Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गावगाड्यात शिकलेले जगाच्या व्यासपीठावर पास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या मनाचा पाया भक्कम होतो. गावगाड्यात शिकलेले विद्यार्थीच विविध क्षेत्रांत कर्तबगारी गाजवत जगाच्या व्यासपीठावर पास झाले आहेत. सामाजिक क्षेत्रात चमकत आहेत,' असे उद्गार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काढले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा समृद्ध शाळा अभियानांतर्गत विजेत्या शाळांना बक्षीस आणि प्राथमिक शाळा शताब्दी सोहळा मानपत्र वितरण असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. राज्यमंत्री खोत यांच्या हस्ते शाळा व शिक्षकांचा गौरव झाला. राजाराम कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे कार्यक्रम झाला.

राज्यमंत्री खोत म्हणाले, 'महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाची प्रगती आणि तळागाळातील व्यक्तींना सन्मान मिळवून द्यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखले होते. त्यांनी बहुजन समाजात शिक्षणाचा पाया घातला. शिक्षणाने मानवी जीवनाला नैतिक अधिष्ठान मिळते. सत्तेच्या राजकारणावर कर्तबगारी माणसे आली की, परिस्थितीचे भान ठेवून उत्तम काम करू शकतात. प्राथमिक शाळेतच आमच्या पिढीवर संस्कार झाले. गावात शिक्षण घेऊनच वेगवेगळ्या क्षेत्रांत यशाची शिखरे पादाक्रांत केली.'

ते पुढे म्हणाले, 'शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांनी लोकसहभाग वाढवून प्राथमिक शिक्षणाला चालना देण्याचे कार्य केले. जिल्हा परिषदेच्या शाळांचा इतका प्रेरणादायी इतिहास आहे. मात्र, आज ८० टक्के शिक्षकांची मुले इंग्रजी शाळेत शिकताना आढळतात. याचा अर्थ शिक्षकांना त्यांच्या अध्यापनावर विश्वास नाही असा होतो. मोठ्या शाळेत शिकले की मुले हुशार अशी भावना काहींच्या मनात निर्माण होत आहे. ही मुले चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील, पण जगाच्या व्यासपीठावर नापास ठरतील. कारण त्यांना तळागाळातील समाजाचे भावविश्व, सामाजिक भान यापासून ते लांब असल्याचे आढळते.'

याप्रसंगी शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे, पक्षप्रतोद विजय भोजे यांची भाषणे झाली. प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, सदस्य राजवर्धन निंबाळकर, भगवान पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्यासह अधिकारी, सदस्य उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समिती स्थापन करा’

$
0
0

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने अंबाबाई मंदिर देवस्थान व्यवस्थापन समितीची स्थापना करावी. अथवा प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी नेमून व्यवस्थापन सुरू करावे. त्याद्वारे पगारी पुजाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी पन्हाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव सासने यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशवंत बँक चोरीप्रकरणी दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर पोलिसांनी मुंबई, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे तपास करुन कळे (ता. पन्हाळा) येथील यशवंत बँकेतील चोरीप्रकरणी आंतरराज्य टोळीतील दोन संशयितांना अटक केली. चांदखान अब्दुलगणी नईमखान (वय ४०, रा. दि ग्रेट इंदिरानगर, मरोळ, पाइपलाइन, अंधेरी वेस्ट, मुंबई, मूळ गाव ककराला, ता. दातागंज, जि. बदायू, उत्तर प्रदेश), गुड्डू उर्फ तसद्दूअल्ली अब्दुलनबी नईमखान (वय ३८, रा. ककराला, ता. दातागंज, जि. बदायू, उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना १६ मार्चपर्यंत कोर्टाने पोलिस कोठडी दिली आहे. आठ फेब्रुवारी रोजी दोन संशयितांसह मुख्य सूत्रधार व त्यांच्या सात साथीदारांनी बँकेच्या खिडकीचे गज कापून तिजोरीतील दोन किलो ४४४ ग्रॅम वजनाचे दागिने चोरुन नेले होते. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत तपासाची माहिती दिली.

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाबू कौसर खान, गुड्डू उर्फ कालिया इसरा अल्ली खान, फसाहत उर्फ तहजीब आलम खानकल्लुखान, सेहवाज खान (चौघे रा. ककराला, ता. दातागंज, जि. बदायू, उत्तर प्रदेश), राहुल (रा. धनपुरा, जि. बदायू, उत्तर प्रदेश) हे संशयित फरारी आहेत. गुन्ह्याचा तपास करताना चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या ट्रकचा वापर केला होता, अशी माहिती मिळाली होती. पोलिसांनी ठाणे, भिवंडी, नवी मुंबईत ट्रकचा तपास केला असता भिवंडी येथील शहजादे चांद खान यांच्या नावे ट्रक असल्याचे लक्षात आले. पण प्रत्यक्षात चांदखान आणि गुड्डू खान हे दोघे भाऊ ट्रकचा वापर करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिल्ली येथे भजनपुरा, जमुना विहार परिसरात शोध घेऊन संशयित गुड्ड खानला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीनुसार त्याचा भाऊ चाँद खान याला अंधेरीतील इंदिरानगर झोपडपट्टीत ताब्यात घेण्यात आले. दोघांनी चोरीची कबुली देत आणखी सात सदस्यांची माहिती दिली. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बदायू येथील ककराला गावी जाऊन अन्य साथीदारांचा तपास केला, पण ते फरारी झाले होते. पोलिसांनी या गुन्ह्यातील ट्रक (एम.एच.०४ जी सी ४६८९) जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई, उत्कर्ष वझे, उप निरीक्षक सचिन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला.

..............

सविस्तर वृत्त ...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाडापाडीसाठी नव्हे जिंकण्यासाठी राजकारण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेसचा पराभव करण्याची ताकत भाजप, शिवसेनेत नाही. पक्षातीलच नेत्यांनी निवडून आला की आमदार होईल, मंत्री बनेल या राजकीय ईर्ष्येतून एकमेकांविरोधात पाडापाडीचे राजकारण केले आणि पक्ष कमकुवत बनला. आता नेते गटबाजी विसरून एकवटले आहेत. पाडापाडीसाठी नव्हे तर जिंकण्यासाठी राजकारण करायचे आहे. जिल्ह्यात काँग्रेस आघाडीचे दोन्ही खासदार निवडून आणून दिल्लीत राहुल गांधींचे हात बळकट करू. विधानसभेला पक्षाचेच सर्वाधिक आमदार निवडून आणू' असा संकल्प जिल्ह्यातील नेत्यांनी केला. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पी. एन. पाटील यांच्या निवडीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार सोहळा झाला. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार झाला.

