Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बेकायदेशीर बंदुकीसहएकाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केर्ली (ता. करवीर) येथे बेकायदेशीर गावठी बनावटीची १२ बोअरची बंदूक बाळगणाऱ्या संदीप माने (वय ३५, रा. केर्ले, मानेवाडी ता. करवीर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून बंदूकीसह तीन जिवंत काडतुसे असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. बंदूक विक्री केलेला संशयित ओंकार दगडू कासार (रा. हनुमान मंदिराजवळ, साखरपा, ता. संगमेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित माने हा बेकायदेशीर हत्यारे बाळगत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. तो बुधवारी केर्ली येथे टॅफे ट्रॅक्टर शोरुम जवळील शेतात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीने नियुक्त केलेल्या पथकाने छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने ही बंदूक आणि राउंड एक वर्षापूर्वी ओंकार कासार याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. दरम्यान त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांच्यावर बेकायदेशीर शस्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल करून करवीर पोलिसांत वर्ग केला आहे. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक दादाराजे पवार, सहायक फौजदार शिवाजी जामदार, कुमार पोतदार, संजय पडवळ, संतोष पाटील यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकसभा निकालानंतर अतिक्रमणविरोधी कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीदरम्यान थंड पडलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूल कारवाईला मतमोजणीनंतर त्वरीत सुरुवात होणार आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी एक अधिकारी आणि चार पोलिस कर्मचारी मिळणार असल्याने कारवाई धडाक्यात करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे रहदारीच्या रस्त्यावरील फूटपाथ आणि अनधिकृत होर्डिंग्जमुक्त शहर होण्याची शक्यता आहे.

डिसेंबर २०१८ पासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण निर्मूलन कारवाईला सुरुवात केली. फेब्रवारी २०१९ पर्यंत केलेल्या कारवाईमध्ये अनेक फूटपाथनी मोकळा श्वास घेतला. तर अनधिकृत जाहिरात फलक व होर्डिंग्ज हटवण्यात आले. मात्र अशी कारवाई करताना पोलिस बंदोबस्ताची मागणी करुनही मिळाला नसल्याने अनेकदा कारवाईवर मर्यादा आल्या.

दहा मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. तसेच निवडणूक कामासाठी अतिक्रमण विभागातील अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने अतिक्रमण निर्मूलन मोहीम गेल्या काही दिवसांपासून ठप्पा झाली आहे. मात्र या कारवाईला आता पुन्हा सुरुवात होणार आहे. मंगळवारी जिल्हा पोलिस प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान अतिक्रमणे काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त वेळेत मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी एक स्वतंत्र अधिकारी व चार कर्मचारी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी कायमस्वरुती देण्याचे जाहीर केले. अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलिस बंदोबस्त मिळणार असल्याने अतिक्रमण निर्मूलन मोहीम धडाक्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून (ता.२४) मोहीम राबवण्याचा नियोजन सुरू केले आहे.

..........

चौकट

कारवाई करायची कशी ?

गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण विभागाकडून शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. पण त्यामध्ये सातत्य नसल्याने कारवाई केलेल्या ठिकाणे पुन्हा अतिक्रमणाने वेढली गेली आहेत. शहरात अनेक ठिकाणी अशी वस्तुस्थिती असताना फूटपाथवरील अतिक्रमणे काढा आणि आतमधील ठेवा असे पत्रच विभागाला दिले असल्याने, नेमकी कारवाई करायची कशी असा प्रश्न या विभागातील कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणूक प्रारुप मतदारयादी उद्या प्रसिद्ध

$
0
0

कोल्हापूर

महापालिकेच्या पद्माराजे उद्यान व सिद्धार्थ नगर प्रभागातील होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रारुप मतदारयादी शुक्रवारी (ता.१७) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर २१ मेपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. हरकती व सूचनांचा विचार करुन २७ मे रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर केंद्रनिहाय मतदारयादी २९ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदारयादी अंतिम झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवल्यानंतर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयडीबीआय बँकेत घोटाळा केल्याची कबुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले तत्कालीन शाखा व्यवस्थापक जयंत गंधे आणि वकील सी. जी. कुलकर्णी यांनी घोटाळा केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी लवकरच दोषारोपपत्र सादर केले जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी दिली.

बोगस पीक कर्ज आणि पाइपलाइनसाठी कर्ज प्रकरणे मंजूर करुन आयडीबीआय बँकेची सुमारे ८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार बँकेच्या अधिकाऱ्यांनी करवीर पोलिसांत दिली होती. २७ ऑक्टोबर २०१६ ते ३ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला होता. बँकेच्या अन्य सुमारे ४५० खातेदारांनी या प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. या प्रकरणी गंधे आणि कुलकर्णी या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची पोलिस कोठडी १३ मे रोजी संपली. त्यांना पुन्हा कोर्टासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तपासात त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. खातेदारांच्या नावावर एक गुंठा जमीन नसताना बनावट सर्च रिपोर्ट, कागदपत्रांची तपासणी न करणे, प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी न करता बोगस पीक कर्ज आणि पाइपलाइन कर्ज प्रकरणे मंजूर केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. या दोघांनी संगनमताने फसवणूक केल्याचे उघड होत आहे. त्यांच्याकडे मिळालेल्या मोबाइल कॉल डिटेल्सवरुन आणखी काहीजणांची नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्याने, हॉल, मैदानांवर खासगी सुरक्षारक्षकांची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेची उद्याने, मैदाने व अनेक सांस्कृतिक हॉल तळीरामांचे अड्डे बनले आहेत. रात्रीच्यावेळी तर अशा सार्वजनिक ठिकाणी अवैध प्रकारांना ऊत येतो. त्याला अटकाव करण्यासाठी अशा सर्व सार्वजनिक ठिकाणांवर खासगी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाने तयार केला आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी अभ्यास दौऱ्यावरुन परत आल्यानंतर यावर निर्णय होईल.

