Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पारा उतरला, पण उष्मा कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाचे चटके, उष्मामुळे होणारी अंगाची लाही लाही यामुळे त्रस्त बनलेल्या नागरिकांना रविवारी तापमानाचा पारा कमी झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला. दुपारपर्यंत शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते, त्यामुळे तापमान ३७.७ अंशांपर्यंत खाली आले. पारा उतरला असला तरी हवेतील उष्मा कायम होता. दरम्यान शनिवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे ३० लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. आजरा, हातकणंगले, आजरा आणि चंदगड तालुक्यातील घरांची पडझड झाली.

रविवारी सुट्टीचा दिवस असूनही दुपारच्या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ कमी होती. सायंकाळनंतर प्रमुख बाजारपेठा, मार्गावरील वर्दळ वाढली. मात्र उष्मा सहन होत नसल्यामुळे नागरिकांनी आइस्क्रीमची दुकाने, शीतपेयांना पसंती दिली. उन्हाच्या चटक्यापासून सुटका करून घेताना नागरिकांनी शहरातील उद्यानांत गर्दी केली होती. महापालिकेच्या मालकीच्या उद्याने दुपारनंतर फुलली होती. शहर आणि जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापुरातील तापमान ४१ अंशांवर पोहचले होते. असह्य करणाऱ्या उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण बनले आहेत. शनिवारी सायंकाळी शहरात पावसाचा शिडकावा झाला तर जिल्ह्यातील विविध भागात पावसाने तडाखा दिला होता.

रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पावसाची चिन्हे दिसत होती. सकाळच्या सुमारास उन्हाची तीव्रता कमी जाणवत होती. शिवाय हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे पुन्हा पाऊस येण्याची चिन्हे होती. पण दुपारनंतर उन्हाची तीव्रता पुन्हा जाणवू लागली.

जिल्ह्यात घरांची पडझड

शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरांची पडझड झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्तकालीन कक्षाकडील उपलब्ध माहितीनुसार चंदगड तालुक्यात १२ घरांची पडझड झाली. यामध्ये १६ लाख, ६६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हातकणंगले तालुक्यात बारा घरांना पावसाचा फटका बसला असून नुकसानीचा आकडा दहा लाखावर आहे. आजरा आणि कागल येथेही घरांची पडझड झाली आहे. यामध्ये नागरिकांना हजारो रुपयांचे नुकसान सोसावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थी संघटनेला नोटीस

$
0
0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील गैरकारभारावरून कुलगुरूंच्या निवासस्थानासमोरील कार्यालयाला आज(ता.२९) टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्या १३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कुलगुरूंच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीसीद्वारे बजावले आहे. दरम्यान विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी याबाबत बोलताना सांगितले, 'विद्यापीठ प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून बेजबाबदार व चुकीची उत्तरे दिली जातात. प्रशासनाने दबावतंत्र वापरून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करु नये. सोमवारी ठरल्याप्रमाणे आंदोलन होईल. होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनावर राहील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांतील पाणीपातळीत घट

$
0
0

शेतीच्या पाणी वापरावर निर्बंध, टंचाईचे संकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील प्रमुख सात धरणांतील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजघडीला उपलब्ध पाणी कमी आहे. यामुळे शेतीसाठीच्या पाण्यावर पाटबंधारे प्रशासनाने उपसाबंदी करून निर्बंध आणले आहेत. मॉन्सूनचा पाऊस लांबल्यास शहरासह औद्योगिक प्रकल्पांनाही पाणी टंचाईची झळ बसणार आहे.

वाढत्या उष्यामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. बाष्पीभवन, शेती, पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणांतील पाणी तळ गाठत आहे. राधानगरी धरणाची एकूण क्षमता ८. ३६ टीएमसी आहे. त्यामध्ये आता केवळ २. ३८ टीएमसी पाणी शिल्लक आहे. या धरणातील पाणी पंचगंगा नदीतून शिरोळ, कर्नाटकपर्यंत जाते. सध्या या धरणातून १ हजार घनफुट प्रती सेकंद विसर्ग सुरू आहे. 'तुळशी'ची क्षमता ३.५ टीएमसी आहे. तेथे फक्त १.४५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. काळम्मावाडी धरणाची क्षमता २५.४० टीएमसी असताना तेथे ५.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या दोन्हींसह राधानगरी धरणातील पाणी पातळी घटण्याचा वेग असाच राहिला तर शहरालाही पाणी टंचाईची झळ बसणार आहे. म्हणून पाटबंधारे प्रशासन उपासाबंदी करून पाणीसाठा राखून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातूनच पंचगंगा नदीवर २७ आणि २८ एप्रिल व १२ ते १५ मे दरम्यान उपसाबंदी लागू केली आहे.

भोगावती नदीवर २९ आणि ३० एप्रिल व ८ ते ११ मेपर्यंत उपसाबंदी आहे. परिणामी शेतीच्या पाणी वापरावर मर्यादा आली आहे. दोन्ही काठावरील ऊस पीक वाळत आहे. पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यास फटका बसला आहे. पुढील कालावधीत इतर घटकांना झळ बसणार आहे. राखीव पाणीसाठ्याची पातळी खालावल्यास औद्योगिक कारखान्यांच्या पाणी कपातीचा निर्णय प्रशासनास घ्यावा लागणार आहे. दुधगंगा, कासारी, वारणा धरणातील पाणीसाठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. या धरणातून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. राजाराम, सुर्वे, रूई बंधाऱ्यातून १२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोगे, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, शिंगणापूर, बालिंगा बंधाऱ्यातून विसर्ग बंद आहे.

...............

चौकट

पाणीसाठ्यात तफावत

गेल्यावर्षी २८ एप्रिलचा आणि यंदाचा कंसातील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये धरणनिहाय असा : राधानगरी ३.३२ (२.३८) , तुळशी १.७० (१.४५), वारणा १३.०२ (६.९१), दुधगंगा ८.७३ (५.१०), कासारी १.१२(१.०६) .

...................

चौकट

...तर भीषण परिस्थिती

कोल्हापूर शहरासाठी पंचगंगा नदीवरील शिंगणापूर तर भोगावती नदीवरील बालिंगा, नागदेववाडी येथून पाणी उपसा केला जातो. उपसा केलेल्या एकूण पाण्यापैकी १३८ एमएलडी पाणी गळतीमुळे वाया जाते. दरम्यान, या दोन्ही नदीतील पाणी कमी झाल्यास शहरातही पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात ४ लाख लोकांना२२३ टँकरने पाणीपुरवठा

$
0
0

सोलापुरात ४ लाख लोकांना

२२३ टँकरने पाणीपुरवठा

सोलापूर :

सोलापूर जिल्ह्यात उन्हाच्या झळांनी एकीकडे नागरिक पुरते हैराण झाले असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईने ग्रामीण भागातील नागरिकांची झोप उडविली आहे. विहिरी, बोअर कोरडे पडल्याने पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. जनावरांच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जाताना जिल्हा प्रशासनाने जवळपास ७०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला होता. यंदाच्या उन्हाळ्यात अशी परिस्थिती नसली तरी सुद्धा आजमितीला टँकरने द्विशतक गाठले आहे. अर्थात पाणीटंचाई तीव्र जाणवत असल्याचे दिसून येते. वाड्या-वस्त्यांवरील नागरिक पाण्यासाठी वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे.

