Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रंकाळ्यातील गाळ नेण्याचे आवाहन

$
0
0

कोल्हापूर : रंकाळा तलावातील गाळ श्रमदानातून काढण्याचे काम महापालिकेतर्फे सुरू आहे. गाळ काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत यंत्रसामग्री उपलब्ध करुन दिलेली आहे. यंत्रसामग्रीद्वारे काढण्यात येणारा गाळ नेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तलावातील गाळ शेती, उद्यान, झाडांना खत म्हणून उपयोगी असून तो गाळ विनामोबदला रंकाळा तलावात येथे उपलब्ध आहे. संबंधितांनी स्वत:च्या वाहनातून गाळ घेऊन जावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

.. . . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डायरी - ३ जून

$
0
0

डायरी - ३ जून

मटा एज्युफेस्ट : महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअरची अचूक दिशा दाखविणारा 'मटा एज्युफेस्ट २०१९', स्थळ : हॉटेल सयाजी, वेळ : सकाळी ११ ते सायं. ५.३० पर्यंत.

योग शिबिर : योगगुरू विठ्ठल तांदळे यांचे योग शिबिर, स्थळ : प्रभातीर्थ अपार्टमेंट, ताराबाई रोड, वेळ : सकाळी ७ व सायंकाळी ६ वा.

शिबिर : चित्रतपस्वी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या वतीने 'चला नाटक शिकूया' बालनाट्य शिबिर, स्थळ : भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, नागाळा पार्क, वेळ : सकाळी ९ ते ११ वा.

व्याख्यान : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान, विषय : छत्रपती शिवरायांचे साम्राज्य, गुजरात ते श्रीलंका, वक्ते : नीरज साळुंखे, स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, वेळ : सायं. ५.३० वा.

मैफल : प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीने किशोरकुमार यांच्या गीतांची मैफल, स्थळ : आनंद हॉल, हॉटेल झोरबा, शाहूपुरी, वेळ : सायं. ५.३० वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीसाठी तालमींच्या जोरबैठका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या सिद्धार्थनगर व पद्माराजे उद्यानामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये कमालीची ईर्ष्या निर्माण होऊ लागली आहे. एकास-एक उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्षाचा असताना त्याला तालमी-तालमीमधील ईर्ष्याही समोर येऊ लागली आहे. तालमीची अस्मिता जपण्यासाठी एक उमेदवार देण्यासाठी बैठक होत असताना सोमवारी (ता. ३) शेतकरी कामगार पक्षाचे स्वप्नील पाटोळे अर्ज दाखल करणार आहेत.

पद्माराजे उद्यान प्रभागाचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण व सिद्धार्थनगर प्रभागाचे नगरसेवक अफजल पिरजादे यांचे पद अपात्र ठरल्यामुळे दोन्ही प्रभागात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. गुरुवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली असली, तरी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. मात्र सर्वाधिक ईर्ष्या पद्माराजे उद्यान प्रभागात दिसत आहे. या प्रभागात वेताळमाळ, खंडोबा तालमींचा समावेश आहे. त्यामुळे या प्रभागाचे राजकारण आणि निवडणूक तालमीभोवती फिरते. वेताळमाल तालीमकडून माजी नगरसेवक अजित राऊत यांचे नाव जवळपास निश्चित असल्याने खंडोबा तालमीकडून एकच उमेदवार देण्याच्या हालचाली शनिवारी गतिमान झाल्या. रात्री उशिरा तालीम समर्थकांची बैठक झाली. एका नावावर शिक्कामोर्तब झाले नसले, तरी एकच उमेदवार देण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. एकीकडे अशा हालचाली होत असतानाच तालीम परिसरात असणारे शेकापचे युवा कार्यकर्ते स्वप्नील पाटोळे यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली असून सोमवारी ते अर्ज दाखल करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा एज्युफेस्ट.....

$
0
0

प्रशासकीय सेवेसाठी

अभ्यासाचा त्रिसूत्री पॅटर्न

कोल्हापूर : 'महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सामोरे जाताना उमेदवारांनी आत्मविश्वास, विषयाचे नीट आकलन आणि अभ्यासात सातत्य राखणे आवश्यक आहे. हा त्रिसूत्री पॅटर्न उमेदवाराला प्रशासकीय सेवेत करिअरसाठी यशाचा पासवर्ड आहे,' असे प्रतिपादन द युनिक अॅकॅडमी, कोल्हापूर शाखेतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक हेमंत जोशी यांनी केले.

'मटा एज्युफेस्ट'मध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 'स्पर्धा परीक्षेतील करिअरच्या संधी' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. एमपीएससी व यूपीएससी परीक्षेचे स्वरूप, तयारी कशी करावी, प्रश्नपत्रिकेचा सराव यासंदर्भात मार्गदर्शन करून जोशी म्हणाले, 'स्पर्धा परीक्षा कोणतीही असो, तिचा आवाका समजून घेऊन नियमित अभ्यास केल्यास परीक्षा कठीण जात नाही. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या २०१२ मधील सुधारित अभ्यासक्रमानुसार पूर्वपरीक्षा ४००, मुख्य परीक्षा ८००, तर मुलाखत १०० गुणांची आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा ४००, मुख्य परीक्षा १७५० तर मुलाखत २७५ गुणांची आहे. प्रशासकीय सेवेत करिअर करू इच्छिणारे पदवीनंतर स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. कोणत्याही शाखेतील पदवीधर अगदी ३५ टक्के गुण प्राप्त केलेलासुद्धा परीक्षा देऊ शकतो.'

'पूर्व, मुख्य आणि मुलाखत हे तीनही टप्पे महत्त्वाचे आहेत. मुलाखत म्हणजे उमेदवाराची बौद्धिक क्षमता तपासणारी आणि तो समाजाकडे कुठल्या नजरेने पाहतो हे तपासण्याची परीक्षा असते. मुलाखतीप्रसंगी तुम्ही ज्या भागाचे प्रतिनिधित्व करता, त्या भागाशी निगडित प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते, यामुळे उमेदवाराला सर्वंकष माहिती असणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी संदर्भग्रंथ अतिशय उपयुक्त ठरतात. जनरल नॉलेज आणि सद्य:स्थितीविषयक (करंट अफेअर्स) अपडेट्स असावेत. सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी वृत्तपत्रीय वाचन गरजेचे आहे'

०००००

अभ्यासाच्या परफेक्ट

नियोजनात यशाची बीजे

कोल्हापूर : 'विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत दहावी आणि बारावी हे दोन्ही टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत. या दोन्ही परीक्षांतील यशावर उच्च शिक्षणाच्या संधी, भविष्यकालीन करिअर अवलंबून आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियमित, साप्ताहिक, पंधरवडा, मासिक, सहामाही आणि वार्षिक अशा पद्धतीचे नियोजन करा. काळ, काम आणि वेग या तीन गोष्टींची सांगड घातल्यास कुठल्याही विषयाचा अभ्यासक्रम मागे उरत नाही,' अशा शब्दांत चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. भारत खराटे यांनी विद्यार्थ्यांना यशाची शिकवण दिली.

