Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पालकांना प्रशिक्षण

0
0

कोल्हापूर : समग्र शिक्षा अंतर्गंत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूर व प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रशिक्षण देण्यात आले. मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन दोन दिवसीय प्रशिक्षण सत्र पार पडले. प्रशिक्षणामध्ये दिव्यांग मुलांना सामाजिक सुरक्षा, संपूर्ण अधिकार, समान संधी, शैक्षणिक व मोफत वैद्यकीय सेवेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डीआयसीपीडी चे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, मनपा प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस. के. यादव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, डीआयसीपीडीच्या जेष्ठ अधिव्याख्याता पल्लवी चिंचोळकर, समन्वयक शकीला मुजावर यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण सत्राला राजेद्र आपुगडे, सई कांबळे, आदिती जाधव, दिपाली नाईक, विक्रमसिंह भोसले, शमा खोमणे, शरद गावडे, सुनिता घुणकीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विशेष मतदार नोंदणी आज

0
0

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी दिव्यांग मतदार नोंदणी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. सोमवारपर्यंत (ता. २५) ही मतदार नोंदणी महापालिकेच्या दिव्यांग सहाय्यता कक्षामध्ये सुरू राहणार आहेज्या दिव्यांगांचे १८ वर्षे पूर्ण असून ज्यांची नोंदणी केलेली नाही अशांनी सोमवारपर्यंत मतदार नोंदणी करावी. दिव्यांगांनी रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्माचा पुरावा व दोन रंगीत फोटोसह महापालिकेच्या दिव्यांग सहाय्यता कक्ष येथे संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख मतदार परगावी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सव्वा लाख ते दीड लाख मतदार परगावी असून या मतदारांना मतदानासाठी त्यांच्या गावी आणण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असेल. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य शहरांमध्ये जिल्ह्यातील विविध गावांतील मतदार वास्तव्य करतात, मात्र, त्यांचे मतदान त्यांच्या मूळगावी आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघातील अनेकजण नोकरी, व्यवसाय व शिक्षणानिमित्त पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह बेंगळुरु, हैद्राबादसह देशातील अन्य शहरांत वास्तव्य करत आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, आजरा, गडहिंग्लजमधील अनेक मतदार मुंबई, ठाणे, नवी मुंबईत आहेत. नोकरदार मंडळी कुटुंबासह वास्तव्य करत असले तरी अजूनही त्यांचे मतदान गावातील मतदार यादीत आहे. हे मतदार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीसाठी गटातटाच्या ईर्ष्येने मतदानासाठी येतात. त्यासाठी उमेदवार येण्या-जाण्याचा प्रवास, भोजनाचा खर्च करतात. पण लोकसभा मतदार संघ मोठा असल्याने उमेदवाराकडून खर्चाची तजवीज कशी होणार याकडे पहावे लागेल.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा निवडणूक २३ एप्रिल रोजी आहे. याच दिवशी पुणे, बारामती, मावळची निवडणूक आहे. पुण्यात गुरुवारी औद्योगिक वसाहतीला सुटी असल्याने बुधवारची रजा टाकून मतदार मतदानासाठी येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच अनेक कुटुंबे सुट्टीनिमित्त गावाकडे येत असल्याने मतदानाला येतील असा कयास बांधला जात आहे.

२०१४ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतदानाची संधी हुकली होती. पण यंदा मतदान मंगळवारी असल्याने मला सुट्टी आहे. मतदानाच्या सुटीला जोडून एक दिवसाची रजा काढून मतदानासाठी स्वखर्चाने तळेगाव दाभाडे येथून कोल्हापुरात येणार आहे.

शिवराज उगळे, पुलाची शिरोली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक इमराती उतरवून घ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबईतील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपत्तनी निवारण विभागाची बैठक घेऊन शहरातील धोकादायक इमारती उतरवून घेण्याच्या सूचना केल्या. धोकादायक इमारती किंवा इमारतीचा भाग उतरवण्यासाठी एक उपविभाग तयार करण्यात आला आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला जातो. त्यानुसार धोकादायक इमारती ठरवल्या जातात. २०१८ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार शहरात ९० धोकादायक इमारती असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्व्हेमध्ये ६९ धोकादायक इमारती होत्या. त्यामध्ये नव्याने २१ इमारतींची नोंद झाली. मात्र, प्रत्यक्षात सुमारे २०० हून अधिक इमारती धोकादायक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महापालिकेकडे नोंद असलेल्या ९० मिळकतधारकांना मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ कलम ६२४ नुसार दुरुस्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. इमारती दुरुस्तीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयात पाठवून देण्याच्या सूचनाही केल्या. पण दुरुस्ती प्रस्तावाला मिळकतधारकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. मात्र अद्यापही धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारती जैसे थे आहेत. मुंबई पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तातडीने आपत्ती निवारण विभागाची बैठक घेऊन शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. बैठकीमध्ये चार विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या इमारती उतरवून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. मिळकतदारांनी इमारतीचे अभियंत्यामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करावे. एखादी इमारत धोकादायक असल्यास महापालिका अशी इमारत स्वत: उतरवून घेईल. त्यासाठी चारही विभागीय कार्यालयांचे दुरध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत. या क्रमांकावर इमारतीशेजारील अथवा परिसरातील नागरिकांनी तक्रार दिल्यास त्याची दखल घेतली जाणार आहे. धोकादायक इमारती उतरवण्यासाठी एक उपविभागही प्रशासनाने तयार केला आहे. दरवर्षी महापालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी एक महिना धोकादायक इमारती काढून घेण्याबाबत संबंधित मिळकतदारांना नोटीस देते. पण यावर्षी मुंबई दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन महिने आधीच कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. आता अशा इमारतीचे मिळकतदार कसा प्रतिसाद देतात हा औत्सुक्याचा मुद्दा ठरणार आहे.

