Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोल्जर्सचा खंडोबावर निसटता विजय

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए ब गट फुटबॉल स्पर्धेत सोल्जर्स ग्रुपने खंडोबा तालीम मंडळ ब संघावर १-० असा निसटता विजय मिळवला. रंकाळा तालीम मंडळ आणि बीजीएम स्पोर्टस यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सोल्जर्स आणि खंडोबा यांच्यातील सामना चुरशीचा झाला. आघाडी मिळवण्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केला. ५५ व्या मिनिटाला सूर्यवंशीने खंडोबाचा बचाव भेदत मैदानी गोल केला. हाच गोल निर्णायक ठरला.

रंकाळा आणि बीजीएम यांच्या सामन्यातही चुरस पाहायला मिळाली. १६ व्या मिनिटाला शिवम पवारने गोल करत रंकाळा संघाला आघाडी मिळवून दिली. पण त्यांचे आघाडीचे समाधान फार काळ टिकले नाही. तीनच मिनिटांनी केवल कांबळेने गोल करत बीजीएमला बरोबरीत आणले. पूर्णवेळेत कोणत्याही संघाला आघाडी न मिळाल्याने सामना १-१ असा बरोबरीत सुटला.

शनिवारचे सामने : रंकाळा तालीम मंडळ वि. सोल्जर स्पोर्टस्, दुपारी २ वा. बीजीएम स्पोर्टस् वि. खंडोबा तालीम मंडळ ब, दुपारी ४ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापुरजवळ आंध्रप्रदेश परिवहनची बस जळून खाक

0
0

आंध्रप्रदेश परिवहनची बस जळून खाक

१३ प्रवासी जखमी; तिघांची प्रकृती चिंताजनक

सोलापूर :

हैदराबादहून पुण्याकडे निघालेल्या आंध्र प्रदेश राज्य परिवहन सेवेच्या बसने बॅटरी भरून रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत एसटीतील १३ प्रवासी जखमी झाले असून, तीन जणांची स्थिती गंभीर आहे. बसमधून एकूण १८ प्रवासी प्रवास करीत होते. जखमी झालेले प्रवासी हैदराबादमधील आहेत. अस्लम महिबूब सय्यद (वय-२७, रा. चारमिनार हैदराबाद), अजमेश रामय्या भिकू (वय-३२, रा. हैदराबाद) आणि मादय्या रामलू बोफीदी (वय-३२, रा. महिबूबनगर), रणधिरसिंग दीक्षित (हैद्राबाद), नारायनसिंग राजपूत, मीना राजपूत आदी जखमी प्रवाशांची नावे असून, त्यांच्यावर सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान पहाटे व्यायाम करीत असलेल्या स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीमुळे या भीषण दुर्घटनेत जिवितहानी झाली नाही. जखमींना सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील सोलापूर अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासमोर शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना झाली. सोलापूर एसटी आगार व्यवस्थापक दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ही दुर्घटना घडली. पुण्याच्या दिशेने निघालेल्या एसटीने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. ट्रकमधील बॅटरीला धडक दिल्याने एसटीने तातडीने पेट घेतला, आग इतकी भीषण होती आतील प्रवाशी जीवंत राहतील की नाही याची शंका होती. मात्र, अमीर मुलाणी, आकाश सरवदे, तुषार शिंदे, नितीन भोसले, सागर देडे आणि पवन बनसोडे या सहा स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीमुळे एकही जीवितहानी झाली नाही. एसटी पूर्णपणे जळून खाक झाल्याने गाडीची नंबरप्लेट ही स्पष्ट दिसत नव्हती. बसचा चालक आणि वाहक यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, ते बेशुद्ध असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग मदत केंद्राला कळवूनही तब्बल एक ते दीड तासांनी पोलिस आल्याचा आरोप अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या तरुणांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सदाशिवगड’चा पर्यटन आराखडा

0
0

'सदाशिवगड'चा पर्यटन आराखडा

कराड :

सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता लोकवर्गणीतून गडाखालून गडावर पाणी नेण्यात यशस्वी ठरलेल्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठाने किल्ले सदाशिवगड विकासाला अधिक गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले सदाशिवगडच्या सर्व्हेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच किल्ले सदाशिवगडचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

सदाशिवगडच्या संवर्धनासाठी गेल्या बारा वर्षांपासून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान कार्यरत आहे.

..........

विमानतळ बाधितांचा

प्रांत कार्यालयात ठिय्या

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रक्रियेत कराड विमानतळ विस्तारीकरण विरोधी कृती समिती व बाधित शेतकऱ्यांना अंधारात ठेवून प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कृती समिती सदस्य व बाधितांनी शुक्रवारी दुपारी थेट येथील प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांना धारेवर धरले. नोटिसा वाटप तातडीने बंद करून मुख्यमंत्र्यांशी तातडीची बैठक लावण्याबाबतचे लेखी आश्वासन द्यावे, अशी जोरदार मागणी केली. मात्र, असे लेखी देता येणार नसल्याचे खराडे यांनी स्पष्ट करताच संतप्त झालेल्या बांधितांना प्रांताधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रांत कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची तारंबळ उडाली.

कराड विमानतळ विस्तारीकरणामध्ये येथील वारूंजी, केसे व मुंढे गावचे बागायत क्षेत्र बाधित होणार आहे. येथील भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून झालेला शास्वत विकास उद्धवस्त करण्याचा डाव मांडल्याचा आरोप करीत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीची स्थापना केली असून, या कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात मोठे जनआंदोलन सुरू आहे.

मात्र, या जनआंदोलनाला बेदखल करीत प्रशासनाने गेल्या ३० मे रोजी भूसंपादन अधिनियम १८९४च्या कलम १२ (२) व कलम १६नुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विस्तारीकरणासाठी भूसंपादन कायदा २०१३ची तरतूद तसेच ३१ ऑगस्ट २०१६च्या अंतिम निवाड्यानुसार बाधित होणाऱ्या सुमारे ११७१ शेतकऱ्यांना मंजूर निवाडा व भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार होणाऱ्या रक्कमेचे वाटप व ताबा अशी प्रक्रिया ९ जुलै २०१९ रोजी पूर्ण केली जाणार असल्याची नोटीस तलाठी कार्यालयामार्फत देण्याचे काम सुरू आहे.

