Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उलगडला चलनव्यवस्थेचा इतिहास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

'पैसे म्हणजे काय? धातूचा एक तुकडा कशामुळे इतका मौल्यवान ठरतो? ज्याने वस्तूंची, सार्वजनिक सेवांची तसेच विचारांची देवाण-घेवाण करता येते? सर्वात पहिले नाणी कशी विकसित झाली? नाण्यांवरून इतिहासाची पुनर्रचना करता येते का? नाणी अस्तित्वात अर्थव्यवस्था कोणती होती? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे वस्तूविनिमय ते पतपेढी व्यवस्था या प्रदर्शनातून मिळाली. कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थानावर विद्यार्थ्यांनी 'म्युझियम ऑन व्हील्स'च्या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

मुंबईतील छत्रपती शिवाजी वस्तूसंग्रहालय व सिटी इंडियाच्या संयुक्त विद्यमाने संग्रहालयाचा प्रसार व्हावा या उद्देशाने मांडणी केलेली म्युझियमची बस आज कोल्हापूर वस्तूसंग्रहालयाच्यावतीने राजर्षी शाहू जन्मस्थळावर आणण्यात आली. बसमध्ये मांडलेला भारताच्या पैशाचा इतिहास पाहण्यासाठी कसबा बावडा परिसरातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली. बसचे स्वागत कोल्हापूर वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक अमृत पाटील व शाहू जन्मस्थानचे उप अभिरक्षक उत्तम कांबळे यांनी केले. या फिरत्या वस्तुसंग्रहालयात वस्तूविनिमय ते पतपेढी व्यवस्था म्हणजेच भारतीय चलन व्यवस्थेचा इतिहास मांडण्यात आला आहे. छत्रपती राजाराम हायस्कूल, जीवन कल्याण हायस्कूलसह महापालिकेच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिली. मुंबईच्या वस्तू संग्रहालयातील शिक्षण सहाय्यक कृतिका म्हात्रे, गौरव जाधव, चिन्मय गावडे, सिमरन जॉर्ज यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

मंगळवारी (ता. १२) चित्रकला शिक्षकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन राजर्षी शाहू जन्मस्थळावर केले आहे. शिक्षकांना 'वस्तूसंग्रहालय शिक्षणाचे एक अनौपचारिक माध्यम' या विषयावर लघुपटाद्वारे संग्रहालयाची माहिती देवून बसमधील वस्तूसंग्रहालयही दाखविण्यात येणार आहे. बुधवारी (ता. १३) गारगोटीतील शाहू कुमार भवनात ही बस जाणार आहे. त्यानंतर प्रायव्हेट हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूल कोल्हापूर येथे बस असेल. रविवारी (ता. १७ ) टाउन हॉल येथील कोल्हापूर वस्तू संग्रहालयाच्या दारात बस असेल.

मुंबईतील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय व सिटी इंडियाच्या संयुक्त विद्यमाने म्युझियमची बस राजर्षी शाहू जन्मस्थळावर आणण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती.

फोटो : राहुल मगदूम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राध्यापक-कर्मचाऱ्यांच्या ‘आवाजा’वर लगाम !

$
0
0

विद्यापीठाचा लोगो वापरावा....

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर :

शिवाजी विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनावरुन आता कॅम्पसमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. विद्यापीठ कॅम्पसचा परिसर शांतता झोनमध्ये समाविष्ठ असल्याचे पत्र पुढे करत प्रशासनाने प्राध्यापक व शिक्षकेतर संघटनांना परिसरात घोषणेबाजी केल्यास पोलिस कारवाई होऊ शकते, असे निदर्शनास आणले आहे. प्रशासनाच्या या पत्राला संघटनांनी विरोध केला. तसेच हा आंदोलने व आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला. प्रशासनाने मात्र त्याचा इन्कार करत सरकारी निर्णयाची केवळ माहिती दिली असे म्हटले आहे.

विद्यापीठ प्रशासनाने सात संघटनांकडून घटनेची व पोटनियमांची माहिती मागवली आहे. त्यावर प्रशासनाला संघटनेच्या कार्यकक्षेची आवश्यकता आताच का भासली,असा प्रश्न प्रतिनिधींनी उपस्थित केला. दरम्यान, कुलसचिव विलास नांदवडेकर यांच्या स्वाक्षरीने संघटनांना पत्रे पाठविली आहेत. त्यामध्ये सरकारच्या राजपत्राद्वारे शिवाजी विद्यापीठाचा समावेश शांतता झोनमध्ये समावेश आहे. त्यानुसार राजारामपुरी पोलिस स्टेशनने ऑक्टोबर महिन्यात एमफुक्टो संघटनेच्या प्रतिनिधींना विद्यापीठाच्या इमारतीसमोर तसेच परिसरात घोषणा देण्यास परवानगी नाकारली होती. आणि घोषणा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संघटनेस कळविले होते. हीच बाब आपल्या निदर्शनास आणत असल्याचे म्हटले आहे.

