Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तिरुपती विमानसेवा सुरू

0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

'उडाण' योजनेंतर्गत अलायन्स एअरनंतर कोल्हापूर विमानतळावरून इंडिगो कंपनीच्या विमानसेवेला रविवारी सुरुवात झाली. कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावरील सेवेच्या प्रारंभाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तिरुपतीला जाणाऱ्या विमानाचे १४ जुलैपर्यंतचे बुकिंग फुल्ल आहे. यापुढे कोल्हापुरातून मुंबई-अहमदाबाद विमानसेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबईसाठी मोठा प्रतिसाद मिळेल, अशी आशा विमानतळचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी सांगितले.

निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवेचा प्रारंभ झाला. सकाळी नऊच्या दरम्यान इंडिगो कंपनीचे हैदराबादवरून आलेले विमान कोल्हापूर विमानतळावर उतरले. यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अत्यंत कमी पाणी वापरून प्रथम 'वॉटर सॅल्यूट' देण्यात आला. त्यानंतर विमानतळावर प्रवाशांचे स्वागत मिठाई देऊन करण्यात आले. यावेळी मुलींच्या शिरगाव येथील जय हनुमान लेझीम पथकाने ढोल ताशाच्या गजरात प्रवाशांचे स्वागत करून तिरुपतीला निघालेल्या प्रवाशांना निरोप दिला. त्यानंतर त्या विमानाने तिरुपतीला जाण्यासाठी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी उड्डाण केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला.

त्याच दरम्यान हैदराबादवरून अलायन्स कंपनीचे विमान विमानतळावर दाखल झाले. ते पुन्हा हैदराबादला रवाना झाले. दोन कंपन्यांकडून हैदराबाद, बंगळुरु, तिरुपती अशा तीन मार्गावर विमानसेवा सुरू झाली आहे. दोन्ही विमानांमधून एका दिवशी दोनशेहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विमानतळाचे सहाय्यक संचालक अनंत शेखर व एफ. सी. कांबळे आदी उपस्थित होते. विमानतळावर धावपट्टीसह इतर कामे जोरात सुरू आहेत. आज प्रथमच दोन विमानातून शंभराहून अधिक प्रवासी आले. तितकेच प्रवासी तिरुपती व हैदराबाद येथे गेले. अलाएन्स एअर कंपनीकडून गेल्या पाच महिन्यांपासून कोल्हापूर ते हैदराबाद आणि कोल्हापूर ते बेंगळुरू या दोन मार्गांवर विमानसेवा सुरू आहे. पाच महिन्यांत या दोन्ही विमानांची प्रवासी संख्या २२ हजारांपर्यंत पोहोचली आहे. दोन्ही विमान कंपन्यांच्या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईची सेवा सुरू झाल्यानंतर यामध्ये आणखी वाढ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलम : प्रेरणा आणि अस्मिता

0
0

२ फोटो....

००००

मित्रप्रेमाचे प्रतीक ः भाऊसिंगजी मार्ग

००००

डॉ. अरुण शिंदे

000

कोल्हापूरमध्ये जुन्या राजवाड्यापासून नव्या राजवाड्याकडे जाणारा भाऊसिंगजी मार्ग हा एक प्रसिद्ध रस्ता आहे. कोण होते हे भाऊसिंगजी? त्यांचे नाव रस्त्याला कोणी व का दिले? या प्रश्नांचा शोध घेतल्यास राजर्षी शाहू महाराज व भावनगरचे भावसिंहजी महाराज यांच्या अजोड मित्रप्रेमाची गाथा उलगडते.

000

राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये झाले (१८८६-१८८९). यावेळी तेथे भावनगरचे भाऊसिंगजी ठाकूर महाराज हे त्यांचे सहाध्यायी होते. भाऊसिंहगजींचा जन्म १६ एप्रिल १८७५ चा. त्यांचे वडील तख्तसिंह हे भावनगरचे महाराज होते. राजकोटच्या कॉलेजमध्ये शाहू महाराज व भाऊसिंगांचे मैत्र जुळले व पुढे आयुष्यभर ते जिवश्च कंठश्च मित्र बनले. राजकोट कॉलेजमध्ये शिकत असताना शाहू महाराज सुट्टीमध्ये अनेकदा भावनगरला जात असत. १८८९ साली शाहू महाराजांना पुढील शिक्षणासाठी धारवाडला पाठविण्यात आले. तेथे भाऊसिंगही त्यांच्या सोबत होते. सर फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले. हिवाळ्याच्या सुट्टीत भाऊसिंग शाहू महाराजांबरोबर कोल्हापूरला येत असत. त्यामुळे उभयतांमध्ये एक कौटुंबिक स्नेह निर्माण झाला. फ्रेझर यांनी आपल्या शिष्यांना भारत दर्शन घडविले. उत्तर हिंदुस्थानातील लोकजीवन, संस्कृती यांचे दर्शन राजकुमारांना घडले. या सर्व दौऱ्यामध्ये शाहू महाराज व भाऊसिंग एकत्र होते.

१८९६ साली भाऊसिंगजी महाराजांनी भावनगर संस्थानची सूत्रे हाती घेतली. त्यांचा सतत परस्परांशी संपर्क, संवाद, पत्रव्यवहार असे. जानेवारी १९०५ मध्ये भाऊसिंगजी यांच्या खास आमंत्रणावरून शाहू महाराज आपल्या मुलांसह भावनगरला गेले. भाऊसिंहनी महुआ येथे बांधलेल्या नवीन राजवाड्याचे उद्घाटन महाराजांनी केले. शाहूंवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊसिंहनी आपल्या या नव्या राजवाड्यास 'शाहू पॅलेस' असे नाव दिले. शाहू महाराज नेहमी थंड पाण्याने स्नान करीत. भाऊसिंग आपल्या युवराजांना मुद्दाम शाहू महाराजांचे थंड पाण्याचे स्नान दाखवीत व त्यांचे अनुकरण करण्याचा आग्रह धरीत.

१९०८ साली शाहू महाराजांच्या कन्या राधाबाई ऊर्फ आक्कासाहेब महाराज यांचा विवाह देवासचे तुकोजीराव पवार यांच्याशी कोल्हापूरमध्ये झाला. या विवाह सोहळ्यास भाऊसिंग महाराज सपत्नीक हजर होते. यानिमित्ताने भाऊसिंगजी महाराजांनी कोल्हापूरच्या खजिन्यात शेकडा चार टक्के व्याजाने तीन हजार रुपये व्याजी लावून आक्कासाहेब महाराजांच्या नावाने दोन शिष्यवृत्त्या व एक सुवर्णपदक कोल्हापुरातील मुलींच्या शाळेतील गुणवान मुलींना देण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे भावनगरच्या महाराणींच्या कोल्हापूर भेटीचे स्मरण राहावे म्हणून त्यांच्या नावाने तीन शिष्यवृत्त्या कोल्हापूर शहराबाहेरील संस्थांच्या शाळेतील मुलींना देण्याचा निर्णय शाहू महाराजांनी घेतला.

भाऊसिंगजी महाराज सुधारणावादी व पुरोगामी विचारांचे राज्यकर्ते होते. शाहूंच्या विचारकार्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. त्यांनी आपल्या संस्थानात लोककल्याणास प्राधान्य दिले. सन १९०० साली राज्यात मोठा दुष्काळ पडल्यावर स्वतः दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना मदत केली. राज्यकारभारात लोकांचा थेट सहभाग वाढविण्यासाठी 'पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह असेंब्ली'ची स्थापना केली. शिक्षणप्रसारावर भर दिला. १९१२ साली दलितांसाठी शाळा सुरू केली. दलित विद्यार्थ्यांना वैद्यकीय व विज्ञानाचे उच्चशिक्षण परदेशात घेता यावे म्हणून शिष्यवृत्त्या सुरू केल्या. सहकार चळवळीस चालना दिली. साहित्य, कला, संगीत आदींची त्यांना आवड होती.

