Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अमोल माने यांची निवड

$
0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणी सदस्यपदी अमोल माने यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच माने यांना निवडीचे पत्र दिले आहे. माने यांनी यापूर्वी राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. यापूर्वी ते पक्षातर्फे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. याशिवाय ते शिवबांचा मावळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. निवडीसाठी त्यांना, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राष्ट्रवादी अर्बन सेलचे आदिल फरास यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्र वेचक

$
0
0

चंद्रभागेत भाविक बुडाला

सोलापूर : चंद्रभागेच्या पात्रात रविवारी पहाटे पाचच्या सुमारास स्नानासाठी गेलेला एक भाविक बुडून बेपत्ता झाला आहे. गोविंद जनार्धन सुवर्णकार (२७) असे त्याचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील सुवर्णकार कुटुंबीय रविवारी सांगोला येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यास जाणार होते. पहाटे चंद्रभागेचे स्नान करून विठोबाचे दर्शन घेऊन सांगोल्याला जाण्याचा त्यांचा विचार होता. परंतु पहाटे आंघोळीसाठी नदीपात्रात गेलेला गोविंद सुवर्णकार बुडाल्याने या कुटुंबावर आघात झाला असून, पोलिसांना याची माहिती दिली आहे. बुडालेल्या भाविकांचा शोध कोळी समाजातील तरुण होडी चालकांच्या मदतीने घेत आहेत.

राजनीत बिबळ्याचा थरार

भंडारा : लाखांदूर तालुक्यातील राजनी या गावात रविवारी सकाळपासून बिबळ्याचा थरार अनुभवयास मिळाला. सकाळी सहाच्या सुमारास बिबळ्याने गावात प्रवेश केला. येताच त्याने गुरूदेव निंबेकर नामक व्यक्तीवर हल्ला केला. गुरुदेव नालीत पडल्याने बिबळ्याने त्यांना सोडून दिले व त्याने एका घराच्या स्वयंपाक खोलीत प्रवेश केला. एका ग्रामस्थाने वेळीच या खोलीचे दार बाहेरून लावून घेतले. त्यानंतर वनविभागाचे पथक राजनीत दाखल झाले व अखेरीस ट्रँक्विलाइज करून बिबळ्याला बंदिस्त करण्यात आले. सात तासापर्यंत हा थरार सुरू होता.

दोन लाख जनावरे छावण्यांत

नगर : दुष्काळाची तीव्रता वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील चारा छावण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सात तालुक्यांमध्ये ३३२ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून या छावण्यांमध्ये एक लाख ९२ हजार १९८ जनावरे दाखल झाली आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली चाराटंचाई पाहता मे महिन्यापर्यंत चारा छावण्यांची संख्या ४५० ते ५०० पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत असून, पाण्यासह चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पशुधन जगविण्याचे आव्हान उभे आहे.

भ्रष्टाचाराबाबत हजारेंना साकडे

संगमनेर : राज्यातील विविध महामार्गांच्या कामादरम्यान महावितरण कंपनी, महामार्ग अधिकारी, ठेकेदार व उपठेकेदार यांनी संगनमताने केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे घालण्यात आले आहे. संबंधितांकडे वारंवार तक्रारी व पुरावे सादर करूनही कारवाई न झाल्याने सरकारचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. राज्यातील जनतेवर वीजदरवाढीची टांगती तलवार असल्याचे हजारे यांना दिलेल्या विनंती पत्रात म्हटले आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, अ‍ॅड. दिलीप साळगट व राजू थोरात यांच्या या पत्रावर सह्या आहेत.

सोलापूरला अवकाळीचा फटका

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागा आणि डाळिंबीच्या बागा वादळी वारा आणि पावसामुळे झाल्या अक्षरशः आडव्या झाल्या आहेत. या शिवाय जिल्ह्यातील शेकडो एकर जमिनीवरील फळबागांसह इतर पिकेही जमिनदोस्त झाली आहेत. मोहोळ तालुक्यातील राजेश जगताप या शेतकऱ्याची साडेतीन एकराची द्राक्षबाग जमिनदोस्त झाली आहे. जगताप यांचे सुमारे २५ ते २६ लाखांचे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने सर्वकाही संपवले आहे, सरकारने पंचनामे करून किमान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडीरेकनर दरपत्रक आज मिळण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेडीरेकनर दरामध्ये बदल होतात. त्याबाबतची दरसूची मार्चच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारकडून जाहीर होते. त्याप्रमाणे रविवारी उशिरापर्यंत दरसूची मुद्रांक शुल्क विभागाकडे प्राप्त झाली नाही. मात्र, दरसूची सोमवारी (ता.१) मिळण्याची शक्यता असल्याने याकडे बांधकाम व्यावसायिक व नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्य सरकारने सलग दुसऱ्या वर्षी मालमत्तेचे मूल्यांकन करणाऱ्या रेडीरेकनर दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, याबाबतची दरसूची राज्याच्या नगररचना विभागाकडून येथील मुद्रांक शुल्क विभाग किंवा नगररचना विभागाला मिळालेली नाही. मात्र, रेडीरेकनरचे दर जैसे थे राहिल्यास त्याचा फायदा बांधकाम व्यावसायिक व घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना होणार आहे.

रेडीरेकनरच्या सूचीच्या आधारे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे मुद्रांक शुल्क, घरफाळा व अन्य विभागांना मालमत्तेच्या मूल्यांकनासाठी आधारभूत मानला जातो. रेडीरेकनरच्या मूल्यांकनात वाढ झाल्यानंतर त्याचा फटका बांधकाम व्यावसायिक व नागरिकांना बसतो. त्यामुळे आर्थिक वर्षअखेरच्या दिवशी सर्वांचेच लक्ष रेडीरेकनर दराकडे लागले होते. रेडीरेकनरच्या दरात वाढ अथवा जैसे थे राहिल्याचे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने सोमवारपासून जुन्या दरांप्रमाणेच दस्तनोंदणी होणार असल्याचे मुद्रांक शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सकारात्मक ठसा उमटविलेल्या महाडिकांना निवडून द्या’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'केंद्रातील भाजप, शिवसेना सरकारने गेल्या पाच वर्षात नागरिकांची दिशाभूल केली. समाजातील सर्वच घटकांमध्ये भाजप सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. ही चीड मतपेटीतून व्यक्त करुया आणि फसव्या सरकारला महिला शक्तीची क्षमता दाखवून देऊ. लोकहिताच्या कामांना प्राधान्य आणि संसदेत ठसा उमटविलेल्या खासदार धनंजय महाडिकांना निवडून देणे गरजेचे आहे'असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. आर. के. नगर येथे अश्विनी माने यांच्या पुढाकाराने महिला मेळावा झाला.