'मटा एज्युफेस्ट'च्या रविवारी दुसऱ्या दिवशीच्या मार्गदर्शन सत्रात त्यांनी 'दहावी, बारावी नंतरच्या संधी' या विषयावर विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. चाटे शिक्षण समूहामध्ये गेली २६ वर्षे कार्यरत असलेल्या प्रा. खराटे यांनी पारंपरिक अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम, देश-विदेशातील बदलते ट्रेंड याविषयी मार्गदर्शन केले. केंद्रीय बोर्ड परीक्षा, राज्य मंडळाच्या परीक्षा, अभ्यासक्रम, अभ्यास करताना घ्यावयाची काळजी याविषयी विवेचन केले.

ते म्हणाले, 'बारावीत जनरल ग्रुप म्हणून ओळखला जाणारा 'पीसीएमबी' ग्रुप बारावीनंतर कोणत्याही क्षेत्रातील प्रवेशासाठी उपयुक्त ठरू शकतो. इंजिनीअरिंगमधील करिअरसाठी ७५ शाखा आहेत. इंजिनीअरिंगसाठी पीसीएम ग्रुप आवश्यक आहे. दहावी, बारावीनंतर करिअरसाठी टाइमटेबल आवश्यक आहे. तुमच्या स्वप्नातील गुणपत्रक (ड्रीम मार्कलिस्ट) तयार केल्याशिवाय ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, तेथे प्रवेश घेण्याचा मार्गच निश्चित होणार नाही. दैनंदिन वेळापत्रक आणि त्यानुसार आचरण गरजेचे आहे. करिअरसाठी मेडिकल, इंजिनीअरिंगसह अन्य दालने खुली आहेत. या कालावधीत पालकांची भूमिका अंत्यत महत्त्वाची आहे. केवळ संगोपन करणे म्हणजे पालकत्व नव्हे. पालकत्व हे पाल्यांसाठी प्रेरणादायी असावे. दोघांत मित्रत्वाच्या नात्यासारखे बंध असावेत.'

०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएचबी’ नियुक्ती नियमांच्या कचाट्यात

$
0
0

पान २ अँकर...

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : राज्य सरकारने तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात ३०० वरून ५०० रुपये इतकी वाढ केली. मात्र, सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी कॉलेजला विद्यापीठाची मान्यता, शिक्षण सहसंचालक कार्यालयाचा 'ना हरकत दाखला' बंधनकारक केले आहे. पूर्वी एका पूर्णवेळ रिक्त पदासाठी तीन सीएचबीधारकांची नियुक्ती केली जायची. त्यामध्ये बदल करून आता फक्त दोनच प्राध्यापकांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. शिवाय एकाचवेळी एकाच कॉलेजमध्ये काम करणार, असे हमीपत्र प्राध्यापकांना द्यावे लागणार असल्याने नियुक्त्या नियमांच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

येत्या शैक्षणिक वर्षाला महिनाभरात सुरुवात होणार आहे. सरकारच्या नव्या नियमावलीमुळे सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीत अडचणी उद्भवू शकतात असे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. सरकारी नियमांची सांगड घालून सीएचबी नियुक्ती करताना विशेषत: प्राचार्यांची कसोटी लागणार आहे. सीएचबी नियुक्तीपूर्वी कॉलेजने जाहिरात देऊन विद्यापीठाची मान्यता घ्यावयाची आहे. विद्यापीठाने मान्यता दिल्याचे पत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर करायचे आहे. सहसंचालकांच्या कार्यालयाकडून संबंधित विषयाचा कार्यभार तपासून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. नियुक्ती प्रक्रियेला विद्यापीठाची मान्यता नसल्यास वेतन प्रक्रियेला मंजुरी मिळणार नाही. शिवाय २०१७ पूर्वी रिक्त जागेसाठीच नियुक्ती करावी, या अटी वादाच्या ठरत आहेत.

सरकारच्या नव्या नियमानुसार एका पूर्णवेळ रिक्त पदासाठी फक्त दोनच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नेमणुका करता येतील. एका प्राध्यापकाकडे जास्तीत जास्त नऊ तासांचा कार्यभार सोपविता येईल. पूर्वी कॉलेज पातळीवर तीन सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्त्या केल्या जायच्या. शिवाय प्राचार्यांच्या अधिकाराखालील नियुक्ती प्रक्रिया पूर्ण व्हायची. नव्या नियमानुसार कॉलेजने विद्यापीठ मान्यतेने जाहिरात द्यायची. विद्यापीठ अनुदान आयोग, विद्यापीठ व सरकारने निश्चित केलेल्या शैक्षणिक पात्रताप्राप्त प्राध्यापकांची स्थानिक निवड समितीप्रमार्फत निवड करावयाची आहे. समितीत संस्थाप्रमुख, प्राचार्यांव्यतिरिक्त बाह्यविषय तज्ज्ञ गरजेचा आहे.

००००

सहसंचालकांची भेट, विद्यापीठाशी चर्चा करणार

सरकारच्या नव्या नियमावलीनुसार सीएचबी नियुक्तीवेळी अडचणी उद्भवू शकतात, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य प्रवीण चौगुले, सचिव प्राचार्य सुरेश गवळी यांनी विभागीय शिक्षण सहसंचालक अजय साळी यांच्यासोबत चर्चा केली. येत्या चार दिवसांत ते विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करणार आहेत. 'विद्यापीठाने सीएचबी नियुक्तीसाठी तत्काळ परवानगी द्यावी. परवानगी मिळण्यास विलंब झाला तर नियुक्ती रखडू शकते, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक होऊ शकते,' असे प्राचार्य सुरेश गवळी यांनी सांगितले.