महापालिकेकडे नोंदणीकृत ५४ उद्याने तसेच सांस्कृतिक हॉल व मैदाने आहेत. हॉल व मैदानांवर कर्मचारी तैनात नसले, तरी उद्यानांच्या देखभालीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. सुरक्षेसाठी तीन शिफ्टमध्ये कर्मचारी कार्यरत असतात. अशा सार्वजनिक ठिकाणी सायंकाळी सातनंतर अवैध प्रकार जोरात सुरू होतात. अशा ओपन बारमुळे आजुबाजूच्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.

जेवणावळीसह, ओपन बार, गांज्या पार्ट्या मध्यरात्रीपर्यंत करण्यासाठी अनेकांची ही हक्काची ठिकाणे बनली आहेत. ओपन बारवर पोलिस प्रशासन वेळोवेळी कारवाई करते. पण कारवाईनंतर पुन्हा ओपन बार जोरात सुरू होतात. अशा अवैध प्रकारांतून अनेकवेळा वादावादीचे प्रकारही घडतात. त्यामुळे उद्याने अथवा मैदानावर येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. विशेषत: उद्यानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिक दमदाटी करुन ताबा घेतात. परिणामी अनेकवेळा त्यांच्यासोबत वादावादीचे प्रसंग उद्भवतात. तसेच तीन कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी सुमारे एक लाख रुपये त्यांच्या वेतनावर खर्च होतात. या खर्चामध्ये बचत करण्याबरोबर अवैध प्रकार आणि अशी ठिकाणे सुस्थितीत व सुरक्षित राहण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. बांधकाम विभागाने तयार केलेला प्रस्ताव रचना व कार्यपद्धती विभागाकडे पाठवण्यात आला आहे. दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यावरुन आयुक्त डॉ. कलशेट्टी आल्यानंतर त्यांच्यापुढे प्रस्ताव सादर केला जाईल.

'धोकादायक इमारती, उद्यानांची सुरक्षा आणि अतिक्रमण मोहिमेबाबत मंगळवारी पोलिस प्रशासनाबरोबर बैठक झाली. बैठकीमध्ये उद्यानामधील नियमावलीबाबत पोलिस प्रशासनानी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सुरक्षारक्षक नेमण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे,' अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.

........

चौकट

मुलांनी केल्या बाटल्या गोळा

पन्हाळा गडावर दारुच्या पार्ट्यांमुळे अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो. पन्हाळा गडवासियांनी या दारुच्या बाटल्या गोळा करण्याची मोहिमच हाती घेतली. त्याचप्रमाणे पद्माराजे उद्यानामध्ये येथील शालेय विद्यार्थ्यांनी दारुच्या बाटल्या गोळ्या करण्यास सुरुवात केली. यावेळी शेकड्याने दारुच्या बाटल्या गोळा झाल्या. त्यामुळे शहरातील उद्याने ओपन बार असल्याचे स्पष्ट होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी चावरेतील एकास चोप

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळें यांच्याविषयी सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी चावरे (ता. हातकणंगले)येथे संबधित तरुणांच्या घरी जाऊन चांगलाच चोप दिला. अक्षय पोपट तांबवेकर (वय १८)असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान त्याच्याकडून लेखी माफीनामा घेऊन कार्यकर्त्यांनी त्याला सोडून दिले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, असं वक्तव्य केले होते. याविषयीच्या बातमीची पोस्ट संबंधित एका वृत्तवाहिनीच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली होती. चावरे येथील अक्षय तांबवेकर याने या पोस्टला प्रतिक्रिया देत खासदार सुप्रिया सुळेंविषयी अपशब्द वापरले होते. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते बुधवारी रात्री उशिरा त्याच्या घरी पोहचले. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांबद्दल अक्षयला पालकांसमोर जाब विचारून मारहाण केली. याबाबत अक्षय तांबवेकर याने ‘सोशल मीडियावर केलेल्या चुकीच्या पोस्टबद्दल जाहीर माफी मागत आहे. अशी लेखी व कॅमेरासमोर माफी मागितल्यावर कार्यकर्त्यांनी त्याला सोडून दिले आणि त्याच्या पालकांना मुलावर लक्ष देण्याची विनंती केली. याबाबतचा व्हिडिओ राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेन वॉटर हार्वेस्टिंगने मंडलिक पार्क स्वयंपूर्ण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

माळी कॉलनीतील मोकळ्या जागेत रस्त्यांसाठी डांबरीकरण केले गेले. रस्ता चकाचक झाला, म्हणून रहिवाशी खूष झाले. पण डांबरीकरणाने पार्कमधील बोअरिंगचे पाणी आटले. काही जागरुक नागरिकांनी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचा, जल पुर्नभरणाचा प्रकल्प राबवला. हा प्रयोग यशस्वी ठरला. माळी कॉलनी येथील न्यायमूर्ती श्यामराव मंडलिक पार्कमध्ये उन्हाळ्यातील बोअरिंगमधून भरपूर पाणी पुरवठा होत आहे.

मंडलिक पार्कची १९९४ मध्ये उभारणी झाली. पार्कमध्ये ३० फ्लॅट आणि पाच रो बंगले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महानगरपालिकेचे पाणी तर अन्य वापरासाठी बोअरिंग खोदाई केली गेली होती. पार्कच्या स्थापनेपासून २०१० पर्यंत बेअरिंगच्या पाण्याची अडचण नव्हती. २०११ मधील उन्हाळ्यात बोअरिंगचे पाणी कमी झाले. दर दोन दिवसाला एक पाण्याचा टँकर भाड्याने आणायला लागला. बोअरिंगचे पाणी कमी का झाले? याचा शोध घेतला असता पार्कमधील मोकळ्या जागांत तयार केलेल्या डांबरी रस्त्यांमुळे असे झाल्याचे लक्षात आले. डांबरीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरले नसल्याचे आले. त्यानंतर पार्कमधील रहिवाशी पवन केमकर, सिनेमॅटोग्रॉफर नंदकुमाार पाटील यांनी तत्कालीन भारतीय जल संस्कृती मंडळाच्या उपाध्यक्षा मिलन होळणकर यांच्याकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगची माहिती घेतली. त्यानुसार प्रकल्प राबवण्यात आला.

