Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांगोल्याच्या दत्ता शिंदेंनी हातांनी पडले ५६ आड

$
0
0

अब तक छपन्न...

सांगोल्याच्या दत्ता शिंदेंनी हातांनी पडले ५६ आड

सुनील दिवाण, पंढरपूर

सांगोला तालुक्यातील बलवडी गावाच्या दत्ता शिंदे यांनी हातांनी तीन फूट व्यासाचे आतापर्यंत ५६ आड पाडले आहेत. तेही अगदी एका माफक दरात. सांगोल्याची कायम दुष्काळी तालुका म्हणून आहे. बलवडी गाव देखील पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेले आहे. लोकांना किमान पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून दत्ता शिंदे यांनी हातांनी बोअर पडायच्या प्रयोगाला २०११मध्ये सुरुवात केली.

पूर्वीच्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी लहान लहान आड केले जायचे आणि हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन दत्ताने छोट्या दांड्याचे खोरे आणि छोटी कुदळ याचा वापर करीत एकट्यानेच आड बनवायला सुरुवात केली. आड बनविताना देखील तीन फूट इतका अतिशय बारीक व्यास धरून त्याने खोदायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या प्रयत्नाला यश येऊ लागले आणि अतिशय कमी खर्चात शेतकऱ्यांना तो आड हातानेच आड काढून देऊ लागला. मदतीला पत्नी आणि एखाद्या मजुराच्या साहाय्याने तो हळूहळू तो आड खोल करीत जाऊ लागला आणि पाहतापाहता चक्क एकाच मापात शंभर फुटांपर्यंत तो हे आड तयार करू लागला. जसेजसे जमिनीच्या पोटात खोदाई करायला लागायची तशी प्रचंड उष्णता, कमी ऑक्सिजन, अशा त्रासाला त्याला तोंड द्यावे लागे. पण, आता गेल्या आठ वर्षांत दत्ताला याची चांगलीच सवय झाली आहे. आजपर्यंत त्यांनी तब्बल ५६ आड पाडले आहेत. दत्ता अगदी एका रेषेत खोलपर्यंत आड तयार करतो. जमिनीचा शेवटच्या स्तराला जेव्हा पाणी लागते, तेंव्हाच त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरते. एखादा पाणाड्या चुकल्यावर शंभर फूट खोलीवरून पुन्हा जमिनीत आडव्या रेषेत तीस फुटापर्यंत खोदत जाऊन तो शेतकऱ्याला पाणी मिळवून देतो. त्यामुळेच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाऱ्या बलवडीमधील शेतकरी दत्ताच्या आडामुळे आता बागायती शेतीची स्वप्ने बघू लागली आहेत.

आपल्या परिस्थितीमुळे जीवावर उदार होऊन दत्ता करीत असलेल्या या कामामुळे आज बलवडीत आडातील पाण्यामुळे शेततळी भरू लागली आहेत. त्या पाण्यावर परिसरातील डाळिंब बागा आणि इतर पिके जिवंत राहिली आहेत. परिसरातील जनावरांसाठी हिरवा चारा मिळू लागला आहे. दत्ताने स्वतःच्या हाताखाली काम करणाऱ्या तीन जणांना हातांनी आड पडायला शिकवले असून, आता ही मंडळी देखील परिसरात अशा पद्धतीची आड तयार करू लागली आहेत. बलवडीतील डॉ. अशोक कवडे यांनी दोन महिन्यांपूर्वी पाडलेल्या आडातून आता आपले शेततळे भरून घ्यायला सुरुवात केली आहे. कायम दुष्काळी असलेल्या माझ्या जमिनीत आता बागायत होणार, असे ही कवडे म्हणाले. बलवडी भागात अनेक शेतकरी दत्तामुळे बागायतदार झाले आहेत. दत्ता सारखा माणूस तालुक्यात काय जिल्ह्यात देखील शोधून सापडणार नाही, त्याचे गावावर प्रेम असल्याचे सूर्यकांत यादव सांगतात. मशीनने बोअर पडल्यास सर्व खर्च दीड लाखांच्या घरात जातो. मात्र, हेच काम दत्ता केवळ २५ हजारांत करीत असल्याने शेतकऱ्यांना दत्ताचे आड फायदेशीर ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशातील मंदीच्या तीव्रतेत वाढ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'मोदी सरकारने केलेली नोटाबंदी सर्वात मोठी चूक होती. यामुळे शेती आणि लघू उद्योगातील रोजगार घटले. त्यातून देश सावरण्याआधीच जीएसटी लागू झाला. त्याच्या अंमलबजावणीची प्रणाली उद्योजक, व्यावसायिकांसाठी साखळदंड बनली आहे. परिणामी देशात मंदीची तीव्रता वाढत आहे. २३ मेनंतर कोणतेही सरकार आले तरी त्यांना यावर त्वरित ठोस उपाययोजना करावी लागेल. तसे न केल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे संकेत आतापासूनच मिळत आहेत,' असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले. दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौउंड्रीमनच्या येथील शाखेच्या ४२ व्या वार्षिक सभेत ते बोलत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. येथील रेसीडन्सी क्लबमध्ये सभा झाली.

डॉ. पाटील म्हणाले, 'सध्या देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. विकासदर घटला आहे. नुकत्याच बाहेर आलेल्या आकडेवारीवरून ४७ वर्षात सर्वाधिक बेरोजगारांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले. उद्योग, व्यवसायसह सर्वच घटकांत मंदीचे परिणाम तीव्रपणे जाणवत आहेत. चारचाकी वाहनांची खरेदी कमी झाली. विमान प्रवासी घटले. पर्यटकांची वर्दळ रोडावली. हे मंदीचे संकेत देणारे प्रमुख घटक आहेत. रिझर्व्ह बँकेतून सरकारने बँकांच्या स्थैर्यासाठीचा राखीव निधी काढला आहे. पहिल्यांदाच स्वायत्त अशा रिझर्व्ह बँकेच्या प्रशासनात राजकीय हस्तक्षेप झाला आहे. शेती संकटात आहे. सर्वच वस्तूंची मागणी कमी झाली आहे. त्याचा परिणाम उत्पादन निर्मितीवर झाला. नविन रोजगार नाहीत. विषमता महाभयानक निर्माण झाली आहे. दारिद्र्याचे प्रमाण वाढते आहे. हे सर्व मुद्दे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रकर्षाने आले आहेत. यातून शहाणपण घेऊन नव्या सरकारने ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.'

दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौउंड्रीमनचे मावळते अध्यक्ष सुरेश चौगुले म्हणाले, 'फौउंड्रीमनच्या येथील शाखेने वर्षभर चांगली कामगिरी केली. वीज दरवाढीविरोधी रस्त्यावर उतरून लक्ष वेधले. त्याची सरकारला सकारात्मक दखल घ्यावी लागली. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाशी चांगला समन्वय निर्माण केला.'