एप्रिलअखेर उन्हाच्या झळा तीव्र होत असताना टँकरच्या संख्येतही वाढ होत आहे. २६ एप्रिलअखेर जिल्ह्यातील १९८ गावे व १३०५ वाडी-वस्तीवरील ४ लाख १२ हजार ७२६ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मंगळवेढा तालुक्यात ४५ गावांना ५४ तर सांगोला तालुक्यातील ४३ गावांना ४८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पंढरपूर तालुक्यात अद्याप एकही टँकरची मागणी आली नाही. उर्वरित तालुक्यातील टँकरची संख्या पाहता मे महिन्यात टँकरची संख्या तीनशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ गावांतील ३५ हजार ९७० लोकसंख्येला १२ टँकरने, बार्शी तालुक्यातील ९ गावांतील ११ हजार ९८० लोकांना ८ टँकरने, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १३ गावांतील ५८ हजार ५०६ गावांना २२ टँकरने, अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांतील १६ हजार ८०६ लोकांना ११ टँकरने, माढा तालुक्यातील ११ गावांतील ३२ हजार ४५५ लोकसंख्येला १५ टँकरने, करमाळा तालुक्यातील ३४ गावांतील ६६ हजार ५१९ लोकांना ३४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

मोहोळ तालुक्यातील ८ गावांतील १३ हजार ९९३ लोकांना ८ टँकरने, मंगळवेढा तालुक्यातील ४५ गावे व ५१३ वाडीवस्तीवरील ८२ हजार ६९१ लोकांना ५४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सांगोला तालुक्यातील ४३ गावे व ३१८ वाडीवस्ती ६३ हजार ५४२ लोकसंख्येला ४८ टँकरने तर माळशिरस तालुक्यातील १३ गावे व १३६ वाडीवस्तीवरील ३० हजार २६४ लोकांना ११ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या मध्ये १७ शासकीय व २०६ खासगी टँकरचा समावेश आहे. याशिवाय १११ खासगी विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

टँकरच्या रोज ४७१ खेपा

उत्तर सोलापूर तालुक्यात २१, बार्शी तालुक्यात १४, दक्षिण सोलापूर तालुक्यात ४९, अक्कलकोट तालुक्यात २२, माढा ३८, करमाळा ८०, मोहोळ २६, मंगळवेढा ८८, सांगोला १०४ तर माळशिरस तालुक्यात २७ खेपा केल्या जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांसाठी सरसावली गल्ली

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

प्रत्येक कुटुंबाने घर बांधल्यानंतर एक झाड तरी लावले. कुणी छोटा बगीचाही साकारला. घराभोवतीचे वातावरण पर्यावरणपूरक ठेवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला. त्याचदरम्यान 'महाराष्ट्र टाइम्स' ने 'पक्षी वाचवा' मोहिमेतून दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत रामानंदनगरमधील तक्रार ग्रुप परिसरातील एका गल्लीने पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची भांडी ठेवण्यास सुरुवात केली. पाहता पाहता चिमण्या व इतर पक्षी, खारुताई दररोज येऊ लागल्या. दोन वर्षापासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे या गल्लीत येण्यास आता पक्ष्यांना असुरक्षित वाटत नाही.

रामानंदनगर परिसरातील तक्रार ग्रुपजवळ २५ घरांची गल्ली आहे. यामध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना पर्यावरणाबाबत चांगलीच आवड आहे. अगदी घरातील लहान मुलांकडूनही झाडांची जोपासना, त्यांना पाणी घालणे अशा प्रकारची कामे आनंदाने केली जात असतात. 'महाराष्ट्र टाइम्स' ने 'पक्षी वाचवा' मोहिमेतून नागरिकांना घराजवळ धान्य व पाणी ठेवण्याचे आवाहन चालवले आहे. त्यासाठी समाजातील दानशुरांकडून मदत घेऊन पक्ष्यांसाठी काम करणाऱ्या संस्था व नागरिकांकडे सोपवण्यात येत आहे. समर्पण फाउंडेशनशी संबंधित असलेल्या प्रीतम घाटगे व शुभांगी घाटगे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पाण्याची भांडी, धान्य व घरटी घेऊन घराजवळ ठेवले. त्यांचा हा प्रयत्न पाहून गल्लीतील नागरिकांनी, महिलांनी काम सुरू केले. प्रत्येकाच्या घराजवळ एक तरी झाड तसेच छोटी जागा असल्याने तिथे सावलीत पाण्याचे भांडे व धान्य ठेवण्यास सुरुवात केली. लहान मुले दररोज पाणी व धान्य ठेवण्याचे काम करत आहेत.

पाणी व धान्याची उपलब्धता होऊ लागल्याने तिथे पक्ष्यांची वर्दळ वाढली. दिवसभर चिमण्यांपासून अनेक छोटे पक्षी ते पोपटापर्यंत या परिसरात आरामात ये जा करत असतात. त्यांच्या किलबिलाटाने तेथील वातावरणच बदलून गेले आहे. केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर वर्षभर पक्ष्यांसाठी धान्य व पाणी ठेवले जात आहे. पक्ष्यांबरोबर खारुताईही मोठ्या प्रमाणावर येतात. तसेच उन्हाळ्यात भटक्या जनावरांसाठी गल्लीतील नागरिक पाण्याची व्यवस्था करत आहेत. मुक्या पशूपक्ष्यांना आधार देण्यासाठी सारी गल्ली एकत्रित काम करु लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिसंवाद मंगळवारी

$
0
0

कोल्हापूर: तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. ज. रा. दाभोळे यांच्या वाढदिवसानिमित्त 'जातीअंताचे तत्वज्ञान आणि व्यवहार' या विषयावर मंगळवारी (ता. ३०) परिसंवाद आयोजित केला आहे. कॉम्रेड डॉ. भारत पाटणकर अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून भंते एस. संबोधी, राजाभाऊ शिरगुप्पी, अनिल म्हमाने उपस्थित राहणार आहेत. शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पाच वाजता परिसंवादाला सुरुवात होईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवाना नूतनीकरणातून उद्योजकांची गळचेपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर महापालिकेकडून उद्योजक, व्यापाऱ्यांना परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. नूतनीकरण परवाना शुल्क वाढीसोबत विविध विभागांच्या 'ना हरकत' प्रमाणपत्रासाठी महापालिकेचा परवाना विभाग गळचेपी करत असल्याचा आरोप कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

पत्रकात म्हटले आहे, 'जीएसटी, आयकर, वाढलेले वीजदर यामुळे उद्योजक व व्यापारी अडचणीत आले असताना आता त्यामध्ये महापालिकेच्या वाढीव परवाना शुल्काची भर पडली आहे. परवाना नूतनीकरण करताना अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची सक्ती केली जात आहे. घरफाळ्यामध्ये फायर सेसची आकारणी होत असताना पुन्हा ना हरकत प्रमाणपत्रासाठी शुल्क का आकारले जाते? सर्व दिव्य पूर्ण केल्यानंतर परवाना विभागातील कामाच्या संथगतीचा फटका बसत आहे. एकाच ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने अभ्यागतांना या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरावे लागत आहे. परवाना विभागाकडे ऑनलाइन सिस्टिम नसून धनादेशही स्वीकारले जात नाहीत. तसेच दुपारी तीननंतर परवाना शुल्क स्वीकारले जात नसल्याने ३० एप्रिलपर्यंत परवाना नूतनीकरण करणे जिकिरीचे होणार आहे. त्यासाठी शुल्क जमा व नूतनीकरणासाठी एक महिन्याची मुदत द्यावी.' अशी मागणी पत्रकांद्वारे केली आहे.

