Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उमेदवार, समर्थकांची कागदपत्रांसाठी धांदल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीसाठी २८ मार्चपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आणि समर्थकांची अर्जांसोबतच्या कागदपत्रांसाठी धावपळ सुरू आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांना पहिल्यांदाच गुन्हेगारीसंबंधीचा इतिहास इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स, वृत्तपत्रांतून ठळक प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाच वर्षांतील उत्पन्नवाढीच्या आलेखाचे प्रतिज्ञापत्रही द्यावे लागणार आहे. यासंबंधीची तयारी बहूतांश उमेदवारांनी पूर्ण केली आहे. कायदेतज्ज्ञांकडून कागदपत्रे तपासून घेतली जात आहेत.

या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे. खर्चाचा हिशोब दाखवण्यासाठी अर्ज भरण्याआधीच्या दिवसापासून स्वतंत्र खाते उघडावे लागेल. मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांना एक सूचक तर बिगर मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांना दहा सूचक शोधावे लागणार आहे. खुल्या वर्गातील उमेदवारास २५ हजार तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारास साडेबारा हजार रुपये अनामत भरावी लागणार आहे. अर्जासोबत आयकर भरलेल्या पावत्या, सरकारी देणी नसल्याचे ना-हरकतपत्र जोडावे लागेल. अर्जात शैक्षणिक पात्रता, विवाहित-अविवाहित, स्वत:सह कुटुंबातील सर्व सदस्यांची पाच वर्षांतील उत्पन्नाची माहिती भरावी लागणार आहे. या माहितीसोबत अनुषंगिक कागदपत्रे द्यावी लागतील. ती संकलित करण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांची धावाधाव होत आहे.

निवडणूक प्रक्रिया अशी

२८ मार्च

अर्ज भरण्यास सुरुवात

४ एप्रिल

अर्ज भरण्याची अंतिम मुदत

५ एप्रिल

दाखल उमेदवारी अर्जांची छाननी

८ एप्रिल

अर्ज माघारीची अंतिम मुदत

२३ एप्रिल

सार्वत्रिक मतदान

२३ मे

निकाल

पोलिस ठाण्यातून परवानगी

सभा, बैठकांसाठीची परवानगी संबंधित पोलिस ठाण्यांतून घेणे सक्तीचे आहे. परवानगी न घेतल्यास आचारसंहिता भंगाचा आणि इतर बेकायदेशीर कृत्यांचे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी परवानगी घेण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ तैनात केले आहे. निवडणूक प्रशासनाचे पथकही सभा, बैठकांतील घोषणा, भाषणांवर लक्ष ठेवून आहे.

घोषणापत्राची सक्ती

उमेदवारास फौजदारी प्रकरणांबाबत विहित नमुन्यांतील अर्जांतून घोषणापत्र भरून द्यावे लागणार आहे. त्यात न्यायालयाचे नाव, फौजदारी प्रकरणांची सद्यस्थिती, कलमे, अपराधाचे वर्णन, शिक्षा झाल्यास माहिती भरावी लागेल. गुन्ह्यांची माहिती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापासून ते मतदानाच्या तारखेपूर्वी दोन दिवस आधी तीनवेळा वृत्तपत्रे, वाहिन्यांमध्ये प्रसिद्ध करणे सक्तीचे आहे. माहिती प्रसिद्ध करणाऱ्या वृत्तपत्रांच्या प्रतींच्या खर्चाचा हिशोब जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्यावे लागेल.

खर्चाची माहिती ३० दिवसांत देण्याची सक्ती

फौजदारी प्रकरणासंबंधीची माहिती प्रसिद्ध केलेल्या वर्तमानपत्रांचे नाव, प्रसिद्धीची तारीख, त्यासाठी केलेला खर्च, इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी वाहिनीचे नाव, प्रसारीत झाल्याचा दिनांक, त्यासाठीच्या खर्चाची माहिती उमेदवारास स्वत:च्या सहीनिशी द्यावी लागणार आहे. ही माहिती निकाल लागल्यानंतर ३० दिवसांत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक बंदीचा फज्जा

$
0
0

फोटो आहे.

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालण्याची राज्य सरकाने अधिसूचना काढताना महापालिकेसह अन्य सरकारी यंत्रणांना कडक कारवाईचे निर्देश दिले. मात्र सरकारी यंत्रणांनी अंमलबजावणीकडे केलेले दुर्लक्ष आणि विक्रेत्यांनी नियमांना दिलेली बगल यामुळे प्लास्टिकची खुलेआम विक्री सुरू आहे. प्लास्टिक विक्रीला निर्बंध घालण्यासाठी महापालिकेने चार पथकांची स्थापना केली असली, तरी पथकांने वर्षात केवळ ९० विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. परिणामी आजही प्लास्टिकचे उत्पादन व विक्री शहरात राजरोसपणे सुरू असल्याने वर्षभरातच प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला.

प्लास्टिक आणि थर्माकोलपासून पर्यावरणाला धोका पोहोचत असल्याने त्यापासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंवर निर्बंध घालणारी अधिसूचना २३ मार्च, २०१८ रोजी काढली. त्यानुसार १७ जूनपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना उत्पादन व विक्रीवर बंदी घालण्यात आली. मोठ्या शहरांसह तालुकास्तरावर होणाऱ्या प्लास्टिक विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन यांच्यासह तलाठ्यांना अधिकार दिले. सरकारच्या या सर्वच यंत्रणा सुस्त राहिल्याने बंदीच्या निर्णयाला हरताळ फासला आहे. त्यामुळेच प्लास्टिकची खुलेआम विक्री सुरू असल्याचे दिसते.

अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्यानंतर महापालिकेने प्लास्टिक विक्रीला अटकाव करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली चार पथके स्थापन केली. प्रत्येक चार कर्मचाऱ्यांचा समावेश केला. पण या पथकाची कारवाई केवळ कागदावर राहिली. वर्षभरात केवळ ९० जणांवर कारवाई करताना प्रत्येकी पाच हजारप्रमाणे साडेचार लाखाचा दंड वसूल केला. पण झालेली कारवाई निर्णयाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्लास्टिक विक्रीवर कारवाई करण्यासाठी नेमलेले पथक कागदावर राहिले आहे. या पथकांकडून शहरात कारवाई होणे अपेक्षीत असताना महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या शेजारीच असलेली विक्रीही रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. प्लास्टिक उत्पादन किंवा विक्री करताना तीनवेळा दंडात्मक कारवाई झाल्यानंतर फौजदारी गुन्ह्याची तरतूद आहे. पण गेल्या वर्षभरात एकदाही अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल झालेला नाही. मोठे व्यापारी, दुकानदार, फळविक्रेते सर्रास प्लास्टिकमधून खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत आहेत. पथकाची कारवाई थंडावल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी कडक कारवाईचे निर्देश दिले.

