Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘महोत्सवामुळे परांजपे नव्या पिढीला समजले’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या आणि ५० वर्षांपूर्वी चित्रपटातून मांडलेल्या विषयांचे संदर्भ आजही लागू होतील इतके वास्तव मांडणाऱ्या दिग्दर्शक व अभिनेते राजा परांजपे यांचे नाव आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात या महोत्सवाचे योगदान मोलाचे आहे,' असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले. कोल्हापुरात हा महोत्सव होणे अभिमानास्पद गोष्ट असल्याचेही राजेभोसले यांनी नमूद केले.

राजा परांजपे प्रतिष्ठान आणि गुणिदास फाउंडेशन यांच्या वतीने दहाव्या राजा परांजपे चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते झाले. रविवारी केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री इरावती हर्षे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि संगीतकार अजित परब यांना राजेभोसले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महोत्सव २० एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून त्या दिवशी आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन महोत्सवाचा समारोप होणार आहे.

राजेभोसले म्हणाले, 'असे चित्रपट फक्त पुणे, मुंबईपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पोहाचावेत. महोत्सवाच्या निमित्ताने अशा सिनेमांमध्ये दिसणारी मेहनत, कलात्मकता यातून कामाचा आवाका समजण्यास मदत होते. राजा परांजपे यांनी मराठी सिनेमात दिलेल्या योगदानाचा आदर ठेऊन महोत्सवात पुढील वर्षी चित्रपट महामंडळाचाही सहभाग राहील. सरकारच्यावतीने जुन्या मराठी पहिल्या २० चित्रपटांचे डिजीटायझेशनचे काम सुरू आहे.'

राजा परांजपे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे यांनी महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. शिशिर सप्रे यांनी स्वागत केले. यावेळी चंद्रकांत कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, अजित परब, इरावती हर्षे यांनी मनोगत व्यक्त केले. हा पुरस्कार म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद आहे, अशा शब्दांत पुरस्कारप्राप्त कलाकारांनी भावना व्यक्त केल्या.

अजय राणे यांच्यासह मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी प्रतिष्ठानच्या वतीने 'ऋतुगंध' हा भरतनाट्यम आणि कथकमधील नृत्यरचनांवर आधारित कार्यक्रमचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, महोत्सव काळात राजा परांजपे अभिनित आणि दिग्दर्शित लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, ऊन-पाऊस, पुढचं पाऊल, पडछाया, पाठलाग, सुवासिनी, आदी चित्रपट दररोज सकाळी दहा व दुपारी एक वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. त्याशिवाय महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी सायंकाळी पाच वाजता ऋतुगंध अभंगरंग, जादूची पेटी, मेलेदिक रिदम, असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५०० झाडे लावणार

0
0

कोल्हापूर : भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्ताने कुंभोजगिरी येथे वर्षभरात २५०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. बुधवारी ता.१७ वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक विशा श्रीमाळी १०८ गोळ जैन समाज संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र शहा यांनी केली आहे. शिवाय जैन समाजाच्या २४ तीर्थंकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी साधना केली होती अशा चोवीस रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे पत्रकांत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन धर्मातील तत्वांतच मन:शांती

0
0


'जीवनामध्‍ये मन:शांती ही मंदिरामध्‍ये जाऊन मिळत नाही, तर प्रत्‍येक व्‍यक्‍तीने अपरिग्रह व सत्‍य ही जैन धर्मातील चिरंतन तत्‍वे अंगीकारल्‍यास मन:शांती निश्चितच मिळू शकते,' असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती सुभाष चौगुले यांनी महावीर महाविद्यालयात केले.

भगवान महावीर प्रतिष्‍ठान व महावीर महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने महावीर जयंती महोत्‍सवाच्‍या निमित्‍त आयोजित वक्‍तृत्‍व स्‍पर्धेच्‍या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणून ते बोलत होते. अध्‍यक्षस्‍थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे होते. या स्‍पर्धेत शालेय गट व खुला गट अशा दोन विभागात वक्‍तृत्‍व स्‍पर्धा घेण्‍यात आल्‍या. यावेळी भगवान महावीर प्रतिष्‍ठानच्‍यावतीने भगवान महावीर प्रतिष्‍ठानचे अध्यक्ष भरतेश सांगरुळकर, उपाध्यक्ष डॉ. सुषमा रोटे, सचिव सुरेश मगदूम, सुनील डुणूंग, आनंदराव पाटणे, शरद पाटील, प्रतिक्षा बहिरशेठ उपस्थित होत्‍या.

चौगुले म्‍हणाले, 'जीवनातील आसक्‍ती व अभिलाषा यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. जीवनातील दु:ख हे सततच्‍या हव्‍यासामुळे व आसक्‍तीमुळे आहे. त्‍यामुळे भगवान महावीर यांनी सांगितलेल्‍या अपरिग्रहाचे तत्‍व अंगीकारल्‍यास सुखाची अनुभूती येईल. त्‍याचबरोबर जीवनात सत्‍याची कास सोडल्‍यास दु:ख हे अटळ आहे. त्‍यामुळे आपण खोटे बोलणार नाही, याचे सतत भान ठेवले पाहिजे.'

प्राचार्य डॉ. लोखंडे यांनी प्रस्‍ताविक व स्‍वागत केले. दादासाहेब मगदूम हायस्‍कूलचे मुख्‍याध्‍यापक बी. सी. वस्‍त्रद यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संकेश्वरी’चा करिष्मा कायम

0
0


दत्ता देशपांडे, गडहिंग्लज

गडहिंग्लज बाजार समितीच्या आवारात लांबसडक आणि लालभडक जवारी मिरचीचे सौदे निघतात. सौद्यामुळे बाजार समितीचा आवार लालेलाल होऊन जातो.संपन्न संस्कृतीची जोपासना करणाऱ्या गडहिंग्लजची बाजारपेठ मिरची, गूळ व शेंगा यासाठी प्रसिद्ध आहे. बदलत्या परिस्थितीत शेंगा व गुळाची बाजारपेठ अस्तित्वासाठी संघर्ष करीत असली तरी मिरचीचा (संकेश्वरी मिरची) करिष्मा मात्र कायम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जवारी मिरचीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडहिंग्लज बाजारपेठेत एका हंगामात सुमारे पावणे दोन कोटी रुपयांची उलाढाल होते.

गडहिंग्लजची जवारी मिरची ‘संकेश्वरी मिरची’ नावाने ओळखली जाते. यंदाच्या हंगामात सुमारे सात हजार पोत्यांची आवक झाली, तर कर्नाटकातून आलेल्या ब्याडगीसह इतर जातीच्या मिरच्यांची पाच हजार पोत्यांची आवक झाली. विशेष म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर हा काळ जवारी मिरची उत्पादनाचा असल्यामुळे या काळात वर्षाच्या सरासरीत ५० टक्के आवक होते. मिरची उत्पादक शेतकरी सौद्यात आणून मिरची विकतो हे बाजारपेठेतील विश्वासाचे गमक आहे. त्यामुळे बाजारपेठेची उलाढाल तेजीत चालते. अडत व्यापाऱ्यांकडून मिरची घेऊन रविवारच्या बाजारात छोट्या व्यापाऱ्यांकडून होणारी विक्रीही मोठ्या प्रमाणात असते.

