Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वकिलाकडून पाच लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी नोकरीच्या कोर्ट कामकाजात मदत करण्याचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅड. अमोल आनंदराव पाटील ( साईलीला बंगलो, नेजदार पार्क, प्रिन्स शिवाजी शाळेजवळ, कसबा बावडा) याच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी उदय मानसिंगराव पोवार (वय ४४ रा. रमणमळा, दत्त मंदिरजवळ) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली. २३ सप्टेंबर, २०१८ पासून हा प्रकार घडला.

पोलिसांनी सांगितले की, अॅड. पाटील यांनी उदय पोवार यांना सरकारी नोकरीसाठी कोर्ट कामकाजात मदत करण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जमीन खरेदी करण्यासाठी २३ सप्टेंबर, २०१९ रोजी पाच लाख रुपये घेतले. त्यांचे नियनामुसार करारपत्रही करून दिले. मध्यवर्ती सरकारी इमारतीसमोरील नाथ फोटो स्टुडिओ अॅण्ड स्टोअर्स दुकानात ही रक्कम दिली. दरम्यान पोवार यांच्याकडून घेतलेली रक्कम काही दिवसांनी परत देण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले होते. फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी ३१ हजार रुपयांची रक्कम फिर्यादी उदय यांचे वडील मानसिंगराव पोवार यांच्या खात्यावर ऑनलाइन वर्ग केली. उर्वरित रक्कम काही दिवसांनी परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र आजअखेर ही रक्कम परत दिली नसल्याने त्यांनी पाटील याच्या विरोधात फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालोजीराजेंच्या भेटीनंतरआंदोलन स्थगित

$
0
0

सिद्धार्थनगर रहिवाशांनी प्रवेशद्वारासाठी गेल्या एक महिन्यापासून सुरू केलेले आंदोलन स्थगित केले. शनिवारी रात्री माजी आमदार मालोजीराजे यांची भेट घेऊन आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले. सायंकाळी मालोजीराजे यांनी कृती समितीला चर्चेसाठी बोलवून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. यावेळी शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू समाधीस्मारकाला सिद्धार्थनगर नागरिकांचा विरोध असल्याचा अपप्रचार केला जात आहे. मात्र समाधीस्थळाच्या नावाखाली प्रशासन नागरिकांच्या सुविधा हिरावून घेत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मालोजीरो यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर आंदोलन स्थगित करत असल्याचे कृती समितीने पत्रक प्रसिद्धीला दिले. पत्रकावर संजय माळी, देवदास बनकर, वसंत लिंगनूरकर, भारत रुईकर, स्वाती काळे, सीमा कांबळे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडाप्रकरणी दोन हजार वाहनांची तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर कुडित्रे (ता. करवीर) येथील यशवंत सहकारी बँकेच्या आपटेनगर रिंग रोडवरील शाखेवरील दरोडाप्रकरणी पोलिसांनी सुमारे दोन हजार वाहने आणि २५० संशयितांची चौकशी केली. आपटेनगर, कळंबा, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसह परिसरातील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. चार पथकांकडून या बँक लुटीचा तपास सुरू आहे. करवीरचे सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपटेनगर रिंगरोडवरील यशवंत बँकेच्या शाखेत गुरुवारी भरदुपारी तीन वाजता दोघा दरोडेखोरांनी लिपिकाला पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून पाऊण लाखाची रोकड लंपास केली. याप्रकरणी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजसह परिरातील दहा कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. यामध्ये या मार्गावरील दोन हजार वाहने तपासली आहेत. बँकेच्या आवारातील दोन कॅमेऱ्यात दोघेही मोपेडवरुन आल्याचे दिसत आहे. या मोपेडच्या क्रमांकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. चोरट्यांनी चेहरे रुमालाने बांधून डोक्याला हेल्मेट घातले आहे. फुटेजमधील त्यांच्या वर्णनानुसार संशयितांचा शोध सुरू केला आहे. टीप देऊन लूट झाल्याचा संशय असल्याने बँकेचे कर्मचारी, शाखाधिकाऱ्यांसह सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू आहे. दरोडेखोरांच्या शोधासाठी सांगली, सातारा आणि कर्नाटकात चार पथके रवाना झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूर डाळ १०० रुपये किलो, महागाईचा भडका!

$
0
0

कोल्हापूर: लोकसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा महागाईनं डोकंवर काढलं आहे. धान्य आणि कडधान्याच्या दरात या आठवड्यात वाढ झाली असून तुरडाळीचा प्रतिकिलो दर १०० रुपये झाल्याने ग्राहकाचा खिशाला चाट पडणार आहे. मागील दोन महिन्यांत डाळीच्या दरात प्रतिकिलो ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. मसूर, मूग आणि मटकी या कडधान्याबरोबर, शेंगदाणा, वरीच्या दरातही वाढ झाल्याने महागाईचे चटके जाणवू लागले आहेत.