थर्माकोल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या ताट, कप, प्लेट्स, ग्लास, काटेचमचे, वाटी, स्ट्रॉ, कटलरी, नॉन ओव्हन पॉलीप्रॉपिलेन बॅग, स्प्रेड शीट्स, पाऊच, वेष्टन यांचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री तसेच आयात व वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.

नॉन ओव्हन बॅगबाबत संदिग्धता

राज्यासह देशातील बहुतांशी राज्यात प्लास्टिक पिशव्यावरील बंदी आणल्यानंतर त्यांची जागा 'नॉन ओव्हन बॅग'ने घेतली. नॉन ओव्हन बॅग कापडी वाटत असल्याने त्याचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला. पथक कारवाई करण्यास गेल्यास विक्रेते या बॅग दाखवतात. बॅगबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने पथकाला कारवाई करण्यास अडचण होते. पण ही बॅग सुद्धा पर्यावरणाला घातक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.

प्लास्टिक बंदी निर्णयानंतर ९० विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. प्लास्टिक विक्रीला बंदी करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली चार पथके स्थापन केली आहेत. पथकांच्या माध्यमातून पुन्हा कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

डॉ. विजय पाटील, प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने गुणवत्तावाढीसाठी घेतलेल्या राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. परीक्षेत मसिरा नदाफ (२९० ), प्रसन्ना ओंकार (२८८) व साची शिंदे (२८६) ने गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी शिक्षण मंडळाच्यावतीने तीन युनिट टेस्ट, तीन सराव चाचण्या, शिष्यवृत्तीविषयक निवडक विद्यार्थी शिबिर व अंतिम शिष्यवृत्ती परीक्षा असे स्वरुप होते. ४४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अत्रेय शेंडे, पियुष कुंभार, आरिफा मुल्ला, शरयू शिंगाडे, सुमित शिंत्रे, श्रद्धा सुतार, शार्दुल कांबळे, आसिया सय्यद, सार्थक माने, माया शितोंडे, सिद्धेश बुडके, तनिष्का पवार, दिया चित्रकार, श्लोक खटावकर, सादिका मुल्ला, ह्रषिकेश पाटील, विश्वजीत देवाळे, रीतेश जाधव, गंगा परीट, सच्चिदानंद सुमेध, खदीजा मोमिन आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुधाळी सांडपाणी प्रकल्प मार्गी लावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासून दुधाळी परिसरात अमृत योजनेंतर्गत सुरू असलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प रखडला आहे. प्रकल्पासाठी मोठ्याप्रमाणात खोदाई केलेल्या ठिकाणी सांडपाणी साचून राहत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम त्वरीत मार्गी लावावे,' अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे, दुधाळी येथे सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्याप्रमाणात खोदाई केली आहे. अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने खोदाई केलेल्या ठिकाणी सांडपाणी साचून दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन अनेक नागरिकांमध्ये तापाची लक्षणे दिसून येत आहेत. तसेच प्रकल्पावर कार्यरत असणाऱ्या मजुरांमध्ये रात्रीच्यावेळी वाद निर्माण होत असल्याचाही त्रास होत आहे. याबाबतची माहिती विभागीय पाहणीवेळी आपल्याला दिली आहे. प्रकल्प कार्यन्वित होण्यापूर्वी संपूर्ण प्रकल्पाची माहिती, भविष्यातील संभाव्य धोके व निवारण याची लिखित स्वरुपात हमी द्यावी व येथील नगरिकांच्या समस्या त्वरीत निर्गत कराव्यात. अन्यथा प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.

आयुक्तांनी शिष्टमंडळाशी चर्चा करुन प्रकल्प त्वरीत मार्गी लावण्याबरोबर नियमित औषध फवारणी करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात नगरसेवक प्रतापसिंह जाधव, पूनम डाकवे, उषा रजपूत, विजयसिंह रजपूत, नंदा कदम, अनिता कदम यांच्यासह परिसरातील महिला व नागरिकांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंजूर कामांची वर्कऑर्डर काढा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या कामांना मंजुरी मिळाली होती. पण अधिकारी आचारसंहितेचे कारण पुढे करत कामे प्रलंबित ठेवत आहेत, असा आरोप करत मंजूर झालेल्या कामांची वर्क ऑर्डर काढा. अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामे ठप्प होत असल्याने आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांची भेट घेतली. भेटीदरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. दहा मार्चनंतर एकही विकासकाम मंजूर केलेले नाही. मात्र महापालिका प्रशासन आचारसंहितेची सबब पुढे करत मंजूर कामांची वर्कऑर्डर काढण्यास दिरंगाई करत आहे. त्यामुळे पूर्वी मंजूर झालेल्या कमांची वर्क ऑर्डर काढून त्वरित कामे सुरू करण्याची मागणी केली.' यावेळी आयुक्तांनी मंजूर कामे त्वरित सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. भेटीवेळी उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, श्रावण फडतारे, संजय मोहिते यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

suicide: पत्नीवर गोळी झाडून सहसचिवाची आत्महत्या

$
0
0

सोलापूर

घरगुती वादातून मंत्रालयातील एका सहसचिवाने आज पहाटे पत्नीवर गोळी झाडून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विजय भागवत पवार असे या सहसचिवाचे नाव आहे. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे ही घटना घडली आहे. पवार हे मंत्रालयातील कौशल्य विकास विभागात नुकतेच सह सचिव पदावर रुजू झाले होते.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार आपल्या मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या गावी आले असता काल रात्री त्यांचा पत्नीशी वाद झाला. त्यानंतर त्यांनी पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या आणि स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र, सुदैवाने यात पत्नी सोनाली या बचावल्या असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी, शेतमजुरांचा लढवय्या

$
0
0

स्मरण : नागनाथअण्णा नायकवडी,

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा सातवा स्मृतिदिन आज, शुक्रवारी आहे. त्या निमित्त....

