Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आचारसंहितेचा फटका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा धसका सर्वसामान्य नागरिकांनीही घेतला आहे. कारवाई करणाऱ्या पथकाच्या दहशतीमुळे खासगी, वैयक्तिक कार्यक्रमांवरही मर्यादा आल्या आहेत. पथकातील काहीजण अधिकाराचा गैरवापर करत 'चिरीमिरी' मागत असल्याच्या तक्रारी आहेत. रात्री साडेदहा वाजल्यानंतर मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशनसह बाजारपेठेतील हॉटेल्स, किराणा दुकाने बंद करावी लागत आहेत. त्यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. परिणामी, 'आचारसंहिता पथक आले पळा पळा' असे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. कारवाईच्या नाहक बडग्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.

निवडणुकीच्या काळात एक लाख रुपांपेक्षा अधिक रक्कम काढणाऱ्या खातेदारांची माहिती खर्च नियंत्रण समितीकडे देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांना दिल्या आहेत. त्यामुळे लाखावरील व्यवहारांना ब्रेक लागला आहे. लग्नसमारंभ, बारसे, वाढदिवसांचे कार्यक्रम आणि घर, शेती खरेदीचे विक्रीचा व्यवहार लांबणीवर टाकणे अनेकांनी पसंत केले आहे. आवश्यक त्या ठिकाणी रोख पैसे घेऊन जाणे टाळले जात आहे. त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे बाजारपेठेवर जाणवत आहे. लग्न वा अन्य कार्यक्रमांसाठी सभागृह, साहित्याचे बुकिंग थांबले आहे. सामान्य माणूसही कधी एकदा आचारसंहिता संपेल, त्याची प्रतीक्षा करत आहे. आचारसंहितेच्या पथकाने नको तितकी दहशत निर्माण केल्याने बाजारपेठेतील मंदीत भर पडली आहे.

रात्री साडेदहा वाजल्यानंतर शहरातील हॉटेल्स, बाजारपेठेतील सर्व दुकान बंद होत असल्याने शुकशुकाट जाणवत आहे. बाहेरून रात्री उशिरा येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात जेवण शोधण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे. त्यांना लांबवरच्या गल्लीबोळातील घरगुती खानावळींचा आधार घ्यावा लागत आहे. चौकाचौकांत, रस्त्याकडेला लावलेल्या गाड्यांवरील खाद्यपदार्थ खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रात्री साडेदहानंतर जीवनावश्यक वस्तू, दुधही मिळत नाही. रात्री उशिरा पोहोचणारे काही पर्यटक ऑनलाइन जेवणाची ऑर्डर देत आहेत. त्यामुळे अशा ऑर्डर पोहोच करणाऱ्या कंपन्यांच्या दुचाकींची वर्दळ वाढली आहे.

एक खिडकी कक्ष

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील राजकीय पक्ष, उमेदवारांना परवानगीसाठीच्या कागदपत्रांसाठी धावाधाव करायला लागू नये, यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. तेथून सुलभपणे परवाना मिळण्यासाठी आवश्यक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे अधिकार संबंधित पोलिस ठाणे आणि भरारी पोलिस पथकांना दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे असे सूत्रांनी सांगितले.

सहा वाहनांना परवाना

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरलेले उमेदवार, त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचीही परवानगी घेणे सक्तीचे आहे. परवाना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुविधा कक्ष कार्यरत आहे. तेथून आतापर्यंत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातून प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा वाहनांचे परवाने घेण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरचा परवाना घेण्यात आला होता.

कारवाईच्या धाकाआडून लूट

कर्नाटक, गोवा राज्यातून येणारी विनापरवाना दारू, पैसे रोखण्यासाठी ३३ चेकपोस्ट आहेत. त्यातील काही चेकपोस्टवर वाहन परवाना तपासणीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा शेतमाल नेणारी वाहने अडवून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. कारवाईच्या धाकाआडून 'चिरीमिरी'वर डल्ला मारला जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे चेकपोस्ट, आचारसंहिता पथकाच्या 'कारनाम्यां'वर कुणाचे नियंत्रण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आचारसंहितेच्या काळात रात्री साडेदहा वाजल्यानंतर हॉटेल्स, बार, धाबे सुरू ठेऊ नये असे आदेश दिला आहे. प्रचारातील कार्यकर्त्यांचीही जेवणांची सोय व्हावी म्हणून साडेदहापर्यंत वेळ वाढवली आहे. ही वेळ न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. विनापरवाना प्रचार, सभा, बैठकांवरही नजर आहे.

- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

आचारसंहितेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीची आचारसंहिता म्हणजे आणिबाणी आहे की काय असे वाटू लागले आहे. दैनंदिन व्यवहारांचे पैसे बँकेत भरण्यासाठी जातानाही पथकाकडून पकडले जाईल, चौकशीचा ससेमिरा लागेल असे व्यापाऱ्यांना वाटू लागले आहे. त्याचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. व्यापार, उद्योगाच्या मंदीत भर पडली आहे.

- सदानंद कोरगावकर, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी धावाधाव सुरूच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

बालिंगा पंपिंग हाऊस येथील विद्युतपंपांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने बुधवारी पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. शहराच्या बहुतांश भागात पाणी न आल्याने टँकरच्या मागणीत वाढ झाली. टँकर भागात आला की त्याच्याभोवती नागरिकांची झुंबड उडाली होती. उन्हाची तीव्रता वाढत असताना अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांच्या मात्र तोंडचे पाणी पळाले आहे.

