Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

धमकी देऊन खंडणी मागणाऱ्यास अटक

$
0
0

सिंगल फोटो...

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्यातील भाजपचे नेते रमेश दत्तू रेडेकर यांच्याकडे एक कोटी रुपये खंडणीची मागणी करून ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या श्रीधर शिंगटे (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) या फरारी आरोपीला आजरा पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी त्याला येथील न्यायालयात हजर केले असता १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. शिंगटेच्या अटकेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रमेश रेडेकर गेल्या काही वर्षांत नवोदित उद्योजक तसेच चंदगडमधून आमदारकीसाठी प्रयत्नशील म्हणून परिचित आहेत, तर या प्रकरणातील आरोपी शिंगटेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्र प्रकरणी त्याच्यावर आधीच गडहिंग्लज आणि कोल्हापूर पोलिसांत गुन्हे नोंद आहेत.

अशा स्थितीत एक कार्यक्रम संपवून रेडेकर सरंबळवाडी (ता. आजरा) या आपल्या गावी येत असताना शिंगटे व त्याच्या साथीदारांनी त्यांना धमकावले होते. तसेच दुसऱ्या दिवशी फोन करून शिवीगाळ आणि एक कोटीची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास रेडेकरांसह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद रेडेकर यांनी केली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी गुन्हा नोंद केला, पण शिंगटे फरारी होता. त्याला गुरुवारी पहाटे खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून नेसरीजवळ अटक केली.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्य सरकारच्या निर्णयानुसार शहरात प्लास्टिकबंदी असली, तरी अद्यापही प्लास्टिकची विक्री सुरू आहे. प्लास्टिक निर्मितीचे स्रोत आणि विक्रीला अटकाव करण्यासाठी प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत,' अशी माहिती शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पत्रकार बैठकीत दिली. त्यासाठी रेड्यूस, रेव्हुज व रिसायकल या थ्री आरचा वापर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'शहरातील कचरा आणि प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्लास्टिक विक्रीबाबत प्रशासन वेळोवेळी कारवाई करत असले, तरी पूर्णपणे प्लास्टिकबंदी करण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. प्लास्टिकचे निर्मिती स्रोत बंद करण्यासाठी रेड्युस, रेव्हुज व रिसायकल या थ्री आरचा वापर करण्यात येणार आहे.

शहरातील कचऱ्याची वेळेत निर्गत करण्यासाठी कर्मचारी वेळेत येण्याची गरज आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यावर भर दिला जाईल. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती कक्ष उभारण्यात येणार आहे. कक्षाच्या माध्यमातून घरोघरी जावून प्रबोधन करुन त्यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करुन घेऊ. स्वच्छतेची सुरुवात महापालिकेच्या विविध कार्यालयापासून केली जाईल. दर पंधरा दिवसाला विभागीय कार्यालये, रुग्णालये, वर्कशॉप येथे स्वच्छता मोहीम घेऊन सर्व कार्यालये स्वच्छ राहतील याकडे लक्ष देण्यात येणार आहे.स्वच्छता अॅपवर केवळ १८ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. स्वच्छतेबाबत तक्रारी दाखल होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.'

...

चौकट

जलदिनानिमित्त निबंध स्पर्धा

२२ मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा होत आहे. शहरवासियांमध्ये जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. सुमारे आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमात जलसाक्षरतेबाबत कार्यक्रम घेतले जातील. पाणी बचत, स्वच्छ पाणी याबाबत जनजागृती फेरीही काढण्यात येणार असल्याचे डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना जाहिरातींवर होणार कारवाई

$
0
0

कोल्हापूर

शहरातील दुकानांच्या दर्शनी भागावरील फलकांमार्फत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीबाबत महापालिका प्रशासनाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार दुकानदारांना जाहिराती शुल्क भरण्याचे निर्देश दिले होते. पण अद्याप काही दुकानदारांनी शुल्क जमा केले नसून अशा दुकानांच्या फलकावर इस्टेट विभागाच्यावतीने करावाई करण्यात येणार आहे. सोमवारपासून (ता. १८) कारवाईला सुरुवात होणार आहे.

महापालिकेच्या महासभेत जाहिरात प्रसिद्धीबाबत धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार दुकानांच्या नामफलका व्यतिरिक्त इतर कंपनींची जाहिरातीसाठी प्रति चौ. फूटाप्रमाणे शुल्क आकाराण्यात येणार आहे. धोरणानुसार शुल्क जमा करण्याच्या सूचना महापालिकेच्या इस्टेट विभागाने दिल्या आहेत. मात्र अनेक दुकानांच्या नामफलकाव्यतिरिक्त जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. अशा फलकांवर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी महापालिकेच्या शिवाजी मार्केट येथील इस्टेट विभागात विहीत शुल्क जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सत्तांतराचा शिवाय गत्यंतर नाही’

$
0
0

'सत्तांतराचा शिवाय गत्यंतर नाही'

सातारा/ कराड :

'आजघडीला देशात अनेक ठिकाणी औद्योगिक क्षेत्राला प्रचंड उतरती कळा लागली आहे. कठोर कायद्याने बांधकाम व्यवसायाची रया घालवली आहे. शेतकऱ्यांची ध्येय धोरणांअभावी झालेली अवस्था पाहून मन विषण्ण होते. निवडणुकांपेक्षा आपले कुटुंब महत्वाचे असून, कुटुंब सधन झाले तरच समाज सधन होणार आहे. देशाच्या उन्नतीसाठी अन्यायकारक कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे आहे, त्यासाठी आता परिवर्तनाशिवाय गत्यंतर नाही,' अशी टीका राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केली. खा. उदयनराजे भोसले मित्र समुहाच्या वतीने येथील कल्याण रिसॉर्टमध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. कृषी तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के आदी उपस्थित होते.

