Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तीन लाखांचे देशी-विदेशी मद्य जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गस्त सुरू असताना अवैधरीत्या मद्याचा साठा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळसंदे (ता. हातकणंगले) येथे केलेल्या कारवाईत महेश बाळासाहेब पाटील (वय ३०, रा. जुने पारगाव) याला अटक केली असून, त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या मद्याचे २३ बॉक्स आणि मारुती व्हॅन असा तीन लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत वडगांव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी बुधवारी जयंती नाला, गोमती नाला, रेणुका मंदिर परिसर, कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व उद्यमनगर येथे पाहणी केली. यावेळी राजेंद्रसिंह यांनी औद्योगिक कारखान्यातून येणाऱ्या पाण्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्याची सूचना केली.

राजेंद्रसिंह विविध कार्यक्रमांसाठी कोल्हापुरात आले असता, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट इंजिनीअरिंग आणि शिवाजी विद्यापीठाच्यावतीने शहरातील जुन्या जयंती व गोमती नदी पाहणीचे आयोजन केले होते. सकाळी साडेसात वाजता हुतात्मा गार्डन, गोमती व जयंती नाला, रेणुका मंदिर परिसरासह वाय. पी. पोवार व उद्यमनगर परिसराची पाहणी केली. नाल्याच्या शेजारी झालेली अतिक्रमणे आणि औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, विजय कोराणे, राज डोंगळे, वंदना कुसाळकर, डॉ. पी. डी. राऊत, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

त्यानंतर राजेंद्रसिंह कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी जलअभियंता सुरेश कुलकर्णी व आर. के. पाटील यांच्याकडून पंचगंगा नदीचे पाणलोट क्षेत्र, प्रदुषित पाणी, वाहत येणाऱ्या कचऱ्याची माहिती घेतली. महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सांडपाणी प्रकल्पाबाबत राजेंद्रसिंह यांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेचा विहिरीत बुडून मृत्यू

$
0
0

पाणी टंचाईचा पहिला बळी

नांदेड- जिल्ह्याच्या वेगवेगळया भागात पाणीटंचाईने जनता होरपळून निघत असताना लोहा तालुक्यातल्या कांजळ तांडा येथील बालिकेचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ती आपल्या मैत्रणीसोबत पाणी आणण्यासाठी गेली होती. ही घटना बुधवारी सकाळी नऊ वाजता घडली.

सारीका मोहन राठोड (वय १३) असे मृत बालिकेचे नाव आहे. नांदेड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टँकर मुखेड तालुक्यात आहेत. घागरभर पाण्यासाठी सामान्य नागरिकांची वणवण सुरू आहे.

लोहा तालुक्यातील कांजळ तांडा येथील सारीका राठोड ही मैत्रणीसोबत पाणी अणण्यासाठी गेली होती. संतोष तापे यांच्या शेतातील विहीरीवर पाणी उपसा करत असताना तिचा तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईचा पहिला बळी गेल्याचे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात ३९ जणांवर कारवाई

$
0
0

जालना - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलिस प्रशासनानेही जय्यत तयारी चालवली असून निवडणूकीच्या कालावधीत शांततेचा भंग होऊ नये या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ३९ व्यक्तींविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक एस. चैतन्य यांनी दिली.

जालना लोकसभा निवडणूकीत कोणतेही गालबोट लागू नये, ही निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी विशेष प्रयत्न चालवले आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक एस. चैतन्य यांनी देखील जिल्हा प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाय योजना करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून यापूर्वी २० गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली असून एमपीडी कायद्यान्वये देखील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची भूमिका जिल्हा पोलिस अधिक्षक एस. चैतन्य यांनी घेतलेली आहे.

जालना शहर व जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची माहिती पोलिस ठाण्याकडून मागवण्यात आली असून गुन्हेगारांच्या गुन्ह्याची पडताळणी करण्यात आल्यानंतर आणखी ३९ गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी बिनवडे यांच्या मान्यतेनंतर या आरोपींविरुद्ध तडीपारीची कारवाई केली जाईल, असेही जिल्हा पोलिस अधिक्षक चैतन्य यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींचा सरकारी मावेजा लाटण्याचा प्रकार उघड

$
0
0

जालन्यातील सिडकोची महागडे प्लॉटस् घेणार कोण?

