Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अर्थसंकल्प आज ‘स्थायी’कडे सादर होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरवासियांचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर महापालिकेचा २०१९-२०२० या वर्षाचा अर्थसंकल्प सोमवारी (ता. २५) प्रशासन स्थायी समितीकडे सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता असल्याने प्रशासन एक महिना आधीच अर्थसंकल्प सादर करणार आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे शहरवासियांचे नेहमीच लक्ष असते. शहर विकासाच्या कोणत्या योजनांचा यात समावेश आहे, याबाबत त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे. अर्थसंकल्पामध्ये कोणतीही करवाढ नसल्याचे संकेत सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने यापूर्वीच दिले असले, तरी नव्या कोणत्या योजना प्रशासनाने सुचविल्या आहेत याची माहिती अर्थसंकल्प सादर झाल्यावरच मिळू शकेल. त्याचवेळी परिवहन व प्राथमिक शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प स्थायीकडे सादर होईल. प्रशासनाने 'स्थायी'कडे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यामध्ये काही बदल करून पुढील आठवड्यात तो मंजुरीसाठी महासभेकडे सादर केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रकल्पग्रस्तांचा आज वनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

न्याय हक्काच्या मागण्यांसाठी चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्त गेल्या चौदा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. घरदार आणि लहान मुलांना गावाकडे सोडून महिला व पुरुषांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला आहे. जिल्हा प्रशासनासह वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाकडे पाठपुरावा करुनही प्रश्ने सुटत नाहीत. त्याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्त सोमवारी (ता. २५) वनसंरक्षक कार्यालयावर दुपारी बारा वाजता मोर्चा काढणार आहेत.

श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांची १३ फेब्रुवारी २०१९ रोजी वन्यजीव कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी ऊहापोह करण्यात आली. मात्र कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. दोन आठवड्यापासून आंदोलन सुरू असताना प्रशासकीय पातळीवर काहीच हालचाली होत नाहीत ही गंभीर बाब असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांच्या चर्चेवेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच्या उपसंचालिका, कोल्हापूर उपविभागीय वनसंरक्षक आणि चांदोली अभयारण्यातील वनक्षेत्रपाल या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याविषयी कळविले आहे.

'तेरा फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे पाच कोटी ६३ लाख रुपयांचा निधी वारणा कालवा विभागाचे (क्रमांक १ इस्लामपूर) कार्यकारी अभियंत्याकडे वर्ग करावेत, नागरी सुविधा व घरबांधणी अनुदान, गोठा अनुदानसाठी लागणारा निधी व त्या वाटपाबाबतचा अहवाल, भूसंपादनासाठी उपलब्ध चार कोटी ४२ लाख मधून शिल्लक राहिलेल्या निधीचे प्रकल्पग्रस्तांना वाटप या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. यांसह अन्य प्रश्नांच्या सोडवणूक झाली पाहिजे' यासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हाप्रमुख राजाराम पाटील, मारुती पाटील, कॉम्रेड संपत देसाई, डी. के. बोडके यांनी सांगितले. दरम्यान, धरणे आंदोलनात शंकर पाटील, आनंदा आमकर, प्रकाश बेलवलकर, नजीर चौगुले, पांडूरंग पवार, भगवान झोरे, भगवान बोडके, बंडू पाटील आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार क्षीरसागरांनी पक्षाची प्रायव्हेट कंपनी केली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दांडियावीर अशी ओळख असलेल्या आमदार राजेश क्षीरसागर हे शिवसेनेतील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकले नाही. राबणारे कार्यकर्ते नसल्याने पगारी कार्यकर्ते नेमून पक्ष प्रायव्हेट कंपनी केलेल्या आमदारांनी राज्यभर कार्यकर्ते असलेल्या राणे कुटुंबीयांवर टीका करू नये. शहरातील शिवसैनिकांच्या त्यागामुळे चुकून आमदार झाला आहात' असा टोला स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.

तोडकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 'दहा वर्षे आमदार असलेल्या क्षीरसागर यांना स्वत:च्या प्रभागात नगरसेवक निवडून आणता येत नाहीत. ते चारपेक्षा जास्त नगरसेवकांना निवडून आणू शकले नाहीत. गेल्या दहा वर्षात सरकारी अधिकारी, डॉक्टर व उद्योगपतींशी तोडपाणी करण्यातच त्यांचे कर्तृत्व दिसून येते. दुसऱ्यांनी केलेल्या आंदोलनात घुसून क्रेडिट घेऊन एकही यशस्वी आंदोलन उभे केलेले नाही. नारायण राणे यांना कोल्हापुरात मानणारा मोठा वर्ग असल्याने उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचे नीतेश राणे यांनी जाहीर केल्याने ते वाटेल तसे आरोप करीत आहेत. 'तोंडपाणी' आमदरांच्या टिकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही' असे पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू कॉलेजमध्ये १२ मार्चला राष्ट्रीय चर्चासत्र

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज व प्रा. डॉ. एन. डी. पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बारा मार्च रोजी 'महात्मा गांधीजींचे विचार व वर्तमानकालीन परिस्थिती' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. उद्योजक एम. बी. शेख हे अध्यक्षस्थानी असतील. चर्चासत्रात राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. भालबा विभुते, समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे समारोप होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सी.जे. खिलारे यांनी दिली आहे. चर्चासत्रातील सहभाग, पेपर सादरीकरण यासंदर्भातील माहितीसाठी कॉलेजमधी प्रा. डॉ. एम. बी. देसाई, प्रा. एम. के. कन्नाडे व प्रा. संदीप महाजन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतर्फी प्रेमातून बारावीच्या मुलीचे अपहरण

$
0
0


पंढरपूर: एकतर्फी प्रेमातून बारावीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या पाजजणांना अटक करण्यात आली आहे. अपहरण करणाऱ्यांपैकी दोनजण हे तरुणीचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. आरोपींपैकी सुधाकर साळुंखे या तरुणीच्या आत्येभाऊला मुलीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे त्याने अपहरण केले असल्याची बाब समोर आली आहे.

बारावीचा पेपर दिल्यानंतर केंद्रावरून ही मुलगी पालकांसोबत घरी निघाली होती. मुलीला घेऊन निघालेल्या पालकांच्या दुचाकीला पखालपूर मंदिराजवळ काही तरुणांनी बोलेरो जीप आडवी आणून अडवले. बोलेरोतील चार तरुणांनी पालकांना धमकावत बळजबरीने मुलीचे अपहरण केले. या अपहरण नाट्यातील दोन तरुण मुलीचे आत्येभाऊ असल्याचे पालकांनी ओळखले. त्यांनी तातडीने पोलिसांना या अपहरणाची तक्रार केली. परीक्षार्थी मुलीच्या अपहरणामुळे हादरलेल्या पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मोबाईलवरून यातील आरोपींचे लोकेशन तपासण्यात आले. हे आरोपी मुलींसह सातारा परिसरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सातारा पोलिसांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास बोलेरो गाडी पकडण्यात आली. यावेळी अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करत मुलीची सुखरुप सुटका केली. यातील आरोपी सुधाकर साळुंखे हा या मुलीचा आत्येभाऊ असून त्याला या मुलीसोबत लग्न करायचे होते. मात्र, लग्नासाठी मुलगी आणि कुटुंबीयांचा विरोध होता. अखेर आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने अपहरण करून लग्न करण्याची तयारी केली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हालचाल करून या पाच आरोपींना अटक केली. या प्रकारामुळे पोलिसांनी आता परीक्षा केंद्र आणि ग्रामीण भागात गस्त वाढवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएसके गुंतवणूकदारांना अर्ज भरण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डीएसके कंपनीत केलेली गुंतवणूक परत मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी दोन प्रतीत अर्ज करावेत, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक आर.बी. शेडे यांनी केले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी डीएसकेंची १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून त्यासाठी मावळ प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोल्हापुरातील २३३ हून अधिक गुंतवणूकधारकांनी डीएसके कंपनीत गुंतवणूक केलेली अंदाजे २० कोटी रुपये रक्कम परत मिळावी यासाठी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिले आहेत. प्रत्येक अर्जदारांचे जबाब घेण्यात आले आहेत. कंपनीचे मालक डी.एस. कुलकर्णी यांच्याविरोधात कोल्हापूर, पुणे, सांगली, सोलापूरसह सहा शहरातील गुंतवणूकदारांनी गुन्हे दाखल केले आहेत. गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळवण्यासाठी कुलकर्णी यांची संपत्ती जप्त केली असून त्या संपत्तीतून रक्कम परत देण्यासाठी मावळ प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. रक्कम परत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना दोन प्रतीत अर्ज भरावयाचे आहेत. या अर्जाचा नमुना कसबा बावडा येथील मुख्य पोलिस प्रशासकीय इमारतीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर लावलेला आहे. गुंतवणूकदारांकडून भरुन घेतलेले अर्ज आर्थिक गुन्हे शाखा स्वीकरणार असून त्यानंतर सर्व अर्ज प्रातांधिकाऱ्याकडे जमा केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत धर्म विचारमंथनपरिषद रविवारी सोलापुरात