शिवाजी शंकर पाटील

क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी म्हणजे समाजसेवेचे व्रत घेतलेले तपस्वी. सर्व जाती-धर्मातील गोरगरीब, दलित, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, दुष्काळग्रस्त, धरणग्रस्त यांच्यासाठीच संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच वाळवा आणि परिसरात सहकारी संस्था उभ्या राहिल्या. संस्था उभ्या न करता त्या आदर्शवत चालवल्या.

क्रांतिसिंह नाना पाटील वाळव्याला येऊन ब्रिटिशांविरूद्ध स्फुलिंग जागृत करण्यासाठी मारुतीच्या देवळाजवळ जाहीर सभा घेत. देवळाजवळ जो मुलगा आधी येईल त्याच्या हातात तिरंगा झेंडा देऊन गावातून फेरी काढत. त्या काळात नाना पाटलांचा आवाज ऐकल्यानंतर घरातून पळत येऊन नाना पाटलांच्या हातातील झेंडा घेण्याची संधी कधीही आण्णांनी चुकविली नाही. वाळव्यासारख्या ग्रामीण भागात जाज्ज्वल्य देशप्रेमाने प्रेरित होऊन क्रांतिवीर अण्णांच्या रूपाने एक देशभक्त भारतमातेला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या विचाराने घडत होता.

मुंबईत ९ ऑगस्ट १९४२ साली स्वराज्यप्राप्तीसाठी बोलविलेल्या काँग्रेस अधिवेशनाला ते हजर राहिले. त्या दिवसानंतर अण्णा अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे २२ मार्च २०१२ पर्यंत कौटुंबिक जीवनाचा त्याग करून समाजासाठी, देशासाठी जगले.

स्वातंत्र्यचळवळीत ब्रिटिश सत्ताधीश भारतीय लोकांचे मोर्चे व आंदोलने बंदुकीच्या धाकाने उधळून लावीत. यामुळे अण्णा उदीग्न झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणे सशस्त्र क्रांती केल्याशिवाय ब्रिटीश फौजेस रोखता येणार नाही, अशी त्यांची धारण होती. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांती करणारे क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी एकमेव नेते होते. सशस्त्र क्रांती करताना २५ फेब्रुवारी १९४६ रोजी अण्णांच्या फौजी संघटनेतील दोन सहकाऱ्यांना ब्रिटीशांच्या गोळीने हौतात्म्य पत्करावे लागले. त्यानंतर अण्णा आयुष्यभर त्यागी आयुष्य जगले.

स्वातंत्र्यानंतर १९४८ साली दुर्बल, उपेक्षित, मागासलेल्या शेतकरी, शेतमजूर घटकांना साक्षर करून समाजाचे प्रवाहात आणण्यासाठी वाळव्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून किसान शिक्षण संस्थेची स्थापना केली. शेतीसाठी सामुदायिक प्रयत्नातून कृष्णा नदीवर नागठाणे बंधारा बांधला. शेतकरी, कामगार, शेतमजुरांच्या सुखासाठी किसान शिक्षण संस्थेच्या कामकाजास आर्थिक मदत व्हावी, यासाठी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना सुरू केला. ता देशात आदर्शवत चालवून दाखविला. साखर धंद्यात उच्चांकी ऊसदर, उच्चांकी साखर उतारा, कामगारांना योग्य वेतन व न्याय्य हक्क देऊन अल्पावधीत ‘हुतात्मा पॅटर्न’ नावलौकिक मिळविला. या कारखान्याच्या आर्थिक पाठबळावरच वारणा व कोयना धरणग्रस्त संघटना, महाराष्ट्रातील १३ दुष्काळी तालुक्यांची पाणी परिषद आटपाडीत १९९३ मध्ये घेऊन त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी अखंड संघर्ष केला. या चळवळीचा व संघर्षाचा परिपाक म्हणजे ‘कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना’ होय. त्यामुळे अशक्यप्राय व स्वप्नवत वाटणारे कृष्णेचे पाणी उपसा सिंचन योजनेव्दारे दुष्काळग्रस्त जनतेसाठी वरदान ठरले. सध्या दुष्काळाची भीषणता पहाता या पाण्याचा उपयोग किमान आटपाडी तालुक्याला व आजूबाजूच्या दुष्काळी तालुक्यांना नक्कीच होईल. अण्णांनी ठरविल्यानुसार शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचल्यानंतरच ही चळवळ थांबणार आहे, अशी जनतेची व पाणी संघर्ष चळवळीतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. या थोर क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरणातून आरक्षण संपवण्याचा डाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून घटनेच्या माध्यमातून मागासवर्गीयांना शिक्षण आणि आरक्षण मिळाले. यातून मागासवर्गीयांचा विकास झाला. मात्र, खासगीकरणातून विकासाची ही दोन्ही दारे बंद करण्याचा डाव सरकारकडून सुरू आहे,’ असा आरोप अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केला.

माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीने आयोजित केलेल्या समारंभात ‘दलित वंचित समाजाची स्थिती आणि पुढील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी संध्याकाळी कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना डॉ. थोरात म्हणाले, ‘केवळ ३३ टक्के लोकसंख्या असलेल्या उच्चवर्णीयांकडे ६६ टक्के जमीन आहे. उद्योग, पतपुरवठा संस्थांमध्येही उच्चवर्णीयांचेच प्राबल्य आहे. मागासवर्गीयांकडे केवळ चार टक्के जमीन आहे, तर उद्योगांमध्ये हा टक्का आणखी कमी आहे. उत्पन्नाचे निश्चित साधनच नसल्याने मागासवर्गीय आर्थिक दुर्बल राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक जागृतीमुळे मागासवर्गीय समाज शिक्षणाकडे वळले, तर त्यांनीच दिलेल्या आरक्षणाच्या घटनादत्त अधिकारामुळे नोकऱ्या मिळाल्या. यातून आजचा नवा मध्यमवर्ग दिसत आहे. या समाजाची गेल्या ३० ते ४० वर्षातील विकासाची गती यापुढे दिसणार नाही.’
डॉ. थोरात यांनी विविध अहवालांचा आधार देत मागासवर्गीयांच्या सध्यस्थितीची माहिती दिली. यापुढील आव्हानांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘मागासवर्गीयांना मिळालेल्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यासाठी खासगीकरण केले जात आहे.
खासगीकरणात आरक्षण नाही. सरकारी नोकऱ्यांमध्येही कंत्राटी नोकर भरतीमुळे नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. सरकारच्या याच धोरणामुळे राज्यातील पाच लाख नोकऱ्या गेल्या आहेत. अधिकार टिकवण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागेल.’
प्रा. विनय कांबळे म्हणाले, ‘मागासवर्गीयांच्या प्रश्नांचे स्वरुप बदलले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन संघर्षाचे स्वरूप बदलावे लागेल. यासाठी व्यापक सामाजिक जागृतीची गरज आहे.’ राहुल ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले, तर अशोक चोकाककर यांनी स्वागत केले. यावेळी आनंद राणे, रमेश रत्नाकर, आदी उपस्थित होते. प्रा. सिद्धार्थ मानकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. ए. बी. कांबळे यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान
वक्ते - डॉ. पी. एस. कांबळे
विषय - वंचित समाजाच्या विकासाची समस्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माढ्याचा तिढा सुटणार; संजय शिंदेंना राष्ट्रवादीची उमेदवारी?

