Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गुण जास्त, आनंद मोठा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'लहानपणापासूनच अभ्यासाची ओढ होती. दहावीपर्यंत शाळेत रँकीग. बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळणार याची खात्री होती, जवळपास ९३ टक्के गुण अपेक्षित धरले होते. त्याहूनही मोठे यश मिळाले.वर्गातील लेक्चरला पूर्ण वेळ हजेरी, नियमित अभ्यास हेच यशाचे गमक आहे' ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, श्रृती लिलेश पटेल यांची. तिने, बारावीच्या परीक्षेत वाणिज्य विभागात ९६ टक्के गुण मिळवले आहेत. विवेकानंद कॉलेजची ही विद्यार्थिनी आहे.

श्रृती पटेल ही मूळची सिंधुदुर्ग येथील. वडील बिझनेसम, तर आई गृहिणी आहे. दहावीच्या परीक्षेत तिला ९४.२० टक्के गुण मिळाले होते. अभिनव विद्यामंदिर, वैभववाडी या शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे वैभववाडी तालुक्यात ती दुसऱ्या क्रमांकाची विद्यार्थिनी ठरली. अकरावी, बारावीसाठी तिने विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. होस्टेलमध्ये राहून ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. बारावीत मिळालेल्या यशाविषयी ती म्हणाले, 'संपूर्ण वर्षभर मी वर्गातील एकही लेक्चर चुकविला नाही. सगळ्या विषयांच्या लेक्चरला पूर्णवेळ हजेरी होती. शिवाय दिवसभरात सह तास अभ्यास करायचे. विवेकानंद कॉलेजमधील प्राध्यापकांचे मोलाचे ठरले. वर्ग व होस्टेलमधील मैत्रीणींचे सहकार्य मिळाले. शिक्षकांनी सातत्याने प्रोत्साहन केले.'

'नियोजनबद्ध अभ्यास केल्यामुळे बारावीच्या परीक्षेत यशाची पूर्ण खात्री होती. ९३ टक्क्यापर्यंत गुण अपेक्षित होते. निकालाविषयी प्रचंड उत्सुकता होती. दुपारी आई,पप्पांचा फोन आला, ९६ टक्के गुण मिळाल्याचे त्यांनी सांगितले. क्षणभर माझा विश्वास बसला नाही. त्यांना खूप आनंद झाला होता. मला सीए करायचे आहे' असे श्रृतीने सांगितले. बारावीच्या परीक्षेत ६५० पैकी ६२४ गुण मिळाले.

गणितला पैकीच्या पैकी

श्रृतीने बारावीत प्रत्येक विषयाचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले होते. परीक्षेत इंग्रजीला ९६, जर्मन विषयाला ९५, अर्थशास्त्र ९५, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट ९६, गणित १०० तर अकाऊंटला ९९ गुण मिळाले आहेत.

संबंध वर्षभरात श्रृतीने एकही तास चुकविला नाही. सगळ्या लेक्चरला उपस्थिती दर्शविल्यामुळे विषयांचे आकलन चांगले झाले. बारावीतील यशासाठी अभ्यासातील सातत्य महत्वपूर्ण ठरले. बारावीच्या परीक्षेत विवेकानंद कॉलेजने यशाची एक परंपरा निर्माण केली आहे. त्याला साजेसे यश यंदाही कॉलेजने मिळवले.

- एस. वाय. होनगेकर, प्राचार्य, विवेकानंद कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हायकोर्टात जाण्याचा संस्थाचालकांचा इशारा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य सरकारने, शाळांना २००४ ते २०१३ या कालावधीतील वेतनेत्तर अनुदान दिले नाही. सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही शिक्षण संस्थाचालकाचे म्हणणे विचारात घेतले नाही. थकीत वेतनेत्तर अनुदानासाठी कोल्हापूर शिक्षण संस्था चालक हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण संस्था मंडळातर्फे पत्रकाद्वारे दिली आहे.

या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. ३ जूनध) जिल्ह्यातील शिक्षण संस्थांची कार्यशाळा आयोजित केली आहे. मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत कार्यशाळा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षणसंस्थांनी आपापल्या शिक्षण संस्थेचे थकीत वेतनेत्तर अनुदानाची माहिती कार्यशाळेत द्यावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शिवाजी माळकर, सचिव गोपाळ सामंत, संघटक नंदकुमार इनामदार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधी स्मारकाबअडथळ्यांबाबत आज बैठक

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

येथील नर्सरीबागेतील राजर्षी शाहू समाधी स्मारक कामासंबंधीच्या अडचणीसंबंधी उद्या (शुक्रवारी) दुपारी ३ वाजता व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. समाधी स्थळाच्या कामाला गती देण्यासंबंधी सकारात्मक आणि ठोस भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रेमी शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते.

शिष्टमंडळातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सरकार आणि महानगरपालिकेतर्फे समाधीस्थळाचे सुशोभिकरण केले जात आहे. मात्र काही व्यक्तींनी समाधी स्थळाच्या संरक्षण भिंतीच्या कामास विरोध केला आहे. सर्व समाजासाठी शाहूंनी मोठे काम केले आहे. असे असताना काहीतरी कारण पुढे करून विरोध करणे चुकीचे आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे.

निवेदन देताना दिलीप देसाई, संभाजीराव जगदाळे, रमेश मोरे, अजित सासणे, भगवान काटे, किसनराव कल्याणकर, अॅड. पंडीतराव सडोलीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

0
0

प्रविण कांबळे, हातकणंगले

सांगली-कोल्हापूर या राज्य महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रिम कंपनीच्या अनागोंदी कारभारात झालेल्या अरुंद पूल, संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक यांसह अनेक अर्धवट कामांनी वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहा. महामार्ग बनल्यानंतरही या रस्त्यावरील अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सद्यस्थितीत हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करूनदेखील जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षाने हा 'महामार्ग' आणखी किती बळी घेणार ? असा संतप्त सवाल प्रतिक्रिया उमटत आहे.

