Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पर्यटकांना कोकणची साद

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम सुट्ट्या सुरू होताच अनेक घरात पर्यटनाचे बेत आखले जातात. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटकांसाठी कोकण हे नेहमीच सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन असते. आंबा, फणस, करवंद, जांभूळ अशा कोकणच्या मेव्यासह समुद्रकिनारी साहसी खेळांची मजा लुटता येते. त्यामुळे अलिकडच्या काळात कोकणची सहल विशेष ठरते. समुद्राची ओढ सगळ्यांनाच असते. उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेले निळेशार पाणी, किनाऱ्यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग यामुळे कोकणात अगदी फॉरेन टूरचा फील येतो. यातच कोकणातील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे भर उन्हातही कोकण हवाहवासा वाटतो. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबईपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेल्या या किनाऱ्यावर पर्यटकांना खिळवून ठेवणारी अनेक ठिकाणे आहेत. कोल्हापूरपासून ज‌वळ असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे म्हणजे तळकोकण आहे. गडकिल्ले, धार्मिक स्थळे, सागरी किनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात. धार्मिक पर्यटन करणाऱ्यांसाठी गणपतीपुळे, कुणकेश्वर मंदिर, सागरेश्वर मंदिर, परशुराम मंदिर असे अनेक पर्याय आहेत. गणपतीपुळे येथे राहण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे. गडकिल्ले पाहणाऱ्यांसाठी सिंधुदुर्ग, जयगड, रत्नदुर्ग हे किल्ले साद घालतात, तर समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करणाऱ्या पर्यटकांसाठी तारकर्ली, तोंडवली, चिवला, वेंगुर्ला, गणपतीपुळे, मालवण असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वाढत्या उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणांचाही पर्याय आहे. आंबोली येथील एक दिवसाची सहल पर्यटकांना थंडाव्याचा अनुभव देते. याशिवाय सर्वच गावांमधील मंदिरे, जुनी घरे, छोट्या वाड्या हे सारेच पाहण्यासारखे असते. कोल्हापुरातून कोकणात जाताजाता राधानगरीचे धरण, दाजीपूरचे अभयारण्यही पाहता येते. कोकण म्हंटले की खाण्यापिण्याची चंगळच असते. सध्या तर आंबा, फणस, करवंदे, जांभूळ यांचा हंगामच सुरू आहे. रस्त्याकडेलाही विक्रेते आपले दुकान मांडून बसले आहेत. कोकणच्या मेव्याचा मनसोक्त आनंद घेता येतो. बहुतांश पर्यटक कोकणात जाऊन माशांवर यथेच्छ ताव मारतात. समुद्रकिनारी होणाऱ्या लिलावात स्वत: ताजी मासळी खरेदी करून त्याचा आस्वाद घेता येतो. घरगुती पद्धतीचे मासे तयार करून देणारी घरे समुद्र किनारी आहेत. याशिवाय खास कोकणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक हॉटेल्स पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. कोकणची मिठाईदेखील चविष्ट आणि खास कोकणी पद्धतीची असते. आंबा पोळी, आंबा बर्फी, काजू बर्फी, गूळशेव, तांदळाचे मोदक, जांभूळ, फणस, करवंदाच्या फ्लेवरमधील चॉकलेट्स असे अनेक पदार्थ खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवतात. साहसी खेळांचे आकर्षण साहसवीरांसाठी मालवणच्या समुद्रकिनारी वॉटर स्पोर्टस् उपलब्ध आहेत. मोटरबोटिंग, स्कुबा डायव्हिंग यासह पॅराशूटचीही मजा लुटता येते. खोल पाण्यात जाऊन समुद्रातील जलचरही पाहता येतात. मालवणपासून तारकर्ली, देवबागपर्यंतचा सुमारे १२ किलोमीटर अंतराचा समुद्रकिनारा साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. या आकर्षक किनारपट्टीवर तंबुनिवासाचीही सोय आहे. सुट्ट्या सुरू होताच कोकणातील पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परदेशातील स्वच्छ आणि सुंदर बीचप्रमाणे कोकणातही अनेक आकर्षक बीच आहेत. इथे समुद्रात जलक्रीडा करण्यासह खाण्यासाठीही अनेक पर्याय आहेत. खास कोकणी पद्धतीचा पाहुणचार घेण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. - संतोष पारकर, हॉटेल व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलगुरूंविरोधात सुटा रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यापीठाचा गैरकारभार, सदोष प्रमाणपत्रांमुळे झालेले आर्थिक नुकसान, नियमबाह्य नेमणूकप्रक्रिया यांसह १२९ प्रमादांसाठी कोणतेही स्पष्टीकरण देत नसलेल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना पदावरून हटवावे, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) शुक्रवारी भर उन्हात आंदोलन करण्यात आले. दसरा चौकात दुपारी जनजागरण धरणे आंदोलन करत प्राध्यापक संघटनांसह विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले, तसेच कुलपती सी. विद्यासागर राव यांना निवेदनाची प्रत पाठवण्यात आली.

कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सुटातर्फे १६ एप्रिलपासून विविध मार्गाने आंदोलन सुरू आहे. डॉ. शिंदे यांच्या बेकायदेशीर कारभाराचे १२९ पुरावे उघड केल्याचा दावा सुटाने केला आहे. या बाबी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करत सुटातर्फे 'कुलगुरू हटाओ' मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत शुक्रवारी 'सुटा'तर्फे दसरा चौकात जनजागरण धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कुलगुरू सतत दौऱ्यावर असल्याने विद्यापीठाच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठाचे मानांकनात घसरण झाली आहे. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सदोष पदवी प्रमाणपत्रांमुळे आर्थिक नुकसान झाले, त्यानंतर दिलेल्या प्रमाणपत्रांचा दर्जा अयोग्य होता. यासाठी चौकशी समितीने कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले आहे. समितीचा अहवालही खुला केलेला नाही. होस्टेलमध्ये मिळणारे निकृष्ट जेवण, असुविधा, विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या स्थापनेकडे होणारे दुर्लक्ष, असुविधा असलेल्या महाविद्यालयांना नूतनीकरणासाठी परस्पर मंजुरी देणे असे गैरकारभार विद्यापीठात सुरू आहेत. देशपांडे समितीने, विद्यापीठातील नियमबाह्य नेमणुकांबाबत दिलेल्या अहवालातील शिफारसीनुसार अद्याप कुलगुरूंनी कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रक्रियेतून नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आजपर्यंत ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कुलगुरूंना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी विद्यार्थी संघटना, पालक संघटना, कामगार व शिक्षक संघटना आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिष्टमंडळात सुटाचे अध्यक्ष डॉ. आर. एच. पाटील, कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील, उपाध्यक्ष डॉ. अरुण पाटील, प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्रा. ए. बी. पाटील, डॉ. आर. के चव्हाण यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उष्णतेमुळे सोलापूरच्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

