Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तूरडाळ महागली, गहू स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रब्बी हंगामातील नवीन कृषी उत्पादनांचे बाजारात आगमन होऊ लागले आहे. मात्र नवीन तूरडाळीची आवक झाल्यानंतर दर उतरण्याऐवजी वाढले आहेत. तुरडाळीच्या दरात प्रतिकिलो दोन ते चार रुपयांची वाढ झाली आहे. गव्हाची आवक होऊ लागल्याने त्याच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांची घसरण झाली आहे. तर ज्वारीचे दर स्थिर आहेत.

मराठवाड्यात दुष्काळाची छाया असल्याने तुरीचे उत्पादन कमी झाले आहे. नवीन तूरडाळीचे आगमन झाले असले तरी चांगल्या प्रतिच्या तुरडाळीत प्रतिकिलो दोन ते चार रुपये वाढ झाली आहे. प्रेसिडेंट कंपनीच्या तूरडाळीचा दर ८८ ते ९० रुपये झाला आहे. गव्हाच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांनी घसरण झाली आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणातून नवीन गहू बाजारात दाखल झाल्याने दर उतरले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सरकी खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो दोन ते चार रुपयांनी घट झाली आहे.

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३६

शेंगदाणा : ८० ते ९५

मैदा : ३२

आटा : ३४ ते ३६

रवा : ३२

गूळ : ४० ते ४५

साबुदाणा : ६०

वरी : ७५ ते ८०

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ८० ते ९०

मूगडाळ : ८० ते ८४

उडीद डाळ : ७२ ते ८०

हरभरा डाळ : ६४ ते ६८

मसूर डाळ : ६० ते ६४

मसूर : ६० ते १२०

चवळी : ७२

हिरवा वाटाणा : ८८ ते १००

काळा वाटाणा : ६० ते ६४

मूग ७६ ते ८०

मटकी : ७५ ते ९५

छोले : ८० ते ९५

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ३४ ते ४८

गहू : २८ ते ३६

हायब्रीड ज्वारी : २४ ते २८

बाजरी : २६ ते २८

नाचणी : ३६ ते ४०

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १२५

सरकी तेल : ८६

खोबरेल : २४०

सूर्यफूल : ९० ते १०५

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १८०

जिरे : २८०

खसखस : ७००

खोबरे : १९० ते २००

वेलदोडे : २२००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांच्या फोटोग्राफीचे ‘कलादर्पण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिरवाईने फुललेला पंचगंगा नदीकाठचा परिसर, रंकाळा तलाव व पन्हाळगडावर सौंदर्य खुलविणाऱ्या वास्तू. याशिवाय ताडोबा जंगलातील वन्य जीव आणि समाजातील विविध घटकांसह कोल्हापूरची वैशिष्ट्ये येथील शाहू स्मारक भवनमध्ये फोटोग्राफी माध्यमातून पहावयास मिळत आहेत. फोटोग्राफीटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलेल्या प्रसंगांचे प्रतिबिंब 'कलादर्पण' प्रदर्शनात उमटले आहे.

शासकीय तंत्रनिकेतनमधील सामूहिक योजनेअंतर्गत (सीडीटीपी) मोफत फोटोग्राफी प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. संस्थेच्या आठव्या बॅचच्या प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या विविध फोटोंचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनात शनिवारी सुरू झाले. फोटोग्राफी प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक डी. के. लमतुरे, प्रशिक्षक रविराज सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दोन दिवसीय प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. १०) खुले राहणार असल्याचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले. फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नजरेतून निसर्गातील विविध पैलूंचे दर्शन होत आहे. प्रदर्शनात विविध विषयांवरील १७६ छायाचित्रांचा समावेश आहे. त्यामध्ये उमेश सोलापूरकर, राहुल गायकवाड, प्रज्वल मोहिते, नंदिनी देसाई, रोशन गरुड, अमर माळी, रुपेश सावंत आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रत्येकाच्या फोटोग्राफीचा विषय वेगळा आहे. कुणी निसर्गाची विविध रुपे टिपली आहेत, तर कुणी मानवी जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगावर प्रकाशझोत टाकला आहे. यात्रा, चिखलगुठ्ठा, बंध मैत्रीचे, पाणी वाचवा, धनगर आरक्षण, ग्रामसंस्कृती अशा विषयांवर फोटोग्राफी करत वेगळेपण जपले आहे. विवेक कुबेर, उमाकांत चव्हाण, जयंत पाटील, राज पाटील, किरण साकतकर, प्रसन्ना जोशी, शंतनू जाटेगावकर यांच्यासह ४० विद्यार्थ्यांनी काढलेले फोटो आहेत. विद्यार्थ्यांनी फोटोग्राफीतून निसर्ग संवर्धन, पाणी वाचवा असा संदेशही दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याच्या विकासाची सूत्रे मंडलिकांच्या हाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एकदा निर्णय घेतल्यानंतर मी त्यात कोणत्याही परिस्थितीत बदल करत नाही. मी कुणाचच ऐकत नाही' असे सांगत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'संजय मंडलिक, तुम्ही लोकसभा निवडणुकीची काळजी करु नका, एकदा फसवलेल्या पुन्हा मदत करणार नाही. भविष्यात जिल्ह्याच्या विकासाची सूत्रे प्रा. मंडलिक यांच्याच हाती राहतील' असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरच्यावतीने आयोजित गृहिणी महोत्सवात ते बोलत होते. यावेळी 'जल्लोष लोकसंगिता' रंगारंग कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

निर्माण चौक येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गृहिणी महोत्सवामध्ये शनिवारी शिवसेनेचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार प्रा. मंडलिक उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता 'एकदा फसवलेल्यांना पुन्हा मदत करणार नाही,' असा टोला लगावला. ते म्हणाले, 'जिल्ह्याच्या विकासाची सूत्रे प्रा. मंडलिक यांच्या हाती येणार आहेत. माझा निर्णय पक्का झाला असून त्यामध्ये बदल होणार नाही. राज्य सरकारने गेल्या चार वर्षांपासून विधवा महिलांची पेन्शन बंद केली आहे. आणखी सहा महिने प्रतीक्षा करा. सहा महिन्यानंतर पेन्शन सुरू होईल.'