विद्यापीठ कार्यक्षेत्रात कार्यरत प्राचार्य संघटना, शिवाजी विद्यापीठ मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था संघटना, विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटना, विद्यापीठ ऑफीसर्स फोरम, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, विद्यापीठ कर्मचारी संघ, विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघ, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ अशा ११ संघटनांना पत्रे पाठवली आहेत. प्रशासनाच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी सेवक व कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधींनी एकत्र येत आहेत.

विद्यापीठात सध्या प्रशासनाच्या कामकाजाविरोधात आंदोलने सुरू आहेत. सुटा संघटनेने कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या कामकाज पद्धतीला आक्षेप नोंदवले आहेत. शिवाजी विद्यापीठ सेवक संघानेही कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी द्वारसभा, काळ्या फिती लावून आंदोलने केली आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या आवाजाला लगाम घालण्यासाठी प्रशासन खटाटोप असल्याचा आरोप संघटना करत आहेत.

.................

कोट

'शिवाजी विद्यापीठ परिसराचा शांतता झोनमध्ये समावेश आहे, यासंबंधी सगळयांना माहिती व्हावी यासाठी पत्रे पाठवली आहेत. संघटनांच्या आंदोलनाला लगाम घालण्याचा प्रश्नच नाही. संघटनांच्या घटनेची व नियमांची माहिती मागविण्यामागे त्यांच्या कार्यकक्षा कळाव्यात हा प्रशासनाचा शुद्ध हेतू आहे.

डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव

............

'लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. कॅम्पसमध्ये परवानगी नाकारली तर गेटबाहेर सनदशीर मार्गाने आंदोलने चालूच राहतील.

प्रा. सुधाकर मानकर, नेते सुटा संघटना

..............

'विद्यापीठ प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार सुरू आहे. संघटना अनेक वर्षे कार्यरत असताना आताच घटनेची माहिती मागवण्याचे कारण काय ? चर्चा करुन मुदतीत प्रश्नांची सोडवणूक केल्यास आंदोलन करण्याची वेळच येणार नाही.

मिलिंद भोसले, महासचिव, विद्यापीठ कर्मचारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकशाही वाचविण्यासाठी गांधीत्व सिद्ध करावे लागेल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सध्याचे राज्यकर्ते लोकशाहीच्या सगळ्या संस्था उद्ध्वस्त करू पाहत आहेत. धर्म व जातीच्या राजकारणामुळे अस्तित्वाच्या प्रश्नांना बगल दिली जात आहे. झुंडीने हत्या करण्याच्या घटनेने समाजमन सुन्न बनले आहे. अशा कठीण स्थितीत लोकशाही वाचवायची असेल तर सामूहिकपणे गांधीत्व सिद्ध करावे लागेल' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांनी व्यक्त केले. आंतरभारती शिक्षण मंडळ आणि पाटगावकर कुटुंबीयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समारंभात त्यांना 'कुसुम' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. रोख ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात सोमवारी सायंकाळी कार्यक्रम झाला.

सुनीती यांनी भाषणात नर्मदा बचाव आंदोलन, ओरिसातील वेदांत आंदोलन, रायगडमधील सेझ विरोधी आंदोलन अशा वेगवेगळ्या आंदोलनाचे टप्पे आणि त्याच्या यशस्वितेची मांडणी केली. त्या म्हणाल्या, 'प्रत्येक आंदोलनातून यश तर मिळालेच शिवाय 'लडेंगे तो ही जितेंगे आणि लडेंगे नही तो मरेंगे'ची शिकवणही मिळाली. जन आंदोलन राष्ट्रीय समन्वयाच्या गेल्या तीस वर्षातील लोकलढयामुळे समस्त जन आंदोलनाला नवी वाट गवसली. मुळात विविध प्रश्नावरील जन आंदोलनात नागरी समाजाची भूमिका मोठी आहे, तो आणखी वाढायला हवे. जनसहभागाची रणनिती हीच जन आंदोलनाची राजनीती ठरेल.'