मराठवाडा, विदर्भात दुष्काळ आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे धान्य व कडधान्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे गेले चार महिने सातत्याने दरवाढ होत आहे. तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो आठ रुपये वाढ झाली असून १०० रुपये दर झाला आहे. २०१५ मध्ये दुष्काळ पडल्याने तुरीचे उत्पन्न घटले होत. त्यावर्षी तुरडाळीचे दर गगनाला भिडले होते. प्रतिकिलो २२० रुपयांनी तूरडाळीची विक्री झाली. गरीबांसाठी सरकारला रेशनवर प्रतिकिलो १०० रुपयांने तूरडाळ विक्री करावी लागली. त्यावेळी केंद्र सरकारने डाळीचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले. सरकारच्या आवाहनला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी डाळीचे उत्पादन घेतले. २०१६ आणि २०१७ मध्ये तुरडाळीचे बंपर उत्पादन झाल्यावर दर घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळीचे पीक घेण्याकडे पाठ फिरवली. २०१८ मध्ये दुष्काळ व कमी पावसामुळे तूरडाळीचे उत्पादन घटले आहे. तसेच डाळीची परदेशात निर्यात होऊ लागली असल्याने दर वाढला आहे. गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीचा दर ६४ रुपयांवरुन १०० रुपयांवर पोचला आहे. मागील आठवड्यात हा दर प्रतिकिलो ९२ रुपये होता. मसूरडाळ आणि मूगाच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. मटकीच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. बंदरी मटकी ७० रुपयांवरुन प्रतिकिलो ८० रुपये तर जवारी मटकीच्या दर ११० रुपयांवरुन १२० रुपये झाला आहे. शेंगदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. भूईमुगच्या पेरणीसाठी शेंगदाण्याची मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. वरीच्या दरातही चार रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलो ८८ रुपयांवर ९२ रुपयांवर दर पोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ हजार ८६९ कोटी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यंदा १२ हजार ८६९ कोटी रुपये पतपुरवठा करण्यााचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात २४३० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरण करण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी १२१५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जूनअखेर खरीप पीक कर्जाचे वाटप करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्हास्तरीय बँकर्सची बैठक जिल्हाधिकारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वार्षिक पतपुरवठा आराखड्यात प्राथमिक क्षेत्रासाठी आठ हजार ४३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पतपुरवठा आराखड्यात १४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. शेतीमालाला चांगला दर मिळावा यासाठी शंभर टक्के शेतकरी बँकिंग व्यवस्थेखाली आणण्यात येणार आहे. शेतीसह त्याला लागणाऱ्या संलग्न सेवांसाठी चार हजार ११५ कोटी रुपये तरतूद केली आहे. गतवर्षी संलग्न सेवेसाठी तीन हजार ९३२ कोटी रुपयांची तरतूद केली होती. पीक कर्जासाठी दोन हजार ४३० कोटींची तरतूद करण्यात आली असून, खरीप व रब्बी हंगामासाठी प्रत्येकी एक हजार २१५ कोटींची तरतूद केली आहे.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर बी. किशोरकुमार, बँक ऑफ इं‍डियाचे डेप्युटी झोनल मॅनेजर मिथिलेश सिंग, युनियन बँकेच्या रिजनल मॅनेजर सुचित्रा नारकर, आयडीबीआय बँकेचे रिजनल मॅनेजर अमित वालिया, फेडरल बँकेचे रिजनल मॅनेजर अजित देशपांडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माने, डीआरडीएचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, सीडबीचे सहायक महाप्रबंधक व्ही. व्ही. आरप्रसाद, जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक सतीश शेळके, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

००००००

पतपुरवठ्यातील अन्य तरतुदी अशा...

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी : २९५४ कोटी तरतूद

प्राथमिक क्षेत्र : १,३७५ कोटी रुपये

पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या : २,२४,९६१

३१ मार्च २०१९ अखेर पीक कर्जवाटप : २२२८ कोटी २६ लाख रुपये

बचत गटांची संख्या : ५४ हजार

प्रधानमंत्री जनधन योजना एकूण खाती : ११ लाख ६३ हजार ५०३

ग्रामीण भागातील खात्यांची संख्या : ८ लाख नऊ हजार १५७

शहरी भागातील खाती : ३ लाख ५४ हजार ३४६

एकूण रुपे एटीएम कार्ड वाटप : १० लाख ५८ हजार ७८८

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरावर पाणीकपातीचे सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मान्सून पावसाने ओढ दिलेली असतानाच जिल्ह्यातील धरणसाठ्यामध्ये प्रचंड घट होऊ लागली आहे. धरणातील पाणीपातळी कमी होऊ लागल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. पावसाची प्रतीक्षा वाढत असताना आणि धरणसाठा कमी होत असताना शहरात अद्यापही पाण्याचा अपव्यव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने पुढील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली आहे.

भारतीय हवामान खात्याने यावर्षी मान्सून पाऊस ९६ टक्के पडेल अशी शक्यता वर्तवली असली, तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. हवामान खात्याने एक जून रोजी पावसाचे आगमन होईल असा अंदाज वर्तवला. पण, नंतर त्यामध्ये बदल करून मान्सूनची प्रतीक्षा १८ जूनपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली आहे. राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी यांसह अन्य प्रमुख धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आल्याने लोंकाच्या तोंडचे पाणी पळू लागले आहे. परिणामी पाणीदार जिल्ह्यावर टंचाईचे सावट घोंगावू लागले आहे.

पंचगंगा, भोगावती नदीची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल अशी शक्यता आहे. एकीकडे पाणीटंचाईचे सावट गडद होत असताना शहरात मात्र पाण्याची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी सुरू आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीच्या मोठ्या गळती काढून वाया जाणाऱ्या पाण्याची बचत केली असली तरी शहरवासियांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग सुरू आहे. प्रशासनाने मात्र पाऊस लांबण्याची शक्यता वर्तवल्यानंतर तातडीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त डॉ. कलशेट्टी स्वत: पाणीपुरवठा विभागाशी दररोज संपर्क साधून शिंगणापूर बंधाऱ्यातील पाणीपातळीचा आढावा घेत आहेत. शहराला लागणारा पाणीपुरवठा आणि उपसा याचा लेखाजोखा मांडला जात आहे. पावसाने ओढ दिली तर तातडीच्या उपाययोजना करण्याचे नियोजनही केले आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

वळीवाच्या गैरहजेरीने संकट

दरवर्षी चैत्र यात्रेनंतर वळीव पाऊस हमखास पडतो. यावर्षी मात्र एकदा झालेली गारपीट वगळता जिल्ह्यात वळीव पावसाने हजेरीच लावलेली नाही. परिणामी शेतीला लागणाऱ्या पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, त्यासाठी पाटबंधारे विभागाने आवर्तने कमी केली. तरीही नागरिकांच्या मानसिकेतमध्ये बदल झालेला नसून पाण्याची नासाडी मोठ्याप्रमाणात केली जाते.

