Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निवडणूक विभागात सावळा-गोंधळ

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे. अशा टप्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कार्यालयातील गलथानपणाचा फटका मतदार आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बसत आहे. तेथे निवडणुकीसंबंधी माहिती सांगण्यास टाळाटाळ केली जात आहे. मतदार यादीत नाव आहे की नाही, हे विचारण्यासाठी आलेल्या सामान्य मतदारांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. परिणामी निवडणुकीच्या पारदर्शक, गतिमान कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर निवडणूक कार्यालय अनेक वर्षापासून आहे. लोकसभा निवडणुकीमुळे या कार्यालयातील प्रशासनाची लगीनघाई तीन महिन्यापासून चालू आहे. मतदार यादी अद्यावत करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रक्रिया राबवणे, मतदानाची आणि नवमतदारांची टक्केवारी वाढीसाठी जनजागृती केली जात आहे. आता प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेची धांदल जोरात आहे. कार्यालयात निवडणूक उपजिल्हाधिकारी, दोन तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज होत आहे. उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ याची अलिकडे नियुक्ती झाली आहे. काही कर्मचारी नागरिकांना माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळत असल्याच्या तक्रारी आहेत. याकडे वरिष्ठांना लक्ष देण्यास वेळ नाही. मतदार यादी नेण्यासाठी, नाव आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आलेल्यांना ताटकळ थांबावे लागत आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार केंद्राचे कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाजवळील शाहू सभागृहात आहे. येथेही प्रचंड विस्कळीतपणा आहे. उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी आल्यानंतर कुठे मिळतात, हे कळत नाही. उमेदवार, कार्यकर्त्यांस ठिकाण शोधावे लागत आहे. अर्जासह विविध निवडणूक प्रक्रियेची माहिती कुठे मिळणार यासंबंधीचा फलक दर्शनी भागात लावण्यात आलेला नाही. नागरिक, पत्रकारांना माहिती देणे म्हणजे तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपकार करत असल्याच्या अविर्भावात काम करतात.

निविदेत गोलमाल?

निवडणूक कालावधीत सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा बसवण्यासह आवश्यक कामे करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून विविध कामे करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र ही निविदा प्रक्रिया संशयास्पद रितीने राबविली जात असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. अधिकारी नियमानुसार काम करत नसतील तर ठेकेदार निश्चित झाल्यानंतरच माहिती अधिकारात त्याचा भांडाफोड करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कार्यालय अडगळीत

जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत भव्य आणि प्रशस्त आहे. मात्र अजूनही जुन्या कार्यालयात अडगळीत आहे. तेथे निवडणूक उपजिल्हाधिकारी कक्ष वातानुकूलित आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना नीट बसण्याची व्यवस्थाही नाही. एखाद्या किराणा दुकानात गेल्यानंतर जसे चित्र असते, तशी व्यवस्था तिथे पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या जादा कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याच्या रस्त्यावरच खुर्ची आणि टेबल टाकून बसावे लागले आहे. कामानिमित्त येणाऱ्यांनाही बैठकीची व्यवस्था नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रुद्राणी पाटीलचे यश

0
0

कोल्हापूर: समृद्धी शैक्षणिक प्रसारक संस्थेतर्फे (भुदरगड) घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत येथील सानेगुरुजी वसाहत परिसरातील श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालयातील विद्यार्थिनी रुद्राणी उत्तम पाटीलने पहिला क्रमांक पटकाविला. तिने पहिलीच्या गटात १०० पैकी ९८ गुण मिळवले आहेत. तिने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवल्याचा दावा केला आहे. मुख्याध्यापक यशवंत पाटील, वर्गशिक्षिका सिद्धी संसारी यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलिकांच्या विजयासाठी जिवाचे रान करूया

0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

'भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी भुदरगड तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते जिवाचे रान करतील,' असे प्रतिपादन भाजपचे भुदरगड तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले. प्रा. मंडलिक यांच्या प्रचाराबाबत झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक बाबा देसाई होते. मौनी विद्यापीठाचे सदस्य अलकेश कांदळकर प्रमुख उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी युतीचा एकेक उमेदवार खासदार होणे आवश्यक आहे. मागच्या निवडणुकीत प्रा. मंडलिक यांचा अल्पमतात पराभव झाला. गेली पाच वर्षे ही भळभळती जखम घेऊन आपण वावरलो, आता या जखमेवर उपचार करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मतदारसंघातून प्रा. मंडलिक यांच्या रूपाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी खासदार संसदेत पाठवूया.'

यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश परुळेकर, प्रा. हिंदुराव पाटील, संतोष पाटील, के. बी. देसाई, हिंदुराव झांबरे पाटील, विलास बेलेकर, आनंदा आमते, अशोक कांबळे, आदी उपस्थित होते. प्रा. संतोष पाटील यांनी स्वागत केले. रणजित आडके यांनी आभार मानले.

00000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमिन्स कपंनीची खत प्रकल्पास भेट

0
0

कोल्हापूर: एकटी संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या खत प्रकल्पास कमिन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संदीप सिन्हा यांनी मंगळवारी भेट दिली. मेनन अँड पिस्टनचे सचिन मेनन व गायत्री मेनन यांनी माहिती घेतली. एकटी संस्थेच्यावतीने घरोघरी जावून संकलित होणाऱ्या कचऱ्याची माहिती घेतली. सिन्हा यांनी प्रकल्पाचे कौतुक करत सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, वनिता कांबळे, अमित लेले, जैनुद्दीन पन्हाळकर, मनीषा पोटे, पुष्पा कांबळे, सविता कांबळे, प्रगती पितळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयआरबी इमारतीचे मूल्य १४ कोटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पातंर्गत आयआरबी कंपनीने टेंबलाईवाडी येथे बांधलेल्या इमारतीची मूल्यांकन प्रक्रिया पार पडली. महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या मूल्यांकनानुसार इमरातीचे मूल्य १४ कोटी रूपये निश्चित केले आहे. तसा मसुदा तयार करुन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे पाठवण्यात आला. महामंडळाकडून मसुद्याला मंजुरी मिळाल्यानंतर नोंदणी शुल्क जमा केल्यानंतर इमारत महापालिकेच्या ताब्यात येणार आहे.

शहरांतर्गत रस्त्यांची बांधणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ४९. ९९ किमीचा रस्ते विकास प्रकल्प राबवला. त्यासाठी आयआरबी कंपनीची नेमणूक केली. २२० कोटीच्या प्रकल्प खर्चातील तूट भरुन काढण्यासाठी टेंबलाईवाडी येथील ३० हजार चौरस मीटर जागा ९९ वर्षाच्या कराराने दिली. कंपनीने आर्यन हॉस्पिटॅलिटी सोबत करार करुन अलिशान हॉटेल उभारणीस सुरुवात केली. सद्य:स्थितीत बांधकाम पूर्णत्वाकडे जात असतानाच राज्य सरकारने ३० जानेवारीला कंपनीला प्रकल्प खर्चाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ४७३ कोटी ३७ लाखांची तरतूद केली.

कंपनीला देण्यासाठी रक्कम निश्चित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कंपनीकडील टेंबलाईवाडी येथील जागा व इमारत ताब्यात घेण्याचे आदेश दिले. मूल्यांकन करुन स्टँप ड्यूटी व नोंदणी शुल्क जमा केल्यानंतर इमारत ताब्यात येणार होती. पण बांधकाम, नगररचना (टीपी) व इस्टेट विभागातील समन्वयाअभावी अडीच महिने इमारतीचे मूल्यांकन होऊ शकले नाही. प्रत्येक विभाग एकमेकांवर जबाबदारी झटकत असल्याने मूल्यांकनाला गती मिळाली नाही. मात्र आयुक्त डॉ.कलशेट्टी यांनी याबाबतच्या सूचना दिल्यानंतर सर्वच विभाग तातडीने कामाला लागले. त्यानुसार कंपनीने बांधलेल्या इमारतीचे नगररचना विभागाने १४ कोटी मूल्यांकन केले आहे. कंपनीला नाममात्र एक रुपया भाड्याने जागा दिलेली असल्याने जागेचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही. इमारतीच्या मूल्यांकनाचा मसुदा प्रशासनाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे पाठवला आहे. महामंडळाकडून मसुद्याला मंजुरी मिळाल्यानंतर नोंदणी शुल्क जमा केल्यानंतर इमारत महापालिकेच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गर्दी जमविण्यासाठी करावी लागतेय धडपड’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'सभेसाठी कर्नाटकातील माणसे आणून गर्दी जमविण्याची धडपड शिवसेनच्या उमेदवाराला करावी लागली. कर्नाटकातील त्या माणसांच्या मतदानावर ते निवडून येणार आहेत का?' असा सवाल गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई यांनी केला.

