Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गृह खरेदीला तंत्रज्ञानाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराचा विकास झपाट्याने होत असताना अनेकजण घराचे स्वप्न पाहतात. प्लॉट, फ्लॅट, रो-हाऊससोबत अनेकजण प्रशस्त बंगलोसाठी पसंती देतात. ग्राहकांच्या मनातील घराची सुप्त इच्छा शाहूपुरी येथे आयोजित केलेल्या 'क्रिडाई दालन २०१९' प्रदर्शनामधून पूर्ण होत आहे. स्वप्नातील घर पाहण्यासाठीच्या या प्रदर्शनाला नवतंत्रज्ञानाचीही जोड दिली आहे. त्यामुळे शनिवारी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नैसर्गिक साधन सपन्नता, मुबलक पाणी आणि मिळणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे कोल्हापूरात घर असावे असे स्वप्न अनेकजण पाहतात. मुंबई, पुण्यानंतर अनेकजण स्वप्नातील घरासाठी कोल्हापूरला पसंती देतात. यामुळे शहराचा विस्तार वेगाने होत असून बांधकाम व्यावसायिकांच्यामुळे विकासाला चालना मिळाली. त्यामध्ये येथील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या क्रिडाईचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिला आहे. या संस्थेच्या माध्यमातून दर तीन वर्षांनी 'दालन'च्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील बदलत्या तंत्रासोबत आकर्षक फ्लॅटची उपलब्धता करुन दिली जाते.

अद्ययावत अशा तंत्राने परिपूर्ण असे आधुनिक वास्तू व बांधकाम विषयक माहितीचे सुमारे १६० स्टॉल्स प्रदर्शनात आहेत. बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक मिक्सर, बार कटिंग, व्हायब्रेटर, मिक्सर वीथ लीफ्ट अशा साहित्यांची येथे आकर्षक पद्धतीने मांडणी केली आहे. स्वप्नातील फ्लॅट खरेदीनंतर हॉलमधील सजावटीला प्राधान्य देऊन येथे फर्निचर, सोफासेटसह इंटिरिअरची माहिती ग्राहक घेत आहेत. शहर आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांची त्यामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांसह प्रेझेंटेशन करण्यात आले आहे. पूर्वी या कमात प्लायउडचा वपार होत होता. आता प्लास्टिकपासून बनवलेल्या दारे, चौकटी, खिडक्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेषत: बाथरुममधील बदललेल्या साहित्यांची मांडणी प्रदर्शनात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनेक प्रकल्पांची येथे विस्तृत मांडणी येथे केली आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

सायंकाळच्या सत्रात बांधकाम व्यवसायातील बदलांचा सेमिनारच्या माध्यमातून आढवा घेतला. बी. जी. शिर्के कंपनीचे सिनिअर जनरल मॅनेजर सी. एम. अडसर, शशीकांत किल्लेदार-पाटील यांनी मार्गदर्शन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनीही मार्गदर्शन केले.

पर्यावरणाचा संदेश

फ्लॅट, प्लॉटची माहिती देताना अनेक बांधकाम व्यावसयिक पर्यावरणपूरक प्रकल्पांला प्राधान्य देत असल्याचे सांगत आहेत. शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखणारे प्रकल्प खरेदीदारांना आकर्षित करत आहेत. दालनच्या प्रवेशद्वारावर पर्यावरणाचा संदेश दिला जात आहे. आकर्षक फुले, झाडांची सजावट केली असून नर्सरीच्या माध्यमातून शोभिवंत रोपांची मांडणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोहिते-पाटील, सोपल, परिचारक, ढोबळेंसह ३९ जणांवर ठपका

$
0
0

मोहिते-पाटील, सोपल, परिचारक, ढोबळेंसह ३९ जणांवर ठपका

सोलापूर

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँक बरखास्त झाल्यानंतर बँकेतील गैरव्यवहाराची नेमकी स्थिती समजून घेण्यासाठी चाचणी लेखापरीक्षण (टेस्ट ऑडिट) करून घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी तयार झाला आहे. अहवालात १९९२पासून केलेल्या कर्जवाटपाची यादीच जोडली आहे. संबंधित ८१ जणांना म्हणणे देण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. शिवाय कर्जे घेऊनही थकीत राहिलेल्या ५४ सहकारी संस्थांच्या ५४८ संचालकांनाही नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती लेखापरीक्षक पिंगळे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडकरींची मला काळजी वाटतेः पवार

$
0
0

म. टा. वृत्तसवा, पंढरपूर

'नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी सुरू झाली, ही आनंदाची गोष्ट आहे. गडकरी माझे चांगले मित्र असल्याने आता मला त्यांची काळजी वाटू लागली आहे,' अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

