Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

घरकुलाची कामे अडकली आचारसंहितेत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

करवीर तालुक्यात रमाई आवास योजनेंतर्गत ३२० घरकुले मंजूर झाली होती. त्यापैकी ५० घरकुलांसाठी अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला आहे. दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्याने उर्वरित २७० घरकुलांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरकुले पूर्ण झाली नाहीत तर लाभार्थ्यांना राहण्यासाठी जागांची शोधाशोध करावी लागेल. संबंधित लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता द्यावा अशी मागणी करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे केली. तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंत बांधण्याची दहा कामे मंजूर आहेत. ही कामे सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगिरी करणार नाही

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचगिरीवर आक्षेप नोंदवत धुडगूस घालणाऱ्या दिलबहार तालीम मंडळाच्या संघावर कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पंचगिरीवर आक्षेप नोंदवला असल्याने यापुढे 'दिलबहार'च्या कोणत्याही फुटबॉल सामन्यास पंचगिरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे पत्र कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनला (केएसए) त्वरित देण्यात आले.

रविवारी (ता. २४) चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामना पीटीएम विरुद्ध दिलबहार तालीम मंडळात झाला. पीटीएमने दिलबहारचा पराभव करत विजेतेपद पटकावल्यानंतर दिलबहराच्या समर्थकांनी सामन्याचे मुख्य पंच अजिंक्य गुजर यांच्या पंचगिरीवर आक्षेप नोंदवत कार्यालयात येऊन शिवीगाळ केली. यावेळी साइड पंच व रेफ्री असोसिएशनच्या अन्य पंचांनी हस्तक्षेप करत समर्थकांना रोखले. यानंतर मैदानाबाहेर प्रचंड हुल्लडबाजी करत दगडफेकही केली.

यानंतर मात्र दिलबहारच्या एका जबाबदार व्यक्तींने सदोष पंचगिरीमुळे संघाचा पराभव होत असल्याची जाहीर प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेचा जाहीर निषेध करताना रेफ्री असोसिएशनने म्हटले आहे, 'पंचांच्या निर्णयामुळे संघाचा पराभव आणि त्यानंतर हुल्लडबाजी होत असल्यास रेफ्री असोसिएशनचा कोणताही पंच यापुढे दिलबहारच्या फुटबॉल सामन्याला पंचगिरी करण्यास तयार नाही.'

दरम्यान सायंकाळी रेफ्री असोसिएशनची बैठक झाल्यानंतर तातडीने निर्णयाचे पत्र कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनला देण्यात आले. बैठकीस नंदकुमार सूर्यवंशी, प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, राहुल तिवले, अजिंक्य गुजर, सुनील पोवार, अभिजित गायकवाड, सोमनाथ वाघमारे, योगेश हिरेमठ, शहाजी शिंदे, गौरव माने, सतीश शिंदे, हर्षद राऊत, गजानन मनगुतकर यांच्यासह रेफ्री असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

फुटबॉल बंद पाडू नका

दरम्यान फुटबॉल स्पर्धेनंतर झालेल्या हुल्लडबाजीनंतर केएसएने फुटबॉल स्पर्धा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयामुळे कोल्हापूरच्या लोकाश्रय आणि राजाश्रय मिळालेल्या फुटबॉलचे नुकसान होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने दिले आहे. 'मूठभर हुल्लडबाजांमुळे फुटबॉल बदनाम होत आहे. अशा प्रवृत्तीने ठेचून काढले पाहिजे. हुल्लडबाजांमुळे फुटबॉल बंद न पाडता अशा प्रवृत्तींना अटकाव करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न केले पाहिजेत.' किसन कल्याणकर, रामेश्वर पत्की यांच्यासह फुटबॉलप्रेमीने प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा उचलला, निर्गतीचे काय?

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी राबवलेली प्रभावी यंत्रणा आणि कार्यन्वित झालेला विज निर्मिती प्रकल्प कोल्हापूर महापालिकेच्या पथ्यावर पडला. त्यामुळेच केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानांतर्गत 'स्वच्छ सर्वेक्षणा'त कोल्हापूरने थ्रीस्टार मानांकनासह देशात १६ वा क्रमांक मिळवला. मात्र, शहरात दररोज कचऱ्याचे संकलन केले जाते, विल्हेवाटीचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. संकलन केलेल्या कचऱ्यावर पूर्ण क्षमतेने न होणारी प्रक्रिया, कॅपिंगचा तिढा आणि दहा वर्षांपासून रखडलेली लँडफील साइट या प्रश्नांच्या सोडवणुकीची गरज आहे.

शहरात दररोज सुमारे २०० टन कचरा संकलीत केला जातो. जमा झालेला कचरा कसबा बावडा येथील घनकचरा प्रकल्पावर टाकला जातो. कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागेचा शोध वर्षानुवर्षे सुरू आहे. मात्र, त्यात अपयश आल्याने प्रकल्पस्थळी कचऱ्याचा डोंगर साठत आहे. गेल्या वर्षापासून ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले. त्यासाठी दंडात्मक कारवाईचे संकेतही दिले. त्यासाठी घर टू घर कचरा संकलन मोहीम राबवली. पण संकलीत केलेला कचरा टाकायचा कोठे? असा प्रश्न अधुनमधून उद्भवतो. त्यामुळे हे प्रयत्नही अपुरे ठरतात. शहरातील काही मिळकतदार व सोसायट्या, अपार्टमेंटधारकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करुन खत निर्मितीही केली. पण त्यांची संख्या अत्यल्प आहे. परिणामी घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत आहे.