आमदार पाटील म्हणाले, 'गृहिणी महोत्सवाचे हे १५ वे वर्ष आहे. महिलांना हक्काचे व्यसपीठ मिळवून देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केले आहे. बचत गटांच्या माध्यमातून प्रतिमा आणि मी महिलांना प्रोत्साहन दिले आहे. नेमबाज राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत या कोल्हापुरातील महिलांनी कोल्हापूरचं नाव सातासमुद्रापार नेले आहे. आपण कोल्हापूरचे ब्रँडिंग झाले पाहिजे. कोल्हापूर महापालिकेच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी सॅनिटरी व्हेंडिंग मशीन बसविण्याची तरतूद केली. शहरात विविध शंभर ठिकाणी अशी मशीन्स बसविण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी सॅनिटरी व्हेंडिंग मशीन बसविणार कोल्हापूर ही देशातील पहिली महापालिका असेल. थेट पाइपलाइन योजना लवकरच पूर्ण होईल. स्वच्छता सर्वेक्षणात महापालिकेचा देशात १६ वा तर राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. महापालिकेत नाविन्यपूर्ण योजनांमुळे, विकासकामांमुळे महापालिकेने देश पातळीवर नाव मिळवले आहे. यापुढेही कोल्हापूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहे. सर्वसामांन्य जनतेच्या सेवेसाठी डी. वाय. पाटील कुटुंबीय चोवीस तास उपलब्ध असते.'

यावेळी एका मराठी वाहिनीचा 'जल्लोष लोकसंगीताचा' हा कार्यक्रम पार पडला. अभिनेती प्राजक्ता माळी आणि हेमंत ढोमे यांनी बहरदार सूत्रसंचालन केले. नेहा खान यांचा नृत्याविष्कार आणि आनंद शिंदे यांच्या गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 'हास्यजत्रा'मधील हास्य सम्राट गौरव मोळे व वनिता खरात यांनी विनोदांतून उपस्थितांचे मनोरंजन केले.

यावेळी शांतादेवी पाटील, प्रा. संजय मंडलिक, डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, वैजयंती पाटील, राजश्री काकडे, करण काकडे, चैत्राली काकडे, वैशाली क्षीरसागर, सुरेश साळोखे, उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, राजू लाटकर, विजयसिंह मोरे यांसह नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज सभा

$
0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, कोल्हापूर शाखेच्या कार्यकारिणीसाठी रविवारी (ता. १०) सभा आयोजित केली आहे. कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांची बदली झाल्याने नूतन अध्यक्ष व पदाधिकारी निवडण्यात येणार आहेत. संघटनेचे राज्याध्यक्ष बलराज मगर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी निवडीची सभा होणार आहे. साइक्स एक्स्टेंशन येथील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता सभा होणार आहे. कर्मचाऱ्यांनी सभेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष जाधव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉल्व्ह गळतीने हजारो लिटर पाणी गटरमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील पाणीपुरवठ्याचे विस्कळीत नियोजन, जलवाहिनीला ठिकठिकाणी लागलेली गळती यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. मात्र याचवेळी एअर व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी थेट गटरमध्ये मिसळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद हॉलच्या पिछाडीस असलेल्या व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती सुरू आहे. याबाबत नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन निरुत्तर केले जात आहे.

शहरातील जुन्या झालेल्या वितरण व्यवस्थेबरोबर नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना नेहमीच पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. रोज कोणत्या ना कोणत्या भागात नागरिक रस्त्यावर उतरून महापालिकेला अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारतात. आंदोलनांदरम्यान वेळकाढूपणाची उत्तरे देऊन बोळवण केली जाते. मात्र, यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. एकीकडे नियोजनाअभावी सुरळीत पाणीपुरवठा ही समस्या बनली असताना, पाणी गळतीतून दररोज हजारो लिटर पाणी थेट गटरमध्ये जात आहे.

शहरातील नागरिकांसाठी दररोज १४० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. प्रत्यक्षात गरज १२० एमएलडीची आहे. जादा २० एमएलडी पाण्याचा उपसा होतो. प्रत्यक्षात ११० एमएलडी पाणी नागरिकांपर्यंत पोहोचते. उर्वरीत ३० एमएलडी पाणी वितरण गळक्या जलवाहिनींतून आणि व्हॉल्व्हवाटे गटारींमध्ये जाते. त्यामुळे नागरिकांना अपुरे पाणी मिळते. गळतीबाबत अनेक सजग नागरिक पाणीपुरवठा विभाग अथवा प्रशासनाशी संपर्क साधतात. पण, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी सबळ कारण देत नाहीत. ताराबाई पार्क, संभाजीनगर, शेंडा पार्क, कळंबा जेल, आपटेनगर, फुलेवाडी, कावळा नाका आदी अनेक ठिकाणी व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी थेट गटारीमध्ये मिसळत आहे. गळती त्वरीत न काढल्यास ऐन उन्हाळ्यात नदी दुथडी भरुन वाहत असताना शहरवासियांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.

ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद हॉलच्या पिछाडीस गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची गळती सुरू आहे. याबाबत अनेकवेळा पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला. पण कोणताही प्रतिसाद मिळत नाही. एकीकडे पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत असताना पाणी गळती रोखण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.

- राजश्री साकळे, स्थानिक राहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूंच्या समाधीस्थळी पवित्र मृदा अर्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे नर्सरी बागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण सुरू आहे. या स्मारकस्थळी राजर्षी शाहूंच्या जन्मभूमीतून आणि कर्मभूमीतून विविध ठिकाणची पवित्र मृदा संकलित करण्यात आली. ही पवित्र मृदा महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते शनिवारी समाधी स्थळावरील मेघडंबरीतील दगडी पेटीत ठेवण्यात आली.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी देशात सामाजिक समतेचा पाया घातला. त्यांचे कार्य बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे. शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे बांधकाम त्यांच्या उत्तुंग कार्याला शोभेल अशा स्वरुपात सिद्धार्थ नगरातील नर्सरी बागेत साकारत आहे. महापालिकेच्या स्वनिधीतून समाधीस्थळी भव्य मेघडंबरीसह सभोवतालचा परिसर विकसित करण्यात येत आहे. गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी समाजात आदर्शवत कार्य केले. त्यांच्या पदस्पर्शाने आणि विचाराने पावन झालेली मृदा कोल्हापूरपासून मुंबई ते नागपूर आणि कर्नाटकात धारवाडपर्यंत अशा शंभर ठिकाणांहून संकलित करण्यात आली. ही मृदा महापौर मोरे यांच्या हस्ते स्मारक स्थळामधील दगडी पेटीत ठेवण्यात आली.

कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळ, मुंबईतील मृत्यूस्थळ, जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, माणगाव परिषदेचे ठिकाण, अतिग्रे तलाव, राधानगरी येथील हत्तीमहाल तसेच राधानगरी धरण, पुणे येथील शिवछत्रपतींचे स्मारक आणि राजर्षी शाहूंनी शिक्षण घेतलेल्या कर्नाटकातील धारवाड येथील शाळेतील, ज्योती तालीम त्याचबरोबर रायबाग तालुक्यातील रायबाग बंगला, पन्हाळा येथील राजवाडा आणि शिवमंदिर, जोतिबा सोनस्थळी, शिरोळ मराठा तख्त, जयसिंगपूर, सिंधुदुर्ग येथील शिवमंदिर आणि कोल्हापुरातील २३ वसतीगृहे, न्यू पॅलेस, खासबाग मैदान, शिवाजी टेक्निकल स्कूल, अंबाबाई मंदिर, कोल्हापूर रेल्वे स्टेशन, नाशिक आणि खामगाव अशा विविध शंभर ठिकाणची मृदा संकलित केली आहे. ही मृदा विधिवत पूजा करुन मेघडंबरीतील दगडी पेटीत ठेवण्यात आली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपमहापौर भूपाल शेटे, उपायुक्त मंगेश शिंदे, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळ विकास समितीचे सदस्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, व्ही. के. पाटील, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा तिघांची, संधी चौथ्याला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर विद्यापीठ कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांमधून सिनेटवर नियुक्त करायच्या एका जागेसाठी चर्चा 'तिघांची' आणि संधी 'चौथ्याला' असा प्रकार घडला आहे. सिनेटवर नियुक्तीसाठी गेली सव्वावर्षे विद्यापीठ सेवक संघात चढाओढ सुरू होती. इच्छुकांपैकी काहींनी आमदार आणि खासदारमार्फत फिल्डिंग लावली होती. जागा एक आणि इच्छुक जास्त अशा स्थितीत चर्चेतील नावे मागे पडली आणि कुलगुरू नियुक्त सदस्यांच्या यादीमध्ये सेवक संघाचे सरचिटणीस राम तुपे यांनी बाजी मारली.

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये विद्यापीठाच्या अधिसभा व विविध अधिकार मंडळाच्या निवडीची प्रकिया पार पडली. नव्या कायद्यानुसार कुलगुरू नियुक्त सदस्यांची संख्या मोठी आहे. नियुक्ती रखडल्याने सेवक संघामार्फत प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. दुसरीकडे विद्यापीठ कॅम्पसमध्ये कार्यरत सहायक अधीक्षक मिलिंद भोसले, अजय इंगळे, वरिष्ठ सहायक धैर्यशील यादव हे सिनेटसाठी इच्छुक होते. तिघेही विद्यापीठ सेवक संघाशी संबंधित आहेत. यापूर्वीच्या निवडीदरम्यान सेवक संघाकडून एका नावाची शिफारस केली जायची. मात्र, अंतिम नियुक्तीचा अधिकार कुलगुरूंचा असतो. सिनेटवर संधी मिळावी म्हणून तिघांनीही प्रयत्न केले. कुणी सेवक संघाच्या माध्यमातून शिफारस मिळवली तर एकाने राज्यसभेवरील खासदारांपर्यंत फिल्डिंग लावली. अन्य एकाने कागल तालुक्यातील शिक्षण संस्थाचालक व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याला मध्यस्त केले होते. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमार्फत आमदारांकडून शिफारस मिळवण्याचा प्रयत्न झाला. अन्य एक सदस्य संघटनेच्या ताकतीच्या बळावर सिनेटवर जाण्यासाठी प्रयत्नशील होते.

वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याने सिनेट सदस्यपदाची नियुक्ती रखडली होती. प्रशासनाने नुकतेच विद्यापीठ कर्मचाऱ्यांतून एकाची सिनेटवर नियुक्ती केली. यात चर्चेतील नावे मागे पडली आणि राम तुपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या घडामोडींवरून सेवक संघात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेवक संघाची मार्च महिन्यात शेवटची सभा होणार असून त्यामध्ये पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी ठोकले पाणीपुरवठा कार्यालयाला टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जुलै महिन्यापासून मिरजकर तिकटी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वारंवार तक्रार देऊनही दखल घेतली न गेल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी मंगळवार पेठेत पाण्याचा खजिना येथे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता. आक्रमक महिलांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरत 'पाणी देणार नसाल तर बिले का भरायची?' असा उद्वीग्न सवाल केला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, बालगोपाल तालीम, खरी कॉर्नर, न्यू महाद्वार रोड परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गणेशोत्सवादरम्यान आंदोलन केल्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला. मात्र, पुन्हा या भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाणी पूर्ण दाबाने व नियमित सोडण्यासाठी येथील नागरिक वारंवार पाणीपुरवठा विभाग व प्रशासनाला पत्रव्यवहार करतात. पण, त्याची दखल घेतली जात नाही. गुरुवारी मिरजकर तिकटी येथे नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी पाणी नियमित सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

मात्र आश्वासनानंतरही पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक संतप्त झाले. एक घागर भरण्यासाठी एक तासाचा अवधी लागत असल्याने वैतागलेले नागरिक थेट पाण्याचा खजिना येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात आले. कार्यालयात संबंधीत अधिकारी नसल्याने महिला संतप्त झाल्या. त्यांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला टाळे ठोकले. संतप्त नागरिकांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पाणीपुरवठा विभागाची सोमवारी बैठक असून त्यावेळी पाणीप्रश्न निकालात काढू असे आश्वासन दिले.

