Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोलापुरात तीन ठिकाणी आग सोलापुरात दोन ठिकाणी लागलेल्या आगीत किमती साहित्य जळुन खाक पंढरपूर बाजार समितीमधील फटाक्याच्या गोदामालासुद्धा भीषण आग

$
0
0

पंढरपूरमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग

सोलापूर :

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळी एकूण तीन ठिकाणी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पंढरपुरातील बाजार समितीमधील फटाके ठेवलेल्या गोदामाला रविवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत कोणताही अनर्थ घडला नाही. मात्र आगीत साहित्य जाळून मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. तर सोमवारी सकाळी रंगभवन परिसरातील एकूण १६ दुकानांना भीषण आग लागून फर्निचरसह लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील दोन टॉवेल कारखान्यांना आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले.

अग्निशमन दलास रंगभवन येथील आगीची वर्दी पहाटे सव्वातीनच्या सुमारास आली. त्या वेळी अग्निशमन पथक एमाआयडीसीमधील टॉवेल कारखान्यांना लागलेली आग विझवत होते. अग्निशमन दलाच्या पथकाने रंगभवन परिसरात धाव घेतली. तोवर बरीच दुकाने पेटली होती. रंगभवन चौकातील फस्ट चर्चसमोर ही दुकाने आहेत. या ठिकाणी फर्निचर, शोभेच्या वस्तू विक्रीची दुकाने आहेत. काही वेळातच दुकाने जळून खाक झाली. पाण्याचा मारा करून मागील बाजूस असलेली दुकाने आगीपासून वाचवण्यात यश आले आहे. सकाळपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती समजताच पालकमंत्री विजयकुमार देशमुख , आमदार प्रणिती शिंदे आणि महापौर शोभा बनशेट्टी यांनी भेट देऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापूरच्या बाजार समिती सभापतिपदीपालकमंत्री देशमुख यांची बिनविरोध निवड

$
0
0

सोलापूरच्या बाजार समिती सभापतिपदी

पालकमंत्री देशमुख यांची बिनविरोध निवड

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सभापतिपद भाजपकडे आल्याने भाजपची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे. देशमुख यांच्या बिनविरोध निवडीने दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याचे संकेत आहेत.

कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने नवीन सभापती निवडीसाठी सोमवारी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली़ या सभेत सभापतिपदासाठी पालकमंत्री देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जगताप यांनी जाहीर केले.

दरम्यान, रविवारी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या जोडभावी पेठेतील घरी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळीराम साठे यांची बाजार समितीच्या संचालकांसोबत बैठक झाली़ या बैठकीसाठी माजी आमदार दिलीप माने यांनाही आमंत्रित केले होते. मात्र ते आले नाहीत. बैठकीच्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी त्यांनी स्वत: पुन्हा सभापती होण्याची इच्छा व्यक्त केली़ त्या नंतर वेगाने राजकीय घडामोडी घडल्या. त्यात पालकमंत्री देशमुख व अन्य १३ संचालक गुप्त ठिकाणी गेले व त्यांनी पालकमंत्र्यांना सभापती करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ही बाब दिलीप माने यांना समजताच त्यांना धक्का बसला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या नेतेमंडळींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत १३ संचालकांना घेऊन पालकमंत्री अज्ञातस्थळी गेले होते़ सोमवारी सकाळी सर्व संचालक पालकमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानी एकत्र जमले. तेथे बैठक झाल्यानंतर दहाच्या सुमारास पालकमंत्र्यांसह सर्व संचालक बाजार समितीकडे रवाना झाले. बाजार समितीच्या सभागृहात आल्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी सभापतिपदाचा अर्ज भरला. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जगताप यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायगावला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

$
0
0

नायगावला 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

सातारा :

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता 'ब'वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. या बाबतचा निर्णय सोमवारी जारी करण्यात आला असल्याची माहिती ही सुत्रांकडून देण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती घेण्यासाठी त्यांचे जन्मगाव असलेल्या मौजे नायगाव या ठिकाणास विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक सहली वर्षभर भेट देत असतात. या ठिकाणास दर वर्षी पाच लाखांपेक्षा अधिक पर्यटक भेट देतात. ही पार्श्वभूमी विचारात घेवून या पूर्वी 'क' वर्गात असणाऱ्या या पर्यटनस्थळास आता 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांच्या पुतळ्याचेफडणवीसांच्या हस्ते गुरुवारी अनावरण

$
0
0

शिवरायांच्या पुतळ्याचे

फडणवीसांच्या हस्ते गुरुवारी अनावरण

कराड :

जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण येत्या गुरुवारी, १३ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे. या निमित्ताने कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.

पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्याला नरेंद्र पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शेखर चरेगावकर, डॉ. अतुल भोसले, नितीन बानुगडे-पाटील, आमदार पृथ्वीराज देशमुख, शंभुराज देसाई, शिवाजीराव नाईक, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, मदनराव भोसले, सांगली झेडपीचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आदी उपस्थिती राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे बुजले, प्रतीक्षा डांबरीकरणाची

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मध्यवर्ती बस स्थानकाच्या समोरील रिक्षा थांब्याच्या पिछाडीस असलेल्या आणि हॉटेल सह्याद्री, चालुक्यसमोरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. १५ दिवसांपूर्वी याचे खडीकरण करण्यात आले. मात्र नंतर रस्त्याचे काम ठप्प झाले असून ही खडी उखडत आहे. रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण झाले नाही तर पावसाळ्यात या रस्त्याची पुन्हा दूरवस्था होईल अशी स्थिती आहे.