कसबा बावड्यात प्रकल्पस्थळी कचरा टाकण्यास जागा कमी पडत असल्याने टोप येथील नवीन जागेचा पर्याय पुढे आला. पण येथील नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे सद्यस्थितीत ही बाब न्यायप्रविष्ट बनली आहे. गेल्या दहा वर्षापासून ही स्थिती कायम आहे. प्रशासनाला नव्या जागेचा शोध घेण्यास यश आलेले नाही. प्रकल्पातील कचऱ्यापासून विज निर्मितीस सुरुवात झाली. पण हा प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. शिवाय सुमारे आठ एकर जागेवर साडेतीन लाख टन कचऱ्याचे कॅपिंग करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात दोन्ही प्रकल्प मार्गी लागलेले नाहीत. लँडफील साईटचा प्रश्नही जैसे थे आहे. त्यामुळे प्रशासनाला भविष्यात फाइव्ह स्टार मानांकनासाठी प्रयत्न करताना कचरा निर्गतीवर भर द्यावा लागणार आहे.

नागरिकांच्या समाधानामुळे थ्री स्टार मानांकन

'स्वच्छ भारत अभियानंतर्गत झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात फक्त कचरा उठावाला प्राधान्य नसून नागरिकांच्या तक्रारींचे निरसन आणि समाधान, प्रक्रिया प्रकल्प, सोशल मीडियाचा वापर, बायोमेट्रिक हजेरी आदींसाठी ५००० गुणांचा समावेश होता. कोल्हापूर महापालिकेला कचरा संकलन, त्यापासून विज निर्मिती आणि नागरिकांच्या तक्रारी याद्वारे थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. त्यावरील मानांकनासाठी सुधारणेला भरपूर वाव आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे' असे प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.

प्लास्टिकचा खुलेआम वापर कायम

राज्य सरकारने गेल्यावर्षी प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्रयाची अंमलबजावणी करण्यास सर्वच सरकारी यंत्रणा कुचकामी ठरल्या. परिणामी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर बिनदिक्तपणे सुरू असतो. वापरानंतर प्लास्टिकची विल्हेवाट लावली जात नसून ते थेट कचराकुंडी किंवा गटारीमध्ये फेकून दिले जाते. सांडपाण्याद्वारे गटरमध्ये फेकलेले सर्व प्लास्टिक नाल्यांत अडकून बसते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटण्याबरोबर आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाययोजना करणे ही महापालिकेला डोकेदुखी बनली आहे.

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महापालिकेचा देशात १६ क्रमांक मिळविला. भविष्यात हे मानांकन आणखी वाढविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी लोकसहभाग वाढवून आवश्यक प्रकल्प कार्यन्वित करू.

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त

८५०

मोठ्या कचराकुंड्या

२००

छोट्या कचराकुंड्या

१,५४०

स्वच्छता कर्मचारी

३२५

कचरा गोळा करणारी वाहने

ट्रॅक्टर

जेसीबी

डंपर

१४

रिफ्युज कॉम्पॅक्टर

३००

सायकल रिक्षा

लोगो : मटा भूमिका

कचरामुक्त कोल्हापूरचा

संकल्प राबविताना

घनकचरा संकलनासाठी राबवलेली प्रभावी यंत्रणा, कचऱ्यापासून विज निर्मिती प्रकल्प, नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, महापालिकेकडून त्यांचे केले जाणारे निसरन, नागरिकांच्या प्रतिक्रीया आणि लँडफील साईट कार्यन्वित करण्यासाठीच्या घेतलेल्या निर्णयामुळे कोल्हापूर महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षणामध्ये देशात १६ वा क्रमांक मिळविला. हा मानांकनामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. महापालिकेची ही कामगिरी कौतुकास्पद असली, तरी भविष्यात शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच कचरा विल्हेवाटीसाठी नव्या पर्यायी जागेचा शोध घ्यावाच लागेल. त्यासाठी राजकीय नेतृत्वाची प्रगल्भता आवश्यक ठरेल. प्रशासनाला आणखी काटेकोर नियोजन करून काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. शहरात तयार होणारा कचरा संकलीत करण्याबरोबर मोठ्या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी लोकांनाही प्रकल्पांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. केवळ कचरा संकलीत केला म्हणजे आपले काम संपले असे न मानता त्यावर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतची आणि नागरिकांच्या शंका-समाधानाची जबाबदारी पूर्णत्वास न्यायला हवी. त्यासाठी कचऱ्यापासून विज निर्मितीचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबरोबरच कॅपिंगलाही त्वरीत सुरुवात करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी २० कर्मचारी निवडणूक शाखेकडे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी सर्वच सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी प्रथम १३० महापालिका अधिकारी, कर्मचारी वर्ग केल्यानंतर आणखी २० कर्मचारी सोमवारी पुन्हा नव्याने नियुक्त करण्यात आले. महापालिकेची आर्थिक वर्षाची अखेर असल्याने वसुली मोहीम जोरात सुरू आहे. मात्र आता अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कर वसुलीवर परिणाम करत आहे. दुपारपर्यंत निवडणुकीचे काम केल्यानंतर सायंकाळी उशीरापर्यंत कर्मचारी विविध करांच्या वसुलीसाठी प्रयत्न करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या कामासाठी विविध सरकारी विभागांचे कर्मचारी निवडणूक शाखेकडे वर्ग केले आहेत. त्यानुसार महापालिकेचे १३० अधिकारी, कर्मचारी यापूर्वीच नियुक्त करण्यात आले. उपायुक्त, मुख्य लेखापरीक्षक, चार उपशहर अभियंता, कामगार अधिकारी, ३० कनिष्ठ अभियंता या प्रमुख अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. उपायुक्त मंगेश शिंदे यांच्याकडे मीडिया मॉनिटरिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांची झोन ऑफिसर म्हणून तर हर्षजित घाटगे यांची नोडल ऑफिसर, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांची आचारसंहिता पथकात नियुक्ती झाली आहे. कायदा व विधी अधिकारी अॅड. संदीप तायडे यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था तर जयेश जाधव यांना झोनल ऑफिसर म्हणून नियुक्त केले आहे. वरिष्ठ लिपिकांची नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी, सहायक झोनल ऑफिसर, आचारसंहिता कक्ष अधिकारी, सहायक कर्मचारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

