Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिक्षण भरती प्रक्रियेचे होणार व्हिडिओ चित्रिकरणशिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती

0
0

शिक्षण भरती प्रक्रियेचे होणार व्हिडिओ चित्रिकरण

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'शिक्षण क्षेत्रातील भरतीची सर्वच प्रक्रिया पारदर्शी करण्यासाठीच पवित्र पोर्टल प्रणाली लागू करण्यात आली आहे. शिक्षण भरती प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचे व्हिडिओ चित्रिकरण होणार आहे. त्यामुळे भरतीतील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार थांबणार आहे. भ्रष्टाचार थांबणार असल्याने अनेक जण अस्वस्थ झाले आहे, ते अफवा पसरवत आहेत,' असे मत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. कुचन प्रशालेच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्साठी तावडे सोलापुरात आले होते.

तावडे म्हणाले, 'समाज व शिक्षण क्षेत्रात काम करणारी लोकं हुशार आहेत, त्यामुळे त्यांच्या अफवांना कोणी बळी पडणार नाही. पुण्यात सुरू असलेले उपोषण केवळ राजकीय श्रेयासाठी वाढवू नये. मी कधीही त्यांच्याशी संवादाला साधण्यासाठी उपलब्ध आहे.

.....

तावडेंना दाखवले काळे झेंडे

'१३ पॉईंट रोस्टर म्हणजे मागील दाराने आरक्षण बंद करण्याची पद्धत आहे,' असा आरोप करून युवा पॅँथरच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना शुक्रवारी सोलापुरात काळे झेंडे दाखवून ताफा अडविण्यात आला. सोलापुर-पुणे महामार्गावर सोलापूर विद्यापीठातील कार्यक्रमाला जाताना वारद नगर, मडकी वस्ती येथे दुपारच्या सुमारास तावडे यांचा ताफा अडवून घोषणा देत काळे झेंडे दाखविण्यात आले. या आंदोलनामुळे तावडे यांना दोन ते तीन मिनिटे थांबावे लागले. मात्र, ते खाली उतरले नाहीत. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची धांदल उडाली. गाड्यांचा ताफा थांबताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्त डॉ. ढाकणेंची बदली

0
0

सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी बदल्यांचे आदेश काढले. त्या बाबतचा फॅक्स महापालिका कार्यालयाला शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाला. डॉ. ढाकणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. जळगावचे जिल्हाधिकारी के. डी. निंबाळकर यांच्या जागी डॉ. ढाकणे जात आहेत.

तत्कालीन मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांची सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर डॉ. ढाकणे यांनी २ मे २०१७ रोजी सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता.

ढाकणे यांनी स्मार्ट सोलापूरबरोबर स्वच्छ सोलापूर, घंटागाडी, पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला. उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी मार्गी लावण्यात त्यांचे मोठे योगदान होते. शहर एलईडी दिवे लावून वीजबिलात मोठी कपात केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात ऊस संशोधन केंद्र सुरू करणार

0
0

सोलापुरात ऊस संशोधन केंद्र सुरू करणार

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

सोलापूर :

सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी ऊस संशोधन केंद्र सुरू करणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे सांगितले.

सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे उद्घाटन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आज झाले. या वेळी ते बोलत होते. आमदार सिद्धराम म्हेत्रे, माजी आमदार सुधाकर परिचारक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुणे साखर आयुक्त कार्यालयाचे सहसंचालक दत्तात्रय गायकवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर, सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, 'सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी प्रादेशिक सहसंचालक कार्यालय सुरू केले आहे. याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेचे विभागीय कार्यालय ही सोलापुरात सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. उसाचे उत्पादन वाढावे, यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. असे प्रशिक्षण, आभ्यास दौरे साखर कारखान्यांनी आयेाजित करावेत. प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल. कोल्हापूर जिल्ह्यात साखरेचा उतारा आहे, तसा उतारा सोलापूर जिल्ह्यातही मिळावा यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. साखर कारखानदारीसमोर असणाऱ्या समस्या आणि शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर मिळण्यास मदत व्हावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार बच्चू कडूंची रविवारी सोलापुरात सभा