पत्रकावर असोसिएशनचे अध्यक्ष अतुल आरवाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, उद्यम सोसायटीच्या अध्यक्षा संगीता नलवडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायजेरियन खेळाडू महिनाभर कोठडीत खितपत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

फुटबॉल सामन्यानंतर हुल्लडबाजांनी धुडगूस घातला. त्यानंतर काही हुल्लडबाजांवर कारवाईही झाली. या प्रकरणातील काही जणांना अटक झाली. त्यात चार खेळाडूंचा समावेश होता. इतरांची सुटका झाली असली तरी दिलबहार तालीम मंडळाने करारबद्ध केलेला नायजेरियन खेळाडू इचिबेरी यझुची इमॅन्युयल उर्फ चिमा याला गेले महिनाभर कळंबा कारागृहातील कोठडीत खितपत पडण्याची वेळ आली आहे.

पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला अशी वेगवेगळी कलमे दाखल केली आहेत. त्यामुळे त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. इचिबेरी उर्फ चिमाची सुटका व्हावी यासाठी न्यायालयीन स्तरावरही प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, स्थानिक हुल्लडबाज मोकाट आणि एका परदेशी खेळाडूला कोठडी या स्थितीबाबत आता उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

२४ मार्च रोजी चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात अंतिम सामना झाला. सामना संपल्यानंतर पंचाच्या निर्णयावरुन हुल्लडबाजांनी थेट केएसएच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. पंचांचा निर्णय अमान्य करीत त्यांच्या कक्षाकडे धाव घेत दगडफेक केली. या प्रकाराचे लोण मैदानावर आणि मैदानाबाहेर पसरले. मैदानाबाहेर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्याने २५ वाहनांचे नुकसान झाले. खेळाडू व प्रेक्षकांनाही त्याचा फटका बसला. या प्रकारात राज्य राखीव पोलिस दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करुन हुल्लडबाजीवर नियंत्रण मिळवले होते.

या प्रकारनंतरही स्पर्धेचे संयोजक आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन या दोन्ही स्तरांवरून हुल्लडबाजांकडे दुर्लक्ष करम्यात आले. त्यांनी फिर्याद न दिल्याने पोलिसच स्वत: फिर्यादी झाले. पोलिसांनी अनिकेत सावंत, स्वप्नील माने, अशिष जमदाडे, इचीबेरी यझुची इमॅन्युयल उर्फ चिमा यांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, दहशत माजवणे, सरकारी संपत्तीचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे असे गुन्हे दाखल केले. अटक केलेल्या संशयितांमध्ये फक्त इचिबेरी उर्फ चिमा हा एकमेव खेळाडू दिलबहार तालीम संघाचा आहे. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्याने इचिबेरीला जामिन मिळालेला नाही. त्यामुळे त्याची रवानगी कळंबा कारागृहात केली आहे.

इचिबेरी हा नायजेरियन नागरिक असून त्याच्या अटकेची माहिती परराष्ट्र विभागाला देण्यात आली आहे. इचिबेरीनेने हुल्लडबाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करीत पोलिसांनी त्याला प्रमुख आरोपी केले. मात्र, आजवर इचिबेरीच्या मैदानावरील वर्तनाबद्दल आक्षेप आलेला नाही. कोणत्याही सामन्यात पंचांनी त्याला 'कार्ड' दाखविलेले नाही. सामना संपल्यानंतर त्याने केलेल्या वर्तनामुळे हुल्लडबाजीला प्रोत्साहन मिळाले असल्याचा दावा पोलिसांनी केला असून त्याला प्रमुख आरोपी केले आहे. वस्तूत: इचिबेरीपेक्षा दोन्ही संघांतील अन्य खेळाडूंचे वर्तन असभ्य असताना इचिबेरीला सॉफ्ट टार्गेट करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

महिनाभर लोकसभा निवडणुकीमुळे फुटबॉलप्रेमींचे लक्ष राजकारणाकडे होते. दिलबहार संघाचे पदाधिकारी इचिबेरीवरील गंभीर गुन्हे मागे घेतले जावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत. इचिबेरीच्या बहिणीनेही जुना राजवाडा पोलिस ठाण्यात त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. नगरसेवक सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके यांनी इचिबेरीवरील गुन्हे मागे घेतले जावेत यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याकडे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, त्यांना यश मिळालेले नाही. हुल्लडबाज खेळाडू, समर्थक प्रेक्षकांमुळे नायजेरियन खेळाडूला कारागृहात खितपत पडावे लागले असून त्याचे करिअरही धोक्यात आले आहे.

या संदर्भात दिलबहार तालमीचे अध्यक्ष विनायक फाळके म्हणाले, 'हुल्लडबाजांना अटक झाली हे योग्य झाले. पण, एका परदेशी खेळाडूला अटक झाल्याने अन्य राज्यांतील, परदेशी खेळाडू कोल्हापुरात खेळायला येतील का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. इचिबेरीवरील गंभीर गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी संघ प्रयत्नशील आहे.'

तो म्हणाला, 'किल देम...'

सामना संपल्यानंतर इचिबेरीने 'किल देम, किल देम' अशा शब्दांत हुल्लडबाजांना चिथावणी दिल्याचा उल्लेख पोलिसांनी फिर्यादीत केला आहे. त्याने चिथावणी दिल्याचे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पण मैदानावर इतका गोंगाट व दंगा सुरू असताना इचिबेरीचे धमकीचे शब्द कुणी ऐकले या प्रश्नाबरोबरच वाहनांवर आणि केएमस कार्यालयावर दगडफेक करणारे, मालमत्तेचे नुकसान करणारे पोलिसांना कसे दिसले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

०००

(मूळ कॉपी)

नायजेरियन खेळाडू भोगतोय हुल्लडबाजीची शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुटबॉल सामन्यानंतर हुल्लडबाजांनी घातलेल्या धुडघुसाची शिक्षा दिलबहार तालीम मंडळाचा नायजेरियन खेळाडू इचिबेरी यझुची इमॅन्युयल उर्फ चिमा भोगत आहे. खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला अशी वेगवेगळी कलमे पोलिसांनी गुन्ह्यात दाखल केली असल्याने त्याला जामिन मिळाला नाही, त्यामुळे गेले महिनाभर त्याला कळंबा कारागृहात खितपत राहण्याची वेळ आली. चिमाची सुटका व्हावी यासाठी न्यायालयीन पातळीवर प्रयत्न झाले आहेत.

गेल्या महिन्यात २४ मार्च रोजी चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला.सामना संपल्यानंतर पंचाच्या निर्णयावरुन हुल्लडबाजांनी थेट केएसएच्या कार्यालयात पंचांच्या कक्षाकडे धाव घेत दगडफेक केली. त्याचे लोण मैदान व मैदानाबाहेर पसरले. हुल्लडबाजांनी दगडफेक केल्याने २५ वाहनांचे नुकसान झाले. खेळाडू व प्रेक्षकांनाही त्याचा फटका बसला. राज्य राखीव पोलिस दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी लाठीमार करुन जमावाला पिटाळले.

