Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा प्रचार प्रारंभही कोल्हापुरातून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्ष-शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभही कोल्हापुरातून होणार आहे. युतीची सभा २४ मार्च येथील गांधी मैदानात होत असून त्यानंतर दोन ते तीन दिवसात आघाडीची जंगी सभा घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. युतीपेक्षा मोठी सभा घेण्याचे नियोजन असल्याचेही दोघांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची आघाडी झाली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला आला आहे. येथून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित असून त्यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. गुरुवारी खासदार महाडिक व आमदार मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कोल्हापूर शहरातील आजी, माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोल्हापुरातून आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे सांगितले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराची सुरुवात व्हावी यासाठी खासदार महाडिक प्रयत्नशील आहेत. ते गांधी यांच्याशी संपर्क साधत आहेत. कोल्हापुरातील आघाडीची सभा ही युतीच्या सभेपेक्षा मोठी होईल, या पद्धतीने नियोजन केले जाईल.'

खासदार महाडिक म्हणाले, 'समाजातील सर्वच घटक भाजप सरकारच्या विरोधात आहेत. सध्यस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. कोल्हापुरात संयुक्त सभा घेऊन प्रचाराचा धडाक्यात प्रारंभ होईल. प्रियांका गांधी यांना सभेसाठी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार व गांधी यांच्या संयुक्त सभेद्वारे प्रचाराचा धडाका निर्माण होईल.'

...........

शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचारदौरा

मुश्रीफ म्हणाले, 'शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचार दौऱ्याचे नियोजन आहे. महापौर सरिता मोरे, शहराध्यक्ष आर. के. पोवार आणि प्रा. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभागनिहाय प्रचार दौरे, कॉर्नर सभा होतील. प्रत्येक नगरसेवकाने आपआपल्या प्रभागात प्रचाराची सूत्रे सांभाळायची आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटन विकास आडवाटेलाच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा मूळ आराखडा कागदावरच राहिल्याचे चित्र गेल्या चार वर्षात आहे. देशातील आणि राज्यातील पर्यटकांचे पाय कोल्हापूरकडे वळतील असे एकही पर्यटनस्थळ नव्याने विकसित झाले नाही. अस्तित्वात असलेल्या पर्यटनस्थळांच्या विकासाची गतीही संथ राहिली. त्यामुळे कोल्हापूरची पर्यटन विकासातील ओळख देशाच्या नकाशावरू धूसर होत चालल्याचे चित्र आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'आडवाटेवरचं कोल्हापूर' उपक्रमातून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शहर आणि जिल्ह्यातील सर्वांगिण पर्यटन विकास आडवाटेवरच राहिल्याचे वास्तव आहे.

पालकमंत्री पाटील यांच्या रुपाने कोल्हापूरला वजनदार मंत्रीपद मिळाले. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यात फारसे यश आले नाही. पूर्वीपासूनच शहर आणि जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गीक पर्यटनासाठी स्थळांचे वरदान लाभले आहे. त्या जोरावर पर्यटनवाढीला मोठी संधी मिळू शकते. कोकण, गोवा ही ठिकाणे जवळ असल्याने परजिल्ह्यांतून, राज्यांतून पर्यटक शहरात येतात. पायाभूत सुविधांचा अभाव, लक्ष वेधतील अशी ठिकाणे नसल्याने पर्यटकांचे यांचे वास्तव्य राहत नाहीत. परिणामी, शहरातील हॉटेल, लॉजिंग व्यवसाय वाढलेला नाही.

अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखडा २५० कोटींचा आहे. सरकारने पहिल्या टप्यात ७० कोटी तर दुसऱ्या टप्यात ९० कोटी देण्याची घोषणा केली होती. या आराखड्यात मंदिर परिसरातील दर्शन मंडप, पार्किंगचा सामावेश आहे. यातील कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. अंबाबाई मंदीर परिसरात प्रचंड गैरसोयीही आहेत. महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. पार्किंगची सुविधा नाही. पे पार्किंगमध्ये दर्जेदार सुविधा नसतानाही वाहनधारकांकडून मनमानी पैसे उकळल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.

कसबा बावड्यात राजर्षी शाहू महाराज लक्ष्मी विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले. पण, आर्ट गॅलरीचे काम लटकले आहे. विविध परवानग्यांच्या कचाट्यात काम रखडले. सरकारी पातळीवरील उदासीनतेमुळे गतीने कार्यवाही झालेले नाही.

दख्खनचा राजा जोतिबा डोंगरावरील तिर्थक्षेत्र विकास आराखडा २५ कोटींचा आहे. पहिल्या टप्यात पाच कोटींचा निधी येऊन दीड वर्षे उलटले. पण प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने प्रत्यक्ष कामाला उशीर झाला. आचारसंहिता लागू होण्याआधी घाईगडबडीत कामाचे उदघाटन करण्यात आले. पण कामाला गती आलेली नाही.

हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे शंभर वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत परिषद झाली होती. त्यामुळे परिषदेच्या ठिकाणाचा विकास आराखडा तयार करण्यात आला. दोन कोटी रुपये देण्याची घोषणाही पालकमंत्री पाटील यांनी केली होती. अजूनही काम पूर्ण झालेले नाही. पन्हाळ्यावरील लाइट अॅँड साउंड शोचा प्रकल्पही रखडला आहे. निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात नाही. पर्यटन वाढीचे महत्वाचे प्रकल्प रखडल्याने अपेक्षित पर्यटनवाढ झालेली नाही.

केएसबीपीच्या माध्यमातून

केएसबीपीच्या माध्यमातून पोलिस मुख्यालयासमोरील पोलिस परेड मैदानालगतच्या उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले. त्या ठिकाणी देशातील दुसऱ्या क्रमांचा ३०३ फूट उंचीचा तिरंगा उभारण्यासाठी ध्वजस्तंभ उभारला गेला. मात्र त्यावर बारा महिने, चोवीस तास ध्वज फडकत नाही. आलेल्या पर्यटकांना अनेकवेळा केवळ स्तंभ पाहून परतावे लागते. उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्यांची मोडतोड झाली आहे. तेथील हिरवळही गायब झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचा कल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण असून नामांकित कंपन्यांचे शेअर्स घेण्याकडे गुंतवणुकदारांचा कल वाढला आहे. मीडिया, सरंक्षण उत्पादन, सरकार ऑइल कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी रुची दाखवली आहे.

