Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोलापूर-पुणे मेट्रो धावणारकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

0
0

सोलापूर-पुणे मेट्रो धावणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'नागपुरात ब्रॉडगेज मेट्रोचा कारखाना तयार होणार आहे, चार डब्यांच्या छोट्या एसी गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे. ४० किलोमीटर प्रति तास क्षमता असलेल्या या गाड्या आहेत. सोलापुरातून जाणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या रद्द करून प्रत्येक तासाला पाच ब्रॉडगेज मेट्रो धावतील. सोलापूरपासून पुण्यापर्यंत व पुण्यापासून मुंबईपर्यंत या मेट्रो धावतील. मी दिलेली आश्वासने आणि केलेल्या घोषणा पूर्ण होतात. त्यामुळे सोलापूरकरांचा मेट्रोतील गारेगार प्रवास नक्की आहे,' असे अश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

सोलापुरात भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले, 'मी जे बोलतो ते करतोच, गेल्या निवडणुकीवेळी मी दिलेल्या वाचनाची पूर्तता केली आहे. आता सोलापूरच्या सार्वजनिक विकासासाठी कटिबद्ध आहोत. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महास्वामींना संसदेत पाठवा. मी तुम्हाला वाचन देतो अवघ्या तीन महिन्यांत सोलापूरला हवेत चालणारी डबल डेक्कन बस चालू करतो. तास डीपीआर तत्काळ महापालिकेने ठराव करून पाठवावा. सोलापूरमध्ये मी ड्राय पोर्ट करणार आहे.'

दुष्काळाचा प्रश्न निकाली काढणार

सोलापूर शहर व जिल्ह्यातील दुष्काळी भागातील प्रश्न निकाली काढणार आहोत. सोलापूरचा टॉवेल एकवेळ जगप्रसिद्ध होता. आज स्थिती वाईट आहे. सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सोलापुरात उद्योगधंदे आले पाहिजेत. रोजगार निर्माण झाला पाहिजे. येणाऱ्या काळात सोलापूरमधून एक्स्पोर्ट झाले पाहिजे आणि एक्स्पोर्ट होण्यासाठी लॉजिस्टिक कॉस्ट मोठी अडचण आहे. उद्योग वाढीसाठी लॉजिस्टिक कॉस्ट कमी करण्यासाठी ड्राय पोर्ट करण्याला प्राधान्य देणार आहोत, असेही गडकरी म्हणाले.

स्वामींच्या डोक्यावर मोदींचा करंट

स्वामीजी तुम्ही काळजी करू नका, तुमच्या गाडीला गडकरी व फडणवीस हे डबल इंजिन आहे आणि वरून मोदींचा करंट आहे. त्यामुळे तुमची बुलेट ट्रेन धावल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एसी कोचमध्ये आरामात बसा. जनतेचे कल्याण करा, गाडी आपोआप धावेल, असेही गडकरी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नरेंद्र मोदींची आज अकलूजमध्ये सभा

0
0

नरेंद्र मोदींची

आज अकलूजमध्ये सभा

पंढरपूर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज, बुधवारी सकाळी अकलूज येथे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधानांची ही सभा माढा, बारामतीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व पुणे भागासाठी भाजपला उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.

सोलापूर लोकसभेसाठीचा प्रचार मंगळवारी संपला आहे. सोलापुरात १८ रोजी मतदान होणार आहे, त्याच्या आदल्या दिवशीच पंतप्रधान मोदी अकलूज येथे सभा घेणार आहेत. त्यावर विरोधकांनी आक्षेप नोंदविला होता. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. अकलूज माढा मतदारसंघात असून, तेथे २३ रोजी मतदान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला बहुमत देऊनजनतेने चूक केली

0
0

भाजपला बहुमत देऊन जनतेने चूक केली: उदयनराजे भोसले

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने पूर्ण तळमळीने एखाद्या चित्रपटाप्रमाणे अभिनय करून देशाला भुलविले. सर्वसामान्य जनता ही यामध्ये वाहवत गेली. लोकांनी पूर्ण अपेक्षेने भाजपला बहुमत दिले परंतु, जनहिताचा एकही निर्णय सरकारने घेतला गेला नाही. जनतेने भाजपला बहुमत देऊन चूक केली, असा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला.

नागठाणे (ता. जि. सातारा) येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. या प्रसंगी कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी उपस्थित होते. छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, 'दर वर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणार या आश्वासनाची वचनपूर्ती सरकारकडून झाली नाही. उलट जीएसटी कराच्या केलेल्या अंमलबजावणी यामुळे छोटे मोठे व्यवसाय बंद पडले व लाखो तरुण बेरोजगार झाले. गेल्या ४५ वर्षांत नव्हती एवढी बेकारी या पाच वर्षांत वाढली आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असे म्हणणाऱ्या सरकारने जाचक अटी व निकष लावून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचं काम केले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल प्रचार

0
0

डिजिटल प्रचार

कराड :

सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ते मतदारांना भूमिका पटवून देत आहेत. या मतदारसंघात सुमारे एक लाख नवमतदार असून, त्यापैकी बहुतेक तरुण टेक्नोसॅव्ही आहेत. त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहचून आपल्या उमेदवारीची आणि प्रचाराची माहिती देण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या टीमने नरेनअ‍ॅप नावाचे अँड्रॉईड अ‍ॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून पाटील यांचा डिजिटल प्रचार सुरू आहे.

......