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथे सभा झाली. याप्रसंगी देसाई म्हणाले, 'खासदार महाडिक यांनी भुदरगड तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. पायाभूत सुविधा सक्षम केल्या. जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली. मात्र विरोधी उमेदवाराकडे कोणतेही विकास प्रकल्प नाहीत. विरोधकांना जाहीर सभेसाठी कर्नाटकातून माणसे आणावी लागली, येथेच निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.'

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, 'खासदार महाडिकांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम केले आहे. वाड्या, वस्त्यावरील नागरिकांचे प्रश्न सोडविले आहेत. संसदेत त्यांनी प्रभावी कामगिरी केली असून येत्या निवडणुकीत विजयी करू.' दरम्यान खासदार महाडिकांनी टिक्केवाडी, निळपण येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. याप्रसंगी ओंकार गुरव, संगीता तोरसे, एन. डी. कुंभार, सुभाष कुंभार, अपर्णा कदम, देवळेवाडीच्या सरपंच माधुरी कुंभार, फयेच्या सरपंच गुरव आदी उपस्थित होते.

चिले कॉलनीत मेळावा

चिले कॉलनी येथे भागीरथी महिला संस्थेच्या वतीने खासदार महाडिकांच्या प्रचारासाठी मेळावा झाला. संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी प्रसाद उगवे म्हणाले, 'सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयी खासदार महाडिकांना कळवळा आहे. विविध योजनांची अंमलबजावणी करत विकासावर भर दिला. त्यांना निवडून देणे गरजेचे आहे' मेळाव्याला रेखा उरगे, पौरवी उरगे, राजश्री शिंदे, जयसिंग शिंदे, शिवाजी पाटील, कृष्णा ढोबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परेश भोसलेंसह चौघांनीभरले उमेदवारी अर्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी धैर्यशील माने, परेश भोसले यांच्यासह चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. हातकणंगले मतदारसंघातून नव्याने ५ तर 'कोल्हापूर'साठी २५ जण अर्ज घेऊन गेले आहेत.

'हातकणंगले'तून अपक्ष म्हणून विद्यासागर ऐतवडे (रा. इंगळी, ता. हातकणंगले) तर शिवसेनेतून धैर्यशील माने (रा. रूकडी, ता. हातकणंगले) यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 'कोल्हापुरातून' गुंडोपंत संकपाळ (रा. सरनोबतवाडी, ता. करवीर), परेश भोसले (रा. पुईखडी, ता. करवीर) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ४ एप्रिलअखेर अर्ज भरण्याची मुदत आहे. सोमवारी शिवसेनेचे प्रा.संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक अर्ज दाखल करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाएटतर्फे मोफत मार्गदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्यावतीने (डाएट) दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कलचाचणी अहवालानुसार योग्य अभ्यासक्रम निवडीबाबत मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. १ एप्रिल ते १० जून या कालावधीत ही कार्यशाळा होणार आहे. शाळा, तालुका, जिल्हा स्तरावर यासंदर्भातील वर्ग भरवण्यात येणार आहेत. तसेच डाएटतर्फे वर्षभर समुपदेशकांच्यावतीने विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याने या प्रशिक्षण कार्यशाळांचेही नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती डाएटचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई

0
0

३५ हजार रुपयांचा दंड वसूल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्लास्टिकबंदी असताना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक व नॉन ओव्हन पिशव्यांच्या विक्रीप्रकरणी महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी धडक कारवाई केली. ५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करत ३५ हजाराचा दंड वसूल केला.