अध्यक्षस्थानावरुन राजन गवस म्हणाले, 'बोलाल तर याद राखा अशा आक्रमक प्रवृत्तीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येऊ पाहत आहे. गेल्या साडेचार वर्षात देशामध्ये खोट्या प्रकारचा माहौल तयार झाला आहे. या खोट्या माहौलमध्ये जगताना राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आणि विचारांचे महत्व अधोरेखित होते. राष्ट्र सेवा दलाने संवेदनशील माणूस व्हायला मदत केली. त्या विचार, संस्कारांची आज नितांत आवश्यकता आहे.'

संस्थेचे सचिव एम. एस. पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. तनुजा शिपूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. इंद्रायणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुचिता पडळकर यांनी आभार मानले. व्यासपीठावर आंतरभारती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर, पल्लवी कोरगावकर, संजीव पाटगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्राणपणाने रक्षणाची जबाबदारी

सुनीती सु. र. म्हणाल्या, 'लोक संविधनाच्या चौकटीत राहू इच्छितात. हिंसेने हिंसा वाढते, प्रश्न सुटू शकत नाहीत हे देशाने अनुभवले आहे. सध्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले वाढले आहेत. समाजजीवनात अभिव्यक्ती स्वातंत्र ही मौल्यवान गोष्ट असून त्याचे प्राणपणाने रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. देशातील सध्याच्या 'फॅसिस्ट'वृत्तीचे आक्रमणामुळे लोकशाहीसमोर मोठे आव्हान आहे. त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने व्यक्त होणे गरजेचे आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत बील वसुलीपोटी चार गाळे सील

$
0
0

इचलकरंजी : नगरपालिकेने घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम तीव्र केली आहे. आज थकीत बिल वसुलीपोटी कागवाडे मळा परिसरातील चार गाळे सील केले.

नगरपालिकेच्या कर विभागाकडे घरफाळा बीलापोटी ३१ कोटी रुपये तर पाणीपट्टी बीलापोटी ११ कोटी रुपये असे मिळून सुमारे ५० कोटी रुपयांची मागणी आहे. कर वसुलीसाठी नगरपालिकेतर्फे विविध स्तरावर मोहीम राबविली जात आहे. नगरपालिकेने ५० कोटी रुपयांपैकी २६ कोटी रुपयांपर्यंत म्हणजे सुमारे ५१ टक्के वसुली केली आहे. आर्थिक वर्षअखेर होण्यासाठी केवळ दोन महिने उरले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी वसली मोहीम तीव्र केली आहे. कागवाडे मळ्यामध्ये १ लाख २ हजार ५१० रुपयांच्या थकीत वसुलीसाठी पालिकेने चार दुकानगाळे सील केले. कारवाईमध्ये अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, कर विभागाचे अनिस पठाण, बापू मुल्ला, संजय भोसले, संजय पाटील, सुरेश जाधव, युवराज चव्हाण, राम तडाखे, भरत लाखे, तुळशीदास मुसळे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरः विठूरायाच्या दागिन्यांचे होणार लेखपरीक्षण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

विठूरायाच्या खजिन्यात शेकडो वर्षांपासून दान करण्यात आलेल्या आणि अब्जावधी किमतीच्या दागिन्यांचे लेख परीक्षण करण्याचा निर्णय सोमवारी मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सर्व दागिने चिरकाल टिकण्यासाठी त्यांच्यावर खास पद्धतीची प्रक्रिया केली जाणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीत सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नियुक्त करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे.

देवाच्या खजिन्यात शेकडो वर्षांपासून अतिशय मौल्यवान पारंपरिक दागिन्यांचा समावेश आहे. या सर्व अनमोल दागिन्यांच्या योग्य पद्धतीने नोंदी आणि लेखा परीक्षणाचे काम आजवर झाले नसल्याने हे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे. पुरातन दागिन्यांचे अभ्यासक आणि इतर संस्थांची मदत घेऊन या दागिन्यांचे डिजिटलायझेशन केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक अनमोल दागिन्यांचा इतिहास, रचना, त्यातील हिरे, माणिक मोत्यांच्या विवरणासह फोटोसह मंदिराकडे उपलब्ध होणार आहे.