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना शहरातील खरपुडी परिसरातील नियोजित सिडको प्रकल्पासाठी खरपुडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी जमिनी देण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतरही बळजबरीने जमिनीची मोजणी करण्यासाठी सिडकोचे अधिकारी आले. खरपुडीतील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल दराने घेऊन कोट्यावधी रुपयांचा सरकारी मावेजा लाटण्याचा राजकीय नेत्यांच्या धनाढ्य हस्तकांचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान प्रस्तावित सिडकोची हे महागडे प्लॉटस् आणि घरे जालन्यात कोण विकत घेणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जालन्यात नियोजित सिडको प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठी खरपुडी गावातील शेतकऱ्यांच्या संघटीत विरोधामुळे जमीन मोजण्यासाठी आलेल्या भूमापन अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. जालना येत्या काही दिवसांत महापालिका होणार आहे. शहरालगतच्या असलेल्या या सगळ्या छोट्या गावांचा समावेश या महापालिकेत होणार असल्याचे सांगण्यात येते. तेंव्हा खरपुडी गावातील शिवार महापालिका क्षेत्रात येईल आणि त्यानंतर या सगळ्या भागातील जमीनीचा भाव आपोआप वाढेल या मुद्द्यावर खरपुडीचे गावकरी सिडकोला जमीन देण्यासाठी विरोध करत आहेत, असे खरपुडीचे रहीवासी सुभाष देठे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे खरपुडीच्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या यलो झोनच्या शेकडो हेक्टर जमिनी कवडी मोल दराने धनाढ्य व्यापाऱ्यांनी अलीकडच्या महिनाभरापासून खरेदी केलेल्या आहेत. सिडको इकडे येणार हे खरपुडीच्या शेतकऱ्यांना माहित नव्हते. अचानकपणे जमिनीचा सौदा करणारे दलाल खरपुडीमध्ये फिरून त्यांनी गरजू आणि काही नडलेल्या शेतकऱ्यांना हेरून त्यांच्या जमिनी रात्रीतून विकत घेतल्या आहेत. आता या सगळ्या जमिनी यलो झोनच्या असल्याचे सिडकोचे अधिकारी मधुकर अर्दड यांनी शेतकऱ्यांना सांगितले. तसेच यलो झोनच्या जमिनीचा भाव प्रचंड आहे. त्या तुलनेत ग्रीन झोनमध्ये जमीन कवडी मोल दराने विकावे लागणार असल्याचे शेतकऱ्यांना समजले आणि या सगळ्या प्रकरणांची उकल झाली, असे देठे यांनी सांगितले.

विरुद्ध दिशेमुळे सिडकोला भविष्य नसेल

दरम्यान, औरंगाबाद आणि जालना हे दोन्ही शहर जुळे शहर होणार आहेत. त्यामुळे सिडको हे औरंगाबादच्या दिशेने झाले तरच ते लवकर भरभराटीस येईल. सध्या सिडकोने निवडलेली जागा ही औरंगाबादच्या विरुद्ध दिशेने असल्याने सिडकोला भविष्य नसेल, असे स्पष्ट मत अनेकांकडून पुढे येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'चंद्रकांत पाटलांच्याइशाऱ्यांना भीत नाही'

$
0
0

पंढरपूर : 'मी कधी भाजपमध्ये प्रवेशच केला नव्हता, त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आणि मी कोणाच्या धमकीला घाबरत नाही,' अशी इशारा माढ्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी दिला आहे. 'संजय शिंदेंनी पक्षाशी गद्दारी केली आहे, त्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल,' अशा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर संजय शिंदे बोलत होते. शिंदे गेली साडेचार वर्षे भाजपच्या सोबत होते, त्यांनी भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील मिळविले होते. मात्र, नंतर राष्ट्रवादीने माढ्यातून लोकसभेची उमेदवारी देताच शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शिंदे यांच्याकडून दगाफटका झाल्याचे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील या दोघांनाही जिव्हारी लागले होते. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील सर्व आमदार व प्रतिनिधींची बैठक जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या सोनके येथील फार्म हाऊसवर झाली. या वेळी शिंदे म्हणाले, 'मी कोणत्याही स्कॅम किंवा आर्थिक घोटाळ्यात अडकलेलो नाही. त्यामुळे मी कोणाच्या धमक्यांना भीत नाही.' दरम्यान, या बैठकीला काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे तसेच कल्याण काळे यांनी दांडी मारल्याने आघाडीतही सारे आलबेल नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर मतदारसंघात १२ उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर लोकसभा मतदार संघासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांच्या नियंत्रणाखाली व निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण रिशीरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीमध्ये नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. या मतदारसंघातून १२ उमेदवार वैध ठरले आहेत.