प्रशासनाने बाधित शेतकरी व कृती समितीला विश्वासात न घेता नोटिसा बजावल्याने संतप्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी थेट प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना शुक्रवारी धारेवर धरले. आजपर्यंत कृती समितीच्या माध्यमातून सरकारकडे वारंवार लेखी पाठपुरावा केला आहे. प्रत्येक नोटिसीला लेखी उत्तरे दिली आहेत. शिवाय विमानतळ विस्तारीकरणासाठी कायद्यातील तरतुदीनुसार जमीन अधिग्रहण करण्यासाठी पर्यायी जागा कृती समितीने सुचवली आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा केलेला विकास उद्धवस्त करून सरकार कोणता विकास साधणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायला प्रशासन तयार नाही. या पूर्वी प्रांताधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री यांच्याशी बैठक लावण्यासंदर्भातील आश्वासन देण्यात आले होते. अशी कोणतीही बैठक न लावता थेट भूसंपादनाची नोटीस कशी काय बजावण्यात आली? असा जाब विचारत प्रांताधिकारी खराडे यांना धारेवर धरले.

दरम्यान, कृती समितीचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शनिवारी रोजी कृती समिती व बाधितांची बैठक घेऊन लिखित स्वरूपात आपले निवेदन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठिय्या आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

कॅप्शन : कराड प्रांताधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करताना बाधित शेतकरी.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे बुजले, प्रतीक्षा डांबरीकरणाची

0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील हॉटेल सह्याद्री, हॉटेल चालुक्य आणि रिक्षा थांब्याभोवतीच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. १५ दिवसांपूर्वी याचे खडीकरण करण्यात आले. पण त्यानंतर येथील रस्त्याचे काम ठप्प झाले असून ही खडी वर येत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर पावसाळ्यात या रस्त्याची पुन्हा दुरवस्था होणार आहे.

हॉटेल सह्याद्री ते महाराजा हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी होत नसल्या, तरी पर्यटकांची व मोटारसायकली पार्किंग केल्या जातात. गेल्या दहा वर्षात रस्त्याची कोणतीही दुरुस्ती न केल्याने मोठ-मोठे खड्डे पडले होते. परिणामी पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. त्यामुळे वाहनधारक रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करत होते. मात्र त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते.

१५ दिवसांपूर्वी ताराराणी विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. मोठी खडी, बारीक खडी टाकून रोलर फिरविण्यात आला. मात्र शेवटचा लेयर न टाकल्याने पसरलेली बारीक खडी वाहनांच्या वर्दळीमुळे आजूबाजूला जावून पुन्हा मोठी खडी दिसू लागली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी यावर बारीक खडीचा लेयर न टाकल्यास टाकलेली खडी जावून पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचा दावा करत असले, तरी दिलेल्या मुदतीत काम न झाल्यास खर्च झालेला निधी वाया जाण्याची शक्यता आहे.

पंधरा दिवसांपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. आठवड्यात रस्त्यावर शेवटचा लेयर टाकण्यात येईल. कोणत्याही स्थितीत रस्त्याचे काम अर्धवट सोडले जाणार नाही.

हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंगम समाजाचा अय्याचार विधी संपन्न

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वीर माहेश्वर गुरुकुल संस्कार व सेवा मंडळातर्फे जंगम समाजाचा शिवदीक्षा अय्याचार विधीचा सांगता समारंभ कोल्हापूर हायस्कूल येथे झाला. सुमारे दोनशेहून अधिक बटूंना अय्याचार आणि शिवदीक्षा देण्यात आली.

या वेळी १०८ शिवलिंग शिवाचार्य महाराज (बेळंकी मठ) यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'अय्याचार विधी हा महत्त्वाचा संस्कार आहे. लहान वयातच योग्य संस्कार झाल्यास जीवनाला दिशा आणि यशस्वी होण्याचा मार्ग खुला होतो. पारंपारिक पद्धतीने समाजात शिवदीक्षा आणि अय्याचार विधीचे महत्त्व आहे. समाजाचे अध्यक्ष अशोक मल्लय्या स्वामी, उपाध्यक्ष चंद्रकांत स्वामी, शिवाजी जंगम, अशोक स्वामी, विवेकानंद हिरेमठ, कल्लाप्पा स्वामी, सुनील जंगम, भूषण जंगम आदी उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमात कळंबा ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल शीतल कृष्णात जंगम यांच्यासह नंदकुमार जंगम यांचा सत्कार झाला. सायंकाळी जगदगुरू पंचाचार्य यांची उत्सवमूर्ती मिरवणूक सोहळा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होर्डिंग्जने शहर विद्रूप