चौकीदार पळून गेले

कराड :

सवंग लोकप्रियतेसाठी अच्छे दिन सारख्या मोठ्या घोषणा करून भावनिक बोलून लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजप सरकारने केले. मागील निवडणुकीमध्येही विकासाच्या मुद्द्यावर काही बोलण्यासारखे नसल्याने चौकीदार चौकन्ना आहे. या सारख्या भावनिक घोषणा देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. चौकीदार चौकन्ना आहे, तर मग नीरव मोदी आणि विजय मल्या का पळून गेले, असा प्रश्न कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित केला. करड येथे आयोजित खासदार उदयनराजे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

चाफळमध्ये रंगला रथोत्सव

कराड :

'बोल बजरंगबली की जय,' 'सीताराम की जय,' 'प्रभु रामचंद्र की जय'च्या जयघोषात गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत हजारो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत व सासनकाठ्यांच्या साक्षीने चाफळचा श्रीराम रथोत्सव मंगळवारी सुर्योदयाबरोबर उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. गुलालाने माखलेले युवक-युवती परस्परांना गुलाल लावण्यात रंगून गेलेले होते. ही वेळ नेमकी सुर्योदयाची असल्याने अरुणाचा लालिमा पूर्व क्षितिजावर पसरल्याने सर्वच वातावरण धुंद बनून गेले होते. समर्थ रामदास स्वामींनी सन १६४८पासून सुरू केलेला श्रीरामनवमी उत्सव आजही अखंडितपणे तीर्थक्षेत्र चाफळ येथे सुरु आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते एकादशी, असा उत्सव सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ही माझी शेवटची निवडणूक सुशीलकुमार शिंदे यांचे भावनिक आवाहन

0
0

ही माझी शेवटची निवडणूक

सुशीलकुमार शिंदे यांचे भावनिक आवाहन

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'प्रकाश आंबेडकर जातीयवादी पक्षासोबत गेले आहेत, ते तत्वशून्य आहेत. प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेबांच्या सेक्युलॅरिझमचा खून केला आहे,' असा आरोप सोलापूर लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. मंगळवारी दुपारी प्रचार संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, '१९७४पासून निवडणुका लढवत आलो आहे. सोलापूर जिल्हा हा एकच माझा मतदारसंघ राहिलेला आहे. मी कधीही जिल्हा सोडला नाही. त्यामुळे जिल्ह्याचा आभारी आहे. १९७४ पासून २०१४चा अपवाद वगळता आजपर्यंत सर्व निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिले. १९९८-९९मध्ये दोन्ही वेळी सर्वसाधारण जागेवरून निवडून दिले. दक्षिण सोलापूर तालुक्यातून २००३ आणि २००४ या दोन्ही वेळी आमदारकीला निवडून दिले. हा लोकशाहीचा गौरव समजतो. एकाद्या दलित कार्यकर्त्याने सर्वसाधारण जागेवर निवडून येणे ही मोठी कठीण गोष्ट आहे. पण, सोलापूरकरांनी जगाला दाखवले की, आमचा जिल्हा हा सर्वधर्म समभावाचा जिल्हा आहे. इथे जाती धर्माच्या नावावर काही चालत नाही. आता यापुढे कोणत्याही निवडणुकीत मी उभा राहणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक आहे.'

आंबेडकर भाजपने उभे केलेले पिल्लू

'ही निवडणूक एकीकडे धर्मावर तर दुसरीकडे जातीवर आधारित असलेल्यांच्या विरोधात लढवत आहोत. भाजपने केवळ धर्माच्या आधारावर उमेदवार उभा केला आहे. भाजपने आपला हेतू पूर्ण करण्यासाठी त्यांचा बळी देण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. बाबासाहेबांचे नातू वंचित आघाडीच्या माध्यमातून एमआयएम या कट्टर जातीयवादी पक्षाबरोबर गेले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेबांच्या सेक्युलॅरिझमचा खून केला आहे. जात-पात न मानणारा सीपीएम त्यांच्या सोबत गेला आहे. आंबेडकर भाजपने उभे केलेले पिल्लू आहे. मतांच्या विभागणीसाठीच आंबेडकर उभे आहेत,' असा आरोपही शिंदे यांनी केला.

भाजपची कामे बघायला दुर्बिण लावून बसलोय

'भाजपच्या खासदारांनी एक तरी प्रकल्प सोलापुरात आणलाय का? मी दुर्बिण लावून बसलोय पण, कुठे दिसतेय त्यांचा प्रकल्प. टीका करणे फार सोपे मात्र, कष्ट करून आणणे सोपे नसते. मी नेहमी विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर गेला आहे. पण, आज भाजपकडे विकासाचा अजेंडा नाही. मोदींनी पाच वर्षांत सोलापुरातील टेक्सटाइलमधून एक मिटर तरी कपडा खरेदी केलात का? सोलापूरचे जुने विमानतळ दुसरीकडे नेणार आणि त्या ठिकाणी आयटी पार्क सुरू करणार, असे अश्वासनही शिंदे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे-पवार-ठाकरेंमध्ये गुफ्तगू

0
0

शिंदे-पवार-ठाकरेंमध्ये गुफ्तगू

सोलापूर :

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे सोलापूरचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंगळवारी सकाळी सोलापुरातील बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये एका बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली या बाबतचा तपशील समजू शकला नाही.

शरद पवार आणि राज ठाकरे सोमवारी प्रचाराच्या निमित्ताने सोलापूरच्या दौऱ्यावर होते. रात्री त्यांनी सरोवरामध्ये मुक्काम केला. मंगळवारी सकाळी ते आपापल्या नियोजित कार्यक्रमासाठी जाणार होते. सकाळी लवकर सुशीलकुमार शिंदे पवार यांना भेटण्यासाठी सरोवरमध्ये आले. या वेळी माध्यम प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना संबंधितांच्या कक्षापासून खाली पाठविण्यात आले. या नंतर उभयतांनी एका बंद खोलीत काहीकाळ चर्चा केल्याचे सांगण्यात आले. नेमकी चर्चा काय झाली हे समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गो. मा. पवार यांचे निधन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. डॉ. गो. मा. पवार यांचे मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.

गेले दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार यांच्या निधनाची बातमी समजताच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजापूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. पवार यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्र लिहिले आहे. या चरित्रासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. महर्षी शिंदे यांचे ते नातजावई होत.

......