०००

नियुक्तीवेळी द्यावे लागणार हमीपत्र

राज्य सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भात आदेश काढला आहे. त्यामध्ये 'तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची एका शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त नऊ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करावी. त्यास विद्यापीठाची मान्यता असावी. तासिका तत्त्वावरील नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपातील असल्याने त्यास नियमित सेवेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत. त्यामुळे भविष्यात सेवेत कायम करण्याची मागणी, नियमित सेवेच्या कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही. तसेच एकाचवेळी एकाच महाविद्यालयात काम करता येईल, असे हमीपत्र १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर संबंधित प्राध्यापकांनी रुजू होतेवेळी द्यावयाचे आहे,' असे म्हटले आहे.

०००००

सीएचबी प्राध्यापकांचे प्रती तास नवीन मानधन

कला, वाणिज्य विज्ञान शाखेतील प्राध्यापक : ५०० रुपये (पूर्वी ३००)

प्रती तास प्रात्यक्षिक : २०० रुपये (पूर्वी १५०)

कला, वाणिज्य, विज्ञान पदव्युत्तरसाठी : ६०० रुपये (पूर्वी ३००)

शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी : ६०० रुपये (पूर्वी ३००)

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेथी पेंढी २० रुपयांना

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम्स

वाढता उन्हाळा, न झालेला वळीव पाऊस आणि पिकाला पाणी नसल्याने भाजीपाल्याच्या दरावरही परिणाम झाला आहे. फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली असून मेथी पेंढीची विक्री २० ते २५ रुपयांना झाली. फ्लॉवर आणि कोबीचा गड्ड्याची २० रुपयांनी विक्री सुरू होती.

धान्य, कडधान्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे. तुरडाळीचा दर प्रतिकिलो १०० रुपयांवर पोहोचला असून मसूर, मूग आणि मटकी या कडधान्यांबरोबर शेंगदाणा, वरीच्या दरातही वाढ झाली. मंडईत भाज्यांचे दरही वाढले आहेत. वांगी, भेंडी, दोडका, ढब्बू मिरची, टोमॅटो यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. सरासरी प्रतिकिलो ४० रुपयांनी या भाज्यांची विक्री होत आहे. आंब्याची मोठी आवक झाली असून हापूस आंबा १५० ते ४०० रुपये डझन अशी विक्री होत आहे. लालबाग आंबा ४० रुपये किलो तर पायरी आंब्याचा दर ८० ते १२० रुपये डझन असा दर आहे. फणसाचे बाजारात आगमन झाले आहे. ४० ते १०० रुपये फणस विकला जात आहे. जांभूळ, करवंद हा रानमेवाही विक्रीस आला आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : १५ ते २०

टोमॅटो : ४०

भेंडी : २० ते ४०

ढबू : ४०

गवार : ६० ते ८०

दोडका : ४०

कारली : ६०

वरणा : ४०

हिरवी मिरची : ४० ते ५०

फ्लॉवर : २० ते ४०

कोबी : २० ते ३०

बटाटा : २५ ते ३०

लसूण : ६० ते १००

कांदा : १५ ते २५

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : २० ते २५

कांदा पात : १०

कोथिंबीर : २० ते ३०

पालक : १०

शेपू :१५ ते २०

करडा : १५ ते २०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : ६० ते १४०

डाळिंब : ४० ते ६०

केळी : २० ते ६० (डझन)

जवारी केळी : ३० ते ७० (डझन)

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३६

शेंगदाणा : १००

मैदा : ३२

आटा : ३२

रवा : ३२

गूळ : ४४ ते ५०

साबुदाणा : ८४

वरी : ९२

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : १००

मुगडाळ : ९२

उडीद डाळ : ६८ ते ७२

हरभरा डाळ : ६८

मसूर डाळ : ६८

मसूर : ८० ते १२०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९६

काळा वाटाणा : ६८

मूग ८० ते ८४

मटकी : ८० ते १२०

छोले : ९६ ते १००

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४० ते ५०

गहू : २८ ते ३२

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : ३२

नाचणी : ३६ ते ४०

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १२५

सरकी तेल : ८६

खोबरेल : २४० २२०

सूर्यफूल : ९० ते १०५

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १८०

जिरे : २६०

खसखस : ९००

खोबरे : १८० ते २००

वेलदोडे : ३६००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनासाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'मानधन नको वेतन द्या, मानधनाच्या अर्धी पेन्शन द्या'अशी घोषणेबाजी करत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर, राधानगरी, कागल, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि भुदरगड, करवीर तालुक्यातील मदतनीस यांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. सरकारकडून वेतन देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही तर आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मत देणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी महासंघातर्फे राज्यभर आंदोलन पुकारले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दिवसभर चळवळीतील गाणी सादर करत आंदोलनाची धार वाढवली. दरम्यान सरकारने ऑक्टोबर २०१८ मध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात अनुक्रमे १५०० आणि ७५० रुपयांची वाढ केली. घोषणा करुन आठ महिन्याचा कालावधी उलटला पण सरकारने अद्याप वाढीव मानधन दिले नाही. शिवाय अंगणवाडी कर्मचारी संघाने मानधनाऐवजी वेतनासाठी लढा सुरू आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी सर्व आमदारांना पत्रे पाठवली आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेच्या सचिव कॉम्रेड सुवर्णा तळेकर यांनी सांगितले.

आंदोलनात प्रेमा पोतदार, स्वाती कल्याणकर, लीला सातवेकर,शुक्रा पाटील, कांचन पाटील, मंजुळा लव्हटे, राजश्री पडवळ,, कल्पना गायकवाड, शारदा आगळे आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या. मंगळवारी (ता. ४ जून) होणाऱ्या धरणे आंदोलनात राधानगरी, कागल, आजरा, शिरोळ तालुक्यातील मदतनीस व हातकणंगले, इचलकरंजी, करवीर, भुदरगड, चंदगड येथील सेविका सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारीच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

पुणे-बेंगळुरू महामार्गावर कागलजवळील लक्ष्मी टेकडीजवळ होंडा सिटी मोटारीच्या धडकेने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. मारुती नारायण पुजारी (वय ७०, रा. कसबा सांगाव ता. कागल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पुजारी हे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील खाजगी काम करतात. आज दुपारी बाराच्या सुमारास आपल्या टीव्हीएस मोपेड गाडीवरून (एमएच ०९ ०६८१) ते लक्ष्मी टेकडीजवळील लक्ष्मी मंदिरासमोरुन औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी कोल्हापूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या होंडा सीटी (जीजे ०५ जेएफ ८५५०) गाडीसमोर पुजारी हे आले. मोटरसायकलस्वारास वाचविण्यासाठी मोटार चालकाने प्रयत्न केले. या प्रयत्नात मोटार दुभाजकावर जोरात धडकली. नंतर कारने मोटरसायकलला धडक दिली. अपघातात पुजारी गंभीर जखमी झाले. १०८ रुग्णवाहिकेला कळवूनही वेळेत न आल्याने त्यांना रिक्षातून कागल रुग्णालयात नेण्यात आले. पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीएचबी’ नियुक्ती नियमांच्या कचाट्यात

$
0
0

पान २ अँकर...

