Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जवानांचा अपमान सहन करणार नाही: खोत

0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

'जवानांच्या जातीवर कशाला बोलता, तुम्हाला माहीत आहे का, एअरमार्शल भूषण गोखले कोण होते? असे अनेकजण सैन्यात आहेत. आम्ही जर तुम्हाला विचारले शेट्टी नावाचे किती आहेत, तर ते बघायला आम्हाला तमिळनाडूला जावे लागेल. आरोप-प्रत्यारोप करा, पण जवानांचा अपमान करू नका, तो आम्ही सहन करणार नाही,' असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता त्यांना दिला. पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

खासदार शेट्टींवर टीका करताना मंत्री खोत म्हणाले, 'मी उसाला भाव दिला, दुधाला भाव दिला म्हणता, पण साखरचे दर वाढले की उसाला भाव मिळतोच. तुम्ही एकट्याने आंदोलन केले काय? आंदोलनात आम्हालासुद्धा लागले, रक्तबंबाळ झालो, पण आम्ही फोटोग्राफर कधी सोबत नेला नाही. आमच्यावरही गुन्हे दाखल झाले. आम्हीसुद्धा पंढरपूर ते बारामती चाललो, पण आमच्या पायाला कधी फोड आले नाहीत की पट्टी बांधली नाही. मग तुम्ही एकटेच चालत होता काय? हजारो माणसे वारीला पायी चालत जातात, त्यांच्या पायाला कधी फोड आले नाहीत, मग तुमच्याच पायाला कसे आले?'

यावेळी माजी खासदार निवेदिता माने, आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील यांची भाषणे झाली. यावेळी शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी, मी काँग्रेसचा असलो तरी सदाभाऊ खोत यांचा आदेश आहे म्हणून शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यात दहा उमेदवारांचे अर्ज वैध

0
0

सातारा :

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १२ उमेदवारांनी २१ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. छाननीमध्ये दहा उमेदवार पात्र ठरले. शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा अर्ज स्वीकृत झाल्याने अर्ज छाननीच्या दिवशी प्राची नरेंद्र पाटील यांचा अर्ज नाकारण्यात आला. साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील यांच्या थेट लढत होणार आहे.


बलिदानमासानिमित्त मूक पदयात्रा

सांगली :

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानमासानिमित्त सांगलीतील प्रमुख मार्गावरून शुक्रवारी मूक पदयात्रा काढण्यात आली. वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरुन प्रज्वलित करून आणलेली ज्वाला सांगलीतील मारुती चौकात ठेवण्यात आली आहे. या ज्वालेसह शुक्रवारी निघालेल्या मूक पदयात्रेला शिवप्रेमींनी गर्दी केली होती.

श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने वढू बुद्रुक येथून आणलेल्या ज्वालेचे सांगलीवाडीत स्वागत केल्यानंतर ती ज्वाला मारुती चौकात विसावली होती. त्या ज्वालेपासून अनेक ज्वाला प्रज्वलित करून कार्यकर्त्यांनी आपापल्या गावी नेल्या आहेत. शुक्रवारी सकाळी सांगलीत या ज्वालेसह मूक पदयात्रेस सुरुवात झाली. आनंदराव चव्हाण यांच्या हस्ते ज्वालेचे पूजन करण्यात आले. राजू शहापूरे यांनी ध्येयमंत्र म्हटल्यानंतर संभाजी सूर्य हृदय हा श्लोक सामुदायिकरीत्या म्हणण्यात आला. कापडपेठ, राजवाडा चौक, स्टेशन चौक, बदाम चौक, पंचमुखी मारुती रोड, फौजदार गल्ली, बापटबाल रोड, गावभाग या मार्गावरून निघालेली मूक पदयात्रा मारूती चौकात समाप्त झाली. त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या प्रतीकात्मक चितेला भडाग्नी देण्यात आला. बलिदान मासानिमित्त अनेकांनी उपास, गोड न खाणे, चप्पल न घालणे, गादीवर न झोपता जमिनीवर झोपणे, मुंडण करणे, चहा न पिणे असे संकल्प केले होते. बलिदानमासाचे हे ३३०वे वर्ष आहे. मूक पदयात्रेत माजी आमदार नितीन शिंदे, शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजरा कारखान्यास कारणे दाखवा नोटीस

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा साखर कारखान्यामध्ये गेल्या दोन-तीन वर्षांत बेकायदेशीररीत्या सभासद करून घेतले आहेत. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. मात्र, याबाबतच्या सुनावणीदरम्यान अनुपस्थित राहत, याप्रश्नी गांभीर्य नसल्याचे आजरा कारखान्याच्या संचालकांकडून निदर्शनास आले आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत पंधरा दिवसांत खुलासा करण्याबाबत पत्राने कळविले आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या नोव्हेंबर २०१५, मे २०१७ व ऑगस्ट २०१८ अशा तीन सभांमध्ये अनुक्रमे १२१४, ११३६ व ३८६ असे एकूण २७३६ सभासद करून घेतले. मात्र, त्यांचे सभासदत्व बेकायदेशीर आहे. याबाबत संचालक विष्णू केसरकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. याची सुनावणी सुरू आहे. मात्र, तेथे संचालक मंडळाला म्हणणे मांडण्याबाबत सूचित केले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यानुसार प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयामार्फत याची गंभीर दखल घेतली असून कारखान्यावर प्रशासक का नेमू नये, याबाबत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी वापरा जपून

