Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गोकुळ दूध संघावर आयकर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयावर आयकर खात्याने मंगळवारी छापा टाकण्यात आला. पथकाने जवळपास चार तासांहून अधिक काळ तेथील कागदपत्रांची तपासणी आणि अन्य चौकशी केली. दूध संघाकडून अपेक्षेपेक्षा कमी आयकर भरल्यामुळे ही चौकशी करण्यात आल्याचे समजते. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या संघाच्या आयकर खात्याकडून झालेल्या चौकशीने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली.

गोकुळ दूध संघाची सुमारे दोन हजार कोटींची वार्षिक उलाढाल आहे. दूध संघाकडून दर महिन्याला आयकरही भरला जातो. तथापि, चालू आर्थिक वर्षात आयकरची रक्कम कमी भरल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई केल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. मंगळवारी सायंकाळी संघाच्या मुख्य कार्यालयात आयकरच्या एका महिला अधिकाऱ्यासह पाचजणांचे पथक आले. त्यांनी संघातील विक्री झालेला माल, उत्पादन आणि ताळेबंदाविषयीची तपासणी केली. संघ फायद्यात असताना गेल्या महिन्यात पाच कोटीचा कर कमी भरल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक, चार्टर्ड अकाउंटंट आणि अधिकारी उपस्थित होते. गायीच्या दुधाचे दर घसरल्यामुळे 'गोकुळ'ला गेल्यावर्षी नव्वद कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तसेच सध्या गायीच्या दुधाचे दर घसरले असल्याने तोटा होत असून, फायदा कमी होत असल्याने आयकर कमी भरल्याचा खुलासा करण्यात आला. पण, अधिकाऱ्यांनी संघाचा खुलासा धुडकावून टाकत पाच कोटी आयकर भरण्याची नोटीस संघाला दिल्याचे समजते. दरम्यान, संघाच्या कार्यालयावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा पडल्याचे अफवेने खळबळ उडाली होती. पण, प्रत्यक्षात आयकर खात्याची कारवाई असल्याचे स्पष्ट झाले.

नियमीत तपासणी...

ही नियमित तपासणी असल्याचे 'गोकुळ'च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्याशी मोबाइलवरुन संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. एका ज्येष्ठ संचालकाने ही चौकशी झाल्याचे मान्य केले. तथापी त्यांनीही ती नियमीत तपासणी असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आवाडे गटाची घरवापसी, भाजपला धक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील सत्तारुढ भारतीय जनता पक्ष व मित्रपक्ष आघाडीला बुधवारी धक्का बसला. सत्तारुढ भाजप आघाडीसोबत असलेले आवाडे गटाचे दोन सदस्य बुधवारी रितसर काँग्रेस आघाडीत सामील झाले. बुधवारच्या सर्वसाधारण सभा व अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर आवाडे गटाने काँग्रेस आघाडीने आयोजित केलेल्या पार्टी मिटिंगला हजेरी लावली. आवाडे गट विरोधी पक्षात सामील झाला असला तरी त्या गटाच्या सदस्या वंदना मगदूम या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी कायम आहेत. जि.प.राजकारणात आवाडे गटाने वेगळा मार्ग निवडला तरी सध्यस्थितीत भाजपची सत्ता कायम राहणार आहे.

मात्र आवाडे गटाचे सदस्य राहुल आवाडे व वंदना मगदूम यांच्या खेळीमुळे जिल्हा परिषदेतील सत्ताकारणाचा संघर्ष आणखी चिघळणार आहे. सप्टेंबर महिन्यात अध्यक्षपदासाठी आरक्षण निघणार आहे. जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष होईल अशी घोषणा केली होती. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत दोन वर्षांपूर्वी सत्तेची मोट बांधताना विविध आघाड्यांना एकत्र केले. त्यामध्ये आवाडे गट व स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी झाली.

पहिल्या वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्या शुभांगी शिंदे यांनी महिला व बालकल्याण समिती सभापतिपद भूषविले. या दोन्ही घटकातील सत्ता वाटपाच्या सुत्रानुसार आता हे पद आवाडे गटाला मिळाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन सदस्य आहेत. बुधवारच्या सत्तारुढ भाजपच्या पार्टी मिटींगला शुभांगी शिंदे उपस्थित होत्या तर पद्माराणी पाटील अनुपस्थित होत्या. जि.प.मध्ये स्वाभिमानीची भूमिका ही गेल्या काही वर्षात सत्तेच्या बाजूने राहिली आहे. शिवाय काँग्रेसचे दोन सदस्य व राष्ट्रवादीच्या एका सदस्याची भूमिका ही भाजप आघाडीला पूरक अशी आहे.

तर मंडलिक, आबिटकर गटाची मते निर्णायक

भाजप व शिवसेनेत लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या राजकारणात आतापर्यंत भाजप आघाडीच्या विरोधात सक्रिय असलेले सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर गट येत्या कालावधीत कोणती भूमिका घेणार यावरही जि.प.तील राजकारण अवलंबून राहणार आहे. या दोन्ही गटाचे मिळून पाच सदस्य आहेत. आवाडे गटापाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनाही भाजपासून लांब गेली तर मंडलिक आणि आबिटकर गटाची मते निर्णायक ठरणार आहेत.

'भाजप, जनसुराज्य, शिवसेना, ताराराणी आघाडी, चंदगड विकास आघाडी व मित्रपक्षांच्या आघाडीकडे भक्कम बहुमत आहे. आगामी काळात भाजप आघाडीकडील सदस्य संख्या ४० पर्यंत पोहचेल. विरोधकांचे सत्ता काबीज करण्याचे स्वप्न हे मृगजळच ठरणार आहे. आवाडे गट बाजूला गेला तरी भाजप व मित्रपक्ष आघाडी मजबूत आहे.

विजय भोजे, पक्षप्रतोद भाजप आघाडी

'आवाडे गटाचे दोन्ही सदस्य हे विरोधकाची भूमिका बजावतील. जि.प.मध्ये आवाडे गटाला मिळालेले पद हे स्वाभिमानी शेतकरी संघटना व आवाडे गटातील सत्तेच्या फॉर्म्युलानुसार मिळाले आहे. त्यामुळे त्या पदावरुन कुणी आक्षेप घ्यायचे कारण नाही. येत्या अध्यक्षपदाच्या निवडीत नक्कीच बदल घडवू.