0
0

आमदार बच्चू कडूंची

रविवारी सोलापुरात सभा

सोलापूर

प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांची रविवार १० फेब्रुवारी रोजी सोलापुरात सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. कांदा व उसाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या बाबत आमदार कडू बोलणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चहा पावडरमध्ये भेसळ

0
0

सांगली :

चहा पावडरमध्ये खाण्याच्या रंगाची भेसळ करणाऱ्या एकनाथ पंढरीनाथ शिर्के यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. त्याच्याकडून तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, खाद्य पदार्थ विक्रीच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी न घेणाऱ्या तीन व्यावसायिकांकडून ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचेही चौगुले म्हणाले.

शिराळा तालुक्यातील कोकरूड, माळेवाडी या परिसरात फिरून चहा पावडरची विक्री करणाऱ्या शिर्के याच्या कडील चहा पावडरची तपासणी २७ जून २०१८ रोजी करण्यात आली होती. भेसळीचा संशय असल्याने त्या पावडरचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच आला असून, त्या पावडरमध्ये खाद्यरंगाची भेसळ करण्यात आली असून, पावडरीचा दर्जाही चांगला नसल्याचे समोर आले. या प्रकरणी शिर्के याच्याकडून ३० हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. खाद्य पदार्थांची विक्री होत असलेल्या तीन ठिकाणी स्वच्छतेचा अभावासह इतर गोष्टींच्या त्रूटी आढळल्याने मिरजेतील सुरभी वडापाव सेंटर (फायर ब्रिगेड नजीक, लक्ष्मी मार्केट समोर), प्रकाश नाष्टा सेंटर (इस्लामपूर रोड) या व्यवसायिकांना ३६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे चौगुले यांनी सांगितले.

------------------ ----------------

लाचप्रकरणाला नाट्यमय वळण

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्हा परिषदेच्या आवारात शुक्रवारी एक नाट्यमय लाचलुचपत प्रकरण घडले. एका सामाजिक संस्थेच्या कंत्राटी अधीक्षकाला लाच देण्याचा प्रयत्न करणाराला ताब्यात घेण्यात आले. परंतु, ही लाच देण्या-घेण्याचा परिणाम कोणत्याही प्रकारच्या सरकारी कामावर होणारा नव्हता आणि या संदर्भात तक्रार करणारी व्यक्ती कायद्याच्या चौकटी बाहेरची होती. त्यामुळे लाच देणाऱ्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांना केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्याची मुक्तता करावी लागली.

रात्री उशीरा मिळालेल्या माहिती नुसार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल झाला आहे. अर्जदार व्यक्तीने कुपवाड येथील एका संस्थेची माहिती अधिकारात मागितली होती. ही संस्था सरकारी अनुदान घेते. संबधित अधीक्षकपदाच्या व्यक्तीला सरकारी मानधन दिले जाते. अशा व्यक्तीने माहिती देण्यास दिरंगाई केली होती. या दिरंगाईमुळे अर्जदार व्यक्तीने अपील करु नये, म्हणून अधीक्षक व्यक्ती अर्जदार व्यक्तीला लाच देणार होती म्हणे. या आधारे सदर माहिती अधीकार कार्यकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केल्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या आवारात सापळा लावला. पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराजवळ ११०० रुपयांची लाच देत असताना त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला तातडीने गाडीत घालून कार्यालयात नेले. त्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तक्रारदार हा लाचलुचपत कायद्यातच येत नसल्याची माहिती समोर आली. तक्रारदार व्यक्तीचे कोणतेही सरकारी काम अडवलेले नव्हते. तो खासगी व्यक्ती म्हणून तक्रार करीत होता, असे समोर येताच कारवाईतील हवाच निघून गेली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली कारवाई बाजूला ठेवून विश्रामबाग पोलिस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल केली. विश्रामबाग पोलिसांनी दखल घ्यायची म्हणून अदखलपात्र गुन्हा दाखल केला. सांगली जिल्हा परिषदेच्या आवारात लाचलुचपतने कारवाई झाल्याची माहिती समजताच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी प्रकरणात जिल्हा परिषदेचा थेट संबंध नसल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८६ किलो गांजाचीवाहतूक करणाऱ्यांना अटक