यामध्ये एकूण १५ उमेदवारांच्या २७ नामनिर्देशन पत्राची छाननी होऊन ११ उमेदवारांचे २१ अर्ज वैध ठरले. चार उमेदवारांचे सहा अर्ज अवैध ठरले, या चार पैकी तीन उमेदवारांची उमेदवारीही अवैध ठरविण्यात आलेली आहे. रमेश निवृत्ती कांबळे (अपक्ष), सुधाकर तुकाराम श्रृंगारे (भाजप), सिद्धार्थकुमार दिगंबर सूर्यवंशी (बसप) अरुण रामराव सोनटक्के (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दत्तू प्रभाकर करंजीकर (बहुजन मुक्ती पार्टी), रामराव नरसिंग गारकर (वंचित बहुजन आघाडी), मधुकर संभाजी कांबळे (अपक्ष), मच्छिंद्र गुणाजी उर्फ गुणवंतराव कामत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मिलिंद हरिभाऊ कांबळे (अपक्ष), पपिता रावसाहेब रणदिवे (अपक्ष), मिलिंद गणपत महालिंगे (अपक्ष), रुपेश शामराव शंके (स्वतंत्र भारत पक्ष) यांचे अर्ज वैध ठरले. संजय सिताराम दोरवे (भाजप), विकास सतीश कांबळे (वंचित बहुजन आघाडी), भगवान धोंडिबा कुमठेकर (शोषित बहुजन आघाडी, शिव लहू भीम आर्मी) या तीन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने त्यांची उमेदवारी अवैध ठरली. मधुकर संभाजी कांबळे (अपक्ष) यांचा एक अर्ज वैध व एक अवैध ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत पाटील यांच्याधमक्यांना भीत नाही

$
0
0

चंद्रकांत पाटलांच्या

इशाऱ्यांना भीत नाही

पंढरपूर

'मी कधी भाजपमध्ये प्रवेशच केला नव्हता, त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आणि मी कोणाच्या धमकीला घाबरत नाही,' अशी इशारा माढ्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी दिला आहे.

'संजय शिंदेंनी पक्षाशी गद्दारी केली आहे, त्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल,' अशा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर संजय शिंदे बोलत होते. शिंदे गेली साडेचार वर्षे भाजपच्या सोबत होते, त्यांनी भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील मिळविले होते. मात्र, नंतर राष्ट्रवादीने माढ्यातून लोकसभेची उमेदवारी देताच शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शिंदे यांच्याकडून दगाफटका झाल्याचे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील या दोघांनाही जिव्हारी लागले होते.

राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील सर्व आमदार व प्रतिनिधींची बैठक जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या सोनके येथील फार्म हाऊसवर झाली. या वेळी बोलताना शिंदे म्हणाले, 'तुमच्याकडे सध्या येणारे नेते कोणत्या तरी भानगडीत अडकलेले असतील, पण मी अशा कोणत्याही स्कॅम किंवा आर्थिक घोटाळ्यात अडकलेलो नाही. त्यामुळे मी कोणाच्या धमक्यांना भीत नाही. माझ्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात भाजप ग्रामीण भागात पोचायला सुरुवात झाली होती. मी तीन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असून, भाजपकडून कोणीही उमेदवार असला तरी आमची तयारी झाली आहे.' दरम्यान, या बैठकीला काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे तसेच कल्याण काळे यांनी दांडी मारल्याने आघाडीतही सारे आलबेल नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्महत्येस प्रवृत्त, पाचजणांना कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

देवनाळ (ता. जत, जि. सांगली) येथील राजाराम बलभीम कांबळे याने उदगाव (ता. शिरोळ) येथे आत्महत्या केल्याची नुकतीच घटना घडली. तथापि, याप्रकरणी त्याची पत्नी, सासू, सासरे, मेहुणा व अन्य एक अशा पाचजणांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद राजाराम कांबळे यांचे भाऊ रामचंद्र कांबळे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी सर्वांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पत्नी गंगा राजाराम कांबळे (वय ३१), सासू शांताबाई लक्ष्मण लांडगे (वय ५५), सासरे लक्ष्मण भीमा लांडगे (वय ७०), मेहुणा मऱ्याप्पा लक्ष्मण लांडगे (वय ३५, सर्व रा. कोळी मळा, उदगाव) व योगेश श्रीकांत आवळे (वय ३१,रा. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्या लढा कष्टकरी, शेतकऱ्यांसाठीच राहील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच घटक पक्षांतील मी एकट्याने भाजपला विरोध केला. बलाढ्य शक्तीला विरोध करताना अनेकांनी भीती घातली. मात्र, मला कोणत्याही आघाड्यांशी देणेघेणे नाही. उन्हात तळपणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतोय आणि लढत राहीन,' अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार शेट्टी यांनी बुधवारी प्रचाराचा प्रारंभ केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार विश्वजित कदम, रविकांत तुपकर उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, 'भाजप सरकारने देशातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांना एकत्रित करून दबावगट निर्माण केला आहे. आजपर्यंतच्या निवडणुकीत सामान्य कष्टकऱ्यांनी वर्गणी देऊन निवडणुका जिंकून दिल्या आहेत. काहीजण सत्तेचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप करीत आहेत. स्वत:ची गरिबी हटविण्यासाठीचे साधन म्हणून कधीही निवडणूक लढविली नाही. जे व्रत क्रांतिसिंह नाना पाटलांनी जपले, तेच व्रत घेऊन शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी चळवळ पुढे घेऊन जात आहे. मी बेनामी संपत्ती मिळवल्याचे जो कोणी दाखवून देईल त्याचक्षणी ती संपत्ती त्याला दान करेन.'