याप्रसंगी चित्रा वाघ म्हणाल्या, 'भाजप सरकारने फसव्या आणि चुकीच्या योजना आणून समाजाध्ये असंतोष पसरवण्याचे काम केले. नोटाबंदीमुळे व्यावसायिक रस्त्यावर उतरले. गेल्या पाच वर्षात शेतकरी आत्महत्या वाढल्या. सरकारवरील असंतोष मतपेटीतून व्यक्त करा.'

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनी येत्या निवडणुकीत खासदार महाडिक हेच लोकसभेसाठी एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. नगरसेविका रुपाराणी निकम यांनी महाडिकांच्या माध्यमातून जिल्हा विकासाच्या वाटेवर असल्याच गतिमान असल्याचे नमूद केले. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा जहिदा मुजावर यांचे भाषण झाले. जवाहरनगर येथे झालेल्या महिला मेळाव्यात भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रंजना घाळे, मेघा गायकवाड, स्मिता पाटील, सारिका लिगाडे, सविता घोरपडे, मंगला महाडिक, सुनीता राऊत आदी उपस्थित होते.

रविवार पेठेत पदयात्रा

राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी रविवार पेठ परिसरात पदयात्रा काढून नागरिकांच्या भेटी घेतल्या. बिंदू चौक, बागवान गल्ली, महात गल्ली, भोई गल्ली, चांदणी चौक येथे पदयात्रा काढली. स्थानिक तालीम मंडळ व सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जहाँगीर जमादार म्हणाले, ज्यांचा समाजाशी व सामाजिक कार्याशी कसलाही संबंध नसलेल्यांना जमिनीवर आणू. पाच वर्षात आठ हजार कोटींचा निधी आणला आहे. विकासाची दृष्टी असलेल्या खासदार महाडिक यांना पुन्हा विजयी करण्याचे जनतेने ठरवले आहे. डॉ. मोहन पवार यांनी खासदार संसदेत आत्मविश्वासाने बोलत आहेत. त्यामुळे योग्य माणसाला निवडून दिले ही कोल्हापूरकरांना खात्री पटली आहे, असे सांगितले. पदयात्रेवेळी जयेश कदम, माजी नगरसेवक राजू यादव, बाळासाहेब मुधोळकर, सचिन तोडकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवी प्रमाणपत्रात चुका होतातच कशा?

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

कोल्हापूर : तीन ते पाच वर्षे शिक्षण घेतल्यानंतर शिवाजी विद्यापीठाकडून मिळणारे पदवी प्रमाणपत्र सदोष का स्वीकारायचे? नाव, फोटो, विषय चुकीचा छापल्याने प्रमाणपत्र बदलून घेण्यासाठी हेलपाटे का मारायचे? ज्यांच्या प्रमाणपत्रात चुका आहेत त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा हा पर्याय का निवडायचा? चुकीच्या दुरस्तीनंतर मिळणारे दर्जाहिन प्रमाणपत्र का घ्यायचे? या प्रश्नांनी सध्या विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य हरवले आहे. आमच्याकडून पैसे व अर्ज दाखल झाल्यानंतर प्रमाणपत्राच्या कामासाठी सहा महिने हाती असतानाही शेवटी पदवी प्रमाणपत्रात चुका होतातच कशा असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

गेल्या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठाच्या पदवीप्रमाणपत्रातील घोळ, भोंगळ कारभार, चुकांच्या मालिका, त्यावर दिली जाणारी मोघम स्पष्टीकरणे यामुळे विद्यापीठाचा परीक्षा विभाग चांगलाच चर्चेत आला आहे. गेल्या वर्षीच्या दीक्षान्त कार्यक्रमात कुलसचिवांच्या स्वाक्षरीच्या आवश्यकतेला फुली मारून जी प्रमाणपत्रे छापली गेली त्यांच्या अधिकृततेवर ताशेरे ओढल्यानंतर नव्याने छपाई करण्यात आली. कुलगुरू व कुलसचिव या दोघांच्या स्वाक्षरी असणे आवश्यक असताना केवळ कुलगुरूंचीच स्वाक्षरी ठेवण्याचा निर्णय नेमका कुणी घेतला याची शोधमोहीम सात महिने सुरू होती. त्यावर नेमण्यात आलेली चौकशी समिती, समितीचा अहवाल, अहवालात दोषी ठरवण्यात आलेला दीक्षान्त विभाग या सगळ्याच बाबींकडे संशयाची सुई गेल्या दोन दिवसांपासून फिरत आहे. गेल्यावर्षीच्या प्रमाणपत्रांवर केवळ कुलगुरूंची स्वाक्षरी करण्याच्या प्रकरणावर विरोधाचे टिकास्त्र सुटल्याने विद्यापीठ प्रशासनाला दहा लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च करून २४ हजार प्रमाणपत्रे नव्याने छापावी लागली.

तीन दिवसांवर दीक्षान्त समारंभ असताना छपाईची लगीनघाई उडाल्यामुळे अर्थातच नव्या प्रमाणपत्रावरही विद्यार्थ्यांच्या नावापासून फोटोपर्यंत आणि विषयाच्या नावापासून अभ्यासक्रमाच्या नावापर्यंत चुका झाल्या. गडबडीत छापण्यात आलेल्या त्या प्रमाणपत्रांच्या कागदाचा दर्जाही चांगला नव्हता. प्रमाणपत्रांसाठी विद्यापीठाने निर्धारीत केलेली पूर्ण रक्कम भरूनही दर्जाहिन व चुका असलेल्या प्रमाणपत्रांना बदलून घेण्यासाठी पुढचे दोन महिने विद्यार्थ्यांच्या परीक्षा विभागात खेपा सुरू होत्या. वर्ष होत आले तरी प्रमाणपत्रावरील सहीच्या घोळासाठी दोषींवर कारवाईचा बडगा उगारलेला नाही. अजूनही गोपनीयतेच्या वेष्टनाखाली अहवालाला गोंजारण्याचे काम सुरू आहे. कदाचित चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा प्रत्यय या प्रकरणी आला तर आश्यर्च वाटू नये अशा दिशेने गेल्या वर्षीच्या प्रमाणपत्राचे गुऱ्हाळ सुरू आहे.