सांगली-कोल्हापूर या महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे या वाढत्या अपघातांना पायबंद घालण्यासाठी विविध संघटनांच्या जनआंदोलनाने व या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला. ४३ किलोमीटर अंतरासाठी १९६.५ कोटी रुपयांचे हे काम २०१२ साली मुंबईतील सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले. पण कंपनीने हे काम मुदतीत पूर्ण केले नाही. त्यामध्ये कंपनीने महामार्गावरील गतीरोधक नसणे, दिशादर्शक फलक नसणे, गावांच्या लगत सेवा मार्ग नसणे, वेगनियंत्रण नसणे, हातकणंगले येथील अर्धवट अवस्थेत असलेला उड्डाणपूल, रस्त्यांचे चढ उतार, रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसणे, महामार्गावर प्रवाशांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात उभे राहण्यासाठी पिकअप शेड नसणे यांचा समावेश आहे.

अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे गुळगुळीत झाला आहे. काही ठिकाणी भुयारी मार्ग नाहीत. अशा अनेक कारणांमुळे अपघात वाढले आहेत. महामार्गावरील अरुंद पूल, संरक्षक कठड्यांचे अर्धवट बांधकाम व चोकाक फाट्यावरील धोकादायक वळण यांसह अतिग्रे येथे पाणीची मोरी बांधली गेलेली नाही. रुकडी फाट्यावर गतीरोधक नाहीत. तसेच कोल्हापूरहून येत असताना अतिग्रे गावाजवळ रस्ता निमुळता होत गेल्याने अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे.

महामार्गावरील अनेक कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याने मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढल्याने 'सुप्रिमच्या' कारभाराबद्दल मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. यानंतर तीन वर्षांपूर्वी या महामार्गाचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्गाकडे केल्याने या रस्त्याचे भाग्य उजळणार असे वाटत असताना आजअखेर याकडे कोणीही लक्ष दिले गेलेले नाही.

सद्यस्थितीत वारंवार अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या महामार्गावरील अतिग्रे, इचलकरंजी फाटा, रुकडी फाटा, अतिग्रे, चोकाक फाटा, माले फाटा, हातकणंगले बसस्थानक, मजले फाटा आदी अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनली आहेत. हातकणंगले येथील उड्डाणपुलासाठी उभा केलेला सांगडा बेकायदेशीर वाहतुकीचा अड्डा बनला आहे. हे ठिकाण वाहतूकदारांसाठी अपघातास आमंत्रण देणारे ठरत आहे. सांगली फाट्यावरील टोल वसुलीचे शेडही वाहतुकीस अडथळा ठरत आहे.

महामार्गावरील अतिग्रे व हातकणंगले गावाजवळील अनेक कामे संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाची केल्याच्या तक्रारी झाल्यानंतर त्याला काळ्या यादीत टाकले आहे. यामुळे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. या महामार्गाचा नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गात समावेश होऊन जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरु आहे.

-डॉ. सुजित मिणचेकर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वृत्त

0
0

बाजीराव नाळे

कुडित्रे: सांगरुळ (ता. करवीर) येथील बाजीराव ज्ञानदेव नाळे (वय ५४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, चुलते असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार (ता. ३१) सकाळी दहा वाजता सांगरुळ येथे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात ई-चलनद्वारे दंड आकारणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहनांना दंड करणारी पारंपारिक पावती पुस्तके (जीएम) आता हद्दपार झाली आहेत. बेशिस्त वाहनधारकांना जागेवरच दंड करण्यासाठी गुरुवार (ता. ३०) पासून कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेला ५५ ई- चलन मशीन दिली आहेत. त्याद्वारे वाहनधारकांकडून दंड आकारला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. देशमुख म्हणाले, 'पोलिस प्रशासनाने 'एक राज्य एक ई चलन' ही प्रणाली विकसित केली आहे. यापूर्वी मुंबई, ठाणे, पुणे या मेट्रो शहरात लागू केलेली ही प्रणाली कोल्हापुरात सुरु केली आहे. शहर वाहतूक पोलिस आणि वाहनधारकांच्यात दंडात्मक आकारणीवरुन अनेकदा वाद होतात. आता हे वादाचे प्रसंग दिसणार नाहीत. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरासाठी ५५ ई-चलन मशीन दिली आहेत. या मशीनद्वारे गुरुवारपासून दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम मोडल्यास संबधित वाहनाचा त्या ठिकाणीच फोटो काढला जाणार आहे. मोटार वाहन उल्लंघनाचे नियम, कलमनिहाय दंडाच्या रक्कमेची माहिती वाहनधारकाच्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. त्यासह दंडाची रिसीट दिली जाईल. दंड आकारणी डेबिट कार्डद्वारे केली जाईल. कार्ड नसल्यास रोख रक्कम आकारली जाणार आहे. एका वाहनधारकावर राज्यात किती ठिकाणी कारवाई झाली आहे, त्याच्या दंडाची एकत्रित रक्कमेची माहिती या यंत्रणेमुळे उपलब्ध होणार आहे. बेवारस वाहनांची माहिती आणि त्याच्या मूळ मालकाचा शोध घेण्यास ही यंत्रणा उपयोगी पडणार आहे. वारंवार नियम मोडणाऱ्यांची माहितीही मिळेल.'

.....

अपघात रोखा

'अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष खासदार आहेत. त्यासह प्रत्येक पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना त्यांच्या हद्दीतील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मानवी चुका, परिस्थिती आणि वाहनांतील दोष या तीन कारणांमुळे अपघात होत आहेत. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटवर अधिक सुरक्षा आणि आवश्यक त्या उपयायोजना करण्याच्या सूचना संबधित खात्याला दिल्याचे अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

....

अॅप करा डाऊनलोड

शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर म्हणाले,' आपल्या वाहनांवर कारवाई झाली आहे का? यासह अन्य माहिती उपलब्ध करुन घेण्यासाठी Mahatraffic App डाऊनलोड करुन घ्यावे. अॅन्ड्राइड फोनवर हे अॅप डाउनलोड करता येऊ शकते. या अॅपच्या सहायाने संबधित वाहनधारकाला दंडाची रक्कम ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोटार वाहन उल्लंघनाचे नियम, कलमनिहाय दंडाची रक्कम, वाहतुकीचे शिक्षण, ई चलन पेमेंटची माहिती मिळू शकेल.'