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत आलेल्या स्वाभिमानी संघटनेला लोकसभेच्या दोन जागा द्यायचे ठरले होते. आम्ही आमच्या वाट्याची हातकणंगलेची जागा त्यांना दिली आहे. आता काँग्रेसने त्यांना कोणती जागा द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. अमूकच जागा स्वाभिमानीला द्या, असे आम्ही काँग्रेसला सांगितलेले नाही. काँग्रेसने त्यांच्या वाट्याची कोणती जागा द्यायची हे त्यांनी ठरवावे. सांगलीच द्या, असे आम्ही सांगितलेले नाही. अनेक वर्षे खासदार शेट्टी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. संसदेत शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे त्यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.'

यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, मंगलाताई शिंदे, सयाजी मोरे, प्रकाश पोफळे यांची भाषणे झाली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे मारेकऱ्यांच्या माहितीसाठी ५० लाखांचे बक्षीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार करणारे मारेकरी फरारी संशयित विनय बाबूराव पवार (वय ४०, रा. उंब्रज, ता. कराड) आणि सारंग दिलीप अकोलकर उर्फ कुलकर्णी (३८ रा. शनिवार पेठ, पुणे) यांची माहिती देणाऱ्यास ५० लाखांचे बक्षीस गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे. यापूर्वी १० लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान पानसरे प्रकरणी गुरुवारी (ता. २८) मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

पानसरे यांच्या हत्येच्या चौकशीत प्रगती नसल्याच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने तपास यंत्रणेवर सातत्याने ताशेरे ओढले आहेत. पानसरे यांची २०१५ मध्ये हत्या झाली. त्यांच्या हत्येला चार वर्षे झाली. सध्या या गुन्ह्याचा तपास पुणे येथील पोलिस महासंचालकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या देखरेखीखाली कोल्हापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे करीत आहेत. २६ फेब्रुवारी २०१७ मध्ये सरकारने फरार झालेल्या दोन्ही आरोपीची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड व वीरेंद्र तावडे पोलिस रेकॉर्डवर आले. या दोघांविरोधात कोल्हापूर एसआयटीने दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोघांनाही जामीन मिळाला. त्यानंतर तपास यंत्रणेने पानसरे हत्येत तिसरा संशयित आरोपी विनय पवार व सारंग अकोलकर या दोघांचा समावेश असल्याचे दोषारोपपत्रानुसार कोर्टाच्या निर्दशनात आणून दिले. कोर्टाने या दोघांची माहिती आणि फोटो असलेली भित्तिपत्रके देशभर प्रसिद्ध करावीत, त्यांची माहिती प्रसिद्ध करावी, याबाबतचे सर्व अधिकार तपास यंत्रणेला दिले. त्यानुसार यंत्रणेने कार्यवाही केली.

आरोपींचा शोध घेण्यासाठी देशभरात पथके रवाना केली आहेत. तपास पथकाला जनतेतून माहिती मिळावी, यासाठी अप्पर पोलिस महासंचालक संजीव सिंघल यांनी आरोपीची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये द्यावेत, अशी विनंती सरकारकडे केली होती. त्यानुसार बक्षीसाची ही रक्कम वाढविली आहे. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक


एसआयटी पथकात १४ अधिकारी

याशिवाय सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोन फरार संशयित आरोपींना अटक करण्यासाठी सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. या पथकामध्ये यापूर्वी सात अधिकारी होते. आता १४ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. कोल्हापूर एसआयटीत नुकतीच अमृत देशमुख यांची नियुक्ती केली आहे.


येथे संपर्क साधा

गुन्हे अन्वेषण विभाग पुणे : क्रमांक ०२०-२५६३४४५९

विशेष पोलिस महानिरीक्षक (कोल्हापूर) ०२३१-२६६७५३३

जिल्हा पोलिस अधीक्षक : ०२३१- २६६२३३३

विशेष तपास पथक : मोबाइल क्रमांक ७९७२६३५२०७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवेंद्र आणि माझी टॉम अॅण्ड जेरीची जोडी’