$
0
0

लिंगायत धर्म विचारमंथन

परिषद तीन मार्च रोजी सोलापुरात

सोलापूर :

अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने आयोजित दुसरी लिंगायत धर्म विचारमंथन परिषद सोलापुरात रविवारी, तीन मार्च रोजी होत आहे. बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. सोलापुरात बसव चळवळ रुजवणाऱ्या सिंधुताई काडादी अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

जानेवारी महिन्यात औरंगाबाद येथे झालेल्या पहिल्या लिंगायत धर्म विचारमंथन परिषदेला

कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लिंगायत धर्माचे अभ्यासक, संशोधक, वक्ते आणि चळवळीत अग्रभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. येथील होटगी रोडवरील मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन येथे दिवसभर चार सत्रामध्ये ही मंथन परिषद होणार आहे. लिंगायत धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा समज गैरसमज, लिंगायतांचे राष्ट्र निर्मितीतील योगदान, लोकशाहीचे जनकः युग पुरुष महात्मा बसवण्णा, वचनकार सिद्धरामेश्वर, शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि महात्मा बसवण्णा अनुबंध आदी विषयावर या परिषदेत मंथन होणार आहे. शरण साहित्याचे अभ्यासक डॉ. शशिकांत पट्टणशेट्टी, लिंगायत साहित्याचे ज्येष्ठ संशोधक डॉ. सूर्यकांत घुगरे, राजशेखर तंबाके आदी सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत निवडणुकीत उंडाळकर गटाचा धुव्वा

$
0
0

ग्रामपंचायत निवडणुकीत

उंडाळकर गटाचा धुव्वा

कराड :

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर (ता. कराड) ग्रामपंचायतीमध्ये माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील गटाने एकत्रित लढत देत सत्तांतर घडवले. त्यामध्ये माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर गटाचा १५-२ अशा फरकाने धुव्वा उडाला आहे. अन्य ग्रामपंचायतींतही अपेक्षित निकाल लागले आहेत.

कराड तालक्यातील दुसऱ्या टप्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी २४ रोजी मतदान झाले होते. यामध्ये मसूर ग्रामपंचायतीसाठी विक्रमी ८७.३२ टक्के मतदान झाले होते. तर वाण्याचीवाडी, माळवाडी, वडोली-भिकेश्वर व राजमाची ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान झाले होते. कचरेवाडी, पवारवाडी आणि धनवडी, या ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या होत्या. तसेच यादववाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी मतदान घेण्यात आले.सोमवारी झालेल्या मतमोजणीत मसूर ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेब पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणाऱ्या जनशक्ती पॅनलने माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या मसूर नागरिक पॅनेलचा सरपंच पदासह १५-२ असा धुव्वा उडविला. उंडाळकर गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत जनशक्ती पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार पंकज बाळकृष्ण दिक्षित विजयी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तेजस्वी सातपुतेसाताऱ्याच्या पोलिस अधीक्षक