सचिव रवींद्र पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. खजिनदार समीर पाटील यांनी आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. उद्योजक रामप्रताप झंवर, प्रदीप कापडीया, लक्ष्मीदास पटेल, अतुल आरवाडे, रणजित शाह, हरिषचंद्र धोत्रे, अतुल पाटील, संगीता नलवडे, प्रताप पुराणिक, सचिन शिरगावकर, नरेंद्र झंवर, डी. बिस्वास, संजय पाटील आदी उद्योजक उपस्थित होते.

अध्यक्षपदी सुमित चौगुले

संस्थेचे मावळते अध्यक्ष सुरेश चौगुले यांनी २०१९-२० साठी नव्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. अध्यक्षपदी सुमित चौगुले, उपाध्यक्षपदी रविंद्र पाटील, मानद सचिवपदी समीर पाटील, खजिनदारपदी विनय खोबरे यांची निवड झाल्याचे सांगितले. नूतन अध्यक्ष चौगुले यांचा विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांचा अहवाल पुढील आठवड्यात आयुक्तांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या वादग्रस्त कामकाजाच्या चौकशीचा अहवाल चौकशी समितीने प्रशासन आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्याकडे आठवड्यापूर्वी सादर केला. त्या अहवालात लोहार यांच्यावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यांना जिल्हा परिषद सेवेतून मुक्त करावे, असाही निष्कर्ष समितीने नोंदवला आहे. हा अहवाल कार्यवाहीसाठी शिक्षण आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. अध्यक्ष महाडिक यांच्याशी चर्चा करून अहवाल पुढील आठवडाभरात आयुक्तांकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

चौकशी समितीने लोहार यांच्या प्रशासकीय कामकाजासंबंधी गंभीर आक्षेप असलेल्या ४३ तक्रारींची चौकशी करून निष्कर्ष काढला. कर्तव्यात कसूर करणे, दप्तर दिरंगाई करणे, सरकारी नियमांचे उल्लंघन करणे, हेतुपूरस्सर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेस गैरहजर राहणे, असे गंभीर ठपके लोहार यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. हा अहवाल जसाच्या तसा स्वीकारून पारदर्शक कार्यवाही झाल्यास लोहार यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई होऊ शकते. यामुळे समर्थक आणि लाभार्थी संस्थांचे पदाधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी मुंबईपर्यंत मोर्चेबांधणी करत आहेत.

जि. प. च्या सर्वसाधारण सभेत लोहार यांच्या कामकाजाची चिरफाड केलेले आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणारे सदस्य राजवर्धन निंबाळकर यांच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. शिष्टमंडळाव्दारे त्यांची भेट घेतली जात आहे. मात्र निंबाळकर लोहार यांच्यावरील कारवाईवर ठाम असल्याने शिष्टमंडळ हतबल होत आहेत. परिणामी लोहार यांच्यावर काय कारवाई होणार याकडे शिक्षण क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोहार वर्ग एकचे अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाईचा अधिकारी सरकारला आहे. त्यासाठी सीईओ मित्तल त्यांच्यासंबंधी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण आयुक्तांकडे पाठवणार आहे.

.........

कोट

'लोहार यांनी अनेक गंभीर प्रशासकीय चुका केल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. अजूनही माध्यमिक शिक्षण विभागातील कामकाजात सुधारणा दिसत नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. सरकारी पातळीवरही प्रयत्न करणार आहे.

राजवर्धन निंबाळकर, सदस्य, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पशुखाद्य दर कधी कमी करणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ शिरगाव येथील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) कार्यालयावर शिवसेनेने धडक मोर्चा काढला. पशुखाद्याचे दर कमी कधी करणार? असा जाब गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासह संचालकांना विचारला. दर कमी झाले नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी दिला.

गोकुळने पशुखाद्याच्या पोत्यामागे १०० रुपयांची दरवाढ केली आहे. तसेच खरेदी दूधाचे दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी केले आहेत. या प्रश्नांवर शिवसेनेने ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयावर म्हशीसह मोर्चा काढला होता. तसेच जिल्ह्यात चार ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. गोकुळचे अध्यक्ष आपटे यांनी एक पत्रक काढून कच्च्या मालाचे दर वाढल्याने पशुखाद्य दर वाढले आहेत, असा खुलासा केला होता.

गोकुळकडून दरवाढ कमी होत नसल्याने आज सोमवारी गोकुळ शिरगाव येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे आणि गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली. यावेळी गोकुळ संचालक मंडळाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 'गोकुळ'च्या नियमित बैठकीला बहुतांशी संचालक कार्यालयात उपस्थित होते. शिवसैनिकांची समजूत काढण्यासाठी संचालक बाबा देसाई यांना पाठवण्यात आले. पण शिवसैनिकांनी अध्यक्ष आपटे यांनी समोर यावे, अशी मागणी केली. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्ष आपटे, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, विश्वास पाटील, रणजितसिंह पाटील, अमरिश घाटगे, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, मोर्चाला सामोरे गेले. यावेळी पशुखाद्यावरून आक्रमक होत जाब विचारला.

अध्यक्ष आपटे म्हणाले, 'कच्च्या मालाचे दर वाढले असल्याने पशुखाद्यात वाढ झाली. गोकुळच्या पशुखाद्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. तोटा दाखवून पशुखाद्य शेतकऱ्यांना दिले तर ऑडिट विभागाकडून ताशेरे ओढले जातात. कच्च्या मालाचे दर कमी झाल्यानंतर पशुखाद्याचे दर कमी केले जातील. शेतकऱ्यांना परतावा दिला जाईल. दर कमी करण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल.' आंदोलनात सुनील शिंत्रे, संभाजी भोकरे, संभाजी पाटील, राजू यादव, दिलीप माने, सुजित चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षारोपण मोहिमेची तयारी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्या उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी आवश्यक रोपांची मागणी उद्यान विभागाकडे करा, राज्य सरकारच्या निर्देशानुसार वृक्षरोपण मोहीम राबवा,' अशी सूचना देत अमृत योजनेमधील झालेल्या कामाचा आढावा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी घेतला. पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी मुलींचा जन्म झाला अशा पालकांना त्यांच्या नावे एक झाड लावण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

