Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोलापुरात ३०४ टँकरने पाणीपुरवठा

$
0
0

सोलापूर :

मे अखेरला जिल्ह्यातील टँकरची संख्या ३०० पार केली आहे. २५ मे अखेरला जिल्ह्यात २६६ गावांतील ६ लाख ८ हजार ७१६ लोकांना ३०४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक ५७ टँकर मंगळवेढा तालुक्यात सुरू आहेत. या शिवाय खासगी मालकीच्या १६९ विहिर, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाऊस लांबल्यास टँकरच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. यामध्ये खासगी २८६ तर सरकारी १८ टँकरचा समावेश आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील १५ गावांतील ५२ हजार ६५३ लोकांना १८ टँकरने, बार्शी तालुक्यातील १९ गावातील ३९ हजार ७५० लोकांना १७ टँकरने, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १७ गावांतील ७२ हजार ६०६ लोकांना २५ टँकरने, अक्कलकोट तालुक्यातील १२ गावांतील २५ हजार ४४९ लोकांना १२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

माढा तालुक्यातील २४ गावांतील ७१ हजार २२९ लोकांना २९ टँकरने, करमाळा तालुक्यातील ४८ गावांतील ९७ हजार ६८६ लोकांना ४९ टँकरने, पंढरपूर तालुक्यात एका गावाला एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मोहोळ तालुक्यात १७ गावांतील ४६ हजार ८८ लोकांना २३ टँकरने, सांगोला तालुक्यात ४८ गावांत ७७ हजार ६८० लोकांना ५५ टँकरने, मंगळवेढा तालुक्यात ५० गावांतील ८८ हजार ३८६ लोकांना ५७ टँकरने तर माळशिरस तालुक्यातील १५ गावांतील ३४ हजार ३८४ लोकांना १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

३०४ टँकरच्या ६६६ खेपा

जिल्ह्यात ३०४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रतिदिन ६६६ खेपा केल्या जात आहेत. करमाळा तालुक्यात सर्वाधिक १२४.५० खेपा केल्या जात आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात ३१.५०, बार्शी तालुक्यात ३४.५०, दक्षिण सोलापूर ५७, अक्कलकोट तालुक्यात २६.५०, माढा तालुक्यात ६९.५०, करमाळा तालुक्यात १२४.५०, पंढरपूर तालुक्यात २, मोहोळ तालुक्यात ६०, सांगोला तालुक्यात १२१, मंगळवेढा तालुक्यात ९७ तर माळशिरस ४२.५० खेपा होत आहेत.

हिळ्ळी बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय

अक्कलकोटसह शेजारील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी हिळ्ळी बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला. सोलापूर शहर व भीमा नदीवरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठीच्या आवर्तनाच्या वेळी चिंचपूर कोल्हापूर बंधाऱ्याच्या खालील भागात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताराः माण-खटावला शरद पवारांकडून १ कोटी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी खटाव-कोरेगाव तालुक्यातील पाणी फाउंडेशन स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या गावांना एक कोटींचा निधी खासदार फंडातून दिला. डिस्कळ पाणीपुरवठा योजनेकरीता खासदार वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीमधून भरीव निधी देण्याची घोषणा ही त्यांनी केली आहे. तसेच परिसरात पवार चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत पिण्याच्या पाण्यांचे टँकर सुरू करण्यात आले आहेत.

डिस्कळ येथून मोळ-मांजरवाडी नवीन पाणीपुरवठा योजना आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून मार्गी लावण्यात आली आहे. ही नवीन पाणी योजना पूर्ण झाल्यावर मोळ-मांजरवाडी या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भविष्यात भेडसावणार जाणार नाही, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी विविध दुष्काळी गांवांना भेटी देताना दिली. शरद पवार, उदयनराजे भोसले. आमदार शशिकांत शिंदे यांनी माण-खटाव-पूर्व कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी, नागेवाडी, डिस्कळ, मोळ, मांजरवाडी या गावांच्या दुष्काळाचा आढावा घेतला.

चिलेवाडीच्या दुष्काळ निवारणासाठी निधी देणार

राज्य सरकारला दुष्काळाबाबत गांर्भीय नाही. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर देता, मात्र जनावरांच्या पाण्यासाठी सरकार खर्च करीत नाही, ही काही चांगली गोष्ट नाही. दुष्काळ निवारणासाठी आपण सरकारवर विसंबून न राहता, आपले प्रश्‍न आपणच सोडवू शकतो, हा इतिहास घडवायचा आहे, असा निर्धार शरद पवार यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा धुरळा खाली बसतो ना बसतो, तोच खासदार पवार यांनी दुष्काळी भागाच्या दौऱ्यास सुरुवात केली आहे. कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी आणि नागेवाडी गावाला त्यांनी शनिवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: जिल्हाधिकारी कार्यालयात चंदनचोरीचा प्रयत्न