आंदोलनात रेवती देसाई, चैताली केसरकर, निर्मला शिंदे, श्वेता जगताप, अनिता सुतार, वंदना गायकवाड, कांचन जगताप, धर्मराज जगताप यांच्यासह मिरजकर तिकटी परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


८७ गावांना पाण्यासाठी चार कोटींचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ८७ गावांना चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. या निधीतून ५६ गावांमध्ये वॉटर एटीएम व तर ३० गावांत जलशुद्धीकरण सयंत्र (आरओ) बसविण्यात येणार आहे. यामध्ये करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

पत्रकात म्हटले आहे की, ग्रामस्थांना शुद्ध पाणी देणार असल्याचे आश्वासन दिले होते. पंचगंगा नदीकाठच्या गावांतील लोकांना तसेच प्राधिकरणात समाविष्ट ग्रामस्थांना दिलेले आश्वासन याद्वारे पूर्ण केले आहे. वॉटर एटीएममधून ग्रामस्थांना अल्पदरात शुद्ध पाणी मिळेल. सध्या ४७ गावांमध्ये शुद्ध पाण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. पंचगंगा नदीकाठावरील बालिंगा, नागदेववाडी, हणमंतवाडी, शिंगणापूर, आंबेवाडी, चंदूर, रुई, पट्टणकोडोली, माणगाव, इंगळी, रांगोळी, नांदणी, शिवनाकवाडी, हारोली, धरणगुत्ती या गावांना निधीचा लाभ मिळेल. भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर येथेही पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. तर कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणात समाविष्ट चौदा गावांतही शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. यामध्ये शिये, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळ शिरगाव, पाचगाव, भुये, भुयेवाडी, सांगवडेवाडी, जठारवाडी, पाडळी खुर्द, उजळाईवाडी गावांचा समावेश आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ५६ गावांमध्ये वॉटर एटीएम बसविण्यात येतील, असे पत्रकात म्हटले आहे.

०००

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ८७ गावांना चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून ५६ गावांमध्ये वॉटर एटीएम व तर ३० गावांत जलशुद्धीकरण सयंत्र (आरओ) बसविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. यामध्ये करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

'ग्रामस्थांना आपण शुद्ध पाणी देणार असल्याचे आश्वासन दिले होते. पंचगंगा नदी काठच्या गावातील लोकांना तसेच प्राधिकरणात समाविष्ठ ग्रामस्थांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे पालकमंत्री पाटील यांनी म्हटले आहे. वॉटर एटीएममधून ग्रामस्थांना अल्पदरात शुध्द पाणी मिळेल. सध्या ४७ गावामध्ये शुद्ध पाण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे.

पंचगंगा नदी काठावरील बालिंगा, नागदेववाडी, हणमंतवाडी, शिंगणापूर, आंबेवाडी, चंदूर, रुई, पट्टणकोडोली, माणगाव, इंगळी, रांगोळी, नांदणी, शिवनाकवाडी, हारोली, धरणगुत्ती या गावांना निधीचा लाभ मिळणार आहे. भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर येथेही पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. तर कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणात समाविष्ठ चौदा गावातही शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. यामध्ये शिये, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळ शिरगाव, पाचगाव, भुये, भुयेवाडी, सांगवडेवाडी, जठारवाडी, पाडळी खुर्द, उजळाईवाडी गावांचा समावेश आहे. याशिवाय जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ५६ गावांमध्ये वॉटर एटीएम बसविण्यात येतील असे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाय दूध खरेदी दर २५ रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने दूध अनुदान योजनेस वाढ दिली असून, प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सहकारी व खासगी संस्थांना गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपये द्यावा लागणार आहे. गोकुळ दूध संघाने अनुदान बंद झाल्यानंतर खरेदी दरात दोन रुपयांनी कपात केली आहे.

पिशवीबंद दूध वगळून दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या दूध संघांना गायीच्या दुधावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा गतवर्षी राज्य सरकारने केली होती. अनुदानाबरोबर गाय दूध खरेदीदर प्रतिलिटर २५ रुपये करण्याची अट घातली होती. अनुदानाची मुदत ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत होती. त्यानंतर ही मुदत ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत वाढविली होती. अनुदानाचा लाभ अनेक खासगी व सहकारी संघांना मिळाला. पण ३१ जानेवारीनंतर मुदत न वाढविल्याने राज्यातील दूध संघांनी गायीच्या दूध खरेदी दरात मोठी कपात केली आहे. गोकुळने दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात करून खरेदी दर २५ रुपयांवरून २३ रुपयांवर केला आहे. त्याचा फटका दूध उत्पादकांना बसला आहे.

राज्य सरकारने दूध अनुदान योजनेस मुदतवाढ दिली असून खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपये कायम ठेवला आहे. तसेच अनुदानाची रक्कम पाच रुपयांवरून तीन रुपये केली आहे. ज्या संघांनी गाय दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २० ते २३ रुपये केला आहे त्यांना प्रतिलिटर २५ रुपये खरेदी दर द्यावा लागणार आहे. जे संघ देणार नाहीत त्यांना दुग्ध आयुक्त कार्यालयाकडून नोटिसा पाठविण्यात येणार आहेत, असे अधिकारी पातळीवरील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

गोकुळची पिशवीतील दुधाची विक्री जास्त असून, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती कमी आहे. गायीच्या दुधाची भुकटी तयार केल्यास गोकुळला अनुदान मिळते. पण त्यासाठी राज्य सरकारने कॅशलेसची अट घातली असल्याने गोकुळला तांत्रिक अडचणी येत आहेत. गोकुळची कॅशलेसची खाती कमी असल्याने अनुदानाचा फटका बसणार आहे. त्यासाठी गोकुळकडून कॅशलेस व्यवहार गतीने होण्यासाठी पावले उचलली आहेत. ग्रामीण भागात दूध उत्पादकांकडून बँक खाती काढण्यास उत्सुकता दाखवली जात नाही. तसेच अनेक गावांत बँका नसल्याने त्या ठिकाणी पॉस मशिनचा वापर करावा लागणार आहे. ज्या दूध उत्पादकांनी बँक खाती काढली आहेत त्यांना अनुदानाचा लाभ होणार आहे.

०००००००

'गोकुळ'कडून प्रतिलिटर २५ रुपये दर दिला, पण राज्य सरकारकडून कॅशलेसची अट घातली असल्याने त्याचा फटका बसत आहे. सरकारने 'गोकुळ'कडून प्रतिलिटर २५ रुपये दर दिला जातो की नाही हे तपासून अनुदान द्यावे. कॅशलेसची अट काही काळ शिथिल करावी.

