Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आज मोफत कार्यशाळा

$
0
0

कोल्हापूर : 'दहावी, बारावीनंतर करिअरमधील संधी' याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी सुमित कोचिंग क्लासेसच्या वतीने रविवारी (ता. २४) केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी दहा वाजता मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. एनईईटी, जेईई, सीईटी परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. सुमित कुलकर्णी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आण्णासाहेब पाटलांचे विचार प्रेरणादायी’

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अण्णासाहेब पाटील यांचे विचार मराठा समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारावर कोल्हापूर मराठा समाजाची वाटचाल सुरू आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य मराठा समाजासाठी वेचले,' असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. मराठा महासंघातर्फे आयोजित अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यातिथीनिमित्त माथाडी कामगारांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.

मुळीक म्हणाले, 'मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रथम अण्णासाहेबांनी आवाज उठवला. समाजातील विविध समस्या सोडविण्याचे काम केले. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्याचदरम्यान त्यांनी माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठीही प्रयत्न केले. राज्यभरात माथाडी कामगारांचे संघटन करून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. आता पुन्हा माथाडींना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांची सोडवणूक करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नाची गरज आहे.'

यावेळी ज्येष्ठ माथाडी कामगारांचा सत्कार करण्यात आला. अमरसिंह जाधव यांना पीएचडी, तर डॉ. रघुनाथ वाडकर यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाची डी.लिट्. पदवी मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

अण्णासाहेब पाटील, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत, अजय इंगवले, दीपक पाटील, शंकरराव शेळके, रामचंद्र पोवार, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते. मिलिंद पाटील यांनी स्वागत केले. विजय काकोडकर यांनी प्रास्ताविक केले. विद्या साळोखे यांनी सूत्रसंचालन केले. शैलजा भोसले यांनी आभार मानले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीच्या बैठकीत ठरणार रणनिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व त्यांच्या समर्थकांनी उघडपणे प्रचाराला सुरुवात केल्यामुळे दोन्ही आघाडीत पॅचअप करण्यासाठी प्रयत्न वेगावले आहेत. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी ता.२४ काँग्रेस कमिटीत बैठक होत आहे. या बैठकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे महाडिकासोबतचे वैरत्व विसरुन प्रचारासाठी सहभागी होणार हाच औत्सुक्याचा विषय आहे. दरम्यान आघाडीच्या संयुक्त प्रचाराच्या नियोजनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तब्बल वीस वर्षांनी काँग्रेस कमिटीत प्रवेश करणार आहेत.

काँगेसमध्ये १९९९ मध्ये विभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रवादीच्या स्थापनेमुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. काँग्रेसमधील बहुसंख्य नेते राष्ट्रवादीत सामील झाले. ही सारी मंडळी दोन दशकानंतर रविवारी बैठकीच्या निमित्ताने काँग्रेस कार्यालयात जमणार आहेत. सकाळी ११.३० वाजता बैठकीला प्रारंभ होईल. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, मानसिंगराव गायकवाड, महापौर सरिता मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. काँग्रेसच्या माजी आमदारांनाही बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान खासदार महाडिक यांच्या ताराराणी चौक येथील कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

सतेज पाटील यांच्याकडे लक्ष

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उघडपणे खासदार महाडिकांच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे. या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी पक्षीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोघांमध्ये पॅचअॅप घडवले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या बैठकीत आमदार पाटील सहभागी होणार का यावर बरेचसे अवलंबून आहे. त्यांचे समर्थक शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात आहेत. दुसरीकडे काँग्रेसने आमदार पाटील यांची सातारा, सांगली लोकसभा निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. या बैठकीच्या निमित्ताने ते रविवारी सांगली दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे त्यांच्या बैठकीतील सहभागाविषयी साशंकता आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्ष आवाडे यांनी शनिवारी काँग्रेस कमिटीत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांना रविवारच्या बैठकीला उपस्थित राहण्याविषयी कळविल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले. काँग्रेसच्या नगरसेवकांना बैठकीविषयी कळविले नसल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरेंद्र पाटील यांची आज उमेदवारी जाहीर होणार

$
0
0

नरेंद्र पाटील यांची आज उमेदवारी जाहीर होणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सातारा लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून अण्णासाहेब पाटील महामंडळ आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची आज रविवारी (ता. २४) उमेदवारी जाहीर होणार आहे. रविवारी कोल्हापुरात तपोवन मैदानावर भाजप-शिवसेना युतीच्या प्रचार शुभारंभ सभेत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा उद्धव ठाकरे करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या विरोधात पाटील यांची लढत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांची बैठक

$
0
0

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर : निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनची बुधवारी बैठक झाली. अलंकार हॉल येथे झालेल्या बैठकीत पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी योग प्रशिक्षिका डिंपल गजवानी यांनी मन:शांती, तत्वज्ञान यावर योगाच्या सहाय्याने मात करता येत असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मदनराव चव्हाण, विष्णू कुंभार, बाबासाहेब गवाणी-पाटील, पंढरीनाथ मांढरे, पी. ए. पाटील, प्यारे जमादार, विलास देवुडकर, अशोक कांबळे, परशुराम रेडेकर, मोहन माणकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायन, वादनाची सुरेल मैफल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शास्त्रीय गायन आणि हार्मोनियम वादनाचा सुरेल आस्वाद शनिवारच्या सायंकाळी कलारसिकांनी लुटला. उपज कला मंचतर्फे येथील गायन समाज देवल क्लबमधील अच्युतराव भांडारकर कलादालन येथे युवा पिढीच्या शास्त्रीय गायिका कीर्ती कुमठेकर यांच्या गायनाची व हार्मोनियमवादक रोहन महेकर यांच्या वादनाची मैफल रंगली.

