Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महिला कॉन्स्टेबलची आज होणार चौकशी

$
0
0
फुलेवाडी येथील इंगवलेनगर व सदासुख लॉजवर वेश्याव्यवसायाच्या संशयावरुन टाकलेल्या छाप्यातील महिलेसह पाचही संशयितांना न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

२ हजार किलो मटणविक्री थांबली

$
0
0
बीओटी तत्त्वावर कत्तलखाना नको, बापट कॅम्प परिसरातील कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करावे, या मागणीसाठी मटण डीलर असोसिएशन आणि खाटिक समाजाने जनरल मटण मार्केट समोर शनिवारपासून आंदोलन सुरू केले.

महिला कॉन्स्टेबलला अटक

$
0
0
वेश्या व्यवसायात मदत केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल सुमन रावसाहेब मडीवाल (रा. ओम शिवकुमार बंगला, फुलेवाडी) हिला सोमवारी सायंकाळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली.

गृहस्वप्नाला घर ‘घर’

$
0
0
नवीन वर्षात शहरातील रेडीरेकनरचा दर २५ टक्क्यांनी वाढणार असून, त्यामुळे घर घेण्याचे सामान्य कोल्हापूरकरांचे स्वप्न आणखी दूर जाणार आहे. ग्रामीण भागातही रेडीरेकनरचा दर १० ते १५ टक्क्यांनी वाढणार आहे.

राधानगरीतील पशुधन सलाइनवर

$
0
0
तालुक्यात शेती निगडित पाळीव जनावरांची संख्या लक्षणीय असली तरी गेल्या पाच वर्षापासून तालुक्यातील जनावरांसाठी असलेल्या श्रेणी एकच्या आठही सरकारी दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी पदे रिक्त असल्याने येथील पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

वीज दरवाढीबाबत लवकरच निर्णय

$
0
0
थोर नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे शहर व परिसर सहकाराचे नंदनवन बनले आहे. हाच आदर्श आजच्या युवापिढीने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.

तहसीलदार पवार यांची चौकशी

$
0
0
गेले काही दिवस चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या आजरा तालुक्यातील सावरवाडी व कानोली जमीन वाटपप्रकरणी तत्कालीन तहसीलदार बाबूराव पवार यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी दिली.

‘दौलत’चे भवितव्य टांगणीला

$
0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना गेले दोन हंगाम बंद असून तिसऱ्या हंगामातही बंद रहाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. १७ डिसेंबरला निविदा प्रक्रियेनंतर दौलत केशव शुगर्सकडे देण्याचा निर्णय झाला होता.

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0
येथील जवाहरनगर परिसरात चहाच्या टपरीत तीनपानी जुगार खेळणाऱ्या आठजणांना आज दुपारी सहाय्यक पोलिस अधिक्षक चैतन्य एस. यांच्या पथकाने छापा टाकून अटक केली. या छाप्यात ९ मोबाईल, ३ दुचाकी व रोख १० हजार १३५रुपये असा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वकिलावर हल्ला : एकास ७ वर्षे सक्तमजुरी

$
0
0
किरकोळ कारणावरुन इचलकरंजी बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. डी. ए. कंदले यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गजानन महादेव आंबी (वय ४७ रा. भोनेमाळ) यास दोषी ठरवून येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. शहापूरे यांनी सात वर्षे सक्तमजुरी व साडेसहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

आज-यात पत्नीवर ब्लेडने हल्ला

$
0
0
किरकोळ कारणावरून आजरा येथे सोमवारी (ता. ३०) रात्री नऊच्या सुमारास पतीने पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली. रेश्मा अमर गवंडी (वय ३६, रा. आजरा) असे या महिलेचे नाव आहे.

