Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सहा जण अटकेत; शंभर जणावर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराणा प्रताप चौक परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांत झालेल्या दगडफेकप्रकरणी बुधवारी पोलिसांनी सहा हुल्लडबाजांना अटक केली. त्यांना कोर्टासमोर हजर केले असता ११ जूनपर्यंत कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली. खूनाचा प्रयत्न आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दोन्ही गटाच्या सुमारे १०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी महाराणा प्रताप चौकातील साळी गल्लीत समन्वय बैठक घेऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

क्रिकेटच्या सामन्याच्या वादानंतर महाराणा प्रताप चौक परिसरातील साळी गल्लीत लहान मुलांच्या क्रिकेटच्या खेळाच्या कारणावरून दोन गटाकडून दगडफेक आणि हाणामारी झाली होती. यामध्ये जमावाला शांत करण्यासाठी गेलेले लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर, सहायक पोलिस निरीक्षक सुनील पोवार आणि कॉन्स्टेबल अमर पाटील जखमी झाले होते. तसेच दगडफेकीत सात ते आठ जण जखमी झाले होते. पोलिसांवर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिस नाईक विजय देसाई यांनी १०० जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार नंदकुमार सूर्यंवंशी, यशपाल सूर्यंवंशी, उमेश चव्हाण, पवन शेलार, चेतन पोवार, संदीप सूर्यंवंशी (सर्व रा. घिसाड गल्ली) यांना अटक करण्यात आली. या सर्वांना कोर्टासमोर हजर केले असताना ११ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यासह दगडफेक करणाऱ्या जाफर मंजूर शेख, जुफरान अजीज शेख, अमन अख्तर शेख, सैफअली फरीद शेख, शरीफ नसीर, रफीक महमंद मोमीन, रफिक मोरजंग महात (सर्व रा. अकबर मोहल्ला,) यांच्यासह सुमारे १०० जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती तपास अधिकारी एस. टी. पाटील यांनी दिली.

दगडफेकीत सात ते आठ जणांना जखमी केल्याप्रकरणी शाहीन इम्तियाज खलिफा (वय ३२ रा. सोमवार पेठ) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अटक केलेल्या सहा जणांसह ४५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. काचेच्या बाटल्या, विठांचे तुकडे, दगड, कौले फेकून मारल्याने मुलगा आयाज याच्यासह रफीक मोमीन, सैफ फरीद शेख, जाफर सिंधी, अख्तर शेख, शरीफ पठाण, शबाना आयाज जखमी झाले. आयाज याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बुधवारी रात्री माजी स्थायी समिती सभापती रमेश पोवार यांनी काही कुटुंबियासोबत पोलिसांची भेट घेऊन दगडफेकीत सहभागी नसलेल्यांच्या गुन्हे दाखल करू नयेत, अशी विनंती केली. त्यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात सहभागी असलेल्यांचा शोध सुरू आहे. संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यावरणदिनी एसटीपीवर वृक्षारोपण

$
0
0

फोटो आहेत...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने कसबा बावडा येथील एसटीपी प्लांटवर आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बुधवारी वृक्षारोपण केले. विशेषत: देशी वृक्षांचे रोपण करत रोपांना माजी महापौरांच्या नावाचे रोप त्यांच्याच हस्ते रोपण करण्यात आले. राज्य सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत ११ हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्याची तयारीही सुरू केली आहे.

यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'महापालिकेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने कचरा वर्गीकरण, सांडपाणी निर्गतीकरण व स्वच्छता चळवळ सुरू झाली आहे. त्यासाठी विविध संघटना व त्यांचे कार्यकर्ते, एनजीओ व शहरवासीयांचा पाठिंबा मिळत आहे. शहरातील कचरा व सांडपाणी कमी करण्याचे नियोजन असून स्वच्छता मोहीम घराघरांत पोहोचवायची आहे. तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून शहरात हरितपट्टा विकसित करण्याचा मानस आहे. शहरवासीयांमध्ये जागृती करण्यासाठी कॉर्नर सभा घेण्याचे नियोजन आहे. गुरुवारपासून कसबा बावडा येथे कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे.'

माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, 'महाराष्ट्र उष्णतेने होरपळत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटू लागले आहे. कोल्हापूरला टंचाईच्या झळा बसलेल्या नसल्या, तरी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.'

यावेळी महापौर सरिता मोरे, मधुरिमाराजे छत्रपती, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, परिवहन सभापती अभिजित चव्हाण, राजसिंह शेळके, गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक संदीप नेजदार, नगरसेविका माधुरी लाड, स्वाती यवलुजे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहाळकर, माजी महापौर आर. के. पोवार, क्रिडाईचे राज्याध्यक्ष राजू परीख, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आर्किटेक्ट आसोसिएशनेच अध्यक्ष अजय कोराणे, आदी उपस्थित होते. विजय वणकुद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

००००

देशी प्रजातींची लागवड अधिक

एसटीपी प्लांटजवळ लावण्यात आलेल्या रोपांमध्ये विशेषत: तबोबिया, स्पॅटोडिया, अर्जुन, मूचकुंद याबरोबर वड, पिंपळ या डेरेदार वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. त्याचबरोबर देशी प्रजातींच्या रोपांची अधिक लागवड केली आहे. यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचऱ्याचे कॅपिंग झाल्यानंतर येथे उद्यान विकसित करण्यात येणार असून, येथे मोठ्या प्रमाणात देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

$
0
0

महापालिका पोटनिवडणूक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पद्माराजे उद्यान व सिद्धार्थनगर प्रभागासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (ता.६) शेवटचा दिवस आहे. पद्माराजे उद्यान प्रभागातून दोन अर्ज दाखल झाले असून सिद्धार्थनगर प्रभागातून एकही अर्ज दाखल झालेला नाही.

पक्षांतरबंदी कायद्यामुळे अपात्र झालेल्या दोन प्रभागामध्ये पोटनिवडणूक जाहीर होऊन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ३० मेपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली असताना, पद्माराजे उद्यान प्रभागातून केवळ दोन अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये शेकापचे स्वप्नील पाटोळे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक अजित राऊत यांनी अर्ज दाखल केला आहे. राऊत हे वेताळमाल तालीम मंडळाचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्याविरोधात खंडोबा तालीम मंडळाचा एक उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत या प्रयत्नाला यश आलेले नव्हते. तर सिद्धार्थनगर प्रभागातून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. परिणामी दोन्ही प्रभागातील पोटनिवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेखाचित्राच्या आग्रहाने अलगद जाळ्यात

$
0
0

प्रकाश बनसोडे, इस्लामपूर

येथील अपहृत वरदराज बाळासाहेब खामकर या दहा वर्षाच्या मुलाने सलग ३२ तास उपाशीपोटी खंभीरपणे आपल्यावरील संकटाचा सामना केला. मुलाच्या अपहरणाने हादरून गेलेले त्याचे आईवडीलही दोन दिवस उपाशी होते. अपहरण करणारा जवळचा नातलग पोलिस आणि अथकपणे तपास करणारेही पोलिस... पोलिस दलाची ही दोन रुपे यानिमित्ताने अनुभवायला मिळाली.