0
0

लोगो : पाणी वाचवा

कोल्हापूर टाइम्स टीम

पाण्याशिवाय जीवन नाही. हे खरे आहे, पण आपण ह्या जीवनाचा आदर राखतो का? देशातील पाण्याचे स्रोत दुषित होत आहेत. एककीकडे पाणी प्रदूषणामध्ये वाढ होत असताना पाण्याचा अपव्यव ही मोठ्या प्रमाणात होतो. पाण्याचा अपव्यव आणि दुषित करण्याचे प्रमाण असेल वाढत गेल्यास भावी पिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. यासाठी शहरातील सुज्ञ नागरिकांनी पाण्याची नासाडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले पाहिजेत.

अनिर्बंध वाळू उपसा, नद्यांच्या पात्रात मानवी अडथळा करणे यातून आपण निसर्गाशी खेळ करत आहोत. परिणामी देशातील अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत, तर काही नद्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शेती कसण्यासाठी जमीन आहे, पण प्रदूषित पाण्यामुळे जमिनीची नापिकी वाढत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत असताना अनेकठिकाणी पाण्याचा बेसुमार वापर होत आहे. तर अनेकठिकाणी कारखान्यांतून होणारे प्रदूषण, नदीकिनिारी केली जाणारी धार्मिक कृत्ये, नदीपात्रात टाकला जाणारा कचरा, नागरी वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाण्यामुळे जलचर नष्ट होऊन एकप्रकारे निसर्गालाच आव्हान दिले जात आहे.

देशभरात अशी स्थिती असताना पाणी जिल्ह्यातील कोल्हापूर शहराचीही वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. दुथडी वाहणाऱ्या पंचगंगेतून शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असला, तरी पाणी वापरांबाबत नागरिकांमध्ये जलसाक्षरतेचा असलेला अभाव, वितरण नलिकांद्वारे बेसुमार वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शहरात वारंवार कृत्रीम टंचाई निर्माण होते. शहरातील ही टंचाई दूर करण्यासाठी शहरवासीयांनी पाणी जपून वापरले पाहिजे. कमीतकमी पाण्याचा वापर करुन दैनंदिन गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. त्यासाठी जनतेनेही सहभाग घेण्याची आवश्यकता आहे.

आवाहन

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने शहरातील सुमारे साडेसात लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी वृध्वनलिका, दाबनलिका आणि ‌वितरण नलिकांचा वापर केला जातो. पाण्याचा दाब कायम राहण्यासाठी ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहे. जुनी वितरण नलिका, एअर व्हॉल्व्हमध्ये झालेला बिघाड यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छ पाणी थेट गटारींमध्ये मिसळत आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. अशा गळतीच्या ठिकाणांचे फोटो आणि शंभर शब्दांची माहिती maruti.patil@timesgroup.com या ईमेल आयडीवर पाठवा. आपण पाठवलेला फोटो आणि वृत्ताला योग्य प्रसिद्धी देऊन दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू. तसेच पाणी गळती रोखण्यासाठी आणि पाण्या वाया जावू नये, यासाठी सूचना, उपायही पाठवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नातल्या घराला गृहकर्जाचा बूस्ट

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर पाव टक्क्याने घटवल्याने गृहकर्जदार ग्राहक खूष झाले आहेत. कर्ज स्वस्त झाल्याने मंदीच्या गर्तेत सापडलेल्या गृहउद्योगाला दिलासा मिळणार असून कर्जदारांची संख्या वाढणार आहे.

रिझर्व्ह बँककडून दर दोन महिन्यांनी पतधोरणाचा आढावा घेतला जातो. सलग दोन द्वैमासिक पतधोरणात रेपो दर पाव टक्क्यांनी घटवला आहे. कर्जाचा दर ६.२५ टक्क्यांवरुन सहा टक्क्यावर आला आहे. त्यामुळे कर्जे स्वस्त झाली असून त्याचा फायदा कर्जदार व ग्राहकांना होणार आहे.

सर्वसामान्य व मध्यमवर्गीय मंडळी घर खरेदीसाठी कर्ज काढतात. अशा कर्जदारांची संख्या मोठी आहे. गृहकर्जाचा कालावधी दहा ते वीस वर्षांचा असतो. ज्या ग्राहकांनी यापूर्वी कर्ज काढले आहे त्यांचा कर्जाचा हप्ता कमी होणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

वीस लाख रुपयांपर्यंत आणि वीस लाखांवर अशी कर्जाची विभागणी होते. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बँकांनी २०१८/२०१९ या आर्थिक वर्षात गृह कर्जाचे जे लक्ष्य होते ते डिसेंबर २०१८ अखेर ६६ टक्के पूर्ण झाले. नोटबंदी, रेरा कायद्यामुळे गृहउद्योग मंदिच्या गर्तेतून चालला आहे. भडकेलेले वाळूचे दर आणि जीएसटीमुळे बांधकाम साहित्य महागल्याने तयार घरांचे दरही वाढले असल्याने घर खरेदी करताना मध्यमवर्गीयांनी हात आखडता घेतला होता. गतवर्षी कोल्हापुरात २० लाखांपर्यंत ५५३२ घरांसाठी जिल्ह्यातील बँकांनी ४९२ कोटी ५४ लाखांची तरतूद केली होती. पण प्रत्यक्षात ३७६२ घरे खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ३२५ कोटी रुपये कर्जांचे वाटप झाले आहे. २० लाखांवरील १२८३ घरांसाठी बँकांनी ५०६ कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण प्रत्यक्षात १२८३ घरांची खरेदी झाली असून त्यासाठी ३१५ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. सव्वाआठशे कोटी रुपये कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना रेपो दर पाव केल्याने कर्जाचा हप्ता कमी बसणार आहे.