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम सरकारी यंत्रणेने केलेल्या जाहिराती, होर्डिंग्ज, व्यावसायिक फलक आणि त्यापाठोपाठ उगवणारे राजकीय नेत्यांचे वाढदिवस फलक यातून शहराचे विद्रुपीकरणच सुरू आहे. शहराच्या प्रवेशद्वारापासून सुरू असलेली फुकटची जाहिरातबाजी आता गल्लीबोळात पोहोचली आहे. अधिकृत आणि अनधिकृत जाहिरातींमुळे शहराच्या होत असलेल्या विद्रुपीकरणाबरोबरच खराब झालेल्या डिजिटल फ्लेक्समुळे प्लास्टिक कचऱ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही प्लास्टिक कचऱ्याची वाढ पर्यावरणाला घातक ठरत आहे. महापालिका प्रशासन यावर कारवाईकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले आहे. राजकीय नेत्यांच्या जाहिरातीपासून कमर्शिअल (व्यावसायिक) माहिती देणारे फलक अनेक महत्त्वाच्या मार्गांसह वैयक्तिक आणि ऐतिहासिक इमारतींभोवती दिसतात. असे जाहिरात फलक हे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत असला, तरी बहुतांशवेळा परवानगी न घेताच फलकबाजी केली जाते. त्यामुळे महसूल बुडत आहे. शहराचे विद्रुपीकरणही मोठ्या प्रमाणात होत आहे. शहराला असलेला ऐतिहासिक वारसा, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, रंकाळा, न्यू पॅलेसमुळे पर्यटकांचा ओघ नेहमीच असतो. बाहेरचा जिल्हा किंवा राज्यातून आलेल्या पर्यटकांमुळे येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पण महत्त्वाची सर्व ठिकाणे अनधिकृत, अधिकृत होर्डिंग्जमुळे अक्षरश: झाकोळून गेली आहेत. महापालिकेने अनधिकृत जाहिरातबाजीला अटकाव करण्यासाठी धोरण स्वीकारले. त्याबाबतचा महासभेत ठराव केला. तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी परवाने व कारवाई करण्याचे इस्टेट विभागाचे अधिकार चारही विभागीय कार्यालयांकडे हस्तांतरीत केले. अनधिकृत फलकांवर कारवाई सुलभपणे करण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी यानंतरही अनधिकृत फलकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विभागीय कार्यालयांकडून अशा फलकांची पाहणी होईपर्यंत जाहिरातबाजी करून फलक काढून घेतले जातात. मात्र, एक फलक गेल्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा फलक लावला जात असल्याने कारवाई केवळ कागदावरच राहते. शहराला ज्याप्रमाणे अतिक्रमणांचा विळखा पडला आहे, त्याचप्रमाणे होर्डिंग्ज, फलकांची संख्याही लक्षणीय आहे. अतिक्रमण विभाग सवडीनुसार कारवाई करताना अनधिकृत होर्डिंग्जवर झालेली कारवाई ठळकपणे सांगितली जाते. पण अशा स्वरुपाच्या कारवाईनंतरही फलक दिसत असल्याने कारवाई नेमक्या कोणत्या अनधिकृत फलकांवर केली? हा प्रश्न गुलदस्त्यातच राहतो. कारवाई कधी? महापालिकेने यापूर्वी महासभेत जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ठराव केला. वाहतुकीला अडथळा न करता होर्डिंगवर पाच वर्षांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी विहित शुल्क भरल्यानंतर परवानगी मिळते. अशी परवानगी नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे जाहीर प्रकटन प्रशासनाने २४ मे रोजी प्रसिद्धीस दिले. पण आठवडाभरात प्रशासनाने एकाही अनधिकृत होर्डिंग, फलकांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे शहरात असलेली सर्व होर्डिंग्ज अधिकृत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो. डिजिटल फलकांचा कचरा गेल्या महिन्यापासून महापालिकेने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. विशेषत: जयंती नाला व उपनाल्यांची स्वच्छता करताना नाल्यांच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा आढळून येत आहे. यात खराब झालेल्या डिजिटल फलकांचाही समावेश आहे. ज्याप्रमाणे जैववैद्यकीय कचऱ्याबरोबर खराब झालेल्या होर्डिंगचे फलक मोठ्या प्रमाणात दिसून आले. खराब झालेल्या डिजिटल फलकांवर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नसल्याने हा सर्व प्लास्टिक कचरा कोंडळा अथवा नाल्यांच्या पात्रात टाकला जातो. परिणामी प्लास्टिकचा प्रश्न आणखी गंभीर होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा प्रश्न सुटणार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सध्या करिअरच्या अनेकविध वाटा खुल्या झाल्या आहेत. यामध्ये स्पर्धा परीक्षेचे आव्हान पेलत प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र, यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. हीच बाब ओळखून महाराष्ट्र टाइम्स व द युनिक अॅकॅडमी यांच्या वतीने प्लॅनेट कॅम्पस अंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. द युनिक अॅकॅडमी येथे शनिवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता कार्यशाळेस सुरुवात होणार आहे.

सरकारी नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एकमेव व सर्वोत्तम मार्ग आहे. अलिकडे हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात. मात्र, नेमके मार्गदर्शन मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळत नाही. वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती निराशा आल्याने नकारात्मक मानसिकता तयार होते. योग्य वेळेत अभ्यासाची सुरुवात करणे, योग्य संदर्भग्रंथांचा अभ्यास, सराव परीक्षा, परीक्षांचे तंत्र यांची माहिती असेल तरच विद्यार्थ्यांना यश मिळते. परीक्षांचे स्वरुप आणि विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांना नेमके मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स द युनिक अॅकॅडमीने संयुक्तपणे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावरील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना युनिक अॅकॅडमीचे संचालक शशिकांत बोराळकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

'प्लॅनेट कॅम्पस' अंतर्गत ही कार्यशाळा खासबाग येथील द युनिक अॅकॅडमी येथे शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे स्वरुप समजावून सांगितले जाईल. आपली क्षमता कशी ओळखावी, पदांनुसार संबंधित परीक्षांचा अभ्यास कसा करावा, कोणत्या घटकांवर भर द्यावा याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रवेशासाठी इच्छुकांनी युनिक अॅकॅडमीच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेन राजाराम’मध्ये पार्किंगचा प्रस्ताव

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

नवरात्र उत्सव आणि दिवाळी-उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत भाविक पर्यटकांची संख्या वाढते. पार्किंगसह वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. विशेषत: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मेन राजाराम हायस्कूल परिसरातील खुली जागा 'पे अँड पार्किंग' योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. चारचाकी वाहनासाठी पहिल्या दोन तासाला ५० रुपयांची आकारणीचा प्रस्ताव आहे. परिसरात अस्वच्छता केल्यास संबंधितांकडून ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे.

या संदर्भात शिक्षण विभागाकडून रितसर प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सादर होणार आहे. त्यानंतर पार्किंगचा ठेका द्यायचा की जिल्हा परिषदेने चालवायचा याचा निर्णय होणार आहे. सुट्टीच्या कालावधीत बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या वाहनासाठी मेन राजाराम हायस्कूल परिसरातील जागा पार्किंगसाठी देण्याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाने, जिल्हा परिषदेला कळविले होते. शहरामध्ये पर्यटक, भाविक मोठ्या संख्येने खासगी वाहनाने येतात. शिवाय अंबाबाई मंदिर परिसरात सोने, चांदीची बाजारपेठ आहे.