शहरातील उद्याने व परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आयुक्तांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यानंतर झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी स्थायी सभागृहात त्यांची बैठक झाली. यावेळी बोलताना आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'शहरातील अनेक उद्यानामध्ये आवश्यक झाडे लावण्याची गरज आहे. त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी उद्यान विभागाकडे आवश्यक झाडांची संख्या व मागणीचा प्रस्ताव द्यावा. वृक्षारोपण करणाऱ्या खड्ड्यामध्ये माती, खत योग्य प्रमाणात देण्याचे नियोजन करावे. नगररचना विभागाकडील ५० गुंठे जागेवर वृक्षारोपण करण्याचे नियोजन उद्यान अधीक्षकांनी करावे. पाच जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ज्या मुलींचा जन्म झाला त्यांच्या पालकांना मुलींच्या नावे झाडे लावण्यासाठी प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी सकाळी घनकरचा व्यवस्थापन प्रकल्प व सायंकाळी पुईखडी येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आठवड्यात प्रत्येक उद्यानामध्ये श्रमदान करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी नियोजन करावे.' अशी सूचना केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस. के. माने, आर. के. जाधव, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील, नारायण भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, सुनील बिद्रे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

ग्रीन गार्डन डेव्हलपमेंट

शहरातील सर्वात मोठा नाला म्हणून जयंती नाल्याची ओळख आहे. या नाल्याच्या स्वच्छतेसाठी आयुक्तांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. मोहिमेच्या माध्यमातून नाल्याचे पात्रही वाढवले असून पात्राजवळची जागा ग्रीन गार्डन डेव्हलपमेंट म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या शिक्षेवर फेरविचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑनलाईन बदली प्रक्रियेत सोयीच्या गावातील शाळा मिळण्यासाठी चुकीची माहिती भरून प्रशासनाची दिशाभूल केलेल्या ११८ शिक्षकांची तात्पुरती एक वेतनवाढ रोखण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमन मित्तल यांनी गेल्या महिन्यात दिला होता. मात्र काही शिक्षकांकडून अनवधानाने, निकषातील स्पष्टता नसल्याने चूक झाली असल्यास त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी २४ मे रोजी शिक्षेवरील फेरविचारासाठी सुनावणी आयोजित केली आहे. या सुनावणीत संबंधित शिक्षकांना बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.

गेल्या वर्षी बदली प्रक्रियेवेळी १५८ शिक्षकांनी चुकीची माहिती भरून लबाडी केल्याचे समोर आले. यातील ४० शिक्षकांचे खुलासे मान्य करण्यात आले. उर्वरित ११८ शिक्षक दोषी आढळले. त्यांची तात्पुरती एक वेतनवाढ रोखली. सरकारने बदली केलेल्या ठिकाणी जाण्याचा आदेश दिला. मात्र यामधील अनेक शिक्षकांनी आम्हाला निकष न कळाल्याने चुकीचे माहिती भरल्याचे म्हणणे सीईओंसमोर मांडले. परिणामी त्यांच्यावरील कारवाईचा फेरविचार करण्यासाठी सुनावणी आयोजित केली आहे. सुनावणीत जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरून हवी ती शाळा मिळाल्याचे पुढे आल्यास त्या शिक्षकांना गंभीर शिक्षा देण्यात येणार आहे. नियुक्तीची तारीख कोणती द्यायची, यासंबंधी स्पष्टता नसल्याने चूक झाली असल्यास अशा शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा मागे घेण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे.

१५ शिक्षकांना गंभीर शिक्षा

चुकीची माहिती भरून हवी ती शाळा मिळवलेल्या १५ शिक्षकांना गंभीर शिक्षा होणार आहे. कायमस्वरूपी एक वेतनवाढ रोखणे, निलंबित करणे अशी शिक्षा होऊ शकते. सुनावणीनंतर हा निर्णय होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटेक, इन्फेक्शन वेलचे अग्निदिव्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेतील अडथळ्यांची मालिका खंडीत न होता वाढतच चालली आहे. युद्धपातळीवर जॅकवेलच्या कामाला सुरुवात झालेली असताना इंटेक वेल व दोन इन्फेक्शन वेलमधील गाळ काढण्याचे काम अद्याप चालूच आहे. दोन वर्षापूर्वी वेलसाठी खोदाई केलेल्या भागातून गाळ काढून कामाला सुरुवात होण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. याचबरोबर वन क्षेत्रात केवळ ७०० मीटर पाइपलाइन टाकण्यासाठी अद्याप केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही. पावसाळ्यापूर्वी अडथळ्यांचे सर्व अग्निदिव्य पूर्ण झाले, तरच डिसेंबर २०१९ पर्यंत थेट पाइपलाइनद्वारे पाणी मिळू शकेल, अन्यथा आणखी एका वर्षाची शहरवासियांना प्रतीक्षा करावी लागेल.

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पाच वर्षांपासून कामाला सुरुवात झाली. पण योजनेतील अडथळे अद्याप कमी होताना दिसत नाही. अडथळे दूर करण्यास प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले असले, तरी अद्याप पूर्णत: यश आलेले नाही. एकीकडे सोळांकूर ग्रामस्थांचा पाइपलाइन टाकण्यास विरोध कायम असतानाच वन विभागाने केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाला अद्याप ग्रीन सिग्लन मिळालेला नाही. सोळांकूर ग्रामस्थांचा विरोध चर्चेतून दूर होईल, मात्र नैसर्गिक अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे.

योजनेतील सर्वात महत्त्वाच्या जॅकवेलमधील राप्ट टाकण्यासाठी स्टील बांधणीस सुरुवात झाली. मात्र दोन वर्षापूर्वी खोदाई केलेल्या इंटेक वेल व इन्फेक्शन वेलमधील अद्याप केवळ गाळच काढण्याचे काम सुरू आहे. धरणातील पाणी १२ मीटर उंचीच्या इंटकवेलमध्ये घे‌वून ते जॅकवेलद्वारे पाइपलाइनला जोडण्यात येणार आहे. १२ मी. उंचीच्या इंटेक वेलसाठी दोन वर्षापूर्वी सहा मीटरची खोदाई केली. मात्र त्यानंतर काम न झाल्याने पावसाळ्यामध्ये खोदाई केलेली जागा पुन्हा गाळाने भरुन गेली आहे. हा गाळ काढण्याचे काम सद्य:स्थितीस सुरू आहे. प्रत्येकी दहा मी. उंचीच्या इन्फेक्शन वेल क्रमांक एकचे काम केवळ तीन मीटर शिल्लक असून दोन क्रमांकाच्या वेलच्या खोदाईला सुरुवात झाली आहे. या वेलवर १७ मीटरचे आरसीसी बांधकाम करावे लागणार आहे. त्याचबरोबर या तीनही वेल साठी प्रत्येकी १८०० मीमीच्या दोन आरसीसी कनेक्टिंग पाइप टाकावी लागणार आहे. हे काम इंटक व इन्फेक्शन वेलचे काम पूर्ण झाल्यानंतरच करावे लागणार आहे. परिणामी जॅकवेल बांधणी पाणीपातळीच्यावर आणण्याबरोबर तीनही वेलचे काम पूर्ण करण्याचे अग्निदिव्य दीड महिन्यात पूर्ण करावे लागेल.

