Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘हक्काच्या मागण्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दूध डेअरी कर्मचाऱ्यांना अत्यल्प मोबदल्यात काम करावे लागत आहे. वेतन, आरोग्य सुविधा आणि बोनस या हक्काच्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी रस्त्यांवर उतरण्याची तयारी ठेवावी,' असे आवाहन कॉ. नामदेव गावडे यांनी केले. महाराष्ट राज्य दूध संकलन कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेव माने होते.

बिंदू चौक येथील भाकप कार्यालयात झालेल्या मेळाव्याला करवीर, कागल, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी येथील गोकुळ, वारणा, शाहूसह खासगी व सहकारी दूध संकलन करणाऱ्या डेअरीतील कर्मचारी उपस्थित होते.

कॉ. गावडे म्हणाले, 'दूध कर्मचाऱ्यांचे दोन मालक अस्तित्वात आहेत. दूध डेअऱ्यांवर संपूर्ण सुपरविजन गोकुळ किंवा वारणेसारख्या संस्थांच्या वतीने केले जाते. सहकारी व खासगी दूध संघांकडून प्रतिलिटर एक रुपये २० पैसे दूध डेअरींना मिळतात. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य खर्चातून कर्मचाऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळतो. त्यासाठी यापुढे लढा उभारावा लागेल.'

कामगार कायद्यानुसार किमान वेतन मिळावे, सेवापुस्तक भरून द्यावे, या मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या. डेअरी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. संघटनेचे निमंत्रक हरीश कांबळे यांनी कामगारांच्या अडचणी व समस्य मांडल्या. यावेळी गिरीश फोंडे, बी. एल. बरगे, उत्तम निगडे, सर्जेराव मिठारी, अमोल पांढरे, दिलीप पाटील, आदी उपस्थित होते. आरती रेडेकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेवावृत्ती कमी होतेय

0
0

फोटो आहे..

फोटो ओळी : सोनाली नवांगुळ यांचा अरविंद देशपांडे स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करताना मुंजश्री पित्रे. सोबत अरविंद पित्रे, रवींद्र जोशी.

०००

क्षमता नको

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मर्यादित क्षमता दिसणाऱ्या व्यक्तीकडे मर्यादित दृष्टीने पाहू नका. त्यांच्याकडे सामाजिकदृष्टीने पाहायला हवे. त्यासाठी उन्मादातून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. सामाजिक मदतीसाठी केलेले कायद्याची योग्य अंमलबजावणी केली जात नसल्याने सेवावृत्ती कमी होत आहे,' असे मत लेखिका सोनाली नवांगुळ यांनी व्यक्त केले.

अरुणमंगल सेवा ट्रस्टच्या वतीने अरविंद देशपांडे स्मृती पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. मंगळवार पेठेतील अक्षर दालनमध्ये पुरस्कार सोहळा पार पडला. ट्रस्टच्या मंजुश्री पित्रे, अरविंद पित्रे यांच्या हस्ते नावांगुळ यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, ग्रंथभेट व रोख दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

नावांगुळ म्हणाल्या, 'अपंगानी पुढे जाण्यासाठी भावनिक बौद्धिकता हवी. त्यादृष्टीने प्रत्येकाने विचार करावा. मर्यादित क्षमता असणाऱ्या व्यक्तींना बेगडी आणि वांझ सहानुभूती दाखविण्यापेक्षा कृतीतून समाजमन जपले पाहिजे. अशा व्यक्तींच्या स्वभोवतालची व्यक्ती त्यांचे जीवन घडवत असतात. अशी उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व जीवनात लाभल्याने आतापर्यंतचा प्रवास सुखकर झाला. सद्य:स्थितीत मोकळेपणाने संवाद साधण्याची वानवा असल्याने त्याचा परिणाम समाजावर पडत आहे. देशात विविध जाती, भाषाांचा समावेश असताना ऐतिहासिक गोष्टीच्या माध्यमातून समाजाला चेतवले जात आहे.'

यावेळी डॉ. विजय कुलकर्णी, रवींद्र जोशी, किशोर देशपांडे, करवीर पंचायत समितीचे गटविस्तार अधिकारी विश्वास सुतार, डॉ. ज. ल. नागावकर, पी. डी. देशपांडे, अनंत बोरगावकर, उदय कुलकर्णी आदी उपस्थित होते. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक रॅली प्रतिक्रिया

0
0

महिला आणि मुलींना आत्मविश्वास देणाऱ्या या उपक्रमाने उत्साह वाढवला. सकाळच्या अल्हाददायी वातावरणात सुट्टीचा आनंद द्विगुणीत झाला. महिलांनी रॅलीमध्ये केवळ सहभागी न होता विविध सामाजिक संदेशही दिले. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या ऑल वुमेन पॉवर रॅली या स्तुत्य उपक्रमात दरवर्षी सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