परीक्षा विभागावर विद्यार्थ्यांचा मोर्चा

यंदाही प्रमाणपत्रातील चुकांनी विद्यार्थ्यांना मनस्ताप दिला आहे. यावर्षीचा दीक्षान्त समारंभ २२ फेब्रुवारी रोजी झाला. नव्या नियमानुसार विद्यापीठातील अधिविभागातील विद्यार्थ्यांना मुख्य दीक्षान्त सोहळ्यात पदवीदान करण्यात आले. नंतर महाविद्यालयीन स्तरावर पदवी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. आजमितीस विद्यापीठाच्या अखत्यारितील २२ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान कॉलेजकडून मिळालेल्या पदवी प्रमाणपत्रावरील नावात, फोटोत व विषयांच्या नावात विसंगती असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुरुवातीला महाविद्यालय प्रशासनाकडे विचारणा केली. महाविद्यालयाच्या सल्ल्यानुसार परीक्षा विभागाकडे मोर्चा वळवला. प्रमाणपत्रासाठी अर्ज भरताना नाव, विषय याची अचूक माहिती विद्यार्थ्यांकडून भरूनही प्रत्यक्ष मिळालेल्या प्रमाणपत्रात चुका राहिल्या आहेत.

पदवी प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रमाणपत्र अचूकच असले पाहिजे. आधी चुका करायच्या आणि नंतर त्या दुरूस्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाशी संपर्क साधण्याचा पर्याय द्यायचा ही पद्धत विद्यापीठ प्रशासनाच्यादृष्टीने योग्य नाही. यामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब होते.

- पार्थ मुंडे, विद्यार्थी संघटना प्रतिनिधी

दर्जेदार, अचूक पदवीप्रमाणपत्र मिळणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. त्यासाठी विद्यार्थी शुल्क भरतात. त्यामुळे विद्यापीठाच्या चुकीची शिक्षा व मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. माझ्या प्रमाणपत्रात पदवी मिळवलेल्या अभ्यासशाखेचे नाव चुकले आहे. हे बदलून घेण्यासाठी माझा किमान एक महिन्याचा वेळ खर्च होणार आहे. शिवाय बदलून मिळणाऱ्या प्रमाणपत्राचा दर्जा कसा असेल याविषयी खात्री नाही.

- श्वेता खराटे, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक बनण्याचे स्वप्न अधुरेच...

$
0
0

राहुल मगदूम, कसबा बावडा

सतत हसतमुख असणारा राहुल दिसता क्षणीच समोरची व्यक्ती आपोआपच स्माईल देणार. फुटबॉल ग्राउंडवर तो ठरविक वेळेला दिसणारच. कसबा बावडा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेला, पण वयाच्या तिसाव्या वर्षी मोठा उद्योजक बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राहुल कृष्णात चौगले या तरुण उद्योजकाचा बावडा-शिये मार्गावर रविवारी झालेल्या अपघातात मृत्यू झाला आणि त्याचे उद्योजक होण्याचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले. अचानक वीज कोसळावी तसा हा आघात त्याच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींवर झाला आहे.

राहुलचे शालेय शिक्षण मेन राजाराम हायस्कूल येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये झाले. त्याने सोलापूर येथे बॉयलरचा टेक्नॉलॉजी कोर्स पूर्ण केला. एका साखर कारखान्यात काही महिने अनुभवही घेतला. तो घरची शेतीची कामे करत असे, पण शेतीची कामे करता करता त्याने आपला दररोजचा कार्यक्रम ठरवलेला असे. वयाने अजून तिशीत असल्याने त्याने आपले क्रीडा क्षेत्रातील छंद जोपासले होते. पूर्वी तो बावडा येथील पॅव्हेलियन ग्राउंडवर पावसाळ्यात फुटबॉल खेळायचा, नंतर नंतर जशी आवड निर्माण झाली तशी तो सकाळी मेरी वेदर ग्राउंडवर फुटबॉल खेळण्याचा सराव करू लागला.

राहुलने आपल्या करिअरसाठी भाऊजींच्या व्यवसायातील अनुभवापासून शिकत त्यांच्या सहकार्याने भागीदारीत शिरोली एमआयडीसी येथे मशिन शॉप सुरू केले. मग त्याचे आयुष्य प्रगतीच्या वाटेवर असताना त्याचा दिनक्रम तंतोतंत ठरलेला असे. रविवारी दुपारी घरगुती कार्यक्रमास उपस्थित राहून तो चारच्या सुमारास आपल्या कारखान्यात जाण्यासाठी शिरोली एमआयडीसीकडे मोटारसायकलने जात होता. बावडा टोल नाका ओलांडला आणि सिमेंटच्या रस्त्यावरील खाचीत त्याच्या मोटारसायकलचे पुढचे चाक गेल्याने टायर फुटला आणि गाडीवरचा ताबा सुटून तो मागे फेकला गेला. त्याचे डोके दुभाजकावर आपटल्याने तो जागीच गतप्राण झाला. उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले, पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राहुलच्या अचानक जाण्याने एक क्रीडापटू तसेच उमद्या उद्योजकास बावडा मुकला असून, त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

००००

खड्ड्यांनी घेतला बळी

राहुलने चार दिवसांपूर्वी मोटारसायकलची दुरुस्ती करून घेतली होती. त्याच वेळी त्याचा मित्र असणाऱ्या मिस्त्रीने त्याला गाडी पावसाळ्यापूर्वी एकदा पूर्ण व्यवस्थित चेकअप करण्यास सांगितले होते. त्यावर त्याने दोन दिवसांत चेकअप करण्यास गाडी देतो असे सांगितले. गाडीचा टायर व इतर मेंटेनन्स वेळोवेळी करणे गरजेचे आहे. कारण आयआरबीने शहरातील रस्ते अर्धे सिमेंट व अर्धे डांबरी केले आहेत. त्यातच या रस्त्यांचा मेंटेनन्स केला नसल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळेच राहुलचा बळी गेला. प्रत्येकाने काळजी घेऊन राहुलवर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये असे वाटते

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार परवानगीसाठी‘एक खिडकी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आचारसंहिता कालावधीत प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांना, उमेदवारांना आवश्यक विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कक्ष उघडण्यात आला आहे. परवानगीसाठी लागणाऱ्या सर्व विभागांचे ना हरकत दाखले तेथेच मिळण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, निवडणूक आयोगाने 'सुविधा' ही संगणक प्रणाली कार्यान्वित केली आहे. याद्वारे उमदेवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा राजकीय पक्ष ऑनलाइन अर्ज करू शकतात. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील कक्षात ऑफलाइन अर्जही स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. लाऊडस्पीकर, सभा, मेळावे, तात्पुरते प्रचार कार्यालय, रॅली मिरवणुका, रोड शो, पोस्टर, बॅनर्ससाठी परवानगी देण्यात येणार आहे. कार्यक्रमापूर्वी किमान दोन दिवस आधी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगीसाठी अर्ज करावा. दोन उमेदवार, पक्षांचे कार्यक्रम एकाच ठिकाणी असल्यास मध्ये तीन तासांचा कालावधी खुला असणे बंधनकारक राहील. एका ठिकाणी एकाच वेळेस एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास प्राप्त अर्जाच्या प्राधान्यक्रमानुसार परवानगी दिली जाईल.