....

चौकट

केंद्राकडून मान्यतेची प्रतीक्षा

योजनेतील ७०० मीटर पाइपलाइन वन विभागाच्या क्षेत्रातून टाकण्यात येणार आहे. त्याच्या परवानगीसाठी कोल्हापूर येथील मुख्य वनरक्षक यांच्यामार्फत पाठवलेला प्रस्ताव केंद्राकडे एक महिन्यापूर्वी सादर केला आहे. मात्र महिन्यानंतरही केंद्राकडून त्यासाठीची मान्यता मिळालेली नाही. तसेच बिद्री सबस्टेशमधून घेण्यात येणाऱ्या विद्युतपुरवठ्याबाबत संभ्रमावस्था असल्याने यातून प्रशासन कसा मार्ग काढणार यावरच योजना पूर्णत्वाचा टप्पा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानातील पार्ट्यांवर येणार निर्बंध

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्यावतीने सार्वजनिक ठिकाणी राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये दारुच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पत्रावळ्या व ग्लास आढळून आले आहेत. अशा प्रकारांमुळे कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी उद्यानामधील रात्री उशीरापर्यंत होणाऱ्या पार्ट्यांवर निर्बंध येणार आहेत. उद्यान बंद झाल्यानंतर येथे पार्ट्या होत असल्यास पोलिस प्रशासन त्याची गंभीर दखल घेणार आहे. तसेच शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज व अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला एक अधिकारी व चार स्वतंत्र पोलिस कर्मचारी देण्याचा निर्णय बैठकीत झाला.

पावसाळा पूरस्थिती पूर्वतयारीबाबत आयुक्त कार्यालयात सोमवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी आयुक्त डॉ. मल्लिन्नाथ कलशेट्टी होते. ते म्हणाले, 'शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणे, ओपन ग्राउंड व उद्यानामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी दारुच्या बाटल्या, पत्रावळ्या, प्लास्टिकचे ग्लास आढळून आले. उद्यानांची निगा राखण्यासाठी पोलिस राउंडवेळी येथे फेरी मारावी.'

शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत म्हणाले, 'शहरात ज्याठिकाणी पुराचे पाणी येते, तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. चार विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या धोकादायक इमारती उतरवण्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर काही वादग्रस्त इमारती उतरवण्यासाठी पोलिस बंदोबस्त लागणार आहे.'

जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, 'ओपन बारवर पोलिस प्रशासन सातत्याने कारवाई करत आहेत. त्याचप्रमाणे उद्यानातील अवैध प्रकार रोखण्यासाठी नियमावली तयार करावी. त्याची माहिती नागरिकांना द्यावी. उद्याने बंद झाल्यानंतर होणाऱ्या अवैध प्रकारांना अटकाव करण्यासाठी उद्यान सुरक्षारक्षकांचे संपर्क क्रमांक द्यावेत. त्यांना पोलिस प्रशासनाचा क्रमांक दिला जाईल. यातून उद्यानातील पार्ट्यांवर निर्बंध आणले जातील. शहर अतिक्रमणमुक्त व होर्डिंग्जमुक्त करण्यासाठी कायमस्वरुपी एक स्वतंत्र अधिकारी व चार पोलिस कर्मचारी उपलब्ध करुन दिले जातील. शहरातील धोकादायक इमारती उतरवण्यासाठी आवश्यक ठिकाणी पोलिस संरक्षण देण्यात येईल.'

बैठकीस अतिरिक्त पोलिस प्रमुख ऐश्वर्या शर्मा, शहर पोलिस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, आर. के. जाधव, हर्षजीत घाटगे, अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांच्यासह लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज ताराबाई उद्यानाची स्वच्छता

$
0
0

कोल्हापूर

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती महापालिकेच्यावतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. संभाजीराजेंच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी (ता. १४) सकाळी सात वाजता ताराबाई उद्यान येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. मोहिमेमध्ये महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. तसेच शहरातील प्रमुख संस्था, व्यक्ती यांनी मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय पोषण आहारसंघटनेतर्फे धरणे आंदोलन

$
0
0

कोल्हापूर: केंद्रीय किचन पद्धती अंमलबजावणी विरोधात जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेतर्फे सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार संघटनेने केला.

२००३ पासून शालेय पोषण आहार योजना कार्यरत आहे. बचत गट आणि व्यक्तिगत ठेकेदारांकडून आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जातो. यामुळे जिल्ह्यातील बचत गटातील सात हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान, १९ मार्च, २०१९ मध्ये नागरी भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार केंद्रीय किचनपद्धतीने वितरण करण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे बचत गटातील महिला स्वयंपाकी, मदतनीस यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार आहे. त्या दरमहा एक हजार रूपये मानधनावर १६ वर्षे काम केले. केंद्रीय किचन पद्धतीमुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. यास विरोधासाठीच्या आंदोलनात वर्षा कुलकर्णी, अमोल नाईक, अश्विनी साळोखे, साधना पाटील, शशिकला रायकर, कल्पना खोराटे, सुनीता मोहिते आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरकरांची ‘उड्डाणे’ वाढली

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

Tweet :@sachinyadavMT

कोल्हापूर : पर्यटन, नोकरी, वैद्यकीय उपचार, उच्चशिक्षण, परदेशातील नातेवाईकांच्या भेटीगाठी आदींसाठी गेल्या सव्वापाच वर्षात १ लाख २४ हजार ४०० कोल्हापूरकरांनी पासपोर्ट काढले आहेत. २०१७च्या तुलनेत २०१८ मध्ये जादा साडेपाच हजार पासपोर्ट काढले गेले आहेत. गेल्या पाच वर्षांतील संख्या पाहता दरवर्षी यात वाढच होत आहे. यंदा जानेवारीपासून ८ मे अखेर ९ हजार ९२९ जणांनी पासपोर्ट काढले आहेत. यात तरुणांची संख्या सर्वाधिक असून उच्चशिक्षण आणि नोकरीसाठी पासपोर्ट काढत असल्याची माहिती तरुणांनी अर्जात दिली आहे.