जिल्ह्यात मुंबई शेअर बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या सबब्रोकर्सच्या अंदाजे शंभर शाखा आहेत. सुमारे ७५ हजार गुंतवणूकदार येथे कार्यरत आहेत. शेअर्सबरोबर म्युच्यूअल फंडातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढत आहे. गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात तेजी वाढली आहे. विदेशी फंड वितरण, मजबूत झालेला रुपया आणि दुसऱ्यांदा एनडीए सरकार निवडणूक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने उसळी घेतल्याचे सांगितले जात आहे.

गुंतवणूकदार बाजारात संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन शेअर्स खरेदी करतात. सध्या ए ग्रुपकडे गुंतवणूकदारांचा मोठा ओढा आहे. दूरसंचार, बँकिंग, आरोग्य, फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांनी सकारात्मक कामगिरी केली आहे. त्यामध्ये नामांकित रिलायन्स, महिंद्रा, टीसीएच, बजाज, एचडीएफसी, टाटा, बिर्ला आदी कंपन्यांच्या शेअर खरेदीकडे गुंतवणूकदारांनी रस दाखवला आहे. बी ग्रुपमध्ये स्मॉल कॅपिटल कंपन्या आहेत. पण या ग्रुपमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना सावध पावले उचलली जात आहेत. याशिवाय, मीडिया, युद्धसाहित्य निर्मीती कंपन्यांनाही प्राधान्य आहे. सरकारी इंधन कंपन्या, ट्रान्सपोर्ट संबधित कंपन्यांच्या शेअर्सना मागणी आहे. जिल्ह्यातील काही नामांकित कंपन्यांच्या शेअर्सबाबतही विचारणात होत आहे. त्यामध्ये मेनन अँड मेनन, मेनन बेअरिंग, मेनन पिस्टन, मनुग्राफ आदी कंपन्यांचा समावेश आहे. म्युच्यूअल फंडासाठी एसआयपीलाही प्राधान्य दिले जात आहे.

सध्या बाजारात तेजीचे वातावरण आहे. केंद्र सरकारने उद्योगांबाबत दाखविलेल्या धोरणांमुळे दिग्गज कंपन्याकडून स्वागत होत आहे. ए ग्रुपमधील नामवंत उद्योग व कंपन्यांचे शेअर्स खरेदीत गुंतवणुकदारांकडून उत्सुकता दाखवली जात आहे.

- राजेंद्र शहा, अध्यक्ष, जिल्हा इन्व्हेस्टर असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची मदार पालकमंत्र्यावर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भाजप आणि शिवसेनेची युती घडविण्यात पुढाकार घेणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचाराची मदार राहणार आहे. दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेले असल्याने युतीधर्माचे पालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे.

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर कोल्हापूर आणि इचलकरंजी मतदारसंघात भाजपकडून उमेदवारांचा शोध सुरू होता. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हेच भाजपचे उमेदवार असतील असे ठसवले जात होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर अंबाबाई मंदिरातील एका कार्यक्रमात तर केंद्रात महाडिक केंद्रिय मंत्री असतील असे वक्तव्य केले होते. पण, तीन राज्यांतील निवडणुकीत काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर चित्र बदलले. भाजपकडून शिवसेनेशी युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झाल्याने कोल्हापूरची जागा शिवसेनेकडेच राहिल असे संकेत मिळाले. तर दुसरीकडे स्थानिक काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांचा विरोध असतानाही खासदार महाडिकच हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याचे निश्चित झाल्याने पालकमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा देत युतीचा प्रचार करण्याची घोषणा केली आहे.

युती घडवण्यात पालकमंत्री पाटील यांनी भूमिका बजावली असल्याने त्यांना दोन्ही मतदारसंघात सेनेचे उमेदवार निवडणूक आणण्याचे कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. शिवसेनेकडून प्रा. संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्याचे जवळजवळ निश्चित झाल्याने त्यांचा प्रचार करण्याची जबाबदारी भाजपवर येऊन पडली आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीतही भाजपने मंडालिकांचा जोरदार प्रचार केला होता. यंदाही भाजपला धनुष्यबाणाचा प्रचार करावा लागणार आहे. कागल तालुक्यात समरजित घाटगे, चंदगड तालुक्यात रमेश रेडेकर, गडहिंग्लजमध्ये वसंत यमगेकर, प्रकाश चव्हाण, भुदरगडमध्ये राहुल देसाई, करवीर तालुक्यात केरबा चौगुले, गगनबावडा तालुक्यात पी. जी. शिंदे यांना युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र माजी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशिल माने शिवसेनेचे उमेदवार असतील. या मतदारसंघात सेनेला इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर आणि शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक या दोन आमदारांचा पाठिंबा महत्वाचा ठरणार आहे. हाळवणकर यांच्या विजयात माने गटाचा मोठा वाटा असल्याने त्याची परतफेड करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. तसेच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, पन्हाळा-शाहूवाडीतून माजी आमदार विनय कोरे, इचलकरंजी भाजपच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, हुपरी नगराध्यक्षा जयश्री गाठ, हातकणंगलेतून अशोक माने, शिरोळमधून गोकुळचे स्वीकृत संचालक अनिल यादव, विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचा पाठिंबा राहणार आहे. दोन्ही मतदारसंघातील भाजप-शिवसेना नेत्यांची मोट बांधून पालकमंत्र्यांना युतीचे उमेदवार निवडून आणून इतिहास रचण्याची संधी साधावी लागणार आहे.