संयोजक व केएसए या दोघांनी फिर्याद देण्यास नकार न दिल्याने पोलिस स्वत: फिर्यादी झाले. पोलिसांनी अनिकेत सावंत, स्वप्नील माने, अशिष जमदाडे, इचीबेरी यझुची इमॅन्युयल उर्फ चिमा यांना पोलिसांनी अटक केली. खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, दहशत माजवणे, सरकारी संपत्तीचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. अटक केलेल्या संशयितामध्ये फक्त इचिबेरी हा एकमेव दिलबहार तालमीचा खेळाडू आहे. संशयितांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्याने इचिबेरीला जामिन मिळालेला नाही. त्यामुळे त्याची रवानगी कळंबा कारागृहात केली आहे.

इचिबेरी हा नायजेरियन नागरिक असून त्याच्या अटकेची माहिती परराष्ट्र विभागाला दिली आहे. इचिबेरी याने हुल्लडबाजीला प्रोत्साहन दिल्याने त्याला प्रमुख आरोपी करण्यात आले आहे. इचिबेरीच्या मैदानावरील वर्तनाबद्दल पंचानी कोणत्याही प्रकारचे कार्ड दाखवले नाही. पण सामना संपल्यानंतर त्याने केलेल्या वर्तनामुळे हुल्लडबाजीला प्रोत्साहन मिळाले असल्याने पोलिसांनी त्याला प्रमुख आरोपी केले आहे. इचिबेरीपेक्षा दोन्ही संघातील अन्य खेळाडूंचे वर्तन असभ्य असताना इचिबेरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

गेले महिनाभर लोकसभा निवडणूकीमुळे फुटबॉल प्रेमींचे लक्ष राजकारणाकडे होते. तर दुसरीकडे दिलबहाराचे पदाधिकारी इचिबेरीवरील गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इचिबेरीच्या बहिनीनेही जुना राजवाडा पोलिस ठाण्यात भेट देऊन सुटकेसाठी प्रयत्न केले. नगरसेवक सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके यांनी चिमावरील गंभीर गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याकडे प्रयत्न सुरु ठेवले असले तरी यश मिळालेले नाही. संघाचे समर्थक, हुल्लडबाजांच्या कृत्यामुळे नायजेरियन खेळाडूचा मुक्काम कळंबा कारागृहात वाढणार आहे. त्यामुळे त्याचे करिअर धोक्यात आले आहे.

०००००

किल देम.......

सामना संपल्यानंतर इचिबेरीने 'किल देम, किल देम' अशा शब्दात हुल्लडबाजांना चिथावणी दिल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला. त्याच्या चिथावणीचे पुरावे असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पण मैदानावर इतका गोंगाट व दंगा सुरु असताना इचिबेरीचे 'किल देम' अशी धमकी कुणी ऐकली, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या संदर्भात दिलबहार तालमीचे अध्यक्ष विनायक फाळके म्हणाले, हुल्लडबाजांना अटक झाली हे योग्य झाले. पण एका परदेशी खेळाडूला थेट अटक झाल्याने भविष्यात अन्य राज्यातील व परदेशी खेळाडू कोल्हापूरात खेळायला येणार नाहीत. इचिबेरीवरील गंभीर गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी संघ प्रयत्नशील आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पशुखाद्याची दरवाढ कमी करा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'लोकसभा निवडणुकीत उधळलेले पैसे दूध उत्पादकांच्या माथी मारण्याचे कारस्थान सुरू आहे. जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) पशुखाद्यात केलेली दरवाढ मागे घ्यावी,' अशी मागणी गोकुळ बचाव कृती समितीने केली. समितीच्या शिष्टमंडळाने गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना दरवाढ मागे घेण्याबाबत निवेदन दिले. गोकुळने पशुखाद्याच्या प्रति बॅगेस नुकतीच शंभर रुपयांची दरवाढ केली आहे. या दरवाढीने दूध उत्पादकांतून पडसाद उमटत आहेत. गोकुळ बचाव कृती समितीने दरवाढ कमी करण्यासाठी निवेदन दिले.

निवेदनात असे म्हटले आहे, कोणतेही ठोस कारण न देता लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर पशुखाद्याच्या दरात वाढ करुन संघाने सभासदांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. दूध खरेदीदरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याची घोषणा करुन दरवाढ मात्र केली नाही. संचालक मंडळाने वाहनांवर नियंत्रण ठेऊन दूध उत्पादकांना दोन रुपये जादा देण्याची आवश्यकता होती. पण संचालक मंडळ प्रचंड उधळपट्टी करत आहे. पशुखाद्य दरवाढीच्या रुपाने दरोडा घातला जात आहे. संचालक मंडळ एका कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी दूध उत्पादकांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत. पशुखाद्य, वैरण, औषधोपचार, जनावरांची निगा यासाठी होणारा खर्च व संघाकडून मिळणारा दूधाचा खरेदी दर याचा ताळमेळ बसत नसताना पशुखाद्याच्या दरात अन्यायी वाढ करुन लोकसभा निवडणुकीत उधळलेले पैसे दूध उत्पादकांच्या माथी मारण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे संघाने पशुखाद्याच्या दरात केलेली वाढ रद्द करावी. अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन करावे लागेल.'

शिष्टमंडळात गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगले, किरणसिंह पाटील, किशोर पाटील, सदाशिव चरापले, राहुल देसाई यांच्यासह समितीचे सदस्यांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडापटू संदीप लेलेयांचा मृत्यूधावपटू संदीप लेलेयांचा मृत्यू

$
0
0

धावपटू संदीप लेले

यांचा मृत्यू

सातारा :

दातांचे प्रसिद्ध डॉक्टर व उत्कृष्ठ धावपटू संदीप शिवराम लेले (वय ४८) यांचे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील तेजस डेअरी नजीक महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला.

डॉ. संदीप लेले यांना सायकलिंगची आवड होती. शनिवारी पहाटे पाच वाजता ते आपले मित्र पंकज नागोरी, तुषार लोया यांच्या समवेत भुईंज येथे सायकलिंगसाठी गेले होते. तुषार लोया लिंबखिंड येथून माघारी फिरले. तर नागोरी व डॉ. लेले भुईंजपर्यंत सायकलिंग करण्यास गेले. तेथून परत साताऱ्याला येत असताना गौरीशंकर कॉलेजनजीक असलेल्या तेजस डेअरीनजीक आले असताना त्यांच्यासोबत असलेल्या पंकज नागोरी यांना समोर बंद स्थितीत उभा असलेला ट्रक दिसला, मात्र डॉ. लेले हे मान खाली घालून सायकल चालवत असल्याने तो ट्रक त्यांना दिसला नाही. त्यामुळे त्यांच्या सायकलने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, सायकलिंग करीत असलेल्या नागोरी यांनी तातडीने मोबाइलवरुन हे वृत्त साताऱ्यात कळवले. अधिक उपचारासाठी त्यांना अॅम्ब्युलन्समधून यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र, त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्या नंतर सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर डॉ. लेले यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत ४४ टीएमसी पाणीसाठा

$
0
0

कोयनेत ४४ टीएमसी पाणीसाठा

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणामध्ये ४५ टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याने वीजनिर्मितीसह पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती करून कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग अखंडित सुरू आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातील मे महिन्यामध्ये राज्यात भारनियमन होणार नाही, तसेच सिंचन व पिण्यासाठी ही पाणी कमी पडणार नाही.