वादक रोहन महेकरने यांनी सांगीतिक मैफलीला सुरुवात केली. विलंबित झपतालमध्ये राग चारुकेशी सादर केला. छोटा ख्याल व अभंग रचना सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. तबलासाथ प्रशांत देसाई यांनी केली. दरम्यान, सुभाष नागेशकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार केला.

युवा पिढीच्या गायिका कीर्ती कुमठेकरने गायनाची सुरुवात 'राग जैताश्री'ने केला. पंडित कुमार गंधर्व यांची 'रंग ना दारो शामजी' ही रचना राग सोहनीमध्ये सादर केली. त्यानंतर तराणा, नाट्यगीत ऐकवित मैफलीची सांगता झाली. संगीतसाथ रोहन मयेकर, प्रदीप कुलकर्णी यांनी केली. प्रदीप कुलकर्णी व सुचित्रा मोर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणग्रस्तांचे आंदोलन स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारशी झालेल्या धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन काही चांगले निर्णय झाल्याने श्रमिक मुक्ती दलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली ४० दिवस सुरू असलेले आंदोलन स्थगित केले. आचारसंहितेमुळे निर्णयाची अंमलबजावणी करता येत नसल्याने आंदोलन स्थगित केल्याचे पत्रक संघटनेने प्रसिद्ध केले आहे.

आंदोलनात वारणा, कुंभी, उचंगी, सर्फनाला, धामणी धरणग्रस्त सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ३८ दिवसांच्या आंदोलनानंतर सरकारसोबत आंदोलकांशी मुंबईत चर्चा झाली. चर्चेत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतले, पण जिल्हापातळीवरही निवेदनही देऊनही प्रशासन योग्य निर्णय घेण्यात अपयशी ठरल्याने निवडणुकीनंतर पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भादोले येथील धरणग्रस्तांना वीस वर्षांपूर्वी भूखंडाचे वाटप झाले होते. पण त्यांना कब्जेपट्टी दिली नव्हती. प्रशासनाने धरणग्रस्तांना भूखंडाची कब्जेपट्टी दिली असून, त्या कागदपत्रांचे समारंभपूर्वक आंदोलनस्थळी वाटप केले आहे.

आंदोलनात जिल्हाप्रमुख मारुती पाटील, डी. के. बोडके, दाऊद पटेल, आनंदा आमकर, भगवान झोरे, पांडुरंग कोठारी, अशोक पाटील, आदींनी भाग घेतला होता.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणूकधारकांचा मंगळवारी मेळावा

$
0
0

कोल्हापूर : पर्ल्स गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळण्यासंदर्भातील माहिती देण्यासाठी मंगळवारी (ता.२६) दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन मेळावा होणार आहे. कॉ. शंकर पुजारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार आणि लोढा समितीच्यामार्फत गुंतवणूकधारकांची रक्कम परत देण्यासाठी एप्रिलअखेर ऑनलाइन फॉर्म भरुन घेण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पॅनकार्ड, गुंतवणूकीचे मूळ प्रमाणपत्र, हप्ते भरलेल्या पावत्या स्कॅन करणे आवश्यक आहे. मेळाव्यात ऑनलाइन फॉर्म भरण्यासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील गुंतवणूकधारकांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहनही पुजारी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मी कॉंग्रेसमध्ये राहणार: गोरे

$
0
0

मी कॉंग्रेसमध्ये राहणार

कराड :

'भाजप पक्ष प्रवेशाबाबतच्या चर्चा तर होणारच, पण वस्तूस्थिती तशी नाही. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबतची वस्तूस्थिती ते सांगतील. मात्र, मी कॉंग्रेसमध्ये होतो, कॉंग्रेसमध्ये आहे आणि कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. या बाबत कधीही शंका घ्यायचे काम नाही,' असा खुलासा माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

येथील पंकज हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजित कदम, आमदार आनंदराव पाटील यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कमराबंद चर्चा झाली. या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गोरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत काम करत असताना येणाऱ्या अडचणीबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली. माझी पहिल्यापासूनची मागणी सांगितली की राष्ट्रवादी सोबत काम करताना कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान हा राहिला पाहिजे. कोठे कॉंग्रेसला दुजाभाव मिळता कामा नये. माझा मतदारसंघ हा माढ्यात असून, माढ्यावरती माझे पूर्ण लक्ष आहे आणि राष्ट्रवादीने असे काही पुण्य केले नाही की, मी त्यांच्या पदरात काही तरी टाकावे. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघात मी महाराजांबरोबरच आहे. मी कॉंग्रेस सोबतच असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबरच काम करणार आहे.