याप्रकरणातील मुख्य संशयित सुनील कदम हा पोलिस आहे. अपहरणानंतर तो इस्लामपुरात नातेवाईकांसोबतच होता. पोलिसांनी संशयितांचे बनवलेले रेखाचित्र तो पाहण्यासाठी देण्याचा सतत आग्रह करत होता. त्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई त्याच्याभोवती फिरत राहिली आणि अखेर त्याने खंडणीसाठी साथीदाराच्या मदतीने वरदचे अपहरण केल्याची कबुली दिली.

वरदचा शोध, पोलिस यंत्रणेचा तपास या सर्व घडामोडीत कदम सहभागी होता. अनेकदा तो पोलिसांशी बोलून माहिती घ्यायचा. मुलाचे वडील आणि त्याचे सख्खे मामा बाळासो खामकर यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असे. पोलिसांनी केलेले संशयिताचे रेखाचित्र पाहण्याचा कदमने आग्रह धरल्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी कदम काम करत असलेल्या गडहिंग्लज पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि सहकाऱ्यांशी बोलून माहिती घेतली. त्यानंतर या सहकाऱ्यांनी कदमला फोन करून तू काही उपद्व्याप केले असशील तर पोलिसांना सांगून मोकळा हो, असे सांगितल्यावर आपण घेरलो गेलोय, हे कदमच्या लक्षात आले. तपासाची चक्रे आपल्याभोवती फिरत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने त्याच्या साथीदारांना वरदला सोडून द्यायला संगितले. त्यानुसार मंगळवारी रात्री त्याच्या साथीदारांनी वरदला शिये फाट्याजवळ हायवेवर सोडले आणि ते पसार झाले. वरद अत्यंत धाडसी आणि हुशार असल्याने त्याने एका गाडीला लिफ्ट मागितली आणि पोलिसांशी संपर्क झाला.

सोमवारी संध्याकाळी वरदला वडिलांचा फोन आल्याचे सांगून त्याला गाडीत बसवून त्याचे अपहरण केले. त्याचवेळी मुख्य संशयित सुनील कदम हा मामा बाळासो खामकर यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या महाविद्यालयाच्या परिसरात थांबला होता. खामकर वरदला आणायला क्लासकडे जाणार होते. मात्र या बोलण्यात त्यांची सात ते आठ मिनिटे गेली आणि सुनील कदमचा प्लॅन सक्सेस झाला. कदमच्या दोन साथीदारांनी वरदला कोल्हापूरच्या दिशेने नेले आणि लॉजवर ठेवले होते.

शियेफाट्याजवळील हॉटेल शिवतेज लॉजही कदमने पोलिस असल्याचे सांगून मामाच्या मुलाच्या जीविताला धोका आहे. त्याला आठ दिवसासाठी येथे ठेवायचा आहे असे सांगून बुक केला होता. प्रत्यक्षात या ३२ तासात वरदच्या समोर सुनील आला नाही. मात्र लॉजच्या परिसरात तो गेला होता.

.. .. .. ..

फिर्याद देण्यासाठी आरोपीच पुढे

वरदचे अपहरण झाल्यापासून तो सर्व प्रक्रियेत सहभागी होता. इस्लामपूरचे ठाणे अंमलदार संगणकावर फिर्याद नोंद करताना कदमने फिर्याद टाइप करण्यासाठी त्यांना मदत केली. फिर्याद नोंद करून झाल्यावर अनेक लोक पोलिस ठाण्याच्या आवारात थांबून होते. त्यावेळी त्याने उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना फोन करून स्वतःची ओळख पटवून देत या घटनेबाबत मामांना मदत करण्याची विनंती केली.

... .. .. .. .. ...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीट परीक्षेत घवघवीत यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. विवेकानंद, राजाराम आणि गोखले कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. खासगी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत बाजी मारली. संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अॅकॅडमी, विवेकानंद कॉलेज, चाटे शिक्षण समूहासह गोखले कॉलेज, राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले.

घोडावत अॅकॅडमीमधील निशांत बिराजदारने ७२० पैकी ६५९ गुण मिळवत देशात ५८७ वा क्रमांक मिळवला. येथील विवेकानंद कॉलेजमधील विद्यार्थी चैतन्य काटकरने ६२७ गुण मिळवत कॉलेजमध्ये अव्वल ठरला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशातील नीट परीक्षा अत्यंत महत्त्वाची समजली जाते. या अभ्यासक्रमासाठी पाच मे रोजी परीक्षा झाली होती. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्कंठा लागून राहिलेल्या या परीक्षेचा निकाल बुधवारी वेबसाइटवर दुपारी जाहीर झाला, पण सर्व्हर डाउनमुळे असंख्य विद्यार्थ्यांना निकाल समजू शकला नाही. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही जीव टांगणीला लागला.

केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी या तीन विषयांची एकूण ७२० गुणांची परीक्षा पाच मे रोजी झाली होती. या परीक्षेत विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी अलिशा दरडाने ५९५, कलिका देशमुख ५८४, ईशा सतीश पावसकर ५०५ तर सचिन कुलकर्णीने ४८५ गुण मिळविले. गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजचा विद्यार्थी सिद्धार्थ मंदार पाटील ४९८ गुणांनी यशस्वी ठरला. सिद्धार्थ हा सुशिक्षित कुटुंबातील असून आई, वडील दोघेही डॉक्टर आहेत.

००००

परीक्षेसोबत खेळातही चमक

ईशाने विवेकानंद कॉलेजध्ये अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले. तिला बारावीच्या परीक्षेत ८८.८० टक्के गुण मिळाले. शिवाय विवेकानंद कॉलेजमध्ये सीईटी परीक्षेत पीसीबी ग्रुपमध्ये प्रथम आली आहे. नीट परीक्षेत ५०५ गुण मिळाले. तिला टेबल टेनिस खेळाची आवड आहे. अकरावी, बारावीत शिकत असताना तिने राज्यस्तरावरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कांस्य पदक पटकाविले. छत्रपती शाहू विद्यालयातून दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ईशाचे वडील सतीश पावसकर डॉ. डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे येथे संचालक आहेत, तर आई गृहिणी आहे.

