Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

$
0
0

सोलापूर :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना करणारे बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह मूर्तिकारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोलापुरातील शिवप्रेमींनी मंगळवारी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्याकडे केली आहे. सोमवारी निघालेल्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत नगरसेवक चंदनशिवे संस्थापक अध्यक्ष असलेल्या प्रबुद्ध भारत मंडळाने कोलंबिया विद्यापीठाची मोठी प्रतिकृती साकारली होती. प्रतिकृतीच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपतींच्या रूपात सिंहासनावर विराजमान झालेली मूर्ती साकारली होती. या वरून शिवप्रेमींमध्ये छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाल्याची भावना निर्माण झाली. पी. बी. ग्रुपने जाणीवपूर्वक व खोडसाळपणे हा प्रकार केल्याचा आरोप करीत आनंद चंदनशिवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी प्रबुद्ध भारत मंडळाने बाबासाहेबांच्या सिंहासनारूढ मुर्तीसह वाजतगाजत मिरवणूक काढली. मात्र मिरवणूक मध्यवर्ती ठिकाणी आल्यानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. सर्वांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आनंद चंदनशिवे यांना विचारना करीत मिरवणुकीतून मूर्ती तातडीने हटविण्यास सांगताच एकच गोंधळ निर्माण झाला. मिरवणुकीतून मूर्ती हटविण्याबरोबरच प्रबुद्धने मिरवणूकच आटोपती घेतली. मुर्तीसह देखावा असलेला कंटेनर मध्यरात्री पुना नाका येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर बाबासाहेबांची सिंहासनारूढ मूर्ती उतरवून तातडीने तिची बाहेरगावी पाठवणूक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेत आणखी दोन दिवस शुकशुकाट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कामासाठी महापालिकेच्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या महिन्यापासून सर्व कर्मचारी निवडणूक शाखा आणि महापालिका अशा दोन्ही ठिकाणच्या कामकाजाची भूमिका बजावत होते. अधिकारी व कर्मचारी नसल्याने प्रशासकीय कामे होत नसल्याने लोकप्रतिनिधी व नागरीकांचा महापालिकेतील राबता कमी झाला. मात्र, आणखी दोन दिवस असाच शुकशुकाट राहणार बुधवारपासून पुन्हा महापालिकेचा विठ्ठल रामजी शिंदे चौक गर्दीने फुलून जाईल.

मतदार नोंदणी, ओळखपत्रांमध्ये बदल व वाटप, रहिवासी पुराव्यात बदल अशा अनेक निवडणूक कामासाठी विविध सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिकेच्या ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक शाखेकडे झाली. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पुन्हा ५० कर्मचारी वर्ग करण्यात आले. त्यामध्ये उपायुक्त, मुख्य लेखापरीक्षक, चार उपशहर अभियंता, कामगार अधिकारी व ३० कनिष्ठ अभियंता या प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश होता. जाहीर प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा महापालिकेचे २० कर्मचारी वर्ग केल्याने तब्बल १५० कर्मचारी निवडणूक शाखेकडे वर्ग झाले. सर्व कर्मचाऱ्यांना आचारसंहिता पथक, जाहीर प्रचाराला उपस्थिती, बाहेरील मतदारांना बॅलेट मतपत्रिका पाठवणे, एव्हीएम मशीनची तपासणी व प्रात्यक्षिके, मतदारजागृती अभियान आदी कामे करावी लागली. या सर्व कामकाजामध्ये अधिकारी, कर्मचारी व्यस्त राहत असल्याने त्यांचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला. अनेक वरिष्ठ अधिकारी दुपारपर्यंत निवडणूक शाखेचे कामकाज केल्यानंतर दुपारी आपल्या मुख्य हुद्याची जबाबदारी पार पाडताना दिसत होते. अधिकारीच उपस्थित नसल्याने काहीवेळा अभ्यागतांना हेलपाटेही मारावे लागतात. निवडणूक काळात कोणतेही काम होणार नसल्याने अनेकजणांनी महापालिकेकडे येणे बंद केले.

प्रशासकीय पातळीवर अशी स्थिती असताना चार दिवसांपूर्वी आणखी २७५ कर्मचारी निवडणूक शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे मनपाचे तब्बल ४२५ कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. परिणामी मनपाच्या कामकाजावर चांगलाच परिणाम झाला आहे. प्रशासकीय पातळीवर अशी शांतता दिसत असताना, एक-दोन नगरसेवक वगळता अन्य नगरसेवकांचे दर्शन अत्यंत दुर्मिळ झाले आहे. मंगळवारी मतदान असल्याने शासकीय सुटी असल्याने कार्यालय बंद राहणार आहे. मात्र बुधवारपासून मनपामध्ये अधिकारी, नगरसेवक व नागरिकांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू होईल.

कामकाजावर परिणाम

महापालिकेतील अनेक ‌विभागांचे अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. अनेक अधिकारी दुपारपर्यंत निवडणुकीच्या कामकाजामध्ये सहभाग घेत दुपारनंतर महापालिकेत उपस्थिती दाखवत होते. पण, मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तशी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुपानंतरही महापालिकेच्या कामकाजात सहभाग घेऊ येऊ शकला नाही. मंगळवारी मतदान होणार असल्याने विविध अधिकारी सोमवारीच मतदान केंद्रावर दाखल झाले. हे सर्व अधिकारी बुधवारी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेतही शुकशुकाट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मिळून ५००हून अधिक जणांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. मंगळवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या कामकाजासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी सोमवारी नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले. कर्मचारी मोठ्या संख्येने निवडणूक कामकाजात सहभागी झाल्यामुळे जिल्हा परिषदेतील मुख्यालयात शुकशुकाट जाणवत आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदकडे पाठ फिरवली आहे. जिल्हा परिषदेचा परिसर हा सोमवारी विविध कामानिमित्त येणाऱ्या लोकांमुळे गजबजलेला असतो. सध्या मात्र लोकसभा निवडणुकीचे सावट सर्वत्र दिसत आहे. नागरिकांची मुख्यालयातील ये-जा रोडावली आहे. दुसरीकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, वित्त व लेखाअधिकारी, कक्ष अधिकारी, अधीक्षक, कनिष्ठ व वरिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ सहायक यांच्यावर निवडणूक कामकाजाची जबाबदारी सोपवली आहे. शिपायांच्याही नियुक्त्या केल्या आहेत. अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हजर राहिले. यामुळे मुख्यालयातील कामकाज थंडावले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या २३ शाळांमध्ये पक्के रॅम्प

