Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मुरगूडला निषेध सभा

$
0
0
कामगारमंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर त्यांच्या पक्षाच्या अपंग सेलच्या जिल्हाध्यक्षांकडून शाई फेकण्याच्या प्रकरणाचे शुक्रवारीही येथे संतप्त पडसाद उमटले.

कागल तालुक्यात बंद, रास्ता रोको, निषेध सभा

$
0
0
बुलढाणा येथील कार्यक्रमात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शाई ओतल्याच्या निषेधार्थ कालपासून कागल शहरासह तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारी कागल शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.

महिलेचा विनयभंग : चौघांवर गुन्हा

$
0
0
दोनवडे (ता. भुदरगड) येथील महिलेशी लज्जास्पद वर्तन करून तिच्या भावाला मारहाण करण्याचा प्रकार घडला. त्याच्या खिश्यातील रक्कम काढून घेतल्याप्रकरणी चौघाजणांवर दरोड्याचा गुन्हा भुदरगड पोलिसात नोंद झाला आहे.

अतिक्रमणाविरुद्ध ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

$
0
0
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत हद्दीतील गटक्रमांक ४९३/१ या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकारी विवेक आगवणे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

चव्हाण, फरास यांच्यावर आक्षेप

$
0
0
काँग्रेसचे नगरसेवक सचिन चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अदिल फरास यांच्या जातीच्या दाखल्यावर निर्णय घेण्यास विलंब करत असल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जातपडताळणी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली.

‘नेट’ची तयारी पूर्ण

$
0
0
प्राध्यापकपदासाठी अनिवार्य मानल्या जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) रविवारी, २९ डिसेंबर रोजी होत आहे. यंदा शिवाजी विद्यापीठाला ‘नेट’चे केंद्र मिळाले आहे. विद्यापीठ केंद्रावर ४२६० उमेदवारांनी नोंदणी केली असून, त्यांची विद्यापीठ आणि शहरातील विविध कॉलेज अशी नऊ ठिकाणी बैठक व्यवस्था केली आहे.

फिल्डिंग लोकसभेसाठी... वेटिंग विधानसभेसाठी

$
0
0
नेत्यांनी महापौर, स्थायी समिती सभापतिपदाची निवड करताना लोकसभेबरोबरच विधानसभेचे गणितसुद्धा मांडल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभेला उपयोगी पडणारा उमेदवार म्हणून सुनीता राऊत हे नाव अचानक निश्चित केले, तर विधानसभेला उपयोगी पडतील म्हणून तृप्ती माळवी व राजू घोरपडे यांना वेटिंगवर ठेवले.

शेवटच्या क्षणापर्यंत अस्वस्थता

$
0
0
महापौरपदासाठी दुपारपर्यंत राष्ट्रवादीच्या तृप्ती माळवी यांचे नाव निश्चित झाल्याचे वातावरण असताना अर्ज भरण्यापूर्वी मात्र ते बदलून सुनपता अजित राऊत यांचा अर्ज सादर करण्यात आला. या नाट्यमय घडामोडींमुळे राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्तीच्या कारभाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांना धक्काच बसला. स्थायी सभापतीपदासाठीही काँग्रेसमधून राजू घोरपडेंऐवजी सचिन चव्हाण यांचे नाव निश्चित करण्यात आले.

मटणासाठी ग्रामीण भागाकडे मोर्चा

$
0
0
खाटिक समाजाने शनिवार (ता. २८) पासून मटणविक्री बंद केली आहे. बंद आंदोलनात शहरातील १२० मटण विक्रीची दुकाने सहभागी होणार आहेत. त्यामुळे ३० आणि ३१ डिसेंबर रोजी खवय्यांना शहरात मटण मिळणार नसले तरी मटणासाठी ग्रामीण भागात सोय होणार आहे.

जानेवारीत राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळून दुप्पट जागा मिळतील. जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार जाहीर केले जातील.

