Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूरचे प्रश्न जैसे थे

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

@gurubalmaliMT

कोल्हापूर

दोन्ही काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडत युतीने कोल्हापुरात घवघवीत यश मिळवले. यातून भाजप आणि शिवसेनेचा विस्तार झाला. काँग्रेसवाले काम करत नाहीत म्हणून युतीच्या पारड्यात मतांचा गठ्ठा टाकला. अपेक्षा होती की, सरकार सत्तेवर आल्यानंतर जुने प्रश्न सुटतील. पण पाच वर्षांत बहुतेक सर्वच प्रश्न जैसे थे च राहिले आहेत. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विधानसभेची तयारी सर्वच पक्षांच्या वतीने जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी कोल्हापुरात येत आहेत. त्यांना आता कोल्हापूरकर जनताच विचारत आहे,… 'मुख्यमंत्री साहेब, कोल्हापूरचे प्रश्न सुटणार तरी कधी?'

कोल्हापूरला संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही हा इतिहास आहे. थेट पाइपलाइन, टोलमुक्ती, पर्यायी शिवाजी पूल, विमानतळ, रस्ते अशा अनेक प्रश्नांसाठी कोल्हापूरकारांना सतत लढा उभारावा लागला. अनेक वर्षांच्या लढाईनंतर काही प्रश्न मार्गी लागले. पण काही प्रश्नांसाठी सुरू असलेले आंदोलन पाहता ही लढाई संपणार नाही असेच सध्याचे चित्र आहे. आघाडीचे राज्य गेले, युतीच्या राज्यात तरी काही प्रश्नांची तड लागेल अशी अपेक्षा होती, पण टोल वगळता इतर सर्व प्रश्न कायम आहेत. आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तरी यातील महत्वाचे प्रश्न मार्गी लागतील का, असा सवाल कोल्हापूरकरांमधून होत आहे.

कागल येथे दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत. विधानसभा निवडणुका आता तोंडावर आहेत. लोकसभेच्या दोन्ही जागा युतीला मिळाल्याने युतीत उत्साह आहे. यामुळे विधानसभेची देखील जोरात तयारी सुरू आहे. पण राजकीय यश मिळत असताना कोल्हापूरच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण त्यांनी लक्ष घातले तरच कोल्हापूरचे काही प्रश्न सुटणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने राज्यातील दोन नंबरचे मंत्रीपद या जिल्ह्याला मिळाले आहे. राज्यात एक आणि दोन नंबरच्या मंत्र्यांनी ठरवले तरी काहीही होऊ शकते. यामुळे या दोघांनी आता कोल्हापूरच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त होत आहे.

......

खंडपीठाची ऑर्डर कधी ?

खंडपीठासाठी लढा तापत असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांनी अकराशे कोटींची घोषणा केली. पण एक रूपयाही निधी दिला नाही. मुख्य न्यायमूर्तींकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता असताना त्यामध्ये त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. खंडपीठाच्या जागेचा प्रश्नही कायम आहे.

....

उद्घाटनाच्या प्रतीक्षेत चित्रनगरी

चित्रनगरी दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते उद्घाटन करण्याचा काहींचा अट्टाहास आहे. कागलला दोन वर्षात तीन दौरे करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना वाटेवर असणाऱ्या चित्रनगरीच्या उद्घाटनाला वेळ का मिळत नाही, अशी विचारणा होत आहे. उद्घाटनाअभावी चित्रीकरणावर मर्यादा येत आहेत. किमान आचारसंहिता लागण्यापूर्वी तरी उद्घाटनाचा नारळ मुख्यमंत्र्यांनी फोडायला हवा. सरकारने लक्ष न घातल्याने लता मंगेशकरांनी जयप्रभा स्टुडिओबाबतची न्यायालयीन लढाई जिंकली आणि जयप्रभा पूर्णपणे त्यांच्या मालकीचा झाला. आता सरकारनेच लक्ष घातले तर जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व टिकणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 'शब्द ' टाकावा, अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे

...

तीर्थक्षेत्र आराखडा कागदावरच

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा अनेक वर्षे कागदावरच आहे. दोन हजारावरून हा आराखडा सव्वा दोनशे कोटीपर्यंत खाली आला. पण केवळ केवळ चाळीस कोटी निधी जिल्ह्यात पाहोचला आहे. तो देखील खर्च झाला नाही. अंबाबाईचा निवडणुकीला आशिर्वाद घ्यायचा अन निधी मात्र द्यायचा नाही, हा विरोधाभास आहे. शहराचा विकास होण्यासाठी हा निधी मुख्यमंत्र्यांनी तातडीने देण्याची गरज आहे.

...

वीज दराने उद्योग अडचणीत

राज्यात इतरत्र वीज दरात सवलती देत असताना कोल्हापुरात मात्र औद्योगिक विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. यामुळे उद्योग अडचणीत आले आहेत. याबाबत उद्योजकांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही. हीच अवस्था विद्यापीठाला जाहीर केलेल्या निधीची आहे. सात वर्षापूर्वी जाहीर झालेले पन्नास कोटी अजूनही विद्यापीठाला मिळालेले नाहीत.

दोन महिन्यातच विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे कोल्हापूरला काही मिळण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा दौरा महत्वाचा आहे. या निमित्ताने कोल्हापूरला काही तरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री करू शकतात. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत.

..............

चौकट

या प्रश्नांची तड कधी ?

चित्रनगरीच्या उद्घाटनाची दोन वर्षानंतरही प्रतीक्षाच

खंडपीठासाठी मुख्य न्यायमूर्तींकडे पाठपुरावा

पोलिस आयुक्तालयाची घोषणा हवेतच

विद्यापीठाला निधी जाहीर, पण मिळणार कधी

प्राधिकरणाची स्थापना, सुविधांची वानवाच

जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी सरकारचा पुढाकार हवा

सीपीआरला निधीची कमतरता, मुलभूत सुविधांची वानवा

थेट पाइपलाइन योजनेला दहा टक्केच निधी

विजेचे वाढलेले दर कमी कधी होणार ?

शाहू समाधी स्थळाला निधी मिळणार का?