जिल्हास्तरीय कक्ष

जिल्हाधिकारी कार्यालयात

प्रचारासाठी वाहन, नेत्यांसाठी हेलिकॉप्टर परवानगी देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवाजी सभागृह विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. परवानगीसाठी लागणारे अर्ज, ना हरकत प्रमाणपत्राचे सर्व नमुने कक्षात ठेवण्यात आले आहेत. अर्ज प्राप्त झाल्यावर त्यावर ४८ तासांच्या आत कार्यवाही करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी चार शाळांत सेमी इंग्लिश

$
0
0

लोगो : महापालिका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिका शाळा टिकाव्यात. विद्यार्थ्यांना अधिकाधिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्राथमिक शिक्षण समिती प्रयत्नशील आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून आणखी चार शाळांमध्ये सेमी इंग्लिश सुविधेच्या उपलब्धतेसाठी हालचाली सुरू आहेत. सध्या महापालिकेच्या १३ शाळांत सेमी इंग्लिशची सुविधा आहे. विद्यार्थ्यांची गरज आणि पटसंख्या वाढीसाठी आणखी चार शाळांत या सुविधेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा आधारवड म्हणून पालिकेच्या शाळा ओळखल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून उपनगरांतील महापालिकेच्या शाळांत हाउसफुलचे बोर्ड झळकत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेचा पॅटर्न, सेमी इंग्लिशची सुविधा, विविध परीक्षांत यशाचा उंचावणारा आलेख यामुळे पालिकेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनला आहे. शिक्षित व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलेही पालिकेच्या शाळेत प्रवेश घेत असल्याच्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत.

जरगनगर विद्यालयातील पटसंख्या १६०० हून अधिक आहे. पालिकेच्या एकूण ५९ शाळांतील विद्यार्थी संख्या दहा हजारांच्या घरात आहे. सध्या जरगनगर विद्यामंदिर, नेहरूनगर विद्यामंदिर, टेंबलाईवाडी विद्यामंदिर, महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी, उर्दू विद्यालय सरनाईक वसाहत, विद्यामंदिर लोणार वसाहत, शेलाजी वनाजी विद्यालय, संभाजी विद्यालय, प्रिन्स शिवाजी विद्यालय जाधववाडी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर राजेंद्रनगर, वीर कक्कया विद्यालय जवाहरनगर, भाऊसो महागावकर विद्यालय कसबा बावडा, मुलींची शाळा नंबर कसबा बावडा या शाळांत सेमी इंग्लिशची सुविधा आहे.

महापालिकेच्या अन्य शाळांतील पटसंख्येत वाढ व्हावी यासाठी शिक्षण समिती प्रशासनाकडे आणखी चार शाळांनी सेमी इंग्लिशसाठी प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये सागरमाळ परिसरातील वि.स. खांडेकर विद्यालय, प्रिन्स शिवाजी विद्यालय कसबा बावडा, रुईकर हिंद विद्यालय रुईकर कॉलनी आणि विचारे विद्यालय येथे सेमी इंग्लिश सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हालचाली सुरू आहेत. प्रस्ताव मान्यतेसाठी प्रशासनाकडे पाठविला आहे. येत्या महिनाभरात मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून येत्या जूनपासून या चार शाळांत सेमी इंग्लिश सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

०००००

कोट...

सेमी इंग्लिशमुळे विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजी विषयाची तयारी सुरू होते. सेमीअंतर्गत पहिली ते पाचवीपर्यंत गणित व इंग्रजी, तर सहावीनंतर गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांचा समावेश आहे. आज बहुसंख्य पालक व मुलांचा ओढा सेमी इंग्लिशकडे आहे. पहिलीपासून सेमी इंग्लिशची सुरुवात केल्यामुळे पटसंख्येत वाढ झाल्याची ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे.

किरण माळी, शिक्षक प्रिन्स शिवाजी विद्यालय जाधववाडी

००००

महापालिकेच्या एकूण शाळा ५९

विद्यार्थी संख्या १०,०००

सेमी इंग्लिशची सुविधा असलेल्या शाळा १३

नव्याने सेमी इंग्लिशसाठी प्रस्ताव सादर केलेल्या शाळा ४

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आवक वाढल्याने भाज्या आवाक्यात

$
0
0

लोगो : बाजारभाव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाचा तडाखा वाढला असला तरी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने गेल्या आठवड्यात वाढलेले दर कमी झाले आहेत. पण पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. फ्लॉवरच्या गड्ड्याचाही दर २० रुपये होता.

मेथी, कांदा पात, अंबाडी, करडा, शेपू, पोकळा या पालेभाज्यांच्या पेंडीचा प्रतिदर १० रुपये होता. अंबाडीलाही मोठी मागणी आहे. कोथिंबीरही महागली असून प्रतिपेंढी २० ते ३० रुपये दराने विक्री सुरू होती. काकडीची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर घसरले. काकडीची प्रतिकिलो ३० ते ४० रुपये विक्री झाली. काकडीचा दर गेल्या आठवड्यात प्रतिकिलो ६० ते ७० रुपये होता. वांग्याचा दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांवर स्थिर आहे. कोबी व फ्लॉवर प्रतिगड्डा १५ ते ४० रुपयांना विकला जात आहे.

भेंडी व गवारीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर घसरले आहेत. गेल्या आठवड्यात गवारीचा दर प्रतिकिलो १०० ते १२० रुपये होता. तो आता ८० रुपयांवर स्थिरावला आहे. भेंडीचा दर प्रतिकिलो ३५ ते ४० रुपये होता. दोडका प्रतिकिलो ४० रुपये, तर टोमॅटोची २० रुपयांनी विक्री झाली.