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अपुऱ्या पाण्याची समस्या बनली आहे. कधी वितरणातील दोष तर कधी दुरुस्तीमुळे वारंवार पाणीपुरवठ्याचा बट्याबोळ उडत आहे. उन्हाची तीव्रता वाढून पाण्याच्या मागणीत वाढ होत असताना एक-दोन दिवसांतून कोणत्या ना कोणत्या भागात पाण्याची समस्या निर्माण होते. नागरिक रस्त्यावर उतरुन संताप व्यक्त करतात. मग लोकप्रतिनिधी, अधिकारी आश्वासने देतात. पण पुन्हा 'पहिले पाढे पचावन्न' अशी स्थिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून बालिंगा पंपिंग हाऊस येथील चारपैकी एका विद्युत पंपात बिघाड झाला आहे. त्यामुळे तीन पंपांद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याने अनेक भागात अपुरे पाणी येत आहे. एकाचवेळी दुरुस्ती करण्यासाठी बुधवारी शटडाऊन घेण्यात आला. त्यामुळे सकाळच्या सत्रात पाणी येणाऱ्या 'ए.', 'सी.', 'डी.' आणि 'ई.' वार्डात पाणी आले नाही. त्यामुळे सकाळपासून कळंबा व बावडा फिल्टर हाऊस येथून टँकरच्या मागणीत वाढ झाली. अनेक भागात टँकरच्या फेऱ्या सुरू होत्या.

टँकरचे दर वाढले

महापालिकेच्या टँकरची संख्या कमी असल्याने खासगी टँकरमालकांनी मात्र याचा चांगलाच फायदा उचलला. नेहमी २५० ते ३०० रुपये असणारा खासगी टँकरचा दर आज ५०० ते ७०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. दरम्यान बालिंगा पंपिंग हाऊस येथील दुरुस्तीचे काम सायंकाळपर्यंत पूर्ण होऊन गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेची दहशत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा धसका सर्वसामान्य नागरिकांनीही घेतला आहे. कारवाई करणाऱ्या पथकाच्या दहशतीमुळे खासगी, वैयक्तिक कार्यक्रमांवरही मर्यादा आल्या आहेत. पथकातील काहीजण अधिकाराचा गैरवापर करत 'चिरीमिरी' मागत असल्याच्या तक्रारी आहेत. रात्री साडेदहा वाजल्यानंतर मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशनसह बाजारपेठेतील हॉटेल्स, किराणा दुकाने बंद करावी लागत आहेत. त्यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. परिणामी, 'आचारसंहिता पथक आले पळा पळा' असे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. कारवाईच्या नाहक बडग्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.

निवडणुकीच्या काळात एक लाख रुपांपेक्षा अधिक रक्कम काढणाऱ्या खातेदारांची माहिती खर्च नियंत्रण समितीकडे देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांना दिल्या आहेत. त्यामुळे लाखावरील व्यवहारांना ब्रेक लागला आहे. लग्नसमारंभ, बारसे, वाढदिवसांचे कार्यक्रम आणि घर, शेती खरेदीचे विक्रीचा व्यवहार लांबणीवर टाकणे अनेकांनी पसंत केले आहे. आवश्यक त्या ठिकाणी रोख पैसे घेऊन जाणे टाळले जात आहे. त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे बाजारपेठेवर जाणवत आहे. लग्न वा अन्य कार्यक्रमांसाठी सभागृह, साहित्याचे बुकिंग थांबले आहे. सामान्य माणूसही कधी एकदा आचारसंहिता संपेल, त्याची प्रतीक्षा करत आहे. आचारसंहितेच्या पथकाने नको तितकी दहशत निर्माण केल्याने बाजारपेठेतील मंदीत भर पडली आहे.

रात्री साडेदहा वाजल्यानंतर शहरातील हॉटेल्स, बाजारपेठेतील सर्व दुकान बंद होत असल्याने शुकशुकाट जाणवत आहे. बाहेरून रात्री उशिरा येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात जेवण शोधण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे. त्यांना लांबवरच्या गल्लीबोळातील घरगुती खानावळींचा आधार घ्यावा लागत आहे. चौकाचौकांत, रस्त्याकडेला लावलेल्या गाड्यांवरील खाद्यपदार्थ खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रात्री साडेदहानंतर जीवनावश्यक वस्तू, दुधही मिळत नाही. रात्री उशिरा पोहोचणारे काही पर्यटक ऑनलाइन जेवणाची ऑर्डर देत आहेत. त्यामुळे अशा ऑर्डर पोहोच करणाऱ्या कंपन्यांच्या दुचाकींची वर्दळ वाढली आहे.

एक खिडकी कक्ष

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील राजकीय पक्ष, उमेदवारांना परवानगीसाठीच्या कागदपत्रांसाठी धावाधाव करायला लागू नये, यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. तेथून सुलभपणे परवाना मिळण्यासाठी आवश्यक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे अधिकार संबंधित पोलिस ठाणे आणि भरारी पोलिस पथकांना दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे असे सूत्रांनी सांगितले.

सहा वाहनांना परवाना

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरलेले उमेदवार, त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचीही परवानगी घेणे सक्तीचे आहे. परवाना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुविधा कक्ष कार्यरत आहे. तेथून आतापर्यंत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातून प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा वाहनांचे परवाने घेण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरचा परवाना घेण्यात आला होता.

कारवाईच्या धाकाआडून लूट

कर्नाटक, गोवा राज्यातून येणारी विनापरवाना दारू, पैसे रोखण्यासाठी ३३ चेकपोस्ट आहेत. त्यातील काही चेकपोस्टवर वाहन परवाना तपासणीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा शेतमाल नेणारी वाहने अडवून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. कारवाईच्या धाकाआडून 'चिरीमिरी'वर डल्ला मारला जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे चेकपोस्ट, आचारसंहिता पथकाच्या 'कारनाम्यां'वर कुणाचे नियंत्रण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आचारसंहितेच्या काळात रात्री साडेदहा वाजल्यानंतर हॉटेल्स, बार, धाबे सुरू ठेऊ नये असे आदेश दिला आहे. प्रचारातील कार्यकर्त्यांचीही जेवणांची सोय व्हावी म्हणून साडेदहापर्यंत वेळ वाढवली आहे. ही वेळ न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. विनापरवाना प्रचार, सभा, बैठकांवरही नजर आहे.

- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

आचारसंहितेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीची आचारसंहिता म्हणजे आणिबाणी आहे की काय असे वाटू लागले आहे. दैनंदिन व्यवहारांचे पैसे बँकेत भरण्यासाठी जातानाही पथकाकडून पकडले जाईल, चौकशीचा ससेमिरा लागेल असे व्यापाऱ्यांना वाटू लागले आहे. त्याचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. व्यापार, उद्योगाच्या मंदीत भर पडली आहे.

- सदानंद कोरगावकर, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळूमामाचा भंडारा उत्साहात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, कोकण आणि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड ) येथील सद्गु्रू बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्साहात पार पडला. गेले सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांच्या भक्तिमय वातावरणात, भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत, ढोल-कैताळांच्या गगनभेदी आवाजात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘बाळूमामांच्या नावानं चांगभल’च्या जयघोषात श्रीक्षेत्र आदमापूर भक्तिरसात न्हाऊन निघाले. यावेळी दोन-अडीच लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

विविध भागातील कीर्तनकार, प्रवचनकार यांची कीर्तने, प्रवचने, भजनी मंडळांची भजने, धनगरी ढोल यांच्या निनादात आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात भंडारा उत्सव झाला. जागरादिवशी रात्री उशिरा भाविकांनी ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे बाबुराव डोणे (वाघापूरकर) यांचा चिरंजीव कृष्णात डोणे वाघापुरे यांचा भाकणुकीचा कार्यक्रम झाला. धनगरी गाणी, ओव्यांच्या गायनाने भाविक तल्लीन झाले होते. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे पाचशे क्विंटल तांदूळ, गहू धान्यांचा भात व खिरीच्या महाप्रसादाचा लाभ सुमारे दोन-अडीच लाख भाविकांनी घेतला.

तिसऱ्या दिवशी पालखी सोहळा बाळूमामांच्या मंदिरापासून आदमापुरातून सकाळी आठ वाजता सुरू झाला. धनगरी ढोलाच्या गगनभेदी निनादाबरोबरच भजनी मंडळे, लेझीम पथके, दांडपट्टा, मानाच्या अश्वांचे नृत्य असा लवाजमा होता. सद्गुरु बाळूमामा विकास फाउंडेशन, बजरंग उद्योगसमूह, बाळूमामा अर्थमुव्हर्स, ९२०० बाइज मुदाळ आदींच्यावतीने अन्नछत्र उभारण्यात आले. सायंकाळी गावच्या आड विहिरीवर भंडारा टाकून पालखी मंदिरात आली.

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी, प्रांताधिकारी संपत खिलारे, सरपंच नेहा पाटील, उपसरपंच बजरंग पाटील, बाजारसमितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक व उद्योगपती दिनकरराव कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार यांनी आंबेडकरी चळवळीची पिढी बरबाद केली: आनंदराज आंबेडकर

$
0
0

पंढरपूर:

चुकीच्या नेत्याला पुढे आणून शरद पवार यांनी आंबेडकरी चळवळीची एक पिढी बरबाद केली आहे. त्यामुळंच प्रकाश आंबेडकर यांचा पवारांवर राग आहे, असं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज सांगितलं.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आनंदराज यांनी यावेळी पवारांवर हल्लाबोल केला. 'शरद पवार यांनी चुकीच्या नेत्याला पुढं आणलं. या नेत्यामुळं आंबेडकरी चळवळीचे ३० ते ४० वर्षांचे राजकारण फुकट गेले आणि आज तो नेता स्वत:ही पवारांच्या सोबत नाही,' असं आनंदराज म्हणाले. त्यांचा रोख रामदास आठवले यांच्याकडं होता. मात्र, त्यांनी थेट नामोल्लेख टाळला.

'सोलापूरमध्ये काल झालेली शरद पवार यांची सभा केविलवाणी होती. ज्या सेनापतीनं रिंगणातून पळ काढला त्याच्याबाबत आपणास काहीच बोलायचं नाही, असा टोला त्यांनी पवार यांना हाणला. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची 'बी' टीम नसून काँग्रेसच भाजपची 'ए' टीम आहे. उत्तर प्रदेशात हे सिद्ध झालंय,' असंही ते म्हणाले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४८ जणांनी भरले उमेदवारी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ४८ जणांनी ६८ उमेदवारी अर्ज दाखल केले. अंतिम दिवशी शिवसेना, भाजप मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पत्नी वैशाली यांनी अपक्ष म्हणून 'कोल्हापूर'साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांच्याकडे त्यांनी अर्ज भरला. दरम्यान, आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता अर्ज छाननी प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.

'कोल्हापूर'साठी अखेरच्या दिवशी ८ जणांनी १० अर्ज तर एकूण २५ उमेदवारांनी ३७ अर्ज भरले. तर 'हातकणंगले'साठी १४ उमेदवारांनी १६ अर्ज तर आजअखेर २३ उमेदवारांनी ३१ अर्ज दाखल केले. अर्ज भरण्यासाठी एक तास शिल्लक असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक यंत्रावरून पुकारा केला. कुणी अर्ज दाखल करण्यासाठी आले असतील तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात यावे, असे ते पुकारत होते. शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक येत राहिले.

दाखल झालेल्या अर्जातील प्रमुख उमेदवारांची नावे मतदारसंघनिहाय अशी : कोल्हापूर : राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीतून खासदार धनंजय महाडिक, अरूंधती महाडिक, बहुजन समाज पार्टीतून महेश कांबळे, वंचित बहुजन आघाडीतून अरूणा माळी, महाराष्ट्र क्रांती सेनेतून भारत पाटील.

हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून खासदार राजू शेट्टी, प्रा. जालिंदर पाटील, शिवसेनेतून धैर्यशील माने, वंचित बहुजन आघाडीतून अस्लम सय्यद, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील, हिंदुस्थान मानव पार्टीतून गजानन आंबी, बहुजन मुक्ती पार्टीतून विराज कांबळे.