आमदार महाडिकांची गोची

कोल्हापूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार, खासदार महाडिक हे भाऊ असल्याने 'कोल्हापूर दक्षिण'चे भाजपचे आमदार अमल महाडिक यांची मोठी गोची होणार आहे. त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या प्रचारात दिसू लागले आहेत. कोल्हापूर महापालिकेतील भाजप नगरसेवकांमध्ये महाडिक समर्थकांची मोठी संख्या आहे. अशीच स्थिती जिल्हा परिषदमध्ये राहणार आहे. भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करू असे सांगितले असले तरी भाजपच्या गोटात काळजी व्यक्त केली जात आहे. भाजपचे अनेक जिल्हा परिषद सदस्य खासदार महाडिकांच्या प्रचारात उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे कट्टर भाजप कार्यकर्त्यांसह पालकमंत्री पाटील यांनाच किल्ला लढवावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांनी वाचला तक्रारींचा पाढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राष्ट्रवादीचे नगरसेवक महापौरपदाची निवडणूक लढवित असताना महाडिक समर्थक त्याला पराभूत करण्यासाठी राजकीय डावपेच खेळतात. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात काहीजण प्रचार करतात. महापालिकेत उलटे राजकारण करणाऱ्या, पक्षाला त्रास देणाऱ्या अशा मंडळींना तुम्ही सोबत घेऊन कसे फिरता ? नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारासाठी प्रभागात प्रचारार्थ का उतरला नाही ?,' अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांनी मनातील खदखद व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचार नियोजनासाठी आयोजित बैठकीत आजी-माजी नगरसेवकांनी तक्रारींचा पाढा वाचला. आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल पॅव्हेलियन येथे सुमारे दोन तास बैठक झाली. याप्रसंगी खासदार महाडिक यांनी महापालिकेच्या निवडणुकीत चुका झाल्या असतील तर पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. आगामी काळात, महापालिकेच्या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करू, अशी ग्वाही दिली. आमदार हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाच वर्षाच्या कालावधीतील विविध प्रकल्पांचे कौतुक केले. ते म्हणाले,' येत्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार महाडिक यांना निवडून आणू आणि राष्ट्रीयस्तरावर शरद पवार यांचे हात बळकट करु. आता एकमेकांची उणीदुणी काढायची नाहीत. यापूर्वी जे घडले ते सगळे विसरुन महाडिकांना पुन्हा खासदार करण्यासाठी प्रत्येकाने शंभर टक्के योगदान द्यायचे. नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागात पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करुन शहरातून मताधिक्क्य मिळवून द्यावे.'

प्रा. जयंत पाटील म्हणाले,'महापालिका निवडणुकीत खासदार महाडिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना साथ दिली नाही. त्यांच्या प्रचारासाठी ते फिरले नाहीत. शिवाय राष्ट्रवादीचा उमेदवार महापौरपदाच्या निवडणुकीत असताना त्याला विरोध करणारे माजी महापौर सुनील कदम, नगरसेवक सत्यजित कदम हे तुमच्यासोबत कसे? अशा लोकांना दूर सारुन तुम्ही पक्षाचे काम करायला पाहिजे अशी नगरसेवकांची भावना आहे.'

त्यावर महाडिक यांनी मी महापालिका निवडणुकीत कुणाचाही प्रचार केला नाही. महापौर निवडीत माझा कसलाही संबंध नव्हता, असा खुलासा केला. माजी नगरसेवक आदिल फरास यांनी रुईकर कॉलनी प्रभागात खासदार व त्यांच्या समर्थकांनी प्रकाश पाटील यांना मदत केली असती तर राष्ट्रवादीचा नगरसेवक झाला असता असे कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे नमूद केले.

माजी नगरसेवक रमेश पोवार यांनी महापालिका निवडणुकीत महाडिक समर्थकांनी आपल्या विरोधात प्रचार केला हे निदर्शनास आणले. माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांनी खासदारांनी महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या प्रभागात प्रचार केला नसल्याची खंत व्यक्त केली. नगरसेवक महेश सावंत यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना खासदारांकडून प्रभागातील विकासकामासाठी निधीची अपेक्षा होती असे सांगितले. यावर महाडिकांनी पाच कोटी खासदार निधी मिळतो, लोकसभा मतदारसंघ मोठा असल्याने या निधी वाटपात मर्यादा पडत असल्याचे स्पष्ट केले. नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यकाळात या चुका दुरुस्त करुन कामकाज करु. येत्या निवडणुकीत प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले.

याप्रसंगी माजी महापौर हसीना फरास, वहिदा सौदागर, नगरसेवक संदीप कवाळे, सचिन पाटील, नगरसेविका शमा मुल्ला यांचे पती सलीम मुल्ला, माजी नगरसेवक परिक्षित पन्हाळकर, प्रकाश काटे, काकासाहेब पाटील,अमोल माने, महेश गायकवाड, अफजल पिरजादे, रशिद बारगीर, उत्तम कोराणे, शारदा देवणे, महिला आघाडीच्या संगीता खाडे, जहिदा मुजावर, विश्वास आयरेकर, जयकुमार शिंदे, सुनील देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

.........

बैठक संपल्यावर महापौर दाखल

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बैठक संपली. त्यानंतर महापौर सरिता मोरे बैठकस्थळी दाखल झाल्या. पुन्हा राष्ट्रवादीचे नेत्यांची बैठक झाली. उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसोबत फोटोसेशन झाले. सगळ्यांनी महाडिकांना साथ देण्याची ग्वाही दिली. कागल येथे गलेफ चढविण्याचा कार्यक्रम होता, त्यामुळे बैठकीला येण्यास विलंब झाला, असे मोरे यांनी सांगितले. नगरसेवक सुनील पाटील हे बैठक संपल्यावर पोहचले.

.........

लाटकरांसहित पाच सदस्य अनुपस्थित

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक राजू लाटकर, नगरसेविका सूरमंजिरी लाटकर या दोघांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. एकेकाळी 'महाडिक समर्थक' अशी राजू लाटकर यांची ओळख होती. गेल्या काही वर्षांत ते महाडिकांपासून दुरावले आहेत. याशिवाय नगरसेविका अनुराधा खेडकर, मेघा पाटील, नगरसेवक मुरलीधर जाधव व अजिंक्य चव्हाण हे अनुपस्थित होते. मुरलीधर जाधव यांचा वाढदिवस असल्याने ते येऊ शकले नाहीत. मेघा पाटील या जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांच्या स्नुषा आहेत. राष्ट्रवादीच्या प्रचारात त्या सक्रिय आहेत.

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मदती’वरुन राष्ट्रवादीत खळबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात मी प्रचार केला नाही. उलट मुलांची शपथ घेऊन सांगतो, पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील एका पदाधिकाऱ्याला मोठी मदत केली होती,'

असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाच्या आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीत केला. महाडिकांच्या या विधानाने राष्ट्रवादीत खळबळ माजली असून'तो' पदाधिकारी कोण ? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, माजी नगरसेवकांनी 'त्या' पदाधिकाऱ्याला फोन करुन विचारणा केली असता माझ्याकडे उमेदवारांसाठी कसलीही मदत मिळाली नसल्याचे उत्तर त्यांनी दिल्याचे वृत्त आहे.