$
0
0

सातारा

खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाढत गेलेले वितुष्ट अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या साक्षीने मिटले. दोन्ही राजांची जाहीर गळाभेट झाली. शिवेंद्रराजेंनी आपल्या भाषणात डायलॉगबाजी करताना ‘जो मैं बोलता हूँ, ओ मैं करता हूँ, जो मैं नही बोलता हूँ, ओ डेफिनेटली करता हूँ’ अशी संवाद फेक केली. शिवेंद्रराजेंची व माझी टॉम अॅण्ड जेरीची जोडी आहे, तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशी आमची अवस्था असल्याची मिश्किली खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. भविष्यात आम्ही कायमस्वरूपी एकत्र राहू, असा शब्दही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा-जावळी तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा येथील कल्याण रिसॉर्टमध्ये पार पडला. मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे, शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, नगराध्यक्षा माधवी कदम, ऋषिकांत शिंदे, तेजस शिंदे, सुनील माने यांची आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘उदयनराजेंना सगळ्या महाराष्ट्रातून मागणी आहे. आज दोन्ही राजांचे पुन्हा मनोमीलन झाले आहे, ही महाराष्ट्रासाठी चांगली नांदी आहे. शिवेंद्रराजेंनी अंबानी बंधूंची उपमा दिली आहे. एक बंधू संकटात असताना दुसरा धावून गेला, असे शिवेंद्रराजेंना सुचवायचे असावे. उदयनराजे, तुम्ही आता निवडून आला आहात. लोकसभेनंतर तुमची जबाबदारी जास्त आहे. तुमच्यापेक्षा शिवेंद्रराजेंवर माझे जास्त प्रेम आहे. ते वयाने लहान आहेत. शिवाय राजारामबापू पाटील यांनी भाऊसाहेब महाराजांवर प्रेम केले होते, त्यांना राजकारणात आणले होते. तसेच माझे शिवेंद्रराजेंच्या बाबतीत आहे. त्यामुळे तुमची निवडणूक झाल्यावर शिवेंद्रराजेंवर तुमचे लक्ष असले पाहिजे, हे पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझे तुम्हाला सांगणे आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी सरकारचा मेंदू गुडघ्यातः प्रकाश आंबेडकर

$
0
0

पंढरपूरः सरकार हे डोक्याने चालवायचे असते. मात्र, मोदी सरकारचा मेंदू गुडघ्यात असल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. सोलापूर लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात आंबेडकर यांनी मंगळवेढा येथून केली. त्यावेळी ते बोलत होते.

या सभेला दलित आणि मुस्लिम महिलांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने काँग्रेस आघाडी आणि भाजप गोटात अस्वस्थता पसरल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करताना, पुलवामा हल्ल्यानंतर सगळे जग थांबण्यासाठी सांगत असताना कर्जबाजारी पाकिस्तानवर यांनी १४ दिवसांनी हल्ला चढवला. एकदम हल्ला केला खरा, पण निदान एखादा तरी दहशतवादी मारायचा होता, अशा शब्दांत आंबेडकरांनी सर्जिकल स्ट्राइकवर हल्ला चढविला. पुन्हा असाच गाढवपणा करीत देशाकडील गुपित फोडण्याचे काम केले आणि आपण किती महान नेता आहे, हे दाखवायचा प्रयत्न केला. पुलवामानंतर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामुळे कर्जबाजारी पाकिस्तानच्या मदतीला चीन धावला आणि त्याने पाकिस्तानला २ लाख कोटी रुपयांची मदत केली, असा दावा आंबेडकर यांनी यावेळी केली.

नोटबंदीच्या काळात केलेल्या घोटाळ्यातून आलेल्या ४० टक्के कमिशनची रक्कम आता निवडणुकात खर्च केली जाणार असून, पैशाच्या जीवावर निवडणूक जिंकण्याचे स्वप्न मोदी-शाह जोडी बघत असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या आलेल्या मतदानपूर्व चाचण्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला एकही जागा दाखवली नसली, तरी मला भेटलेल्या युतीच्या १८ उमेदवारांनी आपली लढत वंचित बहुजन आघाडीशी असल्याचे त्यांनी सांगितले, असे आंबेडकर म्हणाले. समाजातील दलित आणि मुस्लिम हे दोन वर्ग भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही मतदान करणार नसून, याचा सगळ्यात जास्त फायदा वंचिताला होणार असल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला.

काँग्रेसचे ३० टक्के उमेदवार सनातनी!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ३० टक्के उमेदवार सनातनवाद्यांशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप करीत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आंबेडकर यांनी पंढरपूरमध्ये प्रचार सभा घेतली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशात आणि राज्यात 'आरएसएस' आणि भाजप विचाराचे सरकार यावे, अशी काँग्रेस नेत्यांची धारणा आहे, असा दावा आंबेडकरांनी केला. आजही काँग्रेस आणि सनातनवाद्यांचे साटेलोटे आहे, असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तरुणांना परदेशातील नोकरीसाठी संधी देणार’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'विधवा सक्षमीकरण अंतर्गत स्वयंरोजगारची संधी उपलब्ध करून देण्याबरोबर सेमी स्कीलमध्ये तरुणांना कुशल करुन त्यांना परदेशात संधी उपलब्ध करुन देणार येईल, असे प्रतिपादन परराष्ट्र खात्यातील निवृत्त सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. भारतीय जन संविधान मंच आणि कोल्हापूर कॉलिंगच्यावतीने 'चांगुलपणाची चळवळ' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल, निवृत्त पोलिस उप अधीक्षक मदन चव्हाण, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री पूजा जैस्वाल, उद्योजक विरेन शहा, रघुविरसिंग राठोड, अनिल नानिवडेकर उपस्थित होते.