राज्य सरकारने जून २०१८ पासून प्लास्टिक व थर्माकोल उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र बंदीचे उल्लंघन करुन अनेक ठिकाणी प्लास्टिकची विक्री राजरोसपणे सुरू आहे. शहरात प्लास्टिक विक्री होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक पथकाची स्थापना केली आहे. शुक्रवारी पथकाने धडक मोहीम राबविली. यामध्ये राजारामपुरी, रेल्वे फाटक, लक्ष्मीपुरी, रिलायन्स मॉल, स्टार बझार मॉल, शिव ऑप्टिक्स, निरंकारी ट्रेडर्स, बाबाजी प्लॅस्टिक व डेनिब हब येथे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक व नॉन ओव्हन पिशव्या विक्री व साठा केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पिशव्या जप्त करून त्यांच्याकडून ३५ हजार दंड वसूल करण्यात आला. कारवाईमध्ये आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रभारी आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, मुनीर फरास, सौरभ पाटील आदी सहभागी झाले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथनाट्यातून मतदार जागृती

0
0

कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती व करवीर पंचायत समितीच्यावतीने विविध ठिकाणी पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. स्वत: शिक्षक पथनाट्य तयार करुन मतदार जागृती अभियान राबवत आहेत. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पथनाट्य पाहून शिक्षकांचे अभिनंदन केले. बिंदू चौक, भवानी मंडप, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी पथनाट्याद्वारे मतदार जागृती करण्यात आली. उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, करवीरचे गटविकास अधिकारी सचिन घाटगे, गटशिक्षणाधिकारी अधिकारी एस. के. यादव, डी. एस. तळप आदींच्या उपस्थितीत पथनाट्याचे सादरीकरणे केले. पथनाट्यामध्ये प्रभाकर लोखंडे, सरिता सुतार, अजित पाटील, नीता खाडे, साताप्पा पाटील, उषा सरदेसाई, संतोषकुमार कदम, दिग्विजय नाईक, आदिती जाधव, विक्रम भोसले, क्षमा खोमणे, जयश्री पुजारी व नामदेव वाघ या शिक्षकांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

chandrakant patil : पवारांना दिल्लीत घर शोधावं लागेलः पाटील

0
0

पंढरपूर

शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात. पण याच चार जागा निवडणुकीत पडल्यावर पवारांना दिल्लीत रहायला घर शोधावे लागेल, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलीय. सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीत निंबाळकर यांच्या प्रचाराचा भव्य मेळावा घेण्यात आला होता. यासाठी चंद्रकांत पाटीलांसह सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रणजितसिंह मोहिते पाटील आणि आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.

शरद पवार यांचा जीव बारामती, माढा, कोल्हापूर आणि सातारा या चार मतदारसंघमध्ये आहे. यंदा हे चारही मतदारसंघ भाजप जिंकेल. यामुळे शरद पवारांना दिल्लीत राहण्यासाठी घर शोधावं लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मला निवडणुकीत जिंकून द्या. आपण सर्व दुष्काळी भागातील पाण्यासाठी लढणारी लोकं आहोत, असं आवाहन यावेळी भाजपचे माढाचे उमेदवार रणजीत निंबाळकर यांनी नागरिकांना केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना बंदूकप्रकरणी एकास अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, गगनबावडा

विनापरवाना बंदूक व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी गगनबावडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद झाला असून, त्यातील पांडुरंग सखाराम तोरस्कर (रा. नरवेली, ता. गगनबावडा ) याला पोलिसांनी अटक केली आहे. निर्भया पथकातील पोलिस उपनिरीक्षक विलास कुबडे यांनी ही कारवाई केली. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी विभागाचे पोलिस उपनिरीक्षक कुबडे यांच्या नेतृत्वाखालील पथक गगनबावडा तालुक्यात गस्त घालत होते. लखमापूर ते बोरबेट दरम्यानच्या जंगल भागातून रस्त्याने जात असताना पांडुरंग तोरस्कर, धनाजी दत्तात्रय पाटील (इचलकरंजी) व संजय मुकुंद पोतदार (रा. गगनबावडा) हे तिघे विनापरवाना शिकारी बंदूक व जिवंत काडतुसासह आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन तोरस्करवर गगनबावडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिकांच्या विजयासाठी हाडाची काडे करू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आगामी लोकसभेची निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांना खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आणायचे आहे. यासाठी सगळ्यांनी हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करू असा संकल्प करुन प्रचारात सक्रिय व्हावे' असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थिती मंगळवारी होत असलेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खासदार महाडिक यांच्या प्रचार कार्यालयात बैठक झाली. याप्रसंगी महाडिकांचा सोमवारी (ता. १) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. शक्तीप्रदर्शन व मिरवणुकीला फाटा देत साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याचे बैठकीत ठरले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यांची घोषणेबाजी करुन चिड निर्माण होईल असा प्रकार कुणी करू नये. उलट मित्रपक्षांच्या नेत्यांच्या घोषणा द्याव्यात. प्रचाराच्या २३ दिवसांच्या कालावधीत कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे'

