Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

व्हाइट आर्मीकडून ओडीशात मदतकार्य

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ओडिशातील फनी चक्री वादळानंतर उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी ओडीशा राज्यात देशरामतील आपत्कालीन संस्था दाखल झाल्या आहेत. कोल्हापुरातील व्हाइट आर्मी संस्थेच्या पथकाने मदत कार्यास सुरुवात केली असून पाच डॉक्टरांच्या पथकाने एक हजार रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले आहेत.

व्हाइट आर्मीने पुरी येथील पेनटागोंडा तीन ठिकाणी मेडिकल कॅम्प सुरू केले आहेत. तसेच जवानांनी रस्ते व घरे स्वच्छ करण्याचे काम सुरु केले आहे. रस्त्यांवरील पडलेल्या फांद्या बाजूला करुन रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करुन दिला जात आहे. पुरीचे जिल्हाधिकारी व विशेष पोलिस महानिरीक्षकांनी भेट देऊन व्हाइट आर्मीच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. व्हाइट आर्मीच्या पथकात २० जवानांचा समावेश असून सात महिलांचा समावेश आहे. वैद्यकीय पथकात डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. सुरेश शेलार, डॉ. एन.बी. जाधव, डॉ. विनय कुलकर्णी यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गायकवाड, देसाई, कुटे, घोलप यांना पुरस्कार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, अलोक जत्राटकर, महादेव कांबळे यांच्या पुस्तकांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. रविवारी (ता. १२) सकाळी अकरा वाजता लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

संग्राम गायकवाड यांच्या 'आटपाट देशातील गोष्टी' या कादंबरीला देवदत्त पाटील पुरस्कार जाहीर करण्यात आला. शंकर खंडू पाटील पुरस्कार दिनकर कुटे यांच्या 'कायधूळ' कथासंग्रहाला मिळाला. दत्ता घोलप यांच्या 'आशय आणि अविष्कार' या मराठा कांदबरीला कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार जाहीर करण्यात आला. अण्णा भाऊ साठे पुरस्कार संपत देसाई यांच्या पुस्तकाला मिळाला. 'एका लोकलढ्याची यशोगाथा' असे पुस्तकाचे नाव आहे. अलोक जत्राटकर यांच्या 'निखळ जागर संवेदनाचा' पुस्तकाला चैतन्य माने पुरस्कार देण्यात आला आहे. महादेव कांबळे यांच्या 'वेदनांकित घुंगराचे संदर्भ' यांच्या काव्य संग्रहाला शैला सायनाकर पुरस्कार जाहीर झाला. बालवाङ्मय पुरस्कार कुमारी गायत्री शिंदे हिच्या 'माझा राजा शाहूराया' या पुस्तकाला मिळाला आहे.

गो. मा. पवार पुस्कार वि. दा. वासमकर यांच्या 'मराठीतील कलावादी समीक्षा' या ग्रंथाला मिळाला आहे. डॉ. विजय निंबाळकर पुरस्कार २४ पुस्तकांना मिळाला आहे. त्यामध्ये संजय कांबळे यांच्या सम्यक समीक्षा, रवी राजमाने यांच्या वाळवाण, भास्कर जाधव यांच्या महाप्रस्थान, जीवन साळोखे यांच्या वर्तमानाचे टोक, श्रीधर कुदळे यांच्या चैत्र पालवी, दत्ता पाटील व नीलेश शेळके यांच्या समकालीन मराठी साहित्य, उर्मिला आगरकर यांच्या मनी मानसी, दत्तात्रय मानुगडे यांच्या आजीची पोथढी, सोनाली नवांगुळ यांच्या जॉयस्टिक, रघुराज मेटकरी यांच्या सह्याद्रीच्या खोऱ्यात, सलीम मुल्ला यांच्या ऋतुफेरा, सुनील जंवजाळ यांच्या काळीजकाटा, सुनील पाटील यांच्या महर्षी महेश योगी, धनाजी घोरपडे यांच्या गाऱ्हाणं, महेशकुमार कोष्टी यांच्या ओळंबा, सविता नाबर यांच्या डोन्ट वरी बी हॅपी, अजंली देसाई यांच्या काव्याजंली, योजना मोहिते यांच्या होरपळ आणि हिरवळ, प्रशांत नागावकर यांच्या कॉ. धनाजी गुरव यांची मुलाखत, कबीर वराळे यांच्या किलबिल गोष्टी, दिनेश वाघुंबरे यांच्या मिथकांचा रंगाविष्कार, प्रमोद बाबर यांच्या निळ्या लाटा, किरण कुलकर्णी यांच्या बंधन या पुस्तकांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष गौरी भोगले, सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षय्य तृतीयेला बाजारपेठेने साधला मुहूर्त

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे बाजारपेठेने उसळी घेतल्याचे चित्र मंगळवारी होते. सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन आणि गृह उद्योगात खरेदीला गर्दी झाली. त्यामुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.

साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेला बाजारात मोठी उलाढाल झाली. या दिवशी सोने खरेदी करण्याची अनेक कुटुंबाची प्रथा असल्याने गुजरीमधील सराफी दुकाने सकाळपासून हाऊसफुल्ल होती. भाऊसिंगजी रोड, व्हिनस कॉर्नर आणि राजारामपुरीतील शोरुम महिलांच्या गर्दीने खच्चून भरली होती. सोने-चांदीच्या दागिन्यांबरोबर हिऱ्यांच्या दागिन्यांकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसला. पारंपरिक दागिन्यांबरोबर एक ग्रॅम वजनाच्या फॅशनेबल दागिन्यांची चलती बाजारात पहायला मिळाली. एक ग्रॅम सोन्याचे वळे खरेदी करण्यासाठी मोठ्या शोरुममध्ये ग्राहकांची गर्दी होती. व्यापाऱ्यांनी मजुरी व डिस्काउंट, सोने खरेदीसाठी ईएमआयची सोयही उपलब्ध करुन दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीकडेही चांगला कल राहिला. एलईडी खरेदीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सोबत होम थिएटरली पसंती होती. उन्हाच्या तडाख्यामुळे एसी, कुलर यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचबरोबर फ्रीज, वॉशिंग मशिन खरेदीसाठी महिला वर्गाची उपस्थिती शोरुममध्ये जाणवत होती. रोख रक्कमेवर पाच ते दहा टक्के डिस्काउंट अशी स्कीमही व्यापाऱ्यांनी काही ठिकाणी दिली. त्यामुळे लक्ष्मीपुरी, व्हीनस टॉकीज, टेंबे रोड परिसरातील शोरुम हाऊसफुल्ल होत्या. मोबाइल कंपन्यांनी बाजारात आणलेल्या नवीन मॉडेल्सना तरुणाईकडून पसंती मिळाली. शेकडो मोबाइल्सची विक्री झाली. ब्रँडेड मोबाइल खरेदीवर तरुणाईच्या उड्या पडल्या.