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांत सुलभरित्या जाण्याची सोय व्हावी यासाठी महापालिकेच्या २३ शाळांमध्ये पक्क्या स्वरुपाचे रॅम्प बांधण्यात आले आहेत. पक्क्या स्वरुपातील या रॅम्पचा फायदा संबंधीत शाळांतील अपंग विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी होणार आहे. रॅम्पमुळे किमान २३ शाळांमधील अपंग विद्यार्थ्यांचा दैनंदिन ये-जा करण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २३) मतदान होत आहे. त्यासाठी शहरात ३१९ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. महापालिकेच्या ५४ शाळांपैकी २३ शाळांमध्ये मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे त्यासाठी निवडणूक आयोगाने अपंग व्यक्तींना केंद्रांमध्ये जाण्यासाठी कायम अथवा तात्पुरत्या स्वरुपात रॅम्प उभारण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेने 'स्व' मालकीच्या २३ शाळांमध्ये पक्क्या स्वरुपात रॅम्प बांधले आहेत. या रॅम्पचा फायदा नंतरच्या काळात होणार आहे. त्याचबरोबर या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी वापर करता येणार आहे. तसेच इतर शाळांतील मतदान केंद्रामध्ये तात्पुरत्या स्वरुपात रॅम्प उभे करण्यात आले आहेत. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी विशेष लक्ष देऊन कायमस्वरुपी रॅम्प उभारणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान केंद्रावर मनपाच्या सुविधा

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी शहरात ३१९ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. या सर्व केंद्रांर लाईट, पाणी, टेबल, खुर्च्या, मंडप आदी सुविधा महापालिकेच्यावतीने पुरवण्यात आल्या आहेत. तसेच अपंग व्यक्तींना मतदान केंद्र व पुन्हा निवासस्थानी सोडण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था केली, असून ७८ व्हिलचेअर देण्यात आल्या आहेत. तर इतर सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाचे तब्बल ६०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी (ता. २३) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्यासाठी शहरात ३१९ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. या सर्व मतदार केंद्रांवर लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा महापालिकेच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामध्ये टेबल, खुर्च्या, लाईट, पाणी अशा सुविधा देण्याबरोबर तात्पुरत्या स्वरुपात शौचालय बांधण्यात आली आहेत. उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांमध्ये अनुक्रमे ४८ व २५ ठिकाणी आवश्यकतेनुसार मंडप उभारणी केली आहे.

मतदानाच्या वेळेमध्ये कर्मचारी अथवा मतदाराला प्रथमोपचाराची आवश्यकता भासल्यास किंवा अन्य कामासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागेच ६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर केवळ निवडणूक कामासाठी महापालिकेच्या ४२५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याने तब्बल एक हजार कर्मचारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या निवडणूक कामात सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बावडा एसटीपी प्लांटच्या नोंदी ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये (एसटीपी) वापरण्यात येणारे क्लोरिन, लॉक बूक याच्या दैनंदिन नोंदी ठेवण्याबरोबरच बेसिनची तातडीने दुरुस्ती करा, असे आदेश सोमवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाला दिले. प्लांट परिसरात पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पालाही भेट दिली.

जयंती नाला आणि लाइन बाझार येथील नाल्यातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कसबा बावडा येथे ७६ एमएलडीचा प्लांट उभा केला आहे. प्लांटमध्ये ६० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून सोमवारी आयुक्तांनी त्याची पाहणी केली. उपशहर अभियंता आर. के. पाटील यांनी सांडपाण्यावर होणाऱ्या प्रक्रियेबाबतची माहिती दिली. त्यानंतर आयुक्तांनी प्रकल्पामध्ये प्रक्रिया केल्या जाणाऱ्या सांडपाण्यामध्ये वापरण्यात येणारे क्लोरिन, लॉक बूक यांच्या दैनंदिन नोंदी ठेवण्याचे आदेश दिले. प्रकल्पातील बेसिनची तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना केली. प्रकल्प परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी आराखडा तयार करा. आराखड्यानुसार प्रकल्प परिसरात वृक्षलागवडीचे नियोजन करा, अशी सूचना आरोग्य विभागाला केली.

त्यानंतर आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली. दैनंदिन संकलित होणाऱ्या कचऱ्यामध्ये इनर्ट मटेरियलचा समावेश असतो. दररोज संकलित होणारे इनर्ट मटेरियल शिफ्टिंग लँडफील साईटवर करुन २०० टन कचऱ्याचे नियोजन करण्याची सूचना केली.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून जानेवारीपासून वीज निर्मितीस सुरुवात झाली आहे. मात्र वीज निर्मितीतून तयार होणाऱ्या आरडीएफला अद्याप ग्राहक मिळालेला नाही. परिणामी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आरडीएफ विक्रीसाठी खरेदी करार करण्याची सूचना आरोग्य विभागाला दिली. यावेळी आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आर. के. पाटील, हेमंत काशीद आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानोळीत पोलिसांनी केली हातभट्टी उद्ध्वस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या पथकाला ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आढलेल्या दानोळी (ता. शिरोळ) येथी हातभट्ट्या उद्ध्वस्थ केल्या. जयसिंगपूर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत हातभट्टी उद्ध्वस्त करुन पाच लाख तीन हजार रूपये किंमतीचे कच्चे रसायन व दारू नष्ट करण्यात आली. सोमवारी दुपारी या कारवाईवेळी नऊ जणांनी पलायन केले. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

निवडणुकीच्या निमित्ताने मतदान यंत्रे पोहोचविण्यासाठी पोलिस दानोळी येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत ड्रोन कॅमेरा होता. त्यातून पाहणी करत असताना जंगम ओढा व वारणा नदीकाठी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी तुकाराम यशवंत जाधव (वय ४८), रमेश आण्णासो माने (वय ३६), सावकर परशू माने (वय ४५), संदीप बाळू माळी (वय ३०), ईश्‍वर परशू माने (वय ३३), उदय बाळू माने (वय ३०), गोपाळ गणपती माने (वय ४७), अर्जुन भीमराव चव्हाण (वय ३७), संभाजी बोर्डे (वय ३७, सर्व रा. दानोळी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग व जयसिंगपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार ठिकाणी छापे टाकले. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, उपनिरीक्षक किरण दीडवाघ, नाईक सचिन निकम, कॉन्स्टेबल अभिजित भातमारे, हवालदार संजय नाईक तसेच राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक शिवाजी कोरे, कॉन्स्टेबल विजय माने यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाही बसला अपघात