मुंबईतील 'राजू शेट्टी'

हातकणंगले मतदारसंघातून पूर्व मुंबईत राहणारे राजू मुजीकरराव शेट्टी यांनी बहुजन महापार्टीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. 'स्वाभिमानी'चे खासदार राजू शेट्टी यांच्या नावाशी त्यांच्या नावाचे साधऱ्र्म आहे.

रात्री उशिरापर्यंत

अर्जांच्या छाननीची पूर्व तयारी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आयोगाकडून आलेले नियम डोळ्यासमोर ठेऊन दाखल सर्व अर्जातील मजकुराची पडताळणी केली जात होती. प्रत्येक अर्जाचे वाचन केले जात असल्यामुळे विलंब झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाळवणीतील ९५० वर्षांपूर्वीच्या शिलालेखाचा उलगडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

सांगली जिह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे सापडला आहे. चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) उर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला. बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग आणि दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखावर आहे.

मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी हा शिलालेख शोधून काढला. या लेखाने जिल्ह्यातील प्राचीन व्यापारी श्रेण्या, त्यांची कामगिरी, जैन धर्मियांचे स्थान यांची माहिती मिळण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील हा सर्वांत जुना हळेकन्नड शिलालेख ठरल्याचा दावा काटकर आणि कुमठेकर यांनी केला आहे.

या दोघांनी शिलालेखाविषयी माहिती दिली. 'कल्याणीहून राज्य करणाऱ्या चालुक्य राजांची भाळवणी ही उपराजधानी होती. ती प्रमुख व्यापारी पेठ होती. अनेक प्रसिद्ध व्यापारी या गावात राहत. नागरिक आणि व्यापाऱ्यांनी गावात मोठी मंदिरे बांधल्याचे उल्लेख आहे. भाळवणी येथे यापूर्वी दोन कानडी आणि एक देवनागरी शिलालेख सापडले होते. त्यापैकी दोन चालुक्यकालीन तर एक यादवनृपती दुसरा सिंघण याच्या काळातील आहे. हे शिलालेख सध्या कराड येथे आहेत. मात्र, सध्या उपलब्ध झालेला शिलालेख त्याहून वेगळा आहे. या शिलालेखाचे ठसे घेऊन गेले वर्षभर अभ्यास करण्यात आला. त्यांना राहुल गंगावणे, बाळासाहेब पाटील यांनी सहकार्य केले.'

शिलालेख जुन्या कन्नड लिपीत असल्याचे सांगून ते म्हणाले की, तो चालुक्यराजा सोमेश्वर (दुसरा) याच्या राजवटीतला आहे. सोमेश्वराची कारकीर्द १०६८ ते १०७६ अशी केवळ आठ वर्षेच झाली होती. या काळातील त्याचे मोजकेच शिलालेख आढळून येतात. भाळवणीत नव्याने सापडलेल्या शिलालेखामुळे सोमेश्वराच्या राजवटीची नवी माहिती उजेडात आली आहे. शिलालेखानुसार दान २० फेब्रुवारी १०७० रोजी देण्यात आले आहे. यामध्ये सोमेश्वराला भुवनाश्रय, श्री पृथ्वीवल्लभ महाराजाधिराज, परमेश्वरम, परमभट्टारक, सत्याश्रय, कुळतिळक, चालुक्यभरणम, भुवनैक्यमल्ल अशा पदव्या लावण्यात आल्या आहेत. हा राजा हा कल्याण येथे कथाविनोदात रममाण असताना शिलालेख भाळवणी गावातील व्यापारी आणि ६० शेतकऱ्यांनी लिहून ठेवला आहे.

शिलालेख तीन भागांत

प्रारंभी जैन देवतेची स्तुती करण्यात आली आहे. त्यानंतर दानलेख लिहिला आहे. त्यानंतर शेवटच्या भागात शापवचन लिहिले आहे. भाळवणी येथे असलेल्या प्राचीन मूळसंघ नावाच्या जैन बस्तीचा गावातील शेतकरी आणि प्रमुख व्यापाऱ्यांनी मिळून जीर्णोध्दार केला आणि या बस्तीमधील गंध, धूप, नैवेद्य या नैमित्तिक धार्मिक कार्यासाठी काही जमीन, फुलझाडांच्या दोन बागा आणि काही दुकानांमधून येणारे उत्पन्न दान म्हणून दिले आहे. सांगली जिल्ह्यात उत्तरकालीन चालुक्यांचे काही शिलालेख सापडले. त्यामध्ये हा सर्वात जुना शिलालेख आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्तीनिमित्त सत्कार

$
0
0

कोल्हापूर : प्रतिभानगर येथील मिलिंद हायस्कूलमधील सहायक शिक्षक शिवाजी शामराव जिरगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक एम. एम. शिर्के अध्यक्षस्थानी होते. शाल, श्रीफळ व पुस्तके भेट देऊन जिरगे यांचा सत्कार झाला. त्यांनी शाळेला तिजोरी भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. एस. एन. दिंडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मलकापुरात उद्या भव्य मिरवणूक

$
0
0

मलकापुरात उद्या भव्य मिरवणूक

शाहूवाडी : मलकापूर (ता. शाहूवाडी) येथे गुढीपाडवा (६ एप्रिल) निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ८०० चौरसफूट रेखाटण्यात येणारी महारांगोळी या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असल्याची माहिती नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने देण्यात आली. यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही समितीच्या वतीने केले आहे. मलकापूरमध्ये प्रथमच गुढीपाडवा दिनी नववर्षाचे स्वागत उत्साही वातावरणात होत आहे. गुढीपाडवादिनी भव्य मिरवणूक निघणार आहे. दरम्यान, शहरातील ३५ महिला शुक्रवारी (ता.५) सकाळी ४०×२० ‌फूट जागेत संस्कार भारती रांगोळी रेखाटणार आहेत. ही रांगोळी रविवार (ता.७) पर्यंत पाहण्यासाठी खुली राहणार आहे.