यासंदर्भात पवन केमकर यांनी माहिती दिली, ते म्हणाले, 'अपार्टमेंट, रो बंगल्यांच्या टेरेसवरील पावसाचे पाणी पीव्हीसी पाइपच्या मााध्यमातून जमिनीत सोडण्यात आले. त्यासाठी बोअरजवळ चार चेंबर बांधले गेले. चेंबरमध्ये खडीचे फिल्टर बनवले आहेत. कॉलनीतील गेटमधून उतारामुळे येणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यात आले. त्यासाठी १५ फूट लांबीचा चेंबर बनवण्यात आला. त्यात २० फुटांचे नऊ पाइप्स घेण्यात आला. त्याला प्लास्टिकचे केसिंग करून त्यात पुन्हा लहान होल मारण्यात आले. नऊ इंच परिघाचे हे पाइप्स आहेत. त्यातून पावसाचे पाणी जमिनीत मुरते. रो बंगल्यांच्या टेरेसवरील पावसाचे पाणीही चेंबरला जोडण्यात आले.'

रेन वॉटर हार्वेस्टिंगचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. पाण्याची पातळी वाढली. २०१३ पासून आजतागायत पाण्याची कमतरता भासलेली नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी फार मोठे तंत्रज्ञान लागत नाही असून जास्त खर्चही येत नाही. हा उपक्रम राबवण्यासाठी ७० ते ७५

हजार रुपये खर्च आला. फ्लॅटधारक व रो बंगल्याच्या मालकांना समान खर्च बसवण्यात आला.

अपव्यय टाळण्याचा प्रयत्न

रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयत्न यशस्वी झाल्यावर पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पाणी साठवण्याच्या टाक्यांना अलार्म बसवण्यात आले आहेत. ८० टक्के टाकी भरली की अलार्म वाजतो. त्यानंतर पाणी पुरवठा बंद केला जातो. या प्रकल्पामुळे पाणी टंचाईवर यश मिळवण्यात मंडलिक पार्कच्या रहिवाशांना यश आले. दरवर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंगची देखभाल केली जाते. खराब झालेल्या पाइप्स बदलण्यात येतात. युवा पिढीकडून यासाठी सहकार्य मिळत असल्याची माहिती पवन केमकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याचा दर उतरला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

बाजारात गेले आठवडाभरात आंब्याची मोठी आवक आली असून पंधरा दिवसांपूर्वी असलेला ५०० ते ६०० रुपये डझन दर असलेला आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागला आहे. बाजारात प्रतिडझन २०० ते ३०० रुपये दराने हापूसची विक्री होत आहे.

शहरातील सर्व भाजी मंडयांमध्ये आंब्याची जोरदार विक्री सुरू आहे. लक्ष्मीपुरीतील दलाल मार्केटसमोर २० ते २५ हातगाड्यांवर आंब्याची विक्री केली जाते. याशिवाय शहरातील चौकाचौकांत, सिग्नलनजीक स्थानिक विक्रेते, शेतकरी आंब्यांची विक्री करीत आहेत. मार्केट यार्डातील शेती उत्पन्न बाजार समितीत रोज हापूस आंब्याच्या एक ते दीड हजार पेट्या आणि दहा हजार बॉक्सची आवक होत आहे. याशिवाय पायरी, लालबाग, मद्रास हापूस, मद्रास पायरी या आंब्यांचीही मोठी आवक झाली आहे. आवक वाढल्याने दरही उतरू लागले आहेत.

मार्केट यार्डातील बाजारात हापूस आंब्याच्या पेटीचे दर ४५० रुपये १५०० रुपये आहेत. पेटीमध्ये चार ते सहा डझन आंबा असतो. बॉक्सची किंमत ७० ते ३०० रुपये इतकी असून बॉक्समध्ये बारा, सोळा, अठरा नग असतात. मात्र मार्केट यार्डपेक्षा शहरात विक्रेत्यांकडे हा दर डझनाला ५० रुपये ते २०० रुपयांपर्यंत वाढतो. प्रवास भाडे, विक्रीतील कमिशनपोटी दरवाढ होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सद्यस्थितीत आंब्याचा दर कमी झाल्याने ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही ग्राहक थेट मार्केट यार्डातून आंबा खरेदी करत आहेत. जातीवंत देवगड, रत्नागिरी हापूस मिळावा यासाठी ग्राहक जागरुक आहे. कोल्हापुरात काही कोकणातील कुटुंबे स्थायिक आहेत. त्यांच्याकडूनही आंब्याची विक्री होत आहे. आणखी तीन आठवडे देवगड, रत्नागिरी हापूसचा सिझन सुरू राहिल असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे.

बाजारात आंब्याची मोठी आवक झाल्याने दर उतरले आहेत. ही आवक आणखी काही दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे दरही तुलनेने कमी झाले आहेत. सध्या आंब्याची २०० ते ३०० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे.

- डी.एम. बागवान, आंबा व्यापारी

आंब्याची आवक

प्रकार आवक दर (रुपयांत

देवगड हापूस पेटी ११०५ ४५० ते १५००

देवगड हापूस बॉक्स १००१० ७० ते ३००

पायरी बॉक्स ५०० ५० ते १५०

लालबाग बॉक्स २८०० ५० ते ११०

मद्रास हापूस पेटी ११०० ३५० ते ९००

मद्रास हापूस बॉक्स २९०० ५० ते २५०

मद्रास पायरी पेटी ४०० २०० ते ४००

मद्रास पायरी बॉक्स १९०० ६० ते १२०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार आदर्श ग्राम योजना गुंडाळली

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

राज्य सरकारच्या आमदार आदर्श ग्राम योजनेतून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात गाव निवड करून विकास आराखडा करवून घेण्याकडे जिल्ह्यातील आमदारांनी पाठ फिरवली आहे. स्वतंत्र निधी नसल्याने या योजनेबद्दल सत्ताधारी आमदारांतही प्रचंड उदासीनता आहे. परिणामी २०१९ पर्यंत योजनेतून किमान तीन गावे आदर्श करण्यात त्यांना यश आलेले नाही. साहजिकच 'आमदार आदर्श' गावे आदर्श होण्याआधीच गुंडाळल्याचे पाहायला मिळते.

केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर विधानसभा, विधान परिषद आमदारांसाठी आमदार आदर्श ग्राम योजना राबवण्याचा निर्णय ८ ऑक्टोबर २०१५ मध्ये ग्रामविकास विभागाने घेतला. त्यानंतर मोठा गाजावाजा करून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. जुलै २०१७ पर्यंत प्रत्येक आमदारांनी एक गाव आणि जुलै २०१९ पर्यंत दोन अशी तीन गावे आदर्श करणे अपेक्षित आहे.

लोकांचा सहभाग, स्त्री, पुरूष समानता, महिलांना सन्मानाची वागणूक, आर्थिक व सामाजिक न्याय, श्रमाची प्रतिष्ठा, स्वच्छतेची संस्कृती, पर्यावरण संतूलन, नैतिक मूल्यांचे पालन, सर्वांगिण विकास निवडलेल्या गावांत करणे गरजेचे आहे. या निकषांवर जिल्ह्यात आमदारांनी निवडलेल्या गावांतील विकास झालेला नाही, हे वास्तव चित्र आहे. पाणी, रस्ते, गटर्स, पथदिवे, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांही त्या गावांत दर्जेदार करण्यात यश आलेले नाही. परिणामी आदर्श गाव करण्याची योजना फसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे भाजप, शिवसेनेचे सत्तेतील आमदारांचाही असाच सूर आहे. म्हणूनच निम्यांपेक्षा अधिक आमदारांनी दुसऱ्या टप्प्यात आदर्शसाठी गावांची निवड केली नाही. निवडीसाठी आमदारांना प्रशासनाने सहा ते सात विनंती पत्रे दिली आहेत. मात्र योजना फसवी असल्याचे गुपित उघड झाल्याने गाव निवड करून त्या गावास 'आदर्श'चे अमिष दाखवण्यापासून ते लांब राहणे पसंत केले आहे. सहा महिन्यांत विधानसभा सदस्यांचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे त्यांना 'आदर्श' गाव करणे अशक्य आहे.

................

आमदार आणि कंसात पहिल्या टप्प्यात आदर्श करण्यासाठी निवडलेली गावे

पुणे पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (कसबा वाळवे, ता. राधानगरी).

विधानपरिषद सदस्य सतेज पाटील (जोतिबा, ता. पन्हाळा).

सुरेश हाळवणकर (चंदूर, ता. हातकणंगले).

अमल महाडिक (मुडशिंगी, ता. करवीर).

हसन मुश्रीफ (मडिलगे, ता. आजरा).

संध्या कुपेकर (तेरणी, ता. गडहिंग्लज).

डॉ. सुजित मिणचेकर (किणी, ता. हातकणंगले).

प्रकाश आबिटकर (धामोड, ता. राधानगरी).

राजेश क्षीरसागर (तासगाव, ता. हातकणंगले).

चंद्रदीप नरके (वडणगे, ता. करवीर).

सत्यजीत पाटील (सातवे, ता. पन्हाळा).

.................

दुसऱ्या टप्प्यासाठी पाच,

तिसऱ्या टप्प्यासाठी तीन गावे

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी दारवाड (ता. भुदरगड), हनिमनाळ (ता. गडहिंग्लज), कुपेकर यांनी कुरणी (ता. चंदगड) आणि हत्तीवडे (ता. आजरा), महाडिक यांनी दिंडनेर्ली, कणेरी (ता. करवीर) या गावांची निवड केली. दुसऱ्या टप्प्यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी घालवाड (ता. शिरोळ), सत्यजित पाटील यांनी वाघवे (ता. पन्हाळा) या गावांची निवड केली. मात्र या गावांचा विकास आराखडा तयार नाही. उर्वरित आमदारांनी दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यासाठी आमदारकीचा कालावधी संपत आला तरी गाव निवड केलेली नाही.

..............

१६ कोटी २६ लाख खर्च पण ...

सर्व आमदारांनी विविध सरकारी योजना आणि आमदार फंड देऊन निवडलेल्या एकूण १२ गावांत ७३२ कामे करण्यात आली आहेत. त्यावर १६ कोटी २६ लाखांचा निधी खर्च झाला आहे. यातून मूलभूत सुविधाच निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. खऱ्या 'आमदार आदर्श' च्या निकषांपर्यंत पोहचता आलेले नाही.

............

कोट

'आमदार आदर्श' ची संकल्पना चांगली आहे. मात्र यासाठी स्वतंत्र निधी नाही. त्यामुळे गाव आदर्श करणे शक्य झालेले नाही. संपूर्ण मतदारसंघासाठी आमदारांना वर्षाला दोन कोटींचा निधी मिळतो. निधी एकाच गावासाठी दिल्यास इतर गावांवर अन्याय होतो. यामुळे योजना अयशस्वी झाली.

उल्हास पाटील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुरगूडचा तलाव जनतेचा करूया

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

जहागीरदारांच्या ताब्यातील ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव मुरगूडच्या जनतेच्या मालकीचा झाला पाहिजे. यासाठी प्रसंगी सनदशीर मार्गाने संघर्ष उभा केला जाईल,' असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुरगूड, शिंदेवाडी व यमगे गावच्या पाणीप्रश्नाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. नगराध्यक्ष राजेखान जमादार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. युवराज पाटील, भैय्या माने, प्रवीण भोसले, मनोज फराकटे, नामदेव मेंडके आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, यावर्षी सर्वत्र दुष्काळाची तीव्रता अधिक असल्यामुळे जलसाठे आटत आहेत. अशा परिस्थितीत पिण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा झाला पाहिजे.

लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला पाणी मिळाले पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. हवामानाच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. राधानगरी व काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. माझ्या मतदारसंघातील जनतेला पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळाले पाहिजे, याकरिता मी मुरगूड नगरपालिकेला निवेदन दिले आहे. या निवेदनाची दखल घेऊन पालिका प्रशासनाने हा तलाव मुरगूडकरांच्या मालकीचा झाला पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्याकरिता मी नगरपालिकेच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहीन. आम्ही काम केलेले हे तलाव हे आमच्याच मालकीचे राहिले पाहिजे, अशी मुरगूडमधील नागरिकांची भावना आहे. त्यातूनच हा लढा उभा होत आहे. तो यापुढे तीव्र करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. त्यासाठी आज दिवंगत सदाशिवराव मंडलिक, विश्वनाथराव पाटील यांना अभिवादन करून आम्ही हा संकल्प सोडत आहोत व त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आम्ही सत्यात उतरवणार आहोत.

प्रवीणसिंह पाटील म्हणाले, 'तलावात सध्या पाणी पातळी २५ फूट असताना देखील शहराला अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असेल तर तलाव मालकांनी पाइपलाइनचा हॉल्व्ह कमी केला असेल. अशा प्रकारची अरेरावी केली जात असेल आणि त्यातून जनतेला वेठीस धरले जात असेल तर हे यापुढे सहन केले जाणार नाही. डी. डी. चौगले म्हणाले, 'कोल्हापूर जिल्हा हा पूर्वीपासूनच देशात पाणीदार असताना समरजितसिंह घाटगे मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जलयुक्त शिवाराचे कौतुक करत जिल्ह्याला जलयुक्त शिवारची गरज नसताना आपल्या अक्कलेचे दिवाळे काढत फिरतात. तर दुसरीकडे मात्र मुरगूडच्या जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टाचा घासयला लावतात. हा दुटप्पीपणा आहे.'

२२ हँण्डपंप बसवणार

पालिकेत पाटील गटाची सत्ता असताना शहरातील विविध २२ ठिकाणी बोअरवेल मारले आहेत. सर्व बोअरवेलला आचारसंहिता संपताच आपण तातडीने हातपंप बसवत असल्याची ग्वाही आमदार मुश्रीफ यांनी दिली. या बैठकीस जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, युवराज पाटील, उपनगराध्यक्ष नामदेव मेंडके, पक्षप्रतोद जयसिंग भोसले, पाणी पुरवठा समिती सभापती रवीराज परीट, शामराव घाटगे, शामराव पाटील, बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले, दीपक शिंदे, एस. व्ही. चौगुले, शिवानंद माळी, अनिल राऊत, विशाल सूर्यवंशी, आनंदा मांगले, संजय मोरबाळे, विकास पाटील, रणजित सूर्यवंशी, डी. डी. चौगले, शशिकांत खोत, अँड. जीवन शिंदे, सुधीर सावर्डेकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, सूर्यकांत पाटील,संदीप कलकुटकी आदी उपस्थित होते.आभार दिगंबर परीट यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिअल इस्टेटची वाटचाल ‘अच्छे दिना’कडे

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे (वस्तू व सेवा कर) रिअल इस्टेट उद्योगाला चांगलाच फटका बसला होता. मात्र जीएसटी कमी केल्यामुळे रिअल इस्टेट उद्योग पुन्हा उभारी घेण्याच्या दिशेने झेप घेत आहे. आर्थिक वर्षात जिल्ह्यात २६ हजार खरेदीखतांची दस्तनोंदणी झाली. याद्वारे मुद्रांक शुल्कपोटी राज्याच्या तिजोरीत २९६ कोटीचा महसूल जमा झाला असला, तरी गेल्या वर्षीपेक्षा चार हजारांने दस्तनोंदणी कमी झाली आहे. जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यावर्षी रिअल इस्टेट उद्योगाची वाटचाल अच्छे दिनाच्या दिशेने वाटचाल करेल, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले.

जिल्हा मुद्रांक कार्यालयाकडे खरेदी खत, बक्षिसपत्र, विकसन करारनामा, भाडेपट्टी हस्तांतर करार आदी ६३ प्रकाराच्या माध्यमातून मुद्रांक शुल्क जमा होतो. २०१६ मध्ये घेतलेला नोटाबंदीचा निर्णय जून २०१७ पासून जीएसटी लागू करण्याचा निर्णयानंतर विशेषत: रिअल इस्टेटवर त्याचे गंभीर परिणाम दिसून आले.

२०१६-१७ आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यात २६,३६३ खरेदीखतांची नोंदणी झाली. नोंदणीद्वारे १२४ कोटींचा मुद्रांक महसूल जमा झाला. २०१७-१८ मध्ये ३०,५७३ खरेदीखतांची नोंदणी होऊन १५६ कोटींचे मुद्रांक शुल्क जमा झाले. २०१७-१८ च्या मध्ये खरेदीखतामध्ये झालेली वाढ जीएसटी लागू होण्याचपूर्वीचा होती. जीएसटी लागू होण्यापूर्वी दस्तांची नोंदणी झाल्याने मुद्रांक शुल्कामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. २०१८-१९ वर्षामध्ये जमा झालेल्या एकूण २९६ कोटी मुद्रांक शुल्कापोटी खरेदीखताद्वारे १४३ कोटींचा महसूल जमा झाला. २०१८-१९ मध्ये २६, ५५५ खरेदीखतांची नोंदणी झाली. गेल्यावर्षीपेक्षा ४,०१८ खरेदीखतांची नोंदणी कमी होऊन १३ कोटीचा महसूल कमी झाला.

बांधकाम व्यावसायिकांसाठी १२ टक्के जीएसटी आकारणीमुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी झाल्याने शुल्कामध्ये घट झाल्याचे दिसून येते. मात्र दोन महिन्यांपूर्वी जीएसटीमध्ये सात टक्के घट करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये वाढ होऊ लागली असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. एक जूनपासून बांधकाम व्यावसायिकांसाठी असलेल्या पोटनियमामध्ये बदल होणार असल्याने रिअल इस्टेट उद्योग पुन्हा उभारी घेईल, असे बांधकाम व्यवसायातील तज्ज्ञांनी सांगितले.