भाऊसिंगजींचे १३ जुलै १९१९ रोजी निधन झाले. आपल्या परममित्राच्या निधनाने शाहू महाराज दुःखात बुडाले. महाराजांनी भावनगरला जाऊन भाऊसिंगजींच्या कुटुंबीयांना आधार दिला. त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. ते परतल्यावर मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज लाइड ३० जुलै १९१९ रोजी कोल्हापूरला आले होते. त्यांच्या सन्मानार्थ महाराजांनी दरबार भरविला. त्यावेळी भाऊसिंगजींच्या आठवणीने भावनावश होऊन महाराज भरल्या आवाजात म्हणाले, 'आमचे गुरू फ्रेजर यांच्या हाताखाली आम्ही शिक्षण घेत होतो, त्या वेळी आम्ही स्नेही झालो. माझा लहान मुलगा गमावून नुकतेच एक वर्ष झाले. त्याच्या मृत्यूमुळे मला जबरदस्त धक्का बसला; परंतु हा धक्का त्याहीपेक्षा हृदयभेदक होता. त्यांच्या भूतदयेच्या व बुद्धिमत्तेच्या विविध गुणांचे विवेचन करण्याचा हा प्रसंग नाही. त्यांच्या मृत्यूमुळे भावनगरचेच नुकसान झाले नसून त्यामुळे ब्रिटिश सरकारचेही नुकसान झाले आहे; त्यांची उणीव सहसा भरून निघणारी नाही, एवढी गोष्ट येथे सांगितली असता बस्स होईल.'

आपले परममित्र भाऊसिंगजींचे कायम स्मरण राहावे म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरातील जुना राजवाडा ते नवा राजवाडा या राजमार्गास भाऊसिंगजींचे नाव दिले व मित्रप्रेमाचा एक उत्तुंग आविष्कार घडविला. निखळ, निर्मळ मित्रप्रेमाची साक्ष देणारा हा रस्ता आपणास खूप काही सांगून जातो.

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज लोकशाहीच्या गळचेपीचा काळ

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'सध्या लोकशाहीच्या गळचेपीचा काळ आहे. अशावेळी साहित्य क्षेत्रात खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण करण्याचे काम दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा करीत आहे,' असे मत लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी रविवारी व्यक्त केले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे आयोजित धम्मपाल रत्नाकर राज्यस्तरीय काव्य आणि उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होते. साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. डॉ. भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, 'शब्दांतून व्यक्त झाल्यानंतर साहित्यकृती तयार होते. ते कोणत्या स्वरूपाचे असावे, या खोलात न जाता मुक्तपणे लेखन करत रहावे. पूर्वीच्या महिलांना पेन, पेन्सिल, माइक मिळत नव्हता. त्या जात्यावर ओवी गात उत्कट भावानांचा आविष्कार करत. आंतरिक खदखद ओव्यांतून व्यक्त करत होत्या. आता याउलट चित्र आहे. महिलांना व्यासपीठ मिळत आहे. त्या उघडपणे व्यक्त होत आहेत. लेखन करीत आहेत. काही पुरुषी संशोधक त्यांच्या साहित्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. साहित्यासह कोणतीही कला असली तरी ती विशिष्ट साच्यात बसवता येत नाही. यामुळे नवलेखकांनी कोणत्या प्रकारात साहित्य बसते, याचा विचार न करता लिहीत रहावे.'

प्रास्ताविकात साहित्य सभेचे अध्यक्ष चोरमारे म्हणाले, 'साहित्य सभेतर्फे दुर्लक्षित साहित्यकांना पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी निवडलेल्या लेखकांबद्दल कोणतेही वाद नसतात. विविध निकषांवर निवड केली जाते.'

डॉ. तडेगावकर, गायकवाड, जाधव, घोलप, देसाई यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. एकनाथ पाटील यांनी परीक्षक डॉ. रफीक सूरज यांचा संदेश वाचून दाखवला. कवी गोविंद पाटील यांनी स्वागत केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे, साहित्य सभेचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम, गौरी भोगले, भीमराव धुळूबुळू, श्याम कुरळे, विलास माळी, पाटलोबा पाटील यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनोद कांबळे यांनी आभार मानले.

पुरस्कार विजेते असे

धम्मपाल रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार : सुचिता खल्लाळ, संजीवनी तडेगावकर, देवदत्त पाटील पुरस्कार : संग्राम गायकवाड, शंकर खंडू पाटील पुरस्कार : दिनकर कुटे, अण्णा भाऊ साठे पुरस्कार : संपत देसाई, कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार : दत्ता घोलप, चैतन्य माने पुरस्कार : आलोक जत्राटकर, शैला सायनाकर पुरस्कार : महादेव कांबळे, बालसाहित्य पुरस्कार : गायत्री शिंदे, डॉ. गो. मा. पवार पुरस्कार : वि. दा. वासमकर, डॉ. विजय निंबाळकर पुरस्कार : संजय कांबळे, विशेष पुरस्कार : रवी राजमाने, भास्कर जाधव, जीवन साळोखे, श्रीधर कुदळे, दत्ता पाटील, नीलेश शेळके, उर्मिला आगरकर, दत्तात्रय मानुगडे, सोनाली नवांगुळ, रघुराज मेटकरी, सलीम सरदार मुल्ला, सुनील जवंजाळ, सुनील पाटील, धनाजी घोरपडे, महेशकुमार कोष्टी, सविता नाबर, अंजली देसाई, योजना मोहिते, प्रशांत नागावकर, कबीर वराळे, दिनेश वाघुंबरे, प्रमोद बाबर, किरण कुलकर्णी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छता उपक्रमांत लोहसहभाग महत्त्वाचा’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'ओला व सुका कचरा वर्गीकरण, उद्यानांची नियमित स्वच्छता, शहरातील सर्व चॅनेल, नाल्यांची स्वच्छता, आदी उपक्रमांमध्ये नागरिकांचा विशेषत: महिलांचा लोकसहभाग नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे,' असे मत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने केएमसी कॉलेज येथील आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. दरम्यान, कार्यशाळेनंतर त्यांनी कसबा बावडा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले.

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य निरीक्षकांनी आपल्या प्रभागातील नागरिक, बचत गट, स्वंयसेवी संस्था यांचे सहकार्य घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आरोग्य व उद्यान विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी जनजागृती करावी.'

पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड म्हणाले, 'जयंती नाल्यामध्ये मिसळणारे उपनाले, चॅनेलमध्ये मोठ्याप्रमाणात प्लास्टिक व घरगुती कचरा आढळून येतो. हा सर्व कचरा रोखण्याची आवश्यकता आहे.' यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपायुक्त मंगेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेनंतर आयुक्तांनी इतर अधिकाऱ्यांसह घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी दैनंदिन संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील, आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचारी आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनाथ मुलांचा ‘कुटुंबा‘सारखा सांभाळ

0
0

लोगो : मातृदिन दिन मे १२

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनाथ, निराधार मुलांचा सांभाळ करायचा, निवास व भोजनापासून शैक्षणिक सुविधेसह संपूर्ण पालकत्वाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडायची, त्यांच्या जीवनाला योग्य आकार द्यायचा, या भावनेने 'बालकल्याण संकुल'ने आजपर्यंत शेकडो मुलांना 'माये'ची ऊब दिली आहे. जवळपास ७० वर्षांपासून संस्थेचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. आज संस्था २४२ मुलांचा सांभाळ करत आहे.

बालकल्याण संकुलमध्ये मुलांना मातृत्वाची, मायेची पखरण घालताना आयुष्यात ही मुले स्वावलंबी बनावीत, शिक्षणासोबत त्यांना व्यावसायिक कौशल्ये प्राप्त व्हावीत यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे आर्टस, कॉमर्स, सायन्स तसेच तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश दिला जातो. मुलांच्या कलेप्रमाणे त्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नर्सिंग, टू व्हीलर-फोर व्हीलर दुरुस्ती असे व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते. संस्थेचे कामकाज सहा विभागांमार्फत चालते. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षणगृह तथा बालगृह, नलिनी शां. पंत वालावलकर कन्या निरीक्षणगृह, अनिकेत निकेतन बालगृह, शिशुगृह, डॉ. अहिल्याबाई शं. दाभोळकर कन्या बालगृह, डॉ. अहिल्याबाई शं. दाभोळकर महिला आधारगृह व बालसंगोपन योजना या माध्यमातून काम सुरू आहे.

