Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

घटक पक्ष संयुक्त बैठकीच्या प्रतिक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने विविध घटक पक्षांना एकत्र करुन आघाडीची मोट बांधली. राज्यपातळीवर घटक पक्षाच्या नेत्यांनी आघाडीच्या प्रचारात सामील होऊन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. जिल्हास्तरावर आघाडीतील घटक पक्ष आघाडीसोबत राहणार आहेत, प्रचार करणार आहेत. पण अद्याप त्यांची आघाडीचे जिल्ह्यातील नेते, उमेदवारांसोबत संयुक्त बैठक झाली नाही. आघाडीच्या नेत्यांनी विविध घटक पक्षांशी चर्चा केलेली नाही, यामुळे अजूनही अनेकजण प्रचारात उतरलेले नाहीत. संयुक्त बैठकीत जे नियोजन होईल त्याप्रमाणे प्रचारात सक्रीय होऊन आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे घटक पक्षांचे पदाधिकारी सांगतात. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीत शेतकरी कामगार पक्ष, आरपीयआय (गवई गट), पीआरपीआय (कवाडे गट) यांच्यासह विविध घटक पक्ष सामील आहेत. एकेकाळी जिल्ह्यात वर्चस्व गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची ताकद आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. करवीर तालुक्यातील काही भागात या पक्षाची हक्काची मते आहेत. शिवाय जुन्या काळातील कार्यकर्ते या पक्षाला मानणारे आहेत. कोल्हापुरातही शेकापची विचारधारा मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या चांगली आहे. या पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दोन्ही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. शेकापचे शहर चिटणीस बाबूराव कदम म्हणाले, 'जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शेकापची दोन्ही काँग्रेससोबत आघाडी झाली आहे. मत विभागणी होऊ नये म्हणून पक्षाने ठिकठिकाणी उमेदवारही दिले नाहीत. पक्षाच्या धोरणानुसार जिल्ह्यात आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करु. जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधून जे नियोजन देतील त्याप्रमाणे निवडणुकीत काम करु.' ..... कोट 'भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात नागरिकांची घोर फसवणूक केली आहे. हुकुमशाही प्रवृत्तीने कारभार सुरू आहे. भारतीय संविधान बचावाची भूमिका घेऊन आरपीआय गवई गट हा काँग्रेस, आघाडीसोबत आहे. आघाडीचे जिल्ह्यातील उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते उतरतील. लवकरच उमेदवार आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक होणार आहे. प्रा. विश्वास देशमुख, जिल्हाध्यक्ष, आरपीआय (गवई गट) ...................... चौकट चर्चा झाल्यावर आघाडीच्या प्रचारात पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (पीआरपीआय, कवाडे गट)ने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला आहे. पीआरपीआयचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर म्हणाले, 'जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांनी व विद्यमान खासदारांनी अद्यापही आमच्यासोबत निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलीही बैठक घेतली नाही की प्रचाराविषयी चर्चा केली नाही. आम्हाला गृहीत धरुन कुणी चालू नये. आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक आणि चर्चा झाल्यावरच कार्यकर्ते प्रचारात उतरतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधन वृत्त बातमी....

$
0
0

निर्मला जाधव

कोल्हापूर : नागाळा पार्क परिसरातील श्रीमती निर्मला यशवंतराव जाधव (वय ९०) यांचे निधन झाले. शिवाजी विद्यापीठातील निवृत्त सहायक अधीक्षक विजय जाधव यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

०००

विजय शिंदे

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत सुतार मळा येथील विजय बाळासाहेब शिंदे (वय ३८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Raju Shetty: राजू शेट्टींच्या मालमत्तेत दीड कोटींनी वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भरलेल्या उमेदवारी अर्जासोबत मालमत्ता विवरण पत्र दाखल केले. त्यात पाच वर्षात दीड कोटींची वाढ झाल्याचे समोर आले. मुंबईतील फ्लॅट विक्री, सरकारी मानधन, वडिलोपार्जित मालमत्तेच्या सरकारी मूल्यांकनातील वाढ, गावाकडील घर बांधण्यासाठी २२ लाखांच्या लोकवर्गणीमुळे मालमत्ता वाढल्याचे कारण खासदार शेट्टी यांनी विवरणपत्रात नमूद केले आहे.

सन २०१४ मध्ये त्यांची मालमत्ता ८३ लाख ८७ हजार ७० होती. आता ती २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ इतकी झाली आहे. गेल्यावेळीपेक्षा १ कोटी ५२ लाख ६० हजार २६३ रूपयांची मालमत्ता वाढ झाली आहे. त्यांनी पाच वर्षात नव्याने मालमत्ता खरेदी केलेली नाही. मात्र जुन्याच मालमत्तेचे सरकारी मुल्यांकन वाढल्याने गेल्यावेळेपेक्षा तिप्पट वाढ झाल्याचे दिसते. २०१४ मध्ये शेट्टी यांनी मुंबईतील म्हाडाचा फ्लॅट ४५ लाखांला घेतला होता. तो विकल्याने १ कोटी ४३ लाख रूपये त्यांना मिळाले. त्यात ९८ लाख अधिक मिळाले.

सन २०१४ चे आणि आताचे कंसात उत्पन्नाचे महत्वाचे तपशील असे : शेतजमीन : १७ लाख (२७ लाख ७० हजार २५०), रोख शिल्लक : १७ हजार (२७ हजार), बँक शिल्लक : १ कोटी ३ हजार २०८ (१ कोटी ४० लाख ७ हजार ४०५), विमा रक्कम : ७ लाख ४० हजार ६६४ (१९ लाख २४ हजार ७००), सोने : ३ लाख ३० हजार (५ लाख ५८ हजार ७९०), म्हाडा फ्लॉट : ४५ लाख, गुंतवणूक : ०० (२५ लाख ९० हजार), इतर गुंतवणूक : ० (५ लाख ३० हजार), कर्जे : १ कोटी ५० लाख ४ हजार १५२ (७ कोटी ७४ लाख ५९).

पत्नी, मुलांच्या नावावर संपत्ती

खासदार शेट्टी यांच्या पत्नी संगीता यांच्या नावावर ३ हजार २४२ रूपये तर मुलग्याच्या नावे १३ हजार ५० रूपये बँकेत शिल्लक आहेत. पत्नीकडे ३ लाख ९४ हजार ४४० रूपयांचे आणि मुलग्याकडे ३२ हजार ८७० रूपयांचे सोन्याचे दागिने आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जोरदार टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तलवारी म्यान केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पवारांवर कुणीही टीका केली तर तातडीने प्रत्त्युत्तर देणारे नेते गप्प कसे, असा सवाल कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पवारांवर भाजप शिवसेनेकडून सातत्याने टीका होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीने पवारांना टार्गेट केले केले. कोल्हापूरच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. पालकमंत्र्यांनी तर 'महायुतीच्या धसक्याने पवारांनी माढ्यातून पळ काढला आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात ते मुलगी सुप्रिया सुळे यांना ढकलत आहेत. महिलांना पुढे करून मागे राहणाऱ्या पवारांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे', अशी टीका केली. मुंबई आणि पुण्यातही ते पवारांवर बोलले.

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना पवारांवर टीका झाली तर नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्युत्तर देण्यासाठी यापूर्वी स्पर्धा लागायची. पण भाजप सत्तेत आल्यानंतर मुश्रीफ वगळता अन्य नेत्यांनी तलवारी म्यान केल्याचे चित्र आहे. पालकमंत्री पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी चांगले संबध ठेवले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना विशेषत: खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर यांना निधी देताना हात सैल ठेवला. जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांचेही पालकमंत्र्यांशी चांगले संबध असल्याने सर्वच स्थानिक नेते पवारांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत.

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप युती झाल्याने माजी आमदार के.पी. पाटील यांनी पवारांवरील टीकेबाबत पालकमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलेले नाही. शहराध्यक्ष आर.के. पोवार हे शहरातील विविध आंदोलनात सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष व निमंत्रक असल्याने त्यांचे पालकमंत्र्याशी चांगले संबध आहेत. पालकमंत्र्यांशी असलेले संबध बिघडू नयेत यासाठी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी तलवारी म्यान केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुटा’चा अहवालाला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रातील घोळाचा चौकशी अहवाल हा वस्तुस्थितीदर्शक नाही. तसेच यामध्ये असंख्य त्रुटी आहेत. यामुळे चौकशी समितीच्या अहवालाला व शिफारसीला शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघानेविरोध केला आहे. 'सुटा'चे व्यवस्थापन परिषदेतील सदस्य प्रा. आर. जी. कोरबू, प्रा. प्रकाश कुंभार यांनी गुरुवारी विद्यापीठ प्रशासनाला याबाबत निवेदन दिले.