- महिमा मुधाळे, शिक्षिका

गेल्यावर्षी रॅलीमध्ये सहभागी झाल्याने हा अनोखा आनंद माहीत होता. त्यामुळे रॅलीमध्ये येण्यासाठी पूर्वतयारी केली. नोकरी, कुटुंबाची जबाबदारी यातून काहीशा मुक्ततेचा एक वेगळा आनंद रॅलीमधून मिळाला. महिला 'हम भी कुछ कम नही' असा संदेश देण्यात यशस्वी झाल्या. नोकरदारांपासून गृहिणींपर्यंत सर्वच स्तरातील महिला रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

- शीतल उलपे, शिक्षका

वुमेन पॉवर रॅलीमध्ये मी प्रथमच सहभागी झाले होते. पण, येथील महिलांचा उत्साह पाहून अनेक वर्षांपासून सहभागी होत असल्याची अनुभूती आली. दैनंदिन जीवनात महिलांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे त्या नेहमीच गुंतून राहतात. मात्र, बाइक रॅलीच्या माध्यमातून महिलांना थोडातरी विरंगुळा मिळाला.

- स्वरुपा पाटील, गृहिणी

वुमेन बाइक रॅलीतून वर्षभराची मरगळ दूर झाली. प्रत्येक वर्षी रॅलीमध्ये सहभागी होताना, प्रत्येक रॅलीत नवा अनुभव येतो. नव्या मैत्रिणी जोडल्या जातात. हा खूप चांगला उपक्रम असल्याने स्वत:च्या वाढदिवसाप्रमाणे आम्ही बाइक रॅलीची वाट आतुरतेने पाहत असतो. 'मटा'ने अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत, जेणेकरुन महिलांना कलागुण सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळेल.

- तन्वी पाटील, राजारामपुरी

रॅलीच्या माध्यमातून स्त्री शक्तीची प्रचिती आली. महिला आणि मुलींना एक चांगले व्यासपीठ मिळाले. रॅलीमध्ये देण्यात येणाऱ्या 'भारत माता की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा एक वेगळाच उत्साह निर्माण करतात. रॅलीतील महिलांनी विविध सामाजिक संदेश देणारे फलक घेऊन सहभागी होत सामाजिक जबाबदारीचे दर्शनही घडविले.

- नयना पाटील, आहार तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिमाखदार कार्यक्रमात रॅलीचे उद्घाटन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सामाजिक संदेश देणारे फलक, उदंड उत्साह, बाइकने दिलेला आत्मविश्वास, मराठमोळ्या पेहेरावाच्या जोडीने महिला, तरुणींनी आणलेला पाश्चिमात्य पेहेरावाचा बाज असा उत्साही माहौल 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने महिला दिनानिमित्त आयोजित ऑल वुमेन पॉवर रॅलीच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी राहिला. पद्माराजे हायस्कूलच्या आवारातील दिमाखदार कार्यक्रमात रॅलीचे उद्घाटन झाले.

महापौर सरिता मोरे, उद्योजिका छाया जाधव, डॉ. अर्चना पवार, जिल्हा बँकेच्या सदस्या उदयानी साळुंखे, माजी महापौर सई खराडे, मधुरीमाराजे छत्रपती, माजी नगरसेविका माणिक पाटील, माधुरी नकाते, रुपाली पाटील यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून आणि हवेत फुगे सोडून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. या रॅलीला चाटे शिक्षण समूह प्रायोजक होते.

मराठमोळ्या नऊवारी साडीसह फेटे परिधान केलेल्या महिला ते पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेस अनुसरुन आलेल्या आर्मीच्या पोषाखातील महिला, युवती असे वैविध्य पद्माराजे हायस्कूलच्या मैदानात होते. आधुनिक पेहेराव करून 'पर्यावरण वाचवा,' 'मराठी भाषा संवर्धन' आणि 'एक मिशन जुनी पेन्शन' असे विविध विषयांवरील फलक घेऊन महिलांनी सकाळी सात वाजल्यापासून मैदानावर हजेरी लावली. आई-मुलगी, सासू-सून, नणंद-भावजय अशा नात्यांच्या गुंफणीसह मैत्रिणींचे जथ्थेच्या जथ्थे रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल होत होते. नोकरी, उद्योग आणि घरकामाच्या निमित्ताने नेहमी सवारी करत असलेली बाइक अनेकांनी सजवून आणली होती. बाइकसोबत सेल्फी घेत असताना जुन्या मैत्रिणींसोबत मैदानावरच फोटोसेशन सुरू होते.

रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी भालकर कला अकादमी, वेकअप् डान्स अॅकॅडमी, झेस्ट डान्स अॅकॅडमीने सादर केलेल्या नृत्याच्या कार्यक्रमाने महिलांच्या उत्साहाला उधाण आले. महापौर मोरे यांनी रॅलीला शुभेच्छा दिल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग दाखवून हवेत फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जयघोषात बाइक रॅलीला सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेटर ते पोलिस उपनिरीक्षक

0
0

मिलिंद पांगिरेकर, गारगोटी

घरची केवळ अर्धा एकर शेतजमीन, आई-वडील शेतकरी, तोकडी शेती आणि दूध व्यवसायावर कुटुंबाची गुजराण. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुढचे शिक्षण घेणे अशक्य. त्यामुळे आठवीनंतर शाळा सोडली आणि सरळ हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. पण आयुष्यात काही तरी करून दाखवायचे, ही जिद्द मनात बाळगून पुन्हा शाळेचा रस्ता धरला. कठोर परिश्रमाच्या जोरावर पाल (ता. भुदरगड) येथील संदीप नामदेव गुरव याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षपदाच्या परीक्षेत राज्यात सहावा, तर इतर मागासवर्ग प्रवर्गात पहिला क्रमांक पटकावला

आई-वडील शेतकरी आणि तेही अशिक्षित. घरात कोणत्याही प्रकारे शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. घरची अवघी अर्धा एकर जमीन, दूध व्यवसायावर कुटुंबाची गुजराण मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांनी घेतलेले कष्ट वाखाणण्यासारखे आहे. संदीपचे आई, वडील आपल्या शेतीत कष्ट करून आणि म्हशी पाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बऱ्याचदा जनावरांना चरण्यासाठी जंगलात नेण्याची जबाबदारी संदीप पार पाडत असे. मुलांच्या शिक्षणासाठी पडेल काम करून शक्य ते सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे. मुलाने स्पर्धा परीक्षेत मिळविलेल्या यशामुळे आई-वडिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे. संदीपचा लहान भाऊ सचिन महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तोसुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे.

संदीपचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर पाल, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल,पालमध्ये तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण गारगोटी येथील कर्मवीर हिरे कॉलेजमध्ये झाले. प्राथमिक शाळेतून बाहेर पडल्यावर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत प्रवेश घेतल्यावर घरच्या परिस्थितीमुळे आणि शिक्षणाचे महत्त्व न समजल्यामुळे संदीपने शाळा सोडून सांगलीला जाऊन हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. दोन वर्षे हॉटेलमध्ये काम केल्यानंतर आयुष्यात काही करायचे तर शिकावे लागेल हे समजल्यामुळे शाळा शिकण्याची इच्छा झाली आणि पुन्हा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

पदवीनंतर स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय अधिकारी व्हायचे हा निश्चय केला आणि अभ्यासाला सुरुवातही केली. पण मार्गदर्शनासाठी कोल्हापूर, पुण्यासारख्या शहरातील स्पर्धा परीक्षा केंद्रात जाणे परिस्थितीमुळे जाणे शक्य न झाल्याने घरीच राहून परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. गणित विषयासाठी गारगोटीतील यश क्लासेस येथे, तर इंग्रजीसाठी ध्येयसाधना क्लासेस येथे मार्गदर्शन घेतले. शारीरिक तंदुरुस्तीसाठी श्री शाहू प्रबोधिनी, कोनवडे (ता. भुदरगड) येथे मार्गदर्शन घेतले. फक्त अवघड विषयासाठी क्लासेसकडे धाव घेतली. अन्य विषयांची घरीच तयारी केली. अभ्यासासाठी भरपूर वेळ दिल्यानेच यश मिळणे शक्य झाले. २०१३ पासून राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली. सलग दोन प्रयत्नांत अपयश येऊनही जिद्दीने पुन्हा प्रयत्न सुरूच ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. पुढे अभ्यास सुरूच ठेवणार असून, आयपीएस अधिकारी बनण्याची मनोदय संदीपने व्यक्त केला.