दुचाकी व चारचाकी प्रवासी वाहनांबरोबर माल वाहतूक, शेतीसाठी उपयुक्त असलेल्या वाहनांची चांगली खरेदी झाली. रुईकर कॉलनी, गोकुळ शिरगाव, शिरोली पुलाची येथील कार शोरुम सजल्या होत्या. मुहूर्तावर वाहने नेण्यासाठी सकाळी गर्दी झाली होती. बाइक, मोपेड वाहनांसाठी हलक्या मोटार खरेदीला चांगला प्रतिसाद लाभल्याचे डिलर्संनी सांगितले. जीएसटी नसलेल्या फ्लॅट व बंगल्यांची चांगली खरेदी झाली. जीएसटीचा दर कमी झाल्याने फ्लॅट व बंगल्यांचे चांगले बुकिंग झाले. घर खरेदीचा व्यवहार पूर्ण केलेल्या ग्राहकांनी सहकुटूंब गृहप्रवेशाचा मुहूर्त साधला.

सोने खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. महिला, युवतींनी पारंपरिक दागिन्यांबरोबर लाइटवेट दागिन्यांकडे ओढा होता. तरुण पिढीकडून हिऱ्यांच्या दागिन्यांनाही पसंती लाभली. बाजारात सोने खरेदीत चांगली उलाढाल झाली.

- कुणाल लडगे, सुवर्ण व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पळवणाऱ्यांना निवडणुकीत हरवाः आंबेडकर

0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

लोकसभा निवडणुकीत सध्या मांडण्यात येणारे सगळे आराखडे चुकणार असून यंदा निकाल वेगळे लागतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. वारंवार दुष्काळाशी सामना कराव्या लागणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील पाणी पळविणाऱ्या बड्या ठेकेदारांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केल्यास दुष्काळाचा प्रश्न सुटेल, असाही टोला आंबेडकर यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी दौऱ्यासाठी आले होते. महाराष्ट्रात अलिकडे सातत्याने दुष्काळ पडत असल्याने कायमस्वरूपी दुष्काळी उपाययोजनेची तयारी शासनाने करून ठेवणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही मंडळी सातत्याने पाणी पाळावीत असल्याने इतर जनतेच्या माथी हा दुष्काळ येतोय. या नेत्यांना निवडणुकीत हरवून तुमचा दुष्काळ हटवा. ब्रिटिशांनी कोकणातील नद्यांची तोंडे पश्चिम महाराष्ट्राकडे वाळविल्याने येथे पाण्याचा उपलब्धता मोठी असली तरी नियोजनाच्या अभावामुळे सातत्याने दुष्काळाचे संकट येत असल्याचे आंबेडकर म्हणाले.

निवडणुकीनंतर काही कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला पंढरपूर येथील जनकल्याण हॉस्पिटलमध्ये जाऊन आंबेडकर यांनी माऊली हळणवर या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी आपल्या दुष्काळी दौऱ्याची सुरुवात सांगोला तालुक्यातील मांजरी येथून करीत चारा छावण्यात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथूनच आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला. छावण्यांचे अनुदान व इतर दुष्काळी प्रश्न त्यांनी मांडले. तसंच चारा छावणीत असलेल्या शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून मजुरी देण्याची मागणी यावेळी आंबेडकर यांनी केली. आज आंबेडकर यांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनच्या ‘तपासणी’चा अहवाल गायब

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रकमेच्या पावत्या उपलब्ध होत नसल्याबद्दल २०१६ मध्ये तक्रारी झाल्या होत्या. त्यावेळी वित्त विभागाने तालुकानिहाय आढावा घेण्यासाठी तपासणी पथक नेमले. मात्र हा अहवालच वित्त विभागाकडून गहाळ झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाला अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीच्या संदर्भातील विवरणपत्रे ३१ मे पर्यंत उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळे कर्मचारी महासंघाने १३ मे पासून पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घ्यावे, असे पत्र दिले. तत्पूर्वी सीईओंनी वित्त विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मित्तल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचारी महासंघाने काम बंद आंदोलन ३१ मेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी दिली.

वेतन कपातीच्या पावत्यांवरुन सध्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. दोन कोटीच्या रकमेच्या पावत्यांचा हिशेब लागत नाही. कर्मचाऱ्यांना २०१६ पासून 'अंशदायी'अंतर्गत वेतन कपातीच्या पावत्या मिळालेल्या नाहीत. तसेच त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याचे म्हणणे आहे. सोमवारी कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन सीईओंची भेट घेऊन काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. कर्मचारी महासंघाने २०१६ मध्ये वेतन कपातीच्या पावत्यावरुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पेन्शन योजनेचे धनादेश मुदतबाह्य व गहाळ झाल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत वित्त व लेखा विभागाने प्रत्येक तालुक्यातील अंशदायी पेन्शन योजनेची तपासणी करण्यासाठी तपासणी पथकाची स्थापना केली होती. त्या पथकाने तपासणी करुन अहवाल वित्त विभागाकडे सादर केला. मात्र त्या अहवालातील निष्कर्ष काही समोर आला नाही. सध्या तर हा अहवाल गहाळ झाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे.