$
0
0

उष्णतेमुळे सोलापूरच्या

बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

सोलापूरः सोलापुरात मंगळवारी ४४.३ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. सूर्यनारायण आग ओकू लागल्याने सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. या कडक उन्हाने अबालवृद्धांची पुरती दमछाक झाल्याचे दिसून येत आहे. सिमेंटच्या घरातील लोक तर हैराण आहेत. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या लोकांची तर झोपच उडाली आहे. उन्हाच्या झळांनी सोलापूरकर घराबाहेर बसने पसंत करीत आहेत. रस्त्यावर सामसूम असून, लग्न सराई असतानासुद्धा बाजारपेठामध्ये शुकशुकाट आहे. स्लॅब आणि पत्रेसुद्धा कमालीचे गरम होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकांचे गावझाले दोन वर्षांचे

$
0
0

पुस्तकांचे गाव

झाले दोन वर्षांचे

सातारा

पुस्तकांचे गाव भिलार, या अभिनव प्रकल्पास शनिवारी ०४ मे, २०१९ रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भिलार येथे विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक, डॉ. आनंद काटीकर यांनी दिली. या निमित्ताने 'पुस्तक जाणून घेऊ या' ही पुस्तकांविषयीचे सर्वांगिण मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आणि कौशल इनामदार यांचा 'अमृताचा वसा' हा साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम भिलारमध्ये आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. काटीकर यांनी दिली.

पुस्तकांचे गाव भिलार येथे शनिवारी, ४ मे रोजी दुपारी तीन वाजता गावातील हनुमान मंदिराजवळील कै. भि. दा. भिलारे गुरुजी सभागृहात 'पुस्तक जाणून घेऊ या' ही कार्यशाळा होत आहे. बदलापूर येथील ग्रंथसखा भाषासंवर्धक श्याम जोशी या कार्यशाळेत पुस्तकांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ, आयएसबीएन क्रमांक, प्रकाशन पृष्ठ, दुर्मिळ पुस्तकांचे संशोधन, संदर्भ ग्रंथांचे वाचन, पुस्तकांची बांधणी, विविध ऋतूंमध्ये पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, पुस्तक निर्मितीत सहभागी होणाऱ्या सर्व घटकांचे कष्ट इ. पुस्तकाशी जोडलेल्या विविध मुद्द्यांबाबत या कार्यशाळेत रसिकांचे लक्ष वेधले जाणार आहे. ग्रंथपालांसाठी आणि पुस्तक प्रेमींसाठीही अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या ह्या कार्यशाळेसाठी राज्याच्या ग्रंथालय संचालनालयानेही विविध ग्रंथालयांना उपस्थित राहण्यासंबंधी आवाहन केले आहे. या कार्यशाळेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसून, पूर्व नोंदणी मात्र आवश्यक आहे. पूर्व नोंदणीसाठी ०२१६८-२५०१११ व ९५४५१२६००७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडधान्याच्या दरात वाढ

$
0
0

बाजारभाव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढला असताना बाजारपेठेतही कडधान्यांच्या दरात वाढ झाली आहे. मटकी, हरभरा डाळ, तूरडाळ, वेलदोडे महाग झाले आहेत. कडधान्यांच्या दरातील वाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

मटकीच्या दरात पंधरा दिवसांत प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिकिलो १०० रुपये असलेल्या मटकीचा दर १२० रुपयांवर पोहोचला आहे. तूरडाळ व हरभरा डाळीच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. तूरडाळ प्रतिकिलो ८४ वरून ८८ रुपयांवर, तर हरभरा डाळ ६४ वरून ६८ रुपयांपर्यंत गेली आहे. अवेळी झालेला पाऊस व दुष्काळामुळे कडधान्याचे उत्पादन कमी झाल्याने दर वाढल्याचे किराणा दुकानदारांनी सांगितले. वेलदोड्याच्या दरात प्रतिकिलो २०० रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ यापुढे कायम राहील, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकात वेलदोड्याचे उत्पादन कमी झाल्याने दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गहू, ज्वारी, साखर, शेंगदाणे व खाद्यतेलाचे दर स्थिर आहेत.

०००

किराणा दर (प्रतिकलो रु.)

पोहे : ४४

साखर : ३६

शेंगदाणा : ९० ते १००

मैदा : ३२

आटा : ३२ ते ३५

रवा : ३२

गूळ : ४० ते ५०

साबुदाणा : ६८ ते ७२

वरी : ७५ ते ८०

००००

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ८८

मूगडाळ : ८४ ते ८८

उडीदडाळ : ६८ ते ७२

हरभराडाळ : ६८

मसूरडाळ : ६० ते ६४

०००

कडधान्ये (प्रतिकिलो रु.)

मसूर : ८० ते १२०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९६

काळा वाटाणा : ६४

मूग ८०

मटकी : ८० ते १२०

छोले : ८० ते १००

००००

ज्वारी दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ३२ ते ५०

गहू : २६ ते ३२

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : २४

नाचणी : ४०

००००

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १२५

सरकी तेल : ८६

खोबरेल : २४० ते २२०

सूर्यफूल : ९० ते १०५

०००

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १८०

जिरे : २४०

खसखस : ८००

खोबरे : १९० ते २००

वेलदोडे : २४००

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावड्यात दूषित पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

आधीच उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले असताना कसबा बावडा येथील आंबे गल्ली व आंबेडकर वसाहतीत काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

आंबे गल्लीला पाणीपुरवठा करणारा व्हॉल्व्ह हनुमान मंदिर येथे आहे. तो अत्यंत जुने झाला असून तो रस्त्याच्या खाली आहे. त्यामुळे तेथे सतत पाणी साचून राहते. व्हॉल्व्हच्या खड्यामध्ये तेथील झाडांची पाने आजूबाजूचा कचरा पडतो. त्यामुळे तेथील खराब झालेले पाणी त्या व्हॉल्व्हमध्येच मिसळते. तेथून हे पाणी नळाद्वारे नागरिकांना मिळते. या परिसरात जुन्या सिमेंटच्या पाइप असल्याने त्यातून पाणी मिसळत असावे. आंबेडकर नगरातील गल्ली क्रमांक एकमध्ये काही घरांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. येथील पाइपलाइनमुळेच दूषित पाणीपुरवठा होत आहे. या भागात वरचेवर पाण्याचा टँकर आणून पाइपलाइनमध्ये मोठ्या दाबाने पाणी सोडून पाइपलाइनची सफाई करावी लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने तत्परतेने येथे लक्ष घालून नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावे अशी मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांवर हल्ला; चौघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी परिसरातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून १२ एप्रिलपासून फरारी झालेल्या चौघांना राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने शनिवारी अटक केली. त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना १० मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. लतिफ मेहबूब गवंडी (वय ४२, रा. विद्यानगर चिकोडी), शब्बीर मेहबूब गवंडी (३८), तौफिक यासीन शेख (२६, रा. शाहूपुरी), आलिम सादिक सय्यद (१९ रा. बालगोपाल तालमीजवळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. रोहित सुधीर मिराशी (३९ रा. संभाजीनगर) यांनी तक्रार दाखल केली होती.