$
0
0

शिवशाही बसला अपघात

कराड

मलकापूर (ता. कराड) येथील अक्षता मंगल कार्यालयाजवळ पुणे-बेंळुगरू महामार्गावर शिवशाही बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला आहे. अपघातात आठ जण जखमी झाले असून, हायवे हेल्पलाईनच्या तत्परतेमुळे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मलकापूर शहराच्या हद्दीत महामार्गावर अक्षता मंगल कार्यालयाजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास शिवशाही बसने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात शिवशाही बसचे मोठे नुकसान झाले असून, आठ जण जखमी झाले आहेत. शिवशाही बस पुण्याहून मालवणला निघाली होती. मुख्य महामार्गावर झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झालेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंत्रणा सुविधांसह सज्ज

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीसाठी आज (ता. २३) होत असलेल्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून तालुकापातळीवर कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. निवडणूक कर्मचारी, एसटी महामंडळ, पोलिस प्रशासनाने कामकाजाचे वाटप केल्यानंतर दुपारनंतर मतदान केंद्रे प्रशासनाने ताब्यात घेतली. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुविधा देण्यात आल्या आहेत.

राधानगरीत लगबग

राधानगरी : राधानगरी येथे विधानसभा मतदार संघातील मुख्यालयातून मतदान साहित्य वितरीत करण्यात आले. साहित्य ताब्यात घेण्यासाठी केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांनी गर्दी केली होती. साहित्य ताब्यात घेतल्यानंतर साहित्य वाटपाच्या आवारात साहित्य मोजून निवडणूक कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. मतदान केंद्रावर जाऊन निवडणूक कर्मचारी वर्गाने मतदान बूथ रचना करून साहित्य मांडणी केली आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता अभिरुप मतदान घेऊन झाल्यानंतर सकाळी सात वाजता मतदान अधिकारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरवात करणार आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान नोंदवले जाणार आहे. मतदान केंद्रावर अथवा मतदान यंत्रात बिघाड झाल्यास त्वरित पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

हातकणंगलेत ३३० केंद्रांवर मतदान

हातकणंगले: हातकणंगले विधानसभा २७८(अनुसूचित जाती राखीव)या मतदारसंघात एकूण ३३० केंद्रावर २३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी २७ झोनल अधिकारी,१० पोलिस सेक्टर अधिकारी, ३३० केंद्रांवर १३२० मतदान अधिकारी, राखीव १३२ अधिकारी तसेच ३३० पोलिस व ३३० शिपाई असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी व तहसीलदार सुधाकर भोसले यांनी दिली.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख, १९ हजार, ७१६ इतके मतदार असून त्यापैकी १लाख ६५ हजार ८३६ पुरुष तर १ लाख ६३ हजार ८७५ स्त्रिया तसेच पाच इतर मतदार आहेत.

शाहूवाडीत १८०० कर्मचारी

शाहूवाडी: हातकणंगले लोकसभा मतदारसंघाअंतर्गत शाहूवाडी विधानसभा क्षेत्रातील निवडणूक व मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त ४० विभागीय निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुमारे १८०० निवडणूक मतदान कर्मचारी सोमवारी दुपारी पावणेएक वाजता ७५ वाहनांतून नियुक्तीच्या ठिकाणाकडे रवाना झाले. तत्पुर्वी येथील शाहू हायस्कूलच्या क्रीडांगणावर मतदारसंघातील एकूण ३३२ मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधींना निवडणूक प्रशासनाने मतदान साहित्य वितरित केले. मिळालेल्या साहित्याची खातरजमा करून घेत सर्व कर्मचारी लगबगीने मतदान केंद्राकडे रवाना झाले. निवडणूक प्रशासनाने यासाठी ४७ एसटी बस, तीन शाळा बस, २५ खासगी जीपगाड्या अशी ७५ वाहनांची यंत्रणा तैनात केली होती. तसेच प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक याप्रमाणे ३३२ पोलिस कर्मचारी, आठ तांत्रिक अभियंता संच याशिवाय शाहूवाडी महसूल विभागाचे शंभर कार्यालयीन कर्मचारी या निवडणूक कामात व्यस्त राहणार आहेत. शाहूवाडी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत २ लाख ८६ हजार ७८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख, ४८ हजार १८७ पुरुष, १ लाख, ३८ हजार ५९५ महिला तसेच अन्य दोन मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी दिली.

चंदगडमध्ये प्रशासन सज्ज

चंदगड: लोकसभा निवडणुकीसाठी निवडणुक प्रशासन सज्ज झाले आहे. पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा, वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होईल, अशी माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.

चंदगड मतदारसंघात एक लाख ५९ हजार, ८०२ पुरुष तर एक लाख ५९ हजार ३३९ महिला व अन्य दोन असे तीन लाख १९ हजार १४३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, सहाय्यक पोलिंग ऑफिसर एक, दोन व दीन, शिपाई, पोलिस, व्हॉलिंटिअर, आरोग्य मदतनीस, पाळणाघरासाठी महिला व बिएलओ मार्गदर्शक असतील. प्रत्येक मतदान केंद्रावर दहा टक्के राखीव मशीन्स ठेवण्यात आल्या आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघात ३७६ मतदान केंद्रे असून १६५४ कर्मचाऱ्यांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

००००००

मतदान केंद्रांवर सुविधा

मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, व्हिलचेअर, रुग्णवाहिका, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, अंधदृष्टी असणाऱ्या मतदारांसाठी भिंग, पुर्ण अंधत्व असलेल्यांसाठी ब्रेल लिपी व डमी मतपत्रिका, मदत केंद्रे, ऊन्हाच्या ठिकाणी मंडप, लहान मुलांसाठी पाळणाघर असेल.

गडहिंग्लजमध्ये ग्रीन इंडिया संकल्पना

गडहिंग्लज:लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाची जय्यत तयारी झाली असून मतदान प्रक्रियेसाठी पोलिसांच्या फौजफाट्यासह सर्व यंत्रणा तैनात करून चंदगड विधानसभा मतदारसंघातील केंद्रावर गडहिंग्लज येथून रवाना करण्यात आली. एम. आर. हायस्कूल गडहिंग्लजच्या मैदानावर केंद्रातील साहित्य वाटप करण्याचे व स्वीकारण्याचे नियोजन करण्यात आले.