०००

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रु.)

वांगी : ४० ते ६०

टोमॅटो : २०

भेंडी : ३५ ते ४०

ढबू : ४०

गवार : ८०

दोडका : ४०

कारली : ६०

वरणा : ५० ते ६०

मटार : ६० ते ७०

हिरवी मिरची : ६० ते ८०

फ्लॉवर : २० ते ४०

कोबी : १५ ते २५

०००

बटाटा : २० ते ३०

लसूण : ४०

कांदा : १० ते ३०

००००

पालेभाजी दर (पेंढी रु.)

मेथी : १०

कांदा पात : १०

कोथिंबीर :२० ते ३०

पालक : १०

शेपू :१०

अंबाडी : १०

०००००

फळांचे दर (प्रतिकिलो रु.)

सफरचंद : ८० ते १४०

डाळिंब : ४० ते ६०

चिकू : ५० ते ६०

द्राक्षे : ४० ते ६०

केळी : २० ते ५० (डझन)

जवारी केळी : २० ते ७० (डझन)

हापूस आंबा : ४०० ते १००० (डझन)

कलिंगड : १० ते ४० (प्रति नग)

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जर्मन गँगच्या चौघांना खंडणीप्रकरणी अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

व्यवसाय करायचा असेल आणि जिवंत राहायचे असेल तर दरमहा २० हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी करत दोघांना मारहाण केल्याप्रकरणी अल्पवयीनासह जर्मन टोळीच्या सहा जणांविरोधात गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी चौघांना अटक केली आहे. अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून, एकजण फरारी आहे. याप्रकरणी बाबासाहेब रंगराव लाखे (वय ३२, रा. दत्तनगर भाटले मळा) यांनी फिर्याद दिली आहे

बाबासाहेब लाखे यांचे लालनगर परिसरात वराह मटण विक्रीचे दुकान आहे. रविवारी लाखे व त्यांचा कामगार जगदीश जावळे दुकानात बसले होते. त्यावेळी रूपेश नरवाडे, विकास ऊर्फ गोट्या महादेव शिंदे, सौरभ गायकवाड, शाहरुख जमादार व अजय कोरवी (सर्व रा. जवाहरनगर) यांच्यासह एक अल्पवयीन असे सहाजण मोटारसायकलीवरून दुकानात आले. त्यापैकी नरवाडे व शिंदे यांनी कोयते दाखवत लाखे यांना आम्ही जर्मन गँगचे भाई असून तुला वराहपालनाचा व्यवसाय करायचा असेल आणि जिवंत राहायचे असेल तर दरमहा २० हजार रुपये द्यावे लागतील, असा दम दिला. त्यानंतर सर्वांनी लाखे व जगदाळे यांना धक्काबुक्की करत लाखे यांच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व गावभाग पोलिसांच्या पथकाने नरवाडे, शिंदे, गायकवाड आणि जमादार यांना अटक केली आहे, तर अजय कोरवी हा फरारी आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिकारकांच्या वंशजांची आज शहरात मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहीद भगतसिंगांचे पुतणे अभय सिंग, सुखदेव यांचे नातू अनुज थापर, राजगुरू यांचे नातू सत्यशील राजगुरू यांचे सोमवारी (ता. १) कोल्हापुरात आगमन होत आहे. क्रांतिकारकांच्या या वंशजांची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी (ता. २) सायंकाळी सहा वाजता राजर्षी शाहू खासबाग मैदान येथे देशभक्तीपर व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, साथी फाउंडेशन, वई कॅन फाउंडेशन व मराठा रणरागिणी यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवारी खासबाग मैदान येथे होणाऱ्या कार्यक्रमाला काडसिद्धेश्वर महाराज उपस्थित राहणार आहेत. यावेळी क्रांतिकारकांच्या वंशज आणि कुटुंबीयांशी संवाद, शहिदांवरील चित्रफीत, अंतरंग प्रस्तुत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे पत्रक संयोजन समितीचे जितेंद्र बामणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा स्वच्छतेसाठी आयुक्तांनी घेतला झाडू

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील उद्याने आणि रंकाळा परिसर स्वच्छतेसाठी आग्रही असलेले महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रविवारी स्वत:च झाडू हातात घेत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. आयुक्तांनीच स्वच्छतेसाठी झाडू घेतल्यानंतर अन्य अधिकाऱ्यांनीही स्वच्छतेस सुरुवात केली. आयुक्तांनी केवळ सहभाग न घेता नियमितपणे देखभाल करण्याची सूचना केली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक महामंडळाचे संचालक अशोक देसाई यांनी त्यांचा सत्कार केला.

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दर पंधरा दिवसाला रंकाळ्याची स्वच्छता करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार रविवारी डॉ. कलशेट्टी यांनी सकाळी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्वच्छतेला सुरुवात केली. स्वत: आयुक्त झाडू घेऊन स्वच्छता करू लागल्यानंतर रंकाळा संवर्धन समितीचे सदस्य व अन्य रंकाळाप्रेमी स्वच्छता करण्यास सुरुवात केली. रंकाळ्याप्रमाणे शहरातील सर्वच उद्यानांची देखभाल आणि येणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. रंकाळा पदपथ उद्यानासह सर्वच उद्याने सुस्थितीत ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच भाग म्हणून रंकाळ्याची स्वच्छता करण्यात आली. या दरम्यान राजशेखर तंबाके, विकास जाधव, सुधीर राऊत, राजेंद्र पाटील, आदींनी रंकाळा प्रदूषण व येथील विकासकामांबाबत त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केल्या.

दरम्यान, आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी रंकाळा संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्याबद्दल रंकाळा संवर्धन समिती व रंकाळा ग्रुपच्या वतीने महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक महामंडळाचे संचालक अशोक देसाई यांच्या हस्ते सत्कार केला. स्वच्छता मोहिमेत उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, रमेश मस्कर, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, नारायण भोसले, एम. एस. पाटील, सचिन जाधव, प्रमोद बराले, सुनील भाईक, उदय गायकवाड, आदींसह रंकाळ संवर्धन समितीचे कार्यकर्त्ते सहभागी झाले होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मिडियावर प्रचाराचा धुरळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उमेदवारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, कॉर्नर सभा, प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारांसमोर जातानाच सोशल मीडियावरही प्रचाराचा धुरळा उडाला आहे. प्रत्येक पक्षाकडून सोशल मीडियावरील अपडेटससाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांत सोशल मीडियावरही प्रचाराचा सामना रंगला आहे.