'वर्गमित्र बच्चूदादांनाच साथ देणार'

उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी सायंकाळी प्रथमच पाटणमध्ये येऊन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास झालेल्या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजते. भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी यापूर्वी गैरसमज झाले असतील तर ते दूर सारून वाट्टेल, त्या परिस्थितीत आजपासून भविष्यकाळात बच्चुदादांना मी साथ देणार असल्याची ग्वाही दिली. ही भेट सदिच्छा होती की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? असे पत्रकारांनी विचारल्यानंतर राजे म्हणाले, 'पहिल्यापासून नातेगोत्याचे संबंध आहेत. कॉलेजपासून मित्राचे संबंध आणि आज आलो ते आदरणीय सरकारांचा आशिर्वाद घेण्यासाठी आणि मित्र बच्चुदादांना भेटण्यासाठी. योगायोग कसा असतो, ते पहा आजच राष्ट्रवादीकडून यादी जाहीर झाली आणि मी पाटणमध्ये आलो. कालच पाटणमध्ये यायचे ठरले होते. या पूर्वी समज-गैरसमज जे झाले ते दूर झाले पाहिजेत. मागे काय झाले ते विसरून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत घालावी लागते. अगदीच काही टोकाचे झाले अशातला काही भाग नाही. गैरसमजातून काही गोष्टी घडल्या, ते नाकारता येत नाही. आजपासून भविष्यकाळात कायमस्वरूपी वाट्टेल त्या परिस्थितीत बच्चुदादांची मी साथ देणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार भारत भालकेंवर गुन्हा दाखल

$
0
0

आमदार भारत भालकेंवर गुन्हा दाखल

पंढरपूर :

आमदार भारत भालके यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण हलविताना एका वृद्ध महिला विक्रेत्याला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर भालके मंदिर परिसरात गेले होते. सुरुवातीला शांततेत चर्चा सुरू असताना मंदिर सुरक्षेतील पोलिस अधिकारी विश्वास साळोखे यांच्या उद्दाम उत्तरानंतर भालकेंचा पारा चढत गेला. त्यातच जमलेल्या शेकडो विक्रेत्यांसमोर पोलिस अधिकारी उद्दाम उत्तरे देऊ लागल्यावर भालकेंनी थेट मी तुझा बाप आहे, बुक्कीत दात पाडीन, अशी भाषा वापरल्याने दोघांमधील तणाव वाढला. या प्रकरणी भालकेंवर गुन्हा दाखल झाला आहे.

मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली होती. या वेळी महिला विक्रेत्याला मारहाण झाल्याने विक्रेते संतप्त झाले होते. त्यांनी थेट भालकेंकडे तक्रार केल्यावर आमदार घटनास्थळी पोहोचले. मात्र, सुरुवातीला शांतपणे सुरू असलेल्या चर्चेत पोलिस अधिकारी विश्वास साळोखे यांनी महिला विक्रेत्याचा अरेतुरे बोलण्यास सुरुवात केल्यावर भालके भडकले. सा‌ळोखे डोक्यावर टोपी न घालता आणि शर्टाची काही बटणे उघडी ठेवून भालके यांच्याशी बोलू लागल्यावर भालके यांनी त्याला तुझी टोपी कुठे आहे, असे विचारताच साळोखे यांनी उद्दामपणास सुरुवात केली. भालकेंनी ही मी तुझा बाप आहे, बुक्कीत दात पाडीन, अशा भाषेत पोलिस अधिकाऱ्याला बोलण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती चिघळली. या प्रकरणी भालकेंवर विविध सात कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. दरम्यान, अतिक्रमण काढताना मारहाण झाल्याने व्यापारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला देणार आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावित्रीबाई रुग्णालयात टोकन पद्धत सुरू करा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना दीर्घ काळ रांगेत उभे रहावे लागते. या महिलांना रांगेत उभा न करता टोकन पद्धत सुरू करा, तसेच विश्रांती कक्षही सुरू करा,' अशा सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते महापालिकेच्या विविध विभागाना भेटी देऊन तेथील अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयास भेट दिली. भेटीदरम्यान ओपीडी कक्षात सुमारे १५० महिला रांगेत उभ्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने गर्भवती महिलांना रांगेत उभे करू नका. तपासणी करण्यास विलंब होणार असल्यास त्यांच्यासाठी विश्रांती कक्ष सुरू करा, असेही त्यांनी सुचविले.

भेटीदरम्यान त्यांनी महापालिकेकडून केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. रुग्णांशी संवाद साधत त्यांनी येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सरकारी योजनांची माहिती देण्याची सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर त्यांनी पंचगंगा रुग्णालयास भेट दिली. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रकाश पावरा आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाण्याचा आराखडाथेट ‘पाण्यात’

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर टाइम्स टीम

ऐतिहासिक रंकाळा आणि कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून प्रयत्न केला जात आहे. प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडाही तयार केला. मात्र कृती आराखड्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने प्रदूषणाचे दुखणे कायम राहिले. याबाबत हायकोर्टाने वेळोवेळी सूचना देऊन दंडही केला. शेवटी प्रदूषणाचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादाकडे गेला. मात्र तरीही कृती आराखड्याला गती मिळालेली नाही. रंकाळा आणि पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने काही धोरणात्मक निर्णय घेतले. पण त्याची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई होत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न आजही गंभीर स्वरुप धारण करत आहे.