मलकापूरात दोन गटांतील मारामारी प्रकरणी चौदा जणांवर गुन्हा

म.टा.वृत्तसेवा,कराड : 23 मार्च 2019

मलकापूर,ता.कराड येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुंबळ मारामारी झाल्याची घटना गुरू.21 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.याप्रकरणी दोन्हीकडील चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरबाज शेख,अलतमेश मु"ा,इकलास खोजी,सईद शिकलगार (रा.मंडई कराड),नाजीम सय्यद,कमरअली मुतवली,तौफिक इनामदार तिघेही (रा.दर्गा मोह"ा,कराड)व इतर अनोळखी सात जण (नावे समजू शकली नाहीत) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

मलकापूर (धनगरवाडा) येथे बाबा मेडीकलसमोर अरबाज व अरिन सय्यद व सईद शिकलगार यांच्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा समेट करण्याकरीता गेले असता इकलास खैजी यांच्यासोबत चर्चा करीत असताना इकलास व त्याच्याबरोबर असणाऱ्या मित्रांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.त्यानंतर घरी येत असताना अरबाजचा पाठलाग करून काहीनी दांडक्याने व तलवारीने मारहाण करण्यास सुरूवात केली.अरबाज शेख याने हातातील दांडक्याने मानेवर व कमरेवर मारहाण केली व अलतमेश मु"ा याने तलवारीने अरबाजच्या पायावर वार केला आहे.याप्रकरणी अरबाज आयाज बागवान याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

बाबा मेडीकल समोरच इकलाश,आकिब पठाण,अरबाज शेख,अलतमेश मु"ा व अरबाज शेखचा मित्र (नाव माहित नाही) असे सर्वजण गप्पा मारत असताना अचानकपणे मलकापूर गावातून सईद शिकलगार व त्याच्याबरोबर इतर लोक इकलास खोजी याच्याजवळ आले व अकिबा पठाण व अलतमेश मु"ा या दोघांना दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. सदरचा प्रकार बघून इकलास खोजी,अरबाज शेख व त्याचा मित्र यांनी मारामारी सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना सईद शिकलगार याने हातातील कोयत्याने इकलासच्या डोक्यात वार केला व आरिन सय्यद याने त्याचे हातातील दांडक्याने इकलाशच्या पाठीत मारले.त्यातील कमरअली मुतवली व नाजीम सय्यद यांनी इकलाशच्या हातावर व पोटात पाईप व दांडक्याने मारहाण केली.

याबाबत इकलाश इनाईतु" खोजी याने फिर्याद दिली आहे.त्यानुसार कराड शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून याप्रकरणी दोन्हीकडील चौदाजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कराडजवळील सुर्लीत कापलेला गहू पेटवल्याने एकावर गुन्हा

म.टा.वृत्तसेवा,कराड : 23 मार्च 2019

एकाने दारू पिऊन शिवीगाळ करत कापून ठेवलेल्या गव्हास आग लावल्याची घटना सुर्ली,ता.कराड येथे शुक"वारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.पद्मावती कृष्णत फुके (वय 30,रा.सुर्ली) यांनी कराड ग"ामीण पोलिसात याबाबतची फिर्याद दिली असून याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पद्मावती फुके यांचे विहरीजवळच्या शेतात गहू कापून ठेवला होता.या कारणावरून शुक"वारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दिर मिथुन आनंदा फुके (रा.सुर्ली) हा दारू पिऊन शिवीगाळ करू लागला व कापून ठेवलेल्या गव्हाच्या बुचडीस काडीपेटीने आग लावली.यामध्ये सुमारे 7 हजार रूपये किंमतीचा 2 क्विंटल गहू आगीत जळून खाक झाला.

याबाबत पद्मावती फुके यांनी ग"ामीण पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी दिरावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृष्णा’त विक्रमी ९१०० मेट्रिक टनाचे गाळप

$
0
0

कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने या हंगामात १८ मार्च रोजी ९१०० मेट्रीक टन इतके विक्रमी गाळप केले आहे. कारखान्याच्या इतिहासातील हे एका दिवसांतील सर्वाधिक गाळप असून, कारखान्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा विक्रम दोन वेळा केला असून, सोमवारी कारखान्याच्या ६० वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च गाळप झाल्याने 'कृष्णा'च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कृष्णा कारखान्याने या हंगामात आजअखेर प्रतिदिन सरासरी ८००० मेट्रीक टनाहून अधिक क्षमतेने ९ लाख ९७ हजार ६४० मे. टन गाळप केले असून, १२ लाख ७४ हजार ४२० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. दिवसाचा साखर उतारा १३.५५ टक्के तर सरासरी उतारा १२.७० टक्के आहे. अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्वी १ जानेवारी २०१६ रोजी ९०४० मेट्रीक टन इतके एका दिवसांत उच्चांकी गाळप केले होते. त्याच बरोबर गतवर्षी कारखान्याने १५ लाख २१ हजार ६५ क्विंटल साखर उत्पादित केली होती.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृष्णा’त विक्रमी९१०० मेट्रीक टनाचे गाळप

$
0
0

'कृष्णा'त विक्रमी

९१०० मेट्रीक टनाचे गाळप

कराड :

