Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव

$
0
0

कोल्हापूर

महावितरण कंपनीने दुरुस्तीसाठी विद्युतपुरवठा बंद ठेवल्याने शहर पाणीपुरवठा विभागाकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहिला. उन्हाची तीव्रता वाढत असताना ए, बी व ई वॉर्डातील नागरिकांना सोमवारी पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. नागरिकांना सहा टँकरमधून ३७ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. महावितरण कंपनीचा सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत विद्युतपुरवठा बंद असल्याने पुईखडी व कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रात होणारा शिंगणापूर येथील पाणी उपसा बंद राहीला. त्यामुळे सकाळ सत्रात होणारा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. दुपारनंतर विद्युतपुरवठा सुरू झाल्यानंतर पाणी उपसा करण्यास सुरुवात होऊन सायंकाळच्या सत्रात येणाऱ्या भागात पाणीपुरवठा सुरू झाला. पण तो कमी दाबाने होता. मंगळवारीही ए, बी व ई वॉर्डात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मांडुकलीजवळ अपघातात मुंबईच्या भाविकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गगनबावडा

कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर मांडुकली-मार्गेवाडी यांदरम्यान भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याकडेच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात मुंबईतील भाविकाचा जागीच मृत्यू झाला. कोकणातील आंगणेवाडी यात्रेहून परतताना ही घटना घडली. किशोर शंकर कलमष्टे (वय ५८, रा. म्हाडा हौसिंग कॉलनी, बांद्रा ईस्ट, मुंबई) असे मृत भाविकाचे नाव आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील किशोर कलमष्टे हे तीन सहकाऱ्यांसमावेत फियाट कारमधून (एमएच ०५ ए २३२७) कोकणातील आंगणेवाडी यात्रेला गेले होते. ते दर्शन घेऊन दुपारी मुंबईला परतत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर मांडुकली-मार्गेवाडीदरम्यान आले असताना भरधाव वेगामुळे चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याकडेच्या कठड्याला धडकली. कारमधील किशोर यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजय भोसले (वय ५४) व चालक किशन सरजीत वर्मा (वय ४०, दोघे रा. बदलापूर, ठाणे) हे गंभीर जखमी झाले. विलास नारायण पाटणकर (वय ५८, रा. ठाणा वेस्ट ) हे किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमींना आपत्कालीन १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघाताची नोंद गगनबावडा पोलिसात झाली असून सहाय्यक फौजदार श्रीकांत मोरे, कॉन्स्टेबल जगदीश वीर, शहाजी दुर्गुळे, हिंदुराव पाटील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा योजना पूर्णत्वासाठी एकमुखी ठराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

दानोळी गावातूनच वारणा थेट पाइपलाइन पाणीयोजना पूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा एकमुखी ठराव सोमवारी नगरपरिषदेच्या विशेष सभेत करण्यात आला. दरम्यान, आमदार सुरेश हाळवणकर यांनी सुचविलेल्या उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याच्या पर्यायाला काँग्रेससह राजर्षी शाहू विकास आघाडीने कडाडून विरोध दर्शविला. त्यामुळे सत्तारुढ गटाला हा प्रस्ताव रद्द करण्याची वेळ आली.

गेल्या दोन वर्षापासून रखडलेली वारणा पाणीपुरवठा योजना दानोळी उद्भव धरुनच पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंदर्भात ठराव करण्यासाठी सोमवारी नगरपरिषदेची विशेष सभा झाली. सभेवेळी नगरसेवक किसन शिंदे यांनी वारणा योजनेसंदर्भातील फलक घेऊन घोषणा देत सभागृहात प्रवेश केला. कामकाज सुरू होताच राजर्षी शाहू विकास आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी, वारणा योजनेसंदर्भातील विविध पक्षांच्या पक्षप्रतोदांनी ठरविल्याप्रमाणे विशेष सभेचे आयोजन केले. पण त्यामध्ये उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या मागणीवरुन सभा बोलविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजकारणविरहीत प्रयत्नातून योजना मार्गी लावण्याचा निर्णय झाला असताना भाजपकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी, न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सल्ला कोणत्या कायदेतज्ज्ञाने दिला याचा खुलासा करण्याची मागणी केली. तर पालिकेच्या कामकाजात बाहेरील मंडळींचा हस्तक्षेप वाढत चालल्याचा आरोप केला. वारणा योजना समिती निमंत्रक तानाजी पोवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना भेटून मंजूर केलेली योजना शासनानेच मार्गी लावावी, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले असताना आमदारांनी यात राजकारण आणत पाणीप्रश्‍न न्यायालयाच्या कक्षेत नेऊन योजना प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप केला.