$
0
0

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अज्ञात चोरट्यांनी चंदनचोरीचा प्रयत्न केला. रविवारी (ता. २६) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजी आबा घोलप (वय- ६२, रा. वारणा कॉलनी, ताराबाई पार्क) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विपुल वृक्षसंपदा आहे. ध्वजस्तंभासमोर चंदनाचे झाड आहे. अज्ञात चोरट्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी चंदनाचे झाड कापून पाडले. कापलेल्या झाडाचे खोड तिथेच सोडून चोरट्याने पळ काढला. मात्र, या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडांची अवैधरित्या तोड आणि चोरीचे प्रकार घडले आहेत. पुन्हा असाच प्रकार घडल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी चंदनचोरांचा शोध सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीकरांनी पळवलेले पाणी दोन दिवसांत आणणार

$
0
0

पंढरपूर

माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निवडून आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी बारामतीकरांना आव्हान दिलंय. बारामतीकरांनी पळवलेल नीरा देवघरचे पाणी दोन दिवसात आणणार असं सांगत बारामतीकरांवर थेट निशाणा साधला आहे. तर विधानपरिषदेचे सभापती माझ्या आई आणि नातेवाइकांबद्दल अपशब्द बोलत असतील तर मी का सहन कराचे, असा प्रश्न निंबाळकर यांनी उपस्थित केला.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दुष्काळी सांगोल्यात उपाययोजनांबाबत प्रशासनाची बैठक घेतली. सत्तेत असताना ठराव करून नीरा देवधरचे चाळीस टक्के पाणी बारामतीला नेले होते. मात्र या ठरावाची मुदत दोन वर्ष संपूनही ते पाणी बेकायदेशीर वापरले जात आहे. आता दोन दिवसांत हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला मिळणार आहे. पाणी पळवल्यावरून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट बारामतीकरांनाच आता आव्हान दिले आहे.

दुष्काळी उपाययोजना बैठकीत टँकर वेळेवर येत नसल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. तसंच जर अधिकारी टँकर घोटाळा करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची सुचना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला दिल्या.

विधानपरिदषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माझी आई आणि नातेवाइकाबद्दल अपशब्द वापरले तर मी का संयम बाळगायचा? ते बदनामी करतात तर मी फक्त जे सत्य आहे ते बोललो, असं खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी स्पष्ट केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहल्यादेवी होळकरांचे कार्य प्रेरणादायीः प्रा. संजय सोनवणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

'पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. अहल्यादेवी व मल्हारराव होळकर यांच्या कामगिरीच्या इतिहासाचा अभ्यास करून धनगर समाजातील तरूणांनी विविध ज्ञानाच्या प्रातांत प्रगती करण्याची गरज आहे', असे मत प्रा. संजय सोनवणी यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मल्हार सेनेतर्फे बिंदू चौक येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 'आहिल्यादेवी होळकर : जीवन व कार्य' हा व्याख्यानाचा विषय होता.

प्रा. सोनवणे म्हणाले, 'राजकारणात धनगर समाजाचे आमदार, खासदार दिसत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी धनगर समाजातील समाजसुधारकांच्या विचार आत्मसात केला पाहिजे. ज्ञानाच्या क्षेत्रात तरूणांनी चांगली कामगिरी करत उद्योजक, इतिहासकार, व्यावसायिक, शिक्षक, संशोधक व्हावे. अहल्यादेवी कुशल प्रशासक, योध्या होत्या. त्यांच्या कार्यावर इंग्लडमधील कवीने पहिले खंडकाव्य लिहिले आहे. जयंतीनिमित्त त्यांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यांच्या कामगिरीचा वर्तमान परिस्थितीशी संबंध जोडणे आवश्यक आहे. आजकाल समाजाचा विचार करतो, असे अनेकजण सांगतात. मात्र कृतीत काहीही आणत नाहीत.'

राघू हजारे यांनी स्वागत केले. बयाजी शेळके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बबनराव रानगे, वसंतराव मुळीक, नितीन काकडे, पांडूरंग शेळके, बंडोपंत बरगाले, अंबाजी बोडेकर, नाना लांडगे, शामराव माने आदी उपस्थित होते. शहाजी सिद यांनी आभार मानले.

'पानिपत' चित्रपटाला विरोध

'धनगर समाजाचे श्रध्दास्थान मल्हारराव होळकर यांच्या आणि धनगर समाजाविषयीच्या चुकीच्या आशयावर आधारित 'पानिपत' चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्यास कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाने विरोध करावा', असे आवाहन प्रा. सोनवणे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१,०५२ दिव्यांगांची तपासणी

$
0
0

कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या दिव्यांग तपासणी शिबिरामध्ये १,०५२ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करुन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या ४३० दिव्यांगांना उपयुक्त साधने दोन महिन्यात मोफत वाटप करण्यात येणार आहेत. केएमसी कॉलेज येथे झालेल्या शिबिराचे उद्घाटन महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी होते.