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने या हंगामात १८ मार्च रोजी ९१०० मेट्रीक टन इतके विक्रमी गाळप केले आहे. कारखान्याच्या इतिहासातील हे एका दिवसांतील सर्वाधिक गाळप असून, कारखान्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या संचालक मंडळाच्या कारर्किदीत एका दिवसांत सर्वाधिक गाळप करण्याचा विक्रम दोन वेळा केला असून, सोमवारी कारखान्याच्या ६० वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च गाळप झाल्याने 'कृष्णा'च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कृष्णा कारखान्याने या हंगामात आजअखेर प्रतिदिन सरासरी ८००० मेट्रीक टनाहून अधिक क्षमतेने ९ लाख ९७ हजार ६४० मे. टन उसाचे गाळप केले असून, १२ लाख ७४ हजार ४२० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. दिवसाचा साखर उतारा १३.५५ टक्के असून, सरासरी साखर उतारा १२.७० टक्के इतका आहे. अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्वी १ जानेवारी २०१६ रोजी ९०४० मेट्रीक टन इतके एका दिवसांत उच्चांकी गाळप केले होते. त्याच बरोबर गतवर्षी कारखान्याने १५ लाख २१ हजार ६५ क्विंटल साखर उत्पादित केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

nimbalkar: आता काँग्रेसचे निंबाळकरही भाजपच्या वाटेवर

$
0
0

सातारा

माढा लोकसभा मतदारसंघात दबदबा असलेले काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपात प्रवेश करत आहेत. नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची माढ्यातील स्थिती मजबूत होणार असून काँग्रेसला फटका बसणार असल्याची चर्चा माढा मतदारसंघात रंगली आहे. नाईक निंबाळकर उद्या (सोमवारी) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

अहमदनगरमधील काँग्रेसचे सुजय विखे पाटील आणि उस्मानाबादमधीर रणजितसिंह मोहिते पाटील, मुंबईतील प्रविण छेडा आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार यांच्यानंतर नाईक निंबाळकर यांचा भाजपत प्रवेश होणार आहे. नाईक निंबाळकर यांचा सातारा जिल्ह्यातील माण, खटावस फलटण या माढा मतदार संघात येणाऱ्या तालुक्यांत मोठा प्रभाव आहे. याच कारणामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माढ्यातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांचा संजय शिंदे यांच्याशी थेट मुकाबला होणार आहे. काही दिवसांपूर्वीच नाईक निंबाळकर यांना काँग्रेसने जिल्हाध्यक्ष पद देऊ केले होते. अंतर्गत वादामुळे नाईक निंबाळकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे बोलले जात आहे.

परभणीत राष्ट्रवादीला धक्का?

परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्याचा भाजपत प्रवेश झाल्यास परभणीत राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. समीर दुधगावकर यांनी कालच (शनिवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Lok Sabha elections: मोहिते पाटील हे मोडीत निघालेली भांडीः शिंदे

$
0
0

पंढरपूर

'मोहिते पाटील हे राजकारणात मोडीत निघालेली भांडी असून शरद पवार साहेबांनी ती १० वर्षे कल्हई करून चालवली. परंतु, तरीही ती चालेनात हे पवारांच्या लक्षात आल्यावर आता ही भांडी भाजपने चालवायला घेतली आहे', अशा शब्दात माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे यांनी मोहिते पाटलांवर घणाघाती टीका केली.

गेली १० वर्षे याच मोहिते पाटलांच्या विरोधामुळे भाजपच्या जवळ गेलो होतो. मात्र पुन्हा भाजपने यांनाच पक्षात घेतल्याने आपण पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले. आपण कधीही भाजपात प्रवेश केलेला नव्हता. मात्र भाजपात राष्ट्रवादीपेक्षा जास्त गटबाजी अनुभवायला मिळाल्यावर भाजपपासूनही दूर थांबत जिल्हापरिषदेचे काम करीत राहिल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्यातील मोठी घराणी वाचवण्याचे काम भाजप करू लागल्याचा टोला लगावत ही घराणी म्हणजे पोकळ वासा आहे, याची जाणीव भाजपला लवकरच होईल, असे ते म्हणाले.

मोहिते पाटील यांच्या अनेक संस्थांमध्ये जनतेचे पैसे अडकले असून त्यांनी ते पैसे जर लगेच दिले तर आपण लोकसभेच्या प्रचाराला सुद्धा बाहेर पडणार नाही. मोहिते विरुद्ध शिंदे ही लढत साऱ्या महाराष्ट्राला पाहायची असून मी तर माझी उमेदवारी जाहीर केली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपाची उमेदवारी द्यावी, असे आवाहनही शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-सेनेची प्रचाराची सभा म्हणजे इव्हेंट

$
0
0

कोल्हापूर

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. स्थानिक राजकारण आणि मतदारसंघातील प्रश्नावरुन त्यांचे खासदार धनंजय महाडिक यांच्याशी बिनसले आहे, ते दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. व्यक्तीपेक्षा विचार आणि पक्षीय राजकारण महत्वाचे आहे. आमदार पाटील यांनी मतदारसंघातील प्रश्नात आणि राजकारणात जास्त अडकून पडू नये, चुका दुरुस्त कराव्यात अन्यथा भविष्यात त्यांना अडचणी उद्भवू शकतात अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनजंय महाडिक यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची काँग्रेस कमिटीत बैठक झाली. भाजप-शिवसेनेच्या संयुक्त प्रचाराची सभा म्हणजे एक इव्हेंट आहे. त्यांनी राज्यात सभेचे असे कितीही इव्हेंट करू देत नागरिक त्यांना भीक घालणार नाहीत, अशी टीका जयंत पाटील यांनी केलीय. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने कारभार करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात पुन्हा सत्ता सोपविण्याचा निर्धार लोकांनी केला आहे. दोन्ही काँग्रेस एकसंधपणे काम करणार असल्यामुळे खासदार महाडिक हे अडीच लाख मतांनी विजयी होतील, असा दावा पाटील यांनी केला.