या साऱ्या प्रकारावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर पदाधिकारी आणि नगरसेवकांत खळबळ उडाली आहे. कोल्हापूर महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारात खासदार धनंजय महाडिक सक्रिय नव्हते, असा आक्षेप शहरातील आजी, माजी नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीत नोंदविला आहे. आमदार हसन मुश्रीफ, महापौर सरिता मोरे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी महाडिकांच्या प्रचारासाठी नियोजन बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या काही पदाधिकारी व नगरसेवकांनी महाडिकांवर निशाणा साधला.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत महाडिकांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न केले, त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत महाडिकांकडून आम्हाला काय फायदा झाला? उलट महाडिकांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाडापाडीचे काम केले, असा आरोप केला. त्यावर खासदार महाडिकांनी महापालिका निवडणुकीत मी कुणालाही त्रास दिला नाही. उलट पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एका पदाधिकाऱ्याकडे मदत पोहोच केली होती,' असे स्पष्टीकरण दिले. खासदारांच्या या वक्तव्यानंतर बैठकीत एका माजी नगरसेवकाने 'आम्हाला कसलीही मदत मिळालेली नाही, विनाकारण नगरसेवकांच्या नावाची बदनामी होते'असे उत्तर दिले. त्यावर महाडिकांनी माझ्यावर विश्वास नसेल तर त्या पदाधिकाऱ्याला बैठकीत बोलवा आणि त्यांना शपथ घेऊन खरे काय ते मांडायला सांगा,' असे प्रतिउत्तर दिल्याचे वृत्त आहे. यावर आमदार मुश्रीफांनी एकमेकांची उणीदुणी काढायचे बंद करुन निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

.........

तर्कवितर्काला उधाण

बैठकीत विषय उपस्थित झाल्यानंतर महापालिकेतील महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीने, राष्ट्रवादीच्या 'त्या' पदाधिकाऱ्याला फोन करुन महापालिका निवडणुकीवेळी उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदारांनी मदत केल्याचे खरे आहे का आणि तुमच्याकडे मदत मिळाली नसल्यास बैठकीत समोर या आणि वस्तुस्थिती स्पष्ट करा, असे सांगितल्याचे वृत्त आहे. त्यावर त्या पदाधिकाऱ्याने मला कसलीही मदत मिळाली नाही आणि त्या मदतीशी माझा काही संबंध नाही असे उत्तर दिल्याची चर्चा बैठकस्थळी रंगली होती. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीत तर्कवितर्काला उधाण आले आहे. 'तो'पदाधिकारी कोण याची चर्चा करताना काहीजण न मिळालेल्या मदतीचीही आकडेमोड करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्याची आज प्रचार नियोजनासाठी बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप शिवसेनेची युती झाल्यानंतर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील प्रचाराची व्यूव्हरचना ठरवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज, शुक्रवारी (ता. १५) बैठक घेणार आहेत. एका हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

युतीची घोषणा होऊनही भाजपचे कार्यकर्ते प्रचारात सक्रीय झाले नव्हते. दोन्ही जागा शिवसेनेकडे असल्याने भाजपचे कार्यकर्ते प्रचारात उतरतील, अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी यापूर्वीच केली आहे. त्यातच भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात उतरले असल्याने त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली आहे. बैठकीला महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यकर्त्यांना पालकमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचारापासून काँग्रेसचे नगरसेवक अलिप्त राहणार

$
0
0

काँग्रेसच्या नगरसेवकांची महाडिकविरोधात भूमिका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीची धामधूम वाढली असताना काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लोकसभेच्या निवडणुकीविषयी चर्चा झाली. या बैठकीत ज्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत फसवणूक केली, त्यांना साथ न देण्याचा निर्धार केल्याचे समजते. यामुळे आघाडीच्या प्रचारापासून काँग्रेसचे नगरसेवक अलिप्त राहण्याची शक्यता आहे. तर काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या खासदारांविरोधात उघडपणे प्रचाराची मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. कसबा बावडा येथील बहुतांश नगरसेवकांनी महाडिकांच्या विरोधात प्रचाराला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहचला आहे. आमदार पाटील यांनी महाडिकांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. शिवाय शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना साथ देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या पुढाकाराने झालेल्या गृहिणी महोत्सवाच्या कार्यक्रमातही पाटील यांनी 'मी एकदा दिलेला शब्द बदलत नाही'असे वक्तव्य करत मंडलिकासोबत राहण्याचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गुरुवारी खासदार महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रचाराच्या नियोजनासाठी बैठक झाली. त्यापूर्वीच काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेऊन पाटील यांनी नगरसेवकांना निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची याची दिशा दिल्याचे समजते. महापालिकेत काँग्रेसचे २९ नगरसेवक असून हा सर्वात मोठा पक्ष आहे. नगरसेवकांच्या माध्यमातून शहरात मंडलिकांना अधिकाधिक मताधिक्क्य देण्याची रणनिती आखण्यात आली. सध्या महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहेत. त्यातून काँग्रेसच्या वाटणीची पदे शिवसेनेला दिली आहेत. साहजिकच महाडिकांविरोधात नगरसेवकांची मोट बांधण्याचा निर्णय झाला. नगरसेवकांचे गट तयार केले आहेत. टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने विरोध करायचा याचा फॉर्म्युला तयार केल्याचे वृत्त आहे. शेवटच्या टप्प्यात काही नगरसेवक उघडपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीसएनएल कर्मचाऱ्यांचा पगार थकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इतिहासात पहिल्यांदाच बीएसएनएल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. १५ तारीख येऊनही मागील महिन्याचा पगार झालेला नाही. २० मार्चपर्यंत पगार होईल, असे सांगितले जात आहे.