शाहू मिलमध्ये शाहूंचे आंतरराष्ट्रीय स्मारक कधी होणार?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'बालकामगार निर्मूलनासाठी समाजाच्या मदतीची गरज'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर बालकामगार ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. देशातील बालमजुरी रोखण्यासाठी बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम कायद्याच्या अंमलबजावणीसह बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी समाजाच्या मदतीची गरज आहे असे प्रतिपादन बालकल्याण समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी केले. सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर व इचलकरंजी यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त आयोजित परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बुधवारी बोलत होते. उद्यमनगर येथील इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात परिसंवाद पार पडला डॉ. पाटील म्हणाले, 'बालकामगार कायदा अस्तित्वात असला तरी केवळ कायद्याच्या माध्यमातून या प्रथेविरोधात काम करणे शक्य नाही. त्यासाठी समाजाच्या मदतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. वेळोवेळी बालकामगार कायद्यात दुरुस्ती करून बालकामगार समस्येच्या निर्मूलनासाठी शासनाकडून प्रयत्न झाले आहेत. १४ वर्षांखालील मुलांना काम करण्यास कायद्याने बंदी घातली आहे. सद्य:स्थितीत कायद्याच्या अंमलबजावणीवर अधिक चांगल्या प्रकारात भर देणे आवश्यक आहे. बालकामगारांच्या प्रश्नांविषयी समाजात जी उदासीनता आहे ती दूर व्हावी. त्यांना शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवता कामा नये. देशात बालमजुरांची संख्या खूपच मोठी आहे. त्यामुळे बालमजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा.' पाटील म्हणाले, 'बालमजूर म्हणून काम करणाऱ्या मुलांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी अतिशय दारिद्र्याची असते. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्या मुलांकडे कोणतेही साधन असत नाही. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसाठी मुलांना झगडावे लागते. आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे शिक्षण दिल्यास बालमजुरीचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल. त्यासाठी बालमजुरांच्या मूलभूत गरजांकडे अधिक प्राधान्याने लक्ष दिले जावे. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आपण काहीतरी ठोस प्रयत्न करायला हवेत असे समाजभान सामाजिक घटकांनी ठेवणे गरजेचे आहे.' जिल्हा न्यायाधीश एम. के. जाधव म्हणाले, 'समााजातील प्रत्येक नागरिकाला बालकामगारांबाबत न्याय मागण्याचा अधिकार आहे. आपल्या परिसरात बालकामगार असल्यास त्याबद्दल तक्रार करण्याचा संपूर्ण अधिकार कुठल्याही व्यक्तीला आहे. यावेळी उपस्थितांनी 'मी माझ्या व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी बालकामगार ठेवणार नाही आणि असेल तर त्याला त्वरित मुक्त करून त्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न करेन' अशी शपथ घेतली.' यावेळी ज्ञानेश्वर मिरजकर, मोहन सोनार, अश्विनी वाघ, राहुल तोडकर, यशवंत हुंबे, संजय महानवा उपस्थित होते. सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: मे महिन्यात अंबाबाई चरणी कोटींचे दान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मे महिन्याच्या उन्हाळी सुटीत आलेल्या पर्यटकांमुळे देवीच्या खजिन्यात एक कोटी ७ लाख २९ हजार ४३० रूपयांचे देणगीमूल्य जमा झाले. देवस्थानच्या आजवरच्या इतिहासात एका महिन्यात उच्चांकी दान जमा होण्याची पहिलीच घटना असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांना दिली.

जाधव म्हणाले, 'गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी सुटीत कोल्हापुरात पर्यटकांची संख्या वाढली आहे. यंदाही मे महिन्याच्या सुटीत लाखो भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेत अंबाबाईच्या दानपेटीत रोख रक्कम स्वरूपात दान दिले. देवस्थान समितीच्या नियमानुसार मे महिन्यात दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या देणगीमूल्याची मोजणी १० ते १२ जून या तीन दिवसांच्या कालावधीत गरूड मंडप येथे करण्यात आली. बुधवारी रात्री ही मोजणी पूर्ण झाली. १० जून रोजीच्या पहिल्या दिवशीच्या मोजणीमध्ये ३४ लाख ५८ हजार ९४ रुपयांचे दान मोजण्यात आले. तर ११ जून रोजीच्या मोजणीत ४३ लाख ३७ हजार ८०४ रुपये दान मोजण्यात आले. बुधवारी १२ जून रोजी दानपेट्यांमधील २९ लाख ३३ हजार ५३२ रुपयांच्या रकमेची मोजदाद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समुपदेशन

$
0
0

करिअर निवडीचा महामार्ग: कलचाचणी

दिवाकर ठाणेकर

गेली दोन वर्षे शाळेमधून कल चाचणी दिली जात आहे. यावर्षापासून यासोबत काही क्षमता चाचण्या समाविष्ट केल्या आहेत. त्याचा निकाल देखील परीक्षेवेळी दिला आहे. पण याला मर्यादा आहेत. या चाचण्या मोबाइलवर घेतल्या जातात. त्याकडे विद्यार्थ्यांनी कितपत लक्ष दिले असेल हे सांगता येत नाही. यासाठी केाणतेही अभ्यास प्रश्न सोडवून घेतलेले नाहीत. चाचणी देणारे शिक्षक हे प्रशिक्षित असतीलच असे नाही. चाचणी सुरू असताना योग्य मार्गदर्शन झाले असेल असे नाही. कोणत्याही शाखेकडे प्रवेश घेताना त्यासाठी बुद्धिमत्तमापन होणे गरजेचे असते. यासोबतच व्यक्तीमत्त्वदेखील पाहणे महत्त्वाचे आहे. अलीकडे यामध्ये जास्त समस्या दिसून येत आहेत. कुटुंबातील सुसंवाद कमी होत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या विकासावर होत आहे. मुलांमधील तापटपणा वाढला आहे. सगळ्यात महत्त्वाचे समुपदेशन आहे. सरकारने शाळा स्तरावर समुपदेशन करण्याविषयी कळविले आहे. मात्र केवळ कसोटीचा निकाल सांगण्याचे काम होत आहे. यामधून विद्यार्थी व पालकांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम सुरू आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना नेमका कोणता अभ्यासक्रम निवडावा यासंबंधी मार्गदर्शन होत नाही. विद्यार्थ्यांने नेमका कोणता अभ्यासक्रम निवडावा याचे मार्गदर्शन होत नाही. बहुतांश विद्यार्थ्यांचा कल एकापेक्षा अनेक शाखेकडे येतो अशा वेळी नेमके काय करावे, हे सांगता येत नाही. समुपदेशनमध्ये एक तत्व सांगितले आहे की एक वेळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन नाही केले तरी चालेल पण चुकीचे मार्गदर्शन व समुपदेशन करू नका.

मानसशास्त्रीय कसोटीचे महत्त्व आणि उपयोग

मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यात मानसशास्त्रीय कसोटीचे महत्त्व लक्षात येते. विद्यार्थ्यांच्या अंगी कोणते गुण आहेत, कोणत्या उणिवा आहेत हे सांगता येते. मानसशास्त्रीय कसोटी अर्थानुसार विद्यार्थ्यांच्या गुणविशेषाबद्दल वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्याचे योग्य साधन म्हणजे मानसशास्त्रीय कसोटी होय.

\Bअभिरुची संपन्न

\Bया कसोट्या कंटाळा न येणाऱ्या असतात. कसोटी सोडविताना एका लयीत सोडविता येतात.

\Bसाधेपणा :\B कसोटीमध्ये साधेपणा असतो. कोणतीही अडचण येत नाही.

\Bप्रमाणित :\B कसोटी तयार करताना विद्यार्थी वयोगट समोर ठेवून केली जाते. कसोटीमधील प्रश्न तयार करताना विद्यार्थी वयोगटानुसार काठीण्य पातळी ठेवली जाते.

\Bविश्वसनीयता :\B या कसोट्या तयार केल्यानंतर त्या विविध विद्यार्थी गटांना देऊन त्यांची प्रमाणके काढली जातात. त्यामुळे या कसोट्या विश्वसनीय आहेत. आजही य कसोट्यांची विश्वसनीयता टिकून आहे.