त्यावर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी नगरपालिकेच्या नियमानुसार योजना पूर्ण होताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचा खुलासा केला. अजित जाधव यांनी, आमदार हे शहराच्या पिण्याच्या पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावरही विरोधी नगरसेवकांचे समाधान झाल्याने त्यांनी जनहित याचिका दाखल करण्याच्या निर्णयाला विरोध कायम ठेवला. योजना सरकारने मंजूर केली. योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. मग उद्घाटनानंतर संघर्ष निर्माण झाला असून त्याचे निराकरण शासनानेच करावे. दानोळीकर आणि इचलकरंजीकरांत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. योजनेबाबतच्या ठरावाला आमचा एकमुखी पाठिंबा असेल असे स्पष्ट केले. चर्चेअंती सत्तारुढ गटाने विरोधी गटाने सुचविलेला प्रस्ताव ठरावात घेऊन तो एकमताने मंजूर केला. चर्चेत सुनील पाटील, राहुल खंजिरे, ध्रुवती दळवाई, बिल्किश मुजावर आदींनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातकणंगलेतील शेतमजूरांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

बांधकाम कामगारांच्या धर्तीवर शेतमजूरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, हातकणंगले तालुका दुष्काळ जाहीर करावा, सर्व शेतमजूरांची नोंदणी प्रत्येक गावातील गावचावडी अथवा ग्रामपंचायतीमध्ये करण्यात यावी, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी पात्र बेघर कुटुंबांना शासनाने तातडीने जागा द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी राज्य शेतमजूर युनियनच्यावतीने (लालबावटा) प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

कॉ. भाऊसाहेब कसबे यांच्या नेतृत्त्वाखाली हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बेघर व शेतमजूरांचा प्रांताधिकारी कार्यालयाव मोर्चा काढण्यात आला. प्रमुख मार्गावरुन मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातच सर्वांनी ठिय्या मारत निदर्शने केली. यावेळी शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात, राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकारने साडेचार वर्षाच्या काळात सर्वसामान्य भूमिहीन बेघर, शेतमजूरांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ दिलेला नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. हातकणंगले तालुका दुष्काळ जाहीर करावा, सर्व शेतमजूरांची नोंदणी प्रत्येक गावातील गावचावडी अथवा ग्रामपंचायतीमध्ये करण्यात यावी, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी पात्र बेघर कुटुंबांना शासनाने तातडीने जागा द्यावी आदी मागण्या केल्या. आंदोलनात आण्णासाहेब रड्डे, वत्सला भोसले, संजय टेके, अरुण मांजरे, विमल कांबळे, हिराबाई हुग्गे, तबस्सुम शेख, सविता कोथळे आदींसह भूमीहीन, बेघर, शेतमजूर सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी

कणगला येथून दुचाकीवरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या हार विक्रेत्याला ट्रकची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २४) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात ही घटना घडली. रमण कल्लाप्पा खानाई (वय ४६, रा. शांताई कॉलनी, कसबा बावडा कोल्हापूर) असे दुचाकीस्वाराचे नाव असून तर पाठीमागे बसलेला जोतिबा शिवाजी माळी (वय २७ रा. मूळगाव चिकोडी, सध्या रा. कोल्हापूर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर दुचाकी जळून खाक झाली.

अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गेले दोन दिवस कणगला येथे महालक्ष्मीची यात्रा सुरू होती. त्यासाठी रमण आणि ज्योतिबा हे दोघेही सूरज माळी यांच्याकडे यात्रेसाठी गेले होते. रविवारी यात्रा संपवून सायंकाळी ते हिरो होंडा स्प्लेंडर(केए २३ ईई १३६०) दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बेळगाव येथून बॉक्साइट उतरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मालट्रकची (एमएच ०९ एल ४१५५) दुचाकीला धडक बसली. त्यामध्ये रमण जागीच ठार झाला. तर ज्योतिबा हे गंभीर जखमी झाले. ट्रकने दुचाकी फरपटत जावून लगेच तिला आग लागली. त्यामध्ये दुचाकी जळून खाक झाली. पुंज लॉइडच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एच. डी. मुल्ला, सहाय्यक निरीक्षक एम. जी. निलाखे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ट्रकचालक इसाक सनदी (कोल्हापूर) याला पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे. मृत रमण यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागण्यांच्या पूर्ततेसाठी धडक मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामपंचायत कामगारांसाठी सरकारने लागू केलेला आकृतीबंध रद्द करावा, किमान वेतनप्रमाणे पगार मिळावा यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत कामगारांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

कामगार संघटनेचे कॉम्रेड आप्पा पाटील, सुकुमार कांबळे, औदुंबर साठे यांच्या शिष्टमंडळाने सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांची भेट घेतली. याप्रसंगी आडसूळ यांनी, 'मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुकीचे प्रयत्न करु. संघटनेने कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सविस्तर माहिती द्यावी' असे शिष्टमंडळाला सांगितले. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास कामगारांचा मोर्चा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर पोहचला. या ठिकाणी जोरदार घोषणेबाजी करत कामगारांनी रस्त्यावर ठिय्या मारला.

शिष्टमंडळातर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये कामगारांचे वेतन थेट त्यांच्या खात्यावर जमा करावे, सरकारने लागू केलेला राहणीमान भत्ता स्वतंत्ररित्या मिळाला पाहिजे. मागील फरकाची रक्कम त्वरित द्यावी. कामगारांची सेवापुस्तके अद्ययावत करावीत. अनेक कामगारांना नोकरीमध्ये दहा ते १५ वर्षे नोकरी करुन सुद्धा कायम केले नाही. अशांना तत्काळ सेवेत कायम करुन सेवा सुविधा मिळाव्यात या मागण्यांचा प्रमुख समावेश आहे. आंदोलनात संग्राम यादव, माणिक कांबळे, यशवंत कांबळे, नंदकुमार बिरंजे, संतोष कांबळे, दिनेश लालबिघे आदींसह महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीतील दोन पोलिसांचीतडकाफडकी बदली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हुपरी (ता. हातकणंगले) येथील पोलिस ठाण्यातील सुशील मोहनराव गायकवाड व राजासाब गजबरसाब सनदी या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची तक्रारींनंतर जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी तत्काळ बदली केली. या घटनेमुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. या तक्रारींची चौकशी करून पोलिस अधिक्षक देशमुख यांनी सुशील गायकवाड यांची गगनबावडा व राजासाब सनदी यांची चंदगड येथे तत्काळ बदलीचे आदेश काढले.