मध्यवर्ती बसस्थानकासमोरील आणि रिक्षा स्टॉपच्या पिछाडीस असलेल्या या रस्त्याचा दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी सर्वाधिक वापर होतो. तर रत्नागिरीकडे जाणारी खासगी वाहने येथे थांबलेली असतात. हॉटेल सह्याद्री ते महाराजा हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी होत नसला तरी पर्यटकांची आणि स्थानिकांची वाहने लावण्यासाठी पार्किंग आहे. गेल्या दहा वर्षात रस्त्याची कोणतीही दुरुस्ती न केल्याने मोठ-मोठे खड्डे पडले होते. परिणामी पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. त्यामुळे वाहनधारक रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करत होते. मात्र त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. १५ दिवसांपूर्वी ताराराणी विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. मोठी खडी, बारीक खडी टाकून रोलर फिरविण्यात आला. मात्र शेवटचा लेअर न टाकल्याने पसरलेली बारीक खडी वाहनांच्या वर्दळीमुळे आजूबाजूला जावून पुन्हा मोठी खडी दिसू लागली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी यावर बारीक खडीचा लेअर न टाकल्यास टाकलेली खडी जावून पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचा दावा केला जात असला तरी दिलेल्या मुदतीत काम न झाल्यास खर्च झालेला निधी वाया जाण्याची शक्यता आहे.

पंधरा दिवसांपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. आठवड्यात रस्त्यावर शेवटचा लेअर टाकण्यात येईल. कोणत्याही स्थितीत रस्त्याचे काम अर्धवट सोडले जाणार नाही.

- हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांनी ‘एनडीए’सोबत यावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला भवितव्य उरलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने राज्यात पवार यांची पॉवरही कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. काँग्रेसची अवस्था बिकट आहे. या परिस्थितीत पवारांना देशाचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी 'एनडीए'मध्ये सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करावे', असे आवाहन केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे सोमवारी केले. केंद्र सरकारने सवर्ण समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला असून, त्याचा विविध समाजघटकांना शिक्षण आणि नोकरीत फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला.

सर्किट हाउस येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी वंचित आघाडीमुळे आम्हाला कसलाही फटका नाही. 'किंचित' परिणाम झाला. नागरिक, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. वंचित आघाडीचा सत्तेपर्यंत पोहचण्याचा मार्ग खडतर आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही 'एनडीए'त सामील व्हावे. सत्ता कशी मिळवायची, मंत्री कसे बनायचे हे विरोधकांनी माझ्याकडून शिकावे. सरकार आणि इव्हीएम मशिनचा काही संबंध नाही. इव्हीएमबद्दल आक्षेप असतील तर विरोधकांनी निवडणूक आयोगाला भेटावे. त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही. निवडणूक आयोगाने मतपत्रिकांच्या आधारे निवडणूक घ्यायचा निर्णय घेतल्यास तशा निवडणुका घेण्यसाची आमची तयारी आहे.'

राहुल गांधी यांनी उलटसुलट बोलून मते घालवली, असे सांगून ते म्हणाले, 'काँग्रेसच्या दारुण पराभवामुळे त्यांना तोंड दाखवायला जागा उरली नाही. विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्यासाठी खटाटोप सुरू आहे. पवार यांच्याविषयी आदर आहे. मात्र इव्हीएमवरुन ते तक्रार करत असतील तर बारामतीतील विजयाबाबत त्यांचे काय म्हणणे आहे, हे त्यांनी सांगावे.'

. .. .. .. ..

रिपाइंला वीस जागा मागणार

'राज्यात भाजप-शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी अशा दोन आघाड्या आहेत. 'वंचित'सारख्या तिसऱ्या आघाडीला महाराष्ट्रात स्थान नाही. रिपाइं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे वीस जागा मागणार आहे. या जागा भाजपच्या कमळ चिन्हावर नव्हे तर, आरपीआयच्या (आठवले गट) चिन्हावर लढणार आहोत. शिवाय राज्य मंत्रिमंडळ विस्तारातही मागणी करणार आहे. राज्यभरातील साठ कार्यकर्त्यांना महामंडळावर प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. कोल्हापुरातील एका कार्यकर्त्याला महामंडळावर संधी दिली जाईल. एकाला संधी मिळाली म्हणून दुसऱ्यांनी नाराज होऊ नये.'

०० ०० ० ०

........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलाढाल कारभाऱ्यांची, धावधाव शिक्षकांची

$
0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑनलाइन बदली प्रक्रियेदरम्यान चुकीची माहिती भरल्याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी शिक्षकांची धावाधाव सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा परिषदेतील दोन तरुण कारभाऱ्यांनी पडद्याआड राहून मोठ्या उलाढाली केल्याचे काही सदस्य आरोप करत आहेत. यामुळे शिक्षक बदली प्रक्रिया आणि त्यानंतरच्या कारवाई प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

ऑनलाइन बदली प्रक्रियेतील घोळावर पांघरुण घालण्यासाठी दोन तरुण कारभाऱ्यांच्या पडद्याआडच्या खेळीमुळे अन्य सदस्य अस्वस्थ बनले आहेत. दोघा कारभाऱ्यांपैकी एक जण तरुण सदस्य आहे, तर दुसरा हा प्रशासनाशी निगडीत विभागातील कारभारी आहे. जिल्हा परिषदेत या दोघांची जोडी प्रसिद्ध असून, त्यांनी शिक्षक संघटनेतील काहीजणांना हाताशी धरुन मोठ्या उलाढाली केल्याची चर्चा वेगावली आहे. या जोडगोळीचा प्रताप अन्य पदाधिकारी, सदस्य व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आला आहे.