महाद्वार रोड, ताराबाई रोड, शिवाजी रोड हे सदैव गजबजलेले असतात. या परिसरात पार्किंगची सुविधा पुरेशी नाही. भागातील रस्ते अरुंद आहेत. परिणामी भाविक, पर्यटकांच्या वाहनामुळे वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शहरामध्ये येणाऱ्या भाविक व पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी 'पे अँड पार्किंग'चा प्रस्ताव जिल्हा परिषदेने मान्य केला आहे. नवरात्र उत्सव आणि दिवाळी-उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत पार्किंगसाठी खुली जागा देण्याचा प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने परवानगी दिली.

पोलिसांचे सहकार्य घेणार

सुट्टीच्या दिवशीच पार्किंगसाठी जागा द्यावयाची आहे. चारचाकी वाहनाच्या पार्किंगसाठी सुरुवातीच्या दोन तासांसाठी ५० रुपये व त्या पुढील तपासणीसाठी ५० रुपये शुल्क आकारणीचा निर्णय झाला आहे. परिसरात कुणी अस्वच्छता केल्यास संबंधितांकडून ५०० रुपये दंड प्रस्तावित आहे. शिक्षण विभागाकडून सीईओंना प्रस्ताव सादर झाल्यानंतर, पार्किंग धोरण ठरविले जाईल. दरम्यान पार्किंगची व्यवस्था पाहण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच पार्किंगची व्यवस्था सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत या वेळेत करण्याचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट दारू निर्मितीकारखान्यांवर छापा

0
0

बनावट दारू निर्मिती

कारखान्यांवर छापा

सातारा :

सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने फलटण तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा बनावट देशी-विदेशी दारू निर्मिती कारखान्यावर छापा घालून फोर्ड आयकॉन कंपनीच्या एक चारचाकी वाहनासह एकूण २ लाख ४ हजार १७८ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमध्ये ४ जणांना अटक करण्यात आली आहे. रज्जाक हिराबाई सय्यद (रा. मलवडी ता. फलटण) हा फरार असून एकूण पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगोल्यात गळफास आंदोलन

0
0

सोलापूर :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी मुंबई येथे बैठक होती. पवार यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीकडे वळविले आहे. मुंबई येथील बैठकीत बारामतीचे पाणी जैसे-थे राहावे, असा निर्णय झाल्यास सांगोला तालुक्यातील भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे असंख्य कार्यकर्ते शिवाजी चौक सांगोला येथे गळफास घेणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. बारामतीला जास्तीचे पाणी घेऊ देणार नसल्याचे श्रीकांत देशमुख यांनी सांगितले. त्यासाठी शिवाजी चौक येथील चिंचेच्या झाडास दोर लावून फास बांधण्यात आले. गळ्यात फास लावून आंदोलन करण्यात आले. बैठकीत निर्णय सांगोलकरांच्या विरोधात गेल्यास अनेक कार्यकर्ते भर चौकात गळफास घेणार असल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ९.६७ टीएमसी पाणी

0
0

कोल्हापूर : जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पात अवघा ९.६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबला असल्याने शेतीसाठी शुक्रवारपासून उपसाबंदी जाहीर करण्यात आली. त्याचा फटका पिकांना बसणार आहे. पाऊस लांबला तरी पुढील दीड महिने पिण्याचे पाणी पुरेल, असा प्रशासनाचा दावा आहे.

जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा हे मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये ४.५२ टीएमसी पाणी आहे. या प्रकल्पातील पाणी न येणाऱ्या भोगावती, पंचगंगा आणि वारणा नदी खोऱ्यात उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. कोल्हापूरला पाणी पुरवठा होणाऱ्या राधानगरी धरणात ०.७५, दूधगंगा धरणात ०.८८ तर तुळशी धरणात ०.७७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस येईपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.

जिल्ह्यात नऊ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये ३.९९ टीएमसी पाणीसाठा आहे. लघु प्रकल्पात १.१५ टीएमसी पाणी आहे.

जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे उपसाबंदी केली आहे. दूधगंगा, राधानगरी, वारणा नदीतून शेतीसाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात आले आहे. केटीवेअर बंधाऱ्यात पाणी अडवले आले असले तरी उपसाबंदीमुळे शेतकऱ्यांना पाणी मिळणार नसल्याने ऊस पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणातील शिल्लक पाणीसाठा (टीमसीमध्ये)

प्रकल्प पाणीसाठा

राधानगरी ०.७५

तुळशी ०.७७

वारणा २.१२

दूधगंगा ०.८८

कासारी ०.४२

कडवी ०.९०

कुंभी ०.६५

पाटगाव ०.६९

चिकोत्रा ०.४९

चित्री ०.२४

जंगमहट्टी ०.१२

घटप्रभा ०.४७

जांबरे ०.०२

०० ०० ००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुने थकले, नव्यांचा थांगपत्ता