रेपो दर कमी झाल्याने कर्जे स्वस्त होणार असल्याचे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. बाजारात पैसा आल्याने खेळता राहणार त्याचा फायदा चलनव्यवस्थेला होणार आहे. कर्ज स्वस्त झाल्याने कर्जदार पुढे येतील. त्यातच सर्वसामान्यांना स्वत:चे घर हवे असते. अशी मंडळी घर खरेदीसाठी मोठ्या संख्येने कर्ज नेण्यासाठी पुढे येतील. प्रधानमंत्री आवास योजनेला चांगला प्रतिसाद लाभत असून गृहकर्ज स्वस्त झाल्याने ही योजना वेगाने कार्यरत होईल.

गृहकर्ज स्वस्त झाल्याने घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना त्याचा फायदा होईल. याआधी कर्ज घेतलेल्यांचा हप्ताही स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे अनेकांना फायदा होणार आहे.

रवी गायकवाड, फेडरल बँक

सध्या गृहकर्जासाठी विचारणा मोठ्या प्रमाणात होत आहे. कोल्हापुरात कमी रक्कमेच्या कर्जदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. व्याज दर कमी झाल्याने दीर्घकालीन कर्जासाठी फायदा होणार आहे.

हेमंत पराडकर, पंचगंगा बँक

जिल्ह्यातील बँका

एकूण बँका :४७

शेड्यूल्ड बँक : १

मल्टिस्टेट बँक : ४

ग्रामीण बँक: १

राष्ट्रीय बँका: २१

शाखा: ३७७३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’ त ४१ अर्ज वैध

0
0

\Bअरूंधती महाडिक यांच्यासह सातजणांचे अर्ज अवैध, \Bसोमवारी माघार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दाखल अर्जांपैकी सात उमेदवारी अर्ज विविध कारणांनी शुक्रवारी अवैध ठरले. अवैध अर्जांमध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरूंधती यांच्या उमेदवारी अर्जाचा समावेश आहे. याउलट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादी, काँग्रेस, मित्रपक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक, भाजप, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासह ४१ जणांचे अर्ज वैध ठरले. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीचा सोमवारी शेवटचा दिवस आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील दाखल अर्जासाठी जिल्हाधिकारी कक्षात सकाळी ११ वाजता छाननीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. अर्जावर आक्षेप नोंदवण्याची कुणकुण लागलेल्या उमदेवारांचे प्रतिनिधी वकिलांसह दाखल होत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृतपणे खासदार महाडिक यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र त्यांच्या पत्नी अरूंधती यांनीही राष्ट्रवादीचा एबी फॉर्म जोडला होता. एकाच पक्षाचे दोन एबी फॉर्म झाल्याने अरूंधती यांचा एक अर्ज अवैध ठरला. अपक्ष भरलेला त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरवण्यात आला. अपक्ष म्हणून भरलेला एस. आर. पाटील यांच्या अर्जासोबतचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण होते. त्यांचा अर्ज अवैध ठरला. अपक्ष सुधीर मंडलिक, अभिजित जोशी यांनी प्रतिज्ञापत्र जोडले नव्हते. त्यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. उर्वरित २१ अर्ज वैध ठरवले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा निर्णय दिला. इतर अर्जांवर आक्षेप न घेतल्याने आणि ते परिपूर्ण असल्याने छाननीची प्रक्रिया एका तासात पूर्ण झाली.

'हातकणंगले'साठी निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांच्यासमोर छाननी प्रक्रियेला प्रारंभ झाला. येथील स्वाभिमानीचे उमेदवार खासदार शेट्टी आणि शिवसेना, भाजपचे उमेदवार धैर्यशील माने यांचे प्रतिनिधी वकिलांना घेऊन हजर राहिले. मात्र या दोन्ही अर्जांवर कोणीही आक्षेप घेतला नाही, त्रुटी नसल्याने ते वैध ठरवण्यात आले. संतोष खोत यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण आणि त्यात त्रुटी असल्याचे समोर आले. ज्ञानू उर्फ हरिबा पाटील यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही. यामुळे खोत आणि पाटील यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले. खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात हिंदूस्थान मानव पक्ष पुरस्कृत गजानन आंबी यांना ७ वर्षे शिक्षा झाल्याने प्रतिज्ञापत्रातून निदर्शनास आले. यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. उर्वरित २० अर्ज वैध ठरवण्यात आले.

....