$
0
0

तेजस्वी सातपुते

साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक

सातारा

साताऱ्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी तेजस्वी सातपुते यांची वर्णी लागली आहे. देशमुख यांची अवघ्या सात महिन्यांत बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नव्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या २०११च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सध्या त्या पुणे येथील वाहतूक विभागाच्या उपआयुक्त होत्या. दरम्यान, याच पदावर आता साताऱ्याचे एसपी पंकज देशमुख यांची बदली झाली आहे. त्यांनी सात महिन्यांच्या कालावधीत पोलिस प्रशासनात अमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला. सातपुते म्हणाल्या, 'साताऱ्याचा इतिहास ज्वलंत, रोमांचकारी आहे. शांत व समृद्ध अशी ओळख आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून हे आपले पहिलेच पोस्टिंग आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपीचे पाच प्रकार उघडकीस

$
0
0

कोल्हापूर

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी पाच कॉपीचे प्रकार उघडकीस आले. या प्रकाराची चौकशी करुन संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र, जनरल फाऊंडेशन व सचिवाची कार्यपद्धतीन या विषयांची परीक्षा होती. कोल्हापूर विभागातून ८९ हजार विद्यार्थ्यांनी या चार विषयाची परीक्षा दिली. दरम्यान, कळे, इचलकरंजी,गोखले कॉलेज येथे एक तर गारगोटी येथे दोन विद्यार्थी कॉपी करताना सापडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ओपन बार’ वर कारवाईचा बडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात बेकादेशीर दारु विक्री करणाऱ्या व खुल्या जागा, मैदानावर (ओपन बार) मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बेकायदा मद्यविक्री करणाऱ्या सहाजणांवर तर मैदानावर मद्यपान करणाऱ्या १५ जणांवर कारवाई करुन १२ हजार ८३८ रुपये किंमतीची देशी व विदेशी दारु जप्त केली. ही कारवाई कायमस्वरुपी सुरू राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. राजारामपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, भुदरगड, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांना सहा संशयितांना अटक केली. गीता उर्फ गुड्डी शाम मछले (रा. पांजरपोळ झोपडपट्टी), संतोष मुरलीधर बोंगाळे (यादवनगर), अनिल ठाकूरसिंग मछले (रा. मोतीनगर), कांतीलाल गणेश हासदा (रा. माळवाडी टोप, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

ईपी हायस्कूल मैदान, खानविलकर पेट्रोल पंपाच्यामागे, पंचगंगा स्मशानभूमीजवळ, हॉकी स्टेडियम परिसरातील खुली मैदाने याठिकाणी मद्यपान करणाऱ्या १५ जणांवर पोलिसांनी कारवाई केली . रवी अंश लोहार (रा. सुतारवाडा, दसरा चौक), अमित रंगराव जाधव (रा. न्यू शाहूपुरी), पोपट चंद्रकांत झेंडे अनिकेत राजेश निबजिया (दोघे रा. मंगळवार पेठ),विशाल कुंदन येळवणकर, सुजय शंकर कांबळे, विशाल गौतम कांबळे (तिघे रा. सिद्धार्थ नगर), रवि बाबासो गायकवाड (रा. रमणमळा), अभिजीत संभाजी देवकुळे (रा. शास्त्रीनगर), रोहीत जयवंत कांबळे , जीवन बाबासो जामकर (दोघे रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), अनिल अशोक मछले (रा. मोतीनगर), इम्रान मुबारक शेख, संतोष श्रीकांत सोळंकी (दोघे रा. साळोखे पार्क), नंदकुमार बाबूराव गिरीगोसावी (रा. पाण्याचा खजिना, मंगळवार पेठ ) अशी कारवाई केलेल्या संशयितांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावी परीक्षेवर शिक्षकांचा बहिष्कार कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्युनिअर कॉलेजच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर नियामक व परीक्षकांनी टाकलेला बहिष्कार सोमवारी कायम राहिला. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली ज्युनिअर कॉलेज शिक्षकांनी अहकार आंदोलन पुकारल्यामुळे राज्यभरातील उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व तपासणीचे काम ठप्प आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मंगळवारी (ता.२६) शिक्षक महासंघाच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत दुपारी बारा वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आठ सदस्यीय नियामक मंडळाचे शिष्टमंडळ चर्चेत सहभागी होणार आहे. यामध्ये अध्यक्ष अनिल देशमुख, कार्याध्यक्ष अविनाश तळेकर, संजय शिंदे, विलास जाधव, संतोष फाजगे, डॉ. अविनाश बोर्डे, अशोक गवाणकर आदी संघटनेच्या मागण्या मांडणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी बोलविलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीवर तीनही जिल्ह्यातील नियामकांनी बहिष्कार टाकला. संपूर्ण राज्यभर हेच चित्र आहे. राज्यभरातील नियामक व परीक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीसाठी असहकार आंदोलन पुकारल्यामुळे इंग्रजी, मराठी, हिंदीसह अन्य विषयाच्या मिळून तब्बल ३० लाखांहून अधिक उत्तरपत्रिका पडून आहेत. दरम्यान, सोमवारपासून विज्ञान विषयांच्या परीक्षेला प्रारंभ झाला. ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांच्या असहकार आंदोलनामुळे बारावी परीक्षेच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर विभागाकडून रोजचा अहवाल वरिष्ठांकडे

