Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पालिकेचे १३० कर्मचारी निवडणूक शाखेकडे

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेच्या १३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक शाखेकडे करण्यात आली आहे. यामध्ये उपायुक्त, मुख्य लेखापरीक्षक, चार उपशहर अभियंता, कामगार अधिकारी यांच्यासह वरिष्ठ, कनिष्ठ लिपिक आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांची निवडणूक शाखेकडे नियुक्ती झाल्याने महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाला गेल्या सहा महिन्यांपासून सुरुवात झाली. मतदार नोंदणी, आयडी बदल, रहिवासी पुराव्यांत बदल अशा प्रकारची कामे सुरू होती. मात्र, रविवारी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर या कामासाठी आणखी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये महापालिकेच्या १३० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना पालिकेच्या दैनंदिन कामकाजाबरोबर निवडणूक कामातही सहभागी व्हावे लागत आहे.

नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उपायुक्त, मुख्य लेखापरीक्षक, चार उपशहर अभियंता, कामगार अधिकारी व ३० कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. उपायुक्त मंगेश शिंदे यांच्याकडे मीडिया मॉनिटरिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांची झोन ऑफिसर, हर्षजित घाटगे यांची नोडल ऑफिसर तर कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांची आचारसंहिता पथकात नियुक्ती झाली आहे. कायदा व विधी अधिकारी अॅड. संदीप तायडे यांची कायदा व सुव्यवस्था तर जयेश जाधव यांची झोनल ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. यासह वरिष्ठ लिपिकांना नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी, सहायक झोनल ऑफिसर, आचारसंहिता कक्ष यांसह सहायक कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या महाजन भेटीने सोलापुरात खळबळ

0
0

रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या महाजन भेटीने सोलापुरात खळबळ

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

शरद पवार यांच्या माघारीनंतर आता माढा लोकसभा मतदारसंघातील वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. आमदार बबन शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील गटाकडून दबाव तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवारी मुंबईत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोठात खळबळ उडाली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनी माघारी घेण्यामागे मोहिते-पाटील गटाची नाराजीच प्रमुख कारण असल्याने पुन्हा मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आणि जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनीही पुन्हा उमेदवारीसाठी जोर लावला आहे. दबाव तंत्राचा एक भाग म्हणून रणजितसिंह मोहिते-पाटील-गिरीश महाजन भेटीकडे पहिले जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याच्या विचारात असताना मोहिते-पाटील यांनी आपला मुलगा रणजितसिंह यांच्या साठी उमेदवारी मागितली आहे. त्याला पक्षातील एका मोठ्या गटाचा विरोध असल्याने रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी साखर कारखान्याच्या कामाचे कारण देत महाजनांची भेट घेत खळबळ उडवून दिली आहे.

संजय शिंदेंना मुख्यमंत्र्याचे बोलाविणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक असलेल्या संजय शिंदे यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले होते. भाजपकडून देखील वेगाने हालचाली सुरू आहेत. संजय शिंदे यांनी या पूर्वी शरद पवार यांच्या उमेदवारीला उघड पाठिंबा देत त्यांचा प्रचार करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता पवार निवडणूक रिंगणात नसल्याने संजय शिंदे निवडणूक जिंकू शकणारे उमेदवार असल्याची खात्री भाजपला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी शिंदे याना तातडीने भेटीस बोलावले होते. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर संजय शिंदे व विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक गटाला मुख्यमंत्र्यांनी ताकद दिली आहे. मुख्यमंत्री माढा लोकसभेची जबाबदारी शिंदे यांच्याकडे देऊ पाहत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांची उमेदवारी घोषित करून भाजपच्या खेळीतील हवाच काढू शकते, अशी ही चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'इतिहासात महिलांचेमोलाचे योगदान' कराड :

0
0

'इतिहासात महिलांचे

मोलाचे योगदान'

कराड :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ मॉँसाहेब, भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, मादाम कामा, प्रितीलता वड्डेदार, अशा अनेक स्त्रियांनी आपल्या देशासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आजही जगात अनेक मोठ्या पदांवर महिला विराजमान आहेत. इतिहासात महिलांनी मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी दुपारी आयोजित महिला मेळाव्यामध्ये चव्हाण बोलत होते. या वेळी मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे आदी उपस्थित होते.

...........

यशवंतराव चव्हाणांना जयंतीनिमित्त आदरांजली

कराड :

यशवंतराव चव्हाण यांच्या १०६व्या जयंतीदिनी त्यांच्या समाधीस्थळी अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, जयंतीनिमित्त शहरात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चारेगावकर, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, संजीवराजे नाईक-निंबाळकर, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आदींनी प्रीतिसंगमावरील चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले.

पी. डी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने एक सूर एक ताल, या उपक्रमांतर्गत त्यांच्या स्मृतीस शब्द सुरांची आदरांजली वाहण्यात आली. या उपक्रमात शिवाजी शिक्षण संस्थेसह अन्य प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी व संगीत प्रिय शिक्षकांनी सहभाग घेतला.

......

वडार समाजाचे

आंदोलन स्थगित

कराड :

आपल्या विविध मागण्यांसाठी वडार समाज बांधवांनी सुरू केलेल्या उपोषणाची सरकारी पातळीवर कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आंदोलकांनी मंगळवारी कृष्णा नदीपात्रात अर्धनग्न अवस्थेत जल आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या शिष्टाईने आंदोलकांनी तीन तासांनंतर जल आंदोलन स्थगित केले. मात्र, येथील तहसील कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी त्यांनी आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरण झाले, पुढे काय?

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

प्रादेशिक योजनेमधील त्रुटी दूर करा, कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकणाला गती द्या, महापालिकेला लागू झालेली 'ड' वर्ग नियमावली कमी करा, नव्याने तयार केलेल्या पूरनियंत्रण रेषेचा सर्व्हे करा या प्रमुख मागण्यांसाठी असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनीअर्सच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार प्रकाश दगडे दिली.