0
0

Appasaheb.mali @timesgroup.com Tweet : Appasaheb_MT कोल्हापूर : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या (सीएचबी) नियुक्तीची नियमावली म्हणजे 'आगीतून उठून फुफाट्यात' असा प्रकार बनला आहे. सरकारने मानधनात वाढ केली, पण सीएचबी प्राध्यापकांना एकाच कॉलेजवर शिकवणे बंधनकारक केले. पूर्वी एका रिक्त जागेसाठी तीन सीएचबी प्राध्यापक नियुक्त केले जायचे, सरकारने त्यावर मर्यादा आणून आता दोन जागा भरण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे मानधन वाढले, पण दुसरीकडे एकाची नोकरी घटली याकडे सीएचबी प्राध्यापक लक्ष वेधत आहेत. सरकारचा सीएचबी प्राध्यापकांसोबत 'ताटातील वाटीत आणि वाटीतील ताटात' असा खेळ सुरू असल्याच्या भावना उमटत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सीएचबी प्राध्यापकांची संख्या २२२५ आहे. सरकारी कॉलेजमधील प्राध्यापक वगळता अन्य कॉलेजमधील सीएचबी प्राध्यापकांना नोव्हेंबर २०१८ पासून मानधन मिळालेले नाही. राज्य सरकारने नोव्हेंबर २०१८ पासून त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे मानधन जुन्या पद्धतीने काढायचे की नव्या आदेशानुसार, या संभ्रमात सरकारी यंत्रणा गुरफटल्याने गेले सहा महिने त्यांना मानधन मिळालेले नाही. यामुळे अनेकांसमोर आर्थिक समस्या उद्भवत आहेत. दुसरीकडे सरकारने एका रिक्त जागेसाठी दोन सीएचबी प्राध्यापक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका नव्याने पीएचडी व नेट-सेटप्राप्त प्राध्यापकांना बसणार आहे. परिणामी अनेकांची तासिका तत्त्वावरील नोकरीही हिरावणार असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान, कॉलेजकडून सीएचबी प्राध्यापकांचा ज्या-त्या महिन्याच्या कामाचा अहवाल शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर केला जातो. शिक्षण सहसंचालक कार्यालय त्या अहवालाच्या आधारे सीएचबी प्राध्यापकांचे मानधन कॉलेजकडे जमा करते. मात्र, सरकारच्या शिक्षण खात्याकडून सीएचबी प्राध्यापकांचे दरमहा वेतन काढले जात नाही. यासंदर्भात कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक अजय साळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. दरम्यान, विद्यापीठ कायद्यामध्ये सीएचबी प्राध्यापक नियुक्तीला मान्यतेची तरतूद नाही याकडेही काहीजण लक्ष वेधत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बदल्या पारदर्शक’

0
0

कोल्हापूर:काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत चुकीचे मत व्यक्त केले होते. मात्र, जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने पारदर्शक पद्धतीने झाल्याचा दावा राज्य महसूल कर्मचारी संघाचे पदाधिकारी विलास कुरणे आणि जिल्हाध्यक्ष सुनील देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला. जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कर्मचाऱ्याच्या मुलाखती घेतल्या. प्रत्येक कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना सोयीने बदली करण्यात आली. पत्रकार परिषदेला राज्य संघटनेचे शिवकुमार वाली, तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष धनाजी कलिकते, करवीर तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल काटकर, सर चिटणीस अविनाश सूर्यवंशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या स्वबळाच्या हालचाली

0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारी केली असून, पुढील वर्षी होणारी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान भाजप-ताराराणी आघाडी सदस्यांसह आजी-माजी नगरसेवक, इच्छुकांना पक्षात घेण्यासाठी फिल्डिंग सुरू केली आहे.

राज्यात भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. कोल्हापूर महापालिका वगळता भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली. इचलकरंजी नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात घेताना अन्य नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली. शहरी मतदारसंघावर पकड असलेल्या भाजपने राज्यातील मुंबई वगळता पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, धुळे, नाशिक, जळगाव अहमदनगरसह अनेक महापालिकांवर भाजपची सत्ता आणली.

महापालिकेवर सत्ता स्थापन करताना राज्य सरकारने २०१७ च्या महाराष्ट्र अधिनियम ९ अन्वये महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमाच्या कलम पाचमध्ये दुरुस्ती केली आहे. बृहन्मुंबई वगळता २०१६ नंतर झालेल्या सर्व महानगरपालिका निवडणुकीत एकसदस्यीय पद्धत बदलून बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात आणली. या दुरुस्तीमुळे भाजपचा चांगला फायदा झाला. काँग्रेस, राष्ट्रवादीतील नगरसेवकांना भाजपमध्ये आणून सत्ता स्थापनेचा प्रयत्न यशस्वी झाला. अन्य महापालिकेप्रमाणे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात आणली जाणार आहे.

२०१५ च्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले, पण भाजपचे यश थोडक्यात हुकले. काँग्रेस व राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे प्रयत्नही करण्यात आले. पण वाढता घोडेबाजार लक्षात घेऊन तो प्रयत्न सोडून देण्यात आला. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला यश मिळणार ही शक्यता गृहित धरून भाजपने पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी बांधणी सुरू केली आहे. त्यासाठी २०१७ च्या कायद्यानुसार एकसदस्यीय प्रभाग रचनेऐवजी बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात आणली जाणार आहे. त्याचा लाभ भाजपला चांगला होऊ शकेल अशी शक्यता गृहित धरून रणनीती आखली जात आहे. आजी-माजी नगरसेवकांकडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. सध्या महापालिकेत ८१ नगरसेवक असून, २० प्रभागांत प्रत्येक चार सदस्यीय निवडणूक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. १९ प्रभागांत चार, तर एका प्रभागात पाच सदस्यीय प्रभागाची निर्मिती होणार आहे. बहुसदस्यीय निवडणूक झाली तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेपुढे मोठे आव्हान असणार आहे.

००००००

कोट...

राज्यात मुंबई वगळता सर्व महापालिकांत बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका झाल्या. त्यासाठी राज्य सरकारने दुरुस्ती केली आहे. २०२० मधील कोल्हापूर महापालिकेची निवडणूकही याच पद्धतीने होऊ शकते. एकसदस्यीय पद्धतीने निवडणूक घ्यायची की, बहुसदस्यीय पद्धतीने हा निर्णय सर्वस्वी राज्य सरकार घेईल.

नितीन देसाई, नगरपालिका विभाग प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम व्यावसायिकांसाठी ‘एक खिडकी’

0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

@gurubalmaliMT

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकांसाठी जमीन व्यवहारात होणारी धावपळ थांबवण्याच्या दिशेने सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. यापुढे जमिनीची सर्व प्रकारची माहिती मिळवण्यासाठी तीन कार्यालयात करावी लागणारी पायपीट थांबणार असून, तलाठी, सहनिबंधक आणि भूमी अभिलेख या तीन कार्यालयाऐवजी यापुढे महसूल विभाग स्वतंत्र कार्यालय सुरू करणार आहे. या प्रस्तावावर पावसाळी अधिवेशानात शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, क्रिडाईच्या कोल्हापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत यावर चर्चा होऊन सुधारणा सुचवण्यात येणार आहेत.

