Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्ह्यात ऊसक्षेत्र वाढले

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरलेले साखरेचे दर, एकरकमी एफआरपीचे केलेले तुकडे, दुष्काळाचे सावट असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊसशेतीला प्राधान्य दिले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ऊसपिकाचे क्षेत्र ६२०८ हेक्टरने वाढले आहे. गडहिंग्लज तालुक्यात गतवर्षीएवढेच क्षेत्र असून चंदगड, गगनबावडा तालुक्यांत थोडीशी घट झाली आहे.

मोठी व मध्यम धरणे, लघुपाटबंधारे आणि बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे जिल्ह्यात सर्वांत जास्त उसाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात २२ साखर कारखाने असून, यंदा मार्चअखेर साखर हंगाम लांबला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर घसरल्याने एकरकमी एफआरपी देण्यास कारखान्यांनी असमर्थता दर्शविली. कारखान्यांनी उसाला प्रतिटन पहिला हप्ता २३०० रुपये देऊन एफआरपी कायदा मोडीत काढला. एप्रिल व मेअखेर बहुतांश कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना दर दिला.

एफआरपीचे तुकडे पाडले असले तरीही ऊस पिकाला हमीभाव असल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. गतवर्षीपेक्षा ६२०८ हेक्टर लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. राधानगरी, भुदरगड या दोन्ही तालुक्यांत ऊसलागवडीचे क्षेत्र वाढले आहे. गतवर्षी राधानगरी तालुक्यात १० हजार ६७ हेक्टर लागवड झाली होता. यंदा १७५३ हेक्टरची वाढ होऊन तालुक्याचे क्षेत्र विस्तारले आहे. ११ हजार ८२० हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. राधानगरीप्रमाणेच भुदरगड तालुक्यात १५२७ हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. गतवर्षी भुदरगड तालुक्यात ५३५० हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा हे प्रमाण ६८४७ हेक्टरवर पोहोचले आहे.

हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, करवीर, कागल, आजरा तालक्यांतही उसाचे क्षेत्र वाढले आहे. गडहिंग्लज तालुक्यात ९१७२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गतवर्षी हेच प्रमाण होते. चंदगड तालुक्यात फक्त ६४ हेक्टर, गगनबावडा तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्र घटले आहे.

उसाचे क्षेत्र जरी वाढले असली तरी कडक उन्हाळा आणि वळीव पडला नसल्याने उसाची वाढ खुंटल्याचे चित्र अनेक तालुक्यांत पाहायला मिळत आहे. यंदा उसाचे वजन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आडसाली, पूर्वहंगामी, सुरू, खोडवा लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली असली तरी येत्या साखर हंगामात उसाला दर किती मिळणार याची काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे.

०००००

उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका २०१८ २०१९

हातकणंगले २१,३६६ २१,९१८

शिरोळ २३,५८७ २३,८८९

पन्हाळा ११,००० ११,२८४

शाहूवाडी ४६५४ ५२६१

राधानगरी १०,०६७ ११,२८४

करवीर २३,३८७ २३,५०२

गडहिंग्लज ९१७२ ९१७२

भुदरगड ५३५० ६८४७

आजरा ४७०० ५४१६

चंदगड १०,६७५ १०,६११

गगनबावडा ३६२४ ३५१४

कागल २१,३८७ २२,३५०

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुटबॉल ग्रासरुट लीडर कोर्सला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन नवी दिल्ली, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई आणि कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन यांच्यावतीने ग्रासरूट लीडर्स कोर्सला सोमवारी राजर्षी शाहू स्टेडियम येथे प्रारंभ झाला. गुरुवारी (ता. ६) कोर्सचा समारोप होणार आहे.

जिल्ह्यातील एकूण २४ प्रशिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. प्रशिक्षणामध्ये रोल ऑफ कोच, कम्युनिकेशन, वॉर्मअप, प्लॅनिंग ऑफ सेशन, मेथडस् ऑफ कोचिंग, प्रिन्सिपल ऑफ प्ले, स्पोर्टस् सेफ्टी अँड इनज्युरी प्रिव्हेंटेशन, लॉज ऑफ दि गेम याबाबतची व्हिडीओ, थेअरी आणि मैदानातील प्रात्यक्षिके याद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

प्रशिक्षक अंजू तुरंबेकर म्हणाल्या, 'व्यावसायिक फुटबॉल वाढीसाठी हा कोर्स महत्वपूर्ण ठरणार आहे. संपूर्ण कोर्स मराठीमध्ये तयार करण्यात आला असल्याने त्याचा फायदा स्थानिक खेळाडूना होत आहे. प्रशिक्षकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न प्रशिक्षण कालावधीमध्ये केला जात आहे. या माध्यमातून प्रशिक्षकांना अत्याधुनिक आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूंनी आधुनिक तंत्राचा स्वीकार करावा. तसेच फुटबॉलमध्ये व्यावसायिकता यावी या उद्देश्याने विशेष प्रयत्न केले जात आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्माराजे प्रभागातून पाटोळे यांचा अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी पद्माराजे उद्यान प्रभागातून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील पाटोळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. या प्रभागातून खंडोबा तालीम मंडळाचा एक उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू असून मंगळवारी सायंकाळ पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