कर्मचाऱ्यांचा आक्षेप, मंत्रालयापर्यंत चौकशी

उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही, तसेच २०१० ते २०१८ या कालावधीतील २२ कोटी ३१ लाखांहून अधिक रक्कम व तितकीच सरकारी वाट्याची रक्कम व त्या रकमेवरील व्याजापोटी दहा कोटी ४७ लाखांची रक्कम कोषागारमध्ये जमा असल्याचे म्हटले होते. कदम यांच्या खुलासावर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतले आहेत. गेल्या तीन वर्षातील रक्कम खात्यावर जमा झाल्याच्या पावत्या आढळत नाहीत. कर्मचाऱ्यांची रक्कम खात्यावर जमा नसेल तर समतुल्य रक्कम सरकार कशी जमा करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची संवाद साधून वित्त विभागातील नियमावलीची माहिती घेतली. दरम्यान, अंशदायी पेन्शन योजनेवरुन निर्माण झालेला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी जादा कर्मचारी नेमून पावत्या तयार करण्याविषयी प्रशासन विचार करत आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात जवानाचा मृत्‍यू

0
0

अपघातात जवानाचा मृत्‍यू

सातारा

सुरुर फाट्यानजीक रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास दुचाकीच्या अपघातात जवान नारायण आनंदराव मतकर (वय ३१) हे जखमी झालेले होते. उपचारादरम्‍यान मंगळवारी त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, असा परिवार आहे.

तांदुळवाडी (ता. कोरेगाव) येथील जवान नारायण आनंदराव मतकर (वय ३१) हे सैन्य दलात ११२ इंजिनीअर रेजिमेंटमध्ये पुणे येथे कार्यरत होते. त्यांची तेरा वर्ष नोकरी झाली होती. पुणे येथे कार्यरत असणारे मतकर रविवारी सुट्टीनिमित्त गावी तांदुळवाडी येथे आले होते. दरम्‍यान, त्यांना तत्काळ आॕफिसला हजर होण्याबाबतचा संदेश मिळाला होता. त्यामुळे परिवाराची भेट आवारून ते पुन्हा पुणे येथे ड्युटीवर हजर होण्यासाठी दुचाकीवरुन ते निघाले होते. या दरम्‍यान त्यांच्या दुचाकीला सुरुर फाट्यानजीक रविवारी अपघात झाला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सातारा येथील सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्‍योत मालवली. तांदुळवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

.........

पाणी-चाऱ्याचाही प्रश्न गंभीर

सातारा :

जिल्ह्यात चारा आणि पाणी टंचाईची स्थिती वाढल्याने जनावरांसाठी छावण्या सुरू आहेत. या छावण्यांतून जनवारांना योग्य चारा, पशुखाद्य मिळते का नाही हे पाहण्यासाठी जिल्हास्तरीय पथकाला १५ दिवसांतून एकदा तर तालुका पथकाला आठवड्यातून चारवेळा तपासणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पाऊस पडला. त्यामुळे अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. माण, खटाव, फलटण या तालुक्यांत तर पाण्याबरोबरच चाऱ्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चारा छावणी सुरू करण्याची मागणी सतत होत होती. त्या नुसार मागणीप्रमाणे प्रशासाने जिल्ह्यातील १५ हून अधिक ठिकाणी छावणी सुरू करण्यास परवानगी दिली. सर्वाधिक छावण्या या माण तालुक्यात आहेत.

ट्रॅक्‍टरसह अन्य वाहने दारातच उभी

कृषी व्यावसायाला पुरक व्यवसाय म्हणून ट्रॅक्‍टरसह अन्य वाहने दुष्काळामुळे माणदेशीवासियांच्या दारातच उभी आहेत. दुष्काळाचा शेतीला फटका बसत आहे, शिवाय शेतीची कामे ठप्प झाल्याने शेतीपूरक व्यवसायही आतबट्ट्याचा ठरू लागला आहे. माण तालुक्‍यात व्यवसायिकांची संख्या भरपूर आहे. ट्रॅक्‍टरमुळे शेती व वाहतुकीची कामे करून आर्थिक उत्पन्नाचा हातभार मिळवला जात आहे. मात्र, सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची कामे ठप्प झाली असून, वाहतुकीची कामेही मंदावली आहे. त्यात ऊस हंगाम बंद झाल्यापासून वाहनांना काम शिल्लक राहिले नाही. अशा वाहनांना शेतकऱ्यांनी घरासमोर सावलीला उभे केले आहे. दुष्काळाच्या तडाख्यामुळे कृषी उत्पन्नावर मोठा परिणाम होत असतानाच व लाखो रुपये किमतीच्या वाहनांना जनावरे बांधण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांग उन्नती शिबिर स्थळावरून ‘राजकारण’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत ११ ते २६ मे या कालावधीत आयोजित तालुकास्तरीय शिबिरावरून राजकारण उफाळले. 'चंदगड येथील शिबिर पंचायत समितीच्या ठिकाणी, तर अन्य तालुक्यातील ठिकाणे विधानसभेच्या राजकीय सोयीसाठी निवडल्याचा संशय निर्माण होत आहे. याबाबत प्रशासनाने खुलासा करावा,' असे पत्र कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले.

सदस्य मनोज फराकटे, युवराज पाटील, शिल्पा शशिकांत खोत यांच्या स्वाक्षरीचे पत्र सीईओ मित्तल यांना दिले. त्यामध्ये 'संबंधित ठिकाणे निवडताना ज्या त्या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांना विचारात घेतले आहे का, घेतले असल्यास कोणत्या सदस्यांसोबत चर्चा झाली, याचा तपशील द्यावा. दिव्यांग उन्नती अभियान चांगल्या प्रकारचे अभियान आहे. पण तालुकास्तरीय शिबिराविषयी सदस्यांशी सविस्तर चर्चा होणे आवश्यक होते. मात्र, अभियान राबविताना सर्व सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचे दिसून येत आहे, असे म्हटले आहे.