$
0
0

सोलापूर

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कांग्रेसपुढे निर्माण झालेला पेच सुटण्याची चिन्हे दिसत असून माढा लोकसभा मतदार संघातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप पुरस्कृत सोलापूर जिल्हापरिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे आज स्वगृही परतणार असून आजच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळालेले रणजितसिंह मोहिते पाटील यांना विरोध करण्यासाठी संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. वास्तविक मोहिते पाटलांना भाजपात प्रवेश देण्यापूर्वी संजय शिंदे यानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी माढ्याच्या उमेदवारीसाठी विचारणा केली होती. मात्र, आपण लोकसभा नाही, तर करमाळा विधानसभा लढविण्यास उत्सुक असल्याचे शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले. त्यानंतर मोहिते पाटील याचा भाजपत प्रवेश झाला. आता मोहिते भाजपवासी झाल्याने शिंदे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत संजय शिंदे?

संजय शिंदे हे माढा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांचे धाकटे बंधू आहेत. ते मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यांनी निमगाव टेंभुर्णीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे करमाळा विधानसभा लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि अध्यक्ष झाले. शिंदेहे म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याचे, तसेच विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. शिवाय माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचेही ते चेअरमन आहेत. शिंदे जिल्हा बँकेचे अध्यक्षही आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाताला काम मिळायला हवे

$
0
0

विविध पक्षांच्या विद्यार्थी, युवक संघटनांची अपेक्षा

कोल्हापूर टाइम्स टीम

देशाचे भविष्य युवकांच्या हातात आहे, असे म्हटले जाते. आपला देश जर महासत्ता बनायचा असेल तर युवकांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे. रोजगाराभिमुख शिक्षण आणि हाताला काम देण्याचे काम राज्य आणि केंद्र सरकारचे आहे. केंद्रात कायदे बनत असल्याने खासदारांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे युवकांचे विविध प्रश्न डोळ्यासमोर ठेवून सभागृहात प्रश्न मांडले पाहिजेत, आवाज उठवला पाहिजे. काही वेळा सर्वच गोष्टी सभागृहात मांडू शकत नाहीत अशा वेळी खासदारांनी आपल्या निधीतून प्रश्नांची तड लावली पाहिजे. युवकांचा वापर केवळ सभांना गर्दी करण्यासाठी न करता त्यांचेही भविष्य घडले पाहिजे.

चर्चेदरम्यान स्पर्श फाउंडेशनचा अवधून अपराध म्हणाला, ‘कोल्हापुरात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयटी हब तयार केले पाहिजे. पुणे आणि बेंगळूरू दरम्यानचा जो स्पेस आहे तो कोल्हापूरमध्ये भरून निघू शकतो. केंद्रीय शाळा कोल्हापुरात झाली पाहिजे. प्रत्येक शैक्षणिक संस्थांचे दरवर्षी अकॅडमिक ऑडिट झाले पाहिजे. १२ वी पर्यंत मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. नव्या अभियांत्रिकी कॉलेजना मान्यता न देता आहेत त्या संस्था सक्षम करणे, त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यास केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे. देशात १३ टक्के विद्यार्थी १२ वी उतीर्ण होतात. त्यापैकी पदवी पूर्ण करण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. याचा अर्थ १० टक्के गळती होते. ती थांबली पाहिजे.’

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष प्रसाद उगवे म्हणाला, ‘मागील सरकारने शिक्षणाचे खासगीकरण करण्याचे धोरण आखले. सरकारी शाळा बंद करून खासगी शाळांना प्राधान्य दिले जात आहे. खासगी शाळांची फी परवडत नसल्याने अनेकजण शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे याविरोधात खासदारांनी आवाज उठवला पाहिजे. सरकारी पातळीवर दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी संसदेत कायदा करून त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरला पाहिजे. विद्यार्थी दत्तक घेणे, संस्थांना निधी देणे यामाध्यमातूनही खासदार काम करू शकतात.’

एआयएसएफची शहर सचिव आरती रेडेकर म्हणाली, ‘राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून प्राथमिक शाळा उभारल्या. त्यामुळे आपण शैक्षणिक विकास करू शकलो. आत्ता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पातळीवरील उमेदवार पाहनू युवकांनी मतदान न करता स्थानिक पातळीवरील उमेदवाराची ध्येयधोरणे पाहून मतदान केले पाहिजे. आपल्याकडे सध्या जॉबलेस ग्रोथ वाढत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने रिक्त जागा भरून बेरोजगारी कमी केली पाहिजे. त्यासाठी खासदारांनी संसदेत आवाज उठवला पाहिजे. सध्या देशभरात इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा घाट घातला जात आहे, पण त्यामागील हेतू शुद्ध असतील तर त्याला पाठिंबा आणि नसतील तर विरोध असे धोरण ठेवले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शैक्षणिक संस्थांवरील गळचेपीबाबत खासदारांनी आवाज उठवला पाहिजे.’

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष कल्पेश चौगुले म्हणाला, ‘विविध जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंनी यश मिळविले की आपल्याकडे त्याला सुविधा दिल्या जातात. याउलट चीनमध्ये असे खेळाडू तयार करण्यासाठी आधीपासूनच पैसे खर्च करते. सरकारी पातळीवर असे निर्णय होत नसले तरी खासदार आपल्या निधीतून खेळाडूंना मदत करू शकतात. जिल्हा पातळीवर अद्ययावत क्रीडा संकुल, चांगले प्रशिक्षक नेमण्यासाठी खासदारांनी पुढाकार घेतला पाहिजे.’