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागातर्फे नियामक परीक्षकांच्या असहकार आंदोलनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा रोजचा अहवाल मंडळाच्या पुणे येथील अध्यक्षांना सादर केला जात आहे. कोल्हापूर विभागातंर्गत इंग्रजी विषयाच्या एक लाख २० हजार, मराठी विषयाच्या ९५ आणि हिंदी विषयाच्या ३० हजार उत्तरपत्रिका तपासणीविना आहेत. दरम्यान, मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे सहसचिव टी. एल. मोळे यांनी नियामक व परीक्षकांना विद्यार्थी हित पाहून उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला सुरुवात करण्याविषयीचे आवाहन केले आहे. सोमवारी मराठी विषयाच्या नियामकांनी त्यांची भेट घेऊन असहकार आंदोलनाविषयी निवेदन दिले.

..........

कोट

'शिक्षक महासंघ गेली कित्येक वर्षे सरकारकडे न्याय मागत आहे. वर्षानुवर्षे शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नाही. सध्याच्या असहकार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री व अर्थमंत्र्यांनी मंगळवारी मंत्रालयात संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले आहे. बैठकीत संघटनेच्या मागण्या प्रभावीपणे मांडल्या जातील.

प्रा. अविनाश तळेकर, कार्याध्यक्ष, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ अधिकाऱ्यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

येथील आर. टी. ओ. अधिकाऱ्याच्या घराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यांनी तिजोरीतील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर व सतरा राऊंड चोरुन नेले. याबाबत अधिकारी पल्लवी पांडव यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पल्लवी विजय पांडव या इन्स्पेक्टर म्हणून आरटीओत कार्यरत आहेत. शुक्रवारी (ता. २३) त्या कोल्हापूर-सांगली महामार्गालगत असलेल्या आपल्या घरी आल्या होत्या. सकाळी साडेदहा ते अडीच यांदरम्यान त्या हॉस्पिटलला गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी उचकटून घरात प्रवेश करुन त्यांची सर्विस रिव्हॉल्व्हर आणि १७ राऊंड घेऊन पलायन केले. पांडव या घरी परत आल्यानंतर त्यांना घराची कडी उचकटलेली पाहून घरातील साहित्य तपासल्यानंतर त्यांना आपले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर व १७ राऊंड नसल्याचे चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ हातकणंगले पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. हातकणंगले पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघटनेचे हित कमी, गटबाजी जास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पदव्युत्तर शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक, संशोधन प्रकल्पाला चालना आणि त्या माध्यमातून प्राध्यापक व विद्यापीठाच्या लौकिकात भर हा प्रमुख उद्देश ठेवून शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनांची स्थापना झाली. विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापकांसाठी काम करताना संघटनेने वेगळा ठसा उमटविल्याची वस्तुस्थिती आहे. आता संघटनेत प्राध्यापक आणि विद्यापीठाच्या हिताचे काम कमी आणि प्राध्यापकांतील गटबाजी जादा असा प्रकार सुरू आहे.

