Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गोंधळी, जोशी, वासुदेव बागडीसमाजाचे सोमवारी धरणे आंदोलन

0
0

गोंधळी, जोशी, वासुदेव बागडी

समाजाचे सोमवारी धरणे आंदोलन

सोलापूर :

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गोंधळी, जोशी, वासुदेव बागडी, चित्रकथी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आपल्या समाजाच्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी सर्व समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक लक्ष्मण भोसले यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Raj Thackeray: पुलवामातील शहीद जवान हे राजकीय बळी!

0
0

कोल्हापूर :

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान हे राजकीय बळी ठरले आहेत, असा गंभीर आरोप आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची चौकशी केल्यास सर्वच गोष्टी बाहेर येतील, असं वक्तव्यही त्यांनी केलं.

राज ठाकरे तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.

नोटबंदी, राफेल व्यवहारातील भ्रष्टाचार अशा गेल्या साडेचार वर्षांतील सर्वच गोष्टी मतदारांनी विसराव्या म्हणून सरकारकडून निवडणुकीच्या सुरुवातीला आणि मध्यावर मोठं काहीतरी घडवलं जाईल, अशी भीती राज यांनी बोलून दाखवली. मी आता अधिक बोलणार नाही. निवडणुकीत मी हे सगळं समोर आणणार आहे, असेही राज पुढे म्हणाले.

पुलवामात हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जीम कार्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. या घटनेबाबत कळूनही त्यांनी शूटिंग थांबवले नाही, असा आरोप राज यांनी केला. पाकिस्तानचे पाणी अडवण्यावरूनही त्यांनी निशाणा साधला. पाकचे पाणी अडवण्यासाठी अमित शहांना तुम्ही नदीत बसवणार आहात का, असा खोचक सवाल राज यांनी केला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: गव्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

0
0

आजरा (कोल्हापूर)

आजरा तालुक्यातील सोहाळे येथील एका महिलेवर आज सकाळच्या सुमारास एका गव्याने हल्ला केला. पाठीत शिंग घुसल्याने व डाव्या पायातून हाड बाहेर आल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हौसाबाई परसू पेडणेकर (वय ५५) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. गावाजवळ येऊन वन्यप्राणी आता माणसांवर हल्ले करू लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार हौसाबाई सकाळी उठून घरातील जनावरांचे शेण काढणे, ते उकिरड्यात टाकणे अथवा शेणी लावण्याचे काम नियमित करतात. मात्र आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्या शेणी लावण्याकरीता गावाच्या प्रवेशद्वाराजवळील संत्सग भवन परिसरात गेल्या होत्या. यावेळी बाचीच्या जंगलातून आलेल्या गव्याने श्रीमती हौसाबाई यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात श्रीमती पेडणेकर गंभीर जखमी झाल्या होत्या. पाठीत शिंग घुसल्याने रक्तस्त्राव मोठा झाला. तर पायाचे हाड फ्रॅक्चर झालेल्या स्थितीत आरडा-ओरड्यामुळे जमा झालेल्या ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्या मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीच्या काळात मोठी घटना घडवण्याचा घाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नोटबंदी, राफेल, भ्रष्टाचार या साडेचार वर्षांतील सर्व घटना मतदारांनी विसराव्यात, यासाठी केंद्र सरकारकडून निवडणुकीच्या सुरवातीला व मध्यावर मोठी घडवली जाईल. देशातील जनतेचे लक्ष त्यावर वळवले जाईल', अशी शक्यता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच 'राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी केली तर सर्व गोष्टी बाहेर पडतील', असेही ते म्हणाले. पुलवामा हल्ल्यात बळी गेलेल्या शहीद जवानांविषयी आदर बाळगत ठाकरे यांनी ते राजकीय बळी ठरलेत, अशी टीकाही केंद्र सरकारवर केली.

राज ठाकरे रविवारी कोल्हापुरात एका खासगी चॅनेलच्या उद्घाटनाला आले होते. त्यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले, 'निवडणुकीच्या तोंडावर आजकाल मिडियावर साडेचार वर्षात जे घडले त्या बातम्या बंद झाल्या असून युद्ध, काश्मीर, निवडणुका या नवीन बातम्या सुरु झाल्या आहेत. या सरकारच्या कारभारामुळे आरबीआय, सीबीआय, बँक, पोलिस, लष्करात दोन वेगवेगळे गट पडले आहेत. हे लक्षण देशासाठी चांगले नाही.'

पाकिस्तानचे पाणी आडवणार या घोषणेची खिल्ली उडवताना, त्यांना तुम्ही काय नळातून पाणी देता का? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, 'पाणी वाटप, अडवणे यासाठी इंटरनॅशनल वॉटर अॅक्ट आहे. तीन देशांतून जे पाणी जाते, ते पाणी एक देश थांबवू शकत नाही. पण सरकार सातत्याने निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणेतून पाक शत्रू आहे असे वातावरण भासवत आहे. पाकिस्तानचे पाणी बंद करणार, देशात विमान हॅयजॅक करण्याचे प्रयत्न होणार अशा बातम्या पसरवून इतर सर्व गोष्टी विसराव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद मोदी जिम कार्बेट अभयारण्यात चार तास शूटिंग करत होते. पुलवामा हल्ल्यात मोठ्या संख्येने जवान शहीद झाले असताना शूटिंग थांबवून मोदींनी दिल्लीला येण्याची गरज होती. उलट मोदी व शहा जाहीर सभेत भाषणे देत होते. भाषणात मोदी मला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे असे सांगून मतदान मागत होते. त्यांना हकनाक गेलेल्या शहीद जवानांचे काहीच वाटत नव्हते.'