पाच वर्षात भाजपचा पाळणा हलला नाही

गेली पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. पण या कालावधीत त्यांना जनमानसाचे प्रेम जिकंता आले नाही. पाच वर्षात भाजपचा पाळणाच हालला नाही. पक्ष वाढला नाही. निवडणुकीत त्यांची सारी भिस्त आयाराम गयारामवर आहे. बाहेरचे उमेदवार घेवून ते निवडणूक लढवत आहे, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

sushilkumar shinde : प्रकाश आंबेडकरांनी घटनेचा खून केलाः शिंदे

$
0
0

पंढरपूर

माझ्या विरोधात भाजपकडून धर्माच्या नावावर साधूगिरी करणारा उमेदवार दिलाय. तर ज्यांनी घटना लिहिली त्यांच्या नातवाकडून जातीयवादी आणि दंगली पसरवणाऱ्यांसोबत आघाडी करून धर्मनिरपेक्ष घटनेचा खून केलाय, अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आघाडीच्या मेळाव्यात भाजप आणि वंचित बहुजन आघाडीवर टीकास्त्र सोडले. पंढरपूर येथील संत तनपुरे मठात काँग्रेस आघाडीच्यावतीने पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भारत भालके, आमदार रामहरी रुपनवर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मी पण चर्चेला होतो. मात्र अवास्तव मागणीमुळे ते सोबत आले नाहीत. आंबेडकरांची भाजपची बी टीम असल्याच्या अजित पवार यांच्या आरोपात तथ्य आहे, असं शिंदे म्हणाले. आंबेडकर यांचा पक्ष फक्त मतं कापण्याचं काम करीत असून याचा फायदा भाजपाला मिळणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी न दिल्याने आपल्याला दुःख आहे. ज्यांनी गोध्रा कांडानंतर मोदींना वाचवले त्या आडवाणींचं खच्चीकरण केलं जातंय, असं शिंदे म्हणाले.

काँग्रेसकडे नेत्यांचा स्टाॅक असून गेलेले नेते त्यांना धर्मनिरपेक्षता शिकवून परत येतील असा टोला शिंदेंनी लगावला. सपना चौधरींच्या नावाने भाजपच्या नाकाला मिरच्या झोंबू लागल्या असून आजवर हेमा मालिनींच्याविरोधात टक्कर देणारे समोर उभे ठाकले नसल्याने भाजपचा तिळपापड होत असल्याची टीका, सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Pratik Patil : काँग्रेस आणि माझा संबंध संपलाः प्रतीक पाटील

$
0
0

सांगली

'मी काँग्रेसचा राजीनामा देत असून काँग्रेसचा आणि माझा संबंध संपला आहे. येथून पुढे मी समाजकारणात कार्यरत राहीन,' अशी घोषणा माजी केंद्रीय मंत्री आणि वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी केलीय. दादाप्रेमी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बंधू विशाल पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. दरम्यान, विशाल पाटील यांनी काँग्रेसचा उमेदवार मीच असून सांगलीची जागा खेचून आणूया, असं आवाहन केलं.

प्रतीक पाटील हे भाजप वाटेवर असल्याची दोन दिवसांपूर्वी चर्चा होती. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर सांगलीतून निवडणूक लढवणार की काय याचीही उत्सुकता होती. पण प्रतीक पाटील यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय. काँग्रेस आणि माझा संबंध संपल्याची त्यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

uddhav thackeray : युतीच्या सभेतून मुख्यमंत्री, उद्धव यांचा एल्गार

$
0
0

कोल्हापूर

कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीसाठी युतीची पहिली जाहीरसभा घेत भाजप-शिवसेनेने प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. सातारामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयनराजे भोसलेंविरोधात ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

आमचा हिंदुत्ववाद जाती, धर्माच्या पलीकडील: मुख्यमंत्री

मुंबईत अरबी महासागर, कोल्हापुरात जनतेचा महासागर लोटला आहे. या गर्दीने लोकसभा निवडणुकीचा निकाल दिला आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले कोल्हापूर हे शक्तीपीठ आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक चळवळ सुरू केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात देशात परिवर्तन झाले आहे. ५६ पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही. देश चालविण्यासाठी ५६ इंचाची छाती आवश्यक आहे. भाजप, शिवसेना युती म्हणजे फेविकॉलचा मजबूत जोड आहे. त्याला कुणी तोडू शकत नाही. काँग्रेस सरकारच्या कालावधीत केवळ काँग्रेसच्या नेत्यांचीच गरीबी हटली. सामान्य माणूस खितपत पडला. भाजप, शिवसेनेची युती विचारांची आहे, ही हिंदुत्वादी विचारांची युती आहे. हिंदुत्ववाद जाती, धर्माच्या पलीकडील आहे. ज्यांचे मातृभूमीवर प्रेम आहे, त्या प्रत्येकाला सोबत घेऊन हिंदुत्व चालतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्रजी कृपा करून शरद पवारांना भाजपामध्ये घेऊ नकाः उद्धव ठाकरे