राहुल आवाडे, सदस्य, आवाडे गट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक आरोग्यावर शनिवारी परिषद

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लैंगिक आरोग्याविषयी समाजामध्ये तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन व पॅरेंटहूड इंटरनॅशनल या राष्ट्रीय संस्थेच्यावतीने 'महासेक्सकॉन २०१९' या दोन दिवसीय राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले आहे. येथील हॉटेल सयाजी येथे शनिवारी (ता. ९) आणि रविवारी (ता. १०) येथे परिषद होणार असून डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग परिषदेचा सहसंयोजक आहे. देशभरातील चारशेहून अधिक डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.

संस्थेचे सचिव राजसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. शारीरिक आरोग्याबाबत लोक जागरूक असतात. मात्र ही जागरूकता मानसिक व लैंगिक आरोग्याबाबत दिसून येत नाही. डॉक्टरांमध्येही याबाबत अनभिज्ञता आढळून येते. म्हणूनच लैंगिक आरोग्याबाबत व लैंगिक आजाराचे निदान व उपचार करण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याने राज्यात प्रथमच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे

शनिवारी (ता. ९) परिषदेत वैद्यकीय तज्ज्ञ चर्चा करणार असून रविवारी (ता. १०) आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय देशपांडे उपस्थित राहणार आहेत. परिषदेमध्ये डॉक्टरांसाठी 'सेक्सॉलॉजी' या विषयावर कार्यशाळा, परिसंवाद व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील तज्ज्ञ या परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये डॉ. नारायण रेड्डी, डॉ. संजय देशपांडे, डॉ. व्यंकट रमण, डॉ. राज ब्रह्मभट्ट, डॉ. पद्मिनी प्रसाद, डॉ. दीपक जुमानी, डॉ. अल्ला सत्यनारायण रेड्डी या नामवंत डॉक्टरांचा समावेश असेल. पत्रकार परिषदेस डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रताप पाटील, डॉ. बसवराज हंचनाळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिल्यादेवींचा विचार समोर आणा

$
0
0

सहकारमंत्र्यांचे आवाहन, सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार

म. टा. प्रतिनिधी, सोलापूर

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाज व देशासाठी आयुष्यभर लढून समाज सुधारण्याचे महान कार्य केले आहे. त्यांचे देशप्रेम, लढवय्या, एकसंघवृत्तीचा विचार नव्या पिढीसमोर आणून सोलापूर विद्यापीठाने देशात एक आदर्शवत निर्माण करावे,' असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन नामविस्तार करण्याचा सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून सहकारमंत्री देशमुख हे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार नारायण पाटील, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, शेळी व मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे राजाभाऊ सरवदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य बँकेचे संचालक अविनाश महागावकर, समता गावडे, गोपीचंद पडळकर, नगरसेवक चेतन नरोटे, माजीमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, माजी महापौर अरुणा वाकसे, बाळासाहेब शेळके, विजयकुमार हत्तुरे, उत्तम जानकर, प्रा. महेश माने, मोहन डांगरे उपस्थित होते. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील यांनी स्वागत केले. जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. महात्मे यांचीही यावेळी भाषणे झाली.

चौकट

देशमुखांविरुद्ध निदर्शने

सहकारमंत्री देशमुख यांनी नामांतरासाठी देशमुखांनी कोणतेच प्रयत्न न केल्याचा आरोप करत उपस्थिती कार्यकर्त्यांनी घोषणा देत गोंधळ घातला. त्यामुळे देशमुखांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले. त्यातच एफआरपीवरूनही शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी देशमुखांना टार्गेट करत अर्वाच्च भाषा वापरल्याचे चर्चा होती. दरम्यान सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराजांचे नाव न देता अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणा केल्यावरून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. आजच्या कार्यक्रमावेळी गोंधळ घालू नये म्हणून पोलिसांनी सकाळीच शिवाचे शहराध्यक्ष शरणबसप्पा केंगनाळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादावादी, खडाजंगी अन् दिलगिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अर्थसकंल्पाच्या उशिरा मिळालेल्या प्रती, आयत्या वेळेचा विषय म्हणून बजेट सादर करण्याची पद्धत आणि इचलकरंजी येथे महिला व बालकल्याण समितीच्या कार्यक्रमपत्रिकेवर खासदार व आमदारांच्या नावाचा उल्लेख टाळण्याचा प्रकार यावरुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला. बजेटवरुन पक्षप्रतोद विजय भोजे व काँग्रेसचे सदस्य राहुल आवाडे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी उडाली. गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी ग्रामपंचायतीचा हॉल भाडेतत्वावर देण्यावरुन राष्ट्रवादीचे सदस्य सतीश पाटील व शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्यामधील वाद टोकाला पोहचला आणि दोघांनी सभागृहात एकमेकांना एकेरी भाषेत आव्हान दिल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अर्थ समिती सभापती अंबरिश घाटगे यांनी आयत्या वेळचा विषयात बजेट मांडण्यास सुरूवात केली. त्याला काँग्रेसचे सदस्य राहुल आवाडे यांनी जोरदार आक्षेप घेतला. सभागृहात बजेट सादर होत असतानाही सदस्यांना प्रती मिळाल्या नाहीत. बजेटचा अभ्यास कधी करणार आणि सूचना कशा मांडणार? मुळात आयत्या वेळचा विषय म्हणून बजेट मांडता येते का? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या टीकेला पक्षप्रतोद विजय भोजे यांनी प्रतिउत्तर देताना बजेट सादरीकरणाला सत्तारुढ आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे, अगोदर बजेट सादर होऊ दे नंतर चर्चा करु, अशी भूमिका मांडली. यावरुन आवाडे व भोजे यांच्यामध्ये खडाजंगी उडाली.

या गोंधळातच सदस्य राजवर्धन निंबाळकर, प्रसाद खोबरे, जीवन पाटील हे बजेट सादर करण्याची मागणी करु लागले. विरोधी सदस्य सतीश पाटील, मनोज फराकटे, जयवंत शिंपी यांनी घाईघाईने बजेट मांडण्याचा प्रकारावरुन प्रशासनाला लक्ष्य केले. बजरंग पाटील यांनी सत्ताधाऱ्यांनी अरेरावीची भाषा करु नये अशी सूचना केली. सभापती घाटगे यांनी बजेट मांडण्याचा आपला नैतिक अधिकार आहे. नियमानुसार बजेट मांडत असल्याचे सांगितले. त्यावर विरोधी गटाचे समाधान झाले नाही. अखेर अध्यक्षा शौमिका महाडिक व सीईओ अमन मित्तल यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पाऊण तासाच्या गोंधळानंतर दुपारी सव्वा दोन वाजता बजेट सादर झाले.

