Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

फुलेवाडी रिंगरोडसाठी रास्ता रोको

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दहा वर्षांपासून फुलेवाडी ते कळंबा साई मंदिर रिंगरोडचे काम रखडले आहे. रिंगरोडचे काम तातडीन सुरू करण्यासाठी फुलेवाडी व आपटेनगर येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण व माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे आले असता पदाधिकारी व आंदोलक आमने-सामने आल्याने शाब्दिक चकमक उडाली. यावेळी फुलेवाडी नाक्याजवळ सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.

फुलेवाडी रिंग रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दहा वर्षांत केवळ खड्डेच भरले जात असल्याने पुन्हा खड्डे पडत असून, त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. त्याचबरोबर येथील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ सकाळी दहा वाजता आपटेनगर व फुलेवाडी नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. यापूर्वीही परिसरातील नागरिकांनी आंदोलने, मोर्चा, प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, पण त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे फुलेवाडी नाक्याजवळ वाहतूक ठप्प झाली.

जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव घटनास्थळी दाखल झाले, पण महापालिका प्रशासन जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. त्यामुळे तणाव वाढत गेला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना येण्यास विलंब झाल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाले. आंदोलन सुरू असतानाच महापालिकेच्या वतीने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. पावसाळ्यापूर्वी रिंगरोडचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात विजय देसाई, राजू जाधव, प्रकाश पाटील, प्रकाश भाट, दत्ता पाटील, विनायक मोरे, बाबाजी शेळके, अविनाश मोरे, दौलत सावंत, अनिता पोवार, अनुसया धुमाळ, आदी सहभागी झाले होते.

००००

स्टंटबाजी करू नका...

आपटेनगर येथे राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह रास्ता रोको आंदोलन केले. महिलांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. आंदोलनादरम्यान स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख दाखल झाले. रिंगरोडच्या कामासाठी वर्कऑर्डर दिली असून, कामाला सुरुवात झाल्याचे सांगून त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावेळी जाधव यांनी, लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन सुरू असून, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. यावेळी देशमुख यांचा पारा चढला. स्टंटबाजी करू नका, आम्ही नगरसेवक असून, आम्हाला नागरिकांची काळजी असल्याचे ठणकावून सांगितले. परिणामी येथे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीईटीत दर्शन शहा अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये विवेकानंद कॉलेज आणि चाटे क्लासेस व कॉलेजच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळवले. विवेकानंद कॉलेजच्या दर्शन शहाने पीसीएम गटात ९९.९५ पर्सेंटाईल मिळवत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.

विवेकानंद कॉलेजच्या वृषभ पाटील पीसीएम गटात ९९.९३ पर्सेंटाईल मिळवत दुसरा तर यश कुंडले ९९.७५ पर्सेंटाईल मिळवून तिसरा आला. तसेच पीसीबी गटात वृषभ पाटीलने ९९.५१ पर्सेटाईल मिळवत पहिला क्रमांक मिळवला. स्नेहल कदम ९९.२३ पर्सेंटाईल मिळवत दुसरी तर श्रीया उपाध्ये ९९.१५ पर्सेंटाईल मिळवून महाविद्यालयात तिसरी आली. पीसीएम गटात ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ९० पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळाले. तर पीसीबी गटात ४५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ९० पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. पीसीएम व पीसीबी गटात शंभरहून अधिक विद्यार्थ्यानी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

\Bचाटेच्या १३ विद्यार्थ्यांना ९९ पर्सेंटाईल\B

परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. चाटे समुहाच्या १३ विद्यार्थ्यांना ९९ पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण मिळाले असून १५७ विद्यार्थ्यांना ९० पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळाले.

कोल्हापूर विभागातील ९५ पर्सेंटाईलपेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी आशुतोष शिरोडकर, विनयसिंह पाटील, श्रेयस पाटील, आकांक्षा देसाई, वैभव बिचवे, ऐश्वर्या अलमद, सायली निकम, जयदीप कोयंडे, मंदार मुळे, श्रेयस पवार, उद्धव नागरगोजे, हिमांशू पवार, दमयंती चव्हाण, तेजश्री पाटील, सानिया पाटील, अद्वैत कर्णिक, अजिंक्य कांबळे, आदित्य जाधव, कोमल माने, अक्षय निल्ले, कपिल करंबळेकर, नेहा जाधव, अनय राजगुरू, प्रेरणा पाटील, ऋषिकेश पाटील, साईनाथ निकम, सर्वेश कुलकर्णी, शिवम कोले- पाटील, सृष्टी रावळ, साक्षी महाडेश्वर, श्रेयस गुजर, श्रुती प्रभाळे, दिशा अवधुत, ऋत्विक पालव, सर्वेश मराठे, सायली खोत, दिव्या पाटील, रुची पाटील, साक्षी जोशी, दिनेश घोरपडे, अर्पिता पाटील, सिद्धेश भोसले, लेखा मराठे, हार्दिक ढेरे, रामचंद्र राणे, ऋतुराज महाजन, श्रेया पाटील, ऐश्वर्या कदम-पाटील, कोमल राणे. यशस्वी विद्यार्थ्यांना चाटे समुहाचे संचालक प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, कोल्हापूर विभागीय संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांचे मार्गदर्शन लाभले. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून चार लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील तीन लाख, ९२ हजार, ३५४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पीसीएम विषयामध्ये बसलेले विद्यार्थी २ लाख, ७६ हजार, १६६ तर पीसीबी विषयामध्ये २ लाख, ८१ हजार, १५४ आहेत. मागील वर्षी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेस चार लाख ३५ हजार, ६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील चार लाख, १९ हजार, ४०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंगणापूर बंधाऱ्यातील गळती रोखण्यास प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर मान्सून पावसाने ओढ दिल्याने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शिंगणापूर बंधाऱ्यातील पाणी गळती रोखण्यावर भर दिला आहे. शिंगणापूर बंधारा येथे पाणीपातळी कायम ठेवण्यासाठी मंगळवारी प्लास्टिक कागद व वाळुची पोती टाकून गळती रोखली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्याकडून बांधाऱ्यातील पाणीपातळी व गळतीबाबतची माहिती घेतली. दिवसेंदिवस मान्सून पावसाची प्रतीक्षा लांबणीवर पडत असल्याने शहरावर पाणीटंचाई धोका वाढू लागला आहे. धरण व उपसा होणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्यामध्ये १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठी असला, भविष्यातील धोका ओळखून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सकाळी आयुक्तांनी जलअभियंता कुलकर्णी यांच्या चर्चा करून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. शहराला पाणी उपसा होणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्याला गळती लागली आहे. त्यामुळे धरणातून सोडलेले पाणी गळतीवाटे वाया जात आहे. वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी मंगळवारी प्लास्टिक व वाळूची पोती टाखून ८० टक्के गळती दूर केली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दोन दिवसांत शिंगणापूर बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार असल्याने बंधाऱ्यातील गळती दूर करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार आज गळती दूर केली. पण कायमस्वरुपी असणारी गळती पावसाळ्यानंतर निविदा काढून दूर करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्कभंग दाखल करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्य सरकारकडे पाठपुरवा करून विविध विकासकामांसाठी निधी खेचून आणला. आशा प्रयत्नातूनच शहरात राबवण्यात येत असलेल्या एलईडी स्ट्रीट लाइटसाठी निधी आणला. उद्घाटनाबाबत कोणतीही माहिती न देता आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ उद्घाटन करतात कसे?' असा संतप्त सवाल आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना मंगळवारी केला. 'निधी माझा आणि उद्घाटनाला दुसरेच असा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नसून दोषी अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल करु,' अशा इशाराही त्यांनी बैठकीत दिला.