राजारामपुरी पोलिसांनी सांगितले की, डॉ. मिराशी हे राजारामपुरी येथील एका हॉस्टिपलमध्ये काम करतात. तनवीर लतिफ गवंडी (रा. चिकोडी) यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य उपचार केले नसल्याच्या रागातून गवंडी यांचा मृत्यू झाला, असे समजून संशयित चौघांनी डॉ. मिराशी आणि वॉर्डबॉयला शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी मिराशी यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. हॉस्टिपटलमधील सीसीटीव्ही फुटेज पाहून संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर चौघा संशयितांना अटक करुन शनिवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र कोर्टाने त्यांना १० मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकती सर्वेक्षण अंतिम टप्प्यात

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शहरातील सर्व मिळकतींचा कररचनेत समावेश करुन उत्पन्नवाढीसाठी गेल्या चार वर्षापासून सायबर टेक कंपनीकडून मिळकतींचे सर्वेक्षण सुरू आहे. चार वॉर्डमधील पूर्ण तर 'ई' वॉर्डमधील ७५ टक्के सर्वेक्षण कंपनीने केले आहे. सर्वेक्षणातून नव्या मिळकती समोर आल्या असताना महापालिकेला भविष्यात उपयोगी ठरेल असा विविध प्रकारचा अमूल्य डाटा संकलीत करण्यात आला आहे. त्यामध्ये रेनवॉटर हॉर्वेस्टिंग, सोलर सिस्टिम, मोबाइल टॉवर्स, बायोगॅस, इमारतींवरील जाहिराती यांसह महापालिकेकडून मिळणाऱ्या सुविधांचाही यात समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व्हे पूर्ण होईल असे सूत्रांनी सांगितले.

राज्य सरकारने एलबीटी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला. महापालिकेच्या उत्पन्नवाढीचा भाग म्हणून २०१५ पासून सर्व मिळकतींना घरफाळा लागू करण्यासाठी सर्व्हे करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी सायबरटेक कंपनीला सर्व्हेचे काम देण्यात आले. कंपनीने निर्धारित मुदतीत काम पूर्ण केले नसले, तरी चार वर्षाच्या कालावधीत जीआयएस (ग्लोबल इन्फर्मेशन सिस्टिम) पद्धतीने ए., बी., सी., डी. या वॉर्डांमधील सर्वेक्षण पूर्ण केले. 'ई' वॉर्डामधील ७५ टक्के काम झाले आहे. सर्व्हे पूर्ण झालेल्या भागांतून ८,६२७ नव्या मिळकतींचा शोध घेण्यास कंपनीला यश आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल.

घरफाळा लागू करण्यासाठी सुरू केलेल्या सर्व्हेमध्ये मिळकतींचे छायाचित्र, प्रॉपर्टी कार्डसंबंधी कागदपत्रे, मिळकतदारांचे ओळखपत्र आदींचे स्कॅनिंग केले आहे. त्याचबरोबर प्रशासनाला उपयोगी ठरेल अशी अन्य प्रकारची माहिती संकलीत केली आहे. त्यामध्ये रेनवॉटर हॉर्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापनासाठी बायोगॅस, सोलर सिस्टिम, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, इमारतीवर जाहिराती प्रसिद्ध होतात का?, विद्युत जोडणी, इमारतींवरील मोबाइल टॉवर, बोअरवेल, मनपाची पाणीपुरवठा सुविधा, ड्रेनेज लाइनला सेफ्टी टँक जोडला आहे का?, शहरवासीयांनी मोबाइल अथवा ई मेल आयडी दिल्यास त्याचीही नोंद घेतली आहे. नव्या स्वरुपात संकलीत केलेल्या नोंदी प्रशासनाला भविष्यात उपाययोजनासाठी साह्यभूत ठरतील.

सर्व्हेदरम्यान अनेक मिळकतींवर अनधिकृतपणे मोबाइल टॉवर व जाहिरात फलक असल्याचे आढळून आले आहे. अशा मिळकतींची माहिती इस्टेट विभागाला देण्यात येणार असून टॉवर, जाहिरात फलकांसाठीचे शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे घरफाळा वाढीसाठी केलेला सर्व्हे महापालिकेच्या इतर विभागांच्या उत्पन्नवाढीसाठीही फायदेशीर ठरणार आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व्हे पूर्ण होण्याची शक्यता आहे. निर्धारित वेळेत सर्व्हे पू्र्ण झाल्यास नव्या आर्थिक वर्षामध्ये त्याचा उत्पन्नवाढीवर चांगलाच परिणाम दिसून येईल, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

माहितीचे संकलन

शहरातील सर्व मिळकतींना घरफाळा लागू करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून सायबरटेक कंपनीकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. कंपनीच्या कामाबाबत अनेक तक्रारी असल्या तरी कंपनीने विविध प्रकारची प्रशासनाला उपयोगी होईल अशी माहिती संकलीत केली आहे. त्या माहितीचा उपयोग भविष्यातील अनेक तरतुदीसाठी होईल, हे वास्तव नाकारता येणार नाही.

१,५२,६१३

मिळकतींची संख्या

१,१६,३२३

करपात्र निवासी इमारती

२९,२९०

करपात्र अनिवासी इमारती

८,६२७

सर्व्हेमध्ये मिळालेल्या मिळकती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगा, भोगावतीत उपसाबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाळ्याच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सहा दिवस पाणी उपसाबंदी जाहीर केली आहे. पंचगंगा व भोगावती या नद्यांच्या काठावर शेतीसाठी पाणीउपसा करणाऱ्या उपसा यंत्रांवर हा आदेश लागू राहील. कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी उपसाबंदी व उपसा कालावधी जाहीर केला आहे. दरम्यान, यामुळे पाण्याचा फेरा २५ दिवसांपर्यंत लांबणार असल्याने पिकांची वाढ खुटण्याची भीती पाणी संस्थांनी व्यक्त केली आहे.