पोलिस कॉन्स्टेबल सुशिल गायकवाड यांनी हुपरीतील भाजप युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात मद्यपान करुन सहाय्यक पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ यांच्यासमोर उद्धटपणे वर्तन केल्याच्या कारणावरून त्याची बेदम धुलाई केली होती. तर गावभागातील बसस्थानक परिसरात ८० वर्षांचा एका वृद्धाला मटका घेत असल्याचा आरोप करत राजासाब सनदी यांनी पोलिस ठाण्यांमध्ये आणून सहाय्यक निरीक्षक नदाफ यांच्यासमोर त्यांना पट्ट्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत त्या वृद्धाच्या हाताच्या बोटाचे हाड मोडले. त्यांच्या मांडीला मोठी जखम झाली होती. याबाबत आरपीआयचे राज्य सचिव मंगलराव माळगे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे लेखी तक्रार केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरुकली गावठाण भूखंड वाटपात अपहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

कुरुकली (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीतील सत्तेचा गैरफायदा घेऊन गावठाणमधील भूखंड वाटप करताना मोठा अपहार केला गेला आहे. आपल्या जवळच्या सदस्यांना, बगलबच्यांना दोन-तीन प्लॉट देऊन सामान्य नागरिकांना वंचित ठेवण्याचे काम भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नामदेव पाटील यांनी केले आहे. भूखंड वाटपातील अपहाराबाबत न्यायालयीन लढाईबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दाद मागणार असल्याची माहिती भोगावती कारखान्याचे विद्यमान संचालक पांडुरंग पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, नामदेव पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

पांडुरंग पाटील म्हणाले, 'कुरुकली येथे ५००/१ मध्ये २० एकर गावठाण जमीन आहे. येथे भूखंड पाडण्याची परवानगी २००६ मध्ये मिळाली होती. २००७मध्ये भूखंडांचे लेआउट शासकीय नियमानुसार वाटपाचे धोरण ठरले. गावातील ४९६ लोकांना भूखंड वाटप करण्याची यादी तयार करण्यात आली. यादी तयार करताना ग्रामपंचायतीची सत्ता भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नामदेव पाटील यांच्याकडे होती. सत्तेचा गैरफायदा घेत पाटील यांनी चुकीची यादी तयार करून सदस्यांना व आपल्या बगलबच्च्यांना दोन, तीन भूखंड देऊन नागरिकांवर अन्याय केला. रस्त्यालगतचे व मोक्याचे भूखंड लिलाव करण्यात आले. यात ३३ लाखांचा लिलाव झाला, पण १७ लाखांची रक्कम जमा झाली. ही रक्कम तीन सदस्यांच्या व्यक्तिगत नावे टाकून ग्रामपंचायत शिपायांना सचिव करून रक्कम परस्पर हडपण्यात आली. या गैरकारभाराबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य सरकारकडे तक्रारी झाल्या. २००८ पासून भूखंड वाटपास स्थगिती मिळाली. पण भाजपचे नामदेव पाटील यांनी ग्रामपंचायत व भाजपच्या सत्तेचा वापर करून भूखंड वाटपाची स्थगिती उठवून ग्रामपंचायतीमध्ये मनमानी यादी प्रसिद्ध केली. गावात रहिवासी नसणारे, रेशनकार्ड नसणारे लोकसुद्धा यादीत आहेत. याबाबत विशेष गाव सभा हनुमान मंदिरात आयोजित केली होती. पण गावसभेला सरपंच, उपसरपंचांसह नऊ सदस्य गैरहजर राहिले. ऋतुराज पाटील व शशिकांत पाटील या दोन सदस्यांनी सभेला उपस्थिती दाखवली होती. या अपहाराबाबत आंदोलन करून सर्वसामान्य ग्रामस्थांना न्याय देणार आहे.'

पत्रकार परिषदेला एकनाथ पाटील, माजी सरपंच एम. एस. पाटील, बळवंत पाटील, पी. आर. पाटील, सुनील पाटील, कुमार पाटील उपस्थित होते.

राजकीय सुडभावनेने आरोप

दरम्यान, नामदेव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, 'कुरुकली गावठाणमधील भूखंड वाटप प्रक्रिया गेली नऊ वर्ष प्रलंबित होती. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून मंजुरी आणली आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार शासनाने ठरवलेली रक्कम ही शासनाच्या खात्यावरच जमा करायची आहे. त्यामुळे यात अपहार झालेला नाही. आमच्यावर केलेले आरोप राजकीय सुडभावनेने केलेले आहेत. भूखंड वाटपात वंचित राहिलेल्या कुटुंबांना दुबारमधून भूखंड वाटप करणार आहे. यासाठी लवकरच विशेष ग्रामसभा बोलवण्यात येईल. ज्या ग्रामस्थांना काही तक्रार मांडायची आहे त्यांनी या ग्रामसभेत मांडावी. त्याचा खुलासा ग्रामसभेत केला जाईल' असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुन्या प्रकल्पांवर भर