'राजकीय व सार्वजनिक जीवनात काँग्रेस आणि गांधी घराणे सोडून दुसरा विचार केला नाही. जिल्ह्यात काँग्रेस वाढवायची आहे. सर्वसामान्य माणूस उभा करायचा आहे' अशा शब्दांत पी. एन. पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. पक्षाच्या गटबाजीवर टिप्पणी करताना ते म्हणाले, 'वीस वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत मी दोष स्वीकारत, अडचणीवर मात करत कार्य करत राहिलो. इचलकरंजीत आवाडे आणि आवळे गटात भांडणे झाले की मीच दोषी. कागलमध्ये विक्रमसिंहराजे आणि संजय घाटगे यांच्यामध्ये वाद घडला की तो माझ्यामुळेच. शाहूवाडीत खासदार गायकवाड विरुद्ध आमदार गायकवाड, राधानगरीत माजी आमदार दिनकरराव जाधव व बजरंग देसाई यांच्यात वाद झाला की त्यालाही मीच जबाबदार असा ठपका यायचा. महाडिक आणि सतेज पाटील अनेक वर्षे एकत्र होते, गळ्यात गळे घालून फिरायचे. नंतर त्यांच्यात वाद झाला आणि त्याला मीच दोषी असे चित्र निर्माण झाले. भविष्यात हा दोष जिल्हाध्यक्ष आवाडे यांना स्वीकारावा लागणार असून, पक्षकार्यात त्यांना साथ कायम राहील.'

जिल्हाध्यक्ष आवाडे यांनी पी. एन यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. 'पक्षात आता कुठलेही मतभेद नाहीत. संघटना भक्कम असेल तरच पदे आहेत याची जाणीव प्रत्येकाला आहे. आगामी निवडणुकीत शंभर टक्के यश मिळवू. पक्षाबाहेर गेलेले स्वगृही यायला तयार आहेत. विधानसभेला सर्वाधिक आमदार आमचेच निवडून येतील' असे त्यांनी सांगितले.

दरम्यान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील सत्कार सोहळ्याला अनुपस्थित होते. त्यावर जिल्हाध्यक्ष आवाडे यांनी 'सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांचा करवीर तालुक्यात संयुक्त कार्यक्रम होता. काल त्यांच्याशी बोलणे झाले आहे. कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे ते सत्कार सोहळ्याला उपस्थित नाहीत' असा खुलासा केला. उपमहापौर भूपाल शेटे, प्राचार्य राजेखान शानेदिवाण यांची भाषणे झाली. प्रदेश सचिव प्रकाश सातपुते यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी आभार मानले.

आवाडे, आवळे, पी.एन, सतेज आमदार होतील

माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले, 'जिल्ह्यातील नेते एकत्र आल्याने पक्षाला चांगले वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार निवडून येतील. इचलकरंजीत प्रकाश आवाडे, हातकणंगलेत माझे चिरंजीव राजू, करवीरमध्ये पी. एन. पाटील आमदार होतील. सतेज पाटीलही आमदार होतील. हातकणंगले आणि इचकरंजीत आवळे-आवाडे गट एकत्र आले आहेत. पूर्वी आम्ही एकमेकांची तोंडे बघत नव्हतो. निवडणुकीत आवाडे गटाने काही खेळी केली तर आम्ही दुसरा डाव खेळायचो. आम्ही काही केले तर आवाडे गट वेगळीच चाल रचायचा. कोणीही मंत्री, आमदार होऊ नये म्हणून पाडापाडीचे राजकारण झाले. जिल्हाध्यक्षांनी पी. एन. आणि सतेज यांना एकत्र आणावे. आजच्या कार्यक्रमाला सतेज आले असते तर बरे झाले असते.' त्यांच्या भाषणादरम्यान पाटील यांनी 'इचलकरंजी नगराध्यक्षपद निवडीत तिकीट कुणी कापले ते सांगा' अशा शब्दांत चिमटा काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार

$
0
0

कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्य केला आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर यांनी दिली आहे. अंगणवाडी कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी मुंबईत आंदोलन केले. संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिष्टमंडळात एम. ए. पाटील, दिलीप उटाणे, शुभा शमीम, दत्ता देशमुख, सत्यभामा तीमटे आदींचा सहभाग होता. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्पन्न वाढीसाठी कर प्रणाली बदला’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी नाविन्यपूर्ण योजनांचा अवलंब करावा, महसुली उत्पन्नात वाढ करण्यासाठी शक्य त्या ठिकाणी कर प्रणालीत बदल करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी विभागप्रमुखांना केल्या. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. ६) होणार आहे. या सभेत अंदाजपत्रक सादर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ समितीची शनिवारी बैठक झाली. सीईओ मित्तल यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. प्रत्येक विभागाची वसुली, विकासकामांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात यासाठी असे त्यांनी निक्षून सांगितले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत विविध विकासकामांचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्ड स्टोअरेज प्रकल्प रखडला

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील नियोजित कोल्ड स्टोअरेजसाठी जागा आरक्षण प्रस्ताव आणि बांधकामाला परवानगी मिळाली नसल्याने हा प्रकल्प रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिका व बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असतानाही कोल्ड स्टोअरेज पाठपुरावा होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बाजार समितीत शेतीमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज उभारणीची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. समितीच्या प्रत्येक निवडणुकीत कोल्ड स्टोअरेजचा मुद्दा असतो. माजी आमदार विनय कोरे यांच्या पुढाकाराने आणि आमदार हसन मुश्रीफ, सतेज यांच्या प्रयत्नातून बीओटी तत्त्वावर कोल्ड स्टोअरेज उभारणीला हिरवा कंदील मिळाला आहे. तीन महिन्यांपूर्वी कोल्ड स्टोअरेज उभारणीच्या कामाचे भूमिपूजनही नेत्यांच्या हस्ते झाले, पण उभारणीचे काम रेंगाळले आहे.