०००००

हळदीतील कुस्ती

मैदानात हृषिकेश विजेता

म\R.टा\R.वृत्तसेवा\R, कुडित्रे\R

हळदी\R (ता\R. करवीर)\R येथे\R भद्रकाली\R आंबिल\R यात्रेनिमित्त\R, रावजी\R कामते\R यांच्या\R स्मरणार्थ\R व\R ग्रामपंचायतीच्या\R वतीने\R आयोजित\R कुस्ती\R मैदानात\R हृषिकेश\R पाटील\R (राशिवडे\R) विरुद्ध\R दत्ता\R पाटील\R (आमशी\R) यांच्यात\R प्रथम\R क्रमांकासाठी\R अटीतटीची\R लढत\R झाली\R. एकमेकांवर\R चाललेल्या\R झटापटीत\R आठव्या\R मिनिटाला\R हृषिकेशने\R एकेरी\R कस\R काढत\R दत्ता\R पाटीलला\R अस्मान\R दाखवून\R प्रथम\R क्रमांक\R पटकावला\R.

भोगावती\R शिक्षण\R प्रसारक\R मंडळाचे\R उपाध्यक्ष\R सर्जेराव\R पाटील\R, उद्योगपती\R विशाल\R कामते\R, शंकर\R पाटील\R, पोलिसपाटील\R सर्जेराव\R पाटील\R, बाबासाहेब\R पाटील\R, बळी\R पाटील\R, आदींच्या\R उपस्थितीत\R प्रथम\R क्रमांचा\R विजेत्या\R मल्लांना\R बक्षीस\R वाटप\R करण्यात\R आले\R. आखाडा\R पूजन\R धोंडिराम\R चौगले\R यांच्या\R हस्ते\R करण्यात\R आले\R. द्वितीय\R क्रमांकाची\R कुस्ती\R भगतसिंग\R खोत\R विरुद्ध\R सुभाष\R निऊंगरे\R यांच्यात\R झाली. त्यामध्ये भगतसिंगने\R गुणावर\R सुभाषवर\R मात\R केली\R. तृतीय\R क्रमांकाची\R किरण\R मोरे\R विरुद्ध\R ओंकार\R चौगले\R यांच्यातील\R कुस्ती\R बरोबरीत\R सोडविण्यात\R आली\R. मैदानात यानंतर\R अनेक\R लहान\R - मोठ्या\R चटकदार\R १५०\R हून\R अधिक\R कुस्त्या\R झाल्या.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेएकोणीस लाखाची रोकड जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गगनबावडा येथे गुरुवारी मध्यरात्री खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून १९ लाख ५० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. संतोषकुमार पटेल (रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश) असे या प्रवाशाचे नाव आहे. तो नीता ट्रॅव्हल्समधून (क्रमांक एमएच ०४, एफके ५७५७) प्रवास करीत होता. स्थिर निरीक्षण पथकाने ही कारवाई गुरुवारी पहाटे तीन वाजता करण्यात आली. जप्त केलेली रक्कम प्राप्तिकर विभागाकडे देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा येथून मुंबईकडे जाणारी नीता ट्रॅव्हल्सची बस पहाटे साडेतीनच्या सुमारास गगनबावडा येथे आली. त्यावेळी वनरक्षक चौकी येथे निरीक्षण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बस थांबवून तपासणी केली. त्या वेळी संशयित संतोषकुमार पटेलकडील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये २००० रुपयांच्या २२५ आणि ५०० रुपयांच्या ३ हजार नोटा मिळाल्या. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने मुंबई येथील एका खासगी बिटकॉन कंपनीच्या निविदेची रक्कम भरण्यासाठी पैसे आणल्याचे तपासात सांगितले. मात्र त्याच्याकडे या कंपनीची कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्याच्याकडील १९ लाख, ५० हजारांची रोकड जप्त केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषानुसार दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम सापडल्याने पथकाने प्राप्तिकर विभाग आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. पथकात कृषी विभागाचे प्रदीप लोहार, महादेव कांबळे, पोलिस हवालदार डामसे आदींचा समावेश होता.

.. .. ..

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, विधानसभा मतदारसंघनिहाय ४० स्थिर निरीक्षण पथके कार्यरत आहेत. दररोज प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले आहेत. रोकड, हत्यारे, गांजा, गुटखा, दारु सापडल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान गगनबावडा येथे जप्त केलेली रक्कम निवडणूक आयोगाने नियुक्त केलेली समिती घेणार आहे. समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, कोषागार अधिकार, प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आहेत. या समितीला आठवडाभर जप्त केलेल्या रोकडचा निर्णय घ्यावा लागतो.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिक सर्वाधिकश्रीमंत उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांत खासदार धनंजय महाडिक यांची मालमत्ता सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ प्रा. संजय मंडलिक यांची मालमत्ता आहे. सर्वात कमी मालमत्ता खासदार राजू शेट्टी यांची आहे.

निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्जासोबत स्वत:सह कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नाचे विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक केले आहे. यामुळे उमेदवारांनी दाखल केलेल्या विवरणपत्रावरून त्यांची मालमत्ता समोर आली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल केलेल्या विवरणपत्रात धैर्यशील माने यांची स्थावर २ कोटी ६१ लाख व जंगम २ कोटी १५ लाख मालमत्ता आहे. त्यांच्याकडे रोख ३२ हजार, पत्नी वेदांतिकाकडे यांच्याकडे २७ हजार रूपये रोख आहे. माने यांच्याकडे २ लाख ६८ हजार ९५० आणि पत्नीकडे ५ लाख ४७ हजार ८०० तर मुलगीकडे १ लाख ३८ हजार ६०० रूपयांचे सोने आहे. एक कार त्यांच्या नावे आहे.