कोट

मान्सूनने ओढ दिली असल्याने पाणीपुरवठा विभाग दररोज पाटबंधारे विभागाशी दररोज समन्वय साधत आहे. बंधाऱ्यात पाणी भरपूर असले, तरी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. संभाव्य टंचाई लक्षात घेवून आठवड्यात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात येणार आहे.

- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, महानगरपालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधिस्थळी सीसीटीव्हीचा वॉच

$
0
0

फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नर्सरी बागेतील लोकराजा राजर्षी शाहू समाधिस्थळ संरक्षक भिंतीच्या कामाला शनिवारी वादावादीनंतर पोलिस बंदोबस्तात सुरुवात झाल्यानंतर रविवारी येथे पोलिस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या परिसरात अग्निशमन दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहे. शनिवारी रात्री संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून रविवारी अतंर्गत सुशोभिकरणाच्या कामाने गती घेतली.

गेल्या चार वर्षांपासून नर्सरी बागेतील लोकराजा राजर्षी शाहू समाधिस्थळाचे सुशोभिकरण सुरू आहे. मोठ्या चौथऱ्यावर मेघडंबरी बसवून अतंर्गत कामासह संरक्षक भिंतीच्या कामाला फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात झाली. २६ जूनपर्यंत लोकार्पण करण्याच्या तयारीत असलेल्या महापालिका प्रशासनाला सिद्धार्थनगरवासियांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.

सिद्धार्थनगरकडील बाजूला प्रवेशद्वार ठेवण्याच्या मागणीवरुन पाच मेपासून येथील कृती समितीने काम बंद पाडले. महापालिका प्रशासनाने दोनवेळा बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये अपयश आले. शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीत तोडगा निघाला. त्यानुसार शनिवारी महापालिकेचे पदाधिकारी भिंतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी गेले असता, त्याला पुन्हा कृती समितीने विरोध केला. परिणामी वाद उफाळून आला. यावेळी धक्काबुक्कीही झाली. शाहूप्रेमी आणि कृती समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याहीवेळी वादाची ठिणगी पडण्याची शक्यता होती. मात्र कृती समितीचा विरोध झुगारुन भिंतीच्या कामाला सुरुवात करण्यावर महापालिका पदाधिकारी ठाम राहिले. परिणामी पोलिस बंदोबस्तात भिंतीच्या कामाला सुरुवात झाली. तरीही वातावरण तणावपूर्ण होते. शनिवारी रात्री कृती समितीने आंदोलन स्थगित करत असल्याचे प्रसिद्ध पत्रक दिले. पण प्रशासनाने समाधिस्थळाच्या संरक्षणासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाकडे १५ दिवस पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली. तसेच रात्री उशिरा येथे सुरक्षततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला.

\Bकामांना आला वेग\B

रविवारी सकाळी स्मारक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलवर तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. कॅमेऱ्यातील फुटेज पाहण्यासाठी तात्पुरते शेड उभे केले असून येथे कायमस्वरुपी केबिन उभारण्यात येणार आहे. या कॅमेऱ्याद्वारे समाधिस्थळातील सर्व हालचालींवर नजर राहणार आहे. महापालिकेने केलेल्या मागणीनुसार पोलिस प्रशासनाने पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला असून अग्निशमन दलाचे जवानही परिसरात तैनात आहेत. रविवारी सुटी असूनही अंतर्गत काम सुरू होते. २६ जून रोजी साजरी होणाऱ्या राजर्षी शाहू जयंतीनिमित्त लोकार्पण सोहळा करण्याच्या तयारी प्रशासन असल्याने अतंर्गत कामाने चांगलाच वेग घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करिअरची मोठी क्षितिजे उपलब्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देश-विदेशात करिअरची मोठी क्षितिजे उपलब्ध आहेत. प्रशासकीय सेवा, मेडिकल, इंजिनीअरिंग, एमबीए अशा क्षेत्रांत विपुल संधी आहेत. शिवाय जर्मनी, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांत मनुष्यबळ कमी असल्याने हुशार आणि कल्पक तरुणांना परदेशातील करिअर साद घालत आहे. विद्यार्थ्यांनी योग्य वयातच करिअर निश्चित करून नियमित अभ्यास, नावीन्याची ओढ आणि कष्टाची तयारी ठेवल्यास जीवनात नक्कीच यशाचे शिखर गाठता येईल,' अशा शब्दांत तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत नाव कमाविण्याविषयी स्फुल्लिंग चेतविले. 'महाराष्ट्र टाइम्स'व 'टाइम्स ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मटा एज्युफेस्ट'मधील सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांतील करिअरविषयी मौलिक मार्गदर्शन लाभले.