$
0
0

मनपा अर्थसंकल्प

कोल्हापूर टाइम्स टीम

'महसुली, भांडवली, विशेष प्रकल्प व वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानावर अधारित महापालिका प्रशासनाने १३८६ कोटी ९५ लाखांचा २०१९-२० चा अर्थसंकल्प प्रशासनाने सोमवारी स्थायी समितीकडे सादर केला. अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा, हरित क्षेत्र विकास, मलनिस्सारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापनाबरोबर शाहू क्लॉथ मार्केटमध्ये व्यापारी संकूल, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व सावित्रीबाई फुले रुग्णालयाची श्रेणीवाढ करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे,' अशी माहिती प्रभारी आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

तत्पुर्वी पाटणकर यांनी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्याकडे २०१९-२० चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सत्यजित कदम, संदीप कवाळे, सचिन पाटील, माधुरी लाड, पूजा नाईकनवरे, संजय मोहिते, राजाराम गायकवाड, सविता भालकर, दीपा मगदूम, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे आदी उपस्थित होते. यावेळी प्राथमिक शिक्षण मंडळ व महिला बालकल्याण विभागाने बजेट सादर केले.

मुख्य लेखापाल संजय सरनाईक म्हणाले, 'प्रशासनाने कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ई-ऑफिस सिस्टिम कार्यन्वित करण्यात येणार आहे. यामधून नागरिकांना गतिमान प्रशासनामुळे दिलासा मिळेल. येत्या आर्थिक वर्षात किमान ३५० कोटींपेक्षा अधिकचे प्रकल्प मार्गी लागतील. सेफसिटी-२ कचरा प्रश्न, अंबाबाई विकास आराखडा, चार गार्डनचे सुशोभिकरण तसेच रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे मुख्य उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.'

अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्प

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानअंतर्गत कोल्हापूर शहरासाठी ११४ कोटी ८१ लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. शहरासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइन योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. यामध्ये प्रामुख्याने शीर्षकामे, दाबनलिका, गुरुत्वनलिका व उंच टाक्या भरणेसाठी फिडर मेन्सचा समावेश आहे. हायड्रॉलिक मॉडेलिंगनुसार वितरण व्यवस्थेचे रिझोनिंग करून आठ नवीन झोन करण्यात येणार आहेत. २०४९ मध्ये २०५ एमएलडी इतक्या मागणीचा विचार करून योजनेचा आराखडा तयार केला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

हरितक्षेत्र विकास प्रकल्प

शहरामध्ये मोकळ्या जागा हरित क्षेत्र विकसित करून प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत अभियान अंतर्गत नागरी वनीकरण अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत महानगरपालिकेने प्रकल्प कार्यन्वित केला आहे. त्यानुसार शहरात २,८०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून पाच बंदिस्त खुल्या जागेत २,८०० शोभिवंत झाडे लावली आहेत. २०१६-१७ च्या आराखड्यानुसार त्रिमूर्ती उद्यान, टेंबलाई उद्यान व मंगेशकरनगर उद्यान या ठिकाणी हरित क्षेत्रांचा विकास केला आहे. २०१७-१८ च्या आराखड्यानुसार रंकाळा उद्यान विकसित करणे, सह्याद्रीनगर, टाकाळा, फुलेवाडी, घाटगे कॉलनी येथील उद्यान विकासासाठी दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

मलनिस्सारण प्रकल्प

शहरातील दुधाळी झोनमधील ११२. ९० किलोमीटर लांबीच्या ड्रेनेज लाइनचे काम अमृत योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. मलनि:सारण योजनेच्या ७२ कोटी ४७ लाखाच्या आराखड्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ठेकेदार निश्चित होऊन प्रत्यक्ष कामकाजास सुरवात झाली आहे. योजना अनुदानाचा पहिला हप्ता महापालिकेस प्राप्त झाला असून अर्थसंकल्पीय वर्षामध्ये योजने काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील सर्व झोपडपट्टयांचे सर्वेक्षण पूर्ण करुन सर्वांसाठी घरे कृती आराखडा व वार्षिक अंमलबजावणी आराखडा सरकारकडे सादर केला आहे. योजनेंतर्गत खासगी भागीदारीद्वारे महापालिकेच्या रिसनं १००९/१ जागेवर २३४ घरे बांधण्यात येणार आहेत. प्रत्येकी ३० चौरस मीटर क्षेत्रावर घरे बांधण्यात येथील. तसेच तीन खासगी विकासकांच्या मदतीने १,२७६ घरे मंजूर झाली आहेत. यापूर्वी २५२ लाभार्थ्यांचे अनुदान महापालिकेस प्राप्त झाले असून १२४ लाभार्थ्यांनी बांधकाम परवाना घेतला आहे.

