Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आघाडीचे बारा वाजवू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सगळ्यांना विश्वासात घेऊन मी मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपसोबत गेलो. यावेळीही छुपा नाही तर उघडपणे त्यांना थेट पाठिंबा देणार आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे बारा वाजवणार,' असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी केले. 'डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला गर्दी होत असली तरी पुन्हा मीच सत्तेत असेन,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आयोजित संकल्प परिषदेत दसरा चौकात बोलत होते. जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी होते.

आठवले म्हणाले, 'शिवसेना, भाजपने मुंबईतील जागा माझ्यासाठी सोडावी, अशी अपेक्षा आहे. काहीही झाले तरी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. पाच वर्षांत मोदी यांनी चांगले काम केले आहे. दहा टक्के सवर्ण आरक्षण, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. ओबीसी, भटक्या विमुक्त, धनगर समाजाच्याही मागण्या पूर्ण झाल्या आहेत. यामुळे माझा पक्ष भाजप, शिवसेनेसोबत असेल. तेही माझ्यासोबत असतील. सत्तेपर्यंत पोहचण्यासाठीच्या माझ्या निर्णयावर काहीजण 'कुत्रं', 'मांजर' अशा शब्दांत टीका करीत आहेत. मात्र आम्ही पिसाळलो की चावतो, हेही टीका करण्याऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. भीमा कोरगावनंतरच्या महाराष्ट्र बंदमध्ये माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आघाडीवर होते. मात्र त्याचे श्रेय प्रकाश आंबेडकर घेत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.'

यावेळी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरोदे, उत्तम कांबळे, मंगलराव माळगे, अॅड. पंडितराव सडोलीकर, परशुराम वाडेकर, प्रा. शहाजी कांबळे यांची भाषणे झाली. बी. के. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. रूपा वायदंडे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत वाघमारे, जितेंद्र बनसोडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कवितेतून आवाहन

आठवले यांनी कवितेतून कार्यकर्त्यांना आवाहन केले. ते म्हणाले, 'माझ्या भीमाला आपण मानायचं हाय, मोदी सरकार पुन्हा देशात आणायच हाय, काँग्रेसला आता आणायचं नाय, राष्ट्रवादीला आता मानायच नाय, समतेचा संकल्प करायचा हाय, जागी झाली आता माझी माय, संघर्षाची दुधाची आता झाली शाय, नरेंद्र मोदी यांना सध्यातरी सोडणार नाय.' अशी कविता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगा घाट सुशोभिकरण ठप्प

0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:@satishgMT

कोल्हापूर : केंद्रीय पुरातत्व विभागाच्या परवानगी नसल्याने पंचगंगा घाट संवर्धन, पुनर्बांधणी व सौंदर्यीकरण प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे. पर्यायी शिवाजी पुलाप्रमाणे हा प्रकल्प रेंगाळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर शहरात नवीन पर्यटनस्थळ निर्माण व्हावे यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. २८ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून राज्य सरकारने पहिल्या टप्प्यातील कामास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यासाठी चार कोटी २८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. गेल्यावर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कामाचे भूमीपूजन झाले. पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र, दगडी प्रवेशद्वार, उद्यान विकसित करण्यात येणार आहे. दोन वर्षांत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला होता. पण, ठेकेदाराने काम सुरू करण्यासाठी फक्त खड्डे पाडून ठेवले आहेत. त्यानंतर या प्रकल्पाचा एक दगडही रचला गेलेला नाही.

प्रकल्पाचे काम ब्रह्मपुरी टेकडी या पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील स्थळाजवळ असल्याची शंका काही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रकल्पाला परवानगी मिळावी यासाठी राज्य पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव पाठवला. परवानगी मिळण्याची शक्यता असतानाही काही तज्ज्ञांनी राज्य पुरातत्व विभागाकडे तोंडी तक्रार केल्याने त्या खात्यातील अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात येऊन प्रकल्पाच्या ठिकाणी भेट दिली. प्रकल्पाला आमचा विभाग परवानगी देऊ शकत नाही, असे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाला केंद्रीय पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार दिल्लीला पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. पुरातत्व खात्याचे कायदे कडक असल्याने सध्या हे काम बंद ठेवण्यात आले. प्रस्ताव मंजुरीनंतर काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा आहे २८ कोटींचा प्रकल्प

पंचगंगा नदीघाटाच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पाचे डिझाइन ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंट, पंचगंगा नदीचे प्रदूषण या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तयार केले आहे. सध्या हनुमान मंदिराजवळील असलेल्या घाटापासून म्हशी जाण्याचा रस्ता, परीट घाट, ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंटचा खालील भाग, शिवाजी पूल, दशपिंड घाट, खवन घाटापर्यंत नवीन दगडी घाटाचे नियोजन केले आहे. दगडी पायऱ्यांचे घाट व कमानीच्या देवळी अशी रचना केली आहे. पुराचे पाणी देवळ्यांमध्ये खेळून पुन्हा नदीत येणार असल्याने पुराचा धोकाही कमी होणार आहे. ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंटच्या खालील बाजूने एक नव्याने उद्यान विकसित करण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी पिकनिक पॉईट, नवीन उद्यान, देवळी व घाटाकडे जाण्यासाठी जिने व रस्ते तयार केले जाणार आहेत. ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंटवरून अधिक उंचीवरून सूर्यास्त पाहता यावा यासाठी ४० फूट उंचीच्या सनसेट पॉईंटची उभारणी करण्यात येणार आहे.