निवडणूक शाखेकडे सोमवारी आणखी २० जादा कर्मचारी वर्ग करण्यात आले. ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपणार असल्याने महापालिकेच्या सर्वच ‌विभागांची वसुली मोहीम गतिमान झाली आहे. त्यासाठी विशेष पथकही स्थापन केला आहे. मात्र पथकातील काही कर्मचारी निवडणूक शाखेकडे वर्ग केल्याने त्याचा वसुलीवर परिणाम होत आहे. निवडणुकीचे काम केल्यानंतर दुपारनंतर हे कर्मचारी महापालिकेत दाखल होतात. रात्री उशीरापर्यंत कर्मचारी जमा-खर्चाचा ताळेबंद लावत असल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अनेक भागांतपाण्यासाठी धावाधाव

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुरुस्ती किंवा गळती अशी कोणतीही स्थिती नसताना शहराच्या अनेक भागांत नागरिकांना मंगळवारी पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागला. दिवसभरात कळंबा व बावडा फिल्टर हाउस येथून २९ टँकरच्या फेरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. पाणी उपसा सुरळीत असताना केवळ वितरण योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरेज जावे लागत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढत असल्याने पाण्याचीही मागणी वाढत आहे. गेल्या आठवड्यात दोनवेळा दुरुस्तीसाठी शटडाउन घेतल्यानंतर चार दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत झाला. पण मंगळवारी दुरुस्ती किंवा गळती काढण्याचे कोणतेही काम सुरू नसताना अचानक शहराच्या अनेक भागात अपुरा व कमी दाबााने पाणीपुरवठा झाला. सकाळी व सायंकाळी दोन्ही सत्रात अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांना टँकरची प्रतीक्षा करावी लागत होती. तर अनेकजण नगरसेवकांकडे टँकर पाठविण्याची मागणी करत होते. परिणामी दिवसभरात कळंबा व बावडा फिल्टर हाऊस येथून तब्बल २९ टँकर फेऱ्या झाल्या. त्यामुळे ज्या भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही, तेथे नागरिकांची टँकरभोवती गर्दी होत होती.

लक्ष्मीपुरी, पूल गल्ली, नेहरूनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, राजेंद्रनगर, महालक्ष्मी नगर, पाच बंगला, ताराबाई पार्क, राजू गांधी वसाहत, सदर बाजार, कदमवाडी, लाइन बाजार, लोणार वसाहत, कावळा नाका, कामगार चाळ, शिवाजी पार्क व शाहूपुरी परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. दरम्यान, प्रभाग कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने स्वत: नगरसेवकांनी टँकरसाठी फिल्टर हाउस येथे धाव घेतली. त्यामुळे आपल्याच भागात टँकर नेण्यासाठी टँकरची पळवापळवीही करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माढा: भाजपचा उमेदवार घोळ अजूनही सुरूच

$
0
0

पंढरपूर:

शरद पवार यांच्या उमेदवारीने चर्चेत आलेला माढा लोकसभा मतदारसंघ आता भाजपासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. भाजपमध्ये अजूनही उमेदवाराबाबत घोळ सुरू असून कार्यकर्ते गोंधळून गेल्याचे चित्र तयार झाले आहे. मागील चारवर्षांपासून संजयमामा शिंदे यांना माढा लोकसभेसाठी उमेदवार देण्याची तयारी भाजपने केली होती. मात्र, राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना पक्षात घेत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपसमोर प्रश्न निर्माण झाला असल्याची चर्चा सुरू आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ येऊनही अजून भाजपकडून रोज नवीन उमेदवाराचा घोळ सुरू राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर अचानक राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपात प्रवेश झाल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित समजण्यात येत होती. त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र आणि खासदार संजय काकडे यांचे जावई रोहन देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. दोन दिवसापूर्वीच सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित निंबाळकर यांना पक्षात प्रवेश देत त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. मात्र, आज सकाळीपासून पुन्हा राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. त्यामुळे भाजपात उमेदवार निवडीवरुन गोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Vijaysinh Mohite: विजयसिंह मोहिते भाजपकडून लढण्यास तयार!

$
0
0

सोलापूर :

माढा लोकसभा मतदारसंघातील राजकारण रोज नवनवी वळणे घेत असतानाच खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज निवडणूक लढण्याबाबत सूचक विधान केले आहे. भाजपने पक्षादेश दिल्यास माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल, असे मोहिते पाटील म्हणाले. माढा येथे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या घरी भेट देण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

माढा लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादीतील उमेदवारीचा तिढा संपला असला तरी भाजपच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. जो भाजपात प्रवेश करेल त्याच्या नावाची काही काळासाठी उमेदवार म्हणून चर्चाही रंगत आहे. मात्र, उमेदवारीचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.

माढा लोकसभेसाठी भाजपकडून सुभाष देशमुख यांच्या नावाबरोबरच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख, फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार असतील, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरही केले होते. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी मुख्यमंत्री त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. मात्र आज सकाळपासून पुन्हा मोहिते पाटील पिता-पुत्राच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विजयसिंह मोहिते पाटील हे माढा येथे आज माजी आमदार धनाजीराव साठे यांच्याघरी आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना माढा मतदारसंघातून तुम्ही लढण्यास इच्छूक आहात का? असे विचारले असता पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढण्यास तयार आहे, असे ते म्हणाले. अद्यापही तुम्ही भाजपात प्रवेश केला नाही, असे विचारताच त्यांनी स्मितहास्य करत उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये प्रवेश करणार की असे उत्तर दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Madha Loksabha चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना घाबरत नाही: संजय शिंदे

$
0
0

पंढरपूर:

आपण कधी भाजपात प्रवेशच केला नव्हता त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आणि आपण कोणाच्या धमकीला घाबरत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी म्हटले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय शिंदे यांनी भाजपशी गद्दारी केली असून त्याची किंमत मोजावी लागेल असा गर्भित इशारा दिला होता. त्यावर संजय शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