0
0

८६ किलो गांजाची

वाहतूक करणाऱ्यांना अटक

सातारा :

सुमारे ८६ किलो वजनाचा अमली पदार्थ असणाऱ्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना सातारा उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. दुचाकी व गांजा असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित दोघे पळशी (ता. खटाव) येथील आहेत. शंकर विलास जाधव व लक्ष्मण अंकुश जाधव (दोघे रा. पळशी ता. खटाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

......

पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांना चावा

सातारा : मोरे कॉलनीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, सहा जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. जखमी झालेल्या रुग्णांवर साताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

राजवाड्यापासून जवळच मोरे कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. वाटेत दिसेल त्याला चावा घेत कुत्रे कॉलनीमध्ये इकडून तिकडे फिरत होते. त्यामुळे नागरिकांनी या कुत्र्यांचा चांगलाच धसका घेतला आहे. काही नागरिकांनी भीतीने दरवाजा बंद करून घेतले. नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. परंतु कोणीच कॉलनीमध्ये फिरकले गेले नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारती विद्यापीठांतर्गत आयटी आयडॉरिक्षा-कारच्या धडकेत सहा जखमी

0
0

रिक्षा-कारच्या धडकेत सहा जखमी

कराड :

कराड-चांदोली रस्त्यावर प्रवासी वाहतूक रिक्षा आणि इंडिका कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात रिक्षातील सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.

ओंड-उंडाळे गावादरम्यान उंडाळेहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी प्रवाशी रिक्षाला (एम. एच ११- ९८३७) उंडाळे बाजूस जाणाऱ्या इंडिका विस्टा या चारचाकी गाडीने (एम. एच. १० बी. डब्ल्यू ९८३४) समोरासमोर जोरदार धडक दिली. उंडाळे येथील या जगदंबा पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघातात राजेंद्र कांबळे, जयश्री हनुमंत चव्हाण, चंद्रकांत वर्मा जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य जखमी नावे समजू शकली नाहीत. अपघानंतर घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या इडिकाला उंडाळे पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.

......

अपघातात चक्काचूर झालेली वडाप रिक्षा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारीपाच मार्चपासून बेमुदत संपावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना कॉलेज कर्मचारी युनियनच्यावतीने निवेदन

0
0

सोलापूर :

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या निर्णयानुसार राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी पाच मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारने आठ वर्षांपासून मिळत असलेला अर्थिक लाभ सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या निर्णयामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे कर्मचारी महासंघाने सरकार विरोधात बेमुदत संप पुकारला आहे. या बाबतचे निवेदन शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना युनियनच्या वतीने विद्यापीठात देण्यात आले.

दरम्यान, तावडे यांनी या बाबत लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आठ वर्षांपासून मिळणारा आर्थिक लाभ काढून घेण्याबाबतचा र्णय त्वरीत रदद्द करावा, अशी मागणीही आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामविकासाशी निगडीतसंशोधनास प्रोत्साहन देणार

0
0

ग्रामविकासाशी निगडीत

संशोधनास प्रोत्साहन देणार

शिक्षण मंत्री तावडे यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'संशोधकांनी समाज आणि ग्रामविकासाशी निगडीत विषय संशोधनासाठी निवडावेत. सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारचे किमान पंधरा हजार विषय असून, अशा विषयांवर संशोधन केल्यास उच्च शिक्षण विभाग त्यासाठी प्रोत्साहन देईल,' असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठात हातमाग प्रकल्पाचे आणि ४८२ एकर परिसर व कृषी पर्यटन केंद्राच्या संरक्षक भिंतीचे भूमीपूजन शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे उपस्थित होते.