पद्माराजे उद्यान व सिद्धार्थनगर प्रभागामची पोटनिवडणूक जाहीर होऊन अर्ज भरण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. पण सोमवारपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. पद्माराजे उद्यान प्रभागातून प्रथमच पाटोळे यांनी दुपारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. यावेळी प्रा. टी. एस. पाटील, शहरचिटणीस बाबुराव कदम, कुमार जाधव, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान या प्रभागातील वेताळमाळ तालीम मंडळाचे उमेदवार अजित राऊत यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याच्या हालचाली खंडोबा तालीम मंडळाच्यावतीने सुरू आहेत. राजेंद्र चव्हाण, महेश चौगुले, शेखर पोवार, चंद्रकांत सूर्यवंशी व पाटोळे इच्छुक असून यापैकी एका उमेदवाराला तालमीचा पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण निर्मूलन मोहीम आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने मंगळवारपासून (ता.४) शहरात अतिक्रमण निर्मूल मोहीम राबवण्यात येणार आहे. फूटपाथ आणि लहान गल्लीमध्ये झालेली अतिक्रमणे पहिल्या टप्प्यात हटवण्यात येणार आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने पोलिस बंदोबस्त दिल्याने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे.

अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान विरोध होत असल्याने महापालिका प्रशासनाने जिल्हा पोलिस प्रशासनाकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी स्वतंत्र चार कर्मचारी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी बंदोबस्त दिला. पण सर्व उपशहर अभियंते व प्रमुख अधिकारी लोकशाही दिनामध्ये व्यस्त असल्याने कारवाईला सुरुवात होऊ शकली नाही. मंगळवारपासून कारवाईला सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यात फूटपाथ व छोट्या गल्लीतील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी चीन, रशियात संधी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'परदेशातील कॉलेज, विद्यापीठात एमबीबीएस अभ्यासक्रमांना पसंती देताना त्या संस्थेची वैद्यकीय सेवेविषयी नितीमत्ता जपणाऱ्या, वैद्यकीय शिक्षणात गुणवत्तेचा मानदंड निर्माण करणाऱ्या संस्थांना प्राधान्यक्रम द्या. चीन, रशिया, अमेरिका, कॅरेबियन येथील शिक्षणाचा जगभर लौकिक आहे. या देशातील नामांकित संस्थेतील वैद्यकीय अभ्यासक्रम करिअरसाठी उत्तम मार्ग ठरू शकतो,' असे प्रतिपादन मोक्ष अॅकॅडमीचे जयंत पाटील यांनी केले.

'मटा एज्युफेस्ट'मध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 'परदेशातील एमबीबीएस शिक्षण प्रवेश प्रक्रिया' याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले, 'वैद्यकीय सेवा ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी सेवाभाव हा महत्त्वाचा आहे. परदेशातील अनेक देशांमध्ये प्रगत वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली आहेत. विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला प्रवेश घेताना दीर्घपल्ल्याचा विचार करावा. ज्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या संस्थेची नीतीमत्ता, गुणवत्ता तपासली पाहिजे. विविध देशातील वैद्यकीय शिक्षण संस्थांची माहिती 'वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल'वर उपलब्ध आहे.'

विविध देशातील शिक्षणाच्या संधीविषयी ते म्हणाले, 'चीनमधील २३७ पैकी ४५ शिक्षण संस्थामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी परवानगी आहे. रशियातील वैद्यकीय शिक्षण संस्था देणाऱ्या नामवंत कॉलेज आहेत. कॅरेबियन समूह असलेल्या १४ देशातही प्रगत वैद्यकीय शिक्षणाच्या संधी आहेत. परदेशात अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना उमेदवारांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. एजंटामार्फत करिअरचा आराखडा बनवू नका. काही वेळेला पाच आणि सहा वर्षांची फी एकदम भरल्यास शुल्कामध्ये सवलत मिळू शकते असे सांगून फसगत होण्याची शक्यता आहे. कोणत्याही देशातील सरकारी कॉलेज एकावेळी एकाच वर्षाचे शैक्षणिक शुल्क आकारते. बांग्लादेश, नेपाळ, किरगिस्तान देशातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा समाधानकारक नाही. तेव्हा एमबीबीएससाठी चीन, रशिया देशातील नामांकित कॉलेजला पसंती देणे करिअरसाठी उपयुक्त ठरेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीए’ ना कोल्हापुरात मोठ्या संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'चार्टर्ड अकाऊंटटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पहिल्या दिवसापासून प्रॅक्टिस सुरू करता येते. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात सीएचे स्थान खूप मोलाचे असल्याने करिअरच्या विपुल संधी आहेत. कोल्हापुरात मोठ्या कंपन्या दाखल होत आहे, गुंतवणूक वाढत असल्याने या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे,' असे मत सीए चेतन ओसवाल यांनी मांडले.