...

ठाणेनिहाय मशीन वाटप

शहर वाहतूक शाखा ७

जुना राजवाडा १

लक्ष्मीपुरी १

राजारामपुरी १

शाहूपुरी १

गांधीनगर २

शिरोली एमआयडीसी २

गोकुळशिरगाव पोलिस ठाणे १

करवीर २

जयसिंगपूर २

वडगाव २

इचलकरंजी १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाधिकारी, संस्थाचालकांना फटकारले

0
0

'विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेचीही आहे. विद्यार्थ्यांना प्रवासात दुखापत झाल्यास संबंधित शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना व शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल,' अशा शब्दांत पोलिस अधीक्षकांनी संस्थाचालकांना फटकारले. त्यांनी शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रवासाची नोंद ठेवण्याच्या सूचना केल्या. विद्यार्थी कोणत्या वाहनातून शाळेला ये जा करतो याची माहिती शाळांनी ठेवावी. विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली तरी शाळेला जबाबदार धरले जाईल, असेही त्यांनी सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसाढवळ्या बँक लुटीचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुडित्रे (ता. करवीर) येथील यशवंत सहकारी बँकेच्या आपटेनगर रिंग रोडवरील शाखा गुरुवारी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. भरदुपारी तीन वाजता दोघा दरोडेखोरांनी लिपिकाला पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून पाऊण लाखाची रोकड लंपास केली. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघांनी चेहरे रुमालाने बांधून डोक्याला हेल्मेट घातल्याचे दिसत आहे. बँकेचा लिपिक जेवण करत असताना त्याला पिस्तूल लावून अवघ्या पाच मिनिटांत दरोडेखोर रोकड घेऊन पसार झाले. या प्रकारामुळे उपनगरात खळबळ उडाली.

आपटेनगर रिंगरोड येथे एका खासगी इमारतीच्या गाळ्यात यशवंत बँकेची सुरु आहे. गुरुवारी शाखा व्यवस्थापक अशोक तोडकर, लिपिक दर्शन निगडे बँकेत आले. शिपाई रजेवर असल्याने दोघेच बँकेचे व्यवहार दिवसभर सांभाळत होते. तोडकर दुपारी अडीच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले. निगडे दुपारच्या सुट्टीत टेबलवर जेवण करीत बसले होते. त्यावेळी तोंडाला स्कार्प आणि डोक्याला हेल्मेट घातलेले दोघे तरुण बँकेत घुसले. त्यांनी निगडे यांच्या पोटाला पिस्तूल लावले. दुसऱ्या तरुणाने कोयत्याचा धाक दाखविला. 'साहेब कुठे आहे, त्याला लगेच फोन करुन बोलाव,' असे दरडावले. त्यावेळी साहेब बाहेर गेल्याचे निगडे यांनी सांगितले. त्यावर 'कॅश कुठे ठेवली आहे, स्टोअर रुम कुठे आहे त्याची चावी दे,' म्हणत दमदाटी केली. अचानक झालेल्या या प्रकाराने निगडे घाबरले. त्यांनी स्ट्रॉग रुमची चावी शाखा व्यवस्थापक सोबत घेवून गेल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणाने व्यवस्थापकाच्या टेबलची झडती घेतली. त्याच्या हाती ६२ हजार ११० रुपये लागले. ही रोकड काढून घेण्यासाठी निगडे दरोडेखोरांच्या मागे धावत गेले. मात्र त्यांच्यावर पुन्हा पिस्तूल रोखले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच दरोडेखोर पसार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरः बदलीसाठी ‘महसूल’ चे चढे दर!

0
0

कोल्हापूरः

जिल्हाधिकारी कार्यालयासह महसूल प्रशासनातील बदल्यांची प्रक्रिया चार दिवसांत पूर्ण करण्याची धांदल सुरू झाली आहे. एकूण आस्थापनेच्या ३० टक्केप्रमाणे बदलीपात्र कर्मचाऱ्यांकडून बदलीनंतर हव्या असलेल्या दहा ठिकाणांची नावे घेण्यात आली आहेत. सर्वाधिक कर्मचाऱ्यांनी जमीन महसूल, गृह, गावठान या मलईदार टेबलची मागणी केली आहे. परिणामी हव्या त्या ठिकाणी बदल्यासाठी 'महसूल'चा दर सहा अंकी आकड्यापर्यंत जाऊन पोहचला आहे. मनाप्रमाणे बदलीचे ठिकाण मिळाल्यानंतर ठरलेली रक्कम हवाला पध्दतीने देण्याची अट घालण्यात आली आहे. यामुळे रॅकेट तयार झाले आहे.

महसूल प्रशासनात मंडल कार्यालयात काम करणारे मंडल अधिकारी (सर्कल), जिल्ह्यातील तहसील, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून, लिपिक - टंकलेखकांच्या बदलीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. एकाच टेबलवर तीन वर्षे आणि विभागात सहा वर्षे पूर्ण झालेल्या बदलीस पात्र असलेल्यांना बदलीनंतरच्या ठिकाणांसाठीचे अर्ज मागवून घेतले आहे. अर्जात प्राधान्यक्रमाने दहा ठिकाणे देण्याची संधी आहे. त्यात अव्वल कारकून, लिपिक - टंकलेखकांनी जमीन, महसूल, गावठान, गृह शाखेला अधिक पसंती दाखवली आहे. या विभागात आणि टेबलला नियमाची आडकाठी आणून पैसे गोळा करता येतात, हे जगजाहीर आहे. जमीन महसूलच्या एका आदेशाने लाखो, कोटींचे व्यवहार होतात. त्याप्रमाणे कमाई होत असते. म्हणूनच येथील नियुक्तीसाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.