लोगो : रखडलेले प्रश्न

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टर्न टेबल लॅडरसाठी चार कोटींचा निधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेची अग्निशमन यंत्रणा अद्ययावतीकरण व्हावी यासाठी टर्न टेबल लॅडर खरेदीसाठी राज्य सरकारकडून चार कोटींचा निधी देण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र मिळाले आहे. यामुळे गेल्या पाच वर्षांची प्रतीक्षा या निधीमुळे संपुष्टात आली असली तरी निधी मिळाल्याचे पत्र अद्याप महापालिकेला मिळालेले नाही. मात्र या निधीचा फायदा अग्निशमन दलाला होणार आहे.

शहरात ५४ मीटरपर्यंतच्या इमारतींमध्ये एखादी आपत्ती ओढविल्यानंतर तशा आपत्तींचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाकडे यंत्रणाच नाही. अशी यंत्रणा असलेले टर्न टेबल लॅडर घेण्यासाठी महापालिकेने २०१४मध्ये राज्य सरकारकडे निधीची मागणी केली. त्यासाठी ११ कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, राज्य सरकारने दोन टप्प्यात निधी मिळेल असे स्पष्ट केल्यानंतर महापालिकेने साडेपाच कोटींचा प्रस्ताव पाठवला. प्रस्तावानुसार टर्न टेबल लॅडरसाठी चार कोटी रुपये उपलब्ध झाल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले आहे. उर्वरित २५ टक्के निधी महापालिकेला उपलब्ध करावा लागणार आहे. मात्र या निधीमुळे महापालिकेच्या विकासाला हातभार लागणार आहे.

सध्या शहरात ३५ मीटर उंचीपर्यंतच्या इमारती उभारल्या जात आहेत. मात्र, अशा इमारतींमध्ये एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाकडे अशीच कोणतीच यंत्रणा नाही. मात्र टर्न टेबल लॅडर वाहनासाठी निधी मिळाला असल्याने ५४ मीटरपर्यंतच्या इमारतींमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास तेथे त्वरीत उपाययोजना करता येणे शक्य होणार आहे. मात्र, त्यासाठी अग्निशमन दलाकडील रिक्त पदे भरावी लागणार आहेत. विभागात अनेक पदे रिक्त असल्याने अनेक गाड्यांवर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. टर्न टेबल लॅडर वाहन आणि मोठ्या उंचीच्या शिडीसाठी निधी मिळाला असल्याने त्यासाठी मनुष्यबळही उपलब्ध करावे लागणार आहे.

टर्न टेबल लॅडरसाठी निधी मिळावा यासाठी महापालिका प्रशासन २०१४पासून पाठपुरावा करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधीबाबतचे पत्र आल्याचे सांगण्यात येते. मात्र अद्याप महापालिकेकडे निधीबाबतचे पत्र मिळालेले नाही.

- रणजित चिले, मुख्य अग्निशमन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणगाव परिषद शताब्दीवर्षानिमित्त विविध कार्यक्रम

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या विचारांनी माणगाव येथे ऐतिहासिक परिषद झाली या घटनेला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे मार्च २०१९ ते मार्च २०२० हे शताब्दी महोत्सव वर्ष साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. २१) डॉ. सुखदेव थोरात यांच्या व्याख्यानाने शताब्दी वर्षाची सुरुवात होईल. राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडेपाच वाजता दलित वंचित समाजाची स्थिती आणि त्यापुढील आव्हाने या व्याख्यानाचा विषय असेल' अशी माहिती माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. विनय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. कांबळे म्हणाले, 'शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करताना दर दोन महिन्यांत तीन व्याख्यानांची एक व्याख्यानमाला अशी वर्षभरात २० व्याख्याने होतील. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर आधारित चर्चासत्रे, शिबिरे व परिसंवादांचे आयोजन केले जाणार आहे. यांदरम्यान १९२० मध्ये झालेल्या माणगाव परिषदेच्या इतिहास लेखनाची पुस्तिका प्रसिद्ध करण्यात येईल. वर्षभर झालेल्या कार्यक्रमाची स्मरणिकाही यानिमित्ताने प्रकाशित होईल.'

कांबळे म्हणाले, 'शताब्दी महोत्सव साजरा करताना ज्या नव्या समस्या, नवी आव्हाने उभी राहिली, परिस्थिती बदलती या सर्वांची उत्तरे शोधण्यात येईल. यासाठी वर्षभर चालणाऱ्या व्याख्यानांतून देशभरातील तज्ज्ञांना आमंत्रित केले जाईल. याची सुरुवात गुरुवारी डॉ. थोरात यांच्या व्याख्यानाने होईल. शुक्रवारी (ता. २२) शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एस. कांबळे यांचे 'वंचित समाजाच्या विकासाची समस्या' या विषयावर शाहू स्मारक भवनात व्याख्यान होईल. शताब्दी महोत्सवाची सांगता २१ व २२ मार्च २०२० रोजी होईल. या दोन्ही दिवशी व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकांचे आयोजन केले आहे.'