सांडपाणी ड्रेनेज व्यवस्था नसल्याने रंकाळ्यामध्ये चार आणि पंचगंगा नदीमध्ये १२ मोठ्या नाल्यांसह अनेक छोट्या नाल्यांतील ९३ एमएलडी सांडपाणी थेट मिसळते. त्यामुळे रंकाळा आणि नदी प्रदूषाणामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याला अटकाव करण्यासाठी महापालिकेने ७६ व १७ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केले. यापैकी दुधाळी येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असला, तरी कसबा बावडा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यन्वित नाही, परिणामी १४ एमएलडी पाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन वारंवार साथीच्या आजारांची साथ फैलावत आहे. महापालिका प्रशासन ७९ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करत असल्याचा दावा करत असले तरी, बापट कँप व लाइन बाजार येथून दहा एमएलडी व चार एमएलडी सांडपाणी छोट्या नाल्यांद्वारे थेट नदीत जात आहे. बापट कँप व लाइन बाजार येथील सांडपाणी पंपिंग करण्यास डिसेंबर २०१९ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर चार छोट्या नाल्यातील सांडपाणी रोखण्यासाठी प्रक्रिया प्रकल्पासाठी जाहीर केलेल्या निविदेला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उर्वरित सांडपाण्यावर प्रक्रिया करेपर्यंत प्रदूषणाचे दुखणे कायम राहील.

रंकाळ्यामध्ये मिसळणारे सांडपाणी रोखण्यास महापालिकेला यश आले असले, तरी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे अनेकवेळा रंकाळ्यातील पाण्याला हिरवा रंग चढतो. त्याचा परिणाम जलचरांवर होत आहे. हे सांडपाणी रोखण्यासाठी रंकाळ्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू असले, तरी त्याला म्हणावी तितकी गती नाही. रंकाळा व नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार केला. पण प्रयत्न अपुरे पडल्याने याबाबत कोर्टात धाव घेण्यात आली. हायकोर्टानंतर हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाकडे गेले. हरित लवादाने वेळोवेळी याबाबत महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंणण मंडळाला फटकारलेही. मात्र दोन्ही संस्थांनी केलेल्या दुर्लक्षांमुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. वारंवारच्या अशा दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याऐवजी प्रदूषण रोखण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्याला गती देण्याची आवश्यकता आहे. कागदावरच कृती आराखड्याची मांडणी न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सुचनांनुसार प्रत्येक महिन्याला अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान प्रशासनाने अहवालच सादर केला नाही. त्यामुळे बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान लवादाने महापालिकेला दंड सुनावला. रंकाळा व पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने एसटीपी प्लांटसह नाले वळवण्यात यश आले आहे. यामध्ये शंभर टक्के यश आले नसले, तरी केलेल्या उपाययोजना सादर करणे आवश्यक होते. महापालिकेप्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाला दर महिन्याला चाचणी अहवाल घेऊन सादर करण्याची सूचना दिली आहे. प्रदूषण मंडळाने चाचणी घेतली पण त्याबाबतचा अहवाल सादर केला नाही. दोन्ही केलेल्या उपाययोजना बाबत गाफील राहिल्याने दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.

९३ एमएलडी

पंचगंगेत मिसळणार सांडपाणी

६० एमएलडी

कसबा एसटीपी प्लांट प्रक्रिया होणारे पाणी

१९ एमएलडी

दुधाली एसटीपी

७९ एमएलडी

एकूम प्रक्रिया होणारे सांडपाणी

शहरात निर्माण होणाऱ्या एकूण सांडपाण्यापैकी ८५ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरीत सांडपाण्यावर डिसेंबरअखेर प्रक्रिया केली जाईल. त्याचबरोबर २०३४ पर्यंत दररोज सांडपाणी निर्माण होईल तेवढा प्लांट नव्याने उभारणी केली आहे. राज्यातील इतर महापालिकेपेक्षा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक बाबी कोल्हापूर महापालिकेने अधिक केल्या आहेत. मात्र झालेला दंड हा तांत्रिक स्वरुपाचा आहे.

आर. के. पाटील, उपअभियंता

रंकाळा माझा आहे आणि माझाच राहिला पाहिजे, असे प्रत्येक नागरिकाची भावना तयार होणे आवश्यक आहे. जुन्या पिढीने ज्याप्रमाणे रंकाळ्याचे संवर्धन केले त्याच पद्धतीने संवर्धन करून पुढच्या पिढीकडे हँडओव्हर केला पाहिजे. त्यासाठी पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासकांनी पुढे येण्याची गरज असून रंकाळा संवर्धनासाठी झालेल्या खर्चाबाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला जाब विचारण्याची आवश्यकता आहे.

सुनील केंबळे, याचिकाकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंब एक, पक्ष अनेक

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com
Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशाने सोयीच्या राजकारणाचा विषय ऐरणीवर आला आहे. कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नाही. जिल्ह्यातही व्यक्तीकेंद्रित राजकारण, तालुका राजकारणात सोयीची भूमिका आणि प्रत्येक निवडणुकीत वारा वाहील त्या पद्धतीने धोरण अंगिकारणाऱ्या नेत्यांची कमतरता नाही. यामुळे एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, आमदार म्हणून राजकारणात वावरत आहेत. 'कुटुंब एक आणि पक्ष अनेक'असे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. कुटुंबातील सदस्याच्या विजयासाठी काहीजणांनी पक्षीय बंधने झुगारली तर काही कुटुंबात पदासाठी भाऊबंदकी उफाळली.

डी.वाय. राष्ट्रवादीत, सतेज काँग्रेसमध्ये

शिक्षण आणि राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची ओळख आहे. गेली अनेक वर्षे ते सक्रिय राजकारणात नसले तरी काँग्रेससोबत कायम राहिले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे रितसर सदस्यत्व स्वीकारले. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन राजकारणही रंगले. दुसरीकडे त्यांचे पुत्र आणि आमदार सतेज पाटील हे जिल्ह्यात काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून कार्यरत आहेत. मात्र सध्या पाटील कुटुंबियांत वडील राष्ट्रवादीत आणि मुलगा काँग्रेसमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे.

