Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चाफळमध्ये रामनवमी साजरीचाफळ येथे रामनवमी उत्सव संपन्न

$
0
0

थोडक्यात

चाफळमध्ये रामनवमी

कराडः चाफळ येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा हजारो भविकांच्या उपस्थितीत सत् सीता राम की, जय च्या गजरात गुलाल खोबऱ्यांची उधळन करीत प्रचंड उत्साह आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. त्या नंतर राम दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या यात्रेत नवमी दशमी आणि एकादशी हे तीन मुख्य दिवस असून, या यात्रेला गुडीपाडव्यापासून प्रारंभ होऊन ती पुढे दहा दिवस चालते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लक्ष्मीनारायण बोल्ली पुरस्कारनारायण कुलकर्णींना जाहीर

$
0
0

लक्ष्मीनारायण बोल्ली पुरस्कार

नारायण कुलकर्णींना जाहीर

सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि चंडक परिवार यांच्या वतीने ज्येष्ठ कवी, लेखक लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या स्मरणार्थ साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत म.स.पा चे कार्याध्यक्ष जे. जे कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. अकरा हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १५ एप्रिल रोजी म्हणजे लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या जन्मदिनी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. हि. ने वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल. ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत ठकार यांच्या हस्ते आणि प्राध्यापक सुहास पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृष्णा’च्या गळीत हंगामाची सांगता

$
0
0

'कृष्णा'च्या गळीत

हंगामाची सांगता

कराड :

कृष्णा कारखाना एक कुटुंब असून, सभासद, कर्मचारी व तोडणी वाहतूकदार हे या कुटुंबाचे प्रमुख सदस्य आहेत. आपण सर्वांनी एक साथ राहिल्यास संस्थेची प्रगती कोणही रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सन २०१८-१९च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील व त्यांच्या पत्नी कविता पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या तोडणी मजूर, मुकादम, कंत्राटदारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

भोसले म्हणाले, 'अधिकारी, ऊस तोडणी मजूर ,वाहतूक कंत्राटदार व कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे कारखान्याने चांगली कामगिरी केली आहे. पुढील गळीत हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी लागणार आहे. कारखान्याची यंत्र सामुग्री ६० वर्षे जुनी असल्याने काही तांत्रिक अडचणी येतात. परंतु, या अडचणींवरही मात करीत कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कारखान्याने हंगामात ११ लाख ५८ हजार ७९५ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. अंदाजे सरासरी १२.७० एवढा साखर उतारा असून, १४ लाख ८९ हजार २३० क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पृथ्वीराज चव्हाणांची राष्ट्रवादीला कळली’

$
0
0

'पृथ्वीराज चव्हाणांची

राष्ट्रवादीला कळली'

जयकुमार गोरे

कराड :

'राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाची वेळोवेळी अवहेलना केली असून, या-ना त्या कारणाने राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निरर्थक टीका केली आहे. शिवाय, पृथ्वीराज चव्हाण यांचा पश्चिम महाराष्ट्रावरील प्रभाव कमी होत चालल्याचीही टिपण्णी राष्ट्रवादी नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र, त्याच राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीसाठी राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांची गरज भासत आहे. त्यांच्या मदतीशिवाय राष्ट्रवादीचे खासदार निवडून येऊ शकत नाहीत. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांची ताकद राष्ट्रवादीला कळली आहे,' असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.

काँग्रेसचे माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी रात्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांच्यात सुमारे तासभर कमराबंद चर्चा झाली. त्या नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सातारा, माढा लोकसभा मतदारसंघाच्या भूमिकेसह विविध विषयांवरही चर्चा झाल्याचे गोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैय्याकुमारसाठी कोल्हापुरातून मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी नेता व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कन्हैय्याकुमार हे बिहारमधील बेगुलसराई येथून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत.त्यांच्या प्रचार कार्याला मदत म्हणून कोल्हापुरातील विविध संघटनांनी एकत्र येऊन ५० हजार ५०० रुपयांचा निधी दिला आहे. तसेच परभणी व अहमदनगर येथील उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर, कॉम्रेड बन्सी सातपुते यांनाही २० हजार रुपयांची मदत पाठविली आहे.

'तरुण व बुद्धीमान नेतृत्व लोकसभेत पोहचावे यासाठी कन्हैय्याकुमार यांना देशभरातून मदत केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील गोकुळ दूध कामगार संघटना, केडीसी बँक कर्मचारी संघटना, करवीर कामगार संघ, श्रमित प्रतिष्ठान, आयटक या संस्था व काही नागरिकांनी एकत्रित येऊन निधी जमा केला. जमलेली सगळी रक्कम निवडणूक निधी म्हणून कन्हैय्याकुमार यांच्याकडे पाठविला आहे' असे एस. बी. पाटील यांनी म्हटले आहे. चांगल्या कार्यकर्त्यांना मदत करण्याचा हा प्रयत्न आहे. कन्हैय्याकुमार यांची गेल्या वर्षी कोल्हापुरात सभा झाली होती. कॉम्रेड बन्सी सातपुतेही कोल्हापूरशी निगडीत आहेत. चळवळी आणि आंदोलनाच्या माध्यमातून ते येथील विविध संस्थेशी निगडीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इकडे तिकडे करणाऱ्यांवर पक्षाचं लक्ष आहे

$
0
0

जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडेंची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसमधील काही जण 'आमचं ठरलयं' आणि राष्ट्रवादी 'आम्ही बी ध्यानात ठेवलंय'म्हणत असेल तरी नागरिकांनीच आता खासदार धनंजय महाडिक व खासदार राजू शेट्टी यांना पुन्हा खासदार करण्याचे ठरविले आहे. इकडे तिकडे करणाऱ्यांवर पक्षाचे लक्ष आहे. योग्य त्या ठिकाणी त्या नोंदी पोहोच होतील,' असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व मित्रपक्षातर्फे खासदार महाडिक यांच्या प्रचार कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष आवाडे यांनी पुन्हा एकदा सध्याच्या राजकीय घडामोडीवर स्पष्टपणे मते व्यक्त केली.