संजय शिंदे हे मागील साडेचार वर्षे भाजप सोबत होते. त्यांनी भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील मिळविले होते. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीने माढा लोकसभेची उमेदवारी देताच शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिंदे यांच्याकडून दगाफटका झाल्याची भावना मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील या दोघांनाही जिव्हारी लागली. संजय शिंदे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. तुमच्याकडे सध्या येणारे नेते कोणत्या तरी भानगडीत अडकलेले असतील पण मी कोणत्याही घोटाळ्यात अडकलेलो नाही. त्यामुळे मी कोणाच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. याउलट, माझ्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजप ग्रामीण भागात पोचायला सुरुवात झाली होती असा दावाही त्यांनी केला. ३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असून भाजपकडून कोणीही उमेदवार असला तरी आमची तयारी झाली असल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी व काँग्रेसच्यावतीने मतदारसंघातील सर्व आमदार व प्रतिनिधींची बैठक जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या सोनके येथील फार्म हाऊसवर पार पडली. यासाठी आमदार रामराजे निंबाळकर, गणपतराव देशमुख, बबनदादा शिंदे, भारत भालके यांच्यासह रश्मी बागल, प्रभाकर देशमुख आणि मतदारसंघातील इतर प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसचे आमदार जीवन गोरे, कल्याण काळे यांनी दांडी मारल्याने आघाडीतही सारे आलबेल नसल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योग क्षेत्राला स्थिर आकाराचा ‘करंट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशाचा आधार घेत महावितरणने गेल्या सात महिन्यात दुसऱ्यांदा वीज दरवाढ केली. वीज दरवाढीचा फटका हा सर्वच क्षेत्रांना बसणार आहे. त्याचा विपरीत परिणाम औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रावर होण्याची भिती कारखानदार, उद्योजक व्यक्त करत आहेत. औद्योगिक ग्राहकांच्या वीज स्थिर आकारात ४१ रुपयांनी वाढ केली आहे. स्थिर आकार हा ३५० रुपयांवरुन ३९१ रुपयावर पोहचला असून या दरवाढीच्या झळा शेतकऱ्यांनाही सहन कराव्या लागणार आहेत.

खासगी शेतीपंपधारक, लघुदाब पाणी पुरवठा संस्थांना मोठा फटका बसणार आहे. गेल्या १५ वर्षाच्या तुलनेत मागील पाच वर्षात वीज दरात भरमसाठ वाढ झाली आहे. त्याचा परिणाम शेती खर्चात वाढ होऊन आर्थिक गणित कोलमडले आहे. दुसरीकडे शेतमालाच्या भावात वाढ झाली नाही याकडेही शेतकरी लक्ष वेधत आहेत. औद्योगिक वीज दरात आठ ते बारा टक्केपर्यंत तर लघुदाब शेतीपंपासाठी बारा टक्के, उच्चदाब उपसिंचन योजनेसाठी आठ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

औद्योगिक विजेचा दर शेजारील राज्यांच्या तुलनेत जास्त आहे, त्याचा परिणाम कारखानदारी, उद्योगक्षेत्राच्या उत्पादनावर होणार असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. 'यंत्रमाग उद्योगाच्या सवलतीच्या दरातील वाढीची रक्कम ३० पैसे व ७२ पैसे प्रति युनिट आहे. संपूर्ण वस्त्रोद्योग सध्या आर्थिक कोंडीच्या व मंदीच्या गर्तेत आहे. ५० टक्के उत्पादन बंद आहे, अशा स्थितीतील दरवाढ उद्योगाला झेपणारी नसल्याचे मत वीज क्षेत्रातील अभ्यासक प्रताप होगाडे यांनी नोंदविले आहे.

...........

वीज आकार कमी, स्थिर आकारात वाढ

औद्योगिक वीज ग्राहकाच्या स्थिर आकारात वाढ झाली असताना वीज आकार तीन पैशांनी कमी झाला आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी व्होल्टेजवर आधारित वीज दर ठरविला जातो. जे उद्योजक जादा दाबाने वीज खेचतात त्यांना वहन आकार कमी होतो. तर जसा दाब कमी तसा वहन आकार जास्त होतो. ६६ केव्हीहून अधिक दाबाने वीज घेणाऱ्या ग्राहकांना वहन आकार शून्य तर ३३ केव्हीसाठी वहन आकार प्रति युनिट १५ पैशांनी कमी झाला आहे. पूर्वी प्रति युनिट सात रुपये दहा पैसे इतका दर होता, तो सात रुपये सात पैसे झाला, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ६६ केव्हीहून अधिक दाबाने वीज घेणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट सात रुपये सात पैसे, ३३ केव्हीसाठी सात रुपये २२ पैसे प्रति युनिट दराने आकारणी होईल.

.........

कोट

'वीज नियामक आयोगाकडून महावितरणने २०१६-१७ या वर्षामध्ये २०२० पर्यंतची दरवाढ करुन घेतली होती. त्यामुळे ही दरवाढ अटळ आहे. पाणी पुरवठा संस्थेच्या उच्च दाब शेतीपंपांना सरकारने सवलतीच्या स्वरुपात एक रुपया सोळा पैसे दराने वीज पुरवठा निश्चित करुन अध्यादेश काढला. पण लघुदाब पाणी पुरवठा संस्था आणि खासगी पंपधारक यांच्याबाबत सरकारने शब्द पाळला नाही.

विक्रांत पाटील-किणीकर, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर इरिगेशन फेडरेशन

.......

'आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत दरवाढ कमी करण्याविषयीचे आश्वासन मिळाले होते. वीज दरवाढ मागे न घेतल्यास आचारसंहिता संपताच आंदोलन केले जाईल.

राजू पाटील, अध्यक्ष, 'स्मॅक'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीचा झटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य वीज नियामक आयोगाच्या सप्टेंबर २०१८ मधील वीज दरवाढीच्या आदेशाची येत्या एक एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. त्या आदेशानुसार घरगुती वापराच्या वीजदरात साधारण आठ टक्के तर, शेती पंपधारकांना आठ ते बारा टक्क्यापर्यंतच्या वाढीची झळ सहन करावा लागणार आहे. महावितरणने सप्टेंबर २०१८ नंतर पुन्हा एकदा वीज दरवाढ केली असून या दोन्ही वाढीची एकत्रित सरासरी सहा टक्के इतकी आहे.

