Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बालिकेला डेंगीची लागण

0
0
संभाजीनगर येथील पाच वर्षाच्या बालिकेमध्ये डेंगीसदृश्य लक्षणे आढळली आहेत. तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारांना ती प्रतिसाद देत असून तिची तब्येत सुधारत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी दिली.

वडणगेतील तरूण बेपत्ता

0
0
वडणगे (ता. करवीर) येथील कुलदीप उर्फ राजू दत्तात्रय मर्दाने (वय ३४) हा युवक ३१ मेपासून बेपत्ता झाला आहे. करवीर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

गर्भलिंग निदानाचे रॅकेट उध्वस्त करा

0
0
वैशाली माने या विवाहितेने मुलाच्या हट्टापायी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तिने चिठ्ठीत गर्भलिंगनिदानाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट होते.

राष्ट्रवादीने संस्था बंद पाडल्या

0
0
'सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने देण्यात येणाऱ्या उमेदवारीत गुंडा-पुंडाना अजिबात स्थान नाही. उमेदवारांची ८० टक्के यादी निश्चित झालेली आहे. राष्ट्रवादीला एकही संस्था नीट चालविता आलेली नाही.

पाखीची मराठी एंट्री

0
0
काही वर्षापूर्वी गटांगळ्या खाणारा मराठी सिनेमा आता बॉक्स ऑफिसवरील कमाईबरोबरच राष्ट्रीय पुरस्कारांवरही नाव कोरू लागला आहे. त्यामुळेच अन्य भाषिक प्रेक्षक व निर्माते-तंत्रज्ञांचेही लक्ष मराठी चित्रपटांनी वेधून घेतले आहे.

डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टकडून शिक्षण मंडळाला १ लाख

0
0
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी बक्षीस देण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टच्यावतीने एक लाख रूपये देण्याची घोषणा सोमवारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली.

शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने पंचगंगा घाटावर स्वच्छता मोहीम

0
0
येथील ‌शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने पंचगंगा नदी घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या ठिकाणी असलेली मंदिरे आणि दगडी तटबंदीवर उगवलेल्या झाडांमुळे धोका निर्माण झाल्याने ती काढून टाकण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करा

0
0
ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणीसाठी ऑगस्टमध्ये निषेध दिन पाण्यात येईल असा इशारा येथील राजर्षी शाहू सेवा संघाची वार्षिक सभेत देण्यात आला. सारस्वत बोर्डिंग येथे झालेल्या सभेच्या अध्यपदी डॉ. मानसिंगराव जगताप होते.

करडी नजर हवीच

0
0
कार्यालयीन वेळेत सोशल नेटवर्किंग, गेम्स खेळण्यात मग्न असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक बरेच हैराण असतात. अशा कर्मचाऱ्यांचा कितीही राग येत असला तरी काम न होण्याच्या भीतीने अथवा बोलणी खाण्याच्या भयाने लोक गप्प बसतात.

व्यापारी संकुलांसमोर अडथळे

0
0
कपीलतीर्थ मंडईत उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाची अडथळ्याची शर्यत संपता संपेना. तत्कालीन आयुक्त कुणालकुमार या प्रकल्पासाठी प्रयत्नशील होते. त्यानंतर हा प्रकल्प बारगळला होता.

वेतन निश्चिती अमान्य

0
0
शिवाजी विद्यापीठातर्फे जुलै २०१२ मध्ये वर्ग एक व दोन पदावर नियुक्त आठ उमेदवारांच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे शिक्षण सहसंचालक कार्यालयाने विद्यापीठाकडून खुलासा मागविला आहे.

फ्लर्टी

0
0
‘सेहद के लिये फ्लर्ट करना अच्छा होता है ‘ये जवानी है दिवानी’ मधल्या रणबीर कपूरचा हा डायलॉग, तरुणाईत फेमस होताना दिसतोय. ‘मॅम, फ्लर्ट करावं की करू नये, तुम्हाला काय वाटतं?’ इंद्रजितनं मला डायरेक्ट विचारलं.

पावसाने केले ‘ट्रॅफिक जॅम’

0
0
पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. या पाण्यामुळे वाहनधारक पर्यायी मार्गाचा वापर करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन एकूणच सर्व रस्त्यांवर ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाली आहे.

‘माझं प्रेम अयशस्वीच’

0
0
सोनम कपूरनं सिनेमांमध्ये रोमँटिक भूमिका केल्या असल्या, तरी प्रत्यक्ष आयुष्यात कुणा ‘खास’ व्यक्तीचं प्रेम मिळवण्यास आपण अयशस्वी ठरल्याचं तिनं मान्य केलंय.

विमेन्स जॉब डेस्टिनेशन

0
0
ग्रॅज्युएशन झालं की स्थळं शोधा आणि अक्षता पडल्यानंतर गृहिणीची जबाबदारी सांभाळा. सध्या हे सगळं आउटडेटेड झालं आहे. आताच्या मुली करिअर ओरिएंटेड तर आहेच पण बॅचलर लाइफमध्ये जॉबसाठी घर सोडून इतर शहरांचा रस्ताही धरत आहेत.

तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी गर्दी

0
0
शाळा, कॉलेज सुरू होण्याच्या काळ असतानाही वाळवा तालुक्यातील मंडलनिहाय सेतू केंद्र बंद केले आहेत.

धोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात

0
0
सातारा शहर व परिसरात असलेल्या ४५हून अनेक धोकादायक इमारतींना नगर पालिकडून सदर इमारती उतरवा, अशा स्वरुपाच्या नोटीसा काहीकाळापूर्वीच देण्यात आल्या आहेत. मात्र याकडे कानाडोळा करणाऱ्या सातारकरांवर आता पालीकेकडूनच कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

किफायशीर बेदाणा यंत्राची निर्मिती

0
0
येथील जी. के. गुजर ट्रस्टच्या डॉ. दौलतराव आहेर इंजिनीअरिंग कॉलेजमधील यंत्र इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी काजू कटिंग मशीन आणि बेदाना निर्मिती सौर यंत्र तयार केले आहे. या उपकरणाचे औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.

अधीक्षकांसह सहाजणांना हायकोर्टाची नोटीस

0
0
येथील महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील खून खटल्याच्या फेरतपासादरम्यान भारतीय दंड संहितेच्या कलमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून येथील शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन व सध्या उस्मानाबाद येथे पोलिस निरीक्षक असलेले संभाजी पाटील यांनी केलेली याचिका सोमवारी हायकोर्टाने दाखल करून घेतली.

कास तलाव भरला

0
0
सातारा शहराच्या पश्चिम भागासाठी वरदान असणारे कास तलाव मुसळधार पावसामुळे भरले आहे. सध्या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे निम्म्या सातारकरांचा पुढील जून २०१४ पर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images