गृह शाखेत खेळ, स्वसंरक्षण, वन्यप्राण्यांसाठीचे बंदूक परवाना देणे तसेच नुतनीकरणाचे काम चालते. स्वसंरक्षणासाठी बंदूक वापरणारे बहुतांशीजण श्रीमंत वर्गातील आहेत. ते सहजपणे ४० ते ५० हजार रूपये खर्च करतात. नविन बंदूक परवान्यासाठी लाखांत मागणी केल्यास रक्कम मिळू शकते, असा समज आहे. म्हणून हे विभाग आणि टेबल मिळण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळते. 'साहेबां'च्या जवळच्यांना हे टेबल, विभाग मिळतात, असे यापूर्वीच्या दोन, तीन वर्षांचा अनुभव आहे. यंदा या 'क्रिम' विभागाचा दर कमीत कमी अडीच ते पाच लाखांवर गेल्याचे सांगण्यात येते.

'महसूल प्रशासनातील बदल्यांच्या प्रक्रियेत वशिलेबाजी, आर्थिक देवाणघेवाण झाल्यास भ्रष्टाचार फोफावतो. फाइलमध्ये 'अर्थ' शोधण्यावर भर दिला जातो. यामुळे पारदर्शकपणे बदल्यांची प्रक्रिया होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालावे. - दिलीप देसाई, सामाजिक कार्यकर्ते

१४९ कर्मचारी बदलीपात्र

जिल्ह्यात लिपिक, टंकलेखकच्या २४४ पैकी ७३, अव्वल कारकूनच्या १८० पैकी ५४ तर मंडल अधिकाऱ्यांच्या ७२ पैकी २२ जण बदलीस पात्र आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग, करवीर प्रांताधिकारी, करवीर तहसीलदार, शहर पुरवठा विभागातील ४५ कर्मचारी बदलीस पात्र आहेत. दिव्यांग, अंध, गंभीर आजारी, पत्नी, पत्नी एकत्रीकरण, विधवा, कुटुंबातील एक सदस्य गंभीर आजारी, सेवाज्येष्ठता या निकषानुसार बदली करणे बंधनकारक आहे. मात्र यातूनही पळवाट शोधून अर्थपूर्ण वाटाघाटी झालेल्यास मलईदार ठिकाण दिले जात असल्याचा आरोप होत आहे.

कारकून मास्टरमाईंड

आस्थापन शाखेतील एक अव्वल कारकून बदलीतील वसुलीमध्ये मास्टरमाईंड आहे. तो 'साहेबां'चा खास असल्याने अर्थपूर्ण घडमोडीनंतर बदलीचे कमाईदार टेबल मिळत असल्याची खात्री कर्मचाऱ्यांना झाली आहे. यामुळे बदलीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचा भाव वधारलेला असतो. बदलीचा आदेश मिळाल्यानंतर ठरलेली रक्कम हवाला पध्दतीने पोहच केली जाते. त्या रक्कमेचे टक्केवारीनुसार वाटप होत असल्याचेही बोलले जाते. अलिकडे दोन महिन्यातील 'त्या' अव्वल कारकुनाच्या मोबाइलवरील कॉलची तपासणी केल्यास बदलीतील रॅकेटची पाळेमुळे समेार येतील, असेही अनेक प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समायोजनाने १८० कर्मचाऱ्यांच्या बदल्या

0
0

जि.प.चा लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील विविध विभागातील वर्ग तीनमधील १८० कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय, विनंती आणि आपसी बदली अंतर्गत ही प्रक्रिया झाली. दुसऱ्या दिवशी १०३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यामध्ये आरोग्य, वित्त, महिला व बालकल्याण, बांधकाम, पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जि.प.मध्ये बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवसाच्या कालावधीत समायोजनेतंर्गत बदली प्रक्रिया राबवली. दहाहून अधिक विभागातील वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या झाल्या. बुधवारी ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. गुरुवारी पाच विभागातील कर्मचाऱ्यांसाठी प्रक्रिया राबवली. औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक लेखा, कनिष्ठ सहायक लेखा, कनिष्ठ शाखा अभियंता, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षकांचा समावेश आहे. यामध्ये आरोग्य विभागातील ७८, वित्त विभागातील पाच, बांधकाम विभागातील नऊ, पशुसंवर्धन विभागातील नऊ कर्मचारी आहेत.

.......

पदाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

समायोजनद्वारे बदली प्रक्रिया सुरू असताना जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी उपस्थित राहून आढावा घेतला. यावेळी सीईओ अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः शहरवासीयांना चढला 'वर्ल्ड कप फिव्हर'

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

यजमान इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामन्याने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेस गुरूवारी शानदार प्रारंभ झाला. भारताचा सामना पाच जूनला दक्षिण अफ्रिकेशी असून भारत विश्वचषक जिंकणार असा चाहत्यांचा विश्वास असल्याने वर्ल्ड कप फिव्हर शहरात दिसू लागला आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीतही कोल्हापूरकरांनी आयपीएलचा आनंद लुटला होता. आयपीएलनंतर आता वर्ल्ड कप पाहण्यासाठी क्रिकेट रसिक सज्ज झाले आहेत. विश्वचषकाचे वेळापत्रक पाहून भारताच्या सामन्यादिवशी सुट्टी कशी मिळेल यासाठी नोकरदार मंडळीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. नऊ सामन्यांपैकी चार सामने रविवारी तर एक सामना चौथ्या शनिवारी असल्याने रसिकांना क्रिकेटचा आनंद लुटता येणार आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लड आणि श्रीलंका यांच्याशी भारताचे सामने रविवारी आहेत.

वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी एलईडी टीव्ही खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करणाऱ्या शोरुमकडे विचारणा होत आहे. तसेच सुट्टीदिवशी सामना पाहण्यासाठी फार्म हाऊस बुक केली आहेत. हौशी क्रिकेट शौकिन थेट इंग्लंडला जाऊन सामना पाहणार आहेत. ऑनलाईन तिकीट विक्रीकडे क्रिकेट शौकिन लक्ष ठेवून आहेत.