.................................

चौकट

२०१८-१९ मधील मुद्रांक शुल्क जमा

प्रकार दस्तनोंदणी रक्कम

खरेदीखत २६,५५५ १४३ कोटी

बक्षिसपत्र ९४३ तीन कोटी ५८ लाख

विकसन करारनामा ८९ तीन कोटी ८६ लाख

भाडेपट्टी हस्तांतर ९६ एक कोटी ८३ लाख

.....................................

कोट

'सहायक नगररचनाकारांनी मूल्यांकनाचे केलेले काम आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यावर्षी उद्दिष्टापेक्षा जास्त मुद्रांक वसुली करण्यात यश आले. रेरा कायद्यामुळे नागरिकांची फसवणूक होत नसल्याने अधिक पारदर्शकता आल्याचा परिणामही मुद्रांक वसुलीवर झाला.

सुंदर जाधव, जिल्हा मुद्रांक अधिकारी

....................

' नोटाबंदी व जीएसटीमुळे रिअल इस्टेटला मंदीच्या झळा सोसाव्या लागल्या. मात्र काही दिवसांपूर्वी जीएसटी १२ टक्क्यांवरुन पाच टक्के करण्याचा निर्णय आणि एक जूनपासून पोटनियमामध्ये होणाऱ्या बदलांमुळे रिअल इस्टेट उद्योग पुन्हा उभारी घेण्याची शक्यता आहे.

महेश यादव, माजी अध्यक्ष, क्रिडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान अधिकाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीसंबधी गुरूवारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सकाळी ११ ते २ या वेळेत एक हजारहून अधिकजणांना मार्गदर्शन करण्यात आले.

'कोल्हापूर'साठीच्या अधिकाऱ्यांना केशवराव भोसले येथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारे, विजया पांगारकर तर 'हातकणंगले'साठी राजाराम कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता कुलकर्णी, अमित माळी यांनी प्रशिक्षण दिले. मतदान यंत्राचे सील उघडताना उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखवणे, उमेदवारनिहाय पडलेल्या मतांची नोंद करणे यासंबंधीची माहिती पॉवर पॉईंट प्रेजेंन्टेशनवर दाखवण्यात आली. प्रशिक्षणानंतर उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले. दोन्ही मतदारसंघाचे २८८ मतमोजणी पर्यवेक्षक, २८८ मतमोजणी सहायक, २८८ मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, २६ अतिरिक्त सूक्ष्म निरीक्षक, ५२ पर्यवेक्षक, ५२ मतमोजणी सहायक प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

पोष्टल मतमोजणीचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले. यावेळी १०० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. पोष्टल मतदानावरील बारकोडचे क्युआर कोडचे स्कॅनिंग कसे करावे, त्यांची नोंद कशी करावी, यासंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली. 'कोल्हापूर'चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई, 'हातकणंगले' निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर हे मुंबईत निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षणात सहभागी झाले. मतमोजणीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मोजणी प्रक्रिया कशी पार पाडावी, यासंबंधी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आयोगाकडून देण्यात आलेली माहिती देण्यासाठी पुन्हा २० मे रोजी सर्व मतमोजणी अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानंतर २२ मे रोजी प्रत्यक्ष मतमोजणीची रंगीत तालीम होईल. तेथे प्रशिक्षणाची उजळणी करून प्रत्यक्ष यंत्रावर मोजणीचा डेमो दाखवला जाईल.

....

पहाटे पाच वाजताच ...

२३ मे रोजी सकाळी ७ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असली तरी निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षक पहाटे ५ वाजता मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मतमोजणीपूर्व तयारी करून उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींसमोर सकाळी सात वाजता मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सील फोडण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांना प्रशासनाकडून निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली आहेत.

............

अॅपवरही निकाल

व्होटर हेल्पलाईन अॅप मोबाइलवर डाऊनलोड केल्यास घरबसल्या लाईव्ह फेरीनिहाय निकाल कळणार आहे. अधिकाऱ्यांनी फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यापूर्वीच अॅपवर मतदानाची संख्या कळेल. यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी गर्दी कमी होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. अॅन्ड्रॉइड मोबाईलवर गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन 'व्होटर हेल्पलाईन' असे इंग्रजीत टाइप करून अॅप डाऊन लोड करता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्पलाइन.... पान २ साठी

$
0
0

जिल्हा परिषद...

शिक्षण विभाग (प्राथमिक) : २६५०७८१

शिक्षण विभाग (माध्यमिक) : २५४०४६८

ग्रामपंचायत विभाग : २६६८२२९

जिल्हा आरोग्य अधिकारी : २६५२३२७

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी : २६५२३३१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी १७ मे साठी

$
0
0

पुरस्कार वितरण : आद्य श्रीमद जगदगुरू शंकराचार्य पीठातर्फे शंकराचार्य जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण, स्थळ : शंकराचार्य मठ, शुक्रवार पेठ, वेळ : सकाळी १० वा.

महोत्सव : संध्यामठ तरुण मंडळातर्फे संध्यामठ महोत्सवात विविध स्पर्धा, स्थळ : शिवाजी पेठ, वेळ : सकाळी १० वा.

प्रदर्शन : गडकोट छायाचित्रांचे प्रदर्शन, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सकाळी १० ते ८ वा.

उद्घाटन : ट्रेनिंग स्कूल अभ्यासक्रमाचे उद्घाटन, स्थळ : शासकीय तंत्रनिकेतन, वेळ : सकाळी ११ : ३० वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन दरोडाप्रकरणीमेकॅनिकल इंजिनीअरला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी सुट्टीच्या दिवशी एचडीएफसी बँकेच्या शाहूपुरी येथील खात्यावर हॅकर्संनी दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी इम्फाळ (मणिपूर) येथून मेकॅनिकल इंजिनीअर खेमद्राम जॅकी सिंग (वय २७) याला अटक केली. त्याच्या खात्यावर २५ लाख रुपये जमा झाले असून तो मैत्रिणीला देत असल्याचे तपासात उघड होत आहे. या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे.

शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी १९ एप्रिल रोजी, सुट्टीच्या दिवशी ऑनलाइन दरोडा टाकून ६३ लाख रुपये परस्पर दुसऱ्या अकाउंटवर वर्ग केले होते. ही मूळ रक्कम दि कोल्हापूर अर्बन बँकेची आहे. हॅकर्सनी दोन तासांत ही रक्कम हरियाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यातील विविध बँकांच्या खात्यावर पैसे वर्ग केल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांचे एक पथक इम्फाळ येथे गेले होते. त्यांनी येथून मेकॅनिकल इंजिनीअर असलेला सिंग याला ताब्यात घेतले. त्याच्या अकाउंटवर २५ लाख रुपये जमा झाले आहेत. तो जमा झालेली रक्कम एका मैत्रिणीला देत होता. अन्य अकाउंटवर पैसे वर्ग करुन त्यांच्याकडून ५० टक्के कमिशन घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांच्या खात्यावर पैसे कोणी जमा केले, याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. संशयितांच्या कॉल डिटेल्सवरुन सायबर शाखेकडून तपास सुरु आहे. या प्रकरणी १२ मे रोजी पोलिसांच्या चार पथकांनी मुंबई आणि इम्फाळ येथे छापे टाकून तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून संगणक, राउटर, बँक पासबुके जप्त केली होती. त्याला कोर्टासमोर हजर केले असता २२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उजळाईवाडीत सापडला मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी जवळील एका हॉस्पिटलसमोरील झाडाखाली अर्जुन बसप्पा केंगानूर (वय ५०, रा. सौंदत्ती, जि. बेळगाव, सध्या रा. गोकुळ शिरगाव) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी सापडला. हा मृतदेह कागदी पुठ्ठ्यात गुंडाळून ठेवला होता. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजळाईवाडी येथे मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. त्याच्या खिशातील डायरीनुसार नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. त्याचा मोठा भाऊ गॅरेजमध्ये वॉचमन म्हणून काम करतो. त्याला बोलावून घेतल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. मृत अर्जुनही गोकुळ शिरगाव येथील एका खासगी कंपनीत वॉचमन म्हणून काम करतो. दरम्यान, घटनास्थळी करवीरचे उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली. या प्रकरणी तपास करण्याचे आदेश गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोहताना दम लागल्याने मुलीचा दुर्देवी मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा येथील खणीत पोहताना दम लागल्याने समृद्धी अमित सूर्यवंशी (वय ९, रा. माधवप्रेम अपार्टमेंट, मोहिते मळा, देवकर पाणंद परिसर) या विद्यार्थींनीचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. त्यांच्या कुटुंबियांनी समृद्धीचे मरणोत्तर नेत्रदान केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी ही परिसरातील एका बालमंदिरात चौथीत शिकते. तिला पोहण्यास शिकविण्यासाठी सूर्यवंशी कुटुंबातील काही मुले गुरुवारी सकाळी रंकाळा परिसरातील खणीत आली. समृद्धीच्या आत्याचे पती रोहित रणवरे हे नाथा गोळे तालीम परिसरात राहतात. ते मोहिते मळा येथे सूर्यवंशी यांच्या घरी आले होते. मुलांना पोहायचे असल्याने समृद्धी हिच्यासह अन्य तीन मुले या ठिकाणी पोहण्यासाठी आली. समृद्धी दहा वाजण्याच्या सुमारास पाण्यात उतरली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पाण्यात व्यवस्थित पोहली. मात्र काही वेळाने तिला दम लागल्याने ती पाण्यात गुदमरली. हा प्रकार रणवरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मुलीला पाण्याबाहेर काढले. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने जमले. त्यांनी तिच्या पोटातील आणि फुप्फुसातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला चक्कर आल्याने ती बेशुध्द पडली. तिला तत्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तिच्या फुफ्फुसात पाणी गेल्याने उपचार सुरु असताना तिचा दुर्देवी मृत्यू झाला. समृद्धी हिचे वडील एका फायनान्स कंपनीत नोकरी करतात. आई गृहिणी असून त्यांची दुसरी मुलगी पाच वर्षांची आहे. समृध्दीच्या आई आणि वडिलांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

हरहुन्नरी समृद्धी

समृद्धीने शालेयस्तरावर घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत क्रमांक मिळविला होता. तिने अन्य अनेक स्पर्धांतही बक्षीसे पटकाविली होती. तिच्या दुर्देवी मृत्यूची माहिती तिच्या शाळेतील शिक्षक आणि मैत्रिणींना कळताच त्यांनीही मोहिते मळा येथील तिच्या घरी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मगरीने मुलाला ओढून नेले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीपात्रात पाण्यात पाय सोडून बसलेल्या एका बारा वर्षांच्या मुलाला मगरीने ओढून नेले. या मुलाचा शोध सुरू असून, तो अद्याप सापडलेला नाही.