संक्षिप्त परिचय

प्रा. गो. मा. पवार मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते. मराठी साहित्याच्या सेवेबरोबरच त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्य व साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला होता. प्रा. पवार यांचा जन्म १३ मे १९३२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील पानगाव येथे झाला. शालेय शिक्षण नरखेड येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये झाले. पुणे विद्यापीठातून त्यांनी मराठी विषयातून एमएचे शिक्षण घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून त्यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली. त्या नंतर अध्यापनाच्या क्षेत्रात ३३ वर्षे सेवा केली. सरकारी महाविद्यालय अमरावती, औरंगाबाद व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथेही अध्यापन कार्य केले. १९९२मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर हीच कर्मभूमी मानून विपुल साहित्य निर्मिती केली. मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मीमांसा करणारे प्रा. गो. मा. पवार पहिले व एकमेव समीक्षक आहेत. मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी आतापर्यंत १६ ग्रंथाचे लेखन केले असून, ६० शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी पीएच. डी. आणि २२ विद्यार्थ्यांनी एम. फील प्राप्त केली आहे.

..............

प्रसिद्ध पुस्तके (लिहिली, संपादित)

विनोद-तत्व व स्वरूप

मराठी विनोद-विविध अविष्काररूपे

निवडक फिरक्या

निवडक मराठी समीक्षा

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे-जीवन व कार्य

निवडक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे-भारतीय साहित्याचे निर्माते

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे-समग्र वाड्मय खंड १ व २

द लाईफ अँड वर्क्स ऑफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

.........

मिळालेले पुरस्कार

साहित्य अकादमी पुरस्कार, नवी दिल्ली

भैरू रतन दमाणी पुरस्कार, सोलापूर

शिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार, कुर्डुवाडी

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, वाई

पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरा नगर

महाराष्ट्र फाउंडेशन मराठी साहित्य पुरस्कार, मुंबई

महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ठ वाड्मय पुरस्कार

धोंडीराम माने साहित्य रत्न पुरस्कार, औरंगाबाद

शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार, सोलापूर

मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, औरंगाबाद

.......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशीलकुमार शिंदेंना कायमचे घरी बसवले पाहिजेः आंबेडकर

0
0

सोलापूर

सोलापूर लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यातील पंचतारांकित हॉटेलमधील भेटीनंतरचा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. मंगळवारी दुपारी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंबेडकरांवर टीकेची झोड उठविली होती. तर सायंकाळी आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पलटवार करीत सुशीलकुमार शिंदेंना कायमचे घरी बसवले पाहिजे, असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे.

'प्रचारात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. मागील ७० वर्षांत आम्हाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातून आम्हाला डावलल्याने वंचित समाजा पाठिशी उभारला आहे. ही निवडणूक धनगर समाज लढवतोय, अशी परिस्थिती आहे. या शिवाय व्यापारी आणि इतर समाजाचे लोकही पाठिशी आहेत. विमानतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. शहरात पाण्याचा प्रश्न आहे, नियोजन केल्यास पाणीपुरवठा सुरळीत होईल. महाराष्ट्र सरकारने उजनी पाइपलाइन बाबत जुमलेबाजी केली आहे. रंगभवन ते आंबेडकर चौकापर्यंत २२ कोटी खर्चून स्मार्टसिटी झाल्याचे जाहीर केले. मात्र, धुळीचा प्रश्न जैसे-थे आहे. दोन देशमुखांमध्ये महापालिका अडकली आहे. दोघांमधील भांडणे कमी करावी लागतील. माझे सगळे राजकारण विधायक धक्का देणारे आहे. महाराष्ट्रात प्रस्थापितांना धक्का देण्याची गरज आहे. कुटुंबशाही येते तेव्हा हुकुमशाही येते. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. लोकशाही टिकवण्यासाठी मी सोलापूर मतदारसंघ निवडला आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्री आजारी इंडस्ट्री आहे, ही इंडस्ट्री क्राईम इंडस्ट्री झाली आहे, त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंना कायमचे घरी बसवले पाहिजे,' असेही आंबेडकर म्हणाले.

मुस्लिम माझ्या सोबत

'कॉँग्रेस पूर्णपणे आरएसएसच्या ताब्यता गेली आहे, ती मोदीच्या इशाऱ्यावर नाचते. आरएसएसच्या विरोधात देशभरात आवाज उठवणारा माझ्याशिवाय कोणीही नाही. त्यामुळे मुस्लिम माझ्यासोबत आहेत. 'आम्ही काही चुतिया नाही,' असे अकोल्यातील मुस्लिम मला म्हणत आहेत. मिनी पाकिस्तान हा शब्द आरएसएसने रुजवला आहे,' असे आंबेडकरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परवाना परीक्षा ‘ऑफलाइन’च

0
0

---

मटा विशेष

Raja.Gaikwad@timesgroup.com

..........

@RajaGaikwadMT

पुणे : राज्यभरात मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेली 'सेन्सर' आधारित वाहतूक परवाना परीक्षा प्रत्यक्षात 'ऑफलाइन' झाली आहे. भोसरीतील 'वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन' (आयडीटीआर) संस्थेत परीक्षेसाठी वापरण्यात येणारे जवळपास सर्व सेन्सर बंद पडले आहेत. मानवी हस्तक्षेपरहित, अत्याधुनिक आणि संपूर्ण संगणकीय पद्धतीने वाहन चालन चाचणी (ड्रायव्हिंग टेस्ट) घेण्यासाठी 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट'ने (सीआयआरटी) भोसरी येथे 'आयडीटीआर'च्या माध्यमातून अत्याधुनिक 'ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक' तयार केला. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून या ट्रॅकपैकी फक्त एकाच ट्रॅकवर सेन्सर सुरू आहे. तर, उर्वरित तीन ट्रॅकवर सेन्सर बसविलेच नसल्याने या ट्रॅकवरील टेस्ट संगणकीय पद्धतीने होत नाही. त्यामुळे या ट्रॅकवरील काठिण्य पातळीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

