Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हॉटेल कर्मचाऱ्यांना सापडली चेन केली परत

$
0
0

कोल्हापूर : येथील जलसंपदा विभागाचे कर्मचारी शेखर गरगटे कुटुंबीयांसह अंबाबाई दर्शन करून अल्पोपहारासाठी एका हॉटेलात थांबले, त्यानंतर घरी गेल्यानंतर तीन तोळ्यांची सोन्याची चेन गायब असल्याचे लक्षात आले. पुन्हा हॉटेलमध्ये जावून चौकशी केली असता तेथील वेटर आणि व्यवस्थापकाने त्यांची चेन ओळख पटवून परत केली. अमोल पाटील (रा. करंगफेन) आणि व्यवस्थापक एकनाथ पालेकर (रा. कदमवाडी) यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अनेकांनी कौतुक केले.

गरगटे पत्नीसह शासकीय कामानिमित्त जिल्हा परिषद व पंचायत समितीत आले होते. कामे आटपून अंबाबाई दर्शनाचा बेत आखून हे दाम्पत्य भवानी मडपाकडे रवाना झाले. अंबाबाई चे दर्शन घेऊन घाटी दरवाजा येथील हॉटेल शामसुंदर मध्ये अल्पोउपहार करण्यासाठी थांबले. दरम्यान दर्शन घेऊन ते आपल्या घरी परतले. घरी पोहोचल्यानंतर आपल्या गळ्यातील तीन तोळ्याची चेन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले, कष्टाने कमावलेली वस्तू गमावल्याचे दुःख झाले. सकाळी प्रयत्नांचा भाग म्हणून हे पती-पत्नी अल्पोउपहारासाठी थांबलेल्या हॉटेल शामसुंदर येथे प्राथमिक चौकशी केली असता हॉटेल व्यवस्थापनाने व्यक्ती तीच असल्याची खात्री करून क्षणाचाही विलंब ना लावता तीन तोळ्याची चेन परत केली. गरगटे दाम्पत्यांने या प्रामाणिकपणाबद्दल देऊ केलेले बक्षीसही अमोल पाटील आणि एकनाथ पालेकर (रा. कदमवाडी) यांनी नम्रपणे नाकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ग्रुप क्वॉलिफाय’साठी विद्यार्थ्यांची धावाधाव

$
0
0

फोटो आहे..

............

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

सायन्स विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यातील बदल, भाषा विषयासाठी कृतीपत्रिकेचा वापर या बदलाचा बारावीच्या टक्केवारी परिणाम झाला आहे. विशेषत: विज्ञान शाखेतील असंख्य विद्यार्थ्यांना 'पीसीबी'(फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी) आणि 'पीसीएम'(फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स्) या विषयात 'ग्रुप पात्रते'साठी (क्वॉलिफाय) आवश्यक १५० गुणही प्राप्त झाले नाहीत. यामुळे इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी अभ्यासक्रमाच्या रितसर प्रवेश प्रक्रियेत अडचणी उदभवू शकतात म्हणून संबंधित विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी (फोटोकॉपी) धावाधाव सुरू आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय कार्यालयात विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी रांगा लावल्या आहेत.कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यात मिळून गेल्या दोन दिवसात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामधील बहुसंख्य विद्यार्थ्यांची केमिस्ट्री, फिजिक्स आणि गणित या विषयात कमी गुण मिळाल्याची तक्रार आहे. फोटोकॉपीसाठी थेट मंडळाकडे अर्ज करण्याची नियमावली आहे. अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसाच्या कालावधीत उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळू शकते. एका विषयाच्या फोटोकॉपीसाठी ४०० रुपये शुल्क आहे.

यंदा बारावीचा ऑनलाइन निकाल २८ मे रोजी जाहीर झाला. मात्र विज्ञान शाखेकडील विषयात कमी गुण मिळाल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यामध्ये धाकधूक निर्माण झाली. उत्तरपत्रिकेच्या पुन्हा तपासणी बुधवारी २१० विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळाकडे अर्ज भरला. बारावीत विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी अशा विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. बारावीच्या परीक्षेतील गुणाइतकेच वैद्यकीय व अभियांत्रिकीसाठी प्रवेश परीक्षा प्रक्रिया महत्वाची आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 'नीट', तर फार्मसी, कृषीसाठी 'सीईटी' द्यावी लागते. अभियांत्रिकीसाठी देशपातळीवर प्रवेश घ्यायचा असल्यास जेईई मेन्स व जेईई अॅडव्हान्स या परीक्षा आहेत. राज्यातील अभियांत्रिकी कॉलेजमधील प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागते.

सीईटीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेश अंतर्गत सीईटीमध्ये विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले असतील तर 'पीसीएम'ग्रुपमधील विषयातील जादा गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. मात्र अनेक विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील विषयांना कमी गुण मिळाल्याने शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी त्यांनी उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीची मागणी केली आहे. उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत ज्या त्या कॉलेजच्या विषय शिक्षकाकडून तपासून घेऊन त्यांच्या अभिप्रायसह मंडळाकडे सादर करण्याची नियमावली आहे. पुढे ते पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करु शकतात.पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय ३१० रुपये खर्च आहे.

..........

प्रवेश प्रक्रियेत अडचण

नीट, सीईटी आणि जेईई परीक्षेत चांगले गुण मिळाले, पण ग्रुप क्वॉलिफाय (तीन विषयांना मिळून १५० गुण) होत नसल्यास रितसर प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ शकते. मॅनेजमेंट कोटा, सरकारी मेडिकल कॉलेज, खासगी मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी 'ग्रुप क्वालिफाय' असणे अत्यावश्यक आहे. ग्रुप क्वॉलिफाय होत नसले तर मेडिकल व अभियांत्रिकीच्या प्रवेशापासून वंचित राहू शकतात.

..................