विभागीय निहाय धोकादायक इमारती

शिवाजी मार्केट : ३९

गांधी मैदान : १८

राजारामपुरी : २६

ताराराराणी : सात

एकूण इमारती : ९०

प्रत्यक्षात धोकादायक इमारती: २०० पेक्षा अधिक

या भागात धोकादायक इमारती

महाद्वार रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठ, राजारामपुरी, मंगळवार पेठ आदी शहराच्या जून्या भागात धोकादायक इमारती आहेत.

मुंबई येथील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीमध्ये धोकादायक इमारती अथवा भाग काढून घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. नागरिकांनाही तक्रारी देण्यासाठी विभागीय कार्यालयामध्ये सुविधा उपलब्ध केली आहे.

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मनपा आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. मंडलिकांना मताधिक्य देऊ

0
0

'शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांना शहरातून विजयी मताधिक्य देण्यासाठी पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागा.' अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी दिल्या. प्रा. मंडलिक यांनी आमदार क्षीरसागर व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रचाराच्या नियोजनाबाबत चर्चा केली.

प्रा. मंडलिक यांनी आमदार क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी निवडणूक प्रचारांबाबत चर्चा केली. यावेळी माजी महापौर विलासराव सासणे, माजी महापौर अॅड, महादेवराव आडगुळे, माजी महापौर मारुतीराव कातवरे, माजी उपमहापौर उदय पवार, शहरप्रमुख रवीकिरण इंगवले, माजी स्थायी समिती सभापती सुनील मोदी, परिवहन सभापती अभिजित चव्हाण, नगरसेवक राहुल चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान प्रा. मंडलिक यांनी उचगाव प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, मधुकर चव्हाण, सुजीत चव्हाण, प्रदीप झांबरे, माजी जि.प. सदस्य शशीकांत खोत, सरपंच मालुताई काळे, तालुका प्रमुख राजू यादव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवा पॅटर्नच निवडूण आणेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्याने शिक्षणात कोल्हापूर पॅटर्न, जलसंधारणात कोल्हापूर बंधारा असे यशस्वी पॅटर्न दिले असून राजकारणात 'शिवसेना-भाजप-काँग्रेस' पॅटर्न आकाराला आला आहे. हा पॅटर्नच लोकसभा निवडणुकीत मला खासदार म्हणून निवडून आणील,' असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सभागृहात शिवसेना, भाजप, पदाधिकारी बैठकीत बोलत होते. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

मेळाव्याला आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे संपर्क नेते अरुण दूधवडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, काँग्रेस उपमहापौर भूपाल शेटे, शारंगधर देशमुख, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी महापौर सागर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. मंडलिक म्हणाले, 'जिल्ह्यातील रत्नाप्पाण्णा कुंभार, बाळासाहेब माने, सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांचा वेळोवेळी वापर करून महाडिक गटाने आपली ताकद वाढविली. कोल्हापूर लोकसभेसाठी धनंजय महाडिक, विधानसभेसाठी कोल्हापूर दक्षिणमध्ये मुलगा अमल, हातकणंगले लोकसभा मतदार संघात सून शौमिका, शिराळा मतदारसंघात पुतण्याला उभा करण्याची तयारी महादेवराव महाडिकांकडून सुरू आहे. महाडिक गटाने विळखा घातल्याने जिल्हा महाडिकग्रस्त झाला आहे. त्याच्यातून सुटका करण्यासाठी कोल्हापूरची स्वाभिमानी जनता शिवसेनेचा खासदार निवडून आणील.'

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 'प्रा. मंडलिक हे भाजप-शिवसेनेचे उमेदवार नसून सर्वपक्षीय उमेदवार झाले आहेत. भाजप, शिवसेनेबरोबर काँग्रेसही त्यांच्या प्रचारात उतरल्याने ते सर्वपक्षीय खासदार होतील. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहचविली पाहिजे. कोल्हापूर उत्तरमधून मंडलिकांना ५० हजार मताधिक्य मिळवून देऊ.'

संपर्क नेते अरुण दूधवडकर म्हणाले, 'शिवसेना, भाजप, रिपब्लिक आठवले गटासह काँग्रेसने पाठिंबा दिल्याने मंडलिक सर्वपक्षीय उमेदवार झाले आहेत. सर्वांचा पाठिंबा मिळाला म्हणून शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची युतीच्या कार्यकर्त्यांवर ड्रोनप्रमाणे नजर आहे.'

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, 'कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा व्हावा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होणार आहे. त्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी युतीच्या व्यासपीठावर येऊन पाठिंबा दिला त्याबद्दल अभिनंदन. यापुढे त्यांचा सन्मान ठेवला जाईल.'