००००

'फिजिक्स एज्युपाईंट'चे विद्यार्थी यशस्वी

'फिजिक्स एज्युपाईंट'मधील सहा विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत बाजी मारली. यामध्ये प्रशांत लगडने ५७०, मृण्मयी मानेने ५४८, आकांक्षा चव्हाणने ५४२, हृषिकेश खोतने ५४२, अभिषेक कुलकर्णीने ५०३, सुदर्शन पाटीलने ५१२, रोहित कारंजकरने ४९८, वत्सल भातोडीने ४९६, सचिन कुलकर्णीने ४८५, प्राजक्ता पाटीलने ४८३ गुण मिळविले.

००००

अॅकॅडमीचे १० विद्यार्थी ९९ पर्सेंटाईलवर

संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अॅकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत ६०० हून अधिक गुण मिळवले. अॅकॅडमीच्या निशांत बिराजदार या विद्यार्थ्याने ७२० पैकी ६५९ गुण मिळवून देशात ५८७ वा क्रमांक पटकावला. ९९ पर्सेंटाईलच्या वरती दहा विद्यार्थी आहेत. यामध्ये अॅकॅडमीच्या शशांक ऐतलने या परीक्षेत ९९.९८९ पर्सेंटाईल मिळवून पश्चिम महाराष्ट्रात उच्चांकी गुण प्राप्त केल्याचा दावा संस्थेने केला आहे.

अॅकॅडमीच्या अन्य विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत लख्ख यश मिळवले. यामध्ये स्टीवन अँटीनने ६५२ (देशात ८६० वा), गोविंद मानेने ६३९ (देशात १७६९), सायली पाटीलने ६३७ (देशात १९३०), श्रीरंग रायरीकरने ६३० (देशात २७६४) गुण प्राप्त केले. या यशाबद्दल घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी अॅकॅडमीचे संचालक वासू व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. घोडावत यांनी, अॅकॅडमीने वर्षांनुवर्षे उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखत यशाची घोडदौड सुरू ठेवली आहे. दरवर्षी अॅकेडमीचा निकाल उंचावत आहे, हे गौरवास्पद असून त्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. संचालक वासू म्हणाले, 'प्रयत्नांची उंची वाढवली की यशाचे शिखर गाठता येते. यावर्षीचा नीटचा निकाल हा त्याचेच फलित आहे. यापुढेही अॅकॅडमीची यशस्वी वाटचाल चालू राहील.' दरम्यान, विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. निशांत बिराजदार हा मूळचा सोलापूर येथील आहे.

अॅकॅडमीचे विद्यार्थी पर्सेंटाईलमध्ये

अॅकॅडमीच्या दहा विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईलच्यावरती गुण मिळवले. यामध्ये स्टीवन अँटीन (९९.९८२), श्रीयस कुलकर्णी (९९.९८१), निशांत बिराजदार (९९.९७१), श्रीरंग रायरीकर (९९.९६६) , श्रेया बागडे (९९.९५८), सौरव कलसूर (९९.९४४), श्रीशैल आगाशे (९९.९३७), सायली पाटील (९९.९२५), सर्वेश फेगडेने (९९.९०७) पर्सेंटाईल गुण मिळवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होर्डिंग्जने शहर विद्रूप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम सरकारी यंत्रणेने केलेल्या जाहिराती, होर्डिंग्ज, व्यावसायिक फलक आणि त्यापाठोपाठ उगवणारे राजकीय नेत्यांचे वाढदिवस फलक यातून शहराचे विद्रुपीकरणच सुरू आहे. शहराच्या प्रवेशद्वारापासून सुरू असलेली फुकटची जाहिरातबाजी आता गल्लीबोळात पोहोचली आहे. अधिकृत आणि अनधिकृत जाहिरातींमुळे शहराच्या होत असलेल्या विद्रुपीकरणाबरोबरच खराब झालेल्या डिजिटल फ्लेक्समुळे प्लास्टिक कचऱ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही प्लास्टिक कचऱ्याची वाढ पर्यावरणाला घातक ठरत आहे. महापालिका प्रशासन यावर कारवाईकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले आहे. राजकीय नेत्यांच्या जाहिरातीपासून कमर्शिअल (व्यावसायिक) माहिती देणारे फलक अनेक महत्त्वाच्या मार्गांसह वैयक्तिक आणि ऐतिहासिक इमारतींभोवती दिसतात. असे जाहिरात फलक हे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत असला, तरी बहुतांशवेळा परवानगी न घेताच फलकबाजी केली जाते. त्यामुळे महसूल बुडत आहे. शहराचे विद्रुपीकरणही मोठ्या प्रमाणात होत आहे. शहराला असलेला ऐतिहासिक वारसा, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, रंकाळा, न्यू पॅलेसमुळे पर्यटकांचा ओघ नेहमीच असतो. बाहेरचा जिल्हा किंवा राज्यातून आलेल्या पर्यटकांमुळे येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पण महत्त्वाची सर्व ठिकाणे अनधिकृत, अधिकृत होर्डिंग्जमुळे अक्षरश: झाकोळून गेली आहेत. महापालिकेने अनधिकृत जाहिरातबाजीला अटकाव करण्यासाठी धोरण स्वीकारले. त्याबाबतचा महासभेत ठराव केला. तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी परवाने व कारवाई करण्याचे इस्टेट विभागाचे अधिकार चारही विभागीय कार्यालयांकडे हस्तांतरीत केले. अनधिकृत फलकांवर कारवाई सुलभपणे करण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी यानंतरही अनधिकृत फलकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विभागीय कार्यालयांकडून अशा फलकांची पाहणी होईपर्यंत जाहिरातबाजी करून फलक काढून घेतले जातात. मात्र, एक फलक गेल्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा फलक लावला जात असल्याने कारवाई केवळ कागदावरच राहते. शहराला ज्याप्रमाणे अतिक्रमणांचा विळखा पडला आहे, त्याचप्रमाणे होर्डिंग्ज, फलकांची संख्याही लक्षणीय आहे. अतिक्रमण विभाग सवडीनुसार कारवाई करताना अनधिकृत होर्डिंग्जवर झालेली कारवाई ठळकपणे सांगितली जाते. पण अशा स्वरुपाच्या कारवाईनंतरही फलक दिसत असल्याने कारवाई नेमक्या कोणत्या अनधिकृत फलकांवर केली? हा प्रश्न गुलदस्त्यातच राहतो. कारवाई कधी? महापालिकेने यापूर्वी महासभेत जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ठराव केला. वाहतुकीला अडथळा न करता होर्डिंगवर पाच वर्षांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी विहित शुल्क भरल्यानंतर परवानगी मिळते. अशी परवानगी नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे जाहीर प्रकटन प्रशासनाने २४ मे रोजी प्रसिद्धीस दिले. पण आठवडाभरात प्रशासनाने एकाही अनधिकृत होर्डिंग, फलकांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे शहरात असलेली सर्व होर्डिंग्ज अधिकृत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो. डिजिटल फलकांचा कचरा गेल्या महिन्यापासून महापालिकेने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. विशेषत: जयंती नाला व उपनाल्यांची स्वच्छता करताना नाल्यांच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा आढळून येत आहे. यात खराब झालेल्या डिजिटल फलकांचाही समावेश आहे. ज्याप्रमाणे जैववैद्यकीय कचऱ्याबरोबर खराब झालेल्या होर्डिंगचे फलक मोठ्या प्रमाणात दिसून आले. खराब झालेल्या डिजिटल फलकांवर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नसल्याने हा सर्व प्लास्टिक कचरा कोंडळा अथवा नाल्यांच्या पात्रात टाकला जातो. परिणामी प्लास्टिकचा प्रश्न आणखी गंभीर होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंगणापूर बंधाऱ्यातील गळती रोखण्यास प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर मान्सून पावसाने ओढ दिल्याने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शिंगणापूर बंधाऱ्यातील पाणी गळती रोखण्यावर भर दिला आहे. शिंगणापूर बंधारा येथे पाणीपातळी कायम ठेवण्यासाठी मंगळवारी प्लास्टिक कागद व वाळुची पोती टाकून गळती रोखली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्याकडून बांधाऱ्यातील पाणीपातळी व गळतीबाबतची माहिती घेतली. दिवसेंदिवस मान्सून पावसाची प्रतीक्षा लांबणीवर पडत असल्याने शहरावर पाणीटंचाई धोका वाढू लागला आहे. धरण व उपसा होणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्यामध्ये १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठी असला, भविष्यातील धोका ओळखून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सकाळी आयुक्तांनी जलअभियंता कुलकर्णी यांच्या चर्चा करून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. शहराला पाणी उपसा होणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्याला गळती लागली आहे. त्यामुळे धरणातून सोडलेले पाणी गळतीवाटे वाया जात आहे. वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी मंगळवारी प्लास्टिक व वाळूची पोती टाखून ८० टक्के गळती दूर केली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दोन दिवसांत शिंगणापूर बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार असल्याने बंधाऱ्यातील गळती दूर करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार आज गळती दूर केली. पण कायमस्वरुपी असणारी गळती पावसाळ्यानंतर निविदा काढून दूर करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुषार बुरुड कार्यकारी अभियंता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापऊर

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर दक्षिण विभागाचय कार्यकारी अभियंतापदी बदली झाली आहे. कोल्हापूर दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एन. वेदपाठक यांना पदोन्नती मिळाली आहे. त्या रिक्त जागेवर बुरुड यांची बदली झाली आहे. बुरुड यांनी जिल्हा परिषदेत कार्यरत असताना विविध विकास कामांना गती दिली. जि. प. त त्यांनी ई बिलिंगचा उपक्रम राबविला. रस्ता दुरुस्ती, जि. प. च्या उत्पन्न वाढीसाठी विविध ठिकाणी दुकान गाळ्यांची उभारणी केली आहे. बुरुड हे गेली तीन वर्षे जि.प.च्या बांधकाम विभागाकडे सेवेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपनगरात कमी दाबाने पाणीपुरवठा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पाणी सोडण्याच्या अनियमित वेळा, समन्वयाचा अभाव आणि जलवाहिनीवर आवश्यकतेनुसार व्हॉल्व्ह नसल्यामुळे शहराच्या दक्षिणेकडील उपनगारामध्ये नेहमीच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. राजेंद्रनगर, जरगनगर, वैभव सोसायटी, ग्रीन पार्क, रेव्हुन्यू कॉलनी, योगेश्वर कॉलनी या परिसराची ही वर्षानुवर्षे समस्या बनली आहे. परिणामी या भागातील नागरीकांना एक घागर पाण्यासाठी तासभराची प्रतीक्षा करावी लागते.

मान्सून पावसाची प्रतीक्षा वाढत असल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. हे नैसर्गिक कारण असले, तरी शहरालगतच्या उपनगरांना मानवनिर्मित पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. बुहतांशी उपनगरे उंचावर असल्याने या भागांना नेहमीच अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होता. जरगनगर व परिसरातील नगरे, कॉलन्यांना रात्री आठ ते साडेदहा या वेळेत पाणी सोडले जाते. पण, पाण्याला दाब मिळत नसल्याने अत्यंत कमी पाणीपुरवठा होतो. परिणामी नागरीकांना एक घागर पाण्यासाठी तासाभराची प्रतीक्षा करावे लागते. योगेश्वर कॉलनी व परिसराला सकाळी साळोखेनगर टाकीतून पाणीपुरवठा होतो. मात्र रायगड कॉलनीतून गेलेल्या जलवाहिनी व्हॉल्व्ह नसल्यामुळे पाण्याचा दाब अत्यंत कमी असतो. याबाबत येथील नागरिकांसह नगरसेविकां अनेकवेळा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून व्हॉल्व्ह बसवण्याची मागणी केली. पण, अद्याप विभागाने त्यांची मागणी पूर्ण केलेली नाही.

अशीच स्थिती राजेंद्र नगर परिसरात उद्भवते. या भागाला सुभाषनगर पंपिंग हाऊस येथून पाणीपुरवठा होतो. पण कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने राजेंद्रनगरसह वैभव सोसायटी, ग्रीन पार्क, रेव्हुन्यू कॉलनी, अमरदीप कॉलनी, डी. आर. भोसले नगर परिसराला अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. जरगनगर, राजेंद्रनगर परिसरातील नागरीक दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी सातत्याने करत आहेत. पण याबाबतचा तोडगा महासभेत होत नसल्याने सर्वत्र मुबलक पाणी मिळत असताना या भागाला मात्र अपुरे पाणी मिळते.