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : राज्य सरकारने तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात ३०० वरून ५०० रुपये इतकी वाढ केली. मात्र, सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी कॉलेजला विद्यापीठाची मान्यता, शिक्षण सहसंचालक कार्यालयाचा 'ना हरकत दाखला' बंधनकारक केले आहे. पूर्वी एका पूर्णवेळ रिक्त पदासाठी तीन सीएचबीधारकांची नियुक्ती केली जायची. त्यामध्ये बदल करून आता फक्त दोनच प्राध्यापकांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. शिवाय एकाचवेळी एकाच कॉलेजमध्ये काम करणार, असे हमीपत्र प्राध्यापकांना द्यावे लागणार असल्याने नियुक्त्या नियमांच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

येत्या शैक्षणिक वर्षाला महिनाभरात सुरुवात होणार आहे. सरकारच्या नव्या नियमावलीमुळे सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीत अडचणी उद्भवू शकतात असे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. सरकारी नियमांची सांगड घालून सीएचबी नियुक्ती करताना विशेषत: प्राचार्यांची कसोटी लागणार आहे. सीएचबी नियुक्तीपूर्वी कॉलेजने जाहिरात देऊन विद्यापीठाची मान्यता घ्यावयाची आहे. विद्यापीठाने मान्यता दिल्याचे पत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर करायचे आहे. सहसंचालकांच्या कार्यालयाकडून संबंधित विषयाचा कार्यभार तपासून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. नियुक्ती प्रक्रियेला विद्यापीठाची मान्यता नसल्यास वेतन प्रक्रियेला मंजुरी मिळणार नाही. शिवाय २०१७ पूर्वी रिक्त जागेसाठीच नियुक्ती करावी, या अटी वादाच्या ठरत आहेत.

सरकारच्या नव्या नियमानुसार एका पूर्णवेळ रिक्त पदासाठी फक्त दोनच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नेमणुका करता येतील. एका प्राध्यापकाकडे जास्तीत जास्त नऊ तासांचा कार्यभार सोपविता येईल. पूर्वी कॉलेज पातळीवर तीन सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्त्या केल्या जायच्या. शिवाय प्राचार्यांच्या अधिकाराखालील नियुक्ती प्रक्रिया पूर्ण व्हायची. नव्या नियमानुसार कॉलेजने विद्यापीठ मान्यतेने जाहिरात द्यायची. विद्यापीठ अनुदान आयोग, विद्यापीठ व सरकारने निश्चित केलेल्या शैक्षणिक पात्रताप्राप्त प्राध्यापकांची स्थानिक निवड समितीप्रमार्फत निवड करावयाची आहे. समितीत संस्थाप्रमुख, प्राचार्यांव्यतिरिक्त बाह्यविषय तज्ज्ञ गरजेचा आहे.

००००

सहसंचालकांची भेट, विद्यापीठाशी चर्चा करणार

सरकारच्या नव्या नियमावलीनुसार सीएचबी नियुक्तीवेळी अडचणी उद्भवू शकतात, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य प्रवीण चौगुले, सचिव प्राचार्य सुरेश गवळी यांनी विभागीय शिक्षण सहसंचालक अजय साळी यांच्यासोबत चर्चा केली. येत्या चार दिवसांत ते विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करणार आहेत. 'विद्यापीठाने सीएचबी नियुक्तीसाठी तत्काळ परवानगी द्यावी. परवानगी मिळण्यास विलंब झाला तर नियुक्ती रखडू शकते, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक होऊ शकते,' असे प्राचार्य सुरेश गवळी यांनी सांगितले.

०००

नियुक्तीवेळी द्यावे लागणार हमीपत्र

राज्य सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भात आदेश काढला आहे. त्यामध्ये 'तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची एका शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त नऊ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करावी. त्यास विद्यापीठाची मान्यता असावी. तासिका तत्त्वावरील नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपातील असल्याने त्यास नियमित सेवेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत. त्यामुळे भविष्यात सेवेत कायम करण्याची मागणी, नियमित सेवेच्या कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही. तसेच एकाचवेळी एकाच महाविद्यालयात काम करता येईल, असे हमीपत्र १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर संबंधित प्राध्यापकांनी रुजू होतेवेळी द्यावयाचे आहे,' असे म्हटले आहे.

०००००

सीएचबी प्राध्यापकांचे प्रती तास नवीन मानधन

कला, वाणिज्य विज्ञान शाखेतील प्राध्यापक : ५०० रुपये (पूर्वी ३००)

प्रती तास प्रात्यक्षिक : २०० रुपये (पूर्वी १५०)

कला, वाणिज्य, विज्ञान पदव्युत्तरसाठी : ६०० रुपये (पूर्वी ३००)

शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी : ६०० रुपये (पूर्वी ३००)

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेथी पेंढी २० रुपयांना

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम्स

वाढता उन्हाळा, न झालेला वळीव पाऊस आणि पिकाला पाणी नसल्याने भाजीपाल्याच्या दरावरही परिणाम झाला आहे. फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली असून मेथी पेंढीची विक्री २० ते २५ रुपयांना झाली. फ्लॉवर आणि कोबीचा गड्ड्याची २० रुपयांनी विक्री सुरू होती.