\Bविश्वासार्हता :\B विद्यार्थी वयोगटानुसार प्रमाणके तयार केल्यामुळे त्या कसोट्यांची विश्वासार्हता आजही टिकून आहे.

\Bमानसशास्त्रीय कसोटीचे उपयोग

\Bया गुणांच्या आधारे त्याला कोणता अभ्यासक्रम अथवा प्रशिक्षण योग्य होईल हे सांगता येते. त्याच्या अंगी असणाऱ्या विविध क्षमतामुळे व्यावसायिक जीवनामध्ये कसा उपयोग होईल हे स्पष्ट होते. समान बुद्ध्यांक असणारे विद्यार्थी दोन वेगवेगळ्या व्यवसायांना पात्र होतात हे आपणाला या कसोटीमुळे समजते. विद्यार्थ्यांमधील विविधता समजते. शालेय प्रगतीची भाकित करणे शक्य होते. विद्यार्थ्यांमधील विविध विषयांची प्रगती व उणिवांचे भाकित करता येते. या कसोट्या शाळेत घेतल्या तर शाळेतील अध्यापनाचे मूल्यमापनदेखील करता येते. त्यांच्या भविष्यातील विकासाचे चित्र समजू शकते. विद्यार्थ्यासोबत पालकांना देखील मार्गदर्शन करता येते. पालकांना विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षांचा अभ्यास करून योग्य मार्गदर्शन करता येते. पालक आणि विद्यार्थीमधील कौटुंबीक समस्यांचे निदान होते. समुपदेशनातून मार्ग काढता येतो. विद्यार्थ्यांमधील भावनिक समस्यांचे निदान करुन समुपदेशनातून त्यावर उपाय शोधता येतो. विद्यार्थ्यांसोबत पालकांचे देखील समुपदेशन करता येते.

\Bमानसशास्त्रीय कसोट्या प्रकार

बुद्धिमत्ता कसोटी :\B विद्यार्थ्यांमधील बुध्यांक पाहण्याची कसोटी आहे. यामधून विद्यार्थ्याला कोणता अभ्यासक्रम योग्य आहे का हे सांगता येते. \Bअभियोग्यता कसोटी :\B छोट्या नऊ कसोट्या आहेत. या सर्व क्षमता वापरुन योग्य अभ्यासक्रम निवडणे सोपे जाते.

\Bकलचाचणी :\B कसोटीमधून विद्यार्थ्यांची आवड समजते.

\Bव्यक्तिमत्व कसोटी : \Bही सर्वात महत्त्वाची कसोटी आहे. यामधून विद्यार्थ्यांचे समयोजन कसे आहे हे समजते.

\Bसमुपदेशन संस्था

\Bताराबाई रोडवरील अखिल भारतीय व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन संस्था कोल्हापूरतर्फे या कसोट्या प्रशिक्षित समुपदेशक घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाते. तसेच केवळ एकदा समुपदेशन केले म्हणजे संपले असे नाही. विद्यार्थी व पालक तेथून पुढे केव्हाही मार्गदर्शन व समुपदेशनसाठी संस्थेमध्ये येऊ शकतात. या संस्थेतर्फे आयोजित कसोटी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची नावनोंदणी करुन त्यांना त्यांच्या सोयीनुसार कसोटी कार्यक्रमाचा दिवस सांगितला जातो. कसोटी दिवशी त्यांना संपूर्ण माहिती दिली जाते. तसेच कसोटीमध्ये पास, नापास असे काहीही नाही असे सांगून त्यांच्या मनातील भीती काढली जाते. प्रत्येक कसोटीच्या आधी अभ्यास प्रश्न सोडवून मग कसोटी दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी कसोटी समजून मगच सोडवितात. कसोटी सुरू असताना समुपदेशक हजर असल्यामुळे त्याचे त्यावर लक्ष असते. विद्यार्थी मनापासून या कसोट्या सोडवितात. दुसऱ्या दिवशी कसोट्याचे तपासणी व मूल्यमापन केले जाते. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचा व्यक्तिगत अभ्यास केला जातो. तिसऱ्या दिवशी समुपदेशन घेतले जाते. त्यामध्ये प्रथम पालकांना सर्व कसोट्यांची माहिती दिली जाते. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी व पालकांचे वैयक्तिक समुपदेशन केले जाते. याप्रमाणे या संस्थेमार्फत कसोटी कार्यक्रम आयोजित केला जातो.

(लेखक अखिल भारतीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेत समुपदेशक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढप्रश्नी लवकरच मुंबईत बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विजेची दरवाढ कमी करण्याबाबत लवकरच उद्योजकांची मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पाच वर्षात विजेचे दर स्थिर राहतील असे सांगत सत्तेवर आलेल्या युती सरकारने वीस टक्के दरवाढ केल्याच्या विरोधात येथील उद्योजकांनी गुरूवारी कागल येथील शाहू कारखान्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी त्यांनी बैठकीचे आश्वासन दिले.

गेल्या पाच वर्षांपासून दरवाढीच्या विरोधात जिल्ह्यातील उद्योजक आंदोलन करत आहेत. विजेच्या प्रश्नावर कर्नाटकात स्थलांतर करण्याचा इशाराही देण्यात आला. पण सरकारने त्याची कोणतीच दखल घेतली नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काही ठोस निर्णय घेतील या अपेक्षेने उद्योजकांनी भेट घेतली. पण केवळ बैठकीचे आश्वासन मिळाले.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने पाच वर्षात २५ ते ३० टक्के वीज दरवाढ केली आहे. राज्यातील वीज दर हे शेजारच्या राज्यांच्या तुलनेत २५ ते ३५ टक्के जास्त आहेत. या दरवाढीने उद्योगांवर अतिशय विपरीत व गंभीर परिणाम होत आहे. यामुळे येथील उद्योग राष्ट्रीय व जागतिक स्पर्धेत टिकू शकणार नाहीत. याचा फटका औद्योगिक, व्यापारी, शेती, हॉटेल्स, टिंबर उद्योग या सर्वच वीज ग्राहकांना बसत आहे. यामुळे उद्योग सुरू ठेवणे कठीण होत आहे. यामुळे उद्योजकांत मोठी नाराजी आहे.

इंजिनिअरिंग उद्योगावर वीजदरवाढीने सातत्याने अन्याय केला जात आहे. यामुळे उद्योगावरील संकट दूर करण्यासाठी वीज दरवाढ कमी करा, वाढीव स्थिर आकार रद्द करा, पॉवर फॅक्टरमधील सूट पूर्वीप्रमाणे सुरू ठेवा, लघु दाब ग्राहकांच्या वर्गवारीत सुधारणा करा, व्यापारी वीजदरवाढ पूर्णपणे रद्द करा, अशा मागण्या यावेळी निवेदनाव्दारे करण्यात आल्या.

मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात कोल्हापूर इंजिनिअरिग असोसिएशन, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, शिरोली मॅन्यूफॅक्चरर्स असो., गोकुळशिरगाव मॅन्यूफॅक्चरिंग असो., इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाऊंड्रीमेन यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये संजय शेटे, सुमित चौगले, संगीता नलवडे, चंद्रकांत जाधव, हरिशचंद्र धोत्रे, लक्ष्मीदास पटेल, राजू पाटील, अतुल आरवाडे, सुरेंद्र जैन, योगेश कुलकर्णी, उदय दुधाणे , जितेंद्र गांधी आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदलीवरुन संघर्षाची चिन्हे

$
0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चुकीची माहिती भरुन सोयीच्या ठिकाणी बदली करुन घेतलेल्या ११८ शिक्षकांवरील कारवाईचा प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात शिक्षकांनी कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांत कारवाईवरुन मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. काही पदाधिकारी उघडपणे शिक्षकांची पाठराखण करत असल्याची भावना सदस्यांत बळावत असल्याने नजीकच्या काळात पदाधिकारी विरोधात सदस्य असा संघर्ष घडण्याची चिन्हे दिसत आहेत. कारवाईवरुन प्रशासन आणि पदाधिकारी असा सामना रंगणार हे स्पष्ट आहे.

सभागृहातील ठराव डावलून व अन्य सदस्यांना विचारात न घेता ठराविक पदाधिकाऱ्यांनी परस्पर चालविलेला कारभार बहुसंख्य सदस्यांना मान्य नाही. सभेतील ठरावानुसार शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी पत्रे ते प्रशासनाला देत आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे, राजेश पाटील आदींनी बुधवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांचा हा प्रयत्न फोल ठरला.

मुंबई दौऱ्यावरुन परतल्यानंतर जि.प.च्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना 'त्या' शिक्षकांची पाठराखण केली. गटनेते अरुण इंगवले म्हणाले, 'बहुसंख्य शिक्षकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली आहे. ऑनलाइन माहिती मुख्याध्यापकांनी भरली आहे. यामुळे शिक्षकांना दोषी धरणे योग्य नाही. ९९ शिक्षकांचा काही दोष नाही. त्यांच्यावर बदलीची कारवाई होऊ नये. वेतनवाढ रोखण्यापासून त्यांना सवलत मिळू शकते.'

शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांनी पत्रकार परिषदेतील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठरावाविषयी वादग्रस्त विधान केले. घाटगे म्हणाले, 'प्राथमिक शिक्षकांकडून झालेल्या एका चुकीवर प्रशासनाने दोन शिक्षा प्रस्तावित केल्या होत्या. हे उचित वाटत नव्हते. ९९ शिक्षक हे निर्दोष असून त्यांच्यावर कारवाई होऊ नये. त्यांना न्याय देण्यासाठी मंत्रालयापर्यंत प्रयत्न केले. शिवाय सर्वसाधारण सभेतील असे ठराव सरकारी पातळीवर टिकत नाहीत, त्यांना फारसा अर्थ उरत नाही. शिवाय सभागृहात वेगवेगळे ठराव झाले होते. मुंबईतील बैठकीत वरिष्ठांपुढे सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत. शिक्षकांनी जाणूनबुजून चुका केलेल्या नाहीत. यामुळे याप्रश्नी शिक्षकांची पुन्हा एकदा सुनावणी घेऊन त्यांची बाजू ऐकली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.' घाटगे हे भूमिका मांडत असतानाच पन्हाळा तालुक्यातील सदस्य शंकर पाटील यांनी सर्वसाधारण सभेत दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठराव केला होता, आपण स्वत: तो ठराव मांडला असल्याचे पत्रकारांच्या निदर्शनास आणले.

....

शिक्षक जाणार कोर्टात

प्रशासन, शिक्षकांवर बदलीच्या कारवाईवर ठाम आहे. याविरोधात शिक्षकांनी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक संघटनेचे नेते व शिक्षकांत चर्चा झाली आहे. शिक्षक व्यक्तिगत पातळीवर कोर्टात आव्हान देणार आहेत. संघटनेच्या कारभाऱ्यांनी जि.प. पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. दुसरीकडे शिक्षक बदलीवरुन जि.प. पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वरिष्ठांनी कानपिचक्या दिल्याचे वृत्त आहे.

...

कोट

' बदलीसाठी चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांची यापूर्वी सुनावणी झाली आहे. आता पुन्हा सुनावणी घेण्याची आवश्यकता भासत नाही. दोषी शिक्षकांवर बदलीची कारवाई होणार हे स्पष्ट आहे.

अमन मित्तल, सीईओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेसाठी टोल फ्री क्रमांक, अॅप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे, शहर आणि परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या उपकरणांत बिघाड अशा समस्या उद्भवतात. वीज पुरवठा खंडीत झाला तर कर्मचाऱ्यांवर दोष ठेवण्यापेक्षा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच महावितरणच्या अॅपवरूनही तक्रार करता येऊ शकते, अशी माहिती महावितरणने दिली आहे. ही सुविधा २४ तास कार्यान्वित असणार असेल.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून शहरातील ट्रान्सफार्मर दुरुस्ती, फिडर पिलरच्या दरवाजांची देखभाल दुरुस्ती, उघड्यावरील वायरिंग बंदिस्त अशा उपाययोजना केल्या आहेत. विद्युतवाहिनींना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फाद्यांची काटछाट केली आहे. शहरातील २५ उपविभागांत उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती महावितरणचे कोल्हापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील माने यांनी दिली.

महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध केले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यास पाच ते दहा मिनिटे थांबून महावितरणच्या टोल फ्री क्रमांकाला फोन करावा. विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कंपनीने १९१२, १८००२३३३४३५ व १८००१०२३४३५ अशा तीन टोल फ्री क्रमांकाची सोय केली आहे. मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. आलेल्या तक्रारी जनमित्र व अभियंत्यामार्फत पोहचवून निराकरण केले जाते. टोल फ्री क्रमांक वीजबिलावर छापलेले आहेत. महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारेही विजेसंबंधीच्या तक्रारी नोंदविता येतात अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

वीज गेल्यावर काय करावे

घरामध्ये आरसीसीबी (रेसिड्युल करंट सर्किट ब्रेकर) किंवा इएलसीबी (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) स्वीच असणे गरजेचे.

अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे, गरजेनुसार त्याची तपासणी करावी

वीज उपकरणे, वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी

वीज उपकरणे हाताळताना पायात स्लीपर घालावी.