गडहिंग्लज बाजार समितीच्या आवारात मिरची सौद्यात सरासरी चारशे ते पाचसे रुपये किलोला दर मिळतो, पण यंदा ६५१ रुपये इतका विक्रमी दर मिळाला. जवारी मिरची चवीला चांगले असल्याने तिला दरही चांगल्या पद्धतीने मिळत आहे. बाजार समितीत आठवड्यातून दोन दिवस जवारी मिरचीचे सौदे होतात. एका दिवशी सरासरी १२५ क्विंटल मिरची सौद्याला येते. कर्नाटकातून येणारी ब्याडगी मिरची गडहिंग्लजच्या बाजारपेठेत प्रसिद्ध आहे.
ब्याडगी मिरचीचा साधारण १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने सौदा होतो. याशिवाय गरुडा, गोटूर, रालेज, शीतल, तेजा, ज्वाला अशा विविध जातीच्या मिरच्या गडहिंग्लज बाजारपेठेत सौद्याला येतात. ऑक्टोबरपासून गडहिंग्लजच्या स्थानिक मिरचीचा सौदा जोरात सुरू होतो. फेब्रुवारीनंतर कर्नाटकातून येणारी मिरची ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. माद्याळ (ता. कागल), माद्याळ (ता. गडहिंग्लज), सुळे व आरदाळ (ता. आजरा), बसर्गे, हेब्बाळ, निलजी, हसूरचंपू, हरळी, हिटणी, महागाव, येणेचवंडी या भागातून जवारी मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जवारी मिरचीला योग्य गुणधर्म इथल्या मातीत आढळतात. मध्यम व खोल निचरा होणारी जमीन मिरचीला उपयुक्त ठरत असल्याने इथे मिरचीचे उत्पादन चांगल होते. जवारी मिरचीला एक विशिष्ट चव असल्याने कोकण, मुंबई, पुणे व कोल्हापुरातून या मिरचीला जास्त मागणी आहे.

कोट....
यावर्षी गडहिंग्लजच्या बाजारपेठेत जवारी मिरचीला क्विंटलमागे साडेसहा हजार रुपये उच्चांकी दर मिळाला. बारीक चवळीसारखी लांब आणि लालभडक मिरची तिखटही आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १२ गुंठ्यांत सुमारे ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. सुळे गावचे शेतकरी मिरचीचा व्यापार करतात. त्यामुळे काही वर्षांत सुळे गाव मिरचीचा गाव म्हणून ओळखले जाईल.
दत्तू कोकितकर, मिरची उत्पादक शेतकरी, सुळे

कोट...
एका दिवसात मिरचीची साधारण २५० पोती सौद्याला येतात. हंगामात सुमारे ४० सौदे होतात. फेब्रुवारीनंतर कर्नाटकातून मिरची जास्त प्रमाणात येते. बाहेरून फिरून मिरचीची विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे थेट सौद्यावर येऊन मिरची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे. या व्यवसायात आमची तिसरी पिढी काम करत आहे. गडहिंग्लजच्या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
एन. एम. जाधव, अडत व्यापारी, गडहिंग्लज

मिरचीची वैशिष्ट्ये...
कमी पावसात जास्त उत्पादन
लांबसडक आणि लालभडक मिरची
जवारी मिरचीचे एस ३२ असे शास्त्रीय नाव
जिरायती व बागायती जवारी मिरचीचे उत्पादन
तिखटसर मिरची गोडीला जास्त


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचारात न उतरण्यासाठीही ‘पाकीट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरामध्ये प्रचाराच्या फेऱ्या, कॉर्नर सभा होऊ लागल्या, त्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती दर्शवण्यासाठी पाठींबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तरुण मंडळांपासून विविध प्रकारच्या संघटनांना सोबत घेण्यासाठी ‘अर्थ’ पूर्ण हालचाली वेगावल्या आहेत. ‘आमच्यासोबत येण्यास अडचण असेल तर त्यांच्या बाजूनेही प्रचारात उतरु नका’ असे सांगत त्यासाठी घडामोडी करण्यात येत आहेत.

प्रचाराला अवघा एक आठवडा उरला असल्याने सर्वत्र जोरदार रणधुमाळी उडाली आहे. प्रत्येक पक्षाचे उमेदवार व कट्टर कार्यकर्ते झटून प्रचाराला लागले आहेत. शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून थंड असलेला प्रचार या आठवड्यात सुरू झाला आहे. काँग्रेस आघाडी व युतीच्या उमेदवारांच्या तसेच अन्य नेत्यांच्या सभा, कॉर्नर सभा, पदयात्रा सुरू झाल्या आहेत. याशिवाय भागातील मतदान फिरवू शकणाऱ्या महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या कारभारी मंडळी भेटी घेऊ लागले आहेत. तरुण मंडळे, तालीम संस्था, विविध संघटनांच्या प्रमुखांशी गुप्त बैठका होत आहेत. प्रचाराबरोबरच मतदानादिवशी प्रत्येक भागातील मतदान केंद्रावर कार्यकर्ते गरजेचे असतात. त्यासाठीही भागातील प्रमुखांशी चर्चा केली जात आहे.

एकदा एका उमेदवाराच्या बाजूने निर्णय घेतला की त्यांच्या प्रचाराबरोबरच मतदान प्रक्रियेपर्यंतही सोबत रहावे लागत असल्याने ‘अर्थ’ पूर्ण हालचालींशिवाय बोलणी पुढे सरकत नसल्याची परिस्थिती आहे. दोन्ही बाजूंकडून ऑफर दिल्या जात असल्याने पहिल्यांदा पोहचून तो भाग पॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील पाकिटे पोहचवली जात आहेत. काही मंडळी उघडपणे विरोधकांच्या प्रचारात सहभागी होऊ शकत नाहीत. पण त्यांनी दुसऱ्याच्या प्रचारातही जाऊ नये याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे प्रचार न करण्यासाठीही पाकिटे पोहचवली जात आहेत. जी तालीम मंडळे, तरुण मंडळे कट्टर आहेत, त्यांच्याशी फक्त चर्चा करुन पुढील नियोजन दिले जात आहे. या घडामोडींमुळे गल्लींमध्ये कोण कोणाला भेटायला आले, कुणाच्या घरात बैठक झाली यासाठी दोन्ही बाजूंकडून लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे मतदान होईपर्यंत येत्या आठवडाभर या पडद्याआडच्या हालचाली मोठ्या प्रमाणात चालणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमळ औषधालाही शिल्लक ठेवू नका