.....

सभापतींची माफी

इचलकरंजीत गेल्या आठवड्यात महिला व बालकल्याण विभागातर्फे कार्यक्रम झाला. कार्यक्रमपत्रिकेवर खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. यावरुन भाजपचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांना प्रोटोकॉल माहित नाही का ? कुणाच्या सांगण्यावरुन तुम्ही नावे वगळली, अशी विचारणा केली. सदस्या विजया पाटील यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यावर रसाळ यांनी महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमपत्रिका तयार केल्याचे सांगितले. त्यावर खोबरे हे आक्रमक होऊन खासदार व आमदारांच्या नावांचा उल्लेख टाळणे चुकीचे आहे. आमदार हाळवणकर याप्रश्नी विधानसभेत लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. सभापती मगदूम यांनी अधिवेशन सुरू असल्याने आमदार येणार नाहीत असे समजून नावाचा उल्लेख टाळला. याप्रश्नी माझ्याकडून चूक झाली असून सर्वांची दिलगिरी व्यक्त करते, असा खुलासा केला. सभापतींनी माफी मागितल्याने या विषयावरील चर्चा थांबली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.सभा...अध्यक्षांची सदस्यांना खाली बसण्याची सूचना

$
0
0

मी बोलत असताना खाली बसायचे

बजेट सादरीकरणादरम्यान सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सदस्य मोठमोठ्याने बोलत असल्याने कोण काय बोलत आहे हेच समजत नव्हते. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता आहे. बजेट सादर झाल्यानंतर सदस्य सूचना करु शकतात. त्यामुळे सगळ्यांनी सभापतींनी सहकार्य करावे, अशी सूचना केली. त्या बोलत असताना राहुल आवाडे पुन्हा बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावर अध्यक्षा आक्रमक होऊन म्हणाल्या,' राहुल, मी बोलत असताना खाली बसायचे.'

....

...........

कोट

'बजेटमध्ये आरोग्य सेवेसाठी आणखी तरतूद आवश्यक होती. सदस्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी कसल्याही प्रकारचे नियोजन केलेले नाही. शिवाय विषय पत्रिकेवर १७ विषयांची टिप्पणी असताना सभेत ९७ विषय दिसत आहेत. आयत्या वेळेचे म्हणून किती विषयांचा समावेश करणार, यामागील कारण समजत नाही. सदस्यांना गृहीत धरुन कामकाज करणार असाल तर तो सभागृहाचा अवमान ठरेल.

प्रा. शिवाजी मोरे, सदस्य, जनसुराज्य शक्ती पक्ष

.............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर विद्यापीठ नामकरणात अक्षम्य चूक: वा. ना. उत्पात

$
0
0

पंढरपूर:

सोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद अद्याप संपुष्टात आला नाही. सुरुवातीला लिंगायत समाजाने यास आक्षेप घेत सिद्धेश्वर असे नामकरण करण्याची मागणी केली होती; मात्र काल गोंधळ आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ' असे नामकरण करण्यात आले. हे नाव चुकीचे असून ही बाब विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या लक्षात कशी आली नाही, असा संतप्त सवाल ज्येष्ठ अभ्यासक वा. ना. उत्पात यांनी केला आहे.

उत्पात यांच्या म्हणण्यानुसार, 'अहिल्या' असा केलेला उल्लेख पूर्ण चुकीचा असून, ऐतिहासिक दस्तावेजात अहल्या असे नाव आहे. अहिल्याचा अर्थ आहि म्हणजे साप आणि ला म्हणजे आणणारी म्हणजेच साप आणणारी असा नावाचा अनर्थ होत असून, खरे नाव 'अहल्या' आहे. याचा अर्थ सूर्यप्रकाश पसरवणारी थोर शक्ती असल्याचे उत्पात यांनी सांगितले. आजवरच्या सर्व ऐतिहासिक दस्तावेजात अहल्या हेच नाव असून, विद्यापीठाने आणि सरकारने असे चुकीचे नाव देत अर्थाचा अनर्थ कसा केला, असा सवालही त्यांनी केला.

माधवराव पेशव्यांच्या पत्रात देखील गंगा जल समान मातोश्री पुण्यश्लोकी अहल्याबाई असा उल्लेख आढळतो, अशी माहिती उत्पात यांनी दिली. नामकरणात वापरलेले पुण्यश्लोक हा पुल्लिंगी असून त्याऐवजी पुण्यश्लोकी असायला हवे असे त्यांनी सांगितले. याबाबत आमदार गणपतराव देशमुख आणि अभ्यासक आण्णा डांगे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगत आतातरी विद्यापीठाने ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करून दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षक भरती प्रक्रिया उधळू’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषदेतर्फे सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये खुल्या व एसईबीसी प्रवर्गातील जागा शून्य दाखविल्या आहेत. पवित्र पोर्टलवर अपेक्षित बिंदू नामावली भरुन व त्या आधारे जाहिरात काढून मराठा समाजाचे शिक्षक भरतीमध्ये नुकसान केले आहे. मराठा समाजाला दिलेल्या १६ टक्के आरक्षणाचा शिक्षक भरती प्रक्रियेत समावेश करावा, अन्यथा भरती प्रक्रिया उधळून लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अमन मित्तल यांना निवेदन दिले आहे. शिष्टमंडळात सुनील जाधव, विकी जाधव, अभिजित कांझर, भगवान कोईगडे, नेताजी बुवा, अरुण जकाते, आतिष यादव, कृष्णा नवघरे आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१२४६ कोटी एफआरपी थकीत

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर :एकरकमी एफआरपी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन, एफआरपीचे तुकडे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागातील साखर हंगामाची सांगता होत आहे. विभागातील सहा ते सात कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला असून पुढील पंधरा दिवसांत बहुतांशी कारखान्यांचा हंगाम समाप्त होणार आहे. दरम्यान १५ फेब्रुवारीपर्यंत गाळप झालेल्या ऊस उत्पादकांना विभागातील ३६ कारखान्यांनी बिलापोटी ३६५३ कोटी रुपये जमा केले असून १२४६ कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन २९६६ रुपये तर हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याने २९०६ रुपयांप्रमाणे बिल जमा केले आहे.