०००

गटातटाच्या राजकारणामुळे पेच

या अभियानांतर्गत कागल तालुक्यासाठी १७ मे रोजी 'मेजर आनंदराव घाटगे आयटीआय कॉलेज व्हनाळी' येथे तालुकास्तरीय तपासणी शिबिर होणार आहे. कागलमधील गटातटाचे राजकारण सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे प्रतिस्पर्धी आहेत. शिवाय घाटगे यांचे पुत्र अंबरीश घाटगे सध्या जिल्हा परिषदेत शिक्षण समिती सभापती आहेत. घाटगे यांच्याशी निगडित शैक्षणिक संस्थेत तपासणी शिबिर हे राजकीयदृष्ट्या मुश्रीफ गटासाठी अडचणीचे ठरणारे आहे. कागलमधील गटातटाच्या राजकारणामुळे तपासणी शिबिराच्या ठिकाणावरून पेच निर्माण झाला आहे.

०००

'स्थायी'च्या बैठकीत ठिकाणे निश्चित

दिव्यांग उन्नती अभियानच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ११ ते २६ मे या कालावधीत तालुकास्तरावर तपासणी होणार आहे. तपासणी शिबिरात दिव्यांगांना आवश्यक साहित्यांची नोंदणी करून घेण्यात येईल. त्यानंतर दिव्यांगांच्या मागणीनुसार साहित्य वितरित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत तपासणीसाठी तालुकानिहाय शिबिर निश्चित झाली होती. कागलमधील ठिकाणाला राजकीय रंग लाभल्याचे चित्र आहे.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनाची दखल नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंदगड तालुक्यातील दाटे येथे भारत निर्माण योजनेतून राबविलेल्या पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता ग्राम कमिटीच्या भ्रष्टाचाराला अधिकारी पाठबळ देत आहेत. कमिटी व अधिकाऱ्यांनी संगनमताने निधी हडपला आहे. याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, यासाठी ग्रामस्थ धाकोबा गुरव व सहकारी सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाने कोणत्यारी प्रकारची दखल घेतली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुन्या कृष्णा पुलासाठी कराडकर आक्रमक

0
0

जुन्या कृष्णा पुलासाठी

कराडकर आक्रमक

कराड :

कृष्णा नदीवरील गुहागर-विजापूर महामार्गाला जोडणारा जुना कृष्णा पूल पाडण्यामागचा उद्देश काय? जुन्या कृष्णा पुलावरील वाहतूक बंद करू देणार नाही, कराडहून विद्यानगरकडे जाणारी वाहतूक सध्याच्या नवीन पुलावरून वळवून देणार नाही, या बाबत प्रशासनाचे नियोजन काय? सध्यस्थितीत पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणांबाबत कोणती कार्यवाही सुरू आहे? यासह अन्य प्रश्नांची सरबत्ती राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता रमेश पन्हाळकर यांच्यावर कराडकर नागरिकांनी केली. तसेच हा पूल पाडण्याचा प्रयत्न झाल्यास कराडकर रस्त्यावर उतरतील व जनआंदोलन उभारले जाईल, असा सज्जड इशाराही कराडकर नागरिकांनी दिला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर जुना कृष्णा पुल बचाव कृती समिती स्थापन करण्यासाठी कराडसह परिसरातील नागरिकांची शुक्रवारी रोजी सकाळी अकरा वाजता येथील सरकारी विश्रामगृहात बैठक होणार आहे.

..........

राज्यपालांचा उपस्थित 'कृष्णा'चा

शुक्रवारी दीक्षान्त सोहळा

कराड :

कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा ८ वा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित राहणार आहेत. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या सोहळ्याला कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलिमा मलिक आदींसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील ५५८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. आर. के. गावकर यांनी दिली आहे.

.......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२०० कोटींची वसुली होणार

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : सरकारचे कोट्यवधीचे अनुदान घेऊन गैरकारभार केल्याप्रकरणी संबंधित संस्थांच्या संचालकांकडून रक्कम वसुलीचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील जिल्ह्यातील ४३ औद्योगिक मागासवर्गीय संस्थांचा समावेश आहे. त्यांना दिलेले अनुदान वसूल करण्याची कार्यवाही सहा आठवड्यात करण्याचे आदेश येथील समाज कल्याण सहायक आयुक्तांना दिले आहेत. यामध्ये राज्यातील ८२ संस्थांचा समावेश आहे. या संस्थांची नोंदणी रद्द करण्याबरोबरच त्यांच्यावर अवसायक नेमावा, असेही या आदेशात म्हटले आहे. यामुळे इचलकरंजी, हातकणंगलेसह परिसरातील ४३ संस्थेतील ४७३ संचालकांकडून सरकारने दिलेले २०० कोटींहून अधिक अनुदान आणि इतर अर्थसाह्याची वसुली होणार आहे. परिणामी कागदावर संस्था दाखवून आणि गैरकारभार, नियमाबाह्य कामकाज करून अनुदान लाटलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

अनुसूचित जातींतील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रकल्पाच्या ३५ टक्के सरकारी भागभांडवल आणि दीर्घकालीन कर्ज सरकार देते. मात्र अशा संस्था काढून अनुदान लाटल्याचेच प्रकार मोठ्या प्रमाणात झाले. या संस्थांसंबंधी तक्रारी झाल्याने सरकारच्या लोकलेखा समितीकडून जिल्ह्यातील ४३ सह राज्यातील १२५ संस्थांचे लेखापरीक्षण झाले. त्यात नियमबाह्य कामकाज असलेल्या ८२ संस्थांची प्रकल्प मंजुरी रद्द करण्याबाबत निर्णय घेऊन तसे आदेश करावेत, असे पत्र विभागीय समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांना ११ मे २०१८ रोजी पाठवले. मात्र त्यावर सरकारने काही निर्णय घेतला नाही.