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित आघाडी अशा सर्वच घटकांनी सोशल मीडियासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली आहे. भाजपने 'मैं भी चौकीदार' कॅम्पेनवर भर दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोटाबंदी, शेतीचे प्रश्न, बेरोजगारी,जीएसटी यावरून आक्रमक प्रचार सुरू केला आहे. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे. नवनवीन तंत्राचा अवलंब करुन प्रचार यंत्रणा हायटेक बनली आहे. खरे तर घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी, प्रचार पत्रकांद्वारे उमेदवाराच्या कार्याची माहिती पोहचविणे ही पारंपरिक पद्धत. त्याच्या सोबतीला आता उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन सोशल मीडियावरील प्रचारावर भर दिला आहे.

सोशल मीडियावर तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यक्त होते. बिनधास्तपणे ते आपली मते नोंदवितात. तरुणाईची मते कॅश करण्यासाठी कोल्हापुरातील उमेदवारांनी स्वतंत्र वॉर रुमची स्थापना केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियाचा अतिशय खुबीने वापर सुरू आहे. समर्थक कार्यकर्त्यांकडून एकीकडे विकासकामांचे मार्केटिंग तर दुसरीकडे विरोधकांची खिल्ली उडविली जात आहे. याशिवाय प्रमुख नेत्यांची भाषणे, मतदारसंघातील कामाची प्रसिद्धी, सामाजिक काम फेसबुक पेजवर अपलोड करण्यात येत आहे.

नेत्यांच्या वेशभूषा चर्चेत

राजकारणात दुखावलेली मंडळी प्रचाराच्या धामधुमीत सक्रिय झाली आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या खिल्ली उडविणाऱ्या पोस्ट, आश्वासनांचा भुलभूलैय्या, मतदारसंघात रखडलेली कामे, पाच वर्षातील संपर्कावर आधारित मजेशीर पोस्ट चर्चेच्या ठरल्या आहेत. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सिनेमावर आधारित उमेदवारांच्या वेगवेगळ्या वेशभूषेतील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत.

बाहुबली, सिंघमचा प्रभाव

गाजलेल्या सिनेमातील व्यक्तीरेखांचा प्रभाव सोशल मीडियावर दिसून येत आहे. बाहुबली, सिंघम, उरी सिनेमातील व्यक्तीरेखांचा कल्पकतेने वापर करत पोस्ट बनविल्या आहेत. सिनेमातील संवाद, वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा आणि उमेदवारांच्या छबी अशा पोस्टमुळे सोशल मीडिया सध्या चर्चेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीकडून समन्वयकांच्या नियुक्त्या

$
0
0

दिलीप पाटील, सुरेश पाटील यांच्यावर कोल्हापूर, हातकणंगलेची जबाबदारी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय काँग्रेस व महाआघाडीतील मित्रपक्षांशी स्थानिक पातळीवर प्रचार, बैठका व इतर बाबींसाठी समन्वय राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारसंघनिहाय समन्वयक नियुक्त केले आहेत. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप पाटील (इस्लामपूर) यांची तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील (सांगली) यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ४८ समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. माजी मंत्री, माजी खासदार, आमदार, प्रदेश उपाध्यक्ष यांच्यासह विविध पदावर कार्यरत नेते मंडळीवर समन्वयकपदाची संधी दिली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार शशिकांत शिंदे तर सांगलीसाठी अविनाश पाटील (चिंचणी) यांची नियुक्ती झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा हजार कोटींचा महसूल जमा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्रीय व राज्य सरकारच्या सर्वच विभागांनी गेले महिनाभर विविध प्रकारच्या कर वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवल्याने जिल्ह्यातून सुमारे ११ हजार कोटींचा महसूल जमा होईल अशी शक्यता आहे. केंद्रीय व राज्य वस्तू व सेवा कर विभाग आणि प्राप्तिकर विभागाला प्रत्येकी अडीच ते साडेतीन हजार कोटींच्या कर वसुलीचे टार्गेट होते. रविवारी कर भरून घेण्यासाठी महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे, मुद्रांक शुल्क, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालये रात्री उशिरापर्यंत खुली ठेवण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीची धामधूम लक्षात घेऊन डिसेंबरपासून सर्वच सरकारी कार्यालयांनी तयारी केली होती. १५ मार्चपूर्वी जास्तीत जास्त महसूल वसुली व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांना लक्ष्य दिले होते. नियमित कर भरणाऱ्यांबरोबर नवीन करदाते शोधण्यासाठी प्राप्तिकर, जीएसटी विभागाने विशेष मोहीम राबवली. तसेच कर चुकवणारे व बुडविणाऱ्यांचा शोध घेऊन प्राप्तिकर, जीएसटी विभागाने त्यांना नोटिसा पाठविल्या. तपास पथकांनी धाडी टाकून प्राप्तिकर, जीएसटीची वसुली केली. प्राप्तिकर विभागाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील डॉक्टर, उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांवर छापे टाकले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाने थेट जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयावर छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली. त्यांना पाच कोटी रुपये प्राप्तिकर वसुलीसाठी नोटिसही पाठवली.

केंद्रीय व राज्य वस्तू व सेवा कर विभागानेही कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली. राज्य वस्तू व सेवा कर विभागाने २४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी कर वसूल केला. मोठ्या ४५ करदात्यांकडून जीएसटी वसुलीचे प्रयत्न केले. शेवटच्या सहा दिवसांत २० कोटींहून अधिक कर वसूल केला. केंद्रीय जीएसटी विभागाकडूनही ३००० कोटींपेक्षा जास्त वसुली झाली असण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर, जीएसटी कार्यालयात करदाते धनादेशाने कर भरत असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निश्चित कर संकलन किती झाले याची माहिती मिळेल असे सूत्रांनी सांगितले.