जगभर दळणवळण सुलभ होण्यासाठी आणि तत्काळ पासपोर्ट मिळण्यासाठी केंद्र सरकारने पासपोर्ट सेवा सुलभ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे येथे असलेले पासपोर्ट कार्यालय रमणमळा परिसरातील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यालय सुरू झाले. पासपोर्टची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जदाराला भेटीचा दिवस आणि वेळ दिली जात आहे. त्यानंतर अर्ज पोलिस व्हेरिफिकेशनसाठी संबधित पोलिस ठाण्यात जातो. पोलिसांनी अर्जदारांची चौकशी केल्यानंतर हा अर्ज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पासपोर्ट विभागात व्हेरिफिकेशनसाठी जातो. पासपोर्टसाठी केलेला ऑनलाइन अर्ज, पोलिसांनी दिलेला गोपनीय अहवाल पडताळून अर्जाचे व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर हा अर्ज पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जात आहे.

२०१७ आणि २०१८च्या तुलनेत पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. उच्चशिक्षण, नोकरी, पर्यटन, वैद्यकीय उपचार, परदेशस्थ नातेवाईकांची भेट, उद्योग-व्यापारासाठीच्या संधी यातून परदेशवारीचा टक्काही वाढला आहे. दरवर्षी शिक्षणासाठी कोल्हापुरातून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. परदेशात नोकरीसाठीही अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पासपोर्ट काढला जात आहे.

पासपोर्ट काढणाऱ्यांत तरुणांची संख्या अधिक असल्याचे पासपोर्ट विभागाच्या सूत्रांनी सांगितले. परदेशात शिक्षण आणि चांगल्या पॅकेजच्या नोकरीची संधी मिळत असल्याने अनेकांचा कल त्याकडे आहेत. अनेकांचे परराष्ट्रीय कंपन्यांत नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. संबधित कंपनीचा करार आणि कंपनीकडून काही देशांत दोन, तीन आणि पाच वर्षांचा व्हिसा मिळणार असल्याचेही काही तरुणांनी अर्जात म्हटले आहे.

पासपोर्टसाठी दाखल झालेल्या अर्जांचे सात, चौदा आणि एकवीस दिवसांत व्हेरिफिकेशन केले जात आहे. पोलिस ठाण्याने दिलेल्या गोपनीय अहवालानुसार कागदपत्रांची तपासणी केली जाते. ऑनलाइन अर्ज भरलेल्या पसर्नल प्रॅक्टिक्यूलर फॉर्मची (पीपीएफ) क्रॉस तपासणी केली जाते. त्यासह व्हेरिफिकेशनची प्रक्रिया ४८ तासांत पूर्ण केली जात असल्याने पासपोर्ट नागरिकांच्या हाती लवकर मिळत आहे. दररोज या कामाचा अहवाल वरिष्ठांना पाठविला जात आहे.

- प्रवीण चौगुले, पोलिस निरीक्षक, पासपोर्ट विभाग

टॅबचा कमी वापर

बनावट आधारकार्ड, पॅनकार्डसह अन्य कागदपत्रे देऊन पासपोर्ट काढणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पोलिस खात्याला टॅब देण्यात आले. या टॅबच्या माध्यमातून पासपोर्ट काढणाऱ्या व्यक्तिच्या घरांतून आवश्यक ती सर्व माहिती ऑनलाइन दिली जाते. प्रत्येक पोलिस ठाण्याला एक टॅब दिला आहे. ठाण्यातील पासपोर्टचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून गुन्हे दाखल असल्याची खात्री, संबधित व्यक्तिचा फोटो, त्याच्या निवासाचे ठिकाणाचे लोकेशन ऑनलाइनद्वारे विभागाला पाठविले जाते. मात्र, सध्या राष्ट्रीयत्व आणि गुन्हे दाखल या दोनच गोष्टींची अधिक तपासणी केली जात असल्याने या टॅबचा वापर कमी झाला आहे.

पोलिस ठाण्यातच लागतो वेळ

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांत पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना चौकशीसाठी वेळ दिली जाते. मात्र, पोलिसांवर अन्य कामांचा ताण असल्याने अनेकदा ठाण्यात पासपोर्टचा काम करणारा कर्मचारी उपस्थित नसतो. काहीवेळा तो रजेवर असल्याने नागरिकांना पुढील तारखा दिल्या जातात. चार महिन्यांपूर्वी पासपोर्ट तपासणीसाठी पोलिस ठाणेनिहाय शिबिर घेतले जात होते. आता तेही कमी झाले आहे. त्यामुळे शहरातील पोलिस ठाण्यांत नागरिकांची गर्दी वाढली आहे. काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे दोन ते तीन तास ठाण्याच्या दारात बसावे लागत आहे. पासपोर्ट काढण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज, पत्त्यानुसार पोलिस ठाण्यातील चौकशी आणि व्हेरिफिकेशन या तीन टप्प्यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडे ऑनलाइन माहिती पाठविली जात आहे. मात्र पोलिस ठाण्यात चौकशीसाठी वेळ जात असल्याचा पासपोर्ट काढण्यासाठी येणाऱ्यांची तक्रार आहे.

दृष्टिक्षेपात पासपोर्ट

दाखल अर्ज दिलेले पासपोर्ट

१६७५६ १६७५६

२०१४

२०११८ २०११८

२०१५

१८७२४ १८७२४

२०१६

२७१९५ २७१९५

२०१७

३१६७८ ३१६७८

२०१८

१०६८४ ९९२९ ( ८ मे, २०१९ अखेर)

२०१९

१२५१५५ १२४४००

एकूण पासपोर्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो आहे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

बाचणी (ता. करवीर) येथील ग्रामदैवत जोतिर्लिग चैत्र उत्सव, हनुमान जयंती व दाविद मल्लिक उरुसानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी अमित कारंडे (सावर्डे दुमाला) विरुद्ध रावसाहेब टिळे (शाहूपुरी) यांच्यात झाली. अटीतटीच्या लढतीत शेवटी गुणावर पंचांनी अमित कारंडे याला विजयी घोषित केले.

वस्ताद रंगराव कळंत्रे यांच्या हस्ते आखाडापूजन झाले. प्रथम क्रमांकासाठी अमित विरुद्ध रावसाहेब यांच्यात खम ठोकून खडाखडी झाली. सुरुवातीला अमितने रावसाहेबला हफ्ता भरत खाली खेचून ताबा घेतला. त्यातून रावसाहेबने सुटका करून घेतली. पुन्हा खडाखडी झाली. दोघांनी एकमेकांवर आक्रमक चाल करण्यास सुरुवात केली. पण, कोणालाच यश येत नव्हते. १८ व्या मिनिटांनंतर पंचांनी २ मिनिटांची वेळ दिली. त्यातही निकाल लागला नाही. अखेर पंचांनी गुणांवर अमित विजयी घोषित केले.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत हृषीकेश पाटील (गंगावेश ) विरुद्ध रणवीर पाटील ( मोतीबाग) यांच्या लढतीला प्रारंभ झाला. अवघ्या ३० सेंकदात रणवीरने हफ्ता डावावर हृषीकेशला आस्मान दाखवले. तृतीय क्रमांकासाठी शाहरुख मुल्लाणी (कोगे) विरुद्ध काका टोंगे (शाहूपुरी) यांच्यात तुल्यबळ अशी लढत झाली. ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गोपाळराव पाटील, माजी उपसरपंच सर्जेराव कळंत्रे , शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पै. संभाजी वरुटे, राजीवजी सूतगिरणीचे व्हा. चेअरमन व माजी सभापती पांडुरंग पाटील, मारुती पाटील, सर्जेराव पाटील, नामदेव पाडेकर आदी उपस्थित होते. पंच म्हणून सुभाष पाडेकर, कृष्णात पाटील, वसंत लांडगे, नाना पाटील, नितीन पाटील, संजय पाटील यांनी काम पाहिले. पंच म्हणून यशवंत पाटील व प्रा. पवन पाटील यांनी काम पाहिले.