००००००

जर्मनीत मोफत शिक्षणासह

करिअरच्या विपुल संधी

कोल्हापूर : 'अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी जर्मनीतील वातावरण पोषक आहे. जर्मनी क्षेत्रफळाने भारतापेक्षा नऊपटींनी छोटा आहे, तर लोकसंख्या महाराष्ट्राइतकी आहे. तंत्रज्ञानाने प्रगत आणि भक्कम आर्थिक व्यवस्था ही जर्मनीची वैशिष्ट्ये आहेत. मात्र, तेथे मनुष्यबळाची कमतरता असल्याने इंजिनीअरिंग क्षेत्रात तेथे उत्तम करिअर घडू शकते,' असे मत मोक्ष अॅकॅडमीचे जयंत पाटील यांनी केले.

'जर्मनीतील मोफत अभियांत्रिक शिक्षण' या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोक्ष अॅकॅडमीतर्फे जर्मनीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन केले जाते. यावेळी त्यांनी भारत आणि जर्मनीतील शिक्षण पद्धतीतील फरकही समजावून सांगितला. एवन, एटू, स्टुडंट कॉलिंग, बीएन, बीटू अशा वेगवेगळ्या संकल्पना मांडत त्यांनी जर्मनीत शिकण्याच्या संधी उलगडून सांगितल्या.

पाटील म्हणाले, 'जर्मनीत ८० टक्के शिक्षणव्यवस्था सार्वजनिक क्षेत्राखाली आहे. सरकारने, 'मोफत शिक्षण' संकल्पनेला चालना दिली आहे. याठिकाणी तेरावीनंतर पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात होते. त्यांच्या सर्व पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षांचा आहे. महत्त्वाचे म्हणजे, जर्मन सरकार इंडस्ट्रीज व मार्केटचा विचार करून अभ्यासक्रमाची निर्मिती करते. दर दोन वर्षांनी अभ्यासक्रमात सुधारणा केल्या जातात. जर्मनीतील ६५ टक्के भाग सीनिअर सिटीझन्सचा आहे. यामुळे मनुष्यबळाची कमरतता जाणवत आहे. जर्मन भाषेतील अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना नोकरीत प्राधान्यक्रम दिले जाते. गेल्या काही वर्षात त्यांनी इंग्रजीचा स्वीकार केला आहे. सार्वजनिक क्षेत्राखाली शिक्षण व्यवस्था असल्यामुळे माफक शुल्कात शिक्षण घेता येते. शिक्षण घेताना 'वीकेंड जॉब' करण्याला परवानगी आहे. यामुळे विद्यार्थी सुट्टीच्या कालावधीत अर्धवेळ काम करून उच्च शिक्षणाचा खर्च करू शकतात.' दरम्यान, प्रा. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टर-रुग्णांत विश्वासार्हता गरजेची

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून रुग्णाचा जीव वाचला की नातेवाईक डॉक्टरांना देव मानतात. रुग्ण दगावला की नातेवाईक त्याच हॉस्पिटलसह डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला करतात. हा विरोधाभास असून डॉक्टर आणि रुग्णांत एकमेकांविषयी विश्वासार्हता असणे गरजेचे आहे' असे मत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी व्यक्त केले. प्रायव्हेट हॉस्पिटल व नर्सिग होम असोसिएशन, जिल्हा पोलिस दलातर्फे रविवारी रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. व्ही. ए. भोसले होते. 'हॉस्पिटलवरील हल्ले, वास्तव्य आणि ते रोखण्यासाठी प्रयत्न' या विषयावर चर्चासत्र झाले.

उद्घाटनप्रसंगी महानिरीक्षक डॉ. वारके म्हणाले, 'कोल्हापूर शहर मेडिकल हब बनत आहे. अनेक प्रकाराच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कोल्हापुरात होत आहेत. देशभरातून आणि परदेशांतून रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत आहे. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्याही वाढले. त्यासह वैद्यकीय व्यवसायात रुग्ण आणि डॉक्टरांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रुग्ण गंभीर असतानाही रुग्णांच्या नातेवाईक वस्तुस्थिती समाजवून न घेता डॉक्टरांकडून अवास्तव अपेक्षा करतात. अनेकदा वैद्यकीय खर्चाच्या कारणावरुन आणि उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करुन रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलवर हल्ला करतात. हे हल्ले रोखण्यासाठी समाजाने बदलण्याची गरज आहे. डॉक्टर आणि रुग्णातील संवाद हा विश्वासार्ह असल्यास वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत.'

जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, 'डॉक्टर आणि हॉस्पिटल्सना संरक्षण देणाऱ्या नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. डॉक्टरांना काहीवेळा गुंडांकडून खंडणीसाठी येणाऱ्या धमक्या, रुग्णांनी हॉस्पिटल्सच्या केलेल्या नुकसानाची माहिती पोलिसांना दिल्यास संबधितांवर कायद्यानुसार कारवाई केली जाते. डॉक्टर आणि रुग्णांत चांगला संवाद निर्माण होण्यासाठी कार्यशाळा घेण्याची गरज आहे. हॉस्पिटलवरील हल्ला करण्यापूर्वीच व्यवस्थापनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्यास संभाव्य धोका टळू शकतो.'

कायदेशीर सल्लागार डॉ. संतोष काकडे यांनी हॉस्पिटलवर होणारे हल्ले आणि कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक विजय जाधव होते. यावेळी डॉ. काकडे म्हणाले, 'डॉक्टरांवरील हल्ले थांबण्यासाठी समाजही बदलायला हवा. वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थापन आणि सामाजिक विचारांच्या अभ्यासाचा समावेश हवा. प्राथमिक, द्वितीय स्तरावरील आरोग्यव्यवस्था नीट करुन पेशंटच्या गर्दीचे व्यवस्थापन, तसेच रुग्णांसोबत वरिष्ठ डॉक्टरांवर जबाबदारी आणि लोकशिक्षण या चार उपायांनी डॉक्टरांवरील हल्ले निश्चित कमी होतील. डॉक्टर, रुग्ण आणि हॉस्टिपटलासाठी असलेले विविध कायदे आहे. या कायद्यांची माहिती तिन्ही घटकांनी घेण्याची गरज आहे.'