आज दुपारी मी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि आता मी तीचचं विराट रूप इथे पाहतोय. आम्हाला सत्ता पाहिजे. गोरगरीब जनतेचे भले करण्यासाठी खुर्ची पाहीजे. देव, देश आणि धर्मासाठी युतीची गरज आहे. राममंदिराचा प्रश्न प्रलंबित होता. पुन्हा सत्ता आल्यास राममंदिराचा प्रश्न मार्गी लावू. जो धर्म आम्हाला गाडगेबाबांनी सांगितला. मानवतावाद धर्मासाठी आम्ही युती केली आहे. अनेक गोष्टींसाठी आम्ही युती केली आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. पाकिस्तानमध्ये क्रिकेटपटू पंतप्रधान होतो. तर इकडे पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणारे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचं नाव न घेता केली. समोर शिल्लक कोण राहलयं हेच आता कळत नाही, म्हणुन देवेंद्रजी कृपा करुन शरद पवारांना भाजपामध्ये घेऊ नका. विरोधीपक्ष सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागतात. शरद पवार म्हणाले की हल्ला करण्याचा सल्ला मी दिला होता. तोच हल्ल्याचा पुरावा आहे. त्यांनी सांगावे नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान आहेत, ते त्यांनी जाहीर करावे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सदाभाऊ तुमची तोफ मला हातकणंगलेमध्ये पाहीजे. यावेळी दोन्ही ठिकाणी भगवा फडकला पाहीजे. हा भगवा लोकसभा आणि विधानसभेत फडकला पाहिजे, असं अवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. राष्ट्रवादीला मत देणार असाल, तर अजित पवार धरणं कशी भरतात हे आठवा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाश आंबेडकरांनी राज्यघटनेचा खून केला सुशीलकुमार शिंदे यांचा कांग्रेस मेळाव्यात आरोप

$
0
0

प्रकाश आंबेडकरांनी राज्यघटनेचा खून केला

सुशीलकुमार शिंदे यांचा कांग्रेस मेळाव्यात आरोप

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'माझ्या विरोधात भाजपकडून धर्मच्या नावावर साधुगिरी करणारा उमेदवार दिला आहे. ज्यांनी घटना लिहिली त्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने जातीयवादी आणि दंगली पसरवणाऱ्या एमआयएम पक्षासोबत आघाडी करून धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचा खून केला,' अशी जोरदार टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आघाडीच्या मेळाव्यात केली.

पंढरपूर येथील संत तनपुरे मठात रविवारी काँग्रेस आघाडीच्या वतीने पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी आमदार भारत भालके, रामहरी रुपनवर आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी अवास्तव मागण्या केल्यामुळे ते कॉँग्रेस आघाडीसोबत आले नाहीत, ती भाजपची 'बी' टीम आहे, या अजित पवारांच्या आरोपात तथ्य आहे. आंबेडकरांचा पक्ष फक्त कॉँग्रेसची मते खाण्याचे काम करणार असून, याचा फायदा भाजपला मिळणार आहे,' असेही शिंदे म्हणाले.

भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी न दिल्याने मला दुःख होत आहे. मोदींना ज्यांनी गोध्राकांडानंतर वाचवले त्या आडवाणींचच खच्चीकरण केल जात आहे. काँग्रेसकडे नेत्यांचा चांगला स्टॉक असून, कॉँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते त्यांना सेक्युलॅरिझम शिकवून परत येतील. सपना चौधरींच्या नावाने भाजपच्या नाकाला मिरच्या झोंबू लागल्या आहेत, असेही शिंदे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचार कमी व्हायला हवा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीतीच्या प्रचारावेळी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार पारदर्शक कामकाजाच्या गप्पा मारतात. प्रचंड आश्वासने देतात. मात्र हेच उमेदवार निवडून आल्यानंतर सामान्यांपासून लांब जातात. आश्वासने विसरतात. भ्रष्टाचार करून गब्बर होतात. अशा उमेदवारांना, त्यांच्या पक्षांना मतदारांनी नाकारावे. भ्रष्टाचार कमी करण्याचे ठोस आश्वासन देणारा, सर्वांगिण विकासाचा अजेंडा मांडणारा, स्वत:पेक्षा देशहिताचा विचार करणाऱ्या उमेदवारास निवडून देण्याची गरज आहे, असा सूर 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मटा कट्या'वर व्यक्त झाला. ताराबाई पार्कमधील नाना-नानी पार्कमध्ये हा कार्यक्रम झाला.

डॉ. दिलीप शहा म्हणाले, 'चांगला लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे. मतदानादिवशी पर्यटनासाठी जाऊ नये. निवडणुकीत जो पक्ष, उमेदवार निस्वार्थीपणे, लोकांचे हित पाहतो असे वाटते त्यास निवडून दिले पाहिजे. भ्रष्टाचार, स्वत:चे घर भरण्याची प्रवृत्ती असलेल्या उमेदवारास मतदान करू नये. अद्याप आपल्या अवतीभवती अनेक मुलभूत प्रश्न दुर्लक्षित आहेत. ज्येष्ठ नागरिकांना शहरांतही सुविधा मिळत नाहीत. सरकारी कार्यालयांत त्यांना रांगेत थांबावे लागते. यंत्रणेकडून त्यांना वेठीस धरले जाते. हे थांबायला हवे. गरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा, शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळायला हवा.'