पुनर्मुल्यांकन कमिटीचा निर्णय

कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव सुरेश आवारी म्हणाले, 'विभागीय मंडळातर्फे तीन टप्प्यात उत्तरपत्रिकांची तपासणी होते. तरी विद्यार्थ्यांना अपेक्षेइतके गुण मिळाले नसल्यास संबंधित उत्तरपत्रिका तपासणीसाठी मंडळाकडे अर्ज करु शकतात. शिक्षकांकडून त्याची तपासणी करुन अभिप्रायासह मंडळाकडे तो सादर करण्याची नियमावली आहे. त्या तपासणीत त्यांना जादा गुण मिळाल्याचे लक्षात आल्यावर ते पुनर्मुल्यांकनासाठी मंडळाकडे अर्ज करु शकतात. त्यानंतर मंडळाकडून नेमलेल्या कमिटीकडून पुन्हा उत्तरपत्रिकेची तपासणी होते. कमिटीच्या निर्णयानुसार गुणांमध्ये फरक होऊ शकतो. पुनर्मुल्यांकनासाठी नेमलेल्या कमिटीचा जो निर्णय असेल तशी कार्यवाही होते. गुणात बदल झाल्यास अथवा न झाल्यास विद्यार्थ्यांना कळविले जाते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता बांधणीसाठी जि. प. चा कंपनीसोबत करार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद आणि गेल कंपनीमध्ये रस्ते बांधणी संदर्भात करार झाला. या करारानुसार हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे साडे तीन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. गावठाण ते पाझर तलाव असा मार्ग आहे.

या रस्त्यासाठी जवळतास सव्वा तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेल कंपनी रस्त्यासाठीचा संपूर्ण खर्च करणार आहे. रस्त्यासाठीची रक्कम गेल कंपनीची आणि बांधकामाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर राहणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीत रस्ता तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

गेल कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा होणार आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला. आता प्रत्यक्ष कामांना सुरुवात होत आहे. मौजे वडगाव येथे कंपनीमार्फत स्टोअरेज उभारण्यात येणार आहे. त्या स्टोअरेजमधून कोल्हापूरसाठी गॅस पुरवठा वितरित करण्याचे प्रस्तावित आहे. गावठाण ते पाझर तलाव या मार्गाच्या नजीक स्टोअरेज असणार आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी कंपनीसोबत करार झाला. याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, राजेंद्र ननावरे, गेल कंपनीचे अधिकारी टी. राजकुमार, खासदार संभाजीराजे यांचे प्रतिनिधी योगेश केदार उपस्थित होते.

संपर्काचे आवाहन

गेलच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे की, ज्या भागातून दाभोळ ते बेंगळूरूपर्यंतची पाइपलाइन मंजूर आहे आहे. त्या भागाच्या तीस मीटर परिसरात नागरिकांनी बोअरवेल, विहिरींची खोदाई करण्यात येऊ नये. जर खोदाई करायची असल्यास १५१०१ आणि १८००११८४३० या क्रमांकावर फोन करावा. या टोल फ्री क्रमांकावर फोन करून कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कळवावे असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हापूस, केसरला करवीरकरांची पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरी येथील श्रद्धानंद सांस्कृतिक सभागहात गुरुवारी आंबा महोत्सवास सुरुवात झाली. अस्सल राजापुरी आणि रत्नागिरी येथील हापूस, केसर आंब्याला करवीरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. दिवसभरात कोकणातील उत्पादकांकडून आंबा खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. रविवारी दोन जूनपर्यंत महोत्सव सुरु राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन सहकार विभागीय निंबधक धनंजय डोईफोडे यांच्या हस्ते आणि बाजार समितीचे सभापती बाबासाहेब लाड यांच्या हस्ते झाले. सचिव मोहन सालपे यांनी स्वागत केले. कृषी पणन महामंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी महोत्सवाचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, 'आंबा उत्पादकांना रास्त भाव मिळावा आणि कोल्हापूरकरांना नैसर्गिक पिकवलेला हापूस व केसर आंबा चाखावयास मिळावा या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन केले.'

महोत्सवात २५ स्टॉल असून रत्नागिरी व सिंधूदुर्ग येथील उत्पादक सहभागी झाले आहेत. देवगड, वेंगुर्ला, येथील उत्पादकांच्या स्टॉलवर आंबा खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. लहान आकाराचा 'हापूस बिटका' लाही ग्राहकांनी पसंती दर्शवली. प्रति डझन दीडशे रुपयांनी या आंब्याची विक्री झाली. हापूस आंब्याचा दर प्रतिडझन २०० रुपयांपासून ४०० रुपये इतका होता. पी.डी. सावंत आणि पूजा सावंत यांच्या 'रत्ना केसर' आंब्यांलाही मोठी मागणी होती. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात खुडूस गावातील शेतकऱ्यांनी केसर आंबा विक्रीसाठी आणला आहे. सर्व उत्पादकांनी ऑरगॅनिक हापूस आंबा असल्याचा दावा केला आहे.

महोत्सवाला हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांनी भेट दिली. यावेळी उपसभापती संगीता पाटील, सदस्य परशुराम खुडे, उदयसिंग पाटील, उत्तम धुमाळ, शेखर येडगे, बाबूराव खोत, भगवान काटे, आशालता पाटील, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच गंभीर जखमी

$
0
0

पाच गंभीर जखमी

सातारा :

भुईंज गावच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने लक्‍झरी बस समोर चालेल्या कंटेनरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. सुवर्णा दिनेश मांढरे (वय ४१), दिनेश मांढरे, रघुनाथ लोहकरे, लक्ष्मी चंद्रकांत जाधव (राहणार जाधववाडी, चिखली, ता. जि. पुणे), श्‍वेता मिलिंद जाधव (रा. जाधववाडी पुणे) अशी अपघातील जखमींची नावे आहेत.