वीज पुरवठा बंद असल्याची खात्री करावी

विद्युत खांबाला जनावरे बांधू नयेत

खांबाच्या खाली गोठा किंवा कडब्याची गंजी नको

विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये

नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीपंप, स्टार्टर, वीजमीटरबाबत दक्षता घ्यावी

कर्मचाऱ्याशीच संपर्क साधा

महावितरणने नागरिकांना पावसाळयाच्या कालावधीत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. महावितरणने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, 'विजेची यंत्रणा ही मोबाइल फोनप्रमाणे एका ठिकाणी बसून चालू अथवा बंद करता येत नाही. जेव्हा वीज पुरवठा खंडीत होतो, त्यावेळी वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीज पुरवठा आहे की नाही, याची खात्री करत असतात. रात्री, अपरात्री गेलेली वीज काही वेळात परत येत असेल तर त्यावेळी कर्मचारी भर पावसात, अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलवर चढलेला असतो. तेव्हा कुठे वीज येते. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांना दोष देण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजून घेतली पाहिजे. कारण गेलेली वीज पुन्हा येईल, पण गेलेला वीज पुन्हा येणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चरणपादुका’पुस्तकाचे प्रकाशन

$
0
0

कोल्हापूर: संजय नारायण वेंगुर्लेकर लिखित 'चरणपादुका'पुस्तकात प्रकाशन करण्यात आले. गुजरी रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात कार्यक्रम झाला. मठाचे जयप्रकाश बाबूराव महिंद्रकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी चंद्रशेखर महिंद्रकर, धनंजय महिंद्रकर, स्नेहलता महिंद्रकर, राजश्री महिंद्रकर उपस्थित होते. या अंकामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची माहिती आहे. ४४८ पानी पुस्तक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालेय साहित्य खरेदी जोरात

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील सीबीएससी माध्यमातील शाळा गेल्या आठवड्यापासूनच सुरू झाल्या असून मराठी आणि इंग्रजी माध्यमातील बहुतांश शाळा १७ जूनपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय साहित्य खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारपेठेत गर्दी होत आहे. मुलांना हवे ते साहित्य वेळेत मिळावे यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. दप्तर, वह्या, पुस्तके, गणवेश याबरोबर टिफिन बॉक्स, वॉटरबॅग खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. महाद्वार रोड, महानगरपालिका परिसरातील लुगडी ओळ, जनता बाजार चौक इत्यादी ठिकाणांसह बझार, स्टोअर्ससह मॉलमध्ये शैक्षणिक साहित्याची बाजारपेठ सजली आहे.

शाळा सुरू होताना नवी कोरी पुस्तके, वह्या हव्यात असा हट्ट मुलांचा असतो. त्यामुळे नव्या ट्रेंडनुसार आवश्यक शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनी उपलब्ध केले आहे. पाऊस सुरू होण्याआधी साहित्य खरेदी केले जावे या उद्देशाने पालक व मुले खरेदीसाठी घाई करत आहेत. वह्या-पुस्तके, छत्री, रेनकोट, कंपासपेटी, लंच बॉक्स आधी वस्तूची खरेदी करताना त्यामध्ये नव्या आकर्षक पद्धतीने बनवलेल्या वस्तूंना अधिक मागणी आहे. बदलत्या काळानुसार मुलांच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. कार्टूनची चित्र असणारा प्लास्टिक कंपास बॉक्सला मुले अधिक पसंती देतात. शालेय साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी नव्या ट्रेंडी पद्धतीचा अभ्यास करत साहित्य बाजारपेठेत दाखल केले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांनी सजलेल्या कलरफुल बाजारपेठेचा अनुभव पालक, विद्यार्थ्यांना येत आहे. काही विक्रेत्यांकडून संपूर्ण एकत्रित साहित्य खरेदी केल्यानंतर डिस्काउंट दिला जात आहे.

गणवेश खरेदीला प्राधान्य

शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे गणवेश काही ठराविक दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. इंग्रजी शाळांकडे वाढता कल पाहता त्यांच्या गणवेशाचे अनुकरण मराठी शाळांनी केल्याचे दिसते. काही शाळांचे रंगीबेरंगी शर्ट पँटचे सेट तयार आहेत. अनेक शाळांनी स्वतःचे ड्रेसकोड तयार करून घेतले आहेत. यात बेल्ट व स्वेटरचा समावेश आहे. स्वेटर व शर्टवर शाळेचा लोगो लावण्याचा नवा ट्रेंड रुजत आहे.

शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. यंदा काहीशी दरवाढ झाली असली तरी काही विक्रेते सवलत देत आहेत. त्यामुळे पालक बजेटनुसार खरेदीला प्राधान्य देत आहेत. मुलांचा आकर्षक शालेय वस्तूकडे अधिक कल असल्याने त्याच पद्धतीने बाजारपेठ सजवण्यात आली आहे.

- दीपक माईंगडे, विक्रेता

शाळकरी मुलांना प्रत्येक वस्तू नवीन हवी असते. त्यात आकर्षक वस्तू दिसल्यास मुले हट्ट करतात. यंदा काहीशी दरवाढ झाल्यामुळे बजेट वाढणार आहे. मात्र एकत्रित साहित्य खरेदी केल्यास काही प्रमाणात डिस्काउंट दिला जात आहे. पावसाळ्याआधी खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देत आहोत.

- रितेश पाटील, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मृग नक्षत्राची सुरुवात होवूनही पाठ फिरवलेला पाऊस गुरुवारी कोल्हापूर शहर आणि परिसरात दमदारपणे बरसला. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी कोसळत राहिल्याने नागरिकांसह शेतकरीवर्ग सुखावला. सायंकाळ सहानंतर सलग दीड, दोन तास पावसाने हजेरी लावल्याने शहरातील प्रमुख रस्ते जलमय बनले. शहरातील बाजारपेठांवरही काही अंशी परिणाम झाला. अनेक भागात संथगतीने वाहतूक सुरू होती.

गगनबावडा, चंदगड, आजरा, राधानगरी तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त आहे. चंदगड तालुक्यातील पोर्ले येथे पावसाच्या तडाख्यामुळे घराचे छत कोसळले. यामध्ये दोन लाख रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. कोल्हापूर शहारातील प्रमुख बाजारपेठेच्या मार्गावरील फेरीवाल्यांची धांदल उडाली. राजारामपुरी जनता बझार चौक, बसंत बहार रोड, जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते महावीर कॉलेजकडे जाणारा मार्ग, जयंती नाल्यावरील पुलावर पाणी साचले. शाहूपुरी, राजारामपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, कसबा बावडा येथील सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागली.

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारी बाराच्या सुमारास काही वेळ पावसाने उघडीप दिली. दोन वाजण्याच्या सुमारास पुन्हा पावसाची रिपरिप वाढली. जवळपास अर्धा पास पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. सायंकाळी सहानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला. कधी दमदार तर कधी पावसाच्या हलक्या सरीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार जिल्ह्यात १४५.६२ मिलिमीटर पाऊस पडला. यामध्ये गगनबावडा येथे सर्वाधिक ३८ , चंदगडमध्ये २४.३३, आजरा येथे १३, करवीरमध्ये १२.२७ मि.मी.पावसाची नोंद आहे.

....

पेरणीची धांदल वेगावली

यंदा वळीव आणि मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली होती. यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला होता. पावसाच्या शक्यतेने शेतीची मशागत केली होती. मात्र नक्षत्राला प्रारंभ होवूनही दमदार पाऊस न झाल्यामुळे चिंतेत असलेला शेतकरी गुरुवारी सुखावला. बुधवारी आणि गुरुवारच्या सलग पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामीण भागात पेरणीची लगबग वाढली आहे. भात, नाचणी, सोयाबीन, भुईमूग पेरणीची धांदल सुरु झाल्याचे चित्र शिवारात नजरेस पडत होते.