यामध्ये कहर म्हणजे, संघटनेतील वर्चस्वादावरुन उफाळलेला संघर्ष पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. मात्र हा सारा प्रकार संघटनेतील जुन्या मंडळींना रुचला नाही. शिवाय विद्यापीठ प्रशासन आगामी कालावधीत 'नॅक'ला सामोरे जात आहे. प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असताना कॅम्पसमधील प्रमुख संघटनेतील गटबाजी, अधिकार मंडळावर कार्यरत प्राध्यापकांतील कुरघोडीमुळे विद्यापीठाच्या लौकिकाला बाधा पोहचत असताना प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची, कामकाजात एकमेकाला सांभाळून घेण्याची आणि 'कुणालाही दुखवायला नको' या मानसिकतेतून कामकाज करण्याची पद्धत कारणीभूत आहे.

नवनवीन अभ्यासक्रमामुळे विद्यापीठातील विभागाची संख्या ३६ पर्यंत पोहचली आहे. विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांनी संशोधनवृत्ती, विद्यापीठाचे सहकार्य आणि युजीसीच्या अर्थसहाय्यातून वेगवेगळे संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या संशोधन प्रकल्पाची वाहवा झाली. एकीकडे ही जमेची बाजू असताना दुसरीकडे विद्यापीठातील अनेक विभागातील प्राध्यापकामधील राजकारण हा प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. काही विभागात प्राध्यापकांची संख्या दोन,तीनच आहे. पण त्यांच्यातही टोकाचे मतभेद आहेत. त्याचा फटका संशोधक विद्यार्थी व नियमित विद्यार्थ्यांना बसत आहे. बहुतांश विभागात हीच स्थिती आहे. प्रशासनाने, 'तंटामुक्त विभाग'दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी स्पर्धा जाहीर केली तर त्यासाठी किती विभाग पात्र ठरतील हा संशोधनाचा विषय ठरेल ? अशा तीव्र भावना उमटत आहेत.

खरे तर, 'सुप्टा' ची ओळख विद्यापीठातील प्राध्यापकांचे प्रतिनिधीत्व करणारी संघटना अशी आहे. संघटनेचे १५० हून सभासद आहेत. त्यामध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि वरिष्ठ प्राध्यापक समाविष्ठ आहेत. दर दोन वर्षांनी कार्यकारिणीची निवडणूक होते. एप्रिल २०१७ पासून संघटनेची कार्यकारिणी अस्तित्वात नाही. त्याला प्राध्यापकांतील अंतर्गत वादामुळे कार्यकारिणी निवडही झाली नाही. संघटनेचे सभासद विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर आहेत. मात्र त्यांनी 'राजकारण्यांना'शोभेल अशा वर्तणुकीचे दर्शन घडविल्याच्या प्रतिक्रिया कॅम्पसमध्ये उमटात आहेत.

कॅम्पसमध्ये वाद, स्टेशनमध्ये चुकीची कबुली

विद्यापीठ निवडणुकीतील उणीदुणी, विभागांतर्गत राजकारण आणि संघटनेतील कुरघोडीवरुन कॅम्पसमधील प्राध्यापकांत अधूनमधून'तू तू मै मै'प्रकार घडत असतात. 'सुप्टा' संघटनेच्या कागदपत्रांवरुन १३ फेब्रुवारी रोजी प्रा. एन. बी. गायकवाड व प्रा. सागर डेळेकर, प्रा. जी. बी. कोळेकर, प्रा. भारती पाटील यांच्यामध्ये वाद झाला. गायकवाड यांनी त्या तिघांनी संघटनेचे लेजर, सभा पावती बुके, संघटनेची कीर्द वही, संघटनेचे पासबुक व अन्य कागदपत्रे नेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी लक्ष घातल्यावर संबंधितांनी कागदपत्रे जमा करून घडल्या प्रकाराबद्दल चुकीची कबुली दिली. मात्र कॅम्पसमधील वाद पोलिस स्टेशनपर्यंत पोहचल्याने विद्यापीठाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध गर्भपातप्रकरणी युवकाला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