शहांची उडवली खिल्ली

पाकचे पाणी अडवणार या घोषणेची खिल्ली उडवताना राज ठाकरे म्हणाले, 'मला या विषयावर व्यंगचित्र काढायची इच्छा झाली होती. पाणी आडवण्यासाठी नदीत बंधारा म्हणून अमित शहा यांना आडवे झोपवायचे.' यावर उपस्थितांनी हसून दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हापूस, तोतापुरी बाजारात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाचा तडाखा वाढूनही बाजारात पालेभाज्यांची मोठी आवक झाल्याने त्यांच्या किंमती कमी राहिल्या. स्वस्त पालेभाज्या खरेदीला ग्राहकांनी प्रतिसाद दिला. भेंडी, गवारी, कारल्याचा दर चढाच राहिला. हापूस आणि तोतापुरी अंब्याचेही बाजारात आगमन झाले असून द्राक्षे, कलिंगड खरेदीही सुरू झाली आहे.

गवारीची आवक कमी झाल्याने दर प्रतिकिलो १२० ते १४० रुपये होता. भेंडी आणि कारल्याचा दर ६० ते ७० रुपयांवर स्थिर राहिला. वांग्याचा दर प्रतिकिलो वीस रुपये तर वरणा, वाटाण्याचा दर प्रतिकिलो ३० रुपये होता. कोबीचा गड्डा १० रुपयांना तर फ्लॉवर गड्ड्याचा दर १५ ते ३० रुपये होता. दोडका ८० ते ९० रुपयांवर स्थिर होता. पालेभाज्यांची आवक जास्त झाल्याने मेथी, कांदा पात, चाकवत, पोकळा पेंढीचा दर पाच रुपये होता.

फळ बाजारात चांगली उलाढाल झाली आहे. हापूस आंब्याची आवक मंडईत होऊ लागली असून प्रतिडझन ८०० ते १०० रुपये इतका आहे. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने मार्केट यार्ड व कपिलतीर्थ मार्केटमध्ये मोजक्याच ग्राहकांकडून खरेदी होत आहे. द्राक्षांचा दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपये असल्याने ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने कलिंगडालाही मागणी वाढली आहे. त्याचा दर प्रतिनग २० ते ६० रुपये आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : १० ते २०

टोमॅटो : ३० ते ४०

भेंडी : ६० ते ७०

ढबू : ४०

गवार : १२० ते १४०

दोडका : ४० ते ६०

कारली : ६० ते ७०

वरणा : ३०

हिरवी मिरची : ४० ते ५०

फ्लॉवर : १५ ते ३०

कोबी : १०

बटाटा : २० ते ३०

लसूण : ४०

कांदा : १० ते २०

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : ५

कांदा पात : ५

कोथिंबीर : ५

पालक : ५

शेपू :१०

चाकवत : ५

करडा : ५

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : ६० ते १४०

डाळिंब : ४० ते ६०

मोसंबी : ३० ते ८०

चिकू : ४०

द्राक्षे : ४० ते ६०

केळी : २० ते ६० (डझन)

जवारी केळी : ३० ते ७० (डझन)

हापूस आंबा : ८०० ते १००० (डझन)

कलिंगड : १० ते ४० (प्रति नग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूतन आयुक्त गुरुवारी पदभार स्वीकारणार

0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेले नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी गुरुवारी (ता. २८) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील. सोमवारी, डॉ. कलशेट्टी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे देणार आहेत. त्यानंतर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाची मुंबईत बैठक असल्याने ते सोमवारऐवजी गुरुवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची सांगली जिल्हाधिकारीपदी बदली झाल्यानंतर येथे डॉ. कलशेट्टी यांची नियुक्ती झाली होती. ते सोमवारी पदभार स्वीकारणार होते. पण मुंबईतील बैठका आणि जिल्हाधिकारी पदाचा पदभार यामुळे ते गुरुवारी येथे रुजू होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्धापनदिन उत्साहात