.......

महाडिक स्वतंत्र, पुतण्या राष्ट्रवादीत, मुलगा -सून भाजपात

व्यक्तीकेंद्रित आणि सोयीचे राजकारण करण्यात माहीर म्हणून माजी आमदार महादेवराव महाडिक यांना ओळखले जाते. पक्षीय चौकट, ध्येय धोरणे हे त्यांच्या ध्यानीमनी नसते. आपल्याला योग्य ते आणि सोयीचे राजकारण ही त्यांची राजकीय नीती आहे. युती सरकारच्या कालावधीत त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस संपविण्याची वल्गना केली होती. कालांतराने त्याच काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व केले. केंद्र आणि राज्यामधील सत्ताकेंद्राला पूरक भूमिका घेऊन कधी शिवसेनेशी जवळीक साधली. तर कधी काँग्रेसचे आमदार बनले. आता ते भाजपला जवळचे आहेत. त्यांचा पुतण्या व विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर मुलगा अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत. स्नुषा शौमिका महाडिक या भाजपमध्ये असून जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. एकाच कुटुंबात वेगवेगळे पक्ष एकवटल्याचे उदाहरण म्हणून महाडिक कुटुंबीयांकडे पाहावे, अशी टीका राजकीय विरोधक करतात.

......

कुपेकर कुटुंबामध्ये गृहकलह

माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर कुपेकर कुटुंबीयांत गृहकलह निर्माण झाला. कुपेकर यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर यांना राष्ट्रवादीचे विधानसभेचे तिकीट मिळाल्यानंतर पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांनी वेगळी वाट स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार संध्यादेवी आणि त्यांची मुलगी डॉ. नंदिनी बाभूळकर या राष्ट्रवादीत आहेत. मध्यंतरी डॉ. बाभूळकर यांची भाजपसोबत वाढलेली जवळीक चर्चेचा विषय ठरली होती. विधानसभेची निवडणूक असो की स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येक ठिकाणी या कुटुंबीयांत राजकीय संघर्ष उद्भवत आहे. तालुक्यात दबदबा असणारे कुपेकर कुटुंबीय राष्ट्रवादी आणि शिवसेनेत विभागले आहे.

....................

काका-पुतण्या एकत्र पण....

करवीर तालुक्याच्या राजकारणात नरके कुटुंबीयांचा वरचष्मा आहे. कारखाना, बँका, दूध संस्थांच्या माध्यमातून त्यांचे नेटवर्क आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचा राजकारण व सहकार क्षेत्रात मोठा वावर आहे. विधानसभा निवडणुकीत काका, पुतणे हे दोघे एकत्र असतात. मात्र गोकुळच्या राजकारणात अरुण नरके यांची भूमिका महादेवराव महाडिक यांना पोषक अशीच राहिली आहे. तर लोकसभा निवडणुकीत त्यांनी धनंजय महाडिकांना साथ दिली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार नरके व संदीप नरके हे चुलतभाऊ आमनेसामने उभे ठाकले. संदीप नरके हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर आमदार नरके यांनी जि.प.चे विद्यमान उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांना पाठिंबा दिला होता.

......

मुरगूडमध्ये भाऊबंदकी

मुरगूडच्या राजकारणात रणजितसिंह आणि प्रविणसिंह पाटील या बंधूची जोडी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या दोघांमध्ये भाऊबंदकी उफाळून आली आणि दोघांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या. रणजितसिंह पाटील हे सध्या भाजपात आहेत तर प्रविणसिंह पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना साथ दिली आहे. रणजितसिंह पाटील हे गोकुळचे संचालक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत त्यांची भूमिका ही खासदार महाडिकांना पूरक ठरेल अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मदतीच्या नंबरवर तक्रारींचा वर्षाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी येथील जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीमधील आपत्ती निवारण कक्षातील हेल्पलाईनवर मदत विचारण्याऐवजी तक्रार, प्रश्न विचारण्यासाठीच अधिक कॉल येत आहेत. रोज ५० ते ८० जण फोन करतात. त्यापैकी निम्म्याहून अधिकजण निवडणूक यादीत नाव नाही, ओळखपत्र मिळाले नाही, नविन मतदार अर्ज कसा भरावा, त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडावी, यासंबंधी माहिती विचारतात.

जिल्हा निवडणूक प्रशासनाने २५ जानेवारी २०१९ रोजी जिल्हा संपर्क केंद्र सुरू केले. या केंद्रात लँडलाईनवरून संपर्क करण्यासाठी १९५० तर मोबाइलवरून संपर्कासाठी ०२३१- १९५० असे दोन टोल फ्री क्रमांक कार्यरत आहेत. सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत दोन टप्प्यात येथे कर्मचारी आहेत. ते प्रत्येक कॉलचा नंबर, नाव, पत्ता, कशासाठी फोन केला होता, त्याचे तपशील वहीत नोंद करून ठेवतात. संबंधिताने विचारलेली माहिती सांगतात.

मतदारयादीत नावाचा सामावेश, नाव वगळणे, नाव, पत्त्यांत दुरूस्ती प्रक्रियेसंबंधीच्या प्रश्नास ते उत्तर देतात. मतदारयादीत नाव आहे, हे देखील ऑनलाइन पाहून सांगतात. पण यादीत नाव का आले नाही, मतदार ओळखपत्र कधी मिळणार, मतदार नोंदणीची प्रक्रिया का सोपी नाही, अशा स्वरूपाच्या प्रश्नास त्यांना समर्पक उत्तर देता येत नाही. प्रशासनाच्या दिरंगाई कामकाजाविरोधात मोठ्या संख्येने तक्रारी झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. तरीही कर्मचारी संयमाने उत्तरे देताना दिसतात. शहर आणि जिल्ह्यातून हेल्पलाइनवर फोन येतात. कमीत कमी ५० आणि अधिकाधिक ८२ पर्यंत असे कॉल येतात. आतापर्यंत १९११ कॉल आले आहेत.