ग्रीन इंडिया या संकल्पनेतून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी प्रथम येणाऱ्या मतदाराला एक लहान झाडाचे रोपटे देऊन स्वागत करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली. चंदगड मतदारसंघासाठी ३७६ मतदान केंद्रांवर २२५६ कर्मचारी नियुक्त केले असून ४६ झोनल ऑफिसर नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांना आपापल्या साहित्यासह केंद्रावर पोहोचण्यासाठी ४६ बस आणि ५५ खासगी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी तर झोनल ऑफिसरबरोबर एक पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. तालुक्यातील हुनगिनहाळ येथे मतदान केंद्र क्रमांक ८० हे महिला कर्मचाऱ्यांचे केंद्र राहणार आहे. या केंद्राचे कामकाज महिला कर्मचारी सांभाळणार आहेत.

इस्लामपुरात १७५० कर्मचारी

इस्लामपूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील २९२ मतदान केंद्रांवर सोमवारी सर्व मतदान साहित्य रवाना झाले. केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे १७५० कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी सज्ज असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी दिली.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात २ लाख, ६८ हजार, ८६ इतके मतदार आहेत. पहिल्या तासातच प्रशासकीय यंत्रणेमार्फत सर्व दिव्यांग मतदारांचे मतदान करवून घेण्याचा प्रयत्न आहे. या मतदार संघात १७ उमेदवार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे, एक कंट्रोल युनिट आणि एक व्हीव्हीपॅट यंत्र असणार आहे. प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचारी नियुक्त असतील. महिला कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचारी बाहेरच्या मतदार संघातून येणार आहेत. दोन हजार कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. एस टी महामंडळाच्या ३७ गाड्यांचे ११ लाख, १० हजार रुपये महसूल विभागाने महामंडळाकडे जमा करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरचे कान नाक घसा 'अपडेट'

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMt

कोल्हापूर : नागरिकांमध्ये कान-नाक-घशाच्या आजारांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र या आजारांनी गंभीर रूप घेतल्यास त्याचा फटका रुग्णाला बसतो. किरकोळ वाटणाऱ्या या आजारांवर प्रसंगी अवघड शस्त्रक्रिया कराव्या लागतात. थोरला दवाखाना अशी ओळख असलेला सीपीआरचा कान नाक घसाशास्त्र विभाग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने अद्ययावत झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत सीपीआरमध्ये कान, नाक व घशाच्या आजारांवर गुंतागुंतीच्या ७१५ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत या विभागाचे काम ७५ टक्के वाढले आहे.

कान नाक आणि घसा एकमेकांशी जोडलेले असतात. त्यांच्या क्लिष्ट रचनेमुळे आजाराकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असते. आजार वाढल्यानंतर उपचारासाठी धावाधाव करावी लागते. आजाराने गंभीर रूप धारण केल्यानंतर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. सीपीआरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. यापूर्वी कान, नाक, घश्यावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला इतर हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागत होते. मात्र रुग्णालयाने अद्ययावत तंत्रसामग्री उपलब्ध केल्याने अवघड शस्त्रक्रिया सीपीआरमध्येच होत आहेत. यासाठी भूल तज्ञांच्या मार्गदर्शनानंतर एक महिन्याच्या आत शस्त्रक्रिया पार पाडली जाते. मोहिमेत डॉ. वासंती पाटील, डॉ. मिलिंद सामानगडकर, न्यूरो सर्जन डॉ. अनिल जाधव, डॉ. तुषार ताजणे यांनी सहभाग घेतला आहे.

कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे सांगतात, 'विभाग सक्षम करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. दिवसेंदिवस गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी ३२ वर्षे वय असलेल्या तरुणाच्या फुफ्फुसात वाटाणा अडकला होता. रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाल्यानंतर त्याला खासगी हॉस्पिटलमधून सीपीआरमध्ये आणण्यात आले. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून 'त्या' तरुणाच्या फुफ्फुसातून वाटाणा बाहेर काढण्यात आला. तीन वर्षाच्या चिमुरडीच्या घशात पैशाचे नाणे अडकले होते. डॉक्टरांनी तातडीने नाणे इसोफॅगॉस्कोपीद्वारे यशस्वीरित्या काढले. ४० वर्षे वय असलेल्या एका रुग्णाच्या मेंदूमध्ये पस असल्याचे आढळले होते. तातडीने शस्त्रक्रिया करून त्याच्या उजव्या मेंदूच्या सेरेबल भागात जपलेला पस काढण्यात आला. पिट्युटरी ग्रंथीचा ट्युमर असलेल्या ४८ वर्षीय गृहिणीवर एंन्डोस्कॉपिक एन्डोनेजल ट्रान्सस्पिनॉयडल एप्रोच या अत्याधुनिक शस्त्रक्रियेद्वारे शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढण्यात आला.'

कान नाक व घसा बाबतच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने सीपीआर सक्षम करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. विभागात सकाळी नऊ वाजल्यापासून डॉक्टर हजर असतात. संध्याकाळी ऑपरेशन आणि दाखल रुग्ण यांचा 'वॉर्ड राउंड' बंधनकारक केला आहे. रुग्णांनी भूलतज्ञांचे फिटनेस घेतल्यानंतर शक्यतो एक महिन्याच्या आत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. अजित लोकरे, विभागप्रमुख, कान-नाक-घसा शास्त्र विभाग, सीपीआर

सीपीआरमध्ये झालेल्या शस्रक्रिया

९०

नोव्हेंबर

१०६

डिसेंबर

१६३

जानेवारी

१७५

फेब्रुवारी

मार्च: १८१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यक्तिगत गाठीभेटी अन् रणनितीचे ‘प्लॅनिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जाहीर प्रचाराची सांगता झाली असली तरी उमेदवार मात्र पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे सोमवारी मतदारसंघात फिरत होते. प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, अधिकाधिक मतदानासाठी वेगवेगळ्या पातळीवर जोडण्या, प्रमुख नेत्यासोबतच्या चर्चेद्वारे रणनिती निश्चिती केली. दिवसभरात चार ते पाच तालुक्यातील प्रमुख गावांचा दौरा करत मंगळवारच्या मतदानाच्या नियोजनात कसलीही कसर सोडली नाही. दिवसभर व्यक्तिगत गाठीभेटीची धामधूम पाहावयास मिळाली.

.......