दिव्यांग व्यक्तींना अनेक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. त्यांच्या गरज स्वत: पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने व्हिलचेअर, श्रवणयंत्र, व्हिजन कीट, ट्रायसिकल, कॅपिलर, एमाआर कीट, कुबड्या, कृत्रीम अवयव आदी साहित्य आवश्यकतेनुसार दिले जाणार आहेत. त्यासाठी दिव्यांग तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी दिव्यांगाच्या प्रकारानुसार प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

महापौर मोरे म्हणाल्या, 'दिव्यांग बांधवांना त्यांच्या दैनदिन गरजा भागवण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागत असल्याने, त्यांची मोठी कुचंबणा होते. यामुळे दिव्यांगांचे मानसिक खच्चीकरण होते. हे टाळण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून साहित्य वाटप करण्यात येईल.'

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'आशा संस्था, एनएनएम, वैद्यकीय अधिकारी, कोऑडिनेटर, एनयूएचएम, आरोग्य कर्मचारी यांनी संयुक्त सर्व्हे सुरू केला आहे. सर्व्हेतून स्पष्ट आलेल्या दिव्यांगांना त्वरीत मदत करण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे.'

शिबिरामध्ये सहभागी झालेल्या दिव्यांगांना नगरसेवक शेखर कुसाळे यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा खेडकर, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, अतिरक्ति आयुक्त श्रीधर पाटणकर, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश गवळी, मुख्याध्यापिका अंजली जाधव, वैदयकिय अधिकारी डॉ. विद्या हेरवाडे, डॉ. अमोल माने उपस्थित होते. विजय वणकुद्रे यांनी सूत्रसंचालन केले. उपायुक्त मंगेश शिंदे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजवाहक तार पडून घर खाक

$
0
0

वीजवाहक तार

पडून घर खाक

सोलापूर

महावितरण कंपनीच्या मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटून घरावर पडल्याने लागलेल्या आगीत एक संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ही दुर्घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र चौगुले कुटुंबीयांचा संसार जळून खाक झाला.

कासेगाव-गंगेवाडी रस्त्यावर असलेल्या महावितरण कंपनीच्या मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटून ती बिरोबा वस्तीलगत स्वतःच्या शेतात राहणारे बाळासाहेब मनोहर चौगुले यांच्या घरावर पडली. त्यामुळे ठिणग्या उडून लागलेल्या आगीत त्यांच्या घराने पेट घेतला. त्या घरास लागलेली आग वाऱ्यामुळे भडकत होती. वीजवाहक तारेतून प्रवाह सुरू असल्याने गावकऱ्यांना आग विझवण्याचे कोणतेही प्रयत्न करता आले नाहीत.

या आगीत काही मिनिटांत बाळासाहेब चौगुले यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य, धान्य, भांडी आणि अन्य शेतीचे साहित्य जळून राख झाले. आगीत नेमकी किती वित्तहानी झाली याचा अंदाज अद्याप आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरेच्या अपहारप्रकरणी दलालास कोठडी

$
0
0

कराड :

वेदिका सेल्स कॉर्पोरेशनच्या लेटर पॅडवरती दलालाने परस्पर बोगस डिलिवरी ऑर्डर नंबर बनवून येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यातून साखरेची पोती भरलेली गाडी अन्य ठिकाणी पाठवून दिलेल्या सुमारे वीस लाख रुपये किंमतीच्या ६० टन वजनाच्या साखरेचा परस्पर अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी येथील ग्रामीण पोलिसांनी दलालास रविवारी ताब्यात घेतले होते. त्याला सोमवारी दुपारी येथील न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजीव नेताजी मोरे (रा. सांगली) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे.

जवानमल जैन हे नवकार ट्रेडर्सच्या नावाने साखर खरेदी विक्रीचा घाऊन व्यवसाय करतात. त्यांनी येथील कृष्णा साखर कारखान्याकडून चार मेपासून साखर खरेदी करीत आहेत. त्यासाठी राजीव मोरे वेदिका सेल्स कार्पोरेशनच्या नावाने हा दोघांमध्ये दलाल म्हणून काम पाहत होता. जैन यांनी साखर कारखान्याच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर अनामत रक्कम भरल्यानंतर साखर खरेदी केली जात होती. जैन साखर खरेदीपूर्वी राजीव मोरे यास मोबाइल संदेश पाठवून गाडी क्रमाक पाठवून देत होते. त्या प्रमाणे तो ती गाडी भरून पाठवून देत होता. मात्र, ४ मे रोजी राजीव मोरे याने जैन यांच्या नावे कृष्णा साखर कारखान्यातून कोणताही मेसेज दिला नसतानाही वेदीका सेल्स कॉर्पोरेशन यांचे लेटर पॅडवर परस्पर डिलिवरी ऑर्डर बनविली. साखरेचा अपहार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूर हायकर्सची मोहीम