....

चौकट

भिंतींवरील 'कमळ' झाकले

आचारसंहिता भंगाची तक्रार फोटो, व्हिडिओसह ऑनलाईन करण्यासाठी निवडणूक आयोगाने सीव्हीजील अॅप कार्यान्वित केले आहे. प्रत्येक तक्रार आयोगाच्या प्रशासनास दिसते. अॅपवरील तक्रारीचे निरसन करण्यासाठी आपत्ती निवारण विभागात कक्ष सुरू करण्यात आला आहे. अॅपवर आतापर्यंत ९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात शहरातील मंगळवार पेठेतील एक बार रात्री दहानंतर सुरू असल्याची तक्रार होती. उर्वरित कोल्हापूर आणि इचलकरंजीहून करण्यात आलेल्या तक्रारी भिंतींवर रेखाटण्यात आलेल्या 'कमळ' चिन्हाविरोधात होत्या. कमळ चिन्हामुळे आचारसंहिता भंग होत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते. तक्रारीवरून शंभर मिनिटाच्या आत भिंतींवरील 'कमळ' चिन्ह झाकण्यात आले. तर उशिरापर्यंत चालू असलेल्या बारचालकास नोटीस देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संग्रामसिंह गायकवाड हातकणंगलेतून लढवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून संग्रामसिंह गायकवाड यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ते माजी खासदार दिवंगत उदयसिंगराव गायकवाड यांचे पुतणे तर माजी आमदार दिवंगत संजयसिंह गायकवाड यांचे बंधू आहेत. यापूर्वी त्यांनी १९९९ मध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवताना २१ हजार ११४ मते मिळवली होती.

गायकवाड गेली २५ वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत असून ते राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळवण्यासाठी त्यांनी शाहूवाडी तालुक्यातील आकुर्डे येथे श्रीमंत जयसिंगराव गायकवाड मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटलची उभारणी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना गायकवाड म्हणाले, 'आजअखेर झालेल्या निवडणुकांत मतदारसंघातील पूर्व भागातील दत्तात्रय कदम, बाळासाहेब माने, कल्लाप्पाणा आवाडे, निवेदिता माने खासदार झाले आहेत. विद्यमान खासदार राजू शेट्टी हे देखील पूर्व भागातील आहेत. निवडून आलेल्या सर्व खासदारांना शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातून मताधिक्य मिळाले. पण दोन्ही तालुक्यांचा विकास झाला नाही. शाहूवाडी पन्हाळा परिसरासह दुर्गम ग्रामीण भागात मूलभूत सोयीसुविधा उभारणीसह काबाडकष्ट करणाऱ्या बारा बलुतेदारांचे जीवनमान उंचावण्यासाठी निवडणूक लढवत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल, बार, परमीट रुम रात्री साडेदहा वाजेपर्यंतच खुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवडणूक आचारसंहितेची कडक अमंलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, परमिट रुम, दारू दुकाने रात्री साडेदहा वाजता बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला आहे. आजपासून (शनिवार) याची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हा निर्णय २४ एप्रिलपर्यंत लागू असेल.

लोकसभा निवडणूक निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यााठी आदर्श आचारसंहिता अंमलात आणली जात आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी करताना जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टारंट, बार, परमिट रुम, दारू दुकानांच्या आस्थापना नियमांचा अडथळा येत आहे. नियम डावलून रात्री उशिरापर्यंत हॉटेल व मद्य विक्रीची दुकाने सुरू असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल, बार, परमिट रुम, देशी दारू दुकाने रात्री साडेदहा वाजल्यानंतर बंद ठेवण्याचा आदेश काढला. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत हा निर्णय लागू राहिल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्थ, समीर चालतो,मग रणजित का नको

$
0
0

पंढरपूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अजित पवारांच्या पार्थला तिकीट मिळते, भुजबळांच्या समीरला तिकीट मिळते, मग २० वर्षे पक्षात विविध पदावर काम केलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहितेंना का उमेदवारी मिळत नाही, राष्ट्रवादीला रणजित का चालत नाही, असा सवाल मोहिते-पाटील गटाचे कार्यकर्ते करू लागले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. रणजितसिंह मोहिते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून इच्छितात, त्याला वडील विजयसिंह यांचा ही होकार आहे. पण, रणजितसिंहांना पक्षातून विरोध असल्याचे कारण पुढे करून पुन्हा विजयसिंह मोहिते-पाटील यांना निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला जात आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही मोहिते-पाटील यांनी माढ्यातून विजय मिळवला होता. मात्र, शरद पवार यांनी अचानक येथून उमेदवारी लढविण्याची घोषणा केल्यावर मोहिते-पाटील यांनी माघार घेत पवारांना पाठिंबा दिला होता. मात्र, पवार यांनी लढण्यास नकार दिल्याने मोहिते-पाटील यांना उमेदवारीसाठी आग्रह सुरू झाला आहे. मात्र, आता आपल्या मुलाला उमेदवारी द्या, अशी भूमिका विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली आहे. मात्र, मोहिते विरोधकांनी रणजितसिंहांच्या उमेदवारीस विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पार्थ चालतो. समीर चालतो, तर रणजित का चालत नाही, असा सवाल मोहिते गटाचे कार्यकर्ते करू लागले आहेत. कोणीही उमेदवार दिला, तरी आम्ही त्यास निवडून आणू. मात्र उमेदवाराची घोषणा लवकर करा, अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत. काही कार्यकर्ते प्रभाकर देशमुख यांच्या संभाव्य उमेदवारीवर आक्षेप घेत आहेत. रणजितसिंह किंवा दीपक साळुंखे यातील कोणीही उमेदवार आम्हाला चालेल, पण, देशमुख नको, अशी त्यांची भूमिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दरोडेखोर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0

दोन दरोडेखोर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात

महाबँक दरोडा

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड तालुक्यातील शेणोली येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दिवसाढवळ्या गोळीबार करून दरोडा टाकत २३ लाखांची रक्कम व सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोन संशयितांना नागपूर पोलिसांनी नागपूर येथे जेरबंद केले आहे.