'मटा एज्युफेस्ट'मध्ये 'कॉमर्स क्षेत्रातील करिअरच्या संधी' या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. ओसवाल म्हणाले, 'कॉमर्सचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बँकिंग, वित्तीय संस्था, प्रशासकीय सेवा, कंपनी सेक्रेटरी अशा विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. 'सीए'चा अभ्यासक्रम हा आव्हानात्मक असला तरी या क्षेत्रामध्ये करिअरसाठी प्रचंड वाव आहे. संपूर्ण देशभरात दरवर्षी साधारणपणे सहा टक्क्यांपर्यंत निकाल लागतो. अभ्यासक्रमाच्या चार वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्याची एक माणूस म्हणून जडणघडण होते.'

करिअरविषयी मार्गदर्शन करताना ओसवाल म्हणाले, 'सीए अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. सार्वजनिक क्षेत्र, बँका, मोठ्या कंपन्या, ऑडिटिंग, टॅक्स कन्सल्टंट, जीएसटी आदी क्षेत्रांत महत्त्वाचे स्थान आहे. देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांच्या कार्यकारी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा मोठ्या पदावर सीएची वर्णी लागते. कुठल्याही क्षेत्रातील व्यावसायिकाला सीएची गरज लागते. शिवाय उमेदवार स्वत:ची प्रॅक्टिस सुरू करू शकतो.'

सीएचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी चार्टर्ड अकाऊंटटस असोसिएशमार्फत कोल्हापुरात अभ्यासिका, संदर्भग्रथ, चर्चा सत्रांचे आयोजन करते. कॉमर्स शाखेतून पदवी घेतल्यानंतर कंपनी सेक्रेटरी हे नवे क्षेत्र उमेदवारांना खुणावत आहे. स्टॉक ब्रोकर, फायनान्स कन्सल्टंट म्हणून ते स्वतंत्रपणे काम करु शकतात. सीएचा अभ्यासक्रम शिकत असताना प्रशिक्षण कालावधी महत्त्वाचा आहे. सीए होण्यासाठी अभ्यासात सातत्य, कष्टाची तयारी हवी. सीए होण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. प्रामाणिकपणाने हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पहिल्यादिवसापासून स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करता येते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर ऑडिटचे पालिकेतच तीन-तेरा

$
0
0

Maruti.Patil @timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शहारातील व्यापारी संकुल आणि उंच इमारतींना फायर ऑडिट सक्तीचे करणाऱ्या महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये फायर ऑडिटचे तीन तेरा वाजले आहेत. दिव्याखाली अंधार याप्रमाणे इमारतीमध्ये अनेकठिकाणी धोकादायक विद्युत वायरिंग लोंबकळत असून अग्निप्रतिबंधक यंत्रणा धूळखात पडली आहे. याबाबतच अहवाल अग्निशमन विभागाने वर्षापूर्वी दिलेला असूनही यावर कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

शहराला पायाभूत सुविधांसह प्रशासकीय कामकाज महापालिकेच्या मुख्य इमारतीमधून चालतो. येथे दररोज हाजारो लोकांचा वावर असतो, तर तेवढ्याच प्रमाणात अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतात. प्रशासकीय कामाची विभागणी चार विभागीय कार्यालयांत करण्यात आलेली असली, तरी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये मुख्य इमारतीमध्ये आहेत. त्याचबरोब महासभेचे सभागृह, स्थायी सभागृह, महापौर दालन, परिवहन, महिला व बालकल्याण विभागाच्या पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालनेही आहे. हा सर्व प्रशासकीय गाडा महापालिकेच्या मुख्य इमारतीमधून चालतो. महापालिकेच्या चौथ्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी चार स्वतंत्र जिने असले, तरी चारही जिने अत्यंत अरूंद आहेत. मुख्य इमारतीमध्ये एकही लिफ्ट नसल्याने ज्येष्ठांसह अन्य अभ्यागतांना जिन्यांचा आधार घ्यावा लागतो. जिन्यावरून जात असताना ते इमारतीच्या बाहेरील बाजूला सर्वत्र विद्युत, टेलिफोनच्या वायरिंग लोंबकळत असल्याचे सर्रास चित्र दिसते. तर जिन्यासह अन्यठिकाणी बसवलेली फायर एक्स्टिंग्युशर ही अग्निप्रतिबंधक यंत्रणा धूळखात आहेत.