उत्तम दर्जाचे, प्रशिक्षित अशा वाहन चालकांनाच वाहन चालन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळावा, यासाठी केंद्रीय परिवहन विभागाने २०१४ मध्ये भोसरी येथे आयडीटीआरच्या माध्यमातून अत्याधुनिक असा ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारला. ड्रायव्हिंग टेस्टची काठिण्य पातळी वाढावी, या टेस्टमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप असू नये, यासाठी या संपूर्ण ट्रॅकवर सेन्सर व सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी संगणकीय पद्धतीनेच ड्रायव्हिंग टेस्ट होणार असल्याचे 'आयडीटीआर'ने स्पष्ट केले होते. 'आयडीटीआर'च्या जागेत इंग्रजी आठ आकड्याच्या आकाराचा, 'एच' आणि 'एस' अक्षराच्या आकारांचे आणि ग्रेडीएंट म्हणजेच चढ-उतार असे चार ट्रॅक उभारण्यात आले आहेत. या ट्रॅकचे उद्घाटन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. 'आयडीटीआर हा केंद्राचा पथदर्शी प्रकल्प असून या ट्रॅकच्या धर्तीवर संपूर्ण राज्यात ट्रॅक उभारणार येतील', असे गडकरी यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या उमेदवारांची चाचणी या ट्रॅकवर घेण्यास सुरुवात झाली. मात्र, 'आयडीटीआर' सुरू झाल्यापासून फक्त इंग्रजी आठ आकाराच्या ट्रॅकवरच सेन्सर सुरू आहे. त्यामुळे फक्त या ट्रॅकवरील टेस्टच संगणकीय पद्धतीने होते. तर, उर्वरित तीनही ट्रॅकवर सेन्सर नसल्याने येथील टेस्ट संगणकीय पद्धतीने होत नाही. त्यामुळे गडकरींच्या पथदर्शी प्रकल्प सेन्सरलेस पद्धतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ट्रॅकवर सेन्सर का बसविले गेले नाही, बसविले असतील तर, त्याद्वारे चाचणी का घेतली जात नाही, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.

---------

गेल्या काही दिवसांपासून 'आयडीटीआर'च्या एच, एस आणि ग्रेडीएंट अशा तीनही ट्रॅकवर सेन्सर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. सध्या या यंत्रणेची चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही यंत्रणा प्रमाणित करण्यासाठी परिवहन विभागाला पत्र पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात या ट्रॅकवर संगणकीय पद्धतीने ड्रायव्हिंग टेस्ट सुरू होईल.

- राजीव घाटोळे, प्राचार्य, आयडीटीआर

--------

'आयडीटीआर'च्या ट्रॅकमुळे ड्रायव्हिंग टेस्टची काठिण्य पातळी वाढली आहे. सद्यस्थितीत सेन्सर बसविलेला एकच ट्रॅक उपलब्ध असल्याने त्याच ट्रॅकवर संगणकीय पद्धतीने टेस्ट होत आहे. मात्र, ड्रायव्हिंग टेस्टच्या काठिण्य पातळीचा स्तर उंचाविण्यासाठी आणि ही चाचणी मानवी हस्तक्षेपाविना होण्यासाठी उर्वरित सर्व ट्रॅकवर सेन्सर बसणे गरजेचे आहे.

- संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी

------

- 'आयडीटीआर'च्या मैदानात एकूण चार ट्रॅक

- इंग्रजी आठ आकड्याच्या आकाराचा ट्रॅक

- रिव्हर्स टेस्ट घेण्यासाठी 'एच' अक्षराच्या आकाराचा ट्रॅक

- घाट क्षेत्रासाठी एस अक्षराप्रमाणे वळणदार ट्रॅक

- चढ-उतारासाठी ग्रेडीएंट ट्रॅक

------

दररोज होणाऱ्या ड्रायव्हिंग टेस्ट

पुणे - १२०

पिंपरी चिंचवड - १००

--------

'आयडीटीआर'च्या ट्रॅकचे शुल्क - १००

-------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप ‘शायनिंग इंडिया पार्ट २’ कडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजप सरकारच्या फसव्या घोषणांमुळे देशातील नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत लोक भाजपला पराभूत करतील. २००४ प्रमाणे यंदाही भाजपच्या पराभवाचा 'शायनिंग इंडिया पार्ट २'पाहावयास मिळेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला वातावरण अनुकूल असून राज्यात आघाडीला २४ हून अधिक जागा मिळतील,' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर व सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. तर भाजपचा राष्ट्रवाद हा हेडगेवार, गोळवलकरांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर बेतलेला आहे. भाजपच्या राष्ट्रवादात विशेष जातींना विशेष अधिकार आणि इतर समाजाला दुय्यम वागणूक ही निती असल्याचा टोलाही मलिक यांनी लगाविला.

मलिक म्हणाले, ' बहुतांश राज्यांमध्ये मुख्य पक्षांची आघाडी झाल्यामुळे मतविभागणी होणार नाही. भाजपला यंदा मोठा फटका बसणार असून त्यांचे संख्याबळ २८३ वरुन १५० पर्यंत खाली येईल. एनडीएला २०० पर्यंत जागा मिळतील. भाजपचा पराभव होणार हे लक्षात असल्यामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होऊ नये म्हणून पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे मोठमोठ्या आकड्यांची फेकाफेकी करत आहेत. आकडेफेक करण्यात ते पटाईत आहेत. लोकसभेची निवडणूक लढविणारे राज्यातील चारही मंत्री धोक्यात आहेत. वंचित बहुजन आघाडी ही संभ्रमावस्था निर्माण करत आहे.' पत्रकार परिषदेला प्रवक्ते संजय तटकरे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, 'स्वाभिमानी'चे भगवान काटे, मिलिंद साखरपे, आदिल फरास, समीर शेठ आदी उपस्थित होते.

...........