माजी नगरसेवक भारती पोवार यांनी '२५ वर्षात मंडलिकांनी काय केले' या खासदार महाडिकांच्या वक्तव्यावर टीका केली. 'महाडिकांनी पेट्रोल पंप, रॉकेल डेपो उघडले तर मंडलिकांनी पाणी, दूध, सहकारी संस्था उभारुन जनतेसाठी काम केले. मंडलिकांवर टीका करण्याच्या प्रवृत्तीविरोधात मंडलिक प्रेमी प्रचारात उतरणारच.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-बेंगळरू विमान रद्द

0
0

कोल्हापूर: कोल्हापूर-बेंगळरू विमानसेवा तांत्रिक कारणामुळे रविवारी रद्द झाली. हैदराबाद-कोल्हापूर या मार्गावरील विमान पूर्विनयोजित वेळेनुसार सकाळी विमानतळावर दाखल झाले. मात्र, बेंगळुरुकडे जाणारे विमान काही तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली. विमानसेवा रद्द करण्यात आल्याची माहिती प्रवाशांना एसएमएसद्वारे देण्यात आली असली तरी त्यांची गैरसोय झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र

0
0

फोटो : धनंजय महाडिक, संजय मंडलिक, राजू शेट्टी, धैर्यशील माने, संजय पाटील

०००००

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र

- विजय जाधव

००००

बिनचेहऱ्याची निवडणूक !

००००

दक्षिण महाराष्ट्रातील निवडणूक स्थानिक उमेदवारांच्या राजकीय अंतर्विरोधामुळे बिनचेहऱ्याची झाली आहे. भाजपसमोर सांगली, सोलापूर टिकवण्याबरोबरच कोल्हापूर, हातकणंगले खेचून आणण्याचे आव्हान आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार गटबाजीने त्रासले आहेत. नेतेच 'प्रभावी' असल्याने मोदींचा सर्जिकल स्ट्राइक येथे कितपत काम करणार, हा प्रश्नच आहे! अंतर्गत झुंजी लागल्याने सत्ताधारी आणि विरोधक समान पातळीवर आले आहेत!

००००

बालाकोटावरील सर्जिकल स्ट्राइकने देशातील निवडणुकांचे चित्र तात्पुरते का असेना पालटले, असा आभास या घडीला निर्माण झाला आहे. या दोन्ही घटना वेगळ्या असल्या तरी तोंडावर असणाऱ्या निवडणुकांवर त्याचे बरे-वाईट परिणाम होणारच. राष्ट्रीय राजकारणाचा पट बदलत चालला असून, भाजपच्या विरोधात उभ्या राहू शकणाऱ्या आघाडीचे अवसान गळाले आहे की काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवडणूक न लढविण्याच्या निर्णयामागे भाजप विरोधकांतील बेसूरपणा, ताकद असूनही एकसंध होण्यात इच्छाशक्तीचा अभाव आणि देशाचा मूड ओळखण्यात आलेले अपयश ही काही कारणे आहेत. पवार घराण्यातील गृहयुद्ध हे आणखी एक कारण असले तरी त्याला फारसा अर्थ नाही. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे अवसान गळाले, हे वास्तव आहे. काही सत्ताकांक्षी नेत्यांमुळे लोकशाहीत सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात आणि ती जबाबदारी स्वीकारण्यात भाजप विरोधकांना सपशेल अपयशच आले. बेरोजगारी, औाद्योगिक क्षेत्रातील मंदीचे सावट, महागाईच्या दरात होणारी वाढ, अपेक्षित विकासदर गाठण्यात सरकारला आलेले अपयश यासह देशाच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारे अनेक घटक समोर असताना ही खदखद मतदारांसमोर ताकदीने नेण्यात विरोधकांना यश आले नाही. संघर्ष आणि परिवर्तन यात्रांनी ते कितपत साधले, निवडणुकांआधी लोकशाहीचे जनजागरण किती आणि कसे झाले याचे उत्तरही समाधानकारक नाही. यामुळेच राजकीय आलेखावर आज विरोधक निष्प्रभ दिसताहेत, अनेक चुका करणारे सरकार मात्र आक्रमक.

विरोधकांची कसोटी

दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणावर कटाक्ष टाकला तर याचे सर्वच संदर्भ या राष्ट्रीय राजकीय घटनाक्रमाशी येऊन थांबणारे आहेत. लोकसभेच्या निवडणुका हा त्यामागील समान धागा आहे. ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर होणार हा खरा प्रश्न आहे. ती मुद्द्यांवर किंवा आम जनतेच्या प्रश्नांवर होऊच नये, असा सत्ताधाऱ्यांचा (मग ते कोणीही असोत.) कटाक्ष असतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गेल्या चार महिन्यांत अशा संघर्ष आणि परिवर्तन यात्रा काढल्या, पण त्यातून खरेच जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले? सत्ताधाऱ्यांनी त्यापैकी कोणत्या विषयाची दखल वा नोंद घेतली, कोणते विषय राज्याच्या आणि केंद्राच्या अर्थसंकल्पात आले? कोणता नवा प्रकल्प, कोणती नवी योजना आली? रखडलेल्या कोणत्या प्रश्नासाठी निधी आला? गेल्या पाच वर्षांत त्याचे काय झाले? यासारखे अनेक प्रश्न सोयीस्करपणे पोतडीत बंद करून ठेवले गेले. कोणतीही निवडणूक किंवा त्यासाठीच्या प्रक्रियेची इमारत ही अंतिमत: सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर उभी असते. सर्वांचा समान विकास ही त्यामागील प्रेरणा असते. पण या तात्त्विक गोष्टी आजतरी कागदावरच उरल्या आहेत. निवडणुका आणि त्यासाठीचे राजकारण त्यातून होणारे सामाजिक प्रश्नांवरील विचारमंथन, शेवटी या मंथनातून लोकांनी निवडून दिलेले लोकनियुक्त सरकार या प्रक्रियेच्या पसाऱ्यात हे सर्व ठरवणार आहेत ते 'लोक' कुठेच दिसत नाहीत. मतदानाची दिशाच आधी ठरवली जात असल्याने या निवडणुका प्रश्नांवर कमी आणि भावनेवर अधिक लढल्या जातील.