विजयी मल्ल : नचिकेत पाटील (हळदी), आकाश चिंदगे (सडोली खालसा), राजवीर पाटील (महे), विनायक पाटील, सौरभ पाटील (हळदी), स्वप्नील जाधव,स्वप्नील पोवार, प्रकाश पाटील (कुंभी), प्रवीण पाटील (चाफोडी), परशुराम नंदीवाले (कोपार्डे), किरण पाटील , पार्थ कळंत्रे, सिद्धेश बचाटे, वैभव यादव (शिरोली दुमाला), विजय पुजारी, ओंकार कुंभार (म्हारुळ), सनी अस्वले, संकेत गायकवाड व इतर.

फोटो : बाचणी (ता. करवीर) येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीला प्रारंभ करताना वस्ताद रंगराव कळंत्रे. यावेळी गोपाळराव पाटील, संभाजी वरुटे, पांडुरंग पाटील, रंगराव पाडेकर, सर्जेराव कळंत्रे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांवरील भेगा बुजवण्यास सुरुवात

$
0
0

मटा इम्पॅक्ट

फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर रस्ते विकास प्रकल्पामध्ये तयार केलेल्या सिमेंट काँक्रिट आणि डांबरी रस्त्यांमध्ये मोठ्या भेगा पडल्या आहेत. दोन रस्त्याला जोडणाऱ्या भेगा बुजवण्यास महापालिका प्रशासनाच्यावतीने सोमवारी सुरुवात झाली. महाराष्ट्र टाइम्समध्ये 'भेगा ठरताहेत जीवघेण्या' मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर भेगा बुजवण्याची मोहीम हाती घेतली.

महापालिकेच्यावतीने आयआरबी कंपनीने 'बांधा, वापरा आणि हस्तांतर करा' यानुसार शहरात ४९.४९ किलोमीटरच्या रस्त्यांची बांधणी केली. रस्ते सुसज्ज करताना सिमेंट काँक्रिट व डांबरी अशा जोडप्रकारचे रस्ते केले. मात्र रस्ते बांधणी झाल्यापासून देखभाल झालेली नाही. परिणामी दोन्ही रस्त्यांमध्ये मोठ्या भेगा पडल्या. शहराच्या सर्वच प्रवेशद्वारावरील रस्त्यांची अशी अवस्था झाल्याने मोटारसायकल घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तावडे हॉटेल ते ताराराणी चौक, कळंबा ते आयटीआय, महावीर गार्डन ते खानविलकर पेट्रोल पंप. सर्व ठिकाणच्या रस्त्यांवर जीवघेण्या भेगा असल्याने विशेषत: मोटारसायकलस्वारांना चांगलीच कसरत करावी लागते. याबाबतचे वृत्त सोमवारी (ता.१३) महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले. वृत्ताची दखल घेत तातडीने भेगा बुजवण्यास सुरुवात झाली. खानविलक पेट्रोल पंप ते शहर वाहतूक शाखेसमोरील रस्त्याला भेगा डांबरीकरण करुन बुजवण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाधीस्थळ स्मारक प्रवेशद्वारावरुन खडाजंगी

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळ स्मारक परिसरातील सिद्धार्थ नगरकडील प्रवेशद्वारावरुन महापालिका प्रशासन, नगरसेवक आणि नागरिकांमध्ये खडाजंगी उडाली. या संदर्भात आयोजित बैठकीनंतर सर्वांनी समाधीस्थळाची पाहणी करुन नियोजित प्रवेशद्वाराची माहिती घेतली. मात्र प्रवेशद्वारावरुन स्थानिक नागरिकांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाल्याने पाहणी व्यर्थ ठरली. व्यायामशाळा स्थलांतर करण्यास दिलेली मान्यता समाधीस्थळ पाहणीनंतर मागे घेण्यात आली. परिणामी समाधीस्थळाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला सोमवारी सुरुवात होऊ शकली नाही.

सिद्धार्थनगर येथील नर्सरी बागेत गेल्या पाच वर्षांपासून राजर्षी शाहू समाधीस्थळ स्मारकाचे काम सुरू आहे. चार मे रोजी समाधीस्थळाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना सिद्धार्थनगरकडील बाजूला प्रवेशद्वार ठेवण्यासाठी नागरिकांनी काम बंद पाडले. त्यानंतर महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पदाधिकाऱ्यांसह समाधीस्थळावर नागरिकांशी चर्चा केली. त्यानुसार सोमवारी स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. यावेळी नागरिकांनी सिद्धार्थनगरकडील बाजूला प्रवेशद्वार ठेवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमधील व्यायामशाळा अन्यत्र हलवू नका, दादासाहेब शिर्के उद्यानाचे नाव बदलू नका आदी मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनावर चर्चा सुरू असताना सुशील कोल्हटकर, भारत रुईकर, संजय माळी, वसंत लिंगनूरकर यांनी मते मांडली. डॉ. आंबेडकर हॉल पाच मजली करण्याबरोबरच सिद्धार्थनगर नर्सरी बाग असा उल्लेख करण्याची मागणी केली.

उपमहापौर शेटे यांनी निवेदनाबाहेरील विषयावर चर्चा करु नका, अशी सूचना करत पाच मजली हॉल होऊ शकत नसल्याची तांत्रिक अडचण मांडली. तसेच नावाचा निर्णय यापूर्वीच झाला असून पुन्हा ती मागणी करु नका, अशी सूचना केली. तर माजी नगरसेवक आदिल फरास यांनी महासभेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे समाधीस्थळाचे काम सुरू आहे. बैठकीत निर्णय घेतल्यास महासभेचा अवमान होईल. त्यामुळे पुन्हा हा विषय महासभेपुढे मांडा, अशी सूचना केली.