त्यामुळे डिसेंबर २०१८ मध्ये इचलकरंजीतील सामाजिक कार्यकर्ते सुशील शिंदे, महमंद शेख, विजय शिंदे यांनी मुख्य सचिव, समाज कल्याण आयुक्त, सहकार आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासह गैरकारभार झालेल्या ८२ संस्थांविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. याचिकेवरील आदेशात ८२ संस्थांकडून अनुदानासह इतर अर्थसाह्य वसूल करून अहवाल देण्याचे आदेश दिले. प्रत्येक संस्थेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव यांच्यासह आठ संचालक अनुसूचित जातीचे तर तीन खुल्या प्रवर्गातील संचालक आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार संचालकांकडून अनुदान, अर्थसाह्य वसूल होणार आहे. एका संस्थेला कमीत कमी ५ ते साडेसहा कोटींचे अर्थसाह्य मिळाले आहे. ४३ संस्थांची मिळून ही रक्कम २०० कोटींपेक्षा जास्त होते. ती सर्व वसूल होणार आहे.

फौजदारी दाखल झालेल्या संस्था

सहकार विभागातर्फे विशेष लेखापरीक्षणात गंभीर त्रुटी आढळल्याने फौजदारी गुन्हे केलेल्या संस्था अशा : कल्लाप्पा आवाडे मागास इंड. को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि. (शिवनाकवाडी, ता. शिरोळ), शुभम मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था (इचलकरंजी), नवभारत मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था (नांदणी, ता. शिरोळ), आदर्श मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था (शहापूर, ता. शिरोळ), मागासवर्गीय वनऔषधी सहकारी संस्था (गावठाण, ता. हातकणंगले).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिशवीचे पैसे आकारु नयेत

0
0

कोल्हापूर

मॉलमध्ये ग्राहकांना माल भरुन देण्यासाठी वापरणाऱ्या पिशवीसाठी व्यवस्थापनाकडून पैसे आकारु नयेत, असे पत्रक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी प्रसिध्दीस दिले आहे. पत्रकात म्हटले आहे, 'संबंधित पिशवीवर मॉलची जाहिरात असते. चंदीगड ग्राहक मंचाने नुकताच एका कंपनीला नऊ हजार रुपयांचा दंड केला आहे. कारण त्यांनी ग्राहकाकडून पिशवीसाठी तीन रुपये घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर येथेही पिशवीची विक्री केल्यास चंदीगड ग्राहक तक्रार निवारण मंचच्या केसच्या आधारे कोल्हापुरातही ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० टेबलच्या प्रस्तावाला ब्रेक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. कोल्हापूर मतदारसंघासाठी रमणमळ्यातील गोदामात तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलावाशेजारील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीत होणार आहे. सकाळी आठ वाजता मोजणीला प्रारंभ झाल्यानंतर उशीर लागू नये, यासाठी १४ ऐवजी २० टेबल करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे बुधवारी पाठवण्याचे नियोजन निवडणूक प्रशासनाने केले होते. मात्र टेबलच्या रचनेचा नकाशा सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडून मिळाला नाही. परिणामी प्रस्तावास तूर्त ब्रेक लागला आहे.

कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने लढत झाली. यामुळे कोण निवडूण येणार याविषयी प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. निकालाचा दिवस जवळ येईल तशी ही उत्सुकता ताणली जात आहे. रिंगणातील प्रमुख उमेदवार मीच निवडून येणार असल्याचा दावा करत आहेत. यावर पैजाही लावण्यात आल्या आहेत. तर निवडणूक प्रशासन मतमोजणी प्रक्रियेची तयारी करत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी, तहसीलदारांची बैठक घेऊन अचूक तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. मतमोजणीवेळी उपस्थित राहणाऱ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधींचे अर्ज १० मेपूर्वी प्रशासनाकडे दाखल करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने १४ टेबलवर मतमोजणी करण्यास यापूर्वीच मंजूरी दिली आहे. मात्र पहिल्यांदाच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट यंत्रावरील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल. टपाली मतमोजणीची प्रक्रिया किचकट आहे. यामुळे निकालास विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे टेबलची संख्या वाढवून २१ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र इमारतीमध्ये टेबलची रचना कशी असेल, यासंबंधीचा नकाशा सार्वजनिक बांधकाम प्रशासन करते. त्यांच्याकडून नकाशा मिळण्यात विलंब झाल्याने २१ टेबलचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्यात आलेला नाही. नकाशा मिळताच प्रस्ताव पाठवण्यात येईल. आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर २१ टेबलवर मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली.

............

चौकट

दोन्ही मतदारसंघांसाठी मतमोजणीसाठीचे कर्मचारी

पर्यवेक्षक :९६, सहायक :९६, सूक्ष्म निरीक्षक :९६, रांग अधिकारी :७, अतिरिक्त सूक्ष्म अधिकारी : १३, टपाली मतमोजणी पर्यवेक्षक : २६, टपाली मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक :२६, शिपाई :९६, संगणक ऑपरेटर : १३, हमाल : ६६

...........

मतमोजणीचे हॉल असे :

कोल्हापूर : ए हॉल : चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण.

सी : करवीर.

डी : कोल्हापूर उत्तर

ई : टपाली मतदान

.........

हातकणंगले

ए हॉल : शाहूवाडी, हातकणंगले.

सी : इचलकरंजी, शिरोळ.

डी : इस्लामपूर, शिराळा.

ई : टपाली मतदान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे प्रकल्प लटकले

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील मध्यवस्तीतील पार्किंगसाठी तसेच महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुमजली पार्किंग इमारत व कोंबडी बाजारात उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाची गाडी अजूनही रखडलेली आहे. गेल्या वर्षापासून टेंडर प्रसिद्ध करण्यापर्यंतच्या टप्प्यावर येऊन हे प्रकल्प अडकले आहेत. त्यासाठी प्रशासन व नगरसेवकांकडूनही फार औत्सुक्य दाखवले जात नसल्याने महापालिकेला हे प्रकल्प करायचे आहेत का याबाबत शंका येत आहे.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जागेवर बहुमजली पार्किंगची इमारत उभारण्याचे नियोजन अनेक वर्षापासून सुरू आहे. २०१५ पूर्वीच्या सभागृहातही त्यावर चर्चा झाली होती. त्या प्रकल्पाला सातत्याने विरोध असल्याने त्याच्या आराखड्याशिवाय पुढे काही झाले नाही. त्या आराखड्यातही नंतर बदल करण्यात आले. त्या बदलानंतर प्रकल्पाला गती येईल असे वाटत होते. पण अजूनही हा प्रकल्प कशा पद्धतीने साकारायचा याबाबत प्रशासनाच्या पातळीवर निर्णय घेतलेला नाही. बीओटी तत्वावर प्रकल्प राबवण्याची चर्चा असली तरी त्याबाबतचे टेंडर काढण्यासाठीची प्रक्रिया अजून सुरू केलेली नाही. त्यासाठी आयुक्तांच्या पातळीवर संमती होण्याची आवश्यकता आहे.