गेल्या वर्षीच्या दीक्षान्त समारंभातील प्रमाणपत्रावरील सहीचा घोळ आणि दुबार छपाईच्या चौकशीसाठी प्रशासनाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. चौकशी समिती प्रमुख डॉ. भारती पाटील, अमित कुलकर्णी आणि प्राचार्य धनाजी कणसे यांनी गेल्या आठवड्यात चौकशी अहवाल व्यवस्थापन परिषदेला सादर केला. या अहवालात दुबार छपाईप्रकरणी दीक्षान्त विभागावर जबाबदारी निश्चित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हातकणंगलेतून अपक्ष निवडणूक लढविणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा वारणानगर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती चिकुर्डे (ता. वाळवा) येथील माजी सैनिक आनंदराव सरनाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

सरनाईक म्हणाले, 'हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांबरोबर इतर घटकांनाही अडचणीत आणण्याचे काम केले आहे. ते स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत आहेत. मी देशसेवेचे काम केले असल्यामुळे मला जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्न करावा असे वाटते. त्या दष्टीने मी सातत्याने सक्रिय राहिलो आहे. मी माझ्या चिकुर्डे गावात स्वखर्चाने लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून जनतेने निवडून दिले. समाजात देशसेवा करणारे खासदार होऊ शकत नाहीत का? मतदारसंघातील कार्यकर्ते आणि जनतेच्या आग्रहाखातर मी लोकसभेची निवडणूक लढवत आहे. देशात समान कायदा तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनास हमीभाव मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी चिकुर्डे ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चाने कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन करून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे.'

ते पुढे म्हणाले, 'आतापर्यंत हातकणंगले लोकसभेच्या दोन व पन्हाळा-शाहूवाडी व वाळवा-शिराळा विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. त्यावेळच्या निवडणुकीत जनतेने मला तिसऱ्या क्रमांकाची मते दिली आहेत. विविध सामाजिक, राजकीय उपक्रमांच्या माध्यमांतून सर्व घटकांना योग्य तो न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्नही केला आहे. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मला मतदारांनी १२ हजार मते मिळाली आहेत.'

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीचाही ग्राहकांना तडाखा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या वर्षभरात महावितरणने तीनवेळा दरवाढ केली. घरगुती वीज वापराच्या ग्राहकांसह उद्योजक व कृषी पंपधारकांनीही रस्त्यावर उतरून सरकार आणि महावितरणच्या विरोधात आंदोलने केली. मात्र, वीज दरवाढ मागे घेण्याचे तोंडी आश्वासन देऊन सरकारने ग्राहकांची बोळवण केली आहे. ऐन उन्हाच्या तडाख्यात पुन्हा एकदा वीजदरवाढीचा सामना करावा लागणार असल्याने ग्राहक हतबल झाले आहेत.

राज्यात पुरेशी आणि माफक दरात वीज उपलब्ध करून देण्याची आश्वासने प्रत्येक निवडणुकीत मिळतात. मात्र, निवडणुका संपताच अशा आश्वासनांना केराची टोपली दाखवली जाते. आता तर वीजदरवाढ वर्षभर आधीच निश्चित झाल्याने ऐन निवडणुकीत ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसणार आहे. एप्रिल २०१९ पासून घरगुती वापराच्या वीजदरात आठ टक्के वाढ होणार आहे. कृषीपंप आणि उद्योगांसाठी आठ ते १२ टक्के वीजदरवाढ होणार आहे, तर यंत्रमागधारकांसाठी पाच ते १२ टक्के वीजदरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे वर्षभरातील ही तिसरी दरवाढ आहे. घरगुती वीज ग्राहकांसाठी एप्रिल २०१८ मध्ये सरासरी दोन टक्के, सप्टेंबर २०१८मध्ये चार टक्के, तर आता एप्रिल २०१९मध्ये सरासरी आठ टक्के वाढ होत आहे. उद्योगांच्या अनुदानात कपात केल्याने त्यांची दरवाढ १८ ते २३ टक्क्यांवर गेली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत वाढत्या स्पर्धेमुळे उद्योगांची वीजदरवाढ मागे घ्यावी, असा आग्रह उद्योजकांनी धरला होता. कोल्हापुरातील उद्योजकांनी एकत्र येऊन वीजदरवाढीविरोधात जोरदार आंदोलने केली. अनेकदा उर्जामंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचीही भेट घेऊन उद्योजकांनी भूमिका मांडली. वीजदरवाढ मागे घ्या अन्यथा उद्योगांना ३४०० कोटी रुपयांचे अनुदान द्या, अशी मागणी उद्योजकांनी केली होती. याबाबत चर्चेअंती सरकारने दिलासा देण्याचे तोंडी आश्वासन उद्योजकांना दिले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने हा मुद्दा मागे पडला आहे. आता निवडणुकीच्या काळातच पुन्हा वीजदरवाढीचा शॉक बसणार असल्याने ग्राहक हतबल झाले आहेत. या हतबलतेचा परिणाम निवडणुकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा भावना ग्राहकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

उद्योगांच्या वीज सवलतीचे काय?

कोल्हापुरातील फाउंड्री उद्योगासाठी वीजदरात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. केवळ फाउंड्रीला सवलत देण्यापेक्षा सरकारने सर्वच उद्योगांना सवलत द्यावी, असा आग्रह औद्योगिक संघटनांनी धरला आहे. यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी उद्योजकांची बैठकही झाली. त्या बैठकीत उद्योजकांना वीजदर कपातीचे आश्वासन मिळाले. त्याच्या अंमलबजावणीपूर्वीच नव्याने आठ ते १२ टक्के वीजदरवाढीचा भुर्दंड बसणार आहे. यामुळे उद्योजकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या उद्योगांवर पुन्हा वीजदरवाढ लादल्याने अनेक उद्योग बंद पडण्याचा धोका आहे. उद्योगांमध्ये राज्याची होणारी पिछेहाट रोखण्यासाठी सरकारने तातडीने वीजदरवाढ मागे घ्यावी. अन्यथा सरकारला ग्राहकांच्या असंतोषाचा समना करावा लागेल.

- नितीन वाडीकर, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचे कलाविश्व राष्ट्रीय व्हावे

$
0
0

लोगो : मटा जाहीरनामा

कोल्हापूर : भारताच्या कलाविश्वाला कोल्हापूरसारख्या शहराने दिशा दिली आहे. आजही एफटीआयच्या इमारतीत प्रवेश करताना बाबूराव पेंटरांचा पुतळा आपल्याला नतमस्तक व्हायला लावतो. सिनेसृष्टीमध्ये कोल्हापूरचे योगदान आहे. त्यामुळे आधुनिक भारताचा कलाइतिहास लिहिताना कोल्हापूरच्या कलाकारांची नोंद झाली पाहिजे, कोल्हापुरात कला अकादमी स्थापन झाली पाहिजे, साहित्य संमेलनांच्या पार्श्वभूमीवर कलासंमेलनांचे आयोजन केले पाहिजे, कला क्षेत्राशी संबंधित साहित्यावर जीएसटी आकारू नये अशा मागण्यांची नोंद लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी जाहिरनाम्यात घेतली पाहिजे असे मत कोल्हापुरातील चित्रकार, शिल्पकारांनी व्यक्त केले.

कला संचनालय राज्य पातळीवर काम करते, ललित कला अकादमी ही देशपातळीवर काम करते. या संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी असते. स्थानिक पातळीवर विचार करता हा आम्हाला राजकीय नेते मदत करत असतात. याबरोबरच आपल्याला राष्ट्रीय पातळीवरील एखादी संस्था मदतीला आली तर कला क्षेत्राला उभारी मिळेल. दुसरी गोष्ट अशी की, आज भारतीय सिनेसृष्टी, आधुनिक भारताचा इतिहास लिहित असताना कोल्हापूरच्या कलाकारांची नोंद त्यात झाली पाहिजे.