पाणी उपसाबंदीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयासह महापालिकेला आणि करवीर, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, राधानगरी या तहसील कार्यालयांना देण्यात आली आहे. उपसाबंदीतून ठिबक सिंचन परवानाधारकांना वगळण्यात आले आहे. बंदीच्या कालावधीत अनधिकृतरित्या पाणी उपसा करताना आढळल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना एका वर्षासाठी रद्द करण्यात येईल असा इशारा पाटबंधारे विभागाने आदेशात दिला आहे.

'दोन्ही महिन्यांत मिळून सहा दिवस पाणी उपसाबंदीमुळे पिकांना पाण्याचा फेरा २५ दिवसांपर्यंत लांबणार आहे. त्यामुळे उसासह अन्य पिकांची वाढ खुंटणार आहे. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. पुरेशा पाण्याअभावी ऊस उत्पादनावर एकरी पंधरा ते वीस टनांपर्यंत परिणाम होऊ शकतो अशी भीती कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे 'अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली.

पंचगंगा नदीतील उपसाबंदी व उपसा

पंचगंगा नदीवरील भागामध्ये पाणी उपसाबंदीचा कालावधी २७ व २८ एप्रिल आणि १२ ते १५ मे २०१९ पर्यंत आहे. तर उपसा कालावधी २९ एप्रिल ते ११ मे आणि १६ ते २४ मे असा आहे. खडक-कोगे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापासून ते शिरोळ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या दोन्ही तीरावरील भाग, कासारी नदीवरील यवलूज-पोर्ले कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापासून ते पंचगंगा नदीच्या संगमापर्यंतचे दोन्ही तीरावरील भागाचा समावेश आहे.

भोगावती नदीतील पाणी उपसाबंदी

पाणी उपसाबंदी कालावधी २९ ते ३० एप्रिल तसेच ८ ते ११ मे या कालावधीत राहील. १ ते ७ मे असा सात दिवसांचा कालावधी आणि १२ ते २४ मे असा तेरा दिवसांचा कालावधी उपसासाठी निश्चित केला आहे. उपसाबंदी अंतर्गत राधानगरी धरणापासून ते खडक-कोगे खासगी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भागात उपसाबंदी राहील. त्यामध्ये कुंभी नदीवरील सांगरुळ येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या खालील बाजूपासून ते भोगावती, कुंभी नदीच्या संगमापर्यंत दोन्ही तीरावरील भागापर्यंतचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांची घेतली भेट

दरम्यान, इरिशेगन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, कुरुकलीचे एच. एस. पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना पिकांच्या संभाव्य नुकसानीची माहिती दिली. इरिगेशन फेडरेशन व पाणी पुरवठा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उन्हाळ्यात उपसाबंदी करण्यापेक्षा नोव्हेंबरपासूनच महिन्यातील एक दिवस उपसाबंदी करावी असा प्रस्ताव यापूर्वी दिला होता असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरांवर हल्लाप्रकरणी संशयितांची घरझडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उद्यमनगर परिसरातील आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाउंडमधील पाच घरांवर जागेचा ताबा घेण्यावरुन हल्ला केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी अन्य संशयितांची घरझडती घेण्याचे काम सुरू केले आहे. घरे पाडण्यासाठी आणलेला जेसीबी हा कर्नाटकातील असून कर्नाटक आरटीओ कार्यालयाकडून मूळ मालकाचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. याप्रकरणी एकूण १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

राजारामपुरी पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी रवींद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागेचा ताबा घेण्यावरुन २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता १०० हून अधिक जणांच्या जमावाने जेसीबी मशीन घेऊन या परिसरातील घरांवर हल्ला केला. येथील महिलांना धक्काबुक्की करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. हल्ल्यामध्ये सहा रहिवासी जखमी झाले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहा संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान याप्रकरणी अन्य संशयितांची घरझडती सुरू केली आहे. घटनास्थळावर वर्णन केलेल्या संशयितांची नावे निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. त्यांना हल्ला करण्यासाठी कोणी पाठविले त्याचा शोधही घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्या सबुरीचा चुकीचा अर्थ काढू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशामध्ये एनडीएची सत्ता आणण्यासाठी एकत्र आले आहेत. युतीधर्माचे पालन करताना लोकसभा निवडणुकीत नीतिमत्ता ठेऊन कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. भाजपच्या बैठकीत माझ्यावर जरी टीका झाली असली तरी मी युती धर्मासाठी सबुरी ठेवतोय. पण, त्याचा अर्थ चुकीचा काढू नये,' अशी प्रतिक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर शिवसेना व भाजपमधील वाद उफाळून आला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विधानसभा युती झाल्यावरही आमदार क्षीरसागर यांचा प्रचार करणार नाही, असे स्पष्ट केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात क्षीरसागर यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'देशात एनडीएची सत्ता आणण्यासाठी आणि राज्यात पुन्हा युतीचे राज्य आणण्यासाठी ठाकरे व मोदी एकत्र आले आहेत. साडेचार वर्षातील टीका विसरुन, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी जीवाचे रान केले. मात्र मतदानानंतर अवघ्या तीन दिवसांत माझ्यावर टीका झाली.'

'कोल्हापूर उत्तर मतदारसंघात गेल्या तीन लोकसभा निवडणुकांत माझ्या नेतृत्वाखाली शिवसेनेने प्रचार केला आहे,' असे सांगत आमदार क्षीरसागर म्हणाले, '२००९ व २०१४ च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून युतीला मताधिक्य मिळाले. त्यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे. भाजपकडूनही प्रामाणिक प्रचार झाला आहे. २०१४मध्ये केंद्रात व राज्यात सत्ता आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात भाजप - शिवसेनेने एकमेकावर टीका केली. मीही भाजप नेत्यावर टीका केली व त्यांनीही माझ्यावर टीका केली. पण, पक्षप्रमुखांचा आदेश आल्यावर आम्ही पुन्हा एकत्र येऊन प्रचार केला. जरी भाजपच्या बैठकीत माझ्यावर टीका झाली तरी पक्ष माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे युतीधर्माचे पालन करण्यासाठी माझ्याकडून सामंजस्याची भूमिका राहणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांपासून सावध रहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाळी सुटीमुळे बंद घरे हेरून चोऱ्या होत आहेत. त्यासाठी नागरिकांनी सावध राहून चोरी, घरफोडी टाळण्यासाठी मौल्यवान वस्तू व पैसे बँकेत ठेवावेत. पर्यटनाला जाण्यापूर्वी जवळच्या पोलिस ठाण्याला माहिती द्यावी. चोरी टाळण्यासाठी खबरदारी आणि उपाययोजनेचे एसएमएस सायबर कक्ष आणि आपत्ती निवारण कक्षाकडून पाठविले जात आहेत. मात्र, चोरीचा प्रकार दिसल्यास पोलिसांना तत्काळ कळवा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.