त्यानंतर कोंबडी बाजारातील व्यापारी संकुलाचीही गती खुंटली आहे. तिथे स्थलांतरीत केलेल्या विक्रेत्यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्याबाबतचा निर्णय लागल्यानंतर तातडीने महापालिका काही कार्यवाही सुरू करेल, असे वाटत होते. पण तत्कालिन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असा आराखडा सादर करण्याची सूचना केली. त्याला गेल्या वर्षातील बराच कालावधी गेला. नवीन आराखडा सादर केल्यानंतर तो प्रकल्प बीओटीवर की स्वत: महापालिका उभा करणार यासाठी चर्चा सुरू होती. आता या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्याच्या फाइलवर निर्णय झालेला नाही. शहरात मुळात नवीन प्रकल्प येत नाहीत. अशा परिस्थितीत पार्किंगचा प्रश्न काही प्रमाणात कमी करण्यासाठी बहुमजली पार्किंगचा प्रकल्प महत्वाचा आहे. त्याबाबतही महापालिकेने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. परिणामी या प्रकल्पांची केवळ रखडपट्टी सुरू आहे. यातून हे प्रकल्प महापालिकेला करायचे आहेत का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाव सरकारी, मालकी खासगी

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : पाणीटंचाईची समस्या सार्वत्रिक बनली असताना जिल्ह्यातील विविध भागांतील पाझर तलाव आणि गावतलाव परिसरात अनधिकृत बांधकामे, वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमणे वाढली आहेत. काही ठिकाणी जलस्रोत अडवून बांधकाम करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील २९ पाझर तलाव जिल्हा परिषदेचे आहेत, पण त्यांची मालकी खासगी व्यक्तीकडे आहे. तलावाच्या नाव हस्तांतरणावरून सरकारच्या दोन विभागांत ताकतुंबा सुरू आहे.

सातबारा आणि आठ 'अ' वरून जिल्हा परिषदेला सध्या 'सरकारी काम आणि सहा महिने थांब'ची प्रचिती येत आहे. प्रशासन गेली तीन वर्षे हे तलाव जिल्हा परिषदेच्या नावावर करावेत यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयांशी पत्रव्यवहार केला आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीचे एकूण ९८ पाझर तलाव आहेत. अनेक गावांत तलाव परिसरात अतिक्रमणे झाली आहेत. पत्र्याचे शेड व अन्य प्रकारचे बांधकाम केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

खासगी व्यक्तीच्या नावावरील तलाव जि.प.च्या मालकीचे व्हावेत यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे २२ डिसेंबर २०१५ पासून प्रयत्न सुरू आहेत. सातबारा पत्रकी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी नोंद करण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी कळविले आहे. यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता मनीष पवार म्हणाले, '२९ तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीच्या नावावर व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाशी प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाने यापूर्वीच सीईओंच्या स्वाक्षरीने महसूल विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे.'

०००

भूसंपादन झाले, पण सातबारा नाही

१९७२ चा दुष्काळी कालावधी व त्यानंतर ठिकठिकाणी पाझर तलावांची कामे झाली. पाझर तलावांसाठी जमिनी संपादित केल्या, संबंधितांना नुकसानभरपाई दिली. आतापर्यंत या जमिनी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या होणे अत्यावश्यक होते. मात्र, तत्कालीन अधिकाऱ्यांनी संबंधित तलावाची मालकी जि.प.च्या नावावर होण्याबाबत पाठपुरावा केला नसल्याच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या तक्रारी आहेत. एका ठिकाणची तलावाची जागा जि.प.च्या नावावर केल्यानंतर कोर्ट प्रकरण झाले आहे.

००००

४५० गावतलावांचा सर्व्हे आवश्यक

जिल्ह्यात ४५० गावतलाव आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक तलाव शेवटची घटका मोजत आहेत. तलाव परिसर अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांनी वेढला आहे. काखे (ता. पन्हाळा) येथील गावतलावच्या ठिकाणी क्रीडांगण तयार केले आहे. अनेक गावांतील तलावाच्या अवतीभवती बांधकामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गावतलाव वाचविण्यासाठी प्रशासनाकडून धडक मोहिमेद्वारे सर्व्हे होणे आवश्यक आहे. गाळ उपसा, पाणीगळती आणि अतिक्रमणे हटविल्यास पाण्याची उपलब्धता होऊ शकते, अशी चर्चा जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत झाली.

००००

कोट...

गावतलाव व पाझर तलावात ठिकठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. जलस्रोत बांधकामात दडपले आहेत. पाणीटंचाईवर मात करायची असेल तर गावतलाव गाळमुक्त करणे अत्यावश्यक आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याकामी धडक मोहीम राबवावी.

प्रा. शिवाजी मोरे, सदस्य, जिल्हा परिषद

००००

दृष्टिक्षेपात पाझर तलाव...

जिल्ह्यातील एकूण पाझर तलाव : १३५

जिल्हा परिषदेने बांधलेले पाझर तलाव : ९८

सरकारच्या नावावरील तलाव : ६६

खासगी व्यक्तींच्या नावावरील तलाव : २९

पाटबंधारे विभागाच्या मालकीचे तलाव : ३७

तीन तलावांचा सातबारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंजावर विद्यापीठाशी सामंजस्य करार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

तंजावर (तमिळनाडू) येथील तमिळ विद्यापीठ आणि सरस्वती महाल ग्रंथालय यांच्यासमवेत तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार करण्याबाबत तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम् यांच्याशी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची यशस्वीपणे चर्चा झाली. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या संदर्भात नुकतीच विद्यापीठाच्या अभ्यासकांसमवेत तंजावरला भेट दिली.