$
0
0

कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनने रायगडावरील जलाभिषेक कार्यक्रमासाठी विशेष मोहीम आखली असून लडाखमधील स्टोक कांगरी पर्वतावरुन पाणी आणले आहे. पुढील आठवड्यात भीमाशंकर, पदरगड, कोथलीगड, पन्हाळागडावरुन पाणी आणण्यासाठी पथक रवाना होणार आहे, अशी माहिती, सागर पाटील आणि रवींद्र धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रायगडावर सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे हायकर्सकडून ट्रेकच्या माध्यमातून शिवमूर्तीवर जलाभिषेकांसाठी पाच ठिकाणाहून पाणी आणण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात लडाखमधील स्टोक कांगरीमधून जलाभिषेकांसाठी पाणी आणले आहे. कोल्हापूर हायकर्सच्या गिर्यारोहकांनी ऐन उन्हाळ्यात ही मोहीम फत्ते केली आहे. स्टोक कांगरी हे ६१५४ मीटर उंचीवर (२०,१९० फूट) असलेल्या पर्वतातून पाणी आणले. या मोहिमेत प्रणव बारटक्के, स्वप्नील रेचलेवार, नील राविया, भरत अलिक यांचा समावेश होता. दुसऱ्या मोहिमेत भीमाशंकर, पदरगड, कोथळीगड, पन्हाळगड येथून ट्रेकिंग करुन पाणी नेण्यात येणार आहे. या मोहिमेत सागर पाटील, शंशाक तळप, राकेश सराटे, प्रणव बारटक्के, तेजन कुमठेकर, तन्मय हावळ, रवी धुमाळ, निरंजन रणदिवे, विजय ससे, मुकुंद हावळ, अतुल पाटील, संतोष घोरपडे यांचा समावेश आहे. हायकर्सने पाच ठिकाणाहून आणलेल्या पाण्याने खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते शिवमूर्तीवर जलाभिषेक करण्यात येणार आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंकुश संघटनेचा शिरोळ तहसीलवर मोर्चाअ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

सन २०१८-१९ च्या गळीत हंगामातील उसाच्या एफआरपीवरील १५ टक्के व्याज मिळावे, या मागणीसाठी शिरोळ येथे आंदोलन अंकुश संघटनेने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला, तसेच ठिय्या आंदोलन केले. व्याजाची रक्कम मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. संबंधित कारखान्यांशी पत्रव्यवहार करून व्याजाच्या रक्कमेची तपशीलवार माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू, असे तहसीलदार गजानन गुरव यांनी आश्‍वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या थकित एफआरपीबाबत यापुर्वी आंदोलन अंकुश संघटनेने आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्याप्रमाणे या कारखान्यांना जप्तीच्या नोटिसाही बजाविण्यात आल्या होत्या. त्यानंतर साखर कारखान्यांनी थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली होती. मात्र १५ टक्केप्रमाणे होणारे व्याज कारखान्यांनी दिले नाही.

दरम्यान, आंदोलन अंकुश संघटनेने एफआरपीवरील व्याजासाठी शासन, साखर संघ, साखर कारखाने यांच्याशी यासंदर्भात पत्र व्यवहार केले होते. परंतु त्यांनी अद्याप कोणतेच पाऊल उचलले नसल्याने शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चूडमुंगे म्हणाले, 'व्याजासह एफआरपी वसूल करून देण्याची गरज होती. चार महिने पूर्ण होत आले तरी कोणतीच कारवाई होत नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आहे. बँका, सोसायट्या कर्जाचे व्याज वसूल करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे व्याज मिळण्यास उशीर होत आहे.

तहसीलदार गजानन गुरव यांनी आंदोलकांशी चर्चा केली. थकित एफआरपीबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी सुरेश भोसले, नेताजी देशमुख, अविनाश पाटील, कृष्णराव देशमुख, अनिकेत चूडमुंगे, सुधाकर उदगावे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसआयपी’ मध्ये गुंतवणूक करण्यावर भर

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर

भाजपला दणदणीत बहुमत मिळाल्यानंतर शेअर बाजारात तेजीचे वातावरण पसरले आहे. मात्र तेजी मंदीकडे लक्ष न देता गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडातील एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टेमेंट प्लॅन)वर भर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन मंत्रीमंडळ सत्तेवर आल्यावर सरकारच्या नवीन धोरणांचा विचार करुन म्युच्युअल फंडातील गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला पुर्ण बहुमत मिळाल्याने बाजारात तेजी आली आहे. निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सलग पाच वर्षे स्थिर सरकार असल्याने बाजारावर त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. मागील सरकारच्या काळात भाजप सरकारने म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवर जोर दिला होता. या फंडात मोठी रक्कम जमा झाली होती. गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा देणारा फंड हवा असतो. गतवर्षी बाजारातील चढ उतारामुळे काही कंपन्यांनी पंधरा ते वीस टक्के नफा दिला होता.