भारतीय संघाच्या जर्सीची विचारणा बाजारात होऊ लागली आहे. खेळाचे साहित्य विक्री करणारी दुकाने सज्ज झाली असून शाळकरी विद्यार्थ्यांकडून महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्या पोस्टरची मागणी होऊ लागली आहे. सध्या सुट्टी असल्याने मैदानावर व मोकळ्या जागेत क्रिकेटचे सामने होऊ लागले आहेत. चौकाचौकात आणि रस्त्यांवर नाईट क्रिकेट सामने खेळणारी तरुणाई दिसू लागली आहे. १६ जून रोजी हाोणाऱ्या भारत पाक सामन्यावर पैजाही लागू लागल्या आहेत. सामन्याचा एकत्रित आनंद लुटण्यासाठी मंडळे व तालमीकडून चौकाचौकात स्क्रीन लावण्याचे नियोजन सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप - चित्र

घरकाम करत ऋतुजानेमिळवले लख्ख यश

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम त्यांच्या घरची परिस्थिती सामान्य. दोघी बहिणी. वडिलांचा मेसचा व्यवसाय म्हणजे बेभरवशाच्या उत्पन्नाचा स्रोत. अशा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत ऋतुजा आनंद खुताळे हिने बारावीच्या परीक्षेत ८१.५४ टक्के गुण मिळवले. पहाटे तीन वाजता उठायचे. अभ्यास, घरकाम करायचे. कॉलेज सुटल्यानंतर घरकाम असा दिनक्रम असलेल्या ऋतुजाने हे यश मिळवले. ऋतुजाचे मूळ गाव कागल तालुक्यात वाळवे खुर्द. प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील शिक्षण सिद्धनेर्ली येथे झाले. त्यानंतर आनंद खुताळे हे पाच वर्षांपूर्वी मुलींच्या शिक्षणासाठी कोल्हापुरात आले. सायबर चौकात हॉटेल आणि मेस चालवून ते चरितार्थ चालवतात. येथील एनसीसी भवनजवळ ते राहतात.छोट्याशा भाड्याच्या घरात राहून ते जिद्दीने मुलींना शिक्षण देत आहेत. ऋतुजा पहिल्यापासूनच हुशार आहे. राजाराम कॉलेजला ११ वीला प्रवेश मिळाल्यानंतर तिने नियमित अभ्यासाची सवय लावून घेतली. रोज पहाटे लवकर उठून अभ्यास करायचा, कॉलेजला जावून आल्यानंतर घरकामात मदत करायची असा तिचा दिनक्रम राहिला. अभ्यासात सातत्य राहिल्याने चांगले यश मिळवले. पुढे तिला स्पर्धा परीक्षेतून आयपीएस, पीएसआय व्हायचे आहे. त्यासाठी ती राजाराम कॉलेजमध्येच बी.एला प्रवेश घेणार आहे. बी.ए करत ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉ. गोविंद पानसरे युवाजागर शिबिराचे उद्घाटन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम येथील श्रमिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा येथील संजीवन इंजिनीअरिंग महाविद्यालयात आयोजित कॉम्रेड गोविंद पानसरे युवाजागर राज्यस्तरीय निवासी प्रबोधन शिबिराचे उदघाटन ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ३१ ) सकाळी ११ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार असतील. याप्रसंगी संजीवन नॉलेज सिटीचे संस्थापक प्रा. पी. आर. भोसले, प्रा. एन. आर. भोसले, 'इंडियन जर्नल ऑफ सेक्युलॅरिझम'चे संपादक इरफान इंजिनीअर, काश्मिर प्रश्नाचे अभ्यासक जतीन देसाई, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते शेखर सोनाळकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जगातील सर्वात प्राचीन महान सभ्यतांमधील एक असणाऱ्या भारताने आपली बहुविधता सातत्याने जोपासली आहे. अनेक भाषा, वंश,जाती, धर्म, भाषा असणारा भारत बहुविध संस्कृतीचा मिलाफ घडवितो. अशा या भारताच्या अनोख्या बहुविविधतेची ओळख करून देणारे कॉम्रेड गोविंद पानसरे युवाजागर राज्यस्तरीय प्रबोधन शिबिर पन्हाळा (जि. कोल्हापूर) येथे ३१ मे ते २ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे यंदा चौथे वर्ष असून, यामध्ये महाराष्ट्रातून १०० हून अधिक युवक-युवती, शिक्षक-प्राध्यापक सहभागी होणार आहेत. या सहभागी शिबिरार्थीना 'आपला भारत-बहुविध भारत' या बीजविषयाशी संलग्न उपविषयांवर राज्यातील नामवंत विचारवंतांचे मार्गदर्शन लाभणार आहे. उद्घाटन सत्रात ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी 'जागतिक व भारताच्या संदर्भात सांस्कृतिक बहुलवाद' या विषयावर बीजभाषण करणार आहेत. तसेच आणखी एका स्वतंत्र सत्रात ते 'भारतातील हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन सहअस्तित्व' या विषयावर विवेचन करणार आहेत. तसेच या तीन दिवसीय निवासी शिबिरात ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे 'पूर्वग्रह, परकेपणा आणि संवाद' या विषयावर, 'इंडियन जर्नल ऑफ सेक्युलॅरिझम'चे संपादक इरफान इंजिनीअर 'ऐतिहासिक व भौगोलिक परिप्रेक्ष्यातून भारतीय बहुधार्मिकता' या विषयावर, तिहेरी तलाकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या हसीना खान 'भारतातील धर्म-जमातवाद आणि स्त्रिया' या विषयावर, लेखिका श्रुती तांबे 'भौगोलिक व सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून पितृसत्ताक व भारतीय स्त्री' या विषयावर, अरुणाचल प्रदेश येथील संशोधक विद्यार्थीनी टर्बी लोयी 'ईशान्य भारताचे सांस्कृतिक अनोखेपण', प्राचार्य आनंद मेणसे 'भारतीय जातवास्तव व विद्रोह', विद्रोही कवी वाहरू सोनवणे 'आदिवासी संस्कृती व भारत', सुप्रसिद्ध साहित्यिक राजन गवस 'लोकसंस्कृती व भारत', ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते शेखर सोनाळकर 'भारताचा स्वातंत्र्यलढा,बहुविधता व धर्मनिरपेक्षता', साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक दिलीप बोरकर 'गोवन संस्कृती', ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई 'काश्मिरीयत आणि काश्मीर', लेखक-अनुवादक गणेश विसपुते 'कला-साहित्य-संस्कृती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य', आणि समाजविज्ञान अकादमीचे संस्थापक तथा ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई 'जागतिकीकरण आणि २१ व्या शतकातील संस्कृती, बहुविधता व सहअस्तित्वाचा प्रश्न' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात विविध विषयांवर चर्चा व लघुपटांचे प्रदर्शनही करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनवाढीसाठी हवेत प्रयत्न

0
0

अपेक्षा

..............