तसेच काँग्रेस कमिटीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

आवाडे म्हणाले, 'पक्षातील काही मंडळी नाराज आहेत हे खरे आहे. 'आमचं ठरलंय' म्हणणाऱ्यांना राष्ट्रवादीने 'आम्ही बी ध्यानात ठेवलंय'असं उत्तर दिले आहे. मात्र कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात लोकांनी, खासदार महाडिक व शेट्टी यांना पुन्हा खासदार करायचे ठरविले आहे.'

आवाडे म्हणाले, 'निवडणुकीच्या कालावधीत इकडे-तिकडे करणाऱ्यांवर काँग्रेस पक्षाने लक्ष ठेवले आहे. पक्षासोबत कोण आहेत, कोण विरोधात काम करत त्याच्या तालुकानिहाय नोंदी सुरू आहेत. या नोंदी योग्य ठिकाणी पोहचतील. '

प्रियांका गांधींच्या सभेसाठी प्रयत्न

शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी होणाऱ्या जाहीर सभेसाठी केंद्रीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेसमधील नेते सहभागी होणार आहेत.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सभेची कल्पना दिली आहे, कुठले नेते येणार आहेत, हे सोमवारी कळणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या कोल्हापुरातील सभेसाठी नियोजन सुरू आहे, असे आवाडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतांच्या वारसांना मदतीसाठी प्रस्ताव

$
0
0

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील महागाव रोडवर शनिवारी झालेल्या विविध अपघातांत सहाजणांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी महसूल प्रशासनाने प्रस्ताव पाठविले. मानवतेच्या भूमिकेने हे प्रस्ताव दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. हरळीजवळ चारचाकी झाडावर आदळल्याने वासंती मारुती नांदवडेकर (वय ३५), सोहम मारुती नांदवडेकर (वय १०, रा. सावतवाडी तर्फ नेसरी) या मायलेकांचे निधन झाले. दुसऱ्या घटनेत बस आणि टाटा सुमो यांच्यात अपघात झाला. सुमोतील चंद्रकांत मारुती गरुड (वय ६५), नामदेव सदाशिव चव्हाण (वय ५०), आप्पा रावजी सुपले (वय ५२), मनोज नामदेव चव्हाण (वय २४, सर्व रा. नूल, ता. गडहिंग्लज) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना सरकारी मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरची बाजाराला दरवाढीचा तडका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाचा तडाखा वाढला असून, घरोघरी महिलावर्गाकडून मिरची खरेदीसाठी तयारी सुरू झाली आहे. वेळेत पाऊस न झाल्याने दर्जेदार मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने मिरचीच्या दरात प्रतिकिलो १० पासून १०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच चटणी तयार करण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांच्या पदार्थात प्रतितोळा पाच ते दहा रुपयांची वाढ झाल्याने चटणी व मसाला बाजार 'तिखट' झाला आहे.

फेब्रुवारी महिना संपला की शहर व ग्रामीण भागातील महिलांना मिरची खरेदीचे वेध लागतात. वर्षभरासाठी लागणाऱ्या चटणीसाठी मिरचीचा बुक्का (पूड किंवा पावडर) तयार केला जातो. कोल्हापूरकरांच्या चटणीत हमखास संकेश्वरी मिरचीचा समावेश असतो. यंदा संकेश्वरी मिरचीचा दर प्रतिकिलो ७०० ते ९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गतवर्षी संकेश्वरीचा दर प्रतिकिलो ८०० रुपये होता. संकेश्वरी मिरची चवीला तिखट असून, रंग व वासाला चांगली असल्याने कोल्हापूरकरांची या मिरचीला पसंती असते. मटण, मासे, मसाल्याचे पदार्थ तयार करण्यासाठी संकेश्वरी मिरची पावडरचा वापर केला जातो. खास संकेश्वरी मिरचीची खरेदी करण्यासाठी काही कुटुंबातील सदस्य थेट गडहिंग्लज बाजारपेठेला भेट देतात.

संकेश्वरीबरोबर लवंगी, ब्याडगी, कनार्टक जवारी, गुंटूर मिरचीलाही मोठी मागणी आहे. कर्नाटक मिरचीचा दर प्रतिकिलो १६० रुपये आहे. ब्याडगीचा दर १६० ते १९० रुपये आहे. काश्मिरी मिरचीचा दर प्रतिकिलो २४० रुपये आहे. मारवाडी, गुजराती समाज या मिरचीला पसंती देतात. देठ काढलेल्या ब्याडगी मिरचीचा दर २४० ते २५० रुपये आहे.

०००००

कोट...

खरीप हंगामात शेवटचा पाऊस न झाल्याने उत्तम दर्जाच्या मिरचीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे यंदा मीडियम दर्जाची मिरची बाजारात आली आहे. मिरचीच्या दरात प्रतिकिलो १० ते १०० रुपये दरवाढ झाली आहे.

अनंत सांगावकर, मिरची व्यापारी

०००००

बाजारातील मिरची दर (प्रतिकिलो)

संकेश्वरी ७०० ते ९०० रुपये

लवंगी १५० रुपये

ब्याडगी १६० ते १९० रुपये

कर्नाटक जवारी १६० रुपये

गुंटूर १२० रुपये

काश्मिरी २४० रुपये

०००

मसाल्याचे दर

धने १४० ते १६० रुपये प्रतिकिलो

हिंग ६ रुपये प्रतितोळा

नाकेश्वर १४ रुपये प्रतितोळा

वेलदोडे २४ रुपये प्रतितोळा

मसाले वेलदोडे १५ रुपये प्रतितोळा

धोंडफूल १५ रुपये प्रतितोळा

जायपत्री २४ रुपये प्रतितोळा

बडीशेप २४ रुपये १०० ग्रॅम

शहाजिरे १० रुपये प्रतितोळा

तमालपत्री २ रुपये प्रतितोळा

रामपंत्री १० रुपये प्रतितोळा

मिरे १२ रुपये प्रतितोळा

लवंग १० रुपये प्रतितोळा

डालचीन ६ रुपये प्रतितोळा

पांढरे मिरे १५ रुपये प्रतितोळा

हळकुंड १६ रुपये १०० ग्रॅम

मेथी १० रुपये प्रतितोळा

सुके खोबरे १८० ते २०० रुपये प्रतिकिलो.