खासदार धनंजय महाडिक यांनी 'प्रचार दौरे, मिसळ पे चर्चा, महिला मेळावाच्या माध्यमातून मतदारसंघात चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. मतदारसंघातील ७० टक्के भागाचा गाव टू गाव दौरा पूर्ण झाला आहे. उर्वरित कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला तीन दिवसांचा दौरा करायचे नियोजित आहे' असे सांगितले.

राष्ट्रवादीचे बी. एन. पाटील, कागलचे भैय्या माने, आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, पीआरपीआयचे (कवाडे गट) जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर यांची भाषणे झाली. बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, बाबूराव हजारे, युवराज पाटील, अनिल साळोखे, आदिल फरास, रामराजे कुपेकर, मधुकर जांभळे, धनाजी देसाई, आप्पासाहेब धनवडे आदी उपस्थित होते.

पवारांच्या उपस्थितीत मेळावा

खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी चार वाजता मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण लॉन येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी उचलली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, जनता दल, आरपीआय गवई गट, कवाडे गटासह मित्रपक्षातील मिळून सुमारे दोन हजार कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी होतील.

दाजींच्यावतीने ग्वाही

बैठकीला जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील अनुपस्थित होते. त्याचा संदर्भ घेऊन के. पी. यांनी 'दाजी प्रचाराच्या कामात गर्क आहेत. त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला जास्तीत जास्त कार्यकर्ते आणण्याची ग्वाही दाजींच्यावतीने देतो' असे सांगितल्यावर बैठकीत हशा पिकला.

कागलवरील प्रेमात बदल नाही

शरद पवार यांच्या उपस्थितीत १२ किंवा १८ एप्रिलला जाहीर सभेचे नियोजन आहे. अद्याप तारखा निश्चित व्हायच्या आहेत अशी माहिती आमदार मुश्रीफ यांनी बैठकीत दिली. त्यावर माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, 'शरद पवारांचे कागलवर जास्त प्रेम आहे. त्या प्रेमात काही बदल होऊ शकत नाही. पवारांची कागलमध्ये एक सभा होईल. त्यामुळे आम्ही काही त्यांची सभा मागू शकत नाही. मात्र आमच्या मतदारसंघात स्टार प्रचारकांच्या सभा घ्याव्यात. आतापर्यंतच्या प्रचारात राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. शिवाय बऱ्याच बाहेरच्या शक्ती राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करायला तयार आहेत. कार्यकर्त्यांनी उलटसुलट काही मनात आणायचे नाही. राष्ट्रवादीचा उमेदवार शंभर टक्के निवडून जिंकणार या दृष्टीने काम करावे.'

नगरसेवकांची पाठ... पण

काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शनिवारच्या बैठकीकडे पाठ फिरविली. नगरसेवकांच्या गैरहजेरीवरुन बैठकीत चर्चा झाल्यावर नेत्यावर सारवासारव करण्याची वेळ आली. काँग्रेसचे कार्यकर्ते पीटर चौधरी म्हणाले, '१९७६ मधील विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार लालासाहेब यादव यांच्या प्रचारात एकच नगरसेवक तर बाकी सगळे विरोधात होते. त्या निवडणुकीत यादव विजयी झाले. आता खासदार महाडिक यांचा विजयही निश्चित आहे.' चौधरी यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी तत्काळ माइकचा ताबा घेतला. ते म्हणाले, 'काँग्रेसचे कार्यकर्ते चौधरी यांनी बैठकीला नगरसेवकांची अनपुस्थिती खटकल्याने रागापोटी ते बोलले आहेत. त्यांच्या बोलण्याचा तो भावार्थ आहे. मात्र पक्षाच्या पुढील प्रत्येक कार्यक्रमात नगरसेवकांचा सहभाग दिसेल.' शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनीही मंगळवारच्या मेळाव्याला पक्षाचे सगळे नगरसेवक असतील असा खुलासा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांसमवेत चार व्यक्ती व तीन वाहनांना प्रवेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अर्ज भरणे, छाननी आणि उमेदवार अर्ज माघार प्रक्रियेसाठी उमेदवारासमवेत चारपेक्षा जास्त व्यक्ती व तीनपेक्षा जास्त वाहनांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटरच्या आवारात या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