प्राचार्य अजेय दळवी

कलाक्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर पुढे करायचे काय हा मोठा प्रश्न असतो. कलासंचनालयामार्फत कलेचे सर्व विभाग चालविले जातात आणि कलासंचलनालय हे तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित आहे. तेथील अनेक अधिकाऱ्यांना आपण कुठल्या विभागासाठी काय करतो हे माहीत नाही. दोन्ही क्षेत्रे भिन्न असूनही एकच नियम लावले जातात. लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेऊन कलामहाविद्यालयांना सांस्कृतिक विभागाकडे वर्ग करावे. पाच वर्षांचे शिक्षण घेऊनही पदवी मिळत नाही, त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

विजय टिपुगडे, चित्रकार

स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आपल्या कोल्हापुरात तयार झाला. मात्र, आपलं कोल्हापूर स्वच्छ आहे का हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. ते आधी स्वच्छ करू आणि सुंदर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्यात कलाकारांचा सहभाग घ्यावा. कलाकार यासाठी तयार आहेत. आर्ट फाउंडेान आणि अन्य संस्था तयार आहेत, त्यांना पाठबळ दिले पाहिजे. कोल्हापूरला कलापूर म्हटले जाते तर या शहराची तशीच ओळख तयार केली पाहिजे. शहरात प्रवेश करतानाची कमान असो अथवा मोकळ्या जागा त्या कलात्मक पद्धतीनं तयार केल्या पाहिजेत यासाठी आग्रही राहिलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून दिले पाहिजेत.

प्रा. जयश्री मगदूम, चित्रकार

ज्याप्रमाणे अखिल भारतीय स्तरावर साहित्य संमेलन भरविले जाते त्याप्रमाणे सांस्कृतिक अधिवेशन किंवा संमेलन भरविले पाहिजे. कोल्हापुरात चित्र, शिल्प, नाट्य, सिनेमाची मोठी परंपरा आहे. त्यामुळे कोल्हापूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी पर्यंटन आणि सांस्कृतिकदृष्ट्या अजेंडा राबविला पाहिजे. कला विषय आणि कलाशिक्षक सक्तीचा करण्यासाठी खासदारांनी संसदेत आवाज उठवला पाहिजे. राज्य नाट्य स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर चित्र, शिल्प स्पर्धा भरविल्या पाहिजेत. १० वी नंतर कलेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम अधोरेखित केला पाहिजे.

प्रशांत जाधव, कलाशिक्षक

'सध्या प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर कलाशिक्षकाची भरतीच बंद केली आहे. पवित्र पोर्टलमध्ये कला विषयाच्या जागाच नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीन विकास कलात्मक पायावर उभा राहतो. तो पायाच कच्चा होतोय. केंद्रीय पातळीवरील अनेक संस्थांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम सुरू असतात. ते कोल्हापूरपर्यंत आले पाहिजेत यासाठी खासदारांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. कर्नाटकसारख्या राज्यात परराज्यात प्रदर्शनासाठी कलाकारांना ५० हजारांचे अनुदान देते. केंद्रीय पातळीवर याचपद्धतीने अनुदान पद्धत राबविली पाहिजे.'

ज्येष्ठ चित्रकार शिवाजी म्हस्के

'शर्टच्या बटनापासून ते विमानापर्यंतची डिझाईन ही कुणीतरी कलाकारच करत असतो. त्यासाठी तो शिक्षण घेतो आणि त्यासाठी त्याला रंगाच्या डबीबासून ब्रशपर्यंत साहित्य खरेदी करावे लागते. त्यापोटी सरकार कर वसूल करत असते, तो कर किमान कलाक्षेत्रावर खर्च झाला पाहिजे. अलिकडे एआयसीटीने काही अटींच्या पूर्ततेबाबत कला महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत. मात्र, त्या अटींची पूर्तता करू शकत नाहीत. त्यामुळे कलाक्षेत्रावर घातलेल्या अटी शिथील होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला पाहिजे.'

प्रा. मनिपद्म हर्षवर्धन

'आधुनिक काळात कलेचं क्षेत्र खूप व्यापक झाले आहे. लोकप्रतिनिधींनी स्थानिक पातळीवरील कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून दिले पाहिजे. कलाकारांचे प्रश्न संसदेत मांडून राष्ट्रीय पातळीवरील दालनं खुली करून दिली पाहिजेत. कोल्हापूरला कलेचा खूप मोठा इतिहास आहे. आज शहरात एखादी योजना सरकारी पातळीवर राबवायची असेल तर ऐतिहासिक वास्तू, ठिकाणे, किल्ले, मंदिरे यांच्याशी संबधित गोष्टींबाबत कलाकारांची समिती अनिवार्य केली पाहिजे.

प्रा. मनोज दरेकर

'आबालाल रेहमान, बाबूराव पेंटर यांच्यासारख्या जगप्रसिद्ध कलाकारांमुळे कोल्हापूरचे नाव आदराने घेतले जाते. सद्यस्थितीत अप्लाइड आर्ट, फाइन आर्ट किंवा कल्चर आर्ट ही सगळी कॉलेज एकाच कॅम्पसमध्ये आले पाहिजेत. लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. शाहू मिलचा आराखडा तयार करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील गॅलरीचा प्रस्ताव दिला होता, त्याबाबत विचार केला पाहिजे.'

शिल्पकार अशोक सुतार

'कलाक्षेत्रामध्ये बऱ्याच गोष्टींचा अभाव आहे. स्थाानिक पातळीवर आर्ट गॅलरी झाली पाहिजे. शिल्पकार, छायाचित्रकार, चित्रकारांना राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर नेण्यासाठी सहली आयोजित करणे, दिल्लीसारख्या ठिकाणी विविध कलासंस्थांशी समन्वय करून देणे.'

छायाचित्रकार सर्वेश देवरुखकर

संकलन : बाळासाहेब पाटील

जाहीरनामा

आधुनिक भारताच्या इतिहासात कोल्हापूरच्या कलाकारांची नोंद घेणे

अभिजात कला संकुल

स्थानिक पातळीवरील कलाकारांना प्रतिनिधीत्व देणे

शहर सौंदर्यीकरणात प्राध्यान्य देणे

कोल्हापूर कला अकादमीची स्थापना करणे

कला संमेलनांचे आयोजन करणे

कलाशिक्षकांचे अधिवेशन घेणे

पर्यटकांना कलाकारांसमोर सहज जाता आले पाहिजे

बाबूराव पेंटरांच्या नावाने अधिवेशन झाले पाहिजे

सिनेसृष्टीतील कलाकारांचे आंतरराष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे

कला क्षेत्रातील साहित्यावरील जीएसटी हटवला पाहिजे

कला अभ्यासक्रमात बदल झाला पाहिजे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस-राष्ट्रवादीकडून दादा घराण्याची वाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'वसंतदादा घराण्याची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने वाट लावली. वसंतदादांच्या हयातीत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता सांगलीची हक्काची जागा स्वाभीमानीला देऊन त्यांच्या वारसदारांवर अन्याय सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादीच आघाडीवर आहे,' असा आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केला. दादा घराण्याचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा देताना पाटील यांनी उमेदवारी मिळाली तर लढावे अन्यथा त्यांनी स्वाभीमानाने बाहेर पडावे. आम्ही पायघड्या घालून त्यांच्या स्वागतास तयार आहोत, अशी ऑफरही दिली.

सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांचा उमेदवारी दाखल करण्यासाठी पाटील यांच्यासह पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी हे सर्वजण औदुंबर येथे एकत्र आले होते. त्या ठिकाणी जाहीर सभा झाली.

मंत्री पाटील म्हणाले, 'सांगलीत पक्षाच्या पातळीवर कुरबुरी होत्या. त्या आता संपल्या. म्हणजे त्या कायमच्या मिटल्यात, असे नाही. हेच जीवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे खासदार पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडताना पेल्यातले वादळ संपल्याचा संदेश देण्यासाठी आम्ही आलो आहोत. पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी आमदारांमध्ये प्रेमापोटी स्पर्धा लागली आहे.'

वसंतदादांनी गोरगरिबांच्या मुलांना इंजीनिअर, डॉक्टर होण्याची संधी दिली. अशा व्यक्तीच्या जिल्ह्यातच त्यांच्या घराण्याची वाट लावण्याचे काम कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरु आहे, असा आरोप करून पाटील म्हणाले, 'आता तर सांगलीची जागाच स्वाभीमानीला देण्याचा उद्योग सुरु आहे. त्यामुळे नाराज झालेल्या दादांच्या दोन्ही नातवांनी पक्षाचे एकही पद लावून घ्यायचे नाही, असा निर्णय घेतल्याने पक्षापुढे पेच निर्माण झाला. दादा घराण्यातील तरुणांनी अपमान गिळत मान खाली घालून जगायचे की स्वाभीमानाने बाहेर पडायचे, ते ठरवावे. महाराष्ट्र घडवणाऱ्या वसंतदादा घराण्याचा अपमान सहन करणार नाही.'