गिरगाव (ता. शाहूवाडी) येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित युवकास शनिवार (ता. ७) पर्यंत पोलिस कोठडी तर पीडित मुलीचा अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी संशयित डॉक्टरला न्यायालयीन कोठडी सुनावली. सोमवारी दुपारी शाहूवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर केले असता विशेष सत्र न्यायाधीश कदम यांनी ही कोठडी सुनावली.

शाहूवाडी पोलिसांत याप्रकरणी तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सागर तुकाराम पाटील (वय २४, रा. गिरगाव, ता. शाहूवाडी) या युवकासह डॉ. श्रीकांत दत्तात्रय सागांवकर (वय ४३, रा. महाडिक वसाहत, कोल्हापूर) या दोघा संशयितांना रविवारी रात्री अटक केली होती. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांच्या वतीने दोन्ही आरोपींना सात दिवसांच्या पोलिस कोठडीची न्यायालयात मागणी करण्यात आली. यावर संशयित डॉ. सागांवकर याने 'मी पीडित मुलीवर फक्त नियमित उपचार केले', असे न्यायाधीशांसमोर सांगितले. त्याचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने डॉ. सागांवकर याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचवेळी संशयित सागर पाटील याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष सत्र न्यायाधीश कदम यांनी दिले. तिसरा संशयित तुकाराम पाटील फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती उपनिरीक्षक एम. व्ही. जठार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपा शाळांसाठी ३१ कोटींची मागणी

$
0
0

शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक 'स्थायी'कडे

कोल्हापूर टाइम्स टीम

जून २०१९ मध्ये महापालिकेच्या सहा प्राथमिक शाळा सेमी इंग्लिश करण्याचे उद्दिष्ट निश्चित करत सोमवारी प्राथमिक शिक्षण मंडळाने २०१८-१९ चे सुधारित व २०१९-२० नवीन अंदाज पत्रक स्थायी समितीकडे सादर केले. ४८ कोटी, ४८ लाखांचे अंदाजपत्रक निश्चित करताना महापालिकेकडे ३१ कोटी २९ लाख अनुदानाची मागणी केली. सभापती अशोक जाधव यांनी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले.

महापालिकेच्या १४ प्राथमिक शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे धडे दिले जात आहेत. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी नव्या आर्थिक वर्षात सहा शाळांचा समावेश करण्यात येणार आहे. कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी मॉडेल स्कूल संकल्पना राबवण्यात येणार आहे. नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी संगणकाचा वापर, ई-लर्निंग, स्मार्ट टीव्ही यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. ज्ञानरचनावाद, डिजिटल वर्गाची निर्मिती या अनुषंगाने अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. दहा मॉडेल स्कूल बनवण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला असून, त्यासाठी अंदाजपत्रकात ५० लाखांची तरतूद केली आहे.

महापालिकेच्या २७ प्राथमिक शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा कार्यन्वित केली असून नवीन आर्थिक वर्षात उर्वरित सर्व शाळांमध्ये सीएसआर फंडातून ही सुविधा देण्यात येणार आहे. शाळांचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी 'राजर्षी शाहू समृद्ध शाळा' अभियान राबवण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश व्हावा, यासाठी सराव परीक्षा घेण्यात येतील.