पत्रकार परिषदेस राहुल ठाणेकर, प्रा. अशोक चोकाककर, आनंद राणे, प्रा. सिद्धार्थ पद्माकर, प्रा. ए. एम. कसबे आदींसह महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार

0
0

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार

सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार

सोलापूर :

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार आहेत. स्वतः त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आंबेडकर सोलापूर लोकसभा लढणार असल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद गेल्या वर्षभरात वाढली आहे. त्यामुळे प्रवर्तक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना कार्यकर्त्यांकडून सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह होत होता. त्या नुसार त्यांनी सोमवारी सकाळी अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन सोलापूरमधून उभे राहण्याचा इरादा व्यक्त केला आहे. दरम्यान, अ‍ॅड. आंबेडकर जर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर याचा फटका काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना बसू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

सुशीलकुमार शिंदे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याच मतदारसंघातून अ‍ॅड. आंबेडकर यांनी निवडणूक लढण्याचा इरादा जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसही सावध झाली आहे. बहुजन वंचित आघाडीची स्थापना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये झाली आहे. सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, माळीनगर या भागात मोठ्या सभा झाल्या आहेत. अ‍ॅड. आंबेडकर यांनी शेजारच्या माढ्या मतदारसंघात अ‍ॅड. विजयराव मोरे यांची उमेदवारी जाहीर केली असून, त्यांच्या प्रचारास सुरुवात ही झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांनी जे पेरले तेच उगवले

0
0

पवारांनी जे पेरले तेच उगवले

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

राज्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांत आपल्या कलंदर डावपेचातून अनेकांच्या दांड्या गुल करण्याची कला अवगत असलेल्या शरद पवार यांच्याही नशिबी अखेर जे पेरले ते उगवले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात त्यांच्याच डावपेचात तेच सापडले आहेत. विजयाची खात्री नसल्यानेच त्यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की ओढवली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षातील बडे नेते कायम पवारांच्या मदतीनेच आपले राजकारण करीत होते. त्यामुळे कधी कोणाला खुर्चीत बसवायचे आणि कोणाला घरी याचा निर्णय पवारांच्याच सांगण्यावरून होत आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण्यांच्या तिसऱ्या पिढ्याही आज पवारांच्या इशाऱ्यावर राजकारण करताना दिसत आहेत. मात्र, याच खेळ्यातून राष्ट्रवादीत गटबाजी तयार होत गेली आणि त्याच गटबाजीच्या भीतीने शरद पवारांना माघार घेण्याच्या नामुष्कीपर्यंत आणले आहे.

काही दिवसापूर्वी अकलूजच्या दौऱ्यावर आले असता मी आणि सुप्रिया पवार या दोघांशिवाय आमच्या घरातून कोणीही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले होते. मात्र, आता पार्थ पवार यांच्या उमेदवारीला होकार देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि मोहिते पाटील या दोघांच्या गटबाजीतून पवार यांनी माढ्यातून लढण्याचा निर्णय घेतला हे वास्तव आहे. तिसऱ्या आघाडीच्या मदतीने पंतप्रधानपदाचे स्वप्न सत्यात उतरेल, असे चित्र तयार झाल्याने पवार लोकसभा लढविण्यासाठी तयार झाले होते. मात्र, पण पुलवामा हल्ला व त्यानंतर झालेल्या एअर स्टाइकमुळे राजकीय वातावरण बदलू अंदाज पवारांना आल्यानेच त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. शिवाय मोहिते पाटलांना डावलल्याने त्यांच्या समर्थकात असलेली तीव्र नाराजी अडचणीची ठरू शकते याचा अंदाज त्यांना आला असावा. मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राष्ट्रवादीतील गटबाजीवर मात करीत मोहिते पाटील यांनी निसटता विजय मिळविला होता. फलटण, माण खटाव, माढा, सांगोला, करमाळा या सर्व तालुक्यांतून पिछाडीवर असूनही एकट्या माळशिरस तालुक्यातील मतांच्या जोरावर मोहितेंनी २५ हजारांनी विजय मिळविला होता. हीच आकडेवारी पवार याना धोकादायक वाटू लागली आहे. सर्व तालुक्यांनी साथ देऊनही जर माळशिरस तालुक्यातून मोहिते समर्थकांनी दणका दिल्यास या निवडणुकीत पराभवाचा फटका बसू शकतो, अशी शंका पवारांना आहे. शिवाय पवारांनी आपली खास यंत्रणा वापरून मतदारसंघाचा कानोसाही घेतला असून, त्याचे अंदाजही फारसे उत्साहवर्धक नसल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आता माढ्यातून पुन्हा विजयसिंह मोहिते-पाटील अथवा त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. माढ्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांना उमेदवारीसाठी भरीस घालण्यास पवारांनी सुरुवात केली असल्याची ही चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात तिघांचा मृत्यू

0
0

सोलापूर :

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही आंध्र प्रदेशात घडली आहे. हे सर्व भाविक सांगोला तालुक्यातील आहेत. सोमवारी पहाटे हा भीषण अपघात झाला.

या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगोल्यातील दादासाहेब यशवंत लांडगे (वय-४२ रा. सांगोला ), प्रमोद सुनील राऊत (वय २४ रा. कडलास), गजानन पाटील (रा. लोणार) या तिघांचा मृत्यू झाला आहे. मारुती बबन गवळी (रा. कडलास ) आणि वेदपाठक जखमी झाले आहेत. ते पाच जण स्विफ्ट कारमधून तिरुपतीच्या दर्शनाला गेले होते. पहाटे कार आणि बसचा अपघात झाला. अपघाताचे नेमके ठिकाण कळू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
0

जलसमाधी आंदोलनाचा इशारा

कराड :

वडार समाजाच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत तहसीलदार कार्यालयासमोर समाजबांधवांचे अर्धनग्न अवस्थेत उपोषण सुरू आहे. सोमवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशीही प्रशासनाच्या वतीने कोणतीही दखल न घेतल्याने वडार समाजाने मंगळवारी, १२ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी प्रीतिसंगमावर जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

..........

बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेणोली शाखेवर सशस्त्र दरोडा

कराड :

शेणोली (ता. कराड) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर सोमवारी दिवसाढवळ्या चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. या दरोड्यात सुमारे चार ते पाच चोरट्यांचा समावेश असून, त्यांनी दहशत बसवण्यासाठी हवेत गोळीबार करीत बँकेतील २३ लाख रोख रक्कम व सुमारे १० तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा दरोडा पडला असून, या घटनेमुळे परिसरासह संपूर्ण तालुका हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. चोरट्यांनी बँकेमध्ये प्रवेश करताच बँकेतील उपस्थित खातेदार, ग्राहक, बँक कर्मचाऱ्यांचे मोबाइल काढून घेतले. त्या नंतर त्यांनी संबंधितांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केले. लोकांचे पाच मोबाइल घेऊन त्यांनी पोबारा केला. पळून जाताना त्यांनी बँकेच्या दाराला बाहेरून कडी लावली.

...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परभणी विश्लेषण फोटो

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार

0
0

सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार आहेत. स्वतः त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आंबेडकर सोलापूर लोकसभा लढणार असल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद गेल्या वर्षभरात वाढली आहे. त्यामुळे प्रवर्तक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना कार्यकर्त्यांकडून सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह होत होता. त्या नुसार त्यांनी सोमवारी सकाळी अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन सोलापूरमधून उभे राहण्याचा इरादा व्यक्त केला आहे. दरम्यान, अ‍ॅड. आंबेडकर जर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर याचा फटका काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना बसू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

सुशीलकुमार शिंदे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याच मतदारसंघातून अ‍ॅड. आंबेडकर यांनी निवडणूक लढण्याचा इरादा जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसही सावध झाली आहे. बहुजन वंचित आघाडीची स्थापना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये झाली आहे. सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, माळीनगर या भागात मोठ्या सभा झाल्या आहेत. अ‍ॅड. आंबेडकर यांनी शेजारच्या माढा मतदारसंघात अ‍ॅड. विजयराव मोरे यांची उमेदवारी जाहीर केली असून, त्यांच्या प्रचारास सुरुवातही झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दफन विधीसाठी दरवर्षी निधी देऊ’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून वीरशैव लिंगायत समाजात दफनविधीसाठी प्रत्येक वर्षी एक लाख रुपयांचा निधी वीरशैव समाजाला देऊ,'अशी ग्वाही समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनविधी कार्यासाठी समितीतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. अक्कमहादेवी मंटप येथे कार्यक्रम झाला. वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमन वडगांवकर, उपाध्यक्षा मीनाक्षी कदम, राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार विजेते राजेश गाताडे यांचा सत्कार करण्यात आला.

जाधव म्हणाले, 'वीरशैव लिंगायत समाजाचा दफन विधीसाठी दोन हजाराहून अधिक खर्च येतो. हा खर्च सामान्य लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ही अडचण घेऊन प्रत्येक वर्षी या समाजास दफन विधीसाठी एक लाखाचाा निधी देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे' याप्रसंगी देवस्थान समितीच्या खजानिस वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजी जाधव, चंद्रकांत स्वामी यांची भाषणे झाली. राजेश पाटील-चंदूरकर यांनी प्रास्ताविक केले. राजू वाली यांनी सूत्रसंचालन केले. सुहास भेंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नानासाहेब नष्टे, सुभाष चौगुले, श्रीकांत बनछोडे, शंकरराव कदम, किरण सांगावकर, विवेक हिरेमठ, वसंत सांगवडेकर, बाळासाहेब सन्नकी यांची उपस्थिती होती.़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख गूळ रव्यांचा फटका

0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : दरातील चढउतार, शेतकऱ्यांचा साखर कारखान्यांकडे असलेला ओढा, वाढलेला उत्पादन खर्च आणि सांगली व कराड बाजारपेठेकडे वळलेले गूळ उत्पादक यामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत यंदा एक ते दीड लाख गूळ रव्यांची घट होण्याची शक्यता आहे. गुळाला हमीभाव मिळावा, अशी मागणी होत असताना केंद्र व राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल शेतकरीवर्गाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील गुळाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून १९१३ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी शाहूपुरी येथे गुळाची बाजारपेठ स्थापन केली. त्यानंतर ही बाजारपेठ स्वातंत्र्यानंतर राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथे स्थलांतिरत करण्यात आली. २५ वर्षापूर्वी जिल्ह्यात सुमारे १२०० गुऱ्हाळघरे होती, पण मजुरांच्या कमतरतेमुळे सध्या २०० ते ३०० गुऱ्हाळघरे सुरू आहेत. त्यावर ५० ते ६० हजार लोकांची उपजीविका चालते.

रंग, रूची, टिकाऊपणा यासाठी कोल्हापूरचा गूळ देशभर प्रसिद्ध आहे. कोल्हापुरातील ९० टक्के गूळ गुजरात राज्यात जातो. २०१८-१९ च्या हंगामाच्या सुरुवातीस गुळाच्या प्रतवारीनुसार कमीत कमी दर २७०० रुपये, तर जास्तीत जास्त ६००० रुपये होता. सरासरी दर ३५०० रुपये होता, पण अचानक गुळाचे दर घसरल्याने सरासरी दर ३००० ते ३२०० रुपयांपर्यंत खाली आला. त्याचा फटका गूळ उत्पादकांना बसला. प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपये दर कमी झाल्याने गुळाचे उत्पादन थंडावले. चांगल्या गुळाला दर असल्याने व्यापाऱ्यांनी तो स्टॉक करून ठेवला. गुळाला दर कमी मिळाल्याने यंदा शेती उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक कमी झाली आहे.