परिस्थितीशी झटत, झगडत ध्येय डोळ्यासमोर ठेवून जिद्दीने प्रयत्न केले. आई-वडिलांनी विश्वास टाकून प्रोत्साहन दिल्यामुळे मला यश गाठणे शक्य झाले. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाबरोबरच परीक्षेच्या दृष्टीने सराव केला. यानंतर माझे टार्गेट आयपीएस अधिकारी होण्याचे आहे.
- संदीप गुरव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकरांची भूमिका भाजपला पूरक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी मते खाणारी आघाडी आहे. भाजप शिवसेना युती निवडून आणण्यासाठी ती पूरक ठरणार आहे,' अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी सक्षम नाहीत. त्यांनी पुन्हा सत्तेत येणाऱ्या मोदी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळावी,' असा सल्लाही दिला. जागावाटपासंबंधी काहीही निर्णय झाला तरी भाजप आघाडीपासून फारकत घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आरपीआयला जागा न दिल्याबद्दलचा गंभीर विचार करावा. मी निर्णय घेतला तर त्याचे परिणाम फार नकारात्मक होतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे. काँग्रेसबरोबरची आघाडी सोडल्यानंतर त्यांची सत्ता गेली. आता तुम्हाला सोडले तर तुमचीही सत्ता राहणार नाही, असा इशाराही आठवले यांनी भाजप-शिवसेनेला दिला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यासाठी आठवले सोमवारी येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 'पाच वर्षांत मोदी सरकारने केलेले काम आणि तरुणाईचा मिळणारा पाठींबा पाहता विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. शरद पवार चाणाक्ष राजकारणी आहेत. निवडणूक लढवून पंतप्रधानपदासाठी नंबर लागेल, असे त्यांना वाटत होते. पण आपले सरकार येणार नाही, मग उगीच कशाला निवडणूक लढवायची, असा विचार करून त्यांनी माघार घेतली असावी. राहुल गांधी यांचीही हवा नाही. काँग्रेसच्या जागा ८० च्या पुढे जाणार नाहीत.'

एक जागा तर हवीच..

युती झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मन मोठे करुन दक्षिण मध्य मुंबईतील जागा सोडायला हवी होती. दलितांची मते मिळवायची असतील तर आरपीआयला डावलले, ही भावना समाजात जाता कामा नये. आमची दोन जागांची मागणी आहे. कोल्हापुरात दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. येथे मदत हवी असेल तर दक्षिण मध्य मुंबईतील जागा द्यावी. दोन नसतील तर एक जागा तर हवीच. दक्षिण मध्य की ईशान्य मुंबई, कुणाची जागा द्यायची, हे त्यांनी ठरवावे, असे आठवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडली चवदार पदार्थांची निर्मितीप्रक्रिया

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लहान असो की मोठा सगळयांनाच चवदार आणि खुसखुशीत पदार्थांची चव चाखायला आवडते. हे सगळे पदार्थ घरच्या घरी कमी खर्चात तयार करण्याची प्रात्यक्षिके शनिवारी उलगडली. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब व उज्ज्वला कुकिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॉन्टिनेंटल फूड मेकिंग वर्कशॅापला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्टेशन रोडवरील उज्ज्वला कुकिंग क्लासेसमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ निर्मितीची कार्यशाळा (फूड मेकिंग वर्कशॉप) झाली. क्लासेसच्या प्रमुख व प्रशिक्षिका उज्ज्वला भोसले यांनी कार्यशाळेत सँन्डविच, पिझ्झा पास्ता, बाँम्बे सँडविच, मायॉनीज विथ कॉर्न सँडविच, मसाला टोस्ट सँडविच, बर्गर, चीज गार्लिक टोस्ट, व्हाइट पास्ता, रेड पास्ता असे विविध खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रात्यक्षिक दाखविले. खाद्यपदार्थ तयार करताना घ्यावयाची काळजी, पिझ्झा व सँडविच निर्मितीच्या टीप्सही दिल्या. घरच्या घरी चवदार व पौष्टिक पदार्थ कसे बनविता येतात याविषयी मार्गदर्शन केले. तीन तास झालेल्या कार्यशाळेत सहभागी उपस्थित महिलांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या निर्मितीविषयीची प्रक्रिया समजावून घेतली.

चवदार आणि खुसखुशीत पदार्थ साऱ्यांनाच आवडतात. मात्र अनेकदा खाद्यपदार्थांच्या निर्मितीची प्रकिया माहित नसल्यामुळे हवे ते पदार्थ तयार करण्याचे आणि त्याचा आस्वाद असा बेत बाजूला पडतो. गृहिणींची नेमकी हीच गरज ओळखून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रात्यक्षिके आणि टीप्स मिळाल्याने कार्यशाळा पसंतीस उतरली अशा प्रतिक्रिया सहभागी महिलांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाने पाच मार्चपासून पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला. विविध प्रश्नासंदर्भात कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचारी कामावर पूर्ववत हजर झाले. महासंघाचे पदाधिकारी आणि शिक्षणमंत्री तावडे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सात डिसेंबर २०१८ व सोळा फेब्रुवारी २०१९ रोजीच्या सरकारी निर्णयाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून नियमित करण्याचे आदेश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या सुधारित आश्वासित योजनेचा लाभ मिळाला आहे, तो तसाच चालू ठेवण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालक व सहसंचालकांना देण्यात येतील, शिवाय संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर आकसाने कारवाई करणार नाही आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पक्ष चिन्हांच्या जाहीरातींवर येणार टाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या जाहिरातींवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात जागोजागी भाजपकडून रंगवलेल्या 'कमळ' चिन्हाच्या प्रतिकृतीवर टाच येणार आहे.