या पार्श्वभूमीवर दक्षिण महाराष्ट्रात काय सुरू आहे, याचा विचार करावा लागेल. सत्ताधारी भाजप या भागात थेट उमेदवार देऊ शकला नसल्याने सांगली, सोलापूरचा उमेदवार वगळता अन्य ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पक्षावर आली आहे. या भागावर आजही प्राबल्य असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष अंतर्गत गटबाजीने पोखरलेले आहेत, शिवाय ही निवडणूकही हातातून सोडायचा निर्णय त्यांनी घेतला आहे की काय, असा प्रश्न आहे. दुसरीकडे निवडणुका भावनेवर, गटा-तटातील पारंपरिक संघर्षावर, फोडाफोडीवर कशा होतील, याचा प्रयत्न गेल्या वर्षभरापासून सुरू आहे, त्याला आता यश येताना दिसत आहे. मिसळ-पे-चर्चा, परिवर्तन-पे-चर्चा यातून जनतेचे विकासाचे खरे प्रश्न किती समोर येतील, शंकाच आहे. कोण कोणाच्या जहागिरीत घुसले, कोणी कोणाला आव्हान दिले याचीच चर्चा अधिक. या नेत्यांना कोणी स्थानिकांनी पाच वर्षांतील रिपोर्ट कार्ड मागितले, प्रलंबित प्रश्नांचा हिशेब मागितला, त्याचे संबंधित लोकप्रतिनिधींनी समाधानकारक उत्तर दिले, असे दिसले नाही. कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, साताऱ्याबाबतीत याहून वेगळे चित्र नाही. खासदार धनंजय महाडिक यांचा संसदरत्न म्हणून संसद गाजविल्याचा दावा आहे. आजवरच्या कोणत्याच खासदाराने आपले मेरिट या पद्धतीने संसदेत दाखवले नव्हते हेही खरे आहे. त्यांचा संसदीय व्यवस्थेतील कार्यपद्धतीचा अभ्यास चांगला झाला आहे. तो त्यांना करावा असे वाटले, हीच काय ती त्यांची जमेची बाजू. या भांडवलावर ते मैदानात उतरले आहेत. मात्र, त्यांनी भाजपमध्ये यावे यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, हे लपून राहिले नाही. यामुळे भाजपला आपला उमेदवार तयार करता आला नाही. युती झालीच नसती तर स्वत: रिंगणात उतरण्याशिवाय पाटील यांच्यासमोर पर्याय नव्हता. हा सॉफ्टकॉर्नर महाडिक यांच्या पथ्यावर पडणार की मंडलिक यांच्यासाठी ते सर्वस्व पणाला लावणार हे स्पष्ट होईल, ते निकालानंतरच! महाडिक यांची विश्वासार्हताही पणाला लागली आहे. मंडलिक यांच्यासमोर आपल्याबद्दलचे सर्व प्रवाद खोडून काढून ताकदीने टक्कर देण्याशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय निवडणुकांचा कौल त्रिशंकू असेल, असा होरा आहे. या स्थितीत कोल्हापूरची जागा जिंकण्याचे मोठे आव्हान सेनेपेक्षा भाजपसमोर त्यातही राज्याचे पक्षाचे नेते असणाऱ्या पाटील यांच्यासमोर आहे.

भाजपमध्ये अंतर्विरोध

हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी आजही शेतकऱ्यांचे तारणहार अशी प्रतिमा राखण्यात यशस्वी ठरले. मात्र, एफआरपी पलीकडे ते जाऊ शकले नाहीत. ते हक्काच्या शेतकरी मतपेढीवर विसंबून आहेत. मतदारसंघाच्या आशा-आकांक्षा, वाढते नागरीकरण आणि शहरीकरणाचे प्रश्न वेगळे आहेत. सेना आमदारांचे बळ असूनही धैर्यशील माने यांच्यासाठी ते राबणार काय, असा कळीचा प्रश्न आहे. सांगलीत भाजपचे खासदार संजय पाटील यांना मोठी संधी, कृष्णा खोऱ्याचे पद मिळूनही सामान्य माणूस तहानलेलाच का राहिलाय, उमेदवार बदलाच्या मागणीवरून पक्षाच्या अंतर्गत संघर्ष का उफाळलाय, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ भाजपवर आणि खासदार पाटील यांच्यावर आली आहे. काँग्रेसमधील दुफळी पथ्यावर पडणार असेच आजचे सांगलीचे चित्र आहे. सोलापुरातही हाच अध्याय भाजपमध्ये सुरू आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे यांनी पक्ष, सर्वपक्षीय नेते आणि मतदारांना एकाचवेळी झुंजवत ठेवले. राष्ट्रवादीला सक्षम पर्यायी नेतृत्त्व उभे करता आले नाही, हे वास्तव आहे.

काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या मागे हक्काने राहणे हा या परिसरातील माणसाचा मूलभूत स्वभाव. यामुळे त्याला गटातटाच्या भावनिक आविष्कारात गुंतवून मतदान केंद्रापर्यंत आणायचे की विकासकामांच्या मुद्द्यावर, हे ठरवण्याची वेळ हीच आहे. मतदारांवर भानामती, गंडे-दोरे करण्याचे सोडून आता उमेदवारांनी आणि मतदारांनीही मूळ प्रश्नांना भिडलेले बरे! यावेळी मोदी लाट नाही. मात्र, याचा फायदा उठविण्यात विरोधकांजवळ राजकीय इच्छाशक्ती आणि जिंकण्याची मनोभूमी नाही, काँग्रेस आघाडीच्या नेत्यांचे लक्ष विधानसभेकडे लागले आहे, हे ढळढळीत वास्तव आहे. दक्षिण महाराष्ट्रासाठी ही निवडणूक बिनचेहऱ्याची झाली आहे, ती स्थानिक पातळीवरील विरोधाभासामुळेच!