पाणी सोडण्याच्या वेळा अनियमित असल्याने प्रभागातील नागरिकांना अपुरे पाणी मिळते. रायगड कॉलनी येथून जाणाऱ्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्यासाठी सातत्याने पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळेही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.

- गीता गुरव, नगरसेविका

राजेंद्रनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. पण सुभाषनगर पंपिंग हाऊस येथून केवळ समन्वयाअभावी पाणी उपसा होऊ शकत नसल्याने परिसरात अपुरा पाणी पुरवठा होतो. अतिशय कमी दाबाने पाणी मिळत आहे.

- लाला भोसले, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान समिती देणार दुष्काळग्रस्तांना २५ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने दुष्काळग्रस्तांसाठी सामाजिक सहायता निधीतून २५ लाख लाखांचा निधी देण्यात येणार आहे, लवकरच तो मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. दरम्यान, अंबाबाईचे मुखदर्शन अधिक जवळून घेता यावे या उद्देशाने गुरूवारपासून कासव चौकातूनही देवीच्या मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केरळ येथे पूरगस्तांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मदत केली होती. यंदा महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे देवस्थान समितीतर्फे २५ लाखांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहे. जाधव पुढे म्हणाले, 'दरवर्षी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रत्येकाला थेट गाभाऱ्याजवळ दर्शन घेणे सोपे होत नाही. अशावेळी मंदिरातील मुखदर्शन सुविधेचा लाभ लाखो भाविक घेतात. परंतु भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मुखदर्शनाच्या जागाही तोडक्या पडत आहेत. त्यामुळेच देवस्थान समितीने गुरूवारपासून प्रायोगिक तत्वावर मंदिरातील कासव चौकातून भाविकांना मुखदर्शन सुविधा उपलब्ध करून दिली असून दर्शन घेवून भाविक शेजारील सरस्वती मंदिराजवळीत प्रवेशद्वारातून बाहेर जावू शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैष्णवी पाटील चाटे समूहात प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नीट परीक्षेत चाटे शिक्षण समूहाच्या चाटे कोचिंग क्लासेस व चाटे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले. या परीक्षेत वैष्णवी श्रीपाद पाटील ६३२ गुण मिळवून समूहामध्ये प्रथम आली. आकाश कोल्हेने ६३० गुण मिळवून द्वितीय, तर प्रज्ज्वल वरकने ६१६ गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

या विद्यार्थ्यांसोबतच ५४० ते ४०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये प्रशांत लगड व योगेश्वरी पवळे यांनी अनुक्रमे ५७० गुण मिळवले. आकांक्षा चव्हाणने (५४२), अक्षय कांबळे (५४२), आरती यादव (५३२), रत्नेश्वरी यमलवार (५२०), सुदर्शन पाटील (५१२), ओंकार काळंबे (५१२), रोहित करंजकर (४९८), अनिकेत जयस्वाल (४९५), शुंभकर पाटील (४९२), धनंजय पताडे (४९१), अथर्व सावंत (४८५), आरती कांबळे (४५१), कुणाल नष्टे (४३६), संस्कृती चड्डे (४३३),संकेत पाटील (४२०), वैष्णवी जाधव (४१३), सुजित गुळिंग (४१०), ब्रह्मदेव वगरे (४०६), अंकिता सिंग (४००) गुण मिळवले आहेत.

'विद्यार्थी, पालकांनी चाटे समूहावर दाखविलेला विश्वास आमची जबाबदारी वाढवितो, याची जाणीव आहे. म्हणूनच स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याची गरज ओळखून त्यासाठी सज्ज आहोत,' असा विश्वास समूहाचे कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी व्यक्त केला. चाटे समूहाचे संचालक प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक हटाव चळवळ गतिमान करण्याचा निर्धार

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेदरम्यान प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आता प्लास्टिक हटाव चळवळ सुरू करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्हा आणि शहर टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातील बैठकीच्या अध्यक्षस्थानी निमंत्रक निवास साळोखे होते.

टोलविरोधी आंदोलनाला सुरुवात करताना जनजागृतीसाठी डिजिटल फलक मिरजकर तिकटी येथे उभारण्यात आला. जनजागृतीमुळे टोलविरोधी आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात आली. त्याचप्रमाणे शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी तेवढ्याच मोठ्या फलकातून जनजागृती करण्यात येणार आहे. प्लास्टिकमुक्तीबरोबर पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न करण्यात येतील. मिरजकर तिकटी येथे फलक उभारल्यानंतर त्याचदिवशी शहरात काढण्यात येणाऱ्या जनजागृती रॅलीची तारीख निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीस माजी नगरसेवक बाबा पार्टे, प्रसाद जाधव, संभाजीराव जगदाळे, अनिल घाटगे, जयकुमार शिंदे, अशोक भंडारी, राजू जाधव, संतोष माळी, अनिल कदम, किशोर घाटगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुलावर विद्युत व्यवस्थेची गरज

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पंचगंगा नदीवरील नवीन पर्यायी खुला झाल्यानंतर त्यावरून शनिवारी दिवसभर, रविवारीही वाहतूक सुरू राहिली. पण पुलावर विद्युत व्यवस्था नसल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेने विद्युत व्यवस्था उपलब्ध करावी, अशी सूचना प्रशासनाकडून केली असली तरी दिवसभर त्याची पूर्तता झाली नव्हती.

पूलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी पूल खूला केला. त्यानंतर शिवाजी पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. शनिवारीही शिवाजी पूल वाहतूकीस बंद ठेवण्यात आला होता. नवीन पूल पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी येथे गर्दी केली. नवीन पुलावरुन वाहने चालवण्यास तरुणाई उत्सुक होती. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी शिवाजी पूल परिसरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे तर पूलाच्या दुसऱ्या बाजूला करवीर पोलिस वाहतूकीचे नियोजन करत होते. पुलावरुन वाहतूक सुरू झाली असली तरी विद्युत व्यवस्था झाली नसल्याने रात्रीच्यावेळी अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे पूलाची देखभाल असल्याने त्यांच्याकडून विद्युत व्यवस्था व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. पुलावरुन शहरात वाहने प्रवेश करत असल्याने महानगरपालिकेनेही विद्युत व्यवस्था करावी यासाठी प्रशासनाने सूचना केली आहे. ठेकेदाराकडून क्रश बॅरिअर उभारण्यात येणार आहेत. आंबेवाडीच्या बाजूने रस्त्याकडेला दगड लावण्यात आले आहेत. मुरुम टाकण्यात आला आहे. रेलिंग उभारण्यााचे काम सुरू असून रंगकाम दोन दिवसांत केले जाणार आहे.