शहरातील अनेक व्यापारी संकुल किंवा १५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतीमध्ये फायर ऑडिट केलेले नसते, त्याचप्रमाणे महापालिकेच्या मुख्य इमारतीची अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी लोंबकळत असणाऱ्या विद्युत वायरिंगमुळे शॉर्टसर्किटसारखी घटना घडल्यास मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागेल अशी स्थिती आहे. मुख्य इमारतीवरील धोकादायक स्थितीत असलेल्या वायरिंगबाबत अग्निशमन विभागाने संबंधित दोन्ही विभागांना वर्षापूर्वीच पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाच्या फाइल दिरंगाईचा फटका ज्याप्रमाणे शहरवासियांना बसतो, त्याचप्रमाणे येथेही दिरंगाई दिसून येते. ज्या इमारतीमध्ये दिवसाचे आठ तास व्यतीत केले जातात तसेच जेथे शहरातील नागरिकांचा दिवसभर राबता असतो. तेथे सुरक्षितता निर्माण करणे क्रमप्राप्त आहे. पण प्रशासन याकडेही डोळेझाक करत असल्याच स्पष्टपणे दिसून येते.

शहरातील व्यापारी संकुले, हॉस्पिटल, हॉटेल व अन्य धोकादायक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी फायर ऑडिट करण्याची सक्ती प्रशासनाने केली आहे. वर्षातून दोनवेळा फायर ऑडिटचे प्रमाणपत्र मान्यता प्राप्त संघटनाकडून सादर न केल्यास संबंधितांच्या मिळकती सील करण्याचे आदेश नुकतेच दिले. मात्र असे आदेश देताना प्रशासनाने आपल्या इमारतीची किमान काळजी घ्यावी, अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त केली जाते आहे.

मुख्य इमारतीमध्ये लोंबकळत असलेल्या वायरिंगबाबत विद्युत व शहर अभियंता विभागाला अहवाल दिला आहे. मुख्य इमारतीसह सर्व विभागीय कार्यालयामध्ये अग्निप्रतिबंधक फायर एक्स्टिंग्युशर बसवण्यात आले आहेत.

रणजित चिले, अग्निशमन विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्लंडमधील लीग क्रिकेटमध्ये चंदगडचे प्रवीण गावडेंची निवड

$
0
0

चंदगड : मजरे कारवे (ता. चंदगड) येथील प्रवीण मारुती गावडे यांची इंग्लंड येथील नॉर्थ सॉमरसेट क्रिकेट लीगसाठी निवड झाली आहे. मे ते सप्टेंबर २०१९ यांदरम्यान नॉर्थ सॉमरसेट क्रिकेट लीग खेळविण्यात येणार आहे. प्रवीण हे लीगमध्ये ब्रिस्टॉल ग्लाडीएटर्स क्रिकेट क्लबकडून अष्टपैलू खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी होतील. प्रविण हे महात्मा फुले विद्यालय व गुरू म. भ. तुपारे ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यार्थीदशेतच प्रवीण माने यांनी भालाफेक या प्रकारात दैदीप्यमान यश संपादन केले होते. राष्ट्रीय स्तरावरील ॲथलिट म्हणून त्याने नावलौकिक मिळवला. निवडीनिमित्त महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य एस. व्ही. गुरबे व शालेय समितीचे चेअरमन एम. एम. तुपारे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विहिरीत पडलेल्या गव्याची सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गगनबावडा

बांद्रेवाडी (ता. पन्हाळा) येथे सुमारे वीस फूट खोल विहीरीत गवा कोसळला. प्राथमिक शाळेच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या महादेव पाटील यांच्या शेतातील वीस फूट विहिरीत गवा मादी पडली. रविवारी रात्रीच्या सुमारास पडलेल्या गव्यास सोमवारी दुपारी बाहेर काढण्यास वन विभागाला यश मिळाले. विहिरीत पाणी सोडून गव्याची सुटका करण्यात आली. वन विभागाने अडचणींवर मात करून केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. वाढत्या उष्म्यामुळे गवे पाण्याच्या शोधात शेतवडीत उतरत आहेत. रविवारी रात्री कळपातील एक गवा गावाशेजारील महादेव पाटील यांच्या शेतातील सुमारे वीस फूट खोल विहिरीत कोसळला. विहीरीने तळ गाठल्याने त्याला बाहेर पडता येत नव्हते. सकाळी एका ग्रामस्थांला गव्याचे पिल्लू विहिरीशेजारी ओरडत असल्याचे दिसून आले. त्याने त्याला हुसकावून लावले. नंतर त्याला विहिरीत गवा पडल्याचे दिसून आले. त्याने वन विभागाला कल्पना दिली. वनपाल सदाशिव देसाई व वनरक्षक सुनील कांबळे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. विहीरीत पाणी सोडल्यास गवा बाहेर निघेल असा पर्याय निघाला. मात्र, सोमवारी शेतीचा वीज पुरवठा खंडीत असल्याने अडचण होती. देसाई यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर वीज कर्मचारी गणेश पाटील, बुवासाहेब घुले यांनी वीजपुरवठा सुरू केला. त्यानंतर पंप सुरू करून पाणी विहिरीत सोडण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास पाणी वर आल्यानंतर गवा पोहत विहीरीच्या पायऱ्यांवरुन बाहेर आला. मोहिमेत वनमजूर बाळासाहेब म्हामूलकर, शंकर पाटील, पंगाजी पाटील, भुजंगा पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