0
0

कोल्हापूर: श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या महाद्वार शाखेचा वर्धापनदिन उत्साहात झाला. रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघाचे व्यवस्थापक तानाजी ज्ञानू निगडे यांच्या उपस्थितीत राजारामपुरीतील नंदादीप नेत्रालयाच्यावतीने मोफत नेत्र शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, रोहित पारेख, पतसंस्था फेडरेशनचे संचालक सुनील पाटील, अरुण मणियार, आनंदराव भालकर, राजेंद्र शहा, शशिकांत अथणे, जयकुमार पाटील आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष सुमित चौगुले यांनी स्वागत केले तर शाखाधिकारी माधुरी खोत यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रंकाळ्यावर स्मारक, अन्य बाधकाम नको’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'रंकाळा तलावाचा ऐतिहासिक बाज राखण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणासाठी तलाव परिसरात स्मारक अथवा बांधकामस परवानगी देऊ नये.' अशी मागणी रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीने अतिरिक्त आयुक्त श्रीधार पाटणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे, 'शहराचे भूषण असणारा आणि राजर्षी शाहूंची ऐतिहासिक स्मृती जपणारा रंकाळा तलाव शहराचा पर्यावरणीय समतोल साधत आहे. विरंगुळा म्हणून अनेकजण सकाळ-सायंकाळ रंकाळा तलावावर फिरायला येतात. तलावाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी समिती नेहमीच प्रयत्न करत आहे. तलावाचेच पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन येथे स्मारक अथवा बांधकामास परवानगी देऊ नये. यशवंतराव भालकर चित्रपट क्षेत्राशी संबंधित होते. त्यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी त्याचे स्मारक चित्रनगरी परिसरात उभारणे सुसंगत होईल. त्यासाठी संवर्धन व संरक्षण समिती पाठीशी राहील.' निवेदनावर अशोक देसाई, भरत गांधी, सुभाष हराळे, अॅड. अजित चव्हाण, विकास जाधव, राजशेखर तंबाके, धर्माजी सायनेकर, संजय शिंदे, विजय सावंत, इंद्रजित साळोखे, प्रशांत जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिंडेवाडीत सहा गंजी जळून खाक

0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

दिंडेवाडी (ता. भुदरगड) येथे शाळकरी मुले क्रिकेट खेळण्यासाठी मैदान तयार करत असताना गवताच्या गंजींना लागलेल्या भीषण आगीत दोन म्हशी गंभीररीत्या भाजल्या. गवताच्या सहा गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असून, सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.

दुपारी दोनच्या सुमारास सहा ते सात शाळकरी मुले 'गुरवाळ' नावाच्या शेतात क्रिकेट मैदान तयार करण्यासाठी गेली होती. तेथील पडिक जमिनीवरील काही प्रमाणात गवत कापलेले होते, तर काही प्रमाणात शिल्लक होते. ही जागा स्वच्छ करून तेथे मैदान तयार करण्यासाठी मुलांनी गवत पेटवले. कडक उन्हामध्ये जोराच्या वाऱ्याबरोबर काही क्षणात आग पसरली. मुलांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. शेजारीच शेतकरी दत्तात्रय गुरव, सदाशिव गुरव, गोविंद गुरव यांनी रिकाम्या जागेत मोठ्या सहा गवताच्या गंजी रचल्या होत्या. दत्तात्रय गुरव यांनी गवत गंजी शेजारीच जनावरांना बांधण्यासाठी छतावर गवत टाकून मांडव उभारून त्यामध्ये म्हशी बांधल्या होत्या. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, तेथील गवताच्या सहा गंजी पूर्णपणे जळून खाक झाल्या तसेच दत्तात्रय गुरव यांच्या दोन म्हशी ८० टक्के भाजून गंभीर जखमी झाल्या.

ही घटना गावात समजताच ग्रामस्थांनी धाव घेतली. मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सरपंच श्रीधर भोईटे, उपसरपंच अशोक गुरव, सदस्य गणेश मोरबाळे, भिकाजी मगदूम, पोलिसपाटील विलास कलकुटकी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टाच्या व्यवहाराची माहिती मोबाइलवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोस्टाच्या विविध प्रकारच्या खात्यातील व्यवहाराची माहिती खातेदारांच्या चटकन समजावी यासाठी पोस्ट कार्यालयाने आता 'एसएमएस' प्रणालीचा अवलंब सुरू केला आहे. खात्यावर रक्कम जमा केल्यानंतर आणि काढल्यानंतर दुसऱ्या सेकंदाला त्याची माहिती खातेदारांच्या मोबाइलच्या स्क्रीनवर दिसणार आहे. कोल्हापूर डाकघर विभागाने जिऱ्ह्यातील ५६३ पोस्ट कार्यालयांना खातेदारांचा मोबाइल क्रमांक व आधार कार्ड नंबर खात्यांशी लिंक करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय कार्यालयात रोज जी काही खाती आधार क्रमांक व मोबाइलशी लिंक होतील त्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी व विभागीय कार्यालयास मेल कराव्यात असा आदेश काढला आहे.

हातकणंगले तालुक्यातील यळगूड येथील पोस्ट ऑफीस कार्यालयातील रिकरिंग खात्यातील ठेवींचा घोळ सामोरे आल्यानंतर डाकघर विभागाने विविध पातळ्यांवर खबरदारी घेतली आहे. पोस्टातील गुंतवणूक ही नागरिकांत विश्वासार्ह समजली जाते. हा विश्वास आणखी दृढ करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुळात पोस्टामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. विविध प्रकारची खाती, सुकन्या समृद्धी योजना आणि पोस्टातील गुंतवणुकीवर प्राप्तीकरातून सवलत यामुळे गुंतवणुकीत भर पडत आहे.