पुणे येथील ३५ जण नरसोबाची वाडी व गोवा येथे पर्यटनासाठी निघाले होते. त्यांची लक्‍झरी भुईंज गावच्या हद्दीत आली असताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅव्हल्स समोर चालेल्या कंटेनरला धडकली. या भीषण अपघातात ट्रॅव्हसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळाही खड्ड्यातूनच जाणार

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम शिरोळ तालुक्यात कासवगतीने सुरू आहे. रस्त्याकडेला लावलेले खडी आणि मुरुमाचे ढीग, साइडपट्ट्यांची अर्धवट कामे असे चित्र अंकली टोलनाका ते जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे तसेच बसवान खिंड ते धर्मनगर, जयसिंगपूर, उदगाव, अंकली टोल नाका या परिसरात दिसते. पावसाळा आला तरी ही कामे पूर्ण होण्याची चिन्हे नसल्याने यंदाही वाहनधारकांना खड्ड्यांतूनच जावे लागणार आहे.

कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणांतर्गत तमदलगे बसवान खिंड ते धर्मनगर, जयसिंगपूर, उदगाव, अंकली टोलनाका या जुन्या रस्त्याचे दुपदरीकरण तर बसवान खिंड, तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, अंकली टोलनाका या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले. ठेकेदाराने या रस्त्याचे काम मध्येच थांबविल्याने तमदलगे, अंकली टोलनाक्याजवळ ओढ्यावरील पुलाची कामे आजही अर्धवट आहेत. निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे या रस्त्यावर अल्पावधीत खड्डे पडले आहेत.

कोल्हापूरहून सांगलीला जाताना बसवान खिंड ते अंकली टोलनाका हा निमशिरगाव मार्गे जाणारा बायपास रस्ता जवळचा मार्ग आहे. जयसिंगपूर शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे वाहनधारक बायपासचा वापर करतात. मात्र तमदलगे, जैनापूर, जयसिंगपूर रेल्वे स्टेशनजवळ या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. परिणामी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. सध्या बांधकाम विभागाने रस्त्याच्या डागड़ुजीचे काम हाती घेतले आहे. तमदलगे, जैनापूर परिसरात काम सुरू करण्यात आले असले तरी त्याची गती संथ आहे. जैनापूर, उमळवाड फाटा परिसरात काही ठिकाणी बायपास रस्त्याच्या साइडपट्ट्या मुरुमीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या साइडपट्ट्यांच्या मुरुमावर पाणी मारुन मजबूतीकरण करणे गरजेचे आहे. बायपास रस्त्यावरून चारचाकी वाहने भरधाव वेगाने जातात. परिणामी अपघात टाळण्यासाठी दुचाकीस्वारांना आपली वाहने साइडपट्टीवर घ्यावी लागतात. मुरुमीकरण सुरू असणाऱ्या या साइडपट्ट्यांवर मोठे दगड असल्याने अपघात होत आहेत. याचबरोबर मुरुमावरुन दुचाकी घसरण्याच्या घटनाही घडत आहेत.

तमदलगे ते अंकली टोल नाका या बायपास रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत संथपणे सुरू आहे. जैनापूर ते दानोळी फाटा दरम्यान या रस्त्याचे केवळ एका बाजूचेच काम पूर्ण झाले आहे. तमदलगे बसवान खिंड, धर्मनगर, जयसिंगपूर, उदगाव ते अंकली टोलनाका या रस्त्याची स्थिती चांगली असल्याने या मार्गाच्या साइडपट्ट्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हे कामही संथगतीने सुरू आहे. रस्त्याकडेला मुरुमाचे ढीग दिसत असले तरी पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणासह अन्य कामे पूर्ण होण्याची गरज आहे.

पुलाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष

कोल्हापूर-सांगली मार्गावरील तमदलगे येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या डागडुजीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वाहने धडकल्याने या पुलाच्या बाजूस असणाऱ्या संरक्षक पाइप वाकल्या आहेत. तर काही ठिकाणी सुरक्षिततेसाठीच्या पाइपही नाहीत. त्यामुळे ताबा सुटल्यास वाहने पुलाच्या भरावावरुन थेट खाली कोसळण्याची शक्यता असल्याने येथे उपाययोजना गरजेच्या आहेत.

फोटो ओळी-

- जैनापूरजवळ रस्त्याचे केवळ एकाच बाजुचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे.

- तमदलगे येथे बायपास रस्त्यालगत खडीचे ढीग असून काम संथपणे सुरू आहे.

- तमदलगे येथे साईडपट्टीसाठी टाकण्यात आलेले मुरुमाचे ढीग.

- तमदलगे येथे पुलाच्या संरक्षक पाईप चोरीस गेल्या आहेत.

- उमळवाड फाटा येथे बायपास रस्त्याचे सुरु असणारे काम.

- साइडपट्टीसाठी टाकण्यात आलेल्या मुरुमात असलेले भलेमोठे दगड अपघातास निमंत्रण देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः व्यवसाय परवाने होणार ऑनलाइन

$
0
0

कोल्हापूर :

महापालिकेच्यावतीने शहरातील व्यावसायिकांना देण्यात येणारा परवाना आणि परवान्यांचे नुतनीकरण ऑनलाइन प्रणालीद्वारे होणार आहे. इस्टेट विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधाही ऑनलाइन मिळणार आहेत. विभागाने त्यासाठीची ऑनलाइन प्रणाली डेव्हलप केली असून लवकरच आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमोर याचे प्रेझेंटेशन करण्यात येणार आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे अवैध व्यावसायिकांचा शोध घेण्यासह महापालिकेच्या उत्पन्नातही अधिक भर पडेल अशी अपेक्षा आहे.