.. .. .. .. .. .. .. .. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींची बॅटींग अन मुश्रीफांची बॉलिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उद्योग भवनजवळ गुरूवारी झालेल्या जाहीर सभेत राजकीय टोलेबाजी रंगली. सभेच्या शेवटी व्यासपीठावरच राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी बॉलिंग केली आणि शेट्टींनी बॅटींग करून प्रातिनिधीक क्रिकेट खेळून उपस्थितांचे लक्ष वेधले.

दरम्यान, सभेत आमदार मुश्रीफ यांनी यापूर्वी आम्ही शेट्टी यांच्यावर केलेले आरोप पुरावे नसताना करीत होतो. ते खरेच शेतकऱ्यांशी एकनिष्ठ आहेत, असा खुलासा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मागील संसार नीट केला नाही, म्हणून आम्ही घटस्फोट घेतला. तुम्ही चांगले वागला नाही, तर आमचा बाणा दाखवू ,असा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादीला दिला.

खासदार शेट्टी म्हणाले, 'यापूर्वी चार सार्वत्रिक निवडणुका जनतेच्या पैशांवर लढवल्या आहेत. आताही शेतकरी पैसे देत आहेत. माझ्यावर खोटे आरोप करून दिशाभूल केली जात आहे. त्यावर विश्वास ठेवू नका . कार्यकर्त्यांनी कुणीही चिडवले तरी चिडू नये, शांत डोक्याने बॅट हे चिन्ह मतदारांपर्यंत नियोजनबध्द पोहचवावे. निवडणूक मैदानात उतरल्याने समोरून कसाही बॉल आला तरी परतवून लावणार आहे.'

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, 'शेट्टी यांना आम्ही मनापासून पाठिंबा दिला आहे. त्यांचा विजय काळ्या दगडावरची रेघ आहे.' मुश्रीफ म्हणाले, 'यापूर्वीच्या निवडणुकांत शेट्टी यांच्याविरोधात प्रचार केला. त्यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना शाहूवाडी, राधानगरी, कोकणात जमिनी घेतल्याचे आरोप केले. ते चुकीचे होते. त्यांच्यात आणि माझ्यात अनेकवेळा कलगीतुरा रंगला. ऊस उत्पादकांना केवळ शेट्टी यांच्यामुळेच चांगला भाव मिळाला. साखर कारखानदारीला शिस्त लागली. त्यांनी कधीही साखर कारखानदारांशी हातमिळवणी केली नाही. शेतकऱ्यांशी एकनिष्ठ राहून दीर्घकाळ लढत राहिले.'

तुपकर म्हणाले, 'शेट्टी यांनी सातत्याने बहुजन समाजाला पदे देऊन मोठे केले आहे. मी आमदार, खासदारकीच्या तुकड्यासाठी चळवळीत आलो नाही. आयुष्यभर पद मिळाले नाही तरी शेट्टी यांची साथ सोडणार नाही. शेट्टी यांच्या विरोधातील उमेदवार कमजोर आहे.'

यावेळी माजी आमदार संपतबापू पवार, प्रा. उदय नारकर, कामगार नेते मिश्रीलाल जाजू, माजी मंत्री जयवंतराव आवळे, स्वाभिमानीचे सतीश काकडे, रामपाल जाठ, पी. जी. मांढरे, भवानसिंह घोरपडे, जयंतराव भावरे, प्रताप पाटील, शशांक बावचकर यांची भाषणे झाली. भगवान काटे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आमदार सतेज पाटील, प्रा. जालिंदर पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, जयकुमार कोले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...........

चौकट

देशातील शेतकऱ्यांचा विजय

'हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेट्टी यावेळी तीन लाख मताधिक्यांनी विजयी होतील. त्यांचा विजय म्हणजे देशातील शेतकऱ्यांचा विजय असेल', असे प्रा. योगेंद्र यादव यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींची शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरूवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमबैलगाडीतून येत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत शेतकरी संघटनांचे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव, रामपाल जाठ, सूरजलमठ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, संध्यादेवी कुपेकर, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार संपतराव पवार प्रमुख उपस्थित होते.

दुपारी एक वाजता दसरा चौकातून शक्तिप्रदर्शनाने फेरीला सुरूवात झाली. अंबाबाई दर्शन आणि राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार शेट्टी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील, खासदार महाडिक यांच्यासह बैलगाडीत आले. तेथून ही फेरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. फेरीदरम्यान हलगी आणि घुमक्याचा ठेक्यावर नाचणारे कार्यकर्ते, आसुडाचे फटके ओढत निघालेल्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर शेट्टी यांनी प्रमुख पाच नेत्यांसमवेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी नंकुमार काटकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

... ..

योगेंद्र यादव म्हणाले, 'लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढवणारे शेट्टी हे देशातील एकमेव खासदार आहेत. केवळ कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांचे ते नेते आहेत. गेल्यावेळीप्रमाणेच यावेळीही ते तीन लाख मताधिक्याने निवडून येतील.'

खासदार शेट्टी म्हणाले, 'खासदार म्हणून अनेक घटकांना न्याय मिळवून दिला आहे. यावेळी मैदानात बॅट चिन्ह घेऊन उतरलो आहे. त्यामुळे विरोधकांकडून कसाही बॉल आला तरी परतवून लावत विजय मिळवणारच.'

.. .. ..

२२ लाखांपर्यंत वर्गणी

'एक नोट, एक मत,' याप्रमाणे खासदार शेट्टी यांना विविध गावांतील शेतकऱ्यांनी २० ते २२ लाखांपर्यंत निवडणूक निधी दिला. निधीचा धनादेश आणि काही रोख रक्कम यावेळी शेतकऱ्यांच्याहस्ते शेट्टींकडे सुपूर्द करण्यात आली. संमेद चौगुले या चिमुकल्याने सुट्टीत खाऊसाठी गोळा केलेले पैसे दिले. सार्वत्रिक निवडणुकीचा यावेळी शेट्टी यांनी पाचव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. डमी अर्ज म्हणून स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी अर्ज दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहूवाडी-पन्हाळ्या’त अद्याप सामसूम

$
0
0

चंद्रकांत मुदुगडे, शाहूवाडी

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असताना हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण मात्र अद्याप सामसूमच आहे. खासदार राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने हातकणंगलेच्या आखाड्यातून लढण्यासाठी सज्ज झाले असले त्यांचे समर्थक म्हणून शाहूवाडी-पन्हाळ्यातून कोणीही राजकीय 'वस्ताद' नेता पुढे यायला तयार नाही.

काही प्रमाणात आमदार सत्यजित पाटील यांनी अपरिहार्य राजकारणातून आपले पत्ते खुले केल्यामुळे युवा शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना याचा थोडाफार लाभ होईल असे सध्याचे चित्र आहे. महायुतीचाच एक घटक असणारे माजी आमदार डॉ. विनय कोरे मात्र 'माने' या 'ना माने' अशा द्विधा मनःस्थितीत असल्याने जनसुराज्य पक्ष कार्यकर्त्यांची 'शक्ती' कोणत्या दिशेला वळणार, याची उत्सुकता निवडणुकीच्या अखेरपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉ. कोरे यांच्या या भूमिकेशी 'मिळतेजुळते' घेत शाहूवाडीतील भाजपचे कार्यकर्ते सावध पावलांनी निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. तर विधानसभा मतदारसंघातील स्वतःचे अस्तित्व हरवून गेलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक गटप्रमुख लोकसभा निवडणुकीत स्वतःला सिद्ध करतील असे म्हणणेही अतिशयोक्तीच ठरेल.

शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाने सुरुवातीच्या काळापासून काँग्रेस विचारांची पाठराखण केली. यात प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब माने, त्यांच्या स्नुषा निवेदिता माने, मध्यंतरी कल्लाप्पांना आवाडे यांचा समावेश करावा लागेल. यानंतर अलीकडच्या काळातील लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघाला निर्णायक वळणावर नेण्यात याच मतदारसंघाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही सर्वश्रुत आहे. यात पुढे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहातून २००९ साली राजू शेट्टी यांनी शेतकरी नेता म्हणून मतदारसंघावर मिळविलेली अनपेक्षित मांड दहा वर्षे कायम राहिल्याचे वास्तव आहे.