तीन दिवसांतील दुसरी घटना

शनिवारी सकाळी पणुत्रे येथे पाण्याच्या शोधात आलेला एक गवा विहिरीत पडला होता. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी बांद्रेवाडीतील हा प्रकार घडला. परिसरात गव्यांची संख्या वाढली आहे. वनविभागाने गव्यांच्या बंदोबस्तासाठी खास पथक नेमावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरतीपूर्व प्रशिक्षण

$
0
0

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३६ हजार पदांच्या भरती प्रक्रियेसाठी १७ जून पासून लेखी परीक्षा होणार आहेत. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सतेज पाटील फाउंडेशन व स्टडी सर्कल कोल्हापूर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेला मंगळवारपासून (ता. ४) सुरुवात होणार आहे. साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पसमध्ये दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत कार्यशाळा होईल. कार्यशाळेत प्रा. संजय पाटील, प्रा. अमर पडवळ, प्रा. राहुल पाटील आणि सोपान गंभीरे मार्गदर्शन करतील. नाव नोंदणीसाठी स्टडी सर्कलच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य सुविधांवर जिल्हा परिषदेचा भर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

संभाव्य पूरस्थितीच्या कालावधीत आरोग्य सेवेवर कुठलाही परिणाम होऊ नये, नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, गरोदर मातासाठी निवास व भोजनाची सोय जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे. संभाव्य पूरस्थिती आणि उद्भवणारी रोगराईपासून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देताना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपक्रमांत पुरेसा औषधसाठा उपलब्ध केला आहे. आरोग्य विभागाने प्रत्येक केंद्राला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील संपर्क तुटणाऱ्या गावांवर विशेष लक्ष असणार आहे.

'जिल्हा परिषदेत नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थिती, रस्त्यांची अवस्था यासंबंधीचे अपडेटस उपलब्ध होतील. नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यान्वित असणार आहे. रस्त्यावर पाणी साचले, झाडे कोसळली तर किरकोळ स्वरुपातील कामे जि.प.च्या अखत्यारितील कर्मचारी करतील. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे जिल्ह्यातील माहिती कळविली जाईल असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांनी सांगितले.

मुख्यालय सोडू नका

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित ७४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ४१३ उपकेंद्र आहेत. येथील अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडायचे नाही असा सक्त सूचना आहेत. पूरस्थितीच्या कालावधीतील नियोजनाविषयी सांगताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, 'पावसाळ्याच्या, पुरस्थितीच्या कालावधीत आरोग्य केंद्रातील रोजचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाचवेळी २५ रुग्णांसाठी आवश्यक औषधांची कीटस तयार ठेवले आहेत. उपकेंद्रातही औषधांच्या कीटसची उपलब्धता केली आहे. गरोदर मातांचे दवाखान्यात स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यांच्यासह एका नातेवाईकाची निवास व भोजनाची सुविधा पुरविण्याचे नियोजन आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात दोन गटांत राडा; दगडफेकीत ३ पोलीस जखमी

$
0
0

कोल्हापूर :

लहान मुलांच्या क्रिकेटच्या सामन्यातील वादानंतर महाराणा प्रताप चौक परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांत तुफान दगडफेक, मारामारी झाली. रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यात लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्यासह दोन कर्मचारी जखमी झाले. या घटनेत आणखी सहाजण जखमी झाले आहेत. यावेळी जमावाने परिसरातील वाहनांची मोडतोड केली. त्यात चार वाहनांचे नुकसान झाले. परिसरातील चार ते पाच घरांवर दगडफेक करण्यात आली. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांना अभिवादन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने पद्माराजे उद्यान येथील कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या पुतळयास महापौर सरीता मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरसेविका सुरेखा शहा, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, खजिनदार शरद चव्हाण, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, संचालक सतीश बिडकर, रणजित जाधव, सुभाष गुंदेशा, विजया पेंटर, आशा पेंटर, हेमसुवर्णा मिरजकर उपस्थित होते.

००००००००००

(मूळ कॉपी)

कलामहर्षी बाबुराव पेंटर जयंती साजरी

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने पद्माराजे उद्यान येथील कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या पुतळयास महापौर सरीता मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी नगरसेविका सुरेखाताई शहा, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, खजिनदार शरद चव्हाण, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, संचालक सतीश बिडकर, रणजीत जाधव, संभाष गुंदेशा, विजया पेंटर, अशा पेंटर, एम. सुवर्णा मिरजकर, कलाकारप्रेमी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिराला अतिक्रमणांचा विळखा

$
0
0

लोगो : मटा ऑन दि स्पॉट

कोल्हापूर टाइम्स टीम

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. मंदिरातील गारेचा जोशीराव गणपती, दत्त आणि काशी विश्वेश्वर मंदिर यांच्या पुजाऱ्यांनी थेट स्वत:ची नावे सात-बारा उताऱ्यावर लावली आहे. तर माऊली लॉजने मंदिराच्याच सहा फूट जागेत अतिक्रमण करीत जिना उभारला आहे. मंदिराबाहेर घाटी दरवाजालगतच्या भिंतीजवळ हार विक्रेत्यांनी वर्षानुवर्षे अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाने मंदिराच्या आतील आणि बाहेरील जागेची मोजणी करून अनेक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणाचा लेखाजोखा मांडला आहे. ही अतिक्रमणे हटवून कायदेशीर ताबा मिळवण्याचे दिव्य पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला पार पाडावे लागणार आहे.