देवाला भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू एकत्रित करून त्यांच्या विटा बनविण्याबाबतही निर्णय हीच उपसमिती घेणार आहे. यामुळे गेली अठ्ठावीस युगे पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभा असणाऱ्या विठूरायाच्या खजिन्यात आता भक्तांनी अर्पण केलेले सोने वितळवून सोन्या-चांदीच्या विटा येणार आहेत. भक्ताकडून आलेली प्रत्येक सोन्या चांदीच्या भेट वस्तू मंदिर समिती देवाच्या खजिन्यात नोंद करून जमा करीत असते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या हजारो वस्तू सांभाळणे मंदिर समितीसाठी जिकिरीचे बनू लागले आहे. देवाच्या खजिन्यात भेट आलेल्या सोन्याच्या २५ किलो आणि चांदीच्या ८३० किलो वस्तू आता रिजर्व बँकेच्या गोल्ड रिफायनरीमध्ये वितळवून त्याच्या विटा बनविण्यात येणार आहेत. यामुळे मंदिर समितीची डोकेदुखी कमी होणार असून, त्याच्या व्याजातून मंदिराला चांगले उत्पन्न देखील मिळण्यास सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Unseasonal Rain: मंगळवेढा: अवकाळी पावसानं द्राक्ष बागांचे नुकसान

$
0
0

पंढरपूर:

मंगळवेढा तालुक्यात काल रात्री अवकाळी पावसानं थैमान घातलं. त्यामुळं द्राक्ष बागांना फटका बसला असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी, मारोळी, शिरनांदगी, रड्डे, हुन्नुर परिसरात काल सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. सध्या द्राक्षांची अनेक ठिकाणी तोडणी सुरू झाली असताना, अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे घड पडून आणि मणी फुटून मोठे नुकसान झाले. मंगळवेढा तालुका दुष्काळी असताना शेतकऱ्यांनी टॅंकर आणि कुपनलिकेतील पाण्यावर बागा जगवल्या होत्या. मात्र, अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. द्राक्षासोबत डाळिंब आणि ज्वारीच्या पिकालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इमारत मूल्यांकनाला महिन्याचा कालावधी

$
0
0

लोगो : महानगरपालिका

कोल्हापूर टाइम्स टीम

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते विकास प्रकल्पाची रक्कम आयआरबी कंपनीस देण्यास मान्यता दिल्यानंतर कंपनीला टेंबालाईवाडी येथील दिलेल्या जागेचे व इमारतीचे मूल्यांकन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रकल्प विभागाने सोमवारी इस्टेट विभागाला मूल्यांकनासाठी पत्र दिले. आज पत्र मिळाल्यामुळे मूल्यांकन करण्यास एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जागा व इमारत ताब्यात घेण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शहरांतर्गत रस्त्यांची बांधणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ४९ किमीचा रस्ते विकास प्रकल्प राबवला. त्यासाठी आयआरबी कंपनीची नेमणूक केली. २२० कोटीच्या प्रकल्प खर्चातील तूट भरून काढण्यासाठी टेंबलाईवाडी येथील ३० हजार चौरस मीटर जागा ९९ वर्षांच्या कराराने कंपनीला दिली. कंपनीने आर्यन हॉस्पिटॅलिटी सोबत करार करुन अलिशान हॉटेल उभारणीस सुरुवात केली. सद्य:स्थितीत बांधकाम पूर्णत्वाकडे जात असतानाच राज्य सरकारने कंपनीला प्रकल्प खर्चाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ४७३ कोटी ३७ लाखाची तरतूद केली.

प्रकल्प खर्चाच्या रकमेला मंजुरी देताना कंपनीला दिलेली जागा व इमारत ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. २०१६ मध्ये मूल्यांकन समितीने जागा व इमारतीचे ७५ कोटीचे मूल्यांकन केले होते. दोन वर्षानंतर यामध्ये वाढ होणार असल्याने नव्याने मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याबाबतचे पत्र प्रकल्प विभागाने सोमवारी इस्टेट विभागाला दिले. सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागा व इमारत महापालिकेच्या ताब्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगारासाठी कर्मचारी जि.प.च्या दारात

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या इमारतीत साफसफाईच्या कामाचा ठेका दुसऱ्या ठेकेदाराकडे गेला. त्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची कमी पगारात नियुक्ती केली. यामुळे गेली पंधरा वर्षे साफसफाईचे काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांचा रोजगार बुडाला आहे. पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे व किमान वेतन मिळावे यासाठी हे कर्मचारी जिल्हा परिषदेच्या दारात दिवसभर बसून आहेत.