बाजार समितीने कोल्ड स्टोअरेज उभारणीसाठी १५ हजार स्क्वेअर फूट जमिनीवर आरक्षण टाकले आहे. हा आरक्षणाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे दिला आहे. तसेच बीओटी तत्त्वावर कोल्ड स्टोअरेज उभारणाऱ्या व्यापाऱ्यांनी बांधकामाचा प्रस्तावही महापालिकेकडे पाठवला आहे. पण दोन्ही कामांसाठी बाजार समितीकडून पाठपुरावा झालेला नाही. महापालिका क्षेत्रात प्रथमच कोल्ड स्टोअरेज उभारणी होणार असल्याने बांधकामाच्या डिझाइनला कशी परवानगी देतात यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना मार्गदर्शन घ्यावे लागणार असल्याची चर्चा आहे.

महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असून, जनसुराज्यचा नैतिक पाठिंबा आहे. बाजार समितीत राष्ट्रवादी जनसुराज्य काँग्रेस, शिवसेना, शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. दोन्ही ठिकाणी समविचारी पक्षांची सत्ता असतानाही जागा आरक्षण व बांधकाम परवानगीची कामे रखडली आहेत. बाजार समितीचे सचिव मोहन सालपेही स्वीकृत नगरसेवक आहेत. आमदार मुश्रीफ, पाटील, माजी आमदार कोरे यांचा कोल्ड स्टोअरेज ड्रीम प्रोजेक्ट असतानाही महापालिकेकडून टाळाटाळ होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बीओटी तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पावर तीस कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 'ना नफा ना तोटा' तत्वानुसार शेतकऱ्यांना तीस टक्के माल ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूर ही गुळाची बाजार पेठ असल्याने शेतकऱ्यांना कोल्ड स्टोअरेजमध्ये गूळ ठेवण्याची संधी मिळणार आहे. ज्यावेळी गुळाला दर मिळेल तेव्हा शेतकऱ्यांना विक्री करता येणे शक्य होणार आहे. गुळासह फळ भाज्या ठेवण्यास मदत होणार आहे. कोल्ड स्टोअरेजबरोबर अन्नधान्यावर प्रक्रिया करणारे प्रोसिसिंग युनिटही सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना भाज्या, फळे ठेवण्याची सोय होणार आहे.

००००

बाजार समिती आणि व्यापाऱ्यांकडून महापालिकेकडे जर प्रस्ताव प्राप्त झाला असेल तर त्याची छाननी करून मंजुरीसाठी पावले उचलली जातील. आरक्षण प्रस्तावाबरोबर बांधकाम मंजुरीच्या प्रस्तावाचा अभ्यास केला जाईल.

आर. एस. महाजन, सहायक संचालक, नगररचना

०००००

कोल्ड स्टोअरेज क्षमता ५००० मेट्रिक टन

जागा १७,००० स्क्वेअर फूट

भांडवल ३० कोटी रुपये

शेतकऱ्याच्या मालाला ३० टक्के जागा

गुळासह फळ, भाज्या ठेवण्याची सोय

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन पोलिस निरीक्षकांच्याजिल्हांतर्गत बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तीन पोलिस निरीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सांगलीहून नव्याने हजर झालेले पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांची गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी तर सोलापूर ग्रामिणहून बदली होऊन आलेले पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांची प्रॉस्क्युकेशन स्कॉडमध्ये नियुक्ती करण्यात आली. शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे यांची आर्थिक गुन्हे शाखेने बदली झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार कदम यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून कागल पोलिस ठाण्यात, शहर वाहतूक शाखेकडील शैलजा पाटील यांची पन्हाळा पोलिस ठाण्यात बदली झाली. साताऱ्याहून आलेल्या पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार यांची लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बदली झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंतप्रधान मोदींचे गुणगान महागात; माकप नेत्याचे निलंबन

$
0
0

सोलापूर:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान करणे माकप नेत्याला चांगलेच महागात पडले आहे. माकप नेते नरसय्या आडम यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी नरसय्या आडम यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्यासपीठावरुन भाषण केलं होतं.

नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या व्यासपीठावर भाषण केलं होतं. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचं कारण देत सीपीआय (एम)ने त्यांची तीन महिन्यांसाठी सेंट्रल कमिटीतून हकालपट्टी केली आहे.

आडम मास्तर गेल्या महिन्यात भाजपच्या व्यासपीठावर नुसते उपस्थित नव्हते, तर त्यांनी पंतप्रधान मोदींची आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं भरभरुन कौतुक केलं होतं. विडी कामगार व इतर कष्टकरी समाजासाठी त्यांनी हातात घेतलेल्या ३० हजार घरांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. आघाडी सरकारच्या काळात अडकून ठेवलेली फाईल भाजप सरकारने मंजूर करून निधी देखील दिला. त्यामुळेच मोदी सरकारचे कौतुक केलं, असंही आडम मास्तर यांनी स्पष्ट केलं होतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय मंडलिक लोकसभेत, दोन्ही घाटगे विधानसभेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

'मी मैत्रीपेक्षा युती धर्म महत्वाचा मानतो' असे सांगत 'लोकसभा निवडणुकीत लाखाच्या मताधिक्याने प्रा. संजय मंडलिक यांचा विजय निश्चित आहे. आणि युतीमुळे दोन्ही घाटगे विधिमंडळात जातील यासाठी मी वचनबद्ध आहे,' असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. मेळाव्यामध्ये मंत्री पाटील यांनी सहा तालुक्यांतील मतांचा आणि संजय मंडलिकांच्या मताधिक्याचा जाहीर हिशेबच मांडत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

मुरगूड (ता. भुदरगड) येथे शिवसेना-भाजपच्यावतीने आयोजित शेतकरी, युवक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक होते. म्हाडाचे (पुणे) अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे प्रमुख उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्रसिंह मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'मुरगूडच्या आजच्या मेळाव्यातून युतीच्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे. आम्ही युतीधर्म पाळतो. मैत्री बाजूला सारून आमच्यासाठी युतीधर्म महत्वाचा आहे. प्रा. मंडलिक यांच्या विजयाची जबाबदारी आमच्यावर आली आहे. भाजप मंडलिकांच्या पाठिशी ताकदीने उभा राहील. लोकसभा मतदारसंघातील युतीच्या आमदारांना विधानसभेसाठी आपली उमेदवारी निश्चित करायची असल्यास आपापल्या मतदारसंघांतून प्रा. मंडलिक यांना मताधिक्य द्यावेच लागेल. कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा व्हावा हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी संजय मंडलिकांच्या रुपाने ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करूया.'