यंदाच्या हंगामात एक लाख ४२ हजार २८० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड आहे. एफआरपी अधिक दोनशे रुपये बिल द्यावे अशी मागणी हंगाम सुरु होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोव्हेंबर २०१८ मध्ये केली होती. पण कारखान्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळलेले साखरेचे दर आणि देशांतर्गत बाजारात साखरेचा कमी झालेला उठाव ही कारणे सांगून एकरकमी एफआरपी देणे अशक्य आहे, असे सांगून कारखाने बंद ठेवले होते. अखेर एकरकमी एफआरपी देण्यावर तोडगा निघाल्यानंतर नोव्हेंबरच्या मध्यावर तब्बल १२ दिवसांनी कारखाने सुरू झाले.

एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असूनही कारखान्यांनी उसाचे गाळप झाल्यानंतर दीड ते दोन महिने बिले दिली नव्हती. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यांवर उतरली. तसेच पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर ठिय्या मारल्यावर कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या. तरीही कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडून उसाचे प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे बिल जमा केले. साखर हंगामाची समाप्ती होत असतानाही अजूनही कारखान्यांनी उसाचे दुसरे बिल काढलेले नाही. २३०० पेक्षा जास्त बिल काढण्यात खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. तरीही २८ फेब्रुवारी कोल्हापूर विभगातील ३६ कारखान्याचे २८ अखेर १२४६ कोटी एफआरपी थकीत आहे. केंद्र सरकारने साखर खरेदीचा दर २९ रुपयांवरून ३१ रुपये केला आहे. तसेच एफआरपी भागवण्यासाठी केंद्र सरकारने सॉफ्ट लोन देण्याच निर्णय घेतला आहे. या कर्जाचे सात ते दहा टक्क्यांपर्यतचे व्याज सरकारकडून भरले जाणार आहे. त्यामुळे उर्वरित एफआरपीची रक्कम कारखान्याकडून जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, गगनबावडा, राजारामसह आठ कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. दूधगंगा, कुंभीसह अनेक कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पंधरा दिवसात हंगाम संपणार असला तरी एकरकमी एफआरपी बँक खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

\Bएफआरपी दिलेले टॉप कारखाने

\Bकारखाना एफआरपी एफआरपी पेड एफआरपी थकीत प्रति टन बिल काढलेली रक्कम

पंचगंगा २९६६ ९६ कोटी ४४ कोटी २९९६६ रुपये

जवाहर २९०५ ३३५ कोटी २४ कोटी २९०६ रुपये

शिराळा २८२३ १४४ कोटी ११६ कोटी २८२३ रुपये

वसंतदादा २७१७ १८२ कोटी १२१ कोटी २७१७ रुपये

सदगुरु २४९९ ११५ कोटी १०१ कोटी २४९९ रुपये

केन अॅग्रो २६१९ ४९ कोटी २३ कोटी २४५० रुपये

हुतात्मा अहिर ३०६८ १०१ कोटी ४७ कोटी २४५५ रुपये

दालमिया ३०४९ २२४ कोटी १९० कोटी २४५० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाललैंगिक अत्याचाराविरोधात प्रबोधन

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाळा, हायस्कूलमध्ये नोकरी म्हटले की सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी वेळ ठरलेली. कार्यालयीन कामकाज पूर्ण केले की संपली ड्यूटी, असा समज आहे. मात्र, अध्यापन आणि कार्यालयीन कामकाज एवढ्यापुरतेच कामकाज मर्यादित न ठेवता महापालिका शाळेतील सात शिक्षिकांनी विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी जागृती, समुपदेशन वर्ग या माध्यमातून आरोग्य आणि सुरक्षितता याविषयी जाणीव जागृती सुरू केली आहे.

पर्यवेक्षिका उषा सरदेसाई, सहायक शिक्षिका सरिता सुतार, सुजाता खोत, अर्चना सुतार, शीतल रायकर, स्मिता कारेकर, राधिका पोवार यांनी पहिल्यांदा या उपक्रमाविषयी प्रशिक्षण घेतले, कार्यशाळेत सहभाग घेतला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सहकार्यातून हा उपक्रम सुरू आहे. त्यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महापालिकेच्या प्रत्येक शाळेत प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याचे ठरविले.

व्याख्यान, चर्चासत्र, चित्रफिती, पालक मेळावा या माध्यमातून मुलांची सुरक्षितता, पालकांनी घ्यावयाची काळजी, मुलांनी घ्यावयाची सावधगिरी यासंबंधी मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. प्रत्येक शिक्षिकेवर ठराविक शाळांची जबाबदारी सोपविली. महापालिकेच्या एकूण ५९ शाळा आहेत.

मुला-मुलींशी संवाद, चर्चात्मक स्वरूपात त्यांची मने जाणून घेतली. 'माझे शरीर माझा अधिकार, सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा' याविषयी प्रबोधन केले. त्यांना कुठल्या पद्धतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते याचा कानोसा घेतला. सहज सोप्या भाषेतून मुलांना आरोग्य, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा यासंबंधी माहिती दिली जाते. हा प्रबोधनात्मक उपक्रम महापालिकेच्या बहुतांश शाळांत पोहोचला आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षिकांना सामावून घेतल्याने त्याची व्याप्ती वाढली आहे.

०००

लहान मुलांचे भावविश्व हे निरासग असते. लहान वयात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अत्याचार झाला तर त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ होतात. असे प्रकार टाळावेत आणि शालेय मुले कुठल्याही प्रकारच्या विकृतीला, छळाला बळी पडू नयेत यासाठी शाळास्तरावर प्रयत्न सुरू आहेत. व्याख्यान, चित्रफिती, चित्रे दाखवून त्यांच्यामध्ये जाणीव जागृतीवर भर आहे.