नवीन ठेकेदाराने पाच हजार वेतनावर काम करण्याचे सुचविले. मात्र या कर्मचाऱ्यांनी पूर्वीच्या ठेकेदाराप्रमाणे किमान वेतन द्यावे, अशी मागणी केली. आणि पाच हजारावर काम करण्यास नकार दिला. जिल्हा परिषद सदस्य व अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. निवेदने सादर केली. करवीर कामगार संघांच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रश्नी पाठपुरावा केला. मात्र त्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न काही सुटला नाही. आरती धनवडे, अनिता सूर्यवंशी, शीला काळे, जैनतबी नायकवडी, संगीता खाबडे, दीपाली गवळी, संजय कुरणे, अभिजित पंडत यांना एक फेब्रुवारीपासून रोजगारासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे त्यांनी दाद मागितली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एमबीए सीईटीसाठी नोंदणी मुदत १५ पर्यंत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमासाठी नऊ आणि दहा मार्च रोजी सीईटी (प्रवेश परीक्षा) होणार असून या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा देणे गरजेचे आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे अर्ज भरावेत, असे आवाहन केआयटीज आयएमईआर संचालक डॉ. सुजय खाडिलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खाडिलकर म्हणाले, 'शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात १३ कॉलेजमध्ये एमबीए शिकण्याची सुविधा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाची सोय सहा कॉलेजमध्ये आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी यंदापासून मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स, फायनान्स, ऑपरेशन, सिस्टिम्स, इंटरनॅशनल बिझिनेस, हॉस्पिटॅलिटी या विविध विषयापैकी दोन विषय घेऊन एमबीए करू शकतात. या वर्षांपासून एमबीएच्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिके आणि चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम सुरू होणार आहे.'

कुठल्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी एमबीए अभ्यासक्रम शिकू शकतो. तत्पुर्वी त्याला सीईटी द्यावी लागते. पदवीच्या तृतीय वर्षात शिकणारे विद्यार्थीही सीईटीला बसू शकतात. सीईटी दिली तरच सरकारकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या सवलतींसाठी विद्यार्थी पात्र ठरू शकतात. एमबीएच्या अभ्यासक्रमासाठी तंत्र शिक्षण विभागातर्फे सीईटीचे आयोजन केले जाते. या परीक्षेसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत www.mahacet.org या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करावी. अभ्यासक्रम शिकवणाऱ्या कॉलेजमध्ये ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया मोफत आहे. यावेळी डॉ. प्रवीण जाधव व सायबरमधील प्रा. मधुरा माने उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मुदतवाढ

$
0
0

कोल्हापूर: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 'जनरेटेड प्रायोरिटी लिस्ट'मध्ये (जीपीएल) समावेश नसणाऱ्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाचा तपशील 'आवास प्लस'या मोबाइल अॅपद्वारे नोंद करण्यासाठी सात मार्च २०१९ पर्यंत मुदवाढ दिली आहे. सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यास आचारसंहितेच्या तारखेपर्यंतच मुदत राहणार आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाच्या नोंदणी करणे शिल्लक आहे, त्यांनी आवास प्लस अॅपद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाजाप्रती कृतज्ञ असले पाहिजे’

$
0
0

'समाजाप्रती कृतज्ञ असले पाहिजे'

कराड :

'प्रत्येक व्यक्तीकडे देण्यासारखे काही तरी असते. ज्याला जमेल तसे वस्तू, वेळ,पै सा आणि श्रम यांचे योगदान करीत समाजाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. तरच घडणारा समाज भावी पिढीसाठी पुढे योगदान देईल,' असे प्रतिपादन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

पाटील यांच्या ७८व्या वाढदिवसा निमित्त पुणे येथील एस. बालन समूह व परिवर्तन संस्था यांच्या वतीने गांधीटेकडी (ता. पाटण)येथील ठक्करबाप्पा विद्यालयातील विद्यार्थ्यांना ८० सायकली, १०० स्कूल बॅग व कराड, पाटण तालुक्यातील १० शाळांना सगंणक भेट देण्यात आले. या वेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, एस बालन उद्योग समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अभिजीत घुले-पाटील, राष्ट्रवादी आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील उपस्थितीत होते.