शेकाप व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शनिवारी सांगोल्यात दुष्काळी परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी शेकाप नेते एन. डी. पाटील, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'राज्यात लोकसभेसाठी महाआघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण, राज ठाकरे यांच्यासोबत निवडणूक एकत्र लढण्याबाबत अद्याप चर्चाच झाली नाही. राज्यातील ४८ पैकी ४४ जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. जागा वाढवून घेण्यासाठी अडवणूक होत असली तरी याचा निर्णय दोन्ही कॉंग्रेसचे राज्यातील नेते करतील.' दरम्यान, माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह शेकापच्या सर्व नेत्यांनी पवार यांना माढ्यातून लढण्याचा आग्रह धरला. त्या बाबत बोलताना पवार म्हणाले, भाजपला माझ्या प्रकृतीची काळजी वाटू लागली आहे. पण, त्यांनी आता त्यांच्या पक्षाची काळजी करावी. मी माझी तब्येत सांभाळायला खंबीर आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे जनता हैराण

दुष्काळामुळे प्यायला पाणी नाही, पिके जळून गेली आहेत, ना चारा, ना छवण्या. रोजगार हमीची कामे सुरू नाहीत, अशी स्थिती असताना सरकार मात्र घोषणांचा पाऊस पाडत आहे. आता सरकारने तातडीने मदत न केल्यास टोकाचे पाऊल उचलावे, लागेल असा इशारा शरद पवार यांनी दिला. गेल्या अनेक दुष्काळांत आघाडी सरकारने भरभरून मदत दिली होती, असेही पवार म्हणाले. 'गेल्या ७० वर्षांत कधीही रब्बी पिकांना पावसाने दगा दिला नव्हता. मात्र, यंदाची परिस्थिती खूप गंभीर आहे. सरकारने तातडीने मदत केली पाहिजे,' अशी मागणी गणपतराव देशमुख यांनी केली. मात्र, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आणि खासदार विजयसिंह मोहिते यांनी माढ्यातून शरद पवार यांनी उभारावे, असा आग्रह धरीत परिषदेचा रोखच बदलून टाकला. त्या नंतर बोलण्यासाठी आलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांनीही त्याचीच री ओढत मेळाव्याला राजकीय रंग दिला. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी व्हीलचेअरवर बसून भाषण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाश आंबेडकरांनी सत्तेचे स्वप्न पाहू नयेः रामदास आठवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'सत्तेची स्वप्न पाहताना राजकारणाची हवा कोणत्या बाजूने सुरू आहे, ते पाहून निर्णय घेतला पाहिजे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्याने मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. परंतु, सत्ता कशी मिळवावी, हे त्यांनी माझ्याकडून शिकावे,' असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. शनिवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आठवले म्हणाले, 'प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे स्वप्न पाहू नये. मागासवर्गीय मतांचे विभाजन होणार असल्याने त्याचा फायदा भाजप-शिवसेनेला होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या वंचित आघाडीत सर्व जातीच्या नेत्यांना सामावून घेतले असले तरी २००९च्या माझ्या अनुभवानुसार डोक्यात हवा व पैसा असणारे लोकच वंचित आघाडीकडे जातील. त्यामुळे या आघाडीला राज्यात फारसे यश मिळणार नाही. मी रिडलोसचा प्रयोग केला होता. त्या वेळी १११जागेवर निवडणूक लढवून एकही जागा जिंकता आली नाही.'

मी प्रकाश आंबेडकर याच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यास तयार आहे, पण सत्तेची स्वप्ने पाहताना राजकारणाची हवा कोणत्या बाजूने सुरू आहे, ते पाहून निर्णय घेतला पाहिजे. त्यांनीच आता भाजप-शिवसेनेसोबत यावे, असेही आठवले म्हणाले.

भाजप-शिवसेना एकत्र येतील

भाजप आणि शिवसेना एकत्र यावेत, ही सर्वांचीच इच्छा आहे. मी रिपाईसाठी सोलापूर, रामटेक आणि मुंबईची जागा मागितली आहे. सेना आणि भाजप एकत्र न आल्यास ३ ते ४ जागा मागू, एकत्र न आल्यास आपणास दोन जागा मिळतील. १९९८साली मी दादर मतदार संघातून निवडून आलो होतो. हा मतदारसंघ मला सोडण्याची मागणी करणार आहे. महाराष्ट्रात भाजप- सेना-रिपाई एकत्र आल्यास एकूण ४३ जागा निवडून येतील, असा ठाम विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या खूनप्रकरणी वडिलांना अटक

$
0
0

मुलीच्या खूनप्रकरणी वडिलांना अटक

कराड :

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील करपेवाडी गावच्या हद्दीत उसाच्या शेतात भाग्यश्री उर्फ सोनू संतोष माने या सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घून हत्या झाल्याची घटना मंगळवारी, २२ जानेवारीला उघड झाली होती. या प्रकरणी भाग्यश्रीचे वडील संतोष माने यांनाच पोलिसांनी अटक केली आहे. हा खून अंधश्रद्धेतून झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या बाबत एका मांत्रिकाचीही चौकशी सुरू आहे.