अंबाबाई मंदिराबाहेर जोतिबा रोडवरील काशी विश्वेश्वर मंदिर ते जोतिबा मंदिराच्या पिछाडीस असलेल्या माऊली लॉजपर्यंतची जागा अंबाबाई मंदिराची अखत्यारीत आहे. यापैकी माऊली लॉजच्या मालकाने मंदिराच्या सहा फूट जागेत अतिक्रमण करून जिन्याची उभारणी केली आहे. घाटी दरवाजाच्या दोन्ही बाजूस हार विक्रेत्यांनी पक्की पत्र्याची दुकाने थाटली आहेत. सद्यस्थितीत या दुकानांची मालकी काँग्रेस, भाजप, शिवसेना या तीन पक्षांच्या नेत्यांशी संबधितांची आहेत.

मंदिरात पश्चिम बाजूला घाटी दरवाजाजवळ जोशीराव यांचे गारेच्या गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर खासगी असल्याचा फलक आहे. पण, प्रत्यक्षात जोशीराव हे फक्त वहिवाटदार आहेत. जोशीराव यांनी हे मंदिर लोखंडी ग्रीलने बंदिस्त केले आहे. तसेच या मंदिराच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात पूजा साहित्य विक्रीसाठी दुकान भाड्याने दिले आहे.

आवारातील राम मंदिर वगळता अन्य सर्व मंदिरे देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मालकीची आहेत. सद्यस्थितीत ज्यांच्याकडे ही मंदिरे आहेत ते फक्त वहिवाटदार आहेत असा देवस्थान समितीचा दावा आहे.

मंदिराच्या आवारात मोठे दत्त मंदिर आहे. मंदिराची पूजा-अर्जेची जबाबदारी असलेल्या वहिवाटदारांनी त्याचा ट्रस्ट केला आहे. वस्तूत: हे मंदिरही देवस्थान समितीच्या मालकीचे आहे. पूर्व दरवाजाच्याजवळ रामाचे मंदिर आहे. हे मंदिर व सभामंडप आपले असल्याचा दावा छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचा आहे तर दुसऱ्या बाजूने त्यावर देवस्थान समितीनेही दावा केला आहे. छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टने सभामंडपात पूजा साहित्याची विक्री करणाऱ्या तीन ते चार जणांना जागा भाड्याने जागा दिली आहे. त्यामुळे परिसराचे सौंदर्य बिघडले आहे.

स्वच्छतागृहाच्या जागेचा ताबा घेणार

मंदिराच्या आवारातील मनकर्णिका कुंडाची जागा देवस्थान समितीने महानगरपालिकेला उद्यान विकसीत करण्यास दिली होती. या जागेत प्रारंभी महापालिकेने उद्यान विकसित केले. पण, भाविकांना सुविधा देण्यासाठी सुलभ स्वच्छतागृह बांधले. हिंदुत्ववादी संघटनांनी हे स्वच्छतागृह हटवून मणकर्णिका कुंड पुन्हा विकसित करावे या मागणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर शिवसेनेने अडीच वर्षापूर्वी स्वच्छतागृहाची मोडतोड केली. सध्या या ठिकाणी मोडक्या अवस्थेतील स्वच्छतागृहात खरमाती, फरशा पडल्या आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महानगरपालिकेने उद्यानाऐवजी अन्य हेतूसाठी जागा वापरल्याने देवस्थान समिती या जागेचा ताबा मागणार आहे.

ओवऱ्यातील दुकानांचे काय?

मंदिराच्या दक्षिण बाजूला ओवऱ्या असून त्यामध्ये पूजा साहित्य विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. महाद्वार, घाटी दरवाजा, पूर्व दरवाजाच्या दोन्ही ओवऱ्यांत दुकाने आहेत. तसेच बांगड्या, लॉटरीच्या तिकीट विक्रीची दुकाने मंदिराच्या आवारात आहेत. गरुड मंडपात एका माजी महापौरांच्या कुटुंबीयांचे दुकान आहे. देवस्थान समितीच्या यापूर्वीच्या पदाधिकारी व सदस्यांनी दुकाने भाड्याने दिली असल्याने ही अतिक्रमणे कशी हटवली जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दुकानदारांनी थेट कोर्टात धाव घेतली आहे.

समितीने अंबाबाई मंदिराच्या आतील आणि बाहेरील बाजूची मोजणी केली आहे. यातील अतिक्रमीत जागा मंदिराच्या ताब्यात घेण्यासाठी अतिक्रमणे काढावी लागणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला जाईल. तसेच खासगी व्यक्तींनाही नोटीस पाठवण्यात येणार आहे.

- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा मुश्रीफांचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागनवाडी, आंबेओहळ प्रकल्पांसाठी भूसंपादनासाठी पॅकेज मंजूर करावे, दूधगंगा डावा कालव्याच्या कामाच्या देयकांची चौकशी करावी, बेलेवाडी मासा, तमनाकवाडा, माद्याळ तलावासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीस मोबदला मिळावा, या मागण्यांप्रश्नी विलंब होत असल्याबद्दल आमदार हसन मुश्रीफ सोमवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते पाच या वेळेत धरणे आंदोलन करणार आहेत. प्रकल्पाची कामे पूर्ण न केल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला.

स्वत:च्या जिल्ह्यातही कृष्णा खोरे लवादाप्रमाणे आपल्या हक्काचे १२ टीएमसी पाणी अडवणे गरजेचे असताना एक थेंबही पाणी अडविता आले नसून हे पालकमंत्र्यांचे अपयश असल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.

आमदार मुश्रीफ यांनी आंदोलनासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, नागणवाडी प्रकल्प ७० टक्के पूर्ण होऊनही रखडलेला आहे. प्रकल्पाला ८७ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून, ३५ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. लाभ क्षेत्रामध्ये जमीन मिळणे कठीण झाल्यामुळे जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाने हेक्टरी २७ लाख रुपयांचे पॅकेज प्रकल्पग्रस्तांना देण्यास मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव महसूल व पुनर्वसनमंत्र्यांकडे गेली तीन वर्षे पडून आहे.

आंबेओहळ प्रकल्पग्रस्ताना ४३५ हेक्टर जमीन देय आहे. त्यापैकी १७५ हेक्टर जमीन संपादीत केलेली आहे. त्यापैकी ८५ हेक्टर जमिनीचे वाटप प्रकल्पग्रस्ताना केलेले आहे. ६७ हेक्टर जमिनींचे अद्याप वाटप करावयाचे आहे. अनेक जमिनीबाबत महसूल विभागाच्या आयुक्तांनी स्थगिती दिलेली आहे. गडहिंग्लज प्रातांधिकारी जमीन संकलन दुरुस्ती करत आहेत. या कामाकडेही महसूल अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

कागल तालुक्यातील बेलेवाडीमासा, तमनाकवाडा व माद्याळ या गांवातील साठवण तलाव मंजूर असून, कामे सुरू झालेली आहेत. परंतु या तलावामध्ये ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांना त्याचा मोबदला मिळावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यावरणदिनानिमित्त जि.प.तर्फे कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ ते १७ जून या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ बुधवारी (ता.५) जिल्हा परिषद इमारतीच्या मागील बाजूस वॉल पेंटिंग करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक संदेश, चित्रे रेखाटण्यात येतील. सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. ६ ते ११ जून या कालावधीत पंचगंगा नदीकाठावरील गावांना जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी भेटी देणार आहेत, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. १७ जूनला ग्रामपंचायतस्तरावर नळांना तोट्या न बसविणाऱ्या कुटुंबांना पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावरील फेरीवाले हटवले

$
0
0

फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या तीन महिन्यांपासून थंडावलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली. फेरीवाल्यांचा विरोध मोडीत काढत पथकांने त्यांचे साहित्य जप्त केले. पोलिस बंदोबस्तात पथकाने प्रथमच कारवाईचा धडाका लावला. रस्त्यावरील बोर्ड, स्टँडी व हातगाड्या जप्त केल्या. कारवाई सुरू असताना फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोन करुन अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण पथकांने त्याची पर्वा न करता धडाका कायम ठेवला.

महापालिकेच्या सभेत अतिक्रमण विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढल्यानंतर डिसेंबरपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. फेब्रुवारी महिन्यापर्यंत कारवाई सुरू होती. स्टँडी, अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्ज व रस्त्यावरील फेरीवाल्या हटवत रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले. पण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने कारवाई थंडावली होती. आचरसंहिता संपल्यानंतर कारवाई करण्यासाठी प्रशासनाची बैठक झाली. बैठकीत विभागाने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी एका पोलिस निरीक्षकासह चार कर्मचाऱ्याचे पथक देण्याचे मान्य केले. सोमवारी पोलिस बंदोबस्त मिळाला, पण लोकशाही दिनामुळे कारवाई होऊ शकली नाही.