नव्या वीज दरवाढीचा सर्वाधिक फटका सामान्य व मध्यमवर्गीय ग्राहकांना बसणार आहे. स्थिर आकाराचा वाढीव बोजा सहन करावा लागणाार आहे. दरवाढीच्या नव्या आदेशानुसार घरगुती विजेच्या स्थिर आकारात दहा रुपयांनी वाढ होणार आहे. पूर्वी हा दर ८० रुपये होता. आता एक एप्रिलपासून स्थिर आकार ९० रुपये असणार आहे. औद्योगिक ग्राहकांच्या स्थिर आकारात ४१ रुपयांनी वाढ झाली आहे. महावितरणने गेल्या आठ महिन्यांत दुसऱ्यांदा दरवाढ केली. साधारणपणे उन्हाळ्यात वीज वापरात मोठ्या प्रमाणात वाढ होते. आता दरवाढ झाल्यामुळे नागरिकांना गारव्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

.. ... . ..

केवळ 'मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेस्टिक महाराष्ट्र' अशा गोंडस घोषणा करुन प्रश्न सुटत नसतात. त्याला कृतीची जोड द्यावी लागते. ती दिसून येत नाही. मागील सरकारने सप्टेंबर २०१३ मधील दरवाढ रोखण्यासाठी जानेवारी २०१४ पासून दरमहा ६०० कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. या सरकारमध्ये ती धमक नाही. गेल्या चार वर्षांत उत्पादन खर्च, प्रशासकीय खर्च व वितरण गळती नियंत्रणात आणली नाही. त्याचे परिणाम ग्राहकांना भोगावे लागत आहेत.

प्रताप होगाडे, वीज क्षेत्राचे अभ्यासक

....... ..... ..... .... .......

कोल्हापूर विभागातील ग्राहक संख्या आकडेवारी पाच मार्च २०१९ अखेर

जिल्हा घरगुती ग्राहक व्यावसायिक औद्योगिक शेती पंपधारक

कोल्हापूर ८,३२,७९९ ७५७८१ २०२१७ १,४६, ०५६

सांगली ५,५४,७२५ ४९,६४० ९७१३ २,२८,९३७

एकूण १३,८७,५२४ १,२५,४२१ २९,९३० ३,७४,९९३

....... .. .... .... ...

घरगुती वापरासाठी वीज दर

दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एक रुपया दहा पैसे प्रति युनिट वीज पुरवठा होणार आहे. अन्य घटकांसाठी दरमहा १०० युनिटपर्यंत वीज दर प्रतियुनिट ४ रुपये ३३ पैसे असणार आहे. पूर्वी हा दर ४.३० पैसे होता. १०१ ते ३०० युनिट वीज वापरासाठी प्रति युनिटसाठी वीस पैशांनी वाढ झाली आहे. पूर्वी हा दर ८.०३ पैसे होता तर नवीन दरानुसार तो आठ रुपये २३ पैसे झाला आहे. ३०१ ते ५०० युनिटपर्यंत प्रति युनिट ११ रुपये पाच पैसे दर होता. त्यामध्ये वाढ होऊन ११ रुपये आठ पैसे झाला. ५०१ ते १००० युनिटसाठी प्रतियुनिटचा दर १२ रुपये ७८ पैसेपर्यंत पोहचला. पूर्वी ११ रुपये ८० पैसे होता.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतापलेल्या नागरिकांनी कचरा टाकला रस्त्यावर

$
0
0

यादवनगरमधील प्रकार

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खुल्या जागेत टाकलेल्या कचऱ्याचा उठाव होत नसल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकून संताप व्यक्त केला. बुधवारी दुपारी यादवनगर येथे घडलेल्या या घटनेने महापालिका आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ उडाली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घंटागाडीच्या मदतीने कचरा हटविला.

यादवनगर येथे असलेल्या खुल्या जागेत परिसरातील नागरिक कचरा आणून टाकतात. कचरा न टाकण्याच्या सूचना देऊनही नागरिक कचरा टाकत असल्याने येथे कचराच्या ढीग साचतो. याच परिसरात स्क्रॅप व्यवसायिकांची वाहने असल्याने परिसराला अत्यंत गलिच्छ स्वरुप प्राप्त झाले आहे. तसेच येथे असलेल्या ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी सुटली होती. गेल्या पाच-सहा दिवसांपासून येथील कचरा उठाव न झाल्याने संतप्त नागरिकांनी कचरा थेट रस्त्यावर आणून टाकला.

यादवनगरच्या मुख्य चौकात कचरा टाकल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील बनले. याबाबतची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली. आरोग्य विभागाचे कर्मचारी घंटागाडीसह दाखल झाले. त्यांनी रस्त्यावरील सर्व कचरा हटवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ज भरतेवेळी शक्तिप्रदर्शनासाठी लागणार परवानगी

$
0
0

परवानगी नसल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लोकसभा निवडणुकीसाठी गुरूवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी ४ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जातील. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. न घेतल्यास संबंधित उमेदवाराविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होईल. वाहनांचा वापर झाल्यास ती जप्त केली जातील', अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येताना तीन पेक्षा अधिक वाहने असू नयेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज देण्यासाठी येताना १०० मीटर अंतरापासून उमेदवारासोबत पाच व्यक्तींनाच परवानगी असेल. याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी बंदोबस्ताला असतील. उमेदवाराला अर्जासोबत मालमत्ता विवरण प्रतिज्ञापत्र आणि गुन्ह्यासंबंधीची माहिती द्यावी लागेल. यावर आक्षेप असेल तर आक्षेप घेणाऱ्यासही प्रतिज्ञापत्र दाखल करणे बंधनकारक आहे. आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेणार नाहीत. न्यायालयात निर्णय घेईल. एका उमेदवारास अधिकाधिक चार अर्ज भरता येतील. देशातील कोणत्याही व्यक्तीस येथून निवडणूक अर्ज दाखल करता येईल. मात्र अनुमोदक मतदारसंघातील असणे सक्तीचे आहे. अनुमोदकास आपले नाव कोणत्या मतदारसंघातील मतदारयादीत आहे, त्याची नोंद करावी लागेल. उमेदवारी अर्ज भरलेल्या दिवसापासून ते निकाल लागेपर्यंतचा खर्च द्यावा लागेल. दैनंदिन खर्च, रोख पैसे, बँक स्टेटमेंट माहितीची नोंद ठेवावी लागेल. उमेदवार खर्च नोंदवही मतदान दिवसापर्यंत तीन वेळा खर्च नियंत्रण समितीकडे द्यावी लागेल. उमेदवारांच्या खर्चाची क्रॉस तपासणी केली जाईल. तफावत आढळल्यास उमेदवारास लेखी समज दिली जाईल. न ऐकल्यास निवडणूक आयोगाकडे त्या उमेदवाराविरोधात अहवाल पाठवला जाईल.'