तंजावर येथील तमिळ विद्यापीठाने मराठा इतिहास आणि मराठी भाषेसंदर्भातील चाळीस हजारहून अधिक कागदपत्रे जतन करून ठेवलेली आहेत. हे विद्यापीठ भाषेला केंद्रस्थानी ठेऊन स्थापन करण्यात आले असून या विद्यापीठाकडून मोडी कागदपत्रांचे भाषांतर कार्यही मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे या विद्यापीठाशी तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार शिवाजी विद्यापीठाच्या विचाराधिन होता. त्याचबरोबर सरस्वती महल ग्रंथालयात मोडी कागदपत्रांसह हजारो मराठी ग्रंथांचे जतन केलेले असल्याने संशोधकांना अभ्यासासाठी ते सहज उपलब्ध व्हावे यासाठी ग्रंथालयाबरोबरही सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये तंजावरला मराठी अध्यासन आणि शिवाजी विद्यापीठात तमिळ अध्यासन स्थापन करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली.

शिवाजी विद्यापीठ नवे म्युझिअम साकारत असून या म्युझिअममध्ये तंजावर येथील मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित दालन उभारण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा यावेळी झाली. शिवाय, सरस्वती महल ग्रंथालयातील उपलब्ध अभ्यास साधनासंदर्भात तंजावरचे जिल्हाधिकारी ए. अण्णादुराई यांच्यासमवेतही स्वतंत्र बैठक झाली. दोन्ही बैठका तंजावरचे राजे शिवाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. बैठकांना तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम्, कुलसचिव मुथ्थूकुमार यांच्यासह तमिळ विद्यापीठातील डॉ. विवेकानंद गोपाळ, डॉ. जयकुमार, डॉ. कविता, डॉ. शीला, डॉ. नीलकंठ हे भारतीय भाषा आणि सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक उपस्थित होते; तर, शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, समिती सदस्य डॉ. अवनीश पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. निलांबरी जगताप आणि गणेश नेर्लेकर-देसाई उपस्थित होते.

मराठ्यांच्या इतिहासात तंजावर महत्त्वाचे!

तमिळनाडूतील तंजावर येथे साडेतीनशे वर्षांपूर्वी इ.स. १६७६ ला मराठ्यांनी आपले राज्य स्थापन केले. शहाजीराजेंचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी यांनी हे राज्य स्थापन केले. तेव्हापासून ब्रिटीशांनी १८५५ ला संस्थान खालसा करेपर्यंत तेथे मराठा अंमल होता. या जवळजवळ दोनशे वर्षांमध्ये अकरा राजांनी राज्यकारभार केला. त्यांच्या कारकिर्दीत तेथे मराठी संस्कृती रुजली. मराठ्यांच्या इतिहासात तंजावरचे राज्य हा एक महत्त्वाचा भाग असून तंजावरच्या अभ्यासाशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होत नाही. त्यामुळे तंजावर राजघराण्याचे हजारो पेपर्स, इतर ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, शिल्पे, चित्र, शिलालेख, ग्रंथ अभ्यासणे हे मराठा इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपत्ती व्यवस्थापनासाठीआतापासूनच नियोजन करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यात ७ ते ३० ऑगस्टपर्यंत जास्त पाऊस पडतो. या कालावधीत संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. पूरबाधित ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणी त्वरीत मदत पोहचवण्यासाठी तरुण मंडळांचे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. आपत्ती व्यवस्थापनासाठीची तयारी करावी, ग्राम पातळीवर आतापासूनच नियोजन करावे', अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'आपत्ती व्यवस्थापनच्या यंत्रसामुग्रीची पावसाळ्यापूर्वी तपासणी करुन अहवाल द्यावा. संभाव्य बाधित गावे स्थलांतरीत करण्यासाठी निवारा निश्चित करावा. आपत्तीवेळी संभाव्य जीवित, वित्त हानी टाळण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून काटेकोरपणे नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा अद्ययावत करावा. आपत्कालीन काळात विभागप्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.'

ते पुढे म्हणाले,' संभाव्य भूस्खलन होणाऱ्या गावांची पाहणी करावी. सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने वारंवार वाहतूक बंद होणारी ठिकाणे निश्चित करावीत. वाहतूक मार्ग बंद झाल्यास ते पूर्ववत करावेत. त्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध ठेवावी. आरोग्य विभागाने डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो सारख्या आजारांचा फैलाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक आरोग्य केंद्रावर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. पाटबंधारे विभागाने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. महावितरणच्या प्रशासनाने वारा, झाडामुळे विद्युत वाहिन्या तुटून रस्त्यावर पडणार नाहीत, त्याची खबरदारी आतापासूनच घ्यावी.'

जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, 'जि. प.च्या सर्व विभागांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत केला आहे. ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आपत्ती काळात गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.' यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलीस उपअधीक्षक सतीश माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

................

चौकट

महापालिका प्रशासनाला सूचना

'महापालिका प्रशासनाने स्थलांतरांसाठीची ठिकाणे, नाले सफाई, औषधांची उपलब्धता, धोकादायक, जोखमीच्या इमारतीबाबत योग्य ती कार्यवाही करावी', अशी सूचनाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बैठकीत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांना डायरीयापासून मोफत सुरक्षा कवच

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत प्रथमच रोटाव्हायरस लसीचा समावेश केला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोटाव्हायरसचे जिल्ह्यात सर्वत्र मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुमारे ६२,४६९ बालकांना रोटाव्हायरस लसीमुळे सुरक्षा कवच मिळणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

लसीमुळे बालकांच्जे अतिसारापासून संरक्षण होणार आहे. त्यामुळे बालकांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्याच्या प्रमाणात तसेच बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती कार्यशाळेत देण्यात आली. रोटा व्हायरस लसीकरणसंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे झाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, प्राचार्य डॉ. सी. जे. शिंदे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. एफ. ए. देसाई, सीपीआर येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा झाली.