दरम्यान २००४ ते २००८ कालावधीत 'पन्हाळा-बावडा'चे आमदार म्हणून विनय कोरे (अपक्ष) तर 'शाहूवाडी-पन्हाळा'चे आमदार म्हणून सत्यजित पाटील-सरुडकर (शिवसेना) यांनी धुरा सांभाळली होती. याचवेळी शाहूवाडीतील काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले होते. अशावेळी 'राष्ट्रवादी'तून (सन २००९) लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या तत्कालीन खासदार निवेदिता माने यांनी या दोन्ही आमदारांना दुखावले होते. यातूनच येथील मतदानात निर्विवाद आघाडी घेत शेट्टी यांना खासदार म्हणून संसदेत प्रवेश करणे सोपे झाले होते. तर यानंतरच्या विधानसभापूर्व सरूड येथील मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'कोरे.. न कोरे' या केलेल्या घोषणेच्या लाटेत कोरे यांचा विधानसभेतील विजयी वारू केवळ ३८८ मतांच्या फरकाने रोखला होता, याची खंतही डॉ. कोरेंना असावी. यातच पुढच्या वाटचालीत 'डॅमेज कंट्रोल' साधता न आलेल्या माजी खासदार माने यांना आज महायुतीचा घटक असूनही कोरे यांच्याशी निवडणूक समझोता करण्यात यश मिळाले नसल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जबाबदारी स्वीकारूनही हा अपेक्षित समझोता होऊ शकलेला नाही. याउलट 'हातकणंगले'चा उमेदवारच बदलण्याच्या उघड हालचाली करून आपली दिशा स्पष्ट करणाऱ्या डॉ. कोरे यांनी महायुतीच्या कोल्हापूर येथील सभेला अनुपस्थित राहून 'धनुष्यबाणा'चा प्रचार करण्यात आपल्याला कसलेही स्वारस्य नसल्याच्या चर्चेला एकप्रकारे पुष्टीच दिली आहे. धैर्यशील मानेंची पाठराखण केल्यास विद्यमान आमदारांना त्याचे क्रेडिट मिळवून दिल्यासारखे होईल, या आणखी एका संदर्भाने डॉ. कोरे लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त धोरण स्वीकारतात की पडद्याआडच्या राजकारणात स्वारस्य दाखवितात, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘थर्टीफर्स्ट’चे टार्गेट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा सहकार मध्यवर्ती बँक, जीएसटी कार्यालय, प्राप्तिकर विभाग, वीज मंडळ, राज्य उत्पादन शुल्क विभागासह सहकारी संस्थांनी ३१ मार्चचे लक्ष्य गाठण्यासाठी कर्ज, कर, थकबाकी वसुलीचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा बँकेने एनपीएचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी थकबाकीदार संस्थांशी बोलणी कायम ठेवली आहेत. जप्तीसह कोर्टाचे आदेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जीएसटी व प्राप्तिकर विभागाने करदात्यांचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३३०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. बँकेने साखर कारखाने, मार्केटिंग संस्था, सूत गिरण्या, पगारदार नोकर संस्था, शेती सेवासंस्था, डेअरी, बचतगटांना मोठ्या रक्कमांचे कर्ज वाटप केले आहे. यंदा साखर हंगामात एफआरपीच्या पडलेल्या तुकड्यांमुळे कर्ज वसुलीला बँकांना अडचणी येत आहेत. केंद्र सरकारने अल्प मुदतीच्या कर्जाचे व्याज भरण्याचा निर्णय घेतला असला तरी थकबाकी, कर्जाची मुद्दल वसुली करताना बँकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. बचतगटांना दिलेल्या कर्जाची वसुलीही ९० टक्क्यांच्या पुढे पोचली आहे. व्यक्तिगत, बँक कर्मचाऱ्यांना दिलेल्या कर्जांचे थकलेले हप्ते भरण्यासाठी वसुली अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तगादा वाढवला जात आहे.

एनपीएचे कर्ज वसुलीसाठी २०१७पासून सामोपचार कर्ज परतफेड योजना सुरू केली अहे. वन टाईम सेटलमेंट (ओटीपी) योजनेत वर्षभरात सात संस्थांनी भाग घेतला. यंदाही ओटीपीवर भर आहे. बँकेने दौलत साखर कारखाना अथर्व संस्थेला चालविण्यास दिला असून त्यातूनही कर्जाची रक्कम वसूल होणार आहे. कर्ज वसुलीसाठी तंबाखू संघाचा हळदीतील पेट्रोल पंप सील केला आहे. त्यामुळे अन्य संस्था कर्ज भरण्यास पुढे येऊ लागल्या आहेत. एनपीएतील ३० कोटींपेक्षा जास्त रक्कमेची वसुली होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी एनपीएचे प्रमाण ८.१६ टक्क्यांवरुन ५.३२ टक्क्यांवर आले. यंदा ते पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बँकेकडून शेतकऱ्यांना १४०० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत झाले आहे. पीककर्जाची परतफेड जूनअखेर करायची असली तरी साखर कारखान्यांच्या बिलातून वसुली होऊ लागली आहे. ४० टक्क्यांहून अधिक पीककर्ज ३१ मार्चपर्यंत वसूल होण्याची शक्यता आहे.

अॅडव्हान्स टॅक्सवर

'प्राप्तिकर'चा भर

प्राप्तिकर खात्याकडून अॅडव्हान्स टॅक्सचे हप्ते वसूल करण्यावर भर ठेवला आहे. कराची थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू आहे. नियमित कर भरणाऱ्यांकडून अॅडव्हान्स टॅक्स भरुन घेतला जातो. हा कर भरण्यासाठी वर्षाचे चार भाग केले आहेत. करदात्यांकडून १५ जून, १५ सप्टेंबर, १५ डिसेंबर आणि १५ मार्च अशा तारखांपूर्वी प्रत्येकी २५ टक्के कर भरून घेतले जातात. वर्षाअखेरीस १०० टक्के प्राप्तीकर भरणे अनिवार्य असते. पण, अनेक करदात्यांनी अॅडव्हान्स हप्ते भरलेले नाहीत. अॅडव्हान्स टॅक्सची मुदत ३१ मार्च असल्याने प्राप्तिकर खात्याकडून करदात्यांना ई मेल, एसएमएसद्वारे हप्ते भरण्यासाठी आठवण करुन दिली जात आहे. जास्त रक्कम असलेल्या कंपन्यांना थेट मोबाइल व फोनवर कॉल करुन ३१ मार्चपर्यंत कर भरण्यासाठी तगादा लावला जात आहे.

दूध संघांची अनुदानासाठी धांदल

गायीच्या दुधावर प्रतिलिट पाच रुपये अनुदान मिळावे, असा प्रस्ताव जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ), वारणा, स्वाभिमानी, शाहूसह खासगी दूध संस्थांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविले आहेत. अनुदानासाठी 'कॅशलेस'ची सक्ती असल्याने जिल्हा दूध उत्पादक संघाचे अनुदान रखडले आहे. गोकुळने ४० टक्के ग्राहकांना कॅशलेस पेमेंट केले असल्याने त्यावरील पाच कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान मिळावे, दूध पावडरवरील चार कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळावे म्हणून प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे.

उत्पादन शुल्ककडून

२७२ कोटींचा महसूल जमा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागाने मार्च अखेर २७२ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. यामध्ये १६४३ कारवाया केल्या आहेत. कारवायांत जप्त केलेल्या वाहने आणि मुद्देमाल ३ कोटी ६३ लाख रुपयांचा आहे. उत्पादनशुल्क विभागाकडून आंतरराज्य मद्यतस्करी, जिल्ह्यात सुरू असलेली मद्याची चोरटी वाहतूक, उत्पादन शुल्क, नूतनीकरण आणि परवाना शुल्कातून मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला आहे. त्यासह मार्केट यार्डातील देशी, विदेश मद्यनिर्मिती केंद्रांतून उत्पादन शुल्कातून लाखो रुपयांची रक्कम मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत परवाना शुल्काच्या रक्कमेत ८ कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचा एप्रिल २०१८ ते मार्च २०१९अखेर सुमारे २८० कोटी रुपयांचा महसूल जमा होऊ शकेल, असे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.