-------------------

प्रमुख उमेदवारांची माहिती

उमेदवार शिक्षण मालमत्ता कर्ज

धनंजय महाडिक बी.कॉम ६५ कोटी १३ कोटी

संजय मंडलिक एम.ए. बीएड ९ कोटी ५१ लाख १ कोटी ५ लाख

राजू शेट्टी डिप्लोमा मॅकॅनिकल इंजिनिअरिंग २ कोटी ३६ लाख १ कोटी ५० लाख

धैर्यशील माने बी.कॉम, ४ कोटी ७१ लाख ४ कोटी १५ लाख

............

चौकट

माने यांचे कर्जही

धैर्यशील माने हे माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र असून त्यांनी उमदेवारी अर्ज भरताना मालमत्तेचे विवरणपत्र दाखल केले नव्हते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी विवरण पत्र दिले. त्यात ४ कोटी ७१ लाख उत्पन्न तर त्याच्या आसपास म्हणजे ४ कोटी १५ लाखांचे कर्ज असल्याचे दाखवले आहे. कुटुंबाच्या मालमत्तेत त्यांनी आई माजी खासदार निवेदिता यांची मालमत्ता दाखवलेली नाही.

........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.चा पगार लांबला; वेतन आयोगाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील सुमारे १३ हजार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगासाठी आणखी दीड ते दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. कारण वेतन आयोगाच्या अनुषंगाने पंचायत राज सेवार्थ प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. महाआयटीकडून हे काम सुरू असून, ही कार्यवाही पूर्ण होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जिल्हा परिषदेला पत्राद्वारे कळविली आहे.

ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे पत्र गुरुवारी मिळाले. कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे महाआयटीकडून सेवार्थ प्रणालीत बदल सुरू आहेत. यामुळे सध्याचा पगार सहाव्या वेतन आयोगानुसार करावा अशा सूचना केल्या आहेत. यामुळे जुन्या पगाराप्रमाणे वेतन पत्रके तयार करण्यासाठी चार-पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. परिणामी १० एप्रिलनंतर पगार होण्याची शक्यता आहे. जि.प.मध्ये शिक्षण, ग्रामपंचायत, आरोग्य, बांधकाम, आस्थापना मिळून १३ हजार कर्मचारी आहेत.

राज्य सरकारने एक जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. मार्चचा पगार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे होईल या प्रतीक्षेत कर्मचारी होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार केल्यावरून ‘गोकुळ’ कर्मचाऱ्यास ‘कारणे दाखवा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्थेतील कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होऊ नये, असा नियम असतानाही हालेवाडी (ता. आजरा) येथील गोकुळ दूध संघाच्या पर्यवेक्षक विभागाचा कर्मचारी विलास सातेराव पाटील हा राजकीय पक्षाचा प्रचार करताना सापडल्याने त्याला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली.

'गोकुळ'च्या कर्मचाऱ्याला निवडणूक यंत्रणेचा भाग म्हणून वापरता येणार नाही, हे स्पष्ट करत येथून पुढील काळामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याने प्रचार यंत्रणेत भाग घेऊ नये. तसे कोणी आढळल्यास किंवा त्याच्या विरोधात तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच संबंधित कर्मचारी ज्या विभागात काम करतो त्या विभागाच्या कार्यकारी संचालकांनाही नोटीस पाठविली जाईल. निवडणूक काळामध्ये असा कोणताही कर्मचारी प्रचार यंत्रणेत आढळला तर नागरिकांनी प्रत्यक्षात किंवा निनावी पत्राद्वारे तक्रार द्यावी. त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार गणेश गोरे, नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण समाजातर्फे शेट्टींचा निषेध

$
0
0

इचलकरंजी : लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभेत ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी येथील इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. शेट्टी यांना मतदान न करण्याचा ठाम निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. हेर्ले (ता. हातकणंगले) येथे शेट्टी यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी शेट्टी यांनी सीमेवरील जवानांसंदर्भात बोलताना ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. गुरुवारी झेंडा चौक येथील नारो महादेव सभागृहात इचलकरंजी ब्राह्मण सभेच्यावतीने समाजबांधवांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अ‍ॅड. एम. वाय. सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष सुरेश जोशी, सुनील कुलकर्णी, सुधाकर कुलकर्णी, आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींच्या बालेकिल्ल्यात मोदींच्या सभेसाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासदार राजू शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यात जयसिंगपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. हातकणंगले आणि सांगली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असल्याने मोदींची सभा व्हावी यासाठी केंद्रीय पातळीवरील नेत्यांशी संपर्क सुरु ठेवला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंवर्धन मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सभा होण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना एनडीएमध्ये सहभागी होती. तसेच सांगलीत भाजपचे संजय पाटील उमेदवार असल्याने मोदींची सभा झाली होती. या सभेचा भाजपला चांगलाच फायदा झाल्याने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात संजय पाटील खासदार म्हणून निवडून आले. यावेळच्या निवडणुकीत पाटील यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील स्वाभिमानीकडून लढत आहेत. हातकणंगले व सांगली हे दोन्ही मतदारसंघ जवळ असून जयसिंगपूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. भाजप सरकारच्या विरोधात खासदार शेट्टी यांनी देशभरातील सर्व शेतकऱ्यांची एकजूट केली असल्याने त्यांचा पराभव व्हावा, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. शेट्टी यांच्या विरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने उमेदवार आहेत. तरीही शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यात मोदींची सभा व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु असून शेवटच्या टप्प्यात त्यांची सभा होण्याची शक्यता आहे.

...