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, 'वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या सायकली, संगणकांतून समाज घडणार आहे. नव्या पिढीसाठी हे प्रोत्साहन असून, त्यासाठी आपण आपली जबाबदारी उचलली पाहिजे.' पुनीत बालन म्हणाले, 'श्रीनिवास पाटील साहेबांचे प्रशासकीय, राजकीय, सामाजिक कार्य मोठे आहे. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. त्यांचे दातृत्व मोठे असून, त्यांनी आपल्या जीवन प्रवासात वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना आदर्श मानून प्रेरणा घ्यावी. '

ओळी

मुलांना सायकल वाटप करताना श्रीनिवास पाटील व अन्य.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवेढ्याला अवकाळीचा फटका

$
0
0

द्राक्षबागा, डाळींब, ज्वारीचे मोठे नुकसान

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

मंगळवेढा परिसरात सोमवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी, मारोळी, शिरनांदगी, रड्डे, हुन्नुर परिसरात सोमवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यानंतर रात्री उशीरा सुरू झालेल्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

परिसरात सध्या अनेक ठिकाणी द्राक्षांची तोडणी सुरू आहे. अवकाळीमुळे द्राक्षांचे घड आणि मणी फुटून मोठे नुकसान झाले आहे. मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी टॅँकर आणि बोअरच्या पाण्यावर बागा जगवल्या आहेत. मात्र, फळ हाताला आल्यावर निसर्गाच्या दणक्याने परिसरातील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. द्राक्षासोबत डाळिंब आणि उरलेल्या थोडीफार ज्वारीच्या पिकानाही या अवकाळीचा फटका बसला आहे.

अवकाळीने दुष्काळी भागातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत न दिल्यास आता मरणाची वाट धरावी लागेल. कर्जे काढुन टॅँकरने पाणी देत बागा जगवल्या मात्र, पावसाने लाखो रुपयांची द्राक्षे मातीमोल झाली आहेत, अशी माहिती शिरनांदगी येथील शेतकरी गुलाब थोरबोले यांनी दिली आहे.

पंढरपुरातही पाऊस

सोमवारी रात्री पंढरपूर शहर परिसरातही अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी द्राक्ष, डाळींबावर फवारण्या सुरूरु केल्या आहेत. अवकाळी पाऊस झाल्यास किंवा ढगाळ हवामान कायम राहिल्यास द्राक्षबागांचे नुकसान होण्याची भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाचे राजकारण करू नकाः आदित्य ठाकरे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'कोणत्याही राजकीय पक्षाने दुष्काळाचे राजकारण करू नये. दुष्काळने खचून न जाता आलेल्या परिस्थितीचा सामना केला पोहिजे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत. शिवसेना कायम बळीराजाच्या पाठीशी ठाम उभी राहणार आहे, ' अशी ग्वाही युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरेंनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. जनावरांसाठी चारा आणि पाण्याच्या टाक्यांचे वाटपही केले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी दौऱ्याचे नियोजन केले होते.

आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील काम रखडलेल्या पोखरापूर तलावाची पाहणी केली. त्या नंतर त्यांनी सारोळे या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी चारा आणि नागरिकांना पिण्यासाठी पाण्याच्या टाक्यांचे वाटप केले. आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांसमवेत बसून दुष्काळाबाबत चर्चा केली. आदित्य ठाकरे जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले,'दुष्काळाची भीषण परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. नागपूर, परभणी, हिंगोली, लातूरचा दौरा केला. सर्वत्र पशुखाद्य, चारा आणि पाण्याची टंचाई जाणवत आहे. पावसाने दांडी मारल्याने पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न सर्वत्र सतावत आहे. दुष्काळचे राजकारण करीत बसण्यापेक्षा शिवसेनेने दुष्काळ कितीही भयानक असला तरी शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा केवळ पाहणी दौरा नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे चारा आणि पाण्याच्या टाक्या देऊन मदत करण्यासाटी मी आलो आहे. कितीही मदत दिली तरी कमीच पडणार आहे. परंतु मदतीची सुरुवात आजपासून करीत आहे. गावोगावी टाक्या बसविण्यात येणार आहेत. पाऊस पडेपर्यंत या टाक्यांमध्ये शिवसेना टँकरने भरेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

धामोड (ता. राधानगरी) वन विभागातील विभागाचे कर्मचारी वसंत खाडे यांचा उच्च रक्तदाबने मृत्यू झाला. अचानक कामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. वसंत सदाशिव खाडे, शिवाजी कांबळे, भिवा यादव हे कर्मचारी कांबळवाडी, धामोड परिसरातील विस्तारित जंगलात गस्त घालताना अचानक खाडे यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना ताबडतोब सोळंकूर येथील आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरानी खाडे यांना मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळ्याच्या पायथ्याशी तीन गव्यांचे दर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या आपटी, मंगळवारपेठ या गावांमध्ये मंगळवारी सकाळी पूर्ण वाढ झालेल्या तीन गव्यांचे दर्शन झाले. गावात आलेल्या या गव्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पहाटे दिसलेले हे गवे कळपातून भरकटले आहेत. त्यामुळे त्यांनी मंगळवारपेठेच्या पिछाडीस असलेल्या महाजन यांच्या परसामध्ये दिवसभर तळ ठोकला होता. वनविभागाचे कर्मचारी गव्यांवर दिवसभर लक्ष ठेवून बसले होते.