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


द्वंद्व संपल्याने पालकमंत्री अर्जुनाच्या भूमिकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जवळच्या लोकांविरुद्ध लढावे लागत असल्याने अर्जुनासारखी अवस्था बनलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाभारत समजावून सांगितले आहे. यामुळे त्यांच्या मनातील द्वद्ध संपले असून ते अर्जुनासारखे चांगली भूमिका बजावत लोकसभेच्या रणागणांत खासदार धनंजय महाडिक आणि कंपनीला पराभूत करतील,' असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.

शहर शिवसेनेतर्फे रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. 'रासप'चे कोल्हापूर उत्तर जिल्हाध्यक्ष सागर साळोखे, लखन मुल्लाणी, निरंजन भादिंगरे, राजू नायकवडी, अलताफ मुल्लाणी, अक्षय धुमाळ, अक्षय पाटील, प्रशांत सुतार, हेमंत बोलायकर, संग्राम जाधव, महावीर हंजे, विलास जाधव, सर्जेराव साळोखे, राजू गुरव, पेठवडगाव येथील भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते प्रा. जय कराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 'शिवसेनेने सामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच ताकत दिली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार बनविले. राजकारणात अनेकदा बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात. त्यावेळी पक्षप्रमुखांना अडचणीत आणायचे नसते. लोकसभेच्या लढाईला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातून शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे' याप्रसंगी नगरसेवक राहुल चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले, माजी नगरसेवक चंद्रकांत साळोखे, महिला आघाडीच्या मंगला साळोखे, पूजा भोर, प्रकाश सरनाईक, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.

अर्जुनाने दुर्योधनाचा पराभव करावा

रविकिरण इंगवले म्हणाले, 'लोकसभेच्या निवडणुकीला कौरव-पांडवाच्या लढाईचे स्वरुप लाभले आहे. आम्ही पांडवाच्या बाजूने आहोत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वत:ला अर्जुन समजत आहेत. त्यांना आम्ही भीष्म पितामह, धृतराष्ट्र व द्रोणाचार्य समजत होतो. ते अर्जुन समजत असतील तर विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे दुर्योधनाच्या भूमिकेत आहेत. पालकमंत्र्यांनी त्यांना पराभूत करावे'

वाढदिवसाला अंगठ्या मागणारा मंत्री

शिवसेनेत प्रवेश केलेल्या सागर साळोखे यांनी रासपचे प्रमुख व मंत्री महादेव जानकर यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, 'वाढदिवसाला कार्यकर्ते शुभेच्छा द्यायला गेल्यावर 'सोन्याच्या अंगठ्या घेऊन आलात का, अंगठ्या नसतील तर तुमच्या शुभेच्छा नकोत' अशा शब्दांत जानकर हे कार्यकर्त्यांना फटकारत. त्यांच्यासारखा वाढदिवसाला अंगठ्या मागणारा मंत्री कधी पाहिला नव्हता. सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळे रासपला रामराम करुन सेनेत प्रवेश करत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केमिस्ट असोसिएशनच्या २९ जागेसाठी ११३ अर्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २९ जागेसाठी ११३ अर्ज दाखल झाले आहेत. सत्तारुढ केमिस्ट एकता पॅनेल व विरोधी स्वाभिमानी रिटेल पॅनेल यांच्यामध्ये थेट लढत आहे. सत्तारुढ गटामधून १८ संचालकांना पुन्हा संधी दिली आहे. सोमवारी (ता. १८) अर्जांची छाननी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत १९ ते २३ मार्चपर्यंत आहे. अपक्षांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान शहरातील आठ जागेसाठी ४० अर्ज दाखल झाले आहेत.

केमिस्ट एकता पॅनेल व विरोधी स्वाभिमानी रिटेल पॅनेलमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे. केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा कार्यक्षेत्र असून २३०० हून अधिक सभासद आहेत. दरम्यान सत्तारुढ गटाकडून विद्यमान अध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष संजय शेटे, संचालक सचिन पुरोहित, सुधीर खराडे, शिवाजी ढेंगे, सयाजी आळवेकर, दाजीबा पाटील, बंडा कदम यांचा समावेश आहे. विरोधी पॅनेलकडून सुरेश काटकर, नगरसेवक महेश सावंत, सतीश चव्हाण, बाळासाहेब देसाई, प्रकाश लोदे, अनिल पाटील, विजय पाटील आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षीय बंधने धाब्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा हळूहळू उडू लागला असताना महापालिकेतील काही विद्यमान नगरसेवकांनी थेट प्रचारात उडी घेतली आहे. तर काही नगरसेवक अद्यापही वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसून येत आहेत. नगरसेवकांनी प्रचारात सहभाग घेण्यास सुरुवात केली असली, तरी पक्षीय बंधनांचा फारसा विचार केलेला दिसत नाही. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडी असा संघर्ष असला, तरी दोन्ही आघाडीतील नगरसेवक परस्परविरोधी उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची राष्ट्रीयस्तरावर आघाडी झाली असून राष्ट्रवादीचे ‌विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. तर भाजप-शिवसेनेची युती झाली असून सेनेचे उमेदवार म्हणून प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असली, तरी नेत्यांप्रमाणेच नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आघाडी आणि युतीला धाब्यावर बसविण्यास सुरुवात केली आहे. त्याची झलक विविध ठिकाणी होणाऱ्या प्रचार मेळावे, गाठी-भेटींमधून पहायला मिळत आहे.