0
0


हरीश यमगर, सांगली

विशाल पाटील नावाचे जहाल तण नाशक मी आणले आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांच्या जीवावर उठलेले कमळाचे तण औषधालाही शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी प्रचार सभांच्या निमित्ताने द्यायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी भिलवडी येथे खासदार शेट्टींची सभा झाली. यावेळी विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड, महेंद्र लाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, विजय पाटील, संग्रामदादा पाटील, बाळकृष्ण जाधव, नामादेव तावदर, कुमार पाटील, नंदकुमार शेळके यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, कोणत्याही शेतकर्‍यांची जमिन काढून घेण्याचा कायदा करून जमिनी हडपण्याचा सरकारचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी लोकसभा निवडणूक ही एक संधी आहे. राक्षसाचा जीव जसा पोपटात अडकला होता तसा भाजपवाल्यांचा जीव सत्तेत अडकला आहे. निवडणूकित त्यांचे मुंड मुरघळून टाका. आजपर्यंत सांगली जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी अनेक आंदोलने केली. पण आपण कुणाकडे काहीच मागितले नाही. याहीवेळी विशाल पाटील नावाच जहाल तणनाशक मी आणलं आहे. याचा वापर करून भाजपच्या कमळाचं तण औषधालाही शिल्लक ठेवू नका. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील मला पाडण्याची भाषा करत आहेत. त्यांना सांगतो, मी तर निवडून येणार आहेच पण भाजपचा सांगलीचा खासदार कमी करणार आहे. हातकणंगले आणि सांगलीत दोन्ही ठिकाणी स्वाभिमानीचाच झेंडा फडकणार आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांना साथ द्या, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. कडेपूर येथे राजलक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विशाल पाटील, मोहनराव यादव, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष कदम, क्रांती कारखान्याचे अरूणअण्णा लाड, प्रकाश जगताप यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, महाराष्ट्राचा विशेष करून सांगली जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाचा आम्ही चांगला अभ्यास केला आहे. प्रत्येक गावाला, गावातल्या प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळाले पाहिजे, प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधावर पाणी खेळले पाहिजे. हे आमचे ध्येय आहे. पाण्याच्या मुद्द्यावरच आम्ही स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठींबा दिला आहे. ते वसंतदादांचे नातू आहेत म्हणजे दादांसारखेच आमच्या कष्टक-यांच्या पाठीशी राहातील हा आमचा विश्वास त्यांनी स्वार्थ करावा. समोर बसलेली माणसं साधी वाटतं असली तरी पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करणारी आणि सरकारला नमविणारी माणसं आहेत. जर तुम्ही कुठे चुकलात तर दुरूस्ती करायला भाग पाडू, असे पाटणकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची 'डिजिटल गाव' ही जाहिरात खोटी, लाभार्थीही गाव सोडून गेला

0
0

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'डिजिटल गाव' म्हणून घोषित केलेल्या अमरावतीतील हरिसाल गावातील कथित लाभार्थी मॉडेलच बेरोजगार झाला असून तो गाव सोडून गेल्याचं धक्कादायक वास्तव उघड करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या लाभार्थी तरुणालाच सर्वांसमोर आणून भाजपचा बुरखा फाडला. भाजपची 'डिजिटल गाव' ही जाहिरातही खोटी असून या जाहिरातीचं चित्रीकरण हरिसाल गावात झालंच नसल्याचा गौप्यस्फोटही राज यांनी केला.

सोलापूरच्या कर्णिक नगर क्रीडांगण मैदानावर राज ठाकरे यांची तोफ धडाडली. राज यांनी आज पुन्हा मोदींच्या घोषणांची आणि भाजपच्या जाहिरातींची व्हिडिओ क्लिप दाखवत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल गाव म्हणून घोषित केलेल्या अमरावतीच्या हरिसाल गावात मनसेच्या एका टीमने जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं. यावेळी गावात एकच महाराष्ट्र बँक असून त्याचं एटीएमही सहा महिन्यांपासून बंद असल्याचं दिसलं. गावात मोबाइल टॉवर आहे, पण फोरजी इंटरनेट अद्यापही देण्यात आलेलं नसल्याचं आढळून आलं. भाजपने जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे गावात सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होत नसल्याचं आढळून आलं. गावात सर्व व्यवहार आजही रोखीने होत आहेत. गावात एकाही दुकानात स्वाइप मशीन आढळलं नाही. या जाहिरातीत दाखविण्यात आलेला कथित लाभार्थी आणि गोपालकृष्ण ऑनलाइन सेंटरच्या तरुणालाही कसलाच लाभ मिळाला नसल्याचं दिसून आलं आहे. त्याच्याकडेही साधं स्वाइप मशीन नसल्याचं आढळून आलं. त्यानंही तशी कबुली दिली. त्यावर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे आरोप फेटाळून लावले होते आणि या वृत्तवाहिनीलाही गावात जाऊन पाहणी करण्यासं सांगितलं होतं. त्यानुसार या वृत्तवाहिनीने हरिसालमध्ये जाऊन माहिती घेतली असता राज यांच्या आरोपात तथ्य असल्याचं आढळून आलं. विशेष म्हणजे लाभार्थी योजनेतील मॉडेलच दुकान बंद करून सहा महिने आधीच पुण्यात रोजगाराच्या शोधासाठी गाव सोडून गेल्याचं दिसून आलं. हा सर्व वृत्तांत व्हिडिओ क्लिपमधून दाखवत राज यांनी या बेरोजगार तरुणालाच मंचावर बोलावून भाजपची पुरती पिसे काढली.

मुख्यमंत्र्यांकडे काय उत्तर आहे?

'डिजिटल गाव' या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम केलेला, रोजगारासाठी मुंबई-पुण्याला आलेल्या या तरुणाला राज यांंनी मंचावर आणलं. या तरुणाला भाजपावाले शोधत आहेत. त्याला सांगत आहेत झालं-गेलं विसरून जा, परत ये. मात्र हा तरुण मनसे कार्यकर्त्यांच्या संपर्कात आला. आता हा तरुणच मी तुम्हाला दाखवला आहे. तसंच तिथली परिस्थिती काय आहे? ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली. आता मुख्यमंत्र्यांकडे यावर काय उत्तर आहे, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

68894378

मोदींवर टीका करताना राज यांचा तोल सुटला

या सभेत मोदींवर थेट टीका करताना राज ठाकरे यांचा तोल सुटला. पुलवामातील शहिदांची आठवण करून देत मोदी नव-मतदारांकडून मतं मागत आहेत. मात्र शहिदांच्या कुटुंबीयांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही, असं सांगताना राज यांचा तोल सुटला आणि त्यांनी जवानांपेक्षा व्यापारी शूर असतो, असं सांगणारा इतका निर्लज्ज पंतप्रधान मी पाहिला नाही, अशी टीका केली.

नवाज शरीफना लव्ह लेटर पाठवू नका, असं २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बोलणारे मोदी पंतप्रधान झाल्यावर नवाज शरीफना शपथविधीला बोलावू लागले, त्यांना पाकिस्तानात जाऊन केक भरवू लागले. काय वाटलं असेल शहीद जवानांच्या कुटुंबियांना? आणि जवानांनाही? असा सवालही त्यांनी केला.