कॉलेजांच्या परीक्षा संपल्या असून मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यासाठी अनेकजण सहकुटुंब पर्यटनासाठी परगावी जात आहेत. अशावेळी ते घरामध्ये मौल्यवान वस्तू, पैसे ठेवूनच बाहेर पडतात. बेरोजगारीमुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून चोरटे बंद घरे हेरुन घरफोड्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या चोऱ्या व घरफोड्या टाळण्यासाठी नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. त्यांनी मौल्यवान वस्तू, पैसे बँकेत लॉकरमध्ये ठेवावेत. घराच्या प्रवेशद्वारात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक नेमावा. रोख पैशांपेक्षा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक व्यवहार पद्धतींचा अवलंब करावा. एखादी व्यक्ती संशयितरीत्या फिरताना दिसल्यास स्थानिक पोलिसांशी फोनवरून संपर्क साधावा. रात्रीच्या वेळी बाहेरगावी जाणार असाल तर घरातील वीज सुरू ठेवावी. लग्न समारंभासाठी जाताना दागिन्यांचे जाहीर प्रदर्शन करू नये. दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यांकडून दागिने हिसडा मारून लांबविले जाऊ शकतात. काही तरुणांच्या राहणीमानात बदल दिल्यास तत्काळ पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीपात्रात कचरा, प्लास्टिकचा ढीग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

कसबा बावडा येथील राजाराम बंधारा आणि पंचगंगा घाट परिसरात कचरा आणि प्लास्टिक थेट नदीपात्रात जात असल्याचे निदर्शनास आले. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक घटक समोर येत असताना नागरिकांमध्ये मात्र याबाबत अनास्था दिसून आली. शनिवारी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्यावतीने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान नदी प्रदूषणात मानवी हातभार अधिक असल्याचे दिसून आले. याची गंभीर दखल घेत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.

राजाराम बंधारा व पंचगंगा नदीघाट परिसरात नेहमीच जेवणावळी झडत असतात. येथील ओल्या पार्ट्यांना अटकाव करण्यास अपयश आले आहे. त्याचबरोबर नदीमध्ये टाकले जाणारे निर्माल्य, प्लास्टिक पिशव्यांमुळे ओंगळवाणे रुप येथे येते. बंधारा परिसरात सफाई मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्यावतीने पूर्व तर जिल्हा परिषदेच्यावतीने पश्चिम बाजूच्या बंधाऱ्याची स्वच्छता केली. यावेळी मोठ्या प्रमाणात पत्रावळ्या, प्लास्टिक पिशव्या, ग्लास, दारुच्या बाटल्यांचा कचरा साठला. नदीपात्रातील केंदाळ, कचरा जेसीबी मशीनच्या सहायाने काढून टाकण्यात आला. आयुक्तांनी नदीपात्रामध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी त्यांची नावे पाठवा अशी सूचना आरोग्य विभागाला केली.

जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, वडणगेचे सरपंच सचिन पाटील, कसबा बावडा येथील पंचगंगा विहार मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील वनक्षेत्रात कमालीची घट

$
0
0

सातारा

राज्यातील वन क्षेत्र सातत्याने कमी होतंय. गेल्या तीन वर्षात राज्यातील ६३३ चौरस किलोमीटर इतके वन क्षेत्र कमी झाल्याचे विविध सरकारी अहवालांच्या विश्लेषणांवरून दिसून येते. विशेष म्हणजे ही घट वनखाते आणि फॉरेस्ट डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्राच्या अखत्यारीतील असल्याचं समोर आलंय.

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल २०१७ आणि २०१८ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये राज्यातील एकूण वनक्षेत्र हे ६१,३६९ चौरस किलोमीटर इतके असल्याचे म्हटले आहे. हे क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या १९.९ टक्के इतके भरते. यामध्ये वनखात्याच्या अखत्यारीत ५५,४३१ चौरस किलोमीटर, फॉरेस्ट डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्राच्या अखत्यारीत ३६०४ चौरस किलोमीटर, वनखात्याच्या अखत्यारीत असलेली खासगी वने ७२१ चौरस किलोमीटर तर महसूल खात्याच्या अखत्यारीत १६१३ चौसर किलोमीटर असे मिळून एकत्रित ६१, ३६९ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे.
पण २००९ आणि २०१० चा वनखात्याच्या वार्षिक अहवाल पाहिला तर राज्यातील एकूण वनक्षेत्र हे ६१,९३९ चौरस किलोमीटर इतके असल्याचे दिसून येते. यामध्ये वनखात्याच्या अखत्यातीतील ५५,३६७ चौरस किलोमीटर, महसूल खात्याच्या अखत्यारीमधील २४४९, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्राच्या अखत्यारीतील ३५६३ आणि खासगी मालकीच्या पण वनखात्याच्या अखत्यारीत येणार्‍या जंगलांखालील क्षेत्र हे ५६० चौसर किलोमीटर इतके असल्याचे यात दिसते. २००९- १० चा वनखात्याचा अहवाल आणि राज्याचा २०१७ आणि २०१८चा आर्थिक पाहणी अहवाल यांची तुलना केली तर राज्यातील ५८१ चौरस किलोमीटर इतके जंगलक्षेत्र कमी झाले असल्याचे दिसून येते. इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट २०११ या केंद्र सरकारच्या अहवालात देखील राज्याचे त्यावेळचे एकूण वनक्षेत्र हे ६०९४५ चौरस किलोमीटर इतके असल्याचे म्हटले आहे.

गेल्या तीन दशकातील स्थिती जर पाहिली तर जंगलांची सातत्याने घटल्याचे दिसते. उपलब्ध आकडेवारीनुसार १९८४-८५ मध्ये राज्यातील जंगलाखालील क्षेत्र ६२,९७१ चौरस किलोमीटर इतके होते. हा विचार केला तर गेल्या तीन दशकात राज्यातील १६०२ चौरस किलोमीटर इतके जंगल क्षेत्र कमी होत झाले असल्याचे लक्षात येते. राष्ट्रीय वनधोरण १९८५ नुसार एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक आहे. पण राज्यातील हे क्षेत्र वाढण्यापेक्षा कमीच होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

घटलेले वनक्षेत्र

१ ) पुणे - १३१ चौकिमी २ ) सातारा - १९३ चौकिमी ३ ) सांगली - २१० चौ किमी ४ ) कोल्हापूर - ९७ चौ किमी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याच्या ४५ हजार बॉक्सची आवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चार दिवसांत ४५ हजार, ७२४ बॉक्स आणि ३३८७ पेटी आंब्याची आवक झाली असून खरेदी विक्रीत दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याबरोबर मद्रास हापूस व पायरी आंब्याचेही बाजारात आगमन झाले आहे. हापूस आंब्याची प्रतिडझन ३०० ते ६०० रुपयांनी विक्री होत असून हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याने दर कमी होण्याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात मार्केट यार्ड येथे चार दिवसांत मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झाली आहे. २३ एप्रिल रोजी मतदान आणि २६ एप्रिलला साप्ताहिक सुट्टी असतानाही कोकणासह दक्षिण भारतातून उत्पादकांनी कोल्हापुरात आंबा पाठवला आहे. लोकसभा मतदान संपल्यानंतर बुधवारी (ता. २४) रोजी हापूस आंबा, पायरी, लालबाग, मद्रास हापूस आणि पायरी जातीच्या आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली.