रवींद्र आपटे, अध्यक्ष गोकुळ

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोटीची कामे अडकली आचारसंहितेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या समाजमंदिर सभागृह, रस्ते, गटर्स, पेव्हिंग ब्लॉक मिळून तब्बल एक कोटीहून अधिक निधीची विकासकामे आचारसंहितेत अडकली. या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती, सोमवारी निविदा प्रकिया प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू होती. रविवारी सायंकाळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने निविदा व वर्क ऑर्डर काढण्याची प्रक्रिया थांबली.

आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेने जिल्हा परिषदेत गेल्या १५ दिवसांपासून विविध विभागात धांदल सुरू होती. प्रस्तावित कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी सदस्यापासून कंत्राटदारापर्यंत लगबग होती. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रस्ते दुरुस्तीच्या दहा कोटी रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली होती. ही कामे आचारसंहितेत अडकू नयेत, यासाठी जलदगतीने निविदा प्रक्रिया राबवावी यासाठी सदस्यांचे हेलपाटे वाढले होते. बांधकाम आणि अर्थ विभागात धावपळ सुरू होती.

दरम्यान प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी मान्यता दिलेली एक कोटी रुपयांची विकास कामे आचारसंहितेत अडकली आहेत. यामध्ये २२ कामांचा समावेश आहे. या कामांचा आराखडा तयार आहे. कामे निश्चित आहेत. सोमवारी (ता.११) निविदा प्रक्रिया राबविण्याचे प्रशासनाचे नियोजन होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्यांची सर'मिसळ'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून जिल्ह्यातील पक्षीय राजकारणाचे संदर्भ बदलले आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात विधानसभेनुसार राजकीय पक्षांच्या नेत्यांची सर'मिसळ' झाली आहे. कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेकडे काँग्रेसचे, तर राष्ट्रवादीकडे भाजपचे नेते, कार्यकर्ते समर्थक प्रचारात असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक आणि प्रा. संजय मंडलिक यांच्यात पारंपरिक लढत होणार आहे. खासदार महाडिक हे राष्ट्रवादीचे, तर प्रा. मंडलिक शिवसेनेकडून लढणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. खासदार महाडिक यांच्या मागे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, भरमू सुबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांची फळी आहे. तसेच महाडिक यांचे चुलत बंधू भाजपचे आमदार अमल महाडिकही पक्षादेश डावलून राष्ट्रवादीच्या पाठीशी राहण्याची शक्यता आहे. राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती आणि माजी आमदार मालोजीराजे, बजरंग देसाई, दिनकरराव जाधव यांच्या भूमिकाही अद्याप तटस्थ आहेत. महाडिक यांचे कट्टर विरोधक काँग्रेसचे आमदार सतेज पाटील शिवसेनेचे प्रा. मंडलिक यांच्या पाठीशी राहण्याची शक्यता आहे.

प्रा. मंडलिक यांना शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर या तीन आमदारांचा भक्कम पाठिंबा असल्याचे त्यांचे पारडे जड झाले आहे. तसेच माजी आमदार संजय घाटगेही मंडलिकांच्या बाजूने राहणार आहेत. भाजप-शिवसेना युती झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपची ताकद मंडलिक यांच्या पाठीशी लावणार आहेत. काँग्रेस आमदार सतेज पाटील शिवसेनेचे प्रा. मंडलिक यांच्या पाठीशी राहण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे काही पदाधिकारी राष्ट्रवादीच्या प्रचारात तर काँग्रेसचे काही समर्थक शिवसेनेचा प्रचार करत आहेत. त्यामुळे गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही अटीतटीची निवडणूक होणार आहे.

हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची हॅटट्रिक रोखण्यासाठी शिवसेनेकडून धैर्यशील माने रिंगणात उतरणार आहेत. स्वाभिमानी या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासदार शेट्टी यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, संजिवनीदेवी गायकवाड यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे संभ्याव्य उमेदवार धैर्यशील माने यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब माने आणि आई निवेदिता माने खासदार होत्या. माने घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. माने यांना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर, शिवाजीराव नाईक यांचा पाठिंबा आहे. तसेच भाजपचा सहयोगी पक्ष असलेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी आमदार विनय कोरे, माजी आमदार राजीव आवळे यांचा पाठिंबा माने यांना मिळण्याची शक्यता आहे. कागदावर माने यांना भक्कम पाठिंबा असला तरी शेट्टी हे तळागाळातून आलेले नेतृत्त्व असल्याने आणि काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणार असल्याने हातकणंगलेत काट्याची लढत होणार हे निश्चित.

०००००

पाठिंबा देणारे संभाव्य नेते...

कोल्हापूर मतदारसंघ

खासदार धनंजय महाडिक

आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कपेकर, अमल महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, भरमू सुबराव पाटील.

प्रा. संजय मंडलिक

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, सतेज पाटील, माजी आमदार संजय घाटगे.

०००००

हातकणंगले मतदारसंघ

खासदार राजू शेट्टी

आमदार जयंत पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, मानसिंगराव नाईक, महादेवराव महाडिक.

धैर्यशील माने

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, मानसिंगराव नाईक, माजी आमदार विनय कोरे, राजीव आवळे.

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्मविश्वासाने जगा, आत्मसन्मान मिळवा

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मोबाइल, कम्प्युटर, इंटरनेटमुळे आधुनिक क्रांती झाली. आधुनिक युगाची कास धरताना महिलांनी मानवी नीतिमूल्यांची आणि संस्कृती जतन केली. वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तबगारी सिद्ध करताना आत्मविश्वासाने जगा, आत्मसन्मान मिळवा. नवे युग घडविण्याची ताकद तुमच्या हाती आहे,' असे गौरवोद्गार 'मिस वर्ल्ड' युक्ता मुखी यांनी काढले.

येथील प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गृहिणी महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवाच्या समारोपाच्या दिनी रविवारी सौंदर्य व बुद्धिमतेची स्पर्धा, संशोधन, सामाजिक आणि आरोग्य सेवेत वेगळी छाप उमटविणाऱ्या महिला व युवतींना गृहिणी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. यामध्ये 'मिस इंडिया' विजेती धनश्री गोडसे, डॉ. भारती अभ्यंकर, नयना संदीप साळोखे, नेत्रदीपा प्रदीप पाटील, वसुधा श्रीकांत चिवटे आणि सातारा येथील माधवी विठ्ठल जाधव यांना पुरस्कार बहाल करण्यात आला. युक्ता मुखी व फेमिना मिस इंडिया नूतन वायचळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. आमदार सतेज पाटील, ऑगनायझेशनच्या प्रमुख प्रतिमा पाटील, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, पूजा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.