पालकांनी नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधून एका वर्षाच्या बालकास रोटाव्हायरस लसीकरण करुन घ्यावे. अतिसार या आजारापासून बालकांना सुरक्षित ठेवावे असे आवाहन कार्यशाळेत करण्यात आले. अतिसार रोखण्यासाठी ही लस प्रभावी आहे. रोटा व्हायरस लसीकरणाचे तीन डोस जन्मानंतर सहा, दहा, चौदा आठवडयाच्या वयामध्ये सर्वत्र सरकारी दवाखान्यात व लसीकरण सत्राच्या ठिकाणी मोफत देण्यात येणार आहे. हीच लस खासगी दवाखान्यात एक हजारापेक्षा जादा रुपये घेऊन दिले जाते.

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी कार्यशाळेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेला बालरोगतज्ज्ञ डॉ. डी. एस. थोरात, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यु. एम. मदने, डॉ. एस. ए. पाटील, डॉ. व्ही. एल. मोरे, डॉ. हेमंत खैरनारे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माऊली चौकातील जागा केएमटीच्या ताब्यात द्या

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

माऊली चौक (राजारामपुरी) येथील आरक्षित मिळकत महापालिकेच्या केएमटी उपक्रमाला ताब्यात द्यावी, अशी मागणी परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. देसाई यांनी सदरची मिळकत कायम मालकी हक्काने देण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

निवेदनात म्हटले आहे, 'नगररचना योजनेंतर्गत माऊली चौकातील प्लॉट क्र. २२० पैकी आरक्षित मिळकत २००२ मध्ये केएमटीकडे हस्तांतरीत झाली आहे. यापैकी प्लॉट क्र. १३३ च्या मिळकतीचा आगाऊ ताबा केएमटीकडे आहे. या आरक्षित मिळकतीवर बस टर्मिनस विकसित करण्यासाठी परिवहन समितीच्या बैठकीत वारंवार चर्चा होते. शहराच्या मध्यवस्तीमध्ये बस टर्मिनस झाल्यास केएमटीच्या उत्पन्नामध्ये भर पडण्याबरोबर नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सुविधाही उत्तमप्रकारे मिळण्यास मदत होणार आहे. परिणामी आरक्षित क्र. १३३ ची मिळकत केएमटीला द्यावी.'

शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांच्याशी चर्चा केली. देसाई यांनी ही मिळकत कायम मालकी हक्काने देण्यासाठी राज्य सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठवला जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी प्राथमिक शिक्षण समिती सभापती आशोक जाधव, नगरसेवक शेखर कुसाळे, पुर्नांद गुरव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालाबाबतचे अंदाज चुकणार : प्रकाश आंबेडकर

0
0

निकालाबाबतचे अंदाज चुकणार : प्रकाश आंबेडकर

पंढरपूर :

'लोकसभा निवडणुकीत सध्या मांडण्यात येणारे सर्व अंदाज चुकणार आहेत. यंदा निकाल वेगळे लागतील,' असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वारंवार दुष्काळाशी सामना कराव्या लागणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील पाणी पळविणाऱ्या बड्या ठेकेदारांना विधानसभेत पराभूत केल्यास दुष्काळाचा प्रश्न सुटेल, असाही टोला ही आंबेडकर यांनी लगावला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानानंतर प्रकाश आंबेडकर सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी दौऱ्यासाठी आले होते. महाराष्ट्रात अलीकडे सातत्याने दुष्काळ पडत असल्याने कायमस्वरूपी दुष्काळी उपाययोजनेची तयारी सरकारने करून ठेवणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही मंडळी सातत्याने पाणी पाळावीत असल्याने इतर जनतेच्या माथी हा दुष्काळ येत आहे. या नेत्यांना निवडणुकीत हरवून तुमचा दुष्काळ हटाव. ब्रिटिशांनी कोकणातील नद्यांची तोंडे पश्चिम महाराष्ट्राकडे वाळविल्याने येथे पाण्याचा उपलब्धता मोठी असली तरी नियोजनाच्या अभावामुळे सातत्याने दुष्काळाचे संकट येत आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

निवडणुकीनंतर काही कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला पंढरपूर येथील जनकल्याण हॉस्पिटलमध्ये जाऊन आंबेडकर यांनी माऊली हळणवर या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. या नंतर त्यांनी आपल्या दुष्काळी दौऱ्याची सुरुवात सांगोला तालुक्यातील मांजरी येथून करीत चारा छावण्यात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथूनच आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावून छावण्यांचे अनुदान व इतर दुष्काळी प्रश्नांबाबत चर्चा केली. चार छावणीत असलेल्या शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून मजुरी देण्याची मागणी या वेळी आंबेडकर यांनी केली. आंबेडकर यांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींची अशी भाषा शोभणारी नाही: पवार

0
0

सातारा :

गांधी परिवाराने दोन पंतप्रधान देशाला दिले. दोघांचीही हत्या झाली. एवढा मोठा त्याग या परिवाराने केल्यानंतर नरेंद्र मोदींची अशी भाषा शोभणारी नाही. आपण पंतप्रधानपदावर आहोत. या पदावर असताना अधिक काळजी घेणे आवश्यक असते. मात्र अशी काळजी न घेता अशा प्रकारची भाषा मोदींकडून बोलली जात आहे, हे दुर्दैवी आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त पवार साताऱ्यात आले होते. यावेळी भाऊराव पाटील यांना अभिवादन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, मी स्वतः संरक्षण मंत्री होतो. त्यावेळी मी सुद्धा युद्धनौकांनी अंदमानला गेलो होतो. या युद्धनौका सतत फिरत असतात. यात जर देशाचा पंतप्रधान युद्धनौकांनी फिरत असेल तर त्यात गैर काय आहे, असा प्रश्न पवारांनी केला. अशा दौऱ्यांमुळे युद्धनौकांवरची नेमकी कार्यपद्धती काय, याचा अभ्यास होतो, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images