जिल्हा प्रशासनाने राजकीय नेते, पक्षाचे फ्लेक्स ४८ तासात काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. शहरात फुटबॉल स्पर्धा, महिला मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी मोठी जाहिरातीबाजी केली असून स्वागत कमानी, जाहिराती लावल्या होत्या. या जाहिरातींचे फलक काढण्याचे काम सुरु झाले आहे. आचारसंहिता लागल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने नऊ हजार फलकांवर कारवाई केली . त्यामध्ये स्वागत कमानी, फलक, झेंडे यांचा समावेश आहे.

भाजपने गतवर्षी शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी व सहकारी कार्यालयांवर पक्षाचे 'कमळ' चिन्ह रेखाटलेले आहे. भाजपच्या या प्रचाराविरोधात महानगरपालिकेच्या सभागृहात पडसाद उमटले होते. काँग्रेस पक्षाने या चिन्हाच्या ठिकाणी विरोधातील टीका करणारा मजकूर लिहून निषेध केला होता. पण आता जागोजागी काढलेल्या चिन्हांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे. मतदान केंद्राजवळही काही ठिकाणी 'कमळ' चिन्ह रेखाटलेले आहे. ज्या ठिकाणी चिन्हे रेखाटली आहेत ती पांढऱ्या अथवा काळ्या रंगाने खोडून काढली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी दिवसाआड नव्हे, रोज हवे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेच्या 'ई' वॉर्डामध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वॉर्डातील बहुतांश नगरेसवकांनी सोमवारी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे धाव घेतली. अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी एक दिवसाआड पाणी द्या, अशी मागणी केली. पण आयुक्तांनी एक दिवसाआड नव्हे, तुम्हाला दररोज मुबलक पाणी मिळाले पाहिजे, असे स्पष्ट करत जलअभियंता सुरेश कुलकर्णीं यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

गेल्या सहा महिन्यांपासून 'ई' वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. रास्ता रोको, पाणीपुरवठा विभागीय कार्यालयाला टाळे ठोकणे आदी स्वरुपाची आंदोलने करुनही समस्या निकालात निघालेली नाही. त्यामुळे नियमित व मुबलक पाण्यासाठी अनेकवेळा प्रभागातील नागरिक नगरसेवकांच्या दारी जातात. नगरसेवकही सभागृहात प्रशासनाचे वाभाडे काढत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करतात. पण तरीही समस्या अद्याप सुटलेली नाही. उन्हाची तीव्रता वाढत असताना अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे.

नागरिकांच्या संतापाची दखल घेत नगरसेवक सत्यजीत कदम, उमा इंगळे, कविता माने, सीमा कदम, स्मिता माने, राजसिंह शेळके, कमलाकर भोपळे, राजाराम गायकवाड यांनी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची भेट घेतली. सर्वच नगरसेवकांनी तीन वर्षापूर्वी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर मुबलक पाणी मिळत होते, त्यामुळे ही पद्धत पुन्हा सुरू करुन समस्या निकालात काढा, अशी मागणी केली. मात्र आयुक्तांनी एक दिवसाआड नव्हे तर'ई' वॉर्डाला दररोज पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी नियोजन करण्याची ग्वाही देत जलअभियंता कुलकर्णी यांना उपाययोजना करण्याची सूचना केली. आवश्यकता असल्यास विद्युतपंप खरेदी करण्याचीही सूचना केली. केवळ 'ई' वॉर्डला नव्हे, तर संपूर्ण शहराला नियमित व मुबलक पाणीपुरवठा होईल अशा प्रकारचे नियोजन करुन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जलअभियंत्यांना दिल्या. आयुक्तांनी तातडीने केलेल्या सूचनेनंतर नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ९ हजार विनापरवाना फलक हटवले

0
0

कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शहर आणि जिल्ह्यातील ९ हजार विनापरवाना फलक हटवण्यात आले, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. दोन स्वतंत्र पथकातर्फे कार्यवाही केली जात आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बसस्थानक परिसरातील सार्वजनिक, खासगी मालमत्तेवरील फलक काढण्यात आले. राजकीय पक्षाचे चिन्हावर दिसणार नाही, अशी व्यवस्था केली. पक्षाचे झेंडे काढण्यात आले. कोल्हापूर शहरातील ६२ डिजिटल फलक, २६५ बॅनर, ३ कमानी बसस्थानक परिसरातील १० फलक काढले. महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यात एकूण ९ हजार फलक हटवले.