.........

सी-व्हिजीलवरील

तक्रारीस विलंब

'निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सीव्हिजीलवर आलेल्या आचारसंहिता भंग तक्रारीचे निरसन १०० मिनिटांत करणे बंधनकारक आहे. मात्र सध्याचे मनुष्यबळ आणि भौगोलिक परिस्थितीमुळे १०० मिनिटांत सर्व तक्रारींचे निरसन करता आलेले नाही. यामुळे येत्या काही दिवसात मनुष्यबळ वाढवून यंत्रणा गतिमान केली जाईल. निर्धारित वेळेत तक्रारींचा निपटारा होईल', असे देसाई यांनी सांगितले.

....

मतदान केंद्राची

संख्या वाढणार

'१४०० मतदारसंख्येस एक मतदान केंद्र असावे, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे. यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या २ हजार १३२ मतदान केंद्रात १६ नविन केंद्रांची वाढ होईल. हातकणंगले मतदारसंघामध्ये १८०७ मध्ये ४९ केंद्रे नव्याने वाढणार आहेत. पुरवणी मतदार यादी ४ एप्रिलला प्रसिध्द होइल. यामध्ये नाव असणाऱ्यांना मतदान करता येईल', असे अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाची जाण असलेल्या उमेदवाराला पाठिंबा

$
0
0

माजी नगरसेवक संघटनेचा बैठकीत निर्णय

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'थेट पाईपलाईन, अमृत योजना, पंचगंगा प्रदूषणासह शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणारा आणि विकासाची जाण असणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात येईल.' असा ठराव माजी नगरसेवक संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अनिल कदम होते.

कदम म्हणाले, ' ही संघटना राजकीय पक्षविरहीत आहे. सर्व माजी नगरसेवक सामाजिक हीत व नागरी समस्यांबाबत आवाज उठवतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सामाजिक कार्याची जाण असलेल्या उमेदवाराच्या पाठीशी बहुसंख्येने राहू या.' किरण दरवान म्हणाले, 'निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांना सहकार्य करणारा व समाजाची नाळ न तोडणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देऊ.' सुजय पोतदार यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून विकासाची जाण असलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. यावेळी आप्पा बेडकर, दिलीप माने, अनिल चव्हाण, अनिल कोळेकर, सुरेश सुतार, धनाजी आमते, आप्पासो गायकवाड, विलास केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वृत्त बातमी....

$
0
0

निर्मला जाधव

कोल्हापूर : नागाळा पार्क परिसरातील श्रीमती निर्मला यशवंतराव जाधव (वय ९०) यांचे निधन झाले. शिवाजी विद्यापीठातील निवृत्त सहायक अधीक्षक विजय जाधव यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

०००

विजय शिंदे

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत सुतार मळा येथील विजय बाळासाहेब शिंदे (वय ३८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मॅकने महिलांना औद्योगिक प्रशिक्षण द्यावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

'औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण पन्नास टक्के पर्यंत वाढविण्यासाठी स्मॅक आयटीआयने प्रयत्न करावा. त्यापुढील मुलींना कमिन्स इंडिया आणखी शिष्यवृत्ती साठी मदत करेल' असे प्रतिपादन कमिन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदिप सिन्हा यांनी व्यक्त केले. स्मॅक आयटीआय भवनाच्या पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष सुरेंद्र जैन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कमिन्स इंडियाचे अधिकारी राजीव बात्रा, सौम्या चतुर्वेदी व स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील प्रमुख उपस्थित होते.

कमिन्सचे इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सिन्हा म्हणाले, 'कमिन्स इंडिया गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी स्वतंत्र इंजिनीअरिंग कॉलेज चालविते. त्याच प्रमाणे स्मॅकने आयटीआयच्या माध्यमातून महिलांना औद्योगिक प्रशिक्षण देण्यात पुढाकार घ्यावा. यामुळे आगोदरच विस्तारलेला कोल्हापूरचा उद्योग महिलांच्या सहभागामुळे देशात उदाहरण ठरेल.'

स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, 'स्मॅक आयटीआयमध्ये मुलींना प्रवेशासाठी प्रोत्साहन देवून त्यांना शैक्षणिक शुल्कात विशेष सवलत दिली आहे. महाराष्ट्रात प्रथम आलो आहे, तसे देशात एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करू.'

जेष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर, संजय शेटे, सचिन मेनन, सचिन पाटील, दिपक जाधव, निरज झंवर, भरत जाधव, रोहित मोदी, प्रशांत शेळके आदी उपस्थित होते. स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी आभार मानले. शैलेश कासार व स्नेहल धने यांनी सूत्रसंचालन केले.

सात उद्योजकांकडून मदत

स्मॅक आयटीआयच्या उभारणीसाठी एमआयडीसीमधील ७ उद्योगपतींनी प्रत्येकी ११ लाखांची मदत केली. गॅनट फाउंड्री प्रा. लिमिटेड, जैन व्हर्सटाइल इंजिनीयर्स प्रा. लिमिटेडचे जनवाडकर, सरोज आयर्न इंडस्ट्रीजचे जाधव, एस. बी. रिसेलर्स प्रा. लिमिटेडचे शिरगावकर, परफेक्ट पिन्सचे मोदी, उषा एंटरप्राईजचे शेळके, मेनन अँड मेनन प्रा. लिमिटेडचे विजय मेनन या सर्वांनी प्रत्येकी ११ लाखांची मदत केली.