सरिता सुतार, सहायक शिक्षिका

००००

तक्रार निवारणासाठी विशेष प्रयत्न

किशोरवयीन मुले-मुली अनेकदा उघडपणे चर्चा करत नाहीत. त्यांना नाहक कुणी त्रास दिला, एखाद्या समस्येला तोंड द्यावे लागले तर तक्रार करत नाहीत. त्यामुळे अशा गैरप्रकारांना चाप बसावा यासाठी प्रयत्न होतात. प्रत्येक शाळेत तक्रार निवारण पेटीची सोय केली आहे. त्याद्वारे मिळालेल्या तक्रारी, अडचणी जाणून घेऊन उपाययोजना आखल्या जातात. प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे मुलांमध्ये जाणीव जागृती वाढली असून विद्यार्थी धीट बनल्याचे शिक्षिकांचे मत आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानापमान नाट्य, सभापतींचा बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित पोषण पंधरवडा प्रारंभ सोहळ्याच्या निमित्ताने पदाधिकारी आणि सदस्यांतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली. महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनी कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला. दुसरीकडे समितीतील आठ महिला सदस्याही उपस्थित नव्हत्या. दरम्यान, महिला बालकल्याण विभागाच्या कार्यक्रमाला विभागाच्या सभापती गैरहजर राहिल्यामुळे जिल्हा परिषदेत कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा रंगली.

महिला व बालकल्याण विभागातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला कायदेविषयक जाणीव जागृती मेळावा व पोषण पंधरवडा प्रारंभ सोहळा गुरुवारी झाला. कार्यक्रमाची नियोजित वेळ सकाळी १०.३० ची होती. मात्र, बहुतांश सदस्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत होती. महिला व बालकल्याण समिती सदस्या आकांक्षा पाटील (शिवसेना), कल्पना चौगले (भाजप), वंदना पाटील (काँग्रेस), श्रीमती रेखा हत्तरकी (महाडिक गट), शिवानी भोसले (शिवसेना, मंडलिक गट), डॉ. पद्माराणी पाटील (स्वाभिमानी संघटना), सुनीता रेडेकर (भाजप), शिल्पा खोत (राष्ट्रवादी) या सदस्या अनुपस्थित होत्या.

अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी महिला सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कार्यक्रम घेतल्याबद्दल कार्यक्रमापासून लांब राहिल्याचे मगदूम यांनी सांगितले, तर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता असल्याने महिला दिनाचा कार्यक्रम आठ मार्चऐवजी सात मार्चला आयोजित केल्याचे अध्यक्षांचे म्हणणे आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी कार्यक्रमपत्रिका तयार करताना प्रोटोकॉल पाळला नसल्याचा आक्षेप नोंदविला आहे. यासंबंधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ म्हणाले, 'कार्यक्रमपत्रिका तयार करताना राजशिष्टाचार पाळला आहे. शिवाय बुधवारी सर्वसाधारण सभेप्रसंगी समिती सदस्यांना गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देऊन उपस्थित राहण्याची विनंती केली होती. काही सदस्यांनी मतदारसंघात कामे सुरू असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही कळविले होते.'

००००

महिला दिनानिमित्त आठ मार्चला कार्यक्रम आयोजित करावा असे सदस्यांचे म्हणणे होते. अध्यक्षांना याची कल्पना दिली होती. पण त्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करत एक दिवस अगोदर कार्यक्रम ठेवला. समितीच्या अन्य सदस्यांना विश्वासात घेतले नाही, यामुळे गुरुवारी झालेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

वंदना मगदूम, सभापती, महिला व बालकल्याण समिती

०००

पोषण पंधरवडा कार्यक्रमाच्या पत्रिकेत खासदार राजू शेट्टी यांच्या नावाचा उल्लेख करताना प्रोटोकॉल पाळला नाही. इचलकरंजीतील कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून सभापती मगदूम यांनी माफी मागितली. मग कोल्हापुरातील कार्यक्रमाच्या पत्रिकेतील चुकीची जबाबदारी कुणावर? यासंबंधी प्रशासनाने खुलासा करावा.

डॉ. पद्माराणी पाटील, सदस्या, स्वाभिमानी संघटना

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याच्या नेतृत्वाची स्वप्ने बघू नका

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एकेकाळी ज्यांना जिल्हा परिषद नीटपणे सांभाळता आली नाही, त्यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची स्वप्ने बघू नयेत,' असा टोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांना त्यांचे थेट नाव न घेता लगाविला.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला कायदेविषयक जाणीव जागृती मेळावा झाला. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पोषण पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण हॉल येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी अॅड. पल्लवी थोरात यांचे 'महिला हितसाठी कायदे' विषयावर व्याख्यान झाले.

याप्रसंगी आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून आक्काताई ढेरे आणि राष्ट्रीय पोषण आहार पुरस्कार मिळाल्याबद्दल राजश्री साळसकर यांचा सत्कार झाला. जिल्हा परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षा महाडिक व पक्षप्रतोद विजय भोजे यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्याची प्रशंसा केली. अध्यक्षा महाडिक यांनी खासदार महाडिक यांनी सर्वच घटकांना अभिमान वाटावा अशा पद्धतीने कामकेल्याचे नमूद केले.

उद्घाटनप्रसंगी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'सुदृढ भारत घडविण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या प्रश्नांची जाणीव असून कर्मचाऱ्यांचे पेन्शन, वेतनाचा प्रश्न सुटावा यासाठी लोकसभेत आवाज उठविला. त्यांना मानधनाऐवजी वेतन मिळावे, त्यांच्या वयोमर्यादेत वाढ, पेन्शन व इतर प्रश्नांच्या सोडवणुकीला चालना देऊ. शिवाय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ५० अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिल्ली दौरा घडवू. येत्या निवडणुकीत तुमची साथ मोलाची आहे.'

पक्षप्रतोद विजय भोजे यांनी, अंगणवाडी सेविकांची मानधनवाढ व सुरक्षिततेसाठी खासदार महाडिक यांनी लोकसभेत प्रश्न मांडला. त्यामुळेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाल्याचे सांगितले. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांनी समाज घडविण्याचे राष्ट्रीय कार्य करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी जिल्हा परिषद असल्याचे सांगितले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी प्रास्ताविक केले. शाहीर रंगराव पाटील यांनी महिला चळवळीवर आधारित गीते सादर केली. याप्रसंगी बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील, समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे, सीईओ अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ. फारुख देसाई आदी उपस्थित होते.