मनपा रुग्णालयांची श्रेणीवाढ होणार

महापालिकेच्या हॉस्पिटल सुधारणा अंतर्गत सावत्रिबाई फुले रुग्णालयामध्ये अत्याधुनिक अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला आहे. विभाग सुरू झाल्यापासून सुमारे १५० अत्यवस्थ रुग्णांवर अत्यंत अल्प खर्चामध्ये उपचार केले आहेत. सावित्रीबाई फुले, पंचगंगा रुग्णालयासह अन्य रुग्णालयात आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण केली आहेत. या रुग्णालयांच्या श्रेणीमध्ये वाढ करण्यासाठी एक कोटी दहा लाखांची तरतूद केली आहे. यामध्ये औषध साठ्याचाही समावेश आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी ३७ कोटी, १७ लाख

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शौचालय उभारणीसाठी एक कोटी ६० लाखांचा निधी मिळाला. यामधून १,६१८ लाभार्थ्यांना अनुदान वितरित केले असून १,३१९ लाभार्थ्यांची बांधकामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित बांधकामे प्रगतिपथावर आहेत. तसेच याच अभियानातंर्गत ३७ कोटी, १७ लाखांचा विशेष निधी प्राप्त झाला असून घनकचरा व्यवस्थापनच्या फेज एक व दोन आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. महापालिकेच्या हिश्श्याची रक्कम केंद्रीय वित्त आयोगामधून उपलब्ध केली आहे. त्याचबोरबर शहर कोंडाळामुक्त करुन दैनंदिन घनकचरा संकलनासाठी १०४ टिपर रिक्षा व तीन गार्बेज टिपर वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच कसबा बावडा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर कॅपिंगला अर्थसंकल्पीय वर्षामध्ये सुरुवात होऊन येथील कचऱ्याचा ढिगाचा कायमस्वरुपी प्रश्न मिटणार आहे.

ई गर्व्हनन्स स्मार्ट सुविधांसाठी साडेसात कोटी

महानगरपालिकेमार्फत ई-ऑफिस यंत्रणा, घरफाळा जीआयएस, फेस रेकग्निशन सिस्टिम, कॅशलेससाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा, ऑनलाइन कंम्प्लेंट सिस्टिम, पाणीपुरवठा स्पॉट बिलिंग व कलेक्शन इत्यादी सुविधा ई- गर्व्हनन्स माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. प्रकल्प सुरळीत कार्यन्वित करण्यासाठी प्रकल्प यंत्रणेचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. डेटा सेंटरमधील सॉफ्टवेअर व सर्व्हअर, हार्डवेअर बदलण्यात येणार आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी साडेसात कोटीची तरतूद केली आहे. आवश्यकतेनुसार साहित्य खरेदीसाठी चार कोटीची तरतूद केली आहे.

अंबाबाई मंदिर परिसर विकास प्रकल्प

करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र परिसर विकास आराखड्याअंतर्गत ढोबळ अंदाजपत्रकीय रक्कम रुपये ८७ कोटी, १७ लाख इतका खर्चा आराखडा सादर केला होता. ८० कोटी अनुदान व उर्वरित सात कोटीचे महानगरपालिकेच्या निधीमधून करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा सादर केला आहे. त्यास सरकारीची तत्वत: मंजुरी मिळाली आहे. यानुसार दर्शन मंडप, भक्त निवास, पादचारी मार्ग, मंदिर परिसर सौंदर्यीकरण, सार्वजनिक सुविधा, मंदिर स्थळ दिशादर्शक फलक इत्यादी कामांचा समावेश प्रकल्पामध्ये आहे.

थेट पाइपलाइन योजना जाणार पुर्णत्वास

शहरास कायम स्वरुपी शुद्ध व मुबलक पाण्याचा पुरवठा करणेच्या दृष्टीने काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइन योजना मंजूर केली आहे. शहराची २०४५ लोकसंख्या लक्षात घेऊन प्रतिदिन २३८ दशलक्ष लिटर्स पाण्याची पुर्तता होईल असा आराखाडा तयार केला आहे. योजनेला ४८८ कोटी, ७३ लाखांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी महापालिकेला १४८ कोटी, ४० लाखांचा निधी उभा करावा लागेल. आतापर्यंत ५२ कोटी योजनेमध्ये गुंतवले असून उर्वरित निधी केंद्रीय वित्त आयोग व कर्ज उभारणीमधून उपलब्ध करण्यात येतील. २०१९-२० मध्ये योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

रंकाळ्यासाठी चार कोटी ८० लाख

राज्य सरकारचे पर्यटन विकास योजनेअंतर्गत रंकाळा परिसर विकास करण्यासाठी चार कोटी ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामधून रंकाळा उतरत्या भिंतीची दुरुस्ती, रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन करण्यात आले आहे.

सेफ सीटी प्रकल्प टप्पा दोन

महापालिकेकडून कोल्हापूर शहर सेफ सीटी प्रकल्प टप्पा एकची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे. सेफ सीटी टप्पा दोन प्रस्तावित आहे. यामध्ये व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टम, इमर्जन्सी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम, पब्लिक अॅड्रसे सिस्टिम, पोलिस एम-बीट सिस्टिम, ट्रॅफिक एम-चलन सिस्टिम, व्हिझिटर इन्फॉरमेशन मॅनेजमेंट सिस्टिम, डायल- १०० प्रकल्प राबविणे, सी. टी. ऑपरेशनस् डॅश बोर्ड आदींचा समावेश आहे. प्रकल्प राज्य सरकारच्या अनुदानातून राबवण्यात येईल.

केशवराव भोसले नाट्यगृह परिसर विकास टप्पा दोन

प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत हेरिटेज कंपाउंड वॉल, दगडी कमानी, ब्लॅक बॉक्सची नवीन इमारत, खाऊ गल्ली, लँडस्केप तसेच पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावातील अंदाजपत्राकची तांत्रिक छाननी होऊन नऊ कोटी ९३ लाखाचा आराखडा सरकारकडे सादर केला आहे. राज्य सरकारकडून आठ कोटी ३९ लाखांचे अनुदान अपेक्षित असून उर्वरित निधीची अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे.