00000000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस का ढेपाळलीय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर काँग्रेस प्रचंड सक्रीय झाली आहे. पण राज्यात आणि जिल्ह्यात काँग्रेस का ढेपाळलीय हेच कळत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांना लगावला. बुधवारी (ता. १७) गांधी मैदान येथे होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेच्या तयारीसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्क कार्यालयात प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मुश्रीफ यांनी काँग्रेस नेत्यांना चांगलेच टोले लगावले. बुधवारच्या सभेला एक लाख नागरिक आणण्याचा निर्धार आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, ' कोल्हापुरात काही जण 'आमचं ठरलंय' म्हणतात, वारणेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांचे वेगळेच सुरू आहे. मात्र, आत्ता आपण कामाला लागले पाहिजे. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी उर्वरित काँग्रेस सोबत घेऊन जोरदार कामाला लागावे. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत यंत्रणा गतिमान करावी. प्रचाराच्या सात दिवसाच्या कालावधीत कितीही त्रास होऊ दे, कोणत्याही परिस्थितीमध्ये महाडिकांना खासदार करणार, असा निर्धार करुन प्रत्येक कार्यकर्त्याने प्रचारात झोकून द्यावे.'

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आवाडे म्हणाले, 'कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते तळमळीने प्रचार करत आहेत. पवार यांच्या सभेला पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे लावून वाजतगाजत येतील.'

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'संपूर्ण मतदारसंघात प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला मेळावे, महामेळावा, मतदारांशी संपर्कातून वातावरण निर्मिती झाली आहे. उर्वरित सात दिवसांच्या कालावधीत गावपातळीवर सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रचारफेरी आणि कोल्हापुरातील प्रत्येक वॉर्डनिहाय प्रचार फेरीचे नियोजन करावे.' असे आवाहन केले. याप्रसंगी प्रा. मच्छिंद्र सकटे प्रा. विश्वास देशमुख, दगडू भास्कर यांची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी आभार मानले. बैठकीला माजी आमदार भरमूअण्णा पाटील, नंदिनी बाभूळकर, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, 'गोकुळ'चे संचालक अरुण डोंगळे, विश्वास जाधव, उदयसिंह पाटील, 'स्वाभिमानी'चे प्रा. जालिंदर पाटील, भगवान काटे उपस्थित होते. याप्रसंगी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या यशवंत शेळके यांनी महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला.

लग्न,मंडप आपल्या दारात, इतरांचा सन्मान राखा

मुश्रीफ म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आघाडीतील इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखावा, त्यांना प्रचाराच्या नियोजनात सामील करून घ्या. कारण लग्न आणि मंडप आपल्याच दारात आहे.'

'जेवढी यंत्रणा तेवढी माणसं'

बुधवारच्या सभेसाठी २५ हजार माणसे आणण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे महाडिकांनी सांगितले. तसेच मतदारसंघनिहाय आढावा घेत असताना माजी आमदार के. पी. पाटील यांनी 'जेवढी यंत्रणा तेवढी माणसे जमतील'असे सुचविले. त्यावर महाडिकांनी, 'यंत्रणेचा तुटवडा नाही. सभा यशस्वी होण्यासाठी जे नियोजन सांगाल त्याची पूर्तता करू'असे सांगितले.

होळी देवाची पोळी कायम कागलमध्येच

आमदार मुश्रीफ यांनी सभेसाठी पाच हजार माणसे आणू असे सांगितले. त्यावर माजी आमदार के. पी. पाटील यांनी मुश्रीफांचा चिमटा काढला. ते म्हणाले, 'कागलमधून सभेसाठी पाच हजार माणसे हे मुश्रीफांना शोभणारे नाही. कागलची राखीव फौज त्यांनी मैदानात उतरवावी. पक्षाचे नेते शरद पवार यांनी कागलच्या सभेत त्यांचे प्रचंड कौतुक केले. त्यांना मंत्रिपदाची घोषणा केली. आमच्या मतदारसंघात मात्र सभाही घेतली नाही आणि अन्य काही दिलेही नाही. नाही तर आम्ही सभेला २५ हजार माणसे आणली असती. पण काही गोष्टी आमच्या हातात नाहीत. कारण होळी देवाची पोळी कायम कागलमध्येच पडते' या वक्तव्यावर मुश्रीफांनाही हसू आवरले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५० केंद्रावर ‘तिसरा डोळा’

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : लोकसभा मतदानादिवशी जिल्ह्यातील ३५० मतदान केंद्रावर तिसऱ्या डोळ्याची म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ठेवण्यात येणार आहे. या केंद्रावरील मतदान प्रक्रियेची ऑनलाइन पाहणी तालुक्याच्या ठिकाणी बसून सहायक निवडणूक निर्णय करतील. निवडणूक प्रशासनाने केंद्रावर कॅमेरे व इतर यंत्रणा बसवण्याची तयारी पूर्ण केली आहे. केंद्रात कॅमेरे बसवण्याचे ठिकाण, त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक कर्मचाऱ्याचे नाव, त्याचा मोबाइल क्रमांक संकलित केले आहे.

गेल्या निवडणुकांत केंद्र आणि परिसरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, एकूण झालेल्या मतदानापैकी एकाच उमेदवारास ७० ते ९० टक्यांपर्यंत झालेले मतदान, कुटुबांतील सदस्य नसलेले एकाकी मतदारांची संख्या अधिक असलेली ७१ मतदान केंद्रे क्रिटिकल (संवेदनशील) आहेत. यासह दुर्गम, वाड्या वस्त्या, दळणवळणाच्या चांगल्या सुविधा नसलेल्या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. कॅमेऱ्यामुळे मतदानावेळचे गैरप्रकार, केंद्र ताब्यात घेण्याच्या प्रकारांना चाप बसणार आहे. यासाठी सर्वच विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्राच्या दहा टक्के केंद्रात ही यंत्रणा असेल.