नामदेव बाणेदार म्हणाले, 'शहर आणि जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या मुलभूत सुविधा नाहीत. त्या तयार करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सेवा-सुविधा मिळत नाहीत. सरकारी कार्यालयात त्यांची हेळसांड होते. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालास भाव मिळत नाहीत. बेरोजगारी वाढली आहे. यावर ठोस उपाय मांडणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी राहिले पाहिजे. प्रत्येक बेरोजगार, ज्येष्ठ नागरिकास सरकारने किमान मानधन दिले पाहिजे. सर्वांगिण विकासाची भूमिका मांडणाऱ्या पक्षाचाच विचार व्हावा.'

पी. एस. घोलराखे म्हणाले, 'सरकारच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव तरतूद असायला हवी. अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले विदेशात आहेत. यामुळे वृद्धांच्या पालन-पोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार वृद्धाश्रम सुरू झाले पाहिजेत. त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी. बस प्रवासात ज्येष्ठांना सवलतीच्या दरात तिकिट दिले जाते. मात्र, अनेकदा वाहकांच्या आडमुठपणामुळे अनेकांना याचा लाभ मिळत नाही. यावर त्वरीत उपाय हवेत.'

सुहास सोनाळकर म्हणाले, तंत्रज्ञानातील संशोधनाला विशेष मदतीचे धोरण हवे. सैनदल व इतर विभागांतील तंत्रज्ञान परदेशातून घेतले जाते. या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार केला जातो. मात्र सर्वच विभागांत पारदर्शक कामाला प्राधान्य हवे. इन्कम टॅक्स, रेल्वे, बीएसएनएल, जीएसटी हे विभाग सरकारला विकासकामांसाठी पैसे मिळवून देणारे विभाग आहेत. पण या विभागाकडे सरकार दुर्लक्ष करते. हे विभाग सशक्त करण्याचे धोरण हवे. विशेष निधी द्यायला हवा.'

स्नेहल नाडकर्णी म्हणाल्या, 'कोणत्याही क्षेत्रात स्त्री, पुरुष भेदभाव असू नये. दोघांनाही समान संधी मिळायला हवी. बहुतांशी सरकारी कार्यालयांत सामान्यांना सौजन्याची वागणूक मिळत नाही. कामासाठी कार्यालयात गेल्यावर बसण्यासाठी आसन व्यवस्था नसते. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वारंवार पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांना मतदान करू नये.'

डॉ. एम. बी. मगदूम म्हणाले, 'जय जवान, जय किसान या घोषणेप्रमाणे विकासाची दिशा असली पाहिजे. शेतकरी जगला तरच सर्व घटकांतील लोकांना भाकरी मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालास दीडपट हमीभाव मिळावा. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. शेतीच्या उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाठी दीर्घकालीन धोरणांची अंमलबजावणी करावी. सत्तेविरोधात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी कळवळा दाखवणे आणि सत्तेवर आल्यानंतर सोयीस्करपणे दुर्लक्ष करणाऱ्या पक्षांना या निवडणुकीत बाजूला सारले पाहिजे.'

चर्चेत किरण ढकरे, मानसी कुलकर्णी, डी. जी. कुलकर्णी, नरेंद्र पाध्ये, बी. डी. गुजर, नरेंद्र पाटील, रमेश गुरव, पी. आर. नाईक, श्रीपाद म्हसवेकर, सुनंदा जोशी, मंगला थोरात, उषा लंगडे, वर्षा शेटे, रजनी जाधव, सुनिता माने, विजयमाला काळे आदींनी सहभाग घेतला.

शहरात सार्वजनिक ठिकाणी, बागांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. जी स्वच्छतागृहे आहेत, ती प्रचंड अस्वच्छ आहेत. हे चित्र बदलायला हवे. लोकसंख्येच्या अनुषंगाने पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृह बांधावीत. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य हवे. नागरिकांसाठी सर्वच ठिकाणी दर्जेदार सेवा, सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

- पूनम शहा

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदारयादीत नाव नोंदवावे. जागरुक राहून मतदान करावे. विकासाचा मुद्दा घेऊन रिंगणात असलेल्या उमेदवारास प्राधान्य द्यायला हवे. शिक्षक, पदवीधारकांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांतूनही एक आमदार, खासदार निवडण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.