चांगुलपणाची चळवळ देशभर सुरु केली जाणार असून या चळवळीतून चांगल्या संस्थांच्या व व्यक्तींच्या कामांना उत्तेजन देणार आहे असे सांगून ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, 'सामाजिक परिवर्तनाची चळवळ विशिष्ठ ठिकाणी कुंठीत झाली असून शिक्षणाचा गुण विस्तार रखडला आहे. राजकीय विचारांची पातळी खाली गेली आहे. समाजात नकारात्मक, उदासिनता आली असून जुन्या प्रकारची चळवळ न करता चांगुलपणाची चळवळ केली जाणार आहे.'

'सकारात्मक कामााला प्रोत्साहन देत ही चळवळ सुरु करण्यात येणार आहे,' असा विश्वास व्यक्त करत मुळे म्हणाले, 'समाजातील चांगले काम करणारे लोक भितीने मागे जात आहेत. त्यांना प्रोत्साहन देऊन पुन्हा चळवळीत आणले जाईल. समाजातील सलोखा बिघडवण्याचे काम करणाऱ्यांशी सुरुवातील संवाद केला जाईल. पण त्यामध्ये यश आले नाही तर सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याचे काम अखंडपणे केले. जाईल. प्रत्येक व्यक्तीने नियमित व्यवहाराबरोबर एक चांगले काम करावे यासाठी प्रोत्साहन देण्यावरही भर राहील.'

'कोल्हापुरात विधवा सक्षमीकरणासाठी एक संस्था चांगले काम करत असून या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात विधवासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिले जाईल,' असे सांगून मुळे म्हणाले, 'युरोप, आफ्रिका, पूर्व अशियात छोटी छोटी काम करणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. सेमी स्कील असलेल्या तरुणांना कुशल बनवून त्यांना परदेशात नोकरी उपलब्ध करुन दिले जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्जेदार समीक्षाग्रंथाला पुरस्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ख्यातनाम समीक्षक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. म. सु. पाटील यांचे कुटुंबीय व शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दर दोन वर्षांनी 'डॉ. म. सु. पाटील पुरस्कार' दिला जाणार आहे. पुरस्कारासाठी पाटील कुटुंबीयांतर्फे पाच लाख रुपये शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आले. या देणगीच्या व्याजातून त्यांच्या नावाने मराठीतील दर्जेदार समीक्षाग्रंथास हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

म. सु. पाटील हे मराठीतील नामवंत समीक्षक असून मनमाड महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यांचे आजवर दहाहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मराठी समीक्षा लेखन परंपरेत त्यांची समीक्षा मूलभूत स्वरुपाची आहे. त्यांच्या ग्रंथांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांच्यानावे समीक्षा तसेच वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पाटील कुटुंबीयापैकी कवयित्री नीरजा, शंकर अय्यर, तृप्ती शंकर, अनुराधा मोकल यांच्या उपस्थितीत प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर यांच्याकडे निधी दिला. याप्रसंगी साहित्यिक डॉ. राजन गवस, समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, वित्त व लेखाअधिकारी व्ही. टी. पाटील, प्राचार्य धनाजी कणसे, डॉ. व्ही. एन. शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठात भरला फाउंड्री उद्योगाचा मेळा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग व आग्रा येथील मिनिस्ट्री ऑफ मायक्रोस्मॉल मेडियम एंटरप्रायझेस यांच्यावतीने शिवाजी विद्यापीठात भरवण्यात आलेल्या उद्यम समागम या प्रदर्शनाच्यानिमित्ताने फाउंड्री उद्योगांचा मेळा भरला आहे. विद्यापीठ आवारातील लोककला केंद्रात भरवण्यात आलेल्या दोन दिवसांच्या प्रदर्शनाचे उदघाटन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाले. फाउंड्री उद्योगातील ६५ कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आपल्या कंपनीच्या उत्पादनांची प्रात्यक्षिकासह माहिती देत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा मोठा खजिना ठरत आहे.

प्रदर्शनाच्या निमित्ताने ट्रेड फेअर,नॅशनल सेमिनार व जागरूकता शिबिर घेण्यात येणार आहे.बाजारपेठेत नव्याने येणारे उपक्रम, तांत्रिक विकास झालेल्या क्षेत्रातील फाउंड्री सेक्टर, इंटरनेट, मार्केटिंग, जीइएम पोर्टल,सार्वजनीक खरेदी धोरण याबद्दल जागरूकता, माहिती व प्रचार करण्याच्यादृष्टीने प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली आहे. ६५ युनिटनी उत्पादनसेवेची माहिती या प्रदर्शनात सादर केली असून २० उद्योजकांच्यावतीने सेवासुविधांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. कोल्हापूर, आग्रा, मुंबई, पुणे येथील कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.