सकाळी दहा वाजता दसरा चौक येथून असोसिएशनच्या मोर्चाला सुरुवात झाली. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. मोर्चातील असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आला. 'प्राधिकरणातील त्रुटी दूर झाल्याच पाहिजे', 'कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे', 'प्राधिकरण स्थापन झाले, पुढे काय?' अशा घोषणांसह राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर शिष्टमंडळाने निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, 'प्रादेशिक योजनेतील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे ठप्प झालेले कामकाज, नव्याने निर्माण झालेली पूर नियंत्रण रेषा आणि महापालिकेला लागू झालेल्या 'ड' वर्ग नियमावलीमुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. प्राधिकरण व प्रादेशिक योजनेतील त्रुटी वेळोवेळी जिल्ह्यातील तांत्रिक संघटनांनी दाखवून दिल्या. याबाबत संबंधीत सरकारी अधिकारी सेवेचा अतिरिक्त भार असल्याचे सांगत आणि नियमावलीबाबत सखोल माहिती नसल्याने बेजबाबदारपणे जनतेस वेठीस धरत आहेत. त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होत आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमांतर्गत तरतुदींनुसार सरकारकडे वेळोवेळी सूचना, हरकती, तक्रारी मांडल्या आहेत. त्याची दखल घेऊन विकासातील सर्व अडथळे दूर करा. अन्यथा कोर्टात दावा दाखल करावा लागेल.'

मोर्चासमोर बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे व आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी, प्रशासनाने मोर्चाची दखल न घेतल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. मोर्चात विजय कोराणे, सुजित भोसले, पार्षद वायचळ, आमरजा निंबाळकर, रवी पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, किरण भोसले, मदनराव चव्हाण, नितीन पाटील, रमेश कुंभार यांच्यासह क्रिडाई, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरिअर, अर्थमुव्हिंग मशिनरी ओनर्स असोसिएशन, लँड डेव्हलपर्स असोसिएशन, कोल्हापूर सिव्हील इंजिनीअर्स अँड काँन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या

- प्रादेशिक योजनेतील प्रादेशिक उद्यान रेखांकनाचा फेरसर्व्हे करा

- गावठाणवाढ मूळ गावठाणात समावेश करावा

- प्रादेशिक योजनेमध्ये गुंठेवारी आदेश समाविष्ट करावा

- योजनेतील चुकीच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूल्यांकनाअभावी इमारत पडून

0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet:@MarutipatilMT

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाने कोल्हापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाची रक्कम आयआरबी कंपनीला दिल्यानंतर कंपनीकडे असलेली टेंबलाईवाडी येथील जागा व इमारत ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या जागेचे मूल्यांकन करून स्टँपड्यूटी, नोंदणी शुल्क जमा केल्यानंतर इमारत ताब्यात येणार आहे. मात्र महापालिकेच्या बांधकाम, नगररचना (टीपी) आणि इस्टेट विभागाकडून कागदी घोडे नाचविले जात असल्याने दोन महिन्यानंतरही मूल्यांकन झालेले नाही. परिणामी कोट्यवधींची इमारत धूळखात पडून आहे.

शहरांतर्गत रस्त्यांची बांधणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ४९.९९ किमीचा रस्ते विकास प्रकल्प २००८ मध्ये राबविण्यात आला. त्यासाठी आयआरबी कंपनीला काम देण्यात आले. २२० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पातील तूट भरुन काढण्यासाठी कंपनीला टेंबलाईवाडी येथील ३० हजार चौरस मीटर जागा ९९ वर्षांच्या कराराने देण्यात आली. कंपनीने आर्यन हॉस्पिटॅलिटीसोबत करार करून अलिशान हॉटेल उभारणीस सुरुवात केली. सद्यस्थितीत याचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात असताना राज्य सरकारने कंपनीला ३० जानेवारी २०१९ रोजी प्रकल्प खर्चाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ४७३ कोटी ३७ लाखांची तरतुद करून त्याचे वितरण केले.

याबाबतच्या अध्यादेशात कंपनीला दिलेली जागा व इमारत ताब्यात घेण्याचे आदेश होते. त्यानुसार इमारतीचे, जागेचे मूल्यांकन झाल्यानंतर स्टँपड्यूटी, नोंदणी शुल्क भरुन इमारत ताब्यात मिळणार आहे. त्यासाठी शहर अभियंत्यांनी इस्टेट विभागाला पत्र दिले. इस्टेट विभागाने हेच पत्र टीपी विभागाला दिले. पण, टीपी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणण्यानुसार त्यांना केवळ जागेचे मूल्यांकन करण्याचा अधिकार आहे. इमारतीचे मूल्यांकन होऊ शकत नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून इमारतीचे मूल्यांकन रखडले आहे.

२०१६ मध्ये मूल्यांकन समितीने जागा व इमारतीचे मूल्य ७५ कोटी असल्याचे नमुद तेले होते. सध्याच्या रेडिरेकनरच्या दरानुसार हेच मूल्यांकन शंभर कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पण, प्रशासनातील तिन्ही विभागांत समन्वय नसल्याने मूल्यांकन होऊ शकलेले नाही. परिणामी कोट्यवधींची इमारत धुळखात पडली आहे. राज्य सरकारचा आदेश झाल्यानंतर मूल्यांकन त्वरीत केले असते, तर महापालिकेच्या उत्पन्नाचा नवा स्रोत तयार झाला असता. पण, येथेही अधिकाऱ्यांची अनास्था स्पष्टपणे समोर येत आहे.