- पी. डी. कांबळे

या आहेत अपेक्षा

- विकासकामांसह प्रशासनात पारदर्शकता आणा

- सरकारी व्यवस्थेमधील भ्रष्टाचार कमी व्हावा

- ज्येष्ठ नागरिकांतूनही आमदार, खासदार निवडावा

- महिलांसाठी स्वच्छतागृहे असावीत

- शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळावा

- तंत्रज्ञानाला बुस्ट देणारे धोरण हवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतभेद पंचगंगेत अर्पण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'राजकारणात काही गोष्टी पुढे-मागे होतात. त्यावर पांघरुण घालून पुढची वाटचाल करायची असते. सुभा राखण्याच्या नादात भांड्याला भांडे लागते. मात्र, राज्य आणि राष्ट्राच्या हितासाठी आपआपासातील सारे मतभेद पंचगंगेत अर्पण करुया आणि कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांना शंभर टक्के निवडून आणू' असा निर्धार दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला. रविवारी स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी संयुक्त मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांनी सगळ्या गोष्टींना बगल देऊन हातात हात घेऊन काम करून आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले. आघाडी लोकसभेपुरती मर्यादित नाही तर विधानसभेसह अन्य निवडणुकांतही दोन्ही काँग्रेस एकत्र असतील. भाजप-सेनेला घालवून राज्यात आघाडीची सत्ता येईल' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या एक गटाने खासदार महाडिकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीतील आघाडीच्या प्रमुखांच्या बैठकीत दोन्ही पक्ष एकसंघ असल्याची ग्वाही नेत्यांनी दिली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचा सत्कार झाला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात देशपातळीवर बांधलेली विरोधकांची मोट, मुंबईतील आघाडीच्या घोषणेचा तपशील सांगत जयंत पाटील म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांत समज, गैरसमजातून संवाद कमी झाला होता. बहुजन समाजाच्या हितासाठी दोन्ही आघाड्यांत संवाद वाढायला हवा. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे सरकार सत्तेत आणण्यासाठी राज्य, राष्ट्रीय पातळीवर आघाडीचा निर्णय झाला आहे. जिल्हा पातळीवरही आघाडीच्या आदेशाप्रमाणे काम व्हायला हवे. अद्याप कोणाच्या मनात शंका, कुशंका असल्यास जिल्ह्यातील नेतेमंडळी येत्या चार दिवसांत संयुक्तपणे दौरे करुन त्यांचे निरसन करतील. कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही मतदासरसंघात विरोधात शिवसेनेचे उमेदवार आहेत. भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या पापात शिवसेना ५० टक्के वाटेकरी आहे. सेनेने सत्तेतून बाहेर पडण्याची भीती घालत केवळ स्वत:चा स्वार्थ साधला. जनहिताचे निर्णय घेतले नाहीत. दोन्ही ठिकाणी सेनेच्या उमेदवारांचा पराभवासाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काम करावे.'

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी 'देशभरात भाजपविरोधी लाट आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे सामान्यांचे हाल झाले आहेत. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पूर्वीच्या सगळ्या गोष्टी विसरुन दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत' असे आवाहन केले.

काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश सातपुते यांनी प्रास्ताविक केले. महापौर सरिता मोरे, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार जयवंतराव आवळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार, मानसिंगराव गायकवाड, गुलाबराव घोरपडे आदी प्रमुख उपस्थित होते.

राष्ट्रवादीतील घटक भाजपसोबत

गेल्याने कार्यकर्त्यांत चीड

जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी दोन्ही पक्षांतील कुरघोडीचे आणि शह-काटशहाच्या राजकारणावरुन स्पष्ट मते मांडली. 'काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानीसह संघटनेसह मित्रपक्ष एकसंघ आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा शंभर टक्के आघाडी जिंकेल याची खात्री आहे. सांगलीत कितीही वाद असला तरी तेथेही आघाडीचा उमेदवार विजयी ठरेल. ही आघाडी विधानसभेलाही कायम ठेवावी. दोघेही एकत्र निवडणुकीला सामोरे गेलो तर आघाडीची सत्ता येईल' असे सांगत आवाडे यांनी दोन्ही पक्षांतील वादावर वादावर भाष्य केले. 'राज्यात आता आघाडी झाली असली तर जिल्ह्यात सतेज पाटील, हसन मुश्रीफ व मी एकत्र काम करत होतो. सतेज पाटील आज हजर नाहीत, ते आमचे सन्माननीय नेते आहेत. राष्ट्रवादीतील एक घटक भाजपसोबत गेला. त्यामुळे नाराजीने नवे प्रश्न तयार झाले. शंका निर्माण झाल्यामुळे कार्यकर्त्यांत चीड निर्माण झाली होती. हे सगळे मी मुद्दाम सांगतोय, कारण पोटात काय दुखतंय हे सांगितल्याशिवाय औषध मिळत नाही. दोन्ही आघाड्या आता एकसंघ झाल्यामुळे आघाडीच्या उमेदवारांचा विजय शंभर टक्के निश्चित आहे.'

लहान भावाला पदरात घ्या

'काँग्रेस हा मोठा तर राष्ट्रवादी काँग्रेस हा लहान भाऊ. लहान भावाला पदारात घ्या. आपला प्रथम शत्रू भाजप आहे. भाजप सरकारला सत्तेवरुन हटविण्यासाठी एकसंघ लढण्याचा आघाडीचा निर्णय झाला आहे. त्यामुळे प्रचाराच्या महिनाभराच्या कालावधीत वाद न करता खासदार धनंजय महाडिक व स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. झाले गेले विसरुन जाऊ. वाद, मते पंचगंगेत अर्पण करू. सत्ता नसली की कशी ससेहोलपेट होते याची अनुभव प्रत्येकाला आला आहे' असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

दोन दिवसांत चुका दुरुस्त करू

मेळाव्यात काही वक्त्यांनी गेल्या पाच वर्षातील दोन्ही पक्षांतील विसंवादाकडे लक्ष वेधले. त्यासंदर्भात खासदार धनंजय महाडिक यांनी 'आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त बैठकीत जुन्या गोष्टींवर ऊहापोह झाला आहे. कार्यकर्त्यांच्या मनातील शंका, गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन दिवसांत सगळी दुरुस्ती करू' अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images