उत्पादकांकडून पेटी व बॉक्समधून आंबा पाठवला जातो. १२ नग, १५, १८ आणि २० नगाचे बॉक्स असतात. तर पेटीत पाच ते सात डझन आंबे असतात. आंब्याची जात, प्रकार, आकारानुसार आंब्याचा दर सौद्यात काढला जातो. पहाटे दीड वाजल्यापासून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत कोकण, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू राज्यातून ५० ते ६० वाहनातून आंब्याची आवक होते. त्यानंतर सकाळी सात वाजता आंब्याच्या सौद्यास सुरुवात होते. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली, बारामती, बेळगाव, निपाणीत आंबा विक्रीस पाठवला जातो. कमिशन एजंट नईम बागवान म्हणाले, 'यंदा आंबा उशिराने बाजारात दाखल झाला असून बॉक्सने आंबा येत असल्याने आवक जास्त असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (ता. २७) १५ हजार २९० हापूस आंब्याची पेटी आवक झाली. तसेच ८५७ बॉक्स उत्पादकांनी पाठवले आहेत. कर्नाटकातून लालबाग जातीचा तर आंध्र प्रदेशातून मद्रास हापूस आंब्याची आवक झाली आहे. याबाबत व्यापारी नंदकुमार वळंजू म्हणाले, 'दक्षिण भारतातील उत्पादकांनी कोकणातून हापूस आंब्याच्या रोपे खरेदी करुन आंब्याची लागवड केली आहे. हा आंबा आकार, रंगाने हापूस आंब्यासारखा दिसतो. हापूस आंबा कापल्यावर पिवळा दिसतो तर मद्रास हापूस थोडासा फिकट असतो. तसेच चवीलाही गोडीने कमी असतो. देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याच्या किंमतीपेक्षा निम्म्या किंमतीने आंबा विकला जात आहे.' मे महिन्यात कोकणासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांच्या आवाक्यात आंब्याचा दर येऊ शकतो. सध्या देवगड हापूसचा दर सरासरी ३०० ते ६०० रुपये दर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षा संचालकांकडून वसुली करा

$
0
0

लोगो : शिवाजी विद्यापीठ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभातील एका सहीचा घोळ, दुबार प्रमाणपत्र छपाईच्या चौकशीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना उपलब्ध झाला. त्या अहवालात एका सहीची २४ हजार २४६ प्रमाणपत्रे छापली असून एकूण खर्च चार लाख ८९ हजार, ७६९ रुपये इतका झाला होता. ही रक्कम दीक्षान्त विभाग व परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालकांकडून वसूल करावी, अशी शिफारस केली आहे. दरम्यान चौकशी समितीचा अहवाल वादग्रस्त ठरला आहे.

विविध विद्यार्थी संघटना व शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने एका सहीचा घोळ हा कुलगुरूंच्या आदेशामुळे झाला असताना त्यांच्यावर चौकशी समितीने कोणताही आक्षेप घेतला नाही तसेच जबाबदारी का निश्चित केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक सोमवारी (ता. २९) होत आहे. चौकशी अहवालावरून ही बैठक गाजण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

चौकशी समिती प्रमुख डॉ. भारती पाटील, प्राचार्य डॉ. धनाजी कणसे व अमित कुलकर्णी यांनी हा अहवाल गेल्या महिन्यात विद्यापीठाला सादर केला होता. प्रशासनकडून शुक्रवारी हा अहवाल सदस्यांना प्राप्त झाला. समितीने चौकशीच्या कालावधीत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, दीक्षान्त विभागाचे उपकुलसचिव एन. एम. अकुलवार,श्रीमती एस. जी. ढोणे-पाटील, मुद्रणालयचे अधीक्षक भूषण पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतले. शिवाय २५ ते २९ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रकुलगुरू डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर यांचे म्हणणे ऐकून घेतले.

समितीच्या काही शिफारसी

एका सहीचा संपूर्ण दोष दीक्षान्त विभाग व परीक्षा मंडळ संचालकांचा

२४ हजार २४६ इतकी सदोष प्रमाणपत्रे छापली

४ लाख ८९ हजार ७६९ इतका खर्च

दीक्षान्त विभाग व परीक्षा संचालकांकडून संबंधित रक्कम वसूल करावी

सदोष प्रमाणपत्राची विल्हेवाट लावण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करावी

अधिकार मंडळापुढे विषय मांडताना तो सर्व अधिकाऱ्यांच्या मान्यतेने आणावा.

परीक्षा विभाग प्रमुखांनी कायद्यांच्या परिनियमांचा अभ्यास करून निर्णय घ्यावेत

'तो' तोंडी आदेश २६ फेब्रुवारीच्या बैठकीत

दीक्षान्त समारंभासाठीची आढावा बैठक २६ फेब्रुवारी, २०१८ रोजी झाली. त्या बैठकीत समारंभाचा तपशील, कार्यक्रमपत्रिका, निमंत्रण पत्रिका, पदवीदान समारंभाची कार्यवाहीविषयी चर्चा झाली. मुंबई विद्यापीठाच्या प्रमाणपत्रावर फक्त कुलगुरूंची स्वाक्षरी असल्याचे सांगितले. त्या कार्यपद्धतीविषयी कुलगुरुंनी बैठकीत सांगितले. तसेच शिवाजी विद्यापीठासाठीही कुलपती कार्यालयाकडून नजीकच्या काळात त्यासंबंधी आदेश प्राप्त होतील, असे सांगत एकाच सहीची प्रमाणपत्रे छापण्याचे तोंडी आदेश दिले. त्यावर दीक्षान्त विभागातील अधिकाऱ्यांनी 'आपल्याला तसे करता येणार नाही, परंपरा मोडता येणार नाही'याकडे लक्ष वेधले होते. दरम्यान व्यवस्थापन परिषदेच्या १३ मार्च रोजीच्या बैठकीत हा विषय मान्यतेसाठी होता. तत्पुर्वी दोन दिवस आधी म्हणजे ११ मार्च रोजी एका सहीची प्रमाणपत्रे छपाईला सुरुवात झाली होती.