शहरातील 'दक्षीण'मधील राजेंद्रनगर, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी बसस्टॉप, राजोपाध्यायनगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, संभाजीनगर, जवाहरनगर, टेंबलाईवाडी, अवचितनगर, पाचगाव, उचगाव तर 'उत्तर'मधील ताराबाई पार्क, मंगळवारपेठ, सदरबजार, राजारामपुरी मातंग वसाहत, कावळा नाका, कनाननगर, यादवनगर, टिंबरमार्केट, अकबर मोहल्ला, सिद्धार्थनगर, शनिवार पेठ येथील केंद्रावरही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. येथे कोणताही अनुचित प्रकार कॅमेराबद्ध झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. कॅमेरा टिपत असलेली दृश्ये ऑनलाइन पाहण्याची सुविधा सहाय्यक निवडणूक कार्यालयात करण्यात येणार आहे. तेथे बसून ३५० केंद्रावरील घडामोडींची पाहणी करण्यात येणार आहे.

संवेदनशील केंद्रे

दक्षिण :३३

उत्तर :३१

कागल :३६

राधानगरी :४२

चंदगड :३९

करवीर :३६

शाहूवाडी :३३

हातकणंगले :३३

इचलकरंजी :३३

शिरोळ :३०

क्रिटिकलसह दुर्गम ठिकाणच्या मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येईल. मतदानाआधी एक दिवस कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या केंद्रावर मतदान सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंतची प्रक्रिया कॅमेराबद्ध होईल. सहायक मतदान अधिकाऱ्यांना केंद्रावरील घडामोडी ऑनलाइन पाहता येईल.

सतीश धुमाळ, उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग

३९३९

एकूण मतदान केंद्रे

३१

संवेदनशील केंद्रे

३५०

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणारी केंद्रे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडूनच खरेदी

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:@satishgMT

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकांना एक एप्रिलपासून विक्रीच्या रक्कमेवर पाच टक्के जीएसटी भरण्याचा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे. नवीन पद्धतीने जीएसटी भरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना जीएसटी नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडून ८० टक्के खरेदीची अट घातली आहे. त्यामुळे सिमेंट, वाळू, खडीसह बांधकाम साहित्य त्यांच्याकडूनच खरेदी करावे लागणार आहे. बांधकाम कामगार पुरवणाऱ्या ठेकेदारांनाही जीएसटीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.

वस्तू व सेवा कर परिषदेने एक एप्रिलपासून घर व फ्लॅट विक्रीच्या रक्कमेवरील जीएसटीत १२ टक्क्यांवरुन पाच टक्के इतकी कपात केली. परवडणाऱ्या घरावर एक टक्का जीएसटी आकारला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. नवीन पद्धतीने पाच टक्के अथवा एक टक्का जीएसटी भरताना एकूण प्रकल्पाच्या १५ टक्के चटई क्षेत्रापेक्षा जास्त व्यावसायिक गाळे असता कामा नये अशी अट घातली आहे. बांधकाम प्रकल्पांसाठी जे साहित्य खरेदी केले जाते, ते जीएसटी नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याची अट घातली आहे. ८० टक्के बांधकाम साहित्य जीएसटी नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करावयाचे आहे.

सिमेंट, वाळूसह बांधकाम साहित्य विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. पण, बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी जीएसटी नोंदणी केलेली नाही. अशा व्यापाऱ्यांना नोंदणी करायला लावणे हा जीएसटी परिषदेचा हेतू आहे. जर बांधकाम व्यावसायिकांनी जीएसटी नोंदणी नसलेल्या व्यापाऱ्यांकडून साहित्य खरेदी केले तर साहित्यावर १८ टक्के व सिमेंटवर २८ टक्के कर म्हणजे आरसीएम भरावा लागणार आहे.

कोल्हापुरातील बहुतांशी बिल्डर स्थानिक व्यापाऱ्यांकडून बांधकाम साहित्य खरेदी करतात. सिमेंट, टाइल्स, सळीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जीएसटी नोंदणी केली आहे. पण, त्याचे प्रमाण कमी आहे. वाळू व खडी विक्री करणाऱ्या बहुतांश व्यापाऱ्यांनी जीएसटीसाठी नोंदणी केलेली नाही. बांधकामांसाठी कामगार खर्च मोठा असतो. पण कामगार पुरविणाऱ्या ठेकेदारांनी जीएसटी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे ठेकेदारांना जीएसटी नोंदणी करावी लागेल. बहुतांश बांधकाम व्यावसायिकांचे व्यापारी, ठेकेदार ठरलेले असतात. नोंदणी न करणाऱ्या व्यापारी, ठेकेदारांना जीएसटी नोंदणीसाठी बांधकाम व्यावसायिकांना आग्रह धरावा लागणार आहे. त्यासाठी व्यावसायिकांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

जीएसटी नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडून ८० टक्के खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. जीएसटीसाठी नोंदणी न केलेल्या वाळू, खडी व बांधकाम कामगारांच्या ठेकेदारांना नोंदणीसाठी विनंती करावी लागणार आहे. त्यासाठी क्रिडाई पुढाकार घेईल.

- विद्यानंद बेडेकर, क्रिडाई, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र : विजय जाधव

$
0
0

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र : विजय जाधव

०००००

निवडणूक जनतेच्या हाती !

००००

कोल्हापूरची निवडणूक नेत्यांच्या हाती राहिली नाही तर ती जनताजनार्दनानेच हाती घेतल्याचे चित्र आहे. याची कारणे मात्र काही राजकीय आणि काही थेट विकासकामांशी संबंधित आहेत. हातकणंगलेत शेतकऱ्यांचे प्रश्न, कोल्हापुरात राजकीय सूडनाट्य, साताऱ्यात प्रतिमारंजन, तर सांगलीत वसंतदादा घराण्याचा राजकीय संघर्ष आणि त्याभोवती फिरणारी निवडणूक मतदारांच्या हाती गेली आहे.