जमीन खरेदी-विक्री व्यवहार करताना संबंधित जमीनीची परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जमिनीचा सात बारा, ती इनामी आहे का, येणे आहे का, त्यावर कर्ज आहे का, न्यायालयीन किंवा वारसाहक्काच्या अडचणी आहेत का, त्याची प्रॉपर्टी कार्डावर नोंद आहे का, टायटल क्लिअर आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सध्या तलाठी, सहनिबंधक आणि भूमी अभिलेख अशा तीन कार्यालयात धावपळ करावी लागते. या तिन्ही कार्यालयांचा एकमेकांशी फारसा संबंध नाही. त्यामुळे माहिती मिळवताना अडचणी वाढतात. या पार्श्वभूमीवर जमिनीबाबतचे सर्व व्यवहार एकाच ठिकाणी व्हावेत आणि त्याची माहिती एकत्र मिळावी, यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कार्यालय सुरू करणार आहे. तसा प्रस्तावही तयार असून या पावसाळी अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

बांधकाम व्यावसायिकांच्यादृष्टीने ही नवी व्यवस्था महत्त्वाची आहे. त्यामुळे ती नेमकी कशी असावी, याबाबत अहवाल तयार करण्यात येत आहे. कोल्हापुरात शनिवारी राज्यातील क्रिडाई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व सदस्यांची बैठक होत आहे. त्याला संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्यासह ५१ शहरातील सातशेवर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांच्या अनेक प्रश्नावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये राज्य सरकारच्या नव्या निर्णयाबाबत अधिक चर्चा करून सुधारणा सुचवण्यात येणार आहेत. कारण जमीन विक्री आणि खरेदीनंतर त्याच्या नोंदी करण्यात अनेक अडचणी आहेत. त्याचा त्रास अनेकदा बांधकाम व्यावसायिकांनाच होतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नवीन कार्यालय सुरू करणार आहे. त्याची अमंलबजावणी होण्यापूर्वीच सुधारणा आवश्यक असल्याने शनिवारी याबाबत चर्चा करून अहवाल तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, 'रेरा'अंतर्गत जमीन शीर्षक विमा कायद्याची अमंलबजावणीही करण्यात येणार आहे. यामध्ये काही त्रुटी आहेत. त्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

०० ० ००

या विषयावर होणार चर्चा

बांधकामाची समान नियमावली

'महारेरा' कायद्यातील अडचणी

जीएसटीचे नवे नियम आणि त्रुटी

शहरनिहाय वेगवेगळे प्रश्न

जमीन शीर्षक कायदा

सिमेंटसह इतर वस्तूंच्या दरातील वाढ

.. .. .

क्रिडाईची महिला शाखा

बांधकाम व्यावसायात केवळ पुरूषांचीच मक्तेदारी नाही तर अलिकडे महिलाही या व्यवसायात सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे क्रिडाईने त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी महिलांची स्वतंत्र शाखा सुरू केली आहे. कोल्हापुरातही महिलांच्या या संघटनेची शनिवारी स्थापना करण्यात येणार आहे. या संघटनेत पहिल्या टप्प्यात चाळीस महिलांचा समावेश असणार आहे.

.. .. ..

राज्यातील बांधकाम व्यावसायिकांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये बांधकामाची समान नियमावली, 'रेरा', जीएसटी या प्रमुख प्रश्नांचा समावेश आहे. राज्य सरकार जमिनीबाबत नवीन नियमावली तयार करत आहे. या पार्श्वभूमीवर 'क्रिडाई'च्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

राजीव परिख, अध्यक्ष, क्रिडाई महाराष्ट्र

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाचखोरांविरोधात तक्रार द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाच घेणाऱ्यांविरोधात नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तक्रारदारांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. त्यासह लाचखोर आरोपीवर शिक्षा सिद्ध होण्यासाठी अधिकाधिक सक्षम पुराव्यासाठी तपास यंत्रणेत सुधारणा केली जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस अधीक्षक सुषमा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी नुकताच कोल्हापूर, सांगली आणि सातारा विभागाचा पदभार स्वीकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली. अधीक्षक चव्हाण म्हणाल्या, 'लाच घेणाऱ्याविरोधात १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी केल्या जातात. त्याची दखल विभागाकडून घेतली जात आहे. त्यासह अनेकदा भीतीपोटी आणि लाचखोरांवर कारवाई होणार नाही, या भीतीने तक्रारदार तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. अनेकदा तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया तक्रारादारांना माहिती नसते. तक्रार गंभीर स्वरुपाची असेल तर विभागाचे कर्मचारी तक्रारदाराकडे जाऊन चौकशी करतात. तक्रारीत तथ्य असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेऊन कारवाई केली जाते. सरकारी सेवेतील वर्ग एकचा अधिकारी लाच घेत असले तर त्याच्या विरोधातही निर्भयपणे तक्रारी कराव्यात. या वर्षात जानेवारी ते मेअखेर लाचखोरीचे १३ गुन्हे दाखल झाले असून १७ आरोपींवर कारवाई केली आहे. त्यामध्ये महसूल, वनविभाग, पोलिस, कृषी, उद्योग, उर्जा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, खासगी व्यक्तींवर कारवाई झाली आहे. अनेकदा समन्स बजावूनही आरोपी हजर राहत नाही. त्यामुळे काही खटल्याचा कालावधी वाढतो. हा कालावधी कमी करण्यासाठी तपास यंत्रणा अधिकाधिक गतिमान केली जाणार आहे. कारवाईच्या ठिकाणी सापडलेली रक्कम, साक्षीदार, जबाब आदी सक्षम पुरावे गोळा केले जाणार आहे. दाखल झालेले गुन्हा, तपास आणि कोर्टातील खटले याकडे अधिकाधिक लक्ष दिले जाणार आहे.