गतवर्षी झालेल्या बदली प्रकियेत सुमारे ११८ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे सामोरे आले असून त्यांच्यावर कायमस्वरुपी एक वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईचा ठराव सभागृहाने केला आहे. संभाव्य कारवाईमुळे धास्तावलेल्या शिक्षकांनी सोमवारी जिल्हा परिषदेत धाव घेतली. जि.प.अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे यांची भेट घेऊन गाऱ्हाणी मांडली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शंभरहून अधिक शिक्षक व शिक्षिका एकत्र येऊन व्यथा मांडल्या.

'११८ पैकी ८० टक्के शिक्षक हे परजिल्ह्यातील आहेत. २०१४ मध्ये त्यांनी बदलीसाठी माहिती सादर केली होती. गेल्या वर्षी ऑनलाइन बदली प्रक्रियेदरम्यान प्रशासनाकडून जुनीच माहिती नव्याने सादर केली. यामध्ये शिक्षकांचा काही दोष नाही. बदलीसंदर्भातील माहितीचे पोर्टल मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी भरली होती. त्यामुळे शिक्षकांनी चुकीची माहिती भरली असा शिक्का मारणे योग्य नाही,' अशा भावना त्यांनी मांडल्या.

बदली आणि वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईतून सुटका मिळावी यासाठी सगळे शिक्षक दिवसभर जिल्हा परिषदेत थांबून होते. पदाधिकाऱ्यांपासून सदस्यापर्यंत त्यांनी प्रत्येकासमोर आपली बाजू मांडली. दरम्यान, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने बदलीसाठी चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यासह त्यांची अन्यत्र बदली करावी असा ठराव केला आहे. तत्पूर्वी संबंधित शिक्षकांना नोटिसा काढल्या होत्या. त्यांनी म्हणणे सादर केल्यानंतर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्या दरम्यान १०० शिक्षकांना क्लीन चीट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र सर्वसाधारण सभेने सरसकट सर्वच शिक्षकावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती.

.....

संघटना नेत्यांच्या फेऱ्या वाढल्या

शिक्षकांवरील कारवाईच्या ठरावानंतर शिक्षक संघटनेच्या नेत्यांच्या जिल्हा परिषदेत फेऱ्या वाढल्या आहेत. शिक्षक संघटनेतील कारभारी तर दिवसभर जिल्हा परिषदेत ठिय्या मारुन आहेत. पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन कारवाईतून पळवाट कशी काढता येईल यासाठी वाटाघाटी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल तालुक्यासह परिसरातील रखडलेले सिंचन प्रकल्प ३० जूनपर्यंत मार्गी न लागल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला जाईल. त्यांच्या निवासस्थानासमोर उपोषणाला सुरूवात करू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिला.

नागनवाडी, अंबेओहळ, बेलेवाडी मासा, तमनाकवाडा, माद्याळ तलाव आणि दूधगंगा डाव्या कालव्याच्या देयकांची चौकशी करावी, या मागणीसाठी आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन झाले. आंदोलनात मार्गदर्शन करताना मुश्रीफ यांनी हा इशारा दिला.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'कृष्णा लवादानुसार जिल्ह्यातून वाहून जाणारे १०० टीएमसी पाणी अडवणे गरजेचे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार असताना ८७ टीएमसी पाणी अडवण्यात यश आले. गेल्या चार वर्षात भाजप, शिवसेना सरकारने पाणी अडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या टेबलवर सिंचन प्रकल्पांच्या फायली प्रलंबित आहेत. त्यांची सही होत नसल्याने कामे सुरू होत नाहीत. सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मंत्रालय पातळीवर पाठपुरावा केला. तरीही सरकार दुर्लक्ष करत आहे. धरणासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनीसाठी देण्यात येणारा मोबदला वाढवून देण्यासंबंधीचा निर्णय प्रलंबित आहे. ३२ ते ७६ किलोमीरटचा दूधगंगा डावा कालवा १८ वर्षांपासून रखडला आहे. या कामासाठी १२५ कोटींची प्रशासकीय मान्यता आहे. प्रत्यक्षात कंत्राटदारास ३५० कोटी रुपये दिले आहेत. अजून १२५ कोटी रुपये देय आहेत. सध्या कंत्राटदारांनी यंत्रसामुग्री हलवली आहे. यामुळे या कामांची आणि देय बिलांची चौकशी व्हावी. यावर विधानसभेच्या अधिवेशनातही आवाज उठवणार आहे. ३० जून पर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल.

यावेळी भैया माने, वसंत धुरे यांची भाषणे झाली. जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, मनोज फराकटे, राजेश लाटकर, आर. के. पोवार यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते.

महापौरांची टीका

ठिय्या आंदोलनास महापौर सरिता मोरे यांनी पाठिंबा जाहीर करून पालकमंत्री पाटील यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, 'पालकमंत्री आणि प्रशासनाने कागल तालुक्यातील पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा. अन्यथा आया-बहिणी तुमच्या तोंडचे पाणी पळवतील. दरम्यान, आंदोलनातील बहुतांशी वक्त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आरोप केले.