......

फोटो

कलेक्टर ऑफिससमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी

कोल्हापूर

खानविलकर पेट्रोल पंपासमोरील चौकात महापालिकेच्या पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागाने रस्ता खोदाई केली आहे. यामुळे महावीर कॉलेजकडून या चौकापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. महावीर कॉलेज, रमणमळा, ताराबाई पार्क, कसबा बावडा, सर्किट हाऊस परिसर या भागात जाणारी वाहतूक खानविलकर पेट्रोल पंप चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याने फिरवली आहे. मुळात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला निवासी संकुलातील वाहने, महावीर गार्डन समोरील वाहने लावलेली असतात. महावीर कॉलेज व कसबा बावड्याकडे जाणारी सगळी वाहतूक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरुन सुरू केल्यामुळे येथील मार्गावर दिवसभरात अनेकवेळा वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात वाहतुकीचा बोजवारा उडाल्यासारखे चित्र होते. चौकातून महावीर कॉलेजकडे जाणाऱ्या मार्गावर सायंकाळी पाणी साचले. शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी व सायंकाळी चौकातून पाटलाचा वाडा हॉटेलकडे जाणारी वाहतूक काही वेळ थांबविली. चौकात बॅरिकेटस लावून वाहतूक नागाळा पार्क, जिल्हा परिषद मार्गाकडे वळविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बियाणे खरेदीसाठी गर्दी

$
0
0

बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, लवकरच पाऊस नियमितपणे सुरू होईल याचा अंदाज आल्याने शेतकरी शेतीची मशागत करू लागला आहे. खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. त्यासाठी आगाऊ बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शहरातील बियाणे विक्रीच्या दुकानांवर गर्दी होत आहे. यंदा बियाण्यांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मान्सून लांबणीवर पडणार असल्याचे संकेत असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या तयारीला काहीसा उशीर लावला होता. मात्र, दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने बाजारात विविध प्रकारची दर्जेदार बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करू लागला आहे. विविध ब्रँडच्या लोकप्रिय बियाणांना अधिक पसंती दिली जात आहे. त्याचबरोबर विकत घेतलेल्या बी-बियाणांच्या खरेदी-विक्रीचे बिल शेतकरी आवर्जून दुकानदारांकडून घेत आहेत. दुकानदारही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बियाणांमुळे नेमका काय फायदा होऊ शकतो याची सविस्तर माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करीत आहेत. भाताच्या वाणाची खरेदी अधिक होत आहे. भाताच्या सुधारित अथवा संकरित वाणांचे बियाणे उपलब्ध असून लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पारंपरिक व सुधारित वाणांना चांगली मागणी आहे.

बियाणे खरेदी करताना घ्या काळजी....

१) बियाण्याच्या पिशवीवर लेबल, सील, संबंधित अधिकाऱ्याची सही, खरेदीची पावती, बियाण्याची जात, प्रकार, लॉट, उगवण शक्ती, शुद्धता, बियाणे वापराचा अंतिम तारीख याविषयी खात्री करा.

२) संबंधित बिले शेतकऱ्यांनी जपून ठेवावीत.

३) घरचे बियाणे वापरताना त्याची उगवण क्षमता तपासा.

४) बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके याबाबतचा दर्जा व भेसळ याबाबत काही शंका असल्यास उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवा.

०००

कोट

पाऊस सुरू झाल्याने बियाणे खरेदीसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी येत आहेत. यंदा काहीशी दरवाढ झाली असूनही खरेदीसाठी उत्साह आहे. बियाणे खरेदी करताना विचारण्यात येणाऱ्या शंकांचे निरसन केले जात आहे.

धैर्यशील पाटील, विक्रेता

०००

पाऊस सुरू झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. बियाणे खरेदी महत्त्वाचा भाग आहे. यंदा दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे खर्चाचे बजेट कोलमडणार आहे. बियाणे खरेदी करताना त्याच्या दर्जाबाबत खात्री करावी.

अमोल पाटील, शेतकरी, बालिंगा

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेचं ठरलंय.. वारं फिरलंय

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

@gurubalMaliMT

कोल्हापूर

लोकसभेला महाराष्ट्रभर गाजलेल्या 'आमचं ठरलंय' पाठोपाठ आता कागलच्या राजकारणात 'जनतेचं ठरलंय.. वारं फिरलंय'चे वारे वाहू लागले आहे. यामुळे विधानसभेचे वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने युतीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे 'परमनंट आमदार' म्हणून फलक झळकवणाऱ्या हसन मुश्रीफ आणि घाटगे यांच्या लढार्इत माजी आमदार संजय घाटगे यांच्या भूमिकेची उत्सुकता निर्माण झाली आहे. दुरंगी की तिरंगी याचीच आता कागल विधानसभेला प्रतीक्षा राहणार आहे.

शेतकरी मेळावा, बँक नामकरण आणि पुतळा अनावरणाच्या निमित्ताने तीन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कागलला आणून घाटगे यांनी मतदारसंघात वातावरणनिर्मिती तर केली आहेच, शिवाय भाजप नेत्यांच्या मनात या गटाच्या ताकदीविषयी आत्मविश्वास निर्माण केला आहे. कामाच्या बळावर आमदार मुश्रीफांनी आतापर्यंत तरी या मतदारसंघात चांगलाच जम बसवला आहे. त्यांची ताकद, काम, राजनीती आणि निवडणूक जिंकण्याचे सारे कसब पाहता त्यांच्या समोर कुणी टिकणार नाही अशीच आतापर्यंतची चर्चा होती. पण चार वर्षात घाटगे यांनी जशात तसे उत्तर देत मतदारसंघात वातावरणनिर्मिती केली आहे. मुश्रीफांनी सतत दखल घ्यावी या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू राहिल्याने या राजकीय विद्यापीठातील वातावरण आता विधानसभेच्या तोंडावर चांगलेच तापणार आहे. हातकणंगले लोकसभेच्या निकालाने अनेकांच्या मनात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे. याला कागल कसे अपवाद असू शकेल ?

राज्यात भाजप सेना युती आहे. त्यामध्ये जिल्ह्यात कागलची जागा भाजपला मिळण्याची दाट शक्यता आहे. पण येथे उमेदवार संजय घाटगे की समरजित हा चार वर्षे चर्चेत असलेला प्रश्न आता संपल्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीने भाजप समरजित यांचे मार्केटिंग करत त्यांना बळ देत आहे आणि समरजितदेखील ज्या पद्धतीने कामाला लागले आहेत ते पाहता त्यांच्या गळ्यात उमेदवारी पडणार हे निश्चित आहे. समरजितची उमेदवारी जाहीर करा, अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे जाहीर कार्यक्रमात केली. यावरून त्यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट होते. मुख्यमंत्रीदेखील तीन तीन वेळा एखाद्याच्या कार्यक्रमाला येत असतील तर त्यावरून काय संदेश त्यांना द्यायचा आहे हे स्पष्ट होते.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या तीन कार्यक्रमांच्या निमित्ताने घाटगेंनी मतदारसंघातील गटाची ताकद दाखवून दिली. याशिवाय मतदारसंघात सातत्याने कार्यरत राहत संपर्क वाढवला आहे. कुणाला तरी पाठिंबा देत विजयाचे शिल्पकार होण्याऐवजी आता हा गट स्वत:च निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला रोखण्यासाठी मुश्रीफांना रोखणे महत्वाचे आहे याची जाणीव भाजपला अर्थात चंद्रकांत पाटील यांना आहे. यामुळेच समरजित यांना ताकद दिली जात आहे. जोपर्यंत मंडलिक, संजय घाटगे गटाची ताकद सोबत येत नाही, तोपर्यंत मुश्रीफांना सहज रोखता येणे शक्य नाही. यामुळे संजय घाटगेंचे पुनवर्सन कसे करायचे हा भाजपसमोरचा मोठा प्रश्न आहे. येत्या दोन महिन्यात त्याच कामाला पालकमंत्री प्राधान्य देण्याची चिन्हे आहेत.