'महावितरण'ची धडक वसुली

महावितरणने कोल्हापूर परिमंडल अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत वीज बिल वसुलीवर भर दिला आहे. धडक मोहिमेंतर्गत दोन्ही जिल्ह्यांत मिळून ११ विभाग असून प्रत्येक विभागात एक निरीक्षक नेमला आहे. त्याशिवाय उपविभाग आणि सर्कल अंतर्गत कर्मचारी वसुलीसाठी प्रयत्नशील आहेत. घरगुती वीज वसुली शंभर टक्के झाली पाहिजे, यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना आहेत. कृषीपंपांची वीज बिले मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. त्यासाठीही अधिकारी व निरीक्षकावर जबाबदाऱ्या सोपविल्याचे 'महावितरण'तर्फे सांगण्यात आले. दरम्यान, 'महावितरण'ने, घरगुती वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी मोबाइल अॅप, सुट्टीच्या दिवशीही स्थानिक वीज बिल भरणा केंद्र चालू ठेवण्याच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दरम्यान, सातत्याने थकबाकी ठेवणाऱ्या जिल्ह्यातील १६००हून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारीअखेर खंडीत केला होता. त्यामध्ये तब्बल ८०० थकबाकीधारकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडीत केला आहे. घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्य वर्गातील ग्राहकांचा समावेश आहे. परिमंडळात कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे.

००००

(मूळ कॉपी)

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा सहकार मध्यवर्ती बँक, जीएसटी कार्यालय, प्राप्तिकर विभाग, वीज मंडळ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सहकारी संस्थात ३१ मार्चचे लक्ष्य गाठण्यासाठी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा बँकेने एनपीएचे प्रमाण पाच टक्क्याच्या खाली आणण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी थकबाकीदार संस्थांशी बोलणी कायम ठेवताना जप्ती, कोर्टाचे आदेश मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जीएसटी व प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांचे प्रमाण वाढवण्याच उद्दिष्ठ ठेवले असून त्यांच्या खात्यात कराची रक्कम जादा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३३०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. बँकेने साखर कारखाने, मार्केटिंग संस्था, सूत गिरणी, पगारदार नोकर संस्था, शेती सेवा संस्था, डेअरी, बचतगटांना मोठ्या रक्कमांचे कर्ज वाटप केले आहे. यंदा साखर हंगामामुळे कर्ज वसुलीस बँकांना अडचणी येत असल्या तरी केंद्र सरकारने अल्प मुदतीच्या कर्जाचे व्याज भरण्याचा निर्णय घेतला आहे. पण थकबाकी कर्जाची मुद्दल वसुली करताना बँकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक संस्था नियमित कर्जांचे हप्ते भरत आहेत. बचत गटांना दिलेल्या कर्जाची वसुलीही ९० टक्क्याच्या पुढे पोचली आहे. तसेच व्यक्तिगत व बँक कर्मचाऱ्यांना दिलेल्या कर्जांचे थकलेले हप्ते भरण्यासाठी वसुली अधिकारी व कर्मचाऱ्याकडून तगादा वाढवला जात आहे.

एनपीएचे कर्ज वसुलीसाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार २०१७ पासून बँकेने सामोपचार कर्ज परतफेड योजना सुरु केली अहे. वन टाईम सेटलमेंट (ओटीपी) योजनेद्वारे गेल्या वर्षात सात संस्थांनी सामोपचार कर्ज परतफेड योजनेत सहभागी झाल्या होत्या. यावेळीही ओटीपी योजनावर भर दिला आहे. दौलत साखर कारखाना अथर्व संस्थेचा चालवण्यास दिला आहे असून त्यातूनही कर्जाची रक्कम वसूल होणार आहे. कर्ज परतफेडीसाठी तंबाखू संघाचा हळदी येथील पेट्रोल पंप सील केला आहे. त्यामुळे अन्य संस्था कर्ज भरण्यास पुढे येऊ लागले आहेत. एनपीएतील ३० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची वसुली होण्याची शक्यता आहे. सात ते आठ थकबाकीदार संस्थाककडून ओटीपीसाठी बँकेचे अधिकाऱ्यांसमवेत बोलणी सुरु आहे. गतवर्षी एनपीएचे प्रमाण ८.१६ टक्क्यावरुन ५.३२ टक्क्यावर आले. यंदा हे प्रमाण पाच टक्क्याच्या खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

शेतकऱ्यांना बँकेकडून १४०० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत झाले आहे. पीक कर्जाची परतफेड जूनअखेर करावयाची असली तरी साखर कारखान्यांच्या बिलातून कर्जाची वसुली होऊ लागली आहे. ४० टक्क्याहून अधिक पीक कर्ज ३१ मार्चपर्यंत वसूल होण्याची शक्यता आहे.

००००००

प्राप्तिकर खात्याचा अॅडव्हान्स टॅक्स वर भर

प्राप्तिकर खात्याकडून अॅडव्हान्स टॅक्सचे हप्ते वसुल करण्यावर भर ठेवला आहे. तसेच कर भरण्यासाठी धाडी टाकल्या होत्या त्यांच्याकडून थकीत कराच्या वसुलीसाठी मोहिम सुरु आहे. नियमित कर भरण्याकडून अॅडव्हान्स टॅक्स भरुन घेतला जातो. हा कर भरण्यासाठी वर्षाचे चार भाग केला आहेत. करदात्याकडून १५ जून, १५ सप्टेंबर, १५ डिसेंबर आणि १५ मार्च अशा तारखापूर्वी प्रत्येकी २५ टक्के कर भरुन घेतले जातात. वर्षाअखेरीस १०० टक्के प्राप्तीकर भरणे अनिवार्य असते. पण अनेक करदात्यांनी अॅडव्हान्स हप्ते भरलेले नाहीत. अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च शेवट असल्याने प्राप्तिकर खात्याकडून करदात्यांना ई मेल, एसएमएसद्वारे हप्ते भरण्यासाठी आठवण करुन दिली जात आहे. जास्त कराची रक्कम असलेल्या कंपन्यांना थेट मोबाईल व फोनवर कॉल करुन ३१ मार्चपर्यंत कर भरण्यासाठी तगादा लावला जात आहे.

००००००

दूध संघांची अनुदानासाठी धांदल

गायीच्या दुधावर प्रतिलिट पाच रुपये अनुदान मिळावे, असे प्रस्ताव जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ), वारणा, स्वाभिमानी, शाहूसह खासगी दूध संस्थांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवले आहेत. अनुदानासाठी कॅशलेसची सक्ती असल्याने जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) अनुदान रखडले आहे. गोकुळने ४० टक्के ग्राहकांना कॅशलेस पेमेंट केले असल्याने त्यावरील पाच कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान मिळावे , तसेच दूध पावडरवरील चार कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळावे म्हणून प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिनबुडाच्य आरोपांनाजशास तसे उत्तर देऊ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'माझे काम हेच माझे भांडवल असून या कर्तृत्वाच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत लोकांसमोर जात आहे. पण माझ्यावर बिनबुडाचे आरोप केल्यास आता जशास तसे उत्तर देऊ', असा इशारा राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांनी दिला. उमा टॉकीज परिसरात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

खासदार महाडिक म्हणाले, 'खासदार म्हणून काय जबाबदारी असते ते समजून काम केले. संसदीय कामाची माहिती घेतली. जोपर्यंत संसदेत प्रश्न मांडला जात नाही, तोपर्यंत तो सोडवण्यासाठी सरकारच्या पातळीवर हालचाल होत नाही. त्यामाध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. पण ज्यांना जिल्ह्याचा इतिहास, भूगोल माहित नाही. सामाजिक बांधिलकी काय हे माहिती नाही. ते अचानक निवडणुकीच्या तोंडावर बोलत आहेत. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे. बिनबुडाचे आरोप केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल.' याप्रसंगी राजू ढवळे, महादेवराव इदाते, महेश ढवळे, नामदेव रोडे, शशांक मकोटे आदी उपस्थित होते.

दरम्यान, 'भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सामान्य लोकांची फसवणूक केली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, कामगार, व्यापारी रसातळाला गेले. त्यामुळे येत्या निवडणुकीत नागरिक भाजप, सेना युतीला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. तेंव्हा कोल्हापूरच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिकांना पुन्हा निवडून आणा' असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी केले. राधानगरी तालुक्यातील तिटवे, कसबा वाळवे आणि चांदेकरवाडी येथे भागीरथी महिला संस्थेतर्फे महिला मेळावा आयोजित केला होता. संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या.

अरुंधती महाडिक म्हणाल्या, 'गावागावातून खासदार महाडिकांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी महिला उन्नती व बचत गटासाठी केलेल्या कार्यामुळे ग्रामीण भागातून वाढता पाठिंबा मिळत आहे.'