सतेज पाटलांनी सुधारणा करावी

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याविषयी मलिक म्हणाले, 'राहुल गांधी, शरद पवार यांनी संपूर्ण देशभर भाजपच्या विरोधात महाआघाडीची स्थापना केली. भाजप सरकारच्या माध्यमातून देशासमोर मोठे संकट उभे राहिले असताना सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी बांधिलकी राखली पाहिजे. शिवाय सध्या त्यांनी जी भूमिका घेतली आहे, त्याबद्दल काँग्रेस पक्ष विचार करेल. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी सुधारणा करावी. बुधवारी पवार यांची कोल्हापुरात सभा आहे. पाटील यांनी महाआघाडीच्या प्रचारात सहभागी व्हावे.'

..............................

चंद्रकांत पाटलांची चमकोगिरी

भाजपची नेतेमंडळी सत्तेचा दुरुपयोग करुन काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांवर दबाव टाकत आहेत. यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची जादा चमकोगिरी सुरू आहे. या निवडणुकीत लोक त्यांची चमकोगिरी संपवतील. अहमदनगर, बीड, माढा येथे पक्षाच्या उमेदवाराला कसलीही अडचण नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईचा धडाका

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहू नये, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. वळीव किंवा नियमित पावसाच्या पार्श्वभूमीवर लहान-मोठ्या नाल्यांसह मोठे गटर्स व चॅनेल साफ केले जात आहेत. कर्मचाऱ्यांसह जेसीबी मशीनच्या मदतीने मोहीम सुरू आहे. गेल्या महिनाभरात ८१ पैकी ३८ प्रभागांतील सफाईचे काम पूर्ण झाले. मात्र, चॅनल्स व गटरमध्ये टाकला जाणार प्लास्टिक कचऱ्याची कर्मचाऱ्यांसमोर डोकेदुखी बनली आहे.

गेल्यावर्षी नालेसफाईला सुरुवात होण्यापूर्वीच एफ्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वळीवर पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर गटारी व चॅनल्स चोकअप झाले होते. परिणामी शहराच्या अनेक रस्त्यांवर पाणी येऊन काही नागरिकांच्या घरांतही पाणी घुसले. विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अशी परिस्थिती उद्भवली होती. यावर्षी आरोग्य विभागाच्यावतीने मार्च महिन्यापासूनच नाले सफाईला सुरुवात केली आहे.

वळीव पावसात किंवा जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळ्यात गटर तुंबून राहू नयेत यासाठी सुरू केलेल्या मोहीमेत ८१ पैकी ३८ प्रभागांतील नाले व गटर सफाई पूर्ण झाली आहे. मात्र 'स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूर' हे केवळ पोस्टर पुरते मर्यादीत असल्याचे मोहिमेतून दिसून येत आहे. शहरात दररोज सुमारे १८० ते १९० टन कचरा संकलित केला जातो. त्यापैकी ११० टन कचरा ओला तर ७० ते ८० टन सुका कचरा असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण अत्यंत भयावह असल्याचे कर्मचारी सांगतात.

ज्या ठिकाणी महापालिकेने सफाई मोहीम राबवली, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा काढण्यात आला. आयआरबीच्या रस्ते प्रकल्पातील रुंदीकरण किंवा अनेक प्रभागांत मोठे रस्ते बांधल्यानंतर दोन्ही बाजूंचे फूटपाथ बांधण्यात आले. रस्तावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठिकाणी मोठे चॅनल्स बांधले गेले. पण बहुतांशी चॅनल्समध्ये प्लास्टिकच्या बाटल्या व पिशव्या मोठ्या प्रमाणात टाकल्या जात आहेत. चॅनल्समधून प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर काढावा लागत आहे. हा कचरा काढताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाकही होत आहे.

जेसीबी, पोकलॅनची साथ

शहरात नाले सफाईला सुरुवात झाली असली तरी मोठ्या १२ नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जेसीबी किंवा पोकलॅन मशिनची आवश्यकता लागणार आहेत. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उपनगरांमध्ये पावसाचे पाणी साचून राहणाऱ्या भागात जेसीबीच्या मदतीने चर खोदण्यात येणार आहेत.

प्लास्टिक बंदीचा फज्जा

जून २०१८मध्ये राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा आदेश काढला. पण, अंमलबजावणीच्या पातळीवर याचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. प्लास्टिक पिशव्यांची राजरोसपणे खरेदी-विक्री सुरू असताना नागरिकही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करीत आहेत. वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या गटर किंवा चॅनेल्समध्ये टाकल्या जातात. नागरिकांची बेफिकिरी आणि नियमांच्या अंमलबजावणीकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येते.

आकडे बोलतात

८१

प्रभाग

३८

प्रभागांतील नालेसफाई पूर्ण

४७६

एकूण नाले

२७६

सफाई झालेले नाले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. अर्ज भरण्यास२३ पर्यंत मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतर्फे विविध विभागात भरावयाच्या जागांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ऑनलाइन अर्ज भरताना विलंब लागत असल्याने मुदतवाढ मिळावी अशी मागणी उमेदवारांनी केली होती. ग्रामविकास विभागाने त्या मागणीची दखल घेत मुदतवाढ दिल्याचा आदेश मंगळवारी काढला. कोल्हापूर जिल्हा परिषदेत ५३२ जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. २६ मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत होती. या कालावधीत अर्ज भरताना विलंब लागत आहे. त्यामुळे अनेकांनी अर्ज भरले नव्हते. त्यामुळे २३ एप्रिलच्या रात्री ११ वाजून, ५९ मिनिटापर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली. उमेदवारांनी या www.mahapariksha.gov.in वेबसाइटवर अर्ज भरावा. यापुढे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही असे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागास असल्यानंच काँग्रेसनं माझी जात काढली: नरेंद्र मोदी

0
0

अकलूज:

मी मागास असल्यानं अनेकदा काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी माझी लायकी काढण्याचा प्रयत्न केला; तसेच मी खालच्या जातीचा असल्याचं दाखवून देत मला शिवीगाळ केली, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी 'ओबीसी कार्ड' खेळले. अकलूजमध्ये आज झालेल्या सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी तोफ डागली.