‘FRP’नुसार दर जाहीर करा

$
0
0
‘साखर कारखान्यांना गाळपानंतर पंधरा दिवसांत उसाचे बिल जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीनुसार दर जाहीर केलेला नाही.

पाणी, कच-यासाठी मदतीचा हात

$
0
0
इचलकरंजी शहरात वर्षभरापूर्वी आालेल्या काविळीच्या साथीमुळे या शहरातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कोल्हापूर शहरातून आणि आसपासच्या गावातीलू होणारे पंचगंगेचे प्रदूषण, त्यामुळे इच‍लकरंजी शहराला प्यावे लागणारे दूषित पाणी आणि साथीच्या रोगांची वर्षभर चर्चा केली जाते.

अवैध व्यवसायांची माहिती कळवा

$
0
0
शहरातील सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती एसएमएस, १०० नंबर डायल अथवा पत्राने कळवावी, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी करवीरवासीयांना केले आहे.

सेना-भाजपमध्ये तणाव

$
0
0
महापालिकेतील शिवसेना व भाजप युतीमध्ये गटनेत्याच्या राजीनाम्यावरून वातावरण तापले आहे. युती होत असताना ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांनंतर भाजपचा गटनेता होणे आवश्यक असताना शिवसेना गटनेत्यांकडून राजीनामा न दिल्याने भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात स्वतंत्र बसण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीने मैदान सोडले

$
0
0
‘हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला नको तो काँग्रेसला द्या,’ अशी पुन्हा मागणी करत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला बहाल करत मैदान सोडल्याचे संकेत दिले. यामुळे पक्षाने खासदार राजू शेट्टी यांच्यापुढे सपशेल शरणागती पत्करत कल्लाप्पाणा आवाडे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पदाधिका-यांची कानउघडणी

$
0
0
पक्षाने दिलेली पदे शोभेला नाहीत, आपल्या कार्याने पक्षाची पत वाढवा, त्यासाठी वरिष्ठांचा वशिला घेऊ नका. निवडणूक जिंकण्याचा तंत्र, मंत्र आणि शास्त्र शिका. केलेल्या कामाचे मार्केटिंग करा.

महिला कॉन्स्टेबलच्या घरातच वेश्या व्यवसाय

$
0
0
फुलेवाडी येथे महिला कॉन्स्टेबलच्या बंगल्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर लक्ष्मीपुरी पोलिस व अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून पाच महिलांसह दोघा पुरुषांना ताब्यात घेतले.

अपहरण करून लुटले : ५ जणांवर गुन्हा नोंद

$
0
0
दोनवडे (ता. भुदरगड) येथील संदीप शिवाजी पाटील या तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. व त्याच्याजवळील ५० हजार रुपये व दोन तोळे सोन्याची चेन लंपास केल्या प्रकरणी पाच जणांच्यावर भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

वेदगंगेत बुडून तरुणाचा मृत्यू

$
0
0
मुरगूड-कुरणी (ता. कागल) दरम्यानच्या वेदगंगा नदीपात्रात शनिवारी तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. बंधाऱ्यावर लावलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी आर.टी.ओ. कार्यालयाशी संपर्क साधला असता तो सूरज सुभाष कांजर (वय २४, रा. राजारामपुरी कोल्हापूर) असल्याचे स्पष्ट झाले.

प्रशासकांच्या कारवाईला व्यापाचा विरोध

$
0
0
गूळ हंगाम सुरु असाताना कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांनी अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा चार दिवसांपूर्वी दिली आहे. नोटिसीनुसार ही कारवाई रविवारी (ता. २८) पोलिस बंदोबस्तामध्ये करण्यात येणार आहे. प्रशासक डॉ. महेश कदम यांची ही ही एकतर्फी कारवाई असल्याचा आरोप शाहूपुरी व्यापारी मर्चंट असोसिएशनने पत्रकार बैठकीत केला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images