आमदार महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत शहरातील विशेषत: दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कामाचा आढावा घेतला. या दरम्यान एलईडी स्ट्रीट लाइट कार्यन्वित करण्यासाठी राज्यसरकारला पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. प्रकल्प मंजूर होऊन कार्यन्वित करण्यास सुरुवात झाली. पण निधी आपण आणलेला असताना उद्घाटन अन्य आमदार कसे करतात? असा जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महापालिकेच्या विकासकामासाठी निधी आणला असताना एकदाही उद्घाटनासाठी निमंत्रण दिलेले नाही. मात्र आमदार पाटील व मुश्रीफ यांना निमंत्रण देण्यात येते. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी 'एलईडी प्रकल्पाचे उद्घाटन प्रशासकीय पातळीवर झाले नाही.' असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

पण संतापलेल्या आमदारांनी 'कार्यक्रम महापालिकेचा नव्हता तर अधिकारी तेथे उपस्थित कसे होते. संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबीत करा. याप्रकरणी हक्कभंग प्रस्ताव आणल्याशिवाय राहणार नाही. ज्या प्रकल्पासाठी आपण निधी आणला, त्याचे पुन्हा उद्घाटन समारंभ ठेवा. एकाच कामाचे दोन्हवेळा उद्घाटन झाले, तर मला हरकत नाही. पण येथून पुढे मी आणलेल्या निधीच्या कामांचे उद्घाटन मी करणार' असे सांगितले.

थेट पाइपलाइन, अमृत योजना, रंकाळा सुशोभिकरण यासह अन्य विकासकामांना गती द्या, अशी सूचना करत ते म्हणाले, 'प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२० पर्यंत वर्षाला सहा हजार घरे देण्यात येणार आहेत. त्याचे प्रशासनाने नियोजन करावे. शहरातील रस्त्यांसाठी २२ कोटीचा निधी आला असून रस्त्याची कामे त्वरित सुरू करा. रंकाळा सुशोभिकरणासाठी चार कोटी ८० लाख निधी मंजूर झाला असून विद्युत रोषणाईसाठी दोन कोटी मिळणार आहे. त्याचा प्रस्ताव राज्यसरकारला त्वरित सादर करा,' असे आदेश दिले.

शाहू समाधीस्थळासाठी पाच कोटीचा निधी मंजूर

नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळ सुशोभिकरणासाठी १५ कोटीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाला पाठवला आहे. त्यापैकी पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे. समाधीस्थळ समाजकल्याण विभागाकडे हस्तांतर न करता निधी मिळू शकतो. त्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भालेराव यांच्यावर लाचेचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा ग्राम विकास निधीतून कर्ज मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप जि.प. सदस्या विद्या पाटील यांचे पती विलास यांनी केला. त्यांनी या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे तक्रार केली आहे.

जि.प.ची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पाटील यांनी गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे यांना हा प्रकार सांगितला. त्यांच्यासह अन्य सदस्य प्रसाद खोबरे, सतीश पाटील, उमेश आपटे, मनोज फराकटे, राजवर्धन निंबाळकर यांनी भालेराव यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. दरम्यान, भालेराव यांनी माझ्यावरील आरोप चुकीचा असून, तक्रारीत तथ्य नसल्याचे सांगितले. तर मित्तल यांनी चौकशी करून योग्य कारवाई करू असे आश्वासन सदस्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्लामपुरातून शाळकरी मुलाचे अपहरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

येथील अक्षर कॉलनीत राहणाऱ्या शाळकरी मुलाचे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वरदराज बाळासो खामकर (वय-१०) असे त्याचे नाव आहे. येथील कारखाना रोडवरील वीज वितरण कार्यालयासमोरील मोहन पाटील यांच्या क्लासमध्ये वरदराज गेला होता. सोमवारी सायंकाळी पाच वाजता क्लास सुटल्यावर त्याचे वडील त्याला घ्यायला आले त्यावेळी तो चालत घरी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र तो घरी आला नव्हता. नातेवाईकांकडेही शोध घेतला. मात्र सापडला नाही. त्यामुळे त्याचे वडील बाळासो यांनी पोलिसांत फिर्याद दिली. याबाबत अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, क्लास सुटल्यानंतर तो एका मोटारीतून गेल्याची माहिती पुढे आली असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली आहेत.

सोमवारी वरदच्या आईने त्याला क्लासला सोडले. सायंकाळी पाच वाजता वडील त्याला घ्यायला आले. त्यावेळी वरद चालत घरी गेल्याचे क्लासचालकांनी सांगितले. मात्र वरद घरी आला नसल्याने ते परत क्लासमध्ये आले. त्यानंतर तो हरवल्याचे लक्षात आल्यावर मित्र आणि इतर नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यापासून पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह त्यांचे सहकारी वरदच्या शोधात आहेत. वरदचे वडील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात ग्रंथपाल आहेत. तर आई मिरजेतील बी. एड्. कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. हे कुटुंब मूळचे कर्नाटकातील येरनाळ, ता. निपाणी येथील आहे.

०० ० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णा-वारणेवर उपसाबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

म. टा. वृत्तसेवा, सांगली

धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत निघाल्याने पाटबंधारे खात्याने कृष्णा आणि वारणा नदीकाठावर शेतीसाठी पाणीउपसा बंदी लागू केली आहे. दुष्काळाची तीव्रता वाढतच निघाली असल्याने भीषण पाणीटंचाईची शक्यता गृहित धरुन ही उपसाबंदी लागू केली आहे. त्यामुळे पाच ते सहा दिवसांसाठी म्हणजे मर्यादित कालावधीसाठी शेतीसाठी उपसा करता येणार नाही. पहिल्या टप्प्यात ४ ते ९ जून आणि दुसऱ्या टप्प्यात १६ ते २१ जूनपर्यंत उपसाबंदी लागू असल्याचे पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता ना. शं. करे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पावसाला सुरुवात होईपर्यंत धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा वापरण्यासाठी दहा जूननंतर भोगावती, पंचगंगा, दूधगंगा नदी खोऱ्यात उपसाबंदी लागू होण्याची शक्यता आहे. या दरम्यानही पाऊस झाला नाही तर २०१६ नंतर प्रथमच पिण्याच्या पाण्यासाठी धरणांमधील मृत पाणीसाठा वापरण्याची वेळ येणार आहे. धरणाचे दरवाजे उघडून हे पाणी सोडावे लागणार आहे.

वारणा धरणात जवळपास ४, काळम्मावाडीत १.४ तर राधानगरी पाऊण टीएमसी इतका मृतसाठा आहे. वारणेतील मृतसाठा सोडल्यास ते पाणी वारणा आणि कृष्णेच्या पात्रात जाईल. काळम्मावाडीतील पाणी दूधगंगा नदी तर कोल्हापूर शहर व परिसरातील गावांसाठी राधानगरी व तुळशी धरणातील पाणी मिळू शकेल. तुळशीतील पाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे कोल्हापूरची पाण्याची तहान भागवण्याची मोठी भिस्त राधानगरी धरणावरच आहे. धरणातील पाण्याचा मृतसाठा वापरायचा झाल्यास धरणांच्या भिंतीतील दरवाजे उघडावे लागतात. हे दरवाजे नियमित वापरात नसल्याने उघडण्यासाठी काही कालावधी लागू शकतो.

गेल्या पावसाळ्यात सर्व धरणे शंभर टक्के भरली होती. नियमित नियोजनाप्रमाणे धरणातून १५ ऑक्टोबरपासून पाणी सोडण्यात येते. पण पावसाने दडी मारल्याने यंदा दीड महिना अगोदर सप्टेंबरपासूनच पाणी सोडावे लागले. त्यामुळे जवळपास प्रत्येक धरणातील दीड ते दोन टीएमसी पाण्याचा जादा वापर झाला आहे. सध्या ढगाळ वातावरण तयार झाले असून पाऊस सुरू झाला तरी तातडीने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार नाही.

सांगलीच्या जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, कडेगाव तासगाव पूर्व, मिरज पूर्व आदी भागांत भीषण पाणीटंचाई आहे. या सहा तालुक्यांतील बहुतांशी भागाला ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनांनी दिलासा दिला. लघू आणि मध्यम स्वरुपाचे तलाव योजनांच्या माध्यमातून भरुन घेतले जात असल्याने पिण्याच्या पाणी प्रश्नावर काही प्रमाणात तोडगा काढता आला. तथापि, ढगाळ वातावरण दिसत असले तरी मान्सून किंवा मान्सूनपूर्व पाऊस कधी होईल, याचा नेम नाही. त्यामुळे पाटबंधारे खात्याने संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी कृष्णानदीवर कराडपासून सांगलीपर्यंत तर वारणा नदीवर सांगली आणि कोल्हापूर जिल्हा अशा दोन्ही बाजूला पाणी उपसाबंदी लागू केली आहे.

०० ००

कोल्हापूर जिल्ह्याचे नियोजन

जोपर्यंत पावसाचे पाणी धरणात साठणार नाही तोपर्यंत शिल्लक पाण्याचा वापर

पाऊस लांबल्यास दहा जूनपासून उपसाबंदी लागू

दहा जूननंतरही पाऊस न झाल्यास धरणातील मृतसाठ्याचा वापर

०० ०० ० ००

पाऊस लांबला आहे. शिवाय पाऊस सुरू झाला तरी धरणात पाणी साठायला वेळ लागणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वारणा आणि कृष्णा नदीवर शेतीसाठी उपसाबंदी लागू केली आहे.

हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सांगली

०० ०० ०० ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी टंचाई बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वळवाने दिलेली हुलकावणी आणि मान्सूनला होणारा संभाव्य विलंब या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ६) टंचाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. बैठकीला खासदार व आमदार आणि विविध सरकारी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यात दुष्काळ पडला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. कोल्हापुरात पिण्याच्या पाण्याची टंचाई बहुतांशी भागात जाणवली नसली तरी शेतीला पाण्याची टंचाई जाणवत आहे. १९७२ नंतर प्रथमच वळीव पावसाने हुलकावणी दिली असल्याने शेतीला पाणी देण्यााठी शेतकऱ्यांची धडपड चालली आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याचे प्रमाणही कमी झाला आहे. चारा टंचाई जाणवत असून जो उपलब्ध आहे तो महाग झाला आहे. पावसाचे आगमन वेळाने होणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक नदी खोऱ्यात पाणी उपसा बंदी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गळती रोखण्यास प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मान्सून पावसाने ओढ दिल्याने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शिंगणापूर बंधाऱ्यातील पाणी गळती रोखण्यावर भर दिला आहे. शिंगणापूर बंधारा येथे पाणीपातळी कायम ठेवण्यासाठी मंगळवारी प्लास्टिक कागद व वाळुची पोती टाकून गळती रोखली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्याकडून बांधाऱ्यातील पाणीपातळी व गळतीबाबतची माहिती घेतली.