महामंडळाकडे सात कोटी

रस्ते विकास महामंडळाकडे महापालिकेची २७ कोटींची रक्कम निगेटिव्ह ग्रँट स्वरुपात आहे. महापालिकेने १९ किलोमीटरचे लिंक रोड करून यापैकी २० कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे महामंडळाकडे असेलले उर्वरीत सात कोटी रुपये मिळविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे होते. इमारतींचे मूल्यांकन करण्यास विलंब लावला जात आहे. शिवाय, प्रशासनाने महामंडळालाही या सात कोटी रुपयांबाबत अद्याप विचारणा केलेली नाही.

शहर अभियंत्याचे पत्र मिळाल्यानंतर मूल्यांकन करण्यासाठी नगररचना विभागाला पत्र दिले आहे. मूल्यांकन झाल्यानंतर स्टँपड्यूटी भरून इमारत ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. दोन दिवसांत नगररचना विभागाकडून याबाबतचे पत्र मिळेल.

- प्रमोद बराले, इस्टेट अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलमध्ये विखेंनी घेतली एका नेत्याची गुप्त भेट?

0
0

कोल्हापूरः

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील बुधवारी दुपारी हेलिकॉप्टरने कोल्हापुरात आले. अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी कागलमध्ये जाऊन एका नेत्याची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. पुत्र डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांची भूमिका काय असणार? याची चर्चा राज्यभर सुरू असतानाच त्यांनी गोपनीयरित्या कोल्हापूर दौरा केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने मतदारसंघ न सोडल्याने नाराज झालेले सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांच्या मुलानेच विरोधी पक्षात प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे-पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. यातच बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ते एकटेच हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळावर पोहोचले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता, अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आल्याचे सांगत त्यांनी अन्य प्रश्नांना बगल दिली. आमदार सतेज पाटील यांनी पाठवलेल्या कारमध्ये बसून ते कावळा नाक्यापर्यंत पोहोचले. या ठिकाणी कार थांबवून ते पुन्हा दुसऱ्या एका कारमध्ये बसून कागलच्या दिशेने निघून गेले. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दुपारी चार वाजेपर्यंत अंबाबाई मंदिरात त्यांची प्रतीक्षा करीत होते. मात्र, विखे-पाटील मंदिरात पोहोचलेच नाहीत. चारच्या सुमारास ते विमानतळावरून हेलिकॉप्टरने तुळजापूरला गेल्याची माहिती मिळाली.

जागा वाटपाच्या वादातून मुलाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे-पाटील कॉँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदी राहणार की, पदाचा राजीनामा देणार याची चर्चा सुरू आहे. विखे-पाटील यांनी मंगळवारपासून पक्षाच्या बैठकांमध्येही हजेरी लावलेली नाही. अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले, पण ते मंदिरात पोहोचलेच नाहीत. कागलला जाऊन नेमकी कोणाची भेट घेतली याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेने जोर पकडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातून दहशतवाद विरोधी एकात्मता फेरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त 'दहशतवाद विरोधी एकात्मता' असा संदेश घेऊन शहरातून पदयात्रा काढण्यात आली. महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या पुढाकाराने पदयात्रेचे आयोजन केले. पदयात्रेची सांगता झाल्यानंतर मंगळवार पेठेतील महासंघाच्या कार्यालयात मुळीक यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती.

येथील दसरा चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली. आमदार सतेज पाटील यांनी मुळीक यांना शुभेच्छा दिल्या. पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, मिरजकर तिकटी मार्गे मंगळवार पेठेत आली. या रॅलीत कादर मलबारी, के. एम. बागवान, बबनराव रानगे, अनंत म्हाळुंगेकर, अशोक माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुका पदरात घ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खासदार म्हणून गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत माझ्याकडून अनाहूतपणे काही चुका झाल्या असल्यास अथवा काही गोष्टी घडल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. जाणूनबुजून त्रास देण्याचा माझा स्वभाव नाही. त्यामुळे माझ्याबाबतचे गैरसमज, चुका पदरात घ्या आणि लोकसभा निवडणुकीत साथ द्या. भविष्यात सगळ्यांना सोबत घेऊन कामकाज करेन,'अशी साद खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना घातली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या तालुकाप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी महाडिक यांच्या कार्यालयात बैठक झाली. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी हात उंचावत एकसंघ राहून खासदारांना निवडून आणण्याचा संकल्प केला. तर शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामाणिक आहेत. शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून एकसंघपणे निवडणूक जिंकू. कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीत गद्दारी होणार नाही, असे सांगितले.

खासदार महाडिक म्हणाले, 'मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी असून कार्यकर्त्यांवर गावागावात सरकारच्या कामकाजाचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी आहे. १८ लाख मतदारांपर्यंत मी एकटा किंवा नेतेमंडळी पोहचू शकणार नाहीत. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील व जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. प्रदेश पातळीवरुन अद्याप आघाडीचा आदेश नसल्याने ते प्रचारात उतरलेले नाहीत. आमदार मुश्रीफांनी वरिष्ठस्तरावर आघाडी आणि उमेदवारीच्या घोषणेबाबत चर्चा करावी.'

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 'खासदार महाडिकांनी काही चुका केल्या असतील, आता त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तेंव्हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांना निवडून आणू या आणि दिल्लीत शरद पवार यांच्या मागे ताकद उभी करुया. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा निर्णय झाल्यावर संयुक्त मेळावे, बैठका होतील.'

याप्रसंगी आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक आदिल फरास, बी. एन. पाटील मुगळीकर, करवीर तालुकाप्रमुख मधुकर जांभळे यांची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले.

..............

पाटलांनी तांदूळ टाकले तर नाखूश होऊ नका

पक्षातील गटबाजीवर बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांना माजी आमदार के. पी. पाटील यांनी सुनावले. 'पक्षामध्ये नाराजी अजिबात नाही. यापुढे कुणीही बैठक, मेळावा व सभेत नाराजी हा शब्दच काढायचा नाही. पक्षाचा उमेदवार ठरला आहे. शिवाय लोकसभा निवडणूक म्हणजे राष्ट्रवादीचे लग्न आहे. मुलगा आमचा आहे. या लग्नात पलीकडच्या गल्लीतील पाटील तांदूळ टाकायला आले तर नाखूष होऊ नका,' असे वक्तव्य त्यांनी खासदार महाडिक यांच्याकडे पाहत काढले.