बीएसएनल कर्मचाऱ्यांचा पगार त्याच महिन्याच्या ३० आणि ३१ तारखेला होत असे. पाच दशकापासून पगार जमा होण्याची ही तारीख कधीही चुकली नाही. मात्र पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्याचा पगार अजूनही झालेला नाही. शहर आणि जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी अशा एकूण ९०० जणांना त्याचा फटका बसला आहे. पगार कधी होणार याचीच चिंता त्या सर्वांना लागली आहे. एक मार्चपासून वरिष्ठांकडे विचारणा केली जात आहे. वरिष्ठ २० मार्चपर्यंत पगार होईल, असे सांगत आहेत. पण खात्यावर पगार जमा झाला तरी पुरे, अशीही प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बीएसएनएलची प्रगती खुंटली. परिणामी आर्थिक अडचणीमुळे वेळेत पगार झाले नाहीत, असे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सांगत आहेत. मात्र उघडपणे प्रतिक्रिया देण्यास ते टाळत आहेत. सरकारकडून कारवाई होईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. गेल्या महिन्यात बीएसनएल कर्मचाऱ्यांनी काम बंद करून सरकारचे लक्ष वेधले होते. रिक्त जागा भराव्यात, केंद्र सरकारने बीएसएनएलला फोर-जी सेवेची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. या मागणीकडेही दुर्लक्ष झाल्याची भावना त्यांची झाली आहे. आता पगारही वेळेत न झाल्याने ते तणावात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भविष्यात सतेज पाटील मित्रही होतील

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका, आमदार सतेज पाटील यांच्यासोबत असलेले मतभेद, संसदेत कोल्हापूरच्या प्रश्नांवर उठवलेला आवाज याबाबतची मते मांडली.

...................

प्रश्न: संसदेतील कामाबाबत आपण समाधानी आहात का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मला दिल्लीमध्ये मोठी संधी दिली. राफेलच्या प्रश्नावर मला पक्षाची भूमिका मांडण्यास सांगितले. शिवाजी पुलाचा प्रश्न मी लोकसभेत उपस्थित केल्यानंतर केंद्रीय पुरातत्व कायद्यात बदल केला, असे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी सांगितले. कोल्हापूर विमानसेवा, कोल्हापूर कोकण रेल्वेशी जोडणे, बास्केट ब्रीज उभारणी, पासपोर्ट ऑफिस या प्रश्नांची तड लावली. विमान सेवा सुरु झाल्याने तीन उद्योग कोल्हापुरात आले आहेत. दिल्लीत माझी व पक्षाची चांगली इमेज करण्याची संधी पवार यांनी दिली. या कामाच्या जोरावर मी जनतेसमोर जाणार आहे.

प्रश्न: आमदार सतेज पाटील यांची समजूत कशी काढणार?

राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. आमदार सतेज पाटील पूर्वी मित्र होते, मध्यंतरी शत्रू होते, भविष्यात ते मित्रही होतील. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाल्याने काँग्रेसचे नेते प्रचारात उतरतील. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची आघाडी केली आहे. वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पाळतील.

प्रश्न : तुमच्यातील मतभेदाची कारणे कोणती?

मागील लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या बंगल्यावर मदत मागण्यासाठी गेलो होतो. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सतेज पाटील, मला मदत करा, असे सांगण्यास आमच्याकडे आले नाहीत. त्यानंतर कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अमल महाडिक यांची उमेदवारी महादेवराव महाडिक यांनी जाहीर केली. ते निवडूनही आले. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत आमदार पाटील यांनी महाडिकांचा पराभव केला. पण विरोधाचे राजकारण कायम राहिले. गोकुळ मल्टिस्टेट प्रश्नावर त्यांनी मोर्चा काढला. पण आम्ही त्यांच्या कोणत्याही कारखान्यावर, संस्थेवर मोर्चा काढला नाही. पाटील आमच्या पक्षनिष्ठेवर शंका उपस्थित करतात. पण आमदार पाटील यांच्या बंधूनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. पण आम्ही त्याबाबत काही बोललो नाही.

प्रश्न: प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल तुमचे मत काय?

खासदार सदाशिवराव मंडलिकाबद्दल आम्हाला आदर आहे. २००८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मला मदत केली होती. पण त्यांचे पुत्र प्रा. संजय मंडलिक यांचा कागलबाहेर संपर्क कमी आहे. माझा संपूर्ण मतदारसंघाशी गेली पाच वर्षे सततचा संपर्क आहे. निधी देण्यात मी कमी पडलो असलो तरी संपूर्ण मतदारसंघातील गावांशी मी जोडलो गेलो आहे. मुश्रीफ यांनी मंडलिकांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आपली ताकद वाढली असे वाटत आहे. पण आता पवारांनी मला उमेदवारी दिल्याने आमदार मुश्रीफांच्यामुळे कागलमध्ये मला चांगली मते मिळतील.

प्रश्न : पालकमंत्र्यांशी असलेल्या संबधाचा कितपत फायदा होणार?

राजकारणात माझी सर्वपक्षीय मैत्री आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या चांगल्या कामांना मदत केली आहे. त्यांनी मला मोठ्या प्रमाणात निधी दिला. ते पालकमंत्री आणि मी खासदार असल्याने आमचे एकत्रित कार्यक्रम झाले. त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होत होती. पण पवारांनी मला राष्ट्रीय पातळीवर संसदेत राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी दिली होती. आज पालकमंत्री माझ्या विरोधात प्रचार करणार असले तरी मी केलेल्या कामांमुळे शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांचीही मते मला मिळतील. भाजपचे आमदार अमल महाडिक आपले बंधू असून त्यांचे कार्यकर्ते मला मदत करतील.

प्रश्न : राहुल गांधींशी आपले संबध कसे आहेत?

संसदेत विरोध पक्ष म्हणून काम करताना राहुल गांधी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबध निर्माण झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी संसदेत १३ खासदारांना निलंबित केले होते. त्यानंतर सभागृह स्थगित करण्यात आले. त्यावेळी मी, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी,राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे चर्चा करत होते. सभागृहात असेच चर्चा करत राहिलो तर काहीच होणार नाही. पण संसदेच्या बाहेर धरणे धरली तर त्याचा फायदा होईल, असे मत मी व्यक्त करताच राहुल गांधी यांनी माझी सूचना सोनिया गांधीना सांगितली. त्यांनी ती उचलून धरली. त्यानंतर सलग चार दिवस आम्ही धरणे धरत होतो. राहुल गांधी यांनी राफेल प्रश्न संसदेत उपस्थित केला होता. त्यांच्या भूमिकेशी सुसंगत राष्ट्रवादीची भूमिका मी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनाविशेष कार्यकारीचे अधिकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, स्थायी निगराणी आणि फिरत्या पथक प्रमुखांना १३ एप्रिल ते २७ मे अखेरपर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारीपदाचे अधिकार गृह विभागाचे उपसचिव यु. बी. अजेटवार यांनी दिले. त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १२९, १३३, १४३, १४४ नुसार कारवाई करता येणार आहे.