दिवसेंदिवस मान्सून पावसाची प्रतीक्षा लांबणीवर पडत असल्याने शहरावर पाणीटंचाई धोका वाढू लागला आहे. धरण व उपसा होणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्यामध्ये १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठी असला, भविष्यातील धोका ओळखून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सकाळी आयुक्तांनी जलअभियंता कुलकर्णी यांच्या चर्चा करून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.

शहराला पाणी उपसा होणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्याला गळती लागली आहे. त्यामुळे धरणातून सोडलेले पाणी गळतीवाटे वाया जात आहे. वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी मंगळवारी प्लास्टिक व वाळूची पोती टाखून ८० टक्के गळती दूर केली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दोन दिवसांत शिंगणापूर बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार असल्याने बंधाऱ्यातील गळती दूर करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार आज गळती दूर केली. पण कायमस्वरुपी असणारी गळती पावसाळ्यानंतर निविदा काढून दूर करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

बंधाऱ्यातील पाणीपातळी आणि उपसा याबाबतचा दैनंदिन अहवाल आयुक्तांना सादर केला जात आहे. १५ दिवस पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल, अशी स्थिती असल्याने पाणीपुरवठा नियोजनाबाबत वेगळा पर्याय निवडण्याची आवश्यक दिसत नसल्याचे जलअभियंता कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षण’, ‘सामान्य’च्या कामकाजाचा पंचनामा

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार, बदलीसाठी चुकीची माहिती देणाऱ्या शंभर शिक्षकांना क्लीन चिट देण्याचा प्रकार, सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कामकाजाचा सदस्यांनी सर्वसाधारण सभेत पंचनामा केला. 'माध्यमिक'मधील आठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची सातत्याने सर्वसाधारण सभेसाठीची गैरहजेरी यावरून सदस्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले.

सदस्यांच्या संतप्त भावना विचारात घेऊन 'माध्यमिक'च्या आठ कर्मचाऱ्यांची मुख्यालयाबाहेर बदली केल्याची घोषणा प्रशासनाने केली, तर लोहार पंधरा दिवस रजेवर गेल्याची मााहिती प्रशासनाने सभागृहाला दिली. बदलीसाठी चुकीची माहिती दिलेल्या व दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठराव सभागृहाने केला. अध्यक्षस्थानी अध्यक्षा शौमिका महाडिक सभेच्या होत्या.

शाळा एकत्रिकरणासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. समिती ठराव करूनही कामकाज होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, या सदस्य अरुण इंगवले यांच्या भूमिकेवर सीईओ अमन मित्तल यांनी उबाळे यांना नोटीस काढत असल्याचे सांगितले. सदस्य राजवर्धन निंबाळकर, प्रसाद खोबरे, प्रवीण यादव, सतीश पाटील, हंबीरराव पाटील, राहुल आवाडे, शिवाजी मोरे, हेमंत कोलेकर, विजय बोरगे, अशोक माने, कल्लाप्पाण्णा भोगम, आदींनी शंभर शिक्षकांना क्लीन चिट देण्याच्या प्रकारावरून सभागृह डोक्यावर घेतले. बदलीप्रकरणी दोषी शिक्षकांवर कारवाईची व कायमस्वरुपी वेतनवाढ रोखण्याची सूचना केली. सदस्य शंकर पाटील यांनी माध्यमिकच्या कर्मचाऱ्यांना एक न्याय आणि अधिकाऱ्याला दुसरा न्याय हा प्रकार योग्य नसल्याचे सांगितले. त्यावर लोहार यांच्या चौकशीचे प्रकरण सध्या मॅटमध्ये असल्याचे प्रशासनाने सांगितले.

०००

सीईओंना डावलून आडसुळांचा कारभार

सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्या कामकाजावर आक्षेप नोंदविले. सर्वसाधारण सभेची नोटीस अनेक सदस्यांना मिळाली नाही. व्हॉट्सअॅपवर सभेची माहिती पाठविण्याचा हा कुठला प्रकार आहे. सीईओंना डावलून आडसूळ यांचा स्वतंत्र कारभार सुरू असल्याचा आरोप केला. त्यावर आडसूळ यांनी सभेची नोटीस सर्वांना रितसर पाठविल्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला, पण तो सभागृहाने मान्य केला नाही.

००००

महत्त्वाचे ठराव

बदलीसाठी चुकीची माहिती दिलेल्या शंभर शिक्षकांवर कारवाई

जि.प. सदस्यांना १० हजार रुपये मानधन मिळावे

सदस्यांना टोलमाफी मिळावी, एसटी प्रवास मोफत असावा

जि.प. आवारात यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा

नवरात्र, उन्हाळी व दिवाळी सुट्टीच्या कालावधीत मेन राजाराम हायस्कूलचे मैदान पार्किंगसाठी द्यावे

मेन राजाराम हायस्कूलवर प्रशासक, जि.प.च्या चारही हायस्कूलमधील शिक्षकांच्या बदल्या

००००

सत्ताधाऱ्यांतच खडाजंगी, शिंदे धारेवर

दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या कारवाईवरून तासभर चर्चा होऊनही कामकाज पुढे सरकत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पक्षप्रतोद विजय भोजे यांनी सदस्य राजवर्धन निंबाळकर यांना, हा विषय संपवा असे सुचविले. यावरून भाजपच्या या दोन सदस्यांत खडाजंगी उडाली. दिव्यांग उन्नती शिबिराच्या कार्यस्थळावरून राष्ट्रवादीचे सदस्य मनोज फराकटे यांनी पशुसंवर्धन अधिकारी सजय शिंदे यांना धारेवर धरले.