...................

के.पी.आणि ए.वाय. सोबतीने प्रचार करतील

मुश्रीफ म्हणाले, 'प्रचाराचा कालावधी कमी असल्यामुळे विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी वाढली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मात्र प्रत्येक तालुक्यात ज्या त्या नेत्यांनी गावनिहाय दौरा करावयाचा आहे. कागलमध्ये मी स्वत:, चंदगडमध्ये आमदार संध्यादेवी कुपेकर, राधानगरी भुदरगडमध्ये माजी आमदार के. पी. पाटील आणि जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी संयुक्तपणे प्रचार करायचा आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये शहराध्यक्ष आर. के.पोवार आणि करवीर तालुक्यात मधुकर जांभळे यांना सोबत घेऊन खासदार महाडिकांनी प्रचार मोहिम राबवायची आहे. दक्षिण मतदारसंघातील जबाबदारीही महाडिक यांच्यावर राहील.' कोल्हापूर शहरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक गुरुवारी घेण्याची सूचना मुश्रीफांनी केली.

......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थिती विचित्र, दुरुस्तीत वेळ घालवणार नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय स्थिती विचित्र बनली आहे. काही काँग्रेसचे नेते विरोधी शिवसेना पक्षाच्या व्यासपीठावर दिसत आहेत. लवकरच भाजपची काही मंडळी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसतील' 'असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व खासदार महाडिक यांच्यातील राजकीय संघर्षावर बोलताना ते म्हणाले, 'सध्या जे राजकारण सुरू आहे ते सगळ्यांच्यासमोर आहे. त्यामुळे दुरुस्ती करण्यात वेळ न घालवता राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार महाडिक यांना निवडून आणण्यासाठी प्रचार यंत्रणा गतिमान करू.'

राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, पार्थ पवार, अभिनेता अमोल कोल्हे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे सांगून मुश्रीफ म्हणाले, 'स्वाभिमानी शेतकरी संघटना व दोन्ही काँग्रेस सोबतच्या आघाडीचा तिढा येत्या दोन ते तीन दिवसात सुटेल. खासदार राजू शेट्टी यांनी तीन जागा मागितल्या आहेत. हातकणंगले येथील जागेवरुन ते दोन वेळा निवडून आले आहेत. आघाडीने येथील जागा स्वाभिमानीला सोडली आहे. त्याशिवाय वर्धा आणि बुलढाणा मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे. मात्र या दोन्ही जागा काँग्रेसकडे आहेत. या दोन्ही जागांचा वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. यामुळे येत्या काही दिवसात या जागेवरुन आघाडीत निर्माण झालेला तिढा सुटू शकेल. मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जादा जागांची मागणी केल्यामुळे आघाडीबाबत त्यांच्या मनात काय सुरू आहे हे वेगळे सांगायला नको. शेकाप, आरपीआय व डाव्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवू.'

.......

सतेज पाटलांसोबत चर्चा नाही, वरिष्ठ निर्णय घेतली.

मुश्रीफ म्हणाले, 'काही काँग्रेसचे नेते विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर दिसत आहेत. तर भाऊ या नात्याने भाजपचे आमदार अमल महाडिक हे खासदार महाडिक यांच्या प्रचारात दिसतील.' काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत चर्चा झाली का प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, 'माझी काही त्यांच्यासोबत चर्चा झालेली नाही, खासदारांची झाली असेल तर मला कल्पना नाही.' त्यावर महाडिकांनी माझी काही चर्चा झालेली नाही, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते याविषयी निर्णय घेतील. पंतप्रधानपदासाठी तयारी करणाऱ्या पक्षाचे वरिष्ठ यामध्ये लक्ष घालतील,'असे सांगत जादा बोलण्याचे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा टक्के आरक्षणाचा दाखला मिळविण्याचे आव्हान

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या दहा टक्के आरक्षण लाभासाठीच्या दाखल्यांसाठी पाच प्रकारच्या पुराव्यांची आवश्यकता आहे. मात्र हे पुरावे जमवताना लालफितीच्या कारभाराने अर्जदार हैराण झाले आहेत. आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या आणि इतर कोणत्याही प्रवर्गात नसलेल्यांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठीच्या अटी जाचक आहेत. पुरावे, अटी, विहित नमुन्यातील अर्जात २३ प्रकारची माहिती देण्याचा चक्रव्यूह भेदून 'आर्थिकदृष्या दुर्बल' प्रमाणपत्र मिळवताना 'नको रे बाबा' असे म्हणण्याची मानसिकता तयार होत आहे. कार्यरत ई सेवा केंद्रे आणि आपलं सरकार केंद्रांना दाखल्यासंबंधीची माहितीच नसल्याचे चित्र आहे.

सरकारी सेवा आणि शैक्षणिक संस्थांतील प्रवेशाकरीता केंद्र सरकारने आर्थिकदृष्या मागासांना दहा टक्के जागा आरक्षित केल्या. त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू केली. सध्याच्या नोकरभरतीत बिंदूनामावली (रोष्टर) निश्चित करताना 'इडब्लूएस प्रवर्ग' म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास गटासाठी १० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करू इच्छिणारे उमेदवार दाखला काढण्यासाठी गर्दी करीत आहेत.