महापालिकेच्यावतीने घरफाळा, पाणीपट्टी बिले, जन्म-मृत्यू नोंद, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, बांधकाम परवाना आदी सुविधा ऑनलाइन दिल्या जातात. त्यासाठी एससीएल कंपनीला काम देण्यात आले. मात्र कंपनीच्या कामाबाबत प्रशासनासह शहरवासियांच्याही तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत २०१८ मध्ये एससीएल कंपनीकडून ठेका काढून घेण्यात आला. सध्या उपलब्ध यंत्रणेवर प्रशासन शहरवासियांना ऑनलाइन सुविधा देत आहे. यासाठी सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रत्येकी एक हार्डवेअर इंजिनीअर व सॉफ्टवेअर इंजिनीअर अशा केवळ तीन कर्मचाऱ्यांवर ही सुविधा दिली जात आहे.

जुन्या सुविधा देताना नव्या डेव्हलपमेंटसाठी विभाग प्रयत्नशील आहे. शहरातील व्यावसायिकांना आवश्यक व्यवसाय परवाना व परवान्यांचे नुतनीकरण ऑनलाइन करण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात येत आहे. परवान्यांचे नुतनीकरण वेळत होत नसल्याने व्यापारी व उद्योजकांनी ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्याची मागणी केली होती. प्रक्रियेला उशीर लागत असल्याने प्रशासनाने नुतनीकरणास मुदतवाढही दिली. मात्र आता पुढील वर्षापासून ऑनलाइन प्रक्रिया गतिमान होणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप केले जात आहे.

ऑनलाइन प्रक्रियेत नुतनीकरणावेळी परवानाधारकांना पुन्हा नव्याने कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत. सध्या नुतनीकरण करताना प्रचंड वेळ लागत असल्याने बुहतांश व्यावसायिकांकडून नोंदच होत नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या महसुलावर मोठा परिणाम होत होता. ऑनलाइन प्रणालीमुळे महसूल वाढीसह अवैध व्यावसायिकांचा शोध घेणे सुलभ होणार आहे. त्याचबरोबर इस्टेट विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधाही ऑनलाइन होणार आहेत.

अडीच कोटींची बचत

महापालिकेच्यावतीने घरफाळा, पाणीपट्टी, जन्म-मृत्यू नोंद आदी सेवा ऑनलाइन देण्यासाठी एससीएल कंपनीली २००८ मध्ये ठेका देण्यात आला. त्यासाठी कंपनीला १३ कोटी रुपये देण्यात आले. मे २०१८ पासून कंपनीकडून ठेका काढून घेत महापालिकेतर्फे सेवा दिली जात आहे. यामुळे कंपनीला दरवर्षी देण्यात येणाऱ्या दोन ते अडीच कोटी रुपयांची बचत झाली आहे.

सद्यस्थितीत घरफाळा, पाणीपट्टी विभागाला ऑनलाइन सेवा दिली जात आहे. लवकरच परवाना व इस्टेट विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधा ऑनलाइन केल्या जातील. याचे प्रेझेंटेशन तयार होत असून लवकरच आयुक्तांसमोर त्याचे सादरीकरण होईल. - यशपालसिंह राजपूत, सिस्टिम मॅनेजर

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हातकणंगले’तही इव्हीएमघोळ झाल्याचा आरोप

$
0
0

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीत फरक झाला आहे. अशा प्रकारचा घोटाळा इव्हीएम मशिनमध्ये झाल्याचा संशय माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. त्याची तक्रारही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. 'हातकणंगले'त एकूण १२ लाख ४५ हजार ७९७ मतदान झाले होते. मोजलेली मते १२ लाख ४६ हजार २५६ इतकी आहे. त्यात ४५९ मतांचा फरक पडला आहे. याची दखल आयोगाने न घेतल्यास न्यायालयात धाव घेण्याची तयारी शेट्टी यांनी केली आहे. इव्हीएममध्ये छेडछाड होणार असल्याची कुणकुण मतमोजणीच्या आदल्या दिवसांपर्यंत होती. मतमोजणीच्या ठिकाणी वाय-फाय कनेक्ट झाल्याची तक्रारही केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाधीस्थळाचे काम आजपासून गतीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाच्या संरक्षण भिंतीचे काम आज, शनिवारपासून गतीने करण्याचा निर्णय येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सिध्दार्थनगर सहभाग कृती समितीची संरक्षक भिंतीच्या दुसऱ्या प्रवेशव्दाराची मागणी यावेळी अमान्य करण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या कामास विरोध करू नये, सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यानंतर काम गतीने करण्याच्या निर्णयास हात उंचावून मान्यता देण्यात आली.

समाधीस्थळाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळील वाहिवाटीचा दुसरा रस्ता कायम ठेवावा, अशी मागणी सिध्दार्थनगर सहभाग कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याउलट महानगरपालिका पदाधिकारी, शाहूप्रेमींनी काम त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी केली होती. समन्वयातून मार्ग काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीत सिध्दार्थनगर समितीचे संजय माळी यांनी समाधीस्थळाच्या विकासाच्या नावाखाली तेथील रहिवाशांचे हक्क हिरावून घेतले आहेत, असा मुद्दा मांडला. यावर माजी नगरसेवक नंदू मोरे यांनी जोरदार आक्षेप घेतला. माळी यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी करताच गोंधळ सुरू झाला. जोरदार वादावादी झाली. महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे यांनी मध्यस्थी करून सर्वांना शांत केले. नंदू मोरे म्हणाले, 'समाधीस्थळाचे काम सरकारच्या आर्थिक मदतीविना केले जात आहे. महानगरपालिकेने त्यासाठी आठ कोटी रूपयांचा आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत तीन कोटींचा निधी खर्च झाला आहे. चार वर्षांपासून काम केले जात आहे. आताच दुसऱ्या प्रवेशव्दाराचा मुद्दा उपस्थित करून विरोध करणे चुकीचे आहे.'