करपेवाडी-तळमावले या गावच्या हद्दीतील देसाई शेत शिवारालगतच्या एका उसाच्या शेतामध्ये अज्ञाताने गळा चिरून भाग्यश्री मानेचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. तपासादरम्यान ढेबेवाडी पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागले होते. पोलिसांनी तिच्या वडिलांना ताब्यात अटक केली आहे. भाग्यश्रीचा खून हा अंधश्रद्धेतून झाला असल्याच्या संशय असून पोलिस मांत्रिकाची चौकशी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका क्षेत्रातील अनेक मिळकतदारांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही. त्यामुळे त्यांना केवळ सात-बारा उतारा नोंद असल्याने दुहेरी कर भरावा लागत आहे. याबाबतचे निवेदन आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. निवेदनानंतर मुख्यमंत्र्यांनी शहरातील सर्व मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नगरविकास विभागाच्या सचिवांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याबाबत आमदार महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे, 'शहरातील महापालिका क्षेत्रातील भागाचे नागरिकरण झाले आहे. मात्र सर्व भागांचे नगर

भूमापन झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना अद्याप त्यांचा मिळकतींचा केवळ सात-बारा उतारा मिळत आहे. त्यामुळे मिळकतदारांना दुहेरी कर भरावा लागत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नगरभूपान होऊन प्रॉपर्टी कार्ड देण्याची आवश्यकता आहे. नागरिकांच्या या समस्येबाबत आमदार महाडिक यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आदेश दिले. त्यानुसार १५ जानेवारी रोजी नगरविकास विभागाचे अवर सचिवांनी निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी व आयुक्तांना दिले आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टफ’ व्याज सवलतीचे १४७ कोटी मंजूरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

केंद्र सरकारच्या टफ योजनेशी निगडित नवीन वस्त्रोद्योग प्रकल्पांना व्याजाची सवलत देण्यासाठी राज्य सरकारने ५४६ उद्योग घटकांना १४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तो वितरित करण्यास मान्यता दिल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.

वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ अंतर्गत केंद्र सरकारच्या टफ योजनेचा लाभ घेतलेल्या वस्त्रोद्योगातील घटकांना राज्य सरकारचा वाटा देण्याचा विषय दीर्घकाळापासून प्रलंबित होता. याबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांनी वेळोवेळी वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पाच लाख रुपये व त्यापेक्षा कमी रकमेचे व्याज अनुदान यापूर्वीच वितरित केले आहे, तर पाच लाखांपेक्षा अधिक व्याज अनुदानाची रक्कम वितरित करण्यास यापूर्वीच मंजुरी दिली होती. मात्र, निधीअभावी ते वितरित करण्याचे काम प्रलंबित राहिले होते. अनुदान वितरित केल्यामुळे राज्यभरातील वस्त्रोद्योजकांचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागला आहे. तसेच या योजनेतील प्रलंबित अनुदान आगामी अर्थसंकल्पात तरतूद करून लवकरच वितरित केले जाणार असून, वस्त्रोद्योगाच्या विकासास गती येणार असल्याचे आमदार हाळवणकर यांनी म्हटले आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडताळणीअभावी बुडाला कोट्यवधीचा घरफाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील सर्व मिळकतींना घरफाळा लागू करण्यासाठी महापालिकेने खासगी कंपनीला सर्वेक्षणाचे काम दिले. या कंपनीने गेल्या तीन वर्षात ८ हजार ६२७ मिळकती शोधल्या. मात्र ज्या-त्या वेळी या इमारतींची पडताळणी न झाल्याने आणि पडताळणीची यंत्रणाच नसल्याने कोट्यवधींच्या मिळकत करावर पाणी सोडावे लागले आहे. मात्र, कंपनीच्या कामाची पडताळणी करूनच घरफाळा लागू करण्याची भूमिका महापालिकेची आहे. पडताळणीस आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने या नव्या मिळकतदारांकडून पुढील आर्थिक वर्षातच घरफाळा वसूल होईल अशी शक्यता आहे.

शहरातील अनेक मिळकतींना घरफाळा लागू झालेला नाही. तर अनेक मिळकतदार घरफाळा लागू करून घेण्यासाठी महापालिकेत येरझाऱ्या मारत असतात. पण, लालफितीच्या कारभारामुळे अनेक मिळकतींना कर लागू झालेला नाही. याबाबत अनेकदा महासभेत चर्चा झाल्यानंतर नव्या मिळकतींचा शोध घेण्यासाठी सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. सर्वेक्षणाचे काम सायबर टेक कंपनीला देण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून वॉर्डनिहाय जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. कंपनीने दिलेल्या मुदतीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण न झाल्याने दोनवेळा मुदतवाढ मागितली. वाढीव मुदतीत सर्व्हे पूर्ण न झाल्याने कंपनीने तिसऱ्यांदा मुदतवाढ मागितली. पण १५ डिसेंबर रोजी कंपनीला मुदतवाढ न देता दररोज एक हजार रुपये दंड आकारणी सुरू करण्यात आली. कंपनीने या कालावधीत नव्या मिळकतींचा शोधल्या. मात्र कंपनीवर पहिल्यापासून आक्षेप असल्याने नव्या मिळकतींची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, पहिल्यापासून अशी समांतर यंत्रणा राबवून सर्वेनंतर त्वरीत पडताळणी झाली असती तर नव्या मिळकतींना यापूर्वीच घरफाळा लागू झाला असता. पण, महापालिकेकडे अशी यंत्रणा नसल्याने पूर्ण सर्व्हे झाल्यानंतर घरफाळा लागू होईल. कंपनीने आतापर्यंत एक लाख ५२ हजार मिळकतींपैकी एक लाख सात हजार मिळकतींचा सर्व्हे केला. सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून त्यामध्ये ८,६२७ नव्या मिळकती सापडल्या आहेत. अद्याप २५ टक्के मिळकतींचा सर्व्हे झालेला नसून कंपनीला मुदतवाढ न दिल्याने काम थांबले आहे. त्यामुळे नव्याने शोधलेल्या मिळकतींची पडताळणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पडताळणीसाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असून नंतरच या मिळकतींना घरफाळा लागू होणार आहे. मात्र ही प्रक्रिया राबवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने यास विलंब लागण्याची शक्यता आहे.