शाहू क्लॉथ मार्केटमध्ये व्यापारी संकूल

महानगरपालिकेच्या शाहू क्लॉथ मार्केट येथे अद्ययावत व्यापारी संकुल विकसित करण्यात येणार आहे. संकुलामध्ये कमर्शिअल स्पेसेस, शॉपस व ऑफिसेस प्रस्तावित आहेत. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अथवा मनपाच्या स्वत:च्या निधीमधून विकसित करण्याचा विचार आहे. त्यासाठी स्वनिधीतून दहा कोटीची तरतूद केली आहे.

नऊ कोटींचा हप्ता

महापालिकेने यापूर्वी विविध विकास प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जावर गेल्या आर्थिक वर्षापासून नऊ कोटींचा हप्ता सुरू झाला आहे. नगरोत्थान व स्ट्रॉम वॉटर प्रकल्पावरील कर्जाचा समावेश आले. याव्यतिरिक्त या वर्षापासून आणखी ११ कोटी कर्जाचा हप्ता सुरू होण्याची शक्यता आहे. उत्पन्नातील खर्च कर्जावर खर्ची पडणार असल्याने त्याचा परिणाम विकासावर होण्याची शक्यता आहे.

स्वनिधीतील विकासकामांच्या निधीला कात्री

२०१८-१९ च्या अर्थसंकल्पामध्ये स्वनिधीतील विकासकामांसाठी १०३ कोटींची तरतूद केली होती. त्यापैकी ९० कोटीची अदाबाकी केली आहे. मात्र यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये स्वनिधीतील विकासकामांसाठी ८० कोटीची तरतूद करताना २३ कोटीच्या निधी कमी केला आहे.

विशेष तरतूद

सार्वजनिक वाहतूक : १० कोटी

प्राथमिक शिक्षण : ३१ कोटी

महिला बालकल्याण : ४ कोटी

अपंग कल्याण : ३ कोटी ७५ लाख

स्वनिधीतून विकासकामे : ८० कोटी

पर्यावरण (भांडवली खर्चाच्या) : २५ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलव्यवस्थापन कार्यशाळा

$
0
0

कोल्हापूर: 'पाणी बचतीतून योग्य वापर व जमिनीत पाण्याचे पुनर्भरण या गोष्टी जलव्यवस्थानात महत्त्वाच्या आहेत,' असे प्रतिपादन प्रा. डॉ. डी. एच. पवार यांनी केले. येथील गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये जलव्यवस्थापन विषयक कार्यशाळा झाली. याप्रसंगी बोलताना पवार यांनी पाणी प्रश्नाचे जागतिक स्वरुप व त्यासाठी करावयाच्या उपाययोजनेचे महत्त्व विशद केले. डॉ. अनिलराजे जगदाळे यांनी भूशास्त्र व भूरुपशास्त्राचे पाणी व्यवस्थापनातील महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. इस्त्रायलसारखा दुष्काळी देश योग्य पाणी व्यवस्थापनातून प्रगतीच्या संधी साधतो. त्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. योगिता पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एम. के. पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. एस. जी. राक्षसे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. ए. बी. गडकरी, एस. एच. पिसाळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर महापालिकेला थ्री स्टार मानांकन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाने मंगळवारी स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवलेल्या मोहिमेतंर्गत मानांकन जाहीर केले. शहर कचरामुक्तीसाठी असलेले थ्री स्टार मानांकन कोल्हापूर महापालिकेसह पन्हाळा, पेठवडगाव, मलकापूर व गडहिंग्लज नगरपालिकांना मिळाले. मानांकन मिळालेल्या महापालिका व नगरपालिका पदाधिकाऱ्यांचा गौरव ६ मार्च रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

स्वच्छ भारत अभियानातंर्गत देशातील महापालिका व नगरपालिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. देशातील ४,२३७ महापालिका व नगरपालिकेंचे सर्वेक्षण करताना ६४ लाख नागरिकांच्या प्रश्नावलीसोबत प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये, कचरा संकलनांची माहिती घेण्यात आली. केंद्रीय पथकाने केलेल्या सर्व्हेमध्ये कोल्हापूर महापालिकेसह जिल्ह्यातील चार नगरपालिका कचरामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले.

३१ जानेवारीपर्यंत कोल्हापूर महापालिकेच्या ८१ प्रभागांमध्ये केंद्रीय पथकाने सर्व्हे केला. दहा दिवस पथक विविध प्रभागांतून प्रत्यक्ष नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेला थ्री स्टार मानांकन मिळाले. कोल्हापूरसह राज्यातील ४० महापालिका,नगरपालिकांनाही थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. स्वच्छ अभियानातंर्गत टू ते सेव्हन स्टार मानांकन दिले जाते. यापूर्वी कोल्हापूर महापालिकेला टू स्टार मानांकन मिळाले आहे. त्यानंतर महापालिकेला थ्री स्टार मानांकन मंगळवारी जाहीर झाले. याबाबतचे पत्र स्वच्छ भारत अभियानाचे संचालक व्ही. के. जिंदाल यांनी महापालिकेला पाठवले आहे. बुधवारी (ता. ६) नवी दिल्लीतील मौलाना आझाद रोडवरील विज्ञान भवन येथे पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे. त्यासाठी महापौर,आयुक्त व उपायुक्तांना निमंत्रित केले आहे.