महानगरपालिकेला आर्थिक वर्षात ४३६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. शनिवारअखेर २९२ कोटी वसूल झाले होते. रविवारी मध्यरात्रीपर्यंत ३०० कोटींचा टप्पा ओलांडू असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. एलबीटी, घरफाळा, पाणीपट्टी, इस्टेट, परवाना विभागाची कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

महसूल विभागाला ८१ कोटी ५३ लाखांचे उद्दिष्ट आहे. खनिकर्म, करमणूक करासह जमीन महसूल जमा करण्याचे काम करण्यात आले. गेल्या आठवड्यात ७१ कोटी १४ लाख रुपये महसूल जमा झाला होता. यंदा ८० कोटी रुपये महसूल जमा होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गेल्या आठवड्यात ८२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली होती. त्यांना २६३ कोटींचे उद्दिष्ट असून २१५ कोटी ६५ लाखांची वसुली झाली होती. आतापर्यंत एकूण २२२ कोटी रुपयांपर्यंत वसुली होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्य उत्पादक शुल्क विभागाने २८२ कोटी रुपये महसूल जमा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट व अवैध मद्य वाहतुकीवर चाप बसविला असून गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी छापे टाकले. मुद्रांक विभाग, पाटबंधारे विभाग, कृषी विभागासह अन्य सरकारी कार्यालयांकडून रात्री उशिरापर्यंत महसूल भरून घेण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती.

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील महसूल

३५०० कोटी

प्राप्तिकर विभाग

३००० कोटी

केंद्रीय जीएसटी

२५०० कोटी

राज्य जीएसटी

३०० कोटी

महानगरपालिका

२८२ कोटी

राज्य उत्पादन शुल्क

२२० कोटी

आरटीओ

८० कोटी

महसूल विभाग

०००

(मूळ कॉपी)

जिल्ह्यात १० हजार कोटींचा महसूल वसूल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय व राज्य सरकारच्या सर्वच केंद्रीय व राज्य सरकारच्या विभागांनी गेले महिनाभर वसुलीसाठी जोरदार मोहिम राबवल्याने जिल्ह्यात अंदाजे ११ हजार कोटीचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर, केंद्रीय व राज्य वस्तू व सेवा कर विभागांला प्रत्येकी अडीच ते साडे तीन हजार कोटींची वसूलीचे टारगेट होते. महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे, मुद्रांक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालये रात्री उशिरापर्यंत कर भरुन घेण्यासाठी खुली होती.

लोकसभा निवडणूकीची धामधूम लक्षात घेऊन डिसेंबरपासून सर्वच सरकारी कार्यालयांनी तयारी केली होती. १५ मार्च पूर्वी जास्तीत जास्त वसुली व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांना लक्ष्य दिले होते. नियमित कर भरणाऱ्याबरोबर नवीन करदाते शोधण्यासाठी प्राप्तिकर, जीएसटी विभागाने विशेष मोहिम केली होती. तसेच कर चुकवणारे व बुडवणाऱ्यांचा शोध घेऊन प्राप्तिकर व जीएसटी विभागाने नोटिसा पाठवल्या होत्या. तपास पथकांनी धाडी टाकून प्राप्तिकर व जीएसटी वसूल केला. प्राप्तिकर विभागाने जानेवारी महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याती डॉक्टर, उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांच्यावर छापे टाकले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाने थेट जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) गोकुळ शिरगाव येथील कार्यालयावर छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली. त्यांना पाच कोटी रुपये प्राप्तिकर वसूल करण्याची नोटिसही पाठवली.

केंद्रिय व राज्य वस्तू व सेवा कर विभागानेही कर वसुलीसाठी विशेष मोहिम राबवली. राज्य वस्तू व सेवा कर विभागाने २४०० कोटी रुपयापेक्षा जास्त जीएसटी कर वसूल केला. मोठ्या ४५ करदात्यांकडून जीएसटी वसूल करण्यााठी प्रयत्न केले. शेवटच्या सहा दिवसात २० कोटीहून अधिक कर वसूल केला. केंद्रीय जीएसटी विभागाकडूनही ३००० कोटीपेक्षा जास्त वसुली होण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर, जीएसटी कार्यालयात करदाते धनादेशाने कर भरत असल्याने 'टोटल फिगर' एप्रिलच्या पहिल्या आठवडयात येण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेला आर्थिक वर्षात ४३६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. शनिवारअखेर २९२ कोटी वसूल झाले होते. रविवारी मध्यरात्रीपर्यंत ३०० कोटीचा टप्पा ओलांडण्याचा विश्वास महानगरपालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. एलबीटी, घरफाळा, पाणीपट्टी, इस्टेट, परवाना विभागाची कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

महसूल विभागाला ८१ कोटी ५३ लाखाचे उद्दिष्ट दिले आहे. खनिकर्म, करमणूकसह जमिन महसूल जमा करण्याचे काम करण्यात आले. गेल्या आठवड्यात ७१ कोटी १४ लाख महसूल जमा झाला होता. ८० कोटी रुपये महसूल जमा होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कोल्हापूर कार्यालयाने गेल्या आठवड्यात ८२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली होती. त्यांना २६३ कोटींचे उद्दिष्ट असून २१५ कोटी ६५ लाखांची वसुली झाली होती. २२० ते २२५ कोटी रुपये वसूल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य उत्पादक शुल्क विभागाने २८२ कोटी रुपये महसूल जमा केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बनावट व अवैध मद्य वाहतूकीवर चाप बसवला असून गेल्या महिन्याभरात अनेक छापे टाकले आहेत. मुद्रांक विभाग, पाटबंधारे विभागासह, कृषी विभागासह अन्य सरकारी कार्यालयाकडून रात्री उशिरापर्यंत महसूल भरुन घेण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती.

०००००

जिल्ह्यातील अंदाजित महसूल वसुली

प्राप्तिकर विभाग ३५०० कोटी

केंद्रीय जीएसटी ३००० कोटी

राज्य जीएसटी २५०० कोटी

महानगरपालिका ३०० कोटी

राज्य उत्पादक शुल्क विभाग २८२ कोटी

आरटीओ २२० कोटी

महसूल विभाग ८० कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुनीता शेटे यांची निवड

$
0
0

कोल्हापूर : वीरशैव महिला मंडळाच्या सचिवपदी सुनीता राजेंद्र शेटे यांची निवड झाली. महिला मंडळाच्या बैठकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली. महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमन वडगावकर, उपाध्यक्ष मिनाक्षी कदम, स्मिता हळदे, सुनंदा नष्टे, शकुंतला बनछोडे, शैला गाताडे, माना सावर्डेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

jai siddheshwar swamy: बोलणारा देव मी आहे; महास्वामींचे वादग्रस्त विधान

$
0
0

सोलापूर: ‘पंधरा-एकोणीस एप्रिल दरम्यान अनेक सुट्या असल्याने बरे झाले म्हणून गावाला, देवाला तसेच सहलीला जाण्याचा अनेकांचा बेत असेल. पण, या सुट्टीत देवाला गेलात तरी पुण्य मिळणार नाही, देवदर्शनासाठी गेलात तरी देव तुम्हाला भेटणार नाही, जरी देव भेटला तरी तो तुम्हाला बोलणार नाही. या उलट तो तुम्हाला म्हणेल, आलास त्या पद्धतीने परत जा. विनाकारण तुमचे पैसे खर्च होतील. समाधान मिळणार नाही. तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला तरी देव भेटणारही नाही आणि बोलणारही नाही. बोलणारा देव मी आहे. कारण, जर का त्या दिवशी तुम्ही चुकलात तर कोणीही माफ करणार नाही. कारण, मतदान हे पवित्र काम आहे. मताचे दान टाकून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे,’ असं वादग्रस्त विधान महास्वामी यांनी केले आहे.

