Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्वच्छ शौचालय मोहिमेचे कौतुक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे आयोजित स्वच्छ सुंदर शौचालय अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने मोठ्या संख्येने नागरिकांना सामावून घेतले. जानेवारीत राबविलेल्या अभियानात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चार लाख शौचालयांची रंगरंगोटी करण्यात आली. 'आरोग्य आहे तर समृद्धी आहे'चा घोष जिल्हाभर घुमला. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने या अभियानवर आधारित चित्रफित तयार केली आहे. ही चित्रफित मंत्रालयात बुधवारी दाखविण्यात आली.

'स्वच्छ भारत मिशन'अंतर्गत एक जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत 'स्वच्छ सुंदर शौचालय अभियान' राबविले. या अभियानमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, जळगाव जिल्ह्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राज्यातील एकूण २६ लाख शौचालये स्वच्छ व सुंदर केली. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख शौचालये रंगवली. परिसर स्वच्छ बनविला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी अभियानात सहभाग घेतला. अध्यक्षा व सीईओंनी स्वत हाती ब्रश घेऊन 'स्वच्छ व सुंदर शौचालय'अभियानविषयी प्रबोधन केले. जिल्हा परिषदेच्या या स्वच्छतेविषयक उपक्रमाचा राज्यस्तरावर कौतुक झाल्यामुळे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

लोगो : जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरः आरक्षणासाठी जिल्हा परिषदेत रोस्टर तयार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी दहा टक्के जागा आरक्षित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयांची अंमलबजावणी एक फेब्रुवारी २०१९ पासून सुरू केल्याचे याबाबतच्या अध्यादेशात म्हटले आहे. याबाबत, मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची बैठक झाली.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी सर्व विभागप्रमुख, कक्ष अधिकारी व अधीक्षकांची बैठक घेतली. तत्काळ बिंदू नामावली तयार करण्याचे आदेश दिले. विविध विभागांच्या अधिकारी व अधीक्षकांनी रात्री नऊ वाजेपर्यंत सरकारच्या नव्या आदेशानुसार रोस्टर तयार केले. संबंधित रोस्टरची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून बुधवारी मागासवर्गीय कक्षाकडे रोस्टर सुपूर्द करण्यात येणार आहे. रोस्टरला मान्यता मिळाल्यानंतर सरकारी सूचनेनुसार दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी होईल.

दरम्यान आरक्षणाचा निर्णय सरकारी, निमसरकारी सेवा, मंडळे, महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, सरकारी व खासगी विद्यालये, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, अनुदानित व विना अनुदानित विद्यालयांनाही लागू राहील असे सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशात म्हटले आहे. शिवाय १४ जानेवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत ज्या जाहिरातींमध्ये व प्रवेश प्रक्रियेत दुर्बल घटकासाठी दहा टक्के आरक्षणांनुसार पदांचा समावेश केला असेल, अशा पदांनासुद्धा हे आरक्षण लागू असेल.

आरक्षणासाठी पात्रता

ज्या उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असेल, त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल समजण्यात येईल. आरक्षणाच्या लाभासाठी तो पात्र राहील. कुटुंबांच्या एकत्रित उत्पन्नात त्या कुटुंबातील सदस्यांच्या सर्व स्त्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असेल. यामध्ये वेतन, कृषी उत्पन्न व उद्योग व्यवसाय व अन्य मार्गांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय राज्यात १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापूर्वीचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाइपलाइनला सरकारमुळे दिरंगाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेला आघाडी सरकारने मंजुरी दिली. भाजप सरकारच्या काळात याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र योजनेला आवश्यक असणाऱ्या परगानग्या देण्यात राज्य सरकार जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करीत आहे. त्यामुळे योजना रेंगाळत आहे' असा आरोप महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. 'भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना सभा उधळून लावण्याची होती. म्हणूनच त्यांनी असे कृत्य केले. यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही' असा इशारा महापौरांनी दिला.

महापौर मोरे म्हणाल्या, 'सभा सनदशीर मार्गाने सुरू होती. मात्र विरोधक गोंधळ घालण्याच्या उद्देशानेच सभागृहात आले होते. बुधवारी (ता. ६) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे योजनेच्या रखडलेल्या परवाग्या मिळवून देण्याबाबत पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप उत्तर आलेले नाही. यापूर्वीच्या सर्व महापौरांनी त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही.'

उपमहापौर शेटे म्हणाले, 'विरोधकांनी महापौरांचा अवमान केला आहे. महापौरांचा निषेध करून सभागत्याग करण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. सरकारने परवाने अडवले असताना विरोधकांनी महापौरांचा निषेध नोंदविण्याचा प्रकार निंदनीय आहे. परवानग्यांमुळेच योजना रखडल्या. यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे.'

प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'योजना पूर्ण करण्यासाठी अधीक्षक अभियंत्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारकडे वारंवार मागणी कली. पण सरकारने दुर्लक्ष केले आहे.'

स्थायी सभातपी शारंगधर देशमुख म्हणाले, 'योजना मंजूर झाल्यानंतर सरकार बदलले. त्यामुळे सत्तेवर आलेल्या सरकारची योजनेकडे लक्ष देण्याची जबाबदारी होती. मात्र, सरकार परवानग्यांच्या माध्यमातून योजनेत खोडा घालत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला योजनेचे श्रेय मिळू नये यासाठी विरोधकांनी पूर्वनियोजन करून काळ्या फिती लावून सभागृहात प्रवेश केला.'

शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, नगरसेवक मुरलीधर जाधव, अर्जुन माने, सचिन पाटील, विनायक फाळके, माजी स्थायी सभापती सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

भाजप पुरस्कृत राष्ट्रवादीचे खासदार

'एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात भाजप पुरस्कृत राष्ट्रवादीच्या खासदारांवर नागरिकांनी आरोप केले. त्या आरोपांचे पोटशूळ उठल्याने सभेत भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सभेत गोंधळ घातला' असा आरोप स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री लोकसभेच्या मैदानात?

0
0

\Bचंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत यांचे फोटो....

\B

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेनेबरोबर युती न झाल्यास ऐनवेळी उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ येऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह काहींची नावे पुढे येत आहेत.

युतीच्या जागावाटपात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व हातकणंगले हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत, तर सांगली, सोलापूर व माढा मतदारसंघ भाजप, तर सातारा रिपाइं लढवते. गेल्यावेळी हातकणंगले व माढा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले होते. ही संघटना आता युतीत नसल्याने या जागा भाजपला लढवाव्या लागणार आहेत. युती झाल्यास हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेला मिळेल. धैर्यशील माने यांनी या उमेदवारीसाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भाजपला स्वतंत्र लढण्याची वेळ आल्यास कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत उमेदवार शोधावा लागणार आहे. कोल्हापुरातून गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांनी त्याचा इन्कार न करता पक्ष देईल तो आदेश मान्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा सत्यात उतरला तर खासदार धनंजय महाडिक यांना भाजपमध्ये घेण्याचा पुन्हा प्रयत्न होईल. त्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे विचारणा होईल, पण हे दोन्ही पर्याय जर तर असल्याने पालकमंत्र्यांनाच मैदानात उतरावे लागेल अशी आजची स्थिती आहे.

हातकणंगले मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यासाठी मंत्री खोत तयारी करत आहेत. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी मतदारसंघातील संपर्क वाढविला आहे. युती झाली तर उमेदवारी द्या, अशी त्यांची मागणी आहे. माजी मंत्री विनय कोरे, आमदार सुरेश हाळवणकर यांनी नकार दिल्याने सध्या तरी खोत यांचेच नाव आघाडीवर आहे. निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनादेखील भाजप येथून संधी देऊ शकते. त्यादृष्टीने सध्या चर्चा सुरू आहे.

माढा मतदारसंघातून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मैदानात उतरविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. येथून आता खुद्द शरद पवारच रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे असेल. देशमुख यांनी यापूर्वी पवारांविरोधात निवडणूक लढवली आहे. त्यामुळे पुन्हा लढण्यासाठी त्यांचे नाव पुढे केले जात आहे. सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे यांचे नाव काँग्रेसने निश्चित केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात भाजपचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याबरोबर अमर साबळे यांचेही नाव चर्चेत आले आहे.

००००

सांगलीतही देशमुख, घोरपडे, शिंदेंचे नाव

सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय पाटील यांचे नाव निश्चित आहे; पण काही आमदारांनी त्यांच्या नावाला विरोध सुरू केला आहे. हा विरोध वाढल्यास पर्यायी नावे असावीत म्हणून जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी राज्यमंत्री अजित घोरपडे, दीपक शिंदे यांची नावे पुढे केली जात आहेत. यामध्ये देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांसाठी विशेष तरतूद हवी

0
0

आपलं बजेट आपलं कोल्हापूर

प्राचार्य व्ही. व्ही. कार्जिनी

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

'वाढत्या नागरिकरणामध्ये शहरवासियांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. पायाभूत सुविधा पुरवतांना सुरक्षित प्रवासाठी महापालिकेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. रस्ते प्रकल्पात रस्त्यांचे रुंदीकरण झाले, यातून प्रवास वेगवान झालेला असला, तरी त्याची देखभाल करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी.' अशी अपेक्षा केआयटी कॉलेजचे प्राचार्य व्ही. व्ही. कार्जिनी यांनी व्यक्त केली.

'शहरातंर्गत अनेक रस्ते अरुंद असले, तरी रस्ते विकास प्रकल्पातून शहराच्या सर्वच प्रवेशद्वारांचे रस्त्यांचे रुंदीकरण झाले. मात्र कंपनीचा करार संपुष्टात आल्याने रस्त्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होणार आहे. रस्त्यांच्या देखभालीसाठी सरकारच्या अनुदानांचे वाट न पाहता महापालिकेने स्वतंत्र तरतूद करण्याची गरज आहे. शहराला ऐतिहासिक महत्त्व असल्याने येथे पर्यटकांचा ओघ नेहमीच असतो. त्यासाठी शहरांतर्गत रस्त्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सिग्नलची व्यवस्था केली पाहिजे. यासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीला महत्त्व दिले पाहिजे.'