गेल्यावर्षी २०१७-२०१८ मध्ये ३० किलोच्या रव्यांची २२ लाख ५७१५ एवढी आवक झाली होती. यंदा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात २० लाख ५० रव्यांची आवक झाली आहे. गूळ हंगाम १० ते १५ दिवस सुरू राहणार असून अंदाजे ५० हजार रव्यांची आवक होईल. त्यामुळे एक लाख ते दीड लाख रव्यांची आवक घटणार आहे. गुळाचे उत्पादन जास्त व्हावे यासाठी गुळाला आधारभूत किंमत जाहीर करावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे, पण त्यावर निर्णय झालेला नाही. साखरेप्रमाणे गुळाला हमीभाव मिळाला तर गूळ उत्पादनात वाढ होईल. त्याचबरोबर गुळाला चांगला दर मिळावा यासाठी बाजार समिती, व्यापारी यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.

०००००

गुळाची आवक आणि सरासरी दर

वर्ष आवक रवे किमान कमाल सरासरी

२०१२-२०१३ २८,२४,८३० २४०० ६००० ३२००

२०१३-२०१४ २५,५०,८७५ २४०० ५५०० ३०००

२०१४-२०१५ २१,८४,८०५ २४०० ५५०० २९००

२०१५-२०१६ २२,३२,७२० २३०० ४९०० ३०००

२०१६-२०१७ १९,५९,४४३ २८०० ५८०० ३९००

२०१७-२०१८ २२,०५,७१५ २९०० ६००१ ३३००

२०१८-२०१९ २०,५२,१०१ २८०० ६००० ३२००

०००००

कोट...

गुळाची आवक शेवटच्या टप्प्यात वाढण्याची शक्यता आहे. गुळाला हमीभाव मिळावा यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेतली आहे. हमीभाव मिळाला तर गुळाच्या उत्पादनात वाढ होईल. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.

बाबासाहेब लाड, अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दक्षिण’मध्ये सर्वाधिक क्रिटीकल केंद्रे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ७१ मतदान केंद्रे क्रिटीकल (संवेदनशील) असल्याचा शोध जिल्हा निवडणूक प्रशासनाने लावला आहे. यापूर्वीच्या निवडणुकांत झालेले मतदान, घडलेला अनुचित प्रकार, संशयित मतदारांच्या अशा निकषावरून ही केंद्र शोधून काढण्यात आली आहेत. यातील सर्वाधिक केंद्रे याआधी हायहोल्टेज लढत झालेल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आहे. या केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिस प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. निवडणूककाळात उपद्रवी ठरण्याची शक्यता असलेल्या गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे नियोजन पोलिस विभागाने केले आहे.

मागील निवडणुकांत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, एकूण झालेल्या मतदानापैकी एकाच उमेदवारास ७० ते ९० टक्यांपर्यंत झालेले मतदान, स्थलांतर मतदारांची संख्या अधिक असलेली केंद्रे क्रिटीकल म्हणून गृहीत धरली आहेत. निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच संवेदनशील केंद्राचे नाव बदलून 'क्रिटीकल' केले. या केंद्रांवर निकालापर्यंत प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे. यासाठी विशेष पथके सक्रिय झाली आहेत. क्रिटीकलपैकी ६० केंद्राच्या परिसरात स्थलांरित आणि संशयित मतदारांची संख्या जास्त आहेत. तेथे काही मतदारांची कुटुंबे स्थायिक नाहीत. ते परप्रांत, जिल्ह्यातून आले आहेत.

कोदे खुर्द, राजापूर, शेणेवाडी, वाघोबाचीवाडी केंद्रात गेल्या निवडणुकीत एकाच उमेदवारास ७० ते ९० टक्यांपर्यंत मतदान झाले. राजेंद्रनगरातील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यामंदिर, सदरबाजार तसेच इचलकरंजीतील आदर्श विद्यामंदीर, आतंरभारती आणि महात्मा फुले जोतिबा विद्यालय केंद्र परिसरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. टोकाची राजकीय इर्षा, चुरशीने लढत झालेल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील केंद्रे मोठ्या संख्येने क्रिटीकल आहेत. तुल्यबळ उमेदवार, साम, दाम, दंड, भेदाचा वापर, प्रत्येक मत आणि गठ्ठा मतदान मिळवण्यासाठीची मोर्चेबांधणीमुळे ही केंद्रे संवेदनशील ठरवण्यात आली आहेत. म्हणून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघापैकी केवळ दक्षिण, इचलकरंजी या दोनच मतदारसंघातील केंद्रातील उपद्रव त्रासदायक असेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

..........

शहर आणि परिसरातील क्रिटीकल मतदान केंद्रे

अण्णसाहेब शिंदे विद्यालय, प्रबुध्द भारत हायस्कूल (लक्षतीर्थ वसाहत), विवेकानंद कॉलेज (नागाळा पार्क), महावीर इंग्लिश मिडियम स्कूल (सुर्वेनगर), इस्टर्न पॅटर्न इमारत, महानगरपालिका शाळा (ताराबाई पार्क), विद्यामंदिर शांतीनगर (पाचगाव), वीर सावरकर हॉल (राजलक्ष्मीनगर), विद्यामंदिर (टोप), शाहू मराठी शाळा, कुष्ठरोग निवारण केंद्र इमारत (साळोखेनगर), न्यू इंग्लिश मिडियम स्कूल (संभाजीनगर), अंगणवाडी (उजळाईवाडी), बोंद्रनगर विद्यालय स्कूल (फुलेवाडी बसस्टॉप), राजश्री शाहू हायस्कूल (नाना पाटील नगर), वसंतराव देशमुख हायस्कूल (सानेगुरूजी वसाहत), औद्योगिक प्रशिक्षण संस्था (संभाजीनगर), बापूसाहेब जगदाळे शाळा , शाहू दयानंद हायस्कूल (मंगळवार पेठ), डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यामंदिर (राजेंद्रनगर), कोरगांवकर स्कूल (सदरबाजार).