शिक्षण समितीच्या प्रस्तावित अंदाजपत्रकातील बाबींसाठी जास्तीत जास्त अनुदान देण्याची ग्वाही सभापती देशमुख व सदस्य आणि महापालिका प्रशासनाच्यावतीने दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, प्रभारी प्रशासनाधिकारी शंकर यादव, उपसभापती सचिन पाटील, सदस्या रुपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार, संजय मोहिते, अजित ठाणेकर, नगरसचिव दिवाकर कारंडे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा कारागृह पोलिसाच्या घरात चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा कारागृह पोलिस लाईनमधील पोलिस कर्मचाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ७५ हजार रुपयांचा माल लंपास केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संगीत दत्तात्रय चव्हाण (वय ४३, रा. खोली नं.४०, कळंबा जेल पोलिस लाईन) यांनी याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दत्तात्रय चव्हाण हे कळंबा कारागृहात पोलिस कर्मचारी असून ते कुटुंबासह कोंडापुरी (ता. शिरुर, जि. पुणे) या मूळ गावी दोन दिवस घरगुती कामानिमित्त गेले होते. गावाहून परत आल्यावर चव्हाण कुटुंबियांना घराचे कुलूप तोडल्याचे दिसून गेले. चोरट्यांनी तिजोरी फोडून रोख ६० हजार रुपये, सोन्याच्या दोन रिंगा, चार ग्रॅम वजनाचा जुवाकिस, चांदीचा करंडा, दोन छल्ले या वस्तू चोरुन नेल्या. पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक कामगार आयुक्तांच्या बदलीची मागणी

$
0
0

इचलकरंजी : गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असलेले सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांची इचलकरंजीतून तातडीने बदली करण्यात यावी. काही संघटनांना हाताशी धरून करण्यात आलेल्या ५०० बोगस कामगारांच्या नोंदणीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने (सिटू) सरकारी कामगार अधिकारी सुनील सरनाईक व संजय महानवर यांना देण्यात आले. आठ दिवसांत अंमलबजावणी न केल्यास ६ मार्च रोजी दोन तालुक्यांतील बांधकाम कामगारांचा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही संघटनानी एजंट नेमून बोगस कामगारांची नोंदणी चालू केली असून ५०० रुपये कमिशन घेतले जात आहे. त्या नोंदणीला व लाभ देणेस गुरव मदत करीत आहेत. गुरव यांनी इचलकरंजी कार्यालयातील बांधकाम नोंदणीचे काम डिसेंबर २०१८ पासून बंद करून बीडीओ, मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नोंदणीचे काम होईल म्हणून नोटीस लावली आहे. मात्र, त्यांनी एक संघटना व एजंटांकडील ४०० पेक्षा जास्त कामगारांचे अर्ज जमा करून त्यांना ओळखपत्रेही दिली आहेत. त्यामुळे खरा कामगार नोंदणी व लाभापासून वंचित रहात आहे. म्हणूनच गुरव यांची तातडीने बदली करावी असे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणाचा इशारा

$
0
0

कोल्हापूर : सारस्वत बँकेकडून पूर्वीच्या मराठा बँकेच्या सभासदांचे शेअर्स, ठेवींचे पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू आहे. सुमारे ४८ हजार सभासदांचे शेअर्स, ठेवी अडकल्या आहेत. शेअर्ससह ठेवींचे पैसे तत्काळ परत करावेत, अन्यथा २८ फेब्रुवारी रोजी सारस्वत बँकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा मराठा संघटनेने दिला आहे. लाक्षणिक उपोषणादरम्यान पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. आंदोलनात सभासदांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन संघटनेने केले आहे. आंदोलनाच्या नियोजनासाठी बाळ घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी विजय जाधव, प्रशांत भोसले, दिगंबर माने, दिनेश घोरपडे, दीपक दिवसे, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांगरे पाटील नाशिकचे पोलिस आयुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलिस आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांची नियुक्ती झाली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात नांगरे पाटील यांचीही बदली करण्यात आली. नांगरे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे तीन वर्षे महानिरीक्षकपद सांभाळताना परिक्षेत्रातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी शंभरावर अधिक टोळ्यांना 'मोका' लावला. महिला आणि युवतीच्या छेडछाडीला पायबंद घालण्यासाठी निर्भया पथकांची स्थापना केली. मुली, युवती आणि महिला सुरक्षेविषयी प्रबोधन आणि व्याख्याने, यूथ पार्लमेंट, ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सव असे उपक्रम त्यांनी प्रभावीपणे राबवले.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images