मंत्री तावडे म्हणाले, 'पंढरपूरच्या वारीचे व्यवस्थापन, या विषयावर संशोधनाला मोठा वाव आहे. अशा प्रकारचे संशोधनाचे विषय असायला हवेत. संशोधकांनी पगारवाढीसाठी संशोधन करण्यापेक्षा समाजाला उपयोगी ठरेल, अशा प्रकारचे संशोधन करावे. सोलापूर विद्यापीठाला राज्य सरकारने उच्च शिक्षण विभागातर्फे इनक्युबेशन सेंटर मंजूर केले आहे. त्याकडे विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर करावेत. सोलापूर विद्यापीठाला नामांकित विद्यापीठ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी या विद्यापीठाने उद्योग क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क करून नवनवीन प्रयोग सुरू करावेत. या माध्यमातून उद्योगवाढीसाठी उपयोगी अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू व्हावेत. विद्यापीठाने स्वतःहून समाजाला उपयोगी पडणारे काही अभ्यासक्रम सुरू करावेत. विदेशातील विद्यापीठांशी संपर्क करून त्यांच्याशी करार करून काही अभ्यासक्रम सुरू करावेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकर वसतीगृहासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन कराड येथे आंबेडकर वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन दोन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, विविध सुविधांबाबत समाजकल्याण विभागाचे आश्वासन

0
0

आंबेडकर वसतीगृहासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, कराड

विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जासह अपुरे जेवण देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार पार्ले (ता. कराड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरकारी वसतीगृहात सुरू आहे. त्याचबरोबर सोलर सिस्टम व अन्य सुविधांची ही वानवा असल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत वसतीगृहाबाहेर आंदोलन केले.

या वसतीगृहात संबंधित ठेकेदाराकडे विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरवण्याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, त्याच्याकडून चलढकल होत असल्याने अधीक्षकांनी संबंधित ठेकेदाराला चार महिन्यांत तीन वेळा नोटीस बजावली आहे. वरिष्ठांच्या आदेशानूसार आपण या प्रकरणी कारवाई करू, अशी ग्वाहीही दिली आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य निवासवराव थोरात, सागर शिवदास, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन आवळे यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच वसतीगृहातील फळे व इतर खाद्य पदार्थांची पाहणी केली. त्या वेळी फळे खाण्यायोग्य नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारास मोबाइलद्वारे संपर्क साधला असता, संबंधित ठेकेदाराने बाहेरगावी असल्याची सबब सांगून वेळकाढूपणा केला.

......

राम जगताप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सत्ता मिळवण्याचे कसब आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावे'

0
0

सूर्यकांत आसबे, सोलापूर

सत्तेची स्वप्न पाहताना राजकारणाची हवा कोणत्या बाजूने सुरू आहे, ते पाहून निर्णय घेतला पाहिजे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्याने मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे़. परंतु सत्ता कशी मिळवावी, हे त्यांनी माझ्याकडून शिकावे, अशी टिप्पणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे स्वप्न पाहू नये. मागासवर्गीय मतांचे विभाजन होणार असल्याने त्याचा फायदा भाजप - शिवसेनेला होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या वंचित आघाडीत सर्व जातीच्या नेत्यांना सामावून घेतले असले तरी २००९च्या माझ्या अनुभवानुसार डोक्यात हवा व पैसा असणारे लोकच वंचित आघाडीकडे जातील. त्यामुळे या आघाडीला राज्यात फारसे यश मिळणार नाही, असं मत आठवलेंनी व्यक्त केलं. रिपाइं व वंचित आघाडीचा राजकीय समझोता होऊ शकेल काय? असे विचारले असता ऐक्याची माझी तयारी आहे. मागे दोन ते तीन वेळा असे प्रयत्न झाले आहेत. मात्र, त्यांनी तयारी दर्शवली नाही. दोघे एकत्र आलो तर प्रकाश आंबेडकर मंत्री होतील. रिपाइं ऐक्य होत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात दोघेही छाप पाडू शकतो. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यास तयार आहे. पण सत्तेची स्वप्न पाहताना राजकारणाची हवा कोणत्या बाजूने सुरू आहे, ते पाहून निर्णय घेतला पाहिजे. त्यांनीच आता भाजप-शिवसेनेसोबत यावं, असं आवाहन आठवलेंनी केलं.