'नागरीकरण वाढत गेल्यानंतर अनेक ठिकाणी उपनगरांची स्थापना झाली. अनेक उपनगरे उंचावर असल्याने अशा ठिकाणी पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होते. त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. काळम्मावाडी थेट पाइपलाइनला त्वरित चालना देण्याची आवश्यकता आहे. यासाठी लागणाऱ्या निधीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. देशात सर्वत्र स्मार्ट सिटीचा गाजावाजा सुरू असताना त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश झालेला नाही. शहराला आवश्यक पायाभूत सुविधा दिल्यास स्मार्ट सिटीमध्ये समावेश होऊ शकतो. एखदा त्यामध्ये समावेश झाल्यास सरकारचे थेट निधी मिळेल. त्यामुळे महापालिकेवर अतिरिक्त बोजा पडणार नाही. परिणामी महापालिकेकडे कर स्वरुपात संकलित होणारा निधी अन्य विकासात्मक कामासाठी वापरता येईल. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात तरतूद करावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८६७ शाळांना ‘संरक्षण’ नाही

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शाळा या ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा आधारवड ठरल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील ८६७ शाळांना पूर्णता संरक्षक भिंती नसल्यामुळे त्या शाळेच्या जागा धोक्यात येत आहेत. शाळेच्या जागेवर अतिक्रमण, जनावरांसाठी पत्र्याचा शेड उभारणी, दुकानगाळा बांधण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. ग्रामीण भागातील अनेक शाळा या रस्त्यालगत आहेत. संरक्षक भिंती नसल्यामुळे लहान मुलांच्या जीवितीला धोका उद्भवत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने या शाळेसाठी आवश्यक संरक्षक भिंत, त्यासाठी लागणाऱ्या रकमेचा आराखडा बनविला आहे. ६४ कोटी, २२ लाख, २४ हजार, ८०० रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. संरक्षक भिंती नसलेल्या शाळा या शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात जास्त आहेत. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या एकूण शाळांची संख्या १९९४ इतकी आहे. दरम्यान प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षणात बहुसंख्य शाळेभोवती संरक्षक भिंतीची कमतरता असल्याचे सामोरे आले आहे. शाळेच्या चहूबाजूनी संरक्षक भिंतीची आवश्यकता असताना कुठे निम्म्यावर तर काही ठिकाणी एकूण जागेच्या २५ टक्के भागावर भिंती आहेत.

मोठ्या लोकवस्तीच्या गावामध्ये शाळेच्या जागेवर अतिक्रमण,बांधकाम वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. काही अतिक्रमणे वर्षानुवर्षे काढली नाहीत, त्यामुळे अडथळे येत आहेत.

०००

बहुतांश शाळेभोवती संरक्षक भिंती नसल्यामुळे अतिक्रमण वाढत आहेत. शिवाय रस्त्यालगत शाळा असल्याने मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध झाल्यास शाळांना सुरक्षेचे कवच लाभू शकेल.

हंबीरराव पाटील, जि. प. सदस्य, शाहूवाडी

संरक्षण भिंती आवश्यक असलेली शाळांची तालुकानिहाय संख्या

आजरा: ५५

भुदरगड : १०२

चंदगड : १६

गडहिंग्लज : ९५

गगनबावडा : ५२

हातकणंगले : ७९

कागल : ५५

करवीर : २४

पन्हाळा : १०९

राधानगरी : ९

शाहूवाडी : २०१

शिरोळ : ७०

एकूण : ८६७

इस्टिमेट: ६४,२२,२४ ८००

संरक्षण भिंतीची एकूण लांबी: ११४ किलो मीटर

..................

प्रत्येक शाळेभोवती संरक्षक भिंत आणि भक्कम गेट गरजेचे आहे. सुट्टीच्या कालावधीत शाळा परिसरात बाह्य घटकांचा उपद्रव वाढतो. इमारतीचे नुकसान होते. शाळेचे सौंदर्य, जागा टिकवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रत्येक शाळा सुरक्षित करावी.

प्रसाद खोबरे, सदस्य जिप

...................

११४ किमीचा आराखडा, समितीकडे मागितले वीस कोटी

प्रशासनाने ८६७ शाळांसाठी आवश्यक संरक्षक भिंतीसाठी इस्टीमेट तयार केले आहे. यामध्ये आजरा तालुक्यासाठी ८७९९ मीटर भिंत आवश्यक आहे. अन्य ठिकाणी भुदरगडमध्ये १३७७८, चंदगडमध्ये १९९७, गडहिंग्लजमध्ये १२८५९, गगनबावडामध्ये ७९३२, हातकणंगलेत ९९४७, कागलमध्ये ९०८४, करवीरमध्ये ३५६५, राधानगरीत ६१० मीटर लांबीची भिंत प्रस्तावित केली आहे. शिरोळ तालुक्यात १४४०२, शाहूवाडीत १३५३०, पन्हाळा १८५८० मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधावी लागणार आहे. ८६७ शाळांसाठी ११४ किलो मीटर लांबीची भिंत बांधावी लागणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ६४ कोटी २२ लाखाचे इस्टीमेट तयार केले आहे. जिल्हा नियोजन समितीकडे वीस कोटी रुपयांची मागणी केली आहे. शिवाय मनरेगा योजनेतून शाळेच्या संरक्षक भिंतीची कामे करण्यासाठी नियोजन सुरू आहे.

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगारी पुजारीसाठी २५२ अर्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नेमण्यात येणाऱ्या पगारी पुजारी पदासाठी २५२ अर्ज आले असून यापैकी ३५ अर्ज टपालाने आले आहेत. येत्या दोन दिवसांत अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (ता. १५) आणि शनिवारी (ता. १६) त्र्यंबोली भक्त निवास येथे पगारी पुजारीपदासाठी मुलाखत प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी दिली.

दरम्यान, पंढरपूर येथील मंदिरात असलेल्या सरकारी पगारी पुजाऱ्यांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरात पुजारी नेमण्याबाबत कायदेशीर मसुदा तयार करण्यात आला आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये करण्यात आलेल्या कायद्याच्या मसुद्यानुसार पगारी पुजारी नियुक्तीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे असे सूत्रांनी सांगितले.

या भरतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविले होते. १२ फेब्रुवारीअखेर अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. दरम्यान यापूर्वी जून २०१७मध्ये देवस्थान समितीने पुजारी नियुक्तीसाठी मुलाखत प्रक्रिया घेतली. मात्र जाहिरात न देता मुलाखती घेतल्यामुळे पुजारी हटाओ संघर्ष कृती समितीने या प्रक्रियेवर आक्षेप घेतले होते. त्यानंतर ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यावेळी ११३ अर्ज पगारी पुजारी पदासाठी आले होते. दरम्यान त्यावेळी रद्द झालेल्या भरती प्रक्रियेत ज्यांनी अर्ज केले होता, त्यांनाही नव्या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती. महिलांसाठी राखीव जागा असल्यामुळे २५२ अर्जांमध्ये महिला पुजाऱ्यांकडून अर्ज दाखल झाले असण्याची शक्यता आहे. आगामी दोन दिवसांत अर्जांची छाननी करण्यात येणार असून निकष पूर्ण करणाऱ्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या मुलाखतींसाठी बोलवण्यात येणार आहे.

९ जून २०१७ रोजी श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी अंबाबाईला राजस्थानी पेहराव परिधान केल्यामुळे भाविकांकडून जोरदार टीका झाली. त्यानंतर कोल्हापुरात परंपरागत घराणेदार पुजाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली होती. विद्यमान पगारी पुजारी हटवून सरकारी पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा करावा या मागणीसाठी पुजारी हटाओ संघर्ष कृती समितीने जवळपास एक वर्ष विविध मार्गांनी आंदोलन केले. त्याची दखल घेत राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने पगारी पुजारी कायद्याचा मसुदा तयार केला. या मसुद्यानुसार पगारी पुजारी नियुक्ती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

कोट

न्याय व विधी विभागाच्या आदेशानुसार आणि अंबाबाई मंदिर विश्वस्त व्यवस्थापन समिती स्थापन होईपर्यंत पुजारी नियुक्तीचे अधिकार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे देण्यात आले आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात-बारा तयार झाल्याशिवाय उठणार नाहीडॉ. भारत पाटणकर यांचा इशारा

0
0

सात-बारा तयार झाल्याशिवाय उठणार नाही

डॉ. भारत पाटणकर यांचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, कराड

पाटण तालुक्यातील कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे संकलन तयार आहे. जमीन तयार आहे, लाभक्षेत्र आहे मग वाटपास वेळ कशाला? जमिनी वाटपाचा आदेश आणि सातबारे तयार झाल्याशिवाय आंदोलन स्थळावरून उठणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी कोयनानगरच्या मेळाव्यात प्रकल्पग्रस्तासमोर बोलताना दिला.

कोयनानगर येथील शिवाजी क्रीडांगणावर कोयना प्रकल्पग्रस्तांच्या दुसऱ्या टप्प्यातील आणि निर्णायक आंदोलनात बोलताना डॉ. भारत पाटणकर म्हणाले, 'मुख्यमंत्र्यानी गेल्या वर्षी कोयना प्रकल्पग्रस्तांची विधान भवनात मिटिंग घेऊन कोयना प्रकल्पग्रस्तांच्या १४ मागण्या मान्य केल्या होत्या. या मागण्या तीन महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षीत होते. महसूल विभागाचे काम संथ गतीने काम चालू आहे. पात्र प्रकल्पग्रस्तांची यादी तयार झाली आहे. हरकती, आक्षेप घेऊन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातून जमीन उपलब्ध आहे, असेही सांगितले जाते. मग घोड अडतंय कुठं? आमच्यावर दुसऱ्यांदा आंदोलन करण्याची वेळ का यावी. आता कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत उठायचे नाही.'

.........

बारा जणांवर दरोड्याचा गुन्हा

कराड :

पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील धनगरवाडा (काहीर) येथे सुझलॉन या पवनचक्की कंपनीचे २ लाख ८० हजारांचे लोखंडी साहित्य ट्रकमधून चोरीच्या उद्देशाने घेऊन जाताना त्यांना अटकाव केल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पाटण पोलिसांनी दहा ते बारा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. याची फिर्याद विजय सुभाष मोरे (रा. शनिमंडळ, ता. जि. नंदुरबार) यांनी सोमवारी पाटण पोलिसात दिली आहे.

..........

स्वा. उंडाळकर पुरस्कार

विवेक सावंत यांना जाहीर

कराड :

उंडाळे (ता. कराड) येथील थोर स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा स्वा. दादासाहेब उंडाळकर सामाजिक पुरस्कार विवेक सावंत यांना जाहीर झाला आहे.

दर वर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींना दादासाहेब उंडाळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा त्यांच्या ४५व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रौप्य महोत्सवी समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय संमेलनादरम्यान सोमवारी, १८ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वा. दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कोयना बँकेचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते.

...........

'समाजाप्रती कृतज्ञ असले पाहिजे'

कराड :

'प्रत्येक व्यक्तीकडे देण्यासारखे काही तरी असते. ज्याला जमेल तसे वस्तू, वेळ,पै सा आणि श्रम यांचे योगदान करीत समाजाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. तरच घडणारा समाज भावी पिढीसाठी पुढे योगदान देईल,' असे प्रतिपादन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

पाटील यांच्या ७८व्या वाढदिवसा निमित्त पुणे येथील एस. बालन समूह व परिवर्तन संस्था यांच्या वतीने गांधीटेकडी (ता. पाटण)येथील ठक्करबाप्पा विद्यालयातील विद्यार्थ्यांना ८० सायकली, १०० स्कूल बॅग व कराड, पाटण तालुक्यातील १० शाळांना सगंणक भेट देण्यात आले. या वेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, एस बालन उद्योग समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अभिजीत घुले-पाटील, राष्ट्रवादी आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील उपस्थितीत होते.