राज यांचा घणाघात...

>> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भाजप करणार होते, ५ वर्ष झाली, कुठे आहे स्मारक?

>> शिवस्मारकासाठी पंतप्रधान समुद्रात गेले होते, काय झालं त्या स्मारकांचं?

>> काय झालं मेक इन इंडियाचं? कोणाला कामं मिळाली? काय झालं स्टार्ट अप इंडियाचं? स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर होतं, काय झालं सोलापूरच? नाशिकमध्ये आमच्या सत्ताकाळात आम्ही उद्योगपतींच्या सहकाऱ्याने जे उभारलं ते भारतीय जनता पक्ष स्मार्ट सिटीच्या नावावर खपवतंय.

>> महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांमध्ये जर स्थानिक लोकांनाच फक्त प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही. आज ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारांकडे रोजगार नाही आणि आपण सगळे जातीच्या चर्चांमध्ये अडकलोय. मुळात सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती? जातीवरून मतं मिळवण्यासाठी आरक्षणाची आमिष दाखवली जात आहे.

>> राज ठाकरे हरिसालला गेलेच नाहीत, असं मुख्यमंत्री म्हणाले. मग १ लाख वीस हजार विहिरी बांधल्या म्हणणारे फडणवीस कुठल्या विहिरीवर पाणी काढायला गेले होते?

>> अर्थकारणापासून ते सत्ताकारणांपर्यंत सगळ्या गोष्टी फक्त ८ ते १० लोकांच्या हातात राहतील, अशी व्यवस्था नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भारतात हवी आहे. त्यांना भारताचा रशिया करायचा असल्याने या दोघांना राजकीय क्षितिजावरून हटवलं पाहिजे. इतकंच नव्हे तर त्यांना मदत करणाऱ्यांना देखील मतदान करू नका.

>> मोदींनी उद्योगपतींची जवळपास २.५ लाख कोटींची कर्ज माफ केली, लाज नाही वाटत धनदांडग्यांसाठी देशाला लुटताना?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीय समीकरणांमुळे सोलापुरात चुरस

0
0

जातीय समीकरणांमुळे सोलापुरात चुरस

सूर्यकांत आसबे, सोलापूर

काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यावर आता भाजपने पकड मिळवली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, भाजप-शिवसेना महायुतीचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यातील तिरंगी लढत चुरशीची झाली आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई म्हणावी लागेल.

बहुजन वंचित आघाडीमधून प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्याबरोबर सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सोलापूरचे राजकारण ढवळून निघाले आहे. सोलापूर मतदारसंघात अडीच लाखांच्या आसपास मागासवर्गीय मतदार, तीन लाखांवर मुस्लिम मतदार, लिंगायत समाजाचे दोन लाख मतदार, साडेतीन लाख मराठा मतदार, तेलुगूभाषक पद्मशाली समाजाचे दीड लाख मतदार, सव्वा लाखांच्या आसपास धनगर समाजाचे मतदार आणि इतर मिळून एकूण १७ लाख मतदार आहेत. जातीय समीकरण हाच घटक येथे प्रभावी ठरेल, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमच्या ओवेसींना सोबत घेऊन निवडणुकीत उडी घेतल्याने काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. भाजप महायुतीबरोबर एकतर्फी निवडणूक समजून चालणारे सुशीलकुमार शिंदे यांना ही निवडणूक खूपच अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत झालेल्या पराभवामुळे शिंदे यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीनंतर एक पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी सुशीलकुमार शिंदे त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब झटून प्रचाराला लागले आहे. गेल्या प्रचारातील त्रुटी लक्षात घेऊन शिंदे हे स्वतः मतदारांपर्यंत पोचत आहेत. भाजपच्या केंद्र आणि राज्यातील सत्तेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते भाजपकडे गेल्याने शिंदे अगोदरच अडचणीत आहेत. संसदीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले शिंदे सध्यातरी प्रकाश आंबेडकरांच्या निवडणुकीतील आव्हानामुळे अडचणीत झाले आहेत. पूर्वी केलेल्या सोलापूरमधील विकासकामांचा पाढा वाचत ते मतदारांसमोर जात आहेत. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी मागावर्गीयांच्या मतांबरोबर एमआयएमला बरोबर घेऊन दलित आणि मुस्लिम मतांची मोट बांधण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून मागासवर्गीय समाज प्रकाश आंबेडकरांच्या पाठिशी एकसंधपणे उभा आहे. सोलापुरात त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी काँग्रेसप्रमाणेच भाजपलाही धडकी भरवणारी आहे. काँग्रेसने केलेल्या अन्यायाचा पाढा वाचून आंबेडकरच न्याय देऊ शकतील, असे सांगून त्यांच्यामागे उभे राहण्याचे आवाहन एमआयएमच्या ओवेसी यांनी केले आहे.

या दोन दिग्गजांच्या लढतीत भाजप-शिवसेना महायुतीकडून प्रथमच एक मठाधीश निवडणूक लढवत असल्याने या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महायुतीने जातीय समीकरणे विचारात घेऊन डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राजकारणात नवखे असले तरी धार्मिक कार्यामुळे त्यांचा भक्तगण मोठा आहे. ही निवडणूक राजकारणासाठी नाही तर राष्ट्रसेवेसाठी लढवत असल्याचे महास्वामी सांगतात. त्यांच्या विजयासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या दोन्ही मंत्र्यांना आपल्या मतदारसंघातून मताधिक्य देणे गरजेचे आहे, यावर त्यांच्या विधानसभेचे भवितव्य अवलंबून आहे. मोदींनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांसमोर जाणाऱ्या महास्वामींना शिंदे आणि आंबेडकर यांनी दिलेले आव्हान पेलून दाखवावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘साताऱ्यातील दहशत मोडीत काढा’नरेंद्र पाटील यांचे आवाहन

0
0

सातारा : 'सातारा जिल्हा मागील दहा वर्षांपासून दहशतीखाली आहे. या दहा वर्षांत विकास ही झाला नाही, त्यात भर म्हणून जनता अन्याय सहन करीत आहे. यापुढे येथील जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी असेल. जिल्ह्यातील दहशत मोडीत काढण्यासाठी जनतेने परिवर्तन घडवून मला निवडून द्यावे,' महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केले आहे. पाल (ता. कराड) येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते. या वेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहशत मोडीत काढण्यासाठी परिवर्तन घडवानरेंद्र पाटील यांचे आवाहन

0
0

दहशत मोडीत काढण्यासाठी परिवर्तन घडवा

नरेंद्र पाटील यांचे आवाहन

सातारा :

'सातारा जिल्हा मागील दहा वर्षांपासून दहशतीखाली आहे. या दहा वर्षांत विकास ही झाला नाही, त्यात भर म्हणून जनता अन्याय सहन करीत आहे. यापुढे येथील जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी असेल. जिल्ह्यातील दहशत मोडीत काढण्यासाठी जनतेने परिवर्तन घडवून मला निवडून द्यावे,' महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