आकाश मारुती जाधव (१२, मूळ गाव निंबळक, जि. विजयपुरा) असे त्या मुलाचे नाव आहे. तो वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर कुटुंबातील आहे. डिग्रज-ब्रह्मनाळ रस्त्यावर छोटा पाणवठा आहे. तेथे जवळच वीटभट्टी असून, तेथील कामगारांची मुले पाणवठ्यावर जातात. गुरुवारी आकाश आणि त्याच्या दोन बहिणी पाणवठ्यावर गेले होते. आकाश नदीच्या पाण्यात पाय सोडून खेळत होता. अचानक मगरीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला खोल नदीपात्रात ओढून नेले. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

बराच वेळ मगर आकाशला जबड्यात धरून नदीपात्रात फिरत होती. ते दृश्य पाहून बघ्यांच्या अंगावर काटा आला. वन कर्मचाऱ्यांनी नौकेतून मगरीचा पाठलाग केला. काही वेळ पाठलाग केल्यानंतर मगरीने आकाशला सोडले. मगरीने आकाशला सोडल्याचे पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याचा नदीपात्रात शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लीम संस्थांचा दातृत्वाचा हात

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर

मुस्लीमधर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु असला तरी वर्षभर गरीबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या समाजातील संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपताना वर्षभर सामाजिक कार्यात सातत्य ठेवले आहे. गरीबांना वर्षभर रेशन, वैद्यकीय उपचारासाठी मदत, शिक्षणात खंड पडू नये म्हणून मदत, रक्तदान हे उपक्रम या संघटनांकडून वर्षभर राबवले जातात.

प्रत्येक मुस्लीम व्यक्तीकडून एकूण उत्पन्नातील अडीच टक्के रक्कम 'जकात' म्हणून बाजूला काढून ठेवली जाते. या रक्कमेतून नातेवाईक व मित्र मंडळींना मदत केली जाते. पण जकातीतील काही रक्कम समाजातील दीन, दुबळ्यांसाठी खर्च केली पाहिजे अशी कल्पना २००० सालामध्ये मार्केट यार्ड येथील बागवान समाज भाजी फळे बैतुलमाल कमिटीच्यावतीने सुरु करण्यात आली. फळ, भाजीपाला व्यापाऱ्यांनी एकत्रित केलेल्या रक्कमेतून वर्षभर गरजवंताना औषधोपचार, विवाह समारंभासाठी मदत केली जाते. २००५ मध्ये आलेल्या महापुरात शिरोळ तालुक्यात तीन टन गहू, तांदूळ, भाजीपाल्याचे वाटप केले होते. सानेगुरुजी वसाहत येथील अंध युवक संस्थेच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी गेली दहा वर्षे मोफत भाजीपाला पुरवला जात आहे.

बागवान समाजाच्या पावलावर पाऊल ठेवत कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीकडून सर्व जाती धर्माच्या २०० निराधार कुटुंबांना दर महिन्याला रेशन पुरवले जाते. औषधे, शस्त्रक्रियेसाठी मदत केली जाते. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते. झाकीर हुसेन शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत रिक्षाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. बेवारस, विधवा कुटुंबांना मदत केली जाते. सीपीआरला रक्ताचा तुटवडा पडल्यास समितीचे सदस्य ४० ते ५० बॅग्ज रक्तदान करतात.

महाराणा प्रताप चौकातील मोमीन बिरादरी खैरुल अंजुमन या संस्थेच्यावतीने १५० कुटुंबांना मोफत धान्य व रेशन दिले जाते. फक्त मुस्लीम कुटुंबांना न देता सर्व जातीधर्माच्या कुटुंबांना मदत केली जाते. ही मदत देताना गरजू कुटुंबांना संस्थेकडे अर्ज द्यावा लागतो. अर्जाची खातरजमा केल्यानंतर मदत दिली जाते. चार ते पाच वर्षात कुटुंबाची परिस्थिती सुधारल्यानंतर मदत बंद केली जाते. आणि दुसऱ्या कुटुंबाला मदत केली जाते. मॅरेज ब्युरोमधून विवाह जुळवण्याचे काम केले जाते. सहारा खिदमत फाउंडेशनच्यावतीने खातरजमा करुन गरजूंना मदत केली जाते. या संस्थेचे २० ते २५ सभासद असून वैद्यकीय मदतीवर फाउंडेशनचा भर आहे.

................

कोट

' जकातीमधील दहा टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च व्हावी ही आमची भावना होती. आमच्या उपक्रमाला मुस्लीम समाजातील अनेक व्यक्ती मदत करतात.

फिरोज बागवान, बैतुलमाल बागवान समिती

....

'गाजावाजा न करता मदत करणे हा धर्म आहे. आपली मदत योग्य व्यक्तीला, योग्य वेळी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. समाजात अनेकांना मदत हवी असून त्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी पुढे आले पाहिजे.

जब्बार देसाई, सहारा खिदमत फाऊंडेशन

.........

'गरीब, गरजू, वंचिताना मदत व्हावी या हेतूने रेशन, औषधोपचारासाठी मदत केली जाते. घटस्फोट होऊ नयेत यासाठी बिरादरीच्यावतीने वर्षभर समुपदेशन केले जाते. त्यामुळे अनेकजण सुखाने संसार करत आहेत.

मुनीर मणेर, मोमीन बिरादरी खैरुल अंजुमन

.........

'मुस्लीम धर्मियांबरोबर अन्य समाजातील गरीबांना मदत मिळाली पाहिजे या भावनेतून आम्ही काम करतो. वैद्यकीय आणि औषधोपचारासाठी मदत करताना रक्तदान, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यावर आमचा भर आहे.

अर्शद अत्तार, जिल्हा बैतुलमाल कमिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरमअभावी महापालिकेची सभा तहकूब

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेची शुक्रवारी बारा वाजता बोलवण्यात आलेली महासभा कोरमअभावी तहकूब करण्या आली. महापौर सरिता मोरे यांच्या आदेशानुसार नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी सभा तहकूब केल्याचे जाहीर केले. सभेमध्ये प्रामुख्यांने सेंट्रल किचन व पाणीपुरवठ्याचा विषय येण्याची शक्यता होती. पण सभेकडे नगरसेवकांनी पाठ फिरवली. अनेक नगरसेवक महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात आले होते. पण कोरम पूर्ण होणार नसल्याने अन्य नगरसेवक सभागृहात जाण्यापूर्वीच चौकातूनच परतले. संजय मोहिते, सुभाष बुचडे, सुनील पाटील, सुरेखा शहा, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम आदी सभागृहात आले. पण अन्य सदस्य सभेची वेळ होऊनही न आल्याने महापौर मोरे यांच्या आदेशाने नगरसचिव कारंडे यांनी सभा तहकूब केल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images