संस्थेत दाखल झालेली मुले समाजाच्या विविध क्षेत्रांतील आहेत. त्यांचा सांभाळ करताना त्यांना कुटुंबासारखे प्रेम, मायेची ऊब देताना त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील विविध शाळांत मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे. गेल्या सत्तर वर्षांत संस्थेचा विस्तार झाला. जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेची (बालकल्याण संकुल) स्थापना ऑगस्ट १९४९ मध्ये झाली. अवघ्या चार मुलांनिशी सुरू झालेला संस्थेचा कार्यभार आज विस्तारला आहे. संस्थेच्या माध्यमातून अनाथ, निराधार, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुले, उपेक्षित मुला-मुलींचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन केले होते. पूर्वीच्या 'रिमांड होम'चे 'बालकल्याण संकुल'मध्ये रूपांतर झाले. नलिनी शां. पंत वालावलकर कन्या निरीक्षणगृहात सहा ते अठरा वयोगटातील मुलींचा सांभाळ या विभागात होतो. या विभागाच्या जुन्या इमारतीवर कोल्हापुरातील विविध बांधकाम क्षेत्रातील संस्था, सरकारी संस्था, व्यावसायिक संस्था यांच्या मदतीने दुमजली इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले.

संस्थेत एक दिवस ते सहा वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार बालकांसाठी 'वात्सल्य बालसदन' या विभागाची स्थापना झाली. बाल सदनामध्ये १९ बालके आहेत. १८ वर्षांवरील अनाथ मुली, कौटुंबिक समस्यांनी ग्रस्त महिलांना आसरा दिला जातो. महत्त्वाचे म्हणजे, कुटुंबांशी समुपदेशन करून त्यांच्या समस्यांची सोडवणूक, पुनर्वसनासाठी संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेच्या कार्याचा विस्तार झाला आहे. संस्थेच्या नित्याचा खर्च भागविण्यासाठी वर्षाला २५ ते ३० लाख रुपयांच्या निधीची गरज असते. त्याशिवाय इमारतीची देखभाल, दुरुस्तीसाठी पैसा खर्च पडतो. समाजाने संस्थेला नेहमीच मदतीचा हातभार दिला आहे.

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक संशोधनाचा आधार भक्कम व्हावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सरकार आणि दानशूर व्यक्तींकडे सामाजिक कार्यासाठी मोठी रक्कम आहे. ही रक्कम योग्य संस्थेपर्यंत पोहोचविण्यासाठी संशोधन होण्याची गरज आहे. दि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट (एमआयआरडी) संस्थेने जिल्ह्यातील चांगले काम करणारी संस्था, मंडळे, तालमींचा डाटा एकत्र करावा. त्यावर संशोधन करून जिल्ह्याच्या विकासात योगदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा,' असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नागाळा पार्कात विवेकानंद कॉलेजसमोर दि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट हाउसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार सतेज पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'सी. ए. शरद सामंत यांच्या संस्थेने सरकारी मदत न घेता गेली ३८ वर्षे सामाजिक संस्था, वंचित, दिव्यांग व्यक्तींना मदत केली. ही कौतुकास्पद बाब आहे. संस्थेने संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक संस्था, तालमी, मंडळे कार्यरत असली तरी ठराविक संस्था चांगले काम करतात. अशा संस्थांचा डाटा एकत्र करुन त्यांना चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा.'

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'आपल्या कामाचा गवगवा न करता सामंत सामाजिक कामात झोकून काम करतात. एमआयआरडी संस्थेच्या माध्यमातून समाजातील दिव्यांग, वंचित संस्थांना काम करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. हल्ली संशोधन दुर्मिळ होत आहे. संशोधन करण्यासाठी तरुणांना परदेशात जावे लागते. एमआयआरडी संस्थेने संशोधनात पुढाकार घ्यावा. ही संस्था कोल्हापूरच्या विकासात आधारवड ठरेल. त्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल.'

आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनीही संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. संस्थापक शरद सामंत यांनी दिव्यांग, वंचित संस्थेचे कार्यालय उभारण्यास ३२ वर्षे विलंब झाल्याबद्दल हळहळ व्यक्त केली. सामंत म्हणाले, 'सामाजिक काम करण्यासाठी दानशूर व्यक्तींची मदत होते. पण, काम पूर्णत्वास नेण्यासाठी स्वयंसेवकांची उणीव भासते. आता वीस हजार तरुण स्वयंसेवक तयार करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. कोल्हापुरातील पर्यटनात सर्वांना रस आहे. त्यासाठी आराखडा तयार केला आहे. सामाजिक कामात राजकारण आणायचे नाही हे 'आमचं ठरलंय.' चांगलं काम करायचं हेही 'ध्यानात ठेवलंय'.

संस्थेचे अध्यक्ष सी. ए. गिरीश सामंत यांनी स्वागत केले. यावेळी संस्थेच्यावतीने सायबर, हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड, अवनि, चेतना अपंगमती, बालकल्याण संकुल या संस्थांना आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमाला नगरसेवक अर्जुन माने, अॅड. अजित तारळेकर, सी. ए. संजय व्हनबट्टे, अवधूत झारापकर, पी. डी. देशपांडे, मामा कोळवणकर यांच्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते

वॉचमनच्या हस्ते उद्घाटन

संस्थेच्या जागेचे गेली ३६ वर्षे सरंक्षण करणाऱ्या वॉचमन लिंगाप्पा भागोजी यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ते प्रेक्षकात बसले होते. पालकमंत्री भाषणाला उभे राहिल्यावर त्यांनी लिंगाप्पा यांना व्यासपीठावर बोलावून स्वत:च्या खुर्चीत बसण्यास सांगितले. लिंगाप्पा खुर्चीवर बसताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

राजकारण्यांनी मित्र व्हायला हवे

'निवडणुका आल्या की राजकीय नेत्यांनी एकमेकावर खरपूस टीका करावी. वाभाडे काढावे. पण, निवडणुका संपल्यावर राजकीय वैरभाव विसरून मित्र व्हायला शिकले पाहिजे,' असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले. 'सतेज पाटील विरोधी पक्षात असले तरी ते आमच्यावर टीका करणार हे आम्हाला माहीत असते. पण हळूच ते आमच्या कानात तुमचेच सरकार येणार असे सांगतात,' असे पालकमंत्र्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. 'आमचं ठरलंय हा शब्द रुढ करणारे सतेज पाटील आमचे परममित्र आहेत' असा उल्लेखही त्यांनी भाषणात केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातिअंतासाठी निरोगी संवादाची गरज

0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जातिअंताची लढाई अनेक वर्षे सुरू आहे. सध्याच्या काळात जातीचा अभिमान बाळगला जात आहे. त्यामुळे समाजात विसंवादाचे सूर उमटत आहेत. जातिअंतासाठी पुन्हा लढाई देण्याची गरज असून गट, तट, विचारधारांचा आदर करून निरोगी संवादाची गरज आहे,' असे मत जातिअंताच्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केले. चर्चेत डॉ. भारत पाटणकर, राजाभाऊ शिरगुप्पे, डॉ. रवींद्र श्रीवस्ती, अॅड. कृष्णा पाटील यांच्यासह मान्यवरांनी भाग घेतला.