चौकट

वैध यादीच्या फोटोसाठी गर्दी

अनेक उमेदवारांनी वैध यादी पाहण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी केली होती. सायंकाळी साडेपाचनंतर फलकावर यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्याचा फोटो मोबाईलवर टिपण्यासाठी गर्दी झाली होती. वैध अर्जाच्या यादीवर पहिल्यांदाच उमेदवारांचा फोटो झळकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका प्रभाग समित्यांची निवड १५ रोजी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापती निवड सभा १५ एप्रिल रोजी होणार आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हा परिषदेचे सीईओ तथा पिठासन अधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी काढली. सभापतीपदासाठी गुरुवारी (ता. ११) अर्ज दाखल होणार आहेत.

महापालिकेच्या ताराराणी, गांधी मैदान, शिवाजी मार्केट व राजारामपुरी विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या प्रभाग समिती सभापतीपदाची मुदत संपली आहे. परिणामी विभागीय आयुक्तांनी नव्या सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन पिठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांची नियुक्ती केली. मित्तल यांनी शुक्रवारी सभापतींसह समिती सदस्यांना निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार गुरुवार दुपारी तीन ते पाच वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर १५ रोजी प्रथम प्रभाग समिती क्रमांक एकच्या सभापतींची सकाळी साडेअकरा वाजता निवड होईल. त्यानंतर २,३ व ४ क्रमांक प्रभाग समितींच्या सभापतींची निवड होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटिशीमुळे अस्वस्थता आणि संतापही

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारांमध्ये विरोधी उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत असल्यामुळे महापालिकेच्या नगरसेवकांसह माजी नगरसेवकांना पक्षांकडून नोटीस पाठवण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. मात्र नोटिशीमुळे नगरसेवक प्रचारांमध्ये सहभागी होण्याचीऐवजी त्यांच्या संतापातच भर पडत आहे. सोयीचा प्रचार करता येत नसल्याने आणि सत्ताधारी पक्षाचा धाक असल्याने भाजप नगरसेवकांत मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रचारात सहभागी होण्यासाठी पाठवलेल्या नोटीस नगरसेवक किती गंभीर्याने घेतात हा औत्सुक्याचा विषय बनला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान खासदार धनंजय महाडिक विरुद्ध भाजप-शिवसेना युतीचे प्रा. संजय मंडलिक अशी काट्याची टक्कर होणार, अशी स्थिती एकूण प्रचारांवरुन निर्माण झाली आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीला ग्रामपंचायत निवडणुकीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी दोन्ही उमेदवार व त्यांचे समर्थक घरोघरी प्रचार मोहीम राबवत आहेत. दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात सहभागी झालेले असताना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले अनेक नगरसेवक विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या थेट प्रचारांत किंवा तटस्थ राहण्याची भूमिका घेत आहेत. तटस्थ आहेत त्यांना प्रचारात सहभागी होण्यासाठी विनंतीवजा इशारा दिला जात आहे. तर जे विरोधी उमेदवाराचा प्रचार करत आहेत, त्यांची गंभीर दखल घेतली जात आहे. यातून काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप पक्षश्रेष्ठींनी शिस्तभंगाची नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपच्या शहर अध्यक्षांनी आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी शिस्तभंगांची नोटीस पाठवली आहे. मात्र याचा विपरीत परिणाम दिसून येऊ लागला असून नगरसेवकांच्या संतापात नोटिशीमुळे अधिक भर पडली आहे.

भाजपच्या महानगराध्यक्षांनी दोन नगरसेवकांना नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी खुलासाही केला. पण यातून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव राजू लाटकर यांना नोटीस पाठवल्यानंतर अनेक नगरसेवकांच्या संतापात भर पडली. खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिका निवडणुकीत विरोधी उमेदवाराला मदत केल्याने विजय मिळवताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मग आता कशासाठी त्यांचा प्रचार करायचा? असा प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. तर अनेकांनी होईल त्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. राष्ट्रवादीमध्ये एकीकडे अशी अवस्था असताना काँग्रेसच्या नगरसेवकांनी तर कोणत्याही परिस्थीत प्रचार सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी काँग्रेसच्या नगरसेवकांनाही प्रचारात सहभागी होण्यासाठी नोटिसा पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र अशा नोटिसा पाठवल्यानंतर परिस्थिती सुधारेल का? असा सवालही काहीजण उपस्थित करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवारांची सभा गांधी मैदानात