कारवाई

२०१५ : ३२ गुन्हे, ४३ आरोपी, १२ विभाग

२०१६ : २७ गुन्हे, ३४ आरोपी ७ विभाग

२०१७ : २६ गुन्हे, ३३ आरोपी ९ विभाग

२०१८ : ३४ गुन्हे, ५२ आरोपी, ९ विभाग

जानेवारी २०१९ ते आजअखेर : गुन्हे १२ आरोपी १७ विभाग ११

अधिकाऱ्यांविरोधातही होईल कारवाई

यावेळी विभागाचे उपअधीक्षक गिरीष गोडे म्हणाले, 'वर्ग एकच्या सरकारी अधिकाऱ्यावरही कारवाई केली आहे. राखीव बटालियनचा अधीक्षक के. व्ही. सपकाळे यालाही अटक करून कोर्टासमोर हजर केले होते. त्याची रवानगी कळंबा कारागृहात झाली होती. याप्रकरणी सक्षम अधिकाऱ्याची मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्यावर लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. २०१८ मध्ये वर्ग एकच्या पाच अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे कितीही मोठ्या अधिकाऱ्याने लाच मागितली तरी त्याच्या विरोधात निर्भयपणे तक्रार करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निपाहचा धोका नसला तरी काळजी घ्या’

0
0

कोल्हापूर : जीवघेण्या ठरणाऱ्या निपाह विषाणूने गतवर्षी केरळमधील १७ लोकांचा बळी घेतला होता. यंदा एरणाकुलम येथील एका तरुणाला निपाहची लागण झाल्याची बातमी सोशल माध्यमाद्वारे पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र राज्याला निपाह व्हायरसचा तूर्तास धोका नसून पर्यटनाला जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गेल्यावर्षी निपाह विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात घबराट पसरली होती. खजूर पदार्थाच्या माध्यमातून निपाह विषाणू संपूर्ण देशात पसरल्याचे स्पष्ट झाले होते. फ्रुट बॅट नावाच्या विशिष्ट जातीच्या वटवाघळाच्या माध्यमातून हा व्हायरस पसरत असल्याचेही काही तज्ञांचे म्हणणे आहे. निपाहचा सर्वाधिक फटका केरळ राज्याला बसला होता. जमिनीवर पडलेल्या फळांच्या माध्यमातून विषाणू बाधा होण्याची शक्‍यता असल्याने फळे खाण्याची आधी ती स्वच्छ पाण्यात धुवून घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे. उन्हाळी सुट्टी असल्याने कोल्हापुरातून पर्यटनासाठी दक्षिणेत जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.

००००००००००००००

ही आहेत लक्षणे

निपाह व्हायरसची लागण झाल्यानंतर प्रचंड ताप, डोकेदुखी, सततच्या उलट्या, श्वास घेण्यास त्रास होणे, न्यूरोलॉजिकल समस्या, अंगदुखी तसेच मेंदूज्वर यासारखी लक्षणे आढळून येतात. लक्षणे दिसण्याचा सामान्यत: कालावधी पाच ते चौदा दिवसांपर्यंत असतो. विषाणूची लागण झाल्यानंतर ४८ तासांत वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्ण कोमात जाण्याचा धोका निर्माण होतो.

अशी घ्या काळजी

निपाहला प्रतिबंध करण्यासाठी खूप पिकलेली तसेच झाडावरून पडलेली फळे खाऊ नयेत. संबंधित लक्षणे दिसतात त्याकडे दुर्लक्ष न करता उपचार घ्यावेत. यावर कोणतेही खास औषध उपलब्ध नसल्याने प्रतिबंधात्मक काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

कोट

सद्यस्थितीत निपाह विषाणूचा धोका महाराष्ट्राला नाही. मात्र संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सर्वोतोपरी दक्षता घेत आहे. सध्या सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता निपाहबाबतची लक्षणे दिसतात तात्काळ उपचार घेण्यास प्राधान्य द्यावे.

डॉ. प्रदीप आवटे, राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरात कमी दाबाने पाणीपुरवठा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम पाणी सोडण्याच्या अनियमित वेळा, समन्वयाचा अभाव आणि जलवाहिनीवर आवश्यकतेनुसार व्हॉल्व्ह नसल्यामुळे शहराच्या दक्षिणेकडील उपनगारामध्ये नेहमीच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. राजेंद्रनगर, जरगनगर, वैभव सोसायटी, ग्रीन पार्क, रेव्हुन्यू कॉलनी, योगेश्वर कॉलनी या परिसराची ही वर्षानुवर्षे समस्या बनली आहे. परिणामी या भागातील नागरीकांना एक घागर पाण्यासाठी तासभराची प्रतीक्षा करावी लागते. मान्सून पावसाची प्रतीक्षा वाढत असल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. हे नैसर्गिक कारण असले, तरी शहरालगतच्या उपनगरांना मानवनिर्मित पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. बुहतांशी उपनगरे उंचावर असल्याने या भागांना नेहमीच अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होता. जरगनगर व परिसरातील नगरे, कॉलन्यांना रात्री आठ ते साडेदहा या वेळेत पाणी सोडले जाते. पण, पाण्याला दाब मिळत नसल्याने अत्यंत कमी पाणीपुरवठा होतो. परिणामी नागरीकांना एक घागर पाण्यासाठी तासाभराची प्रतीक्षा करावे लागते. योगेश्वर कॉलनी व परिसराला सकाळी साळोखेनगर टाकीतून पाणीपुरवठा होतो. मात्र रायगड कॉलनीतून गेलेल्या जलवाहिनी व्हॉल्व्ह नसल्यामुळे पाण्याचा दाब अत्यंत कमी असतो. याबाबत येथील नागरिकांसह नगरसेविकां अनेकवेळा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून व्हॉल्व्ह बसवण्याची मागणी केली. पण, अद्याप विभागाने त्यांची मागणी पूर्ण केलेली नाही. अशीच स्थिती राजेंद्र नगर परिसरात उद्भवते. या भागाला सुभाषनगर पंपिंग हाऊस येथून पाणीपुरवठा होतो. पण कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने राजेंद्रनगरसह वैभव सोसायटी, ग्रीन पार्क, रेव्हुन्यू कॉलनी, अमरदीप कॉलनी, डी. आर. भोसले नगर परिसराला अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. जरगनगर, राजेंद्रनगर परिसरातील नागरीक दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी सातत्याने करत आहेत. पण याबाबतचा तोडगा महासभेत होत नसल्याने सर्वत्र मुबलक पाणी मिळत असताना या भागाला मात्र अपुरे पाणी मिळते. पाणी सोडण्याच्या वेळा अनियमित असल्याने प्रभागातील नागरिकांना अपुरे पाणी मिळते. रायगड कॉलनी येथून जाणाऱ्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्यासाठी सातत्याने पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळेही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. - गीता गुरव, नगरसेविका राजेंद्रनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. पण सुभाषनगर पंपिंग हाऊस येथून केवळ समन्वयाअभावी पाणी उपसा होऊ शकत नसल्याने परिसरात अपुरा पाणी पुरवठा होतो. अतिशय कमी दाबाने पाणी मिळत आहे. - लाला भोसले, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालाच्या भीतीने आत्महत्या करणारा प्रणव दहावीत उत्तीर्ण