राजर्षी शाहू स्मारक भवन येथील मिटिंग हॉलमध्ये परिषद झाली. 'आता उठ माणसा, तोड जातीच्या बेड्या' हे गीत गाऊन डॉ. पाटणकर यांनी परिषदेची सुरुवात केली. अॅड. कृष्णा पाटील म्हणाले, 'वर्गसंघर्ष संपल्यावर जातिअंत होईल, अशी मांडणी डाव्या चळवळीने केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कृती कार्यक्रमातून लढा दिला. डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्माचा स्वीकार केला असला तरी जातिअंताचा शिक्का पुसला गेला नाही. दुसऱ्या जातीमुळे माझ्या जातीचे शोषण होत आहे, ही भावना बळावत चालली आहे. त्यासाठी निरोगी संवादाची गरज आहे.'

राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले, 'धर्माला कंटाळून अनेकांनी धर्मांतर केले, पण ज्या जातीत प्रवेश केला त्या जातीतील उच्चवर्णीयांनी त्यांना मूळच्या जातीत कायम ठेवले. धर्मामध्ये उच्च जात व खालची जात यांच्यात संघर्ष सुरू आहे. सध्याच्या राजकारणात जात बळकट करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. जातीतच व्यक्तींना सुरक्षित वाटण्याची भावना बळावत आहे. त्यासाठी राजकीय व सांस्कृतिक वातावरण तयार केले जात आहे. जात संपविण्यासाठी कृतिशील कार्यक्रम आखला पाहिजे.'

जात संपविण्यासाठी कृतिशील कार्यक्रमास सुरुवात करण्याची गरज व्यक्त करत भारत पाटणकर म्हणाले, 'जातिअंत करण्यासाठी पूर्वापार झालेले प्रयत्न आणि वर्तमानातील सांगड घालून कृतिशील कार्यक्रम तयार केले पाहिजेत. गोलमेज परिषदेतून त्याला दिशा दिली जाईल.'

डॉ. दयानंद ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनिल म्हमाने, दादासाहेब ढेरे, गेल ऑम्वेट, शंकर पुजारी, किरण भोसले प्रमुख उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र : विजय जाधव

0
0

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र : विजय जाधव

०००

जयप्रभा वाचवा !

००००

जयप्रभा अखेरच्या घटका मोजतो आहे. चित्रपटसृष्टीचे वैभव उभे करणारा हा स्टुडिओ नामशेष होण्यापासून वाचवायचा असेल तर त्यासाठी नव्याने ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. कोल्हापूरकरांच्या प्रेमाची ही मागणी लता मंगेशकर यांनाही अव्हेरता येणार नाही. सांस्कृतिक चळवळीने आता आणखी एक पाऊल टाकावे, संवादाची हाक मंगेशकरांना द्यावी.

०००००

…चित्रपटसृष्टीचे वैभव आणि सांस्कृतिक वारसा समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओचा वाद न्यायालयाच्या दरबारात संपला असला तरी त्यातून तो वाचण्याऐवजी किंवा वाचविण्याऐवजी नामशेष होण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. हे वैभव कायम राहावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्था आणि त्यासोबत भावनात्मक गुंतवणूक असणाऱ्या शहरवासीयांना त्याचा मोठा धक्का बसला. तो बसणेही साहजिक आहे, कारण एकूणच भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील हे मानाचे पान आता कायमचेच इतिहासजमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या तो गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ताब्यात आहे. न्यायालयाने त्यांची मालकी आणि त्यात फेरबदल करण्याचा किंवा त्याची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा हक्क अबाधित ठेवला आहे. स्टुडिओच्या जमिनीपैकी काही भाग आधीच विकल्याने आता उर्वरित मूळ जमीन आणि त्यावरील चित्रपटसृष्टीचे मूक साक्षीदारही आता तेथून हाकलून लावले जातील, अशी भीती सर्वांना वाटते आहे. न्यायालयाने निवाडा दिला असला तरी त्या जागेच्या व्यापारीकरणाला आव्हान देणारे आणि जागेचे मालक ही माणसेच आहेत. ती कोल्हापूरबद्दलच्या, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आणि चित्रपटसृष्टीच्या तेथे घडलेल्या, मोठ्या मेहनतीने, कष्टाने, कल्पकतेने घडविलेल्या इतिहासाशी त्यांचे प्रेम वजा करता येणार नाही. लता मंगेशकर यांनीही आपले उमेदीचे दिवस येथे घालवले आहेत. जयप्रभा स्टुडिओच्या परिसरातील मंगळवार पेठेतच त्या राहिल्या आणि भावंडांसोबत लपंडावही खेळल्या. भालजी आणि मंगेशकरांनी जपलेला जिव्हाळाही सर्वपरिचित. गायनक्षेत्रात त्यांनी घेतलेल्या भरारीला पंखात बळही कोल्हापूरच्या मातीनेच दिले होते. असा खूपसा संदर्भ आणि त्याचे धागेदोरे जयप्रभाच्या जाण्या-राहण्यामागे आहेत. ते कसे वजा करणार? मध्यंतरी स्टुडिओसाठी आंदोलन झाले, मंगेशकरांना कोल्हापुरात येऊ न देण्याची भाषा केली गेली. त्यातून झाले असेल तर इतकेच की, जो काही आपुलकीचा धागा होता तो आणखी ताणला गेला. मंगेशकरांनी न्यायालयीन लढाईचा निर्णय घेतला.

या घडामोडींनंतर न्यायालयाच्या ताज्या निकालाने कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीत अस्वस्थतेचे वातावरण आहे. मुळातच त्या सांस्कृतिक वैभवाच्या बोटावर मोजता येतील इतक्याच खुणा शिल्लक आहेत. त्यातही आता हा बुरूजही कोसळणार, ही भीती आहे. त्यातूनच अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि शहरातील चित्रपट व्यावसायिकांनी न्यायाचे दरवाजे ठोठावले होते. आता पुढे काय? हा प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे. या स्थितीत वास्तव स्वीकारून पुन्हा संवादाचा हात पुढे करणे गरजेचे वाटते आहे. कोल्हापूरकरांनी मनाचा मोठेपणा दाखवत आणि झाल्या न झालेल्या चुका मान्य करून आता पर्यायांवर विचार करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर 'समंजस संवादाची गरज' व्यक्त करून कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते उदय कुलकर्णी यांनी हा वारसा जपण्याच्या अंधुकशा आशा आजही जिवंत आहेत, असाच संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे. तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला आणि कलारसिकांना नवी आशा दाखविणारा आहे. लता मंगेशकर यांच्याशी संवादाची प्रक्रिया सुरू करून एक पाऊल पुढे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. ही भूमिका स्वागतार्ह म्हणावी लागेल.

\B

संवादाचा पूल \B

जयप्रभा स्टुडिओ, लता मंगेशकर आणि कोल्हापूरच्या नात्याला अनेक पदर आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचा जन्म, उभारणी आणि वैभवाचा काळ या शहराने अनुभवला. साऱ्या मंगेशकर कुटुंबानेच इथे राहून सांस्कृतिक क्षेत्रातले पहिले पाऊल ठेवले, ग म भ न गिरवले त्या शहराच्या आजच्या त्यांच्याकडूनच्या अपेक्षा अवास्तव नसल्या तरी त्या आपलेपणाच्या भावनेने ओतप्रोत आहेत. यामुळेच कोल्हापूरकरांचा एकट्या लता मंगेशकर यांच्यावरच नव्हे तर सर्व मंगेशकर कुटुंबीयांवरच त्यांचा आपुलकीचा हक्क आहे. मंगेशकर बंधू आणि भगिनींनीही तो कधी दडवला नाही. संधी मिळेल तेव्हा प्रसंगानुरूप त्यांनी तो उघड केला. कदाचित या प्रेमापोटीच कोल्हापूरच्या जनतेने त्यांनी हा स्टुडिओ चालवावा, त्याची विक्री करू नये अशी आशा बाळगली. न्यायालयाने या प्रकरणातील मंगेशकरांचे हक्क अबाधित ठेवल्याने आता जयप्रभाचे पुढे काय करायचे, हे ठरविण्याची जबाबदारी मंगेशकरांवरच येऊन पडली आहे, तर कोल्हापूरकरांना आशेवरच राहावे लागणार आहे. व्यवहार आणि या भावनांची सांगड कशी घातली जाणार, त्यांच्याशी संवादाचे पूल बांधले जाणार काय, हे पाहावे लागेल.