००००

करवीर प.सं.च्या जागेचा निर्णय समितीकडे

करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, जि.प. सदस्या रसिका पाटील यांनी पंचायत समितीच्या इमारतीला १९९० च्या ठरावाप्रमाणे जागा मिळावी, अशी सूचना केली. त्यावर अध्यक्ष, सीईओंची समिती निर्णय घेईल असे प्रशासनाने स्पष्ट केले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नवीन शैक्षणिक धोरणाचे मंथन व्हावे’

$
0
0

कोल्हापूर : 'कस्तुरीरंगन समितीने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारला सादर केला आहे. या धोरणानुसार देशाची भावी पिढी घडणार आहे. धोरणातील चांगल्या गोष्टीचे स्वागत झाले पाहिजे. पण, त्रुटी असतील त्यावर चर्चा झाली पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी नगरीत नवीन शैक्षणिक धोरणाचे मंथन शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी करावे,' असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

रिपब्लिकन सोशल फाउंडेशनच्यावतीने निवृत्त शिक्षक संजय जिरगे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. आमदार पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन संजय जिरगे व त्यांच्या पत्नी छाया जिरगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. हरिष भालेराव, अच्युत माने, प्रा. शहाजी कांबळे प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, 'नव्या शैक्षणिक धोरणावर सूचना देण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे. यापूर्वी जाहीर झालेले शैक्षणिक धोरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर आधारित असलेले आणि सर्व जातीधर्मांना सामावून घेणारे धोरण होते. नवीन शैक्षणिक धोरणात चांगल्या गोष्टी असतीलही. या धोरणावर पुढील पिढी देशाच्या विकासात योगदान देणार आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणाचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. पण चुकीच्या गोष्टी असतील तर त्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. त्यासाठी शैक्षणिक धोरणाचे विचारमंथन होण्याची गरज आहे.'

सत्काराला उत्तर देताना संजय जिरगे यांनी निवृत्तीनंतर सामाजिक प्रश्नांवरील चळवळीवर भर देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'नामांतर चळवळीत झोकून दिल्यानंतर कोल्हापूर शहराने सामाजिक कार्याची प्रेरणा दिली. शिक्षणाचे पवित्र काम करताना चळवळीचे कामही केले. कुटुंबातील सदस्यांच्या प्रोत्साहनामुळे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात काम करु शकलो.'

डॉ. भालेराव आणि अच्युत माने यांनी 'आंबेडकर चळवळ वर्तमान वाटचाल आणि दिशा' या विषयावर मते व्यक्त केली. यावेळी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. विश्वास देशमुख, दगडू भास्कर, बबनराव रानगे, भगवान काटे उपस्थित होते. अनंत मांडूळकर, स्नेहल जिरगे, स्मिता जिरगे यांनी मनोगत व्यक्त केले. अविनाश अंबपकर यांनी स्वागत केले तर रुपा वायदंडे यांनी प्रास्ताविक केले.

.. .. . ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयात जिल्हा बँकेची मोठी मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळापासून अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे मोठे योगदान आहे', असे प्रतिपादन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केले. जिल्हा बँकेच्यावतीने अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंडलिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

मंडलिक म्हणाले, 'जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची मुख्य वाहिनी आहे. मला मात्र या बँकेने संचालक झाल्यानंतर खासदार केले. बँकेने शेतकऱ्यांसाठी अपात्र कर्जमाफीची लढलेली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर बँकेच्या विकासासाठी योगदान देऊ.'

यावेळी पी. जी. शिंदे, आर. के. पोवार, विलासराव गाताडे, राजेश पाटील, अनिल पाटील, भैय्या माने, राजू आवळे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, असिफ फरास आदी प्रमुख उपस्थित होते.

मुश्रीफ मोदींच्याही पुढेच...

खासदार मंडलिकांनी मुश्रीफांचे कौतुक केले. ते म्हणाले, 'प्रशासकांची कारकीर्द संपून चार वर्षांपूर्वी आमचे संचालक मंडळ सत्ताधारी झाले. त्यावेळी सर्वच पातळ्यांवर बँक अडचणीत आली होती. मुश्रीफांनी गटातटाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तळमळीने काम करण्याचे आवाहन संचालक मंडळाला केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षे सर्वच संचालक मंडळ निरपेक्षपणे आणि निष्पक्षपातीपणे बँकेच्या विकासासाठी एकदिलाने झटत आहे. त्यामुळेच बँक प्रगतीपथावर आल्याचे दिसते. 'सबका साथ, सबका विकास,' या भावनेने काम करण्यात मुश्रीफ हे पंतप्रधान मोदींच्याही काकणभर पुढेच आहेत.'

० ० ०० ०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवती भवती००००००

$
0
0

आंदोलकांचा डाव फुसका

शिवाजी पूलाला पर्यायी पूल होण्यासाठी सर्वपक्षीय समितीने अनेक आंदोलन केली. त्यामुळे रखडलेले पुलाचे बांधकाम मार्गी लागण्यास मदत झाली. पूलाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या हस्ते पुलाचे उद्घाटन नको अशी भूमिका घेतली. आंदोलनावेळी नेते कुठे होते? असा प्रश्नही कार्यकर्त्यांनी विचारला. त्यामुळे पुलाचे उद्घाटन कोण करणार? वाद होणार का? राजकारण होणार का? याची चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधींच्या पाठबळाने जिल्हा प्रशासनाने जबरदस्त खेळी केली. ३१ मे रोजी काम पूर्ण झाल्यावर, सायंकाळी सहा वाजता पर्यायी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे उद्घाटनाचा आंदोलकाचा डाव फुसका ठरला अशी चर्चा शहरात सुरू आहे.

आता आंदोलनाला वेळच नाही

गेल्या काही वर्षापासून कोल्हापूर म्हणजे आंदोलनाचे शहर असेच चित्र तयार झाले आहे. काहीही झाले तर आंदोलनाला उतरणारे नागरिक कमी नाहीत. हा प्रकार शहरासाठी घातक असल्याने त्यांची सवय कशी मोडायची हे मोठे आव्हानच होते. त्यासाठी एक क्लुप्ती लढवण्यात येत आहे. नागरिकांना सकारात्मक कार्यात गुंतवून ठेवण्यासाठी शहरासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यातून स्वच्छतेच्या कामाला वेग आला. आता पावसाळ्यात स्वच्छता करता येणार नसल्याने झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या घरासमोर झाड लावून जगवण्याचे टास्क दिले जाणार आहे. तसेच इतर उपक्रमही घेण्यात येणार असल्याने त्यामध्येच नागरिक गुंतून राहतील, असा ठोकताळा आहे. साऱ्यांना सकारात्मक कामातून आंदोलनाला वेळ मिळणार नाही, असा विश्वास शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुख अधिकाऱ्याला आहे