श्रवणकुमार ब्रिजनंदन प्रसाद यादव (वय २४, रा. जमालुद्दीन चौक, दानापूर, जि. पाटणा, बिहार) व अभिषेककुमार रणजिसिंग (वय २०, रा. नेवरा कॉलनी, खवल, दानापूर, जि. पाटणा, बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. नागपूर पोलिसांनी या दोघांकडून सुमारे ६ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच ४ मोबाइल, असा एकूण सुमारे ७ लाखांचा ऐवजही जप्त केला आहे. मात्र, या प्रकरणातील अन्य संशयित फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

कराड तालुक्यातील शेणोली येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर सोमवारी, ११ रोजी दुपारी ४ वाजता दोघांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने भरदिवसा दरोडा घातला होता. या वेळी दरोडेखोरांनी हवेत व भिंतीवरती गोळीबार करीत बँकेतील २३ लाख रुपयांची रोकड, सोने तारण कर्जासाठी आलेले सोन्याचे दागिने व अधिकाऱ्यांचे मोबाइल पळविले होते. सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्वतः तपासात लक्ष घालत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. कराडचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, कराड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या सहकाऱ्यांची वेगवेगळी आठ तपास पथक तयार करूत तपास केला होता. दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या टप्प्यात असली तरी ती वेगवेगळय़ा जिल्ह्य़ातून पसार होण्याच्या प्रयत्नात होती. तसेच संशयित दरोडेखोर ज्या वाहनाने प्रवास करीत होते. त्या वाहनांसह सर्व माहिती मिळवण्यात कराड पोलिसांना यश आले होते. दरोडेखोरांनी नागपूरच्या दिशेने पलायन केल्याचे समजताच कराड पोलिसांनी नागपूर पोलिसांना माहिती दिली. नागपूर पोलिसांनी नागपूर-वर्धा मार्गावरील खापरी येथे बसेसची तपासणी केली असता कराडहून आलेल्या एका खासगी प्रवाशी बसमध्ये वरील दोन्ही संशयित आरोपी असल्याचे आढळून आले. कराड पोलिसांनी दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या व माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांनी त्यांची ओळख पटवित अधिक तपासणी केली असता त्यांच्याजवळ सहा लाखांवर रोकड असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी दरोड्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, या टोळीतील अन्य साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात सांगली येथील एक, नागपूर व मुंबई येथील प्रत्येक दोन, असे आणखी पाच आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय आयुक्तांनी मागविला अहवाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंत प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेत केलेल्या विविध उपाययोजनांचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाने मागविला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना विभागातील उप आयुक्त पी. बी. पाटील यांनी कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हा परिषदेला पत्र पाठवून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. जि.प. पदाधिकाऱ्यांकडून वाहने जमा करुन घेण्याविषयीचा अहवाल मागविला आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीमार्फतही स्थानिक पातळीवर कार्यवाही करावी अशा सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक जाहीर झाल्यापासून सार्वजनिक रस्ते, मैदान, इमारतीच्या आवारातील बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज, जाहिराती काढण्याबाबतचा अहवाल मागितला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकवडेतील दोघांकडून प्राणघातक हत्यारे जप्त

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

टाकवडे (ता. शिरोळ) येथील दोघा युवकांकडून पोलिसांनी चार सत्तूर, एक तलवार अशी प्राणघातक हत्यारे जप्त केली. शुक्रवारी मध्यरात्री ही कारवाई केली. मंदार महादेव पाटील व विवेक महादेव पाटील अशी त्यांची नावे आहेत. याबाबत शिरोळ पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : टाकवडे येथे दोघा तरुणांनी दहशत माजविण्यासाठी महादेव पाटील यांच्या पोल्ट्री फार्मच्या मागील बाजूस धारदार शस्त्रे लपविल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या संशयितांना पथकाने पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी लपवून ठेवलेली प्राणघातक हत्यारे काढून दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थेट पाइपलाइनसाठी सात घरे पाडणार

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी सुरू असलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेमध्ये अडथळा ठरत असलेली घरे काढून घेण्यास काळम्मावाडी येथील ग्रामस्थांनी मंजुरी दिली आहे. ही सात घरे बाजूला काढण्यात यश आले आहे. जलसंपदा विभागाच्या नोटिसीनंतर घरे काढून घेण्याची भूमिका काळम्मावाडी ग्रामस्थांनी घेतली. ग्रामस्थ स्वत:हून घरे काढणार असल्याने गावातून जाणारी ७०० मीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.

शहरवासियांच्या जिव्हाळा प्रश्न असलेल्या थेट पाइपलाइन योजना विविध अडथळ्यांतून मार्गक्रमण करीत आहे. विविध सरकारी विभागांच्या परवानग्या मिळवताना प्रशासनाची अडचण होत आहे. योजनेला सोळांकूर ग्रामस्थांनी विरोध केला आहे. वन विभागाची परवानगी वगळता इतर सर्व परवानग्या मिळवून योजनेचे काम सुरू आहे. योजनेतील प्रत्येक अडथळा पार करत कामाला गती देण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. कामात काळम्मावाडी गावातून जाणाऱ्या ७०० मीटर पाइपलाइनला प्रश्न निर्माण झाला होता.