निवडणूक कालावधीत बेकायदेशीर घडमोडी, मतदारांना पैसे आणि विविध वस्तू वाटप करण्यावर वॉच ठेवण्यासाठी ४६ भरारी पथके तर ५८ स्थायी निगराणी पथक कार्यरत आहेत. या सर्व पथक प्रमुखांना आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त असलेले जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकार प्राप्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोगावती नदीकाठ काविळीच्या विळख्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण भागात काविळीचा धोका वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. काविळीची साथ उद्भवलेल्या पाच गावांवर लक्ष केंद्रित केले असून, आवश्यक त्या उपाययोजनेच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कसबा तारळे, ठिकपुर्ली, राशिवडे, हिरवडे खालसा, म्हाळुंगे गावांत विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या पाच गावांत शंभरहून अधिक नागरिक काविळग्रस्त आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतींना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, पुणे येथील आरोग्य विभागाची दोन पथक गेले तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आरोग्य विभागाच्या पथकाने गुरुवारी काही गावांची पाहणी करून तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच पाणी शुद्धिकरण प्रकल्प, पाइपलाइन गळतीची ठिकाणे, व्हॉल्व्ह असलेल्या ठिकाणांची पाहणी केली. सायंकाळी जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली.

आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. डोलारे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील काविळीच्या स्थितीवर चर्चा झाली. दूषित पाणीपुरवठ्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांत काविळीची साथ उद्भवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचू नये यासाठी आरोग्य विभागाने तत्काळ उपाय योजना कराव्यात. प्रत्येक गावात आरोग्यविषयक जागृती करावी, विविध माध्यमातून नागरिकांत प्रबोधन करण्यासंदर्भात नियोजन केले.

०००००

चौकट...

काविळीने नागरिक हैराण

कुडित्रे : दिवसेंदिवस दूषित होणाऱ्या पाण्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत चालले असून भोगावती नदीकाठावरील राधानगरी व करवीर तालुक्यातील बहुतांश गावांत काविळीचा फैलाव होत आहे. काविळीच्या साथीने तोंड वर काढल्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राधानगरी तालुक्यातील आणाजे, पुंगाव, कोदवडे, आमजाई व्हरवडे, चाफोडी, राशिवडे बुद्रुक, शिरसे,कौलव, म्हाळुंगे, तारळे खुर्द, राशिवडे, ठिपकुर्ली तसेच करवीर तालुक्यातील हिरवडे खालसा गावांमध्ये काविळीचे अनेक रुग्ण आढळून आले. करवीर तालुक्यातील हिरवडेत गेल्या पंधरा दिवसांपासून सुमारे १६ रुग्ण आढळून आले. साधारणपणे डोळे व लघवी पिवळीजर्द होणे, भूक मंदावणे, अंग दुखणे, उलट्या होणे आदी काविळीची लक्षणे असून ही लक्षणे दिसताच रुग्णाने वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत. भोगावती नदीकाठच्या ग्रामपंचायतींनी स्वच्छ पाणीपुरवठा करावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९९ हजार युवा मतदार ‘यादीबाहेर’

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet:@bhimgondaMT

कोल्हापूर

जिल्ह्यातील १८ ते १९ वर्षे वयोगटातील ९८ हजार ८४५ जण मतदारयादीबाहेर राहिले आहेत. या युवा मतदारांनी यादीत नाव येण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज दाखल केलेला नाही. नाव नोंदण्यासाठीची किचकट प्रक्रिया, शिक्षणासाठी बाहेरगावी असणे अशी विविध कारणे यामागे आहेत. याउलट अधिकाधिक युवा मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी निवडणूक प्रशासनाने प्रयत्न केले. त्यास चांगले यश मिळाले, असा दावा निवडणूक प्रशासनाने केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा निवडणूक प्रशासनाने दोन टप्प्यात नविन मतदार नोंदणी, नाव, पत्त्यात दुरूस्ती करणे, मयत मतदारांची नावे वगळण्याची मोहिम राबवली. पहिल्यांदाच १८ ते १९ वयोगटातील युवक, युवतींना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विद्यापीठ, कॉलेजमध्ये जाऊन जागृती करण्यात आली. तेथे ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात आले.

सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नविन मतदार नोंदणीसाठी विशेष यंत्रणा राबवली. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून घरोघरो जाऊन अर्ज भरून घेतले. तरीही १८ वर्षे पूर्ण झालेले बहुसंख्य युवक, युवतींनी यादीत नाव येण्यासाठी अर्ज केले नसल्याचे अंतिम मतदारयादी प्रसिध्द झाल्यानंतर स्पष्ट झाले. शिक्षणासाठी बाहेरगावी असणे, वसतिगृहात राहत असल्याने संबंधित युवक, युवतींना प्रशासनाने निर्धारित केलेल्या वेळेत अर्ज भरता आलेला नाही.

अर्जासोबतची कागदपत्रे संकलित करण्यासाठी अनेकजणांना वेळ मिळाला नाही. परिणामी ते अर्ज करू शकलेले नाहीत. निवडून येऊन कोण काय करणार, मतदान कशाला करायचे, अशी मानसिकताही अजून कायम आहे. यामुळे सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी तरूणांत उदासीनता आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा असूनही दुर्लक्ष केले गेले आहे. परिणामी मतदानासाठी पात्र असूनही त्यांना यादीत नाव नसल्याने मतदान करता येणार नाही.

........

सर्वाधिक युवक 'दक्षिण'मध्ये

१८ ते १९ वयोगटातील विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण मतदार, कंसात यादीत सामावेश झालेल्या मतदारांची संख्या अशी : चंदगड : १२३०८ (६८२३), राधानगरी : १३०२१ (७३२८), कागल : १३३०९ (६९५२), कोल्हापूर दक्षिण : १५०२५ (५७९८), करवीर : १३३९५ (५५७१), कोल्हापूर उत्तर :१२३००(४१४९), शाहूवाडी : ११९७८ (५६६३), हातकणंगले :१३७१० (४८४२), इचलकरंजी : १४५८७ (३९७१), शिरोळ : १३२९० (५२०८).