उर्वरीत सर्व्हे कधी ?

शहरातील सुमारे दीड लाख मिळकतींचा सर्वे करण्यासाठी कंपनीला तीन कोटी ७२ लाखांचा ठेका दिला. तीन टप्प्यात कंपनीला पैसे देण्यात येणार होते. त्यापैकी एक कोटी ४५ लाख कंपनीला अदा केले आहेत. कंपनीचे काम समाधानकारक नसताना पैसे दिल्याने वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. नगरसेवकांच्या मागणीनुसार कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यास रक्कम कशी वसूल करायची असा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच कंपनीची मुदतवाढ फेटाळली आहे. त्यामुळे उर्वरीत २५ टक्के मिळकतींचे सर्वेक्षण कसे पूर्ण होणार? असाही प्रश्न निर्माण होत आहे.

१,५२,६१३

मिळकतींची संख्या

१,१६,३२३

करपात्र निवासी इमारती

२९,२९०

करपात्र अनिवासी इमारती

८,६२७

सर्व्हेमध्ये मिळालेल्या मिळकती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्रीय पथकाकडून मूल्यांकन पूर्ण

$
0
0

कोल्हापूर : पंचायत सशक्तीकरण अभियान पुरस्कार अंतर्गत केंद्रीय पथकाने जिल्हा परिषदेच्या योजनेच्या मूल्यांकनाचे काम शनिवारी पूर्ण केले. तीन दिवसीय दौऱ्यात द्विसदस्यीय पथकाने मुख्यालयासह ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्र व बचत गटांना भेटी दिल्या. पथकप्रमुख श्रीनिवास बावा, अनिलकुमार वेल्ठाती यांनी दौऱ्याचा समारोप करताना जिपच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त केल्याचा दावा प्रशासनाने केला. केंद्रीय पथकाने शनिवारी वाडी रत्नागिरी, बोरपाडळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पन्हाळा पंचायत समितीच्या कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर दुपारी जिल्हा परिषदेकडील समिती सभागृहामध्ये विविध योजनेच्या रेकॉर्डची तपासणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा पाणीयोजना बैठक निष्फळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी खासदार राजू शेट्टी आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. इचलकरंजी नगरपालिकेचे पदाधिकारी आणि कोथळी ग्रामस्थांमध्ये एकमत न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. यावेळी इचलकरंजी नगराध्यक्षा अलका स्वामी, मुख्याधिकारी दीपक पाटील, माजी आमदार अशोकराव जांभळे, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन देसाई उपस्थित होते.

अमृत योजनेंतर्गत वारणा नदीतून इचलकरंजी शहराला थेट पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. यापूर्वी शिरोळ तालुक्यातील दानोळी येथून वारणेचे पाणी उचलण्यात येणार होते, पण ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने दानोळी योजना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रद्द केली. मुंबई येथे ३१ मे २०१८ रोजी झालेल्या बैठकीत दानोळीऐवजी कोथळी येथील पाणी लिफ्ट करण्याच्या योजनेला मान्यता दिली.

कोथळी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सर्व्हे करण्यास गेले असताना ग्रामस्थांनी विरोध केला. इचलकरंजीला पाणीपुरवठा झाला तर शेतीला पाणी कमी पडण्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. कोथळीला पाणीपुरवठा कमी पडू नये यासाठी अंकली येथे १३ फूट उंचीचा बंधारा बांधण्याची सूचना खासदार शेट्टी यांनी केली होती. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

बैठकीत कोथळी ग्रामस्थांनी अंकली येथे आधी बंधारा बांधण्यासाठी निविदा काढा, अशी मागणी केली. तर इचलकरंजीतील नगरसेवकांनी पाणीपुरवठा योजनेचा सर्व्हे करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली. अंकली येथे बंधारा बांधण्याबाबत १५ दिवसांत सरकारने निधी मंजूर करावा, असा आग्रह कोथळी ग्रामस्थांनी धरला, तर पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी आधी कोथळी परिसरातील वारणा नदीकाठचा सर्व्हे करण्यासाठी परवानगी द्या, सरकार बंधाऱ्यासाठी निधी देईल, अशी भूमिका इचलकरंजीतील नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कोथळी येथील बंधारा आणि पाणीपुरवठा योजनेचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला. अंकली येथे बंधारा बांधला तर जयसिंगपूर पालिकेकडून विरोध होण्याची शक्यता इचलकरंजीतील नगरसेवकांनी व्यक्त केली. जयसिंगपूर नगरसेवकांच्या अनुपस्थितीत अंकली येथे बंधारा बांधण्याबाबत निर्णय घेता येणार नाही याकडे लक्ष वेधण्यात आला. त्यामुळे कोणत्याही निर्णयाविना बैठक स्थगित करण्यात आली.