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, 'वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या सायकली, संगणकांतून समाज घडणार आहे. नव्या पिढीसाठी हे प्रोत्साहन असून, त्यासाठी आपण आपली जबाबदारी उचलली पाहिजे.' पुनीत बालन म्हणाले, 'श्रीनिवास पाटील साहेबांचे प्रशासकीय, राजकीय, सामाजिक कार्य मोठे आहे. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. त्यांचे दातृत्व मोठे असून, त्यांनी आपल्या जीवन प्रवासात वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना आदर्श मानून प्रेरणा घ्यावी. '

ओळी

मुलांना सायकल वाटप करताना श्रीनिवास पाटील व अन्य.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खूनप्रकरणी तपास पथके रवाना

0
0

खूनप्रकरणी तपास पथके रवाना

कराड :

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मालखेड (ता. कराड) गावच्या हद्दीत पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथील स्वप्नील सुतार याचा खून झाल्याचे सोमवारी रात्री उघड झाले होते. या घटनेच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. पुणे व पेठ वडगाव येथे तपास पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

सोमवारी घटनास्थळवर पोलिसांना मृताच्या खिशात स्विचऑफ असलेला मोबाइल आढळला होता. तो सुरू केल्यानंतर त्या वर मृताच्या नातेवाईकांचे फोन येऊ लागले. या वरून तो मृतदेह स्वप्नील गणेश सुतार (रा. पेठ वडगाव) याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. रविवारी रात्री स्वप्नील पेठ वडगावला जाण्यासाठी निघाला असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मोबाइल बंद झाला. या दरम्यान स्वप्नीलचा खून करून संशयितांनी त्याचा मृतदेह मालखेडच्या हद्दीत सेवा रस्त्यालगत असलेल्या उसाच्या शेतात टाकला असावा. शिवाय स्वप्नीलचा खून अन्य ठिकाणी करून मृतदेह मालखेड येथे आणून टाकल्याचा अंदाज घटनास्थळावरील परिस्थितीवरून पोलिसांनी वर्तविला आहे. स्वप्नील पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये नोकरीला होता. त्यामुळे त्याचा पुणे व पेठ वडगाव परिसरातील लोकांशी संपर्क होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरी मेळाव्याचे आयोजन

0
0

नोकरी मेळाव्याचे आयोजन

शिराळा :

शिराळा येथे शनिवारी (ता. १६) नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्ट चिखली यांच्या वतीने या नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. भाटशिरगाव येथील लायन्स सेवा केंद्रात हा नोकरी मेळावा होणार आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघातील तरुणांना या मेळाव्यात प्राधान्य देण्यात येणार आहे. या मेळाव्यात नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत. प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल. पात्र अर्जदारांचे स्पॉट सिलेक्शन केले जाणार आहे. आयटीआय. फिटर, डिझेल मेकॅनिक मोटर मेकॉनिक, वेल्डर, पेंटर, शीट मेटल वर्कर, डिप्लोमा अ‍ॅटो किंवा मेकॅनीकल झालेल्या उमेदवारांनी . शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक व स्वतःचे सहा फोटो घेऊन नाव नोदणी करून शनिवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.

..........

बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

शिराळा

सांगली जिल्हातील धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त व पवनचक्की ग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यासाठी मंगळवारी मणदूर (ता. शिराळा) येथील हुतात्मा स्मारकाजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील, दाजी शेलार, शिवाजी पाटील तानाजी जाधव, हरीभाऊ पवार आदींच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरुवात करून चांदोली धरणाकडे मोर्चा गेला. महात्मा फुले व्हिजन, आटपाडी पॅटर्न राज्यभर लागू करा, धरण प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसनाची घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, स्वतंत्र ग्रामपंचायत, प्रकल्पग्रस्ताचे जमिनीला पाणी द्या, अन्यथा पंधरा हजार मासिक नुकसान भरपाई द्या, नोकरी न दिलेल्या प्रकल्पग्रस्ताना पाच लाख अनुदान द्या, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पुनर्वसन धोरणा नुसार अंमलबजावणी सुरू करा आदी मागण्या सह जिल्हास्तरावरील मागण्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमच्यावर अपार प्रेम करणार

0
0

तुमच्यावर अपार प्रेम करणार

सातारा

साताऱ्यातील शाहू कलामंदिरात मंगळवारी सकाळी पार पडलेल्या पत्रकार सोहळ्यात खासदार उदयनराजेंनी एका हिंदी चित्रपटातील किशोर कुमार यांचे 'हमें तुमसे प्यार कितना,' हे गीत पेश केले. त्यांच्या या अदाकारीला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्‌ट्यांनी मनमुरादपणे दाद दिली.