वैद्यकीय व्यवस्थापनाने रुग्ण दाखल झाल्यापासूनच कागदपत्रे ते कायदेशीर प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली. चर्चासत्रात डॉ. राजेंद्र अभ्यंकर, डॉ. निरंजन शहा, डॉ. मुरलीधर वरंजेकर, डॉ. अजित लोकरे, सिव्हील सर्जन डॉ. डॉ. बी. सी. केम्पीपाटील आदी सहभागी झाले. असोसिएशनचे डॉ. चारुहास भागवत, डॉ. संजीव कडू, डॉ. राजेश पाटील, डॉ. सुशील श्रेष्ठी, डॉ. सुहास बडवे, डॉ. भारती अभ्यंकर, डॉ. सुजाता प्रभू, डॉ. भरत कोटकर, डॉ. राजेंद्र अभ्यंकर आदींनी संयोजन केले. असोसिएशचे सेक्रेटरी डॉ. वैभव मुधाळे यांनी आभार मानले.

तत्काळ सेवा योजना

सेवानिवृत्त पोलिस कल्याण संघटनेचे सुरेश कमलाकर म्हणाले, 'सेवानिवृत्त पोलिस संघटनेकडून पुणे येथे 'तत्काळ सेवा योजना' सुरू केली आहे. हॉस्पिटलच्या जवळच्या परिसरात राहणारे सेवानिवृत्त संघटनेच्या एका ग्रुपकडून हॉस्पिटलला संरक्षण दिले जाते. हल्ला झाल्यास खासगी सुरक्षारक्षकांना गर्दी हाताळण्याचे पुरेसे प्रशिक्षण नसते. त्यामुळे अनेकदा जमावाने हल्ला केला की ते बिथरतात आणि मागे राहतात. अनेकदा जमाव राजकीय पक्षाशी निगडीत असतो. त्यामुळे सुरक्षारक्षक घाबरतात. सेवानिवृत्त संघटनेतर्फे हा एक चांगला उपक्रम सुरू आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरडाळ १०० रुपये किलो

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

धान्य आणि कडधान्याच्या दरात या आठवड्यात वाढ झाली असून तुरडाळीचा प्रतिकिलो दर १०० रुपये झाल्याने ग्राहकाचा खिशाला चाट पडणार आहे. मागील दोन महिन्यांत डाळीच्या दरात प्रतिकिलो ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. मसूर, मूग आणि मटकी या कडधान्याबरोबर, शेंगदाणा, वरीच्या दरातही वाढ झाल्याने महागाईचे चटके जाणवू लागले आहेत.

मराठवाडा, विदर्भात दुष्काळ आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे धान्य व कडधान्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे गेले चार महिने सातत्याने दरवाढ होत आहे. तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो आठ रुपये वाढ झाली असून १०० रुपये दर झाला आहे. २०१५ मध्ये दुष्काळ पडल्याने तुरीचे उत्पन्न घटले होत. त्यावर्षी तुरडाळीचे दर गगनाला भिडले होते. प्रतिकिलो २२० रुपयांनी तूरडाळीची विक्री झाली. गरीबांसाठी सरकारला रेशनवर प्रतिकिलो १०० रुपयांने तूरडाळ विक्री करावी लागली. त्यावेळी केंद्र सरकारने डाळीचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले. सरकारच्या आवाहनला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी डाळीचे उत्पादन घेतले. २०१६ आणि २०१७ मध्ये तुरडाळीचे बंपर उत्पादन झाल्यावर दर घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळीचे पीक घेण्याकडे पाठ फिरवली. २०१८ मध्ये दुष्काळ व कमी पावसामुळे तूरडाळीचे उत्पादन घटले आहे. तसेच डाळीची परदेशात निर्यात होऊ लागली असल्याने दर वाढला आहे. गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीचा दर ६४ रुपयांवरुन १०० रुपयांवर पोचला आहे. मागील आठवड्यात हा दर प्रतिकिलो ९२ रुपये होता. मसूरडाळ आणि मूगाच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. मटकीच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. बंदरी मटकी ७० रुपयांवरुन प्रतिकिलो ८० रुपये तर जवारी मटकीच्या दर ११० रुपयांवरुन १२० रुपये झाला आहे.

शेंगदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. भूईमुगच्या पेरणीसाठी शेंगदाण्याची मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. वरीच्या दरातही चार रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलो ८८ रुपयांवर ९२ रुपयांवर दर पोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुलावर विद्युत व्यवस्थेची गरज

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पंचगंगा नदीवरील नवीन पर्यायी खुला झाल्यानंतर त्यावरून शनिवारी दिवसभर, रविवारीही वाहतूक सुरू राहिली. पण पुलावर विद्युत व्यवस्था नसल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेने विद्युत व्यवस्था उपलब्ध करावी, अशी सूचना प्रशासनाकडून केली असली तरी दिवसभर त्याची पूर्तता झाली नव्हती.

पूलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी पूल खूला केला. त्यानंतर शिवाजी पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. शनिवारीही शिवाजी पूल वाहतूकीस बंद ठेवण्यात आला होता. नवीन पूल पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी येथे गर्दी केली. नवीन पुलावरुन वाहने चालवण्यास तरुणाई उत्सुक होती. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी शिवाजी पूल परिसरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे तर पूलाच्या दुसऱ्या बाजूला करवीर पोलिस वाहतूकीचे नियोजन करत होते. पुलावरुन वाहतूक सुरू झाली असली तरी विद्युत व्यवस्था झाली नसल्याने रात्रीच्यावेळी अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे पूलाची देखभाल असल्याने त्यांच्याकडून विद्युत व्यवस्था व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. पुलावरुन शहरात वाहने प्रवेश करत असल्याने महानगरपालिकेनेही विद्युत व्यवस्था करावी यासाठी प्रशासनाने सूचना केली आहे. ठेकेदाराकडून क्रश बॅरिअर उभारण्यात येणार आहेत. आंबेवाडीच्या बाजूने रस्त्याकडेला दगड लावण्यात आले आहेत. मुरुम टाकण्यात आला आहे. रेलिंग उभारण्यााचे काम सुरू असून रंगकाम दोन दिवसांत केले जाणार आहे.

दरम्यान पूल वाहतूकीस खुला करण्यापूर्वी उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे, असा वाद निर्माण झाला होता. पण प्रशासनाने उद्घाटन न करता पूल वाहतूकीस खुला केल्याने या वादातील हवा निघून गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० डंपर गाळ व कचरा संकलित

$
0
0

फोटो आहेत

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्यावतीने रविवारी राबवलेल्या महास्वच्छता अभियानाला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रभागनिहाय केलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये २० डंपर गाळ व कचरा काढून टाकण्यात आला. स्वच्छता मोहिमेमध्ये दिव्यांग बांधवांचा सहभाग लक्षणीय होता. करवीर पंचायत समिती कार्यालय येथे महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते मोहिमेस प्रारंभ झाला.

मे महिन्याच्या पहिल्या रविवारपासून श्रमदानातून शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. उद्याने आणि नाला स्वच्छतेला प्राधान्य दिलेल्या मोहिमेमध्ये दिवसेंदिवस शहरवासियांचा सहभाग वाढत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेच्या सर्वच प्रभागात स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्धार प्रशासनाने केला होता. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करुन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली होती. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोहिमेवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. विविध संस्था, युवक मंडळे व सामाजिक संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन लेखी पत्राद्वारे केले होते.

त्यानुसार सकाळी साडेसहा वाजता स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. पंचायत समिती कार्यालय परिसरात राबवलेल्या मोहिमेमध्ये दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंप हाऊस ते सिद्धार्थनगर जयंती नाल्याच्या परिसराची स्वच्छता केली. त्याचप्रमाणे मनोरा हॉटेल, हॉकी स्टेडियम ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, एन. टी. सरनाईक कॉलनी, मैलखड्डा, लक्ष्मीपुरी आदींसह रंकाळा परिसर, फूटपाथ, उद्याने स्वच्छ करण्यात आली. नागरिक कुदळ, फावडे व पाटी घेऊन सहभागी झाले होते. सर्किट हाऊस परिसर, लाइन बझार परिसर, भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, क्रांतीसिंह नानापाटील नगर, बुद्धगार्डन यासह सर्वच प्रभागात स्वच्छता करण्यात आली. सकाळी साडेसहा ते १० वाजेपर्यंत ठिकठिकाणच्या भागात नागरिक स्वच्छता करताना दिसत होते. नागरिकांसोबत आजी-माजी नगरसेवकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. ठिकठिकाणच्या नाल्यातील आठ जेसीबीच्या मदतीने गाळ व कचरा काढून टाकण्यात आला. काढून टाकलेला गाळ व कचरा वाहतूक करण्यासाठी १५ डंपरची व्यवस्था प्रशासनाने केली होती.

विविध संघटना सहभागी

महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह सेवा निवृत्त पोलिस उपअधीक्षक मदन चव्हाण, अनंत खासबागदार, उदय गायकवाड, दिलीप देसाई, कॉ. दिलीप पोवार, निवास साळोखे, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, क्रिडाई, स्वरा फाउंडेशन आदी संस्था व युवक मंडळे सहभागी झाले होते. संपूर्ण स्वच्छता मोहिम अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डी. आर. मोरे यांचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार प्राचार्य डी. आर. मोरे यांनी शनिवारी राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून मोरे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत तक्रारी करण्यात आल्या होत्या. तरीही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मोरे यांची निवड कायम ठेवली होती. शनिवारी मोरे यांनी वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला.

विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता वाढ व अन्य शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळावी यासाठी शैक्षणिक सल्लागार पदाची निर्मिती केली होती. मात्र या पदावरून विद्यापीठात उलटसुलट चर्चा सुरू होती. प्राचार्य मोरे यांच्या नियुक्तीवरून विद्यापीठाच्या अधिसभेतही प्रश्न उपस्थित झाला होता. विद्यापीठ विकास आघाडी व सुटा सदस्यांत यावरून मतभेद निर्माण झाले होते. शैक्षणिक सल्लागारपदाची नेमणूक करताना नियमांना बगल दिल्याचा आक्षेप 'सुटा'ने नोंदविला होता. या पदासाठी रीतसर जाहिराती दिल्या नाहीत. मुलाखत प्रक्रिया पार पडली नाही अशी तक्रारही त्यांनी नोंदविली होती. दरम्यान 'सुटा'चा हा आक्षेप विद्यापीठ विकास आघाडीला मान्य नव्हता. आघाडीच्या सदस्यांनी, 'मुंबई विद्यापीठात मोठ्या संख्येने शैक्षणिक सल्लागारांची नेमणूक केली आहे. कुलगुरूंना शैक्षणिक सल्लागार नेमण्याचे अधिकार आहेत. विद्यापीठात आणखी २० शैक्षणिक सल्लागार नेमावेत, अशी भूमिका घेत नियुक्तीला पाठिंबा दर्शविला होता.