0
0

कोल्हापूर :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. इंग्रजी विषयात नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या करणारा प्रणव जरग ४२% टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाला आहे. प्रणव उत्तीर्ण झाल्याची माहिती त्याच्या मित्रपरिवाराने कुटुंबीयांना दिली.

नापास होण्याच्या भीतीने प्रणव सुनील जरग (वय १६, रा. आर. के. नगर सोसायटी, नंबर ५) या विद्यार्थाने गळफास लावून गुरुवारी (ता. ६ ) आत्महत्या केली होती. आज दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यावर त्याला दहावीत ४२ टक्के गुण मिळाल्याचे समजले. अवघड वाटत असलेल्या इंग्रजी विषयात ३७ गुण मिळाले आहेत. प्रणव उत्तीर्ण झाल्याची माहिती त्याच्या मित्रपरिवाराने दिली.

गुरुवारी सायंकाळी मुलांसोबत खेळून आलेल्या प्रणवने आईबाबांसोबत बाहेर जाण्यास नकार देऊन घरीच राहणे पसंत केले. घरातील दिवे मालवून त्याने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे काका बाजीराव घरी परतल्यावर या गोष्टीचा उलगडा झाला.

आत्महत्या करण्यापूर्वी मी इंग्रजी नापास होणार असल्याची भीती त्याने घरी बोलून दाखविली होती. मात्र पालकांनी 'कितीही गुण मिळूदेत, काळजी करु नको', असे सांगितले होते. प्रणवने आत्महत्या केल्याने तो दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला, मात्र आयुष्याच्या परिक्षेत नापास झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरतीने दिला वडिलांच्या स्वप्नांना ‘रंग’

0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

पोटापाण्याचा प्रश्न मिटावा या हेतूने तिच्या वडिलांनी १५ वर्षांपूर्वी घर सोडून महाराष्ट्राची वाट धरली. मूळची उत्तर प्रदेशातील असलेल्या हिंदी भाषिक आरती विजय हिने

मराठी भाषेची कोणतीही ओळख नसतानाही मराठीशी सलगी केली. इथल्या मातीत शैक्षणिक वाटचालीस सुरुवात केली. आरतीने दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळवत रंगकाम करणाऱ्या वडिलांच्या कष्टाला न्याय दिला. आरती मुक्तसैनिक वसाहतीमधील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.

मुक्तसैनिक वसाहतीत भाड्याच्या घरात राहणारी आरती मूळची उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील चौरीचौरा गावातील आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने तिच्या वडिलांनी मूळ गाव सोडून पंधरा वर्षांपूर्वी कोल्हापूरच गाठले. शिक्षणाची पार्श्वभूमी नसल्याने तिच्या वडिलांनी पडेल ती कामे करत आपल्या तीन मुलांना शिकवले. आरतीला बहीण व भाऊ आहे.

सध्या आरतीचे वडील वॉल पेंटिंग व रंगकाम करतात. मुलांनी शिकावे, खूप मोठे व्हावे असे त्यांना मनोमन वाटते. आरतीची आई घरकाम करते. घरची पार्श्वभूमी प्रतिकूल असतानाही मराठी भाषेशी कुठलाही संबंध नसताना या कुटुंबीयांनी मुलांना स्थानिक भाषेत शिकवण्यास प्राधान्य दिले. आरतीला शिक्षक एस. एस. सौंदलगे, व्ही. व्ही. कुलकर्णी, एस. एस. मनुगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

आपल्या खडतर प्रवासाविषयी आरती सांगते, 'योग्य नियोजन करून अभ्यासाला प्राधान्य दिले. घरामध्ये सर्वजण हिंदी बोलतात. त्यामुळे हिंदीचे संस्कार असूनही मराठीची आवड आहे. सकाळी पहाटे उठून अभ्यास केला. अवघड विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्राधान्य दिले. शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने यश मिळवू शकले. भविष्यात डॉक्टर होऊन सर्वसामान्य रुग्णांची सेवा करणार आहे.'

आरतीला विज्ञान विषयाची आवड असून भविष्यात डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न आहे. दुसऱ्यांच्या घरांना रंगकाम करता करता तिचे वडील विजय यांनी आपल्या मुलीची भविष्यातील स्वप्ने रंगवण्याचा निर्धार केला आहे.

सरकार दप्तरी नोंद नाही

आरतीच्या वडिलांची सरकार दप्तरी कुठलीही नोंद नाही. त्यामुळे शाळेतही तिचे नाव 'आरती विजय' असे आडनावाविना आहे. याकामी शाळेने पुढाकार घेऊन गॅझेट करून आरतीला नवी ओळख देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मूळची कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्यांना कोल्हापूरमध्ये स्थायिक होण्यासाठी धडपड करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images