म्हणाले, 'आपल्या सर्वांना बघून डोळ्यांचे पारणे फिटले. कारण, नसताना माझे कौतुक झाले असले तरी मला दृष्ट लागणार नाही. मोठ्या घरात जन्माला आला म्हणून माणसाला मोठपणा प्राप्त होत नाही. माणूस खऱ्या अर्थाने कर्तृत्वाने मोठा होतो. जिद्द ठेवून उद्दिष्टाने वाटचाल केल्याने आज अनेकांना पुरस्कार मिळाले. मी सर्व सामान्यांसाठी सर्व अर्पण करणार असून, हेच माझे उद्दिष्टे आहे. श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमच्यासाठीच जगणार आहे. तुमच्यावर अपार प्रेम करणार आहे. तुमच्यावर शब्दातीत प्रेम आहे, हे शपथेवर सांगतो. माझ्यात कसलाही बदल होणार नाही. फक्त तुम्ही तुमच्यात बदल करू नका. काय कमवायचे आणि काय गमवायचे? आयुष्यातील बरीच वर्षे निघून गेली. हाफ चड्डीतले दिवस निघून गेले. कॉलेजला असताना दांड्या मारायचो पण कमवली ती मैत्री होती. डीव्ही दादा ग्रेट असून, त्यांचे कार्य आदर्शवत आहे. विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींचा आज सन्मान होत आहे. अवलियापण असल्याशिवाय खऱ्या अर्थाने मजा येत नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासाच्या तणावातून दहावीच्या मुलाची आत्महत्या

0
0

पंढरपूरः

अभ्यासाच्या ताणतणावातुन शहरी भागातले विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जात असल्याच्या घटना वारंवार घडत असताना आता याचे लोण ग्रामीण भागापर्यंत आले आहेत. आज माढा तालुक्यातील वडाचीवाडी येथील दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाढती स्पर्धा आणि पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांचा बोजा सर्वच विद्यार्थी सहन करतात असे नाही आणि यातुन कमी मार्क पडू लागले कि अभ्यास नकोसा होतो. असाच प्रकार माढा येथील सोमनाथ कवले या दहावीच्या विद्यार्थ्याबाबत घडला असून अभ्यास अवघड जातोय या कारणाने बोर्ड परिक्षेपुर्वीच नैराश्यातुन त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोमनाथवर घरच्यांनीही अभ्यासाचा दबाव कधी टाकला नाही तरी सुद्धा त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने त्याचे घरचे हादरुन गेले आहेत. 'अभ्यास अवघड जातो असे तो सांगायचा पण दडपणाखाली येऊन तो आत्महत्या करेल असं वाटलं नव्हतं' असे त्याच्या वडिलांनी सांगितलं. काही दिवसातच बोर्डाची लेखी परिक्षा सुरु होत असून विद्यार्थ्यानी तणावमुक्त परिक्षा द्यावी असे आवाहन आता शिक्षकांकडून करण्यात येत आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटर एटीएमवरून रंगले कळंब्यात राजकारण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या वतीने कळंबा येथील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी अनुसूचित जाती उपाय योजनेतून वॉटर एटीएम बसविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती. वॉटर एटीएमसाठी जागा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. मात्र, राजकीय दृष्टिकोनातून सरपंच सागर भोगम यांनी मशिनसाठी जागाा व पाणीपुरवठा करण्याची सोय नाही, त्यामुळे काम रद्द करण्याबाबत जिल्हा परिषदेला पत्र दिल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या मनीषा टोणपे यांनी केला.

सरपंच भोगम यांनी टोणपे यांच्या आरोपांचा इन्कार केला. ते म्हणाले, 'वॉटर एटीएम मशिनवरून कोणतेही राजकारण नाही. जिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामपंचायत व त्या भागातील सदस्यांशी चर्चा करायला हवी होती. स्थानिक नागरिकांशी संवाद साधायला हवा होता. कळंबा गावातील विकासकामांसंदर्भातील जवळपास १५ ठराव आपण दिले आहेत. यामुळे विकासकामात राजकारणाचा संबंध नाही.'

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारती’कॉलेज ऑफ फार्मसीचा स्नेहमेळावा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'माजी विद्यार्थी हा शिक्षण संस्थेचा कणा असतो. माजी विद्यार्थी संघटनेने केलेल्या अर्थसहाय्यातून विविध सामाजिक उपक्रम राबविले. कॉलेजला मिळालेल्या यशात माजी विद्यार्थ्यांचे योगदान मोठे आहे,'असे प्रतिपादन भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य एच. एन. मोरे यांनी केले.

कॉलेजतर्फे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तेजस ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी डॉ. प्रमोद शिरोटे, डॉ. संतोष पाटील, महेश चौगुले, संजीवनी घोरपडे, गौरव कुलकर्णी, अवधूत जोशी, राजेश्वर मुदक्कना यांचा सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया, डॉ. सचिन पिशवीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर माजी विद्यार्थ्यांनी गीत, गायन, नृत्य, समूहनृत्य, बॅले सादर करत धमाल केली. शुभम पोळ, राधिका पाटील, स्नेहल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आदित्य चौगुले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासाच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

0
0

पंढरपूरः

माढा तालुक्यातील वडाचीवाडी येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमनाथ कवले, असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

दहावीचा अभ्यास अवघड जातोय, या कारणाने बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच त्याने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. वास्तविक सोमनाथ सर्वसाधारण विद्यार्थी होता आणि घरच्यांचाही त्याच्यावर अभ्यासाचा फारसा दबाव नव्हता. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीय हादरुन गेले आहेत. अभ्यास अवघड जातो, असे तो सांगायचा पण, दडपणाखाली तो असे काही करेल याची अपेक्षा नव्हती, असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. काही दिवसांतच बोर्डाची लेखी परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही ताण-तणाव ने घेता मुक्त परीक्षा द्यावी, असे आवाहन आता शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाचगणीत पॅराग्लायडिंग करताना कोरियाच्या नागरिकाचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