सरकारने दाखला देण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून तहसीलदारांना घोषित केले आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर एक महिन्यात संबंधीतांना दाखला देणे बंधनकारक आहे. दाखला मुदतीत न दिल्यास किंवा चुकीचा दिल्यास त्याविरुद्ध प्रांताधिकाऱ्यांकडे अपील करण्याची मुभा आहे. सध्या दाखले काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयांत मोठी गर्दी होत आहे. दाखल्यांसाठी संबंधीत अर्जदार १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत ई सेवा केंद्रांत आणि आपलं सरकार केंद्रांमध्ये या दाखल्यासंबंधी पुरेशी माहिती नाही. त्यामुळे अर्जदारांनाच धावपळ करावी लागत आहे. ऑनलाइन अर्ज भरताना पाच प्रकारच्या पुराव्यांच्या प्रती स्कॅन करणे सक्तीचे आहे. त्याशिवाय अर्ज अपलोड होत नसल्याने संबंधितांची डोकेदुखी वाढली आहे.

ओळखीच्या पुराव्यासाठी

मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पारपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, सरकारी, निमसरकारी नोकरीतील ओळखपत्र, पॅनकार्ड, रोजगार हमी कार्ड यापैकी एक तर पत्याच्या पुराव्यासाठी मतदारयादीचा पुरावा, पाणीपट्टी, घरपट्टी पावती, सात-बारा आणि आठ अ उतारा, वीज बिल, दूरध्वनी बिल, पारपत्र, आधारकार्ड यापैकी एक असणे आवश्यक आहे. जन्म दाखल्याच्या पुराव्यासाठी प्राथमिक शाळा प्रवेशाचा उतारा, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला गरजेचा आहे.

उत्पन्न पुराव्यासाठी

सरकारी, खासगी नोकरीत असल्यास त्यांचे वेतनाचे १६ नंबर फॉर्म, व्यवसाय असल्यास आयकर, वस्तू, सेवा कर भरल्याचा पुरावे, जमीन मालक असल्यास सात बारा, आठ अ आणि तलाठी अहवाल, कुटुंबातील सदस्य सेवा निवानिवृत्त असल्यास बँकेकडील प्रमाणपत्र, आयकर विवरणपत्र, गुंतवणूक, लाभांशाचे उत्पन्न पत्रक उत्पन्न दाखला काढण्यासाठी जोडावा लागणार आहे.

२३ प्रकारची माहिती

दहा टक्के आरक्षण गटातून लाभ घेताना दाखल्यांसह विहित नमुन्यातील अर्जात फोटोसह २३ प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गात सामावेश नसल्याचे घोषणापत्र द्यावे लागणार आहे. घोषणापत्रातील माहिती चुकीची ठरल्यास फौजदारी गुन्हा आणि सेवेतून काढून टाकणे, प्रवेश रद्द करण्याच्या कारवाईस मी स्वत: जबाबदार आहे असे लिहून द्यावे लागणार आहे.

दाखल्यांसाठी रॅकेटही

मराठा आणि दहा टक्के आरक्षण दाखल्यांसाठी ई - सेवा केंदेरे, आपलं सरकार केंद्रांत मोठी गर्दी होत आहे. केंद्रात भरलेले ऑनलाईन अर्ज तहसीलदारांकडे जात आहे. प्रांताधिकारी, तहसीलदारांना लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दाखल्यांना विलंब होत आहे. यातून दाखले मिळवून देण्याचे स्वतंत्र रॅकेट कार्यरत झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी धरणाने तळ गाठला

0
0

उजनी धरणाने तळ गाठला

सोलापूर :

मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये ११० टक्के भरलेल्या उजनी धरणाने पाच महिन्यांत तळ गाठला आहे. रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. बाकीच्या सर्व योजनांना पाणी सुरू आहे. सध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे. बोगद्याच्या तोंडाजवळ पाणी शिल्लक नसेल. उपयुक्त पाणीसाठा ४९१ दशलक्ष घनमीटरवर येईल, त्या वेळेस बोगद्याचे पाणी बंद होईल.

सध्या ९० क्युसेक दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी, २८० क्युसेक सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी, ३२०० क्युसेक इतका विसर्ग कालव्यातून सुरू आहे. पुढील काळात पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नदीला पाणी सोडावे लागणार आहे. त्याचा परिणाम म्हणून पाण्यासाठी सोलापूरकरांना ऐन उन्हाळ्यात संघर्ष करावा लागणार आहे.

गेल्या वर्षी १२ मार्चमध्ये उजनी धरणात ७१.८१ टक्के पाणीसाठा होता. यंदा आज रोजी उजनी एकूण ३.८३ टक्के पाणीसाठा, तर उपयुक्त पाणीसाठा २.५५ टीएमसी इतका आहे. सुरुवातीला पाणी नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे उजनी धरण झपाट्याने रिकामे झाले आहे. उजनी धरणातून रोज एक टक्का पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत उजनी धरणातील पाणीसाठा वजा होणार आहे.