००००००

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात चेहरा नसलेली निवडणूक आता पक्षांपेक्षा स्थानिक राजकीय नेतृत्वाची परीक्षा घेत आहे. केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या कामगिरीबद्दल मतदारांचे प्रबोधन होत आहेच; पण हा घटक कितपत परिणामकारक ठरणार हे सांगता येणार नाही. शिवसेना, भाजपचा पारंपरिक मतदार, मोठ्या संख्येने मतदान करणारा नवमतदार निवडणुकीची दिशा ठरवेल. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आपला कोल्हापूर, साताऱ्याचा बालेकिल्ला राखण्यासाठी धडपडत आहेत. सरकारच्या कामगिरीबद्दलचा नाराजीचा सूर मतात रूपांतरित करण्याची, त्याची मुद्देसूद मांडणी करण्याची संधी काँग्रेस-आघाडीचे नेते गमावणार की काय, अशी स्थिती आहे. एकट्या खासदार राजू शेट्टी यांची ताकद कुठे पोहोचणार? हा प्रश्न आहे. यामुळे सांगलीत वसंतदादा गट स्वत:च्या बळावर मैदानात आहे. कोल्हापुरात महाडिक गट आणि राष्ट्रवादीचा मेळ उशिरा का असेना बसला असला तरी नेत्यांची दमछाक होत आहे. जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक यांनी म्हटल्याप्रमाणे महाडिक गटाच्या राजकीय अस्तित्वाची कसोटी लागली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना त्यांच्याशी सामना करताना महायुतीच्या सभेनंतर तयार झालेली हवा टिकवण्याचे आव्हान आहे. शिवाय ही निवडणूक काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या पवित्र्यामुळे महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी झाली आहे. याचा राजकीय लाभ मंडलिक कसा उठवतात, हे पाहावे लागेल.

संमिश्र चेहरा

निवडणूक प्रचाराला आकार येतो आहे आणि त्याचे धागेदोरेही हळूहळू स्पष्ट होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप-प्रत्यारोपाने गाजलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, राज्यपातळीवर निवडणुकीतील भाजपचे आक्रमक नेतृत्व अशी प्रतिमा तयार झालेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'कळपात' जाऊन नव्या राजकीय समीकरणासोबत आपल्या खासदारकीचे आणि जनाधाराचे मोजमाप करणारे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राजकारणाची गणिते पथ्यावर पाडत वाटचाल करणारे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक, माजी मंत्री आणि 'आमचं ठरलंय'चे प्रणेते काँग्रेसचे सतेज पाटील, सत्तेचे राजकीय प्रयोग केल्यानंतर सत्याच्या प्रयोगाला सामोरे गेलेले राष्ट्रवादीचे खासदार महाडिक आणि त्यांची टीम अशा दमदार आणि दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांच्या हाती निवडणुकीची सूत्रे आली आहेत. यातील एक-दोन पात्रे इकडे-तिकडे असण्याचा, त्यातील तपशिलाचा अपवाद सोडला तर तेच नेते आणि त्याच निवडणुका असाच या निवडणुकीचा संमिश्र चेहरा राहिला आहे.

गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही हातकणंगले मतदारसंघाची निवडणूक शेतकऱ्यांनी तारली होती. ती शेतकऱ्यांच्या हातात होती. आपला नेता निवडून आणायचाच, या निर्धाराने शेतकऱ्यांनी अनेक आव्हानांना सामोरे जात ती निवडणूक पेलली आणि जाती-पातीचा विचार न करता शेवटच्या क्षणी शेट्टींना भरभरून मते टाकली. यावेळी शिवसेनेचे धैर्यशील माने रिंगणात आहेत. जुना खासदार गट यानिमित्ताने सक्रिय झाला. शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूर, हातकणंगले, इचलकरंजी भागातील या गटाचे कार्यकर्ते कामाला लागले. निवेदिता माने यांच्या पराभवानंतर बाजूला फेकले गेलेले, पण स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि साखर कारखान्यांच्या राजकारणात सक्रिय असणारे हे कार्यकर्ते. लोकसभा आणि विधानसभेला नेतृत्वहीन झालेले, पण शिवसेनेचे शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांना विधानसभेला मदत करणारे हे कार्यकर्ते आता माने यांच्याबरोबर आहेत. शेट्टींचे राजकीय शत्रू मंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपचे नेते ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने आणि शिवसेनेच्या आमदारांसह या पक्षाचे सारे नेटवर्क सोबत असल्याने माने चर्चेत राहिले आहेत. त्यांनी शेट्टींच्या सोयीच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे. शेट्टींचा रोख मोदी आणि केंद्र-राज्य सरकारच्या शेतकरी धोरणावर आहे. पवारविरोधी आणि कारखानदारांना वेसण घालण्याच्या नकारात्मक राजकारणातून उभी राहिलेली शेतकरी चळवळ आज काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहे. लोकसभेला याचा शेट्टींनी फायदा उठवत विरोधात उभ्या राहणाऱ्या संभाव्य कारखानदार लॅाबीलाच फितूर करून घेतले आहे. ज्या पवारांविरोधात स्वाभिमानीच्या तोफा धडाडायच्या, त्यांच्याच मांडीला मांडी लावून शेट्टी बसले. हा बदल शेतकरी चळवळ कसा स्वीकारते हेही दिसेल. या स्थितीत सुरुवातीला एकतर्फी वाटणारी हातकणंगलेची निवडणूक शिवसेना-भाजप महायुतीने चर्चेत आणली. शेतकरी पुन्हा शेट्टींच्या पाठीशी राहणार की नव्या नेतृत्वाच्या मागे जाणार, हे ठरविण्याबरोबरच शिवसेनेपेक्षाही माने गटाचे राजकीय भवितव्य ही निवडणूक ठरवेल.