सोलापूरमधील अकलूजमध्ये आज मोदींनी सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मी मागास असल्याने अनेकदा काँग्रेसनं माझ्यावर टीका केली. मी खालच्या जातीचा असल्याचं सांगून मला शिवीगाळ केली. पण यावेळी ते सर्व मागास समाजाला चोर बोलू लागले आहेत, असं मोदी म्हणाले. मला शिवीगाळ करता-करता काँग्रेसचे नामदार आता सगळ्या समाजाला शिवीगाळ करताना दिसत आहेत. आधी त्यांनी चौकीदाराला शिवीगाळ केली, आता ज्यांचे आडनाव मोदी आहे, त्यांनाही ते चोर बोलू लागले आहेत, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

मोदींनी शरद पवार यांच्यावर पुन्हा टीका केली. माझं कुटुंब आहे की नाही यावरून माझ्यावर काल टीका केल्याचं पाहिलं. कुटुंब व्यवस्था हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य, ताकद आणि गौरव आहे. कुटुंबाच्या बाबतीत पवार यांना मोदींविषयी बरं-वाईट बोलण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांची समज आणि संस्कारानुसार बोलण्याचा हक्क आहे, असा टोलाही मोदींनी लगावला.

जे दिल्लीत बसले आहेत, त्यांना जमिनीवरील वास्तव माहीत नाही. ही गर्दी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. शरद पवार यांनी मैदान का सोडलं हे आता माझ्या लक्षात आलं. ते मोठे खेळाडू आहेत. वेळेआधीच ते वाऱ्याची दिशा ओळखतात. दुसऱ्या कोणाचा बळी गेला तरी चालेल, पण आपल्या कुटुंबातील कुणाचंही नुकसान होऊ देत नाहीत. त्यामुळेच ते मैदान सोडून पळून गेले, अशी टीका त्यांनी केली.

मराठीतून भाषणाची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकलूजमधील भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून केली. 'राम राम मंडळी, अकलूजकरांनो कसे आहात? पंढरपूरचे दैवत विठ्ठल-रुक्मिणी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, सिद्धेश्वर महाराज, अहिल्यादेवी होळकर यांच्या धरतीला मी वंदन करतो,' अशा शब्दांत त्यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

LIVE: मोदी-शहांविरुद्ध मी बोलतच राहणार: राज ठाकरे

0
0

सातारा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज साताऱ्यात असून शहरातील गांधी मैदानावर राज यांची तोफ धडाडू लागली आहे. माझा उमेदवार नसला तरी मी बोलतच राहणार आहे. भाजपचा पर्दाफाश करणारे व्हिडिओ दाखवण्यासाठी मला आता लोकांचेच फोन येत आहेत. गुढी पाडव्यानंतर प्रचारासाठी वापरलेले प्रचाराचे प्रोजेक्टर तंत्र लोकांना आवडले आहे, असे नमूद करत राज यांनी आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत...


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाच्या अजेंड्याला मिळाली दिशा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गल्लीबोळात सुरू असलेल्या प्रचार फेऱ्या, रॅली, हँडबीलांचे वाटप करणारे कार्यकर्ते, जाहीर सभा यांतून लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशा वातावरणात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक भवानी मंडपात 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने आयोजित 'मटा डिबेट'मध्ये कोल्हापूरच्या विकासाच्या अजेंड्याला दिशा मिळाली. 'मटा डिबेट'मध्ये शहराच्या प्रलंबित प्रश्नांची मांडणी करताना उपस्थितंनी सर्वच राजकीय पक्षांसमोर विकासाचे प्रश्न मांडले. 'मटा डिबेट'ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहर विकासाच्या संकल्पना मांडल्या गेला. चर्चेत उपस्थित झालेल्या प्रश्नांना सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी समर्पक उत्तरे देत राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत विकासाला चालना देण्याचा संकल्प सोडला. सुमारे अडीच तास रंगलेल्या 'मटा डिबेट'ला कला, क्रीडा, सांस्कृतिक, समाजिक क्षेत्रातील जाणकारांनी उपस्थिती लावली होती.

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर पकडला आहे. तळपत्या उन्हात कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. देश, राज्य पातळीवरील प्रश्नांसोबत स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत प्रचाराची राळ उठवत आहेत. करवीरनिवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, राजर्षी शाहू स्मारक, खंडपीठ, थेट पाइपलाइन योजना, पंचगंगा प्रदूषण, रंकाळा सुशोभिकरण, औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधा यांसह शहर आणि जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यास राजकीय पक्षांच्या नेतृत्वांना अपयश आले असल्याने या प्रश्नांवर नागरिकांनी चर्चा करुन प्रश्न सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता 'मटा डिबेट'मध्ये झालेल्या डिबेटमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, माकप व जनता दलाच्या प्रमुख नेत्यांनी विकासाबाबत आपापल्या पक्षांची भूमिका मांडली. त्यानंतर प्रश्नांचा अक्षरश: पाऊस पडला. नागरिकांनी प्रश्नांची विचारणा करत शहर विकासाच्या अजेंड्यावर मत मांडण्यास राजकीय नेत्यांना भाग पाडले. सुमारे अडीच तास चाललेल्या 'डिबेट'मध्ये नागरिकांनी शहर विकासाच्या अनेक संकल्पना मांडल्या. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. मात्र, त्यामध्ये वाढ झालेली नसल्याने स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराबरोबर आयटी क्षेत्र विस्तारण्याची अपेक्षा व्यक्त केली. करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पंचगंगा प्रदूषण, थेट पाइपलाइन आदी योजना पूर्ण करुन नव्या योजनांच्या माध्यमातून शहर विकासाचा आराखडा पूर्ण करण्याचा मनोदय अनेकांनी व्यक्त केला.