उजनीची सद्यस्थिती

- एकूण पाणीपातळी ४९१.३२० मीटर

- एकूण पाणीसाठा १८६०.९० दलघमी

- उपयुक्त पाणीसाठा ५८.०९ दलघमी

- टक्केवारी ३.८३ टक्के

- एकूण टीएमसी ६५.७१

- उपयुक्त टीएमसी २.०५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता भंगाची करा ‘अॅप’वर तक्रार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाची ऑनलाइन तक्रार करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सीव्हीजील (cvigil) अॅप तयार केले आहे. अॅप मोबाइलवर डाउनलोड करून त्यावरून तक्रार केल्यास १०० मिनिटांत कारवाई करण्यात येणार आहे. तक्रारदाराला कार्यवाहीचा टप्पाही ऑनलाइनच कळणार आहे. अॅप १८ मार्चपासून कार्यान्वीत होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने १० मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू केली. याअंतर्गत सार्वजनिक संपत्तीवर जाहिरात करणे, पोस्टर्स, कटआऊट, होर्डिंग्स, बॅनर्स, झेंडे लावण्यावर निर्बंध आले आहेत. राजकीय पदाधिकाऱ्यांची सरकारी वाहने ताब्यात घेण्यात आली. अर्ज माघारीनंतर रिंगणातील उमेदवारांकडून प्रचार ज्वर वाढेल. त्यानंतर मतदारांना विविध अमिषे दाखवण्यात येतात. मतदानाआधी पैसे, दारू, जेवणावळी वाटप सुरू होते. यासंबंधीची तक्रार पूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन लेखी करावी लागत होती. तक्रारींची दखल घेऊन कारवाई होईपर्यंत अनेकदा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत होती. अशा लालफितीच्या कामकाजाचा अनुभव किमान निवडणुकीत तरी सामान्य नागरिकांना येऊ नये, म्हणून ऑनलाइन तक्रारीसाठी आयोगाने सीव्हीजील अॅप तयार केले. अॅप गुगलवरील प्ले स्टोअरवरून मोबाईलवर अपलोड करून घेता येते.

अॅपवरून आचारसंहिता भंगासंबंधीत तक्रार फोटो, व्हिडिओ स्वरुपात देण्याची सुविधा आहे. तक्रारींवर कारवाईसाठी जिल्हा निवडणूक विभागात स्वतंत्र कक्ष करण्यात येणार आहे. या कक्षात सहायक राज्यकर आयुक्त नितीन बांगर यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत असेल. १८ मार्चपासून पहिल्या टप्यातील निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाल्यानंतर अॅप कार्यरत होईल.

सीव्हीजील अॅपवर कोणासही, कोठुनही तक्रार करता येईल. तक्रारींसोबत पुराव्यासाठी फोटो, व्हिडिओ अपलोड करण्याचीही व्यवस्था आहे. प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल. आयोगाच्या आदेशानुसार १०० मिनिटांत तक्रारीवर कारवाई होईल.

- सतीश धुमाळ, उपजिल्हाधिकारी, निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फडणवीस, पवार, मुंडेंच्या तोफा धडाडणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास अद्याप सुरुवात झालेली नसली, तरी संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला यापूर्वीच सुरुवात केली आहे. वैयक्तिक गाटीभेटींसह जाहीर समारंतून लोकसभेचा आखाडा गाजू लागला आहे. या आखाड्यात पुढील महिन्याभरात राष्ट्रीय आणि राज्य तळीवरील नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त शिवसेनेच्या प्रचाराला रविवारी (ता.२४) प्रारंभ होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभेला उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सेनेचे खासदार संजय राऊत, उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह अन्य नेतेमंडळींच्या तोफा धडाडणार आहेत.

जिल्ह्यातील दोन लोकसभा निवडणुकीचा ज्वर कमालीचा वाढू लागला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी २८ मार्च ते चार एप्रिलपर्यंत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत स्थानिक नेत्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक, शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. अर्ज भरण्यापूर्वी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यापुढील काळात या फैरी आणखी तीव्र होणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय व राज्यपातळीवरील नेत्यांचा समावेश होणार आहे. अशा दिग्गज नेत्यांच्या सभा मतदारसंघात होण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. त्याची सुरुवात रविवारच्या सेनेच्या प्रचार शुभारंभाने होईल. पहिल्याच सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतरच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत, सेनेचे उपनेते व शेतकरी नेते लक्ष्मण वडले, निलम गोऱ्हे, दिवाकर रावते, आदेश बांदेकर यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पकंजा मुंडेंच्या सभा होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सभांचे नियोजन केले जात आहे. राष्ट्रवादीचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचेही राज्यतील ज्येष्ठ नेत्यांच्या सभांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सभा होणार आहेत. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांसोबत स्थानिक नेत्यांच्या तोफाही जाहीर सभाच्या माध्यमातून धडाडणार आहेत. या सभांच्या माध्यमातून देश आणि स्थानिक पातळीवरील मुद्यांच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाला पाच लाखांचा दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा प्रदूषण रोखण्यास दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करून पर्यावरणाची हानी केल्याबद्दल बुधवारी (ता. १३) राष्ट्रीय हरित लवादाने महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रत्येकी पाच लाखाचा दंड सुनावला. तर महापालिकेला परफॉर्मन्स गॅरंटी म्हणून ५० लाखांची ठेव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दंड व गॅरंटी रक्कम १५ दिवसांत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचे आदेशही लवादाने दिले.

रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी सुरू आहे. याबाबतची याचिका सुनील केंबळे यांनी दाखल केली आहे. लवादाच्या निर्देशानुसार प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या उपाययोजनांचा अहवाल प्रत्येक महिन्याला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लवादासमोर २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान महापालिकेचे अधिकारी अनुपस्थित होते. मात्र प्रदूषण रोखण्याबाबत महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर केला होता. पण अहवालाची मांडणी होऊ शकली नाही. त्यामुळे लवादाने महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रत्येकी पाच लाखाचा दंड ठोठावला होता.

बुधवारी दिल्ली येथे न्यायमूर्ती एस. पी. वांगडी, के. रामकृष्णन व पर्यावरण तज्ज्ञ डॉ. नगीन नंदा या लवादासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान पुणे येथे याचिकाकर्त्ते व महापालिकेचे पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे व उपअभियंता आर. के. पाटील अॅड. गुप्ते उपस्थित होते. महापालिकेच्यावतीने दंड कमी करण्यासाठी अर्ज सादर केला. तसेच अॅड. गुप्ते यांनी महापालिकेच्यावतीने म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. पण लवादाने प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. लवादांच्या सूचनांचे उल्लंघन करून पर्यावरणाची हानी केल्याबद्दल महापालिका व प्रदूषण मंडळाला प्रत्येकी पाच लाख रुपये दंड करण्याचा निर्णय दिला. तसेच महापालिकेला परफॉर्मन्स गॅरंटी म्हणून ५० लाख ठेव १५ दिवसांत ठेवण्याचे आदेश दिले. '२०२० पर्यंत लवादाच्या सूचनेनुसार रंकाळा प्रदूषण रोखण्यास अपयश आल्यास परफॉर्मन्स गॅरंटी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.' अशी माहिती याचिकाकर्त्ते सुनील केंबळे यांनी दिली.