शिवाजी विद्यापीठातर्फे या प्रदर्शनात इन्क्यूबेशन सेंटरतर्फे सध्या संशोधन सुरू असलेल्या उत्पादनांची माहिती देणारा स्टॉल मांडला आहे. गुजरात येथील एका कंपनीने टाकाऊ कास्टिंगपासून बांधकामासाठी वापरता येतील अशी वीट तयार केली आहे. शासकीय तंत्रनिकेतनमधील सेंटर फॉर एक्सलन्स इन जेम्स अँड ज्वेलरी विभागातर्फे सोन्याचे दागिने डिझाइन व घडवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. शाहूपुरी येथील मॅकनेट इंडस्ट्रीच्यावतीने अडीच टन वजन उचलणारे यंत्र मांडले आहे. फाउंड्री इंडस्ट्रीतील कास्टिंगचा पुनर्वापर कसा करायचा याची माहिती देणारे स्टॉल लक्ष वेधून घेत आहेत. तसेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या, इंडस्ट्रीतील नव्या तंत्रज्ञानानुसार कोणत्या उत्पादनांना मागणी आहे याविषयी प्रदर्शनात मार्गदर्शन करण्यात येत आहे. नैसर्गिक हळदपूड करणारे मशीन, ऑइल मशीन यांचा स्टॉल आहे. कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, डॉ. डी. आर. मोरे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, डॉ. ए. के. साहू, डॉ. एस. बी. काळे, पी. आर. जोशी, प्रतीक पराशर यांनी संयेाजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपशहर अभियंत्यांचा स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेते सुमारे ३० टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून अनेक विभागांचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. यातच उपशहर अभियंता आर. के. जाधव यांनी ऐच्छिक स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केल्याने आणखी एका रिक्त पदाची भर पडण्याची शक्यता आहे. बहुतांश विभागांत अधिकारी, कर्मचाऱ्यांची वानवा आहे. रिक्त पदांची संख्या जास्त असल्याने अनेक विभागांचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. तर अधिकारी, कर्मचारी स्वेच्छा निवृत्तीसाठी राजीनामा देत आहेत. वर्षभरापूर्वी नगररचनाकार, पर्यावरण अभियंत्यांनी राजीनामा दिला. प्रशासनाने त्यांचे राजीनामे मंजूर केले नाहीत. तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कडक शब्दात समज दिली होती. त्यानंतर काही काळ राजीनामासत्र थांबले. मात्र गेल्या आठवड्यात उपशहर अभियंता जाधव यांनी ऐच्छिक स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’ टार्गेट पूर्ण

$
0
0

लोगो : गुड न्यूज

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य वस्तू व सेवा कर कोल्हापूर विभागाने २३८७ कोटी रुपयांचे लक्ष्य पूर्ण करत २७ मार्चअखेर २४०१ कोटी रुपये जीएसटी जमा केला आहे. या विभागातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असतानाही या विभागाने लक्ष्य पूर्ण केले आहे.

करात सुसूत्रता येण्यासाठी केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) एक जुलै २०१७ पासून देशभर लागू केला. अनेक करांच्या कटकटीतून मुक्तता मिळवून देत 'एक कर, एक देश' म्हणून केंद्रीय व राज्य वस्तू व सेवा कर अशी विभागणी करण्यात आली. विविध वस्तू आणि सेवांवर ८, १२, १८ आणि २२ टक्क जीएसटी लागू करण्यात आला. कराची अंमलबजावणी करताना सुरुवातीला केंद्रीय व राज्य जीएसटी कार्यालयाला मोठ्या अडचणी आल्या. मात्र, प्रबोधनाची मोठी मोहीम राबविली. व्यापारी, उद्योजक, उत्पादक चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहाय्याने जिल्ह्यात अनेक शिबिरे घेण्यात आली. कर भरण्याची यंत्रणा ऑनलाइन केल्याने सुटसुटीतपणा आला. केंद्र सरकारने अनेक वस्तू व सेवांना करामध्ये सवलत दिली.

कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे येतात. या विभागात अंदाजे ७० हजार व्यापारी, उद्योजकांची नोंदणी झाली आहे. या विभागाला २०१८-२०१९ मध्ये २३८७ कोटींचे कर जमा करण्याचे उद्दिष्ट दिले होते. प्रलंबित थकबाकीच्या वसुलीसाठी विभागाने जानेवारी महिन्यापासून धडक मोहीम राबवली होती. नियोजनबद्ध प्रयत्न केल्याने २७ मार्चला २४०१ कोटी रुपये कर गोळा करण्यात यश आले.

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियुक्ती झाली आहे. तरीही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विवरणपत्र करदात्यांकडे वसुलीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. मोठ्या ४५ करदात्यांकडून जीएसटी वसूल करण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या चार दिवसांत १५ कोटी ६७ लाख रुपये कर जमा झाला आहे. सामूहिक प्रोत्साहन योजनेदाखल व्यापाऱ्यांना विभागामार्फत हप्तेबंदी सवलत मिळते. त्याची फेरवसुली सुरू असून, ६६ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. ३१ मार्चपर्यंत जास्तीत जास्त महसूल गोळा व्हावा यासाठी राज्य कर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कार्यरत आहेत.