बैठकीला इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य सभापती संगीता आलासे, इचलकरंजी पाणीपुरवठा समिती सभापती संजय तेलताडे, नगरसेवक शशांक बावचकर, अजितमामा जाधव, शशांक बावचकर, सागर चाळके, रविंद्र माने, मदन झोरे, अशोक स्वामी, तर कोथळी ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील, विजय पाटील, नितीन वायदंडे, सरिता भवरे, अमृता पाटील आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलीस चकमकीत दरोडेखोर ठार

$
0
0

सोलापूर

सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे गावानजीक पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला. तर उर्वरित पाच दरोडेखोर पळून जाण्याचा यशस्वी झाले.

पकडलेल्या दरोडेखोराला सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या पाच साथीदारांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल जखमी झाले. त्यांच्यावर अश्विनी या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला. मृत दरोडेखोराचे नातेवाईक शासकीय रुग्णालयात पोहोचलेत. तिथे त्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या धर्मांधतेमुळे राष्ट्रीय ऐक्याला बाधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

‘अलीकडे धर्मांधता वाढत असल्याने देशाचे सांस्कृतिक ऐक्य टिकविण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. आपण जात आणि धर्माला शरण गेलो तर संविधानाच्या भवितव्याचे काय? जात, धर्मपूजक संविधानाचे पूजक असूच शकत नाहीत,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.श्री शाहू वाचनालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुफंताना 'सांस्कृतिक एकता आणि भारताचे भवितव्य' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष माजी आमदार बजरंग देसाई होते.

डॉ. सबनीस म्हणाले, ‘महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला न्यायव्यवस्थेने फाशी दिली हा इतिहास समोर असताना गांधीजींच्या पुतळ्यास हिंदू महासभेचे लोक गोळ्या घालतात आणि देश मूकपणे सहन करतो. स्वातंत्र्याचा दुरुपयोग किती दिवस सहन करायचा? शांततावादी इस्लामवर मुस्लिम दहशतवाद उभारला, पण मुस्लिम दहशतवाद इस्लामला मान्य नाही. हिंदू-मुस्लिम द्वेष विनाकारण उभा केला आहे. जात आणि धर्मवाद ही देशाला लागलेली कीड आहे. देशात संविधानाची साक्षरता दोन टक्केही नाही हे लक्षात घ्यायला हवे. धर्म, पंथ तत्त्वज्ञानापेक्षा संविधान मोठे आणि पवित्र आहे. श्रद्धेचे स्वातंत्र्य सर्वांना आहे, पण धर्माच्या अस्मिता पेटविण्याचे स्वातंत्र्य संविधान देत नाही. माणसाला माणूस बनविण्याचे काम संत साहित्याने केले. विवेकानंदांची भूमिका उजव्या चौकटीत बसत नाही. विवेकानंद समाजवादी आहेत हे समजून घ्यायला हवे. डॉ. आंबेडकरांचे समाजकारण, धर्मकारण चौकटीत बंदिस्त करता येणार नाही.’
डॉ. जयराम देसाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपाध्यक्ष प्रा. सुभाष देसाई यांनी स्वागत केले. कार्यवाह टी. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल प्रवीण गुरव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळागडाच्या तडबंदीची पडझड

$
0
0

भगवान शेवडे, वारणानगर

चारही बाजूला खोल दरी आणि सभोवताली तटबंदी असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाचा कारभार पुरातत्त्व विभागासह नगरपालिका, खासगी मालक आणि बांधकाम विभाग अशा विभागांकडे असल्याने दुरुस्तीबाबत निर्णय घेताना अडचणी येत आहेत. पश्चिमेला असणाऱ्या अंधारबाव परिसरातील तटबंदीखालील कड्याचा भाग ढासळत चालला आहे. गडाच्या चारही बाजूस असणाऱ्या खासगी जमीनमालकांनी विविध कारणांसाठी खोदाई केल्याने तटबंदी ठिकठिकाणी ढासळली आहे.

बुरुजाची बहुतांश ठिकाणी पडझड झाल्याने गडाला धोका निर्माण झाला आहे. एकूण अकरा किलोमीटर अंतरात असणारा हा एकमेव किल्ला जतन आणि संवर्धनासाठी इतिहासप्रेमी, स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. सध्यातरी गडावर येणाऱ्या पर्यटकांत गडाविषयी माहिती जाणून घेण्याऐवजी मौजमजा करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार प्रयत्नशील असल्याच्या जाहिरातीद्वारे सांगत आहे. मात्र, गडाच्या देखभाल दुरुस्तीचे काम का रखडले आहे हे समजू शकत नाही. गडावर पर्यटकांची गर्दी वाढावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘साउंड अँड लाइट शो’ची घोषणा केली. मात्र तटबंदीला धोका निर्माण झाल्याचे समजूनही सरकारच्या पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाही .

पश्चिमेला अंधारबाव परिसरात खासगी जमीनमालकांनी तटबंदीच्या खाली दगड काढण्यासाठी खोदाई केली आहे. तेथे खासगी मालकीच्याही जमिनी आहेत. त्यामुळे अशा लोकांनी याठिकाणी प्लॉटिंग करण्यासाठी खोदाई सुरू आहे. तटबंदीच्या खाली हा भाग येत असल्यामुळे तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. बालेकिल्ला दरवाजाच्या उत्तरेला धान्य कोठाराजवळची तटबंदीची भिंत जुलै २०१८ ला पावसाळ्यात ढासळली आहे. तिची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. या भिंतीला लागूनच लोकवस्ती आहे. पूर्वेला असणाऱ्या मुख्य दरवाजाजवळची मोठी तटबंदी दहा फूट ढासळली आहे.

वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्याच्या बाजूची भिंतही ढासळली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून तटबंदीच्या भिंती ढासळत आहेत. पर्यटकांना सोयीसुविधा मिळाव्यात, स्थानिकांसाठी रोजगार मिळावा हे रास्त आहे. मात्र हे करताना या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन आणि संगोपन करण्याची जबाबदारी पुरातत्त्व, नगरपालिका, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचीही आहे हे निश्चित.


पन्हाळगडावर पुरातत्त्व विभाग, नगरपालिका, बांधकाम विभाग आणि स्थानिक मालक अशा चार विभागांत या ठिकाणचा कारभार चालतो. त्यामुळे देखभाल दुरुस्ती करताना अडचणी येत आहेत. अंधारबाव परिसरातील तटबंदीच्या खाली असणारा भाग गेल्या दोन वर्षांपासून ढासळलेला आहे. तेथे नेमकी जमीन कोणाची आहे हे माहिती नाही. वेगवेगळ्या ठिकाणी झालेली पडझड चार वेगवेगळ्या प्रशासनाच्या अखत्यारीत येते, त्यामुळे दुरुस्तीची अडचण येते आहे.
विजय चव्हाण, पुरातत्व अधिकारी, पन्हाळा


पन्हाळगडाची दुरुस्ती, संवर्धन आणि जतन सर्वांची जबाबदरी आहे. तटबंदीची झालेली पडझड आणि झालेले उत्खनन याबाबत आम्ही पुरातत्त्व विभागाला अहवाल सादर करणार आहोत. सध्या गडाची माहिती जाणून घेण्यासाठी येणाऱ्यांपेक्षा मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. अशा हुल्लडबाज पर्यटकांना आवर घालणे गरजेचे आहे.
संदीप जाधव, सदस्य, गडकोट मोहीम परिवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूर: वसंत पंचमीला 'लगीन देवाचं लागलं'!

$
0
0

सुनील दिवाण/पंढरपूर:

वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव..तो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो आणि याच मुहूर्तावर आज साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न झाला. या आगळ्यावेगळ्या विवाहाची धामधूम आज सकाळपासूनच पंढरपुरात सुरू झाली होती. देवाच्या या विवाहसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती.

या विवाहसोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील भाविक भारत भुजबळ यांनी ट्रकभर विविध रंगांच्या रंगीबेरंगी फुलांनी मांडव अर्थात विठुरायाची राऊळी सजवली होती. सलग ४८ तास आणि पन्नास कलाकारांच्या मदतीने भुजबळ या भक्ताने देवाचा मांडव, विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा, विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप यासह संपूर्ण मंदिर, ॲंथोरिअम, विविधरंगी गुलाब, ओर्केड, जरबेरा, मोगऱ्यासह ३५ प्रकारच्या फुलांनी सजवला होता.

रुक्मिणीमातेच्या मूर्तीला हिरवी भरजरी पैठणी नेसवण्यात आली होती; तर विठुरायाला पांढरेशुभ्र करवतकाठी धोतर, पांढरी अंगी आणि पांढरी पगडी परिधान करून सजवण्यात आले होते. देवाचे गाभारे आकर्षक गुलाब आणि इतर फुलांनी अतिशय आकर्षक पद्धतीने सजले होते. वसंत पंचमी असल्याने विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात आली होती. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख आणि मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे.