जलसंपदा विभागाने कॅनलसाठी आरक्षीत ठेवलेल्या जागेवर ग्रामस्थांनी घरे बांधली आहेत. सिमेंट काँक्रिटमध्ये बांधलेल्या ७ घरांसह १३ शौचालयांचा अडथळा निर्माण झाला होता. या मार्गात तीन गोबरगॅस प्लान्टही आहेत. त्यामुळे ठेकेदाराने ७०० मीटर अंतरातील कामाला सुरुवातच केलेली नाही. जलसंपदा विभागाच्या या जागेवरील ही घरे हटविण्याबाबत महापालिका प्रशासनाने पत्र पाठवले होते. त्यानंतर जलसंपदा विभागाने संबंधीतांना आरक्षीत जागांवर बांधलेली घरे काढून घेण्यासाठी नोटीसही बजावली. पण त्यावर कार्यवाही झालेली नव्हती.

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. कलशेट्टी यांनी योजनेची पाहणी केली. पाहणीदरम्यान काळम्मावाडी गावातील अडथळा त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर येथील अडथळा दूर करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या. जलसंपदा विभागाने अतिक्रमण केलेल्या ग्रामस्थांना घरे काढून घेण्याबाबत नोटीस दिल्यानंतर ग्रामस्थांनी ही घरे काढून घेण्यास समर्थता दर्शवली आहे. त्यामुळे योजनेतील आणखी एक अडथळा दूर करण्यास प्रशासनाला यश आले आहे.

जॅकवलेच्या कामास सुरुवात

'थेट पाइपलाइन योजनेमध्ये जॅकवेल उभारणीत सर्वात मोठा अडथळा आला आहे. धरणात पाणीसाठा जादा असल्याने कमी कालावधीत हाती आहे. त्यामुळे जॅकवलेच्या खोदाईसाठी विलंब लागत आहे. एकूण ४६ मीटरपैकी ४३ मीटरची खोदाई करण्यात आली असून उर्वरित तीन मीटरच्या खोदाईला गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली. ब्लास्टिंगचा वापर करुन खोदाई केली जात असून मार्चअखेर हे काम पूर्ण होऊन बांधकामाला सुरुवात होईल,' असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरभरा डाळ, गुळाला मागणी वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात हरभरा डाळ, गुळाला मागणी वाढली आहे. दोन्ही पदार्थांचे दर स्थिर असून साबुदाण्याच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. तर गव्हाच्या दरात मात्र प्रतिकिलो दोन रुपयांनी घट झाली आहे.

पुढच्या आठवड्यात बुधवारी, होळी (शिमगा) असून घरोघरी पुरणपोळी बनविली जात असल्याने बाजारात हरभरा डाळ, गूळ, सुंठ या पदार्थांना मागणी वाढली आहे. हरभरा डाळीचा दर प्रतिकिलो ६४ ते ६८ रुपयांवर तर गुळाचा दरही प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांवर स्थिर आहे. दरवर्षी होळी सणावेळी दोन्ही पदार्थांच्या दरात वाढ होते. पण यंदा हरभरा डाळ, गुळाची नव्याने आवक झाल्याने दर स्थिर असल्याचे धान्य दुकानदार किरण वीर यांनी सांगितले. उन्हाळी पदार्थ तयार करण्यासाठी साबुदाण्याला मागणी वाढली असल्याने दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. मसूर डाळीच्या दरातही प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. मसाल्याच्या पदार्थांपैकी जिऱ्याच्या दरात प्रतिकिलो वीस रुपयांनी घट झाली आहे.

किराणा दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३६

शेंगदाणा :९० ते १००

मैदा : ३२

आटा : ३२

रवा : ३२

गूळ : ४० ते ५०

साबुदाणा : ६४ ते ७०

वरी : ७५ ते ८०

००००

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ८४

मूगडाळ : ८४

उडीद डाळ : ७० ते ८०

हरभरा डाळ : ६४ ते ६८

मसूर डाळ : ६० ते ६४

मसूर : ७० ते १२०

चवळी : ७२ ते ८०

हिरवा वाटाणा : ८८ ते ९६

काळा वाटाणा : ६० ते ६४

मूग ८०

मटकी : ८० ते १००

छोले : ८० ते १००

००००

ज्वारी दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ३२ ते ५०

गहू : २८ ते ३२

हायब्रीड ज्वारी : २४ ते ३०

बाजरी : २८ ते ३०

नाचणी : ४०

००००

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १२५

सरकी तेल : ९०

खोबरेल : २४० २२०

सूर्यफूल : ९० ते १०५

०००

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १८०

जिरे : २६०

खसखस : ७००

खोबरे : १९० ते २००

वेलदोडे : २२००

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणप्रश्नी चार अधिकाऱ्यांना नोटिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयंती नाल्याचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याची गंभीर दखल घेत शनिवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी चार अधिकाऱ्यांसह विश्वा इन्फ्रास्ट्रक्चरला कारणे दाखवला नोटीस बजावली. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, उपजलअभियंता रामनाथ गावयकवाड, कनिष्ठ अभियंता आर. के. जाधव या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. विश्वा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवरही नदी प्रदूषणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. आयुक्तांनी जयंती नाला, सुतारमळा, जुना बुधवार पेठ, सीपीआर नाल्याची पाहणी करत नाल्यातील सांडपाणी ओव्हरफ्लो होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना केली.