युक्ता मुखी म्हणाल्या, 'गृहिणी महोत्सवाचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. प्रगतीची नवी वाट चालताना पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा, प्लास्टिक हटवा अशा पयार्वरणपूरक चळवळीतील सहभाग महत्त्वाचा आहे. मुळात अंबाबाई देवस्थानमुळे कोल्हापूरची शक्तिपीठ अशी ओळख आहे. या शक्तीपीठात महिलांनी पर्यावरण वाचविण्याची सुरुवात केली तर त्या कार्यातून अनेकांना ऊर्जा मिळेल.'

प्रतिमा सतेज पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, वैजयंती संजय पाटील, पृथ्वीराज पाटील, आदी उपस्थित होते.

०००

कोल्हापूर लई भारी

'मिस इंडिया' किताबाची मानकरी धनश्री गोडसे यांनी छोटेखानी भाषणात उपस्थितांची मने जिंकली. माझे कोल्हापुरात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले. हे शहर अनेकअर्थी वैशिष्ट्यपूर्ण आहे. अंबाबाई, जोतिबा, पन्हाळा, रंकाळापासून ते कोल्हापुरी मिसळपर्यंत सगळेच लई भारी असल्याचे सांगताच टाळ्यांचा वर्षाव झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा आजपासून बंद

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आपटेनगर पाणी साठवण टाकीतील गाळ काढण्यासह कावळा नाका टाकीतील व्हॉल्व्ह दुरुस्तीला सोमवारपासून (ता. ११) सुरुवात होणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी पूर्ण शहराला तर मंगळवारी 'ए' आणि 'ई' वॉर्डाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या काळात महापालिकेच्यावतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

शहरातील अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठा टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी टाक्यांतील गाळ काढण्याचे काम विभागाने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी आपटेनगर येथील पाणी साठवण टाकीतील गाळ काढण्यात येणार आहे. कावळा नाका येथील उंच टाकीखालील व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात येणार आहे. दोन्ही टाक्यांमध्ये शिंगणापूर उपसा केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल. परिणामी 'ए' आणि 'ई' वॉर्डातील पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. एका दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असले तरी मंगळ‌वारी कमी, अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. ज्या भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही, अशा भागात महापालिकेच्या टँकरद्वारे पाणीवाटप करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’च्या कार्यकर्तृत्वाचा गौरव

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या ऑल वुमेन पॉवर रॅलीच्या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. देशाच्या संरक्षणासाठी शहीद झालेले दिगंबर उलपे यांच्या यांच्या आई, वीरमाता आनंदीबाई उलपे, एचआयव्हीग्रस्तांसाठी कार्यरत असलेल्या रुपाली सुनंदा आणि रस्त्यावरील निराधारांना पोटभर जेवण देणाऱ्या रॉबिनहूड आर्मीच्या सदस्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 'मटा सन्मान' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या मैदानावर रॅलीच्या समारोपप्रसंगी हा सन्मान सोहळा झाला.

मराठी मालिकेतील आघाडीची अभिनेत्री ऋता दुर्गुळे, अभिनेता उमेश कामत, प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा, उद्योजिका छाया जाधव, शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे, डॉ. अर्चना पवार, स्वामी विवेकानंद संस्थेचे प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक डॉ. भारत खराटे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

'ऑल वुमेन पॉवर रॅली'च्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांच्या सन्माने उपस्थित भारावून गेले. महिला शक्तीची चुणूक दाखविणाऱ्या या महिलांच्या सन्मानप्रसंगी टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात रॅलीतील सहभागी महिलांनी त्यांचे अभिनंदन केले. वीरमाता उलपे यांचा गौरव करताना अभिनेते उमेश कामत अक्षरश: नतमस्तक झाले. वीरमाता उलपे यांच्या गौरव सोहळ्यावेळी अनेकांचे डोळे पाणावून गेले. 'वीर जवान तुझे सलाम', 'भारत माता की जय', 'जय जवान जय किसान' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अभिनेते कामत यांनी 'वुमेन पॉवर रॅलीमुळे पश्चिम महाराष्ट्राचा माझा दौरा अविस्मरणीय झाला. आयुष्यातील हा रविवार कधीही विसणार नाही' असे सांगितले. तर रॅलीतील महिलांच्या उत्साहाने भारावून गेलेल्या ऋता दुर्गुळेने सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले.

मुलगा दिगंबरला देशाच्या संरक्षण करताना वीरमरण आले. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या आनंदीबाई उलपे यांचा सन्मान करण्यात आला. गेली अकरा वर्षे अव्याहतपणे एचआयव्हीग्रस्तांसाठी कार्य करताना ६० जोडप्यांना विवाह बंधनात बांधणाऱ्या रुपाली सुनंदा आणि वंचित, निराधारांना पोटभर जेवण देणाऱ्या रॉबिनहूड आर्मीच्या कर्तृत्वाला 'मटा सन्मान'ची जोड मिळाली. पुरस्कार सोहळ्यावेळी समाजभान जपणाऱ्या प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे यांनी वीरमाता उलपे यांची नात प्राची जाधव-कसबेकर हिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली.

मनोगत व्यक्त करताना रॉबिनहूड आर्मीच्या सदस्या, नुपूर रावळ-तोरो म्हणाल्या, 'देशभरात दररोज १९ लाख नागरिक अन्न मिळत नसल्याने उपाशीपोटी झोपतात. यापैकी केवळ एक टक्का लोकांना रॉबिनहूड आर्मी जेवण देऊ शकते, इतकी या कार्याची व्याप्ती मोठी आहे. सजग नागरिकांनी सण, समारंभाच्या निमित्ताने तयार केले जाणारे अन्न वाया न घालवता ते आर्मीकडे सुपूर्द करावे. आम्ही ते गरजूपर्यंत पोहोचवू.'