पर्यटन

..............

कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे. जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभला आहे. बारा महिने पर्यटक आकर्षित होतील अशी ठिकाणे आहेत. या साऱ्या घटकांची योग्यरित्या जाहिरातबाजी करुन परराज्यातील पर्यटकांना आकर्षित करणारे धोरण आखावे. ठिकठिकाणी अॅडव्हेंचर पार्क करावेत. त्याचबरोबर पर्यटक, भाविकांसाठी वाहतुकीची सुविधा, पार्किंगची सोय केल्यास कोल्हापूरच्या पर्यटन वाढीला चालना मिळेल. यासाठी नूतन खासदारांनी प्रयत्न करावेत, अशा अपेक्षा पर्यटन क्षेत्राशी संबंधित जाणकारांनी व्यक्त केल्या.

...........

विमाने सकाळच्या टप्प्यात यावीत

कोल्हापुरात देवदर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्या भाविकांचे पर्यटकांत रुपांतर झाले तर पर्यटन वाढीला चालना मिळेल. खासदारांनी अनिवासी भारतीय व परदेशी नागरिकांना कोल्हापूरकडे आकर्षित करण्यासाठी दूतावासामार्फत प्रयत्न गरजेचे आहेत. कोल्हापूर परिसर बारा महिने पर्यटनासाठी सज्ज आहे. कोल्हापुरात बाहेरुन येणारी विमाने सकाळी यावीत, जेणेकरुन बाहेरील पर्यटकांसाठी ते उपयुक्त ठरेल.

वासीम सरकवास, पर्यटन सल्लागार

........................

टुरिझम मॅनेजमेंटची शाखा सुरू करावी

पर्यटन विकासासाठी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार केला पाहिजे. पर्यटन विकास हा केवळ शहरापुरता मर्यादित न राहता तो जिल्ह्याचा असावा. केंद्र सरकारच्या अखत्यारित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम मॅनेजमेंटची, कोल्हापुरात शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे तरुणांना रोजगार मिळू शकेल आणि पर्यटनामध्ये ज्यांना करिअर करायचे आहे त्यांना ठिकठिकाणी संधी मिळेल.

सिद्धार्थ लाटकर, हॉटेल व्यावसायिक

....................

जिल्ह्यात अॅडव्हेंचर पार्कची गरज

कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या पाहिजेत. भुदरगड, आंबा, गगनबावडा, पन्हाळा, पारगड अशा पर्यटनानच्या दृष्टीने नावाजलेल्या ठिकाणी पर्यटकांच्या निवासासाठी मूलभूत सुविधा कराव्यात. जिल्ह्यातील पर्यटनाच्या ठिकाणी अतिक्रमण वाढत आहे. ते अतिक्रमण हटविले पाहिजे, परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. ऐतिहासिक पर्यटन वाढले आहे. जिल्ह्यात अॅडव्हेंचर पार्क करायला हवेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे, खासदारांनी प्रयत्न करावेत.

प्रमोद पाटील, गिर्यारोहक

............

पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी प्रयत्न आवश्यक

पर्यटक व भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापूर शहर व जिल्ह्यात पथदर्शी फलक लावावेत. ऐतिहासिक, धार्मिक व प्राचीन वास्तूंची बाहेरील लोकांना माहिती मिळायला हवी. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची अन्य राज्यात जाहिरात केली पाहिजे. जोपर्यत योग्यरित्या प्रसिद्धी होत नाही, तोपर्यंत पर्यटकांचा ओघ वाढणार नाही. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारावी. पार्किंगची ठिकठिकाणी सोय करावी. मध्यवर्ती बसस्थानक परिसर, रेल्वे स्थानक या ठिकाणी पर्यटनस्थळांचे ठळक बोर्ड पाहिजेत.

केदार गयावळ, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा कार ऑपरेटर असोसिएशन

........................

ऐतिहासिक वास्तूंची प्रसिद्धी देशभर करावी

कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभला आहे. प्राचीन मंदिरे आहेत. गडकिल्ले, प्राचीन वास्तूंच्या संवर्धन व जपणुकीसाठी प्रयत्न गरजेचे आहेत. ऐतिहासिक वास्तू परिसरात पर्यटक, अभ्यासकांच्या दृष्टीने आवश्यक सुविधा कराव्यात. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. पर्यटकांना उपयुक्त ठरतील असे माहितीयुक्त फलक असावेत. वाहतुकीची सुविधा असावी. कोल्हापुरातील पर्यटनस्थळे, वास्तूंची देशभर प्रसिद्धी झाल्यास लोक आकर्षित होतील.

समीर कुलकर्णी, नागरिक

.................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यायी पूलाचे काम आज होणार पूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यायी शिवाजी पुलाचे काम शुक्रवारी दुपारी बारापर्यंत पूर्ण होत असून पुलाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करायचे, यासंबंधी वाद निर्माण झाला आहे. यामुळे नव्या पुलावरून कधी वाहतूक सुरू होणार, यासंबंधी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून स्पष्ट करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, नव्या पुलावरून वाहतूक सुरळीत झाल्यानंतर जुना पूल वाहन वाहतुकीस बंद करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

जुन्या पुलाचे आयुर्मान संपल्याने २०१२ मध्ये नविन पुलास मंजुरी मिळाली. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रयत्नातून १८ कोटींचा निधी मंजूर झाला त्यामुळे काम ७० टक्के पूर्ण झाले होते. पुरातत्व विभागाच्या परवानगीअभावी २०१५ मध्ये काम बंद झाले. जनरेट्याच्या ताकदीमुळे १५ ऑक्टोबर २०१८ मध्ये पुन्हा काम सुरू झाले. ठेकेदार आसमास कंपनीतर्फे काम केले जाऊ लागले. दरम्यान, ठेकेदाराचे बिल थांबल्याने ४ फेब्रुवारी, २०१९ मध्ये पुन्हा काम बंद झाले. अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून पुलाचे काम पुर्णत्वाकडे जात आहे. गुरुवारी दिवसभर फिनिशिंग, रंगरंगोटी केली जात आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता पुलाचे काम पूर्ण होणार आहे. याच दिवशी शेवटच्या टप्यात पुलाच्या कामास गती दिलेले राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा कार्यभार वाय. जी. लवटे यांनी स्वीकारणार आहेत.

पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्वरित त्यावरून वाहतूक सुरू करावी. रीतसर उद्घाटन करूनच वाहतूक चालू करण्यासंबंधीची भूमिका लोकप्रतिनिधींनी घेऊ नये. जनरेट्यामुळे काम पूर्ण झाल्यामुळे उद्घाटनाचा फार्स करणे चुकीचे आहे.

अशोक पोवार, सदस्य, सर्वपक्षीय शिवाजी पूल नागरी कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी रडणारा नव्हे, लढणारा कार्यकर्ता

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'लोकशाहीत हार-जीत होत असते. पराजयाने रडणारा नव्हे, मी शेतकऱ्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. दुष्काळाच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठी संकटे उभी आहेत. अजून कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत. साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. पाऊस कधी पडेल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी यापुढेही रक्ताचे पाणी करू,' असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

कोपार्डे (ता. करवीर) येथे कार्यकर्त्याच्या लग्न समारंभासाठी आले असता यशवंत बँकेत त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेट्टी यांची भेट घेऊन तुमच्या पाठीशी ठामपणे असल्याचा विश्वास दिला.

यावेळी राजू शेट्टी पुढे म्हणाले, ' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या लोकप्रियतेची काळजी असते. हा माणूस लबाड आहे हे समजल्यानेच आणि त्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष पाहूनच त्यांची साथ सोडली. खासदारकी हे काय माझ्या जगण्याचे साधन नाही, तर शेतकऱ्यांसाठी चळवळ मोठी करणे हा हेतू आहे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा म्हणून मी जनाधाराच्या जोरावर जनआंदोलन उभा केले होते. लोकसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला व हमीभावाला वाचा फोडण्यासाठी खासदारकीचा उपयोग होत होता. पण झालेल्या पराभवामुळे शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. माझ्याबद्दल कुठेही नाराजीचा सूर नसताना, कोणत्याही एक्झिट पोलमध्येही कुठे पराभवाचे भाकित झाले नसताना हा पराभव अकल्पित आहे. माझा पराभव हा जनतेने नव्हे तर ईव्हीएम मशीनने केला आहे. मागील निवडणुकीत नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेती मालाला हमीभावचे आश्वासन दिलेले कोणतेच आश्वासन जाहीरनाम्यात दिले नसतानाही भाजपला यश मिळते याला काय म्हणायचे?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, संचालक बाजीराव खाडे, सर्जेराव पाटील, विक्रम पाटील, सागर पाटील, 'स्वाभिमानी'चे बाजीराव देवाळकर, एम. के. पाटील, पांडुरंग शिंदे, रामचंद्र पाटील, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी स्टेडियमचा विकास करू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमचा लोकसहभागातून विकास करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतील. याशिवाय सरकारच्या 'खेलो इंडिया' योजनेतून एक कोटी २० लाखांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले.

शिवाजी स्टेडियमची देखभाल, दुरुस्ती, सेवा, सुविधा देण्याची मागणी क्रीडाप्रेमी समितीतर्फे देसाई यांच्याकडे केली होती. त्यापार्श्वभूमीवर देसाई यांनी सकाळी दहा वाजता स्टेडियमची पाहणी केली. त्यानंतर तेथेच बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

देसाई म्हणाले, 'स्टेडियमच्या विकासासाठी उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहेत. ते वाढवण्यासाठी उपाय योजना केल्या जातील. स्टेडियमधील गाळे भाडेवाढीच्यादृष्टीने विचार केला जाईल. कार्यक्रमासाठी मैदान देताना एक लाख आणि दुरुस्तीसाठी १५ हजार रुपये दिवसाला भाडे आकारले जाते. कार्यक्रमासाठी मैदान दिले नाही तर इतके उत्पन्न कमी होईल. जलतरण तलाव चांगल्या दर्जाचा होण्यासाठी २० ते २२ लाखांची गरज आहे.

अशोक पोवार म्हणाले, 'मैदानात वारंवार पाणी मारावे लागते. वीज पंपाद्वारे उपसून पाणी मारावे लागत असल्याने वीजबील जास्त येते. त्याचा आर्थिक भार पडत आहे. यासाठी जवळपासच्या रहिवाशांच्या विहिरीतील पाण्याचा वापर करावा. केएसएचे सचिव माणिक मंडलिक यांनी महानरपालिकेच्या मुख्य वाहिनीतून मैदानासाठी पाणी घ्यावे, असे सुचवले. शिष्टमंडळातील काही सदस्यांनी जयंती नाल्यातील प्रक्रिया केलेले पाणी मैदानासाठी वापरावे, अशीही मागणी केली.

जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, सुहास साळोखे, जयकुमार शिंदे, किसनराव कल्याणकर, किशोर घाटगे, अॅड. पंडीतराव सडोलीकर, लालासाहेब गायकवाड, राहुल चौधरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवक संघातर्फे सेवानिवृत्तांचा सत्कार

0
0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ सेवेतून दीर्घकाळ विद्यापीठाची सेवा करून ३१ मे रोजी निवृत्त होत असलेल्या दहा कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांच्या हस्ते संघाच्या कार्यालयात सर्वश्री विष्णू खाडे, नामदेव ढवळे, शिवाजी मोरे, प्रकाश चौगुले, बाबासाहेब पाटील, मारुती मगदूम, शिवाजी एकशिंगे, केरबा सिद्धनेर्ली, मारुती पाटील व धोंडीराम कुपटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश गवळी, अभिजित लिंग्रस, शफीक देसाई, सुरेखा आडके यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकेशन्स कमी, भाडे जादा

0
0

मालिका भाग १

........