...

अतिसंवेदनशील केंद्र नाही

बंदूक रोखून विशिष्ट उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडणे, कायदा हातात घेत मतदारावर थेट दबाव आणणे, मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रकार झालेले नाहीत. यामुळे शहर आणि जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही, असा प्रशासनाचा दावा आहे.

-------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसास दमदाटी दोघांविरोधात गुन्हा

0
0

कोल्हापूर :

वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी शुभम विजय सावर्डेकर (रा. आशीष प्लाझा, ताराबाई पार्क) आणि इम्रान मुलाणी यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सिकंदर अब्बास देसाई या वाहतूक पोलिसांनी फिर्याद दिली आहे. ताराराणी चौकात देसाई यांनी सावर्डेकरची दुचाकी अडवून लायसन मागितले. सावर्डेकरने लायसन घरात असल्याचे सांगितले. त्यानंतर देसाई यांनी लायसन नसल्याने दंडाची पावती करावी लागेल असे सांगितले. पण त्याने नकार दिला. त्यानंतर देसाई यांनी दुचाकीची चावी काढून घेतली. त्यावेळी सावर्डेकर आणि मुल्लाणी यांनी देसाई यांच्याशी हुज्जत घालून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघे निघून गेल्यावर देसाई यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्ती पूर्ण तरीही अपुरा पाणीपुरवठा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

व्हॉल्व्ह दुरुस्ती व साठवण टाकीतील गाळ काढण्यासाठी सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. व्हॉल्व्ह दुरुस्ती पूर्ण झाली असली, तरी मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. परिणामी 'ए' व 'ई' वॉर्डातील नागरिकांना ३४ टँकरच्या फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. टाकीतील गाळ काढण्यासाठी पुढील सोमवारी (ता.१८) पुन्हा एकदिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

आपटेनगर येथील साठवण टाकीतील गाळ काढणे व कावळा नाका पाण्याच्या टाकीखालील व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी सोमवारी 'ए' व 'ई' वॉर्डातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. कावळा नाका येथील व्हॉल्व्हची दुरुस्ती सोमवारी मध्यरात्री पूर्ण झाली. मात्र आपटेनगर येथील साठवण टाकीतील संपूर्ण गाळ काढण्यात यश आले नाही. एक जेसीबी व २० कर्मचारी गाळ काढत होते. पण टाकीमध्ये पानवनस्पती व मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने संपूर्ण गाळ काढण्यात यंत्रणेला अपयश आले. तरीही मंगळवारी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पण एक दिवसांचा स्लॅब असल्याने दोन्ही वॉर्डात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.

पाणीपुरवठा कमी झालेल्या भागांना कळंबा व कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून ३४ टँकरच्या फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यामध्ये राजेंद्रनगर, वसंत विश्वास पार्क, मोहिते कॉलनी, मिरजकर तिकटी, देवकर पाणंद, सानेगुरुजी वसाहत, शिवाजी पार्क, लोणार वसाहत, राजारामपुरी, बापट कँप आदी भागांचा समावेश होता. आपटेनगर येथील साठवण टाकातील राहिलेला गाळ काढण्यासाठी सोमवारी (ता. १८) पुन्हा एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील होर्डिंग्ज हटवले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होवून दोन दिवस झाल्यानंतर मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने विविध पक्षांचे होर्डिंग्ज, जाहिरात व वाढदिवस शुभेच्छा फलक हटवले. निवडणूक आयोगाच्या निर्देषानुसार शहरातील सार्वजनिक मंडळाचे वार्ताफलक कागदाचा वापर करुन झाकण्यात आले. यानिमित्ताने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची कारवाईची लगबग सुरू झाल्याचे चित्र शहरभर पहावयास मिळाले.

डिसेंबर २०१९ पासून शहरात सुरू झालेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम गेल्या एक महिन्यापासून थंड झाली आहे. महापालिका अधिनियमानुसार अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याची मुभा महापालिका प्रशासनाला आहे. मात्र प्रशासनाची परवानगी घेऊन होर्डिंग्ज व जाहिरात फलक लावले जाऊ शकतात. यासाठी ठराविक शुल्क आकारले जाते. पण अनेकजण महापालिकेची परवानगी न घेताच फलकांची उभारणी करतात. त्याकडे अतिक्रमण विभागाचे नेहमीच दुर्लक्ष होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता जाहीर झाल्याने कारवाईसाठी पथक सज्ज झाले आहे.

मंगळवारी दिवसभरात अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील प्रमुख रस्ते, चौक व विद्युत खांबाला लावलेले छोटे मोठे, बोर्ड, झेंडे काढून टाकले.