..........

१८ ते १९ वयोगटातील राज्यातील एकूण युवक, युवती : ४२०१६७६

जिल्ह्यातील एकूण युवक, युवती : १५५१५०

मतदारयादीत सामावेश असलेले युवक, युवती : ५६३०५

..........

कोट

'प्रशासनाने नविन मतदार नोंदणीसाठी व्यापकपणे जागृतता केली नाही. केवळ शहरातील काही कॉलेजमध्ये जाऊन मतदार नोंदणीची माहिती देण्यात आली. गावा, वाड्या, वस्त्यांत जागृतीची यंत्रणा पोहचली नाही. युवकांचा अजूनही राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. नाव नोंदवण्यासाठीची प्रक्रिया किचकट आहे. या कारणांमुळे मोठ्या संख्येने युवकांनी मतदारयादीत नाव येण्यासाठी उत्सुकता दाखवलेली नाही.

पार्थ मुंडे, युवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातोश्रीपर्यंत तक्रार जाता कामा नये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजप - शिवसेना युती होण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येक खासदार महत्वाचा आहे. भाजपचे सर्व नेते, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांनी युती धर्माचे पालन करावे. जोमाने प्रचार करुन युतीचा उमेदवार खासदार केला पाहिजे,' असा आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच यापुढे भाजपविरोधात मातोश्रीपर्यंत तक्रार जाता कामा नये, असा इशाराही दिला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शुक्रवारी हॉटेल पॅव्हेलियनमध्ये बैठक झाली. पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण विभागाच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने पडले होते याची आठवण करुन देताना पालकमंत्री पाटील म्हणाले,'भाजप शिवसेना युतीचा खासदार निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवार कोण आहे याचा विचार न करता शिवसेनेचा प्रचार करायचा आहे. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात युतीला आघाडी मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडून मदत मिळाली नाही, अशी कारणे न सांगता मिळेल ती साधने उपलब्ध करुन प्रचार करावा.'

बैठकीला आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, गोकुळचे संचालक बाबा देसाई, गोपाळराव पाटील, राहुल देसाई, मकरंद देशपांडे, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, माजी नगरसेवक आर.डी. पाटील, अॅड. संपतराव पवार यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

...

नगरसेवक ठाणेकर, भालकर अनुपस्थित

भाजप नगरसेवक अजित ठाणेकर हे मुंबईला कोर्ट कामासाठी गेल्याने आणि नगरसेविका सविता भालकर यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने त्या बैठकीला अनुपस्थित होत्या. यावेळी महानगरपालिका भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक अशिष ढवळे, संभाजी जाधव, संतोष गायकवाड, विजय खाडे पाटील, राजू दिंडोर्ले, किरण नकाते, नगरसेविका उमा इंगळे, भाग्यश्री शेटके, जयश्री जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनंजय महाडिकांसाठी खूप प्रयत्न केले

$
0
0

प्रा. मंडलिक यांच्याच पाठीशी राहणार असल्याची पालकमंत्र्यांची स्पष्टोक्ती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खासदार धनंजय महाडिक युतीचे उमेदवार असावेत यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही,' असा खुलासा करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्याच पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीला आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होत्या.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'खासदार महाडिक हे माझे परममित्र आहेत. तर आमदार अमल महाडिक यांचे ते भाऊ व शौमिका महाडिक यांचे दीर आहेत. आमच्या तिघांत मोठे दंद्व निर्माण झाले आहे. असे प्रसंग इतिहासात अनेकांच्या जीवनात आले आहेत. महाभारतात अर्जुनाला हा प्रश्न पडला होता. तेव्हा कृष्णाने धर्मासाठी लढ असा सल्ला दिला होता. दंद्व संपवून युतीसाठी लढताना तिघांनाही दु:ख होत आहे. खासदार महाडिक माझे जवळचे मित्र आणि अमल यांचे भाऊ असले तरी भारतीय संस्कृती अशी सांगते की, धर्मासाठी लढायचे. त्यामुळे आम्ही प्रा. संजय मंडलिकांच्या मागे राहणार आहोत.'

खासदार महाडिक युतीचे उमेदवार व्हावेत, यासाठी खूप प्रयत्न केले असे सांगून पालकमंत्री म्हणाले, 'खासदार महाडिकांनी पाच वर्षे खासदार म्हणून संधी दिलेल्या राष्ट्रवादीकडून लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांना त्याबद्दल मी खूप मार्कस् देतो. कारण राजकारणात पक्षाशी निष्ठा दाखवणारी अशी मंडळी खूप कमी आहेत. तरीही आमचे युद्ध कोणाबरोबर आहे हे स्पष्ट झाले आहे. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला एक, एक खासदाराची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व भाजपचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील.'

.....

२४ ला कोल्हापुरातून प्रचार प्रारंभ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर प्रेम होते. त्यांची अंबाबाईवर श्रद्धा होती. युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातूनच फोडायचा अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार २४ तारखेला कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे.

.....

अनेक मोठी घराणी भाजपमध्ये येणार

'राज्यातील अनेक मोठी घराणी भाजपमध्ये येत आहे. गेल्या तीन दिवसांत सुजय विखे पाटील, मदन भोसले भाजपमध्ये आले आहेत. लवकरच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगा रुग्णालयास मशिनरी प्रदान

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा रुग्णालयास रोटरी क्लब कोल्हापूर सिटी यांच्यावतीने सुमारे साडेचार लाखांचे चार डबल सरफेस फोटोथेरेपी मशिन प्रदान करण्यात आले. क्लबचे जिल्हा गव्हर्नर रवीकिरण कुलकर्णी यांच्या हस्ते पंचगंगा रुग्णालयास प्रधान करण्यात आले. मशिनचा वापर लहान बाळांची कावीळ कमी करण्यासाठी होतो. पंचगंगा रुग्णालयामध्ये या फोटोथेरेपी मशिनची सुविधा सर्वांसाठी विनामूल्य देण्यात येणार आहे. रोटरी क्लब कोल्हापूरने यापूर्वीही रुग्णालयास साहित्य दिले आहे. यावेळी क्लबचे अध्यक्ष सचिन पाटील, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या हेरवाडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश औंधकर डॉ. सचिन जाधव, नितीन मिरजे, विद्या भोसले यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातातील जखमीचा मृत्यू