फोटो ओळ

शिरोली येथील स्मॅक आयटीआय भवनची पायाभरणी करताना कमिन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप सिन्हा. यावेळी स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, राजू पाटील, सचिन मेनन, राजीव बात्रा, आशा जैन आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाळूमामा देवस्थानाला १३८ किलोची चांदीची मूर्ती

$
0
0

मूर्तीचा फोटो...

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानास महाराष्ट्र-मध्यप्रदेश मेंढपाळ धनगर समाजाकडून ५० लाख रुपये किमतीचा रथ नुकताच अर्पण केला होता. याचबरोबर १३८ किलोची अंदाजे ५० लाख रुपये किमतीची चांदीची मूर्तीसुद्धा नुकतीच अर्पण केली आहे. या मूर्तीबरोबर नाग मूर्ती व घोड्याची मूर्तीही देण्यात आली आहे. या मूर्ती हुपरी येथे तयार केल्या आहेत. मूर्तीची मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली असून, १ एप्रिलला नव्या रथामधून निढोरी ते आदमापूर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

मिरवणुकीसाठी मध्यप्रदेश, राजस्थान, नाशिक येथील विविध वाद्ये येणार आहेत. येथील दोन हजार भाविकही या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. बकऱ्याच्या कळपामधून आणले जाणारे दुधाचे कलशही मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. राजस्थानमध्ये हा रथ बनवला आहे. तो बनवण्यासाठी १५ कारागीर दोन वर्षे काम करत होते. बाळूमामांचे पशुपक्ष्यांवरील प्रेम लक्षात घेऊन रथावर शेळी, मेंढी, बकरा, घोडा, हत्ती, कुत्रा, हंस अशा प्राणी-पक्ष्यांच्या हुबेहुब प्रतिकृती तयार केल्या आहेत. रथ बनविण्यासाठी ५० लाख रुपये खर्च धनगर समाज बांधवांकडून संकलित केला आहे. विष्णू गणपतराव गायकवाड, बापूमामा पिंपरीकर या बाळूमामांच्या भक्तांनी पुढाकार घेऊन यशप्रभा आर्टस् या कंपनीद्वारे हा रथ तयार केला आहे. रथाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी होत आहे.

राजस्थान व मध्यप्रदेशमधून आलेले दलपतराज ताराचंदणी मंडोरा, यशवंत भाई, तानूहारी नानोहर, मिठाराम भाऊ विठ सरम, दिगंबर पूना कारंडे, सुभाष बाळू कोळपे, नारायण कारंडे, आदींनी देवस्थान समितीकडे रथ सुपूर्द केला होता. आता या रथामध्ये बसवली जाणारी चांदीची बाळुमामांची चार फूट उंचीची मूर्तीही अर्पण केली आहे.

०००००

चौकट...

भंडारा उत्सव १ ते ३ एप्रिल

बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवानिमित्त ३ एप्रिल २०१९ अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी वीणापूजन, पहाटे आरती, समाधीचे पूजन, काकड आरती, कीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम होतील. १ एप्रिल रोजी जागर, २ एप्रिलला पहाटे ४ ते ६ कृष्णात डोणे यांची भाकणूक होईल. सकाळी १० वाजता महाप्रसाद व ३ एप्रिलला सकाळी नऊ वाजता श्रींचा पालखीसोहळा आदमापूर गावातून निघणार असून, दुपारी चार वाजता प्रसाद होऊन भंडारा उत्सवाची सांगता होणार आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरण्यकेशी नदीपात्रात शेतकऱ्यांकडून बांध

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीकाठावरील काही गावच्या शेतकऱ्यांनी नदीपात्रातच कोणाचाही परवाना न घेता बांध घालून पाणी अडविण्याचा प्रताप केला आहे. उपसाबंदी असल्याने पुढील पाणी आवर्तन येईपर्यंत जास्त पाणी मिळविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. पण यामुळे त्यांच्या खालील भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांची तहान भागण्यास विलंब होणार, याची त्यांनी जाणीवच ठेवलेली नाही.

हिरण्यकेशी नदीच्या काठावरील खेडगे, मेढेवाडी, दरडेवाडी गावच्या परिसरातील शेतकऱ्यांनी थेट नदीच्या पात्रातच भले मोठे बांध रचले आहेत. विशेष म्हणजे यासाठी जेसीबीचा वापर केला आहे. परिणामी नदीतून वाहणारे पाणीच जाम झाले आहे. सर्वांत वरच्या पश्चिम बाजूकडील धनगरवाडी पाणी प्रकल्पातून सोडलेले पाणी ग्रामस्थांच्या या काही बंधाऱ्यांच्या अडथळ्यांमुळे खाली सरकण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नदी उतारावरील खालील पूर्व दिशेकडील शेतकरी आणि त्यांची पिके भर उन्हाळ्यात तहानेने व्याकुळ झाली आहेत.

उन्हाळ्यात चित्री आणि हिरण्यकेशी नदीतील पाणी उपसण्यावर पाटबंधारे विभागाकडून सक्तीची बंदी लावली जाते. उपलब्ध पाणीसाठा पुरेपूर आणि काटकसरीने वापरण्याचे त्यामागे नियोजन असते. त्यामुळे साधारणतः पंधरा-वीस दिवसांनंतर पाण्याची आवर्तने शेतकऱ्यांना मिळतात. सध्या हिरण्यकेशीवर उपसबंदी उठली आहे. धनगरवाडी पाणी प्रकल्पातील पाणी सोमवारी सोडले आहे, पण अद्याप ते देवर्डेपर्यंत जेमतेम पोहोचले आहे. साळगाव व सोहाळेपर्यंत पोचण्यास विलंब लागणार असल्याने येथील सर्वजण कासावीस झाले आहेत.