खासदार महाडिक यांच्या गेल्या पाच वर्षांतील कार्यपद्धतीवर नाराज असलेले राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक प्रचारांपासून दूर राहिले होते. पण पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या मेळाव्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रचारात सक्रिय होऊ लागले आहेत. मात्र अद्यापही काहीजण प्रचारांपासून दूर असले, तरी त्यांचा वावर थेट शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात दिसत आहे. मात्र काँग्रेसचे नगरसेवक विरोधी भूमिका घेत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. महापालिकेत आघाडीला भाजप-ताराराणीचा विरोध असला, तरी ताराराणीचे सर्वच तर भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या प्रचारात दिसत आहेत.

अशीच स्थिती शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान दिसत आहे. भाजप-सेनेची युती झालेली असली, तरी महापालिकेतील भाजपचे काही नगरसेवक सेनेच्या उमेदवारांऐवजी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसतात. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला महापालिकेत सेनेचा पाठिंबा असला, तरी त्यांचे नगरसेवक प्रचारांपासून दूर होते. पण शनिवारी प्रा. मंडलिकांनी आमदार राजेश क्षीरसागरांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे. मतदानाला अद्याप एक ते सव्वा महिन्याचा अवधी असला, तरी या काळात होणाऱ्या कोपरा सभा, मेळावे, रॅली, प्रचार फेरीमधून हळूहळू सर्वच नगरसेवक प्रचारात सक्रिय होतील. त्यामाध्यमातून त्यांची भूमिकाही स्पष्ट होईल. मात्र महापालिकेच्या सत्तासंघर्षात एकमेकांना पाण्यात पाहणारे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गळ्यात गळे घालून फिरत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साबळवाडीत गॅस गळतीमुळे घराला आग

0
0

साबळवाडीत गॅस गळतीमुळे घराला आग

कराड :

साबळवाडी (ता. कराड) येथील भर मध्यवस्तीत असणाऱ्या घरात रविवारी सकाळी सिलेंडरमधून गॅसची गळती झाल्याने आगीचा भडका उडाला. भीषण आगीत घर जळून खाक झाले असून, आगीमुळे शेजारील दोन घरांना झळ बसली आहे. आगीत संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे दोन लाखांवर नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

साबळवाडीत मध्यवस्तीत दिनकर साबळे यांच्या मालकीचे घर आहे. रविवारी सकाळी साबळे यांची सुन स्वयंपाक करीत असतानाच, गॅसची टाकी संपल्याने त्यांनी दुसरी टाकी जोडून घेतली. त्या नंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटात गॅसच्या रेग्युलेटर जवळ गळती झाल्याने गॅस सिलेंडरने पेट घेतला, त्यानंतर काही वेळातत आगीचा मोठा भडका उडाला. त्यामुळे लागलेली आग घरभर पसरली. या वेळी घरात झोपलेल्या तीन लहान मुलांना नातेवाईकांनी तातडीने घराबाहेर घेतल्याने जीवितहानी टळली.

ग्रामस्थांनी साबळे यांच्या घराकडे धाव घेत आडातून पाणी काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने अल्पावधीत रौद्ररूप धारण केले. त्या नंतर इंजिन लावून आडातील पाण्याचा वापर केल्याने सुमारे एका तासानंतर आग आटोक्यात आली. या आगीची झळ शेजारच्या दोन घरांना बसली असून, दोन्ही घरातील संसारोपयोगी साहित्य जळून बाबुराव आनंदा साबळे व तानाजी साबळे यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात बजरंग सर्जेराव साबळे (वय ४०) किरकोळ जखमी झाले आहेत.

ओळ‌ी

साबळेवाडी येथे गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत घराचे झालेले नुकसान.

.......

चिकून गुणियासदृश्य रुग्ण

कराड :

जखिणवाडी (ता. कराड) येथे तीन दिवसांपासून चिकुन गुणियासदृश्य रोगाची लागण झाल्याचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनासह गावकऱ्यांची धांदल उडाली असून, काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह बारा कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीने गावाचा सर्वे केला. खबरदारीची उपाययोजना म्हणून गावात डास प्रतिबंधात्मक फवारणी व आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे.

..........

पोलिसांनी जप्त केलेली टायर चोरीला

कराड :

उंब्रज (ता. कराड) येथे पोलिसांनी एका गुन्ह्यातील चोरट्यांकडून जप्त केलेल्या सुमारे पाच लाख रुपये किंमतीच्या टायरवर पुन्हा अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली होती. या प्रकरणी उंब्रज पोलिसांनी शुक्रवारी टायर चोरी प्रकरणी दोन संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडे गेले दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर संबंधित टायर चोरीमागे उंब्रज पोलिस क्रेनवरील कर्मचारीच असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी सनी आबा बैले (वय २९, रा. उंब्रज) व बरकत खुद्दबुदीन पटेल (वय ३०. रा. वहागाव ता. कराड) या संशयितांना शुक्रवारी उंब्रज पोलिसांनी अटक करून न्यायलयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. चोरीत तब्बल पाच लाख रुपयांचे एमआरएफ कंपनीचे ६१ टायर पोलिस निवासस्थानातील खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी पोलिस कर्मचारी जोतिराम भुजबळ यांनी ९ ऑक्टोबर २०१८ रोजी टायर चोरीला गेल्याबाबत फिर्याद दिली होती. त्या नुसार तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी तपासही सुरू केला होता. परंतु, तपासादरम्यान पोलिसांची बदनामी होऊ नये, या उद्देशाने अत्यंत गुप्तता पाळली होती.