यंदा कोयना धरण ओव्हर फ्लो झाले होते. १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण गतवर्षीच्या पावसाळ्यात केवळ दोन महिन्यांत पूर्ण क्षमतेने भरले होते. पाणलोट क्षेत्रात कोसळलेल्या मुसलधार पावसामुळे धरणात तब्बल १६१ टीएमसी इतक्या पाण्याची आवक झाली होती, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दोन महिन्यांत धरणाचे सहाही वक्र दरवाजे ६१ वेळा उघडावे-बंद करावे लागल्याची ऐतिहासिक वेळ कोयना धरण व्यवस्थापन विभागावर आली.

दरम्यान, याच धरणाच्या पाण्यापासून सुमारे २१०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील ६७ टीएमसी पाण्याचा वापर पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी तर ३० टीएमसी पाण्याचा वापर पूर्वेकडील सिंचनासाठी केला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांसाठीच्या कृष्णा पाणीवाटप लवादाच्या करारानुसार प्रतीवर्षी १ जून ते ३१ मे या कालावधीसाठीचे तांत्रिक वर्ष मानले जाते. हे या राज्यांसाठीच्या पाणी वाटण लवादाच्या कराराचे तांत्रिक वर्ष असते. चालू सन २०१८-१९ या वर्षी कोयना धरणाच्या एक जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील ११ महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ संपला असून, आता केवळ महिन्याचा म्हणजे ३१ दिवस बाकी असतानाही धरणात सध्या ४५.५९ टीएमसी इतका मुबलक व समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे चालू वर्षीच्या तीव्र उन्हाळ्यातील सिंचन व विजेची गरज भागूनही आगामी नवीन तांत्रिक वर्षारंभाला येथे आवश्यक पाणीसाठा शिल्लक राहील, अशी स्थिती आहे. परिणामी या पाण्यावर अखंडित वीजनिर्मिती सुरू असून, सिंचनासाठी व पिण्यासाठी पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून पाणी सोडले जात आहे.

............

..........

प्रितीसंगमाची स्वच्छता

कराड :

कराड शहराचे ग्रामदैवत कृष्णाबाई देवीची यात्रा नुकतीच पार पडली. यात्रेत येथील प्रितीसंगमावरील कृष्णा घाट व नदीकाठी निर्माण झालेला कचरा, निर्माल्य येथील पालिका मुख्यधिकारी यशवंत डांगे यांच्यासह पालिकेतील कर्माचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबवून एकत्रित केले. कराड नागर पालिकेच्या वतीने आरोग्य विभागामार्फत स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती व्हावी म्हणून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

..........

प्रेरणा दिन साजरा

कराड :

ओंड (ता. कराड) येथे २० एप्रिल १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र मजूर पक्ष व जनता पत्राच्या सभासद नोंदणीसाठी सभा झाली होती. हा दिवस प्रेरणा दिन म्हणून ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला. या वेळी बोलताना काजल शिंदे म्हणाल्या, 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे संविधान लिहून खऱ्या अर्थाने भारताची प्रतिष्ठा जगाच्या नकाशावर उतरवली. या संविधानानुसार आपण आयुष्यात वाटचाल करून स्वत:बरोबरच देशाच्या प्रगतीला गती देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अलिशान कारविक्री थंडावली

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : महागड्या आणि अलिशान कार खरेदी करणाऱ्या कारप्रेमींचे शहर अशी कोल्हापूरची ओळख बनत होती. मात्र, नोटाबंदीनंतर कोल्हापूरकरांचे अलिशान कारप्रेम कमी झाल्याचे दिसते. आर्थिक अस्थिरता आणि महागड्या कारपेक्षा बजेटमधील कारचे पर्याय उपलब्ध झाल्याने अलिशान कारची खरेदी घटली आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापुरात केवळ ८७ अलिशान कारची विक्री होऊ शकली.

आपल्या दारात अलिशान कार उभी करावी, असे सर्वांनाच वाटते. कोल्हापूरकर यात आघाडीवर आहेत. राज्यात मुंबई आणि पुण्यानंतर वाहन खरेदीचे वेड कोल्हापूरकरांनाच आहे. यामुळे कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तब्बल १४ लाख २२ हजार वाहनांनी नोंद आहे. समृद्ध ऊसशेती, औद्योगिक विकास, वस्त्रोद्योग यामुळे एकेकाळी कोल्हापूर जिल्हा दरडोई उत्पन्नात देशात आघाडीवर होता. याचा परिणाम वाहनखरेदीतही जाणवला. जिल्ह्यात सध्या ११ लाख २५ हजार दुचाकी आहेत, तर सुमारे दीड लाख कार आहेत. गेल्या आठ-दहा वर्षात महागड्या आणि अलिशान कार खरेदीचा ट्रेण्ड वाढला होता.

अलिशान कार खरेदी करणाऱ्या कारप्रेमींचे शहर अशी कोल्हापूरची ओळख बनू पाहत होती. मात्र, नोटाबंदीपासून अलिशान कारखरेदीकडील कल कमी झाला. यानंतर आलेल्या जीएसटी करप्रणालीने अलिशान कारचे कर भरमसाठ वाढले. कार खरेदीवरील २८ टक्के जीएसटी यासह अन्य करांमुळे एकूण ४८ टक्क्यांवर कर पोहोचल्याने मोठी रक्कम करांपोटी मोजावी लागते. परिणामी २०१७-१८ या वर्षाच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षात अलिशान कार विक्री घटली. २०१७-१८ मध्ये शंभरहून अधिक कारची विक्री झाली होती. २०१८-१९ मध्ये मात्र ८७ कारची विक्री झाली. नैसर्गिक वाढीनुसार कारखरेदीची संख्या १२० वर जाणे अपेक्षित होते. नोटाबंदी, जीएसटीनंतर आलेल्या आर्थिक अस्थिरतेचा परिणाम कायम असल्याने कारखरेदी घटल्याचे सांगितले जात आहे.

अलिशान कारमध्ये मर्सिडिज, पोर्शे, रोल्स रॉयस, जग्वॉर, रेंज रोव्हर, ऑडी, बीएमडब्लू, वोल्वो असे अनेक प्रसिद्ध ब्रँड आहेत. मोठे व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू यांच्या ताफ्यात अशा अनेक कार असतात. कोल्हापुरातील हौशी कारप्रेमींकडेही यातील अनेक किमती कार आहेत. घोडावत ग्रुप, डीवायपी ग्रुप यात आघाडीवर आहेत. अन्य ग्राहकांनी मात्र किमती अलिशान कारऐवजी एसयुव्ही प्रकारातील इन्डेव्हर, क्रेटा, ब्रिझा अशा बजेटमधील कार्सना पसंती दिली आहे.

एसयूव्हीकडे ओढा

अलिशान कारमधील सर्व सुविधा एसयुव्हीमध्येही मिळत आहेत. याशिवाय एसयुव्ही कार अधिक रुबाबदार आहेत. किंमतीच्या तुलनेत अलिशान कारपेक्षा एसयूव्ही कार खरेदी करणे फायद्याचे ठरत असल्याने अलिशान कारची मागणी घटत असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना व्यत्त केले. अलिशान कार विक्रीत कोल्हापूरचा नंबर मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिकनंतर आहे.

करापोटी भरले ८५ लाख

आठ महिन्यांपूर्वी शहरातील एका बड्या उद्योगपतीने साडेपाच कोटी रुपयांची मेबैक कार खरेदी केली. या कारच्या खरेदीसाठी ८५ लाख रुपयांचा कर त्यांना भरावा लागला. अशा अनेक कार शहरातील कारप्रेमींकडे आहेत. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी, परदेशी पाहुणे आल्यानंतर अशा कारचा वापर होताना दिसतो.