प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल लवादाला सादर केला. पण तांत्रिक बाबींमुळे अहवालाची मांडणी करता आली नाही. पुढील सुनावणी दरम्यान रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करू. तसेच महापालिकेला झालेल्या दंडाबाबत योग्य ठिकाणी दाद मागू.

आर. के. पाटील, उपअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार ओळखपत्र दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत नव्याने सामावेश झालेल्यांची पीव्हीसी मतदार ओळखपत्र आयोगााकडून दाखल झाले. ओळखपत्र संबंधित मतदारांच्या घरात जाऊन देण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व ओळखपत्रे बुधवारी तालुका पातळीवर सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दोन टप्यांत नवीन मतदार नोंदवणे, नाव आणि पत्यात दुरुस्ती, मयत, दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम राबवण्यात आली. त्यात एक लाख २६ हजार, ९७९ मतदारांची नावे नव्याने यादीत सामावेश झाली. त्यांना नवीन ओळखपत्र वितरण करण्यात येणार आहेत. त्यासाठीची यंत्रणा कार्यरत झाली आहे. शक्य तितक्या लवकर ओळखपत्र पोहचवण्याची प्रशासनाची धडपड आहे.

निवडणुकीसाठी विविध विभागांच्या ३९ हजार, २८३ कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेवेळी २९ हजार, ८०९ कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. आता सहा हजार कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामासाठी कार्यरत आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि माध्यमांतील बातम्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. आचारसंहितेच्या काळातील राजकीय कार्यक्रम, उपक्रमांची परवानगीसाठी मागणीनुसार एक खिडकी कक्ष कार्यरत करण्याचे नियोजन निवडणूक प्रशासनाने केले.

१७२ शस्त्रे जमा

स्व-संरक्षणासाठीच्या परवानाधारक ११३५ शस्त्रांपैकी आतापर्यंत १७२ शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यांत जमा झाली आहेत. शस्त्रधारकांना निवडणूक कालावधीत शस्त्रे जमा करण्याचे लेखी आवाहन केले आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता आणि इतर बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या ३२० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अवैध दारू विक्री करणाऱ्या तिघांना अटक करून २०९ लिटर दारू जप्त करण्यात आली.

निवडणुकीचे कारण सांगून दांडी

जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, सहकार, पाटबंधारे अशा विविध विभागाचे कर्मचारी निवडणूक कामासाठी घेतले आहेत. मात्र निवडणूक ड्युटी नसलेले कर्मचारही कार्यालयात नसल्याचे दिसून येत आहे. कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी विचारणा केल्यावर 'निवडणूक कामात आहेत' असे मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन मोबाइल टॉवरसह पेट्रोल पंप सील

0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका प्रशासनाने थकीत घरफाळा वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. मार्चअखेर असल्याने मोहीम अधिक तीव्र करताना बुधवारी थकीत घरफाळाप्रश्नी जीटीएल कंपनीचे दोन मोबाइल टॉवर व इंडियन ऑइल कार्पोरेशनचा पेट्रोलपंप सील केला. तीनही मिळकतधारकांकडे सुमारे १८ लाख घरफाळा थकीत आहे. कारवाईदरम्यान पथकाने स्टेट बँक ऑफ पटियाला व बँक ऑफ इंडियाकडून ३४ लाख ५० हजार घरफाळा वसूल केला.

महापालिकेच्या घरफाळा विभागाने थकीत घरफाळा वसुलीसाठी सवलत योजना जाहीर सुरू केली आहे. जानेवारी ते ३१ मार्चअखेर सवलत योजनेची मुदत असली, तरी सवलत योजनेमध्ये सहभागी न होणाऱ्या मिळकतदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचे निर्देश नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारी निवृत्ती चौक येथील मारुती व पांडुरंग पाटील यांच्या मिळकतीमध्ये जीटीएल मोबाईल कंपनीच्या टॉवरची आठ लाख ६५ हजार, तसेच हॉटेल एलिगंट येथील याच कंपनीच्या टॉवरची सात लाख ३३ हजार थकबाकी होती. या थकबाकीपोटी पथकांने दोन्ही टॉवर सील केले. तर जवाहरनगर मुख्य रस्त्यावरील इंडियन ऑईल कार्पोरेशन कंपनीच्या पेट्रोल पंपाची दोन लाख १६ हजार थकबाकी असल्याने हा पेट्रोल पंप पथकाने सील केला.

ही कारवाई उपायुक्त मंगेश शिंदे व करनिर्धारक दिवाकर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक विशाल सुगते, अनिरुद्ध शेटे, सहायक अधीक्षक विजय वणकुद्रे, भगवान मांजरे, सुभाष ढोबळे, राकेश भोसले, श्रीकांत चव्हाण, मुरलीधर बारापात्रे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आज बैठक

0
0

कोल्हापूर

खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचाराच्या नियोजनसाठी कोल्हापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व आजी माजी नगरसेवकांची गुरुवारी (ता.१४) बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, खासदार महाडिक, महापौर सरिता मोरे, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता हॉटेल पॅव्हेलियन येथे बैठकीला सुरुवात होईल. दरम्यान, महाडिक यांच्या प्रचारापासून राष्ट्रवादीचे काही नगरसेवक लांब असल्याचे निदर्शनास आल्यामुळे गुरुवारी होणारी बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील १८२ होर्डिंग्ज हटवले