प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, 'समाधीस्थळाच्या कामास विरोध नाही. सिध्दार्थनगरला ऐतिहासिक महत्व आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनच्या वहिवाटीचा रस्ता बंद करू नये. मुख्य प्रवेशव्दार असले तरी सिध्दार्थनगर रहिवाशांनी मागणी केलेला रस्ता कायम ठेवावा.' वसंत निंगनूरकर यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. दुसरा रस्ता सिध्दार्थनगरच्या अस्मितेचा विषय आहे, असे त्यांनी सांगितले. सतीशचंद्र कांबळे यांनी समाधीस्थळातील कामांसंबंधी स्पष्टता असावी, असे सांगितले. माळी, निंगनूरकर आणि मोरे यांच्यात शेवटपर्यंत शाब्दीक चकमक उडत राहिली. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आदिल फरास, अशोक पोवार, उपमहापौर शेटे यांनी हस्तक्षेप करून शांतता राखण्याचे आवाहन केले.

महापालिका, शाहूप्रेमी मान्यवर आणि सिध्दार्थनगर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'समाधीस्थळात प्रवेश करण्यासाठी २० फूट रूंदीचे प्रशस्त प्रवेशव्दार आहे. त्याच्या जवळच दुसऱ्या प्रवेशव्दाराचा हट्ट करणे कितपत योग्य आहे. समाधीस्थळात जाऊन राजर्षी शाहू महाराज यांच्यासमोर नतमस्तक होणे महत्वाचे आहे. यासाठी हृदयातून विचार करावा. संरक्षण भिंतीसह इतर कामांना गती देण्यासाठी सहकार्य करावे.' जिल्हाधिकारी देसाई यांच्या या भाविनक आणि ठोस आवाहनास सिध्दार्थनगर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रतिसाद दिला. बैठकीत दोन्हींकडून हात उंचावून मान्यता देण्यात आली.

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी समाधीस्थळाच्या विकास आराखड्याचे सादरीकरण केले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, आदिल फरास, दिलीप देसाई, पी. एस. कांबळे, किसनराव कल्याणकर यांनीही म्हणणे मांडले. शेवटी महापौर मोरे यांनी आज, शनिवारपासून काम गतीने केले जाईल, असे सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, नगरसेवक अभिजित चव्हाण, मेहजबीन सुभेदार, इंद्रजित सावंत, स्वाती कांबळे, सीमा कांबळे, सुशीलकुमार कोल्हटकर आदी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी स्वागत केले.

दरम्यान, बैठक संपल्यानंतर निंगनूरकर, माळी यांनी बैठकीमधील तोडगा मान्य नसल्याचे सांगितले. दुसरे प्रवेशव्दार असावेच, असे त्यांनी जिल्हाधिकारी देसाई यांना सांगितले.

........

चार मागण्या मान्य

समाधीस्थळाजवळील सांस्कृतिक हॉलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे, सांस्कृतिक हॉलमधील व्यायामशाळा इतरत्र न हलवणे, सिध्दार्थनगर राजर्षी शाहू समाधीस्थळ असा नामोल्लेख करणे, शिर्के उद्यानाचे संवर्धन करणे, समाधीस्थळ विकास समितीमध्ये सिध्दार्थनगरातील प्रतिनिधीस घेणे, या मागण्या मान्य केल्याचे महापौर मोरे, उपमहापौर शेटे यांनी सांगितले.

............

चौकट

विरोध खपवून घेणार नाही

महापौर सरिता मोरे यांचे पती नंदू मोरे बैठकीत पहिल्यापासूनच आक्रमक राहिले. 'राजर्षी शाहू महाराज सर्वांचे राजे होते, त्यामुळे विरोध खपवून घेतला जाणार नाही. कुणी आडवे आले तर अद्दल घडवू. सरकार आणि पालकमंत्र्यांकडे समाधीस्थळासाठी निधीची मागणी करूनही मिळालेला नाही. महापालिका स्वत:हून पुढाकार घेऊन निधी खर्च करत आहे. यामुळे कुणीही कामास विरोध करू नये', असे आवाहन मोरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीच्या वादातून सरपंचाकडून विळ्याने हल्ला ; तिघे जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नेर्ली (ता. करवीर) येथे शेतीच्या बांधाच्या वादावरून शुक्रवारी दोन गटात विळ्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले. कपिल मोरे, विनायक मोरे, शंकर मोरे (सर्व रा. नेर्ली, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. मोरे आणि पाटील गटातील पूर्ववैमनस्यातून वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सरपंच प्रकाश पाटील यांच्यासह आठ जणांविरोधात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

गोकुळ शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेर्ली येथे कपिल मोरे कुटुंबिय राहत असून त्यांचे गावात औषध विक्रीचे दुकान आहे. त्यांची शेतजमीन सरपंच प्रकाश पाटील यांच्या शेजारी आहे. गेल्या काही वर्षांपासून मोरे आणि पाटील कुटुंबियात शेतीच्या हद्दीवरुन वाद सुरु आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोरे शेतीला पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यावेळी सरपंच पाटील आणि त्यांचा चुलत भाऊ दगडू पाटील दोघेही शेतात काम करीत होते. सरपंच पाटील शेतीचे काम करुन निघून गेले. त्यावेळी दगडू पाटील यांनी मोरे यांच्यासोबत शेतीच्या हद्दीवरुन जाब विचारला. त्यावेळी शिवीगाळ करुन दगडू याने मोरे यांना मारहाण केली. त्यांनी मारहाण झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली. दगडू याने सरपंच पाटील यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्या वेळी दोन्ही गटाचे समर्थक या ठिकाणी आले. दोन्ही गटाच्या सर्मथकांनी एकमेकांना शिवीगाळ केली. हा वाद सुरु असताना सरपंच पाटील यांनी कपिल मोरे यांच्यावर विळ्याने हल्ला केला. अन्यजणांनी केलेल्या मारहाणीत विनायक मोरे, शंकर मोरे जखमी झाले. दरम्यान, या प्रकरणी सरपंच पाटील, दगडू पाटील, अनिल पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात मोरे यांनी फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलमध्ये काम करत उमेशची यशाला गवसणी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दसरा चौकातील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा विद्यार्थी उमेश राजाराम खोत याने शहरातील हॉटेलमध्ये आठ-आठ तास काम करून बारावी वाणिज्य शाखेतून ८०.९२ टक्के गुण मिळवून देदिप्यमान यश मिळविले. कष्ट करून मिळविलेल्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण व सर्व प्राध्यापकांनी उमेशचे कौतुक केले