.......

चौकट

विधानसभेची 'परफेक्ट' टायमिंग

गुरूवारी झालेल्या विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण व शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने समरजित यांनी विधानसभेची 'परफेक्ट' टायमिंग साधली. उमेदवारीचे संकेत त्यांच्या पदरात पडले आहेत. त्यामुळे मुश्रीफ आणि समरजित लढाई होत असताना संजय घाटगे यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. कार्यक्रमाला अनुपस्थित राहून त्यांनी नाराजीची झलक दाखवली आहे. त्यामुळे विधानसभेला ते काय करणार याला फार महत्व राहणार आहे. कागलमध्ये पक्षाला फारसे महत्व नाही, तेथे गटाला किंमत आहे. गटांनी ठरवल्याने लोकसभेला शिवसेनेला सत्तर हजाराचे मताधिक्य मिळाले. आता विधानसभेला 'जनतेनं ठरवलंय' म्हणत असताना गट काय ठरवणार यावरच निवडणुकीचा माहोल अवलंबून राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतमाल विक्रीसाठी ६०० स्टॉल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'कृषी विभागाची विविध खाती आता वेगवेगळ्या इमारतीमध्ये आहेत. यामुळे कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होते. हे टाळण्यासाठी शेतीसंबंधीत सर्व कार्यालये एकाच इमारतीत आणण्यासाठी शेतकरी सन्मान भवन उभारले जात आहे. इमारत पूर्ण झाल्यानंतर वर्ष, दीडवर्षात सर्व कार्यालये भवनमध्ये येतील. या ठिकाणी ६०० स्टॉल शेतकऱ्यांनी उत्पादित मालाच्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातील,' असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी दिले. शेंडा पार्क येथे भवनच्या भूमीपूजनानंतर ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'भवनच्या इमारतीसाठी कृषी महाविद्यालयाने तीन एकर जागा दिली आहे. यासाठी सरकारने २९ कोटी, ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भवनमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र असेल. केंद्रात नव नवीन बियाणांचे संशोधन, खते, बियाणांची माहिती मिळेल. विक्रीही करता येईल. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या दृष्टीने भवन अत्यंत उपयुक्त ठरेल.'

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, छत्रपती राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता गजानन खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२ हजार कृषी वीज कनेक्शन प्रलंबित

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मिळून तब्बल २२ हजार शेतकरी कृषीपंप वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी महावितरणकडे पैसे भरुनही अद्याप जोडणी झाली नाही. दुसरीकडे कृषीपंपांच्या वीजदराच्या सवलतीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या तीन वर्षांत राज्य विद्युत नियामक आयोगाने चार वेळा शेती पंप वीज दरात वाढ केली. त्यामुळे वीज दरात व थकबाकीत प्रचंड वाढ झाली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज सवलतीच्या दरात द्यावी तसेच सरकारी पाणी पट्टीच्या सवलतीच्या दराबाबत निर्णय घ्यावा. सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या नावावरील पोकळ व दंडीत सरकारी पाणीपट्टीची थकबाकी माफ करावी, अशी मागणी इरिगेशन फेडरेशनने केली होती. त्यासाठी इरिगेशन फेडरेशनने जानेवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचे आंदोलनही केले होते.

डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वालील आंदोलनात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहीचे पत्र आंदोलनस्थळी दिले होते. त्यामध्ये ३१ जानेवारी, २०१९ अखेर इरिगेशन फेडरेशनच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील मागण्यासंदर्भात निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी महिन्यात ऊर्जा व पाटबंधारे विभागाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन सर्व प्रश्न निकालात काढू, असे म्हटले होते, मात्र आज अखेर कुठलाही निर्णय झाला नाही असा आक्षेप इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी नोंदविला.

२०१४ पासून शेतीसाठीचे वीज कनेक्शन प्रतीक्षेत आहेत. विद्युत लोकपाल मुंबई यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यांनी आदेश देऊनही वीज कनेक्शनची जोडणी झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषीपंपासाठी डिसेंबर २०१८ अखेर दोन्ही जिल्ह्यात मिळून २२ हजार कनेक्शन प्रलंबित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० कोटींचा निवडणूक खर्च बेहिशोबीच

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय खर्चापोटी सरकारकडून आलेल्या २० कोटींचा नेमकेपणाने हिशोब अद्याप प्रशासनास लागलेला नाही. निवडणूक प्रक्रियेवेळी कोणत्या घटकावर किती खर्च केला त्यासंबंधीची नेमकी आकडेवारी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने निवडणूक निधीचा खर्चच बेहिशोबी असल्याचे पुढे आले आहे. निकाल लागून एक महिना होत आला तरी खर्चाचा ताळमेळ बसत नाही. परिणामी प्रचारकाळात उमेदवारांना रोजच्या रोज खर्चाची माहिती न दिल्यास कारवाईची नोटीस देणाऱ्या प्रशासनास आता कोण नोटीस बजावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रथमच यावेळच्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएमला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात आले. याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अपडेटसाठी पाठवण्यासाठी ऑनलाईन माहिती भरण्यावर अधिक भर राहीला. म्हणून यावेळची निवडणूक प्रशासकीय यंत्रणा, सामुग्रीच्यादृष्टीने महागडी झाली. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लागणाऱ्या वाहनात इंधन, अधिकारी कर्मचाऱ्यांचे भत्ते, मतदान केंद्रावर तात्पुरत्या सेवा, सुविधा निर्माण करणे, संवेदनशील केंद्रावर ऑनलाईन वेबकास्टिंग करणे, तपासणी पथक उभारणे, मतमोजणीवेळी आवश्यक इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी करणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांना चहा, नाष्टा, जेवण पुरवणे अशा विविध खर्चासाठी सरकारने पहिल्या टप्प्यात २० कोटींचा निधी दिला. हा निधी गरजेनुसार वितरीत करण्यात आला.