गुरुवारपासून (ता.२८) अर्ज भरण्याची प्रक्रिया सूर असून चार एप्रिलपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. शुक्रवारी पाच एप्रिल अर्जाची छाननी होणार असून आठ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम तारिख आहे. अर्ज भरणे, छाननी, माघारीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी उमेदवारासमवेत फक्त चार व्यक्ती व तीन वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिरेकनरचे दर जैसे थे राहण्याची शक्यता

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने सलग दुसऱ्या वर्षी मालमत्तेचे मूल्यांकन करणाऱ्या रेडिरेकनरच्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्र्यांच्या स्तरावर झालेल्या बैठकांत निर्णय घेण्यात आला होता. पण, त्याबाबतची अधिसूचना अद्याप प्राप्त झालेली नाही. रविवारी दुपारपर्यंत जुन्या दराची सूची मुद्रांक व नगररचना विभागाला मिळण्याची शक्यता आहे. रेडिरेकनरचा दर जैसे थे राहिल्यास त्याचा फायदा बांधकाम व्यावसायिकांसह घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना होईल.

राज्य सरकारने गेल्या दोन वर्षापासून रेडिरेकनरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. परिणामी, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रेडिरेकनरच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. रेडिरेकनरच्या सूचीच्या आधारे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे मुद्रांक शुल्क, घरफाळा व अन्य विभागांना मालमत्तेच्या मूल्यांकनाचे व्यवहार करता येतात. या मूल्यांकनात वाढ झाल्यानंतर त्याचा फटका बांधकाम व्यावसायिकांना व नागरिकांना बसतो. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी सर्वांचेच लक्ष रेडिरेकनरच्या दराकडे राहिले होते.

गेल्यावर्षी रेडिरेकनरच्या दरात वाढ झाली नसली, तरी यावर्षी या दरांमध्ये कपात करण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी केली होती. पण, दर कमी न करता जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्य क्रिडाईचे सचिव महेश यादव यांनी सांगितले. २०१६ व २०१७ मध्ये रेडिरेकनरच्या दरामध्ये अनुक्रमे सात व ३.९५ टक्के वाढ करण्यात आली होती. तसेच बांधकाम व्यवसायावरील जीएसटीमध्ये केलेल्या कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे. दरम्यान, रेडिरेकनरच्या दरांबाबत अद्याप कोणतीही अधिसूचना प्राप्त झालेली नाही. रविवारी दुपारपर्यंत अधिसूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे असे मुद्रांक शुल्क अधिकारी सुंदर जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनेक भागांत चोवीस तास पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या अनेक प्रभागांत व्हॉल्व्ह सोडणारे कमर्चारीच नसल्याने १२ ते १३ भागांत चोवीस तास पाणीपुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. कर्मचाऱ्यांवर होणारी अरेरावी आणि नियोजनशून्य कारभारामुळे अनेक भागांत पाण्याचा ठणठणाट असल्याचे खुद्द पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनीच बैठकीत स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या खुलाशानंतर नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.

शहरात निर्माण झालेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी नगरसेवक, पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक छत्रपती ताराराणी सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी उपमहापौर भूपाल शेटे होते. बैठकीत प्रथम पाणीपुरवठ्याची वस्तुस्थिती विशद करण्यास सांगितले. जलअभियंता कुलकर्णी यांनी महिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना निर्भीडपणे बोलण्यास सांगितले. यावेळी पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अनेक भागांत चोवीस तास पाणीपुरवठा सुरू असून, त्याठिकाणाचे व्हॉल्व्ह सोडण्यासाठी कर्मचारीच नसल्याचे स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या खुलाशानंतर विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला. स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी अशा ठिकाणांची यादी देण्याच्या सूचना केल्या. तसेच राजारामपुरी व कावळा नाका पाण्याच्या टाकीवर अवलंबून असलेल्या प्रभागामध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करता येईल का? यासाठी पुढील आठवड्यात संबंधित प्रभागातील नगरसेवक व अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना केली.

