Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘सिक्रेट सांता’ उपक्रमाचे महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजन

$
0
0
समाजातील गरजू व निराधार मुलांसाठी सांताक्लॉजची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी ‘मटा’ च्या माध्यमातून वाचकांना देण्यात येत आहे.

आगामी लोकसभा ‘अधांतरी पार्लमेंट’

$
0
0
आता प्रादेशिक पक्ष प्रबळ झालेले दिसतील आणि भारतीय राजकारण एका वेगळ्या वळणावर येईल, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागप्रमुख व समाजवादी प्रबोधिनीच्या सहसचिव प्रा. भारती पाटील यांनी व्यक्त्त केले.

मिळाला तात्पुरता शिक्षक

$
0
0
जैनापूर (ता. शिरोळ) येथील पालक व ग्रामस्थांनी शिरोळ येथे पं.स.च्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर तात्पुरता शिक्षक नेमला जाईल, अशी ग्वाही पंचायत समिती सभापती कमरूद्दीन पटेल यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

रेशन कार्डसाठी दोन वर्षे वेटिंग

$
0
0
मासिक धान्य, सरकारी योजनांचा लाभ, आरोग्य, शैक्षणिक व महसुलासह विविध प्रकारच्या कामासाठी अंत्यंत महत्त्वाचे असलेले नवीन व विभक्त रेशनकार्ड देण्याचे कामकाज येथील महसूल विभागाने गेल्या दोन वर्षापासून पूर्णता बंद केल्याने अनेक ‍लाभार्थीची मोठी गैरसोय होत आहे.

‘शाहू’, ‘वारणा’ला पुरस्कार

$
0
0
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरच्या श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचा सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जाहीर झाला.

राष्ट्रवादीच्या भूमिकेवर लक्ष

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी भूमिका निश्चित करण्यासाठी येत्या दोन दिवसात नगरसेवकांची बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अशोकराव जांभळे, शहराध्यक्ष मदन कारंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती पक्षप्रतोद रविंद्र माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आंबेओहळला खोडा

$
0
0
चित्री प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन झाल्याने हा प्रकल्प चर्चेत आला आहे. मात्र याच तालुक्यात उत्तूरजवळ होत असलेला हा अंबेओहळ प्रकल्प मात्र स्थानिक आणि स्वयंघोषित नेत्यांच्या कुरघोड्यांमुळे रखडला आहे.

निवडणुका २ जानेवारीला

$
0
0
महापौर, उपमहापौर पदासह तीन समितीच्या निवडणुका नववर्षात होणार असून दोन जानेवारीला जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली सर्व निवडी होणार आहेत.

महालक्ष्मी मंदिर 'अनसेफ'

$
0
0
गेल्या आठवड्यात कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महाराष्ट्र सुरक्षा दलाने करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराची पाहणी केल्याने मंदिराची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र समोर आले आहे.

चुकीच्या आराखड्यामुळे रस्ता धोक्याचा

$
0
0
बऱ्याच वर्षांच्या दुरवस्थेनंतर चांगला बनलेला जरगनगर रस्ता चुकीच्या आराखड्यामुळे अरुंद बनत आहे. आधीच उतार व त्यात झालेल्या डांबरीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला असून ​दुतर्फा बसवलेल्या सिमेंट ब्लॉकमुळे पादचाऱ्यांना तसेच वाहनधारकांनाही हा रस्ता धोकादायक ठरत आहे.

वाहनांची संख्या कमी दाखवल्याने मुदत वाढली

$
0
0
एका‌त्मिक रस्ते विकास प्रकल्पात टोल नाक्यावरून ये-जा होणारी वाहनांची संख्या आणि टोल वसुलीचे दिवस कमी दाखवून टोलची मुदत चुकीच्या पद्धतीने वाढवण्यात आली आहे, असा आरोप कॉमन मॅन संघटनेने केला आहे.

आंबेडकरी संघटना महामोर्चा काढणार

$
0
0
आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलनच्यावतीने २ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बिंदू चौकातून काढण्यात येणाऱ्या या मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेरोव घालण्यात येणार आहे.

एनटीएस, एनएमएमएसची संभाव्य उत्तरसूची उपलब्ध

$
0
0
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (एनटीएस) व राष्ट्रीय दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) या दोन्ही परीक्षांच्या संभाव्य उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

सबसिडीच्या नावाखाली गॅस ग्राहकांची फसवणूक

$
0
0
गॅस एजन्सींकडून आधार कार्ड व बॅक खाते लिंक न केलेल्या ग्राहकांकडून सिलिंडरला १०९० रुपये आकारले जात आहेत. यांसह ग्राहकांच्या खात्यावर अनुदानाची जमा होणारी रक्कम कमी असल्याने नागरीकांची फसवणूक सुरु आहे.

रोजगार हमी योजनेत २५ कोटींचा घोटाळा

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीन रोजगार हमी (मनरेगा) योजनेतील पाच गावांच्या कामांमध्ये १ कोटी १५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे सिध्द झाले आहे. जिल्ह्याचा विचार करता, किमान पंचवीस कोटी रुपयांचा हा घोटाळा झाला आहे.

वापराविना स्कायवॉक भंगारात

$
0
0
जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याचा प्रवास सुकर व्हावा यासाठी दाभोळकर कॉर्नरवरील मुख्य रस्त्यावर स्कॉयवॉकची उभारणी होऊन एक तपाहून अधिक काळ लोटला असला तरी स्थानिक नागरिकांसह प्रवासी त्याचा फारसा वापर करत नसल्याचे चित्र आहे.

कराड भागात उसाला तुरे

$
0
0
ऊसदरासाठी यंदा झालेल्या आंदोलनामुळे ऊसतोडीला उशीर होऊन, सध्या उसाला तुरे येऊ लागले आहेत. परिणामी, उसाचे वजन घटण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावते आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न घटू शकते.

प्रशिक्षणार्थी फौजदारासह ५ कर्मचारी निलंबित

$
0
0
लाच घेताना रंगेहाथ सापडलेले विश्रामबाग पोलिस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक सतीश अशोक डौले, त्यांना मदत करणारा कर्मचारी दिगंबर तुकाराम येवले याच्यासह पाच जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी तातडीने निलंबित केले आहे.

पाचगाव सरपंचांच्या जातीच्या दाखल्यावर सोमवारी निर्णय

$
0
0
पाचगावच्या सरपंच राधिका खडके अनुसूचित जातीच्या नसूनही पद भोगत आहेत. त्यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेऊनही जातपडताळणी कार्यालय कोणताच निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ धनंजय महाडिक युवाशक्ती व महादेव उपनगर विकास आघाडीने कार्यालयाला टाळे ठोकणार होती.

‘पुसेगाव यात्रेवेळी CCTV बसवा’

$
0
0
पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या यात्रेवेळी संभाव्य गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी केली. या यात्रेच्या नियोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images