श्रम विद्यार्थ्यांचे, चमकोगिरी संस्थांची

विद्यार्थ्यांच्या यशावरच शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांचे यश अवलंबून असते. गुणवान विद्यार्थ्यांमु‌ळ‌े अनेक संस्था नावारुपाला आल्या. अलिकडे मात्र विद्यार्थ्यांच्या कष्टावर स्वत: चमकोगिरी करण्याचे काही शिक्षण संस्थांचे प्रकार वाढले आहेत. नुकत्याच बारावीच्या निकालानंतर हे प्रकर्षाने दिसले. निकाल जाहीर होताच अनेक शाळांनी निकालाचे फलक झळकवले. बहुतांश शाळांनी वर्तमानपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी धडपड केली. मात्र, संस्था आणि शाळेचा नावलौकिक वाढवणाऱ्या विद्यार्थ्यांचाच विसर संस्था आणि शिक्षकांना पडल्याचे दिसले. केवळ शाळेचा एकूण निकाल जाहीर करून संस्थापकांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांचे अभिनंदन झाले. फलकांवर संस्थापकांचे फोटो झळकले. मात्र, विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांना मिळालेले गुण लिहिणे सोयिस्करपणे विसरले. अनेकांना तर कॉलेजमधील पहिल्या तीन विद्यार्थ्यांचीही नावे माहिती नव्हती. या प्रकाराने संस्थांची उदासिनता आणि चमकोगिरीच जास्त दिसली.

- उदयसिंग पाटील, सतीश घाटगे, उद्धव गोडसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाच्यावतीने ८५ दिव्यांगांना अनुदान वाटप

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांसाठी विशेष निधीची तरतूद केल्यानुसार पात्र ८५ दिव्यांगांना साहित्य खेरदीसाठी आरटीजसद्वारे अनुदान रकमेचे वितरण केले. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

महापालिकेने २०१५ मध्ये १७३ दिव्यांगांना केबिन्स वाटप केले. उर्वरित १४० दिव्यांगांचे अर्ज प्रलंबित होते. यापैकी पात्र १२९ लाभार्थ्यांना केबिन्सऐवजी प्रत्येकी २५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ८५ लभार्थ्यांना अनुदान वाटप प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केले.

महापौर मोरे म्हणाल्या, 'सरकारच्या निर्देशाप्रमाणे महापालिकेने आपल्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये शहरातील दिव्यांग बांधवांकरीता विशेष निधीची तरतूद केलेली असून पात्र लाभार्थ्यांना उपजिविका व उदरनिर्वाहासाठी यापूर्वीच महापालिकेच्यावतीने केबिनचे वाटप केले आहे. १२९ पैकी पात्र उर्वरित दिव्यांगांना आरटीजीएसद्वारे अनुदान दिले जाईल.''दिव्यांग बांधवांनी या रक्कमेचा उपयोग व्यवसायासाठी करावा व स्वावलंबी व्हावे.' असे आवाहन आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

यावेळी प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा खेडकर, नगरसेवक ईश्वर परमार, उपआयुक्त मंगेश शिदे, नगरसचिव दिवाकर कारंडे, एनयूएलएमचे विजय तळेकर, निवास कोळी, रोहित सोनुले, स्वाती शहा, अंजली सौदंलगेकर आदी उपस्थित होते. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल कर्मचाऱ्यांना सापडली चेन केली परत

$
0
0

कोल्हापूर : येथील जलसंपदा विभागाचे कर्मचारी शेखर गरगटे कुटुंबीयांसह अंबाबाई दर्शन करून अल्पोपहारासाठी एका हॉटेलात थांबले, त्यानंतर घरी गेल्यानंतर तीन तोळ्यांची सोन्याची चेन गायब असल्याचे लक्षात आले. पुन्हा हॉटेलमध्ये जावून चौकशी केली असता तेथील वेटर आणि व्यवस्थापकाने त्यांची चेन ओळख पटवून परत केली. अमोल पाटील (रा. करंगफेन) आणि व्यवस्थापक एकनाथ पालेकर (रा. कदमवाडी) यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अनेकांनी कौतुक केले.

गरगटे पत्नीसह शासकीय कामानिमित्त जिल्हा परिषद व पंचायत समितीत आले होते. कामे आटपून अंबाबाई दर्शनाचा बेत आखून हे दाम्पत्य भवानी मडपाकडे रवाना झाले. अंबाबाई चे दर्शन घेऊन घाटी दरवाजा येथील हॉटेल शामसुंदर मध्ये अल्पोउपहार करण्यासाठी थांबले. दरम्यान दर्शन घेऊन ते आपल्या घरी परतले. घरी पोहोचल्यानंतर आपल्या गळ्यातील तीन तोळ्याची चेन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले, कष्टाने कमावलेली वस्तू गमावल्याचे दुःख झाले. सकाळी प्रयत्नांचा भाग म्हणून हे पती-पत्नी अल्पोउपहारासाठी थांबलेल्या हॉटेल शामसुंदर येथे प्राथमिक चौकशी केली असता हॉटेल व्यवस्थापनाने व्यक्ती तीच असल्याची खात्री करून क्षणाचाही विलंब ना लावता तीन तोळ्याची चेन परत केली. गरगटे दाम्पत्यांने या प्रामाणिकपणाबद्दल देऊ केलेले बक्षीसही अमोल पाटील आणि एकनाथ पालेकर (रा. कदमवाडी) यांनी नम्रपणे नाकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जि.प.चे ५५ कोटींचे सुधारित अंदाजपत्रक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत खर्च न पडलेली रक्कम आणि आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेत विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेत प्रथमच ५५ कोटी ५४ लाख १० हजार ५९३ रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. जि.प.च्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण विषयाला सर्वानमुते मान्यता देण्यात आली. सुधारित अंदाजपत्रकावर सभागृहात चर्चा होऊन सदस्यांनी शिक्षण, आरोग्य सुविधेसाठी निधीच्या तरतुदीच्या सूचना केल्या.