धान्य, कडधान्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे. तुरडाळीचा दर प्रतिकिलो १०० रुपयांवर पोहोचला असून मसूर, मूग आणि मटकी या कडधान्यांबरोबर शेंगदाणा, वरीच्या दरातही वाढ झाली. मंडईत भाज्यांचे दरही वाढले आहेत. वांगी, भेंडी, दोडका, ढब्बू मिरची, टोमॅटो यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. सरासरी प्रतिकिलो ४० रुपयांनी या भाज्यांची विक्री होत आहे. आंब्याची मोठी आवक झाली असून हापूस आंबा १५० ते ४०० रुपये डझन अशी विक्री होत आहे. लालबाग आंबा ४० रुपये किलो तर पायरी आंब्याचा दर ८० ते १२० रुपये डझन असा दर आहे. फणसाचे बाजारात आगमन झाले आहे. ४० ते १०० रुपये फणस विकला जात आहे. जांभूळ, करवंद हा रानमेवाही विक्रीस आला आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : १५ ते २०

टोमॅटो : ४०

भेंडी : २० ते ४०

ढबू : ४०

गवार : ६० ते ८०

दोडका : ४०

कारली : ६०

वरणा : ४०

हिरवी मिरची : ४० ते ५०

फ्लॉवर : २० ते ४०

कोबी : २० ते ३०

बटाटा : २५ ते ३०

लसूण : ६० ते १००

कांदा : १५ ते २५

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : २० ते २५

कांदा पात : १०

कोथिंबीर : २० ते ३०

पालक : १०

शेपू :१५ ते २०

करडा : १५ ते २०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : ६० ते १४०

डाळिंब : ४० ते ६०

केळी : २० ते ६० (डझन)

जवारी केळी : ३० ते ७० (डझन)

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३६

शेंगदाणा : १००

मैदा : ३२

आटा : ३२

रवा : ३२

गूळ : ४४ ते ५०

साबुदाणा : ८४

वरी : ९२

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : १००

मुगडाळ : ९२

उडीद डाळ : ६८ ते ७२

हरभरा डाळ : ६८

मसूर डाळ : ६८

मसूर : ८० ते १२०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९६

काळा वाटाणा : ६८

मूग ८० ते ८४

मटकी : ८० ते १२०

छोले : ९६ ते १००

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४० ते ५०

गहू : २८ ते ३२

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : ३२

नाचणी : ३६ ते ४०

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १२५

सरकी तेल : ८६

खोबरेल : २४० २२०

सूर्यफूल : ९० ते १०५

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १८०

जिरे : २६०

खसखस : ९००

खोबरे : १८० ते २००

वेलदोडे : ३६००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेच्या योजना कागदावरच

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet@Appasaheb_MT

कोल्हापूर : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक नळाला तोट्या बसविणार, जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवरील अतिक्रमण हटविणार, गाव तलाव ताब्यात घेणार, कोल्हापूर शहरात पाच मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स... गेल्या काही महिन्यातील जिल्हा परिषद प्रशासनानाच्या या घोषणा आहेत. घोषणा करुन सहा महिने, वर्ष पूर्ण होत आले पण प्रत्यक्षात कार्यवाही दिसत नाही. प्रशासकीय पातळीवर केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत. पदाधिकारी व सदस्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे.

नळांना तोट्या बसेनात

पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी टंचाई टाळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने सात डिसेंबर २०१८ रोजी ग्रामीण भागातील घरगुती नळांना तोट्या बसविण्याचा ठराव केला. एक जानेवारी २०१९ पासून अंमलबजावणी करण्याचे ठरले. सहा महिन्याचा कालावधी होत आला, अद्याप एकाही गावात नळांना तोट्या बसविल्या नाहीत. जे नळांना तोट्या बसविणार नाहीत त्यांना प्रतिदिन ५००० रुपये दंड ठोठावण्याचे ठरले. ना नळांना तोट्या, ना दंडात्मक कारवाई अशी विचित्र स्थिती बनली आहे.

जागा खासगीच्या ताब्यात

जिल्हातील ग्रामीण भागातील अनेक पाझर तलाव आणि गाव तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहेत. पण कागदोपत्री त्या तलावांचा ताबा खासगी व्यक्तीकडे आहे. सर्वसाधारण सभेत, स्थायी समिती व जलव्यवस्थापन सभेत हा विषय गाजला. प्रशासनाकडून तलाव ताब्यात घेण्याची व कागदोपत्री जिल्हा परिषदेच्या मालकीची करण्याची कार्यवाही केली जाईल असे सांगितले. काही तलावांच्या परिसरात अतिक्रमण झाले आहे. तलाव ताब्यात घेण्याची कार्यवाही रखडली आहे.

शॉपिग कॉम्प्लेक्स रखडले

शहरात भाऊसिंगजी रोडवर जिल्हा परिषदेच्या मालकीची मालमत्ता आहे. या ठिकाणी पाच मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी प्रस्तावित आहे. गेली अनेक वर्षे हा विषय प्रस्तावित आहे. कॉम्प्लेक्ससाठी २५ हजार चौरस फुटाचे बांधकाम होणार आहे. आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे उत्पन्नात भर पडणार आहे. रेडीरेकनर दरानुसार भाडे आकारणी होणार आहे. जुन्या इमारतीमधील दुकानदारांचे पुनर्वसन होणार आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निविदा प्रकिया राबवून आराखड्याला मूर्त रुप देण्याच्या कार्यवाहीबद्दल प्रशासन प्रत्येक वेळी नव नवीन तारीख सांगत आहे.

प्रदूषणमुक्ती थंडावली

पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती प्रकल्प अंतर्गत करवीर तालुक्यातील अकरा गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित आहेत. यासाठी 'टायगर बायो फिल्टर'पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रयाग चिखली, हणमंतवाडी, शिंगणापूर, आंबेवाडी, गांधीनगर, वळिवडे, वसगड, उचगाव, शिये, वडणगे या गावांचाा समाावेश आहे. सांडपाणी व्यवस्थापनसाठी एका खासगी संस्थेने आराखडा बनविला आहे. निधीसाठी सरकारसोबत पत्र व्यवहार, शौचालय बांधणीसाठी उपलब्ध निधीचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारणीसाठी मान्यता या प्रक्रियेत 'टायगर बायोफिल्टर' रखडला. 'नमामि पंचगंगा'उपक्रमाचा गाजवाजा खूप झाला पण प्रत्यक्ष कार्यवाही नजरेस पडत नाही.

'ऑडिट'नंतरही अतिक्रमणे कायम

जिल्हाभर जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्ता आहेत. मात्र प्रशासनाकडे एकूण किती मालमत्ता आहेत याची नेमकी आकडेवारी नव्हती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रशासनाने एकूण २२ प्रकारात मालमत्तांची माहिती गोळा केली. जवळपास चार हजार मिळकतींची नोंद झाली. पण अनेक मिळकतीवर ग्रामीण भागात अतिक्रमणे झाली आहेत. खासगी व्यक्तीकडून जागा ताब्यात घेतली आहे. अतिक्रमणे हटविण्याची सूचना देऊनही कार्यवाही मात्र शून्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी - ४ जून

$
0
0

डायरी - ४ जून

योग शिबिर : योगगुरू विठ्ठल तांदळे यांचे योग शिबिर, स्थळ : प्रभातीर्थ अपार्टमेंट, ताराबाई रोड, वेळ : सकाळी ७ आणि सायं. ६ वा.