मंगळवार पेठेतील नम्रता हावळ मंगळवारी पहाटे घराच्या पाठीमागे गेल्या असता त्यांना परसात गवा बसल्याचा आढळला. पहाटेची वेळ असल्याने थोडा अंधार होता, त्यामुळे त्यांना कुणाची तरी म्हैस सुटून आली असावी असे समजून त्यांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अॅड. माणिक डवंग यांनीहीसुद्धा गवे पाहिले. लोकांची गर्दी जमल्यानंतर गवे मंगळवारपेठेच्या खालील बाजूस नेबापूर शिवाराच्या दिशेने गेले व तेथेच असलेल्या महाजन यांच्या परसात दिवसभर बसले. या गाव्यांमध्ये एका वयस्कर गव्याचा समावेश असल्याने तो जास्त पळू शकत नव्हता. गाव्यांनी नागरी वस्तीजवळच तळ ठोकल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक दिवसभर या ठिकाणी थांबून नागरिकांना त्या भागात जाण्यापासून परावृत्त करत होते. या पथकात राजेश चौगले, के. बी. बादरे, रंगराव उदाळे सहभागी होते. दरम्यान या परिसरात नऊ ते दहा गव्यांचा कळप वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे झाले. या सात दिवसीय निवासी शिबिरात आरोग्यविषयक माहितीचे संकलन, सामाजिक विषयावर आधारित पथनाट्याचे सादरीकरण केले.

जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, बाजार समिती संचालक कृष्णात पाटील, सरपंच स्वाती पाटील यांनी शिबिरातील कार्याचे कौतुक केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांनी कॉलेजच्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी के. आर. पाटील यांचे 'सुसंस्कार काळाची गरज' या विषयावर व्याख्यान झाले. विद्यार्थी नीलेश चौंडे यांनी शिबिरातील अनुभव सांगितले. उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया, प्रा. आर. आर. जरग यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. व्ही. टी. पवार यांनी प्रास्ताविक केले. सचिन गोरड यांनी सूत्रसंचालन केले. महावीर जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर काँग्रेसबरोबर चर्चेची तयारीः प्रकाश आंबेडकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा माझी दुसरी सभा होण्यापूर्वी काँग्रेसने दिल्यास सध्या लोकसभा निवडणुकीसाठी घोषित केलेल्या जागांशिवाय इतर मतदार संघांबाबत अजूनही चर्चेची तयारी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी राज्यातील जितके काँग्रेसचे नेते आहेत, ते सर्व भाजपसमोर म्याऊ आहेत. त्यांचा कधीच वाघ होऊ शकत नाही, अशी कडवट टीकाही केली.

मंगळवारी शिवाजी स्टेडियमवर वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही उमेदवारांची घोषणाही केली. मेळाव्यास प्रचंड गर्दी झाली होती.

अॅड. आंबेडकर म्हणाले, 'सत्तेत आल्यानंतर २०२४ मध्ये संविधान बदलले जाईल असे आरएसएसच्यावतीने सांगण्यात येत असल्याने आता काँग्रेसने आरएसएसबाबतची भूमिका स्पष्ट करावी. मुळात आम्ही जागा मागितल्या नाहीत. ज्या जागा काँग्रेस तीनवेळा हरली आणि जिथे उमेदवार नाहीत अशा १२ जागा द्या असे सांगितले आहे. त्यांच्या विरोधामुळे ओवेसींनी बाजूला होण्याची भूमिका घेतली. आता काँग्रेसने निर्णय घ्यायचा आहे. पण त्यांचे ढोंग न ओळखण्याइतपत आम्ही दूधखुळे नाही. त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती तर कदाचित देशात १०० जागांवर विजय मिळवता आला असता. भविष्यात त्यांना किती जागा मिळणार आहेत हे माहिती नाही. पण आम्ही जाहीर केलेल्या जागांवर आता तडजोड नाही.'

ते पुढे म्हणाले, 'निवडणुकीसाठी चर्चा करताना तुमचे नेते डागळलेले आहेत. ते जपून बोलत असतात. त्यांची बोलण्याची ऐपत नाही. जेलमध्ये प्रथम चिदंबरम की आणखी कोण नेता जाणार हे माहिती नाही. त्यामुळे त्यांचे राज्यातील सगळे नेते भाजपसमोर म्याऊ आहेत. ते वाघ बनले की समुद्रकिनाऱ्यावरील इमारतीचे प्रकरण बाहेर पडेल. आम्ही स्वच्छ चारित्र्याचे आहोत. त्यामुळे आमच्यासमोर पंतप्रधान मोदीही उभे राहू शकणार नाहीत.'