मंगळवारी मात्र पथकाने सीपीआर चौकापासून अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली. रस्त्यावर बसणाऱ्या सर्व विक्रेत्यांचे साहित्य जप्त करत दुकानदारांनी लावलेल्या स्टँडी जप्त करण्यात आल्या. सीपीआर ते महापालिका चौक, गुजरी कॉर्नर ते भवानी मंडप परिसरापर्यंत मोहीम राबवली. चप्पल विक्रेत, छोटे गॅस सिलिंडर, तवे विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर करवीर वाचन मंदिर ते बिंदू चौकापर्यंत कारवाईला सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या विक्रेत्यांमुळे या रस्त्यावर पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील बनले असलेल्या मार्गावर कारवाई करताना विक्रेत्यांनी प्रचंड विरोध केला. साहित्य जप्त करण्यास सुरुवात केल्यानंतर विक्रेते पथकाबरोबर वाद घालत होते. तर विक्रीचे साहित्य एकत्र करुन त्यावरच ठाण मांडून बसत होते. पण पथकांने हा सर्व विरोध मोडीत काढला. यावेळी पथकातील कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये चांगलीच झटापट झाली. पण पोलिस बंदोबस्त असल्यामुळे विक्रेत्यांना नमते घ्यावे लागले. पोलिस निरीक्षक विक्रांत चव्हाण यांच्यासह चार पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.

अतिक्रमण विभागाचे प्रमुख पंडित पोवार यांच्या नेतृत्वाखाली दिवसभर कारवाई करण्यात आली. जेसीबी, डंपर यांच्यासह १५ कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश होता.

हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाईची गरज

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम थंडावली होती. मंगळवारी सकाळपासून मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात वाहतुकीला अडथळे करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात झाली. कारवाईला सुरुवात करताच फेरीवाला संघटनेच्या नेत्यांचे पथकाला फोन येण्यास सुरुवात झाली. प्रत्येक कारवाई दरम्यान असा हस्तक्षेप नवा नसला, तरी यामुळे अनेकदा कारवाई ब्रेक मिळतो. शहरातील अनेक रस्त्यांवर चालणेही मुश्किल बनले असताना शहरात अशी कारवाई सुरू राहण्यासाठी प्रथम हस्तक्षेप करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची अपेक्षा शहरवासीय व्यक्त करु लागले आहेत.

वाहतूक कोंडी

श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक करवीर नगर वाचन मंदिर मार्ग येतात. या रस्त्यावर फेरीवाल्यांची संख्या जास्त असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होती. त्याचा त्रास वाहनधारकांना होता. आज कारवाई सुरू असताना विक्रेत्यांनी विरोध केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्याचा परिणाम सीपीआर चौकापर्यंत दिसून आला. पण कारवाई सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे वाहनधारकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कारवाईचे समर्थन करत थांबणेच पसंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरावेचक महिलांचा मनपासमोर ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार शहरातील करचा वर्गीकरणाचे काम कचरावेचक महिलांच्या बचतगटांना द्यावे, त्यांना शास्रोक्त प्रशिक्षण द्या आदी मागण्यांसाठी वसुधा कचरावेचक संघटनेच्यावतीने महापालिकेच्या प्रवेद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले. १५ जूनपासून मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास ७०० महिला बेमुदत उपोषण करतील, अशा इशाराही दिला.

घनकचरा व्यवस्थापन कायदा २०१६ नुसार शहरातील सुमारे तीन हजार महिला कचरा वर्गीकरणाचे काम करतात. मात्र महापालिका शहरातील कोंडाळे हटपण्यासाठी टिप्पर रिक्षा घेतल्या आहेत. मात्र कचरावेचक महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करावी, कचरावेचक महिला बचतगटाना कचरा संकलीत व वर्गीकरणाचे करण्याचे काम द्यावे,या मागणीसाठी महापालिकासमोर ठिय्या आंदोलन केले.

मागण्यांचे फलक घेवून जोरदार घोषणाबाजी करत सुमारे शंभर महिलांनी ठिय्या मारला. त्यानंतर शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास १५ जूनपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. आंदोलनात अध्यक्षा आक्काताई गोसावी, भारती कोळी, लक्ष्मी कांबळे, जरीना बेपारी, सविता कांबळे यांच्यासह आराध्या, ओंकार, मदरतेरेसा, जिजाऊ, ताराराणी आदी बचतगटातील महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातून उद्या मिरवणूक

$
0
0

कोल्हापूर: अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्यभिषेकदिनी गुरुवारी (ता.६) सायंकाळी ४.३० वाजता मंगळवार पेठ येथील महासंघाच्या कार्यालयातजवळून भव्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणुकीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. मिरवणुकीमध्ये हजारो वारकरी टाळ, मृदुंगांसह सहभागी होतील. मर्दानी खेळ, झांज व लेझीम पथक यांचा समावेश असले. छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा व प्रबोधन फलक मिरवणुकीमध्ये असतील, अशी माहिती वसंतराव मुळीक यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. शिंदेनी स्वीकारली सूत्रे

$
0
0

कोल्हापूर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे डॉ. देवानंद शिंदे यांनी मंगळवारी (ता.४) सकाळी स्वीकारली. यावेळी मावळते कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे व प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजणकर यांना निरोप देण्यात आला. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे, श्रीमती नलिणी चोपडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. चोपडे यांच्याकडून डॉ. शिंदे यांनी कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. सर्जेराव ठोंबरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images