मेळाव्याला तिटवेचे दीपक किल्लेदार, साताप्पा पाटील, दीपक आबदार उपस्थित होते. कसबा वाळवे येथील मेळाव्याला पंचायत समिती सदस्या वनिता पाटील, शरयू पाटील, सारिका कांतेकर, संजीवनी कदम उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७० उमेदवारी अर्जांची विक्री

$
0
0

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज घेऊन जात आहेत. गुरूवारअखेर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून ४८ तर हातकणंगलेसाठी २२ असे एकूण ७० जणांनी उमेदवारी अर्ज नेले. अर्ज घेऊन गेलेल्यात संजय मंडलिक, राहुल आवाडे, डॉ. अरूणा माळी, रघुनाथ पाटील, प्रदीप कांबळे, डॉ. नितीन भाट, अस्लम सय्यद यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माढ्यात आघाडीला दणका; कल्याण काळे भाजपच्या वाटेवर

$
0
0

पंढरपूर:

लोकसभेच्या माढा मतदारसंघासाठी भाजपनं अद्याप उमेदवार घोषित केला नसला तरी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला दणका देण्याचं काम सुरुच ठेवलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे लढताना माढामधून ६५ हजार मते मिळवणारे कल्याण काळे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी भाजप प्रवेश केल्यास आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांचा मार्ग आणखी खडतर होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यंदा माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केल्यानंतर आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. दुसरीकडे रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसंच भाजपनं उमेदवारी दिल्यास माढामधून निवडणूक लढणार असल्याचे संकेत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिले आहेत. त्यात संजय शिंदे हे भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत गेले आणि उमेदवारीही मिळवली आहे. ही बाब भाजपच्या राज्यातील नेतृत्वाच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळं संजय शिंदेंना पराभूत करण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे. त्यादृष्टीनं त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार बबन शिंदे यांच्याविरोधात लढून ६५ हजार मते मिळवलेले कल्याण काळे हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचे समजते. पुढील तीन-चार दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करतील. काळे यांना भाजपमध्ये घेऊन आघाडीला मोठा दणका देण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे. काळे हे भाजपमध्ये गेल्यास राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत, असं मानलं जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः आवाडेंचे बंड थंड; शेट्टींना देणार पाठिंबा

$
0
0

कोल्हापूरः

यापूर्वीचे गैरसमज, नाराजी आणि अनवधानाने राहुल आवाडे यांनी हातकणंगले मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर नाराजी दूर झाली आहे. आवाडे कुटुंब सर्वशक्तीनिशी शेट्टी यांच्या पाठीशी राहणार आहे, असा खुलासा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत केला. याशिवाय सांगलीतील जागेचा तिढा सोडवण्यासाठी सांगलीत असल्याने खासदार शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहता आले नाही. अनुपस्थितीनंतर सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेत काहीच तथ्य नसल्याचे आवाडे यांनी सांगितले. दरम्यान, सांगलीतील जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे निश्चित झाल्याने खासदार शेट्टी यांनी सांगलीतील कॉंग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून समन्वयाने सर्वमान्य उमेदवार द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले हाते. त्यांच्या या निर्णयाने कॉंग्रेससोबत एकनिष्ठ असलेल्या आवाडे कुटुंबातही बंडखोरी उफाळून आल्याची चर्चा सुरू झाली होती. याशिवाय आघडीच्या नेत्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली होती. खासदार शेट्टी यांनी गुरुवारी मध्यरात्री इचलकरंजीत जाऊन आवाडे कुटुंबीयांची भेट घेतली. सुमारे दोन तास झालेल्या चर्चेनंतर राहुल आवाडे यांनी अर्ज भरण्याचा निर्णय मागे घेतला. याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी दुपारी कॉंग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आवाडे म्हणाले की, हातकणंगले मतदार संघातील यापूर्वीच्या निवडणुकांसह इतर काही कारणांमुळे राहुल आवाडे यांचे गैरसमज निर्माण झाले होते. यातून त्यांनी वैयक्तिक पातळीवर उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला होता. मी दोन दिवस जिल्ह्याबाहेर असल्याने मला या घडामोडींची कल्पना नव्हती. गुरुवारी रात्री शेट्टी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सर्व शंका दूर झाल्या आहेत. गैरसमज आणि अनवधानाने घडलेल्या घटनेवर पडदा पडला आहे. आवाडे कुटुंब सर्वशक्तीनिशी शेट्टी यांच्याच पाठीशी राहील, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिशाला चटका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

धान्य, कडधान्ये, भाजीपाला महाग झाला असताना एक एप्रिलपासून काही सेवा व वस्तूंचे दर वाढणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. घरगुती, औद्योगिक वीज दरात वाढ झाली असून प्रतिमहिना ६० ते ७० रुपये जादा वीज बिल भरावे लागणार आहे. रेडी रेकनरच्या दरात वाढ होण्याचे संकेत मिळत असल्याने घरही महाग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 'अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम'मुळे दुचाकी महागणार असून केबलचे दरही वाढलेले आहेत. दूध दरवाढीचे संकेत मिळत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमोडण्याची शक्यता आहे.

वीज दरवाढीचा शॉक

राज्य वीज नियामक आयोगाच्या सप्टेंबर २०१८ मधील वीज दरवाढीच्या आदेशाची येत्या एक एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे घरगुती वापराच्या दरात आठ टक्के तर शेती पंपधारकांना आठ ते बारा टक्क्यापर्यंतच्या वाढीची झळ सहन करावी लागणार आहे. दरवाढीचा सर्वाधिक फटका सामान्य व मध्यमवर्गीय ग्राहकांना बसणार आहे. स्थिर आकार वाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. दरवाढीच्या नव्या आदेशानुसार घरगुती विजेच्या स्थिर आकारात दहा रुपयांनी वाढ होणार आहे. पूर्वी हा दर ८० रुपये होता. एक एप्रिलपासून स्थिर आकार ९० रुपये असणार आहे. औद्योगिक ग्राहकांच्या स्थिर आकारात ४१ रुपयांनी वाढ होणार आहे. घरगुती वापरासाठी १०० युनिटपर्यंतच्या वीज दरात तीन पैसे वाढ झाली आहे. पण १०१ ते ३०० युनिट वीज वापरासाठी प्रति युनिसाठी वीस पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या मासिक वीज बिलात ७० ते ८० रुपयांनी वाढ होणार आहे.

कोल्हापूर विभागातील ग्राहक संख्या अशी

जिल्हा घरगुती ग्राहक व्यावसायिक औद्योगिक शेती पंपधारक

कोल्हापूर ८,३२,७९९ ७५,७८१ २०,२१७ १,४६,०५६

सांगली ५,५४,७२५ ४९,६४० ९७१३ २,२८,९३७

एकूण १३,८७,५२४ १,२५,४२१ २९,९३० ३,७४,९९३

रेडीरेकनरचे दर वाढण्याची भीती

गेल्या काही वर्षात रेडिरेकनरमध्ये वाढ झाल्याने घर आणि भूखंडाच्या किमंती वाढल्या. त्यामुळे घर, जमीन खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले. त्याचा फटका रिअल इस्टेटला बसला. पण रिअल इस्टेटमध्ये मंदी असल्याने कारण सांगून बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी रेडिरेकनचे दर वाढवू नयेत, अशी विनंती राज्य सरकारला केल्याने गेली दोन वर्षे दर वाढले नाहीत. पण यावर्षी सरकारला अपेक्षित महसूल जमा न झाल्याने रेडिरेकनरच्या दरात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फ्लॅट, बंगला खरेदी करणाऱ्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचे अनेक प्रकल्प राज्यात सुरू आहेत. अशा प्रकल्पासाठी सरकारकडून जमीन संपादित केली जाते. जमिन संपादित केलेल्या मालकाला राज्य सरकारकडून रेडिरेकनरच्या दुप्पट ते चौपट दर जमीन मालकाला द्यावा लागत असल्याने सरकारने गेली दोन वर्षे रेडिरेकनरचे दर स्थिर ठेवले आहेत. पण गेल्या दोन वर्षात सरकारने प्रकल्पबाधितांना जमिनीच्या बदल्यात भरपाई दिली आहे. भरपाईची रक्कम काही ठिकाणी अदा केली असल्याने यंदा रेडिरेकनरच्या दरात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेडिरेकनरच्या दरात वाढ झाली तर ग्राहकांना घर खरेदी करताना खिशाला चाट बसणार आहे.