देशात सर्वत्रच वाहन उद्योगात मंदी आहे. कोल्हापुरातही याचे परिणाम जाणवत आहेत. विशेषत: अलिशान कारविक्री घटल्याचे खरे असले तरी, एसयुव्ही प्रकारातील कारची मागणी वाढत आहे. येणाऱ्या काळात अलिशान कारखरेदीचा ट्रेण्ड पुन्हा वाढू शकतो.

- सुधर्म वाझे, ग्रुप हेड मार्केटिंग, युनिक ऑटोमोबाइल

कारविक्री घटल्याचा परिणाम आरटीओच्या महसुलावरही झाला आहे. किमती कारची विक्री वाढल्यास सरकारचा महसूलही वाढतो. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा किमती कारची विक्री कमी झाल्याने महसुलाची उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही.

- डॉ. एस. टी. अल्वारिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

कोल्हापुरातील अलिशान कारखरेदी

ब्रँड २०१७-१८ २०१८-१९

बीएमडब्लू १४ १०

स्कोडा २३ १९

वोलवो ९ २

ऑडी १५ ११

मर्सिडिज १५ १३

टोयाटो २८ ३२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाला भरला कचऱ्याने

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेले कर्मचारी आणि कचरा उठाव करण्यास लागलेल्या विलंबामुळे शहरातील अनेक कचरा कोंडाळे भरले असतानाच हुतात्मा पार्कजवळील नाल्यात कचऱ्याचा ढीग साचला आहे. मार्च महिन्यापासून नालेसफाईला सुरुवात केली असली, तरी या नाल्यातील कचऱ्याचा उठाव झालेला नाही. हा कचरा असाच राहिल्यास वळिवाच्या एखाद्या पावसाने सर्व कचरा पंचगंगा नदीत मिसळण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यापासून शहरातील नाले, गटर्स व मोठे चॅनेल सफाईचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची निवडणूक शाखेकडे निवड झाल्याने कचरा उठाव व नाले सफाईमध्ये शिथिलता आहे. त्याचा परिणाम शहरातील नाल्यांवर दिसू लागला आहे. अनेक नाल्यामध्ये कचरा टाकण्याबरोबरच वाहून आलेला कचरा एकाठिकाणी जमा झाला आहे. हुतात्मा पार्क येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व अन्य प्रकारचा कचरा साचून राहिला आहे. सद्य:स्थितीत वातावरणामध्ये कमालीचा उष्मा जाणवत असल्याने कोणत्याही क्षणी वळिव पाऊस पडण्याची शक्यता आहे. वळिवाने दमदार हजेरी लावल्यास पावसाच्या पाण्यामुळे हा कचरा थेट पंचगंगा नदीमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी या नाल्याची वेळीच सफाई करण्याची आवश्यकता आहे.

पावसाळ्यात जयंती नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. यामुळे नाल्यातील कचरा न काढल्यास हा कचरा नदीत मिसळून प्रदुषण होईल. यामुळे महापालिकेने तातडीने जयंतीसह इतर सर्वच नाल्यांची सफाई मोहीम राबवण्याची गरज आहे.

- चंद्रकांत कांडेकरी, अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपसमोर आव्हान मैदान तयार करण्याचे!

$
0
0


कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा जागा शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेसोबत जागावाटपात आणखी किमान तीन जागा पदरात पाडून घेणे, स्वतंत्र लढल्यास सर्वच ठिकाणी संभाव्य उमेदवार तयार करण्याचे आव्हान भाजपसमोर असेल, काँग्रेस-राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला पुन्हा कसा काबीज करणार हे पाहावे लागेल. शिवसेनेसमोर आहे त्या जागा राखण्याचे मोठे आव्हान असेल.

लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसायच्या आतच भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातूल शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांची कुरापत काढत आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी, भाजपला आपले प्राबल्य दाखविण्यासाठी आणि शिवसेनेला आहे त्या जागा राखण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खरे आव्हान असेल ते भाजपसमोर. यामुळेच शिवसेनेला आताच अंगावर घेत जागावाटपात काही जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पद्धतशीरपणे डाव टाकला असून, यासाठी ‘कोल्हापूर उत्तर’ची निवड केली आहे. सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी जुनी राजकीय खुन्नस काढण्याची तयारी सुरू झाली आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेची निवडणूक शिवसेना आणि भाजपने मोठ्या हिमतीने, एकजुटीने लढवली. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. या दोन्ही जागा राखण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना मोठी धावाधाव करावी लागली आहे. मतदारांनी ७१ टक्के मतदान करून आपली जागरूकता दाखवून दिलीच, यामुळे ही निवडणूक विद्यमान खासदारांना धडकी भरवणारी ठरली. आता लीड कितीचे मिळणार, कितीने कमी होणार, किती घासून होणार, याचा फटका कोणाला बसणार, मतदार कामाला मत देणार की, बदलाला देणार या आणि अशा चर्चांचे पीक येणे साहजिक आहे. ते आले ते निवडणुकीत आलेल्या कमालीच्या चुरशीमुळे आणि राजकीय हिशेब चुकता करण्याच्या स्थानिक राजकारण्यांच्या जिद्दीमुळे! निकाल काहीही लागले तरी याचे जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील. या स्थितीत राष्ट्रवादीचे खासदार महाडिक यांना विरोध म्हणून याच पक्षातील आमदार मुश्रीफ गटाने दत्तक घ्यायची तयारी दाखवलेले आणि उमेदवारीसाठी पायघड्या घातलेले शिवसेनेचे संजय मंडलिक यांना तेथून बाहेर काढून शिवसेनेच्या उमेदवारीवर रिंगणात उभे करण्यात, तुल्यबळ लढतीसाठी तयार करण्यात, कार्यकर्त्यांत जिंकण्याची मनोवृत्ती तयार करण्यात आणि जिल्ह्यात तयार झालेल्या राजकीय तिरस्काराच्या हवेवर स्वार होताना नवे डावपेच टाकण्यात शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी मोठाच संयम, राजकीय चातुर्य, चलाखी दाखवली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार महाडिक यांनी जिल्हा परिषद, महापालिका राजकारणाच्या निमित्ताने निर्माण झालेले सख्य जाणीवपूर्वक बाजूला ठेवले.

भाजपने सेनेबरोबर युती न झाल्यास मंत्री पाटील, म्हाडा (पुणे)चे चेअरमन समरजित घाटगे किंवा आमदार हाळवणकर यांना मैदानात उतरविण्याची तयारी ठेवली होती. मात्र, राज्यात तुटेपर्यंत न ताणता शेवटच्या क्षणी युती झाल्याने भाजपच्या नेत्यांची सुटका झाली. शिवसेनेची ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी मंत्री पाटील यांनी स्वत:कडे घेतली. देशभरात केंद्रातील भाजप आघाडी अडचणीत आली तर एक अन् एक जागा महत्त्वाची ठरणार असल्याने कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सोलापूरच्या जागेसाठी जोरदार तयारी केली गेली. यातच शिवसेनेच्या स्थानिक आमदार आणि नेत्यांशी जुळवून घेत रणनीती ठरवली गेली. लोकसभेचे लळीत संपल्याने आणि खरे राजकारण, आव्हान तोंडावर असल्याने होऊन गेलेल्या निवडणुकीच्या प्रतिमारंजनात न रमता, निकाल काय लागायचा तो लागो, हे सत्य स्वीकारत भाजपने आता पुढचा डाव टाकला आहे.