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'मी तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम सभापती, पक्षप्रतोद म्हणून काम करीत अध्यक्षपदावर चोख काम केले आहे. नुसते प्रश्न मांडण्यावरुन नव्हे तर विकासाच्या कामांसाठी निधी किती आणला यावर लोकप्रतिनिधींची ताकद ठरते. या निवडणुकीत उडपी पद्धतीने काम करणाऱ्या महाडिकांना हाकलण्याचा निर्धारच मतदारांनी केला आहे. देशात मोदी आणि राज्यात चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व महत्त्वाचे आहे. 'खोटे बोल, पण रेटून बोल' अशी परंपरा असणाऱ्या आणि स्वकीयांना विसरणाऱ्या खासदारांना निवडून येण्यासाठी ७० रुपयांच्या साड्या का वाटाव्या लागतात?' असा सवाल केला.

'तुम्ही लोकसभा जिंका, विधानसभा मी संपवतो' असे सांगत समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 'गेली अनेक वर्षे आपण प्रामाणिकपणे एकमेकांना दगड मारले. आता नैसर्गिकपणे आपण एकत्र आलो आहोत ही मैत्री अशीच जपूया. प्रा. मंडलिक यांना खासदार केले पाहिजे. सर्व गट एकत्र ही परिवर्तनाची नांदी आहे. दिवंगत मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आंबेओहोळ प्रकल्प पालकमंत्र्यांनी पूर्ण करावा असे सांगणाऱ्या मुश्रीफांनी जलसंपदा मंत्री असताना झोपा काढल्या का? '

माजी आमदार संजय घाटगे यांनी दिवंगत मंडलिकांना मिळालेल्या मताधिक्याचाही उच्चांक संजय मंडलिक मोडतील असा विश्वास व्यक्त केला. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, सरपंच रुपाली आंगज, अॅड. निता मगदूम यांनीही मनोगत व्यक्त केले. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. विरेंद्रसिंह मंडलिक, सदासाखरचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, पंचायत समितीचे उपसभापती विजय भोसले, सुनील मोदी, प्रा. सुनील शिंत्रे, प्रा. सुनील मगदूम, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, सेनेचे तालुकाप्रमुख अशोक पाटील, शाहू बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, दत्तामामा खराडे, केशवराव पाटील, आर. डी. पाटील उपस्थित होते. सुनील डेळेकर यांनी सूत्रसंचलन केले.

लाखाचे मताधिक्य मिळेल

कागलमध्ये मंडलिक व दोन्ही घाटगेंच्या ताकदीमुळे किमान ७o टक्के, चंदगडमध्ये किमान बरोबरी, भुदरगडमध्ये सेनेचे आमदार आबिटकर आणि त्यांच्याबरोबरच्या इर्ष्येने आमचे असे काही हजारांचे मताधिक्य, कोल्हापुरात सुशिक्षित मतदारांमुळे मोदी फॅक्टरमधून मिळणारे मताधिक्य, दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक आणि सतेज पाटील यांनी दिलेल्या शब्दामुळे मिळणारे मताधिक्य आणि उत्तरेत सेना आमदार असल्याने एकूण लाखाच्या मताधिक्याने संजय मंडलिक विजयी होतील' असा हिशेबच मंत्री पाटील यांनी मांडला.

साड्या किंवा पैंजण वाटले नाहीत

नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी प्रास्ताविकात खासदार महाडिक यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. 'डमी बसवून पास होणाऱ्या महाडिकांनी चंद्रकांतदादांच्या निधीचे श्रेय घेऊ नये. ग्रामीण भागासाठी तुम्हीच नॉट रिचेबल असता. आज महाशिवरात्र असूनही महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. महिलांना आम्ही साड्या किंवा पैंजण वाटण्याचे आमिष दाखवले नाही तर त्या उत्स्फूर्तपणे आल्या आहेत' असे जमादार म्हणाले.

बायको उभारली तरी युतीधर्मच पाळू

'मंडलिकांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. आता माझ्या पत्नीला जरी राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तरी युतीधर्म पाळू. पत्नीसोबत सकाळी चहा घेईन. नंतर प्रचार मात्र युतीधर्म पाळून मंडलिकांचाच करेन' असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला.

पुढच्या वर्षी मुरगूडची म्हाई नक्की !

'आजअखेर ७० लाखाची लोकवर्गणी, आमदार मुश्रीफ व प्रविणसिंह पाटलांच्या प्रयत्नातून १ कोटी २६ लाख आणि चंद्रकांतदादांचे ६७ लाख यामुळे मुरगूडच्या अंबाबाई मंदिराचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. पालकमंत्र्यांकडून मिळणाऱ्या निधीमुळे पुढच्या वर्षी मुरगूडची म्हाई नक्की होईल' या मंडलिकांच्या विधानावरही टाळ्यांचा कडकडाट झाला.

फोटो : मुरगूड येथे सेना-भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील. व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे, संजय पवार, विजय देवणे आदी. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित जनसमुदाय.

छाया : जे. के. फोटो, सुरुपली, साताप्पा चव्हाण, बेनिक्रे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पर्यावरण राखण्याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'आपल्या परिसरातील निसर्गाचे रक्षण करणे हे सर्वाचे काम आहे. प्रत्येकाने निसर्गाच्या रक्षणासाठी पर्याावरणाचे संवर्धन करण्यासाठी स्वतः जाणीवपूर्वक सहभागी होण्याची गरज आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपल्या परिसरातील पर्यावरण संरक्षित ठेवण्यासाठी सामाजिक जागृती करण्याची गरज आहे' असे प्रतिपादन व्यातनाम वक्ते व पर्यावरणाचे अभ्यासक प्रमोद चौगुले यांनी केले. येथील लायन्स, रोटरी क्लब, मनोरंजन मंडळाच्यावतीने आयोजित बाराव्या जागर व्याख्यानमालेत ते बोलत होते.