दरम्यान पूल वाहतूकीस खुला करण्यापूर्वी उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे, असा वाद निर्माण झाला होता. पण प्रशासनाने उद्घाटन न करता पूल वाहतूकीस खुला केल्याने या वादातील हवा निघून गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिंदु राष्ट्रासाठी संप्रदायांनी व्यापकता अंगीकारावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'साधना आणि धर्मप्रसार यांचा सुंदर ताळमेळ अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात पहायला मिळत आहे. आर्थिक, तसेच अन्य कारणांमुळे सिंधी समाज राष्ट्र-धर्म कार्यापासून काही काळ दूर गेला होता; मात्र सध्या परिस्थिती पालटली असून हा समाजही राष्ट्र-धर्म कार्यात अग्रेसर आहे. हिंदु राष्ट्रासाठी संप्रदायांना संकुचितता सोडून व्यापक होऊन कार्य करावे लागेल,' असे आवाहन अमरावती (महाराष्ट्र) येथील शिवधारा आश्रमाचे डॉ. संतोष महाराज यांनी केले. रामनाथी (गोवा) येथे रामनाथ देवस्थानच्या विद्याधिराज सभागृहात 'अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना'च्या सहाव्या दिवशी 'सिंधी समाजात संस्कृती रक्षणासाठी केलेले प्रयत्न आणि त्यास मिळालेले यश' या विषयावर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे बिहार राज्य समन्वयक संजय सिंह यांनी अधिवेशनातील ठरावांचे वाचन केले.

दरम्यान, 'नास्तिकतावादी द्रमुक सरकारमुळे तमिळनाडूमध्ये जम्मू-काश्मीर राज्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तेथे हिंदु विरोधी आणि भारत विरोधी शक्ती शिरजोर झाल्या आहेत', असे मत अर्जुन संपथ यांनी मांडले. देहली येथील अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय महासचिव मुन्ना कुमार शर्मा म्हणाले, 'देशभरात विखुरलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र आणून त्यांना जोडण्याचे अतिशय स्तुत्य प्रयत्न हिंदु जनजागृती समिती करत आहे.'

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय संयोजक सूर्यकांत केळकर म्हणाले, बेंगळुरू येथील कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एन्. पी., वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील 'इंडिया विथ विजडम ग्रुप'चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, मुंबई येथील 'लष्कर-ए-हिंद'चे संस्थापक अध्यक्ष ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्ण

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या आपदा मित्र या कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील ४३ आपत्ती व्यवस्थापकांच्या चौथ्या तुकडीला प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांतील युवकांना आपत्ती व्यवस्थापन विषयांमध्ये तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत या सर्व युवकांना पूर व्यवस्थापन कसे करायचे, अपघातात अडकलेल्या लोकांना कसे सोडवायचे, प्रथमोपचार कसे द्यायचे, बोट कशी चालवायची, तराफा कसा चालवायचा आदींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचा समारोप जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी झाला. या कार्यक्रमात सर्व युवकांनी प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या उपस्थितीत सर्व युवकांना प्रशस्तिपत्र आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये मदतीला येऊ शकेल, अशा साधनांचे कीट वाटप करण्यात आली.

जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली हा 'आपला मित्र' कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यात येत आहे.

00 00 00

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत होर्डिंग्जने शहर विद्रूप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सरकारी यंत्रणेने केलेल्या जाहिराती, होर्डिंग्ज, व्यावसायिक फलक आणि त्यापाठोपाठ उगवणारे राजकीय नेत्यांचे वाढदिवस फलक यातून शहराचे विद्रुपीकरणच सुरू आहे. शहराच्या प्रवेशद्वारापासून सुरू असलेली फुकटची जाहिरातबाजी आता गल्लीबोळात पोहोचली आहे. अधिकृत आणि अनधिकृत जाहिरातींमुळे शहराच्या होत असलेल्या विद्रुपीकरणाबरोबरच खराब झालेल्या डिजिटल फ्लेक्समुळे प्लास्टिक कचऱ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही प्लास्टिक कचऱ्याची वाढ पर्यावरणाला घातक ठरत आहे. महापालिका प्रशासन यावर कारवाईकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले आहे.

राजकीय नेत्यांच्या जाहिरातीपासून कमर्शिअल (व्यावसायिक) माहिती देणारे फलक अनेक महत्त्वाच्या मार्गांसह वैयक्तिक आणि ऐतिहासिक इमारतींभोवती दिसतात. असे जाहिरात फलक हे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत असला, तरी बहुतांशवेळा परवानगी न घेताच फलकबाजी केली जाते. त्यामुळे महसूल बुडत आहे. शहराचे विद्रुपीकरणही मोठ्या प्रमाणात होत आहे. शहराला असलेला ऐतिहासिक वारसा, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, रंकाळा, न्यू पॅलेसमुळे पर्यटकांचा ओघ नेहमीच असतो. बाहेरचा जिल्हा किंवा राज्यातून आलेल्या पर्यटकांमुळे येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पण महत्त्वाची सर्व ठिकाणे अनधिकृत, अधिकृत होर्डिंग्जमुळे अक्षरश: झाकोळून गेली आहेत.

महापालिकेने अनधिकृत जाहिरातबाजीला अटकाव करण्यासाठी धोरण स्वीकारले. त्याबाबतचा महासभेत ठराव केला. तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी परवाने व कारवाई करण्याचे इस्टेट विभागाचे अधिकार चारही विभागीय कार्यालयांकडे हस्तांतरीत केले. अनधिकृत फलकांवर कारवाई सुलभपणे करण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी यानंतरही अनधिकृत फलकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विभागीय कार्यालयांकडून अशा फलकांची पाहणी होईपर्यंत जाहिरातबाजी करून फलक काढून घेतले जातात. मात्र, एक फलक गेल्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा फलक लावला जात असल्याने कारवाई केवळ कागदावरच राहते.

शहराला ज्याप्रमाणे अतिक्रमणांचा विळखा पडला आहे, त्याचप्रमाणे होर्डिंग्ज, फलकांची संख्याही लक्षणीय आहे. अतिक्रमण विभाग सवडीनुसार कारवाई करताना अनधिकृत होर्डिंग्जवर झालेली कारवाई ठळकपणे सांगितली जाते. पण अशा स्वरुपाच्या कारवाईनंतरही फलक दिसत असल्याने कारवाई नेमक्या कोणत्या अनधिकृत फलकांवर केली? हा प्रश्न गुलदस्त्यातच राहतो.