'महापालिकेकडून शंभर टक्के कचरा संकलित केला जातो. यापुढे ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १०४ टीपर रिक्षांची वर्क ऑर्डर दिली आहे. याद्वारे फाइव्ह स्टार मानांकनासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे.

मंगेश शिंदे, उपायुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथालय सदस्यांचा जलसमाधीचा इशारा

$
0
0

ग्रंथालय सदस्यांचा जलसमाधीचा इशारा

कराड :

सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ व्हावी, या मागणीसाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू होते. दरम्यान, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने सार्वजनिक ग्रंथालय कृती समितीच्या सदस्यांनी मागण्या मान्य न झाल्यास गुरुवारी, २८ रोजी कृष्णा नदीपात्रात सामुहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधीस्थळानजीक सुरू असलेले सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे उपोषण सलग पाचव्या दिवशीही सुरू होते. त्यांच्या मागण्यांच्या पुरतेसाठी सोमवारी, २५ रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंत्रालयात ग्रंथालय कृती समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित केली होती. या संदर्भात ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी मंत्रालय सचिवांशी चर्चाही केली होती. मात्र, या बैठकीत मागण्या संदर्भात टोलवाटोलवी केली. परिणामी या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.

दरम्यान, प्रशासनाच्या वतीने येथील प्रांताधिकारी हिम्मत खराडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली, उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मागण्या मान्य न झाल्यास गुरुवारी, २८ ग्रंथालय कृती समितीच्या सदस्यांनी प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समधीस्थळानजीक कृष्णा नदीपात्रात सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोन ठार

$
0
0

कराड :

इंदोली (ता. कराड) गावच्या हद्दीत इंदोली फाटा येथे वॅगनार कार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

विजय कलगुटकर (रा. गोवा) व फहारबीन सुलतानबीन सालेह, (पूर्ण नाव पत्ता मिळू शकला नाही) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. हिना सय्यद, शगुप्ता सय्यद, अमिदी सय्यद, अशी जखमीची नावे आहेत. जखमीपैंकी सहा वर्षांची हिना गंभीर जखमी असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रकसह घटनास्थळावरुन पलायन केले, मात्र त्यास भुईंज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत उंब्रज पोलिस ठाण्यात झाली नव्हती, त्यामुळे अधिक तपशील मिळू शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओपन बारवर कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरुच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने खुल्या मैदानावर (ओपन बार) मद्यपान करणाऱ्या १३ जणांवर कारवाई करुन १८ हजार ४५० रुपयांची दारु जप्त केली. तसेच इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या अशोक देवाप्पा पिंगळे (रा. कबनूर, ता. हातकणंगले) याच्यावर कारवाई करुन १७ हजार ५५० रुपयांची देशी विदेशी दारु जप्त केली.

सोमवारी रात्री रंकाळा तलावाजवळील तांबट कमान, कदमवाडी स्मशानभूमीजवळ उघड्यावर मद्यपान करणाऱ्यावर कारवाई करुन १३ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. बलवानसिंग सुलतानसिंगर बाबरी (रा. विचारे माळ), दौलतसिंग दलसिंग बाबरी (रा. नेहरुनगर, पेठ वडगाव), सतीशसिंग बबनसिंग बाबरी (रा. चुना भट्टीजवळ तामगाव), विशाल बाबूराव चव्हाण (रा. पांजरपोळ), प्रसाद पांडुरंग सावंत (रा. यादवनगर), अमर सूर्यकांत शिंदे (रा. आर.के.नगर), मनोज आनंदा घोरपडे (रा. जुना बुधवार पेठ), शिवम राजेंद्र गायकवाड (रा. सोमवार पेठ), अमित पांडुरंग लाड (रा. दुसरा बस स्टॉप, फुलेवाडी), प्रसाद दिनकर कदम (रा. नाळे कॉलनी), साहिल निसार बागवान (रा. भोई गल्ली), प्रतिक शेखर गोरे (रा. स्टेशन रोड, शाहूपुरी) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैनिकी कारवाईचे उत्साही स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय हवाई दलाने बालाकोटवर मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता हल्ला करुन अनेक अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले. या सैनिकी कारवाईचे शहर-जिल्ह्यात नागरिकांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केले. नागरिकांनी शिवाजी चौक, दसरा चौक, महाद्वार आदी ठिकाणी साखर, जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा करत फटाक्यांची आतषबाजी केली. भाजप, शिवसेनेसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि वैयक्तिक स्तरावर नागरिकही आनंद साजरा करीत होते.

पुलवामा हल्ल्याला मंगळवारी बारा दिवस उलटले. त्या हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशवासियांमध्ये अतिरेकी कारवायांबाबत संतापाची लाट उसळली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून तर थेट पाकिस्तानवर हल्ला करून याचा बदला घ्यावा असे संदेश फिरत होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाने पुलवामा घटनेचा बदला घेतल्याप्रमाणे बालाकोटवर हल्ला चढवला. 'मिराज २०००' या लढाऊ विमानांच्या साह्याने केलेल्या हल्ल्यामध्ये अतिरेकी अड्ड्यांसह सुमारे ३०० अतिरेकी ठार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच देशवासियांच्या आनंदाला भरते आले.