महाराष्ट्र मालमत्ता कायदा १९५५ नुसार अनधिकृत होर्डिंग्ज व जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेवर तीन महिने कैद व दोन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. अनधिकृत जाहिराती रोखण्यासाठी १८००२३३३५६८ व १८००२३३४५९८ या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारही दाखल करता येते. त्यानुसार अनेक नागरिक तक्रारी देतात. पण याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनधिकृत फलकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर होर्डिंग्ज व जाहिरात फलक हटवण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रेशन कार्ड विभक्तीकरण करण्यासाठी येथील करवीर पुरवठा कार्यालयातील एजंट अडीच हजारांची लाच घेताना दोन आठवड्यापूर्वी सापडला. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, कार्यालय प्रमुख आदित्य दाभाडे, पुरवठा निरीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांना बडतर्फ करावे, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र अद्याप या प्रकरणात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. लोकसभा निवडणुकीचे कारण सांगत वरिष्ठ अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. परिणामी कार्यालयात एजंटगिरीचा विळखा कायम आहे.

पुरवठा विभागात एजंट अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून कामकाज करतात. वरिष्ठांशी अर्थपूर्ण लागेबांधे असल्याने त्यांचा खुलेआम कारभार असतो. म्हणून भाकपतर्फे कार्यालयातील प्रमुख दाभाडे, निरीक्षक पाटील यांच्या कामकाजासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनातपुरवठा विभागातील दोघां अधिकाऱ्यांचा उल्लेख असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान अनेक आरोप करण्यात आले. यामध्ये एक रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी एक ते अडीच हजार रुपये घेतले जातात. वर्षभरात जवळपास २५ लाख रुपयांचा ढपला पुरवठा विभागातील एजंट आणि अधिकारी संगनमताने पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपांची चौकशी अद्याप सुरू नाही. जिल्हा पुरवठा प्रशासनाने बेदखल केले आहे. जबाबदार अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने एजंटांचे धाडस वाढले आहे. ते अजूनही दिवसभर कार्यालयात ठाण मांडून असतात. सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांचा रुबाब अधिक असतो. परिणामी नवखे लोक एजंटानाच अधिकारी समजून मागेल तितके पैसे देत आहेत. यासंबंधी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. राणी ताटे यांच्याशी संपर्क झाला नाही.

करवीर पुरवठा कार्यालयात एजंटगिरी कायम आहे. कार्यालयातील अधिकारी, एजंटांनी संगनमताने सामान्यांच्या खिशातील २५ लाखांवर डल्ला मारला. त्याची चौकशी करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पण अजूनही दोषींवर कारवाई झालेली नाही. यामुळे लुटीला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद आहे का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

सतीश कांबळे, सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निशनम दलात दोन फायर फायटर

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात नव्याने दोन फायर फायटर दाखल झाल्या. ५०० लिटरची एक मिनी वॉटर टेंडर व साडेचार हजार लिटर क्षमतेच्य फोम टेंडर गाड्यांची महानगरपालिका प्रशासनाने नव्याने खरेदी केली. सहा दिवसांपूर्वी या दोन्ही फायर फायटर महापालिकेच्या वर्कशॉपमध्ये दाखल झाल्या आहेत. दोन फायर फायटर आणि राज्य सरकारकडून टर्न टेबल लॅडरसाठी निधी दिल्याने अग्निशमन दल सक्षम झाल्याचे मानले जात आहे.

महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे सध्या पाच फायर फायटर, एक फोम टेंडर आणि एक रेस्क्यू गाडी असा सात वाहनांचा ताफा आहे. अपत्ती काळात या ताफ्याच्या माध्यमातून अपत्ती निवारण केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून महापालिकेची हद्दवाढ झालेली नसली, तरी नागरीकरण वाढतच आहे. त्यामुळे आहे, त्याच ताफ्यावर अग्निशमन दलाला विसंबून राहावे लागते. दलाकडे फायर फायटरची संख्या कमी असताना अरुंद रस्ते आणि गल्ली बोळात एकाधी अपत्ती उद्भवल्यास फायर फायटर घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो. तर अनेकवेळा घटनास्थळीच पोहोचू शकत नाही.

अरुंद व छोट्या गल्लीमध्ये फायर फायटर पोहोचण्यासाठी ५०० लिटर पाणी व ५० लिटर फोम अशी क्षमता असलेल्या हाय प्रेशरची मिनी वॉटर टेंडरची खरेदी करण्यात आली आहे. तर साडेचार हजार लिटर पाणी व ५०० लिटर फोम असलेली मोठी फोम टेंडर खरेदी करण्यात आली आहे. या दोन्ही फायर फायटर महापालिकेच्या सुभाष रोड वर्कशॉपमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लवकरच दोन्ही फायर फायटर अपत्ती निवारणासाठी सज्ज होणार आहेत. दोन फायर फायटर नव्याने दाखल झाल्याने महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्षम होणार आहे.

विभागाला मनुष्यबळ देण्याची आवश्यकता

अग्निशमन दल विभागासाठी १८२ मंजूर पदे आहेत. त्यापैकी तब्बल ६० पदे रिक्त असून रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ४० कर्मचारी ठोक मानधनावर कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने अपत्ती निवारणावेळी विभागातील कर्मचाऱ्यांची तारांबळ होते. गणेशोत्वामध्ये अशी स्थिती प्रकर्षाने दिसून येते. वाहनांच्या ताफ्याबरोबर रिक्त पदे भरून विभाग सक्षम करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मनुष्यबळ नसल्यास यंत्रसामुग्री कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्लेषा महाजन यांना पुरस्कार जाहीर

0
0

आश्लेषा महाजन

यांना पुरस्कार जाहीर

सोलापूर :

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा २०१९चा स्वर्गीय श्रीनिवास विष्णू रायते गुरुजी राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार पुणे येथील ज्येष्ठ लेखिका आश्लेषा महाजन यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती मसाप जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी व कार्याध्यक्ष सायली जोशी यांनी दिली.