कारवाई कधी?

महापालिकेने यापूर्वी महासभेत जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ठराव केला. वाहतुकीला अडथळा न करता होर्डिंगवर पाच वर्षांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी विहित शुल्क भरल्यानंतर परवानगी मिळते. अशी परवानगी नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे जाहीर प्रकटन प्रशासनाने २४ मे रोजी प्रसिद्धीस दिले. पण आठवडाभरात प्रशासनाने एकाही अनधिकृत होर्डिंग, फलकांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे शहरात असलेली सर्व होर्डिंग्ज अधिकृत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.

डिजिटल फलकांचा कचरा

गेल्या महिन्यापासून महापालिकेने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. विशेषत: जयंती नाला व उपनाल्यांची स्वच्छता करताना नाल्यांच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा आढळून येत आहे. यात खराब झालेल्या डिजिटल फलकांचाही समावेश आहे. ज्याप्रमाणे जैववैद्यकीय कचऱ्याबरोबर खराब झालेल्या होर्डिंगचे फलक मोठ्या प्रमाणात दिसून आले. खराब झालेल्या डिजिटल फलकांवर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नसल्याने हा सर्व प्लास्टिक कचरा कोंडळा अथवा नाल्यांच्या पात्रात टाकला जातो. परिणामी प्लास्टिकचा प्रश्न आणखी गंभीर होऊ लागला आहे.

फोटो आहेत.

भूमिका -

ऐतिहासिक शहर म्हणून कोल्हापूर शहराची ओळख. येथील अनेक ऐतिहासिक इमारती, ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण असतात. पण अशी बहुतांशी ठिकाणे अनधिकृत आणि अधिकृत जाहिरात फलक व होर्डिंग्जने झोकाळून गेली आहेत. परिणामी शहरवासियांसह पर्यटकांना ऐतिहासिकस्थळे पाहताच येत नाहीत. एकीकडे अनधिकृत होर्डिंग्ज शहराच्या विद्रुपीकरणात भर टाकत असताना होर्डिंग्जच्या वापरानंतर निर्माण होणारा प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न आणकी जटील होत आहे. खराब झालेल्या होर्डिंग्जवर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नसल्याने हा सर्व कचरा कोंडाळा किंवा नाल्यामध्ये टाकला जात आहे. स्वच्छता मोहिमेमध्ये हे वास्तव समोर आल्यानंतरही याबाबतचे ठोस धोरण प्रशासनाकडून ठरवले जात नाही हे दुर्दैवीच मानावे लागेल. शहराचा ऐतिहासिक बाज पर्यटकांच्या नजरेस पडण्यासाठी आणि शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी एक ठोस धोरणाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. केवळ महसूल मिळतो, म्हणून याकडे दुर्लक्ष करणे शहराच्यादृष्टीने घातकच मानावे लागेल.

. .. .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावडा रस्त्यावर नियोजनाअभावी कोंडी

$
0
0

राहुल मगदूम, कसबा बावडा

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयत ते भगवा चौक या मार्गावर विविध सरकारी कार्यालये आहेत. या कार्यालयांत येणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांमुळे तसेच या रस्त्यावरून जाणाऱ्या लहान-मोठ्या वाहनांचा पादचाऱ्यांना त्रास होत आहे. एस. पी. ऑफिस आणि चार नंबर गेटसमोर काही ठराविक वेळी आणि मोठ्या वाहनांमुळे कोंडी होऊ लागली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून जिल्ह्याचा पोलिस यंत्रणेचा कारभार चालतो. त्यालगत जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे. तेथेच राज्य राखीव पोलिस दलाचे कार्यालय आहे. शेजारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असून येथे पंचवीसहून अधिक सरकारी कार्यालये आहेत. तेथेच विक्रीकर भवन आहे. या कार्यालयातून जिल्ह्याचा जीएसटीचा कारभार चालतो. पुढे जिल्हा न्यायालयाची मोठी इमारत असून येथे पन्नासहून अधिक न्यायालये आहेत. न्यायालयाची इमारत संपताच कसबा बावड्याचा रहिवासी परिसर सुरू होतो. भगव्या चौकात डाव्या बाजूस राजर्षी शाहू जन्मस्थान तसेच जुन्या एसआरपी खात्याची इमारत आणि त्यासमोर कृषी खात्याचे कार्यालय आहे.

या परिसरातच दररोज हजारो नागरिक कार्यालयीन कामकाजासाठी येतात. येथील कर्मचारी व नागरिकांची चारचाकी वाहने व दुचाकी हजारो वाहने या परिसरात ये-जा करीत असतात. राष्ट्रीय महामार्गावरून शियेपासून थेट भवानी मंडप तसेच शहरातील आजुबाजूच्या भागात जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. केएमटी बस व टोप, शिरोली भागातून येणारे डंपर या रस्त्यावरून जातात. हा भाग कार्यालयीन वेळेत कायम मोठ्या वर्दळीचा आहे.

रिक्षास्टॉपमुळे कोंडी

चार नंबर गेट चौकातील महापालिकेच्या महागावकर विद्यामंदिरसमोरील रिक्षा स्टॉप अनधिकृत आहे. येथे थांबलेल्या रिक्षांमुळे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांना वळून शहरात जाण्यास अडचणी निर्माण होतात. या भागात दोन्ही बाजूस दोन बस स्टॉप व रिक्षा स्टॉप आहेत. या रस्त्यावर होणारी कोंडी त्रासदायक ठरत आहे. न्यायाधीशांच्या निवासस्थानासमोर दररोज सकाळी वाहतूक पोलिसही काही काळ नियोजनासाठी उपस्थित असतात. मात्र, हा अर्ध्या तासांचा काळ वगळला तर इतर गर्दीच्या वेळी वाहनधारकांना अडचणींना समोरे जावे लागते.

हे व्हायला हवे

- वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयाच्या दारातील बसस्टॉप हा मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीसमोर नेणे. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयाची प्रवेशद्वाराची रचना बदलणे, आत येणारी वाहने उत्तर प्रवेशद्वाराने आणि दक्षिण प्रवेशद्वारातून बाहेर जाणारी वाहने अशी रचना आवश्यक आहे. तरच ती थेट चौकातून बाहेर उजवीकडे अथवा डावीकडे जातील अशा उपाययोजनांची गरज आहे.

- मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील पहिल्या प्रवेशद्वाराचा उपयोग आतमधे येण्यासाठी तसेच जीएसटी भवनच्या बाजूकडील प्रवेशद्वाराकडून बाहेर जाण्यासाठी वापर करणे तसेच जिल्हा न्यायालयात जाण्यासाठी उत्तर बाजूच्या, बावड्याकडील प्रवेशद्वारातून प्रवेश आणि दक्षिण बाजूच्या चौकातून जाणाऱ्या बाजूने बाहेर जाण्यासाठी प्रवेशद्वाराचा वापर करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ हटविण्यासाठी ईदची प्रार्थना

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्यातील दुष्काळ लवकर दूर व्हावा, विश्वात शांतता नांदावी, सर्व समाजातील ऐक्य कायम राहावे अशी प्रार्थना करत मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात बुधवारी रमजान ईद साजरी केली. मुस्लिम बोर्डिंगसह विविध मशिदींमध्ये नमाज पठण झाले. यावेळी ईद मुबारक अशा शुभेच्छा देऊन समाज बांधवांनी गळाभेट घेत ईद साजरी केली.

मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर सकाळी मुफ्ती इर्शाद कुनुरे यांनी ईदचे नमाज पठण केले. तर दुसऱ्या जमात नमाजकरिता आकीब म्हालदार व तिसऱ्या जमातसाठी दस्तगीर चिकोडी यांनी नमाज पठण केले. त्यानंतर खीर वाटप आणि विविध उपक्रमांचे आयोजन झाले. चंद्रदर्शन झाल्याने बुधवारी सण साजरा होणार असल्याचे कमिटीने जाहीर केले होते. मध्यप्रदेशातील भोपाळ शहर व देशातील वेगवेगळ्या भागात चंद्रदर्शन झाल्याची माहिती कमिटीला मिळाल्याने संपूर्ण देशात रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चंद्रदर्शन झाल्याने सहा मेपासून रमजान महिन्याच्या पवित्र उत्सवाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून शहरातील मशिदींमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली. पहाटेची सहेरी, दिवसभर नमाज, कुराण पठण सायंकाळी इफ्तारी केली जात होती. दिवसभर कडकडीत उपवास केल्यानंतर अल्लाहचे नामस्मरण करण्यात मुस्लिम बांधव मग्न होते. गेल्या महिनाभरात रमजानची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होती. ज्या दिवशी चंद्र दिसतो, तो रमजानचा शेवटचा दिवस समजला जातो. त्यानुसार मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव सण साजरा करतात. बुधवारी सकाळी पांढऱ्या शुभ्र पोषाखात आलेल्या मुस्लिम बांधवांनी नमाज पठणासाठी उपस्थिती दर्शवली. यावेळी लहान मुलांमध्ये ईदचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. शुभेच्छा देण्यासाठी सर्वधर्मीय बांधव आवर्जून उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख, आमदार सतेज पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, बबनराव रानगे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष नजीर देसाई, शिवाजी मस्के, नगरसेवक ईश्वर परमार, सत्यजित कदम उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, आमिर हमजेखान शिंदी यांनी केले.

सोशल मीडियावरून शुभेच्छा

रमजान ईदच्या शुभेच्छा फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर अशा समाजमाध्यमातून देण्यात आल्या. अनेक बांधवांनी ईद साजरा केल्याचे फोटो शेअर केले. मुस्लिम बांधवासहित सर्वधर्मियांनी शुभेच्छा देत एकात्मता व बंधुतेची परंपरा कायम राखली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉल पेटिंगमधून पर्यावरणाचा जागर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत वॉल पेटिंगमधून पर्यावरणाचा जागर करण्यात आला. पर्यावरणांशी निगडीत विविध विषयावर भित्तीचित्रे रेखाटत 'निसर्ग संवर्धन'व 'स्वच्छ सुंदर परिसर, आरोग्य नांदेल निरंतर'चा संदेश दिला.

जिल्हा परिषद मुख्यालयाच्या मागील भिंतीवर पर्यावरणपूरक व स्वच्छता संदेश रेखाटत बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उपक्रमाला सुरुवात झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. शिवदास, मुख्य वित्त व लेखाअधिकारी संजय राजमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा कृषि अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य वित्त व लेखाअधिकारी राहुल कदम, प्राचार्य संदीप दिघे यांच्या हस्ते वॉल पेटिंग उपक्रमाचा शुभारंभ झाला.

चित्रांतून 'पाण्याचा योग्य वापर, सांडपाणी व्यवस्थापन'ची गरज अधोरेखित केली. प्लास्टिकच्या दुष्परिणामची तीव्रता मांडली. स्वच्छ भारत अभियान व निसर्गवैभवाने संपन्न गावाचे चित्र साऱ्यांचे आकर्षण ठरले. याशिवाय हवा, पाणी, ध्वनी प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यावर आधारित चित्रे अंतर्मुख बनविणारी आहेत. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर पर्यावरणविषयक संदेश देणाऱ्या चित्रकृती साकारल्या. रंगकाम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जि.प.आवारातील रोप वाटिकेच्या आवारातील गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन झाले. तसेच मुख्यालयाच्या मागील बाजूस वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी वसुंधरा ग्रुपच्या स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी वंदना पुसाळकर, आकांक्षा नरोडे, रोहिणी कळंबे उपस्थित होते.

फोटो : अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्कानं मागणं म्हणजे नाराजी नाही: उद्धव

$
0
0

कोल्हापूर

आपली माणसं समजून हक्कानं मागणं म्हणजे नाराजी व्यक्त करणे नाही, जे मागायचं आहे ते आम्ही हक्कानं मागतोय, ज्या इच्छा व्यक्त करायला पाहिजे त्या करतोय, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला उपसभापतीपद मिळावे या मागणीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. दोन-चार पदं मिळावीत म्हणून आम्ही युती केली नसून, ती हिंदुत्वासाठी केली आहे, असं म्हणत, आमची युती अधिक भक्कम झाली असून ती कधीही तुटणार नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज कोल्हापुरात त्यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह अंबाबाईचं दर्शन घेतलं

'जागांबाबत आमचं ठरलंय'

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत आमचं ठरलंय, याची चिंता कुणीही करण्याची गरज नाही असे उद्धव म्हणाले. मी हे हसत आणि मिष्किल शैलीत म्हणत असलो तरी खरंच आमचं ठरलंय. ते तुम्हाला माहीत नाही, आम्हाला मात्र माहीत आहे, असंही उद्धव म्हणाले. आमच्या विजयासाठी दृश्य तसेच अदृश्य हातांनी मदत केली आहे. त्या सर्वांचे मी दृश्यपणे तसेच अदृश्यपणे आभार मानतो असेही उद्धव म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images