...........

कोयना प्रकल्पग्रस्त

करणार आत्मक्लेश आंदोलन

कराड :

कोयनानगर येथे १२ फेब्रुवारीपासून येथे सुरू असलेले कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन रविवारी, ३४व्या दिवशी सुरूच आहे. कोयना प्रकल्पग्रस्त सोमवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संथगती कामाकाजाचा निषेध म्हणून कार्यालयासमोरच आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत.

वन्य जीव विभागाचा भूमीपुत्राच्या जीवाशी खेळ सुरू असून, महसूल व वन विभागाने संपादित केलेल्या जमिनी आणि १६ सप्टेंबर १९८५च्या सरकारी निर्णयानुसार बाधित गावातील जलसंपदा विभागाने संपादित केलेल्या जमिनीमध्ये मोठी तफावत आहे. याचा छडा लावून देशोधडीला लावलेल्या भूमीपुत्राना प्रशासन व राज्यकर्ते न्याय देणार का? असा सवाल कोयना प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे. पाटण तालुक्यातील एकूण २५ गावे कोयना अभयारण्यात बाधित झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाण्यात जप्तकेलेल्या ३०० गाड्या खाक

0
0

पोलिस ठाण्यात जप्त

केलेल्या ३०० गाड्या खाक

सोलापूर :

सदर बझार पोलिस ठाण्यात विविध कारणास्तव जप्त करण्यात आलेल्या गाड्यांना अचानक आग लागली. त्यामध्ये सुमारे दोनशे ते तीनशे दुचाकी जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बझार पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या गाड्या लावण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक काही गाड्या पेटल्या. त्या नंतर आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. परंतु, तोपर्यंत दोनशे ते तीनशे दुचाकी पेटल्या होत्या. घटनास्थळी अग्निशमनच्या चार गाड्या दाखल झाल्या होत्या. सुमारे तासभराने आग अटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, याच ठिकाणी असलेल्या एका रूममध्ये रिक्षांमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्यांवर कारवाई करून जप्त केलेले गॅस सिलेंडर ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने हे २५ ते ३० गॅस सिलेंडर बाहेर काढले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरुषोत्तम जाधव पुन्हा शिवसेनेत

0
0

पुरुषोत्तम जाधव पुन्हा

शिवसेनेत

सातारा

सातारा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते व नंतर भाजपमध्ये गेलेले पुरुषोत्तम जाधव यांनी मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन बांधून शिवसेनेत पुन्हा जाहीर प्रवेश केला. सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने जाधव यांना शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

भाजपने अद्यापही मतदारसंघावरील दावा सोडला नसल्याने सस्पेन्स वाढला आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विविध प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली असून, त्यांच्याकडून प्रचाराची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र, काही पक्षांकडून अद्याप चाचपणी सुरू असून भूमिका स्पष्ट केलेली नाही. उमेदवारी अर्ज भरायला दहा-बारा दिवसांचा कालावधीच शिल्लक राहिल्याने राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे. पुरुषोत्तम जाधव पूर्वी शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेची व विधानसभेची पहिली निवडणूक ते लढले होते. दुसरी निवडणूक मात्र ते अपक्ष लढले. सध्या ते भाजपमध्ये होते. लोकसभा निवडणुकीसाठी ते पूर्वीपासून इच्छुक आहेत. ते शिवसेने प्रवेश करणार, अशी चर्चाही राजकीय पटलावर सुरू होती.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आजपासून दोन दिवस पाणीबाणी

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिका शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने चंबुखडी साठवण टाकीतील गाळ काढण्याच्या कामाला सोमवारपासून (ता. १८) सुरुवात होणार आहे. परिणामी शहरात सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे ए., सी, डी व 'ई' वॉर्डातील संलग्न उपनगरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. या कालावधीत शहरवासियांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील पाणीसाठवण टाकीतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या आठवड्यात आपटेनगर साठवण टाकीतील गाळ काढण्यात आल्यानंतर सोमवारपासून चंबुखडी साठवण टाकीतील गाळ काढण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिंगणापूर व बालिंगा केंद्रातून होणारा पाणी उपसा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे ए., सी., डी. व 'ई.' या वॉर्डातील पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे. 'सी' आणि 'डी' वॉर्ड, संलग्न उपगनरे तर 'ए' वॉर्डातील फुलेवाडी, फुलेवाडी रिंगरोड परिसर, लक्षतीर्थ वसाहत, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, आपटेनगर, सानेगुरुजी वसाहत, तुळजाभवानी कॉलनी, हरिओम नगर, जुना वाशीनाका, शिवाजी पेठ, सरनाईक कॉलनी, राज कपूर पुतळा परिसर 'ई' वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरी पाचवी ते सातवी गल्ली, कुंभार गल्ली, बागल चौक, बी. टी. कॉलेज परिसराला पाणीपुरवठा होणार नाही. सोमवारी साठवण टाकीतील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले तरी मंगळवारी या भागात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार नाही. अशा भागात महापालिकेतर्फे टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल. दुरुस्तीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘यशस्वी आयुष्यासाठी आरोग्यपूर्ण जीवन हवे’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनाची कास धरत वाचनावर लक्ष केंद्रीत केल्यास निश्चित ध्येयप्राप्ती होते. यशस्वी आयुष्यासाठी आरोग्यपूर्ण जीवन यशपर्यंत पोहोचवते.' असे मत महापालिकेचे उपायुक्त मंगेश शिंदे यांनी केले. यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेजच्या पदवीदान समारंभप्रसंगी बोलत होते.