सुधारित अंदाजपत्रकात समाजकल्याण विभागाला चार कोटी, तर ग्रामपंचायत विभागाला पाणी स्वच्छता विभागासाठी सहा कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे खर्ची न पडलेल्या १८ कोटी ७१ लाख ६५ हजार ८७२ रुपयांच्या निधीचा दहा विभागांसाठी तरतूद केली आहे. अर्थ व शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे यांनी अंदाजपत्रक सादर केले. अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या. सुधारित अंदाजपत्रकानुसार विविध योजनांसाठी तरतूद केलेला निधी शंभर टक्के खर्च करण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, आचारसंहितेमुळे निधी अखर्चित ठेवण्याची वेळ येऊ देऊ नका, असा आदेश सभापती घाटगे व अध्यक्षा महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिला.

अंदाजपत्रक सादर करताना सभापती घाटगे म्हणाले, '२०१८-१९ च्या मूळ अंदाजपत्रकातील ४६ कोटी ३५ लाख रुपयांमधून जि.प.मधील विविध विभागांकडून निविदा प्रक्रिया राबविली आहे. लाभार्थ्यांची निवड केली, मात्र लोकसभेच्या आचारसंहितेमुळे १८ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी खर्च पडला नाही. त्यापैकी पुरवणी मार्च २०१९ चे लेखे अंतिमीकरणासाठी एक कोटी २५ लाख रक्कम शिल्लक ठेवली आहे. उर्वरित १७ कोटी ४६ लाख रुपये निधीत वाढ करून २०१९-२०२० चे प्रथम सुधारित ५५ कोटी ५४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

००००

अंदाजपत्रकातील विभागनिहाय तरतूद (रक्कम रु.)

विभाग रक्कम

समाजकल्याण विभाग ४,०५,४१,२०७

अपंग कल्याण विभाग १,६२,६१,८०५

महिला व बालकल्याण १,२९,१३,२३६

शिक्षण विभाग ३०,००,०००

कृषी विभाग ४६,३१,३९३

पशुसंवर्धन विभाग ३७,९४,९७६

ग्रामपंचायत विभाग पाणी व स्वच्छता कक्ष ६,०८,५७,०००

पाणीपुरवठा ५०,६९,५५३

पाटबंधारे विभाग ३२,९३,४२३

बांधकाम विभाग ४३,००,०००

भाऊसिंगजी रोड जागेवर इमारत बांधकाम २,००,००,०००

पुरवणी मार्च लेखे अंतिमीकरणासाठी २५,०३,२७९

एकूण १८,७१,६५,८७२

००००

अन्य विभागांतील निधीला मंजुरी

महिला व बालकल्याण विभागाचे सुधारित अंदाजपत्रक २,६२,२९,२३६

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवठा ५४,४०,२२०

मागासवर्गीयांना स्वयंरोजगारासाठी साधने पुरविणे १,५८,७८,६८०

मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगारासाठी साधने पुरविणे १,१६,१६,८००

दिव्यांग व्यक्तींना साधने पुरविणे १,५९,००,०००

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांसाठी २५ लाखांचा निधी

$
0
0

कोल्हापूर

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सामाजिक सहायता निधीतून २५ लाखांचा निधी दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे. जनावरांच्या चाऱ्या-पाण्यासाठी ही मदत करण्यात येत आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी लवकरच हा २५ लाखांचा निधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द केला जाईल, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. यापूर्वीही देवस्थान समितीने विविध सामाजीक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही महेश जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिराबाहेरील अतिक्रमण हटवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि महापालिकेच्या संयुक्त कारवाईत हटविण्यात आली. तत्पुर्वी विक्रेत्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकांशी विक्रेत्यांची वादावादी झाली. पण सायंकाळी या विक्रेत्यांनी पुन्हा महाद्वारवर ठाण मांडल्यानंतर कारवाई बंद करण्यात आली. सायंकाळी विक्रेत्यांनी पुन्हा महाद्वारावरच ठाण मांडले.

अंबाबाई मंदिर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सर्व घटकांची बैठक झाल्यानंतर समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, अतिक्रमण विभागाचे प्रमुख पंडित पोवार, समितीच्या सदस्या संगीता खाडे, शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, शिवाजी साळवी आदींनी मंदिर परिसराची पाहणी केली.

अध्यक्ष जाधव म्हणाले, 'अंबाबाई मंदिराला चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. पूर्वीच्या पारंपरिक व्यावसायिकांबरोबर येथे बेकायदेशीर व्यावसायिकांचे प्रमाण वाढले असून त्याचा त्रास भाविकांना होत आहे. मंदिराची सुरक्षा, भाविकांना सुविधा आणि स्वच्छता या गोष्टींना समिती प्राधान्य देणार आहे. त्यासाठी मंदिर परिसरातील अतिक्रमण महापालिकेने हटवले पाहिजे. मंदिराशी संबंधित व्यावसायिकांचे योग्य प्रकारे पुर्नवसन करण्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबर चर्चा केली जाईल. तसेच कारवाई दरम्यान कोणावर अन्याय होणार नाही. याची दक्षता घेतली जाईल.' असे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले.

पदाधिकारी व पोलिस प्रशासनाने मंदिर आवाराची पाहणी केली. घाटी दरवाज्याच्या उजव्या बाजूच्या बेकायदेशीर व्यावसायिकांना आठ दिवसांत आपला व्यवसाय अन्यत्र हलवण्यासाठी मुदत दिली. आठ दिवसांत पर्यायी जागेत स्थलांतर न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. घाटी दरवाजाच्या डाव्या व सरलक्षर भवन आणि विद्यापीठ परिसरातील पार्किंगमधील अतिक्रमणे काढण्याबाबत चर्चा झाली.

त्यानंतर महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथकांसह सर्व पदाधिकारी महाद्वारवर आले. पोलिस प्रशासनाच्या मदतीने विक्रेत्यांना हटवले. यावेळी विक्रेत्यांनी पथकांबरोबर बराचवेळ हुज्जत घातली. पथक कारवाईवर ठाम राहिल्यानंतर विक्रेतेही आक्रमक झाले. पण मंदिराची सुरक्षा पटवून देत त्यांना हटवण्यात आले. दुकानाबाहेर वाढीव छतही काढून टाकण्यात आले. त्यामुळे महाद्वार पूर्णपणे मोकळा झाला. दोन तास भाविक या मार्गावरुन सहज मंदिरात प्रवेश करत होते. सायंकाळी पुन्हा विक्रेत्यांनी महाद्वार ठाण मांडले. तसेच दुकानाबाहेर पुन्हा वाढीव छत मारण्यात आले. परिणामी दुपारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने केलेली कारवाई केवळ फार्स ठरली.