दरम्यान विद्यापीठातील गैरकाभाराविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहेत. 'सुटा'संघटनेने कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यावरही आरोप केले होते. तसेच याप्रश्नी कुलपतींना भेटून कारवाईची मागणी केली. विद्यापीठाशी निगडीत विविध तक्रारीसंदर्भात महिनाभरात काही निर्णय घेऊ, अशी ग्वाही प्रशासनाने 'सुटा'ला दिली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर मोरे यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

०००

प्राचार्य डी. आर. मोरे यांनी शैक्षणिक सल्लागार पदाचा शनिवारी राजीनामा दिला आहे. तो मंजूर केला आहे. नवीन शैक्षणिक सल्लागार नेमणुकीबाबतचे अधिकार व्यवस्थापन परिषदेला आहेत.

डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सम्मेद, अनीश यांचीबुद्धिबळपटूंशी लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनीश गांधी यांनी एकाच वेळी अनेक बुद्धिबळपटूंशी लढत दिली. शिवाजी स्टेडियम येथे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या कार्यालयात झालेल्या प्रेक्षणीय लढतीत सम्मेदने ३२, तर अनीशने ३० खेळाडूंशी दिलेली लढत नेत्रदीपक ठरली.

सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या पहिल्या सत्रात अनीश ३० बुद्धिबळपटूंविरुद्ध स्वतंत्र पटावर लढला. ३० पैकी पाचजण आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त खेळाडू होते. पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळणाऱ्या अनीशने सुरुवातीस सावध व आक्रमक चाली रचत प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकला. तोडीस तोड खेळ करत सर्व प्रतिस्पर्ध्यांनीही अनीशला थोडे आव्हान देण्याचा प्रयत्न केला, परंतु डावाच्या मध्यपर्वात अनीशने कल्पक चाली रचत प्रतिस्पर्ध्यांना गोंधळात टाकले. दुपारी दोनपर्यंत सर्वही ३० प्रतिस्पर्ध्यांना साडेतीन तासांत त्याने पराभूत केले. ३० पैकी दोघांनी लक्षवेधी लढत दिली. आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त जयदीप कोळीने अनीशला चांगलेच झुंजविले. पटावर चांगली स्थिती असणाऱ्या अनीशने केलेल्या चुकीच्या चालींचा फायदा उठवत जयदीपने डावाच्या अंतिम पर्वात मजबूत स्थिती प्राप्त केली, परंतु वेळेच्या बंधनात सापडलेल्या जयदीपला अनीशने पराभूत केले.

दोन वाजता सुरू झालेल्या दुसऱ्या सत्रात सम्मेदविरुद्ध ३२ प्रतिस्पर्ध्यांनी भाग घेतला. यापैकी १५ बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त होते. पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळणाऱ्या सम्मेदने सुरुवातीपासून आक्रमक व जलद चाली रचत प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच जखडून ठेवण्यात यश मिळविले.

नंतर त्याने पटावर गुंता करून प्रतिस्पर्ध्यांना बुचकळ्यात टाकून मात करण्यास सुरुवात केली. तीन तासांत २४ प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यावर शेवटी उरलेल्या आठ प्रतिस्पर्ध्यांनी अतिजलद पद्धतीने खेळविण्यात आले. तुषार शर्मा, आदित्य सावळकर, शर्विल पाटील, अथर्व चव्हाण, प्रणव पाटील यांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत सम्मेदशी झुंज दिली. परंतु अनुभवी सम्मेदने सर्वांना पराभूत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक हटाव चळवळ गतिमान करण्याचा निर्धार

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेदरम्यान प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आता प्लास्टिक हटाव चळवळ सुरू करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्हा आणि शहर टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातील बैठकीच्या अध्यक्षस्थानी निमंत्रक निवास साळोखे होते.

टोलविरोधी आंदोलनाला सुरुवात करताना जनजागृतीसाठी डिजिटल फलक मिरजकर तिकटी येथे उभारण्यात आला. जनजागृतीमुळे टोलविरोधी आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात आली. त्याचप्रमाणे शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी तेवढ्याच मोठ्या फलकातून जनजागृती करण्यात येणार आहे. प्लास्टिकमुक्तीबरोबर पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न करण्यात येतील. मिरजकर तिकटी येथे फलक उभारल्यानंतर त्याचदिवशी शहरात काढण्यात येणाऱ्या जनजागृती रॅलीची तारीख निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीस माजी नगरसेवक बाबा पार्टे, प्रसाद जाधव, संभाजीराव जगदाळे, अनिल घाटगे, जयकुमार शिंदे, अशोक भंडारी, राजू जाधव, संतोष माळी, अनिल कदम, किशोर घाटगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराणा प्रताप यांना अभिवादन

$
0
0

कोल्हापूर : महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महावीर उद्यान येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळयाला महापौर सरीता मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सभागृह नेता दिलीप पोवार, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग राजपूत, वसंतराव मुळीक, अमरसिंग राजपूत, जयराजसिंह राजपूत, अनिलसिंग राजपूत, जीवनसिंग राजपूत, प्रेमसिंग राजपूत, प्रतापसिंग रजपूत, बाळसिंह रजपूत, दिलीपसिंग राजपूत, राजपूत युवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकल्याण येथे शिबिर

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना-बालकल्याण संकुल येथे जीवन आशय बाल युवा केंद्राच्यावतीने उन्हाळी शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात विविध प्रकारचे खेळ, हस्तकला, क्राफ्ट आणि मातीची भांडी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती शिबिरार्थींना देण्यात आली. शिबिराचा समोरावेळी मुलांनी मनोगत व्यक्त केले. लखन जाधव प्रमुख उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले, अधीक्षिका अश्विनी गुजर, द्रौपदी पाटील, तुकाराम कदम आदी उपस्थित होते. राजेश शिंगरे यांनी आभार मानले.