शिबिर : चित्रतपस्वी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्यावतीने 'चला नाटक शिकुया' बालनाट्य शिबिर, स्थळ : भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, नागाळा पार्क, वेळ : सकाळी ९ वा.

कार्यशाळा : सतेज पाटील फाउंडेशन व स्टडी सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा, स्थळ : डी. वाय. पाटील कॅम्पस, साळोखे नगर, वेळ : सकाळी १० ते ५ वा.

निधी वाटप : महापालिकेच्यावतीने दिव्यांगांना निधी वाटप, हस्ते : महापौर सरिता मोरे, स्थळ : विठ्ठल रामजी शिंदे चौक, महापालिका, वेळ : दुपारी ३ वा.

बैठक : यशवंत भालकर स्मारकप्रश्नी बैठक, स्थळ : स्थायी सभागृह, महापालिका, वेळ : सायंकाळी ५ वा.

मैफल : प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्यावतीने मुकेश यांच्या 'मुबारक हो सबको....' गीतांची मैफल, स्थळ : आनंद हॉल, हॉटेल झोरबा, शाहूपुरी, वेळ : सायंकाळी ५.३० वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगरात कचरा डेपोप्रश्नी दलित महासंघाचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

गांधीनगर ( ता. करवीर ) येथे आश्वासन देऊनही कचरा डेपो न हटवल्याबद्दल दलित महासंघाच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलनास सोमवारी (ता. ३) प्रारंभ झाला. कचरा डेपोवरच मंडप उभारून महासंघाचे कार्यकर्ते आंदोलनात बसले आहेत. काल त्याबाजूचा कचरा मोठ्या प्रमाणात पेटविण्यात आला. त्या आगीच्या झळा आणि धूर वाऱ्याने मंडपाकडे येत होता.

गांधीनगर ग्रामपंचायतीपासून थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत लेखी, तोंडी तक्रारी करूनही म्हसोबा माळ परिसरातील कचरा डेपो हलविण्यात आलेला नाही. येथील कचऱ्याचा डोंगर त्वरित हटवावा या मागणीसाठी दलित महासंघाचे करवीर तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, शहराध्यक्ष राजू कांबळे व कार्याध्यक्ष नबीसाहेब नदाफ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास प्रारंभ झाला. सायंकाळी ग्रामस्थ, महिलांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवला. काही महिला आंदोलनात सहभागी झाल्या. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आंदोलनास ग्रामस्थ पाठिंबा दर्शवत आहेत. कचरा डेपोवरच मंडप घालून आंदोलक बसले असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो.

फोटो ओळी :

गांधीनगर येथील कचरा डेपो हटवण्यासाठी दलित महासंघातर्फे कचरा डेपोवरच सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एज्युफेस्ट’मुळे मिळाली दिशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'करिअरसाठी विपुल क्षेत्रं खुली आहेत, मात्र योग्य वेळी योग्य त्या क्षेत्रांची माहिती होत नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात. नेमकी हीच गरज ओळखून 'मटा एज्युफेस्ट'ने देश आणि परदेशातील अनेकविध सेवेतील करिअरची दालने खुली केली. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारा 'एज्युफेस्ट'हा शैक्षणिक उपक्रम सर्वांसाठी दिशादर्शक आहे,' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.

'महाराष्ट्र टाइम्स'आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मटा एज्युफेस्ट'च्या समारोप सत्रात ते बोलत होते. विद्यार्थी आणि पालकांच्या उदंड प्रतिसादात सोमवारी सायंकाळी समारोपाचा कार्यक्रम झाला. मोक्ष अॅकॅडमीचे जयंत पाटील, सीए चेतन ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या तीन दिवसीय प्रदर्शनाने उच्च शिक्षणातील संधीविषयी योग्य मार्गदर्शन घडल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

'दहावी, बारावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, पदवीनंतर करिअरच्या संधी कुठल्या क्षेत्रात अधिक आहेत यासंबंधी सविस्तर माहिती विद्यार्थी व पालकांना कोल्हापुरातूनच उपलब्ध झाली. यामुळे 'मटा एज्युफेस्ट'अभिनंदनास पात्र आहे. देशाच्या जडणघडणीत 'नॉलेज शेअरिंग'चा खूप मोठा वाटा आहे. खऱ्या अर्थाने ती राष्ट्रसेवा आहे.' असे कौतुकोद्गार डॉ. शिर्के यांनी काढले. ते म्हणाले 'तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या बळावर जग आवाक्यात आले आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर करिअरसाठी असंख्य क्षेत्रे आहेत. प्रत्येकाकडे काही ना काही गुणवैशिष्ट्ये असतात. विद्यार्थ्यानी स्वत:मधील कौशल्ये, क्षमता विकसित करुन यशस्वी बनावे.'

याप्रसंगी 'एज्युफेस्ट'मध्ये सहभागी झालेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा येथील शिक्षण संस्थेच्या प्रतिनिधींचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 'महाराष्ट्र टाइम्स'कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय जाधव यांनी तीन दिवसीय प्रदर्शनाचा आढावा घेतला. रिस्पॉन्स हेड मधूर राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

'मटा'मधील लेखमालिका उपयुक्त

'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये दहावी, बारावीनंतरचे अभ्यासक्रम, पदवी शिक्षणाच्या विविध शाखा, रोजगार आणि करिअरची संधी यासंदर्भात सध्या लेखमालिका सुरू आहे. पारंपरिक अभ्यासक्रमासह नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंगमधील विविध शाखा, संख्याशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र असे विविध अभ्यासक्रम, शिक्षणाच्या सुविधा आणि भविष्यकालीन संधीची वस्तुनिष्ठ माहिती विद्यार्थ्यांना मिळत आहे. शिक्षणातील वेगळ्या वाटांचा शोध घेणाऱ्यांसाठी ही लेखमालिका अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे गौरवोद्गारही प्रकुलगुरू शिर्के यांनी काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांचा श्रीलंकेपर्यंत राज्यविस्तार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत जाफना किल्ल्यावर हल्ला करून डचांना हुसकावून लावत श्रीलंकेत विस्तार केला होता. तसे पुरावे इंग्रजांच्या दफ्तरातील पत्रव्यवहारात आले आहेत,' असा दावा इतिहास संशोधक डॉ. नीरज साळुंखे यांनी केला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने आयोजित शिवराज्यभिषेक व्याख्यानमालेत ते बोलत होते. 'छत्रपती शिवरायांचे साम्राज्य गुजरात ते श्रीलंका' असा व्याख्यानाचा विषय होता. क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडकेर अध्यक्षस्थानी होते. डॉ. साळुंखे यांनी अस्सल कागदपत्रांच्या आधारे शिवाजी महाराजांचे राज्य गुजरात ते श्रीलंकेपर्यंत होते हे आजच्या व्याख्यानात उलगडून दाखवले.