रॅलीमध्ये मराठी शाळा आणि भाषा टिकवण्याचे आवाहन करत सहभागी झालेल्या एव्हरग्रीन टीचर्स ग्रुपच्या चारुशिला बिडवे म्हणाल्या, 'सर्वसामान्य कुटुंबांतील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी महापालिकेच्या शाळा टिकल्या पाहिजेत. रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी मुलांना महापालिकेच्या शाळांत पाठविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.'

महिला दिनाच्या शुभेच्छा देताना चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक डॉ. भारत खराटे म्हणाले, 'महाराष्ट्र टाइम्स नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित आहे. हे सर्वच उपक्रम प्रेरणादायी असतात. वुमेन पॉवर रॅलीच्या माध्यमातून महिलांना आपली मते, कलाकृती सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे.'

प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा म्हणाल्या, 'महिला उत्तम प्रकारे बाइक चालवत नसल्याचे अनेकदा म्हटले जाते. पण तुम्ही उत्तम प्रकारे बाइक चालवली. शिवाय राइडचा आनंदही घेतला. आपले नेहमीचे काम सोडून काहीतरी वेगळे करणे खूप महत्त्वाचे आहे.'

स्पर्धेतील विजेते

क्वीन ऑफ रॅली : इंद्रायणी निंबाळकर

बाइक डेकोरेट : शुभदा जोशी ग्रुप (पर्यावरण वाचवा)

बेस्ट हेल्मेट सजावट : राही तोडकर

बेस्ट मेसेज : एव्हरग्रीन टिचर्स ग्रुप

बेस्ट ड्रेस : मराठा बटालियन

बेस्ट डान्स : दिव्या रेवणकर

बॉइज लूक : श्रृती केसकर

वेस्टर्न लूक : सीमा बेनाडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेच्या १२ शाळांना ‘देवस्थान’कडून अँड्रॉइड टीव्ही

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने महापालिकेच्या १२ शाळांना ई-लर्निंग सुविधांसाठी अँड्रॉइड टीव्ही संचांचे वितरण करण्यात आले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते संच वितरण झाले. शिवाजी पार्क येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. महापौर सरिता मोरे, प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती अशोक जाधव प्रमुख उपस्थित होते.

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, 'शिक्षण मुलांचा हक्क असून त्यांना तो मिळालाच पाहिजे. महापालिकेच्या शाळांत बहुजन समाजातील व सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. समितीने उपलब्ध केलेल्या सुविधांमुळे ही मुले विविध क्षेत्रात चमकतील. महापालिका शाळांच्या उत्कर्षासाठी यापुढेही देवस्थान समिती पाठीशी राहील.'

महापौर मोरे, सभापती अशोक जाधव, समितीचे सदस्य शिवाजी जाधव व प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी मनोगत व्यक्त केले. परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, समितीचे सदस्य संगीता खाडे, सचिव विजय पोवार, शिवाजी साळवी, रसुल पाटील, बाबा साळोखे आदींसह पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. बाळासाहेब कांबळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालकेतर्फे ब्रेव्ह वुमन कार्यक्रम

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने ब्रेव्ह वुमन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील व महापौर सरिता मोरे यांनी रोपांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. रमणमळा येथील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे कार्यक्रम झाला.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'महिला व बालकल्याण विभागामार्फत वेगवेगळया योजनांचा प्रसार करुन त्याचा लाभ सर्व महिलांना मिळवून देण्यासोठी प्रयत्नशील राहू.' महापौर मोरे म्हणाल्या, 'महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत गरीब, गरजू व परित्यक्ता, विधवा महिलांनी विविध योजनांचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे. आपली आर्थिक उन्नती साधावी.' पारंपरिक वेशभूषा, एक मिनिट सादीकरण, केशभूषा, गीत गायन व नृत्य स्पर्धा झाल्या. विजेत्या स्पर्धकांना सभापती खेडकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. प्राथमिक शिक्षण सभापती अशोक जाधव, नगरसेविका शोभा कवाळे, उपसभापती छाया पोवार, नगरसेविका स्वाती यवलुजे, ललिता बारामते, अॅड. सूरमंजिरी लाटकर, वनिता देठे, दीपा मगदूम, उमा बनछोडे, माधूरी लाड, वृषाली कदम, गीता गुरव, उपायुक्त मंगेश शिंदे, अधीक्षक प्रीती घाटोळे, शिवाजी आगलावे, मिलिंद कुंभार आदी उपस्थित होते. सरिता सुतार यांनी प्रास्ताविक केले. महिला बालकल्याण समिती सभापती अनुराधा खेडकर यांनी स्वागत केले. प्रियंका साजणे यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेतील विजेते : गीत गायन - स्मिता पुनवतकर, शायराज मणेर, पुनम माने. पारंपारिक वेशभूषा - कविता माने, चारुशिला बिडवे, सुशिला भोसले. एक मिनिट सादरीकरण - सुवर्णा सोनाळकर, मनीषा पांचाळ, वैशाली पाटील. केशभूषा - राधिका पोवार, निवेदिता माने, मंगल गणेशाचार्य. नृत्य - प्रज्ञा तळेकर, नीता खाडे, प्रिया कुरणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधनासाठी युजीसीची पंचसूत्री

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'विद्यापीठ अनुदान आयोगाने संशोधनासाठी पंचसूत्री निश्चित केली आहे. शैक्षणिक संस्थांचे क्षमता संवर्धन, संशोधनाचा दर्जा, मानव्यविद्या व भाषा विषयांमधील संशोधनास प्रोत्साहन, विद्यार्थींकेंद्रीत अध्ययन पद्धती, शिक्षकांसाठी क्षमता संवर्धन कार्यक्रम या पंचसूत्रीच्या आधारे युजीसीने भविष्यातील वाटचाल ठरविली आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली आहे' अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली. शिवाजी विद्यापीठात अधिष्ठाता, अधीविभागप्रमुख आणि संचालकांसमवेत डॉ. पटवर्धन शैक्षणिक धोरणासंदर्भात चर्चा केली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