पालकमंत्री घेणार आज मान्यवरांच्या भेटी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी (ता.५) कोल्हापूर दौऱ्यावर येत असून ते प्रचारासाठी मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. तसेच भाजपच्यावतीने शुक्रवारी गंगावेश येथे ओबीसी, जयलक्ष्मी हॉल येथे अल्पसंख्याकांचा मेळावा होणार आहे. भाजपच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य विद्युत मंडळाच्या संचालिका नीता केळकर रविवारी (ता.७) यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेत सात कोटींचा भ्रष्टाचार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसलमात स्वरुपात मिळणाऱ्या रकमेमध्ये तब्बल सात कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. असा आरोप करत तसलमात रक्कम वचलून भ्रष्टाचार केलेल्या संबंधीतांची आयुक्तांनी चौकशी करावी' अशी मागणी हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार बैठकीत केली. चौकशी न केल्यास संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

इचलकरंजीकर म्हणाले, 'अधिकारी व कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठी तसलमात रक्कम दिली जाते. तसलमात घेतल्यानंतर संबंधीतांना उचल कलेलेल्या रकमेचा हिशोब दिल्या शिवाय पुन्हा रक्कम मिळत नाही. पण १९५१ पासून ३१ मार्च २०१८ अखेर सात कोटी एक लाख ५४ हजार ८४४ रुपये तसलमात रक्कम घेतली आहे. पण, त्याची बिले दिलेली नसून हिशोबही सादर केलेला नाही. केएमटी विभागाकडील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी एक कोटी १५ लाख तर वर्कशॉपमधील अधिकाऱ्यांनी दहा महिन्यांत सरासरी एक कोटी ८५ हजार रुपयांचा खर्च दाखवला आहे. तर २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी जिलेबी खरेदीसाठी सात हजार ५०० रुपये खर्च केला आहे. महापालिका तोट्यात असताना इतक्या रकमेची जिलेबी लागते कशाला?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

'महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय कारणांसाठी अगाऊ रकमेची उचल केली आहे. सुमारे सव्वा लाख ते दीड लाखाची रक्कम कर्करोग व ह्रदयविकाराचा त्रास असे कारण देऊन उचल केली आहे. म्हणजेच महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना कर्करोग झाला आहे का? रंकाळा तलावातील जलपर्णी काढणे व स्वच्छतेसाठी २००७पर्यंत आठ लाख १७ हजार खर्च दाखवला असून त्याच्या खर्चाची बिले अद्याप सादर केलेली नाहीत. पंढरपूर वारीसाठी २५ हजार, महापौर चषक फुटबॉल स्पर्धेसाठी ५० हजार तर वार्षिक स्नेहसंमेलनासाठी ३५ हजारांची अगाऊ उचल केली आहे' असे इचलकरंजीकर यांनी सांगितले.

पत्रकार बैठकीस परिषदेचे अधिवक्ता समीर पटवर्धन, किरण दुसे, बाबासाहेब भोपळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळच्या १४ र्सस्थांना आयएसओ मानांकन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्‍हापूर

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघास दूध पुरवठा करणाऱ्या १४ प्राथमिक दूध संस्‍थांना आयएसओ दर्जाचे कामकाज केल्‍याने

९००१:२०१५ मानांकन मिळाल्याची माहिती संघाचे अध्‍यक्ष रवींद्र आपटे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

गेली काही वर्षे या दूध संस्‍था आयएसओ मानांकन मिळविण्‍यासाठी प्रयत्‍नशील होत्‍या. या संस्थांनी आपल्‍या कामकाजामध्‍ये विविध सुधारणा करत कार्यक्रमात सहभाग घेतला. त्‍याप्रमाणे या संस्‍थांचे ऑडिट दोन टप्प्यांत करण्‍यात आले आहेत. ऑडिट रिपोर्ट टीयूव्‍ही कंपनीच्‍या प्रमुख ऑडिटर ज्‍योती नालसे यांनी केला आहे. ऑडिट रिपोर्टमध्‍ये कोणत्याही त्रुटी आढळून आल्या नसल्याने आयएसओ ९००१:२०१५ मानांकन देण्‍यात आले. यासाठी संघाचे कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, संकलन विभागाचे व्‍यवस्‍थापक एस. व्‍ही. तुरं‍बेकर, सहायक व्‍यवस्‍थापक रवींद्र करंबळी, को-ऑर्डिनेटर्स डी. एच. शियेकर व कन्‍सल्‍टंट रियाज पटवेगार यांनी काम पाहिले.

आयएसओ मानांकनासाठी संकलन विभागाने घालून दिलेल्‍या कामकाज पद्धतीत संस्‍थांनी बदल करून दुधाची तपासणी, स्‍वच्‍छता, रेकॉर्ड, दुधाची प्रत, सेवा-सुविधांचा वापर, दूध उत्‍पादकांशी संवाद, आदी बाबींमध्‍ये आमूलाग्र बदल केले आहेत. संपूर्ण महाराष्‍ट्रात प्राथामिक दूध संस्‍थांमध्‍ये आयएसओ मानांकन प्राप्‍त करण्‍याचा बहुमान या संस्थांना मिळाल्‍याने गोकुळच्‍या लौकिकात आणखीनच भर पडल्‍याचे आपटे यांनी सांगितले.

०००००

बहुमान मिळालेल्या संस्था

भोगावती सडोली (ता. करवीर), हनुमान घोटवडे (ता. राधानगरी), महादेव शिये (ता. करवीर), कृष्‍ण मुरगूड (ता. कागल), कामधेनू मौजे वडगाव (ता. हातकणंगले), भैरवनाथ यवलूज (ता. पन्‍हाळा), शाहू छत्रपती शिरोली दुमाला (ता. करवीर), जोतिर्लिंग माजगाव (ता. पन्‍हाळा), हनुमान गाडेगोंडवाडी (ता. करवीर), महालक्ष्‍मी पडळ (ता. पन्‍हाळा), बलभीम बाचणी (ता. कागल), राम चुये (ता. करवीर), शिवशक्‍ती कानडेवाडी (ता. गडहिंग्‍लज), हनुमान वडकशिवाले (ता. करवीर)

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

“इचलकरंजी मतदारसंघातून१३४ जणांवर हद्दपार करणार‘

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून मतदानाच्या कालावधीत १३४ जणांना हद्दपार करण्यात येणार आहे. मात्र, त्यांना मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी ठराविक कालावधी दिला जाणार आहे. शहरातील तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५०४ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहीती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिंगटे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस व महसूल प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलिस विभागाकडून सराईत गुन्हेगारांवर विविध प्रकाराची कारवाई करण्यात आली आहे.