राफेलवरून राहुल गांधींकडून दिशाभूल

राफेलची १६०० कोटी रुपये किंमत फ्रान्स सरकारने ठरवली आहे. शिवाय कोर्टानेसुद्धा या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. असं असताना राहुल गांधी मात्र पुन्हा पुन्हा राफेल राफेल करून देशभरातील जनतेची दिशाभूल करत आहेत, असं रामदास आठवले म्हणाले. गांधी परिवार देशातील वातावरण जाणीवपूर्वक गढूळ करत आहे. मोदींना कितीही टार्गेट केलं जात असलं तरी या सर्व प्रकारांमुळे मोदींचीच ताकद वाढली. आरपीआय मोदी यांच्याच पाठीशी असल्याचे आठवले म्हणाले.

पवार माझ्या विरोधात लढणार नाहीत?

माढा लोकसभा मतदार संघातील राजकारणाबाबत विचारले असता आठवले म्हणाले, शरद पवार माझ्या विरोधात लढणार नाहीत. इतकेच नव्हे तर विजयसिंह मोहिते - पाटील माढयात असल्याने पवार तेथे येणार नाहीत असंही आठवले म्हणाले. पंढरपूरचे आपण एकदा खासदार होतो. शिर्डीत धोका झाला आणि आपला पराभव झाला. परंतु माढामधून आपण निवडून आलो असतो, असं आठवले यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरे आमच्या आघाडीत नाही: शरद पवार

0
0

सोलापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही प्रश्नावर आमच्यासोबत असले तरी निवडणुकीत सोबत नसल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज सांगोल्यात दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यातही महाआघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. या आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह भारिप, मनसे, डाव्या पक्षांची आघाडी होत असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ४८ पैकी ४४ जागांचे वाटप पूर्ण झाले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित-बहुजन आघाडीशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मनसेदेखील या आघाडीत असणार असून त्यांनी मुंबई-नाशिकमध्ये जागांची मागणी केली असल्याची चर्चा होती. मात्र, पवार यांनी मनसे आघाडीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी सुरू झाली असून यामध्ये आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी हे माझे मित्र असून आता मला त्यांची काळजी वाटू लागली असल्याचे पवारांनी वक्तव्य केले.

माझे वय झाल्याने मी माढातून निवडणूक लढवू नये असे सुचवणाऱ्या भाजप नेत्यांनी माझ्या प्रकृतीची काळजी करू नये त्यांनी आगामी निवडणुकीची काळजी करावी असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीनिवास पाटील यांच्यावाढदिवसानिमित्त उपक्रम

0
0

श्रीनिवास पाटील यांच्या

वाढदिवसानिमित्त उपक्रम

कराड :

सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा ७८वा वाढदिवस सोमवारी ११ फेब्रुवारी २०१९ रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कराड येथील संपर्क कार्यालयात श्रीनिवास पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी नऊ वाजता कराड येथील प्रीतिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. साडेनऊ वाजता स्व. पी. डी. पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहेत. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत येथील संपर्क कार्यालयात उपस्थित राहून हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. दुपारी तीन वाजता गांधी टेकडी तालुका पाटण येथील ठक्करबाप्पा विद्यालयातील नियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सायकल वाटप व पाटण तालुक्यातील शाळांना संगणक वाटप करण्यात येणार आहे. सारंग पाटील युवा विचार मंचच्या वतीने विभागातील शाळांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

.........