२०१९ च्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात चढउतार आले होते. भाजप सरकारने पाच वर्षांच्या कारभारात इन्फास्ट्रक्चरवर भर दिला होता. पूर्ण बहुमताने आलेले भाजप सरकार यावेळीची गुंतवणुकीवर मोठा भर देईल. इन्फास्ट्रक्चर, दळणवळणावर मोठा भर असल्याने रोड इन्फास्ट्रक्चर, रेल्वे, इलेक्ट्रिक कार कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीला चालना मिळणार आहे. बुलेट ट्रेन हा नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पर्यावरण पूरक असलेल्या इलेक्ट्रिक बाईक व कार उद्योगाला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. या कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. गुंतवणूकदारांनी छोटी, छोटी गुंतवणूक केली पाहिजे, त्यासाठी बाजाराचा अभ्यास केला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

शेअर बाजारातील चढउताराचा विचार करता दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपीवर भर देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यापूर्वी एसआयपीत गुंतवणूक केलेल्यांना पुरेसा नफा मिळाला असला तरी आगामी काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घ कालावधीचा विचार केल्यास चांगला परतावा मिळतो हा बाजाराचा अनुभव आहे. अल्प काळातील घसरणीमुळे विचलित न होता. एसआयपीमधील गुंतवणूक किमान पाच ते सात वर्ष कायम ठेवावी. फंड मॅनेजरचा सल्ला घेऊन ही गुंतवणूक दहा वर्षापर्यंत वाढण्याचा सल्ला दिला जात आहे.

...........

कोट

'पाच वर्षांच्या कारभारानंतर भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारला जनतेने बहुमत दिले आहे. भाजप सरकारकडून पायाभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे. या क्षेत्रातील चांगल्या कंपन्यांमध्ये अभ्यास करुन दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरणार आहे.

मनीष झंवर, सदस्य, कोल्हापूर इन्व्हेस्टर असोसिएशन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकप्रतिनिधींना टंचाईचा विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारण करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठीची बैठक घेण्याचा विसर लोकप्रतिनिधींना पडला आहे. उन्हाळा संपून पावसाळा तोंडावर आला तरी बैठकीला मुहूर्त मिळालेला नाही. परिणामी टंचाईग्रस्त गावांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

जून अखेरचा १ कोटी ९१ लाखांचा संभाव्य पाणी टंचाई उपाययोजनांचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात २२ गावात तीव्र पाणी टंचाई घोषित केली. दरम्यान, लोकसभेच्या आचारसंहितेमुळे या गावातही व्यापक उपाययोजना झालेल्या नाहीत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच आमदार प्रचारात होते. त्यांना उपाययोजनासाठी पाठपुरावा करता आलेला नाही. २३ एप्रिलला मतदान झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल करण्यात झाली. त्यानंतरही लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांत विंधन विहीर खुदाई करणे, नळपाणी योजनांच्या दुरूस्तीची कामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या नाहीत. प्रशासनही मतमोजणी तयारीत व्यस्त राहिले. २३ मे रोजी मतमोजणी पूर्ण झाली. त्यानंतर तरी प्राधान्याने टंचाईची कामे होणे गरजेची होती. मात्र तसे चित्र दिसत नाही.

सध्या जिल्ह्यातील मोठे ४, मध्यम ९, लघु ५४ धरणांतील पाण्याने तळ गाठला आहे. पाच वर्षाच्या तुलनेत सर्वच धरणात पाणीसाठा कमी आहे. प्रचंड उष्मा असल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीसाठीची मागणी वाढली आहे. यामुळे झपाट्याने धरणाचे पाणी खालावत आहे. हवामान खात्याने मॉन्सून लांबणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे धरणातील शिल्लक साठा पिण्यासाठी राखून उर्वरित पाण्याचे पीक, औद्योगिकसाठी आणि शिल्लक राहिले तर शेतीसाठी असे नियोजन करावे लागणार आहे. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज या डोंगराळ तालुक्यातील गावे, वाड्या वस्त्यातील रहिवाशांना पाणी, पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. अशा कठीण परिस्थितीत जिल्ह्यात असतानाही लोकप्रतिनिधींना पाणी टंचाईसाठी विशेष बैठक बोलवावी, असे वाटत नाही. यामुळे टंचाईची झळ त्यांच्यापर्यंत पोहचलीच नाही का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

............

१०२८

एकूण गावे

२९७

प्रस्तावित टंचाईग्रस्त गावे

२२

टंचाईची गावे

१ कोटी ९१ लाख

आवश्यक निधी

----------

विंधन विहिरीचाच आधार

महसूल प्रशासनाने प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग करते. आतापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या गावात विंधन विहिरींची खोदाई करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने गावात विहिर खोदाई करण्याची मागणी आहे. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे विलंब होत आहे. तालुका, जिल्हा पातळीवरील लोकप्रतिनिधींचाही दबाव कमी झाल्याने प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे.

--------

१४ टक्केच पाणी

मोठ्या प्रकल्पात एकूण क्षमतेच्या १४ टक्केच पाणीसाठा आहे. राधानगरी धरणात १७ टक्के, तुळशी ३२ टक्के, वारणा १५ टक्के, दूधगंगा ९ टक्के इतके पाणी आहे. मध्यम प्रकल्पात एकूण २७ टक्के पाणी आहे. कासारी २४ टक्के, कडवी ४३ टक्के, कुंभी ३० टक्के, पाटगांव २१ टक्के, चिकोत्रा ३२ टक्के, चित्रीत १८ टक्के, जंगमहट्टी १७ टक्के, घटप्रभेत ३३ टक्के तर जांबरेत ९ टक्केच पाणी आहे.