जयप्रभाच्या जागेवर डोळा असणाऱ्यांना कला-संस्कृती कशाशी खातात हे माहिती असायचे कारण नाही. त्यांना केवळ मोक्याच्या जागेवर टोलेजंग इमारती उभारणे आणि त्यातून अर्थ कमावणे एवढेच त्यांना ठाऊक असते. त्यात त्यांचाही काही दोष नाही. अशावेळी शहराचे सांस्कृतिक मानस झोपले आहे की जागे, स्थानिक जनता, तिचे प्रतिनिधी, सरकार आणि महाराष्ट्राचे एकूणच सांस्कृतिक विश्व या घटनेकडे आणि बदलाकडे कसे पाहते हे महत्त्वाचे ठरते. दुर्दैवाने काही अपवाद सोडता या सर्वच पातळ्यांवर फारसे आशादायक चित्र नाही. चित्रपटांचा मूकपटांचा आणि बोलपटांचा कालखंड ज्या शहराने बघितला, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढच जिथे रोवली गेली त्या शहराची आणि तिथल्या या स्टुडिओची ही बिकट अवस्था पाहून स्वर्गीय भालजी पेंढारकरांना काय वेदना होत असाव्यात? चित्रपटसृष्टीची ही कार्यशाळा आता मोडकळीस आली आहे. चित्रनिर्मितीचे बदललेले तंत्र आणि तंत्रज्ञान हाताशी आहे. मात्र, ती तळमळ कोठून आणणार? तिच्या अभावानेच एकापाठोपाठ एक स्टुडिओ वाढत्या नागरीकरणाने गिळंकृत केले. ना त्यांच्या स्मृती ना स्मारके!

\B

ठोस योजना द्या\B

उदय कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे, लता मंगेशकर यांना जयप्रभा प्रकरणात सातत्याने खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला हे खरे असले तरी या ताण-तणावाच्या काळात हे समज-गैरसमज दूर करण्याचे पुरेसे प्रयत्न झाले नाहीत, ज्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा होती त्यांनीही दुर्लक्ष केले किंवा वाद वाढून तो न्यायालयाच्या दारात जाईपर्यंत मूक भूमिका घेतली हे खरे आहे. यातूनच केवळ पोकळ चर्चेपलीकडे हा विषय पुढे सरकला नाही. सर्वजण आपापली संस्थाने सांभाळत बसले. इतिहास केवळ चघळण्यापुरताच उरला आहे. त्याची ना कुणाला कदर ना कोणाला प्रेम. जो आहे तो केवळ तोंडदेखलेपणा! फुकाचा आव आणि खोट्या अस्मितांचा खेळ! कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगणाऱ्यांनी आणि तो मिरवणाऱ्यांनी ते आता सांगणे तरी बंद करावे किंवा कोषातून बाहेर येत नव्याने प्रयत्नांची मोट बांधावी. ज्या शहराला आपली शक्तिस्थळेच कळाली नाहीत, ते या बदलाच्या रेट्यात पुढे कसे जाणार? आम्ही चित्रनगरी उभारली, असे उत्तर त्यावर दिले जाईल. त्याकडे तरी कोणाचे लक्ष आहे? किती चित्रपटांचे चित्रीकरण तिथे झाले? मुंबई, दक्षिण आणि उत्तरेकडचे किती निर्माते आले? ही अनास्थाच आपला वारसा हळूहळू संपवत चालली आहे.

हा स्टुडिओ महापालिका, चित्रपट महामंडळ, शिवाजी विद्यापीठाचा ललित कला विभाग, राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य संचालनालय यापैकी कोणी ताब्यात घ्यावा, त्यासाठी लागणारी रक्कम राज्य सरकार आणि लोकवर्गणीतून उभारली जावी, शहरातील धनिकांनी, या शहराकडून भरभरून घेणाऱ्यांनी सढळ हाताने मदत करावी, यांसारखे ठोस प्रस्ताव मंगेशकर यांना द्यावेत, अशी कल्पना नव्याने पुढे येते आहे. लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिकांनी, बांधकाम क्षेत्राने पुढे यावे. ओळख पुसली जाण्याआधीच जयप्रभाच्या पुनरुज्जीवनाची ठोस भूमिका घ्यावी. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यात संवादकाची भूमिका बजावू शकतील, राजकीय चष्मे बाजूला ठेवले आणि लोकभावना समंजसपणे पोहोचवली, ठोस योजना दिली तर आणि तरच जयप्रभा वाचविता येईल. लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, आता वेळ आहे, या शहराची अस्मिता आणि अभिमानस्थळे जपण्याची, ती समृद्ध करण्याची! लतादीदी नाही म्हणणार नाहीत!

०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिनाथ तीर्थंकरांवर महामस्तकाभिषेक

0
0

फोटो पट्टी....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवार पेठेतील प्राचीन जैन मठातील तीर्थंकर आदिनाथ यांच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्याला शहरातील जैन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी, तमिळनाडू येथील जिनकंची मठाचे महास्वामी लक्ष्मीसेन उपस्थित होते.

रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शहरातील भाविकांनी महामस्तभिषेक सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आदिनाथांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मिरजेच्या सुरेखा पाटील, सांगलीचे चंद्रकांत शेट्टी, संतोष मेहता, जयसिंगपूरचे गजकुमार मादनाईक, रत्नागिरीचे वृषभ उपाध्ये यांनी उसाचा रस, हळद, कुंकू, अष्टगंध, सर्वोषधीचा अभिषेक केला. यावेळी भाविकांनी नमो, नमोचा गजर केला. मधुकर मगदूम यांना शांती कलशाचा मान मिळाला.

महामस्तकाभिषेकाचे औचित्य साधत लक्ष्मीसेन महाराजांच्या हस्ते माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे आणि इंदुमती आवाडे यांना 'आदर्श दाम्पत्य' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोख ११ हजार रुपये, शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. दिगंबर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. जिनकंची महास्वामींच्या हस्ते प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांचा 'जीवन गौरव' पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. रोख ११ हजार रुपये, शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रशस्तिपत्राचे वाचन डॉ. सम्मेक उपाध्ये यांनी केले. जैन मठाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल आवाडे व प्राचार्य हेरवाडे यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे, इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, राजू उपाध्ये, आदी उपस्थित होते. पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय मगदूम यांनी स्वागत केले. अजित सांगावे यांनी आभार मानले. रविवारी सकाळी धार्मिक कार्यक्रम झाले, तर दुपारी ज्वालामालिनी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आमदार क्षीरसागर मंत्रिमंडळात असतील’

0
0

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांचे कार्यकर्ते व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र रविवारी गृहिणी महोत्सवाच्या समारोप समारंभात पालकमंत्री पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी, 'पालकमंत्री पाटील व आमदार क्षीरसागर एकत्र असल्याने आमदार विजयाची हॅटट्रिक करून मंत्रिमंडळात स्थान मिळवतील' असा विश्वास व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच भाजपने उत्तर मतदारसंघावर दावा केला असताना मंत्री केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील भगिनी महोत्सवात मंत्री केसरकर म्हणाले, 'महोत्सवाच्या निमित्ताने आमदारांनी महिलांनी तयार केलेल्या वस्तुंच्या विक्रीसाठी चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे. पाणीप्रश्न, टोल याचबरोबर समाजकंटकांनी नागरिकांवर केलेला हल्ला त्यांनी परतवून लावला. रिक्षांना ई-मीटर वाटप असो किंवा महापुरुषांच्या पुतळा सुशोभीकरणाची कामे. ती आमदार पाटील यांनी हाती घेतली. आता पालकमंत्री पाटील व आमदार एकत्र असल्याने त्यांच्या विजयाची हॅटट्रिक पूर्ण होऊन त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल.'

संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, 'सामाजिक काम करताना कितीही टीका झाली तरी आपले काम प्रामाणिकपणे करायचे. टीकेकडे दुर्लक्ष करुन काम करत राहा.'

ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, 'गेल्या निवडणुकीपासून गायब झालेले लोक सध्या आमदारांवर टीका करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत कोण कोणाविरोधात लढणार हे निश्चित आहे. पण उत्तर मतदारसंघात समोर उमेदवारच नाही, ही विजयाची नांदी आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटांसाठी मॉल उभा करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापुरी गूळ, चप्पल, प्रसिद्ध अशी चटणी आणि बचत गटांनी तयार केलेल्या मालांच्या विक्रीसाठी राष्ट्रीय महामार्गावर मोठा मॉल उभा करण्यासाठी प्रयत्न करू. महापालिकेच्या परवानगीने प्रत्येक तालुक्याप्रमाणे शहरात महिला बचत भवन उभा करू' असा मनोदय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भगिनी मंचच्यावतीने आयोजित महोत्सवाचा समारोप आणि भगिनी पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर प्रमुख उपस्थित होते.

मंत्री पाटील व केसरकर यांच्या हस्ते चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर, दिग्दर्शिका अॅड. समृद्धी पोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर, लेखिका डॉ. तारा भवाळकर, आंतरराष्ट्रीय धावपटू मनीषा साळुंखे यांचा भगिनी पुरस्कार देऊन गौरव केला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख ११ हजार असे पुरस्काराचे स्वरुप होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'महोत्सवाबरोबर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना वर्षभर विक्री व्यवस्था उपलब्ध करुन दिली पाहिजे. कोल्हापुरातील अनेक वस्तूंनी जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. मॉलच्या माध्यमातून त्यांची विक्री करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर मॉल उभा करू. त्यासाठी चांगल्या जागेचा शोध घ्या.'

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 'समाजाच्या जडणघडणीसाठी नेहमीच उपक्रम राबवले. कोणतेही काम अर्धवट सोडले नसल्याने सलग दहाव्या वर्षी भगिनी महोत्सव त्याच उत्साहात होत आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर अनेकजण विविध महोत्सवाचे आयोजन करतात' असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी पुरस्कार प्राप्त सन्मानमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. महोत्सवांतर्गत झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण झाले. समारोप कार्यक्रमास भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर, उपमहापौर भूपाल शेटे, माजी महापौर हसिना फरास, शिवसेना शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, परिवहन सभापती अभिजित चव्हाण, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, प्रतिज्ञा उत्तुरे, आशिष पेठे, अभिजित मोहिते, नितीन पाटील, निलेश पटवर्धन, मंगळा साळोखे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामाची डेडलाइन पाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काळम्मावाडी थेट पाइपलाइनच्या कामकाजाचा आढावा घेताना सुकाणू समितीच्या बैठकीत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी योजनेचे ठेकेदार आणि सल्लागर कंपनीला धारेवर धरल्यानंतर रविवारी योजनेच्या कामाची पाहणी केली. कामाची डेडलाइन पाळत 'टाइम बाउंड' काम करा. जॅकवेलचे काम पावसाळ्यापूर्वी पाणीपातळीच्या वर आणास, अशा सूचना त्यांनी ठेकेदार राजेंद्र माळी यांना दिल्या.

थेट पाइपलाइन योजनेतील सर्वात महत्त्वाचे काम असलेल्या जॅकवेलमध्ये दरड कोसळल्याचे समोर आले. त्यानंतर झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत कामाला दिरंगाई होत असल्याने ठेकेदार व सल्लागार कंपनीला धारेवर धरण्यात आले होते. यावेळी सदस्यांनी प्रशासनावरही कडक ताशेरे ओढले होते. परिणामी रविवारी सायंकाळी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी कामाच्या ठिकाणी भेट दिली. जॅकवेल कामाची पाहणी करताना त्यांनी ठेकेदारांना टाइम बाउंड काम करा. जॅकवेलचे काम पाणीपातळीवर आणण्याची सूचना केली. ठेकेदार माळी यांनी जॅकवेलच्या राफ्टचे काम सुरू असून ते गुरुवारपर्यंत पूर्ण होईल. जॅकवेलचे काम पाणीपातळीपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगितले. यावेळी पारस ओसवाल, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईलाही ‘अपाचे’ कवच?

0
0

-दहशतवादी हल्ल्यांवेळी अत्यंत उपयुक्त

-'२६/११'नंतर मुंबईसाठी आहे आवश्यक

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

हवाई दलाला अनेक वर्षांनी 'अपाचे'च्या निमित्ताने अत्यंत अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर मिळाले आहे. अशी २२ हेलिकॉप्टर हवाई दलाकडे येणार असून, एका 'अपाचे'चे कवच देशाची आर्थिक राजधानी मुंबई नगरीलाही मिळण्याची दाट शक्यता आहे.

'२६/११'च्या हल्ल्यावेळी नरिमन हाऊस इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी तेथे कमांडोंना हेलिकॉप्टरमधून उतरविण्यात आले होते. पण, संपूर्ण भाग इमारतींनी वेढला असल्याने त्या भागात हेलिकॉप्टर नेणे जोखमीचे झाले होते. त्यावेळी वापरण्यात आलेले हेलिकॉप्टरही तुलनेने जुन्या तंत्रज्ञानाचे होते. त्यामुळेच इमारतींच्या गर्दीत उंचावरून नरिमन हाऊस शोधणे कठीण झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर इन्फ्रारेड कॅमेऱ्याने सज्ज असलेले हेलिकॉप्टर मुंबईत तैनात केले जावे, असा निर्णय घेण्यात आला. या तंत्रज्ञानाला 'हेली-टेली' म्हटले जाते. पण, सन २००८नंतर अद्यापपर्यंत असे कुठलेही हेलिकॉप्टर मुंबईच्या सुरक्षेसाठी तैनात झालेले नाही. हवाई दलाने शनिवारी पहिल्यांदा बोईंग कंपनीकडून खरेदी केलेले 'अपाचे' हेलिकॉप्टर या प्रकारच्या 'हेली-टेली' तंत्रज्ञानाने सज्ज आहे. तसेच, त्यामध्ये इन्फ्रारेड कॅमेराही आहे.

हवाई दल एकूण २२ 'अपाचे' खरेदी करणार आहे. या हेलिकॉप्टरच्या तीन तुकड्या देशात अन्यत्र तैनात होणार आहेत. चार हेलिकॉप्टर ही राखीव स्वरूपात असून, त्यापैकी दोन मुंबईत तैनात होतील, असे बोलले जात आहे. हवाई दलाच्या समुद्री हवाई कारवायांचे (माओ) मुख्यालय मुंबईत आहे. त्या अंतर्गत हवाई दल विविध समुद्री मोहिमांसाठी नौदलाला सहकार्य करीत आहे. याच 'माओ'अंतर्गत शहरी युद्धपद्धतीसाठी दोन 'अपाचे' मुंबईत तैनात होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

१० किमी पल्ल्याचा कॅमेरा

'अपाचे' हेलिकॉप्टरला अत्याधुनिक इन्फ्रारेड कॅमेरा बसविण्यात आला आहे. त्यामुळे दिवस असो वा रात्र, जवळपास १० किमी अंतरावरील घडामोडी वैमानिकाला स्क्रीनवर दिसतात. खास शहरी युद्धपद्धतींसाठीच हा कॅमेरा या हेलिकॉप्टरला बसविण्यात आला आहे. शहरी भागात जेथे लढाऊ विमाने जाऊ शकत नाहीत, त्या भागात हेलिकॉप्टरचा वापर करता येऊ शकतो. अमेरिकेने अफगाणिस्तान व इराक युद्धात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता. त्यामुळेच हे हेलिकॉप्टर मुंबईतील तैनातीसाठी सर्वोत्तम मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडूळ तस्करीप्रकरणी दोघांना अटक

0
0

मांडूळ तस्करीप्रकरणी दोघांना अटक

कराड :

मालखेड (ता. कराड) गावच्या हद्दीत सम्राट लॉजच्या समोर मोकळ्या जागेत मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना कराड ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केली. त्यांच्याकडून सुमारे तीस लाख रुपये किमतीचे एक रेड सॅण्डबो जातीचे मांडूळ व एक दुचाकी असा सुमारे तीस लाख तीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पांडुरंग भगवान शिंदे (वय ३४), जयवंत शंकर ताटे (वय ३३, दोघेही रा. कासेगाव ता. वाळवा, जि. सांगली) अशी मांडूळ तस्करी प्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भव्य तैलचित्रे, पोस्टर्स, अखंड जयघोष

0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तैलचित्रे, सामाजिक संदेश देणारे पोस्टर्स, राष्ट्रपुरुषांचा अखंड जयघोष करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून भव्य सम्यक मिरवणूक काढण्यात आली. हलगीचा कडकडाट, ढोल-ताशांचा निनाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीत रविवारी दसरा चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने सम्यक मिरवणुकीचे आयोजन केले होते. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते अग्रभागी रथातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. शाहू, फुले, आंबेडकरांचा अखंड जयघोष करत मिरवणूक दसरा चौकातून मार्गस्थ झाली. निळे स्कार्प व फेटे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे मिरवणुकीतील वातावरण चैतन्यमय बनले होते.