दुचाकीही महागणार

दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रकारच्या नवीन दुचाकींना एक एप्रिल २०१९ पासून 'अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम' (एबीएस) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांमध्ये या यंत्रणेच्या समावेश केल्याने दुचाकीची किंमत वाढणार आहे. ही वाढ नेमकी किती असणार हे स्पष्ट नसले तरी उत्पादक कंपन्या आपापल्या पातळीवर किंमत निश्चित करणार आहेत. तसेच वाहनांना एक एप्रिलपासून 'हाय सेक्युरिटी नंबर प्लेट' लावली जाणार आहे. त्या नंबर प्लेटच्या खर्चाचा भारही ग्राहकांवर पडणार आहे.

दस्त नोंदणीसाठी धावपळ

रेडी रेकनरचे नवे दर एक एप्रिलपासून लागू होत असतात. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी गर्दी होत असते. यंदा रेडी रेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने दस्त नोंदणीसाठी गर्दी होण्याची शक्यता. ही गर्दी लक्षात घेऊन रविवारी सुट्टीदिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये खुली ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केबलचे दरही वाढले.

ट्राय (दूरसंपर्क नियामक प्राधिकरण) केबल ग्राहकांसाठी नवीन दरप्रणाली आणली आहे. ३१ मार्चपर्यंत चॅनेल निवडण्याची मुदत वाढवली होती. फ्री चॅनेल, पे चॅनेल आणि जीएसटीमुळे केबल पाहणाऱ्यांच्या खिशाला फटका बसत आहे. ३१ मार्चपर्यंत मुदत असल्याने अनेक ग्राहकांनी चॅनेल निवडलेले आहेत. पूर्वी १०० ते २०० रुपयांमध्ये १६४ चॅनेल पहायला मिळत असत. स्पोर्टस् व अन्य चॅनेलसाठी काही ग्राहक तीनशे ते साडेतीनशे रुपये केबल चालकाला देत असत. पण आता फ्री चॅनेलसाठी १५३ रुपये मोजावे लागत आहेत. तसेच पे चॅनेलची रक्कम ग्राहकाला भरावी लागणार आहे. तसेच केबल चालकांनी विशिष्ट पॅकेज तयार केली असून त्याची किंमत २०० रुपयांपासून ६०० रुपये इतकी आहे. विशिष्ट पॅकेजची सक्ती केबल चालकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी रास्ता रोको

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

रविवार पेठेतील माळी गल्लीत पाण्याची वेळ आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी सुभाष रोड येथील तार ऑफिससमोर रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त महिला आंदोलकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना धारेवर धरत प्रश्नाची सरबत्ती केली. मुख्य रस्त्यावर आंदोलन झाल्याने गोखले कॉलेज, माधुरी बेकरी, टेंबे रोड ते खासबाग मैदानपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

माळी गल्ली सकाळी नियमितपणे सकाळी सात वाजता पाणीपुरवठा केला जात होता. पण गेल्या काही दिवसांपासून पाणी ११ ते १२ दरम्यान सोडले जात आहे. त्यामुळे नोकरदार महिलांना पाणी मिळत नसताना येणारे पाणीही केवळ अर्धा तास आणि दुषित येत आहे. परिमाणी महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. या असंतोषाला शुक्रवारी सकाळी वाट मोकळी करून दिली. संतप्त महिलांनी तार ऑफिससमोर रास्ता रोको आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात होताच त्याचा परिणाम इतर रस्त्यावरील वाहतुकीवर झाला. गोखले कॉलेजपर्यंत वाहतूक कोंडी झाल्यानंतर ही कोंडी खासबाग मैदान व बिंदू चौकपर्यंत निर्माण झाली. तशीच कोंडी लक्ष्मीपुरीपर्यंत झाल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता कुलकर्णी आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान प्रभागाचे नगरसेवक सचिन पाटील व माजी नगरसेवक विनायक फाळकेही दाखल झाले. सर्वांनीच कुलकर्णी यांना धारेवर धरले. बालिंगा पंपिंग हाऊस येथील विद्युत पंपांमध्ये बिघाड झाल्याने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्ट करत रविवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन मागे घेतल्यानंतर सुमारे अर्धा तासाने वाहतूक कोंडी दूर झाली.

आंदोलनात सुनिता माने, उन्नती चव्हाण, दीपा चव्हाण, सुजाता घोरपडे, अंजली कामत, अल्का माळी, सुधा सुतार, निर्मला पाटील, सारिका चव्हाण, कुमारी दबडे, शारदा मुळिक, विमल सावंत, लक्ष्मी बिरादार, रेहमाबी शेख, दिलीप मोरे, उदय चव्हाण यांच्यासह माळी गल्लीतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गाळ काढण्यासाठी पाणीपुरवठा बंद

शिंगणापूर व बालिंगा येथील विद्युत पंपांमध्ये वारंवार बिघाड होत आहे. दोन महिन्यापूर्वी येथील उच्च विद्युतदाब वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. त्यानंतर टाकीतील गाळ काढण्यासाठी दोन आठवड्यात दोनवेळा शटडाऊन घेण्यात आले. त्यामुळे शहरात वारंवार पाणीपुरवठ्याचा बट्टाबोळ उडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुहूर्ताच्या खरेदीसाठी ऑफरचा धमाका

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जात असलेल्या गुढीपाडव्याला खरेदीसाठी विविध शोरूम, दुकानांनी ऑफर जाहीर केली आहे. सोने,चांदी, स्थावर मालमत्ता खरेदीसाठी हा मुहूर्त अनेकजण सर्वोत्तम मानतात. मुहूर्ताच्या खरेदीसाठी शहरातील अनेक शोरुमस् सज्ज झाली आहेत. वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व फर्निचर शोरुममध्ये बुकिंगसाठी ग्राहक गर्दी करू लागले आहेत. सर्वच वस्तूवर ऑफर जाहीर होऊ लागल्याने मराठी नववर्षाच्या पहिल्याच मुहूर्ताला खरेदीचा धमाक उडणार आहे.

गुढीपाडव्याच्या पहिल्याच मुहूर्ताने सोने-चांदी, वाहन, नवी शोरुमला सुरुवात यासह स्थावर मालमत्ता खरेदीसाठी अनेकजण प्राधान्य देतात. २०१६ मध्ये झालेली नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठेत मंदीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मात्र यातून आता बाजारपेठ उभारी घेत आहे. विशेषत: गेल्या दोन वर्षात पाऊस चांगला झाल्याने पीकस्थिती उत्तम होती. बहुतांशी शेतकऱ्यांची उसाची बिले जमा झाल्याचा परिणाम यावर्षीच्या बाजारपेठेवर बुकिंगच्या रुपाने दिसू लागला आहे.

गेल्या दोन वर्षात मोटारसायकल व फोर व्हीलरमध्ये नवीन मॉडेल बाजारात आली आहेत. नवीन सिरीजमध्ये अनेक ऑफर जाहीर होऊ लागल्या आहेत. एक्सचेंज ऑफर, शून्य रुपये डाऊन पेमेंट, फ्री अॅक्सेसिरीजसह विमा प्रीमियममध्ये आकर्षक सूट दिल्या आहेत. नवीन मॉडेल आणि मिळणाऱ्या ऑफरमुळे ग्राहकांनी आतापासूनच बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. ऑफरचे फलक विविध शोरुमबाहेर झळकू लागले आहेत. होळीनंतर उन्हाचा तडाखा जाणवू लागला असला, तरी पुढील दोन महिने हा तडाखा आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे फ्रीज, एअरकुलर, एससी यांच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये टीव्ही, मोबाइल, कॅम्प्युटर यांचीही शोरुम सज्ज झाली आहेत. विशेषत: मोबाइलमध्ये दररोज नवनवीन मॉडेल येत असल्याने युवकांचा मोबाइल खरेदीकडे अधिक कल आहे. फर्निचर, नवीन प्लॉट, फ्लॅट खरेदी व बुकिंगमध्येही ग्राहकांना ऑफर मिळू लागल्या आहेत. बाजारपेठे जाहीर होत असलेल्या ऑफर्समुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवसी मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

गुढीपाडव्यासाठी ग्राहकांनी बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना विविध ऑफर दिल्या जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुढीपाडव्याच्या दोन दिवस अगोदर ग्राहकांना पेंडॉलची सुविधा देण्यात येईल.

राजेंद्र गुरव, सरव्यवस्थापक, मोहिते सुझिकी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images