उमेश खोत याचे मूळ गाव कोल्हापूरातून ८१ किलोमीटर असणाऱ्या भुदरगड तालुक्यातील पडखंबे पैकी खोतवाडी. खोतवाडीचा संपूर्ण परिसर जंगलमय. गतवर्षीपर्यंत गावाला डांबरी रस्ताच नाही, अशी परिस्थिती होती. जगण्याचे साधनच गावी नसल्याने उमेशचे वडील २० वर्षांपासून कोल्हापूरातील प्रार्थना हॉटेलमध्ये काम करतात व तेथेच राहतात. गावात दहावी-बारावीच्या शिक्षणाची सोय नसल्याने उमेश व त्याचा भाऊ चार वर्षापूर्वी कोल्हापुरात आले. मिस क्लार्क हॉस्टेल आणि कोरगावकर यांच्या विनयकुमार छात्रालयात ते मोफत राहू लागले. शिक्षणाचा आणि जेवणाचा खर्च भागविण्यासाठी महिना तीन हजार रूपये पगारावरती उमेशने हॉटेलमध्ये आठ-आठ तास काम केले. चार तास कॉलेज केले आणि चार तास अभ्यास करून वाणिज्य शाखेत ८१ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. या यशाबद्दल श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वतीने त्याचे व त्याच्या वडिलांचे कौतुक करण्यात आले.

या यशाबद्दल उमेश म्हणाला, 'शिक्षण घेताना कष्टाची लाज कधी बाळगली नाही. कोण काय म्हणतील याकडे लक्ष दिले नाही आणि खोटी प्रतिष्ठाही बाळगली नाही. भविष्यात मला सी.ए. व्हायचे आहे.' उमेशचे वडील राजाराम खोत म्हणाले, 'पोरगा हॉटेलमध्ये काम करून शिकला. त्याचे यश आम्हाला डोंगराएवढे वाटत आहे. आई-वडिलांच्या परिस्थितीची जाणीव त्याला आहे. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन त्याला मिळाल्याने हे यश मिळाले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईद फेस्टिव्हल आजपासून

$
0
0

कोल्हापूर : बिंदू चौक वाहन पार्किंग परिसरात शनिवारी (ता.१) रमजान ईदनिमित्त ईद फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी सभापती शारंगधर देशमुख, प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती अशोक चव्हाण, परिवहन सभापती अभिजित चव्हाण यांच्यासह नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. फेस्टिव्हलचा लाभ हिंदू, मुस्लिम बांधवांनी घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष शौकत बागवान, शकील अत्तार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा जनसंपर्क अधिकारी नियुक्तीला स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या जनसंपर्क अधिकारी नियुक्तीला औद्योगिक कामगार न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. भरतीला स्थगिती देण्यासाठी महापालिका कर्मचारी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधीश समीना खान यांच्यासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी ११ जूनला होणार आहे. संघटनेच्यावतीने अॅड. उदय जाधव यांनी बाजू मांडली.

महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी पद गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहे. या पदावर प्रभारी म्हणून मोहन सूर्यवंशी काम पाहत आहेत. जनसंपर्कपदी ठोक मानधनावर नेमणूक करण्यासाठी महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. तसेच या पदासाठी शनिवारी (ता.१) सकाळी मुलाखती होणार होत्या. १९८१ मध्ये झालेल्या महासभेत जनसंपर्कपदी सेवाज्येष्ठतानुसार नियुक्ती करण्याचा ठराव झाला होता. त्याचा आधार घे‌ऊन महापालिका कर्मचारी संघटनेने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन दिले. संघटनेच्या निवेदनाची दखल न घेतल्याने औद्योगिक न्यायालयात स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती.

याचिकेवर शुक्रवारी न्यायाधीश खान यांच्यासमोर सुनावणी झाली. संघटनेच्या वतीने अॅड. उदय जाधव यांनी बाजू मांडताना 'जनसंपर्क अधिकारपदाची नियुक्ती नियमानुसार होत नाही. त्याबाबतचा महासभेत ठराव झाला असून, निवृत्त कर्मचाऱ्याची या पदावर नियुक्ती होऊ शकत नाही. तसेच यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे स्पष्ट केले.' त्यानंतर न्यायाधीश खान यांनी स्थगिती दिल्याचे अॅड. जाधव यांनी सांगितले. औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे शनिवारी होणाऱ्या जनसंपर्क अधिकारी पदाच्या मुलाखती होऊ शकणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्यासाठी निधी

$
0
0

कोल्हापूर

रंकाळा तलाव व परिसराच्या सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे महापालिकेने प्रस्ताव पाठवला होता. त्यापैकी ५० लाखाच्या निधीतून सुशोभीकरणाचे काम सुरू झाले असून उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने देवू, अशी ग्वाही महामंडळाचे व्यवस्थापक अभिमन्यू काळे यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना शुक्रवारी दिली. रंकाळा तलाव सुशोभीकरणासाठी महापालिका प्रशासनाने चार कोटी ८० लाखाचा प्रस्ताव पाठवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकिट घ्या, पण पंपाला कनेक्शन द्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

प्रलंबित कृषी पंपासाठी त्वरीत वीज जोडणी देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखा या मागणीसाठी शिवसेनेने अनोखे आंदोलन केले. खोट्या नोटांचे पाकिट देऊन 'पैशाचं पाकिट घ्या, शेतीपंपाला वीज कनेक्शन द्या' अशी मागणी 'महावितरण'कडे करण्यात आली. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न दिल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, मार्च २०२०पर्यंत जिल्ह्यातील सर्व कृषीपंपांसाठी वीज जोडणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी यावेळी दिली.