भाजप पदाधिकाऱ्यांचा ठिय्या

व्यापाऱ्यांसोबत बैठक झाल्याने महाद्वारवरील किरकोळ विक्रेत्यांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. दुपारी झालेल्या कारवाईमुळे महाद्वार मोकळा झाला. परिणामी कोणत्याही अडथळ्याशिवाय भाविकांना मंदिरात प्रवेश करता येत होता. पण सायंकाळी तीन-चार विक्रेत्यांनी पुन्हा महाद्वारवर ठाण मांडले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते सुरेश जरग सायंकाळी तेथे ठिय्या मारुन बसले होते. सत्तारुढ सरकारमधील कार्यकर्त्तेच अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना पाठबळ देत असतील, तर शहरातील रस्ते अतिक्रमणमूक्त होणार कसे? अशी चर्चा महाद्वार परिसरात सुरू होती.

कपिलतीर्थ मार्केटमध्ये पुनर्वसन

अंबाबाई मंदिर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार देवस्थान समितीने केला आहे. त्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणीही करून घेतली आहे. मंदिर परिसरातील फूल विक्रेत्यांना हटवण्यात येणार आहे. या सर्व विक्रेत्यांचे कपिलतीर्थ मार्केटमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत मुलाची सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

येथील शाळकरी मुलाच्या अपहरणप्रकरणी संबंधित मुलाच्या आतेभावासह अन्य दोघांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. अपहरण करणारा त्याचा आतेभाऊ गडहिंग्लज ठाण्यांतर्गत हलकर्णी औट पोस्टमधील पोलिस कर्मचारी सुनील मोहन कदम (वय ३२, रा. शिरदवाड, ता. शिरोळ), गोपाल हिराप्पा गडदाकी (२२) आणि विलास बरमा वरई (२०, दोघे रा. बुगडीकट्टी, ता. गडहिंग्लज) अशी संशयितांची नावे आहेत. तिघांवर अपहरण, खंडणी आणि कट रचून अपहरण करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. वरदराज बाळासो खामकर (वय १०) असे अपहृत मुलाचे नाव आहे. त्याचे सोमवारी संध्याकाळी अपहरण करण्यात आले होते.

इस्लामपूर पोलिसांनी अखंडितपणे ३२ तास तपास यंत्रणा राबवून वरदला सुखरूपपणे त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. अपहरणकर्त्यांनी वरदला रात्री साडेबाराच्या सुमारास शिये फाट्यावर सोडून दिले होते. घाबरलेल्या वरदने एका चारचाकी गाडीला हात करून थांबवले. हेरलेच्या नियाज जमादार, मुस्ताफा जमादार, कासीम जमादार आणि रफिक जमादार या चौघांनी गाडी थांबवून वरदकडे चौकशी केली. त्यांनी वरदकडून नंबर घेऊन त्याच्या आईला फोन करून हकीकत सांगितली. पोलिसांनी ही माहिती मिळताच सर्व चक्रे फिरवली आणि वरदला ताब्यात घेतले.

० ०० ०० ० ०० ०० ०० ०० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैनासाठी लुटली बँक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बनावट एअरगन आणि सत्तूराचा धाक दा‌खवून आपटेनगर येथील यशवंत सहकारी बँकेवरील दरोड्यातील दोघा आरोपींना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. चैनी आणि पैशाच्या हव्यासासाठी यशवंत बँकेतच पिग्मीचे खाते असलेला विजय रामचंद्र गौड (३६, निकम गल्ली, कळंबा, ता. करवीर) आणि त्याचा साथीदार राजू नेताजी सातपुते (वय २८ रा. कळंबा, साईमंदिर शेजारी, तुरबत गल्ली) या दोघांनी दरोडा टाकल्याची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. देशमुख म्हणाले, कुडित्रे (ता. करवीर) येथील यशवंत सहकारी बँकेच्या आपटेनगर रिंगरोड शाखेत लिपिकाला बनावट एअरगन आणि सत्तूराचा धाक दाखवून कॅश काउंटवरुन ६२ हजारांची रोकड लंपास केल्याचा प्रकार ३० मे रोजी भरदुपारी तीन वाजता घडला होता. या दरोड्यानंतर मोपेडवरून आलेले दोघे संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. त्यांनी डोक्याला हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधल्याने तपासात अडथळे निर्माण झाले होते. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांकडून सुरू होता. पथकाने तपासात परिसरातील दोन हजार दुचाकी फुटेजमध्ये तपासल्या. एलसीबीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी तैनात केलेल्या पथकाला संशयिताने वापरलेली पांढऱ्या रंगाची मोपेड राजू सातपुते वापरत असल्याची माहिती कळाली. बँकेवर टाकलेल्या दरोड्यातील पैसे वाटून घेण्यासाठी संशयित तपोवन मैदानावर येणार असल्याची माहिती पथकाला कळाली. त्यानुसार दोन स्वतंत्र पथके या ठिकाणी तैनात केली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोपेड क्रमांक ( एमएच ०९, एफडी ५४३४) वरून गौड आणि सातपुते तपोवन मैदानात आले. साध्या वेशातील पोलिसांना पाहताच विजय गौड याने मोपेडवरून उडी मारुन पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकातील कृष्णात पिंगळे आणि कुमार पोतदार यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बँक लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेली ६२ हजार ११० रुपयांची रक्कमही जप्त केली.

रेकी करुनच चोरी

गौड हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो. तर सातपुते हा पेटिंगकाम करतो. गौड हा दूध विक्रीच्या व्यवसायातून मिळालेले पैसे यशवंत बँकेत भरत होता. त्यासाठी त्याने आपटेनगर रिंगरोडवरील बँकेत खाते उघडले होते. पैसे भरण्याच्या निमित्ताने त्यांनी बँकेत सुरू असलेल्या सर्व व्यवहाराची आणि सुरक्षा व्यवस्थेची टेहाळणी केली होती. दरम्यान त्यांनी यापूर्वी दोन ते तीन वेळा बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बँकेतील गर्दी पाहून ते अयशस्वी ठरल्याचे अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images