पाल (ता. कराड) येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते. या वेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचा अशक्त बछडा अखेर आईच्या कुशीत विसावला

0
0

बिबट्याचा अशक्त बछडा अखेर आईच कुशीत विसावला

कराड :

काले (ता. कराड) येथील धोंडेवाडी परिसरातील चौगुले मळातील उसाच्या शेतात ऊसतोड कामगारांना ऊसतोडणी करताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. त्यातील एक बछडा मृत तर दुसरा बछडा जिवंत पण अशक्त अवस्थेत आढळला होता. या अशक्त बछड्यावरती येथील वन विभागाने गेले सहा दिवस उपचार करून तला सशक्त केले. त्यानंतर मादी बिबट्याने बछड्याला घेऊन जावे, यासाठी वन विभागाने बछड्याला देखरेखीखाली घटनास्थळी ठेवले होते. मात्र, सलग पाच दिवसांपासून मादी बिबट्याने हुलकावणी दिली. अखेर, सोमवारी १५ रोजी पहाटे मादी बिबट्या बछड्याला घेऊन वनक्षेत्रात निघून गेल्याने वन विभागाचा जीव भांड्यात पडला.

धोंडेवाडी परिसरातील ऊसाचा शेतात बिबट्याचे दोन बछडे सापडले. मात्र, अंदाजे एक महिना वय असलेल्या या बछड्यांपैकी एक बछडा मृत तर एक बछडा जिवंत पण, अशक्त अवस्थेत आढळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत होती. त्या नंतर वन विभागाने मृत बछड्याला सदर परिसरात दहन करण्यात आले होते. अशक्त बछड्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले होते. या बछड्याला दर तीन तासांनी मेंढीचे दूध देण्यात येत होते. शिवाय सदर बछड्याला त्याच्या आईने स्वतः नैसर्गिक अधिवासात घेऊन जावे, या साठीही वन विभागाने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले होते. बुधवारपासून रविवारी पहाटे साडेपाच ते सायंकाळी साडेसहा पर्यंत वनविभागाच्या देखरेखीखाली ठेवून वन विभागाने शेवटपर्यंत प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही

0
0

राज ठाकरेंची नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दात टीका

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा या दुकलीच्या हालचाली रशियाच्या धर्तीवर सुरू आहेत. ते दोघे देशाला मोडीत काढत आहेत. ज्यांच्यावर मी विश्वास टाकला होता, त्या मोदींनीच केसाने गळा कापला. इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही,' अशा शेलक्या शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. सोमवारी सायंकाळी सोलापुरात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केले. अच्छे दिन आणि विकासाच्या गप्पा मारणारे मोदी आणि शहा ही दोन नावे देशाच्या राजकीय क्षितिजावरून गेली पाहिजेत. या दोघांबद्धल माझ्या मनात प्रचंड राग असल्यानेच मी माझ्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीत उभा नसताना प्रचारात उतरलो आहे. मी कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी आलो नाही. मोदी-शहा या जोडगोळीला हटविण्यासाठी मोदींना मदत होईल, अशा कोणाला ही मतदान करू नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

ठाकरे म्हणाले, 'मोदी आणि शहा देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत. त्यांनी शेतकरी आत्महत्या व बेरोजगारीचे आकडे लपविले आहेत. प्रसार माध्यमांची गळचेपी केली आहे. इतकेच नव्हे तर शहीद जवानांचे फोटो लावून भाषणे करण्यात येत आहेत. नोटबंदीमुळे सुमारे ४ ते ५ कोटींहून अधिक लोकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे. देशभरातील नागरिकांनी संपूर्ण बहुमतात सरकार हातात देऊनही त्यांनी देशभरातील जनतेची घोर निराशा केली. मोदी आणि फडणवीस यांचे सरकार आल्यापासून सुमारे १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.'

बाबासाहेबांच्या स्मारकांची एक वीटही रचली नाही

इंदू मिलमधील जागेत बाबासाहेबांच्या स्मारकाची घोषणा केली. मात्र पाच वर्षांत एक वीटही रचली नाही. स्मारकाची संकल्पना माझी होती. या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाचनालय व ग्रंथालय होण्याची अपेक्षा होती. यामुळे जग ज्ञान घेण्यासाठी या ठिकाणी येईल. नुसते पुतळे उभा करणे म्हणजे स्मारक नव्हे. अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक करण्यापेक्षा महाराजांचे खरे स्मारक गड आणि किल्ले आहेत, ते नीट बनवा, त्यांचा नवीन पिढी आदर्श घेईल, असे काम करा.

मोदींच्या फेक जाहिरातींचा हिशेब द्या

सरकारने बेरोजगारांना काम दिल्यास प्रामुख्याने मराठा मुला-मुलींना नोकरीत प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज भासणार नाही. मतांसाठी आरक्षणाच्या नावावर दोन समाजात भांडणे लावणे आणि आपली पोळी भाजून घेणे हा सरकारचा उद्योग आहे. एखादी गोष्ट घडली की, दुसरी घटना घडवायची आणि पहिल्या घटनेकडे जाणीवपूर्वक जनतेचे लक्ष्य विचलित करायचे, असा उद्योग सुरू आहे. भाजप सरकार माझ्या जाहीर सभांच्या खर्चाचा हिशोब मागतोय. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने ४ हजार ८८० कोटी फेक जाहिरातींवर केलेल्या खर्चाचा हिशोब कोण देणार? असा सवालही ठाकरे यांनी भाजपला विचारला. माझ्या खर्चाची चिंता त्यांनी करू नये, असेही त्यांनी सुनावले. भाजपने आत्महत्या होत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जे माफ न करता उद्योजकांची अडीच लाख कोटींची कर्जे माफ केली. परदेशातून काळा पैसे आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख टाकणारे गेले कुठे, असा सवाल ही त्यांनी केला.

डिजिटल 'हरिसाल' गावचा गोपालकृष्ण व्यासपीठावर

भाजप सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून हरिसाल हे गाव डिजिटल झाल्याचे दाखविले होते. या गावात ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून खरेदी व्यवहार केले जात असल्याचे व २४ तास वायफाय, एटीएम मशीन, मोबाइलचा वापर आदींवर फोकस करीत गावातील एका तरुणाला जाहिरातीत दाखविले होते. या डिजिटल गावाची पोलखोल राज ठाकरे यांनी केली. या डिजिटल जाहीरातीमधील गोपाकृष्णाला चक्क व्यासपीठावर आणून हा तरुण नोकरीसाठी पुणे शहरात भटकंती करीत असल्याचे निदर्शनास आले, असता मनसे कार्यकर्त्यांनी त्याला माझ्या संपर्कात आणल्याचे सांगत मोदी सरकारच्या खोट्या डिजिटल योजनेचा पर्दाफाश केला.