0
0

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिल्ह्यात आणखी दोन सभा होणार आहेत. शिवसेना, भाजप युतीने प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरात केल्यानंतर त्याला प्रतिउत्तर म्हणून कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष आघाडीची जंगी सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची १७ एप्रिल रोजी गांधी मैदान येथे जाहीर सभा घेण्यासाठी आघाडी प्रयत्नशील आहे. त्यादिवशी त्यांची ग्रामीण भागात एका ठिकाणी जाहीर सभा आणि दिवसभरातील उर्वरित वेळेत गाठीभेटी असा कार्यक्रम आहे. कागल, राधानगरी, भुदरगड आणि करवीर या चार तालुक्यासाठी सोयीचे ठिकाण म्हणून मुदाळतिट्टा येथे सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. पवार यांच्या दोन एप्रिल रोजीच्या दौऱ्यात कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवार खासदार महाडिक आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महामेळावा झाला. पवारांनी मेळाव्यात मार्गदर्शनसह जिल्हा व तालुकास्तरावरील नेत्यांशी चर्चा करून प्रचारात सक्रिय होण्याच्या सूचना केल्या. त्यांनी पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांनाही कानपिचक्या दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूत फसवणुकीतील संशयितास अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सुताची परस्पर विक्री करून साडेअठरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून फरार असणाऱ्या दयानंद परसू वाईंगडे (वय २९, रा. कबनूर) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील आणखीन दोघांना यापूर्वीच अटक केली आहे. विजय आप्पासाहेब हुपरे (रा. पारिक हाउसिंग सोसायटी) यांची सौरभ सिंथेटिक फर्म आहे. सूत खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. वाईंगडे हा हुपरे यांच्याकडे दिवाणजी म्हणून कामास होता. एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत त्याने १८ लाख ५९ हजार रुपयांचे विविध काउंटचे १५७ सूत बाचक्यांची अपरातफर केल्याचे उघडकीस आले होते. यामध्ये समीर इस्माईल लाठेवाले (वय ३३, रा. आभार फाटा, रुई) व राकेश रमेशचंद्र केसरवाणी (वय ३५, बंडगर माळ) यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते. तिघांवरही शिवाजीनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. केसरवाणी व लाठीवाले यांना यापूर्वीच अटक केली होती, तर वाईंगडे फरार होता. शाहूवाडी पोलिसांच्या पथकाने त्याला संशयावरून पकडले. तो फरार असल्याचे सिद्ध झाल्याने शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

०००००

मेंढपाळाची आत्महत्या

इचलकरंजी : इचलकरंजी-टाकवडे रस्त्यावरील शेतातील झाडाला गळफास घेऊन मेंढपाळाने आत्महत्या केली. बाळासाहेब अण्णा हजारे (वय ५० रा. तळसंदे, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. याबाबतची वर्दी सागर सिद्धू देशिंगे (रा. तळसंदे) यांनी गावभाग पोलिसांत दिली आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे चोरणाऱ्या महिलेस पकडले

0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून काढलेले पैसे ग्राहकाच्या हातातून हिसकावून घेऊन पळून जाणाऱ्या चोरट्या महिलेस स्वतः ग्राहकाने पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सहदेव उमाजी बुनुगडे (रा. आंबर्डे, ता. शाहूवाडी) असे ग्राहकाचे नाव असून वैशाली संदीप काळे (रा. कोंडगाव, ता. धुपखेडा, जि. अहमदनगर) असे चोरट्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. बुनुगडे यांनी याबाबतची फिर्याद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.

यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय शिंदे, रणजितसिंहासह ४२ उमेदवारांचे अर्ज वैध

0
0

संजय शिंदे, रणजितसिंहासह ४२ उमेदवारांचे अर्ज वैध

सोलापूर

माढा लोकसभा मतदारसंघात गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आता निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचे उमेदवार तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह एकूण ४२ उमेदवारांचे ५२ अर्ज होते. सर्व अर्जांची छाननी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या दालनात झाल्यानंतर सर्व ४२ उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. सोमवारी, ८ एप्रिल रोजी अर्ज माघारीनंतरच लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून दहा तर ३१ अपक्ष रिंगणात आहेत. या शिवाय सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजप उमेदवाराला पर्याय म्हणून अर्ज भरला आहे. यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे, भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, बहुजन महापार्टीचे शहाजहान शेख, हिंदुस्थान प्रजा पक्षाचे नवनाथ पाटील, भारतीय प्रजा पक्षाचे नानासाहेब यादव, वंचित बहुजन आघाडीकडून विजयराव मोरे, बहुजन मुक्ती पार्टीचे सुनील जाधव, अखिल भारतीय एकता पक्षाच्या ब्रह्माकुमारी प्रमिलाबेन, बसपचे अप्पा आबा लोकरे, बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे रामचंद्र मायाप्पा छुटुकडे या राजकीय पक्षांच्या दहा उमेदवारांचा समावेश आहे. या शिवाय दिलीप रामचंद्र जाधव, विजयराज बाळासाहेब माने-देशमुख, विजयानंद शंकरराव शिंदे, दौलत उमाजी शितोळे, संदीप जनार्दन खरात, अजिनाथ लक्ष्मण केवटे, रामदास माने, सिद्धेश्‍वर आवारे, बापूराव रुपनवर, बशीर अहमद शेख, रोहित रामकृष्ण मोरे, दत्तात्रय भानुदास खटके, दिनकर शिवाजी देशमुख, सविता अंकुश आयवळे, सह्याद्री कदम, संतोष बिचुकले, मारुती केसकर, विश्‍वंभर काशिद, मोहन विष्णू राऊत, अजिंक्य साळुंखे, अण्णासाहेब सुखदेव मस्के, बळीराम सुखदेव मोरे, नंदू संभाजी मोरे, सचिन भास्कर गोरे, अशोक ज्ञानदेव वाघमोडे, संदीप विठ्ठल पौळ, विठ्ठल ज्ञानदेव ठावरे, रामचंद्र केशव गायकवाड, संजय बाबूराव शिंदे, संजय आंनदराव शिंदे, सचिन ज्ञानेश्‍वर पडळकर या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजता उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड दक्षिणमध्ये शनिवारपासून प्रचार

0
0

कराड दक्षिणमध्ये शनिवारपासून प्रचार

कराड :

सातारा लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा प्रारंभ आज, शनिवारी सायंकाळी वडगाव हवेली (ता. कराड) येथे होणार आहे. सभेसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयनराजे भोसले, सतेज उर्फ बंटी पाटील, मोहनराव कदम, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, राजेश पाटील वाठारकर, अविनाश मोहिते, राजाभाऊ पाटील उंडाळकर, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे आदी उपस्थितीत राहणार आहेत.