उपमहापौर शेटे म्हणाले, 'सर्व प्रभागांत नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करा. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फोन बंद न ठेवता ज्या प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करा. त्यानंतरही पाण्याची समस्या न मिटल्यास पगार रोखू.' जलअभियंता कुलकर्णी म्हणाले, 'बालिंगा, शिंगणापूर पंपिंग स्टेशन येथील पंप दुरुस्तीचे काम शनिवारी पूर्ण होईल. पंप कार्यक्षमतेने सुरू झाल्यावर तक्रारी कमी होतील. तसेच नवीन पंप खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. पाइपलाइन व आवश्यक ते व्हॉल्व्ह दुरुस्ती व बदलण्याची कामे, पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती केली जाईल.'

यावेळी परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती अशोक जाधव, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेवक राजसिंह शेळके, शोभा कवाळे, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, आशिष ढवळे, शेखर कुसाळे यांच्यासह अनेकांनी पाणीपुरवठ्याच्या समस्या मांडल्या. बैठकीस उपजल अभियंता रामनाथ गायकवाड, व्यकंटराव सुरवशे, शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, अक्षय आटकर, जयेश जाधव, गुंजन भारंबे, अभिलाषा दळवी, मिलिंद पाटील यांच्यास कर्मचारी उपस्थित होते.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जोरदार टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तलवारी म्यान केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पवारांवर कुणीही टीका केली तर तातडीने प्रत्त्युत्तर देणारे नेते गप्प कसे, असा सवाल कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पवारांवर भाजप शिवसेनेकडून सातत्याने टीका होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीने पवारांना टार्गेट केले केले. कोल्हापूरच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. पालकमंत्र्यांनी तर 'महायुतीच्या धसक्याने पवारांनी माढ्यातून पळ काढला आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात ते मुलगी सुप्रिया सुळे यांना ढकलत आहेत. महिलांना पुढे करून मागे राहणाऱ्या पवारांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे', अशी टीका केली. मुंबई आणि पुण्यातही ते पवारांवर बोलले.

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना पवारांवर टीका झाली तर नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्युत्तर देण्यासाठी यापूर्वी स्पर्धा लागायची. पण भाजप सत्तेत आल्यानंतर मुश्रीफ वगळता अन्य नेत्यांनी तलवारी म्यान केल्याचे चित्र आहे. पालकमंत्री पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी चांगले संबध ठेवले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना विशेषत: खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर यांना निधी देताना हात सैल ठेवला. जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांचेही पालकमंत्र्यांशी चांगले संबध असल्याने सर्वच स्थानिक नेते पवारांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत.

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप युती झाल्याने माजी आमदार के.पी. पाटील यांनी पवारांवरील टीकेबाबत पालकमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलेले नाही. शहराध्यक्ष आर.के. पोवार हे शहरातील विविध आंदोलनात सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष व निमंत्रक असल्याने त्यांचे पालकमंत्र्याशी चांगले संबध आहेत. पालकमंत्र्यांशी असलेले संबध बिघडू नयेत यासाठी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी तलवारी म्यान केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदन चोरीतील फरारी आरोपी जेरबंद