सांगली :

'सांगली लोकसभेसाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे, सांगलीतून भाजपमधून अन्य कोणी इच्छुक आहे की नाही, याची कल्पना नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची माझी भूमिका कायम असल्याने सर्वच मंडळी मला सहकार्य करतात. त्यामुळे कोणतीही अडचण नाही,' असा स्पष्ट निर्वाळा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, खासदार संजय पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.

तासगावात १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण, नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, ज्यांची त्यांच्या पक्षातच दखल घेतली जात नाही, त्यांच्या विधानांची मी दखल घेण्याची आवश्यकता नाही. अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर प्रमाणेच अॅक्सिडेंटल राज्यमंत्री झालेल्या प्रतीक पाटील यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवले तर मी राजकारण सोडून देईन, असे ही खासदार संजय पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदयविकाराने मृत्यू

0
0

चंदगड : म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील कारखाना कॉलनीमधील इमारतीमध्ये काडाप्पा निंगाप्पा हलकर्णीकर (वय ५६) यांचे हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. याबाबतची वर्दी सुनील कांबळे यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. हलकर्णीकर म्हांळुगे येथील कारखान्यात एचआर म्हणून नोकरीला होते. ते कारखाना कॉलनीतील बी इमारतीच्या १२ नंबर खोलीत एकटेच राहात होते. सकाळी अकरा वाजता ते लोखंडी खॉटवर मृतावस्थेत आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची निदर्शने

0
0

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बेरोजगारीच्या विरोधात बुधवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील तरुणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. नोटबंदी व जीएसटीमुळे व्यापार, व्यवसायवर परिणाम झाला. सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन पुकारले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता आंदोलन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तालासुरांच्या जुगलबंदीत रसिक मुग्ध

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बासरीतून उमटणारे नादमधूर सूर, तबल्यावरील ठेका धरायला लावणारी थाप आणि तालासुरांच्या हिंदोळ्यावर झुलणारे रसिक असा अनोखा माहौल 'तालसिद्धी' कार्यक्रमात निर्माण झाला. कोल्हापुरात प्रथमच आयोजित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत उस्ताद झाकीर हुसेन आणि बासरीवाद पंडित राकेश चौरासिया या कलाकारांच्या तबला आणि बासरी जुगलबंदीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. हॉटेल सयाजी येथील लॉनवर आयोजित कार्यक्रमात तबल्याचा नादमधूर ठेका, बासरीवादनातून शास्त्रीय रागदारीची पेशकशने शनिवारची सायंकाळ सजली.

प्रेक्षकांनी तुडूंब भरलेल्या हॉटेल सयाजी येथील लॉनवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उस्ताद झाकीर हुसेन आणि राकेश चौरासिया यांचे आगमन झाले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटात दोन्ही कलाकारांचे स्वागत केले. गुणीदास फाऊंडेशनची दशकपूर्ती आणि ज्येष्ठ तबलावादक केशवराव धर्माधकारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'ताल सिद्धी' कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाने रसिकांवर मोहिनी घातली. झपताल, तीन ताल तसेच पेशकार, रेला यांचा खुबीने वापर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांच्या जादुई तबलावादनाचा आविष्कारांनी प्रेक्षक थक्क झाले. राग चंद्रकस सादर करताना या दोघा कलाकारांमधील रंगलेली जुगलबंदीने कार्यक्रम आणखी उंचीवर पोहचला. पंडित राकेश चौरासिया यांच्या बासरीवादनाने अनोख्या मैफलीला प्रारंभ झाला. त्यांनी बासरीवर राग वाचस्पतीमध्ये आलाप जोड आणि झपतालातील विलंबित गत सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. बासरी वादनातून विविध प्रकारे आलापी करुन कार्यक्रमात आणखी रंग भरला. दरम्यान गुणीदास फाऊंडेशनचे अध्यक्ष शिरीष सप्रे, संचालक योगेश कुलकर्णी यांनी स्वागत केले.