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी पाच स्थिर निरीक्षण, तर चार भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. शहरातील येणाऱ्या सर्वच प्रमुख नाक्यांवर वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, तपासणीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात असल्याच्या काही तक्रारी मिळाल्यामुळे तपासणी ठिकाणी आता सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. तपासणी करताना नागरिकांशी सौजन्यांने वागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याबाबतचा एक फलक तेथे लावला आहे. त्यामुळे आता तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात एकही आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद झालेला नाही. विविध परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. सिव्हीजील अ‍ॅपवर आतापर्यंत पाच तक्रारी दाखल झाल्या होत्या. तथ्य असलेल्या दोन तक्रारींवर तातडीने पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.'

दरम्यान, नियमांचे उल्लघन करणाऱ्या हॉटेल व बीअरबार तसेच घरगुती खानावळींवर कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भविष्यात आणखी उज्ज्वल कामगिरी करू’

$
0
0

कोल्हापूर:

'नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते, दळणवळणाची सेवा, विमानतळ, रेल्वे प्रकल्प, औद्योगिक सोयी सुविधांची गरज असते. यातील बहुतांश प्रश्न मार्गी लावले आहेत. भविष्यात याहीपेक्षा भरघोस आणि उज्ज्वल कामगिरी करू,'अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

रुक्मिणीनगर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना महाडिक यांनी एक खासदार म्हणून संसदेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करताना नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो असल्याचे सांगितले. नगरसेवक सत्यजित कदम म्हणाले, 'कोल्हापूरच्या नागरिकांना अपेक्षापूर्तीच समाधान देणारा लोकप्रतिनिधी म्हणून मतदार खासदार महाडिक यांना प्रथम पसंती देतील. नगरसेवक राजसिंह शेळके म्हणाले, 'कोणतीही सामाजिक बांधिलकी किंवा उपक्रम न राबविता नुसत्या बढाया मारणारे एका बाजूला आहेत तर प्रत्यक्षात विकासकामे करुन खासदार कसा असावा, याचा आदर्श परिपाठ घालणारे खासदार महाडिक नागरिकांसमोर आहेत. या निवडणुकीत ते पुन्हा विजयी होतील.' यावेळी बाबा जांभळे, प्रदीप चव्हाण, राजू पवनगडकर, महेंद्रसिंह चव्हाण, देवेंद्र चव्हाण, रईस शेख, संजय आडके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजू शेट्टी विरूध्द राजू शेट्टींचा ‘डाव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना रोखण्यासाठी विरोधकांकडून विविध डावपेच आखले जात आहेत. त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले मुंबईत पानपट्टीचे दुकान चालवत असलेले राजू मुजीकराव शेट्टी यांना शोधून काढण्यात आले असून त्यांना पोलिस बंदोबस्त देऊन 'हातकणंगले'तून अर्ज दाखल करण्यात आला. यामुळे त्यांनी माघार न घेतल्यास खासदार राजू शेट्टी विरूध्द राजू मुजीकराव शेट्टी अशी लढत होणार आहे.

राजू मुजीकराव शेट्टी यांचे मूळ गाव कर्नाटकातील उडपी. ते १९७५ मध्ये मुंबईत चरितार्थासाठी दाखल झाले. त्यांच्या नावांत आणि खासदार शेट्टी यांच्या नावात साधर्म्य आहे. यामुळे येथील विरोधी उमेदवारांनी मुंबईतून त्यांचा शोध घेतला. मालाड येथील त्यांचे घर गाठले. त्यांना 'शिट्टी' चिन्ह असलेल्या बहुजन महापार्टीचा एबी फॉर्म देऊन 'हातकणंगले'मधून उमेदवारी अर्ज भरण्यास तयार केले. अनामत रक्कमही विरोधकांनी भरली. शुक्रवारी अर्ज छाननीदिवशीही त्यांचा अर्ज अवैध ठरू नये, यासाठी वकिलांची फौज उभी केली.

दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार शेट्टी यांचे निवडणूक चिन्ह 'शिट्टी' होती. यावेळी त्यांना 'बॅट' चिन्ह मिळाले आहे. ग्रामीण शेतकरी मतदारांत संभ्रम निर्माण होण्यासाठी मुंबईतील राजू शेट्टी नामक व्यक्तीला अर्ज भरायला लावल्याचा आरोप खासदार शेट्टी यांच्या समर्थकांकडून होत आहे. मात्र यावेळी मतदान यंत्रावरील नावासमोर उमेदवारांचा फोटो आणि चिन्ह येणार आहे. यामुळे विरोधकांचा डाव कितपत यशस्वी होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

पक्षाचे नावही आठवत नाही
मुंबईच्या राजू शेट्टी यांना अर्जासोबत भरलेल्या एबी फॉर्मवरील पक्षाचे नावही त्वरित आठवत नाही. हातकणंगले मतदारसंघात त्यांचा संपर्कही नाही. अर्ज भरण्यासाठी पहिल्यांदाच ते कोल्हापुरात आल्याचे सांगतात.

'राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. मी कोणत्याही पक्षात सक्रिय नाही. मात्र कोल्हापुरातून काहीजण मला शोधत आले. त्यांनी मला कोल्हापुरात आणून हातकणंगलेतून अर्ज दाखल करण्यास सांगितले. त्यांनीच अनामत रक्कम भरली. मी प्रचारासाठीही येणार नाही.
- राजू मुजीकराव शेट्टी, मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images