विठ्ठल मंदिरातील सभामंडपाला लग्नस्थळाचे स्वरूप देण्यात आले होते. संपूर्ण सभामंडप फुले आणि फुग्यांनी सजवण्यात आला होता. विठ्ठल-रुक्मिणी स्वयंवराची भगताचार्य अनुराधा शेटे यांचा कथासोहळा ऐकण्यासाठी हजारो महिलांनी येथे गर्दी केली होती. देवाच्या लग्नाची कथा ऐकताना भजने सुरू होताच त्या तालावर महिला भाविक ठेका धरत आपला आनंद व्यक्त करत होत्या. अखेर विवाह मंडपात नवरदेव विठुराया आणि नवरी रुक्मिणीमातेला आणण्यात आले. साक्षात देवाच्या लग्नासाठी जमलेल्या शेकडो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत सोहळ्याला सुरुवात झाली. विठ्ठल रुक्मिणीच्या सजवलेल्या उत्सव मूर्तींच्यामध्ये आंतरपाट धरण्यात आला. वऱ्हाड्यांना अक्षता वाटून मंगलाष्टकांना सुरुवात झाली. शुभमंगल सावधान म्हणताच देवाच्या डोक्यावर अक्षता टाकत हजारो भाविक या आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याचे साक्षीदार झाले. आंतरपाट बाजूला काढून देव आणि मातेला पुष्पहार घालून आरती करण्यात आली. त्यानंतर पंगती बसल्या. देवाच्या लग्नाला बुंदीचे लाडू, जिलेबीसह विविध पक्वान्नाचे सुग्रास भोजन भाविकांना देण्यात आले.

67928313


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

loksabha election 2019: सोलापूर भाजपमधील गटबाजी उघड

$
0
0

पंढरपूर:

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली असून, सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी आज घेतलेल्या महत्वाच्या बैठकीला पालकमंत्री विजय देशमुख गटाने 'दांडी' मारल्यानं भाजपमधील गटबाजी समोर आली आहे. माढामधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोलापूरमधून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीनं भाजपसमोर आव्हान उभं राहिलं आहे. त्यात पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळं कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

पंढरपूर येथे आज या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपची महत्वाची बैठक झाली. या बैठकीकडे पक्षाच्या महासचिव सरोज पांडे यांनीही पाठ फिरवल्याने पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. तसंच या बैठकीला जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते येतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती. मात्र, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार अमर साबळे आणि सुरजित ठाकूर यांच्याशिवाय कोणताच मोठा नेता फिरकला नाही.

या सर्व प्रकारामुळे वैतागलेल्या सहकार मंत्र्यांनी थेट पालकमंत्री गटातील पदाधिकाऱ्यांना इशारा देताना, भाजपमध्ये आलेल्या 'पवारप्रेमींना' जर त्यांचा प्रचार करायचा असेल, तर भाजपमुळे मिळालेल्या पदांचे राजीनामे द्यावे लागतील, असं ठणकावून सांगितलं. पालकमंत्री विजय देशमुखही या बैठकीला येऊ शकले नाहीत. तर खासदार संसदेच्या अधिवेशनात असल्याचे तोकडे समर्थन सुभाष देशमुख यांनी करून वेळ मारून नेली. माढामधून पवार निवडणूक लढविणार हे खरे असले तरी या वयात पवारांना कार्यकर्त्यांनी त्रास द्यायला नको होता, असे सांगत राज्यातील जनतेच्या आग्रहामुळे पवार माढ्यातून उभे राहतील, असा दावा देशमुख यांनी केला. पवार आणि शिंदे यांच्या विरोधात भाजप निवडणूक लढवणार असून, आमचा उमेदवार 'कमळ' असेल असे सांगत उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल, असे देशमुख यांनी सांगितले.

सोलापूर भाजपमध्ये सहकार मंत्री आणि पालकमंत्री असे दोन गट आहेत. त्यांच्यातील गटबाजी नेहमीच समोर येत आली आहे. राष्ट्रवादीमधून आलेल्या तरुण तुर्कांच्या मदतीने पालकमंत्र्यांनी जिल्हापरिषद, सोलापूर बाजार समिती अशा महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता मिळवली आहे. यातील जिल्हा परिषद अध्यक्ष संजया शिंदे, विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांचे पवारांवरील प्रेम लपून राहिलेले नाही. आता खुद्द शरद पवार हेच माढामधून लढणार असल्यानं भाजपकडून पुन्हा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनाच निवडणूक लढवावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीक्षाग्रहण सोहळा उत्साहात

$
0
0

चारजणांनी घेतली दीक्षा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील भक्तीपूजा नगरमधील सिध्दी भद्रंकर संयम वाटिकेत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला दीक्षाग्रहण उत्सव भक्तीमय वातावरणात पार पडला. सिध्दी भद्रंकर प्रवज्या समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान, रविवारी पहाटे दीक्षा विधी सोहळा झाला. आचार्य भगवंत श्री नररत्नसूरीश्वर महाराज यांच्या हस्ते नटवर (सुरत), वत्सलकुमार (अहमदाबाद), काव्याकुमारी, जीनलकुमारी (पुणे) यांना विधीवत दीक्षा देण्यात आली.

पहाटे ५ वाजून ३१ मिनिटांनी विधीस प्रारंभ झाला. चेन्नईचे विपीन, मुंबईचे प्रशांत शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात चौघांना दीक्षा देण्यात आली. त्यानंतर त्यांचे नामकरण मुनिश्री निर्लेपरत्न विजयश्री महाराज, मुनिश्री विजयजी महाराज, साध्वीश्री कृपाद्रष्टिश्री महाराज, साध्वीश्री जीवमैत्रीश्री महाराज असे करण्यात आले.

खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी कार्यक्रमास भेट दिली. ललित गांधी, प्रदीप जैन, मनोज राठोड, दिनेश ओसवाल, भरत ओसवाल यांच्यासह जैन समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फक्त १२ व्हीव्हीपॅट तपासणार

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:@satishgMT

कोल्हापूर : लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत ५० टक्के मतांची मोजणी व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे करण्यात यावी, अशी मागणी देशातील २३ राजकीय पक्षांनी केली आहे. मात्र निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक इव्हीएम मशिनची मोजणी करण्याचे तोंडी आदेश जिल्हा स्तरावरील निवडणूक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात फक्त १२ इव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करून ताळमेळ घातला जाणार आहे.

इव्हीएमद्वारे निवडणुकीला आक्षेप घेत ही यंत्रे योग्य प्रकारे सुरू आहेत की त्यात घोळ आहे यांची शहानिशा करण्यासाठी, मतदानाच्या ५० टक्के मतांची मोजणी व्हीव्हीपॅटद्वारे करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली २३ राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे केली आहे. इव्हीएम मशिनवर मतदान केल्यानंतर मतदाराला त्याने कोणाला मतदान केले यांची चिठ्ठी व्हीव्हीपॅटवर दिसणार आहे. ही चिठ्ठी फक्त दहा सेकंद दिसणार असून त्यानंतर व्हीव्हीपॅटमध्ये सर्व चिठ्ठ्या जमा होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीत प्रत्येक इव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट असेल. पण सर्व इव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी होणार नाही.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक इव्हीएम निवडून त्याच्यासोबत असलेल्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, कागल, चंदगड, राधानगरी या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, पन्हाळा, वाळवा, शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एक अशा एकूण १२ व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीची सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार आहे. लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जा असलेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोजणी होणार आहे. इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी झाल्यावर ताळमेळ घालण्यात येणार आहे. मात्र त्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करून पडताळ‌णी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील १२ व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करुन इव्हीएममधील मतदानाच्या आकड्यांशी त्यांचा ताळमेळ घातला जाईल. पण मतमोजणीचा निकाल जाहीर करण्याचे अधिकार फक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- स्नेहल भोसले, जिल्हा निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दालन २०१९’चा आज समारोप

$
0
0

कोल्हापूर

क्रिडाई कोल्हापूरतर्फे भरविण्यात आलेल्या चार दिवसीय गृहप्रकल्प विषयक 'दालन २०१९' प्रदर्शनाचा सोमवारी (ता.११) समारोप होत आहे. येथील शाहूपुरी जिमखाना मैदान येथे प्रदर्शन सुरू आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता प्रदर्शनाचा समारोपाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती क्रिडाईतर्फे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचेतना समितीचे व्याख्यान

$
0
0

कोल्हापूर : 'उत्तम आरोग्यासाठी आहार, विहार व व्यायाम आवश्यक आहे. आहारात कमीत कमी प्रक्रिया केलेले नैसर्गिक स्वरुपातील अन्नाचा समावेश करणे फायदेशीर ठरते' असे मत प्रा. हेमलता कोले यांनी व्यक्त केले. येथील विवेकानंद कॉलेजमधील सचेतना समितीमार्फत आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. 'युवतींच्या आरोग्य समस्या व घ्यावयाची काळजी' हा व्याख्यानाचा विषय होता. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी निरोगी आरोग्याचे महत्व विशद केले. डॉ. माधवी चरणकर यांनी विद्यार्थिनींना आरोग्यविषयक काळजी घेण्याचे आवाहन केले. डॉ. मंजुश्री घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नाजनीन पटेल यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नांचा पाठलाग करायला शिका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'आज अनेक क्षेत्रातील लोक त्यांच्या फायद्यासाठी तरुणांना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या आमिषाला बळी न पडता आयुष्याचा प्लॅन तयार करा. स्वप्न पाहून त्यांचा पाठलाग करा,' असा कानमंत्र विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला.

न्यू कॉलेज येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात '२१ व्या शतकातील युवकांसमोरील आव्हाने' या विषयावर नांगरे-पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी डी. बी. पाटील होते. गुरुवारी न्यू कॉलेज येथे हा कार्यक्रम झाला.

नांगरे-पाटील म्हणाले, 'आजच्या मुलांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. आईवडील ज्या तळमळीने तुम्हाला घडवतात त्याची जाण ठेवली पाहिजे. विज्ञाननिष्ठतेची कास धरली पाहिजे.' प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर. एस. चरापले, आर. डी. आतकिरे, के. जी. पाटील, विनय पाटील, सी. एम. गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, प्राध्यापक, व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. कविता गगराणी व धनंजय पाटील यांनी निवेदन केले. उपप्राचार्य प्रा. टी. के. सरगर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>