सद्यस्थितीत ग्राहकांना पोस्टात एकूण बारा प्रकारच्या बचत खात्यांमध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये रिकरिंग खाते, बचत खाते, एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुदत ठेव, ज्येष्ठ नागरिक बचत खाते, मासिक उत्पन्न खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते, किसान विकास पत्र आदींचा समावेश आहे. सुकन्या समृद्धी योजनेत तर कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल स्थानावर आहे. इंडियन पोस्ट पेमेंटस बॅकेत कोल्हापूर डाकघर विभागाने ७७ हजार खाती उघडत आयपीपीबी सेवेत देशात प्रथम क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात तीन मुख्य पोस्ट कार्यालये आहेत. एकूण कार्यालयांची संख्या ५६३ इतकी आहे. सगळ्या कार्यालयांना कोल्हापूर डाकघर विभागाने पत्रे पाठविली आहेत. खातेदारांना त्यांच्या खात्यातील व्यवहाराचा अपडेटपणा समजावा यासाठी प्रशासननाने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, पूर्वीच्या अनेक खात्यांसोबत मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली नाही. त्यांचे मोबाइल क्रमांकही उपलब्ध करण्याच्या सूचना आहेत.

पोस्टात गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. पोस्टातील ठेवींची सुरक्षितता आणि ग्राहकांचा विश्वास या दोन जमेच्या बाजू आहेत. नागरिकांचा विश्वास जपताना त्यांच्या खात्यावरील व्यवहाराची माहिती पटकन समजावी यासाठी मोबाइल एसएमएसचा अवलंब करणार आहे. त्यासाठी जिल्ह्याीतल सगळ्या पोस्ट कार्यालयांना खातेदारांचे मोबाइल क्रमांक व आधार कार्ड नंबर त्यांच्या खात्यांशी लिंक करण्याविषयी कळविले आहे.

- आय. डी. पाटील, वरिष्ठ अधीक्षक कोल्हापूर डाकघर विभाग

५६३

एकूण पोस्ट कार्यालयांची संख्या

९६

शहरी भागातील पोस्ट ऑफीस

४६७

ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालय

११,९७,६२८

विविध योजनेतील खातेदार

६७,०००

सुकन्या समृद्धी योजनेतील खातेदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी कपातीचे स्वागत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जीएसटी परिषदेने गृहबांधणी क्षेत्राला चालना देण्यासाठी जीएसटीत कपातीचा निर्णय रविवारी घेतला. निर्माणाधीन आणि नव्या प्रकल्पांचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणताना परवडणाऱ्या घरांसाठीचा जीएसटी ८ टक्क्यांवरून १ टक्क्यांवर आणून बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. या निर्णयाचे बांधकाम व्यावसायिकांकडून स्वागत होत असताना २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर संकल्पनाही पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने केलेली नोटाबंदी आणि त्यानंतर बांधकाम क्षेत्रासाठी लागू केलेला रेरा कायदा, या व्यवसायावर लागू झालेला जीएसटी (वस्तू व सेवा कर) या सर्वांचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर योजनेची घोषणा केली असली तरी गृह बांधणीमध्ये आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमुळे त्याला खीळ बसली होती. निर्माणाधीन प्रकल्पांना १२ टक्के जीएसटी आणि नोंदणीसह अन्य खर्च सात टक्के असल्याने एकूण १९ टक्क्यांचा भुर्दंड बांधकाम व्यावसायिकांना बसत होता. पर्यायाने घर खरेदी करण्याला ग्राहकांची अल्प पसंती मिळत होती. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील एफआयसीसीआय (फिक्की) संघटनेसह देशाभरातील विविध बांधकाम संघटनांच्या शिखरसंस्थांनी केंद्र सरकारकडे जीएसटी कपातीची मागणी केली होती.

जीएसटी समितीने काही दिवसांपूर्वी अनेक वस्तूंवरील करात कपात केली. पण, त्यामध्ये बांधकाम क्षेत्राचा समावेश केलेला नव्हता. त्यानंतर पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन जीएसटीमध्ये कपात करण्याची मागणी केली होती. रविवारी बांधकाम क्षेत्राला दिलासा देताना निर्माणाधीन प्रकल्पांना १२ टक्क्यांवरुन पाच टक्के जीएसटी करण्याचा निर्णय घेतला. तर परवडणाऱ्या घरांसाठी आठ टक्क्यांवरून केवळ एक टक्के जीएसटी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नोंदणी शुल्कासह जीएसटी १२ टक्के होणार असल्याने कर कमी झाल्याने गृहबांधणी उद्योगाला चालना मिळणार आहे. बांधकाम क्षेत्रातील उलाढाल वाढणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. त्यामुळे जीएसटी परिषदेच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर देण्याची संकल्पना पूर्ण होईल, असेही मत व्यक्त केले आहे.

जीएसटी परिषदेच्या निर्णयामुळे गृहबांधणी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. निर्माणाधीन प्रकल्पांच्या जीएसटी दरात १२ टक्क्यांवरून पाच टक्के व सवलतीच्या घरावरील जीएसटी आठ टक्क्यावरुन एक टक्के करण्याचा निर्णय बांधकाम क्षेत्राला फायदेशीर ठरेल. त्यामुळे अर्थव्यवस्था गतिमान होईल.