ऐतिहासिक रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीच्या प्रदूषणप्रश्नी राष्ट्रीय हरित लवादाने बुधवारी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड करून एक दिवसही उलटला नसताना शुक्रवारी जयंती नाला ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी थेट नदीत गेले. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी नाल्याची पाहणी केली. बंधाऱ्यावर आयुक्त येताच कर्मचाऱ्यांनी तातडाने पंपिंग सुरू करुन सांडपाणी थांबविण्याचा प्रयत्न केला. याबाबत आयुक्तांनी थेट नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी सुतारमळा येथील नाल्याची पाहणी करत मातीचा बंधारा घालून सांडपाणी अडविण्यासह ब्लिचिंग पावडर टाकण्याची सूचना केली. जुना बुधवार पेठेतील गटारीतून येणारे सांडपाणी ड्रेनेज चेंबरला जोडण्याची सक्त सूचना त्यांनी जलअभियंत्यांना केली.

त्यानंतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्तांनी, 'जयंती नाला पुन्हा ओव्हरफ्लो झाल्यास त्याची जबाबदारी संबंधीत अधिकाऱ्यांवर राहील' असे बजावले. जल अभियंत्यांनी नाला तांत्रिक कारणामुळे ओव्हरफ्लो झाल्याचे सांगितले. मात्र याबाबत आयुक्तांनी असमाधान व्यक्त केले. सांडपाण्याची साठवण मर्यादा वाढवा, गाळ उपसा करणे, बाजूपट्टी करणे या उपाययोजना करा. याबाबतच्या तांत्रिक बाबी तपासून अहवाल सादर करा, असे निर्देश दिले.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रन मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबरे, शाखा अभियंता राजेंद्र पाटील, विश्व इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापक पवनकुमार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी थकविणाऱ्या १० सरकारी कार्यालयांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने 'पाणी कनेक्शन का तोडू नये' अशी कारणे दाखवा नोटीस दहा सरकारी कार्यालयांना दिली. सीपीआर, जिल्हा पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे आदी विभागांकडे असलेल्या सुमारे वीस कोटी रुपयांच्या थकीत पाणीबिलाच्या वसुलीसाठी नोटीस देण्यात आली आहे.

मार्चअखेर असल्याने महापालिकेच्या सर्व विभागांच्या वसुली मोहिमेने वेग घेतला आहे. शहर पाणीपुरवठा विभागाची सुमारे २५ कोटींची थकबाकी आहे. यात सरकारी कार्यालयांकडील थकबाकी सर्वात जास्त आहे. थकीत बिलांच्या वसुलीसाठी प्रशासनाने बिलातील दंडात ५० टक्के सवलत योजना जाहीर केली आहे. योजनेची मुदत ३१ मार्च रोजी संपणार आहे. त्यापूर्वी सरकारी कार्यालयांची थकीत बिल वसुली व्हावी यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय, सीपीआर, जिल्हा पोलिस प्रशासनासह अन्य कार्यांलयाकडे विलंब आकारासह १६ कोटी ६६ लाख रुपये, सांडपाणी अधिभार दोन कोटी ६० लाख रुपये अशी एकूण १९ कोटी ३९ लाखांची थकबाकी आहे. याबाबत सर्वच कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. मार्चअखेर थकबाकी जमा न केल्यास पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. घरगुती व वाणिज्य पाणीवापराच्या थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. नोटिसा देऊनही रक्कम न जमा केलेल्या १५०० मिळकतदारांचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांना विज, पाणी बिले देण्यासाठी वर्षाला अनुदान मिळते. पण अनुदान प्रत्येक महिन्याला न मिळता वर्षअखेरीला मिळते. त्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांची थकबाकी वाढत जाते. त्याचा परिणाम सर्वच सरकारी कार्यालयांच्या वसुलीवर होत आहे.

सीपीआरचे कनेक्शन तोडताना अडचण

सीपीआर रुग्णालयाकडे पाणीपुरवठ्याची चार कोटी २७ लाखांची थकबाकी आहे. रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस दिली असली तरी पाणी कनेक्शन तोडताना प्रशासनासमोर मोठी अडचण आहे. सीपीआरमध्ये हजारो रुग्ण उपचार घेतात. कनेक्शन तोडल्यास त्याचा फटका सर्वात जास्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसणार आहे. त्यामुळे येथे सामोपचाराने थकीत रक्कम वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रमुख थकबाकीदार सरकारी कार्यालये

४, २७,००,०००

२,५१,०००

जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान

२, ५९,०००

पोलिस अधिक्षक कार्यालय

१, १९,०००

करवीर प्रांत कार्यालय

८२०००

करवीर तहसीलदार कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानवारीसाठी शिक्षकांना बिनव्याजी कर्ज

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

उन्हाळ्याच्या सुट्टीत विमानवारीने पर्यटन करण्याचा बेत आखणाऱ्या शिक्षकांना बिनव्याजी जास्तीत जास्त वीस हजार रुपये कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्यावतीने (कोजिमाशी) विमानवारी योजना सुरू केली आहे. सभापती शांताराम तोंदकर, उप सभापती अरविंद किल्लेदार, तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी या योजनेची माहिती एका पत्रकाद्वारे दिली. शिक्षकाला शाळा, घर, समाज या जबाबदारी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. त्याला पर्यटन करायला मिळत नाही. विमानात बसून कुटुंबासह प्रवास करता यावा यासाठी संस्थेकडून जास्तीत जास्त वीस हजार रुपयांचे कर्ज देण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. कर्जाची रक्कम समान दहा हप्त्यात फेडावयाची आहे. ही योजना संस्थेच्या सर्व शाखातून उपलब्ध करुन दिली आहे. अनेक शिक्षकांनी वैयक्तिक व ग्रुपच्या माध्यमातून उन्हाळी सुट्टीत विमानवारीने पर्यटन करण्याचा बेत आखला आहे. त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images