चौगुले म्हणाले, 'आपण हक्काने काय मागायचे याची चांगली माहिती घेतो. पण हक्काने आपल्याला निर्सगातील काय काय गोष्टी सांभाळायच्या याकडे दुर्लक्ष करतो. निसर्गाशी आपण एकरूप झालो तर निसर्गही आपल्याशी संवाद साधतो. निसर्गाला घेण्यापेक्षा देण्याची सवय असल्याने आपण जेवढे निसर्गावर प्रेम करू त्याच्या अधिकपटीने निसर्ग तुमच्यावर प्रेम करतो आपला निसर्गाशी काय संबंध आहे याची जाणीव करून घ्यायला हवी. आपल्या परिसराला आपण चांगला बनवायचा असेल तर पर्यावरणपूर्वक वातावरणाची निर्मिती आपणच करायला हवी, नदीची शुध्दता ठेवण्यासाठी ती घाण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. पावसाचे पाणी वाहून जाणार नाही यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिग करायला हवे. प्रत्येक माणसाला ऑक्सीजन देण्यासाठी किमान १० झाडे लागतात, त्याची जोपासना आपणच केली पाहिजे. वाढत्या वाहनाच्या संख्येमुळे कार्बनडाय ऑक्साइडचे हवेत प्रमाण वाढते आहे ते रोखण्यासाठी उपाय योजना करायला हवी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी आमदार महाडिक यांच्या गडहिंग्लजमध्ये गाठीभेटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

लोकसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी जुळवाजुळवी सुरू केली असून सोमवारी त्यांनी तालुक्यातील काही प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

खासदार महाडिक हे मेळावे, सभा-समारंभातून संपर्क अभियान चालवित आहेत. महादेवराव महाडिक यांनी तालुका स्तरावरील नेत्यांच्या भेटी घेण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचे काही कार्यकर्ते गेल्या निवडणुकीत मंडलिकांच्या प्रचारात सक्रिय होते तर विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे गट महादेवराव महाडिक यांच्या पाठीशी होता. महाडिक यांनी त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जि. प. सदस्य सतीश पाटील यांच्या गिजवणे या गावी जाऊन त्यांचे वडील बी. टी. पाटील यांचीही भेट घेतली. गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक प्रकाश चव्हाण यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. प्रकाश चव्हाण यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. हलकर्णीत सदानंद हत्तरकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयकुमार मुन्नोळी यांच्यासह हत्तरकी कुटुंबीयांशी महाडिक यांनी चर्चा केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत संध्यादेवी कुपेकर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून चंदगड मतदारसंघातून निवडणूक लढविलेले अप्पी उर्फ विनायक पाटील यांच्याशी महाडिक यांची भेट झाली नाही. मात्र, त्यांच्याशी महाडिक यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषमता दूर करण्यासाठी मानसिकता बदला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'वर्षानुवर्ष एका विशिष्ट जातीतील मुलींना देवदासी म्हणून सोडले जाते. जातीभेद, स्त्री शोषण, आर्थिक असमानता यावर कोणत्याही राजकीय सत्तेने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला नाही, ही शोकांतिका आहे. ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन साहित्यिक व ९९व्या आखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी काढले. कुरुंदवाड येथील कवि मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात 'मी आणि माझे नाट्यलेखन' या विषयांवर ते बोलत होते. गणपती मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

प्रेमानंद गज्वी म्हणाले, 'समाजात स्वातंत्र्यापूर्वीपासून असणारा जातीभेद, रुढी-परंपरा, अंधश्रध्दा या आजही कायम आहे. स्त्रियांवर ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत. समाजातील ही भिषण वास्तवता हेच माझ्या नाट्यलेखनाचे उगमस्थान आहे. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी माणुसकीने वागणे हाच या समस्येवरील खरा उपाय आहे.'

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा. शरद पराडकर यांनी स्वागत केले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुनील मुळे यांनी आभार मानले. कांचनमाला बाबर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कवी डॉ. दिलीप कुलकर्णी, सीमा जमदग्नी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा लाख २२ हजार युवा मतदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनाने प्रसिध्द केलेल्या मतदार यादीत १८ ते २९ वयोगटातील ६ लाख २२ हजार मतदार आहेत. सर्वाधिक युवा मतदार राधानगरी तर सर्वात कमी कागल विधानसभा मतदारसंघात आहेत. यामुळे इच्छुक उमेदवारांनी युवा मतदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी सोशल मिडियाचा वापर केला जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाचे नाव मतदार यादीत असावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर अशी दोन महिने विशेष मोहिम राबवली. मोहिमेत व्यापकपणे जागृती करण्यात आली. कॉलेजमध्ये जाऊन आवाहन करण्यात आले. यामुळे १८ ते १९ वयोगटातील ५६ हजार ३०५ नव मतदारांचा नव्याने सामावेश झाला. परिणामी जिल्ह्याचे एकूण मतदार ३० लाख ७५ हजार ७५१ झाले आहेत. यापैकी ६ लाख २२ हजार मतदार १८ ते २९ वयोगटातील आहेत. हे मतदार नव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत. त्यांचे प्रश्न प्रचारात आणून फायदा उठवण्यासाठी संभाव्य उमेदवार आतापासूनच मोर्चेबांधणी करीत आहेत. बहुतांशी युवा मतदार फेसबुक, वॉटसअॅप, व्टिटर अशा सोशल मिडियावर आहेत. या माध्यमातूनच त्यांच्यापर्यंत पोहचावे लागणार आहे. म्हणून प्रचार यंत्रणेत सोशल मिडियाव्दारे पोहचण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे नियोजन प्रमुख राजकीय पक्षांनी केले आहे. त्यासाठी ऑनलाइनसंबंधी ज्ञान असलेल्या युवकांचा शोध घेतला जात आहे.

...

युवा मतदार

विधानसभा मतदारसंघनिहाय युवा मतदारांची संख्या अशी : कोल्हापूर दक्षिण : ६२६४८, कोल्हापूर उत्तर : ४९०९८, चंदगड : ६६०४४, राधानगरी : ७०३९८, कागल : ३८८४२, करवीर : ६४३३७, शाहूवाडी : ६०९५४, हातकणंगले : ६२१०५, इचलकरंजी : ५५६६७, शिरोळ : ६२५२२.