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सुवर्णभूषण देसाई म्हणाला, ‘कॉलेज, शाळांमधील कंत्राटी पद्धत बंद केली पाहिजे. याबाबत कायदा करण्यासाठी खासदारांनी आग्रही राहिले पाहिजे. कोल्हापूर ही फुटबॉलजी पंढरी आहे. या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी यासाठी शिबिरे, प्रशिक्षणांचे आयोजन केले पाहिजे. सरकारी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांचे मूल्यमापन झाले पाहिजे. त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. मोठ्या संस्थांमध्ये होणारे लैंगिक छळाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे केले पाहिजेत.’

मनसेचा जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत म्हणाला, ‘निवडणुकांबाबत विचार करत असताना तरुणांनी खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधींचे काम काय आहे हे समजून घेतले पाहिजे. गल्लीतील एखाद्या कामाबद्दल खासदारांना जाब विचारणे योग्य नाही. राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांची तड लावणे आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी खासदारांची निवड झालेली असते. स्थानिक प्रश्नांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर कायदे करण्यासाठी खासदारांनी संसदेत आवाज उठवला पाहिजे. निवडणूक आली की उमेदवार संघटनांच्या भेटी घेतात, मात्र, पुढील पाच वर्षांत त्यात सातत्य ठेवले पाहिजे. युवकांच्या प्रश्नांचा मागोवा घेतला पाहिजे.’

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष प्रेम भोसले म्हणाला, ‘सध्या शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणामुळे गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे यासाठी खासदारांनी प्रयत्न केले पाहिजेत. युवक हा भविष्यातील देशाचा चालक असतो, त्यामुळे त्याच्या प्रश्नांकडे अधिक संवेदनशीलतेने लक्ष दिले पाहिजे. यासाठी खासदारांना त्यांचे प्रश्न समजणे महत्त्वाचे आहे. हे प्रश्न समजण्यासाठी त्यांनी महिन्यातून एकदा युवक दरबार भरविला पाहिजे. त्यामध्ये सर्व युवक संघटनांच्या प्रतिनिधींसह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या तरुणांना सहभागी करून घेतले पाहिजे. तेथे तरुणांना खासदारांशी संवाद साधता येईल.
युवा विद्यार्थी सेनेचा शहरअध्यक्ष मंजित माने म्हणाला, ‘अनेक भूमीपुत्रांना १०-१५ हजारांच्या रोजगारासाठी गाव सोडून जावे लागते. चांगले शिक्षण घेतलेल्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळावा यासाठी खासदारांनी प्रयत्न केले पाहिजेत.’


सध्या केंद्र सरकारने कितीही गाजावाजा केला तरी शिक्षण आहे, पण रोजगार नाही अशी अवस्था आहे. अनेकांना आपले गाव घर सोडून कमी पगारात नोकरी करावी लागत आहे. अशा वेळी रोगाराभिमुख शिक्षण मिळणे गरजेचे आहे. लोकसभेची निवडणूक ही केंद्रात सरकार तयार करणारी असते. त्यामुळे केंद्रीय पातळीवर, संसदेत कायदे अस्तित्वात आणून रोजच्या जगण्यात बदल घडविण्याची क्षमता खासदारांमध्ये असते. त्यामुळे त्याचा विचार करून आपण आपला प्रतिनिधी निवडला पाहिजे.
रोहित पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस

विद्यार्थ्यांचे प्रश्न मुळापासून समजून घेतले पाहिजेत. सध्या रोजगाराभिमुख शिक्षण मिळत नाही. विद्यापीठांचे महत्त्व कमी केले आहे. नवीन विद्यापीठ कायदा आणून शिक्षण हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी चांगले शिक्षक पाहिजेत. शिक्षकांची नियुक्त करण्यासाठी अनेक परीक्षा आहेत, पण त्या घेत असताना त्याला काढलेले बायपास थांबले पाहिजेत. हे संसदेतच घडू शकते. धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या संस्थांवर अंकुश ठेवण्याचे काम, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा आग्रह खासदारांनी धरला पाहिजे. जनतेच्या वेळेप्रमाणे, जनतेच्या गरजा काय आहेत हे पाहून काम करणारा खासदार असावा.
मंदार पाटील, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

आयआयटी, वैद्यकीय आणि अन्य व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी असते. पण अन्य संस्थांमधून पदवी घेऊन बाहेर पडलेल्यांना ती हमी मिळेलच असे नाही. त्यामुळे संस्थांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी कायदे केले पाहिजेत.
ऋतुराज माने, अध्यक्ष, मराठा महासंघ विद्यार्थी संघटना


सध्या देशात शेतकऱ्यांपाठोपाठ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत शिक्षणावर देशात ३.५ टक्केंपेक्षा अधिक खर्च झालेला नाही. त्यामुळे दर्जेदार शिक्षण महागडे होत असून त्यापासून सर्वसामान्य लोक वंचित राहत आहेत. यासाठी शिक्षणावरील खर्च ६ टक्केंपेक्षा जास्त झाला पाहिजे यासाठी खासदारांनी आग्रही राहिले पाहिजे. बेरोजगारी हे मोठे संकट आहे. मध्यंतरी पंतप्रधानांनी पकोडे तळा असे सांगितले. कोणतेही काम कमी दर्जाचे नाही, असे कदाचित त्यांना म्हणायचे असेल, पण ज्या दर्जाचे शिक्षण घेतले त्या दर्जाचा रोजगार मिळणे हेही आवश्यक आहे. कोल्हापूर वसतिगृहांची जननी आहे, त्यामुळे वसतिगृहांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निधी दिला पाहिजे. युवकांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देईल त्याच उमेदवाराला निवडून दिले पाहिजे.
प्रशांत आंबी, जिल्हासचिव, एआयएसएफ

विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन झाला पाहिजे. त्या माध्यमातून प्रश्न मांडता येतील, तसेच ते सोडविता येतील. ३० वर्षांच्या आतील युवकांना निवडणुकीत आरक्षण असले पाहिजे. चांगले करिअर करण्यासाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळाले पाहिजे. सरकारी पातळीवरून त्यासाठी निर्णय झाला पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी यूथ क्लब निर्माण केले पाहिजेत. खासदारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. किमान संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला पाहिजे.
पार्थ मुंडे, जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय

२०१४ नंतर शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. निवडूण येणाऱ्या खासदारांनी न्यू एज्युकेशनसाठी आग्रह धरला पाहिजे. युवकांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जावून विचार केला पाहिजे. उमेदवार राष्ट्रीय धोरणांबाबत काय विचार करतात हे पाहिले पाहिजे.
श्रीनिवास सूर्यवंशी, अभाविप


आमच्या अपेक्षा...
महिन्यातून खासदारांचा युवक दरबार असावा
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संस्थांवर अंकुश ठेवणारे कायदे करावेत
शिक्षक नियुक्तीसाठी काढण्यात येणाऱ्या बायपासवर अंकुश ठेवावा
रोजगाराभिमुख शिक्षण मिळायला हवे
कोल्हापुरात आयटी हब हवा
शैक्षणिक संस्थांचे अकॅडमिक ऑडिट व्हावे
मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे
वंचित विद्यार्थ्यांना दत्तक घेतले घ्यावे
शिक्षणावरील खर्च ६ टक्क्यांपेक्षा अधिक व्हावा
वसतिगृहांचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे
शिक्षणानुसार रोजगार मिळायला हवा
जॉबलेस ग्रोथ थांबविण्यास प्राधान्य दिले पाहिजे
केंद्र आणि राज्य सरकारमधील रिक्त जागा भरण्यास आग्रह धरावा
विद्यार्थी, युवकांसाठी स्वतंत्र आयोग असावा
सांस्कृतिक क्षेत्रातील युवकांसाठी यूथ क्बल असावा
खेळाडू तयार करण्यासाठी निधीची तरतूद करावी
कंत्राटी शिक्षक पद्धती बंद करावी
शिक्षकांचे मूल्यमापन व्हावे
न्यू एज्युकेशनसाठी आग्रह धरावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MADHA: राष्ट्रवादी प्रवेशासह संजय शिंदेंना उमेदवारी जाहीर

$
0
0

सोलापूरः

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या याद्या जाहीर होत असताना माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटत नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सर्वांना उत्सुकता होती. संजय शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करताच त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच शिवसेना-भाजप यांच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत असलेल्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. बारामती येथील एका सभेदरम्यान, संजय शिंदे हे घरातलेच आहेत, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे का म्हणायचे? अशी विचारणा करत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघातर्फे आणि काँग्रेसच्या सहमतीने मी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतो, असे सांगितले. शिंदे यांच्यासह उस्मानाबादमध्ये राणा जगजीतसिंह पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी जाहीर केले.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळालेले रणजितसिंह मोहिते पाटील यांना विरोध करण्यासाठी संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. वास्तविक मोहिते पाटलांना भाजपात प्रवेश देण्यापूर्वी संजय शिंदे यानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी माढ्याच्या उमेदवारीसाठी विचारणा केली होती. मात्र, आपण लोकसभा नाही, तर करमाळा विधानसभा लढविण्यास उत्सुक असल्याचे शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले. त्यानंतर मोहिते पाटील याचा भाजपत प्रवेश झाला. आता मोहिते भाजपवासी झाल्याने शिंदे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत संजय शिंदे?

संजय शिंदे हे माढा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांचे धाकटे बंधू आहेत. ते मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यांनी निमगाव टेंभुर्णीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे करमाळा विधानसभा लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि अध्यक्ष झाले. शिंदेहे म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याचे, तसेच विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. शिवाय माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचेही ते चेअरमन आहेत. शिंदे जिल्हा बँकेचे अध्यक्षही आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सागर कवडेंना विशेष पोलीस सेवा पदक जाहीर

$
0
0

पंढरपूरः

नक्षलग्रस्त भागातील खडतर परिस्थितीमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल पंढरपूरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे यांना महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर रतनकुमार कवडे यांची २०११ मध्ये पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली. त्यांनी २०१३ ते २०१४ महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेतले. २०१४ ते २०१५ साली जळगाव येथील परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केले. ऑगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०१८ पर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली म्हणून नक्षलग्रस्त गडचिरोली भागात काम केले. त्यांनी नक्षलविरोधी अभियानांचे नेतृत्व केले. यामध्ये आंतरराज्य अभियांनाचा समावेश होता. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या अनेक चकमकीमध्ये ते सहभागी होते. त्यांनी नक्षलवाद्यांनी पेरलेले ५ भूसुरुंग शोधून निकामी केले. ३ जहाल नक्षलवाद्यांचे मनपरिवर्तन करून त्यांचे आत्मसमर्पण घडवून आणले. यामध्ये डिव्हिजनल कमांडर या पदाच्या वरिष्ठ पदाच्या नक्षलवाद्यांचा समावेश होता.

गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद समूळ नष्ट व्हावा; नक्षलवाद्यांची मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात यावी, यासाठी 'प्रोजेक्ट अग्निपंख', गडचिरोलीमध्ये वाचन संस्कृती रुजावी, यासाठी दुर्गम दुरुस्तीस पोलीस मदत केंद्र मध्ये वाचनालयाची स्थापना करणारे 'प्रोजेक्ट ज्ञानगंगा' तसेच आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या मनावरील कट्टर संस्कार पुसून त्यांच्यावर लोकशाहीचे संस्कार व्हावेत यासाठी 'महात्मा गांधी विचारधन परीक्षा', असे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबविले. नक्षलग्रस्त गडचिरोली भागात या बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे मानाच्या 'पोलीस महासंचालक' पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच पोलीस उप अधीक्षक डॉ. सागर कवडे यांना महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १४१३ टीबी रुग्ण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत जागितक क्षयरोग दिनानिमित्त २० ते २६ मार्च या कालावधीत आरोग्य विषयक व क्षयरोग विरोधी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार बैठकीत दिली. दरम्यान जिल्ह्यात सध्या १४१३ क्षयरुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक रुग्ण इचलकरंजीत असून त्यापाठोपाठ करवीर तालुक्यात आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये २५२ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. वेळेवर उपचार घेतल्यास हा रोग बरा होऊ शकतो, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

शास्त्रज्ञ रॉबर्ट कुक यांनी २४ मार्च रोजी टीबीच्या जंतूचा शोध लावला. त्यापित्यर्थ २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान जिल्हा प्रशासनाने २०२२ पर्यंत जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यात क्षयरोगमुक्तीसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. शिवाय जनजागरण मोहिमेतंर्गत प्रश्नमंजुषा, पोस्टर, रांगोळी स्पर्धा, जनजागरण रॅली काढण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. २६) सकाळी आठ वाजता सीपीआर येथून क्षयरोग जनजागण रॅली काढण्यात येणार आहे.