०००

पालकमंत्र्यांची अनुपस्थिती

महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही आमंत्रित केले होते. याशिवाय खासदार राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांची नावे कार्यक्रम पत्रिकेत होती. मात्र, कुणीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली नाही.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकिंग क्षेत्रातही सज्ज आम्ही

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:@satishgMt

कोल्हापूर : आर्थिकदृष्ट्या संपन्न कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी, नागरी, जिल्हा, राष्ट्रीय आणि खासगी बँकांचे जाळे विस्तारत आहेत. अनुभवी, तज्ज्ञ अधिकारी बॅकिंगमध्ये योगदान देत आहेत. त्यामध्ये महिला अधिकाऱ्यांचे योगदानही ठळकपणे अधोरेखित होत आहे. बॅकिंग क्षेत्रातील महत्वाच्या पदांवरील कार्यभार महिला अधिकारी यशस्वीपणे सांभाळतात.

टेबल टेनिसपटू ते क्षेत्र अधिकारी

सुचित्रा शिरोडकर यांनी १३व्या वर्षापासून कोल्हापुरात टेबल टेनिस खेळात शालेय स्तरावरून खेळाडू म्हणून करिअरला सुरुवात केली. राज्य, राष्ट्रीय स्पर्धा आणि विद्यापीठ पातळीवरील स्पर्धांत घवघवीत कामगिरी केली. खेळातील त्यांचे प्राविण्य लक्षात घेऊन युनियन बँक ऑफ इंडियाने त्यांना १९८४ मध्ये बँकेच्या सेवेमध्ये सामावून घेत अधिकारीपद दिले. बँकेत काम करतानाही त्यांची टेबल टेनिसमधील कारकीर्द बहरली. १९८६ मध्ये दक्षिण कोरियात सेऊल एशियाडमध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल बँकेने त्यांना बढती दिली. १९८७मध्ये त्यांचा किरण नारकर यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर पतीनेही त्यांना खेळात प्रोत्साहन दिले. दुसरीकडे बँकेनेही त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्या सहज पेलल्या. सध्या त्या कोल्हापूर क्षेत्रीय प्रमुखपद भूषवत आहेत. युनियन बँकेची भारतात ६३ क्षेत्रीय कार्यालये असून यामध्ये नारकर या एकमेव महिला अधिकारी आहेत. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील ५९ शाखांचा कार्यभार त्यांच्याकडे आहे. खेळांमधील येणारी आव्हाने आणि खिलाडूवत्तीच्या गुणांमुळे मोठ्या पदावर झेप घेणे शक्य आहे, असे नारकर यांचे मत आहे.

आवाडे बँकेच्या 'किल्लेदार'

हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या असिस्टंट मॅनेजर म्हणून पदभार सांभाळणाऱ्या रुपाली विजय किल्लेदार यांनी बी.कॉम.ची पदवी घेतली आहे. जीडीसीअँडए, जेआयआयबी, सीएआयआयबी या परीक्षा त्या उत्तीर्ण आहेत. बँकिंग क्षेत्रात थेट ग्राहक व कर्जदारांची संबध येत असल्याने काम करताना कौशल्य पणाला लावत विविध पदांवर त्यांनी झेप घेतली आहे. आवाडे बँकेपूर्वी त्यांनी सुभद्रा बँक आणि एचडीएफसी बँकेत काम केले आहे. ग्राहकांशी संवाद वाढवून त्याला ठेवी ठेवण्यासाठी विश्वास निर्माण करणे आणि चांगले कर्जदार शोधून त्यांच्याकडून परतफेड करवून घेण्याच्या गुणामुळे बँकेने त्यांच्यावर असिस्टंट मॅनेजरपदाची जबाबदारी दिली आहे. बदलत्या काळातील बँकिंगची आव्हाने त्यांनी पेलली आहेत.

कर्जवसुलीवेळी तलवार हल्ला

शिवाजी पेठ निवृत्ती चौकात कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या शाखाधिकारी म्हणून रंजना स्वामी काम करतात. बीएसह जीडीसी अँड एची पदवी मिळवून जिल्हा बँकेत क्लार्क म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सिनिअर असिस्टंटपदासह महिला कक्ष अधिकारी म्हणून चांगली कामगिरी केली. २०१४मध्ये त्यांची शाखाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सुरुवातीला काम करताना अडचणी आल्या. पण, स्टाफने साथ दिल्याने त्यांना चांगले काम करता आले. ग्राहकांशी चांगला संवाद साधताना ठेवीचे प्रमाण वाढवताना कर्ज वसुलीही केली आहे. कागलमध्ये वसुली अधिकारी म्हणून काम करताना एका कर्जदाराने त्यांच्या पथकावर थेट तलवार हल्ला केला होता. पण, रंजना स्वामी डगमगल्या नाहीत. दौलत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुली पथकात त्या कार्यरत होता. शिवाजी पेठेतील शाखेत स्वामी यांनी कामाद्वारे आपला ठसा उमटवला आहे.

४८ हजार बचत गटांचे संघटन

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील महिला विकास कक्ष अधिकारीपदी स्नेहल करंडे कार्यरत आहेत. त्यांनी बँकेत कॅशिअर म्हणून कारकीर्द सुरू झाली. राजारामपुरी, शाहूपुरी शाखेतही त्या कार्यरत होत्या. बी.कॉम. पदवीधर असलेल्या करंडे यांनी जीडीसी अँड ए, एमबीए फायनान्स ही पदवी मिळवली आहे. २०१२पासून त्या महिला विकास कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्यातील महिला बचत गटांना बँकेतर्फे पतपुरवठा करून गटांना स्वावलंबी बनवून व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे यासाठी त्यांचा कक्ष काम करत आहे. ग्रामीण भागातील ४८ हजार बचत गटांना त्यांनी अर्थसहाय्य केले आहे. या बचत गटांची उलाढाल एक हजार कोटींची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात नाल्यांचे सांडपाणी रोखण्यास अपयश

$
0
0

फोकस - पंचगंगा प्रदूषण

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : महापालिकेने पर्यावरण अहवालामध्ये पंचगंगा नदी आणि ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न अधोरेखित केल्यानंतर सांडपाणी रोखण्यासाठी अथक प्रयत्न केले. दुधाळी व कसबा बावडा येथील सांडपाणी प्रकल्प कार्यन्वित केला. पण, अद्याप शहरातील सात नाल्यांतून वाहून जाणारे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषणाच्या प्रश्नाची पूर्णत: निर्गत झालेली नाही. बापट कँप व लाइन बाजार येथून ऑगस्ट महिन्यापासून पंपिंग सुरू होणार असल्याने प्रदूषणाचा प्रश्न आणखी सहा महिने तरी भेडसावत राहिल अशी स्थिती आहे.