'पदवीधरांनी स्वयंरोजगार निर्माण करावा व समाजातील आदर्श नागरिक बनावे' असे आवाहन प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. सी. आर. गोडसे यांनी केले. त्यांच्या हस्ते ऋतुजा लाड, संदीप कोरे, वैशाली मुगडे, स्नेहा नायकवडी, पंढरीनाथ पाटील, अजित पोर्लेकर, पूजा यादव, शुभम हराळे, प्रियांका जाधव या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. समारंभाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्रांगणातुन रॅली काढण्यात आली. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश गवळी, प्रा. व्ही. के. तिवाटणे हे उपस्थित होते. प्रा. पी. डी. तोरस्कर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बी. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एच. डी. पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनेता सुशांत शेलार कार्यवाहपदी

0
0

कोल्हापूर : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या प्रमुख कार्यवाहपदी अभिनेता सुशांत शेलार यांची निवड झाली. रणजित जाधव यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त होती. महामंडळाच्या कार्यालयासाठीच्या जागा खरेदीचा कारणावरुन महामंडळाच्या बैठकीत वाद झाला होता. तसेच महामंडळाचे कार्यालय कोल्हापूर की पुण्यात करायचे या विषयावरून वादाला तोंड फुटल्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये कार्यवाह जाधव यांनी राजीनामा दिला होता. शनिवारी झालेल्या महामंडळाच्या बैठकीत जाधव यांचा राजीनामा मंजूर झाला. त्यांच्या जागी अभिनेता सुशांत शेलार यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक होईल

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'प्रकल्पग्रस्तांची कामे होत नसतील तर जिल्हा प्रशासनाविरोधात स्फोटक वातावरण होईल,' असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. गेले ३४ दिवस चांदोलीसह अन्य प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. डॉ. पाटणकर यांनी शनिवारी आंदोलनस्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. यापुढेही आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

पाटणकर म्हणाले, 'मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीची धरणग्रस्त वाट पहात आहेत. ९०० खातेदार आंदोलन करत असताना जिल्हा प्रशासन कठोर काळजाचे झाले आहे. धरणग्रस्तांचे रखडलेले काम भयावह झाले आहे. गेले ३३ दिवस आंदोलन करणारे तरुण प्रशासनावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. कोणत्याही क्षणी स्फोटक वातावरण होऊ शकते.'

'श्रमिक मुक्ती दलाची चळवळ नेहमी शांततेच्या मार्गाने आंदोलन करते' याकडे लक्ष वेधून डॉ. पाटणकर म्हणाले, 'आंदोलक रस्त्यावर लढाई करत असताना प्रशासन सकारात्मक भूमिका घेणार नसेल तर निर्णयाची किती वेळ वाट बघायची? खातेदार १८ वर्षे जमिनीची प्रतीक्षा करीत आहेत. सरकार कायद्यानुसार जमीन वाटपच करणार नसेल तर किसन पवारने पुनर्वसन कार्यालयाबाहेर आत्महत्या केली तशी परिस्थिती आणणार का? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत प्रश्न सुटले तरी जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकाराखालील प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही.'

आंदोलनात मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगुले यांनी नेतृत्व करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विवेकानंद’मध्ये गुणवंतांचा सत्कार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, साहित्य लेखन व सांस्कृतिक उपक्रमात सहभाग घेऊन यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यामुळे कॉलेजचा नावलौकिक वाढत असतो. विवेकानंद कॉलेजने ही यशाची परंपरा कायम राखत विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे' असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी केले. कॉलेजतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

'जीवनात यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट, परिश्रमाची गरज आहे' असे प्राचार्य होनगेकर यांनी सांगितले. वादविवाद, वक्तृत्व, साहित्य लेखन, एनसीसी, एनएसएसमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट व गौरवचिन्ह देऊन सत्कार झाला. जिमखाना विभागातील कर्मचारी सुरेश चरापले यांचाही सत्कार करण्यात आला. जिमखानाप्रमुख किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संतोष कुंडले यांनी सूत्रसंचालन केले. एनएसएस प्रमुख प्रा. एच. पी. पाटील यांनी आभार मानले. डॉ. अरिफ महात, प्रा. बी. एस. नागनूर, प्रा. बी. एस. लाड. प्रा. शहिदा कच्छी, डॉ. नीता पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहिती देण्याचे आवाहन

0
0

कोल्हापूर : शालेय पोषण आहार योजनेतील नोव्हेंबर, डिसेंबर २०१८ व जानेवारी २०१९ची इंधन, भाजीपाला बिले राज्य व जिल्हा परिषद स्तरावरुन वर्ग करण्यात आली आहेत. बिले मिळण्यासाठी सोमवारपर्यंत (ता. १८) ऑनलाइन माहिती भरावी लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक पुणे शिक्षण संचालकांनी प्रसिद्ध केले आहे. माहिती भरण्याची ही अखेरची संधी असून संबंधीत ठेकेदार व मुख्याध्यापकांनी ती गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जमा करावी असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. ए. बी. पाटील, कार्याध्यक्ष भगवान पाटील, सचिव अमोल नाईक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images