......

डोंगराळ तालुके पुढे

युवा मतदारांत शहरातील दोन मतदारसंघांच्या तुलनेत राधानगरी, चंदगड हे डोंगराळ तालुके पुढे आहेत. तेथे नवमतदार नोंदणीची संख्याही चांगली आहे. यावरून ग्रामीण भाागातील युवक निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात शहरी युवकांपेक्षा आघाडीवर असल्याचेही स्पष्ट होते. युवा मतदार वाढण्यासाठी विद्यमान आमदार, खासदारांच्या कार्यर्त्यांसह सर्व प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली. शेवटच्या टप्प्यातील नोंदणीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. त्याची छाननी होऊन पात्र मतदारांची नोंद मतदार यादीत करण्यात येणार आहे. यामुळे यादीत पुन्हा तरूण मतदारांची भर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपी, गाय दूधाच्या प्रश्नाचा फटका कोणाला?

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:@satishgMt

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना दूध संघांनी गायीच्या खरेदी दरात केलेली दोन रुपयांची कपात केली आहे. दुसरीकडे एफआरपी देण्यासाठी साखर कारखाने अद्याप टाळाटाळ करीत आहेत. दूध दरातील कपात आणि ऊसाचे बील वेळेत जमा होत नसल्याने ग्रामीण भागात अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला बसणार? याविषयी उत्सुकता आहे.

जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना नेत्यांचे असल्याने एफआरपी प्रश्नावर खासदार राजू शेट्टी यांच्या 'स्वाभिमानी'शी त्यांचा संघर्ष सुरु आहे. 'स्वाभिमानी' संघटना अद्याप एफआरपीसाठी आग्रही असून त्यांची कायदेशीर व रस्त्यावरची लढाई सुरू आहे. त्याचा फायदा खासदार राजू शेट्टी यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढताना होण्याची शक्यता आहे. पण, एफआरपी देण्यास विलंब व टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांचे नेतृत्व करणाऱ्या राजकारण्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. बहुतांशी कारखानदार लोकसभा व विधानसभा निवडणुकीशी संबधीत असून ते प्रचारात असल्याने शेतकऱ्यांकडून त्यांना जाब विचारण्याची शक्यता आहे.

एकीकडे उसाचे बिल दोन ते तीन टप्प्यात होणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. तर ग्रामीण भागात गाईच्या दूध खरेदी दरात कपात झाल्याने त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. गेल्यावर्षी जून महिन्यात गोकुळने गायीचा खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपयांवर २५ रुपये केला. त्यानंतर आणखी दोन रुपये कपात करुन २३ रुपये दर केला. दरकपातीच्या विरोधात आमदार सतेज पाटील, माजी आमदार संपतराव पवार यांनी थेट गोकुळवर मोर्चा काढला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गायीच्या दुधापासून तयार केलेल्या भुकटीचे दर कोसळल्याने गोकुळला ८० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यामुळे दर कमी केल्याचा दावा गोकुळने केला होता. गोकुळच्या समर्थनात खासदार धनंजय महाडिक यांनी मोर्चा काढून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे म्हणून खासदार शेट्टी यांनी मुंबईला जाणारे दूध रोखण्याचे आंदोलन केले. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सरकारने गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. गायीचा खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपये केला.

सद्यस्थितीत राज्य सरकारने पिशवीतून दूध विक्री करणाऱ्यांना अनुदान नाकारले आहे. राज्य सरकारचे अनुदान थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा केले पाहिजे अशी अट आहे. गोकुळच्या उत्पादकांची संख्या मोठी असल्याने आणि अनेक गावांत बँका नसल्याने थेट खात्यावर दूध बिल जमा करण्यात अडचणी आहेत. त्यामुळे गोकुळला १३ कोटींच्या अनुदानपासून वंचित रहावे लागले. राज्य सरकारने ३१ जानेवारीनंतर गायीच्या दूधाला अनुदान बंद केले आहे. त्यामुळे गोकुळने गायीच्या दूध दरात दोन रुपयांची कपात केली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटतील अशी शक्यता आहे.

एका हाताने देणार...

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन टप्प्यात सहा हजार रुपये जमा होणार आहेत. दुसरीकडे राज्य सरकारने गायीच्या दूधाचे प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान बंद केले. एखादा शेतकरी दहा लिटर दूध विक्री करत असेल तर त्याला रोज वीस रुपयांचा फटका बसतो. शेतकऱ्याला महिन्याला ६०० तर वर्षाला ७२०० रुपयांचा फटका बसणार आहे. एकीकडे केंद्र सरकार वार्षिक सहा हजार रुपये देणार तर दुसरीकडे दूध दर कपातीमुळे सुमारे ७ हजार रुपयांचा फटका बसणाार आहे. सरकारने एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साधना, शिवराज, शिवाजी विद्यालय विजेते

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेंट कन्सोल ग्लोबल फाउंडेशनमार्फत झालेल्या बेबी लीग फुटबॉल स्पर्धेत बारा वर्षे गटात साधना हायस्कूल, दहा वर्षे गटात शिवाजी विद्यालय तर आठ वर्षे गटात शिवराज स्कूलने विजेतेपद पटकावले. तर निपाणी फुटबॉल अकॅडमी, न्यू होरायझन गडहिंग्लज व सर्वोदय गडहिंग्लज या शाळांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

एमआर हायस्कूलच्या मैदानावर गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेत तीन गटात ३४ संघांनी भाग घेतला होता. निपाणीचा जीत फुटाणकर, शिवाजी विद्यालयाचा आदित्य मांडे आणि सर्वोदयचा रोमन शहा यांचा हिरो ऑफ द टुर्नामेंटमधून गौरव करण्यात आला. टीसीजी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद इंचानाळकर, युनायटेडचे उपाध्यक्ष अरविंद बारदेस्कर, सुरेश कोळकी, संजय पाटील, राजू भोपळे, गंगाराम नाईक, जिनगोंडा पाटील, प्रसाद गवळी, मनीष कोले यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. स्पर्धा संयोजक दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले. युपिंदर पवार यांनी आभार मानले. दीपक कुपान्नावर, ओंकार घुगरी, ओंकार सुतार आदींनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या.