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'समाधीस्थळाचे नाव सिद्धार्थनगर नर्सरी बाग व उद्यानाचे नाव न बदलण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे.' सिद्धार्थनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतर होणार असल्याने त्याच इमारतीमध्ये अद्ययावत व्यायामशाळा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.' त्याला स्थानिक युवकांना पाठिंबा दिला.

त्यानंतर आर्किटेक्ट अभिजित जाधव यांनी समाधीस्थळाचा आराखडा सादर करत सिद्धार्थनगरकडील बाजूला दोन गेट असल्याचे सांगितले. त्यानंतर नागरिकांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पण नियोजित गेटवरुन स्थानिक नागरिकांमध्ये मतभेद निर्माण झाले. मतभेद वाढत गेल्यानंतर व्यायामशाळाही हलवण्यास दिलेली मान्यता मागे घेण्यात आली. परिणामी प्रवेशद्वारावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहरअभियंता नेत्रदीप सरनोबत, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, माजी महापौर हसिना फरास, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, माजी नगरसेवक आदिल फरास, अफजल पिरजादे, परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत आदी उपस्थित होते.

...

चौकट

मान्यतेनंतर नकार

सिद्धार्थनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पद्माराजे शाळेत स्थलांतर करण्यात येणार आहे. त्या इमारतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमधील व्यायामशाळा स्थलांतरीत करुन अद्ययावत साहित्य देण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. त्याला स्थानिक युवकांनी त्वरीत मान्यता दिली. पण पाहणीनंतर स्थानिक नागरिकांची बैठक झाली. बैठकीत सर्वांबरोबर चर्चा न करता व्यायामशाळा स्थलांतर करण्यास मान्यता का दिली? अशी विचारणा करत मान्यता देणाऱ्या युवकांनाच इतरांनी धारेवर धरले. त्यामुळे व्यायामशाळा स्थलांतर करण्यास अनेकांनी विरोध केला. परिणामी महापालिकेत झालेल्या बैठकीत निकालात निघालेला व्यायामशाळेचा प्रश्नही पुन्हा वादग्रस्त ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती कर्मचाऱ्यांनाफरकाविना सातवा वेतन आयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना एप्रिलपासून सातवा वेतन आयोग लागू केला. त्यामुळे कामगारांच्या पगारात ३६०० रुपयांपासून १८ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना यापूर्वीच्या ३९ महिन्यांचा फरक न देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला. त्यास कर्मचाऱ्यांनी सहमती दिली. त्यामुळे बाजार समितीचे तीन कोटी ९० लाख रुपये वाचले आहेत.

राज्यात कोल्हापूर बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम असून समितीची वार्षिक उलाढाल १८०० कोटी रुपयांची आहे. समितीचे करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व कागल अशा पाच तालुक्यांत कार्यक्षेत्र आहे. येथील गुळाची बाजारपेठ मोठी असून फळे, भाजीपाला, धान्याची मोठी उलाढाल होते. बाजार समितीचे वार्षिक १४ कोटी उत्पन्न आहेत. राज्य सरकारने बाजार समितीला जानेवारी २०१६पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश दिला होता. राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला आहे. ३६ महिन्यांच्या वेतनवाढीचा फरक रोखीने अथवा प्रॉव्हिडंट फंडात वर्ग केला जातो. मात्र बाजार समितीने ३९ महिन्यांचा फरक न देता एप्रिलपासून सातवा वेतन आयोग लागू केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३५०० रुपयांपासून १८ हजार रुपयांपर्यंत पगारवाढ झाली आहे. फरक न देता वेतन आयोग लागू करण्यास कर्मचाऱ्यांनीही मान्यता दिल्याने समितीचे सुमारे चार कोटी रुपये वाचले आहेत. दरम्यान, सातवा वेतन आयोग लागू केल्याने बाजार समितीवर मासिक एक लाख रुपयांचा बोजा वाढणार आहे. वार्षिक एक कोटी रुपयांची पगारासाठी तरतूद करावी लागणार आहे. वेतन आयोग लागू केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्ता दाखवून बाजार समितीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी योगदान द्यावे लागणार आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार सातवा वेतन आयोग लागू करावा लागणार होता. जानेवारी २०१६ पासून फरक न देता एप्रिल २०१९ पासून वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले असल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत.

- बाबासाहेब लाड, सभापती, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातिअंतासाठी निरोगी संवादाची गरज

$
0
0

फोटो... म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'जातिअंताची लढाई अनेक वर्षे सुरू आहे. सध्याच्या काळात जातीचा अभिमान बाळगला जात आहे. त्यामुळे समाजात विसंवादाचे सूर उमटत आहेत. जातिअंतासाठी पुन्हा लढाई देण्याची गरज असून गट, तट, विचारधारांचा आदर करून निरोगी संवादाची गरज आहे,' असे मत जातिअंताच्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केले. चर्चेत डॉ. भारत पाटणकर, राजाभाऊ शिरगुप्पे, डॉ. रवींद्र श्रीवस्ती, अॅड. कृष्णा पाटील यांच्यासह मान्यवरांनी भाग घेतला. राजर्षी शाहू स्मारक भवन येथील मिटिंग हॉलमध्ये परिषद झाली. 'आता उठ माणसा, तोड जातीच्या बेड्या' हे गीत गाऊन डॉ. पाटणकर यांनी परिषदेची सुरुवात केली. अॅड. कृष्णा पाटील म्हणाले, 'वर्गसंघर्ष संपल्यावर जातिअंत होईल, अशी मांडणी डाव्या चळवळीने केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कृती कार्यक्रमातून लढा दिला. डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्माचा स्वीकार केला असला तरी जातिअंताचा शिक्का पुसला गेला नाही. दुसऱ्या जातीमुळे माझ्या जातीचे शोषण होत आहे, ही भावना बळावत चालली आहे. त्यासाठी निरोगी संवादाची गरज आहे.' राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले, 'धर्माला कंटाळून अनेकांनी धर्मांतर केले, पण ज्या जातीत प्रवेश केला त्या जातीतील उच्चवर्णीयांनी त्यांना मूळच्या जातीत कायम ठेवले. धर्मामध्ये उच्च जात व खालची जात यांच्यात संघर्ष सुरू आहे. सध्याच्या राजकारणात जात बळकट करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. जातीतच व्यक्तींना सुरक्षित वाटण्याची भावना बळावत आहे. त्यासाठी राजकीय व सांस्कृतिक वातावरण तयार केले जात आहे. जात संपविण्यासाठी कृतिशील कार्यक्रम आखला पाहिजे.' जात संपविण्यासाठी कृतिशील कार्यक्रमास सुरुवात करण्याची गरज व्यक्त करत भारत पाटणकर म्हणाले, 'जातिअंत करण्यासाठी पूर्वापार झालेले प्रयत्न आणि वर्तमानातील सांगड घालून कृतिशील कार्यक्रम तयार केले पाहिजेत. गोलमेज परिषदेतून त्याला दिशा दिली जाईल.' डॉ. दयानंद ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनिल म्हमाने, दादासाहेब ढेरे, गेल ऑम्वेट, शंकर पुजारी, किरण भोसले प्रमुख उपस्थित होते. ००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माले जपतंय ऐतिहासिक पाऊलखुणा

$
0
0

भगवान शेवडे, वारणानगर

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांची ज्या गावात ऐतिहासिक भेट झाली त्या माले या गावाने आजही या आठवणींनाचा ठेवा भवानी मंदिराच्या रूपाने जपला आहे. दक्षिण दिग्विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झालेले हे मंदिर आजही या सुवर्णक्षणांच्या पाऊलखुणा जपत आहे.