- ललित गांधी, उपाध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

जीएसटीमध्ये बदल केल्याने बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल. व्यवसायातील उलाढालही वाढेल. परवडणाऱ्या घरांसाठी एक टक्का जीएसटी केल्याने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर संकल्पाना पूर्णत्वाकडे जाईल. या निर्णयामुळे ग्राहकांना गृह खरेदीची उत्कृष्ट संधी निर्माण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यावसायिकांसाठी एक चांगला निर्णय घेतला.

- महेश यादव, अध्यक्ष क्रिडाई

बांधकाम व्यावसायिकांना संजीवनी देणारा निर्णय आहे. जीएसटीमुळे व्यवसायवार परिणाम झाला होता. किंमती वाढत असल्याने ग्राहकांचा अल्प प्रतिसाद होता. या निर्णयांमुळे ग्राहकांना फायदा होईल. पण बांधकाम व्यावसायिकांना इनपोर्ट क्रेडिट मिळणार नाही. या निर्णयामुळे फ्लॅट खरेदी-विक्रीत वाढ होईल.

- राजीव परीख, माजी राज्य उपाध्यक्ष, क्रिडाई

जीएसटी परिषदेने अत्यंत चांगला निर्णय घेतला. निर्णयामुळे ग्राहकांचे स्वप्नातील घर ही अपेक्षा पूर्ण होईल. जीएसटी लागू झाल्यापासून दर कमी करण्याची मागणी होत होती. ही मान्य झाली. यामध्ये ९० चौ.मी. आणि ४५ लाख किमंतीच्या आतील घरांना नाममात्र जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे फ्लॅट खरेदी-विक्रीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.

- गिरीश रायबागे, सहसचिव, राज्य क्रिडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर लाक्षणिक उपोषण

0
0

कोल्हापूर : सारस्वत बँकेकडून पूर्वीच्या मराठा बँकेच्या सभासदांचे शेअर्स, ठेवींचे पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू आहे. सुमारे ४८ हजार सभासदांचे शेअर्स, ठेवी अडकल्या आहेत. शेअर्ससह ठेवींचे पैसे तत्काळ परत करावेत, अन्यथा २८ फेब्रुवारी रोजी सारस्वत बँकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा मराठा संघटनेने दिला आहे. लाक्षणिक उपोषणादरम्यान पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. आंदोलनात सभासदांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेने केले आहे. आंदोलनाच्या नियोजनासाठी बाळ घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी विजय जाधव, प्रशांत भोसले, दिगंबर माने, दिनेश घोरपडे, दिपक दिवसे, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीच्या धोरणांमुळे सैनिकांच्या पदरी उपेक्षाच

0
0

खासदार उदयनराजेंचा टीका

म. टा. वृत्तसेवा, कराड

'राजकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे सैनिकांच्या पदरी उपेक्षाच पडली आहे. एक दिवस सीमेवर जाऊन पहा, म्हणजे समजेल सैनिकांचा त्याग आणि शौर्य काय असते ते. सैनिकांचा विशिष्ट घटनेपुरता सन्मान आदर न करता त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत ही भावना मनात ठेवून सदैव सैनिकांचा आदर राखला पाहिजे. मी सर्वसामान्यांच्या बरोबरच सैनिकांच्या ठामपणे पाठीशी आहे,' अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. कराड येथे शहीद जवानांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

उदयनराजे मित्र मंडळाच्या वतीने खा. उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार त्यांचा वाढदिवस साजरा न करता याच दिवशी कराड येथे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली व सातारा जिल्ह्यातील १२७ शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी राजमाता कल्पनाराजे भोसले, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर कराडचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, संग्रामसिंह बर्गे आदी उपस्थित होते.

या वेळी दत्तात्रेय गणपती कदम यांच्या मातोश्री काशीबाई गणपती कदम, तसेच २६ /११ हल्ल्यातील शहीद पोलिस हवालदार तुकाराम ओंबाळे यांच्या कुटुंबाला उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ अमोल कोल्हे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलेल्या मानपत्राचे ध्वनिफीत ऐकविण्यात आली.

प्रारंभी छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या शौर्याची चेतना जागवली. त्या नंतर लष्करी दलाचे बॅण्ड पथक, पोलिस दलाचे बॅण्ड पथक व सातारा येथील सैनिक स्कूलचे बॅण्ड पथकाने ए मेरे वतन के लोगो यासह अनेक देशभक्तीपर गीतांच्या ध्वनी वाजवून कार्यक्रम स्थळी देशभक्तीच्या चेतना जागृत केल्या. या वेळी सातारा जिल्ह्यातील विविध हल्ल्यात शहीद झालेल्या १२७ जवानांच्या कुटुंबीयांचा मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात रास्ता रोको

0
0

सोलापुरात रास्ता रोको

सोलापूर :

काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने गेली ६५ वर्षे धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आणि आता फडणवीस सरकारने साडेचार वर्षे धनगर समाजाला आरक्षणप्रश्नी झुलवत ठेवले. सरकारचा निषेध करण्यासाठी आणि धनगर आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी दुपारी सोलापूर-विजयपूर रस्त्यावर तेरामैल येथे चांगभलं प्रतिष्ठानच्या वतीने समाजबांधवांनी धरणे आंदोलन केले.