फोटो ओळ

बेबी लीग फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देताना मान्यवर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार क्षीरसागरांचे परिवर्तन झालेय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आमदार राजेश क्षीरसागर माझ्यासोबत गाडीतून आले. त्यावेळी चर्चा करताना त्यांच्यात परिवर्तन झाल्याचे दिसले. यापुढे दादा, टीम म्हणून काम करूया,' अशी टिप्पणी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाच्या विस्तारीकरण इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार क्षीरसागर यांच्यातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न केला. युती झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांतील भाषणांतील फरक स्पष्टपणे समोर आला.

पालकमंत्री पाटील यांच्यावर आमदार क्षीरसागर यापूर्वी अनेकवेळा चौफेर टीका केली होती. त्याला पालकमंत्र्यांनीही त्या-त्या वेळी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. पण युती जाहीर होताच दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळण्यास सुरूवात केली. जाहीर कार्यक्रमातून दिसत असलेला हा बदल आणि गाडीत झालेली चर्चा या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आपल्या भाषणात चांगलीच टोलेबाजी केली.

सेवा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शिवसेनेचे मंत्री शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री पाटील एकाच व्यासपीठावर होते. ते काय राजकीय टोलबाजी करणार याकडे श्रोत्यांचे लक्ष लागून राहिले होते. आमदार क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. यापूर्वी क्षीरसागर संधी मिळेल तेथे सरकारच्या कारभारावर तुटून पडले होते. सरकारच्या कामकाजाची चिरफाड करीत होते. पण, आता त्यांचाही सूर बदलल्याचे स्पष्टपणे जाणवले. भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. सरकार चांगले काम करीत असल्याची शाबासकीही दिली.

मंत्री शिंदे यांनीही पालकमंत्री पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले. 'रस्त्यासाठी निधी मागितला तर दादा त्वरित देतात. त्यांच्याकडे राज्याची तिजोरी आहे. महत्वाचे महसूल खाते आहे. ते इकडे असल्याने आम्हाला काळजी करण्याची गरज नाही,' असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

पालकमंत्री पाटील यांनी चाणाक्षपणे कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. सेवा रुग्णालयात लिफ्ट, फर्निचरसाठी निधी द्यावा अशी आमदार क्षीरसागर यांनी केलेली मागणी त्यांनी त्वरित मान्य केली. 'मंत्री शिंदे यांचे कामे चांगले आहे. आरोग्यमंत्री म्हणून कमी वेळात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे' असे पालकमंत्री म्हणाले.

धैर्यशील मानेंच्या उमेदवारीची पालकमंत्र्यांकडून घोषणा

'हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने असतील,' असे पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केले. 'यासंबंधीची अधिकृत घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे करतील,' असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. पालकमंत्र्यांच्या या घोषणेमुळे हातकणंगले मतदारसंघावरील दावा भाजपने मागे घेतल्याचे स्पष्ट झाले.

०००

(मूळ कॉपी)

आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला, टीम म्हणून काम करण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दादा, आमदार राजेश क्षीरसागर माझ्या गाडीतून आले. त्यावेळी चर्चा करताना त्यांच्यात परिवर्तन झाल्याचे दिसले. यापुढे टीम म्हणून काम करूया, असा राजकीय टोला आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहत सोमवारी लगावला. निमित्त होते, कसबा बावडा येथील सेवा रूग्णालय विस्तारीकरण इमारत उदघाटनाचे. पालकमंत्री पाटील यांच्यावर आमदार क्षीरसागर यापूर्वी अनेकवेळा चौफेर टीका केली होती. रम्यादन, लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजप, शिवसेना एकत्र लढविण्याचा निर्णय झाला आहे. हा संदर्भ शिंदे यांच्या टोल्यात दडला आहे.

शिवसेनेचे मंत्री शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री पाटील एकाच व्यासपीठावर होते. ते काय राजकीय टोलबाजी करणार याकडे श्रोत्यांचे लक्ष लागून राहिले होते. आमदार क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. यापूर्वी ते संधी मिळेल तिथे सरकारच्या कारभारावर तुटून पडले होते. सरकारच्या कामकाजाचे चिरफाड करत होते. पण आता त्यांचाही सूर बदलल्याचे स्पष्टपणे जाणवले. भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले.

सरकार चांगले काम करीत असल्याची शाबासकीही दिली. मंत्री शिंदे यांनीही पालकमंत्री पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले. रस्त्यासाठी निधी मागितला तर दादा त्वरित देतात, त्यांच्याकडे राज्याची तिजोरी आहे. महत्वाचे महसूल खाते आहे, अशी त्यांनी पाठ थोपटली. ते इकडे असल्याने आम्हाला काळजी करण्याची गरज नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. पालकमंत्री पाटील यांनी चाणाक्षपणे कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. सेवा रूग्णालयात लिफ्ट, फर्निचरसाठी निधी द्यावी, अशी आमदार क्षीरसागर यांनी केलेली मागणी त्यांनी त्वरित मान्य केली. मंत्री शिंदे यांचे कामे चांगले आहे. आरोग्य मंत्री म्हणून कमी वेळात उल्लेखनीय काम केल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे युतीनंतर भाजप, शिवसेनेच्या नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातील भाषेतील फरक स्पष्टपणे समोर आला.

------------

माने युतीचे उमेदवार, पण

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने असतील, असे पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केले. यासंबंधीची अधिकृत घोषणा शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे करतील, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅपिंगची निविदा आज खुली होणार

$
0
0

कोल्हापूर

कसबा बावडा येथील घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याचे कॅपिंग करण्यासाठी मंगळवारी (ता. ५) निविदा खुली करण्यात येणार आहे. तीन फेब्रुवारी रोजी यासाठी महापालिका प्रशासनाने ऑनलाइन निविदा मागवल्या होत्या. साचलेल्या कचऱ्याचे कॅपिंग करण्यासाठी राज्य सरकारकडून नऊ कोटी ५० लाखांचा निधी मिळाला आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील साचलेल्या कचऱ्याचे कॅपिंग करणारा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सुमारे तीन लाख टन कचऱ्याचे कॅपिंग करुन आठ एकरांमध्ये लॉन विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने निविदा मागवल्या होत्या. त्याची अंतिम मुदत सोमवारी (ता. ४) सायंकाळी संपली असून मंगळवारी निविदा खुली करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राशिवडेत काविळीची साथ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राशिवडे (ता. राधानगरी) गावात कावीळीची साथ पसरली आहे. गावात कावीळीचे नऊ रुग्ण आढळले असून अनेकांना लक्षणे दिसू लागली आहेत. आरोग्य विभागाने गावातील लोकांना मार्गदर्शन आणि उपचार करावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.