विद्युत रोषणाईच्या झगमगाट आणि आकर्षक फुलांची सजविलेल्या रथातील डॉ. आंबेडकरांचा पुतळा अग्रभागी होता. ट्रॅक्टर, रिक्षावर लावलेली माणगाव परिषदेची पोस्टर्स, भारतीय संविधानाचा फलक आणि प्रबोधनपर सामाजिक संदेश देणारे फलक मिरवणुकीचे आकर्षण होते. सम्यक मिरवणुकीच्या माध्यमातून संविधान बचाव संदेश देण्यात आला. दसरा चौकमार्गे आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक येथे मिरवणूक दाखल झाली. समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बिंदू चौकातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवानद केल्यानंतर पुन्हा मिरवणूक मार्गस्थ झाली. शिवाजी चौक, महापालिका चौक, सीपीआरमार्गे दसरा चौकात मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीमध्ये महिला व युवतींचा उल्लेखनीय सहभाग होता.

मिरवणुकीनंतर दसरा चौक मैदानावर प्रा. डॉ. चेतना सोनकांबळे यांचे 'आजची सामाजिक स्थिती' विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यानाला श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती, तर 'वादळवारा'फेम अनिरुद्ध वनकर यांचा 'भीम-बुद्ध' हा भीम गीतांचा कार्यक्रम झाला.

यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष सखाराम कांबळे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब काळे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, अवधूत पाटील, प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, विश्वास देशमुख, दगडू भास्कर, बाळासाहेब वाशीकर, प्रकाश सातपुते, अॅड. पंडित सडोलीकर, विद्याधर कांबळे, आदी उपस्थित होते.

०००००

मराठा महासंघाचा फलक लक्षवेधी

देशातील अनेक राष्ट्रपुरुषांनी चिरंतन अशी समाजविधायक कामे केली, पण नेत्यांनी महापुरुषांना जातीच्या चौकटीत पद्धतशीरपणे अडकवले आहे. परिणामी समाजात दुहीची बीजे पेरली जात आहे. समाजातील दुही देशाच्या विकासाला मारक ठरत आहे. त्यामुळे आशा 'राष्ट्रपुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करू नका' हा अखिल भारतीय मराठा महासंघाचा फलक मिरवणुकीचे आकर्षण ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छायाचित्रातून उलगडले गडकोटांचे विश्व

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दक्षिण भारतातील कडेकपाऱ्यांमध्ये असलेल्या ऐतिहासिक गडकोटांची विविध रूपे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहण्याची संधी कोल्हापूरच्या गडप्रेमींना खुली झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीचे (जोतिबा डोंगर) बळवंत सांगळे यांनी गेल्या ४४ वर्षाच्या काळात केलेल्या गडकोट भ्रमंतीतून साकारलेल्या दक्षिण दिग्विजय या गडकोटांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनास रविवारपासून प्रारंभ झाला. राजर्षी शाहू स्मारक भवन कलादालन येथे १८ मेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

भारतीय सैन्यदलातील रणगाडा विभागाचे कर्नल अमरसिंह सावंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. पेठवडगाव येथील शिवचरणस्पर्श चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सागर नलवडे, शस्रास्र संग्राहक गिरीश जाधव, अरूण घोडके, राम यादव आदी उपस्थित होते.

देशातील महाराष्ट्र राज्यात ज्याप्रमाणे गडकोटांचे वैभव विस्तारले आहे त्याप्रमाणेच दक्षिणेकडील भागातही गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून जतन करण्यात आले आहे. गडकोट भ्रमंतीच्या आवडीतून सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अभियंता सांगळे यांनी १९७५ ते २०१८ या कालावधीत जवळपास चार दशकांच्या प्रवासानंतर या छायाचित्रांचा संग्रह करण्यात आला आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी दुचाकीवरून त्यांनी गटकोटांची भ्रमंती केली आहे. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये दक्षिण भारतातील सुस्थितीत असलेल्या गडकोटांच्या माहितीसह छायाचित्रांची मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये आंध्रप्रदेश येथील मडकसिरा, चित्रदुर्ग जिल्ह्यातील चित्रदुर्ग, तेलंगणा येथुल गोलकोंडा, तामिळनाडूतील जिंजी राजगिरी यांसह दाक्षिणात्य बांधणीच्या किल्ल्यांचे माहितीपूर्ण दर्शन घडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सी डिव्हिजनमधील १४२० फुटबॉलपटूंचे नुकसान

0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMt

कोल्हापूर

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने फुटबॉल सामन्यांना स्थगिती दिल्याने सी डिव्हिजनमधील ७२ संघातील १४२० खेळाडूंचे भवितव्य अंधारमय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थगिती उठवून केएसएने सी डिव्हिजनमधील सामने पावसाळ्यापूर्वी संपवावेत, अशी मागणी होत आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यानंतर मैदानाबाहेर मोठा राडा झाला. अनेक वाहनांचे नुकसान झाले. आठ ते दहा खेळाडू व प्रेक्षक जखमी झाले. पोलिसांनी दिलबहारचा नायजेरियन खेळाडू इचिबेरीसह आठ हुल्लडबाजांना अटक केली आहे. या घटनेनंतर केएसएने फुटबॉल सामन्यांना स्थगिती दिली आहे.

केएसएने स्थगिती न उठवल्याने सी डिव्हिजनमधील स्पर्धा झालेली नाही. या डिव्हिजनमध्ये ७२ संघ असून १४२० खेळाडूंची नोंदणी आहे. शहर, उपनगरे, ग्रामीण भागातील संघांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक खेळाडूच्या रजिस्ट्रेशनसाठी २५० रुपये भरले आहेत. तसेच कीट, बूट यांचा खर्च धरला तर प्रत्येक संघाला अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च केला आहे. केएसए ए डिव्हिजनमधील सामने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु झाले. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात सुरु असताना बी डिव्हिजन स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात दोन संघात झालेल्या वादात स्पर्धा बंद पडली आहे. स्पर्धेबाबत गेली तीन महिने केएसएने निर्णय प्रलंबित ठेवला आहे. मार्च महिन्यात सी डिव्हिजनची स्पर्धा सुरु होते. पण केएसएने सामन्यांना स्थगिती दिल्याने सी डिव्हिजनची स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे संघाचा सराव पाण्यात जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

१० ते १५ जून पूर्वी ए, बी,सी डिव्हिजनमधील स्पर्धा पूर्ण होणे बंधनकारक आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसास सुरुवात होण्याची शक्यता असते. पण केएसएने सी डिव्हिजनबाबत कोणतीच हालचाल न केल्याने १४२० खेळाडूंचे नुकसान होणार आहे.

..........