साळुंखे म्हणाले, 'चौथी व सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजींचे राज्य साडेतीन जिल्हे, तंजावर आणि वेल्लोर एवढेच दाखवले होते. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाने महाराजांच्या राज्याचा नवीन नकाशा करण्याचे काम दिले होते. फ्रेंच, इंग्रज, डच, अदिशाही, मुघलांकडील अस्सल कागदपत्रानुसार संशोधन केले असता महाराजांचे राज्य गुजरातपासून तंजावरपर्यंत असल्याचे सिद्ध होत आहे.'

'स्वराज्य' ही शहाजी आणि शिवाजी महाराजांची एकत्रित कृती होती असा दावा डॉ. साळुंखे यांनी केला. ते म्हणााले, 'शहाजींनी मुघल आणि अदिशहाशी लढा देत निजामशाहीचे पुनरुज्जीवन करण्याचा असफल प्रयत्न केला होता. शहाजीराजांचा बंडाचा धसका घेतलेल्या मुघल व अदिशहाने शहाजींची रवानागी बेंगळुरूत केली. १६३० ते १६३६ या कालावधीत बेंगळुरुमध्ये शहाजी राजांनी महाराजांच्या शिक्षणाची सोय करत पुण्यात पाठवले. त्यानंतर पुढील वीस वर्षात महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी तर दक्षिणेत शहाजीराजेंनी विस्तार करत मराठ्यांचे साम्राज्याचा पाया विस्तारत नेला. शहाजीराजांनी चांगले अधिकारी, शस्त्रे, संपत्तीचीही मदत शिवाजी महाराजांना केली. शहाजी राज्याच्या मृत्यूनंतर दक्षिणेचा विस्तार थांबला होता. आग्र्याच्या सुटकेनंतर शिवरायांनी शहाजीराजांचा अपूर्ण राहिलेला दक्षिणविस्तार करण्यासाठी दक्षिण दिग्विजय मोहिम यशस्वी करत स्वराज्याचा विस्तार श्रीलंकेपर्यंत केला.'

'वास्को द गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घालून थेट दक्षिण आशियाई देशांशी व्यापार वाढवला होता. ही घटना जगाच्या व देशाच्यादृष्टीने महत्वाची होती' याकडे डॉ. साळुंखे यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, 'शिवरायांच्या काळात दक्षिण व पूर्व किनारपट्टीवरील सर्व बेटे व किल्ल्यावर फ्रेंच, डचांनी ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती. व्यापार करण्यासाठी युरोपीय देशांनी थेट सोन्याचा वापर केल्याने मुघलांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्ष वळवले होते. दक्षिण भाग मुघलांच्या ताब्यात येऊ नये यासाठी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत कावेरी नदी परिसर, तंजावर, रामेश्वरपर्यंत स्वराजाचा विस्तार केला. जाफना किल्ल्यावर हल्ला करुन थेट डचांना हुसकावून लावले. दक्षिणेची जबाबदारी सावत्र भाऊ संतोजीकडे ठेवत राजकारभाराची घडी कायम ठेवली होती.'

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. इंद्रजित माने यांनी स्वागत केले. शिरीष जाधव यांनी आभार मानले. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, दिलीप जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिव्यांगांना आज अनुदान वाटप

$
0
0

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या दिव्यांग सहाय्यता निधीचे वाटप मंगळवारी (ता. ४) दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते निधी वाटप करण्यात येणार आहे. पात्र दिव्यांगांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिंदु राष्ट्रासाठी संप्रदायांनी व्यापकता अंगीकारावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'साधना आणि धर्मप्रसार यांचा सुंदर ताळमेळ अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात पहायला मिळत आहे. आर्थिक, तसेच अन्य कारणांमुळे सिंधी समाज राष्ट्र-धर्म कार्यापासून काही काळ दूर गेला होता; मात्र सध्या परिस्थिती पालटली असून हा समाजही राष्ट्र-धर्म कार्यात अग्रेसर आहे. हिंदु राष्ट्रासाठी संप्रदायांना संकुचितता सोडून व्यापक होऊन कार्य करावे लागेल,' असे आवाहन अमरावती (महाराष्ट्र) येथील शिवधारा आश्रमाचे डॉ. संतोष महाराज यांनी केले. रामनाथी (गोवा) येथे रामनाथ देवस्थानच्या विद्याधिराज सभागृहात 'अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना'च्या सहाव्या दिवशी 'सिंधी समाजात संस्कृती रक्षणासाठी केलेले प्रयत्न आणि त्यास मिळालेले यश' या विषयावर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे बिहार राज्य समन्वयक संजय सिंह यांनी अधिवेशनातील ठरावांचे वाचन केले.

दरम्यान, 'नास्तिकतावादी द्रमुक सरकारमुळे तमिळनाडूमध्ये जम्मू-काश्मीर राज्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तेथे हिंदु विरोधी आणि भारत विरोधी शक्ती शिरजोर झाल्या आहेत', असे मत अर्जुन संपथ यांनी मांडले. देहली येथील अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय महासचिव मुन्ना कुमार शर्मा म्हणाले, 'देशभरात विखुरलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र आणून त्यांना जोडण्याचे अतिशय स्तुत्य प्रयत्न हिंदु जनजागृती समिती करत आहे.'