0
0

कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी करताना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील होर्डिंग्ज, बॅनर, झेंडे, पोस्टर हटविले. राजारामपुरी, महाद्वार रोड, सानेगुरुजी वसाहत या मुख्य मार्गावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. राजारामपुरी, महाद्वार रोड, सानेगुरुजी वसाहत, गांधी मैदान परिसरासह केएमटीच्या ११ बसस्टॉपवरील फलक हटवण्यात आले. बुधवारच्या कारवाईत १८२ होर्डिंग्ज, लहान-मोठे २७५ बॅनर्स व ९० झेंडे काढून टाकण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केमिस्ट असोसिएशनसाठी दोन पॅनेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्तारुढ गटाचे प्रमुख मदन पाटील व विरोधी गटाचे प्रमुख सुरेश काटकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये थेट लढत आहे. २९ जणांच्या कार्यकारिणीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी १४ ते १७ मार्च आहे. सात एप्रिल रोजी मतदान तर आठ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

सत्तारुढ केमिस्ट एकता पॅनेल व विरोधी स्वाभिमानी रिटेल पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा कार्यक्षेत्र आहे. किरकोळ व होलसेल औषध विक्रेत्यांची ही संघटना आहे. निवडणुकीसाठी पात्र सभासदांची संख्या २३१९ इतकी आहे. दोन्ही आघाड्याकडून सभासदांच्या अडअडचणी, सभासद कल्याण निधीचे प्रश्न उपस्थित होत असल्याने निवडणुकीविषयी सभासदात उत्सुकता निर्माण झाली आहे. सत्तारुढ गटाचे प्रमुख पाटील यांची केमिस्ट असोसिएशनवर गेली २५ वर्षे सत्ता आहे.

दरम्यान कार्यकारिणीवर कोल्हापूर शहरातून आठ तर हातकणंगले तालुक्यातून पाच उमेदवार निवडण्यात येतात. तर कागल, करवीर, राधानगरी, गडहिंग्लज, आणि पन्हाळा तालुक्यातून प्रत्येकी दोन उमेदवारांची निवड होते. आजरा, शिरोळ, शाहूवाडी, भुदरगड आणि आजरा येथून प्रत्येकी एक उमेदवार आहे. पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारुढ व विरोधी पॅनेलने तयारी सुरू केली आहे.

केमिस्ट असोसिएशनचा कार्यभार करताना नेहमी सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले. या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढावी म्हणून प्रयत्न केले. सभासदांना व्यवसायासंदर्भातील कायदे, नियमावलीविषयी मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या. कल्याण निधीचा वापर सभासदासाठीच केला. त्या निधीचा कधीही व्यक्तिगत कारणासाठी वापर केला नाही.

मदन पाटील, प्रमुख, केमिस्ट एकता पॅनेल

सत्तारुढ आघाडीने गेल्या दहा वर्षांत सभासदांच्या अडचणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. स्वत:च्या फर्मला कंपन्यांच्या एजन्सीज मिळाव्यात म्हणून सत्तेचा वापर केला. किरकोळ व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत. असोसिएशनच्या मालकीचे फार्मसी कॉलेज असूनही सभासदांच्या मुलांना त्या ठिकाणी प्रवेश मिळत नाहीत. अध्यक्षांनी सभासद कल्याण निधीचा वापर करुन व्यक्तीस्तोम माजवले.

सुरेश काटकर, प्रमुख, स्वाभिमानी रिटेल पॅनेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून केल्याची कबुली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आईच्या मृत्यूनंतर पत्नीला झालेल्या आनंदाच्या संतापातून जिन्यावरुन ढकलून तिचा खून केल्याची कबुली संदीप मधुकर लोखंडे (वय ४०, रा. प्लॉट क्रमांक ८, महिपतराव बोंद्रेनगर, राधानगरी रोड) याने जुना राजवाडा पोलिसांना दिली. शुभांगी लोखंडे (३९) असे यातील मृताचे नाव आहे. जिन्यावरुन खाली पडल्यानंतर वाचवण्याची विनवणी करत असतानाही तिच्या डोक्यात फरशीचे घाव घालून खून केल्याची कबुली संदीपने दिली.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘संदीपची आई मालती यांचे गेल्या शनिवारी निधन झाले होते. सासूच्या निधनाच्या धक्क्याने जिन्यावरुन तोल जाऊन पडल्याचा बनाव पतीने रचला होता. मात्र या प्रकाराचा उलगडा चार दिवसांत जुना राजवाडा पोलिसांनी केला. घटनास्थळी रक्त पडलेला फरशीचा तुकडा जप्त केला. संदीप ताब्यात घेऊन चौकशी केली असता शुभांगी व्यवस्थित वागत नव्हती. आईवडिलांकडे लक्ष देत नव्हती. आईच्या मृत्यूनंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. ‘आई गेली तरी संसारात फरक पडत नाही. वाईट वाटून घेऊ नका,’ अशी प्रतिक्रिया पत्नीने दिल्याने संदीप संतप्त झाला. ती झाडू ठेवण्यासाठी पहिल्या मजल्यावर गेली असता मागून धक्का देऊन त्याने तिला खाली ढकलले. तो पळतच खाली आला. फरशीच्या तुकडा तिच्या डोक्यात घातला. वर्मी घाव बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.’

दोन वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज

संदीप आणि शुभांगीत वारंवार भांडणे होत. कुटुंबापेक्षा पत्नीचे देवकार्याकडे जास्त लक्ष होते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी त्याने घटस्फोटही मागितला होता. मात्र आईवडिलांनी तो घेऊ दिला नाही, असे संदीपने सांगितले. आईलाही ती हीन पद्धतीने वागणूक देत असे. पहिल्या मुलाच्या अपघाती मृत्यूलाही संदीप पत्नीला जबाबदार धरत होता. त्या रागातून पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. मात्र आता पश्चाताप होतोय. मुलगा आणि वडिलांची काळजी वाटतेय, असे त्याने सांगितले.

संबंधित बातमी

कोल्हापूर: सासूच्या निधनाच्या धक्क्यानं सुनेची आत्महत्या?


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images