काम सुरूच

शिष्टमंडळाशी चर्चा करताना जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी अंबेओहळ, नागनवाडी प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले. कामासंबंधी नव्याने सरकारी आदेशाची गरज नसल्याचे सांगितले. यावर आमदार मुश्रीफ यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्या मोबाइलवर फोन करून खात्री करून घेतली. अंबेओहळ प्रकल्पग्रस्तांना भरपाई वाटपाला प्रारंभ करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जाधव यांचे स्मारक उभारू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दलित पँथर व आंबेडकरी चळवळीत दत्ता जाधव यांचे मोठे योगदान होते. कोल्हापुरात स्मारक उभारून त्यांच्या कार्याची ज्योत कायम तेवत ठेवणे हीच खरी आदरांजली ठरेल. आंबेडकरी चळवळींना ताकत देण्यासाठी सगळयांनी गट तट विसरून एकत्र येण्याची गरज आहे. चळवळीतील खालच्या पातळीवरील गटबाजी संपवली पाहिजे,' प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

दलित पँथर, कोल्हापूरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील शाहू स्मारक भवन येथे अभिवादन सभा झाली. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी जाधव यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या. याप्रसंगी आठवले म्हणाले, 'दत्ता जाधव आणि माझे व्यक्तीगतरित्या जिव्हाळ्याचे संबंध होते. आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवित त्यांनी आंबेडकरी चळवळ गतिमान केली. त्यांच्या कार्याच्या स्मृती जपताना कोल्हापुरातील एखाद्या सभागृहाला अथवा वाचनालयाला त्यांचे नाव द्यावे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महापालिका यांच्यासोबत चर्चा करुन स्मारकाच्या कार्याला मूर्त रुप देता येईल.'

आरपीआयचे नेते गंगाधर इंदिसे यांनी दत्ता जाधव म्हणजे आंबेडकरी चळवळीचा खरा योद्धा अशा शब्दांत मोठेपण विशद केले. यावेळी जाधव यांची मुलगी डॉ. चारुशीला, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, प्रा. शहाजी कांबळे, प्रा. विश्वास देशमुख, मंगलराव माळगे, बी. के. कांबळे, अॅड. पंडितराव सडोलीकर, अच्युत माने यांनी जाधव यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. याप्रसंगी उत्तम कांबळे, दगडू भास्कर व जाधव परिवारातील सदस्य उपस्थित होते.

.................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीच्या युवकाचा पंचगंगेत बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

विवाहाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे आलेल्या हुपरीतील युवकाचा येथील पंचगंगा नदीत पोहताना बुडून मृत्यू झाला. भीमराव नेताजी गोसावी (वय ३५ रा. शिवाजीनगर) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

हुपरी येथील भीमराव गोसावी हा नातेवाईकांच्या विवाहानिमित्त इचलकरंजीत आला होता. कार्यक्रमानंतर दुपारच्या सुमारास काही सहकाऱ्यांसमवेत तो पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेला. पंचगंगा नदी पात्रातील बंधाऱ्याचे लाकडी बरगे काढण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह जोरात होता. पोहत असताना अंदाज न आल्याने गोसावी हा पाण्यात बुडला. या घटनेमुळे त्याच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा सुरू केल्याने नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस व जीवनमुक्तीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने गोसावी याची शोधाशोध सुरू केली. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर नदीच्या जुन्या पुलानजीक नदीपात्रात मृतदेह आढळून आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. भीमराव याचा हुपरीत स्क्रॅपचा व्यवसाय होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेला मतपत्रिकेवरचमतदान घेण्यास भाग पाडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येत्या काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघात इव्हीएमऐवजी मतपत्रिकेवरच मतदान होईल. राज्यात काहीही होऊ दे, मात्र कागल विधानसभा मतदारसंघात मतदान असेच होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी व्यक्त केला.

कागलसह परिसरातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनाच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. मुश्रीफ यांनी मतपत्रिकेवरच कागलची विधानसभेसाठी मतदान होईल, असे ठामपणे सांगितल्याने प्रशासनात सोयीचा अर्थ काढला जात आहे. ३६४ पेक्षा अधिक जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगून मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यास भाग पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? अशीही चर्चा सुरू झाली आहे.

'भाजपने राज्य कसे करावे, हे शिकवले तरी सत्ता नसल्याने सामान्यांना झळ बसत आहे. अनेक प्रश्न सुटत नाहीत. भाजप धर्मांध शक्तींना खतपाणी घालत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडले जात आहे,' असाही आरोप आमदार मुश्रीफ यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलाचे व्हावे संवर्धन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पर्यायी पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर तब्बल १४१ वर्षांनी शिवाजी पुलावरील वाहनांचा आवाज थांबला. गेली अनेक दशके या पुलावरून सातत्याने वाहतूक सुरू होती. वाहनांची सोय नसताना, संस्थानकाळात पायी सुरू असलेली ये-जा नंतरच्या काळात बैलगाडी, घोडागाडी या साधनांनी वाढली. आधुनिक युगात तर अनेक मोटारी, बस, ट्रकची वाहतूक याच पुलावरून झाली. आता पर्यायी पूल सुरू झाल्याने शिवाजी पूल अडगळीत न पडता हा हेरिटेज स्पॉट व्हावा अशी प्रशासनासह नातेची इच्छा आहे. नागरीकांची ईच्छा आहे. अर्थात यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

पुलाला चौथ्या शिवाजींचे नाव

महाराणी ताराराणी यांनी कोल्हापुरात मराठ्यांची गादी स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराज पहिले (१७०० ते १७१४), छत्रपती संभाजी महाराज (१७१४ ते १७६०), शिवाजी महाराज दुसरे (१७६० ते ११८१३), संभाजी महाराज उर्फ आबासाहेब (१८१३ ते १८२१), शहाजी महाराज बुवासाहेब (१८२१ ते १८३८), शिवाजी महाराज तिसरे उर्फ बाबासाहेब (१८३८ ते १८६६), राजाराम महाराज (पाटणकर) (१८६६ ते १८७०) यांनी कोल्हापूर राज्याचा कारभार केला. नंतर शिवाजी महाराज चौथे हे राज्यावर आले. ब्रिटीशांनी त्याचा छळ केल्याने त्यांचा अहमदनगरच्या किल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. १८५७च्या बंडानंतर कोल्हापूर संस्थानाचा कारभार पाहण्यासाठी ब्रिटिशांनी पोलिटिकल एजंट नेमला होता. या काळात तयार झालेल्या पुलाला अल्पवयीन शिवाजी चौथे यांचे नाव देण्यात आले.