मानेंच्या भेटीगाठी सकाळी सहा वाजल्यापासून

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार धैर्यशील माने सोमवारी दिवसभर मतदारांच्या गाठीभेटीत व्यस्त होते. सकाळी सहा वाजताच ते मतदारसंघातील लोकांना भेटण्यासाठी घराबाहेर पडले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिरोळ, वाळवा, शिराळा, हातकणंगले, पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील मोठ्या लोकवस्तीच्या गावानांही त्यांनी भेट दिली. इस्लामपूर, वाळवा, वारणा कोडोली, शिरोळ तालुक्यातील विविध गावांतील कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधला.

............

शेट्टींनी केले कार्यकर्त्यांना रिचार्ज

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार व महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी हे रविवारी शाहूवाडी तालुक्यात मुक्कामाला होते. सोमवारी पहाटे साडेपाच वाजता ते मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीला बाहेर पडले. शाहूवाडी तालुक्यातील विविध गावांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी पन्हाळा गाठला. पन्हाळा, कोडोली येथे कार्यकर्त्यांसोबत मंगळवारच्या मतदानासंदर्भात चर्चा करुन वडगावमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते इचलकरंजीत दाखल झाले. इचलकरंजीत स्वाभिमानी व महाआघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी चर्चा केली.

..............

मंडलिकांचा कागल, राधानगरी दौरा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी सोमवारी विविध भागांचा दौरा केला. सकाळी त्यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मंगळवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. सकाळी दहा वाजता ते निवासस्थानातून बाहेर पडले. त्यानंतर कणेरीमठ येथे जाऊन त्यांनी काडसिध्देश्वर महाराज यांची भेट घेतली. कागल तालुक्याचा दौरा करताना नदी किनारा येथे माजी आमदार संजय घाटगे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राधानगरी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली.

....................................

महाडिकांचे प्रमुख कार्यकर्त्यांसोबत प्लॅनिंग

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार व खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. सकाळी सात वाजल्यापासून मतदारसंघातील नेते मंडळी, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्यासोबत मंगळवारचे नियोजन, मतदारसंघाचा आढावा घेण्याचे काम सुरू होते. ताराराणी चौक येथील प्रचार कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. अधिकाधिक मतदानासाठी सायंकाळी त्यांनी पाचगाव, आर.के. नगर भागाचा दौरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय किचन विरोधात गुरुवारी मोर्चा

$
0
0

कोल्हापूर : विशिष्ट लोकांना आर्थिक लाभ देणारे व आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या केंद्रीय किचन प्रणालीविरोधात कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्यावतीने २५ एप्रिल रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता टाउन हॉल बागेतून मोर्चाला सुरूवात होणार आहे. केंद्रीय किचनमुळे गेल्या सोळा ते सतरा वर्षांपासून पोषण आहारासाठी काम करणाऱ्या महिला बेरोजगार होणार आहेत. ज्या मुलांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे, त्या मुलांना गरम व ताजा आहार मिळणार नाही. यासंदर्भात संघटनेच्यावतीने आचारसंहिता भंगाची तक्रार जिल्हाप्रशासनाकडे केली होती. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. मोर्चात जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेत काम करणारे कामगार, ठेकेदार, आचारी, बचतगटाच्या महिला यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष ए.बी. पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुदरगडमध्ये १३ घरफोड्या, ५० तोळे सोन्याचे लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

भुदरगड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून रविवारी मध्यरात्री बंद घरांना लक्ष करीत कूर-मिणचे परिसरात तब्बल १३ घरफोड्या करून सुमारे ५० तोळे सोन्याचे दागिने व एक लाखाची रोकड लंपास केली. या चोरीची नोंद घेण्याचे काम दिवसभर भुदरगड पोलिसांत सुरू होते. चोरीची नोंद देण्यासाठी नागरिकांची रीघ लागली होती.

भुदरगड तालुक्यात चोरट्यांनी बंद घराचे, दूध संस्थांचे दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. मिणचे खुर्द येथे चार, बसरेवाडी येथे चार, निळपण येथे तीन, कूर येथे दोन ठिकाणी घरफोड्या केल्याची घटना घडली आहे. कूर येथील श्रीपती कृष्णा सुतार यांच्या घरातील सुमारे ४५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व ५० हजारांची रोकड लंपास केली. बसरेवाडी येथील नृसिंह दूध संस्थेचा बंद दरवाजा तोडून सुमारे १५ हजाराची रोकड लंपास केल्याची वर्दी भिकाजी मोरे यांनी पोलिसात दिली. राधाकृष्ण दूध संस्थेतील नऊ हजारांची रोकड लुटली आहे. शिवाजी पाटील यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून पाच तोळे सोने लंपास केले आहे. दत्त कृपा किराणा स्टोअर्स फोडून चार हजारांची रोकड लंपास केली.

मिणचे येथील सुरेश केरबा नलवडे, सुनील रंगराव देसाई, सुरेश आडके यांची बंद घरात चोरी झाली आहे. सुनंदा पाटील यांची सोन्याची चेन, टॉप्स, मंगळसूत्र असा सुमारे अडीच तोळ्यांचा ऐवज लंपास केला. निळपण येथील नामदेव पाटील, शिवाजी देसाई, शेलार यांच्या घरी चोरी झाली. कूर येथील श्रीपती कृष्णा सुतार हे बाहेरगावी होते याचाच फायदा चोरट्यांनी उठवत बांगड्या, कोल्हापुरी साज, पाटल्या, पुजा पाटल्या, पोहे हार, मंगळसूत्र, चिताक, ब्रेसलेट, अंगठी, हार, छोटी अंगठी, कानातील डुल, चांदीची भांडी व रोख ५० हजार रुपये लंपास केले. कूर येथील राजेंद्र धोंडीराम सारंग यांच्याही घरी चोरी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान साहित्य केंद्रांवर पोहोच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदानासाठीच्या आवश्यक साहित्य सोमवारीच मतदान केंद्रावर पोहोच करण्यात आले. यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून मतदान यंत्रांसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत सर्व केंद्रांवर यंत्रे पोहचली. 'उत्तर' विधानसभा मतदारसंघातील साहित्याचे वाटप विवेकानंद कॉलेज, 'दक्षिण' मतदारसंघातील साहित्य वाटप राम गणेश गडकारी हॉल, 'करवीर' मतदारसंघातील साहित्य वाटप रमणमळा येथील सरकारी गोडावूनमधून करण्यात आले.