शनिवारी सायंकाळी अथर्व गार्डन येथे आयोजित भाजपच्या प्रचार सभेत महास्वामींनी मतदानाच्या दिवशी पवित्र मतदानाला प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. मात्र, ‘मी बोलणारा देव आहे,’ या वाक्याचा संदर्भ देत महास्वामींचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. दरम्यान, महास्वामींच्या वाक्याचा विपर्यास करून आणि व्हिडिओ कट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोप महास्वामींच्या सभेला उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी केला आहे.

जयसिद्धेश्वर स्वामी लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत. ते भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदाच निवडणूक लढत असून त्यांचा सामना वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ajit pawar : अजित पवारांचा निकाल कोणत्याही क्षणीः चंद्रकांत पाटील

$
0
0

संजय शिंदे यांच्या तीन प्रकरणाची चौकशी चालू

सूर्यकांत आसबे, सोलापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपाकडे मोठ्या प्रमाणावर इनकमिंग चालू आहे. भाजपमध्ये प्रवेश करणे म्हणजे त्यांच्या गैरकृत्यांना अभय दिले जाणार नाही. अजित पवार यांच्यासह सर्व घोटाळेबाजांची चौकशी सुरू आहे. योग्यवेळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याला भाजप धजावणार नाही, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसचं माढाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या तीन प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला. छगन भुजबळ जेलमध्ये गेले, अजित पवारांचे प्रकरण न्यायालयात असल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला.

भाजप - शिवसेना महायुतीचे माढाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चंद्रकांत पाटील सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भाजपच्या मित्र पक्षातील खळखळ संपली असून भाजप - शिवसेना रिपाईसह इतर घटक पक्षांची युती अभेद्य आहे. महायुतीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील नगर वगळता ११ पैकी १० जागा महायुती जिंकेल, असा दावासुद्धा यावेळी पाटील यांनी केला.

भाजपने यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये प्रचार करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे घोटाळेबाज जेलमध्ये असतील अशी वल्गना केली होती. मात्र याच राष्ट्रवादीमधील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन शुद्धीकरण सुरू आहे का? असा प्रश्न पाटील यांना करण्यात आला. आपला देश घटनेवर चालणारा आहे. त्यामुळे भाजपचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे. कायद्यांतर्गत ज्यांच्यावर कारवाई करायची आहे, त्यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. भुजबळ दोन वर्षे आत राहिले, अजित पवारांची केस तीन वर्षे हायकोर्टात सुरू आहे. न्यायालयाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सरकारने सादर केली आहेत. कोणत्याही क्षणी न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो त्यावेळी कोणालाही वाचवण्यात येणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी ठामपणे सांगितलं.

संजय शिंदे यांना किंमत मोजावी लागेल

माढाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी भाजपशी गद्दारी केली आहे. त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. त्यांनी त्यांच्या साखर कारखान्यात सामान्य शेतकऱ्यांच्या सातबारावर कोट्यवधींची कर्जे उचलली आहेत. हा प्रकार चुकीचा आहे. या प्रकरणाची चौकशी सरकारने सुरू केली आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांना तुरुंगात जावे लागले, त्याच धर्तीवर संजय शिंदे यांना तुरुंगवारी करावी लागेल. शिंदे यांच्या तीन प्रकरणांची चौकशी करण्यात येत असल्याचं सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख याबाबतीत खमके असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

काळच ठरवेल

निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातील नाराज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. प्रवेश केलेली ही नेतेमंडळी कायमस्वरूपी भाजपात राहतील का? असा सवाल पाटील यांना करण्यात आला. सध्या मुलगा वडिलांचे ऐकत नाही. तर बाहेरून आलेल्या नेतेमंडळींचे काय तो काळच ठरवेल, असे सांगत यावर त्यांनी जास्त बोलणे टाळले.

रणजितसिंहांमध्ये निवडून येण्याची क्षमता

राजकारणात माणूस चांगला असून चालत नाही. तर निवडणुकांमध्ये फक्त माणूस बरा आहे म्हणून ही उमेदवारी देता येत नाही. त्याची निवडून येण्याची क्षमतासुद्धा असावी लागते आणि ती क्षमता रणजितसिंहांमध्ये असल्याने विचारांती त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

sharad pawar : शरद पवार सुशीलकुमार शिंदेंसाठी मैदानात

$
0
0

प्रतिनिधी, सेलापूर

सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी सोलापुरात येत आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी सोलापुरात काँग्रेस- राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचे गुरू शिष्याचे नाते सर्वश्रुत आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी निवडणूक लढवत असलेल्या शिष्य सुशीलकुमारांसाठी गुरू शरद पवार बुधवारी सोलापुरात येत आहेत. सकाळी ९.३० वाजता पवारांचे विमानाने सोलापुरात आगमन होणार आहे. त्यानंतर १० ते सव्वा अकरा या वेळेत दमाणी नगरातील लॉन्स येथे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, मेळावा संपल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठीसुद्धा शरद पवार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ ते ३ ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. दुपारी साडेतीन वाजता रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवनात शरद पवार पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी साडेचार ते साडेसहा या वेळेत जुना कुंभारी नाका येथे यंत्रमाग, पॉवरलूम, रेडिमेड आणि हातमाग संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिष्ठित मान्यवरांशी हितगुज करणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता कन्ना चौक येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर चेहऱ्यावर खुशी

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार महाडिक, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी प्रसारमाध्यमांना हसत पोझ दिली.

.......

फोटो अमित गद्रे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images