राज यांच्याकडून मोदींचा खोटारडेपणा उघड

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणा आणि न केलेल्या अंमलबजावणीचा पंचनामा केला. मोदींच्या भाषणातील विसंगती त्यांनी हजारो सोलापूरकरांसमोर चव्हाट्यावर आणली. मोदींनी जाहीर सभांमध्ये केलेल्या आधी व नंतरच्या भाषणाचे व्हिडिओ दाखवून मोदींची पोलखोल केली. याद्वारे मोदी कसे खोटे बोलत आहेत, हे राज यांनी पुराव्यासह चित्रफितीद्वारे पटवून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरची बाजाराला दरवाढीचा तडका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाचा तडाखा वाढला असून, घरोघरी महिलावर्गाकडून मिरची खरेदीसाठी तयारी सुरू झाली आहे. वेळेत पाऊस न झाल्याने दर्जेदार मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने मिरचीच्या दरात प्रतिकिलो १० पासून १०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच चटणी तयार करण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांच्या पदार्थात प्रतितोळा पाच ते दहा रुपयांची वाढ झाल्याने चटणी व मसाला बाजार 'तिखट' झाला आहे.

फेब्रुवारी महिना संपला की शहर व ग्रामीण भागातील महिलांना मिरची खरेदीचे वेध लागतात. वर्षभरासाठी लागणाऱ्या चटणीसाठी मिरचीचा बुक्का (पूड किंवा पावडर) तयार केला जातो. कोल्हापूरकरांच्या चटणीत हमखास संकेश्वरी मिरचीचा समावेश असतो. यंदा संकेश्वरी मिरचीचा दर प्रतिकिलो ७०० ते ९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गतवर्षी संकेश्वरीचा दर प्रतिकिलो ८०० रुपये होता. संकेश्वरी मिरची चवीला तिखट असून, रंग व वासाला चांगली असल्याने कोल्हापूरकरांची या मिरचीला पसंती असते. मटण, मासे, मसाल्याचे पदार्थ तयार करण्यासाठी संकेश्वरी मिरची पावडरचा वापर केला जातो. खास संकेश्वरी मिरचीची खरेदी करण्यासाठी काही कुटुंबातील सदस्य थेट गडहिंग्लज बाजारपेठेला भेट देतात.

संकेश्वरीबरोबर लवंगी, ब्याडगी, कनार्टक जवारी, गुंटूर मिरचीलाही मोठी मागणी आहे. कर्नाटक मिरचीचा दर प्रतिकिलो १६० रुपये आहे. ब्याडगीचा दर १६० ते १९० रुपये आहे. काश्मिरी मिरचीचा दर प्रतिकिलो २४० रुपये आहे. मारवाडी, गुजराती समाज या मिरचीला पसंती देतात. देठ काढलेल्या ब्याडगी मिरचीचा दर २४० ते २५० रुपये आहे.

०००००

कोट...

खरीप हंगामात शेवटचा पाऊस न झाल्याने उत्तम दर्जाच्या मिरचीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे यंदा मीडियम दर्जाची मिरची बाजारात आली आहे. मिरचीच्या दरात प्रतिकिलो १० ते १०० रुपये दरवाढ झाली आहे.

अनंत सांगावकर, मिरची व्यापारी

०००००

बाजारातील मिरची दर (प्रतिकिलो)

संकेश्वरी ७०० ते ९०० रुपये

लवंगी १५० रुपये

ब्याडगी १६० ते १९० रुपये

कर्नाटक जवारी १६० रुपये

गुंटूर १२० रुपये

काश्मिरी २४० रुपये

०००

मसाल्याचे दर

धने १४० ते १६० रुपये प्रतिकिलो

हिंग ६ रुपये प्रतितोळा

नाकेश्वर १४ रुपये प्रतितोळा

वेलदोडे २४ रुपये प्रतितोळा

मसाले वेलदोडे १५ रुपये प्रतितोळा

धोंडफूल १५ रुपये प्रतितोळा

जायपत्री २४ रुपये प्रतितोळा

बडीशेप २४ रुपये १०० ग्रॅम

शहाजिरे १० रुपये प्रतितोळा

तमालपत्री २ रुपये प्रतितोळा

रामपंत्री १० रुपये प्रतितोळा

मिरे १२ रुपये प्रतितोळा

लवंग १० रुपये प्रतितोळा

डालचीन ६ रुपये प्रतितोळा

पांढरे मिरे १५ रुपये प्रतितोळा

हळकुंड १६ रुपये १०० ग्रॅम

मेथी १० रुपये प्रतितोळा

सुके खोबरे १८० ते २०० रुपये प्रतिकिलो.

00000000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडूनच खरेदी

0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:@satishgMT

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकांना एक एप्रिलपासून विक्रीच्या रक्कमेवर पाच टक्के जीएसटी भरण्याचा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे. नवीन पद्धतीने जीएसटी भरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना जीएसटी नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडून ८० टक्के खरेदीची अट घातली आहे. त्यामुळे सिमेंट, वाळू, खडीसह बांधकाम साहित्य त्यांच्याकडूनच खरेदी करावे लागणार आहे. बांधकाम कामगार पुरवणाऱ्या ठेकेदारांनाही जीएसटीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.

वस्तू व सेवा कर परिषदेने एक एप्रिलपासून घर व फ्लॅट विक्रीच्या रक्कमेवरील जीएसटीत १२ टक्क्यांवरुन पाच टक्के इतकी कपात केली. परवडणाऱ्या घरावर एक टक्का जीएसटी आकारला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. नवीन पद्धतीने पाच टक्के अथवा एक टक्का जीएसटी भरताना एकूण प्रकल्पाच्या १५ टक्के चटई क्षेत्रापेक्षा जास्त व्यावसायिक गाळे असता कामा नये अशी अट घातली आहे. बांधकाम प्रकल्पांसाठी जे साहित्य खरेदी केले जाते, ते जीएसटी नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याची अट घातली आहे. ८० टक्के बांधकाम साहित्य जीएसटी नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करावयाचे आहे.

सिमेंट, वाळूसह बांधकाम साहित्य विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. पण, बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी जीएसटी नोंदणी केलेली नाही. अशा व्यापाऱ्यांना नोंदणी करायला लावणे हा जीएसटी परिषदेचा हेतू आहे. जर बांधकाम व्यावसायिकांनी जीएसटी नोंदणी नसलेल्या व्यापाऱ्यांकडून साहित्य खरेदी केले तर साहित्यावर १८ टक्के व सिमेंटवर २८ टक्के कर म्हणजे आरसीएम भरावा लागणार आहे.