---------

कोट

'भुदरगड तालुक्यातील पाच, सहा गावांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नवसवाडी, लोटेवाडी, कदमवाडी येथील रहिवाशी सहा दिवसांतून एकदा मिळेल तेथून पाणी आणतात. काही ठिकाणी ग्रामपंचायत टँकरने पाणी पुरवठा करत आहे. उपाययोजना करण्यासंबंधी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने बैठक घेऊन टंचाई निवारणाची कामे गतीने करण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात.

जीवन पाटील, सदस्य, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बैठका’वर जोर, अधिकाऱ्यांची ‘हजेरी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हा परिषदेत सोमवारी वर्दळ वाढली. सर्वच पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी उपस्थित दर्शवित विविध विषय समित्यांच्या बैठका घेतल्या. विकासकामांचे प्रस्ताव आणि अंमलबजवणीवरून अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. तर महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या १३ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटिसा लागू होणार आहेत. पूर्वकल्पना न देता बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल सभापती वंदना मगदूम यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

दरम्यान व्यक्तिगत लाभार्थी योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे व ज्यांनी अद्याप वस्तू खरेदी केल्या नाहीत त्यांना एक महिन्याची मुदतवाढ देण्याची शिफारस अर्थ समितीच्या बैठकीत झाला. तसेच शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे यांच्या अध्यक्षतेखाली अनुक्रमे शिक्षण व समाजकल्याण समितीच्या बैठका झाल्या. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी विविध योजनेसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मतदारसंघातील विकासकामांच्या पूर्ततेसाठी सदस्यांनी विभागप्रमुखांच्या भेटी घेतल्या.

\B

बैठकीला उशीर, अधिकाऱ्यांची माफी

\Bमहिला व बालकल्याण समितीच्या बैठकीला जिल्ह्यातील सोळा पैकी केवळ तीन बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. अन्य अधिकारी बैठकीला नसल्यामुळे जवळपास पाऊण तास बैठकीला विलंब झाला. सभापती वंदना मगदूम यांनी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्याकडे विचारणा केली. पूर्वकल्पना न देता अधिकारी गैरहजर कसे काय राहू शकतात? असा प्रश्नही त्यांनी विचारला. रसाळ यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तत्काळ बैठकीला हजर राहण्याची सूचना केली. पाऊणतासांनी अधिकारी जिल्हा परिषदेत आले. बैठकीला उशिरा आल्याबद्दल काहींनी माफी मागितली. तर काहींनी प्रशिक्षणात सहभागी झाल्यामुळे बैठकीला येण्यास विलंब झाल्याचे नमूद केले. बैठकीला वारंवार गैरहजर राहणाऱ्या आणि उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १३ बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्यात येणार आहेत. या बैठकीत अखर्चित ८० लाखाचा निधी चालू वर्षात खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली.

लाभार्थी योजनेबाबत आजच्या बैठकीत अंतिम निर्णय

कृषी, समाजकल्याण व पशुसंवर्धन विभागांतर्गत व्यक्तिगत लाभार्थी योजना राबवली जाते. पात्र लाभार्थ्यांना निधी मंजूर झाला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेमुळे योजनेच्या प्रस्तावाला ब्रेक बसला होता. यामुळे लाभार्थ्यांना योजनेंतर्गत मंजूर वस्तू खरेदी करता आली नव्हती. सोमवारी झालेल्या अर्थ विभागाच्या बैठकीत व्यक्तिगत लाभार्थी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वस्तू खरेदी करण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान जि. प. ची स्थायी समितीची बैठक मंगळवारी (ता. २८) होणार आहे. या बैठकीत त्याला मंजुरी दिली जाईल. शिवाय जलव्यवस्थापन समितीची बैठकही मंगळवारी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उरुस शनिवारी

$
0
0

कोल्हापूर: हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या आणि शहरवासियांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या बाबूजमाल दर्गा उरुस शनिवारी एक जून रोजी होणार आहे. पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) असे दर्गाचे मूळ नाव असले तरी बाबूजमाल दर्गा ही ओळख आहे. शुक्रवारी (ता. ३१) रात्री सव्वा दहा वाजता गंध लेपनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी एक जून रोजी उरुस असून रात्री सव्वा दहा वाजता गलेफ मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर गलेफ घालण्याचा विधी होणार आहे. उरुसानिमित्त भाविकांनी दर्ग्यात दर्शन घ्यावे, असे आवाहन दर्गाचे मुख्य खादीम (पुजारी) लियाकत मिरमहमद पुजारी यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्मदहनाचा इशारा, यंत्रणेची धावपळ

$
0
0

कोल्हापूर

चंदगड तालुक्यातील दाटे येथील पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी धाकोबा गुरव यांनी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन, अग्निशमन दलाची यंत्रणा सतर्क होती. जि.प. परिसरात साध्या वेशातील पोलिस तैनात होते. दरम्यान दुपारच्या सुमारास आंदोलन स्थगित केल्याचे समजल्यानंतर यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीची आज बैठक