पुलासाठी चार वर्षांचा कालावधी

कोल्हापूर आणि पन्हाळा या दोन ठिकाणांना जोडण्यााठी ब्रिटीशांनी १८७४ ते १८७८ या कालावधीत हा पूल बांधला. मेजर वॉल्टर मॉर्डन डफेट रॉयल इंजिनीअर्स या कंपनीच्या देखरेखीखाली राजश्री रामचंद्र महादेव आणि कंपनीने चार वर्षांत पूल बांधला. पूल बांधणीच्या काळात दोन पोलिटिकल एजंटची कारकीर्द पूर्ण झाली. जी. एस. अँडरसन यांच्या कारकीर्दीत पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली तर एफ. श्वेंडरच्या कारकीर्दीत पूल पूर्ण झाला. यावेळी संस्थांनाचे कारभारी रावबहाद्दूर महादेव वासुदेव बर्वे होते. नंतर चौथ्या शिवाजींचे नाव पुलाला देण्यात आले.

हेरिटेज कॉरिडॉर शक्य

पंचगंगा नदी परिसर हे पर्यटन स्थळ व्हावे यासाठी शिवाजी पूल हेरिटेज स्पॉट झाला पाहिजे. पुलाची डागडुजी, ब्रिटीशकालीन विद्युत खांबाची पुन्हा नव्याने मांडणी केली पाहिजे. पुलावर पर्यटक व नागरिकांना बसण्यासाठी जुन्या पद्धतीची बाके बसवण्याची गरज आहे. पुलावरुन नदीघाटाचे सौंदर्य न्याहाळताना पाण्याचा प्रवाहही अभ्यासता येऊ शकतो. या परिसरात पिकनिक पॉईंटही आहे. सध्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कल्पनेतून नदीघाट व परिसराचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. गायकवाड वाडा ते शिवाजी पूल असा हेरिटेज वॉकसाठी सुंदर रस्ताही विकसित करता येऊ शकतो. नदी, घाट, पिकनिक पॉईंट आणि शिवाजी पूल असा हेरिटेज कॅरिडॉर विकसित होऊ शकतो.

अश्लर पाषाणातील

अनघड शिवाडी पूल

'संस्थान काळातील अनघड असा हा शिवाजी पूल आहे. त्यासाठी अश्लर पाषाण शिळांचा वापर केला गेला. त्याचा चिरेबंदीपणा अनुभवणे हा अनोखा अनुभव आहे' असे प्रख्यात आर्किटेक्ट मोहन वायचळ यांनी सांगितले. ते म्हणाले, 'पूल अवलोकताना शेजारच्या नव्या बॉक्स स्ट्रक्चरच्या कॉक्रीट पुलाची तुलना करता येते. शिवाजी पुलाच्या उभारणीत वडार, पाथरवट, गवंडी व स्थापतींनी कमानींचा प्रत्येक की-स्टोनवजा पाषाण घडवताना, त्याची अॕक्युरेसी राखलेली पाहता येते. या कमानीखालून जाताना थक्क व्हायला होते. नॅनो-स्केलपेक्षा कमी फरकाने, त्याचा आस घडवताना त्यांच्या कौशल्याची व मेहनतीची दाद द्यावी वाटते. प्रचंड अर्धगोलाकृती व्हेनेशियन कमानी नसूनही, त्या बसक्या दीर्घ वर्तुळाकृती आहेत. इतक्या वर्षांच्या कालावधीत त्यांची प्लेसमेंट तसूभरही बदलली नाही की सांधमोड हलली नाही. याशिवाय चार कोपऱ्यात रोमन अल्कोव्ह उभारुन, त्याला टस्कन स्तंभाने मढवून हे एका अर्थाने तोरणच सुशोभित केले गेले आहे. म्हणजे फिरग्यांनी स्थापतींच्या सहाय्याने हा पूल स्थानिकांच्या सेवेसाठी बहाल करताना जणू नववधू सासरी जाते हीच भावना ठेवून करवीरवासियांना हस्तांतरण केलेले दिसून येते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवणकामाच्या कष्टाला यशाचे धागे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कुटुंबांचा गाडा ओढण्यासाठी शिवणकाम करणारी आई आणि बेताच्या परिस्थितीतही जिद्दीने शिक्षण घेत आईच्या कष्टाचे सार्थक करणाऱ्या मुली, हे मेरी वेदर मैदान परिसरातील मंटूर कुटुंबीयांचे चित्र सुखावणारे आहे. दहावीची परीक्षा म्हणजे स्वतंत्र अभ्यास खोली, खासगी शिकवणी, गाइड, नोट्स असे चित्र असताना दुसरीकडे अशा सुविधांचा मागमूसही नसलेल्या मेघा मल्लिकार्जुन मंटूर या विद्यार्थिनीने ७९.६० टक्के गुण मिळवले आहेत.