0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

चंदन चोरीचे विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असणारा आणि पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील पोलिसांना गुंगारा देत दीड दशके फरारी असलेल्या आरोपीला शाहूवाडी उपविभागीय पोलिस पथकाने शनिवारी दुपारी कोडोली (ता. पन्हाळा) येथे सापळा रचून जेरबंद केले. अकबर मुबारक मुल्ला (वय ३१, रा. सय्यद मळा-किल्ले मच्छिंद्री, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. अधिक चौकशीसाठी त्याला कोल्हापुरात शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील यांनी दिली.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले मच्छिंद्री येथील अकबर मुबारक मुल्ला याच्या विरोधात सातारा जिल्ह्यातील पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंदन चोरीप्रकरणी सन २००६ मध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून तो फरारी होता. यादरम्यान त्याने पुणे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २००८ मध्ये पाच, कराड शहर पोलिस ठाणे हद्दीत २००८ मध्ये एक, तसेच कोल्हापूर-शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१३ मध्ये दोन चंदन चोऱ्या केल्याने एकूण दाखल १० गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता. परंतु सहजासहजी तो हाती लागत नव्हता. तब्बल तेरा वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या सराईत चंदन चोरट्याच्या शोधासाठी शाहूवाडी उपविभागातून पोलिस उपनिरीक्षक ए. एस. गुरव (कळे पोलीस ठाणे), पोलिस नाईक श्रीकांत दाभोळकर (शाहूवाडी), कॉन्स्टेबल व्ही. एस. सुतार (कळे), कॉन्स्टेबल एस. एस. पाटील यांच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या वरिष्ठांकडून सूचना दिल्या होत्या. यावेळी गुप्त खबऱ्यामार्फत आरोपीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे कोडोली येथील हॅवॉर्ड हायस्कूल परिसरात पथकाने सापळा रचून मुल्लाला ताब्यात घेतले. त्याने चंदन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरोपीला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे डीवायएसपी पाटील यांनी सांगितले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीला फूस लावणाऱ्यास चोप

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार आ. रा. पाटील शाळा परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.

येथील आण्णा रामगोंडा पाटील शाळा परिसरात चार दिवसांपूर्वी संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होती. त्यावेळी त्याने एका मुलीशी संभाषण करत तिला आमिष दाखवून परिसरातील दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी तेथील महिला व नागरिकांनी त्याला हटकल्याने संशयित पळून गेला. मात्र, त्याच्या मोटारसायकलीचा क्रमांक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. तसेच परिसरातील सीसीटीव्हीत तो कैद झाली होती. गेल्या चार दिवसांपासून संशयिताचा शोध घेतला जात होता. शनिवारी स्टेशन रोड परिसरात मोटारसायकल आढळल्यानंतर संशयिताला पकडून नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुईकर कॉलनीत तीन उमेदवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील तीन उमेदवारांचे वास्तव्य कोल्हापूरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असलेल्य रुईकर कॉलनी येथे आहे. त्यामुळे रुईकर कॉलनीतील खासदार ही गेली वीस वर्षे असलेली परंपरा यंदाही कायम राहणार आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक आणि त्यांचे विरोधक शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचे बंगले रुईकर कॉलनीत आहेत. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार हा रुईकर कॉलनी परिसरातील असणार आहे. हातकणंगले मतदारसंघातून माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैयर्शिल माने हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. ते विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लढत आहेत. माने यांनी शेट्टी यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखली तर रुईकर कॉलनीला दुसरा खासदार मिळू शकतो.

रुईकर कॉलनीत गेली अनेक वर्षांपासून खासदारांचे निवासस्थान ही परंपरा कायम आहे. या परिसरात उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकिलांचे बंगले आहेत. ज्येष्ठ नेते, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचाही रुईकर कॉलनीत बंगला आहे. माजी खासदार बाळासाहेब माने यांचे वास्तव्य रुईकर कॉलनीत होते. त्यानंतर खासदार सदाशिवराव मंडलिक रुईकर कॉलनीत रहायला गेले. माने यांच्यानंतर काही काळ खंडित झालेली रुईकर कॉलनीतील खासदार ही प्रथा मंडलिक यांनी कायम ठेवली. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. खासदार मंडलिक व निवेदिता माने यांचे वास्तव्यही रुईकर कॉलनीत होते. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मंडलिक व माने पुन्हा निवडून आले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक यांच्याविरोधात धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. पण ते पराभूत झाले. मंडलिक व महाडिक या दोघांचे बंगले रुईकर कॉलनीत असल्याने कोण विजयी होणार, याकडे लक्ष लागले होते. २००८ च्या निवडणुकीत खासदार मंडलिक यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकताना रुईकर कॉलनीतील खासदार ही परंपरा कायम ठेवली. या निवडणुकीत मंडलिकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजेंचा पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पक्षाने संधी दिली. महाडिक विजयी झाल्याने रुईकर कॉलनीतील खासदार हे समीकरण कायम राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images