कृषी विभागाचा ‘आत्मा’ थंड

$
0
0
शेतीसाठी क्रांतिकारक असणाऱ्या ‘आत्मा’ या संस्थेची कामाअभावी कोल्हापूर जिल्ह्यात धडधड अतिशय मंद झाली आहे. जिल्हास्तरावर केवळ चारच सरकारी अधिकारी घेवून आणि त्यांना सोयीची जिल्हाभर कंत्राटी पद्धतीने स्वतंत्र यंत्रणा तयार असूनही या संस्थेला स्वत:चे कार्यालयच नाही.

नववर्षात ‘स्कडा’ होणार कार्यरत

$
0
0
वीज गेल्याची माहिती जोपर्यंत वीज कंपनीला कळविली जात नाही, तोपर्यंत वीज यंत्रणेलाही याबाबतची माहिती समजत नाही. त्यामुळे वीज कंपनी आणि ग्राहक दोघेही अंधारात असतात. सध्या लोकही माहिती देण्याचे टाळत असल्याने लोकांना तासनतास अंधारात बसावे लागत आहे. स्कडायंत्रणा जोपर्यंत कार्यान्वित होत नाही.

गुरे नियंत्रण कायद्याला स्थगिती द्यावी

$
0
0
‘महापालिका क्षेत्रात गुरे नियंत्रण कायद्यांतर्गत सरकार वर्षाला प्रत्येक जनावरामागे ५५ रुपये शुल्क आकारत असल्याने वैभवशाली दूधकट्ट्याची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे.

वैशंपायन यांनी बेकायदा रीतीने पदोन्नतीचे लाभ लाटले

$
0
0
‘शिवाजी विद्यापीठाच्या संगीत अधिविभागाच्या प्रमुख प्रा. भारती वैशंपायन यांनी पीएचडी नसताना बेकायदा रीतीने रीडर व प्रोफेसर पदाचे लाभ घेतले आहेत. विद्यापीठाला व राज्य सरकारला खोटी माहिती व नसलेली समकक्षता दाखवली आहे.

रेशनकार्डला बारकोड

$
0
0
फूड सिक्युरिटी अॅक्टची अमंलबजावणी जून २०१४ पासून होणार आहे. या कायद्याची अमंलबजावणी होण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डंना बारकोड नंबर देण्यात येणार आहे. बारकोडमुळे बोगस रेशनकार्डला आळा बसणार आहे. बारकोड देण्याची सुरुवात नव्या वर्षात बुधवारपासून (ता. १ जानेवारी) करवीर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर होणार आहे.

सरकारी इमारती बनल्या भूत बंगले

$
0
0
एखाद्या वाड्यात किंवा बंगल्यात अनेक वर्षे कोणी राहत नसले की आपल्याकडे त्याचं भुताचा वाडा किंवा भूत बंगला असं नामकरण केलं जातं. कोट्यवधी रुपये खर्च करुन शहरात अशा काही देखण्या इमारती बिनकामाच्या पडून आहेत.

खंडणी मागणारे तिघे अटकेत

$
0
0
मंडप व्यावसायिकांकडे ५० हजारांची खंडणी उकळणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक करून रोख रक्कम व मोटारसायकल जप्त केली.

‘स्वाभिमानी’ला महायुतीत घेण्याच्या हालचाली वेगात

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत सहभागी होण्यासाठी चर्चेचे दरवाजे चार महिन्यानंतरही खुले न झाल्याने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीसोबत आघाडी करण्याचे संकेत स्वाभिमानीच्या खासदार राजू शेट्टी यांनी देताच महायुतीचे नेते खडबडून जागे झाले आहेत.

३० हजारांहून अधिक कोंबड्यांची विक्री

$
0
0
शहरातील मटण व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळल्याने थर्टी फर्स्टसाठी खवय्ये ग्रामीण भागाकडे वळले. सकाळपासूनच शहराजवळच्या भागात मटण खरेदीसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. शहरात मटणाचा तुटवडा झाल्याने मासे आणि चिकन खरेदीसाठी दुकानांत मोठी गर्दी झाली. शहरात तीस हजारांहून अधिक कोंबड्याची विक्री झाली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images