मटा डिबेटवेळी बाळ पाटणकर, श्रीकांत डिग्रजकर, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अशोक देसाई, संपतराव पवार, विजय जाधव, तुषार देसाई, पारस ओसवाल, बबन रानगे, अशोक पोवार, किरण पडवळ, निरंजन कदम, फिरोज सरगुर, विजय टिपुगडे, मधुकर नाझरे, दिलीप देसाई, गणी आजरेकर, किसन कल्याणकर, राजू माने, दिलीप मैत्राणी, संतोष भिवटे, किशोर घाटगे, सुरेश जरग, मारुती भागोजी, माजी नगरसेवक बाळासाहेब मुधोळकर, सुजय पोतदार, अजित सासने, रमेश मोरे, पीटर चौधरी, बंडा साळुंखे, महेश उरसाल, रवींद्र मुतगी, सतीश पाटील, सुभाष रामुगडे, हेमंत आराध्ये, फारुक कुरेशी, नजीर देसाई, कुणाल शिंदे, आण्णासाहेब माळी, महमद शरीफ शेख, राजेंद्र राऊत, संदीप देसाई, राजू लिंग्रस, अच्युत साळोखे, जी. डी. जाधव, संतोष माळी, सुधीर खडके, सदानंद डिगे, सुहास साळोखे, विकास पाटील, जयवंत हारुगले, नामदेव भवड, संदेश कचरे, चंद्रकांत खोंद्रे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिंगणातील अपक्षांचा प्रचार थंडच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघातून मोठ्या उत्साहाने उमेदवारी अर्ज दाखल केलेले अपक्ष उमेदवार सक्रिय प्रचारापासून अजूनही लांब आहेत. अनेक उमेदवार मतदारसंघात फिरकलेलेही नाहीत. वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीपूर्वी जी हवा तयार केली होती, ती प्रचारात दिसत नाही.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक, भाजप, शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक तर हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार राजू शेट्टी आणि भाजप, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यातच खरी लढत आहे. हे चारही उमेदवार सर्व यंत्रणेसह प्रचारात सक्रिय आहेत. यामुळे रिंगणातील उमेदवारांची संख्या पाहून निवडणूक बहुरंगी वाटत असली तरी दोन्ही मतदारसंघात दुरंगीच लढत आहे. इतर उमेदवारांनी व्यापक प्रचार करण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. अरूणा माळी, बहुजन समाज पार्टीचे प्रा. डी. श्रीकांत, बळीराजा पार्टीचे किसन काटकर, बहुजन मुक्ती पार्टीचे सिध्दार्थ नागरत्न, अपक्ष परेश भोसले, संदीप संकपाळ यांची प्रचार वाहने फिरत आहेत. उर्वरित अपक्ष उमेदवार बाजीराव नाईक, अरविंद माने, मुश्ताक मुल्ला, युवराज देसाई, राजेंद्र कोळी यांचा प्रचार थंडच आहे. 'हातकणंगले'मधून अपक्ष उमेदवार रघुनाथ पाटील, अस्लम सय्यद, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. नितीन भाट, आनंदराव सरनाईक, अजय कुरणे यांचा काही ठिकाणी प्रचार सुरू आहे. उर्वरित रिंगणातील उमेदवार विद्यासागर ऐतवडे, किशोर पन्हाळकर, संग्रामसिंह गायकवाड, डॉ. प्रशांत गंगावणे, विश्वास कांबळे, राजू मुजीकराव शेट्टी, महादेव जगदाळे यांचा प्रचार दिसत नाही. या मतदारसंघात तब्बल १७ उमेदवार रिंगणात असूनही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उमेदवार प्रचारात आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या नामसाधर्म्याचे मुंबईचे राजू मुजीकराव शेट्टी यांना उमेदवार अर्ज भरेपर्यंत विरोधकांनी रसद पुरवली. मात्र ते प्रचारात कुठेच दिसत नाहीत.

.........

मग उद्देश काय ?

लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघांचा असतो. नवख्या उमेदवाराला निवडणूक जाहीर झाल्यानंतर रोज एक गाव केले तरी शेवटी बहुतांशी गावे, वाड्या वस्त्या शिल्लकच राहतात. हे माहित असतानाही मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांनी अर्ज का दाखल केले आहेत, रिंगणात राहिल्यानंतर प्रचार करीत नसलेल्या उमेदवारांचा खरा हेतू काय? कुणीतरी अखेरच्या टप्प्यात माघारीसाठी मनधरणी करावी, तडजोडीने 'मागणी' पूर्ण करून घ्यावी, मतविभागणी व्हावी, मतदान होईपर्यंत नाव चर्चेत राहावे, यासाठीच अर्ज दाखल केले होते, का असा संशय उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानासाठी ११ प्रकारचे पुरावे ग्राह्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मतदार ओळखपत्राशिवाय ११ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव असूनही निवडणूक ओळखपत्र नसलेल्यांनी यापैकी एक पुरावा दाखविल्यास त्यांना मतदान करता येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

पत्रकात म्हटले आहे, लोकसभेसाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र असणे आवश्यक आहे. नसेल तर पासपोर्ट, वाहनचालक परवाना, केंद्र, राज्य सरकारचे ओळखपत्र, सरकारमान्य खासगी कंपनीचे ओळखपत्र, बँक पासबुक, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य ओळखपत्र, आधार कार्ड हे पुरावे मतदान केंद्रांवर ओळख पटवण्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची पडताळणी www.nvsp.in या वेबसाइटवर करता येते. केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार पावती पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही. त्यासोबत मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा ११ पैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांसाठी सुट्टीत घरचा अभ्यासक्रम

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

उन्हाळी सुट्टी म्हणजे मौजमजा, दंगामस्ती असे जणू समीकरण ठरलेले असते. उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटताना मुलांनी 'पाणी वाचवा, पर्यावरण संवर्धन आणि परिसर स्वच्छतेविषयक'धडे गिरवणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षण विभागाने सुट्टीतील अभ्यासक्रम तयार केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या संकल्पनेतून 'सुट्टीत घरचा अभ्यासक्रम' आकाराला आला आहे. स्वच्छ भारत मिशनमध्येही विद्यार्थ्याना सामावून घेतले जाणार आहे.