मेघाच्या वडिला मल्लिकार्जुन यांचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या पश्चात कुटुंबांची जबाबदारी आई प्रेमा यांच्यावर आली. कुटुंबावर कोसळलेल्या आघातामुळे त्या डगमगल्या नाहीत. शिवणकाम करुन त्यांनी कुटुंब सावरलं. त्यांना तीन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झालं आहे. दोन नंबरची मुलगी पन्हाळा येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. सगळ्यात लहान मेघा.

तिने, दादासाहेब मगदूम हायस्कूलमध्ये तिने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीच्या परीक्षेत ७९.६० टक्के गुण मिळवत हायस्कूलमध्ये तृतीय क्रमाकाने उत्तीर्ण झाली.

कठीण परिस्थितीमध्ये तिने मिळवलेले यश सामान्य कुटुंबातील मुलांचे उमेद वाढविणारे आहे. मेरी वेदर मैदान परिसरात दोन खोल्यांच्या घरात त्यांचे वास्तव्य आहे. एका खोलीत स्वयंपाक आणि दुसऱ्या खोलीत शिवणकाम, त्याच ठिकाणी मेघाचा अभ्यास. घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे तिने गाइड, नोट्स घेणे टाळले.

हायस्कूलमधील शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि घरी रोज सकाळी संध्याकाळी वाचन, लिखाण असा जणू पॅटर्नच बनला. सुट्टीच्या दिवशी शिवणकामात आईला मदत ठरलेली. अभ्यासात कधी खंड पडू दिला नाही. 'मुळात मुलींनी शिकावं, स्वावलंबी बनावं. स्वतच्या पायावर उभं राहावं' ही आईची शिकवण शिक्षणाला प्रोत्साहित करणारी ठरली असे मेघा म्हणते. तर मुलीच्या शिक्षणाविषयी जागरुक असलेल्या प्रेमा मंटूर म्हणतात, 'मुलींनी शिकावं, मोठे व्हावे ही आंतरिक ईच्छा आहे. एक मुलगी इंजिनीअरिंग शिक्षण घेत आहे, मेघाने दहावीची परीक्षा दिली. तिला मिळालेले यश आनंद देणारे आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांच्या डोनेशनविरोधात सेनेचे आंदोलन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शाळा विकासाच्या नावावर हजारो रुपयांचे डोनेशन घेत पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या शाळा बंद करण्याची कारवाईबाबतचा अहवाल दोन दिवसांत न दिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयातून रस्त्यावर आणू. शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. फी व्यक्तीरिक्त पालकांकडून आकारल्या जाणाऱ्या डोनेशनला आळा घालावा यासाठी सातत्याने मागणी करूनही अधिकारी शाळा व्यवस्थापन व शिक्षण सम्राटांवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न विचारत आमदार क्षीरसागर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शिक्षण संस्थाच्या मनमानी कारभारा विरोधात शिवसेना व युवासेनेच्यावतीने भरमसाठ डोनेशन घेणाऱ्या शाळांविरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी जय भवानी जय शिवाजी, शिक्षण सम्राटांचा व शिक्षण खात्याच्या भ्रष्टाचारी कारभार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्च्याच्या अग्रभागी राक्षस रूपातील शिक्षणसंस्था चालक, पालक व विद्यार्थ्याच्या गळ्यावर सुरी ठेऊन लूट करीत असल्याचा देखावा सादर करण्यात आला.

आमदार क्षीरसागर म्हणाले, 'शाळा, महाविद्यालयान मध्ये प्रवेशासाठी लाखो रुपयांचे डोनेशन आकारले जात आहे, त्याकडे शिक्षण खात्याचे लक्ष नाही. काही शाळांमध्ये इमारत बांधकाम निधी नावाखाली भरमसाठ फी भरण्याची सक्ती केली जाते. ही रक्कम घेण्यासाठी शिक्षण कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली आहे का? पालकांना ठराविक दुकानामधून शालेय साहित्य व गणवेश खरेदी करण्यासाठी सक्ती केली जाते. यामध्ये शाळेचे कमिशन असते. शाळेतूनच वह्या पुस्तके घेणे बंधनकारक करून छापील किंमतीच्या तिप्पट दराने वह्यापुस्तके विक्री केली जात आहे. काही ठराविक शाळा तर उघडपणे डोनेशन घेत आहेत. यावर कोणती कारवाई कार्यालयाने केली?'

शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्यावतीने सहाय्यक संचालक सुभाष चौगुले, मनपा प्रशासन अशिकारी एस.के. यादव, निरंतर शिक्षण अधिकारी कासार यांनी निवेदन स्विकारले. सहाय्यक संचालक सुभाष चौगुले यांनी, 'तक्रार असलेल्या शाळांना नोटीस काढू. गेल्या दोन वर्षांतील कारवाईचा अहवाल तातडीने दोन दिवसांत पोहोच करू' अशी ग्वाही दिली. लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग, शिक्षण संस्था प्रशासन आणि पालकांची समन्वयक बैठक घेऊन या बैठकीत पालकांच्या शंकाचे निरसन करू, अशी ग्वाही दिली.

शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, दीपक गौड, युवा सेना जिल्हा समन्वयक योगेश चौगुले, जिल्हा चिटणीस अविनाश कामते, युवा सेना शहर अधिकारी चेतन शिंदे, विश्वजित साळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरी तालुक्यात अवैध खनिज उत्खनन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राधानगरी तालुक्यातील लिंगाचीवाडी, धाऊरवाडा येथे वाळू आणि इतर खनिजांचे उत्खनन सुरू आहे. हे त्वरित बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राधानगरी पंचायत समितीचे सभापती दिलीप कांबळे यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.