उमेदवारीच्या घोषणा

सहदेव आयवळे (सातारा), अॅड. विजय मोरे (माढा), जयसिंग शेंडगे (सांगली), नवनाथ पडळकर (बारामती), विठ्ठल सातव (पुणे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाइपलाइनच्या कामाची सीबीआय चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काळम्मावाडीतून थेट पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याच्या योजनेत सुमारे शंभर कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याने श्वेतपत्रिका काढण्यास विलंब केला जात आहे. योजनेचे काम दुसऱ्याच व्यक्तीने घेतले असून जेकेसी कंपनी नावापुरती आहे. भ्रष्टाचारातील खरा सूर्याजी पिसाळ कोण? याचा शोध घेण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे. त्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक उपोषणाला बसतील' अशा इशारा नगरसेवक सुनील कदम यांनी पत्रकार बैठकीत दिला.

नगरसेवक कदम म्हणाले, 'योजनेला दिरंगाई होत असल्याने, १२५ कोटींचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर पडणार आहे. योजनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी यापूर्वी झालेल्या सभेत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौरांनी आदेशही दिले. पण योजनेतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी श्वेतपत्रिका न काढता आघाडीच्या नगरसेवकांचा आवाज दाबला जात आहे. पाइपलाइन योजनेचे ९० टक्के काम निकृष्ट दर्जाचे झाले असून सुमारे शंभर कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी दोन कोटी रुपये देवून जेकीसी कंपनीची निवड केली. पण कंपनीमागे वेगळाच चेहरा असून त्याचा शोध घेण्यासाठी माहिती अधिकारीचा वापर केला आहे.'

नगरसेवक सत्यजित कदम म्हणाले, 'योजनेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे. पाइपलाइनसाठीची खोदाई, पाइपलाइन टाकणे व केटीवेअर या कामांची रक्कम ठेकेदराने यापूर्वीच उचलली आहे. संपूर्ण योजनेची माहिती घेऊन न्यायालयात दाद मागण्यासाठी माहिती अधिकार कायद्यान्वये १६ ते १७ अर्ज दिले आहेत. बोगस योजना शहरवासियांच्या माथी मारू नये यासाठी आवाज उठवत आहे.'

गटनेते विजय सूर्यवंशी यांनी योजनेत संगनमताने भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला. तर 'सभेच्या वेळेबाबत सत्ताधारी आघाडीला गांभीर्य नाही' असा आरोप किरण नकाते यांनी केला.

विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेवक अजित ठाणेकर, आशीष ढवळे, विजयसिंह खाडे-पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराराणी चौकात पाण्यासाठी रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोणार वसाहत परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ ताराराणी चौकात मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर घागर मोर्चा काढून उपजल अभियंत्यांना घेराओ घातला. आंदोलनात सुमारे २०० नागरिक सहभागी झाले होते.

लोणार वसाहत परिसरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथील नागरिकांनी याबाबत महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिली. मात्र प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी संतप्त महिला रिकाम्या पाण्याच्या घागरी घेऊन ताराराणी चौकात दाखल झाल्या. प्रशासनाविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. पाण्यासाठी आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यानंतर महिलांनी कावळा नाका येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर घागर मोर्चा काढून उपजल अभियंत्यांना घेराओ घातला. लोणार वसाहत परिसरातील पाण्याची तांत्रिक अडचण दूर करून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवहन सभापती निवड सोमवारी

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक सोमवारी (ता. १८) सकाळी ११.३० वाजता होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ तथा पिठासन अधिकारी अमन मित्तल काम पाहणार आहेत. सभापती निवडीसाठी शुक्रवारी (ता. १५) दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. राहुल चव्हाण यांनी परिवहन सभापतीपद व सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर मंगळवारी झालेल्या सभेत अभिजित चव्हाण यांची निवड करण्यात आली. चव्हाण यांच्याबरोबर सभेत स्थायी सदस्यपदी दीपा मगदूम व सचिन पाटील यांची निवड केली. परिवहन सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केल्यानंतर उमेदवारी अर्ज, निवडीची तारीख आणि वेळ मंगळवारी निश्चित केली. त्यानुसार सोमवारी सभापती निवड होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images