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारसांना नोकरी द्या’

0
0

कोल्हापूर : मातंग समाजाला आरक्षण देण्यासाठी जलसमाधी घेतलेल्या बीड जिल्ह्यातील संजय ताकतोडेंच्या वारसांना सरकारी नोकरी द्या, यांसह अन्य मागण्यांचे निवेदन क्रांतीगुरू लहुजी साळवे प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा प्रशासनाला दिले. निवेदनात म्हटले आहे की, 'मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी ताकतोडे यांनी आंदोलन केले. पण प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी जलसमाधी घेतली. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्धवस्थ झाले. त्यांच्या कुटुंबाला ५० लाखाची आर्थिक मदत देवून त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी द्या. मातंग समाजाला अ,ब, क, ड प्रमाणे आरक्षण मिळावे.' निवेदनावर अमोल कुरणे, अक्षय साळवी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

यळगूड येथील आधार सामाजिक संस्थाच्या www.kalapuri.com या संकेतस्थळाचे व अद्ययावत ज्वेलरी बनविण्याच्या साहित्य सामुग्रीचे वितरण खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. एका हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमास जिल्हापरिषदेचे सीईओ अमन मित्तल होते.

'आधार' गेल्या काही वर्षापासून उदयोन्मुख कारागीर तसेच छोट्या उद्योजकांसाठी महाराष्ट्र व कर्नाटक भागात कार्यन्वित आहे. नवनवीन डिझाईन्स, नवीन उत्पादने तयार करण्यासाठी प्रयत्न करते. नवीन उत्पादन तयार करण्यासाठी लागणारी सामग्रीचे त्यासाठी वितरण करण्यात आले. पाच वर्षांपासून कलापुरी उद्योग समुहाच्या माध्यमातून हातकारागिरांनी बनवलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातात. उद्घाटन समारंभास हस्तशिल्प सेवा केंद्राचे चंद्रशेखर सिंग, जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे, आर. डी. शिंदे, कारागीर पंचायत अध्यक्ष बसंतकुमार सिंग, संस्थेचे संस्थापक आतिश चव्हाण, अध्यक्षा अपर्णा चव्हाण, संचालक अमरसिंह बागल आदी उपस्थित होते. प्रांजली पुणेकर यांनी सूत्रसंचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समिती सभापती देशमुख यांचा सत्कार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी निवडीबद्दल शारंगधर देशमुख यांचा कोल्हापूर टिंबर व्यापारी व लघू औद्योगिक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तुळजाभवानी देवीची चांदीची मूर्ती व शाल आणि श्रीफळ असे सत्काराचे स्वरुप होते.

यावेळी जिल्हा टिंबर व्यापारी व लघू औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, करसनभाई लिंबाणी, हरीभाई वाघडिया यांनी सत्कार केला. कार्यक्रमास संघाचे सहसचिव लक्ष्मणभाई लिंबाणी, मोहनभाई वेलाणी, जयंतीलाल रंगाणी, हरीभाई पोकार, प्रभाकर लोळगे, कांतीभाई रंगाणी, कमलेश पटेल, राजेश वाघडिया, तुलसीभाई भाद्राणी, शिवदास लिंबाणी, शंकरभाई लिंबाणी, जयंतीलाल रंगाणी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा राजीनामा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी संघटनेचा त्याग करून सामूहीक राजीनामे दिले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. बजरंग दलाचे माजी जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे व माजी शहरप्रमुख महेश उरसाल प्रमुख उपस्थित होते. यावेळी संभाजी साळुंखे यांना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरण्यात आला.

मेळाव्यात प्रास्ताविक करताना विहिपचे शहर सहमंत्री राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, 'साळुंखे यांनी हिंदुत्वासाठी कार्य केले आहे. त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा ते विचार करतात. आताही त्यांनी संघटनेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.'