तत्पूर्वी, कोलकत्त्याच्या शास्त्रीय गायिका सुचिस्मिता दास यांनी उपशास्त्रीय गायन सादर केले. झपतालातील बंदिश आणि द्रुत त्रितालमध्ये राग केदार सादर केला. त्यानंतर 'याद पिया की आए' गझल सादर केली. त्यांना सारंगीवर दिलशादखान, हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी आणि तबला साथ ईशान घोष यांनी केली. माधव चिटणीस डॉ. अजित शुक्ल यांनी कलाकारांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिठीमध्ये जीवनविषयक व्यापक तत्वज्ञान’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लेखक दि. बा. मोकाशी यांच्या कथेवर आधारित चित्रपटनिर्मितीचा विचार गेली दहा वर्षे मनात होता. गेल्यावर्षी चित्रपट निर्मिती करायचे ठरविले. पण वेगळ्या विषयावरील सिनेमासाठी कुणी निर्माता तयार नव्हता. दुसरीकडे कलाकारांच्या तारखा निश्चित केल्या. याप्रसंगी डॉ. मोहन आगाशे, धनंजय कुलकर्णी यांनी सिनेमा निर्मितीला सुरुवात करा असे सांगितले. आगाशे यांनी निर्मितीचा भार उचलला. साधी, सखोल आणि मनाला भावणाऱ्या कथेवर आधारित 'दिठी' सिनेमात जीवनविषयक व्यापक तत्वज्ञान सामावले आहे' असे मत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.

सातव्या कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शनिवारी 'दिठी' सिनेमाच्या प्रदर्शनानंतर आयोजित वार्तालापमध्ये त्या बोलत होत्या. भावे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. त्या म्हणाल्या, 'मुळात सिनेमा ही सामूहिक कलाकृती आहे. सिनेमाशी निगडीत प्रत्येक माणूस हा कलावंत असतो. कलावंताची व्याख्या केवळ अभिनयापुरती समिती नसावी. दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलन, नेपथ्य, संगीतकार असे सिनेमाच्या प्रत्येक भूमिकेशी निगडीत काम करणारे सगळे हे कलावंतच आहेत. एकदिलाने काम करतात तेव्हाच उत्तम कलाकृती साकारते.'

लेखक मोकाशी यांच्या 'आता आमोद सुनासी आले' या कथेवर हा सिनेमा बेतलेला आहे. त्याला कोकणची पावसाळी पार्श्वभूमी आहे. वारकरी रामजी लोहारचा मुलगा पुरात वाहून जातो आणि त्याच्या श्रद्धा डळमळीत होतात. त्या श्रद्धांची पुनर्बांधणी 'दिठी'मध्ये पाहावयास मिळते. प्रेक्षकांशी संवाद साधताना भावे म्हणाल्या, 'आपण जे काम करतो त्यामधून शंभर टक्के आनंद स्वत:ला मिळाला पाहिजे ही कलाकृती निर्मितीमागील भावना आहे. शब्दांच्या भाषेपेक्षा दृकश्राव्यची भाषा अधिक परिणामकारक आणि प्रभावी आहे. त्यामध्ये शब्द कमी आणि शांतता अधिक असते. आणि शांतता अधिक बोलकी असते. सिनेमातील सहा व्यक्तीरेखेसोबतच गाय, पाऊस, नदी आणि आभाळही एक व्यक्तीमत्व म्हणून भेटतात. निसर्ग आणि माणसातील नातेसंबंध दृढ होतात. '