महावितरणकडे कोल्हापूर जिल्ह्यातील ५०५० तर सांगली जिल्ह्यातील १० हजार ७५५ शेतकऱ्यांनी शुल्क भरुन अर्ज केले आहेत. मात्र गेली तीन वर्षे शेतीसाठी

वीज कनेक्शन दिलेले नाही. महावितरणच्या या कारभाराविरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विद्युत लोकपालाकडे धाव घेतली आहे. विद्युत लोकपालांनी या शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी द्यावी, असा आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली आहे असा आरोप करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ताराबाई पार्कातील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. 'शेतकऱ्याच्या आत्महत्येची वाट पाहणार का?', 'तीन वर्षे पैसे भरुनही वीज कनेक्शन कधी मिळणार?' अशी शेतकऱ्यांकडून विचारणा करणारा कार्यकर्त्यांच्या हातातील फलक यावेळी लक्ष वेधून घेत होता.

निदर्शने केल्यानंतर शिवसेनेने थेट कार्यालयावर हल्लाबोल केला. मुख्य अभियंता भोसले यांना पूजेच्या ताम्हणात मांडण्यात आलेल्या खोट्या नोटा, पैशाचे पाकिट, मंगल कलश देण्यात आला. 'पैसे घ्या, पण वीज कनेक्शन द्या' अशी मागणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी आणि माजी नगरसेवक धनंजय सावंत यांनी पैसे भरूनही तीन वर्षे वीज कनेक्शन न मिळाल्याने शेतीचे किती नुकसान झाली याची माहिती दिली.

मुख्य अभियंता भोसले यांनी कार्यकर्त्यांना वीज कनेक्शनच्या सद्यस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, 'गेली तीन वर्षे निधी आला नसल्याने वीज कनेक्शन मिळालेली नाहीत. आठ महिन्यांपूर्वी राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन दिला आहे. सध्या ४७०० वीज कनेक्शन देण्याचे काम प्रलंबित आहे. कनेक्शन देण्यासाठी निविदा काढण्यात आली असून १७ ठेकेदारांना काम दिले आहे. मार्च २०२०पूर्वी जिल्ह्यातील प्रलंबित सर्व शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात येईल.'

आंदोलनात दुर्गेस लिंग्रस, विराज पाटील, तानाजी आंग्रे, सुजित चव्हाण, कमलाकर जगदाळे, शशिकांत बीडकर, अनिल पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पश्चिम महाराष्ट्राला वेगळा न्याय का?

आंदोलनात मराठवाडा, विदर्भाला सवलती आणि पश्चिम महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा प्रश्न जिल्हाप्रमुख देवणे यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक नियमित बील भरतात. पण ज्या ठिकाणी शेकडो कोटी रुपयांचा तोटा आहे, त्यांना मात्र सवलती दिल्या जातात' असा आरोप देवणे यांनी केला.

०००

(मूळ कॉपी)

वीज कनेक्शनसाठी शिवसेनेचे 'पैशाचे पाकिट' देऊन आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रलंबित कृषी पंपासाठी त्वरीत वीज जोडणी देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखा, या मागणीसाठी शिवसेनेने अनोखे आंदोलन केल. सेनेने खोट्या नोटांचे पाकिट देऊन 'पाकिट पैशाचं घ्या, शेती पंपाचा वीज कनेक्शन द्या' अशी मागणी वीज मंडळाकडे केली. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न दिल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यातील सर्व कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी यावेळी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील ५०५० तर सांगली जिल्ह्यातील १० हजार ७५५ शेतकऱ्यांनी शुल्क भरुन अर्ज केले असताना शेतीसाठी गेले तीन वर्षे विजेचे कनेक्शन दिलेले नाही. वीज मंडळाच्या कारभाराच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विद्युत लोकपालाकडे धाव घेतली. त्यांनी तातडीने वीज जोडणी द्यावी, असा आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. या प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ताराबाई पार्क येथील वीज मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

'शेतकऱ्याच्या आत्महत्येची वाट पाहणार का?' हा फलक यावेळी लक्ष वेधून घेतले. 'तीन वर्षे पैसे भरुनही वीज कनेक्शन कधी मिळणार' हा शेतकरी अधिकाऱ्यांना विचारात असलेला प्रश्नाचा फलकही शिवसैनिकांनी मोर्चात आणला होता.

निदर्शनानंतर शिवसैनिकांनी थेट कार्यालयावर हल्लाबोल केला. मुख्य अभियंता भोसले यांना पूजेच्या ताम्हणात मांडण्यात आलेल्या खोट्या नोटा, पैशाची पाकिट, मंगल कलश देण्यात आला. पैसे घ्या व पण वीज कनेक्शन द्या अशी मागणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी आणि माजी नगरसेवक धनंजय सावंत यांनी पैसे भरुनही तीन वर्षे वीज कनेक्शन न मिळाल्याने शेतीचे किती नुकसान झाली याची माहिती दिली.

मुख्य अभियंता भोसले यांनी आंदोलकांना माहिती दिली. ते म्हणाले, गेले तीन वर्षे निधी आला नसल्याने वीज कनेक्शन मिळालेली नव्हती. आठ महिन्यापूर्वी राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन दिला असून ४७०० वीज कनेक्शनचे काम प्रलंबित आहेत. कनेक्शन देण्यासाठी निविदा काढण्यात आली असून १७ ठेकेदारांना काम दिले आहे. मार्च २०२० पूर्वी जिल्ह्यातील प्रलंबित सर्व शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात येईल.