एक मतदान यंत्रावर १५ उमेदवारांची नावे, फोटो, चिन्ह आणि एक 'नोटा'चे बटण असते. यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी १५ उमेदवार असल्याने एक आणि 'हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी १७ उमेदवार असल्याने प्रत्येक केंद्रावर दोन मतदान यंत्रे, एक बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट, व्हीव्हीपॅट यंत्र, बोटाला लावण्यासाठी शाई त्या केंद्रातील केंद्राध्यक्षांसह पाच कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली. हे पथक सील असलेली यंत्रे आणि इतर साहित्य घेऊन सरकारी वाहनातून मार्गस्थ झाले. साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी सहा वाजताच सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई, नंदकुमार काटकर यांनी दिले होते. निवडणूक कामासाठीचा आदेश असल्याने साहित्य घेण्यासाठी अधिकारी, कर्मचारी वेळेत पोहोचल्याचे दिसले.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना विविध सूचना आणि यंत्र हाताळणीसंबंधी माहिती दिली. सकाळी यंत्र सुरू न झाल्यास त्वरित माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान यंत्रात बिघाड झाल्यास संबंधीत मतदान केंद्रातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांतर्फे अर्धा तासात राखीव मतदान यंत्र उपलब्ध असल्याची माहिती सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना देण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वाढण्यासाठी मतदान यंत्राचे सील फोडताना आणि यंत्राची जोडणी करताना उमेदवार, पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले आहे.

गेल्या आठवड्यात इव्हीएम, व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिटची तांत्रिक तपासणी करून विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप करण्यात आले होते. चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी गडहिंग्लजमधील पॅव्हेलियन हॉल, एम. आर. हायस्कूल, राधानगरी मतदारसंघासाठी गारगोटीतील जवाहर बाल भवन, मौनी विद्यापीठ, कागल मतदारसंघासाठी जवाहर नवोदय विद्यालय, शाहूवाडी मतदारसंघासाठी जुने सरकारी धान्य गोदाम, शाहू हायस्कूल, इचलकरंजी मतदारसंघासाठी राजीव गांधी भवन, शिरोळ मतदारसंघासाठी तहसील कार्यालय, पद्माराजे हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजमधून साहित्य देण्यात आले. येथून घेतलेले साहित्य कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील केंद्रांवर ३२३ बस, ४८९ जीप, ३५ टेम्पो ट्रव्हलर, ११ ट्रक तर हातकणंगले मतदारसंघातून २७५ बस, २८६ जीप, १८ टेम्पो, २० ट्रक यांसह अन्य ४६ वाहनांतून पोहोच करण्यात आले.

दिव्यांगासाठी वाहन व्यवस्था

निवडणूक प्रशासनाने शहरातील मतदान केंद्रांत दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था करण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर टाकली आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना आदेश देण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने वाहनाची सुविधा उपलब्ध केल्याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल घेतला. शहरात आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी याचा आढावा घेतला. ऑनलाइन पीडब्लूडी अॅपवर वाहन व्यवस्थेची मागणी केलेल्या दिव्यांगांनाही केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी व्यवस्था आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माढ्यात दुरंगी लढत

$
0
0

माढ्यात दुरंगी लढत

सोलापूर :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाल्याने या मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. वंचित आघाडीचे उमेदवार मोरे यांच्यासह एकूण ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा स्वतः केल्यानंतर आणि त्यानंतर या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपशी जवळीक केल्याने व भाजपच्या मदतीने झेडपीच्या अध्यक्ष झालेले व नंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत असलेले संजय शिंदे यांच्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. शिवाय राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केल्याने या निवडणुकीला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.

संजय शिंदे यांच्यासाठी शरद पवार, धनंजय मुंडे, रोहित पवार, अजित पवार तर भाजपच्या निंबाळकर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी जाहीर सभा घेतल्या. या सर्वांच्या सभांमुळे व आरोप प्रत्यारोपांमुळे माढ्याची निवडणूक चांगलीच गाजली. २०१४ मध्ये मोदी लाट असताना ही खासदार मोहिते-पाटील २५ हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आले होते. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला असून, मोहिते-पाटील भाजपमध्ये गेल्याने मतदार कोणाच्या पाठिशी राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.......

माण तालुक्यात सर्वाधिक ३ लाख ३८ हजार मतदार

माढा मतदार संघासाठी एकूण सुमारे १९ लाख ४ हजार ८४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. टपाल मतदार ४ ७२९ आहेत, ९ हजार ९६८ दिव्यांग मतदार आहेत. ज्यामध्ये १५०१ अंध व १३२७ मूकबधिर मतदारांचा समावेश आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३ लाख ३८ हजार २२७ मतदार आहेत. करमाळा तालुक्यात ३ लाख २ हजार ८९५, माढा ३ लाख २४ हजार ६८२, सांगोला २ लाख ८९ हजार ४१७, माळशिरस ३ लाख १९ हजार ४६१ आणि फलटण तालुक्यात ३ लाख ३० हजार १६३ मतदारांची संख्या आहे. एकूण २०१५ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागात १८४०, शहरी भागात १८५ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज फैसला करणार मतदारराजा निवडणूक कर्मचारी २२९६ मतदान केंद्रांवर रवाना

$
0
0

आज फैसला करणार मतदारराजा

साताऱ्यात दुरंगी लढत

सातारा :

सातारा लोकसभा मतदारसंघात १८ लाख ३८ हजार ९८७ मतदार ९ जणांचे भविष्य ठरविणार आहेत. पुरुष मतदार ९ लाख ३५ हजार ८७८ इतके आहेत, तर महिला मतदार ९ लाख ३ हजार ९२ इतक्या आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या १७ इतकी आहे. सोमवारी तालुक्यांच्या मुख्यालयातून निवडणूक कर्मचारी २२९६ मतदान केंद्रांवर रवाना झाले. मतदान प्रक्रियेसाठी २ हजार ८७३ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

दिव्यांग मतदार केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, घरातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील डमी पत्रिका, तसेच भिंग ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदार संघामध्ये आचारसंहिता भंगाचे ४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व सौम्य स्वरुपाचे गुन्हे असून, एकही गंभीर गुन्हा दाखल झाला नाही. जिल्ह्यातील एकूण ३०१ मतदान केंद्र्रांवर लाईव्ह वेबकास्टिंगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. यावर जिल्हास्तरावरून नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून निरीक्षण ठेवण्यात येणार आहे. एकूण सहा मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला सांभाळणार आहेत. या ठिकाणी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच महिला आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार :

उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी), नरेंद्र पाटील (शिवसेना), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी), सहदेव ऐवळे (वंचित बहुजन आघाडी)

आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी).