यावेळी सूर्यवंशी यांच्यासह प्रशांत कागले, सचिन मांगोरे, प्रवीण मांडवकर, कृष्णा मेरवाडे, विनायक आवळे, सचिन दोशी, रिंकु सोनार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कळंबा, पुलाची शिरोली, सांगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी बजरंग दलाचा राजीनामा दिला. मेळाव्यात हिंदवी स्पोर्ट्स क्लब, हुपरीचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते निळकंठ माने, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, दीपक सपाटे, निखिल माळकर यांनी साळुंखेंच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी हिंदवी स्पोर्ट्सचे धनंजय सावंत, साळोखे फाउंडेशनचे अतुल साळोखे, पेठवडगावचे किरण कोळी, किरण पुरोहित, पतित पावनचे विशाल पाटील, उभा मारुती चौक अध्यक्ष विशाल बोंगाळे, अमित जाधव, लक्षतीर्थ वसाहत येथील विकी साळोखे, कर्तव्य मित्र मंडळाचे आशिषसिंह राजपूत, ओम तरुण मंडळाचे प्रवीण पोवार, संजय पाटील (माळी), डी मेंबरचे ओंकार खोंद्रे, अनमोल कालेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निम्म्या शहराला टँकरचा आधार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आपटेनगर पाणी साठवण टाकातील गाळ काढणे आणि कावळा नाका टाकी येथील व्हॉल्व्हची दुरुस्ती या दोन्ही कामांना सोमवारी सुरुवात झाली. व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी शिंगणापूर पंपिंग हाऊस येथून होणारा पाणीउपसा बंद करण्यात आला. त्यामुळे ए. आणि ई. वॉर्डातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागले. प्रभागात पाण्याचा टँकर आल्यानंतर नागरिकांची टँकरभोवती झुंबड उडत होती.

कावळा नाका टाकी येथील व्हॉल्व्हमधून गेल्या कित्येक दिवसांपासून नादुरुस्त झाला आहे. तेथून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. तर आपटेनगर येथील पाणी साठवण टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. दोन्ही कामे करण्यासाठी एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार सोमवारी दोन्ही कामांना सुरुवात झाली. दुरुस्तीमुळे पाणी उपसा बंद ठेवण्यात आल्याने सकाळी व सायंकाळच्या सत्रात पाणी येणाऱ्या भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. नागरिकांच्या मागणीनुसार कळंबा फिल्टर हाऊस आणि कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून पाणीपुरवठा केला जात होता.

उन्हाची तीव्रता वाढल्याने टँकरच्या मागणीमध्ये वाढ झाली. आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून टँकरभोवती नागरिकांची गर्दी होत आहे. सोमवारी दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असले, तरी मंगळवारीही ए आणि ई वॉर्डाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटबॉल संघांत धुमसतोय असंतोष

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनवतीने आयोजित केली जाणारी 'ब' गट फुटबॉल स्पर्धा वादामुळे बंद पडली आहे. त्यामुळे खेळाडुंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केएसएकडून याबाबत कोणताच निर्णय होत असल्याने काही संघांकडून टोकाची भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. कोर्टाची पायरी चढण्याची भाषा खेळाडूही बोलू लागल्याने फुटबॉल हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामात साखळी स्पर्धेनंतर १६ संघांतील गुणानुक्रमे शेवटी असलेले दोन संघ ज्युनिअर होतात. तर केएसए ब गट साखळी स्पर्धेतील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या दोन संघांना वरिष्ठ गटात सिनिअर संघ म्हणून खेळण्याची संधी मिळते. ब गटातील २१ संघांची अ, ब, क आणि ड अशा चार गटात विभागणी केली आहे. प्रत्येक गटातून एक संघ अव्वल साखळीसाठी पात्र होतो. अव्वल गटातून चारपैकी दोन संघ वरिष्ठ संघ म्हणून पात्र ठरतात.

ब गटामधील 'अ' गटात रंकाळा तालीम मंडळ, तडाखा स्पोर्टस, उचगाव स्पोर्ट्स, सम्राटनगर स्पोर्ट्स हे चार संघ आहेत. या गटातून एक संघ अव्वल साखळीसाठी पात्र होणार आहे. रंकाळा तालीम मंडळाने तडाखा स्पोर्टसवर तब्बल २७ गोलनी विजय मिळवला आहे. हा सामना 'फिक्स' असल्याची चर्चा आहे. रंकाळा तालीमच्या विजयामुळे सम्राटनगर स्पोर्ट्स संघाने उचगाव संघावर मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची गरज होती. पण, उचगाव संघ मैदानावर उपस्थित न राहिल्याने मुख्य पंचांनी सम्राटनगर स्पोर्ट्सला तीन गुण बहाल केले. यामुळे सम्राटनगर संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवता आला नसल्याने त्यांनी आक्षेप घेत मुख्य पंचाला मारहाण केली. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. नंतर तडजोडीने मिटविण्यात आले.

पंचांना झालेल्या मारहाणीनंतर केएसएने स्पर्धा थांबवली आहे. पंचांच्या संघटनेने रमणमळा येथील पोलो मैदानावर होणारी 'ब' गट स्पर्धा शाहू स्टेडियमवरच खेळवावी अशी शिफारस केली आहे. शिवाय पोलिस बंदोबस्त आणि स्पर्धेसाठी निरीक्षकांची मागणी केली आहे. पण, केएसएने स्पर्धा सुरू करण्याहबाबत कोणताच निर्णय न घेतल्याने ब गटातून निवड होणाऱ्या दोन संघांची वरिष्ठ गटातील स्पर्धा खेळण्याची संधी हुकली आहे.