नदीपात्रातील बांधांची माहिती विभागास मिळाली आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध मनुष्यबळ कमी असल्याने संपूर्ण नदीपात्र निगराणीखाली ठेवणे तसेच जेसीबीच्या साहाय्याने रचलेले बांध तातडीने काढण्यास विलंब होत आहे. तरीही विभागाने खेडगे बांध फोडला असून, उर्वरित गावच्या सरपंच व शेतकऱ्यांना तहसीलदारांमार्फत सक्त कारवाईचा इशारा दिला असल्याचे पाटबंधारे शाखा अभियंता मळगेकर यांनी सांगितले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा लाखांची रोकड कोदाळी येथे जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोदाळी (ता. चंदगड) येथे निवडणूक विभागाने अवैध वस्तूंची वाहतूक होऊ नये, म्हणून स्टॅटिक पॉइंट नेमला आहे. तेथे निवडणूक विभागाचे पथक कार्यरत आहे. मंगळवारी रात्री गोव्याकडून चंदगड तालुक्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असताना मोटारीमध्ये नऊ लाख ७६ हजार ४१० रुपयांची रोकड सापडली. निवडणूक आचारसंहिता पथकाने ती जप्त केली. पथकाचे प्रमुख सुनील कोरवी यांनी चंदगड पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रथमदर्शनी ही रक्कम मसाला व्यापाऱ्याची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात कोदाळीसह सीमा परिसरात निवडणूक विभागाने अवैध वस्तूंची वाहतूक होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी पथके तैनात केली आहेत. मंगळवारी रात्री गोव्याकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी कोदाळी येथे स्टॅटिक पॉईंट नेमला आहे. तेथे दोडामार्ग तिलारी घाटातून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीत (के. ए. २२, झेड. ०१७४) ९ लाख ७६ हजार ४१० रुपयांची रोकड सापडली. पथकाचे प्रमुख सुनील कोरवी यांनी बाबतची माहिती अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विनोद रणावरे यांना दिली. रात्री तपासणीसाठी मोटारीसह चालक के. पवनकुमार व मालक मल्लिकार्जुन (दोघेही रा. बेळगाव) यांना चंदगड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आपण मसाले व्यापारी असून, गोव्यातून उधारीची रक्कम आणल्याचे सांगितले. याबाबत पोलिस उपनिरीक्षक पी. बी. कदम यांच्याशी संपर्क साधला असता प्रथमदर्शनी ही रक्कम मसाल्याच्या उधारीची वाटते. मात्र, याबाबत तपास केल्यानंतरच अधिक माहिती उघडकीस येईल, असे त्यांनी सांगितले.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हातकणंगलेतून अपक्ष निवडणूक लढविणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा वारणानगर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती चिकुर्डे (ता. वाळवा) येथील माजी सैनिक आनंदराव सरनाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

सरनाईक म्हणाले, 'हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांबरोबर इतर घटकांनाही अडचणीत आणण्याचे काम केले आहे. ते स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत आहेत. मी देशसेवेचे काम केले असल्यामुळे मला जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्न करावा असे वाटते. त्या दष्टीने मी सातत्याने सक्रिय राहिलो आहे. मी माझ्या चिकुर्डे गावात स्वखर्चाने लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून जनतेने निवडून दिले. समाजात देशसेवा करणारे खासदार होऊ शकत नाहीत का? मतदारसंघातील कार्यकर्ते आणि जनतेच्या आग्रहाखातर मी लोकसभेची निवडणूक लढवत आहे. देशात समान कायदा तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनास हमीभाव मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी चिकुर्डे ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चाने कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन करून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे.'

ते पुढे म्हणाले, 'आतापर्यंत हातकणंगले लोकसभेच्या दोन व पन्हाळा-शाहूवाडी व वाळवा-शिराळा विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. त्यावेळच्या निवडणुकीत जनतेने मला तिसऱ्या क्रमांकाची मते दिली आहेत. विविध सामाजिक, राजकीय उपक्रमांच्या माध्यमांतून सर्व घटकांना योग्य तो न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्नही केला आहे. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मला मतदारांनी १२ हजार मते मिळाली आहेत.'

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षादेश शिरसावंद्य मानून काम करा

$
0
0

सिंगल फोटो...

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'शिरोळ तालुक्यातील जनतेने निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार कोण हे जनताच ठरवणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू. कार्यकर्त्यांनी पक्षादेश शिरसावंद्य मानून लोकसभा निवडणुकीत काम करावे,' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या जयसिंगपूर येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे इचलकरंजीचे नेते मदन कारंडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे, जिल्हा उपाध्यक्ष इकबाल बैरागदार, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर प्रमुख उपस्थित होते.

मदन कारंडे म्हणाले, 'डॉ. राजेंद्र पाटील यांचे सहकार, शिक्षण यासह विविध क्षेत्रांतील कार्य उत्तुंग आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार होणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत मोदींना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी घेतलेले निर्णय स्विकारून कामाला लागावे.'

लोकसभेसह अन्य निवडणुकीमध्ये मदत आम्ही करायची. पुन्हा, आम्ही ज्यांना मदत केली ते लोक आमचा पैरा फेडण्याऐवजी आम्हालाच विरोध करतात, अशी खंत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष इकबाल बैरागदार यांनी व्यक्त केली. येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आमदारकीची माळ डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गळ्यात पडली पाहिजे, असे पंचायत समितीचे माजी सभापती मल्लाप्पा चौगुले म्हणाले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सुभाषसिंग रजपूत, दादेपाशा पटेल, अफसर पटेल, आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अण्णासाहेब क्वाणे यांनी आभार मानले.

याप्रसंगी माजी जि.प. अध्यक्ष नानासाहेब गाट, राष्ट्रवादीचे हातकणंगले तालुकाध्यक्ष डी. बी. पिष्टे, रावसाहेब भिलवडे, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, अक्षय आलासे, दिलीप मगदूम, संजय नांदणे, आदींसह जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

00000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images