लीड

कोल्हापूर हे मराठी सिनेमांचे माहेरघर समजले जाते. मात्र गेल्या काही वर्षात येथील सिनेमा निर्मितीला घरघर लागली. स्टुडिओचे अस्तित्व संपले. दरम्यान, येथील चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारने गेल्या चार दशकांपासून रखडलेल्या चित्रनगरीला उर्जितावस्था दिली. चित्रनगरी विकसित करताना तांत्रिक बाबी विचारात घेतल्या नाहीत. शुटींगसाठी लोकेशन्स विचारात घेताना कोल्हापूरची वैशिष्ट्ये, ग्रामीण संस्कृतीकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे. शिवाय चित्रनगरीचे मार्केटिंगकडे झालेले दुर्लक्ष, निर्माता, दिग्दर्शकांना आकर्षित करण्याच्या धोरणाचा अभाव यामुळे चित्रनगरी खऱ्या अर्थाने बहरली नाही. चित्रनगरीतील त्रुटींचा घेतलेला आढावा....

........................

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला उर्जितावस्था देण्यासाठी चित्रनगरी अद्ययावत करण्याचे ठरले. राज्य सरकारने बारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. त्याद्वारे चित्रनगरीत विविध सुविधा आणि ३५ लोकेशन्स विकसित केल्याचा गाजावाजा व्यवस्थापन करत आहे, मात्र विकसित केलेल्या लोकेशन्समध्ये कमतरता आहेत. चित्रीकरणासाठी आवश्यक सुविधा, तांत्रिक बाबी विचारात घेतलेल्या नाहीत, असा आक्षेप सिनेव्यावसायिकांनी नोंदविला आहे. याठिकाणी गेल्या वर्षभरात एकाही सिनेमाचे अथवा मालिकेचे चित्रीकरण झालेले नाही.

राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून चित्रनगरीचा विकास केला. पण त्याचे मार्केटिंग मोठ्या शहरात झाले नाही. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि चित्रनगरीचे व्यवस्थापनचा उदासीन दृष्टीकोन सुद्धा त्याला कारणीभूत आहे. चित्रनगरीमध्ये विविध सुधारणा केल्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये एका सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरात मात्र एकाही सिनेमा अथवा मालिकेचे शुटिंग झालेले नाही. योग्य देखभालीअभावी तयार केलेल्या लॉनची दुरवस्था होत आहे. तलावात कचरा साठत आहे. बगिचाची निगराणी राखलेली नाही.

दीड, दोन वर्षांपूर्वी चित्रनगरी विकसित करताना पाटीलवाडा, पाटीलवाडाचा पहिला फ्लोअर, स्टुडिओ, बंगला, पोलिस स्टेशन, कोर्ट, कॉलेज, बस स्टॉप, हॉस्पिटल, बँक, बगिचा, रस्ते, शॉपिंग मॉल असे लोकेशन्स तयार केले. हे लोकेशन्स तयार करताना उपलब्ध इमारतीचा व जागेचा बहुउद्देशीय वापर आवश्यक होता याकडे सिनेमा व्यावसायिक लक्ष वेधत आहेत.

कला दिग्दर्शक अमर मोरे म्हणाले, 'सिनेमा निर्मिती करणाऱ्या संस्थांना उत्तम चित्रीकरण स्थळासह शूटींगसाठी आवश्यक साहित्याची (प्रॉपर्टी) आवश्यकता आहे. मात्र चित्रनगरीत कुठल्याही लोकेशन्ससाठी आवश्यक प्रॉपर्टी नाही. हॉस्पिटल, वाडा, कॉलेज, कोर्ट, पोलिस स्टेशन उभारणीसाठी पूरक साहित्याची गरज भासते. मात्र चित्रनगरीच्या व्यवस्थापनकडून प्रॉपर्टी उपलब्ध करुण देण्यासाठी कसल्याच हालचाली होत नाहीत. नूतनीकरण करताना 'पाटील वाडा'चे रुप बदलले. जुन्या इमारतीवर नवीन बांधकाम केले. मात्र हा बदल करताना कोल्हापूरच्या ग्रामीण संस्कृतीचा विचार केला नाही.'

..............

कोट

'चित्रनगरीचा कायापालट करताना चित्रीकरणासाठी आवश्यक तांत्रिक बाबी विचारात घेतलेल्या नाहीत. यामुळे चित्रनगरीतील लोकेशन्सवर मर्यादा पडत आहेत. चित्रनगरीचे व्यवस्थापन ३५ लोकेशन्सचा गाजावाजा करत असली तरी प्रत्यक्षात केवळ ५ लोकेशन्स चित्रनगरीत दिसतात.चित्रनगरीतील सुविधेसंदर्भात सिनेमा व्यावसायिकांनी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. पण त्यांचे म्हणणे विचारात घेतले नाही. सिनेमा व्यावसायिकांचे म्हणणे विचारात घेऊन चित्रनगरीचा दुसरा टप्पा विकसित होणे गरजेचे आहे.

मिलिंद अष्टेकर, माजी उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

............

भाडेशुल्कात कपात, मेकअपरुमची गरज

चित्रनगरीतील विविध ठिकाणांवरील शूटींगसाठी भाडेनिश्चिती केली आहे. मात्र हे शुल्क जादा असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चित्रनगरीकडे निर्मात्यांना आकर्षित करुन घेण्यासाठी प्रारंभीच्या कालावधीत भाडेशुल्कात कपात करावी यासाठी सिनेमा व्यावसायिकांनी पत्रव्यवहार केला आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्चून पूर्वीच्या लोकेशन्समध्ये सुधारणा केल्या. पण कलाकारांसाठी कुठेही मेकअपरुम नाही. पूर्ण आकारातील आरसे नाहीत. यामुळे कलाकारांना मेकअपर करताना अडचणी उद्भवत आहेत. कँटीनची कसलीही सुविधा नाही.

.............................

(पूर्वार्ध)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images