आंदोलनात दुर्गेस लिंग्रस, विराज पाटील, तानाजी आंग्रे, सुजित चव्हाण, कमलाकर जगदाळे, शशिकांत बीडकर, अनिल पाटील यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.

०००००

पश्चिम महाराष्ट्राला वेगळा न्याय का?

मराठवाडा, विदर्भाला सवलती आणि पश्चिम महाराष्ट्राला वेगळा न्याय का असा प्रश्न जिल्हा प्रमुख देवणे यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक नियमित बील भरतात. वेळेवर वीज बिल भरतात. पण ज्या ठिकाणी शेकडो कोटी रुपये तोटा आहे त्यांना मात्र सवलती दिल्या जातात असा आरोप देवणे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘महसूल’मधील बदलीतवशिलेबाजीला फाटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील महसूल विभागातील १५० कर्मचाऱ्यांची बदलीची प्रक्रिया शुक्रवारी राबवण्यात आली. वशिलेबाजी व अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी मुलाखत, समुपदेशनाव्दारे ही प्रक्रिया जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राबवली. प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी देसाई यांनी बदलीसाठी चुकीचे प्रक्रार झाल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी, तहसील कार्यालयातील एका विभागात सहा वर्षे आणि एका टेबलवर तीन वर्षे काम केलेल्या १५० कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया राबवण्यात आली. बदली प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी अलिकडे पहिल्यांदाच मुलाखतीव्दारे बदलीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी देसाई यांनी घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया सुरू झाली. बदलीपात्र प्रत्येक कर्मचाऱ्यास बोलावून मुलाखतीव्दारे बदलीचे ठिकाण देण्यात आले. अशाप्रकारे मंडल अधिकारी २२, अव्वल कारकून ५४, लिपिक - टंकलेखकच्या ७४ जणांसाठी बदलीची प्रक्रिया राबवण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहिली.

.......

उपजिल्हाधिकारी 'साहेब'

अनेक वर्षे जिल्ह्यात ठाण मांडून असलेल्या एका उपजिल्हाधिकाऱ्यांकडे बदलीच्या अर्थपूर्ण वाटाघाटीतील संशयाचे बोट पहिल्यापासून दाखवले जात आहे. बदलीच्या प्रक्रियेत तेच 'साहेब' म्हणून परिचित आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी देसाई यांनी बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणून कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले.

..............

कोट

'बदलीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली असून प्रशासकीय आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार मुलाखतीव्दारे बदलीचे ठिकाण कर्मचाऱ्यांना देण्यात आले. यामुळे कर्मचारीही खूष झाले आहेत.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसले नाट्यगृहात होणार यशवंत भालकर स्मारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे स्मारक भित्ती शिल्प स्वरूपात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद केली आहे. स्मारकासाठी नाट्यगृहातील जागा निश्चित करा. त्यानंतर मंगळवारी (ता.४) बैठक घेऊ,' अशी सूचना महापौर सरिता मोरे यांनी केली.

यशवंत भालकर यांनी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात त्यांचे स्मारक भित्ती शिल्प स्वरूपात असावे अशी स्मारक समितीचे संग्राम भालकर यांनी मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर नाट्यगृह परिसरात जागा निश्चित करण्याची सूचना महापौर मोरे यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेता विलास वास्कर, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अखिल भारतीय मराठा चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाहक बाळ जाधव, स्वप्ना जाधव-भालकर, शिल्पकार किशोर पुरेकर, सतीश बिडकर यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या शहरात महास्वच्छता मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने शहरातील प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम रविवारी (ता. २) राबवण्यात येणार आहे. जयंती नाला व उपनाल्यासह प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी विविध अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संपूर्ण स्वच्छता मोहीम अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील व जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली राबवण्यात येईल.

मे महिन्याच्या पहिल्या रविवारपासून शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. विशेषत: जयंती नाला व उद्यानांची स्वच्छता केली. मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रभागनिहाय स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी चार विभागातंर्गत विविध अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील सर्व सेवाभावी संस्था, एनजीओ, तरुण मंडळे, बचतगट व पर्यावरण प्रेमी यांनी सहभागी व्हावे असे, आवाहन महापौर सरीता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

.....................

चौकट

स्वच्छता दूत होण्याचे आवाहन

रविवारी शहरात व जयंती नाला स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जयंती नाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग कोल्हापूर नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी राबवणाऱ्या मोहिमेमध्ये 'स्वच्छता दूत' म्हणून सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवगा संवर्धन मेळावा

$
0
0

कोल्हापूर

निसर्गमित्र संस्थेच्यावतीने एक ते सात जून दरम्यान शेवगा संवर्धन सोहळ्याचे आयोजन भारत हौसिंग सोसायटी येथील दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय येथे सायंकाळी चार ते सात दरम्यान केले आहे. मेळाव्यामध्ये शेतीमाल प्रक्रिया व उपपदार्थ तयार करणाऱ्या सौरऊर्जा वाळवणी यंत्राचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. याप्रसंगी पर्यावरणपूर्वक विवाह केलेल्या नवदाम्पत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, डॉ. मधुकर बाचूळकर मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उरसाचा आज मुख्य दिवस

$
0
0

कोल्हापूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या बाबूजमाल दर्गा उरुसास शुक्रवारी धार्मिक वातावरणात सुरुवात झाली. रात्री सव्वादहा वाजता गंध लेपनाचा कार्यक्रम झाला. शनिवारी (ता. १) उरुसाचा मुख्य दिवस असून, रात्री सव्वादहा वाजता गलेफ मिरवणूक काढण्यात येणार आहे. उरुसानिमित्त दर्ग्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभर भाविकांनी पिराचे दर्शन घेतले. मुख्य खादिम (पुजारी) लियाकत मुजावर, ऐनुद्दीन मुल्ला, अल्ताफ मुतवल्ली, शकील मुतवल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images