$
0
0

कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आज, मंगळवारी बैठक होत आहे. या बैठकीत पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाच्या कारणांवर चर्चा होणार आहे. शहर पदाधिकारी, विविध सेलचे प्रमुख, नगरसेवक यांच्या उपस्थितीत पक्षाच्या शहर कार्यालयात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कमिटीने, लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा अहवालही मागविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनाळेकर, भावेंच्या सुटकेची मागणी

$
0
0

पुनाळेकर, भावेंच्या सुटकेची मागणी

कराड :

मुंबई येथील राष्ट्रप्रेमी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदू विधीज्ज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अॅड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी केलेली अटक बेकायदा आहे. ही कारवाई अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह आहे. या सर्व प्रकरणात सीबीआयचे वागणे संशयास्पद आणि हिंदुत्ववादी संस्था व कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करणारे आहे. केंद्र व राज्यातील हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकार सत्तेत असताना हे होत आहे. त्यामुळे या सर्वाचा आम्ही जाहीर निषेध करतो. पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करावी, अशी मागणीही करणारे निवेदन नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीकरांनी पळवलेलेपाणी दोन दिवसांत आणणार

$
0
0

बारामतीकरांनी पळवलेले

पाणी दोन दिवसांत आणणार

रणजित निंबाळकर यांचे आव्हान

पंढरपूर :

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी निवडून आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी बारामतीला पळवलेल नीरा-देवधरच पाणी दोन दिवसांत मागारी आणणार असल्याचे सांगत बारामतीकरांवर थेट निशाणा साधला आहे. विधान परिषदेचे सभापती माझ्या आई आणि नातेवाईकांबद्दल अपमानास्पद बोलत असतील तर मी का सहन करायचे? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विजयी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दुष्काळी सांगोल्यात उपाययोजना बाबत प्रशासनाची बैठक घेतली.

सत्तेत असताना ठराव करून नीरा देवधरचे चाळीस टक्के पाणी बारामतीला नेले होते. मात्र, या ठरावाची मुदत दोन वर्ष संपूनही ते पाणी बेकायदा वापरले जात आहे. आता दोन दिवसांत हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला मिळणार आहे, असेही निंबाळकर म्हणाले. दुष्काळी उपाययोजना बैठकीत टँकर वेळेवर येत नसल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी केल्यानंतर अधिकाऱ्यांची माहिती आणि तक्रारदारांची माहिती जुळत नसल्याने टँकर घोटाळा होत असल्यास गुन्हा दाखल करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

दरम्यान, विधान परिदषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माझी आई आणि नातेवाईकाबद्दल अपशब्द वापरले होते. मग मी का संयम बाळगायचा? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. ते आमची बदनामी करतात. मात्र, मी फक्त सत्य आहे, ते बोललो, असेही निंबाळकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२०३ कोटींचे रस्ते होणार

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाशी नाका ते कूर आणि अडकूर ते तिलारीनगरपर्यंतच्या रस्त्याचे काम नव्या हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलमधून करण्यात येत आहेत. त्यासाठी २०३ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये जितेंद्रसिंग अँड कंपनी ४० टक्के गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्यावतीने दोन्ही रस्त्याचे काम करून दहा वर्षे देखभाल, दुरूस्ती आणि दोन्ही बाजूला रोपे लावून ती जगवण्यात येणार आहेत.

वाशी नाका ते कूर (ता. भुदरगड) हा ३६.७३ आणि चंदगड तालुक्यातील अडकूर ते तिलारीनगरपर्यंत ४०.९ किलोमीटर राज्यमार्गाची फेरबांधणी, रूंदीकरकरण करण्यात येत आहे. कांडगाव, देवाळे, हळदी, परिते, ठिकपुर्ली, बिद्री, मुदाळतिट्टा दरम्यानचा काही टप्पा सिमेंटने बांधण्यात येणार आहे. या भागात पाऊस जास्त असल्याने रस्त्यावरील डांबर धुऊन जाऊन खड्डे पडू नयेत, यासाठी तेथील काही अंतराचे काम सिमेंटने करण्यात येणार आहे.

सरकारच्या नव्या अॅन्युइटी मॉडेलमधून रस्त्याचे काम होत आहे. सर्व्हेचे काम होऊन रूंदीकरणात अडथळे ठरणारी झाडे तोडली जात आहेत. दोन्ही रस्त्याच्या बाजूची ६१६ झाडे तोडावी लागणार आहेत. याबदल्यात वाशी नाका ते कूरपर्यंत नव्याने ४ हजार ५८० तर अडकूर ते तिलारीनगरपर्यंत ४ हजार ९५० रोपे दोन्ही बाजूला नव्याने लावण्यात येणार आहेत. ही रोपे लावून दहा वर्षांपर्यंत देखभाल करणे, सांभाळणे आणि वाढवण्याची जबाबदारी गुंतवणूकदार जितेंद्रसिंग कंपनी पार पाडणार आहे. रस्त्याच्या दुरूस्तीची जबाबदारीही कंपनीकडेच असेल. दोन वर्षांत दोन्ही रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर कंपनीने गुंतवलेली ४० टक्के रक्कम सरकार टप्प्याटप्याने देणार आहे.