भाजपसमोर त्यांच्याकडील दोन आणि राष्ट्रवादीकडील दोन अशा चार जागांशिवाय विधानसभेसाठी फारसे मोकळे मैदान नाही. इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिणची जागा राखण्यास विद्यमान परिस्थितीत दुय्यम महत्त्व देत भाजपने आता हे मैदान तयार करण्यास सुरुवात केली आहे. ते करताना ज्या शिवसेनेला सोबत घेत लोकसभेच्या मैदानात विरोधकांना घाम फोडला त्याच शिवसेनेला डिवचण्याशिवाय भाजपसमोर पर्याय दिसत नाही. जिल्ह्यातील दहापैकी सहा जागा शिवसेनेच्या ताब्यात असल्याने तेथे डावपेच टाकल्याशिवाय भाजपला हाती भरीव असे काही लागणार नाही. यामुळेच पहिला डाव ‘उत्तर’मध्ये टाकत हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात भाजपचा चांगला बेस तयार झाल्याचा दावा केला जातो. नगरपालिका, जिल्हा परिषदेने ते स्पष्टही केले आहे. या स्थितीत पक्षाने केवळ दोनच जागांवर कसे लढायचे? असा या पक्षाच्या नेत्यांना पडलेला प्रश्न असावा. लोकसभा निवडणुका लागण्याआधी सर्वच्या सर्व दहा जागा जिंकायचा निर्धार मंत्री पाटील यांनी जाहीर सभांतून सोडला होता, हे विसरता येणार नाही. उद्या उत्तरबरोबरच कागल, चंदगडसह राधानगरी, हातकणंगले आणि शिरोळवर जागावाटपात भाजपने दावा सांगितला तर नवल वाटायला नको.

काँग्रेसचा एक प्रबळ गट आमदार सतेज पाटील यांच्यानिमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात उघडपणे होता. तो शिवसेनेसोबत असल्याने विधानसभेला या गटाच्या भूमिकेला महत्त्व येणार आहे. जिल्ह्यातील किमान सहा जागांवरील उमेदवार निवडून आणण्यात किंवा पाडण्यात सतेज पाटील गटाचे राजकीय धोरण महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसच्या राजकारणात पक्षाचे काम करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. तरीही लोकसभेला शिवसेनेसोबत हातात हात घालून काम केले, ते यावेळी उत्तरमध्ये काय करणार हेही पाहावे लागेल. गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपकडून मोठा दणका बसूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोणता धडा घेतला, हा प्रश्नच आहे. शिरोळ, इचलकरंजी, कागल, राधानगरी, चंदगड वगळता अन्य पाच ठिकाणी राजकीय आघाडीवर शांतताच आहे. त्यातही काँग्रेसचे नेते यावेळी तरी स्वत:चेच सावरणार की पक्षासाठी लढणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार हनुमंत डोळस यांच्यावर उपचार सुरू

$
0
0

सोलापूर :

माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून २०१४ साली हनुमंत डोळस यांना उमेदवारी देण्यात आली होती. माळशिरस मतदारसंघ राखीव असून, त्या मतदारसंघातून डोळस राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. कृपया काहीही अफवा पसरवू नका, अशी विनंती त्यांचे चिरंजीव संकल्प डोळस यांनी केली आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस मतदारसंघातून आमदार डोळस २००९ आणि २०१४मध्ये आमदार झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाला भरला कचऱ्याने

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेले कर्मचारी आणि कचरा उठाव करण्यास लागलेल्या विलंबामुळे शहरातील अनेक कचरा कोंडाळे भरले असतानाच हुतात्मा पार्कजवळील नाल्यात कचऱ्याचा ढीग साचला आहे. मार्च महिन्यापासून नालेसफाईला सुरुवात केली असली, तरी या नाल्यातील कचऱ्याचा उठाव झालेला नाही. हा कचरा असाच राहिल्यास वळिवाच्या एखाद्या पावसाने सर्व कचरा पंचगंगा नदीत मिसळण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यापासून शहरातील नाले, गटर्स व मोठे चॅनेल सफाईचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची निवडणूक शाखेकडे निवड झाल्याने कचरा उठाव व नाले सफाईमध्ये शिथिलता आहे. त्याचा परिणाम शहरातील नाल्यांवर दिसू लागला आहे. अनेक नाल्यामध्ये कचरा टाकण्याबरोबरच वाहून आलेला कचरा एकाठिकाणी जमा झाला आहे. हुतात्मा पार्क येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व अन्य प्रकारचा कचरा साचून राहिला आहे. सद्य:स्थितीत वातावरणामध्ये कमालीचा उष्मा जाणवत असल्याने कोणत्याही क्षणी वळिव पाऊस पडण्याची शक्यता आहे. वळिवाने दमदार हजेरी लावल्यास पावसाच्या पाण्यामुळे हा कचरा थेट पंचगंगा नदीमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी या नाल्याची वेळीच सफाई करण्याची आवश्यकता आहे.

पावसाळ्यात जयंती नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. यामुळे नाल्यातील कचरा न काढल्यास हा कचरा नदीत मिसळून प्रदुषण होईल. यामुळे महापालिकेने तातडीने जयंतीसह इतर सर्वच नाल्यांची सफाई मोहीम राबवण्याची गरज आहे.

- चंद्रकांत कांडेकरी, अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार आज सोलापुरात दुष्‍काळाची पहाणी करणार

$
0
0

शरद पवार आज सोलापुरात दुष्‍काळाची पहाणी करणार

सोलापूर :

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आज (मंगळवारी) सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पहाणी करण्यासाठी येणार आहेत. सांगोला तालुक्‍यात त्यांच्या दौऱ्याचे आयोजन केल्‍याची माहिती राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी दिली आहे.

सकाळी साडेअकरा ते एक दरम्यान अजनाळे येथे दुष्‍काळाने जळालेल्‍या फळबागा, कोरडी पडलेली शेत‍तळी पाहणी व शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. दुपारी तीन वाजता वाटंबरे येथील राजमाता अहिल्‍यादेवी होळकर बहुउददेशीय प्रशिक्षण संस्‍थे अंतर्गत सुरू असलेल्‍या चारा छावणीस भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्‍यानंतर दुपारी चार ते सायंकाळी सहा दरम्‍यान मंगळवेढा तालुक्‍यातील शिरसी व खुपसिंगी या दुष्‍काळी भागाला भेटी देणार आहेत. रात्री साडेसात वाजता राष्‍ट्रवादी भवन, रामलाल चौक सोलापूर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

शित्तूरपैकी गुजरवाडी (ता. शाहूवाडी) येथे बेकायदा जमाव जमवून घरासमोर फटाके वाजविण्याच्या कारणातून झालेल्या वादात पतीस मारहाण व दगडफेक करून घराची मोडतोड केल्याप्रकरणी पोलिसांनी जमावाविरुद्ध गन्हे नोंदविले आहेत. याबाबत सोनाबाई हैबती तळेकर यांनी शाहूवाडी पोलिसांत फिर्याद दिली. श्रीकांत दत्तात्रय तळेकर, विठ्ठल गोपाळ तळेकर, अक्षय विठ्ठल तळेकर, दत्तात्रय गोपाळ तळेकर, आनंदा गोपाळ तळेकर, बाबासो आनंदा तळेकर (सर्व रा. शित्तूर पैकी गुजरवाडी, ता. शाहूवाडी) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.

रविवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या घटनेचा जाब विचारायला गेलेल्या फिर्यादीच्या दत्तक दिरास, 'तू कोण विचारणार.. तुझा काय संबंध' असे म्हणून संशयित आरोपींनी काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार रघुनाथ रामचंद्र तळप (रा. शित्तूर पैकी तळपवाडी) यांनी शाहूवाडी पोलिसांत दिली. या तक्रारीनुसार वसंत गणपती तळेकर, श्रीकांत दत्तात्रय तळेकर, बाबासाहेब आनंदा तळेकर (सर्व रा. शित्तूर पैकी गुजरवाडी, ता. शाहूवाडी), शारदा रामचंद्र चव्हाण (रा. शित्तूर तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी), शालाबाई शिवाजी पाटील (रा. परखंदळे, ता. शाहूवाडी) या संशयितांवर शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघात १० लाखांचा अपहार

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर: शेतकरी संघाच्या शिरोळ शाखेतील ३७ लाखांच्या अपहाराच्या प्रकरणानंतर करवीर तालुक्यातील म्हारुळ आणि पन्हाळा तालुक्यातील पडळ शाखेत कर्मचाऱ्यांनी दहा लाखांचा अपहाराची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी म्हारुळ शाखेचा व्यवस्थापक गजानन भीमराव देसाई आणि पडळ शाखेचा कर्मचारी सर्जेराव धोंडिराम खोत यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दिले आहेत.

शिरोळ तालुक्यातील अपहाराच्या घटनेनंतर शेतकरी संघाच्या ऑडिट विभागाने जिल्ह्यातील सर्व शाखांची तपासणी केली असता म्हारुळ आणि पडळ शाखेत गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. म्हारुळ शाखेचा व्यवस्थापक गजानन देसाई याने एक एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ मधील कालावधीत १३ बोगस व्यक्तींच्या नावावर माल विक्री करून चार लाख २७ हजार, ६७५ रुपयांचा अपहार केला. तसेच कोठाराचे भाडे भैरवनाथ संस्थेला दिल्याचे दाखवून ८१ हजार, ७७२ रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. देसाई याने पाच लाख नऊ हजार ४४७ रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब ऑडिटमध्ये निदर्शनास आली.

पडळ शाखेची तपासणी केली असता सर्जेराव खोत याने बोगस व्यक्तींना खत विक्री करून अपहार केला आहे. त्याने किर्दीमध्ये खाडाखोड केली आहे. बोगस नावावर खत विक्री केल्याचे दाखवून खोत याने चार लाख ९७ हजार ४० रुपये ७० पैशाचा गैरव्यवहार केल्याचे सिद्ध झाले आहे.

गैरव्यवहारातील रक्कम भरण्यासाठी देसाईव खोत यांना संघाच्या प्रशासनाने नोटीस पाठवली होती. पण त्यांनी रक्कम भरण्यास नकार दिल्याने प्रशासनाने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संघाने नियुक्त केलेल्या चार्टंड अकाउटंट डी. ए. चौगुले अॅन्ड असोसिएटने जिल्हा उपनिबंधकाकडे गुन्हा नोंदवण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यासाठी अपहाराचे पुरावे जोडण्यात आले होते. पुराव्यात तथ्थ आढळल्याने देसाई व खोत यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शेतकरी संघाच्या प्रशासनाला दिले आहेत.

शिरोळवरील कारवाई संथ

शिरोळ अपहारानंतर म्हारुळ आणि पडळ मधील अपहाराची घटना म्हारुळ व पडळमधील अपहारप्रकरणी कारवाईसाठी ताबडतोब पावले उचलण्यात आली पण शिरोळमधील ३७ लाखांच्या अपहाराप्रकरणी संशयितांवर कारवाई करण्यास गेले चार महिने संघ प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. जिल्हा सरकारी वकिलांकडून अभिप्राय आल्यानंतर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. म्हारुळ, पडळ प्रमाणेच शिरोळमधील संशयितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून पुढे येऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाचणीच्या मैदानात अमित कारंडे विजयी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

बाचणी (ता. करवीर) येथील ग्रामदैवत जोतिर्लिग चैत्र उत्सव, हनुमान जयंती व दाविद मल्लिक उरुसानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी अमित कारंडे (सावर्डे दुमाला) विरुद्ध रावसाहेब टिळे (शाहूपुरी) यांच्यात झाली. अटीतटीच्या लढतीत शेवटी गुणावर पंचांनी अमित कारंडे याला विजयी घोषित केले.

वस्ताद रंगराव कळंत्रे यांच्या हस्ते आखाडापूजन झाले. प्रथम क्रमांकासाठी अमित विरुद्ध रावसाहेब यांच्यात खम ठोकून खडाखडी झाली. सुरुवातीला अमितने रावसाहेबला हफ्ता भरत खाली खेचून ताबा घेतला. त्यातून रावसाहेबने सुटका करून घेतली. पुन्हा खडाखडी झाली. दोघांनी एकमेकांवर आक्रमक चाल करण्यास सुरुवात केली. पण, कोणालाच यश येत नव्हते. १८ व्या मिनिटांनंतर पंचांनी २ मिनिटांची वेळ दिली. त्यातही निकाल लागला नाही. अखेर पंचांनी गुणांवर अमित विजयी घोषित केले.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत हृषीकेश पाटील (गंगावेश ) विरुद्ध रणवीर पाटील ( मोतीबाग) यांच्या लढतीला प्रारंभ झाला. अवघ्या ३० सेंकदात रणवीरने हफ्ता डावावर हृषीकेशला आस्मान दाखवले. तृतीय क्रमांकासाठी शाहरुख मुल्लाणी (कोगे) विरुद्ध काका टोंगे (शाहूपुरी) यांच्यात तुल्यबळ अशी लढत झाली. ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गोपाळराव पाटील, माजी उपसरपंच सर्जेराव कळंत्रे , शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पै. संभाजी वरुटे, राजीवजी सूतगिरणीचे व्हा. चेअरमन व माजी सभापती पांडुरंग पाटील, मारुती पाटील, सर्जेराव पाटील, नामदेव पाडेकर आदी उपस्थित होते. पंच म्हणून सुभाष पाडेकर, कृष्णात पाटील, वसंत लांडगे, नाना पाटील, नितीन पाटील, संजय पाटील यांनी काम पाहिले. पंच म्हणून यशवंत पाटील व प्रा. पवन पाटील यांनी काम पाहिले.

विजयी मल्ल : नचिकेत पाटील (हळदी), आकाश चिंदगे (सडोली खालसा), राजवीर पाटील (महे), विनायक पाटील, सौरभ पाटील (हळदी), स्वप्नील जाधव,स्वप्नील पोवार, प्रकाश पाटील (कुंभी), प्रवीण पाटील (चाफोडी), परशुराम नंदीवाले (कोपार्डे), किरण पाटील , पार्थ कळंत्रे, सिद्धेश बचाटे, वैभव यादव (शिरोली दुमाला), विजय पुजारी, ओंकार कुंभार (म्हारुळ), सनी अस्वले, संकेत गायकवाड व इतर.

फोटो : बाचणी (ता. करवीर) येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीला प्रारंभ करताना वस्ताद रंगराव कळंत्रे. यावेळी गोपाळराव पाटील, संभाजी वरुटे, पांडुरंग पाटील, रंगराव पाडेकर, सर्जेराव कळंत्रे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images