शहरातून वाहणाऱ्या लहान-मोठ्या नाल्यांतील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. शहरातील १२ नाल्यांचा यामध्ये प्रमुख वाटा आहे. गेली अनेक वर्षे याविरोधात पर्यावरणप्रेमी नागरिक, पर्यावरण अभ्यासक, चळवळीतील कार्यकर्त्यांकडून पाठपुरावा सुरू होता. प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास सोसावा लागणाऱ्या इचलकरंजी परिसर आणि शिरोळ तालुक्यातील नागरिकांकडून महानगरपालिकेकडून होणाऱ्या प्रदूषणाबाबत विचारणा होत होती. त्यामुळे महापालिकेने आराखडा तयार करून उपाययोजना सुरू केल्या. मात्र, त्यांची गती संथच राहिली.

महापालिकेने २०१४-१५ च्या पर्यावरण अहवालामध्ये पंचगंगा नदी आणि रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न अधोरेखित केल्यानंतर उपाययोजना करण्यास सुरुवात केली. प्रमुख १२ नाले वळविण्यासोबत दुधाळी व कसबा बावडा येथील सांडपाणी प्रकल्प कार्यन्वित करण्याचा निर्णय घेतला. पण, दोन्ही प्रकल्प कार्यन्वित होण्यास विलंब लागला. या टप्प्यात अनेकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेवर कारवाई केली. बँक गॅरंटी जप्त करण्यापर्यंत आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत कारवाईचा टप्पा गेला.

सद्यस्थितीत दुधाळी येथील १७ एमएलडी सांडपण्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हरित लवादाने महापालिकेला याप्रश्नी चांगलेच पटकारले होते. दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यन्वित झाला असला तरी कसबा बावडा येथील ७६ एमएलडीचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झालेला नाही. जयंती नाल्यातून सध्या सांडपाणी उपसा सुरू असल्याने प्रकल्प ६० टक्केच कार्यन्वित आहे. जोपर्यंत बापट कँप आणि लाइन बाजार येथील सांडपाण्याची उचल होत नाही, तोपर्यंत शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळतच राहणार. दोन्ही ठिकाणांहून सांडपाण्याची उचल करण्यासाठी पंपिंग स्टेशनची उभारणी सुरू असून लाइनबाजार येथील पंपींग स्टेशन जूनमध्ये तर बापट कँप येथील पंपिंग स्टेशन ऑगस्टपर्यंत कार्यन्वित होणार असल्याचे महापालिकेचे पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे यांनी सांगितले.

मंजुरीच्या टप्प्यावर

शहरातील सात नाल्यातील सांडपाणी अद्याप थेट नदीत मिसळत आहेत. या नाल्यांचे सांडपाणी अडवून ते एसटीपी प्लान्टकडे वळविण्यासाठीच्या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तांत्रिक मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीनेही त्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार या कामाची वर्क ऑर्डर लवकरच काढण्यात येणार आहे. सात नाल्यांतील सुमारे सात ते आठ एमएलडी सांडपाणी एसटीपी प्लान्टकडे वळवल्यानंतर शहरातून नदीत जाणारे संपूर्ण सांडपाणी रोखण्यात महापालिकेला यश येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निवडणूक कामकाज सुरळीतपणे पार पाडा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर विविध समित्या स्थापना केल्या आहेत. समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूकविषयक कामकाजासंबंधी सतर्क राहावे. निवडणूक कामकाज सुरळीतपणे करावे,' अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिल्या.

जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांसाठी आयोजित प्रशिक्षणात ते बोलत होते. राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रशिक्षण झाले.

देसाई म्हणाले, 'प्रत्येक निवडणूक वेगळी असते. हे काम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आनंदाने करावे. समित्यांची माहिती, त्यांचे कामकाज निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसातून किमान दोन तास निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील समितीच्या कामकाजाबाबत वाचन करावे. निवडणूक कामकाजाला सर्वोच्य प्राधान्य द्यावे.'

अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, हातकणंगलेच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी, सहायक निवडणूक खर्च निरीक्षक बाबा जाधव यांनी निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फौजदारी दाखल करण्याचे आदेश

$
0
0

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील कुदनूर येथील माजी सरपंच सुखदेव शहापूरकर व ग्रामसेवक अनंत गडदे यांच्या बेकायेदशीर कामकाजप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने दिला आहे. याकामी चौकशी करण्यासाठी सहायक गटविकास अधिकारी आर. जी. पाटील, विस्तार अधिकारी डी. डी. माळी यांची नियुक्ती केली आहे. समितीला पंधरा दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याची मुदत असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिले आहे. यासंदर्भात चंद्रकांत कांबळे यांनी तक्रार केली होती. दोषींवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ता आल्यावर कर्जमाफी करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काबाडकष्ट करुन शेतकरी उत्पादन घेत असतो. पण नैसर्गिक व अन्य कारणांनी शेतकरी अडचणीत आला त्याला सन्मानाने जगता यावे यासाठी त्याला मदत करणे सरकारचे कर्तव्य असते. आघाडी सरकारच्या काळात आम्ही कर्जमाफीत 'सरसकट' शब्द ठेवला होता. पण या सरकारने 'सरसकट' शब्द ठेवला नाही. कर्जमाफीची प्रक्रिया किचकट ठेवली. त्याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर कर्जमाफी निश्चित केली जाईल,' अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पवार यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तरे देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

'ना खाऊंगा, ना खाने दूँगा' या घोषणेचे काय झाले', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करत शरद पवार म्हणाले, 'राफेलबाबतच्या प्रश्नांवर जनता अस्वस्थ आहे. संसदेत या प्रश्नांवर उत्तर दिले जात नाही. राफेलच्या किंमतीबाबत वेगवेगळ्या किंमती सांगितल्या जात आहेत. सरंक्षण खात्याच्या ताब्यातील राफेलसंबधीची कागदपत्रे चोरीला गेली जात आहे, असे सांगितले जात आहे.'

'गेल्या चार वर्षात राज्य सरकारने फक्त घोषणाच केल्या' असा आरोप करत पवार म्हणाले, 'अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होऊनही प्रत्यक्ष कामास सुरुवात नाही. गुजरात मुंबई बुलेट ट्रेन, नागपूर समृद्धी मार्ग, धनगर आरक्षण प्रश्नासंदर्भात घोषणा होऊनही प्रत्यक्षात कामे झालेली नाहीत. मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे. फडणवीस सरकारने ज्यांची अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली होती तेच वकील निवृत्तीनंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात लढत आहेत.'

'काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत घोषणा झाली आहे. पण आघाडी होऊन दोन्ही पक्षांचे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. प्रचारात राष्ट्रवादी सक्रीय झाली आहे पण काँग्रेस सक्रीय नाही. दोन्ही पक्षांचा एकत्रित प्रचार करण्याबाबत मार्गदर्शन करावे' अशी विनंती सामाजिक न्याय विभागाचे विश्वजित कांबळे यांनी केल्यावर पवारांनी आमदार हसन मुश्रीफ यांनी मतभेद विसरुन एकजुटीने काम करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे ४६ जागावर एकमत झाले आहे. दोन जागेबाबत अद्याप निर्णय होणे बाकी आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि घटक मित्र पक्षांची नांदेड येथे पहिली एकत्रित प्रचार सभा झाली. नांदेड ही काँग्रेसकडे जागा असली तरी राष्ट्रवादीचे नेते सभेला उपस्थित होते. आघाडी अंतर्गत जागा वाटप झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकत्रित प्रचार सुरु होईल. कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी आहे. इथली जनता धर्मनिरपेक्ष पक्षासोबत राहणारी आहे. त्यामुळे सारे काही सुरळीत होईल.'

जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संगीता खाडे, राधानगरी तालुका काँग्रेस अध्यक्ष किसन चौगुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेश चव्हाण, प्रसाद उगवे, रोहित पाटील यांनी प्रश्न विचारले. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, पंडितराव केणे, जिल्हा बँक संचालक सर्जेराव पाटील, सर चिटणीस अनिल साळोखे, माजी नगरसेवक अदिल फरास, जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मुश्रीफ, कुपेकर अनुपस्थित

आजच्या कार्यक्रमाला कागल तालुक्यातील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर अनुपस्थित होते. तसेच महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यही नव्हते. कार्यकर्त्यांमध्ये ए. वाय. पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा संख्या लक्षणीय होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाजावाजा जास्त, अंमलबजाणी कमी

$
0
0

Appasaheb.Mali@timesgroup.com

Tweet@AppasahabmMT

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने वेगवेगळ्या योजना आखल्या. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शिरोलीपासून पुढील नदीकाठच्या गावांतील प्रदूषणाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी 'नमामि पंचगंगा' यांसारख्या उपक्रमाची घोषणा केली. तर करवीर तालुक्यांतील अकरा गावांसाठी 'टायगर बायो फिल्टर'संकल्पना जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेच्या दोन्ही योजनांचा गाजावाजा भरपूर झाला, पण अंमलबजावणी कमी असे चित्र पाहावयास मिळत आहे.

पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्याची वरदायनी समजली जाते. जिल्ह्यातील १७४ गावे नदीकाठावर आहेत. याशिवाय तीन औद्योगिक वसाहती, साखर कारखाने व इंडस्ट्रीजचे रसायनयुक्त पाणी थेट नदीत मिसळते. करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या तीन तालुक्यांचा यात समावेश आहे.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीच्या उपाय-योजनांमध्ये कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद या तीन प्रमुख घटकांचा समावेश आहे. मध्यंतरी देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगाा नदीचा समावेश झाला. प्रदूषणाच्या प्रश्नावरून हायकोर्टाने या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी तत्काळ उपाययोजना आखाव्यात असे आदेश दिले. जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात गावांची पाहणी करून नियोजन केले. कोणत्या गावात किती प्रदूषण होते, त्यावर काय उपाय करता येतील याचा आराखडा केला. अध्यक्षा महाडिक यांनी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी 'नमामि पंचगंगा' या उपक्रमाची घोषणा केली होती. नदी प्रदूषणमुक्तीच्या मोहिमांमध्ये लोकसहभाग महत्वाचा आहे हे जाणून त्यांनी हे पाऊल टाकले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक झाले. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकातही वेगवेगळ्या उपाय योजनांसाठी निधीची तरतूद केली गेली.

मात्र सद्यस्थितीत या उपक्रमात अजिबात सातत्य नाही. परिणामी एका चांगल्या योजनेला गती लाभली नाही. शिवाय प्रशासनाने, नदीकाठावरील गावातील सांडपाणी अडविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो प्रस्तावही मूर्त रुपात आलेला नाही. प्रशासनाने कृतिबद्ध कार्यक्रम आखला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली तर 'नमामि पंचगंगा' उपक्रमाची व्याप्ती वाढू शकते. अर्थात यासाठी प्रशासकीय आणि पदाधिकारी, सदस्य अशा दोन्ही पातळ्यांवर ईच्छाशक्ती दाखवावी लागेल.

'टायगर बायो फिल्टर'ला मुहूर्त कधी?

पंचगंगा नदीकाठावरील गावांपैकी विशेषत: करवीर तालुक्यातील ११ गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली आहे. शिवाय केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उपलब्ध निधीतील सात कोटी रुपयांचा या कामासाठी वापर करण्याचे प्रस्तावित आहे. टायगर बायो फिल्टर योजनेंतर्गत गावातील सांडपाण्यावर गावातच व्यवस्थापन केले जावे असे प्रस्तावित आहे. यामध्ये करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, हणमंतवाडी, शिंगणापूर, आंबेवाडी, वडणगे, गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड, वसगडे, उचगाव आणि शिये या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये हे प्रकल्प होणार आहेत. मात्र, सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रकल्पांना मुहूर्त कधी लाभणार? असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयोगानुसार वेतन द्या

$
0
0

कोल्हापूर: जिल्ह्यातील अनुदानित, खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज, अध्यापक विद्यालये व सैनिक शाळेतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार सातव्या वेतन आयोगानुसार करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केले आहे. शिष्टमंडळात मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, बाबा पाटील, मिलिंद पांगिरेकर, एन. एच. गाडेकर, अशोक हुबळे, शिवाजी कोरवी आदींचा समावेश होता. शिक्षण उपसंचालक, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक यांच्याकडे निवेदन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा परिषदेतर्फे, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर ३७ उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सीईओ अमन मित्तल, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे वितरित करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ सहायक, आरोग्य सेवक, पर्यवेक्षिका, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, सहायक स्थापत्य अभियंता या पदासाठी उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून गट क पदी कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पशुधन पर्यवेक्षक मिळून १२ उमेदवारांची नियुक्ती झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images