विद्यापीठातील कुलपती उद्यानाच्या नामफलकाचे अनावरणही डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते झाले. उद्यानात त्यांच्या हस्ते नारळाच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी डॉ. पटवर्धन म्हणाले, 'विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांकडून सादर होणाऱ्या समाजोपयोगी प्रकल्पांना महत्त्वानुसार भरीव आर्थिक निधीची तरतूद केली जाईल. राष्ट्रीय उपक्रमासाठी हाती विद्यापीठांना प्रोत्साहन करण्यात येणर आहे. विशेषतः मानव्यविद्या, भाषा, भाषाविज्ञान यांसारख्या दुर्लक्षित किंवा व अन्य विद्याशाखांसाठीही भरघोस तरतूद करून संशोधनाला चालना दिली जाईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ शिक्षण संस्थेसह सुट्टीच्या कालावधीत अन्य ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण केला तर क्रेडिट गुण देण्यासाठी नॅशनल अॅकॅडेमिक क्रेडिट बँक हा अभिनव उपक्रम विचाराधीन आहे '

कुलगुरू शिंदे यांनी, 'विद्यापीठाने आजपर्यंत युजीसीच्या विविध प्रकल्पांत सहभाग दर्शविला. यापुढील काळातही नवीन प्रकल्पातही विद्यापीठ हिरीरीने सहभागी होईल' असे सांगितले. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी. एस. पाटील, उद्यान विभागाचे उपकुलसचिव व्ही. एन. शिंदे आदी उपस्थित होते.

ज्येष्ठांना पीएच.डी.संशोधनाची संधी

डॉ. पटवर्धन म्हणाले, 'ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर व कलाकार त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात केवळ ज्ञानार्जनाच्या आनंदासाठी पीएच.डी.चे संशोधन करू इच्छितात. त्यांना वय, शिक्षण आदी कोणतीही अट न लावता त्यांना संशोधनासाठी मुभा देण्याबाबत युजीसी सकारात्मक आहे. पीएच.डी.चे निकष, नियम शिथील करुन संशोधनाची परवानगी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासाठी आयोगाने स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक सत्ताकेंद्रे ठरणार निर्णायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्रे असलेले गोकुळ दूध संघ व जिल्हा बँक निर्णयाक ठरणार आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य व महापालिकेचे नगरसेवकही महत्तवपूर्ण भूमिका बजावणार आहेत. दोन्ही लोकसभा मतदारसंघांत पक्षापेक्षा गटाला महत्त्व प्राप्त झाल्याने या चारही ठिकाणी सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक, तर शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांना संभाव्य उमेदवार म्हणून मानले जाते. उमदेवारीवर आपापल्या पक्षाकडे दोघांनीही दावेदारी सांगत प्रचाराला सुरुवातही केली. प्रचाराला अद्याप वेग आला नसल्याने अनेकजण उमेदवारीनंतरच आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत गोकुळ व जिल्हा बँकेचे संचालक, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि महापालिकेतील नगरसेवक कोणत्या उमेदवाराचा प्रचार करणार हा औत्सुक्याचा मुद्दा बनला आहे.

गोकुळवर आमदार महादेवराव महाडिक यांचे एकतर्फी वर्चस्व असल्याने अपवाद वगळता सर्वच संचालक राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेत मात्र सर्वच पक्षांचे संचालक असल्याने हे संचालक कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. सद्य:स्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची बँकेत आघाडी असली, तरी या आघाडीत शिवसेनेच्याही संचालकांचा समावेश आहे. निवडणूक पक्षापेक्षा गटातटाला महत्त्व देणारी असल्याने बँकेचे संचालक कोणाच्या प्रचारात उतरणार हे औत्सुक्याचे ठरेल.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक गटाला सत्तेत सहभागी करत शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मदतीने प्रथमच भाजपची सत्ता मिळवली. पण गेल्या काही दिवसांपासून सदस्यांमध्येच फूट पडल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत आहे. गेल्या दोन वर्षांतील कारभारावरून नाराज असलेले सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून आपली नाराजी दाखविण्याची शक्यता आहे. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-ताराराणी अशी आघाडी असली, तरी येथे पक्षापेक्षा गटाला अधिक महत्त्व दिले जात आहे.

महापालिकेतील काँग्रेसचे सर्व सदस्य आमदार सतेज पाटील यांना मानणारे असल्याने पाटील यांच्या भूमिकेनंतर नगरसेवकांची भूमिका निश्चित होईल. पक्षाचे उमेदवार असून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये खासदार महाडिक यांच्या भूमिकेबाबत नाराजी आहे. काँग्रेस आघाडीत अशी स्थिती असताना विरोधी भाजप-ताराराणी आघाडीची अशीच स्थिती आहे. मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने आणि पालकमंत्री पाटील स्वत: प्रचारात असल्याने भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ताराराणी आघाडीचे बहुतांश नगरसेवक महाडिक गटाचे असल्याने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली. मात्र, भाजपच्या नगरसेवकांची महापालिकेतील आघाडीसोबत जायचे की पालकमंत्री पाटील यांच्या आदेशाप्रमाणे काम करायचे, अशा द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत. परिणामी गेल्या काही वर्षांत सत्तेत सहभागी असलेले या मोठ्या संस्थेतील पदाधिकारी प्रचाराच्या निमित्ताने एकमेंकासमोर येण्याची शक्यता आहे.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी युनियनच्या अध्यक्षपदी सोळांकुरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या अध्यक्षपदी बांधकाम विभागातील सहायक लेखाधिकारी महावीर सोळांकुरे आणि सचिवपदी कनिष्ठ सहायक अमोल घाटगे यांची निवड झाली. यावेळी ४५ जणांची कार्यकारणी निवडण्यात आली. जि. प. कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बलराज मगर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्यामध्ये युनियनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय पुजारी, आबासाहेब दिंडे यांची तर जितेंद्र वसगडेकर यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी मुख्याध्यापक कृष्णात कारंडे, बंडू संकेश्वरे, सुधाकर कांबळे, सुभाष हांडे, गौतम वर्धन, प्रवीण मुळीक, आर. आर. पाटील, मनीषा पालेकर, विद्या व्हटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. महिला प्रतिनिधी म्हणून सुमित्रा कोरवी, वैशाली पवार, संगीता गुरव आणि दुर्गा देशपांडे यांचा समावेश आहे. याप्रसंगी सहायक लेखाधिकारी धनंजय जाधव यांची लेखाधिकारीपदी (वर्ग दोन) निवड झाल्याबद्दल सत्कार झाला. याप्रसंगी एम. आर. पाटील, एम. एम. पाटील, शिवाजी कोळी, सचिन मगर, सुधाकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिन पानारी यांनी स्वागत केले. कृष्णात किरुळकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images