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर नामांतराची अंमलबजावणी करावी, मंद्रूप येथील सरकारी रुग्णालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, सोलापुरात संत सेवालाल महाराजांचे स्मारक व्हावे, भरतीतील १३ बिंदू नामावली रद्द करावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, तेरामैल येथील उड्डाणपुलाचे काम रद्द करण्यात यावे आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी, चाराटंचाईने गवे नागरी वस्त्यांत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाळ्याच्या कालावधीत जंगल क्षेत्रात ओस पडणारे पाण्याचे साठे आणि ओल्या चाऱ्याची टंचाई यामुळे जंगली प्राणी नागरी वस्तीत शिरकाव करण्याच्या प्रकारात वाढ होते. जंगलावरील अतिक्रमणे व जंगलांना आगी लावण्याच्या प्रकारामुळे प्राण्यांचे अधिवास संपुष्टात येत आहेत. ही मनुष्य आणि वन्य प्राण्यांतील संघर्षामागील प्रमुख कारण असल्याचे वन्य अभ्यासकांचे म्हणणे आहे.

दरम्यान आजरा, चंदगड भागात गव्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मानवी वस्तीत घबराट पसरली आहे. या भागातील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आल्यामुळे वन्यजीव विभागातर्फे गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी होणाऱ्या उपाययोजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

मे २०१७ मध्ये भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे भैरूचा माळ शिवारात झालेल्या गव्याच्या हल्ल्यात दोघे ठार झाले होते. एप्रिल २०१८ मध्ये राधानगरी वन विभागाच्या कार्यालय परिसरातील पाण्याच्या कुंडापर्यंत गव्यांचा कळप पोहोचला होता. गव्याने केलेल्या हल्ल्यात वृद्धा जागीच ठार झाली होती. गेल्या काही वर्षभरात वन्यप्राण्यांच्या मानवी वस्तीत शिरकाव करण्याच्या घटना वाढल्या आहेत. आजरा, चंदगड भागात तर गव्यासह वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आजरा येथे रविवारी आणखी एक महिला गव्याच्या हल्ल्याचा बळी ठरल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गव्यांचा धोका हा केवळ आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड तालुक्यांपुरता मर्यादित राहिला नाही. पाणी व चाऱ्याच्या शोधात गव्यांच्या कळपांनी शहरापर्यंत धडक मारली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये गव्यांच्या कळपाने कोल्हापूर शहरात प्रवेश केला होता. जयंती नाला व परिसरातील चार दिवसांच्या मुक्कामानंतर कळप पुन्हा कसबा बावडा, वडणगेमार्गे परत फिरले होते. दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यानंतर अशा घटना वाढतात.

जंगल क्षेत्रातील पाण्याचे साठे ओस पडू लागतात. जंगलालगतच्या ऊसशेतीत कापणी झाली की चाराही संपुष्टात येतो. पाचट जाळले जाते. शिवाय जंगलांना आगी लावण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे गवे हे पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडतात. मानवी वस्ती, पाणवठे असलेल्या भागात त्यांचा वावर वाढतो. विकासकामांच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याचे याकडेही वन्य अभ्यासक लक्ष वेधत आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


... तर ड वर्ग विकास नियंत्रण नियमावली रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या बांधकाम क्षेत्रासाठी ड वर्ग विकास नियंत्रण नियमावलीतील अटी जाचक ठरत आहेत. या नियमावलीमुळे शहर विकासाला फटका बसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची राज्यात सत्ता आल्यावर 'ड' वर्ग विकास नियंत्रण नियमावली रद्द करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 'स्मार्ट सिटी : एक मुक्तसंवाद' कार्यक्रमात दिले. पक्षाच्या अर्बन सेलतर्फे रविवारी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसोबत चर्चासत्र झाले.

नागरी प्रश्नांबाबत अर्बन सेलच्या राज्याध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, आमदार हसन मुश्रीफ, महापौर सरिता मोरे, 'अर्बन सेल'चे सरचिटणीस सुरेश पाटील, सदस्य आदिल फरास, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर दुपारी डॉक्टर, व्यापारी, उद्योजकांसोबत झालेल्या चर्चेत नागरी प्रश्नांबाबतची मांडणी झाली.

आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी, 'महापालिकेने प्लास्टिकपासून इंधननिर्मिती करणारी मशिन्स खरेदी करावेत. नगररचना विभागात अधिकाऱ्यांची वानवा आहे. प्रादेशिक विकास आराखडा लटकला आहे. कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे काम संथगतीचे सुरू असल्याने शहराची बिकट अवस्था बनली आहे' असे सांगितले. लक्ष्मीपुरी, टिंबर मार्केटसह अन्य बाजारपेठा व औद्योगिक वसाहतींतील पायाभूत सुविधांकडे सदानंद कोरगावकर, हरीश पटेल यांनी लक्ष वेधले.