सकाळी भाजप युवा मोर्चाच्यावतीने दसरा चौकात साखर, जिलेबी वाटप करत फटाक्यांची आतषबाजी केली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्', 'भारतीय सैन्यदलाचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसेनेच्यावतीने शिवाजी चौकात साखर वाटप करण्यात आली. तर, महाद्वार रोड फेरीवाले व व्यापारी संघटनेच्यावतीने अतिरेकी कारवाईचा निषेध करत सैनिकी कारवाईचे जोरदार स्वागत केले. अन्य हिंदुत्ववादी संघटनांनाही आनंदोत्सव साजरा केला. अन्य कोल्हापूरवासियांनी वैयक्तिक पातळीवर सैनिकी कारवाईचे समर्थन करताना चहा वाटप केले. महत्त्वाच्या चौकांसह शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, संभाजीनगर, राजारामपुरीसह उपनगरांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.

जल्लोषात दीपक मगदूम, संजय साडविलकर, सुरेश काकडे, भागवत पोतदार, आण्णा पोतदार, संदीप लाड, अमित इंगळे, सुरेश जरग, शाम जोशी, किशोर घाटगे, अमृत लोहार, अविनाश पाटील, केदार पारगावकर, अमित माने, प्रदीप जरग, गणेश रेळेकर, अनुराधा गोसावी, महेश पाटील, संतोष धोंडमनी, सुधीर साळुंखे, अमर ढवन, अमर काकडे आदी उपस्थित होते.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. आज बरोबर १३ व्या दिवशी भारतीय वायूसेनेच्या १२ मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकमध्ये घुसून जैश ए महंम्मद या दहशतवादी संघटनेच्या बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील तळ निव्वळ १९ मिनिटांत उद्धवस्त केले. वायुसेनेची ही कारवाई म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी शहीद जवानांना सर्वात योग्य श्रद्धांजली होय.

- संजय शिंदे, निवृत्त मेजर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सैन्य भरतीसाठी आलेले दोन उमेदवार जखमी

$
0
0

सैन्य भरतीसाठी आलेले

दोन उमेदवार जखमी

येथे सैन्य भरतीसाठी आलेले दोन उमेदवार आज जखमी झाले. सनी संतोष ज्वारे (वय १८ रा. निपाणी, जि. बेळगाव) हा युवक चक्कर येऊन पडल्याने जखमी झाला. तर शारीरिक चाचणीवेळी पळताना पडल्याने युवराज बाबासाहेब पाटील (रा. २०, रा. हिंगोली) हा युवक जखमी झाला. दोघांवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहार चौकशी अहवालआज सादर होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीकडून बुधवारी (ता. २७) चौकशी अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. चौकशीचे काम व अहवाल बनविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चौकशी समितीच्या सदस्यांच्या त्या अहवालावर स्वाक्षरी होणार आहेत. बुधवारी दुपारनंतर पाच सदस्यीय समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर हा अहवाल अध्यक्षा शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत. लोहार यांच्या कामकाजाविषयी संघटना व शिक्षकांनी गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत चौकशी सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीत एक जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतात उसाचा ट्रॅक्टर का घातलास? असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत संतोष आनंदा हिंदोळे (वय २९, रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) हा युवक जखमी झाला. याप्रकरणी दत्तात्रय शंकर हिंदोळे (वय ५०), अक्षय दत्तात्रय हिंदोळे (२२), संगिता दत्तात्रय हिंदोळे (४५, रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) यांच्याविरोधात इस्पुर्ली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, संतोष हिंदोळे यांच्या शेतात संशयितांनी भरलेल्या उसाच्या ट्रॅक्टरची वाहतूक केली. याबद्दल संतोषने संशयितांना जाब विचारला होता. त्याचा राग मनात धरुन संशयितांनी संतोषच्या घरात घुसून त्याला मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या संतोषला हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. त्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली पाच टाके पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थुंकल्याच्या कारणावरून शिवाजी पेठेत एकाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पेठेतील हिंदवी स्पोर्ट्स परिसरात रस्त्यावर थुंकल्याच्या कारणावरुन रॉडने केलेल्या मारहाणीत रोहन दिलीप सूर्यवंशी (वय २५, रा. गंगावेश) हा युवक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी विश्वदीप साळोखे (रा. तटाकडील तालीमजवळ) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सांगितले की, रोहन सूर्यवंशी व संशयित विश्वदीप साळोखे हे दोघेही वेगवेगळ्या मोटारसायकलवरून जात होते. यावेळी विश्वदीपच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला त्यांच मित्र रस्त्यावर थुंकला. थुंकी रोहन यांच्या अंगावर उडाली. त्याबद्दल रोहन यांनी जाब विचारला असताना विश्वदीपने रोहनला शिविगाळ करून त्याला अॅल्युमिनियमच्या रॉडने मारहाण केली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर लोकसभेच्या डॉ. अरुणा माळी उमेदवार

$
0
0

कोल्हापूर : 'वंचित बहुजन आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेसाठी डॉ. अरुणा माळी यांना उमेदवारी देण्यात येणार आहे' अशी माहिती आघाडीचे प्रमुख लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लक्ष्मण माने म्हणाले, 'डॉ. माळी या उच्चशिक्षित असून युवकांना रोजगार देण्यासाठी त्या विशेषकरून प्रयत्न करतील. पक्ष बांधणीमध्ये त्यांनी यापूर्वी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.' यावेळी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अस्लम मुल्ला, इंद्रजित कांबळे, सुहेल शेख, प्रा. शाहिद शेख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images