माले गावात गावच्या पूर्वेला असणाऱ्या ओढ्याच्या बाजूला असणारे छोटेखानी भवानीचे मंदिर आज अडगळीत असले तरी सुस्थितीत आहे. याच मंदिरात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भेट झाली आणि इतिहासाला कलाटणी मिळाली. यावेळी संभाजी महाराजांच्या हस्ते भवानी देवीची आरतीही करण्यात आल्याचे उल्लेख इतिहासात येतात. या भावनिक प्रसंगाचे आणि दोघांच्या भेटीचे ठिकाण असणारे भवानी मंदिर सक्षीदार असल्याचा मालेकरांना अभिमान आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील मानकऱ्यांशी संभाजी महाराजांचे मतभेद होऊ लागले. अण्णाजी दत्तो आणि इतर मंत्री संभाजीराजांच्या विरोधात गेले, त्याचीच परिणिती म्हणजे संभाजीराजेंना दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. या घटनेमुळे आणि प्रचंड अस्वस्थ होऊन संभाजीराजे औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाच्या छावणीत गेले. संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले होते. मात्र, काही काळानंतर संभाजीराजे पुन्हा स्वराज्यात दाखल झाले. शिवाजी महाराजांनी काही विश्वासू मावळ्यांना घेऊन संभाजी महाराजांची गुप्तपणे पन्हाळगडावर जाऊन भेट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाऐवजी गडाच्या पायथ्याला असणाऱ्या भवानी देवीच्या मंदिरात संभाजी महाराजांना बोलावून घेऊन भवानी देवीची आरती करून गळाभेट घेतली. स्वराज्यातील घडामोडींची खलबते केली, त्यांनतर पन्हाळगडावर केलेल्या दोघांच्या वास्तव्याच्या नोंदी आजही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजीराजेंच्या या ऐतिहासिक भेटीच्या पाऊलखुणा भवानी मंदिराच्या रूपाने आजही जिंवत असल्याचा माले गावकऱ्यांना अभिमान आहे.

पन्हाळा तालुक्यातील हे छोटे गाव स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्णपर्व अनुभवत आहे. ही भेट जशी संभाजीराजांना आणि त्यांच्या पश्चात तमाम मराठीजणांना स्वराज्यरक्षणाची प्रेरणा देणारी होती. या भेटीचा इतिहास गावकऱ्यांसह परिसरातील शिवभक्तांना इतिहास जतन करण्याची प्रेरणा देणारा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'एफआरपीसाठी धरणे आंदोलन'

नदीकाठच्या गावांमध्येहीपाण्याचे टँकर सुरू करा मुख्यमंत्र्यांचे सातारा जिल्हा प्रशासनाला आदेश

$
0
0

नदीकाठच्या गावांमध्येही

पाण्याचे टँकर सुरू करा

मुख्यमंत्र्यांचे सातारा जिल्हा प्रशासनाला आदेश

सातारा :

सातारा जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. गावातून नदी गेली आहे परंतु, नदीला पाणी नसेल अशा ठिकाणीही मागणीनुसार पाण्याचे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सातारा जिल्हा प्रशासनास दिले. कायम दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजनांचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सरपंचांना दिले.

मुख्यमंत्र्यांनी ऑडिओ ब्रिजच्या प्रणालीद्वारे सातारा जिल्ह्यातील प्रामुख्याने माण-दहिवडी, खटाव, फलटण व कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सरपंचांनी केलेल्या चारा छावण्या, टँकर, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी बाबींच्या तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉटस अपवर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

रोहयोअंतर्गत जिल्ह्यात ३८५ कामे सुरू

सातारा जिल्ह्यातील रोहयोअंतर्गत ३८५ कामे सुरू आहेत. त्यावर २३९८ मजूर काम करीत हेत. जिल्ह्यामध्ये १५३७९ कामे मंजूर करून ठेवण्यात आली आहेत. अकरा तालुक्यांपैकी माण-दहिवडी, कोरेगाव, फलटण या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमधील १८३ गावे व ७७० वाड्या-वस्त्यांमध्ये एकूण २१९ टँकर सुरू आहेत. सर्वाधिक माण तालुक्यांत १०७ तर सर्वात कमी सातारा तालुक्यात एक टँकर सुरू आहे. जिल्ह्यातील ३१० गावांतील १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना ४१.९३ कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामती हातून जाण्याची पवारांना भीती रामदास आठवलेंचा टोला

$
0
0

बारामती हातून जाण्याची पवारांना भीती

रामदास आठवलेंचा टोला

पंढरपूर :

'शरद पवार मोठे नेते असले तरी यंदा लोकांच्या मनात बारामतीत बदल घडवायचा विचार असू शकतो आणि म्हणूनच बारामती हाताची जाणार दिसल्याने पवारांनी मशीनवर टीका सुरू केली आहे,' असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला. दुष्काळी पाहणी दौऱ्यावर असलेल्या आठवलेंनी रात्री उशिरा सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील चारा छावणीला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.

गेल्या वेळी महादेव जानकर बारामतीमधून थोडक्या मतांनी हरले होते. त्यावेळी त्यांनी कपबशी ऐवजी कमळ चिन्ह घेतले असते तर ते १५-२० हजारांनी निवडून आले असते. एखाद्या मशीनमध्ये घड्याळाला मत दिल्यावर कमळाला जात असेल, पण दुसऱ्या एखाद्या मशीनमध्ये कमळाला दिलेले मत घड्याळाला जात असेल, अशी खिल्ली ही आठवलेंनी उडवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळी जनतेच्या मदतीसाठी सर्व प्रकारची मदत करीत आहेत. टाइम मासिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना मोदी डिव्हायडेड नाही, तर युनायटेड इंडियाचे प्रतीक असल्याचे ही आठवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images