पहिली, दुसरी, तिसरी व चौथी आणि पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्याचा समावेश आहे. सुट्टीत विद्यार्थीं शालेय अभ्यासक्रमापासून पूर्णत: अलिप्त असतात. परिणामी पुढील वर्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. हे नुकसान टाळण्यासाठी उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत इयत्तानिहाय अभ्यासक्रम बनविला आहे. वयोगट, त्यांच्या आवडीनिवडी आणि आकलक्ष क्षमता विचारात घेऊन त्याची आखणी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्यासह शिक्षण व स्वच्छता विभागातील अन्य अधिकाऱ्यांनी या संकल्पनेवर शिक्कामोर्तब केले. प्रत्येक विद्यार्थ्याला पाण्याचे महत्व कळावे, पाण्याची नासाडी होऊ नये यासाठी विद्यार्थ्याने स्वत:च्या घराच्या नळांना तोटी आहे किंवा नाही, नसल्यास घरच्यांना प्रोत्साहित करुन तोटी बसवून घेणे. शेजारील घरातही तोटी बसविण्यास प्रवृत्त करावे अशी शिकवण मुले देणार आहेत. सुट्टीच्या कालावधीत मुलांनी आंबा, चिकू, कडूलिंब, बोरं अशा दहा प्रकारच्या बिया गोळा करायच्या आहेत. मातीचा गोळा बनवून त्यामध्ये बिया लपवून त्या शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांकडे जमा करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.

गुणवत्ता वाढीसाठी

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी किमान तीन पुस्तकांचे वाचन करुन त्यांचा सारांश लिहिणे, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील प्रत्येकी पाच निबंध लिहायचे आहेत. निबंधासाठी 'मानवाधिकार, माझी शाळा समृद्ध शाळा, भारताचे संविधान, मी अनुभवलेली सुट्टी, मला काय बनायचे आहे, पाण्याचे महत्व' हे विषय आहेत. याशिवाय दहा शास्त्रज्ञांची नावे व त्यांचे कार्य, तालुका-जिल्हा व राज्याची प्रमुख पिके, भौगोलिक परिस्थिती व ठिकाणबाबतची माहिती संकलित करायची आहे. तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शब्दांपासून गोष्टी तयार करणे, इंग्रजी शब्दांचा संग्रह, मातीच्या वस्तू तयार करणे व गुणाकार, भागाकाराच्या प्रत्येकी १०० उदाहरणांच्या सोडवणुकीचा समावेश आहे. दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध पुस्तके, फळे व वस्तूंची नावांची यादी आणि बेरीज, वजाबाकीची प्रत्येकी शंभर उदाहरणांची सोडवणूक करायची आहे.

सुट्टीत घरचा अभ्यासक्रम या उपक्रमाची माहिती शिक्षकांना पाठविली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यासंबंधी माहिती द्यावयाची आहे. यंदा समर कॅम्प आयोजित केला आहे. त्या शिबिरात तसेच निकालादिवशी याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. शिक्षणासोबत पाणी, पर्यावरण, स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढविण्याचा प्रयत्न आहे.

- आशा उबाळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात आज मतदान

0
0

सोलापुरात आज मतदान

सोलापूर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेली पंधरा दिवस सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी थांबली. आज, गुरुवारी सकाळी सातपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. १३ उमेदवारांसाठी १८ लाख ५० हजार दोन मतदार, एक हजार १९२६ केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावतील. निवडणुकीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. बुधवारी दुपारनंतर नऊ हजार ६३० कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर पोहोचले. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यात भरणाऱ्या ५९ गावांचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात विविध ठिकाणी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या घटनेत केतन कसबे ( रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट बाजूला, दक्षिण सदर बझार) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक भरारी पथकाचे अधिकारी रोहित चंदेले यांनी सदर बझार पोलिसात तक्रार दिली आहे. कसबे यांनी डॉ. आंबेडकर जयंती उत्सव निमित्ताने दक्षिण सदर बाजार परिसरात डिजिटल फलक लावले आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचा फोटो लावून आचारसंहितेचा भंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काशिनाथ विठ्ठल ठोंबरे (रा. महिम, ता. सांगोला) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महिबूब लाडले पटेल (रा. जनता कॉलनी, मुंबई ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायुतीचा ‘घर टू घर’ प्रचार

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात युतीने 'घर टू घर' प्रचार मोहीम राबवण्यास सुरुवात केली. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने ७० कार्यकर्त्यांची टीम तयार केली असून टीमने बुधवारपासून या मोहिमेला सुरुवात केली. मिरजकर तिकटी येथून मोहिमेला सुरुवात करताना महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात येईल, तसा प्रचाराच्या नवनव्या क्ल्पृत्या लढवल्या जात आहेत. प्रत्येक मतदाराशी संपर्क साधताना भाजपने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव व महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी या 'घर टू घर' मोहिमेला मिरजकर तिकटी येथून सुरुवात झाली.

शहरातील प्रत्येक भागात आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. मंडलिक यांना विजयी करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ आदी परिसरात हँडबिल वाटप केले. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या यशस्वी योजनांची माहिती पत्रकांचे वाटप केले. यावेळी मंडल अध्यक्ष संतोष माळी, उपाध्यक्ष गणेश देसाई, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, नगरसेवक संभाजी जाधव आदी उपस्थित होते.

दरम्यान, मंगळवारी कसबा बावड्यात कसबा बावडा मंडल अध्यक्ष डॉ. सदानंद राजवर्धन, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे व अन्य कार्यकर्त्यांनी घर टू घर संपर्क साधला. लक्ष्मीपुरी मंडलामध्ये मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, उपाध्यक्ष मारुती भागोजी यांच्या नेतृत्वाखाली प्रचार मोहीम राबवण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images