याप्रसंगी कॅमेरामन धनंजय कुलकर्णी, योगिनी कुलकर्णी यांनी सिनेमाच्या संदर्भातील आठवणी सांगितले. फेस्टिव्हलचे संयोजक चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. दिलीप बापट यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती निवडीसाठी पत्रव्यवहार सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तारीख देण्यासाठी महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. येत्या पंधरा दिवसांत सभापतिपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने सत्ता स्थापण्यास पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी पदांचा फॉर्म्यूला निश्चित केला आहे. त्यानुसार सेनेला कायमस्वरुपी परिवहन सभापतिपद देण्यात आले आहे. सेनेचे चार नगरसेवक असल्याने त्यांना विभागून पद दिले जात आहे. प्रथम नियाज खान व राहुल चव्हाण यांनी पद भूषविले. चव्हाण यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनाम दिला आहे. त्यानुसार रिक्त झालेल्या पदावर मंगळ‌ारी (ता. १२) होणाऱ्या महासभेत सदस्य निवड होईल. त्यानंतर सभापती निवड होईल. त्यासाठी विभागीय आयुक्तांकडे सभापती निवडीसाठी तारीख व वेळ मागवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरळसेवा भरतीसह करवाढीवर होणार चर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेची महासभा मंगळवारी (ता. १२) सकाळी ११.३० वाजता होणार आहे. महासभेत विविध विभागांनी सुचवलेल्या करवाढीवर व सरळसेवा भरतीमध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यावर चर्चा होईल. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे असतील.

महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी विविध विभागांनी करात वाढीचे प्रस्ताव स्थायी समितीला सादर केले. मालमत्ता कराचे दर मागील कराच्या दराप्रमाणे कायम ठेवण्याचा घरफाळा विभागाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या शिफारसींसह असून त्यावर चर्चा होईल. पाणीपुरवठा, नगररचना, इस्टेट व परवाना विभागाकडून आलेल्या करवाढीच्या प्रस्तावावर महासभेत चर्चा होणार आहे. बेरोजगार युवकांना सरळसेवा भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी सदस्य ठराव दाखल केला आहे. स्थायी समितीमध्ये महापालिकेच्या विविध विभागांनी सुचविलेल्या करवाढीचा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. पण चालू आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ करू देणार नसल्याचे सभापती शारंगधर देशमुख यांनी शुक्रवारीच स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवतरली श्वानांची अनोखी दुनिया

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॅनाइन क्लब ऑफ कोल्हापूर आयोजित ओबिडियन्स अँड चॅम्पियनशीप डॉग शोच्यानिमित्ताने शनिवारी श्वानांची अनोखी दुनिया अवतरली. पहिल्या दिवशी झालेल्या ओबिडियन्स शोमध्ये टाटा स्टीलच्या चार श्वानांनी बाजी मारली. रविवारी (ता. १०) ऑलब्रीड चॅम्पियनशीप डॉग शो होणार असून ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.

मार्केट यार्डातील लोणार वसाहत येथील गणेश लॉन्सवर ओबिडियन्स शोमध्ये १३ श्वान सहभागी झाले होते. यात आज्ञाधारक चाचणीमध्ये वेगवेगळ्या वयोगटासाठी चाचण्या घेण्यात आल्या. श्वान व मालक यांच्यात कसा एकोपा आहे, पट्टा न लावता श्वान मालकांबरोबर कसा चालतो, मालकाचे आदेश कसे पाळतो, फेकलेली वस्तू सहज कशी आणून देतो, मालकाची आज्ञा पाळतो का? याची चाचणी घेण्यात आली. सेंट बर्कमध्ये मालकाच्या शरीराच्या वासाचा रुमाल शोधण्याची परीक्षाही घेण्यात आली. ८० टक्के गुण मिळवलेल्या टाटा स्टीलच्या चार श्वानांनी स्पर्धेत बाजी मारली. बेल्जियम शेपर्ड जातीचे हे श्वान होते. रविवारी स्पर्धेचा शेवटचा व दुसरा दिवस असून सकाळी नऊ वाजल्यापासून ऑलब्रीड चॅम्पियन डॉग शो होणार आहे. देश विदेशातील विविध जातीचे श्वान पहायला मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images