क्षयरोगावरील उपचाराबाबत माहिती सांगताना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार म्हणाल्या, 'जागतिक आरोग्य संघटनेने 'हीच वेळ आहे, क्षयरोग निर्मूलनाची' हे घोषवाक्य जाहीर केले आहे. दरम्यान जानेवारी २०१७ पासून टीबी रुग्णासाठी एक दिवसाआड औषधोपचारऐवजी दररोज औषध प्रणाली सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यातील टीबी रुग्णांची उपचार प्रणाली सहा महिने कालावधीची आहे. रुग्णाला त्याच्या वजनानुसार दिवसाला दोन ते पाच गोळ्या घ्याव्या लागतात. शिवाय एप्रिल २०१८ पासून क्षयरुग्णांना औषधोपचार सुरू असेपर्यंत पोषण आहारासाठी महिन्याला ५०० रुपये अनुदान दिले जाते. क्षयरोग रुग्णांसाठी वरदान ठरणारी औषध उपलब्ध आहे. सरकारमार्फत रुग्णांना ही गोळी मोफत दिली जाते' पत्रकार परिषदेला डॉ. सुप्रिया देशमुख, एकनाथ पाटील, विनोद नायडू आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायुतीचे घटक पक्षांकडे दुर्लक्ष

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भाजप-शिवसेना युतीने लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदार संघात संयुक्त मेळावे सुरू केले आहेत. पण या मेळाव्यासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि जनसुराज्य शक्ती पक्षाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांत बळावत आहे. आरपीआयने निमंत्रण मिळाल्याशिवाय युतीच्या व्यासापीठावर जायचे नाही असा निर्धार केला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीत आठवले गट, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम हे प्रमुख पक्ष सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीत फूट पडल्यावरही आठवले गट, रासप, स्वाभिमानी, शिवसंग्राम हे पक्ष भाजप महायुतीत सहभागी झाले. जनसुराज्य शक्ती पक्षही राज्यात भाजपशी सत्ता स्थापन झाल्यावर महायुतीत सहभागी झाला. रामदास आठवलेंना केंद्रीय राज्य मंत्रिपद तर रासपचे महादेव जानकर यांना राज्यात कॅबिनेट मंत्रिपद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालिन नेते सदाभाऊ खोत यांना राज्य मंत्रिपद मिळाले. सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्या वितुष्ट आल्याने खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. 'स्वाभिमानी'ने भाजपशी फारकत घेतली असून काँग्रेस राष्ट्रीय आघाडीत सहभागी झाले आहेत. खासदार शेट्टी यांना राष्ट्रवादीने हातकणंगले लोकसभा मतदार संघाची जागा सोडली आहे.

लोकसभा निवडणुकीत आठवले गटाने लोकसभा निवडणुकीसाठी एका जागेची मागणी केली आहे. रासपकडे भाजपने दुर्लक्ष केल्याने दोन दिवसांत जानकर पक्षाची भूमिका जाहीर करणार आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा प्रचार करण्यासाठी भाजप शिवसेनेने एकत्रित मेळावे घेतले. या मेळाव्याला महायुतीतील आठवले, रासप गटाला आमंत्रित केलेले नव्हते. उलट महायुतीचे कट्टर विरोधक काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आजी माजी नगरसेवकांना व्यासपीठावर स्थान मिळाले होते. त्यामुळे आरपीआय गटाचे कार्यकर्ते नाराज झाले आहे. या पक्षाची करवीर, राधानगरी, शिरोळ, कागल, चंदगड, आजरा तालुक्यात चांगली ताकद आहे. रविवारी (ता. २४) कोल्हापुरात होणाऱ्या महायुतीच्या प्रचार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सभेला महायुतीतील घटक पक्षांना मानाचे स्थान देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. युतीच्या प्रचार सभेच्या पत्रकावर नेते मंडळीच्या फोटोंमध्ये केंद्रीय मंत्री आठवले यांचाही समावेश केला असला तरी आमंत्रण मिळाल्याशिवाय महायुतीच्या व्यासपीठावर जायचे नाही असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

\Bसरमिसळ झाल्याने गोंधळ

\Bकोल्हापुरातील रासप पदाधिकाऱ्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला असल्याने स्थानिक पातळीवर या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाहूवाडी विधानसभा मतदार संघात जनसुराज्य शक्ती संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील आहेत. त्यामुळे कोरे यांना शिवसेनेचा प्रचार करण्यावर मर्यादा येत आहेत. पण शेवटच्या टप्प्यात ते युतीकडून उतरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथाकथन स्पर्धा

$
0
0

कोल्हापूर: राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे बुधवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजता कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले आहे. शाहूपुरी दुसरी गल्ली येथील राधाकृष्ण मंदिर येथे स्पर्धा होणार आहे. स्पर्धेकांना प्रा. ए. आर. जयतीर्थ व प्रा. आर. एम. हार्डीकर यांच्यातर्फे रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी सोडत काढून फक्त दहा स्पर्धकांना प्रवेश आहे. स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मानसिंग जगताप यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विहिरींनी गाठला तळ...हाफिज खान पठाण

$
0
0

मुखेड तालुक्यातील बेन्नाळ, परतपूर वस्तीवरील विहिरींनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी ते राष्ट्रवादी व्हाया भाजप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

राष्ट्रवादी काँग्रेसने माढा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले संजय शिंदे हे माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे धाकटे बंधू. मूळचे राष्ट्रवादीचे, पण मोहिते-पाटील विरोधातून सध्या भारतीय जनता पक्षाशी घरोबा केलेले. त्यांना शुक्रवारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे संजय शिंदे यांची 'घरवापसी' झाली आहे. भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे सध्या सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.

शिंदे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. आपले खच्चीकरण करण्यासाठी पवारांनी गेल्या दहा वर्षांपासून शिंदे बंधूंना बळ दिल्याची मोहिते-पाटील कुटुंबाची तक्रार आहे. संजय शिंदे मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. शिंदे यांनी निमगाव-टेंभुर्णीच्या सरपंचपदापासून राजकारणाला सुरुवात केली. २०१४च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळ्यातून विधानसभेची निवडणूक लढवली, त्यात त्यांचा निसटता पराभव झाला.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संजय शिंदे अपक्ष म्हणून निवडून आले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मदतीने ते झेडपीचे अध्यक्ष झाले. म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन या साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद, माढा तालुका पंचायत समितीचे सभापतिपदही संजय शिंदे यांनी भूषविले आहे.