.............

कोयनेत उडी

एकाची आत्महत्या

कराड :

कोयना नदीवरील जुन्या पुलावरून एकाने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. रमेश दिनकर बोत्रे (वय ४९) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

रमेश बोत्रे शास्त्रीनगर, मलकापूर (ता. कराड) येथील रहिवासी असून, त्यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जुन्या कोयना पुलावरून नदीपात्रात उडी टाकून आत्महत्या केली. या प्रकरणी उमेश दिनकर बोत्रे (रा. तळमावले) यांनी येथील शहर पोलिसांत खबर दिली. त्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एम. डी. पवार बँकेलाएक कोटींचा नफा

0
0

इस्लामपूर

एम. डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि., बँकेला संपलेल्या आर्थिक वर्षात एक कोटी एक लाख रुपये ढोबळ नफा झाला आहे. बँकेने ११० कोटी ६८ लाख रुपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती बँकेचे संचालक वैभव पवार यांनी दिली.

वैभव पवार म्हणाले, 'बँकेकडे ६९ कोटी ४७ लाख रुपयांच्या ठेवी असून, बँकेने ४१ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेचा एनपीए २.३२ टक्के असून, बँकेने नेट एनपीए शून्य टक्के राखला आहे. तसेच सीआरएआर १३.७० टक्के आहे. गतवर्षाच्या तुलनेत बँकेने सर्व विभागात सकारात्मक वाढ केलेली आहे.'

बँकेच्या इस्लामपूरसह सांगली, मिरज व कोल्हापूर या चार शाखा आहेत. मुख्य व कोल्हापूर शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहे. खातेदारांना आर. टी. जी. एस., एन. ई. एफ. टी., एस. एम. एस. बँकिंग, सी. टी. एस. चेक, वीज बिल भरणा, पॅनकार्ड काढणे व सर्व प्रकारच्या नवीन व जुन्या वाहनांचा इन्शुरन्स या सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. कोणत्याही शाखेत पैसे भरून कोणत्याही शाखेत पैसे काढण्याची सुविधा आहे. या वेळी बँकेच्या अध्यक्षा अलकादेवी पवार, व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

...........

नोकरीच्या अमिषाने

१६ लाखांची फसवणूक

इस्लामपूर

बँकेत नोकरीला लावतो, असे सांगून दोघांची १६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या संतोष साहेबराव जामनिक उर्फ अक्षय मिश्रा (रा. रेपाडखेडा, ता. मोरतिजापूर, जि. अमरावती) व विलास गोवर्धन जाधव (रा. मोगरा, ता. बडनेरा, जि. अमरावती) या दोघांच्या विरुद्ध शुक्रवारी इस्लामपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

या बाबत केशव उर्फ राहुल उत्तम जगताप (वय २९, रा. अक्षर कॉलनी, इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली. केशव जगताप व राहुल संभाजी मगदुम (रा. पेठ) या दोघांची १६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. संतोष जामनिक आणि विलास जाधव या दोघांनी स्टेट बँकेचे लेटरपॅड दाखवून तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी लावतो म्हणून दोघांकडून प्रत्येकी ८ लाख रुपये त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर जमा केली. जून २०१६पासून वाट पाहूनही नोकरीची काहीच शक्यता नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपप्रांतपालपदी सुनील सुतार

0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या लायन्स डिस्ट्रीक्ट उपप्रांतपालपदी कुरुंदवाड येथील सुनील सुतार यांची गोवा येथे झालेल्या परिषदेत निवड करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या माध्यमातून त्यांनी गेली ३५ वर्षे समाजसेवा केली आहे. कुरुंदवाड येथील सुसज्ज आय हॉस्पिटल उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या एकत्रित असलेल्या डिस्ट्रीक्टच्या माध्यमातून या जिल्ह्यांत लायन्सचे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. शिवाय या सर्व जिल्ह्यांमध्ये ११ आय हॉस्पिटल्स, सहा व्हिजन सेंटर्स, सोलापूर, इस्लामपूर, इचलकरंजी गडहिंग्लज, बारामती येथील अद्ययावत ब्लड बँक असे कायमस्वरूपी प्रकल्प सुरू आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपुरवठ्यावर वरिष्ठांची नजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे व मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी शुक्रवारी (ता. ५) काढले. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन, विहित वेळेत गळती दूर करणे आदी वॉर्डनिहाय वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून शहरात पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ उडाला आहे. नागरिकांना नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने असंतोष निर्माण होत आहे. वारंवार रास्तारोको, अधिकाऱ्यांना घेराओ, निवेदने देवूनही पाण्याची समस्या अद्यापही कायम आहे. स्थायी समिती, महासभेमध्ये या विषयावर सभागृहात सूचना, उपाय सुचवले जातात. पण पाणीपुरवठ्यामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. गुरुवारी झालेल्या बैठकीत तर नगरसेवकांनी जलअभियंत्यांना गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