.. .. . . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्ण

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या आपदा मित्र या कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील ४३ आपत्ती व्यवस्थापकांच्या चौथ्या तुकडीला प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांतील युवकांना आपत्ती व्यवस्थापन विषयांमध्ये तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत या सर्व युवकांना पूर व्यवस्थापन कसे करायचे, अपघातात अडकलेल्या लोकांना कसे सोडवायचे, प्रथमोपचार कसे द्यायचे, बोट कशी चालवायची, तराफा कसा चालवायचा आदींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचा समारोप जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी झाला. या कार्यक्रमात सर्व युवकांनी प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या उपस्थितीत सर्व युवकांना प्रशस्तिपत्र आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये मदतीला येऊ शकेल, अशा साधनांचे कीट वाटप करण्यात आली.

जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली हा 'आपला मित्र' कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यात येत आहे.

00 00 00

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नवीन शैक्षणिक धोरणाचे मंथन व्हावे’

$
0
0

कोल्हापूर : 'कस्तुरीरंगन समितीने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारला सादर केला आहे. या धोरणानुसार देशाची भावी पिढी घडणार आहे. धोरणातील चांगल्या गोष्टीचे स्वागत झाले पाहिजे. पण, त्रुटी असतील त्यावर चर्चा झाली पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी नगरीत नवीन शैक्षणिक धोरणाचे मंथन शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी करावे,' असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

रिपब्लिकन सोशल फाउंडेशनच्यावतीने निवृत्त शिक्षक संजय जिरगे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. आमदार पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन संजय जिरगे व त्यांच्या पत्नी छाया जिरगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. हरिष भालेराव, अच्युत माने, प्रा. शहाजी कांबळे प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, 'नव्या शैक्षणिक धोरणावर सूचना देण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे. यापूर्वी जाहीर झालेले शैक्षणिक धोरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर आधारित असलेले आणि सर्व जातीधर्मांना सामावून घेणारे धोरण होते. नवीन शैक्षणिक धोरणात चांगल्या गोष्टी असतीलही. या धोरणावर पुढील पिढी देशाच्या विकासात योगदान देणार आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणाचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. पण चुकीच्या गोष्टी असतील तर त्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. त्यासाठी शैक्षणिक धोरणाचे विचारमंथन होण्याची गरज आहे.'

सत्काराला उत्तर देताना संजय जिरगे यांनी निवृत्तीनंतर सामाजिक प्रश्नांवरील चळवळीवर भर देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'नामांतर चळवळीत झोकून दिल्यानंतर कोल्हापूर शहराने सामाजिक कार्याची प्रेरणा दिली. शिक्षणाचे पवित्र काम करताना चळवळीचे कामही केले. कुटुंबातील सदस्यांच्या प्रोत्साहनामुळे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात काम करु शकलो.'

डॉ. भालेराव आणि अच्युत माने यांनी 'आंबेडकर चळवळ वर्तमान वाटचाल आणि दिशा' या विषयावर मते व्यक्त केली. यावेळी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. विश्वास देशमुख, दगडू भास्कर, बबनराव रानगे, भगवान काटे उपस्थित होते. अनंत मांडूळकर, स्नेहल जिरगे, स्मिता जिरगे यांनी मनोगत व्यक्त केले. अविनाश अंबपकर यांनी स्वागत केले तर रुपा वायदंडे यांनी प्रास्ताविक केले.

.. .. . ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयात जिल्हा बँकेची मोठी मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळापासून अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे मोठे योगदान आहे', असे प्रतिपादन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केले. जिल्हा बँकेच्यावतीने अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंडलिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

मंडलिक म्हणाले, 'जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची मुख्य वाहिनी आहे. मला मात्र या बँकेने संचालक झाल्यानंतर खासदार केले. बँकेने शेतकऱ्यांसाठी अपात्र कर्जमाफीची लढलेली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर बँकेच्या विकासासाठी योगदान देऊ.'

यावेळी पी. जी. शिंदे, आर. के. पोवार, विलासराव गाताडे, राजेश पाटील, अनिल पाटील, भैय्या माने, राजू आवळे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, असिफ फरास आदी प्रमुख उपस्थित होते.

मुश्रीफ मोदींच्याही पुढेच...

खासदार मंडलिकांनी मुश्रीफांचे कौतुक केले. ते म्हणाले, 'प्रशासकांची कारकीर्द संपून चार वर्षांपूर्वी आमचे संचालक मंडळ सत्ताधारी झाले. त्यावेळी सर्वच पातळ्यांवर बँक अडचणीत आली होती. मुश्रीफांनी गटातटाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तळमळीने काम करण्याचे आवाहन संचालक मंडळाला केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षे सर्वच संचालक मंडळ निरपेक्षपणे आणि निष्पक्षपातीपणे बँकेच्या विकासासाठी एकदिलाने झटत आहे. त्यामुळेच बँक प्रगतीपथावर आल्याचे दिसते. 'सबका साथ, सबका विकास,' या भावनेने काम करण्यात मुश्रीफ हे पंतप्रधान मोदींच्याही काकणभर पुढेच आहेत.'

० ० ०० ०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images