--

हायब्रीड अॅन्युइटी

म्हणजे काय ?

बीओटी आणि टोलच्या रस्त्यांना पर्याय म्हणून एकूण रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या निधीपैकी ६० टक्के सरकार आणि ४० टक्के ठेकेदार विकसक कंपनीने गुंतवायचे. ती रक्कम सरकार पुढील काही वर्षे देणार अशा 'खासगी सार्वजनिक भागीदारी' पद्धतीने केल्या जाणाऱ्या या मॉडेलला हायब्रीड अॅन्युइटी असे म्हटले जाते. ७० किलोमीटरवरील सर्व मोठे राज्य मार्ग याच मॉडेलमधून करण्यात येणार आहे.

-- ---

एक किलोमीटरला

२ कोटी ६७ लाख

हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलमधून होणाऱ्या ७७ किलोमीटरसाठी २०३ कोटी खर्च होणार आहे. ३३ फूट रूंद रस्ता होणार आहे. ज्या ठिकाणी कठीण खडक नाही त्या ठिकाणी रस्ता उकरून नव्याने केला जाईल. त्यासाठी एका किलोमीटरला २ कोटी ६७ लाख पैसे खर्च होणार आहे. या मॉडेलमधून होत असलेल्या रस्ते रूंदीकरणासाठी नव्याने जमीन संपादन करण्याची गरज नाही. सध्याच्या रस्त्याचे रुंदीकरण, आहे त्या ठिकाणी खोदून नव्याने भराव टाकणे, फेर मुरूम आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे.

-- -- --

हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलमधून जिल्ह्यातील दोन राज्य मार्ग केले जात आहेत. हे काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे तोडावी लागणार आहेत. तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात पंधरा रोपे लावून ती जगवण्याची अट ठेकेदार विकसक कंपनीला घातली आहे. या नव्या मॉडेलमध्ये ठेकेदाराची गुंतवणूक असल्याने रस्ते दर्जेदार होतील.

तुषार बुरूड, प्रभारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम

- -- - --- --- --

२०३ कोटी

दोन रस्त्यांवर होणारा खर्च

७७

रस्ते किलोमीटर

३९

एकूण पूल बांधकाम

९५३०

नवी रोपे लावणार

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती पदाधिकाऱ्यांनी लढविली खिंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या विजयात तरुण पदाधिकाऱ्यांचा विजयात मोठा वाटा होता. तर आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्येष्ठांचा भरणा असल्याने युतीचे पदाधिकारी निवडणुकीत भारी पडल्याची चित्र स्पष्ट झाले.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा खासदार निवडून आणायचा अशी जिद्द भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली होती. दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये काही वेळा टोकाचे विरोध होऊन पक्षशिस्त पाळत युतीचा प्रचार केला. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील हे तरुण आमदार आहेत. शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनीही चांगली तडफ दाखवली. शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, ऋतुराज क्षीरसागर, वीरेंद्र मंडलिक, जिल्हा परिषद शिक्षण सभापती अमरिश घाटगे, सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर यांच्यासह बहुतांशी पदाधिकारी तरुण असल्याने त्यांनी तडफ दाखविली. भाजपमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, सरचिटणीस विजय जाधव, राहुल चिकोडे, अशोक देसाई, या तरुण कार्यकर्त्यांनी खिंड लढविली. भाजपच्या प्रत्येक बूथमध्ये वीसहून अधिक तरुण कार्यकर्ते आहेत. या सर्वांचा फायदा लोकसभा निवडणुकीत महायुतीला झाला.

एकीकडे भाजप शिवसेनेकडे तरुण तडफदार पदाधिकाऱ्यांचा समावेश असताना राष्ट्रवादी, काँग्रेसकडे तरुणांची वानवा जाणवत होती. दोन्ही पक्षात प्रचारासाठी सूर जुळला नव्हता. आघाडीचे बहुतांशी पदाधिकारी ज्येष्ठ असल्याने त्यांच्याकडून प्रचार करण्यात मर्यादा आल्या. राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी तरुण कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्याचा प्रयत्न केला. पण महायुतीच्या प्रचारापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राष्ट्रवादीकडून अदिल फरास हे एकमेव तरुण पदाधिकारी प्रचारात दिसले. काँग्रेसच्या ज्या गटाकडे तरुणांचा भरणा होता तो गट शिवसेनेच्या प्रचारात होता. पी. एन. पाटील गटाचे करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, उदय पाटील, कुर्डूचे सरपंच संदीप पाटील, दत्तात्रय मेडशिंगे यांच्याकडे प्रचाराची धुरा होती. पण नरके यांच्या तरुण कार्यकर्त्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images