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय संयोजक सूर्यकांत केळकर म्हणाले, बेंगळुरू येथील कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एन्. पी., वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील 'इंडिया विथ विजडम ग्रुप'चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, मुंबई येथील 'लष्कर-ए-हिंद'चे संस्थापक अध्यक्ष ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात अभियान

$
0
0

पणजी (गोवा) : देशातील सरकारीकरण केलेल्या मंदिरांची स्थिती भयावह आहे. अनेक मंदिर समित्यांमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. अधिग्रहित मंदिरांच्या परंपरा, व्यवस्था आदींमध्ये हस्तक्षेप केला जाऊन त्या पालटण्यात येत आहेत. हे प्रयत्न भाविक कदापि सहन करू शकत नाहीत. या धोरणाविरोधात राष्ट्रीय अभियान सुरू करण्याचा निर्णय आज येथे आठव्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात घेण्यात आला.

अधिवेशना'ला २५ राज्ये आणि बांगलादेश येथून एकूण १७४ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ५२० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनात हिंदूंच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांसह मंदिरांच्या सरकारीकरणाविषयी चर्चा करण्यात आली. देशातील मंदिरांसाठी हिंदूंच्या व्यवस्थापकीय समितीची स्थापना करण्यात यावी. या समितीवर शंकराचार्य, धर्माचार्य, धर्मनिष्ठ अधिवक्ते, धार्मिक संघटनांचे प्रतिनिधींची नेमणूक करण्यात यावी. मंदिरांच्या संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केली. या वेळी 'भारत रक्षा मंच'चे राष्ट्रीय सचिव ओडिशा येथील अनिल धीर, या रितु राठोड, चेतन राजहंस, रमेश शिंदे उपस्थित होते.

पिंगळे म्हणाले, 'कायदेशीरदृष्ट्या मंदिरांना कह्यात घेण्याचा कोणताही अधिकार सरकारला प्राप्त नाही. सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूतील नटराज मंदिराच्या संदर्भात निकाल देतांना स्पष्ट केले आहे की, कोणत्याही सरकारला मंदिराचे सरकारीकरण करून ते कायमस्वरूपी ताब्यात ठेवण्याचा अधिकार नाही. तसेच मंदिरांची जमीन 'सरकारी जमीन' म्हणून सरकार तिचा वापर करू शकत नाही. जर एखाद्या मंदिरात गैरप्रकार आढळल्यास, तेथे तात्पुरता सरकारी अधिकारी नेमून तो गैरप्रकार दूर करण्याच्या उपाययोजना करून ते मंदिर त्या समाजाकडे परत करायचे आहे. प्रत्यक्षात मात्र सरकार या मंदिरांना दुभती गाय मानून मंदिरेच बळकावून बसले आहे. येत्या वर्षात भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रितपणे 'मंदिर-संस्कृती रक्षण अभियान' नावाने राष्ट्रव्यापी चळवळ राबवणार आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधीस्थळावर आणखी एक सीसीटीव्ही कॅमेरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळ परिसरात सोमवारी आणखी एक सीसीटीव्ही कॅमेरा कार्यन्वित करण्यात आला. परिसराची सुरक्षा लक्षात घे‌वून महापालिका प्रशासनाने एकूण चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून पोलिस बंदोबस्त कायम ठेवला आहे.

राजर्षी शाहू समाधीस्थळ संरक्षक भिंतीच्या प्रवेशद्वारावरून प्रशासन व सिद्धार्थनगरवासीयांमध्ये वाद निर्माण झाला होता. शनिवारपासून पोलिस बंदोबस्तात संरक्षक भिंतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. समाधीस्थळाची सुरक्षा लक्षात घेवून रविवारी तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. त्यामध्ये आणखी एका कॅमेऱ्याची भर पडली. समाधीस्थळ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहावर कॅमेरे कार्यन्वित करण्यात आले आहेत. तसेच पोलिस बंदोबस्तही तैनात ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरारी तेलनाडेसह दहा जणांवर २५ लाखांच्या खंडणीचा गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

खोटे संमतीपत्र व संचकारपत्र बनवून जागा परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि दाखल खटला मागे घेण्यासह जागा सोडण्यासाठी २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नगरसेवक संजय तेलनाडेसह दहा जणांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये, राहुल मांगलेकर, विनायक फुलारी, खासगी क्लास चालक मधुकर फुलारी आदींविरोधात याप्रकरणी सुनील प्रभाकर कुलकर्णी (वय ५३ रा. कुलकर्णी बिल्डिंग ) यांनी तक्रार दाखल केली.

सुनील कुलकर्णी हे फायनान्शीयल कन्सल्टंट म्हणून काम करतात. २०११ मध्ये तेलनाडे यांचा हस्तक राहुल मांगलेकर हा कर्ज प्रकरण करण्यासाठी विनायक फुलारी याच्याकडे घेऊन गेला होता. त्यावेळी विनायकने कुलकर्णी यांच्या सिसनं १७२२६/४ व १७२२६/११ या मिळकतीच्या कागदपत्रांची झेरॉक्स काढून घेतली. परंतू कुलकर्णी यांनी मांगलेकर व फुलारी यांनी सुचविलेल्या खाजगी सावकार संजय व सुनील तेलनाडेकडून कर्ज घेण्याचा प्रस्ताव नाकारला होता. त्यामुळे कुलकर्णी यांच्या मिळकतीच्या झेरॉक्सच्या आधारे या मिळकतीचे खोटे संमतीपत्र व संचकारपत्र बनवून ती जागा हडप करण्याच्या उद्देशाने परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्याला कुलकर्णी यांनी विरोध करता त्यांच्यावर दिवाणी दावा दाखल केला. विनायक फुलारी, मधुकर फुलारी व इतरांनी संगनमताने कट रचून बनावट व खोटे दस्तऐवज बनवून मिळकत हडपणेबाबत पुरावे मिळाल्यानंतर कुलकर्णी यांनी उपरोक्त सर्वांविरोधात येथील न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. त्यानंतर फेब्रुवारी २०१९ पर्यंत संजय व सुनील तेलनाडे यांच्यासह वकील पवनकुमार उपाध्ये यांचेकडून कर्ज घेण्यास नकार दिल्याच्या रागातून मांगलेकर, विनायक फुलारी, मधुकर फुलारी अन्य चारजण खटला मागे घेण्यासह मिळकतीवर हक्क सोडावा तसेच जीवाची भीती घालून जागेतून बाहेर पडण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागत असल्याचे कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

तेलनाडे बंधूसह वकील फरार

मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यापासून एसटी सरकार गँगमधील नगरसेवक संजय व सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये फरारी आहेत. कायद्याचा आधार घेऊन मोका कारवाईवर न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images