जनताच ठरवणार!

कोल्हापूरची लढत शिवसेनेसोबतच होणार हे आधीच स्पष्ट होते. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार महाडिक आणि शिवसेनेचे मंडलिक यांच्यातच अटीतटीची लढत होते आहे. भाजप-सेना महायुतीने महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडला. यावेळी त्यांनी केलेले शक्तिप्रदर्शन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेला मोठा जनसागर उसळला. राज्याच्या राजकारणात प्रचंड तणातणी झाल्यानंतर हातात हात घालणारे हे नेते येथे काय बोलणार, याची उत्सुकता जनतेला होतीच; पण दोन्ही पक्षांचे विशेषत: शिवसेना आणि मंडलिक गटाचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे तेही मोठ्या संख्येने आले. येथेच महाडिक यांच्याविरोधातील लढत फुसकी नसून ती काटाजोड होणार हे स्पष्ट झाले. मंडलिक यांनी यानिमित्ताने या संधीचा पुरेपूर लाभ उठवत प्रचाराची पहिली फेरी दणक्यात पार पाडली. खासदार महाडिक यांच्यासमोर हे मोठे आव्हान होते. हा धुरळा खाली बसल्यानंतर महाडिक यांनी यंत्रणेला गती दिली. सभा, मेळावे, पदयात्रांवर जोर दिला. आता हा शेवटचा आठवडा दोन्ही उमेदवारांसाठी कसोटीचा ठरणार आहे. मंडलिक यांच्या पाठीशी राहिलेली आमदार सतेज पाटील यांची फळी, मंत्री पाटील यांची ताकद, कागल-कोल्हापूर-गडहिंग्लज-राधानगरी-भुदरगड-आजरा-चंदगडची जनता, शिवसेनेची तरुणांची फळी कशी सक्रिय राहते, त्याचबरोबर मुश्रीफ गटाची ताकद, राष्ट्रवादी-काँग्रेसची आघाडी, महाडिक युवा शक्ती, भागिरथी महिला चळवळ, जिल्ह्यातील छोटे-मोठे डझनावर गट-तट, महाडिक यांची गेल्या पाच वर्षांतील प्रतिमा यावरच या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी कोण हे ठरेल. या प्रत्येक गोष्टीभोवतीच त्या-त्या भागातील जनता आणि मतदार जोडले आहेत. पेठांचा अपवाद वगळता शहरी मतदार आणि त्याचे प्रश्न बाजूला राहण्याची शक्यता जाणवते. महाडिक गेल्या पाच वर्षांतील कामाचा लेखा-जोखा मांडत आहेत. प्रत्यक्ष कामापेक्षा संसदेतील कामावर त्यांचा भर आहे. निवडणुकीच्या निमित्ताने जनता चार्ज झाली आहे. मतदाराला गृहीत धरता येत नाही. हवा कळते, पण त्याचा कल आणि कौल ओळखणे अनेकदा कठीण असते. विकासाचे मुद्दे प्रचारात नसले तरी मतदाराच्या मनात ठोस आहेत. यातच 'आमचं ठरलंय आणि ध्यानात ठेवलंय'चा संघर्ष पेटला असला तरी निवडणूक अजूनतरी जनतेच्या म्हणजेच मतदाराच्या हातीच आहे. त्याला गृहित धरण्याची चूक करून चालणार नाही!

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनंजय मुंडे यांची उद्या सभा

$
0
0

कोल्हापूर: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या उमेदवारासाठी मंगळवारी (ता. १६) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार व खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी त्यांची गारगोटी येथे त्यादिवशी जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसांत हलवणार पालकमंत्री सूत्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारांची जबाबदारी असलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील १८ ते २० एप्रिल या कालावधीत सलग तीन दिवस कोल्हापुरात मुक्कामी असून प्रचाराची सूत्रे हलवणार आहेत.

पालकमंत्र्यांना दहा मतदार संघाची जबाबदारी दिल्याने ते जिल्ह्यात कमी व अन्य मतदार संघात जास्त वेळ कार्यरत आहेत. प्रचार संपवून पालकमंत्री मुक्कामाला कोल्हापुरात येण्याचा प्रयत्न करतात. कोल्हापुरात असताना पाच ते सहा गावात प्रचार करून पुन्हा अन्य जिल्ह्यात प्रचाराला जातात. पण महायुतीचा प्रचार करण्याठी तीन दिवस कोल्हापुरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या साडेचार वर्षात पालकमंत्र्यांनी भाजपचा विस्तार केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू भाजपचे आमदार अमल महाडिक प्रचारापासून अलिप्त आहेत. भाजपचे काही पदाधिकारी राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे. कोल्हापुरात प्रचार करताना पालकमंत्र्यांनी थेट खासदार महाडिक यांच्यावर टीका करण्यास सुरू केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार सलग दोन वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी महाडिक यांच्या पॅचअपचे काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सलग तीन दिवस कोल्हापूर आणि हातकणंगलेत प्रचार करणार आहेत.