ब गटातील स्पर्धा सुरळीत झाली असती तर दोन संघांना अस्मिता चषक, राजेश चषक, अटल चषक आणि चंद्रकांत चषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली असती. त्यामुळे ब गटातील संघात असंतोष आहे. ब गट साखळी स्पर्धा पुन्हा सुरू करावी म्हणून केएसएला निवेदन दिले आहे. पण, केएसएच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संघांना फटका बसत आहे.

कोर्टात जाण्याची तयारी

सिनिअर गटात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता धूसर होऊ लागल्याने काही संघांनी कोर्टात दाद मागण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. काही संघांतील खेळाडूंनी वकिलांचा सल्ला घेण्यास सुरुवात केली आहे. कोर्टात एखादा संघ गेला तर फुटबॉल हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परिवर्तनवादी’ संघटनेचे निवेदन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'दलित व अल्पसंख्याक युवकांना अमानुष मारहाण करणाऱ्या उपाधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करुन त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा' अशी मागणी परिवर्तनवादी बहुजन संघटनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, उपाधीक्षक नवटक्के दलित व अल्पसंख्याक युवकांना मारहाण करत असल्याचे चित्रीकरण सर्वत्र प्रसारीत झाले आहे. मात्र, या घटनेची सरकारने अद्याप दखल घेतलेली नाही. पोलिस दलाकडून आयपीसी कलम ३०७ चा दुरुपयोग होत आहे. दलित, मुस्लिम आंदोलनकांवर या कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन जामिन मिळणार नाही, अशी व्यवस्था करतात. परिणामी अनेक युवकांचे करिअर धोक्यात येत आहे. त्यामुळे या कलमाचा वापर करण्यासाठी पोलिसदलाला मार्गदर्शक सूचना देण्याची आवश्यकता आहे. निवेदनावर अॅड. पंडितराव सडोलीकर, अमोल कुरणे, अक्षय साळवी, प्रभाकर कांबळे, केशव लोखंडे, मारुती जायकल आदी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉइंटर

0
0

पालिका साकारणार मानवनिर्मित जंगल... २

उमरोळीचे पूरसंकट टळणार

पनवेल : पावसाळ्यात अनेकदा पुराच्या पाण्यामुळे गाढी नदीवर असलेल्या जुन्या पुलावरची वाहतूक बंद होऊन पनवेल तालुक्यातील उमरोळी गावाचा संपर्क तुटतो. मात्र यंदाच्या पावसाळ्यात हा पूल पूर्ण होण्याची शक्यता आहे. रविवारपासून उमरोळी गावात नवा उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

वृत्त... ४

मतदारांसाठी २४ तास

ठाणे : मतदारयादीतील नाव शोधणे, मतदानकेंद्राचा शोध घेणे, मतदानासाठी आवश्यक माहिती मिळवणे आणि कोणत्याही प्रकारच्या निवडणूक विषयक माहितीसाठी जिल्हा संपर्क केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारपासून २४ तास ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या सेवेचा शुभारंभ झाला असून १९५० या हेल्पलाइनद्वारे या केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. याशिवाय सी-व्हिजिल आणि पीडब्ल्यूडी अॅपचा वापर करून मतदारांना नावे शोधण्यापासून आचारसंहिताभंगाच्या तक्रारी करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे तक्रार केल्यानंतर १०० मिनिटांमध्ये दखल घेऊन त्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

वृत्त... ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशमुख यांची नियुक्ती

0
0

कोल्हापूर: नगररचना कोल्हापूर शाखेच्या नगररचनाकारपदी एस. व्ही. देशमुख यांची नियुक्ती झाली. येथील व्ही. एल. कोटी यांच्यांकडे नगररचनापदाचा प्रभारी कार्यभार होता. तर याच विभागातील उपसंचालक प्रादेशिक योजनेचे एम. डी. किणीकर यांची इचलकरंजी येथील विशेष घटक योजनेच्या सहायक संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच प्राप्त झाले. नगररचना विभागाच्या नगररचनाकारपदाचा कोटी यांच्याकडे प्रभारी पदभार होता. या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्धा येथील नगररचनाकार देशमुख यांची या पदावर वर्णी लावण्यात आली. याच विभागातील किणीकर यांची बदली झाली असली, त्यांच्याठिकाणी अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्याने हे पद रिक्त राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images