.....

उदयनराजेंच्या समर्थकांवर अपहरणाचा गुन्हा

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांच्यासह पाच जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात अहपरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. लोकसभेचे उमेदवार अभिजित बिचुकले यांचे गाडीतून अपहरण करून त्यांना प्रचार न करण्यासाठी धमकावल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अ‍ॅड. विकास पवार, पंकज चव्हाण, अ‍ॅड. अंकुश जाधव, सुनील काटकर तसेच गाडीवरील ड्रायव्हर (सर्व रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकासह दोघांवर गुन्हा दाखल

$
0
0

सोलापूर :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना केल्याप्रकरणी बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि प्रबुद्ध भारत मंडळाचे अध्यक्ष अक्षय माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील शिवप्रेमींनी मंगळवारी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्याकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

सोमवारी सायंकाळी निघालेल्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत नगरसेवक चंदनशिवे संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष अक्षय माने यांच्या प्रबुद्ध भारत मंडळाने कोलंबिया विद्यापीठाची मोठी प्रतिकृती साकारली होती. प्रतिकृतीच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपतींच्या रूपात सिंहासनावर विराजमान झालेली मूर्ती साकारली होती. या वरून शिवप्रेमींमध्ये छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाल्याची भावना निर्माण झाली. पी. बी. ग्रुपने जाणीवपूर्वक व खोडसाळपणे हा प्रकार केल्याचा आरोप करीत आनंद चंदनशिवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी प्रबुद्ध भारत मंडळाने बाबासाहेबांच्या सिंहासनारूढ मुर्तीसह वाजतगाजत मिरवणूक काढली. मात्र मिरवणूक मध्यवर्ती ठिकाणी आल्यानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. सर्वांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आनंद चंदनशिवे यांना विचारना करीत मिरवणुकीतून मूर्ती तातडीने हटविण्यास सांगताच एकच गोंधळ निर्माण झाला. मिरवणुकीतून मूर्ती हटविण्याबरोबरच प्रबुद्धने मिरवणूकच आटोपती घेतली. मूर्तीसह देखावा असलेला कंटेनर मध्यरात्री पुना नाका येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर बाबासाहेबांची सिंहासनारूढ मूर्ती उतरवून तातडीने तिची बाहेरगावी पाठवून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचडीएफसी वर ऑनलाइन दरोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एचडीएफसी बँकेच्या शाहुपूरी शाखेतील यंत्रणा हॅक करून ६७ लाख, ८८ हजार रुपयांवर ऑनलाइन दरोडा टाकल्याचे शनिवारी उघडकीस आले. ही रक्कम कोल्हापूर अर्बन बँकेच्या खात्यावरील आहे.

बँकेतील ३४ व्यवहाराच्या अनाधिकृत नोंदी सापडल्या असून गुडफ्रायडेच्या सुटीदिवशी बँकेचा सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी पैसे काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. याप्रकरणी कोल्हापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यरत अधिकारी बाजीराव दगडू खरोशे (वय ५०, भानुदास सरनाईकनगर, नवीन वाशीनाका) यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात हॅकर्सवर गुन्हा दाखल केला असून गुन्हा सायबर शाखेकडे वर्ग केला आहे.

शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगावेश येथे दि कोल्हापूर अर्बन बँकेची मुख्य शाखा आहे. या बँकेची एचडीएफसी बँक, शाहुपूरी शाखेत दोन खाती आहेत. अर्बन बँकेतर्फे खाते क्रमांक एकवरून खातेदारांना आरटीजीएस व एनईएफटी सुविधा दिली जाते. खाते क्रमांक दोन वरून आयएमपीएस, ई-कॉम, एटीएम सेटलमेंट प्रणालीची सुविधा आहे. या प्रणालीत दररोज सुमारे दोन कोटींच्या आसपास व्यवहार होतो. १९ एप्रिल रोजी बँकांना सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्बन बँकेचे कामकाज बंद होते. शनिवारी (ता. २०) बँकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सहायक अधिकारी शिल्पा मोहिते व मीनाक्षी लुकतुके यांना बँकेच्या खात्यावरून ६७ लाख, ८८ हजार, ४१ रुपये डिजिटल (आय. एम. पी. एस) पेमेंटद्वारे वर्ग झालेचे दिसून आले. त्यांनी ही माहिती बँकेचे मुख्य कार्यरत अधिकारी खरोशे यांना दुरध्वनीवरून दिली. खरोशे तत्काळ शाखेत येऊन त्यांनी खात्यांवरील विवरणपत्रांची पडताळणी केली. त्यावेळी दोन खात्यांवरुन १९ एप्रिलला अनाधिकृतपणे रक्कमा वर्ग झाल्याचे निदर्शनास आले. ऑनलाइनद्वारे रक्कम वर्ग झालेली विवरणपत्राच्या प्रती काढून पडताळणी केली असता ३४ व्यवहारांच्या नोंदी झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी हा प्रकार वरिष्ठांना सांगून शाहूपुरी पोलिसांना रविवारी कळविले.
दरम्यान याप्रकरणी पोलिस निरीक्षक मोरे यांनी कर्मचाऱ्यासह एचडीएफसी बँकेत धाव घेतली मात्र, सुट्टी असल्याने त्यांनी केवळ बँकेतील सर्व ऑनलाइन व्यवहारांची माहिती घेतली. त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. हा गुन्हा सायबर गुन्हे अन्वेशन शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सोमवारी (ता. २२) बँकेचे
व्यवहार सुरू झाल्यानंतर पथकातील सायबर तज्ज्ञांकडून माहिती घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावमध्ये शांतता, चुरस कायम

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गटातटाच्या राजकारणामुळे संवेदनशील गाव म्हणून ओळखल जाणाऱ्या पाचगावमध्ये शांततेत पण चुरशीने मतदान झाले. खासदार धनंजय महाडिक व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील समर्थकांतील ईर्ष्याही पाहावयास मिळाली. दोन्ही गटाकडून जास्तीत जास्त मतदान आपआपल्या उमेदवाराला व्हावे यासाठी धावपळ सुरू होती. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचगाव मतदान केंद्र परिसरात मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता.