राशिवडे गाव हे बाजारपेठेचे गाव. गावची लोकसंख्या सुमारे पंधरा हजार आहे. गावात गेले चार दिवस काही लोकांना उलट्या, ताप, मळमळणे अशी लक्षणे दिसू लागली. त्यानंतर काविळीची लागण झाल्याचे दिसून आले. गावात काविळ झालेले नऊ रुग्ण आढळून आले असून अनेक लोकांना लक्षणे दिसत आहेत. याबाबत प्राथमिक आरोग्यात संपर्क साधला असता पाण्यामुळे काहीजणांना कावीळ झाली असून नागरिकांनी अशी लक्षणे जाणवताच त्वरित उपचार घेण्यासाठी यावे. लवकरच गावचा सर्व्हे केला जाईल. पाणी उकळून प्यावे, घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरी मिसळचा राजकारणात तडका

$
0
0

Mahesh.patil@timesgroup.com

कोल्हापूर : कोल्हापुरी मिसळचा चटकदारपणा खवय्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. अनोखी चव आणि दर्जामुळे या मिसळच्या 'टेस्ट'ने पुणे, मुंबईसह राज्यातील आणि देशातील खवय्यांची पसंती मिळवली. याच मिसळचा सध्या कोल्हापूरच्या राजकारणाला तडका मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी चालवलेली 'मिसळ पे चर्चा', त्याला उत्तर देताना लोकसभेसाठीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केलेले मिसळ-भेसळीची कॉम्बिनेशन आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी चालवलेली 'मिसळ पे परिवर्तन' मोहीम यातून राजकारणाची चवही तिखट बनत चालली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूरची जागा शिवसेनेकडे राहणार की भाजप काढून घेणार यावर गेल्या आठवड्यात झालेल्या उलट-सुलट चर्चांना मुंबईच्या किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीचा संदर्भ होता. सोमय्या यांना शिवसेनेने विरोध केल्याने भाजपनेही कोल्हापूर मतदारसंघ आम्हाला द्या आणि सोमय्या यांची जागा तुम्ही घ्या असा तिढा निर्माण केला. पण, कोल्हापूर सेनेकडेच राहणार असे जाहीर झाल्यानंतर दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र, शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी वेगाने प्रचाराला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात, शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठेत स्थानिक नेते, नगरसेवक, तालीम मंडळांचे अध्यक्ष, तरुण मंडळांच्या अध्यक्षांच्या गाठीभेटी घेतल्या. कोल्हापूर उत्त्तर मतदारसंघात हा भाग येत असल्याने सेनेचे पाठबळ त्यांना येथे मिळाले आहे. मंडलिक यांनी येथे घरोघरी संपर्क मोहीम राबवताना पेठेतील ज्येष्ठ नागरिकांशी, नेत्यांशी मिसळ खात संवाद साधला. पेठेत मंडलिक पोहोचल्याचे लक्षात आल्यावर खासदार महाडिकही सक्रिय झाले. त्यांनी 'मिसळ पे चर्चा' करत मोर्चेबांधणी सुरू केली. त्यांनी मंगळवार पेठ, कसबा बावडा ते मुक्त सैनिक वसाहतीपर्यंत 'मिसळ पे चर्चे'चा सूर सुरूच ठेवला.

पहिल्या टप्प्यापासूनच महाडिक आणि मंडलिक यांच्यातील वैयक्तिक आरोपांची राळ उडू लागली आहे. पाच वर्षात काय केले? इथपासून ते 'फोन न उचलणारे उमेदवार काय संपर्क ठेवणार?' अशी विचारणा करत परस्परांवर टीकास्र सोडले जात आहे. त्याहीपुढे जाऊन खासदार महाडिक यांच्या 'मिसळ' मोहिमेला टार्गेट करून 'भेसळ करणाऱ्यांना मिसळची चव काय कळणार?' अशी विचारणा मंडलिक यांनी केली. त्यामुळे पुढच्या टप्प्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

एकीकडे महाडिक-मंडलिक यांच्यातील सत्तास्पर्धा तीव्र असताना खासदारांना त्यांचे राजकारणातील हाडवैरी आमदार सतेज पाटील यांच्याशी झुंजावे लागत आहे. यापूर्वीच्या राजकारणातील घडामोडींत आमदार पाटील यांनी 'यापूर्वी घात करणाऱ्यांचा प्रचार नाही' असे जाहीर केले आहे. त्याला खासदारांनी थेट बावड्यातील राजर्षी शाहू विद्यामंदिराच्या पटांगणात (११ नंबर शाळा) सभा घेत 'बावडा ही कोणाही जहागीर नाही' असे प्रत्युत्तर दिले आहे. तर आमदारांच्या कार्यकर्त्यांनी 'मिसळ पे चर्चा'ला विरोध करताना 'मिसळ पे परिवर्तन' मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते 'मिसळ पे परिवर्तन घडवूया' असे थेट आवाहन करीत आहेत.

तिखटजाळ चव अनुभवायला मिळणार

खवय्यांचे कोल्हापूर ही एक वेगळीच, अनुभवण्यासारखी बाब आहे. फडतरे, चोरगे, आराम अशा अनेक मिसळच्या टेस्ट आजही जशाच्या तशा आहेत. कोल्हापुरी मिसळ काळानुसार बदलली. तिखटजाळ चवीचा अनुभव देणाऱ्या 'नॉनव्हेज' मिसळची सेंटर्सही सुरू झाली आहेत. प्रसिद्ध मिसळच्या फ्रँचाइजी सुरू झाल्या. या मिसळीने राजकारणात केलेला प्रवेश पाहता, आगामी काळात 'तिखटजाळ' चव अनुभवायला मिळणार हे नक्की. याची फोडणी पडली आहे!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images