पालकमंत्र्यांनी गेल्या साडेचार वर्षात शहरासह जिल्ह्यातील अनेक मंडळे, तालमी व संस्थांना मदतीचा हात पुढे केला आहे. या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेणार आहेत. तसेच व्यापारी, उद्योजकांची भेट घेऊन ग्रास रुटवर प्रचार करणार आहेत. तीन दिवसात प्रचाराची दिशा महायुतीच्या बाजूने वळवण्यासाठी पालकमंत्र्याकडून प्रयत्न केल्याने भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी आराम बस चालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या खासगी आराम बसच्या चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. बालाजी हणमंत डोंगळे (वय ५६ रा. विक्रमनगर) असे मृताचे नाव आहे. पण मृत्यूपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी दुसऱ्या चालकाला बस चालवण्यास दिल्याने मोठी दुर्घटना टळल्याची माहिती पुढे आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, शहरातील एका नामवंत खासगी आराम बसवर चालक म्हणून काम करणारे डोंगळे हे शनिवारी रात्री मुंबईतून कोल्हापुरात बस घेऊन येत होते. बसमधील ४० प्रवाशी झोपले होते. खंडाळा घाटात बस आल्यानंतर चालक डोंगळे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी बस रस्त्यात थांबवली व दुसरा चालक तुकाराम पेडगे यांना बस चालवण्यास सांगितले. त्यानंतर ते शेजारच्या सीटवर झोपले. त्यानंतर चहा घेण्यासाठी बस एका हॉटेलजवळ थांबली असता चालक पडगे यांनी डोंगळे यांना उठवण्याचा प्रयतन केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी शिवापूर टोल नाका येथून १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून डोंगळे यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लक्ष्मीपुरी ठाण्यातीलडी.बी. पथक बरखास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे डी.बी. पथक (डिटेक्शन ब्रँच) तडकाफडकी बरखास्त करण्यात आले. निवडणुक बंदोबस्तासाठी कर्मचारी हवे असल्याने पथक बरखास्त केले असल्याचा खुलासा वरिष्ठ अधिकारी करत असले तरी वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसायांवर वचक ठेवण्यात कुचराई झाल्यामुळेच पथक बरखास्त केल्याची चर्चा आहे.

शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरभी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ६५ जणांना अटक केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व वाहने जप्त केली. राजरोसपणे जुगार सुरू असताना पोलिसांकडून दुर्लक्ष केले होते. पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी डीबी पथकाला अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना 'सुरभी'कडे पथकाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आज तडकाफडकी डीबी पथक बरखास्त करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी शहरातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करून जेरीस आणण्याचा प्रयत्न केला असून काही कर्मचारी यात कुचराई करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांचे अजूनही तळ्यात मळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय नसलेल्या नगरसेवकाविषयी विचारणा झाल्यावर शहर पदाधिकारी सतर्क झाले आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना फोन करुन पक्षाचा उमेदवार आहे, प्रचारात सक्रिय व्हा अशा सूचना केल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे चार सदस्य प्रचारापासून अलिप्त आहेत. 'तळ्यात, मळ्यात'भूमिकेत वावरणाऱ्या नगरसेवकांवर राष्ट्रवादीतर्फे वॉच ठेवण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या १५ होती. त्यापैकी दोघा नगरसेवकांवर पद रद्दची कारवाई झाली आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्ताधारी आहे. सगळे नगरसेवक हे आमदार हसन मुश्रीफ यांच्या जवळचे समजले जातात. काँग्रेस सोबत त्यांचा महापालिकेत सत्तेचा फॉर्म्युला ठरला आहे. पक्षाच्या माध्यमातून नगरसेविका हसीना फरास, सरिता मोरे या महापौर बनल्या. नगरसेवक सुनील पाटील, महेश सावंत, शमा मुल्ला यांना उपमहापौरपदी संधी मिळाली. मुरलीधर जाधव हे स्थायी समिती सभापती तर वहिदा सौदागर यांना महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी काम केले आहे. महापालिकेत अनेकांना पदे मिळाली असली तर राष्ट्रवादीचे नगरसेवक एकसंधपणे वावरताना कधी दिसले नाहीत. पक्षाच्या चिन्हावर निवडून आले तरी अनेकांची पक्ष आणि नेत्यांवर निष्ठा दिसत नाही. यामुळे अनेकजण सोयीचे राजकारण करताना दिसतात. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजू लाटकर व त्यांच्या पत्नी व नगरसेविका सूरमंजिरी या प्रचारापासून लांब आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत शिवाजी पार्क व ताराबाई पार्क प्रभागात महाडिकांनी विरोधकांना मदत केल्याचा आक्षेप लाटकरांचा आहे. दुसरीकडे महापालिकेचे स्थानिक राजकारण, महाडिक व सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष यामुळे काही जण दूर राहून अंदाज घेत आहेत.

नगरसेवकांचे नातेवाईक प्रचारात आघाडीवर

पवारांच्या दौऱ्यानंतर पक्षाच्या सर्वच नगरसेवकांना लोकसभेच्या निवडणूक प्रचारात सक्रिय होण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. प्रत्येकाशी संपर्क साधला असून पक्षाचे धोरण स्पष्ट केले असल्याचे शहराध्यक्ष पोवार यंनी सांगितले. राष्ट्रवादी आघाडीचे महापालिकेतील नेते व नगरसेवक प्रा. जयंत पाटील, नगरसेवक मुरलीधर जाधव, संदीप कवाळे, महेश सावंत, सुनील पाटील, नगरसेविका हसिना फरास यांचे पुत्र व स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, वहिदा सौदागर यांचे पती फिरोज हे प्रचारात सक्रिय आहेत. नगरसेविका मेघा पाटील या जिल्हाध्यक्ष ए.वाय. यांच्या स्नुषा आहेत. नगरसेविका माधवी गवंडी यांचे पती प्रकाश यांनी प्रचाराच्या नियोजनाच्या बैठकीला हजेरी लावली होती. प्रा. जयंत पाटील हे प्रचारात आघाडीवर आहेत, दुसरीकडे त्यांचे समर्थक समजले जाणारे माजी स्वीकृत नगरसेवक विनायक फाळके, नगरसेवक सचिन पाटील हे स्थानिक राजकारणाचा मुद्दा रेटत प्रचारापासून लांब आहेत. महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा खेडकर प्रचारात सक्रिय दिसत नाहीत. अफजल पिरजादे प्रचारात आढळतात. तर अजिंक्य चव्हाण प्रचारापासून लांब असल्याचे चित्र आहे. तर शमा मुल्ला सध्या पोलिस कोठडीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीत बाबासाहेबांचा जयघोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हलगी-घुमक्याच्या तालावर जोश निर्माण करणारी तालबद्ध लेझीम, डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित चित्ररथ आणि त्यांच्या जयघोषात सिद्धार्थनगरातील मंडळांनी काढलेली मिरवणूक उत्साहात झाली. शहरातील संभाजीनगर, विचारे माळ, राजेंद्रनगर येथील मंडळांनी मिरवणुका काढल्या. बिंदू चौकात बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी अनुयायांनी दिवसभर गर्दी केली होती.