कोल्हापुरातील बहुतांशी बिल्डर स्थानिक व्यापाऱ्यांकडून बांधकाम साहित्य खरेदी करतात. सिमेंट, टाइल्स, सळीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जीएसटी नोंदणी केली आहे. पण, त्याचे प्रमाण कमी आहे. वाळू व खडी विक्री करणाऱ्या बहुतांश व्यापाऱ्यांनी जीएसटीसाठी नोंदणी केलेली नाही. बांधकामांसाठी कामगार खर्च मोठा असतो. पण कामगार पुरविणाऱ्या ठेकेदारांनी जीएसटी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे ठेकेदारांना जीएसटी नोंदणी करावी लागेल. बहुतांश बांधकाम व्यावसायिकांचे व्यापारी, ठेकेदार ठरलेले असतात. नोंदणी न करणाऱ्या व्यापारी, ठेकेदारांना जीएसटी नोंदणीसाठी बांधकाम व्यावसायिकांना आग्रह धरावा लागणार आहे. त्यासाठी व्यावसायिकांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

जीएसटी नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडून ८० टक्के खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. जीएसटीसाठी नोंदणी न केलेल्या वाळू, खडी व बांधकाम कामगारांच्या ठेकेदारांना नोंदणीसाठी विनंती करावी लागणार आहे. त्यासाठी क्रिडाई पुढाकार घेईल.

- विद्यानंद बेडेकर, क्रिडाई, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या चार पैकी तीन प्रभाग समित्यांच्या सभापतिपदावर अपेक्षेप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने वर्चस्व राखले. गांधी मैदान प्रभाग समिती सभापतिपदी काँग्रेसच्या रीना कांबळे, छत्रपती शिवाजी मार्केट सभापतिपदी राष्ट्रवादीच्या हसिना फरास तर बागल मार्केट प्रभाग समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या शोभा कवाळे यांची निवड झाली. बहुचर्चित ताराराणी मार्केट विभागीय प्रभाग समितीच्या सभापतिपदी ताराराणी आघाडीच्या राजसिंह शेळके यांची सलग तिसऱ्या वर्षी चिठ्ठीद्वारे निवड झाली. जिल्हा परिषदेचे सीईओ तथा निवडणूनक अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी प्रभाग समित्यांच्या सभापतीनिवडीसाठी स्थायी समिती सभागृहात बैठक झाली.

गांधी मैदान समितीसाठी नगरसेविका कांबळे आणि नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांच्यात लढत झाली. कांबळे यांना ११ तर खाडे-पाटील यांना सहा मते मिळाली. निवडीवेळी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, मेघा पाटील, प्रतीक्षा पाटील अनुपस्थित होत्या.

छत्रपती शिवाजी मार्केट समितीसाठी नगरसेविका सुनंदा मोहिते यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर सभापतिपदी हसिना फरास यांची बिनविरोध निवड झाली. बागल मार्केट समितीसाठी नगरसेविका शोभा कवाळे आणि सविता भालकर यांच्यामध्ये निवडणूक झाली. कवाळे यांना ११ तर भालकर यांना आठ मते पडली. या निवडीदरम्यान नगरसेविका शमा मुल्ला गैरहजर होत्या.

ताराराणी मार्केट प्रभागासाठी नगरसेवक श्रावण फडतारे आणि राजसिंह शेळके यांचे अर्ज दाखल झाले होते. फडतारे व शेळके यांना समान दहा मते पडली. त्यामुळे सभापती निवड चिठ्ठीद्वारे काढण्याचा निर्णय पिठासन अधिकाऱ्यांनी घेतला. महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या दिव्या कांबळे हिने उचललेली चिठ्ठी शेळके यांच्या नावाची निघाली. त्यामुळे पिठासन अधिकारी मित्तल यांनी त्यांची सभापतिपदी निवड झाल्याचे जाहीर केले. शेळके यांची सलग तिसऱ्यांदा सभापतिपदी चिठ्ठीद्वारे निवड झाली.

महापौर सरीता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसचिव दिवाकर कारंडे, विजय वणकुद्रे यांसह नगरसेवक, नगरसेविकांनी नूतन सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जोतिबा यात्रेची जय्यत तयारी

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्रासह-कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पोलिस व जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी वाहतुकीचे नियोजन व पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळात १४०० पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी नेमण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिवाजी पूल ते जोतिबा डोंगर मार्गावर पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे.

चैत्र पोर्णिमा यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातून लाखो भाविक वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगरावर येत असतात. सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. तरीही भाविक बैलगाडीने सासनकाठ्या घेऊन जोतिबा डोंगराकडे निघाले आहेत. १९ एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक तिरुपती काकडे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षेबाबत सूचना दिल्या.

शुक्रवारी (दि. १९) आणि शनिवारी (दि. २०) यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविक जमलेले असतात. सासनकाठ्या व पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. मंदिर परिसर व सेंट्रल प्लाझा या दोन्ही स्थळांची पोलिसांनी पाहणी करून तबंदोबस्ताचे नियोजन केले. अशा वेळी दर्शनरांगेत चेंगराचेंगरी होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जोतिबा परिसरात ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. डोंगरावर येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

यात्रेकरूंसाठी मार्ग

यात्रेसाठी सर्व वाहने केर्ली व कुशिरे फाटामार्गे जोतिबा डोंगरावर जातील. इतर सर्व मार्ग चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. केर्ली-कुशिरे गावांवरून येणारी सर्व चारचाकी वाहने सामाजिक वनीकरण फाटा येथून गायमुखमार्गे जोतिबावर जातील. सर्व एस. टी. बस व अत्यावश्यक सेवेतील वाहने सामाजिक वनीकरण येथून दानेवाडीमार्गे जोतिबावर जातील. घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व वाहने दानेवाडी फाट्याकडून वाघबीळकडे न जाता गायमुखमार्गे केर्लीकडे उतरतील. जोतिबा ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतूक दोन्ही मार्गांनी सुरू राहील. देवदर्शन घेऊन परत जाणाऱ्या वाहनचालकांनी गिरोली बाजूकडील एकदिशा मार्गाचा अवलंब करावा. वाघबीळ व शाहूवाडीकडून दानेवाडीमार्गे येणारी सर्व वाहने केर्लीमार्गे जोतिबावर जातील. माले, कोडोली, गिरोली, वाघबीळ हे मार्ग बाहेर जाण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. यामार्गे वाहनांना जोतिबावर येण्यासाठी प्रवेशबंदी आहे. या मार्गावर दिशादर्शक व सूचना फलक लावले आहेत.

पार्किगची ठिकाणे

केर्ली फाटामार्गे येणाऱ्या वाहनांना ट्रक पार्किंग, नवीन एस. टी. स्टॅँड, चारचाकी, जुने एसटी स्टँड, यात्री निवास समोरील जागा, तळ्याभोवती, दोनवडे क्रॉसिंग, जुने आंब्याचे झाड परिसर, शेवताई मंदिर परिसर, केर्ली हायस्कूल, गिरोली फाटा येथे केले आहे. तर गिरोली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनांना यमाई मंदिर परिसर, बुणे कॉर्नर पार्किंग, प्रेम लॉजिंग, निलगिरी बाग परिसर येथे दुचाकी व चारचाकी पार्किंग करता येणार आहे.

अवजड वाहनांना नो एन्ट्री

बुधवारपासून (ता. १७ एप्रिल) जोतिबा डोंगावर जाणाऱ्या अवजड वाहने, ट्रक, तीनचाकी प्रवासी व मालवाहतूक रिक्षा तसेच ट्रॅक्टर यांना यात्रा कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यापूर्वीच माल न्यावा असे प्रशासनाने कळवले आहे.