अहवालात तिघांचे अभिनंदन

एका सहीची प्रमाणपत्रे स्नातकांना दिली असती तर ती अवैध ठरली असती. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत १७ मार्च, २०१८ रोजी झालेल्या अधिकाऱ्यांच्या अनौपचारिक बैठकीत दुबार प्रमाणपत्र छपाईचा निर्णय झाला. त्याबाबत प्र-कुलगुरू डॉ. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डी. आर. मोरे हे अभिनंदनास पात्र आहेत, असे चौकशी समितीच्या अहवालात म्हटले आहे. तसेच मुद्रणालय विभाग व परीक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अहारोत्र झटून प्रमाणपत्रांची छपाई केली, असा अहवालात उल्लेख आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निपाणी-देवगड मार्गाला ब्रेक

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने निपाणी ते देवगड मार्गाचे काम सुरू आहे. याच मार्गावरील सोळांकूर ते मांगेवाडी दरम्यानच्या मार्गावर काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेतील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. मात्र, पाइपलाइन टाकण्यास सोळांकूर ग्रामपंचायतीने अद्याप परवानगी दिली नसल्याने सुमारे साडेतीन किलोमीटरच्या राज्य मार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे. रस्त्याचे काम त्वरित होण्यासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी पुन्हा एकदा महापालिकेने ग्रामपंचायतीकडे केली.

शहरवासीयांना काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना सुरू आहे. योजनेच्या परवानगीबाबत अनेकपातळीवर घोळ असताना ज्या गावातून पाइपलाइन टाकली जाणार होती, त्यातील अनेक गावांनी सुरुवातीस विरोध केला. त्यामध्ये प्रामुख्याने सोळांकूर, कपिलेश्वर, तुरंबे, सोळंबी, हळदी आदी गावांचा समावेश होता. ग्रामपंचायतींचा विरोध दूर करण्यासाठी प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढला. पण सोळांकूर येथील प्रश्न अद्याप निकालात निघालेला नाही. ज्याठिकाणी विरोध होईल तेथील काम थांबवून पुढील टप्प्यातील काम करण्यास सुरुवात केली. परिणामी ४४ किमीची पाइपलाइन टाकण्यात आली असून केवळ वन विभाग व सोळांकूर गावातील अशी सुमारे नऊ किमी पाइपलाइनचे काम ठप्प झाले आहे.

मात्र सोळांकूर गावामध्ये थांबलेल्या कामाचा फटका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर झाला आहे. सार्वजनिक बांधकामच्यावतीने १७८ क्रमांकाचा निपाणी ते देवगड राज्य मार्गाचे काम हाती घेतले आहे. सद्य:स्थितीत रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून ज्या गावातून हा मार्ग जात आहे, तेथे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येत आहे. त्याप्रमाणे मांगेवाडी फाटा ते सोळांकूर कॅनॉलपर्यंतचा सुमारे चार किमी रस्ताही सिमेंट काँक्रिटचा होणार आहे. मात्र याच रस्त्याच्याबाजुने सुमारे ३.७० किमी अंतराची काळम्मावाडी योजनेची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. एकदा रस्ता केल्यानंतर पुन्हा खोदाई करणे शक्य नसल्याने सार्वजनिक बांधकामने महापालिकेकडे पाइपलाइन टाकण्यासाठी तगादा लावला आहे. सार्वजनिक बांधकामचा तगादा आणि सोळांकूर ग्रामपंचायतीचे परवानगी मिळत नसल्याने महापालिका प्रशासन कात्रीत सापडले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा एकदा शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने सोळांकूर ग्रामपंचायतीकडे पाइपलाइन टाकण्यासाठी ११ एप्रिल रोजी पत्रव्यवहार केला. त्याची प्रत राधानगरी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनाही सादर केली आहे. मात्र सोळांकूर ग्रामपंचायतीने अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. परिणामी थेट पाइपलाइनच्या कामासह निपाणी-देवगड रस्त्याच्या कामाला ब्रेक लागला आहे. परवानगी त्वरित न दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता करण्याची तयारी केली आहे. एकदा रस्ता झाल्यानंतर पुन्हा पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई केल्यास त्याची भरपाई महापालिकेला द्यावी लागणार आहे.

चर्चा निष्फळ ठरली

शहरवासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या थेट पाइपलाइन योजनेतील पाइपलाइन टाकण्यास परवानगी द्यावी, यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी संपर्क करत आहे. ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी मोठा मेळावा घेण्यात आला. मात्र त्यानंतरही गावकऱ्यांचा विरोध मावळला नसून पाइपलाइन टाकण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी बैठकही घेतल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारी बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करावे. पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक सक्षम, प्रभावीपणे करावे अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिल्या.

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराबाई सभागृहात बैठक झाली. देसाई म्हणाले, 'पाऊस पडण्यास होणारा विलंब अथवा प्रमाणापेक्षा पडणारा अधिक पाऊस याचा विचार करून तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. बनावट बियाणे टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण पथकाद्वारे तपासणी करावी.'

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, 'रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आरोग्यास हानी पोहोचत आहे. सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे. गटशेतीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा.'

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, नाबार्डचे नंदू नाईक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, आदी उपस्थित होते. उपसंचालक भाग्यश्री पवार यांनी सूत्रसंचालन केले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा प्रदूषमुक्तीसाठी ४८० कोटींचा आराखडा

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी 'नमामी'चा दर्जा मिळण्यासाठी प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय सविस्तर प्रस्ताव तयार करीत आहे. केंद्र सरकारच्या नमामी गंगेच्या धर्तीवरचा हा प्रस्ताव तयार करण्यात आहे. यासाठी कोल्हापूरसह पंचगंगा खोऱ्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कृती आराखडा, कामनिहाय आवश्यक निधीची माहिती घेतली जात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने आता सुरू असलेल्या प्रकल्पाशिवाय उर्वरित कामांसाठी ४८० कोटींची आवश्यकता असल्याची माहिती नुकतीच दिली आहे. पन्हाळा नगरपालिकेने तीन कोटींतून सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा प्रकल्प उभारण्याचे नियोजन दिले आहे.

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघण्यासाठी भरीव निधीची गरज आहे. 'नमामी'योजनेत या नदीचा सामावेश झाल्यास आवश्यक निधी मिळू शकतो. यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर पंचगंगेला नमामीचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रशासन करत आहे. त्यांनी पंचगंगा खोऱ्यातील एकूण गावे, औद्योगिक वसाहत, साखर कारखाने, शेतीचे क्षेत्र, त्यामध्ये वापरण्यात येणारी रासायनिक खते, औषधांचा वापर यांची माहिती संकलित केली जात आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी तात्पुरते आणि कायमस्वरुपी उपाययोजना आणि भविष्यातील प्रकल्प आणि इतर कामांसाठी लागणाऱ्या निधीच्या आकडेवारीसह कृती आराखडा एकत्र केला जात आहे.

महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीत अमृत योजनेतून सांडपाण्यासाठी भुयारी वाहिनी टाकण्यासाठी ७० कोटी, नगरोत्थान योजनेतून दुधाळी सांडपाणी प्रकल्पासाठी १३ कोटी, कसबा बावड्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ७६ कोटी मिळाले आहेत. कामही अंतिम टप्यात आहे, असे म्हटले आहे. याशिवाय शहर, परिसरातील सर्व वसाहतींमध्ये सांडपाणी एकत्रीकरणासाठी पाइपलाइन टाकून प्रक्रिया प्रकल्पापर्यंत सांडपाणी नेणे, सर्व नाले वळवून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे आणण्यासाठी ४०० कोटी, नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ५० कोटी, दुधाळी सांडपाणी प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी सहा कोटी, अत्याधुनिक कत्तलखाना उभारणीसाठी २५ कोटी, गणेशोत्सव काळात निर्माण होणाऱ्या निर्माल्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पासाठी दोन कोटी यासाठी ८० कोटींची गरज आहे, अशी माहिती दिली. पन्हाळा नगरपरिषेदच्या हद्दीतील सांडपाण्यामुळे अप्रत्यपणे पंचगंगा दूषीत होते. त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि कचरा व्यवस्थापनासाठी तीन कोटींच्या निधी तरतूद असल्याचे लेखी पत्र 'प्रदूषण'च्या प्रशासनास दिले आहे.

जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

पंचगंगा नदी प्रदूषित होण्यात सर्वाधिक कोल्हापूर, इचलकरंजी आणि काठावरील गावे जबाबदार आहेत. म्हणून इचलकरंजी, जिल्हा परिषद, जयसिंगपूर, कुरूंदवाड, वडगाव, शिरोळ या नगरपालिकांनी कृती आराखडा देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. 'प्रदूषण नियंत्रण'चे प्रशासन वारंवार पाठपुरावा करीत आहे. मात्र ते दुर्लक्ष करीत असल्याने नमामी पंचगंगेचा अंतिम प्रस्ताव तयार करण्यासाठी विलंब होत आहे.

७१ दशलक्ष लिटर थेट नदीत

कोल्हापूर शहरातून २४, इचलकरंजीतून २४, काठावरील गावातून २३ असे एकूण ७१ दशलक्ष लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया रोज पंचगंगेत मिसळते. कोल्हापुरातील ९६ पैकी ७२ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केले जाते. याशिवाय सर्व भागात भुयारी वाहिनीव्दारे सर्व सांडपाणी एकत्र करणे, त्यावर प्रक्रिया करणे, घनकचरा संकलन, व्यवस्थापन, प्रक्रियेसाठी 'नमामी गंगे'तून स्वतंत्र निधीची मागणी केली आहे.

नमामी योजनेसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ तयार करत असलेल्या प्रस्तावासाठी महानगरपालिकेने ४८० कोटींचा कृती आराखडा तयार करून दिला आहे. त्यामध्ये शहर आणि परिसरातील उचगाव, टेंबलाईवाडी, कदमवाडी, राजेंद्रनगर अशा सर्व भागातील सांडपाण्यासाठी भुयारी पाइपलाइन टाकणे, विविध ठिकाणी नव्याने सांडपाणी प्रकल्प उभारणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, जयंतीसह इतर नाल्यांतील सांडपाणी वळवण्याच्या कामांचा सामावेश या आराखड्यात आहे.

आर. के. पाटील, शहर उपअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केशवराव’च्या एसीत बिघाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण करताना लाइट अँड साउंड, वातानुकूल यंत्रणा, अद्ययावत स्टेज अशा नवीन तंत्रज्ञानाचा अतिशय कुशलतेने वापर केला. परिणामी नाट्यगृहातील अद्ययावत वस्तूंच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. नूतनीकरणानंतर बसविलेली वातानुकूलित यंत्रणा ऑगस्टपासून बंद आहे. प्रेक्षकांना गारवा देणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने त्यांना नाट्यगृहात अक्षरश: घाम फुटत आहे.

नाट्यगृहाचे नुतनीकरण करताना नाट्यगृहात गारवा व वातावरण आल्हादायी राहण्यासाठी सात ते आठ ठिकाणी वातानुकूल यंत्रणा कार्यान्वित केली. वातानुकूल यंत्रणा व नाट्यगृहातील वीजपुरवठा खंडित होऊ नये, त्यासाठी १२५ केव्हीचा जनरेटरही बसविला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरच्या मदतीने तो कायम करण्यात येतो. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी नाट्यगृहातील यंत्रणेवर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेपैकी बाल्कनीच्या खालच्या बाजूकडील यंत्रणा ऑगस्टपासून बंद पडली आहे. याबाबतची माहिती नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने महापालिकेच्या विद्युत विभागाला देऊन दुरुस्तीसाठी तीन लाख निधीची मागणी केली. मात्र, नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही दुरुस्तीसाठी निधी मिळालेला नाही. त्यामुळे आता उन्हाचा तडाखा सुरू झाल्यानंतर त्याचे परिणाम समोर येऊ लागला आहे.

नुकत्याच झालेल्या 'अलबत्या गलबत्या' नाटकादरम्यान तर प्रेक्षकांनी थेट नाट्यगृहामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांकडे याबाबत कडक शब्दांत विचारणा केली. मात्र, कर्मचाऱ्यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. वीजपुरव‌ठा खंडित झाल्यास जनरेटरचा वापर करून पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जातो, पण गेल्या काही वर्षांत जनरेटरची देखभाल दुरुस्ती न केल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरवर केवळ स्टेजवरील वीजपुरवठा सुरू होतो, पण वातानुकूलित यंत्रणा सुरू होत नाही. परिणामी नाट्यगृहातील संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर बंद पडत असल्याचे समजते.

०००००

विद्युत विभाग करतो काय?

नाट्यगृहातील एसीमध्ये बिघाड झाल्यानंतर निधीसाठी विद्युत विभागाकडे प्रस्ताव पाठवला. ऑगस्टमध्ये पाठविलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. गतवर्षीचे बजेट अपुरे पडल्याचे कारण पुढे करताना हा विभाग वाढीव बजेटसाठी का प्रयत्न करत नाही? नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये मिटिंगमध्ये वाढीव बजेटची मागणी करणे अपेक्षित होते, पण तशी मागणी केली नसल्याचे समजते. त्यामुळे विद्युत विभाग नेमके करतो काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images