कोट

'स्पर्धा स्थगित केल्याने आम्ही सराव बंद केला आहे. सध्या फुटबॉल प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्युनिअर खेळाडू घडवणारी सी गट डिव्हिजन स्पर्धा सुरु होण्याची गरज आहे. केएसएने ताबडतोब निर्णय घेऊन स्पर्धा व्यवस्थित घ्याव्यात.

सूरज जाधव, खेळाडू, सणगर गल्ली फुटबॉल क्लब.

............

'मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्पर्धा सुरु होते. त्यासाठी कसून सराव केला आहे. पण स्पर्धा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संघांचे मोठे नुकसान झाले आहे. घाईगडबडीत स्पर्धा न गुंडाळता पावसाळ्यापूर्वी सी डिव्हिजन स्पर्धा सुरु करावी.

अमर शिंत्रे, आर.के. स्पोर्टस् , आर.के.नगर

....

नोंदणी झालेले संघ व खेळाडूंची संख्या

गट एकूण संघ खेळाडू

ए १७ ३३४

बी १७ ३३७

सी ७२ १४२०

गडहिंग्लज १६ २८८

एकूण १२२ २३६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचाही घोळ

0
0

Appasaheb.mali @timesgroup.com Tweet : Appasaheb_MT कोल्हापूर : अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत वेतनातून कपात केलेल्या रकमेचा आणि त्याच्या पावत्यांचा हिशेब लागत नसताना आता जिल्हा परिषदेतील १५२१ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम जमा झाली नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या रकमेच्या पावत्याही मिळाल्या नाहीत. राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेकडे रक्कम प्राप्त

होवूनही वित्त विभाग व अन्य खात्याच्या आस्थापना विभागातील समन्वयाच्या अभावामुळे कर्मचाऱ्यांना फरकाच्या रकमेपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हा परिषदेकडे एक जानेवारी २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू आहे. अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दहा टक्के रक्कम कपात करुन त्यांच्या खात्यावर जमा केली जाते. मात्र जि.प.मध्ये रुजू झालेल्या १५२१ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर अंशदायीची रक्कम जमा झाली नाही. परिणामी त्याच्या पावत्याही आढळत नाहीत. त्या पाठोपाठ आता सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा घोळ समोर आला आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी २००६ पासून सहावा वेतन आयोग लागू झाला. त्याची अंमलबजावणी मे २००९ पासून सुरू झाली. २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर तीन वर्षाच्या फरकाची रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा झाली. जून २०१०, जून २०११ आणि जून २०१२ या तीन टप्प्यात त्यांना खात्यावर रक्कम मिळाली. मात्र एक जानेवारी २००५ नंतर रुजू झालेले वर्ग तीन आणि चारमधील सुमारे १५२१ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर मात्र रक्कम जमा झाली नसल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये अधीक्षक, कक्ष अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ सहायक, आरोग्य सेवक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, परिचर अशा ५६ संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून प्राप्त रक्कम कर्मचाऱ्यांच्या नावावर जमा करण्याची जबाबदारी वित्त विभागाची आहे. पण वित्त विभागाकडून याकामी चालढकल झाली आहे. वेतन आयोगाच्या फरकाची रक्कमही त्यांच्या खात्यावर जमा झाली नाही, पावत्याही मिळाल्या नाहीत. यामुळे नेमका किती फरक मिळाला याविषयी कर्मचारी संभ्रमावस्थेत आहेत. एका कर्मचारयाची तीन वर्षाच्या फरकाची रक्कम किमान ७५ हजार रुपये अपेक्षित धरल्यास १५२१ कर्मचाऱ्यांच्या फरकाची रक्कम ११ कोटी २० लाखाहून अधिक होते. ही रक्कम अद्याप कर्मचाऱ्यांच्या नावावर का जमा केली नाही यामागील गौडबंगाल काय अशी विचारणा होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीची युद्धपातळीवर तयारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. निकालाची तारीख जवळ आल्याने जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. दोन्ही मतदारसंघातील निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्यासाठीचे नियोजन केले आहे. यासाठी १४ ऐवजी २० टेबलांवर मतमोजणीचा प्रस्ताव निवडणूक प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे चार दिवसापूर्वी पाठवला आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून २० टेबलांवर पक्षांच्या प्रतिनिधींची नावे घेतली जात आहेत. त्यांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार आहे.

'कोल्हापूर' मतदारसंघातून रिंगणातील उमेदवारांची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय गोदामात तर 'हातकणंगले' मतदारसंघाची मतमोजणी शिवाजी विद्यापीठसमोरील राजाराम तलावाजवळील सरकारी गोदामात होणार आहे. मतमोजणीदिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक पोलिसबळ तैनात करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख हे जादा पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करतील. निकाल लांबल्यास बंदोबस्तावरील पोलिसांवर ताण येतो. त्यामुळे वेळेत निकाल लागण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, संगणक प्रणाली जोडली जात आहे.

यावेळी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी होणार आहे. सोडत पद्धतीने निवड करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्रांतील चिठ्ठ्यांची मोजणी होईल. सैनिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या मतपत्रिका मोजणीस विलंब होणार आहे. प्रत्येक मतपत्रिकचे स्कॅनिंग आणि नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक उच्च प्रतीचा, स्कॅनर आणि शंभरावर संगणक संच बसविण्यात येणार आहे.

मतमोजणी पारदर्शकपणे सुरू असल्याची खात्री करण्यासाठी प्रत्येक टेबलवर उमेदवार आणि त्यांच्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची संधी दिली जाते. त्यासाठी उमेदवारांकडून तेथे उपस्थित राहणाऱ्या विश्वासू कार्यकर्त्यांची नावे प्रतिनिधी म्हणून

घेतली जात आहेत. त्यांचे रितसर अर्ज भरू घेऊन, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सहीचे ओळखपत्र दिले जाणार आहे. प्रत्येक टेबलला तीन कर्मचारी एक शिपाई असतील. या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. निवडलेल्यांना नियुक्तीचे आदेश दोन दिवसांत देण्यात येणार आहे. त्यांना प्रत्यक्ष मतमोजणीच्या कामाचे प्रशिक्षण १६ मे रोजी दिले जाणार आहे.

फेरीनिहाय निकाल जाहीर

दोन्ही मतदारसंघांत फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एका फेरीत सहा विधानसभा मतदारसंघातील ८४ केंद्रांची मते मोजण्यात येतील. तशी एक फेरी असेल. ही फेरी पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये उमेदवारनिहाय पडलेली मते जाहीर केली जातील. दुपारी दोन वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर करण्याचे नियोजन प्रशासन करत आहे. 'कोल्हापूर'चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई, 'हातकणंगले'चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पराभवाच्या भीतीने पवार मशीनवर बोलू लागलेतः आठवले

0
0

पंढरपूरः

शरद पवार मोठे नेते असले तरी यंदा लोकांच्या मनात बारामतीत बदल घडवायचा विचार असू शकतो आणि म्हणूनच बारामती हातून जाणार असे दिसल्याने पवारांनी ईव्हीएम मशीनवर टीका सुरू केल्याचा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला. दुष्काळी पाहणी दौऱ्यावर असणारे आठवले यांनी रात्री उशिरा सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील चारा छावणीला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली .

मागील निवडणूकीत महादेव जानकर बारामतीमधून थोडक्या मतांनी हरले होते . पण त्यावेळी त्यांनी कपबशी ऐवजी कमळ चिन्ह घेतले असते तर ते १५ - २० हजारांच्या मतांनी निवडून आले असते असंही ते म्हणाले. एखाद्या मशीनमध्ये घड्याळाला मत दिल्यावर कमळाला जात असेल पण दुसऱ्या एखाद्या मशीनमध्ये कमळाला दिलेले मत घड्याळाला जात असेल अश्या भाषेत आठवले यांनी पवारांची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळी जनतेच्या मदतीसाठी सर्व प्रकारची मदत करीत असून ते जमिनीवरून आलेले नेते आहेत अशा शब्दात आठवले यांनी पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

टाईम मासिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना मोदी हे डिव्हायडेड नाही तर युनायटेड इंडियाचे प्रतीक असल्याचे सांगितले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images