बंदोबस्त दृष्टीपथात

पोलिस अधीक्षक

अप्पर अधीक्षक

पोलिस उपअधीक्षक

१९

पोलिस निरीक्षक

७३

पोलिस उपनिरीक्षक

४०

वाहतूक पोलिस

८००

पोलिस शिपाई

२ तुकड्या

एसआयपीएफ

१०००

होमगार्ड

(याशिवाय डॉग स्कॉड पथक, क्रेन व्हॅन, व्हाइट आर्मी)

मदतीसाठी संपर्क

पोलिस नियंत्रण कक्ष ०२३१ २६६२३३३

पन्हाळा पोलिस ठाणे ०२३२८ २३५०२४

कोडोली पोलिस ठाणे ०२३२८ २२४११०

जोतिबा डोंगर पोलिस चौकी ०२३२८ २३९०४१

रूग्णवाहिका सेवा १०८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमा कंपनी घोटाळ्यातील तिघे अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी येथील दि न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीत ६८ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (ता. १५) वरिष्ठ लिपिकासह तिघांना अटक केली. किरण रत्नाकर माने (वय ५१, रा. कळंबा) याच्यासह साथीदार दीपक विजय स्वामी (५१, रा. मंगळवार पेठ) आणि विजय आनंदराव शिंदे (४९, रा. न्यू शाहूपुरी) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी तिघांचीही बँक खाती गोठवली असून अधिक चौकशी सुरू आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या शाहूपुरी शाखेत किरण माने चार वर्षांपासून वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होता. त्याच्याकडे १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत विमा कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी होती. या कालावधीतील शाखेचे वार्षिक लेखा परीक्षण केले असता ६८ लाख ५० हजारांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. संशयित माने हा विमा एजंट यांच्यासह ग्राहकांचे धनादेश काढण्याचे काम करीत होता. तो रोज दहा खात्यांवर धनादेशाद्वारे पैसे भरत होता. त्याने लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत दीपक स्वामी आणि विजय शिंदे या दोघांच्या नावे खाती उघडली होती. त्यावर तो विमा कंपनीच्या शाखेतून धनादेशाद्वारे पैसे भरत होता. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजवरून तो पैसे काढण्यासाठी जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तपास अधिकारी रुकसाना नदाफ यांनी सोमवारी सकाळी संशयित लिपिक माने याला त्याच्या घरातून अटक केली. यानंतर अधिक चौकशीत त्याच्या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. दीपक स्वामी आणि विजय शिंदे या दोघांची खाती विमा कंपनीत आहेत. यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जात होती. वर्षभराच्या काळात ६८ लाख ५० हजारांची रक्कम वर्ग केली आहे. यातील काही रक्कम दोन्ही खातेदारांनाही मिळाली आहे. तिघे संगनमताने रक्कम काढत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी तिघा संशयितांची बँक खाती गोठवली आहेत. अपहाराच्या रकमेचे त्यांनी काय केले? पैसे कशात गुंतवले? काय खरेदी केली? याची चौकशी सुरू आहे. या अपहारात विमान कंपनीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही हात असू शकतो, असा संशय तपास अधिकारी नदाफ यांनी वर्तवला आहे. याबाबत विमा कंपनीचे शाखा व्यवस्थापक श्रीकांत दत्तू कोले (५७, रा. पाचगाव, ता. करवीर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

व्याप्ती वाढण्याची शक्यता

विमा कंपनीत रोजच्या आर्थिक व्यवहारांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली जाते. कंपनीच्या खात्यांवर शिल्लक असलेली रक्कम आणि विविध खातेदारांच्या नावांवर जमा केलेल्या रकमांचे तपशीलही दिले जातात. दर महिन्याच्या अहवालातही याची सविस्तर माहिती असते. असे असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत हा प्रकार का आला नाही? असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक यंत्रांची जोडणी

0
0

कोल्हापूर : लोकसभा मतदानासाठी आवश्यक मतदान यंत्रांच्या जोडणीचे काम सोमवारपासून सुरू झाले. मंगळवारीही तालुक्याच्या ठिकाणी हे काम चालणार आहे. 'दक्षिण' विधानसभा मतदारसंघातील यंत्राची जोडणी येथील पेटाळा येथील गडकरी सभागृहात आणि 'उत्तर'मधील यंत्राची जोडणी विवेकानंद कॉलेजमधील हॉलमध्ये करण्यात येत आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू आहे. तयार झालेल्या यंत्रांवरील ज्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबणार त्याच उमेदवारास मतदान झाले की नाही, याची खात्री करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रघुनाथ पाटील, सुरेश पाटील यांचे अर्ज दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी सहाव्या दिवशी सहा जणांनी आठ अर्ज दाखल केले. खासदार धनंजय महाडिक यांनी पुन्हा दोन तर महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, शेतकरी संगटनेचे रघुनाथ पाटील यांच्यासह सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांच्याकडे बळीराजा पार्टीकडून किसन काटकर यांनी अर्ज दाखल केला. खासदार महाडिक यांचे दोन अर्ज सूचकांनी आणून दिले. 'हातकणंगले'साठी अपक्ष म्हणून संग्रामसिंह गायकवाड, विजय चौगुले, सुरेश पाटील, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र्र क्रांती सेनेचे पाटील म्हणाले, सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यात अपयशी झाले आहेत. समाजाला न्याय मिळालेला नाही. यामुळे राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

मालमत्ता

रघुनाथ पाटील : एकूण २ कोटी संपत्ती, कर्ज : १७ लाख, गुन्हे : ९

सुरेश पाटील : ४ कोटी, ४५ लाख ८ हजार ८१३

संग्राम गायकवाड : जंगम मालमत्ता : ४ लाख ९० हजार १५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लिहून ठेवा, मोदी पंतप्रधान होणार नाहीत’

0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

'घराच्या तुळईवर लिहून ठेवा, नरेंद्र मोदी यावेळी पंतप्रधान होणार नाहीत, आणि झालेच तर २०२४ ला निवडणुकाच होणार नाहीत,' अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी मांगले (ता. शिराळा) येथे केले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यावेळी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले 'नरेंद्र मोदींना हिटलरचे आकर्षण आहे, त्यामुळे विरोधकांना ते देशद्रोही समजून त्यांच्या जवळच्या लोकांनाही संपवण्याचे काम करीत आहेत. देशात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, त्यांचा मुलगा आणि स्मृती इराणी यांच्यासारखेच लोक खूश आहेत. अन्य लोक नाखूष असल्यामुळे यावेळी सत्तातर होणारच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधी भूमिका घेणारा आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा माझ्यावर आरोप केला आहे, मात्र यापुढेही शेतीमाल आणि उसाला योग्य भाव मिळवण्यासाठी कारखानदारांबरोबर भांडण सुरूच ठेवणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images