त्यानंतर आयुक्तांनी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कोणत्या उपयायोजना करता येतील याबाबत सर्वच महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत वितरण नलिकेला वारंवार लागणारी गळती आणि एअर व्हॉल्व्हमधून वाया जाणारे पाणी यावर चर्चा झाली. बहुतांशवेळा गळती काढण्यास पाणीपुरवठा विभागाकडून दिरंगाई होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वॉर्डनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांच्याकडे विभागीय कार्यालय चार अंतर्गत 'ई' वॉर्डाची तर मुख्य लेखापाल सरनाईक यांच्याकडे विभागीय कार्यालय चार अतंर्गत 'ई' वॉर्डची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपायुक्त शिंदे यांच्याकडे ए, बी, सी व डी वॉर्डाची जबाबदारी देण्यात आली. तीनही अधिकारी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवतील. तसेच एखाद्या ठिकाणी गळती लागल्यास दुरुस्ती विहित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दही-दूधावरची पुंजी आज्जीबाईंकडून विठ्ठलचरणी अर्पण

0
0

पंढरपूरः

तिरुपती किंवा शिर्डी येथे कोट्यवधीचे दान देणारे शेकडो भक्त असतात. आपल्या कमाईतला ठरवीक हिस्सा या देवस्थानात देऊन थेट देवाला भागीदार करणारेही अनेक शेठजी दिसतात. पण, गोरगरिबांचा देव असा महिमा असलेल्या विठुरायाला समाजातील सर्वसामान्य भक्त मंडळी आपली आयुष्यभराची पुंजी अर्पण करून कृतकृत्य होत असतात. अशाच एका भक्ताने आयुष्यभर दही-दूध विकून जमा केलेली लाख रुपयांची पुंजी आज विठुरायाच्या चरणी अर्पण केली.

हातावर पोट असलेल्या माणिकबाई सखाराम गवळी या आज्जीबाई मालेगाव येथील रहिवाशी. दही दुधाचा व्यवसाय करीत नेटका संसार केला. मात्र, विठुरायाच्या कृपेने सगळे चांगले घडत गेल्याने आयुष्याच्या उतारवयात उपयोगी येईल म्हणून जमा केलेली पुंजी याच देवाच्या पायावर अर्पण करायची त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्ण केली. माणिक आजींचा मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माणिकबाईंची मुले, सुना, नातवंडे उपस्थित होते.

म्हातारपणात चार पैसे साठवण्याकडे ज्येष्ठांचा कल असतो. मात्र, भक्ती अमूल्य असते, हेच माणिक आजींनी दाखवून दिले आहे. त्यांनी पै-पै करून जमा केलेले हे पैसे विठुरायाचरणी अर्पण केले. त्यानंतर आजींचा आनंद गगनात मावत नव्हता. आयुष्यात जमा केलेला पैसा देवाच्या चरणी वाहण्याचा मी निश्चय केला होता. तो आज मी पूर्ण झाल्याचे सांगताना पूर्णत्वाचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुहूर्तावर कोट्यवधीची उलाढाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साडेतीन महुर्तापैकी पहिल्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. दागिन्यांच्या खरेदीसाठी हार्ट ऑफ सिटी समजल्या जाणाऱ्या गुजरीत सोने, चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. पाडव्याचा मुहूर्त साधताना अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न साकार झाले. इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या खरेदीमुळे अॅटोमोबाईल मार्केटमध्ये फिलगुडचे वातावरण होते. मोबाइल खरेदीला तरुणाईचा उदंड प्रतिसाद लाभला.

गुढीपाडव्याला सोने खरेदी करायची ही प्रथा अनेकांनी जपल्याने गुजरीत मोठी उलाढाल झाली. पारंपरिक दागिन्यांबरोबर एक ग्रॅम वजनाच्या डिझाइन दागिन्यांनाही ग्राहकांनी पसंती दिल्याचे सार्वत्रिक चित्र पहायला मिळाले. शहरातील नामांकित कंपन्याच्या दागिन्यांच्या शोरुममध्ये महिलांची गर्दी लक्षणीय होती. गुजरी, राजारामपुरी, व्हिनस टॉकीज, दसरा चौकातील शोरुम हाऊसफुल्ल होती. सोने-चांदीच्या दागिन्यांबरोबर हिऱ्यांच्या दागिन्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. सोने, चांदीचे दर कमी झाल्याने लग्नसराईसाठी पाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदी झाली.

घरबांधणी उद्योगातील मंदीचे सावट कमी झाल्याचे चित्र आज पहायला मिळाले. शुभमुहूर्तावर अनेकांनी फ्लॅट, बंगले खरेदी केले तर अनेकांनी बुकिंग केले. रेरा कायदा, जीएसटीमुळे गेले दोन वर्षे मंदी होती. जीएसटीच्या दरात कपात झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांनी घेतला. बंगले, फ्लॅट खरेदी केलेल्या ग्राहकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर गृहप्रवेश केला. नवीन गृह प्रकल्पांच्या बुकिंगलाही चांगले ओपनिंग मिळाल्याची प्रतिक्रीया बांधकाम व्यावसायिकांकडून मिळाली.

इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी मोठ्या ऑफर दिल्याने एलइडी, फ्रीज, वॉशिंग मशिन, एसी, मोबाइल, ओव्हन, कॅमेरा या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. कॅशबँक, एक्सचेंज, शून्य टक्के टक्कमेवर इएमआयवर वस्तू खरेदीच्या ऑफर दिल्याने ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद लाभला, लक्ष्मीपुरी, उमा टॉकीज, टेंबे रोड, बिंदू चौक शिवाजी रोडवरील शोरुममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. मोबाइल खरेदीसाठी तरुणाईचा मोठा पुढाकार होता. विविध कंपन्यांचे नवीन मॉडेल, कॅशबॅक योजनेचा फायदा घेण्यात ग्राहकांनी रुची दाखवली. दिवसभर मोबाइलचे शोरुम हाऊसफुल्ल होते.

पाडव्याला नवीन गाडी दारात आणण्याचे बेत आज साकार झाले. बुकिंग केलेली वाहने ताब्यात घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी होती. रुईकर कॉलनी, तावडे हॉटेल, पुलाची शिरोली, गोकुळ शिरगाव येथून मोठ्या संख्येने वाहनांच्या चाव्या ग्राहकांना देण्यात आल्या. दुचाकीबरोबर यंदा चारचाकी वाहन खरेदीलाही चांगला प्रतिसाद लाभला. एकंदरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर व्यापारीपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याने समाधानाचे वातावरण होते.

सोन्याचे दर उतरल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी पाडव्याचा मुहूर्त साधला. सराफ बाजारात अतिशय उत्साहाचे वातवरण आहे. अंगठी, टॉप्ससह हिऱ्यांच्या दागिन्यांनाही ग्राहकांनी पसंती दिली.

- भरत ओसवाल, अध्यक्ष सराफ संघ

पाडव्याच्या मुहूर्तावर गृहपयोगी वस्तूंना महिला ग्राहकांची चांगली पसंती लाभली. फ्रीज, वॉशिंग मशिन, एलइडीहीसह एसी खरेदीला प्रतिसाद लाभला. ऑफर्सचा लाभ ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात घेतला.

- मुग्धा कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक वस्तू व्यापारी

जीएसटीमध्ये कपात केल्याने ग्राहकांना चांगला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड दिसत आहे. पाडव्याच्या मुहुर्तावर आज चांगला प्रतिसाद मिळाला. गृहप्रकल्पांत बुकिंगकडे ग्राहकांनी लक्ष दिले.

- अतुल पोवार, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा कोटींचा निधी परत गेला

0
0

कराड :

'विद्यमान खासदारांना निधी वापरायची माहिती नाही. पाच वर्षांतील २५ कोटी निधीपैकी फक्त १२ कोटी निधीचा वापर झाला असून, उर्वरित निधी परत गेला आहे. हे विद्यमान खासदारांचे नुकसान नसून, सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेचे नुकसान आहे. यामुळेच सामान्य लोक या निवडणुकीत पुढकार घेऊन परिवर्तन करतील,' असा विश्‍वास शिवसेना, भाजप, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. मलकापूर येथे शनिवारी गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील, भाजप प्रदेश चिटणीस अतुल भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आदी उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्थ तरुण आहे, चुकला तर लगेच फाशी देता का? अजित पवार माध्यमांवर भडकले

0
0

पार्थ तरुण आहे, चुकला तर लगेच फाशी देता का?

अजित पवार माध्यमांवर भडकले

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'पार्थ तरुण आहे, तो चुकला तर लगेच फाशी देता का?' अशा शब्दात आपला मुलगा पार्थ पवार यांचा बचाव राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या पार्थ पवार यांना सोशल मिडियावर नेटिझन्सकडून वारंवार ट्रोल व्हावे लागत आहे. या बाबतचा प्रश्न अजित पवारांना विचारताच अजित पवार भडकले.

या प्रकरणी त्यांनी माध्यमांनाच जबाबदार धरले. तो तरुण आहे, चुकला तर लगेच फाशी द्याल काय? असे म्हणत अजित पवार माध्यमांवर भडकले. 'पार्थ पहिल्यांदाच निवडणूक लढवतोय, त्यामुळे त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली. त्या नंतर मी त्याला समजावून सांगितले आणि त्याचे पादरीकडे जाण्याचे कृत्य चुकीचेच होते. मात्र, सोबतची मंडळी असे आग्रह करतात आणि मग जावे लागते,' असेही अजित पवार म्हणाले.

चौकशी सुरू असलेले भाजपमध्ये

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या धमक्यांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येती का? याची माहिती घेत आहोत. वंचित बहुजन आघाडी भाजप-सेनेला मदत होईल, असे वागत आहे. ज्या मंडळीच्या सहकारी बॅँका, खासगी सहकारी कारखाने अडचणीत आलेत, ज्यांच्या मागे चौकशींचा ससेमिरा सुरू आहे. दगडाखाली हात अडकलेले सध्या भाजपमध्ये जात आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images