भाजपकडूनही विचारणा

माढा लोकसभा मतदारसंघासाठी प्रथम मुख्यमंत्र्यांनी संजय शिंदे यांना भाजपकडून निवडणूक लढविण्याचा आग्रह केला होता. शिंदे तयार झाले असते तर मोहिते-पाटलांचा प्रवेशही लांबणीवर पडला असता. मात्र, या वेळी आपण करमाळा विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याने मोहिते-पाटील यांना प्रवेश देण्यात आला होता. आता शरद पवारांच्या आग्रहामुळे संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारल्याने जिल्ह्यातील त्यांचे सोबती सध्या तरी भाजपच्या जवळच राहणार असे चित्र आहे. अर्थात, माढा मतदारसंघातून शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करताच संजय शिंदे यांनी त्यांना तत्काळ पाठिंबा जाहीर केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रालयातील सहसचिवाचीपत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या

$
0
0

मंत्रालयातील सहसचिवाची

पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या

पंढरपूर

मंत्रालयात (मुंबई) कौशल्य विकास व उद्योजकता विभागातील सहसचिव विजय पवार यांनी घरगुती वादातून पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे गुरुवारी रात्री घडली. जखमी पत्नीवर सोलापुरात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी रात्री साडेबारा वाजता त्यांनी झोपलेल्या पत्नीला गोळी मारली. मात्र गोळी नाकाजवळून गेल्याने पत्नी जागी झाली. तिने दिवा लावताच पवार पिस्टल घेऊन तिच्या मागे लागले. तिने आरडाओरड केल्यावर जवळपासचे लोक धावून आले. मात्र, पवार यांनी घराबाहेर येऊन पिस्टल दाखवत लोकांना धमकावत पत्नीवर दुसरी गोळी झाडली, ती गोळी काखेत लागली. त्यानंतर पवार यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले, लोकांनी दरवाजा उघडण्याचे प्रयत्न केले, मात्र पवार यांनी दरवाजा उघडला नाही. तोपर्यंत पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी जखमी पत्नी सोनालीला अॅम्ब्युलन्समधून सोलापूरला हलविले. पोलिसांनी पवार यांना बाहेर काढण्यासाठी खिडकीतून पहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. दरवाजा तोडून पवार यांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पवार यांना दारुचे व्यसन असल्याने व कौटुंबिक कलहाने त्यांची मानसिकता ठीक नव्हती. या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात खळबळ उडाली आहे. गेली अनेक वर्षे उच्च पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने, असे आततायी पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे. विजय पवार यांची पत्नी सोनाली हिच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू असून, तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, पवार यांच्या वैवाहिक जीवनात पहिल्यापासूनच अडचणी होत्या. पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाला होता. दुसऱ्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर काही वर्षांपूर्वी पवार यांनी तिसरे लग्न केले होते. या पत्नीसोबतही त्यांच्या नेहमी कलह होत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणजितसिंह नाईक-निंबाळकरलोकसभेच्या मैदानात

$
0
0

रणजितसिंह नाईक-निंबाळकर

लोकसभेच्या मैदानात

सातारा

माढा लोकसभा मतदारसंघातून सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे, तर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटणचा स्वाभिमान जपण्यासाठी येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत रणजित नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीची बैठक शुभारंभ लॉन्समध्ये बोलविली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगर पालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईकनिंबाळकर होते.

.........

पोलिस उपनिरीक्षक गोसावींना विशेष सेवापदक जाहीर

सातारा

म्हसवड येथील पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शहाजी चंद्रकांत गोसावी यांना पोलिस महासंचालकांकडून विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या अतिशय खडतर व कठीण सेवेसाठी त्यांना हे पदक जाहीर झाले आहे. १५ मार्च २०१५ रोजी गडचिरोली येथे हजर झाल्यानंतर गोसावी यांनी शस्र हाताळणी, माओवादी व्यूहरचना, गडचिरोली पोलिसांची कार्यपद्धती व इतर महत्वाचे कार्य विषयक एक महिन्याचे अतिशय खडतर असे जंगल टॅक्टिकल आणि सर्व्हाव्हल कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्या नंतर व्यंकटापूर येथे हजर झाल्यानंतर आदिवासी जनतेला सरकारच्या विविध योजनांची माहिती करून दिली. लोकशाही विषयी त्यांच्या मनात चांगली भावना निर्माण करून योग्य प्रवाहकडे जाण्यास मार्गदर्शन केले. स्वतः कृषी विषयक शिक्षण घेतले असल्याने स्थानिक जनतेला जनजागरण मेळावे घेऊन व स्वतः त्यांच्या शेतीत जाऊन पालेभाज्यांची लागवड, कापूस, तूर, टोमॅटो, हिरवी मिरची लागवडी बाबत योग्य मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील इनकमिंग सुरुच राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची गर्दी झाली असली तरी पक्षात प्रवेश करणारे लोक विचार करुन येतात. त्यांच्यावर अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेतो. अन्य पक्षातील प्रवेशाबद्दल निष्ठावंताची तक्रार नाही. कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्यांचा स्टॉक संपला असला तरी राज्यात अन्य जिल्ह्यांतून भाजपमध्ये इनकमिंग सुरुच राहणार असल्याचे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजप शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रचार शुभारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रचार शुभारंभाच्या सभेस चार ते पाच लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री पाटील म्हणाले, 'तपोवन मैदानावर होणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेस अडीच लाख खुर्च्यांची सोय करण्यात आली असून दीड ते दोन लाख लोकांना मैदानावरील चार मोठ्या स्क्रीनवरुन सभा पाहता येईल. तसेच शहरातील प्रमुख दहा चौकात स्क्रीन लावण्यात येणार आहेत. कोल्हापूरसह हातकणंगले, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील युतीचे कार्यकर्ते सभेला येणार आहेत.'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन सभास्थळी येणार आहेत. तसेच सभेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, नेते उपस्थित राहणार आहेत.

............

अमल महाडिक, कोरे सभेला उपस्थित राहणार

पालकमंत्री म्हणाले,' युतीच्या सभेला भाजपचे आमदार अमल महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे उपस्थित राहणार आहेत. कोरे हे आपले मित्र असून यापूर्वी ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर राहिले आहेत. कोल्हापूर व हातकणंगलेतील शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना कोरे यांचा पाठिंबा आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images