बैठकीत ऑनलाइन मार्केटिंगमुळे लहान व्यावसायिकांसमोर निर्माण झालेल्या समस्या मांडण्यात आल्या. अवजड वाहतुकीला दिवसा शहरात बंदी असल्यामुळे व्यापारावर परिणाम झाल्याची तक्रार करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या या म्हणण्यावर येत्या चार दिवसांत पक्षातर्फे प्रशासनासोबत बैठक घेऊ असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. चर्चेत संदीप नष्टे, अमर क्षीरसागर, रमेश पोवार, नयन प्रसादे, सचिन शहा, अनिल धडाम यांनी सहभाग घेतला.

फेरीवाले, व्यापाऱ्यांना मान्य होईल असा तोडगा

दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी, 'ड वर्ग विकास नियंत्रण नियमावलीतील जाचक अटी शहर विकासात अडसर ठरत आहेत. राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आल्यावर नियमावली रद्द होईल असे आश्वासन पक्षाच्या नेत्यांनी दिल्याचे पत्रकारांना सांगितले. महाद्वार रोडवर व्यापारी आणि फेरीवाल्यांत वाद आहे. फेरीवाल्यांमुळे दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत असून वाहतुकीला अडथळा होत असल्याचे बैठकीत व्यापाऱ्यांनी सांगितले. याप्रश्नी व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि फेरीवाल्यांना आर्थिक फटका बसणार नाही. वाहतूकही सुरळीत राहील अशा पद्धतीने तोडगा काढू असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, माजी महापौर हसीना फरास, नगरसेवक मुरलीधर जाधव, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, उत्तम कोराणे, सुनील देसाई, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे उपस्थित होते.

शहरातील भाडेतत्वावरील व्यापारी मिळकतींना जादा मिळकत कर असल्यामुळे इथल्या विकासाला ब्रेक लागत आहे. हा कर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या चार दिवसांत याप्रश्नी ठोस निर्णय होईल. सभागृहाने या मिळकतींचा कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

- सरिता मोरे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या शहराचा आजपाणीपुरवठा बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील ए., बी., आणि ई वॉर्डातील प्रभागासह संलग्न ग्रामीण भागात सोमवारी (ता. २५) महापालिकेकडून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारीही अपुरा व कमी दाबाने होणार आहे. महावितरण कंपनीच्या दुरुस्तीच्या कामाचा फटका याला बसणार आहे.

महावितरणकडून विविध ठिकाणच्या दुरुस्तीसाठी सोमवारी (ता. २५) दुरुस्तीसाठी सकाळी ९ ते तीन वाजेपर्यंत विज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी महापालिकेच्या शिंगणापूर येथून पुईखडी व कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रात होणारा पाणी उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे ए., बी. आणि ई वॉर्डातील पाणीपुरवठा सोमवारी बंद राहील.

ए. आणि बी. वॉर्डातील फुलेवाडी रिंगरोड परिसर, कणेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जीवबा नाना जाधव पार्क, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, बापूरामनगर, साळोखे नगर, तपोवन परिसर, नाळे कॉलनी, संभाजीनगर, विजयनगर, शहाजी वसाहत, श्रीकृष्ण कॉलनी, रायगड कॉलनी, हॉकी स्टेडियम परिसर, नेहरू नगर, शेंडापार्क, राजेंद्रनगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेतील पाणीपुरवठा बंद राहील. ई वॉर्डातील शुगर मिल, कसबा बावडा परिसर, लाइन बाजार, नागाळा पार्क, रमणमळा, न्यू पॅलेस परिसर, ताराबाई पार्क, न्यू शाहूपुरी परिसर, बी. टी. कॉलेज, साइक्स एक्स्टेंशन परिसर, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, बापट कॅम्प, कावळा नाका, सदर बाजार, मुक्तसैनिक वसाहत, राजारामपुरी, टाकाळा खण व माळी कॉलनी, दौलतनगर, प्रतिभानगर, पांजरपोळ, शास्त्रीनगर, जवाहरनगर, सम्राटनगर, स्वातंत्र्यसैनिक वसाहत, शाहू मिल कॉलनी, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, उचगाव नाका परिसर, जामसांडेकर माळ आदी भागांत सोमवारी पाणी येणार नाही. मंगळवारी या सर्व भागाला अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. या काळात शहर पाणीपुरवठा विभागाकडून टँकरने पाणी दिले जाईल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचा अर्बन सेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहरी प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्यक्रम दिले आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य अशा नागरी प्रश्नांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे आंदोलन करायची आहेत. महापालिका, नगरपालिकेत सत्ता असो वा नसो, त्याचा विचार न करता शहरासह लोकांच्या विकासासाठी पक्षाचे कार्यकर्ते नागरिकांसोबत राहतील' असे पक्षाच्या अर्बन सेलच्या राज्याध्यक्षा, खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शहरवासियांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी दर आठवड्याला एक आंदोलन होईल असेही त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, खासदार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर अर्बन सेलची स्थापना झाली आहे. १७ जणांच्या कार्यकारिणीमध्ये सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील हे सरचिटणीसपदी तर येथील माजी नगरसेवक आदिल फरास यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. अर्बन सेलच्या बांधणीसाठी राज्यभर दौरे असून सोमवारी सांगलीत बैठक होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली अर्बन सेलच्या पदाधिकाऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