निवेदनात म्हटले आहे, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, संरक्षित वनक्षेत्रापासून एक किलोमीटरच्या आत खाणकामास परवानगी देऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. या आदेशाचे उल्लघंन करून लिंगाचीवाडीतील सरकारी गायरान तर ऐनी पैकी धाऊरवाडा येथील सरकारी मुलकी पडमधील जमिनीतून खनिज उत्खनन केले जात आहे. दूधगंगा नदी, काळम्मावाडी गैबी बोगदा, कालव्यातील पाणी उत्खनाने दूषित होत आहे. यामुळे उत्खनन बंद करावे, असा आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले होते. मात्र तहसीलदार कारवाईकडे दुर्लक्ष करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा परिषदेच्या योजना कागदावरच

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com Tweet@Appasaheb_MT कोल्हापूर : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक नळाला तोट्या बसविणार, जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवरील अतिक्रमण हटविणार, गाव तलाव ताब्यात घेणार, कोल्हापूर शहरात पाच मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स... गेल्या काही महिन्यातील जिल्हा परिषद प्रशासनानाच्या या घोषणा आहेत. घोषणा करुन सहा महिने, वर्ष पूर्ण होत आले पण प्रत्यक्षात कार्यवाही दिसत नाही. प्रशासकीय पातळीवर केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत. पदाधिकारी व सदस्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. नळांना तोट्या बसेनात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी टंचाई टाळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने सात डिसेंबर २०१८ रोजी ग्रामीण भागातील घरगुती नळांना तोट्या बसविण्याचा ठराव केला. एक जानेवारी २०१९ पासून अंमलबजावणी करण्याचे ठरले. सहा महिन्याचा कालावधी होत आला, अद्याप एकाही गावात नळांना तोट्या बसविल्या नाहीत. जे नळांना तोट्या बसविणार नाहीत त्यांना प्रतिदिन ५००० रुपये दंड ठोठावण्याचे ठरले. ना नळांना तोट्या, ना दंडात्मक कारवाई अशी विचित्र स्थिती बनली आहे. जागा खासगीच्या ताब्यात जिल्हातील ग्रामीण भागातील अनेक पाझर तलाव आणि गाव तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहेत. पण कागदोपत्री त्या तलावांचा ताबा खासगी व्यक्तीकडे आहे. सर्वसाधारण सभेत, स्थायी समिती व जलव्यवस्थापन सभेत हा विषय गाजला. प्रशासनाकडून तलाव ताब्यात घेण्याची व कागदोपत्री जिल्हा परिषदेच्या मालकीची करण्याची कार्यवाही केली जाईल असे सांगितले. काही तलावांच्या परिसरात अतिक्रमण झाले आहे. तलाव ताब्यात घेण्याची कार्यवाही रखडली आहे. शॉपिग कॉम्प्लेक्स रखडले शहरात भाऊसिंगजी रोडवर जिल्हा परिषदेच्या मालकीची मालमत्ता आहे. या ठिकाणी पाच मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी प्रस्तावित आहे. गेली अनेक वर्षे हा विषय प्रस्तावित आहे. कॉम्प्लेक्ससाठी २५ हजार चौरस फुटाचे बांधकाम होणार आहे. आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे उत्पन्नात भर पडणार आहे. रेडीरेकनर दरानुसार भाडे आकारणी होणार आहे. जुन्या इमारतीमधील दुकानदारांचे पुनर्वसन होणार आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निविदा प्रकिया राबवून आराखड्याला मूर्त रुप देण्याच्या कार्यवाहीबद्दल प्रशासन प्रत्येक वेळी नव नवीन तारीख सांगत आहे. प्रदूषणमुक्ती थंडावली पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती प्रकल्प अंतर्गत करवीर तालुक्यातील अकरा गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित आहेत. यासाठी 'टायगर बायो फिल्टर'पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रयाग चिखली, हणमंतवाडी, शिंगणापूर, आंबेवाडी, गांधीनगर, वळिवडे, वसगड, उचगाव, शिये, वडणगे या गावांचाा समाावेश आहे. सांडपाणी व्यवस्थापनसाठी एका खासगी संस्थेने आराखडा बनविला आहे. निधीसाठी सरकारसोबत पत्र व्यवहार, शौचालय बांधणीसाठी उपलब्ध निधीचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारणीसाठी मान्यता या प्रक्रियेत 'टायगर बायोफिल्टर' रखडला. 'नमामि पंचगंगा'उपक्रमाचा गाजवाजा खूप झाला पण प्रत्यक्ष कार्यवाही नजरेस पडत नाही. 'ऑडिट'नंतरही अतिक्रमणे कायम जिल्हाभर जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्ता आहेत. मात्र प्रशासनाकडे एकूण किती मालमत्ता आहेत याची नेमकी आकडेवारी नव्हती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रशासनाने एकूण २२ प्रकारात मालमत्तांची माहिती गोळा केली. जवळपास चार हजार मिळकतींची नोंद झाली. पण अनेक मिळकतीवर ग्रामीण भागात अतिक्रमणे झाली आहेत. खासगी व्यक्तीकडून जागा ताब्यात घेतली आहे. अतिक्रमणे हटविण्याची सूचना देऊनही कार्यवाही मात्र शून्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्ल्स गुंतवणूकदारांची निदर्शने