वितरीत निधी कसा खर्च केला, कोणत्या वस्तू किती रूपयास कोणाकडून खरेदी केल्या त्याचा हिशोब तालुक्याहून अद्यापही जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे आलेला नाही. २३ मे रोजी निकाल लागला, केंद्रात नविन मंत्रिमंडळ स्थापन झाले. तरीही खर्चाचा सविस्तर तपशील एकत्र न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खरेदीमधील वस्तूनिहाय माहिती उपलब्ध होत नसल्याने त्याची फेरपडताळणी आणि लेखा परीक्षणास विलंब होत आहे. उपलब्ध २० कोटी खर्च होऊन आणखी किती निधीची गरज भासणार आहे, हेदेखील स्पष्ट होत नसल्याचे चित्र आहे.

......

कोट

'लोकसभा निवडणूक खर्चासाठी २० कोटींचा निधी आला होता. तो आवश्यकतेनुसार विधानसभा मतदारसंघनिहाय प्रशासकीय खर्चासाठी वितरित केला आहे. निवडणूक कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त कर्मचाऱ्यांना मुक्त केले आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. यामुळे घटकनिहाय केलेल्या खर्चाच्या तपशीलाचा पाठपुरावा करण्यास विलंब होत आहे.

सतीश धुमाळ, उपजिल्हाधिकारी, निवडणूक

....

दैनंदिन कामात व्यस्त

जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदासंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्या विभागाचे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची निवड केली होती. मतदान, निकाल आणि त्यानंतर निवडणूक निधीच्या शेवटच्या पैशाचा हिशोब संकलित करून जिल्हा प्रशासनास देण्याची जबाबदारी यांची आहे. मात्र हे अधिकारी महसूलच्या दैनंदिन कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे.

.......

उमेदवारांना मर्यादा, यंत्रणेस नाही

रिंगणातील प्रत्येक उमेदवारास निवडणुकीत ७० लाख खर्चाची मर्यादा होती. या मर्यादेतच खर्च केला जातो की नाही, त्यांनी प्रचारावेळी किती खर्च केला यावर वॉच ठेवण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पथके तैनात केली होती. या पथकाने नोंदवलेला खर्च आणि उमेदवारांनी दिलेल्या खर्चातील तफावत तपासली गेली. तफावत आढळलेल्या उमेदवारांना कारवाईची नोटीस पाठवण्यात आली. याउलट प्रशासनास कोणत्याही खर्चाची मर्यादा नाही. रोजच्या रोज खर्चाचा हिशोब ठेवणे बंधनकारक नाही. असा निवडणूक आयोगाचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


....तर प्रदेशाध्यक्षपदही स्वीकारीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आतापर्यंत पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. पक्षाची इच्छा असेल आणि तसे आदेश दिल्यास प्रदेशाध्यक्षपदही स्वीकारण्यात येईल,' अशी तयारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी दर्शवली.

शेंडा पार्क येथे नियोजित शेतकरी सन्मान भवनच्या इमारत भूमिपूजनासाठी आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाच्यादृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे हे पद घेण्यासंबंधी त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचक वक्तव्य केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रीय राज्य मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्याकडे देण्यासंबंधी पक्षातर्गंत चर्चा सुरू आहे. या पदासाठी विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेकर, इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी एका नावाची घोषणा होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र त्यांचे नाव मागे पडून चार दिवसांपासून पालकमंत्री पाटील यांची वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप तशी अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र पाटील यांच्या नावाभोवतीच ही चर्चा फिरते आहे. सध्या पाटील यांच्याकडे कोल्हापूर, पुण्याचे पालकमंत्रिपद, महसूल, मदत, पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, कृषी आणि फलोत्पादन खात्याचे मंत्रिपद आहे. त्यामध्ये पक्षाने संधी दिली तर प्रदेशाध्यक्षपदही मिळणार आहे.

.. .. ..

एकच घाटगे उमेदवार...

कागल विधानसभा मतदारसंघात घाटगे उमेदवार आहेत. मात्र उमेदवारी संजय घाटगे की समरजित घाटगे यांना मिळणार यासंबंधीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

.. . . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यांत्रिकीकरणासाठी निधी

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला यांत्रिकीकरणासाठी राज्य सरकारकडून पाच कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, सदस्य अरुण इंगवले, विजय भोजे, राजेश पाटील यांनी मुंबई येथे त्यांची भेट घेतली. जि.प.कडील बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषि विभाग, आरोग्य विभागाशी संबंधित योजना, निधीबाबत चर्चा झाली. यावेळी मंत्री खोत यांनी कृषि विभागासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना शेतीविषयक साहित्य पुरविले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील शिवाजी तंत्रनिकेतन विद्यालय केंद्र तथा औद्योगिक शाळा येथे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावीनंतर ऑटोमोबाइल, मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल या शाखांसाठी तर पीसीएम ग्रुप घेऊन अकरावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीकल मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनन्स, मोटरसायकल सर्व्हिसिंग व इलेक्ट्रॅानिक्स या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

ऑटोमोबाइल, मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल या तीन शाखांसाठी प्रत्येकी ३० जागा उपलब्ध आहेत. तर अकरावीनंतर इलेक्ट्रीकल मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनन्स, मोटरसायकल सर्व्हिसिंग व इलेक्ट्रॅानिक्स या विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्याची सुविधा आहे.

संस्थेतर्फे अभ्यासक्रमासाठी भवानी मंडप येथील मेन राजाराम हायस्कूल, जुना बुधवार पेठ येथील शाहू हायस्कूल, खासबाग येथील प्रायव्हेट हायस्कूल व शाहूपुरी येथील हणमंतराव चाटे हायस्कूल संलग्न आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासगाव - विसापूर मार्गावर जिल्हा बँकेची २५ लाखांची रोकड लुटली

$
0
0

सांगली:

सांगली जिल्ह्यातील तासगाव - विसापूर मार्गावर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेची २५ लाखांची रोकड चार अज्ञात चोरट्यांनी लुटली. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास हा प्रकार घडला.

बँक कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करीत चोरट्यांनी हे कृत्य केले. रक्कम चोरल्यानंतर चोरटे ढवळीच्या (ता. तासगाव) दिशेने पळून गेल्याचे परिसरातील काही नागरिकांनी पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) अधिकारी, कर्मचारी तासगावात दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरीतून ५२ लाखांची लूट, आरोपी फरार

$
0
0

कोल्हापूर:


हवालाची ५२ लाखांची रक्कम तिघांनी लुटून नेल्याची घटना राजारामपुरी परिसरात घडली आहे. ही रक्कम एका हवाला कंपनीची असल्यााची माहिती मिळत असून रात्री उशिरा राजारामपुरी पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतून हवाला ची रक्कम घेऊन संबंधित कंपनीचे दोन कर्मचारी कोल्हापुरात आले होते. राजारामपुरी परिसरात ते थांबले असता तिघा लुटारूंनी त्यांच्या मोटारीवर हल्ला केला. दगडफेक करून या मोटारीतील दोघांना दम दिला. त्यानंतर ही मोटर त्या दोघा कर्मचाऱ्यांना घेऊन ते शाहूवाडीतून आंब्याच्या दिशेने गेले यातील एकाला शाहूवाडीत तर दुसऱ्याला आंबा परिसरात सोडून दिले आणि ५२ लाखांची रक्कम ते तिघे लुटारू घेऊन पसार झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images