पाचगाव गावठाण व नवीन ६५ कॉलन्यामधील मतदानासाठी तीन ठिकाणी मतदानाची सोय होती. पाचगावमधील जिल्हा परिषद शाळा, शांतीनगर विद्यामंदिर आणि आरकेनगर शाळा या ठिकाणच्या केंद्रांवर रांगा होत्या. मतदारांना उन्हाच्या झळाचा त्रास होऊ नये म्हणून मतदान केंद्र परिसरात मंडप उभारला होता. मतदानासाठी सकाळच्या टप्प्यात महिलांची गर्दी लक्षणीय होती. दरम्यान आमदार पाटील गटाचे समर्थक व पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रविण कुंभार, संग्राम पोवाळकर, धनाजी सुर्वे, प्रकाश गाडगीळ, नारायण गाडगीळ, संजय पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते युतीचे उमेदवार प्रा. मंडलिक यांच्यासाठी सक्रिय होते. शिवाय दोन्ही गटांच्या समर्थक कार्यकर्त्यांची मतदारांना मतदान केंद्रापर्यत पोहचविण्यासाठी धावपळ सुरू होती. पाचगाव शाळा परिसर, हनुमान मंदिर येथे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार महाडिक यांच्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भिकाजी गाडगीळ, मनीषा पाटील, अमर कारंडे, संभाजी शिंदे, आनंदा पोवार, अमोल गवळी, विद्यमान सदस्य शितल गवळी यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यांची यंत्रणा सक्रिय होती. आर. के. नगर मतदान केंद्रात सकाळी दहा वाजण्यास सुमारास दोन महिला मतदारांकडे ओळखपत्र नसल्यामुळे त्यांना मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. केंद्रातील सजग नागरिकांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत आधारकार्ड असताना त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या पेठांत इर्ष्येने मतदान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

छोट्या गल्ल्या, तिकटी, चौकांनी व्यापलेल्या जुन्या पेठांत आज इर्ष्येने मतदान झाले. मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. दुपारच्या टप्प्यात उन्हामुळे मतदानावर परिणाम झाला होता. पण सायंकाळच्या सत्रात मतदारांच्या गर्दीने पुन्हा उसळी घेतल्याचे चित्र पहायला मिळाले.

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांचे वास्तव्य असलेल्या या भागात अनेक सरकारी कार्यालये येतात. सकाळी सात वाजता तोरस्कर चौकातील राजर्षी शाहू हायस्कूल, शुक्रवार पेठ गुणे बोळातील ग. गो. जाधव विद्यालय, गंगावेशेतील शाहू उद्यान मतदान केंद्रावर सुरुवातीला मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. पंधरा मिनिटांत दुसरे यंत्र उपलब्ध करुन दिल्यावर मतदान सुरू झाले. दरम्यान, शंभर मीटर अंतरावर राजकीय पक्षांनी उभारलेल्या बूथवरील गर्दी हटवताना पोलिस व कार्यकर्त्यांत काही ठिकाणी वादावादी झाली. पण मतदारांच्या वाढत्या गर्दीने जमावबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करताना पोलिसांवर मर्यादा आल्या. शुक्रवार पेठेतील राजर्षी शाहू विद्यानिकेतन येथील केंद्रावर ताराराणी आघाडीचे नगरसेवक किरण शिराळे तर शिवसेनेचे विजय सावंत मतदारांना मार्गदर्शन करत होते. दोघांनी मतदानासाठी आलेल्या दोन अंध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यास मदत केली. ग. गो. जाधव विद्यानिकेतनजवळ माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, सतीश पाटील, युतीचे किशोर घाटगे, संतोष घोडगिरीकर, विजय सावंत, दीपक काटकर मतदारांचे स्वागत करत होते. मतदान केंद्रापर्यंत दुचाकी नेण्यावरुन पोलिस व मतदारांत खटके उडत होते. रमाबाई आंबेडकर, खर्डेकर विद्यालयातील मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी होती. राजमाता जिजामाता हायस्कूलच्या तिन्ही केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. काँग्रेसचे नगरसेवक प्रताप देसाई येथे सक्रीय होते.

शनिवार पेठेतील पद्माराजे विदयालयाच्या केंद्रावर सकाळपासून पुरुष व महिलांचा स्वतंत्र रांगा लागल्या होत्या. केंद्राबाहेर उभारण्यात आलेल्या मंडपामुळे उन्हाच्या त्रासापासून मतदारांची सुटका झाली. खोलखंडोबा सांस्कृतिक हॉल, तोरस्कर चौकातील राजर्षी शाहू हायस्कूल, महापालिका शाहू विद्यालयाजवळील मतदान केंद्रावर गर्दी पहायला मिळाली. युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते किती टक्के मतदान झाले याचा सातत्याने आढावा घेत होते.

भाजपचे महानगर अध्यक्ष देसाई, माजी नगरसेवक धनंजय सावंत, नागेश घोरपडे, सुशील भांदिगिरे या युतीच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील मतदान केंद्रातील कार्यकर्त्यांना भेटी दिल्या. सोन्यामारुती चौक डीवायएसपी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, सांस्कृतिक हॉल, करवीर पंचायत समितीतील मतदान केंद्रावर सिद्धार्थनगर, राजेबागस्वार, जुना बुधवार पेठेतील मतदारांची गर्दी पहायला मिळाली. महिला मतदारांची उपस्थिती लक्षणीय होती.

महानगरपालिकेच्या इमारतीतील पाच मतदान केंद्रांवर कुंभार गल्ली, जोशी गल्ली, गवळी गल्ली, तेली गल्ली, म्हसोबा गल्ली, नष्टे गल्ली, परीट गल्ली, शनिवार पोस्ट परिसरातील नागरिकांचे मतदान होते. सकाळपासून येथ मतदारांच्या रांगा लागल्या. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, त्यांच्या पत्नी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या खजानिस वैशाली क्षीरसागर व त्यांच्या मुलांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास रांगेत उभे राहून मतदान केले. मतदानानंतर त्यांनी 'जय महाराष्ट्र'ची प्रतिक्रिया दिली.

घिसाड गल्लीतील देशभूषण हायस्कूल येथे, अकबर मोहल्ला, घिसाड गल्ली, लक्ष्मीपुरीतील मतदारांनी मतदान केले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रमेश पोवार कार्यकर्त्यांसमवेत तळ ठोकून होते. शिवाजी तंत्र निकेतन, लक्ष्मीपुरी भाजी मार्केट परिसरातील रा. ना. सामाणी विदयालय, कॉमर्स कॉलेज, सुसर बागेतील डॉ. झाकीर हुसेन उर्दू विद्यालयात युतीच्या कार्यकर्त्यांत जोष पहायला मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images