पाचगणी येथे पॅराग्लायडिंग करताना डोंगराला धडकून कोरियाच्या नागरिकाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. मृताचे नाव सांग टेक ओह, (वय ४५) आहे. पाचगणी येथून उड्डाण करून जाताना अभेपुरी गावच्या हद्दीत एका डोंगराला धडकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे आणि पोलिस कर्मचारी घटनास्‍थळी दाखल झाले. या घटनेची नोंद पाचगणी पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, कोरियन दूतावासाचे अधिकारी बुधवारी वाईत आले होते. सकाळी शवविच्छेदन झाल्‍यानंतर परदेशी नागरिक असल्याने सोपस्कर पूर्ण करून मृतदेह संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला. कोरियाहून आलेला पॅराग्लायडर्सचा ग्रुप गेल्या काही दिवसांपासून वाई-महाबळेश्वर भागात मुक्कामी आहे. वाईतील स्थानिक मंडळी त्यांना मदत करीत आहेत. टेबल लॅण्डवरुन उड्डाण केल्यानंतर ते हळूहळू हवेच्या दिशेने आकाशात तरंगतात. प्रमाणापेक्षा जास्त हवा असताना मंगळवारी सायंकाळी काही जणांना पॅराग्लायडिंगला सुरुवात केली. मात्र, या टीममधील सांग टेक ओह वगळता उर्वरित सर्व जण पुन्हा खाली उतरले. अंधार पडत चालल्यामुळे सर्व टीम आणि स्थानिकांनी ओहचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाचगणीच्या दरीजवळ असलेल्या अभेपुरी गावातील एका झाडावर ते मृतावस्थेत लटकताना आढळला. ट्रेकर्स आणि स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह खाली उतरवून वाईच्या मिशन रुग्णालयात नेण्यात आला. अंदाज चुकल्यामुळे तो झाडावर आपटला असावा आणि जास्त मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांवर काही वर्षांपूर्वी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आणली होती. त्यामुळे वादही झाले होते, मात्र तरीही परवानगी नाकारण्यात आली होती. आता कोरियाच्या ग्रुपला कशी आणि कोणी परवानगी दिली, या बाबत वाई पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुकुमार कांबळे यांच्याकडे वैचारिक दारिद्र्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांच्याबाबतीत वंचित बहुजन आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी जे वक्तव्य केले ते त्यांच्या वैचारिक दारिद्र्याचे लक्षण आहे. दलित व मुस्लिम समाजानेही खासदार ओवेसी यांचा इतिहास तपासून पाहावा' असे आवाहन शिवाजी पेठेतील तालीम संस्था व पक्ष संघटना प्रमुखांच्या बैठकीत करण्यात आले.

शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत, सचिव महेश जाधव, सहसचिव सुरेश जरग, खजानिस सदाशिव शिर्के, अशोक देसाई यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 'कोल्हापुरातील नागरिक गुण्यागोविंदाने राहत असून बाहेरुन कुणी तरी येऊन येथील सामाजिक सौहार्द बिघडवू नये. मराठा समाज व हिंदुत्ववाद्यांच्याबाबत खालच्या स्तरावरील भाषा अजिबात सहन करणार नाही. आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे, विचारांचे असू. मात्र शिवाजी पेठेतील आमची एकता व अखंडता कोणताही पक्ष तोडू शकत नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारांवरच गुंफली नात्यांची वीण

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सोयरीक जुळवायचं म्हटलं की नात्यागोत्यातील मुला-मुलींचा शोध सुरू होतो, ओळखीच्यांना निरोप दिले जातात. रुढी, परंपरेला महत्त्व देत लग्न जुळविण्याला प्राधान्य देतात. मात्र, जातपात आणि मानपान या कृत्रिम चौकटीच्या पलीकडे जाऊन एकमेकांविषयी आदर, सुंदर विचार आणि संस्कारमूल्यांना महत्त्व देत येथील कामत कुटुंबाने तीन पिढ्यांत आंतरजातीय नात्यांची वीण गुंफली आणि सहजीवनाला नवा आयाम दिला.

५०-६० वर्षांपूर्वी आपल्याच गणगोतातील मुला, मुलींची सोयरीक जुळविली जायची. जातीधर्माची बंधने घट्ट होती. त्या कालावधीत १९४७ मध्ये के. डी. कामत आणि डॉ. कांता कामत यांचा आंतरजातीय विवाह झाला. कांता हे विवाहानंतरचे नाव. त्या मूळच्या मोहिते कुटुंबातील. त्यांचे माहेरचे नाव इंदू. त्या लक्ष्मणराव व सुशिला मोहिते यांच्या कन्या. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या इंदू यांच्यावर मोहिते कुटुंबातील सत्यशोधकी विचारांचा प्रभाव. के. डी. कामत हे सिव्हिल इंजिनीअर होते. गुरुवर्य आबासाहेब सासने यांच्या आश्रमात ते राहायला होते. दोघेही एकाच गल्लीत मोठे झालेले.

उदारमतवादी विचार, नावीन्याचा स्वीकार आणि जातीपातीपेक्षा चांगल्या विचारांचा सन्मान करण्याची वृत्ती त्यांच्यात रुजली. विचारांच्या या समान धाग्यामुळे ते विवाहबंधनात गुंफले. दोघांची कार्यक्षेत्रे भिन्न. पण दोघांनीही आपआपल्या क्षेत्रात नाव कमावले. विविध सामाजिक उपक्रम आणि संस्थेच्या माध्यमातून कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी जपली. व्यक्तिगत आणि सार्वजनिक स्तरावरही त्यांनी कधी जातपात मानली नाही. त्यांचा हाच विचार पुढच्या पिढीने जोपासला आहे. वडिलांचा सामाजिक, व्यावसायिक, संस्थात्मक कार्याचा वसा जपताना प्रसाद कामत यांनीही सदैव चांगल्या विचारांचे स्वागत केले. माणसामाणसांत भिंती निर्माण करणाऱ्या घटकांना लांब ठेवले.

'विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नसतो, तर तो दोन कुटुंबीयांतील सुंदर विचारांचा मिलाफ असतो. जीवनात विचारसरणी, संस्कार या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आमच्या मनात कधीही जातीपातीचा विचार शिवला नाही. एकमेकांविषयी आदर, परस्परांचा सन्मान आणि चांगले विचार हे महत्त्वाचे आहे. विवाह ठरविताना याच गोष्टींना प्राधान्यक्रम असतो' अशा भावना प्रसाद कामत यांनी व्यक्त केल्या. त्यांचा १९८६ मध्ये तनुजा चौगले यांच्यासोबत आंतरजातीय विवाह झाला. तनुजा या महापालिकेचे माजी आयुक्त सुधाकर चौगले यांची मुलगी. दोघांची घरे आमनेसामने. दोन्ही कुटुंबातील सदस्यांची ओळख होती. ओळखीसोबतच चांगल्या विचाराच्या धाग्यानेच ते आयुष्यभरासाठी एकत्र आले.

तिसऱ्या पिढीने जपला वारसा

कामत कुटुंबीयांने कधीही मुलांवर मते लादली नाहीत. प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य, त्याच्या मतानुसार निर्णय घेण्याचा अधिकार इतकी मोकळीक ठेवली. प्रसाद कामत यांचा मुलगा जय आणि माजी नगरसेवक राजू डकरे व माजी महापौर वैशाली डकरे यांची मुलगी रसिका यांचा गेल्यावर्षी विवाह झाला. दोघेही वेगवेगळ्या कॉलेजमधील. जय हा कॉमर्स शाखेतून पदवीधर तर रसिका ही डी.वाय.पाटील इंजिनीअर कॉलेजची विद्यार्थिनी. दोघेही उच्चशिक्षित, विचारांची आदर करणारी पिढी. या दोघांच्या विवाहामुळे कोल्हापुरातील दोन कुटुंबांत नातीगोती जुळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तर, सुकुमार कांबळे यांना अॅक्शन दाखवू’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वंचित बहुजन आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी प्रक्षोभक वक्तव्य करण्यापूर्वी आपली औकात आणि कुवत पाहून विधाने करावीत. त्यांच्यात ताकत असेल तर त्यांनी पुन्हा कोल्हापुरात येऊन दाखवावे. मग, अॅक्शन काय असते हे समजेल' असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला.

छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात मंगळवारी प्रा. कांबळे यांनी इंगवले यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला उत्तर देताना इंगवले यांनी प्रा. कांबळे यांना इशारा दिला. पत्रकार परिषदेत इंगवले यांनी त्यांना लक्ष्य केले. इंगवले म्हणाले, 'मातोश्री हे शिवसेना कार्यकर्त्यांचे देवघर आहे. मातोश्रीच्या दारात होणारी खासदार ओवेसी यांची सभा रोखायला माझ्यासह हजारो शिवसेनेचे कार्यकर्ते कधीही तयार आहेत. त्याची ओवेसी व त्यांच्या पिलावळीने दखल घ्यावी. कांबळे यांनी जातीय गरळ ओकून सामाजिक वातावरण बिघडवू नये. केवळ स्वार्थासाठी महाराष्ट्राचे राजकारण नवीन संघर्षाच्या वळणावर ठेवू नये.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदपत्रांवरुन ‘सुप्टा’मध्ये वाद उफाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेतील(सुप्टा) अंतर्गत धुसफूस बुधवारी चव्हाट्यावर आली. संस्थेची कागदपत्रे ताब्यात घेण्यावरून सदस्यांची विद्यापीठातील मुख्य कँटीनसमोरच सायंकाळी वादावादी झाली. कागदपत्रे ताब्यात घेण्याच्या प्रकारावरुन काळजीवाहू अध्यक्ष डॉ. भारती पाटील व सचिव डॉ. एन. बी. गायकवाड यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

'सुप्टा'ची कार्यकारिणी २०१७ पासून अस्तित्वात नाही. काळजीवाहू अध्यक्ष डॉ. भारती पाटील, डॉ. पी. एस. पाटील. डॉ. पी. डी. राऊत, डॉ. सागर डेळेकर, डॉ. जी. बी. कोळेकर यांनी बुधवारी सायंकाळी काळजीवाहू सचिव डॉ. एन. बी. गायकवाड यांच्याकडे कार्यालयाची किल्ली, कागदपत्रांसंदर्भात विचारणा केली. गायकवाड यांनी नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत कोणालाही कागदपत्र देणार नसल्याचे सांगितले.

त्यावर डॉ. पाटील यांनी सर्वसाधारण सभेने मला काळजीवाहू अध्यक्ष म्हणून अधिकार दिले आहेत. ऑडिटचे काम पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी कागदपत्रांच्या देवघेवीवरून वाद झाला. डॉ. पाटील व अन्य चार सदस्यांनी कार्यालयात जबरदस्तीने जाऊन कागदपत्रे घेतली आहेत. त्यांचे हे कृत्य नियमबाह्य आहे अशी तक्रार गायकवाड यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे केली. 'गायकवाड यांच्या तक्रारीत कसलेही तथ्य नाही. संघटनेच्या जनरल बॉडीने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही कागदपत्रे घेतली आहेत. आम्ही नियमबाह्य काही केले नाही' असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images