$
0
0

पन्हाळा : आवळी (ता. पन्हाळा) येथे झालेल्या अपघातातील जखमी विद्यार्थी हृषिकेश पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ मार्चला सायंकाळी अपघात झाला होता. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आवळी येथे कार आणि मोटारसायकल यांच्यात धडक होऊन आदित्य अनिल तळसकर व हृषिकेश विष्णू पाटील (रा. भाडळे, ता. शाहूवाडी) हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. ९ मार्चला जखमी आदित्यचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हृषिकेशचाही शुक्रवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खंडोबा’चा ‘बालगोपाल’वर विजय

$
0
0

लोगो : चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने यजमान बालगोपाल तालीम मंडळाचा २-१ असा विजय मिळवत अव्वल साखळी फेरीत प्रवेश केला. बालगोपाल तालीम मंडळ आणि जाधव इंडस्ट्रीजने स्पर्धेचे आयोजन केले आहे.

आजच्या सामन्यात बालगोपालचे पारडे जड असतानाही खंडोबाने उत्कृष्ट खेळ करत सामना जिंकला. सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला साईराज दळवीने गोल करत खंडोबाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर परतफेड करण्यासाठी बालगोपालने चढाया केल्या, पण खंडोबाने भक्कम बचाव केला. मध्यंतरापर्यंत खंडोबा १-० असा आघाडीवर होता.

उत्तरार्धात खंडोबाने बालगोपालला दुसरा धक्का दिला. ४९ व्या मिनिटाला साईराज दळवीने बालगोपालचा बचाव भेदत सफाईदार गोल करत वैयक्तिक व संघाची गोल संख्या दोनवर नेली. त्यानंतर बालगोपालने आक्रमक धोरण स्वीकारले. ५३ व्या मिनिटाला त्यांच्या लुकी मायकलने गोल करत एक गोलने आघाडी केली. बरोबरीसाठी बालगोपालने चढायांचा धडाका वाढवला तरी खंडोबाच्या बचावफळीने उत्कृष्ट खेळ करत त्यांची आक्रमणे परतवून लावली. एक गोलची आघाडी कायम टिकवत खंडोबाने २-१ असा सामना जिंकला.

शनिवारी स्पर्धेला सुट्टी असून, रविवार (ता.१७) पासून अव्वल साखळी फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. अव्वल साखळीत पाटाकडील तालीम मंडळ अ, दिलबहार तालीम मंडळ अ, संयुक्त जुना बुधवार पेठ, खंडोबा तालीम मंडळ संघांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्ता पार्क इलेव्हनअंतिम फेरीत दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट स्पर्धेत चित्ता पार्क इलेव्हनने सोनतळी रायडर्सचा ७२ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनने स्पर्धा पुरस्कृत केली आहे.

प्रथम फलदांजी करताना चित्ता पार्क इलेव्हनने ५० षटकांत सात बाद ३०५ धावा केल्या. वैभव पाटीलने शैलीदार फलंदाजी प्रदर्शन करत नाबाद १४७ धावा केल्या. अक्षय भिडेने ४६, चेतन नार्वेकरने ४१, श्रेयस पाटीलने २० धावा केल्या. सोनतळी रायडर्सकडून सरदार मुल्लाने दोन, रणजित निकम, मंजुनाथ यादव, रोहन तोरस्कर व शुभम नार्इक यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. प्रत्युत्तरादाखल सोनतळी रायडर्सने सर्वबाद २३३ धावा केल्या. यामध्ये रणजित निकमने ६७, उत्तम तणंगे ५९, शुभम नार्इक ४५, सरदार मुल्ला १५, अथर्व कडोलीकर १४ धावा केल्या. चित्ता पार्क इलेव्हनकडून अक्षय भिडने तीन, तुषार नार्इक व चेतन नार्वेकरने दोन, श्रेयस पाटीलने एक बळी मिळवला. 'सामनावीर' म्हणून वैभव पाटीलची निवड झाली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई वॉर्डातील पाणी समस्या निकाली निघणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहरात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. वारंवार गळती काढण्याचे कारण पुढे करत नागरिकांना वेठीस धरले जात आहे', असा आरोप शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. स्थायीच्या बैठकीस प्रथमच उपस्थित राहिलेल्या आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ई वॉर्डची पाणी समस्या सोडविण्यासाठी नवीन विद्युत पंप खरेदी करण्याबरोबरच अतिरिक्त आयुक्त पाणीपुरवठ्यावर देखरेख ठेवतील, असे स्पष्ट केले.

सभापती शारंगधर देशमुख, सदस्य संजय मोहिते, संदीप कवाळे यांनी शहरात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे निदर्शनास आणून देत साईक्स एक्स्टेन्शन व न्यू शाहुपूरी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी येत नसल्याचे सांगितले. त्यावर पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम सुरू असून त्याचा कृती आराखडा तयार केला आहे, वेळेच्या नियोजनानुसार पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे स्पष्ट केले.

यावेळी आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवकांबरोबर समन्वय ठेवला जाईल. याबाबत सदस्यांच्या काही सूचना असल्यास लेखी स्वरुपात द्याव्यात. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त देखरेख करताना सर्व भागात फिरती करतील. ज्याठिकाणी माझी आवश्यकता असेल, त्याठिकाणी स्वत: भेट देणार आहे. अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा पुढील आठवड्यात घेणार आहे. ई वॉर्डला पाणीपुरवठा करण्यासाठी पाचवा विद्युत पंप खरेदी केला जाईल. याद्वारे तासाला सात लाख लिटर्स पाणी उपसा होऊन पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यात येईल. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापऱ्याबाबत जनजागृती करु.'

सभापती देशमुख व माधुरी लाड म्हणाल्या, 'घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामधील कचऱ्यावर प्रक्रिया करुन कॅपिंग करण्यात येणार आहे. परंतु तेथे जमिनीखालून लिचड वाहते. यामुळे परिसरातील विहिरी व बोअरवेलला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे.' कचऱ्याचे कॅपिंग करण्यासाठी १५ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. संपूर्ण कचऱ्याचे कॅपिंग झाल्याने त्यामधून लिचड वाहत नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images