खासदार चव्हाण म्हणाल्या, 'नागरिकीकरणाचा वेग वाढत आहे. २०११ मध्ये राज्यात शहरी लोकसंख्येचे प्रमाण ४५ टक्के होते. २०५० मध्ये शहरात वास्तव्य करणाऱ्यांची संख्या ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करुन पक्षाने शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे. महिलांची सुरक्षितता, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छतागृहे या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यकर्ते आक्रमक आंदोलने करतील. दर महिन्याला नगरसेवक प्रभाग सभा घेतील. सातवीनंतर अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल. विद्यार्थी, सामान्य नागरिक, महिला, व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक अशा विविध घटकांसाठी काम करण्यावर फोकस राहणार आहे.'

पक्ष संघटनेवर भर

पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा झाली. मुश्रीफ व महाडिक यांनी संघटनेच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल साळोखे, आर. के. पोवार, आदिल फरास यांची भाषणे झाली. पक्षाची मजबूत बांधणीसाठी बूथ कमिट्या सक्षम करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हुपरीकरांचे अधुरे स्वप्न नगरपालिकेमुळे पूर्ण’

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

'हुपरी शहरात गेल्या वीस वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या अनेक वाढीव वसाहतींमध्ये विकासाची गंगा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम नगरपरिषदेने केले आहे. थोड्याच दिवसांत राहिलेल्या भागातील अपूर्ण कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. नगरपरिषदेने अल्पावधीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून हुपरीकरांचे अधुरे स्वप्न पूर्ण केले आहे,' असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.

हुपरी (ता. हातकणंगले) येथे नगरपरिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार हाळवणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते महावीर गाट होते. यावेळी नगराध्यक्ष जयश्री गाट, उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके प्रमुख उपस्थित होते.

माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, 'हुपरी नगरपरिषदेची स्थापन होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या कालात आमदार हाळवणकर यांच्या प्रयत्नाने आणि ज्येष्ठ नेते महावीर गाट, अमित गाट यांच्या पाठपुराव्यांमुळे आतापर्यंत सहा कोटींचा मोठा निधी आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात केवळ हुपरी नगरपरिषद निधी आणण्यात सरस ठरली आहे. त्यामुळे हुपरीकर शहरवासीयांनी टाकलेला विश्वास गाट कुटुंबीयांनी सार्थ ठरवला आहे.'

यावेळी शहरातील रस्ता, गटर्स, पाणी, आदींसह वाळवेकरनगरातील पथदिव्यांचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे, बांधकाम सभापती लक्ष्मी साळोखे, नगरसेवक जयकुमार माळगे, रफिक मुल्ला, अमजद नदाफ, आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमित गाट यांनी प्रास्ताविक केले. मुबारक शेख यांनी सूत्रसंचालन केले. उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे यांनी आभार मानले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध गर्भपातप्रकरणी तिघांवर गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

गिरगाव (ता. शाहूवाडी) येथील अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्यातून गरोदर राहिलेल्या संबंधित पीडित मुलीचा अवैधरीत्या गर्भपात केल्याप्रकरणी एका डॉक्टरसह तीन संशयितांविरुद्ध शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. श्रीकांत दत्तात्रय सागावकर (वय ४३, रा. महाडिक वसाहत, कोल्हापूर), सागर तुकाराम पाटील (वय २४) व तुकाराम मारुती पाटील (वय ५५, दोघेही रा. गिरगाव, ता. शाहूवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. डॉ. सागावकर व सागर पाटील यांना शाहूवाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

कोल्हापूर शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलिसांनी व्हीनस कॉर्नर परिसरातील दवाखान्यावर शनिवारी सायंकाळी छापा टाकून हा खळबळजनक प्रकार उघडकीस आणला. शाहूवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा हे प्रकरण हस्तांतरित केल्यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, शाहूवाडी तालुक्यातील गिरगाव येथील फिर्यादी महिला व संशयित सागर पाटील यांची एकाच गल्लीत समोरासमोर घरे आहेत. फिर्यादी महिला विधवा असून, तिच्या अल्पवयीन मुलीला धमकावून गेल्या सहा महिन्यांपासून सागर पाटीलने वारंवार लैंगिक अत्याचार केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. याबाबत कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून सागर व त्याचे वडील तुकाराम पाटील यांनी पीडितेसह फिर्यादी महिलेला धमकावून अल्पवयीन पीडितेचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आरोपींनी एका मध्यस्थामार्फत कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर परिसरातील डॉ. श्रीकांत सागावकर याची वेळ निश्चित करून शनिवारी सायंकाळी मुलीला गर्भपातासाठी दवाखान्यात दाखल केले. याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस उपअधीक्षक कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलिसांनी दवाखान्यावर छापा टाकून पीडित मुलीचा ताबा घेतला. दरम्यान, डॉ. सागावकर याने गर्भपाताचे औषध दिल्याने त्रास सुरू झालेल्या मुलीला पोलिसांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल करून डॉ. सागावकरलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images