रोख २१००रुपये, सन्मानपत्र, शाल आणि पुस्तक, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी, २७ मार्च २०१९ रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात सायंकाळी सहा वाजता पुणे मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते व सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार महाजन यांना देण्यात येणार आहे. आश्लेषा महाजन- यांचे बाल साहित्यात मोठे योगदान असून, चार कविता संग्रह, विनोदी लेख, संग्रह कथासंग्रह, ललित लेखनाची पुस्तके, बालकुमारांसाठी लेख, बालकुमारांसाठी कवितासंग्रह, अनुवादित पुस्तके आणि तीन अंकी नाटकाची पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी अनेक वर्तमानपत्रातून आणि मासिकातून सातत्याने बाल साहित्याविषयी लेखन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरीच्या उच्चाटनाचे आव्हान

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet:@bhimgondaMT

कोल्हापूर : महसूल विभागात फोफावलेली लाचखोरी, चिरीमिरीची व्यवस्था रोखणे, जमीन संपादनाअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे, डिजिटल सहीनिशी सात-बारा आणि आठ अ उतारा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान नूतन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर आहे. सद्यस्थितीत प्रशासन गतिमान करण्यासह लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा, सुव्यस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यासमोर आहे. त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असल्याने त्यात महसूल प्रशासन व्यस्त असेल. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये याकडे त्यांना लक्ष द्यावे लागेल.

खाबुगिरी तळागाळापर्यंत

लाच स्वीकारण्याबाबत झालेल्या तक्रारीनंतर कारवाईत रंगेहात पकडलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांत महसूल विभागातील तलाठी, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी गेल्या वर्षभरात आघाडीवर राहिले. लाचलुचपत विभागाच्या पथकाने महसूल प्रशासनात तळागाळापर्यंत पसरलेली खाबुगिरी कारवायांतून दाखवून दिली. शेतकऱ्यांना सात-बारा, आठ अ उतारे काढतानाही पैसे मोजावे लागतात. 'महसूल'मधील काही अधिकारी, कर्मचारी इतर कामांसाठी मनमानी पद्धतीने पैशांची मागणी करतात, अशा सार्वत्रिक तक्रारी आहेत. मराठा जातीसह इतर प्रकारचे दाखले काढताना लूट सुरूच आहे. तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांच्या कामकाजावरून महसूल विभागाची पर्यायाने जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीची प्रतिमा सामान्यांमध्ये निर्माण होत असते. याचा गांभीर्याने विचार करून महसूल प्रशासनात बदल करण्याची गरज ठळक झाली आहे. पैसे न देताही काम होते, हे दाखवून देण्यासाठी प्रचलित लाचखोरीच्या रॅकेटचे उच्चाटन करण्याचे आव्हान आहे.

गतिमान प्रशासन

'सरकारी काम, सहा महिने थांब' असे सध्याचे चित्र महसूल विभागातही आहे. सामान्यांची तातडीने काम झाली असा सुखद अनुभव अभावानेच येतो. झिरो पेंन्डसीची मोहीम तत्कालीक ठरली. ती निरंतर चालणारी प्रक्रिया असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे लालफितीत आहेत. रिक्त जागा, लोकसभा निवडणुकीच्या अतिरिक्त कामांमुळे प्रशासनात शिथिलता आली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना उताऱ्यांसाठी आठ ते पंधरा दिवस हेलपाटे मारायला लागते. एनए, ब वर्ग शेतजमिनींची खरेदी-विक्री, वारसा नोंद करणे, हक्कसोडपत्र, डायरी घालणे, बोजा नोंद करणे अशा कामांत दिरंगाई होत आहे. यामुळे 'महसूल'च्या कामकाजाबद्दल नाराजी आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रशासन गतिमान करावे लागणार आहे.

डिजिटल सात-बारा

सात-बारा, आठ अ दाखल्यांसाठी तलाठ्यांनी मागेल तितके पैसे देण्याची व्यवस्था कायमची नष्ट होण्यासाठी चार वर्षांपासून महसूल प्रशासन संगणकीय सात-बारा अपलोड करीत आहेत. सरकारच्या वेबसाइटवर करवीर वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील सर्व सात-बारा, आठ अचे दाखले अपलोड झाले आहेत. मात्र, डिजिटल सहीनिशी सात-बारा अपलोडचे काम संथगतीने सुरू आहे. अद्याप संगणकावरील सात-बारा, आठ अच्या प्रिंन्टवर सहीसाठी तलाठ्याकडे जावे लागते. सहीला मागेल तितके पैसे शेतकऱ्यांना मोजावे लागतात. यामुळे डिजिटल उतारे त्वरित मिळवून देण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांना करून घ्यावे लागणार आहे. सर्व्हरचा वेग वाढवणे, स्पेस मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.

पंचगंगा नदी प्रदूषण

उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. पंचगंगा नदीचे प्रवाहीत पाणी कमी झाले आहे. त्यामुळे प्रदुषणाचा प्रश्न तीव्र झाला आहे. ऐन उन्हाळ्यात दुषित पाण्याचे परिणाम आणखी प्रखरपणे जाणवणार आहे. दरम्यान, प्रदुषणाचा प्रश्न हायकोर्टात आहे. अंतरिम सुनावणीत हायकोर्टाने प्रदूषण रोखण्यासाठी तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यांना कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी नगरपालिका प्रशासनास सूचना देऊन प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना मार्गी लावाव्या लागतील. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यास प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना भाग पाडावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images