बिंदू चौक आणि महापालिकेजवळील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून अनुयायांची रीघ लागली होती. रविवारी दिवसभर कुटुंबासह अभिवादन करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आले होते. सायंकाळी सहा वाजता सिद्धार्थनगर येथील आंबडेकरांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आमदार सतेज पाटील आणि मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. बारा बलुतेदार समाजाचे वसंतराव मुळीक, बबन रानगे, कादर मलबारी उपस्थित होते.

मिरवणुकीच्या अग्रभागी सिद्धार्थनगरतील युवक-युवतींचे लेझीम पथक मुख्य आकर्षण होते. निळ्या फेट्यातील कार्यकर्ते व सहभागी झालेल्या महिलांकडून बाबासाहेबांचा जयघोष सुरू होता. मिरवणुकीत डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील आधारित चित्ररथ होते. त्यात चवदार तळ्याचा सत्याग्रह, भारत का संविधान आणि सत्यसुधारक हॉटेल हे देखावे साकारले होते.

सिद्धार्थनगर, चिमासाहेब चौक, दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे मिरवणूक सिद्धार्थनगरात विसर्जित करण्यात आली. दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांना, तर बिंदू चौकात डॉ. आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला मिरवणूक समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

००००००

सैनिकांना अभिवादन

सिद्धार्थनगरच्या स्वागत कमानीजवळ सैनिकांना अभिवादन करण्यासाठी भारतीय लष्करातील भूदल, हवाई दल, नौदलाचे फलक लावण्यात आले होते. तसेच योद्धा बॉइजच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, गौतम बुद्धाच्या प्रतिमा व पुतळे उभारले होते. सिद्धार्थनगरात दारोदारी निळे ध्वज व रांगोळ्या काढल्या होत्या.

००००

लोजपातर्फे अभिवादन

लोक जनशक्ती पक्षाच्यावतीने बिंदू चौकात डॉ. आंबेडकरांना आदराजंली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश देसाई, समाजकल्याण सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, विभागीय जातपडताळणी सचिव प्रशांत चव्हाण, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर भारतात भाजपला घसरण

$
0
0

उत्तर भारतात भाजपला घसरण

काँग्रेसचे कार्यकर्ते व उत्तर प्रदेश पूर्व विभागाचे प्रभारी सचिव बाजीराव खाडे यांनी आघाडीचा जाहीरनामा ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत पोहचला पाहिजे, असे आवाहन केले. 'देशभर भाजप विरोधी वातावरण आहे. उत्तर भारतातील सर्वच राज्यात भाजपची घसरण सुरू आहे. यूपीमध्ये भाजपने गेल्या वेळी लोकसभेच्या ८० पैकी ७२ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपची संख्या ३० पर्यंत घसरेल. तर काँग्रेसचे उमेदवार २०हून अधिक ठिकाणी निवडून येतील, 'असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेदहाच्या डेडलाइनला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल, बार, धाबे रात्री साडेदहानंतर बंद करण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. यामुळे रात्री उशिरा शहरात येणाऱ्या पर्यटक, प्रवाशांची गैरसोय होत आहे. व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, याविरोधात निवडणूक प्रशासनाविरोधात हॉटेल मालक संघाने हायकोर्टात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी मंगळवारी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चला लागू झाली. तेव्हापासून हॉटेल, बार, खाद्यपदार्थांचे स्टॉल साडेदहा वाजता बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. साडे दहानंतर हॉटेल उघडे असल्यास आचारसंहिता अंमलबजावणी भरारी पथकातर्फे चित्रीकरण करून गुन्हा दाखल केला जात आहे. परवाना रद्दची कारवाई केली जात आहे. शहरातील ६०० हॉटेलधारकांना सुमारे २० कोटींपेक्षा अधिक उत्पन्नाला मुकावे लागले. सरकारचा जीएसटीही बुडत आहे. रात्री उशिरा शहरात येणाऱ्या प्रवाशांना उपाशीपोटी रात्र काढावी लागत आहे. गैरसोयीमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. यावर अवलंबून असणाऱ्या रोजगारांवर परिणाम जाणवत आहे. आचारसंहितेच्या काळातही रात्री ११ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी असावी, साडे दहानंतर हॉटेल बंदचा आदेश रद्द करावा या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी घेण्यात आली. मात्र जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या कामांमुळे म्हणणे मांडले नाही, त्यामुळे अंतरिम निर्णय लांबणीवर पडला आहे. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत याबाबत निर्णय होईल, असे हॉटेल मालक संघाचे म्हणणे आहे.

हॉटेल परवाना घेताना रात्री ११ पर्यंत व्यवसाय करण्याची मुभा मिळाली आहे. दिल्लीसह इतर शहरात आचारसंहितेच्या काळातही ११ पर्यंत हॉटेल सुरू असतात. येथे निवडणूक प्रशासनाने साडेदहानंतर हॉटेल बंद करण्याचा आदेश काढला. याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत अंतरिम निर्णय होईल.

उज्ज्वल नागेशकर, अध्यक्ष, हॉटेल मालक संघ

काळ सोकावेल म्हणून

२३ रोजी मतदान आहे. त्यानंतर आचारसंहिता शिथील झाल्यास वेळ पूर्ववत होईल. तरीही हॉटेल संघ न्यायालयात ताकदीने बाजू मांडत आहे. यावेळी न्याय मिळण्यास विलंब झाला तरी यापुढील निवडणुकांत तरी असे निर्बंध प्रशासनाने आणू नये, यासाठी संघाने दाद मागितली आहे. प्रशासनाच्या मनमानी आदेशाला आव्हान न दिल्यास काळ सोकावेल, असे व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images