$
0
0

कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून पर्ल्समध्ये गुंतवलेली रक्कम त्वरित मिळावी, या मागणीसाठी येथील अखिल भारतीय पीएसीएल (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेतर्फे सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने २०१६ मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासंबंधी आवाहन केले आहे. मात्र पर्ल्सचे कार्यालय बंद असल्याने अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे गुंतवणूकदारांना मिळत नसल्याचे चित्र आहे. कागदपत्रे चोरीला गेली आहेत. यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांवर अन्याय झाला आहे. म्हणून गुंतवणूकदारांची कागदपत्रे चोरणाऱ्या बड्या एंजटांना अटक करावी. सरकारने पर्ल्स कार्यालयाचा ताबा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. निदर्शनात संघटनेचे शंकर पुजारी, शंकरराव आमते, सुभाष जगदाळे, वर्षा गडदे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांच्या खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या खातेनिहाय चौकशीसाठी आता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत या संदर्भातील अहवाल शिक्षण आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सामान्य प्रशासनाला विभागाला खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

यापूर्वी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी शिफारस करण्यात येणार होती. मात्र माध्यमिक शिक्षणाधिकारी हे राज्य सरकारच्या सेवेत असल्यामुळे त्यांच्यावरील कारवाईचा अधिकार कुणाला हा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे शिक्षणाधिकारी लोहार यांच्यावरील कारवाईवरुन जिल्हा परिषद सदस्यांच्या भूमिका ठाम आहेत. गेल्या वर्षी जि.प.च्या सर्वसाधारण सभेने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्याचा ठराव केला होता.

जि.प.च्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार त्यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नेमली होती. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे. शिक्षक मान्यता, पदोन्नती, शाळांना मंजुरी अशा विविध प्रकरणात सरकारी नियमांना डावलून कामकाज केल्याचा त्यांच्यावर आक्षेप आहेत. गैरकामकाजप्रश्नी त्यांच्यासह माध्यमिक विभागातील आठ कर्मचाऱ्यांनाही दोषी ठरविले आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या चंदगड, गडहिंग्लज,शिरोळ भागात बदल्या करण्यात आल्या आहेत.

सध्या शिक्षणाधिकारी लोहार हे रजेवर आहेत. चार जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या कामकाजाचा विषय गाजला. ते सर्वसाधारण सभेला हजर नाहीत याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. त्यांच्याविरोधात गंभीर तक्रारी आहेत. त्यांच्या कामकाजाची खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस प्रशासनामार्फत शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे करण्यात येणार आहे.

...........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सवर्ण आरक्षणाची उत्पन्न मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या खुल्या गटातील आरक्षणासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाखावरुन बारा लाख रुपयांपर्यंत करावी अशी मागणी केल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. तसेच इंदू मिल जागेवर साकारण्यात येणाऱ्या स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची उंची 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा जास्त असेल. आंतरराष्ट्र्रीय दर्जाचे हे स्मारक असेल असेही त्यांनी सांगितले.

सोमवारी, कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई, सीईओ अमन मित्तल, आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसोबत त्यांनी विविध योजनेचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, जनधन योजनेची तपशीलवर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सवर्णांना दहा टक्के आरक्षणाच्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रात विशेषता मराठा समाजाला होईल, असेही त्यांनी नमूद केले. केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाचा वार्षिक निधी हा ७६ हजार कोटी रुपयांचा आहे. या निधीचे वाटप २० विभागांत केले जाते असेही त्यांनी सांगितले. या निधीच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामूहिक योजन राबविल्या जातात. जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह वाढले पाहिजेत. देशभरात वर्षाला अॅट्रॉसिटीचे ४३ हजाराहून अधिक गुन्हे दाखल होतात. यामध्ये उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये हे प्रमाण जास्त आहे. कोल्हापुरात हे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी सांगितले.


पवारांनी एनडीएसोबत यावे

'काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला भवितव्य उरलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने राज्यात पवार यांची पॉवरही कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. काँग्रेसची अवस्था बिकट आहे. या परिस्थितीत पवारांना देशाचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी 'एनडीए'मध्ये सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करावे', असे आवाहन केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे सोमवारी केले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेगवडेत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

शेवग्याचा पाला काढण्यासाठी झाडावर चढलेल्या बेगवडे (ता. भुदरगड) येथील तानाजी विठोबा नीळकंठ (वय ५५ ) यांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घटना घडली.

बेगवडे येथील तानाजी नीळकंठ (गडकरी ) हे रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ते शेताकडून आले. त्यावेळी पत्नीसह काही महिलांनी रात्रीच्या जेवणासाठी शेवग्याची भाजी करण्यासाठी घराच्या समोरील शेवग्याच्या झाडावर चढून शेवग्याचा पाला काढण्याची विनंती केली. यावेळी ते पत्नीला भाजी काढतो तोपर्यंत चहा कर, असे म्हणत शेवग्याच्या झाडावर चढले. कोयत्याने एक छोटी फांदी खाली पाडली. दुसरी फांदी तोडत असताना फांदी अर्धवट तुटली अन सरळ झाडालगतच असलेल्या गावातील वीजवाहिनीच्या थ्री फेज लाइनच्या विजेच्या तारांमध्ये अडकली. त्यामुळे जोराचा वीजप्रवाह झाडामध्ये पसरल्यामुळे त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला व ते झाडावरच चिकटून राहिले. महिलांचा आरडाओरडा ऐकून शेजारीच असलेल्या व्यक्तीने त्यांना काठीचा स्पर्श केला असता ते झाडावरून खाली पडले. त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images