०००००

जास्तीत जास्त महसूल जमा व्हावा यासाठी सुरुवातीपासून राज्य कर सहआयुक्त घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले. करदात्यांकडे सातत्याने पाठपुरावा करताना नवीन करदातेही शोधले. त्यामुळे यावर्षी चार दिवस अगोदर उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळाले.

सचिन जोशी, सहाय्यक उपायुक्त, राज्य जीएसटी

०००००

ग्राफिक्स...

कोल्हापूरसह पाच जिल्हे

विभागातील समाविष्ट जिल्हे

७० हजार

व्यापारी, उद्योजकांची नोंदणी

२३८७ कोटी रुपये

२०१८-२०१९ मधील उद्दिष्ट

२४०१ कोटी रुपये

२७ मार्च २०१९ पर्यंत वसुली

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकांची प्रचारात उडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीचा प्रचार हळूहळू शिगेला पोहोचत असताना शहरातील अनेक माजी नगरसेवकांनी थेट प्रचारात उडी घेतली आहे. तर अनेकांनी आपली तटस्थ भूमिका सोडलेली नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेना-भाजपचे उमेदवार प्रा. संजयसिंह मंडलिक यांच्यामध्ये लढत होत असली, तरी पक्षीय जोडे बाजूला ठेवून विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक प्रचार करताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली असली, तरी तत्पूर्वीच मतदारसंघातील लढत स्पष्ट झाली आहे. त्यानुसार दोन्ही उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी प्रचारास सुरुवात केली आहे. सेना-भाजपने प्रचाराचा नारळच कोल्हापुरात फोडला असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचीही जंगी सभा होणार आहे. मात्र तत्पूर्वीच मतदारसंघ पिंजून काढण्यास दोन्ही उमेदवारांनी सुरुवात केली आहे. विशेषत: त्याचा ज्वर शहरात चांगलाच दिसू लागला आहे.

शहरात मतदारांची असलेली जास्त संख्या आणि कमी काळात होणाऱ्या संपर्कामुळे विशेष रणनीती आखून प्रचार केला जात आहे. त्यामध्ये माजी नगरसेवकांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांची भूमिका लक्षात घेऊन उमेदवार व त्यांचे समर्थक त्यांची भेट घेऊन पाठिंब्यासह प्रचार करण्याचे आवाहन करत आहेत. त्यानुसार सुनील मोदी, रवी इंगवले, राजू लाटकर, अॅड. महादेवराव आडगुळे, मारुतराव कातवरे, बाजीराव चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, आर. डी. पाटील, रमेश पुरेकर, सुनील कदम, चंद्रकांत घाटगे, धनंजय सावंत, अजित राऊत, राजेंद्र पाटील, मधुकर रामाणे, सुरेश ढोणुक्षे, विजय सुर्यवंशी, निशिकांत मेथे, महेश वासुदेव आदी माजी नगरसेवक थेट प्रचारात उतरले आहेत. कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीला पक्षीय पातळीपेक्षा वैयक्तिकपातळीचे स्वरुप प्राप्त झाल्याने अनेकजण सोयीने प्रचार करत आहेत. त्यामुळे पक्षीय जोडे बाजूला ठेवल्याचे सर्रास चित्र दिसत आहे. प्रचारातील त्यांची उपस्थिती उमेदवारांच्या भेटीगाठीतून स्पष्टपणे दिसत आहे. काही नगरसेवक तर उमेदवारांची प्रचारयंत्रणाच हाताळत आहेत. पण अद्यापही काही नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. दीड वर्षानंतर महापालिकेची निवडणूक होणार असल्याने अनेक नगरसेवक सावध भूमिका घेत असल्याचे चित्र शहरात आहे.

..........................

चौकट

ग्रामीण भागाशी संपर्क

महापालिकेतील अनेक आजी-माजी नगरसेवकांचा ग्रामीण भागाशी संपर्क असतो. अनेकजण ग्रामीण भागातून शहरात स्थायिक झाले असून अनेकांचे नातेवाईक ग्रामीण भागात आहेत. यानिमित्ताने नगरसेवकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना शहरातून थेट ग्रामीण भागात प्रचारासाठी निमंत्रित केले जात आहे. त्यामुळे शहराबरोबर ग्रामीण भागात नगरसेवकांच्या संपर्काचा वापर उमेदवार करुन घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौलव उपसरपंचपदी नम्रता पाटील बिनविरोध

$
0
0

फोटो...

राधानगरी : कौलव (ता. राधानगरी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नम्रता विश्वासराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच सविता चरापले होत्या. कौलव ग्रामपंचायतीवर भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील (राष्ट्रवादी), सदाशिवराव चरापले, (काँग्रेस), अरुण सोनाळकर (जनतादल) यांची सत्ता आहे. सरपंचपद राष्ट्रवादीकडे आहे, तर उपसरपंचपद सदाशिवराव चरापले गटाकडे आहे. उपसरपंच स्नेहा पाटील यांनी एक वर्षाची मुदत संपल्याने पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर नम्रता पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images